Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘काळ्यापाण्या’च्या खाईतून ‘अभिनव’ची सुटका?

$
0
0

नाशिक : ब्रिटीश राजवटीपुढेही ज्या ‘अभिनव भारत मंदिर’ ऐतिहासिक वास्तूने कधी मान तुकवली नाही, त्या वास्तूवर नाशिक महापालिकेच्या ‘ब्लू लाईन झोन’या शिक्क्यामुळे नामोहरम होण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. ही वास्तू पुररेषेत येत असल्याने तिच्या जिर्णोद्धारास येत असलेला तांत्रिक अडसर त्यांच्या जयंतीच्या औचित्यावरच आज (२८ मे) मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच दूर होण्याची आशा सावरकरप्रेमींमध्ये एकटवली आहे. या ऐतिहासिक वाड्याचा काही भागही अखेरच्या घटका मोजत आहे.

सावरकर जयंतीचे औचित्य साधत त्यांच्या जन्मस्थानी भगूरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभिवादन करणार आहेत. तत्पुर्वी, अभिनव भारत मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांकडून गेल्या आठवड्यापर्यंत मुख्यमंत्र्यांकडे या मंदिराच्या जीर्णोध्दारातील तांत्रिक अडसर दूर करण्याकरिता सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे.

‘मित्रमेळा’ आणि ‘अभिनव भारत’ या संघटनांच्या स्थापनेची साक्षीदार असणारी ही तीळभांडेश्वर लेनमधील वास्तू जीर्णोद्धाराच्या निमित्ताने यापूर्वीही वारंवार चर्चेत आली. मनसेच्या सत्ताकाळात तर या वास्तूच्या पुनरुत्थानासाठी एकीकडे तब्बल ५० लाखांचा निधीही मंजूर झाला होता, पण दुसरीकडे वास्तू पुराच्या ‘ब्लू लाईन झोन’मध्ये असल्याचीही मेख मारली गेली होती. आता मात्र या वास्तूच्या घरात विराजमान पापग्रहास शहरात भाजपच्या तीन आमदारांसह राज्यात अन् केंद्रातसुद्धा भाजप सरकारचा जालीम उतारा असल्याने ‘ब्लू लाईन’ची तांत्रिक शांती होण्याची अपेक्षा अभिनव मंदिर ट्रस्ट व सावरकरप्रेमी बाळगून आहेत.


वास्तूबाबत भीती!

३० मे २०१६, ६ जून २०१६ आणि या ६ मे २०१७ रोजी अभिनव भारत मंदिर ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या विषयावर पत्र पाठवली आहेत. या ऐतिहासिक वास्तूचे पुनरुत्थान व्हावे, अशी मागणी पत्रांद्वारे करण्यात आली आहे. या वाड्याचा मागील भाग अखेरच्या घटका मोजत असल्याने यंदाच्या पावसाळ्यात तो कोसळण्याची शक्यताही मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.


स्वातंत्र्यवीरांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या या वास्तूचे पुनरुत्थान गरजचे आहे. भाजप सरकारने मनावर घेतल्यास पूररेषेसारखे तांत्रित अडसर विशेष निर्णयांतर्गत दूर होणे शक्य आहे.

- सूर्यकांत रहाळकर , अध्यक्ष, अभिनव भारत मंदिर ट्रस्ट, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्यांनी घेतली एकमुखी शपथ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

कर्जमाफीसह इतर मागण्यासाठी शेतकरी एक जूनपासून संपावर जात आहेत. तालुक्यातील गावागावात ग्रामपंचायत, सोसायटी स्तरावर बैठका होऊन संपावर जण्याबाबत ठराव करण्यात आले आहेत. निफाड येथे किसान क्रांतीच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत संपावर जाण्यासाठी एकमुखी शपथ घेतली. तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन यांच्यासह तालुक्यातील सर्वच नेत्यांनी किसान क्रांतीचा संप यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या आंदोलनाची धग गावागावांत पोहचविण्यासाठी निफाड तालुक्यातून २९ मे रोजी भव्य मोटारसायकल रॅली काढण्याचे नियोजन करण्यात आले.

बाजार समिती सभागृहात आयोजित किसान क्रांती नियोजन बैठकीस जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा बँकेचे माजी संचालक राजेंद्र डोखळे, पंचायत समितीचे सभापती पंडित आहेर, पंचायत समिती सदस्य सोमनाथ पानगव्हाणे, शिवा पा. सुराशे, अनिल कुंदे, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. जी. एन. शिंदे, योगेश रायते उपस्थित होते. अॅड रामनाथ शिंदे यांनी संपाचा उद्देश स्पष्ट केला.

लासलगाव बाजार समितीला निवेदन

एक जूनपासून होणाऱ्या संपात लासलगाव बाजार समितीने बाजार समितीचे सहभागी होऊन कामकाज बंद ठेवावे, अशा विनंतीचे निवेदन लासलगाव व परिसरातील टाकळी, कोटमगाव, खळकमाळेगाव, खानगाव येथील किसान क्रांतीच्या शेतकऱ्यांनी सभापती जयदत्त होळकर यांना दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्राह्मण समाजाचा आज वधू-वर मेळावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ आणि अनुपम शादी डॉट यांच्या संयुक्त विद्यमाने आज, रविवारी (दि. २८) ब्राह्मण समाजाचा वधू-वर मेळावा होणार आहे. त्र्यंबकरोडवरील हॉटेल एमराल्ड पार्क येथे दुपारी ४ वाजता होणाऱ्या या मेळाव्यास अभिनेता चिन्मय उद्गीरकरची प्रमुख उपस्थिती राहील. या मेळाव्यात राज्यभरातील वधू-वरांचा सहभाग राहणार आहे.

सुयोग्य जोडीदाराची निवड झाल्यास नवीन आयुष्याची सुरुवात चांगली होते. त्या दिशेने एक पाऊल टाकत ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ आणि अनुपम शादी डॉट कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी वधू-वर मेळाव्याला मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे ‌अनेक विवाह जमले आहेत. मेळाव्यानंतरसुद्धा विवाह जमविण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. या मेळाव्यात वधू-वरांना मोफत यादी दिली जाणार आहे. मेळाव्यात अनुपम शादी डॉट कॉम या वेबसाइटवर नावनोंदणी करून सदस्यांना सहभागी होता येईल. कार्यक्रमाच्या ठिकाणीदेखील सदस्यांना नोंदणी करून सहभागी होता येणार आहे. वधू-वर मेळाव्याबरोबरच ऑनलाइन वेबसाइट व मोबाइल अॅप सुविधा असल्यामुळे अनुपम शादी विवाह संस्थेकडून अनेक विवाह जुळले आहेत.

मेळाव्यात मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि नाशिक अशा विविध शहरांतील वधू-वर सहभागी होणार आहेत. या मेळाव्यात उपवर वधू-वरांना त्यांची ओळख, माहिती सांगून आपल्या जोडीदाराबद्दल असणाऱ्या अपेक्षा व्यक्त करता येणार आहेत. उपवर वधू-वरांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जोडीदार निवडता येणार आहे. यात ग्रॅज्युएट, डॉक्टर, इंजिनीअर, डिप्लोमा, डिग्री होल्डर, डॉक्टरेट, आयटी असे उच्चशिक्षित उमेदवार सहभागी होणार आहेत. या मेळाव्यामध्ये ब्राह्मण समाजातील जास्तीत जास्त उपवर वधू-वरांनी सहभागी व्हावेे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळांचा पत्रप्रपंच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांना पीककर्ज पुरवठा करणारी आणि शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेली नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक सध्या आर्थिक अडचणीत सापडली आहे. कर्जमाफीच्या आशेमुळे जिल्हा बँकेची वसुली ठप्प झाली असल्यामुळे याचा परिणाम पीककर्ज वाटपावर झाला आहे. परिणामी नाशिक जिल्ह्यातील शेतकरीवर्ग अडचणीत आल्याने शेतकरी आत्महत्येचे प्रमाणदेखील वाढले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेला तत्काळ पीककर्ज पुरवठा करण्यासाठी निधी द्यावा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे, की शेतकऱ्यांना पीककर्ज पुरवठा करणारी आणि शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेली नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक प्रचंड आर्थिक अडचणीत सापडली आहे. कर्जमाफीच्या आशेमुळे जिल्हा बँकेची वसुली ठप्प झाली आहे. यांचा परिणाम पीककर्ज वाटपावर झाला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. मात्र, जिल्हा बँकेच्या अडचणींमुळे पीककर्ज मिळण्याची शक्यता धूसर झालेली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांना खरीप असो की रब्बी, या हंगामांसाठी जिल्हा बँक पीककर्ज पुरवठा करीत असते. मात्र, नाशिक जिल्हा बँकेची वसुली रखडल्याने, तसेच बँकेच्या जुन्या नोटा बदलून न मिळाल्याने जिल्हा बँक अडचणीत सापडली आहे. बँकेचे व्यवहारदेखील ठप्प झालेले आहेत. पुरेसा चलनसाठा नसल्याने बँकेच्या रोखीच्या व्यवहारांवर बंधने आली आहेत.

शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून आगामी खरीप हंगामासाठी कर्जपुरवठा उपलब्ध होऊ शकणार नाही. कर्ज मिळावे यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी शासनाने जिल्हा बँकेला पीककर्जासाठी निधी उपलब्ध करून देण्याची नितांत आवश्यकता आहे.


...तरच खरिपासाठी पीककर्ज

सरकारने जिल्हा बँकेला निधी उपलब्ध करून दिला, तरच आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध होणार आहे. पीककर्ज न मिळाल्यास खरीप हंगाम धोक्यात सापडण्याची चिन्हे आहेत. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड संकटात सापडले असून, दि. १ जानेवारी २०१७ ते २० मे २०१७ दरम्यान जिल्ह्यात ३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी पीककर्ज मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे सरकारने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीककर्जासाठी जिल्हा बँकेला अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भुजबळ यांनी शेवटी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्नडिगांना मराठी दणका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या उपकनिष्ठ गटाच्या २८ व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत शनिवारी यजमान महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने कर्नाटकचा १४-११ असा पराभव केला, तर यजमान महाराष्ट्राच्या मुलींच्या संघानेही दिल्लीचे आव्हान १६-३ असे मोडीत काढले. या विजयासह यजमान महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

नाशिक जिल्हा खो-खो संघटनेतर्फे व नाशिक महापालिकेच्या सहकार्याने ही स्पर्धा सुरू आहे. आजच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्राच्या मुलांनी बलाढ्य कर्नाटकचे आव्हान संपुष्टात आणले. या पराभवासह कर्नाटकचे आव्हान संपुष्टात आले. महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या नाशिकच्या चंदू चावरेने संरक्षणात ३.३० मिनिटांची पळतीची वेळ नोंदवतानाच तब्बल १० गडी बाद करीत अष्टपैलू खेळाची चमकदार कामगिरी केली. महाराष्ट्राच्या सचिन आहेरने १.१० मिनिटे पळतीची वेळ नोंदवत तीन गडीही टिपले. तारशुभम थोरातने २ मिनिटांचा पळतीचा खेळ करताना दोन गडी बाद केले. तारमोहन चौधरीने दोन गडी बाड करून चांगली साथ दिली. या सांघिक कामगिरीमुळे महाराष्ट्राला कर्नाटकवर १४- ११ असा विजय मिळविता आला. बलाढ्य कर्नाटकची यंदाची सर्वांत खराब कामगिरी मानली जात आहे. इतर सामन्यात आंध्र प्रदेशने विदर्भाचा १०-०४ , कोल्हापूरने पुद्दुचेरीचा १४-१०, तेलंगणाने पश्चिम बंगालचा १२-०७ असा पराभव केला. मुलींमध्ये कर्नाटकने उत्तर प्रदेशला १२-०३, ओरिसाने विदर्भला १३-०६, झारखंडने गुजरातला १७-१६, तर केरळने हरियाणाला १०-०८ असे पराभूत करून उपउपांत्य फेरी गाठली.
महाराष्ट्राच्या मुलींनी दिल्लीचा १६-०३ असा दणदणीत पराभव केला. महाराष्ट्राकडून खेळताना रितिका मगदुमने २.२० मिनिटे पळतीचा खेळ करून दोन गडीही बाद केले. साहसी सर्जेने ३.२० मिनिटे पळतीची वेळ देतानाच तीन गडी बाद केले. गौरी शेंडेने धारदार आक्रमण करताना तीन गडी टिपले, तर साक्षी वाळेकरने १.१० मिनिटे पळतीची वेळ देताना दोन गडी बाद केले. ऋतुका राठोड (दोन गडी बाद), मयुरी पवार (२.३० मिनिटे), वैष्णवी पालवे (१.२० मिनिटे आणि १ गडी) यांच्या सांघिक खेळाच्या जोरावर उपउपांत्य फेरीत सहज प्रवेश केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डी.एल.एड.साठी ऑनलाइन प्रवेश

$
0
0

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाची माहिती संकेतस्थळावर

कॉलेज क्लब रिपोर्टर

बारावीचा निकाल झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी डी. एल. एड.चे प्रवेश सुरू होणार आहेत. ऑनलाइन स्वरूपात यासाठी अर्ज मागविण्यात येणार असून, त्याची प्रवेश प्रक्रिया शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जाहीर केली आहे. शैक्षणिक वर्ष २०१७-१८ साठी डी. एल. एड. प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाइन स्वरूपात घेण्यात येणार असून, याबाबत सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली व अध्यापक कॉलेजेसची यादी जाहीर करण्यात आली आहे.

मार्च २०१७ मध्ये झालेल्या बारावीच्या निकालानंतर लगेचच http://www.mscert.org.net या बेवसाइटवर डी. एल. एड प्रवेश अर्ज भरायचे आहेत. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या इच्छुकास आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, एमसीव्हीसी शाखेतील बारावी उत्तीर्ण असणे महत्त्वाचे आहे.

खुल्या प्रवर्गासाठी किमान ४९.५ टक्के तर मागासवर्गीयांसाठी ४४.५ टक्के गुण असणे आवश्यक असणार आहे. विद्यार्थ्याने संपूर्ण प्रवेश अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत व त्यासोबत अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या प्रतीसह स्वत:ला जिल्ह्यातील कागदपत्री पडताळणी केंद्रावर जावे लागेल. सर्व मूळ प्रमाणपत्रावरून पडताळणी करणे विद्यार्थ्यांची जबाबदारी असणार आहे. पडताळणी न केल्यास विद्यार्थ्याला प्रवेश प्रक्रियेतून बाद करण्याचे अधिकार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडे असणार आहे.

जिल्ह्यातील पडताळणी केंद्राची माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे. बारावीच्या निकालानंतर प्रवेशाबाबतचे सर्व अपडेट वेबसाइटवर अपलोड करण्यात येणार आहे.

फीसाठी डिजिटलायझेशन!

डी. एल. एडच्या प्रथम वर्षात प्रवेश घेण्यासाठी अर्ज केल्यानंतर प्रवेश अर्जाची फी डिजिटल स्वरूपात घेण्यात येणार आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड यासोबतच स्मार्टफोनवरील पेटीएम व इ-व्हॉलेटचा वापर विद्यार्थी करू शकतात. इतर कोणतीही सुविधा यासाठी देण्यात आली नसल्याने डी. एल. एडच्या प्रवेशासाठी डिजिटलायझेशेनेच फी आकारण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रखडलेल्या पर्यटन प्रकल्पांना मिळणार का बूस्ट?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये पर्यटनाला चालना मिळावी यासाठी बोटक्लब, ग्रेप पार्क सिटी, कलाग्राम व साहसी क्रीडा संकुल (अॅडव्हेंचर स्पोर्ट) सारखे प्रकल्प केवळ राजकीय इच्छाशक्तीमुळे रखडले आहेत. आज, रविवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाकडे लक्ष घालून चालना द्यावी, अशी अपेक्षा पर्यटकांकडून व्यक्त केली जात आहे.

बोट क्लबचे संपूर्ण काम पूर्ण झाले असूनही हा क्लब सुरू नाही. तर ग्रेप पार्क सिटी व साहसी क्रीडा संकुलाचे कामही ९० टक्के पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे कलाग्रामचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, केवळ केंद्राची ही योजना बंद पडल्यामुळे हे काम रखडले आहे. उर्वरित २० टक्के कामासाठी राज्य शासनाने निधी दिल्यास हे काम पूर्ण होणार आहे. बोटक्लबच्या ११ बोटीला पर्यावरण खात्याने परवानगी दिली आहे. निविदेसाठी राज्य शासनाकडे याची सर्व कागदपत्रे पाठवली असूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. भावली येथील प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया रखडली आहे.

अॅडव्हेंचर स्पोर्ट

या प्रकल्पाशेजारी असलेला गंगापूर धरणावरील साहसी क्रीडा संकुलातील अॅडव्हेंचर स्पोर्ट हा प्रकल्पही महत्त्वाकांक्षी आहे. मार्च २०१६ मध्ये याचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. गोवर्धन शिवारातील कलाग्राम हा प्रकल्पही रखडला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून तयार झालेले कलाग्राम पर्यटनासह कला, साहित्य व संस्कृती, व्यवसायाला वेगळी दिशा देणारे असूनही निधीअभावी रखडले आहे. केंद्र सरकारच्या उदासीन भूमिकेनंतर राज्य शासनानेही आवश्यक निधी दिलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑस्ट्रेलियात गुंजणार सावरकरांची गीते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑस्ट्रेलियामधील सिडनी या शहरात २८ मे रोजी वीर सावरकर विश्व साहित्य संमेलन आयोजित केलेले या साहित्य संमेलनात नाशिकच्या गायिका गीता माळी यांना वीर सावरकर यांनी लिहिलेली गीते, गाण्यासाठी ऑस्ट्रेलियात आमंत्रित करण्यात आलेले आहे.

साहित्य संमेलनास ऑस्ट्रेलियातील सर्व शहरातून तसेच देश विदेशातून सर्व वीर सावरकर साहित्य प्रेमी उपस्थित राहणार आहेत. अभिनेता शरद पोंक्षे, थोर विचारवंत सच्चिदानंद शेवडेकर यांचीही उपस्थिती असणार आहे. गायिका गीता माळी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे औचित्य साधून तेथील महाराष्ट्र मंडळाने सिडनी, मेलबर्न, ब्रिस्बेन अश्या वेगवेगळ्या मोठ्या शहरामध्ये त्यांच्या गायनाच्या स्वतंत्र मैफिली आयोजित केल्या आहेत. नाशिकमधून ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या त्या पहिल्याच गायिका आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दारणात बुडून चार मुलांचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

मित्राच्या वाढदिवशी दारणा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेली चार मुले पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी पळसे येथे घडली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. बुडालेल्या चार मुलांचे सायंकाळी उशिरापर्यंत शोधून काढण्यात अग्निशमन दल व नाशिकरोड पोलिसांना यश आले. सुमित राजेंद्र भालेराव (वय १५), कल्पेश शरद माळी (१५), रोहित आधार निकम (वय १४) व गणेश रमेश डहाळे (वय १७) अशी या बुडालेल्या मुलांची नावे आहेत.

सुमित भालेराव, कल्पेश माळी व रोहित निकम हे नाशिकरोडच्या जयरामभाई हायस्कूलचे विद्यार्थी आहेत, तर गणेश डहाळे के. जे. मेहता हायस्कूलमध्ये बारावी कॉमर्सच्या वर्गात शिकत होता. पळसे येथील दारणा संकुल येथे राहणाऱ्या शिवानंद गिरी याचा शुक्रवारी वाढदिवस होता. त्याचा वाढदिवस साजरा करण्याची तयारी सुरू होती. मात्र, त्याचे मित्र सुमित भालेराव, कल्पेश माळी, रोहित निकम व गणेश डहाळे या चौघांनी शिवानंदला शुक्रवारी दुपारी बाराच्या दरम्यान दारणा नदीपात्रात पोहण्यासाठी आग्रह धरला. कुणालाही पोहता येत नसल्याने शिवानंदने दारणा नदीकडे जाण्यास नकार दिला. शिवानंदचा सल्ला झुगारून हे चौघे शुक्रवारी दुपारी बाराच्या दरम्यान पळसे स्मशानभूमीजवळील दारणा पात्राकडे पोहण्यासाठी गेले. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या पालकांनी व त्यांच्या मित्रांनी मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, ही चारही मुले कुठेही आढळली नाहीत. त्यानंतर शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता या मुलांच्या पालकांनी नाशिकरोड पोलिसांना माहिती दिली.

नाशिकरोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज बिजली, पोलिस उपनिरीक्षक भीमराज गायकवाड, राकेश शेवाळे व इतर कर्मचाऱ्यांनी माहिती घेतल्यानंतर त्यांनी शनिवारी सकाळी दारणा नदीपात्रात शोधकार्यास सुरुवात केली. दारणा पात्रातून सुमित भालेराव, कल्पेश माळी व गणेश डहाळे या तिघांचे मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला शनिवारी यश आले. सायंकाळी उशिरा रोहित निकम याचा मृतदेह सापडला.

काठावरील कपडे पाहून अश्रू अनावर

दारणा नदीच्या काठावर या चारही मुलांपैकी तिघांनी आपले कपडे एका सिमेंटच्या पाइपावर काढून ठेवलेले होते. ते पाहून या मुलांच्या पालकांना अश्रू अनावर झाले. गणेश डहाळे याचे वडील रिक्षाचालक असून, तो त्यांचा एकुलता मुलगा होता. रोहित निकम याचे वडील एका कुरिअर कंपनीत काम करतात. घटनास्थळी नदीच्या काठावर जेवणाच्या प्लास्टिकच्या डिशेस व ग्लास आढळून आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचलित पद्धतींद्वारे जलसंवर्धन शक्य

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशाची सध्याची भौगोलिक परिस्थिती पाहता अनेक राज्यांत जुन्या प्रचलित पद्धती वापरण्यात येत आहेत. याच धर्तीवर महाराष्ट्रात प्रयोग केल्यास पाण्याचे संवर्धन होण्यास मोठा हातभार लागेल. पर्यायाने पाणी समस्या बहुतांश प्रमाणात सोडविण्यास मदत होईल, असे प्रतिपादन कोल्हापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण विद्याशाखेच्या वतीने शनिवारी ‘पाणी समस्या ः व्यवस्थापन व भविष्यातील आव्हाने’ या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यशाळेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर आणि शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी भूशास्त्र विभागप्रमुख प्रा. सतीश थिगळे, डॉ. राजेंद्र वडनेरे, डॉ. जयदीप निकम होते.

डॉ. पवार म्हणाले, की पाणी व्यवस्थापनाचे विशिष्ट पद्धतीने नियोजन न केल्यास भविष्यात पाण्यावरून युद्ध पेटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या पार्श्वभूमीवर मुक्त विद्यापीठाने आयोजित केलेली पाणी परिषदेसारख्या कार्यशाळांची आवश्यकता आहे. आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय समाजाची मानसिकतादेखील पाणीसंवर्धनासाठी महत्त्वपूर्ण आहे. केवळ शासकीय योजनांवर अवलंबून न राहता पाण्याच्या संवर्धनाबरोबरच त्याचे अचूक व्यवस्थापन करण्यासाठी आता समाजानेच पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. कुलगुरू डॉ. वायुनंदन यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

राज्यभरातून उपस्थिती

डॉ. उदय कुलकर्णी, डॉ. उदय पाटणकर, डॉ. खान डॉ. बरिडे, मनोहर पाटील यांनीही मार्गदर्शन केले. विद्यापीठाच्या शैक्षणिक सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत राज्यातील विविध कॉलेजेसचे प्राचार्य, प्राध्यापक, पाणी क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवक आणि संस्थांच्या अडीचशेहून अधिक प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. कार्यशाळा यशस्वीतेसाठी प्रा. राम ठाकर, संगीता देशपांडे, बाळू साबळे आदींनी प्रयत्न केले. डॉ. जयदीप निकम यांनी प्रास्ताविक केले. श्वेता जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्राजक्ता देशमुख यांनी आभार मानले.


‘ग्रामस्तरावर बनवावेत जलमित्र’

पाणीटंचाई दूर करण्यासाठी फक्त सरकारने प्रयत्न करणे पुरेसे नाही, तर राज्यात ग्रामस्तरावर जलमित्र तयार करणे ही काळाची गरज असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी भूशास्त्र विभागप्रमुख प्रा. सतीश थिगळे यांनी सांगितले.

प्रा. थिगळे म्हणाले, की गेल्या काही वर्षांमध्ये राज्याला दुष्काळाने वेढलेले होते. अद्यापही शेतकरी दुष्काळामुळे आत्महत्या करीत आहेत. अशा परिस्थितीत पाणी वाचविणे हे फक्त सरकारचेच नाही, तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, हाच संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण ‘जलमित्र होऊ, दुष्काळावर मात करू’ ही चळवळ उभी केली आहे. या अंतर्गत शाळा आणि कॉलेजांतील विद्यार्थ्यांना जलसाक्षर केले जाते. या संपूर्ण उपक्रमाची माहिती त्यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून दिली. यामध्ये त्यांनी गावात पाणी कोठे झिरपते याचा अंदाज घेऊन शेततळी, पाझरतलाव, बंधारे यासाठी उपयुक्त जागा कशी शोधायची, पाण्याचा ताळमेळ कसा साधायचा हे सांगून गावातील शाळांमध्ये पर्जन्यमापक यंत्रे बसवून त्याद्वारे वेळोवेळी नोंदी घ्यायला हव्यात, असेही सांगितले. या आधारे प्रत्येक गावाची महिन्याची आणि वार्षिक पर्जन्यवृष्टी काढून त्यातून गावपातळीवर जलमित्र तयार करून दुष्काळावर सहज मात करता येईल, असेही स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रमजान महिन्यास आजपासून प्रारंभ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

इस्लामिक कालगणनेनुसार आठवा महिना असलेल्या शआबान महिन्याची शनिवारी (दि. २७) सांगता होऊन नववा महिना अर्थात, रमजान सुरू झाल्याने आज, रविवारी (दि. २८) पहाटेपासूनच मुस्लिम बांधवांच्या ‘रोजा’स प्रारंभ झाला आहे. शनिवारी सायंकाळनंतर खास तरावीहची नमाज अदा करण्यात आली. समाजबांधवांनी एकमेकांना आलिंगन देत रमजान मुबारकच्या शुभेच्छा दिल्या.

मुस्लिम बांधवांत हा महिना अत्यंत पवित्र समजला जातो. या महिन्यात दिवसभर पाण्याचा एका थेंबही सेवन न करता पवित्र उपवास केले जातात. कारण, कुराण शरीफमध्ये नमाज, रोजा, कलमा, दान व हज या पाच सक्त ताकीद वर्णिल्या आहेत. पवित्र कुराणातील, ‘माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांनो, ज्या प्रमाणे तुमच्या पूर्वजांना उपवास करणे अनिवार्य होते, त्याप्रमाणे ते बंधन तुमच्यावरही आहे. कारण, तुम्हीदेखील पथ्य पाळणारे असायला हवे,’ हा आशयदेखील अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कुराणमध्ये म्हटल्याप्रमाणे रमजान महिना हा अल्लाहचा असून, यादरम्यान पापांपासून दूर राहावे. रोजा पाळल्याने वाईट प्रवृत्ती दूर जाऊन मनुष्य ईश्वराच्या निकट जाण्यास मदत होते. आरोग्याच्या दृष्टीनेही रोजे उपयुक्त मानले गेले आहेत.

दरम्यान, शहर परिसरातील मशिदींमधून रमजानचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, समाजबांधवांत त्यांचे वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार मुस्लिम बांधव या महिन्याभरात धर्मग्रंथांचे वाचन करणे, दिवसातून पाच वेळा नमाज अदा करणे, रात्रीच्या वेळी सहाव्या तरावीहच्या नमाजचे पठण करण्यावर अधिकाधिक समाजबांधव भर देताना दिसतात.

खजूर, दूध, फळे, मिठाईची रेलचेल

रमजानच्या काळात मुस्लिम बांधवांकडून सकाळच्या सहेरीच्या व सायंकाळच्या इफ्तारच्या वेळी विविध खाद्यपदार्थांना मोठी मागणी दिसून येते. या काळात दूध, केळी, खजूर व अन्य फळे, नानपाव, नानकटाई, विविध प्रकारची मिठाई आदींना बाजारपेठेत वाढती मागणी दिसून येते. बाजारपेठेप्रमाणेच असंख्य मशिदींच्या परिसरात सहेरी व इफ्तारसाठी लागणाऱ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात येतात.


ही ठरतात प्रमुख वैशिष्ट्ये

या महिन्यात सूर्योदयापूर्वी पहाटे ४ वाजता जेवण केल्यानंतर १४ ते १५ तास काहीही खाणे, पाणी पिणेदेखील वर्ज्य असते. त्यामुळे रमजान महिन्यात आधीचे दहा दिवस ईश्वरी कृपेचे, पुढील दहा दिवस भक्तीचे मानले जातात. शेवटच्या दहा दिवसांमध्ये अल्लाहकडून रोजा पाळणाऱ्यांचे संरक्षण केले जाते, अशी धारणा आहे. रमजान महिन्यातील ‘शब-ए-कार’ अर्थात, ‘बरकतवाली रात’ही महत्त्वाची मानली जाते. या रात्री एकाग्रचित्ताने इच्छापूर्तीसाठी अल्लाहकडे प्रार्थना केली जाते. आजारी, वृद्ध व्यक्ती, प्रवास करीत असलेले बांधव, गर्भवती व बाळंतीण महिलांना या उपवासातून सूट देण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फनिक्युलर ट्रॉली ऑगस्टमध्ये सुरू!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सप्तशृंग गडावरील देशातील पहिला महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या 'फनिक्युलर ट्रॉली' ची सेवा मिळण्यास भक्तांना ऑगस्टपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, सोशल मीड‌यिावर याबाबत मेसेज तसेच व्हीडिओ व्हायरल झाला असून तो केवळ चाचणीचा व्हिडीओ असल्याचे कळविण्यात आले.

पावसाळा संपल्याशिवाय ट्रॉलीचा वापर होणे शक्य आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून ट्रॉल कधी सुरू होणार याकडे डोळा लावून बसलेल्या भक्तांना अजून तीन महिने वाट पहावी लागणार आहे. मंदिराच्या पायथ्यापासून ते मंदिराच्या सभामंडपापर्यंत सुयोग गुरुबक्षाणी कंपनीच्या माध्यमातून खासगीकरणातून फनिक्युलर ट्रॉलीचे काम पूर्ण झाले आहे. सर्व प्रकारच्या चाचण्या झाल्या असून, आवश्यक बांधकाम व सुविधा पुर्णत्वास आल्या

आहेत. वर्षभरापूर्वी कोलकाताहून दोन वातानुकुलित ट्रॉलींच्याही वेगवेगळ्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यात अंतिम चाचणी घेण्यासाठी जानेवारी २०१७ मध्ये कंपनीने परदेशातून अभियंत्यांनाही बोलाविले होते. या अगोदर गुढिपाडव्यास व त्यानंतर १ मे स ही ट्रॉली भाविकांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुत्रांकडून देण्यात आली होती. मात्र हे दोन्हीही मुहूर्त टळले गेले असून, आता परदेशी अभियंत्यांच्या चाचणीस एक ते दीड महिना लागण्याची शक्यता कंपनीकडून वर्तविण्यात येत आहे. हा प्रकल्प कधी सुरू होईल याकडे लक्ष लागले आहे. दिरंगाई का होत आहे याबाबत खुलासा करावा, अशी मागणी छावा संघटनेचे प्रदीप पगार यांनी केली आहे. संबंधित ट्रॉली सुरू होण्याआधी लोकार्पण सोहळा होईल. भाविकांनी अफवा आणि सोशल मीडियावरील व्ह‌डिीओवर विश्वास ठेवून नये, असे ट्रस्टने कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावरकरांवर शंका घेणारेच देशद्रोही

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या देशभक्तीवर शंका उपस्थित करणारे आणि अंदमानच्या कारागृहातून सावरकरांच्या नावाची पट्टी काढणारे काँग्रेसचे तत्कालीन नालायक मंत्री हेच खरे देशद्रोही आहेत, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दहा दिवस तरी काळ्या पाण्याची शिक्षा भोगवून दाखवावी, असे आवाहन फडणवीस यांनी तत्कालीन मंत्री मणिशंकर अय्यर यांना दिले.

सावरकरांच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांचे जन्मगाव भगूर येथे विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सावरकर वाड्याला भेट देऊन अभिवादन केले. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मोत्सव समितीचे निमंत्रक प्रसाद लाड, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, सहायक जिल्हाधिकारी अमोल एडके, भगूरच्या नगराध्यक्षा अनिता करंजकर आदींसह मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी, मुख्यमंत्र्यांनी भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाला भेट देत पाहणी केली. त्यानंतर स्मारकामधील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समाजातील जातीभेद, विषमता याबरोबरच रुढी, परंपरा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. सावरकरांसारखा दुसरा स्वातंत्र्य सैनिक होणे नाही. देशभक्त, कवी, समाजसुधारक असलेल्या सावरकर यांच्यासारख्या भारतमातेच्या तेजस्वी सुपुत्राच्या घराचे दर्शन मंदिराच्या दर्शनापेक्षा जास्त पवित्र असल्याची भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.

भारतभूमीला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी सावरकरांनी आपले जीवन मातृभूमीला अर्पण केले. ते क्रांतिकारकांचे प्रेरणास्त्रोत होते. त्यांच्या तेजाने क्रांतिकारकांची पिढी निर्माण करण्याचे कार्य केले. अनेकदा अपमान आणि अन्याय सहन करून ही देशसेवेचा विचार सावरकरांनी कधीच ढळू दिला नाही. हे त्यांच्या जीवनातील मोठेपण होते. अंदमान येथे काळ्यापाण्याची शिक्षा भोगतांना भारतमातेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सावरकर सतत कार्यरत राहिले. इंग्रजांनी क्रांतिकारकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी अनेकदा त्यांचा तेजोभंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी परिस्थितीला शरण न जाता तरुण पिढीत देशभक्तीचे स्फूल्लिंग चेतविले. त्यांच्या तेजाने क्रांतिकारकांची वसाहत निर्माण करण्याचे कार्य केले. अंदमानच्या कारागृहातही त्यांनी कैदांना एकत्र करून देशभक्तीचे धडे दिले. देशात जातीव्यवस्था, रुढी व परंपरा आहे तोपर्यंत भारत गुलाम राहील, याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे त्यांनी या परंपरा तोडण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन त्यांना अभिप्रेत असलेले विचार अनुसरण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. सावरकरांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख करून त्यांनी मराठी भाषेला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही सावरकरांच्या महान कार्याची दखल पाहिजे, तशी घेतली गेली नाही, अशी खंतही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी पालकमंत्री महाजन म्हणाले, की सावरकरांनी त्याग, देशप्रेम व सहनशिलतेची शिकवण दिली. त्यांचा जीवनलेख सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. सावरकारांसारखे राष्ट्रप्रेमी भगूरच्या मातीतून घडले याचा जिल्हावासीयांना अभिमान आहे. त्याग आणि सहनशीलतेची शिकवण देणाऱ्या सावरकरांच्या स्मारकाचे जतन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच ६५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती त्यांनी दिली.

काँग्रेसचे मंत्री देशद्रोही

काँग्रेसने सावरकरांना कधीही स्वीकारले नाही. सावरकर यांच्यावर कायम अन्याय झाला. १९४७ च्या आधी ब्रिटिशांनी अन्याय केला. त्यानंतर राजकारण्यांनी अन्याय केला. त्या कालच्या राज्यकर्त्यांना सावरकर यांच्या प्रतिभेतून आपण झाकोळून जाऊ ही भीती होती. म्हणूनच त्यांनी सावरकरांना कधी मोठे होऊ दिले नाही. त्यांच्या काव्यपंक्ती तर एका तत्कालीन नालायक मंत्र्याने काढून टाकल्या. एसी गाड्यातून फिरणाऱ्या या मंत्र्यांनी दहा दिवस तरी अंदमानला जाऊन राहावे, असे खुले आव्हान देत मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता काँगेस आणि मणीशंकर अय्यर यांच्यावर टीका केली.

संग्रहालयासाठी मदत

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान असलेल्या भगूरमध्ये देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी संग्रहालय उभारण्याची मागणी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्याकडे केली. मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या मागणीला प्रतिसाद दिला संग्रहालय झाले पाहिजे असे सांगत, संग्रहालयाची संकल्पना तयार करा, सरकार आपल्या पाठीशी असल्याचे सांगून योग्य ती मदत दिली जाईल, असे आश्वासन यावेळी दिले.

मंदिरापेक्षा पवित्र स्थळ

सिन्नर फाटा : स्मारकस्थळी अभिप्राय नोंदवहीत मुख्यमंत्र्यांनी अभिप्राय नोंदविला. तेजस्विता, तपस्विता आणि त्यागाचे मूर्तीमंत उदाहरण असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर लक्षावधी क्रांतिकारकांचे प्रेरणास्त्रोत होते. बारा वर्षांपेक्षा अधिक काळ अंदमानच्या शिक्षेची तमा न बाळगता प्रखर तेजाने इंग्रजी साम्राज्याविरोधातील मशाल तेवत ठेवणारे देशभक्त, कवी, समाजसुधारक असलेल्या सावरकर यांच्यासारख्या भारतमातेच्या तेजस्वी सुपुत्राच्या घराचे दर्शन मंदिराच्या दर्शनापेक्षा जास्त पवित्र आहे, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या अभिप्रायात म्हटले आहे.

शिवसेना खासदार-आमदारांची दांडी

भगूरमध्ये झालेल्या या विशेष सोहळ्यास शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे तसेच नाशिकरोड-देवळाली कॅम्पचे आमदार योगेश घोलप तसेच ‌भगूरवासीय व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांची अनुपस्थिती दिसून आली. याबाबत खासदार गोडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भूगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेला कार्यक्रम सरकारचा नव्हे तर भाजपचा वैयक्तिक कार्यक्रम होता. ‍शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आगमनापूर्वीच सावरकरांच्या प्रतिमेला त्यांच्या जन्मस्थळी जाऊन अभिवादन केल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, भाजप किंवा जिल्हा प्रशासनाकडून शिवसेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नसल्याची उपस्थितांमध्ये चर्चा रंगली होती.

जिल्हा बँकेला मदत देणार

नाशिक : जिल्हा बँक आर्थिक संकटात सापडली आहे. या बँकेला आर्थिक मदतीसंदर्भात विचारले असता, मुख्यमंत्र्यानी बँकेला आर्थिक मदती संदर्भात निश्चित मार्ग काढू, असे आश्वासन दिले आहे. ‘एसएलडीसी’ या योजनेंतर्गत जिल्हा बँकेला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना वेळे‌त पिककर्ज मिळवून देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कळीच्या प्रश्नाला बगल

नाशिक : दाऊदच्या नातेवाइकाच्या लग्नाला हजेरी लावणाऱ्या पालकमंत्री महाजन यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांच्या हजेरीवर मुख्यमंत्र्यानी चुप्पी साधली. भाजप नेत्यांची हजेरी आणि भाजप नगरसेवकाच्या अटकेवर प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्र्यानी त्या प्रश्नांवर बगल दिली.

मुख्यमंत्री उवाच...

मंदिरात गेल्यावर येते त्यापेक्षा पवित्र भावना मला सावरकर वाड्यात गेल्यावर जाणवली
सावरकर व्यक्ती नव्हे संस्था होते
सशस्त्र क्रांतीच्या लढ्याला सर्वोतोपरी मदत सावरकरांची
सावरकर तेज पुरुष होते, क्रांतिकारकांची वसाहत तयार केली
रोटी बंदी, बेटी बंदी, परदेश बंदी सावरकरांनी उठवली
१८५७ चा लढा सैनिकांच बंड नाही स्वतंत्र युद्ध होत हे सावरकरांनी सर्वप्रथम समाजाला सांगितले
मराठीतले अनेक शब्द सावरकरांची देणगी
१९४७ पूर्वी इंग्रजांनी आणि नंतर स्वकियांनी सावरकरांवर अन्याय केले
सावरकरांना देशद्रोही ठरवणारे अनेक वर्षे सत्तेत मंत्री होते, लोकांनी त्यांना आता घालवले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बीडीएस’मध्ये उज्ज्वल करिअरच्या संधी उपलब्ध

$
0
0

प्रतीक गंगेले, कॉलेज क्लब रिपोर्टर

दंतवैद्यकशास्त्राला (बीडीएस) अलिकडील कालावधीमध्ये खूपच महत्त्व आले आहे. केवळ दुखण्यावरील उपचार या विषयापलिकडे जाऊन सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीनेही या शाखेला महत्त्व दिले जाते. शिवाय, बदलती जीवनशैली व सकस आहार घटकांच्या परिणामी दंतविषयक समस्यांचा सामना करणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त अन् डॉक्टरांची संख्या अत्यल्प अशी स्थिती आहे. परिणामी, बीडीएस या दंतवैद्यक शाखेत करिअरची मोठी संधी दडली आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. संजय भावसार यांनी केले.

महाराष्ट्र टाइम्सच्या कॉलेज कॅम्पस आणि पंचवटी कॉलेज यांच्या वतीने आयोजित करिअर मेळाव्यातील व्याख्यानात ते बोलत होते. ‘बीडीएस शाखेतील करिअर व प्रवेश प्रक्रियेची माहिती’ या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की डॉक्टरी व्यवसाय हा केवळ पत आणि प्रतिष्ठेचाच नाही तर तो प्राधान्याने सेवेचा आहे. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करण्याचा मानस असणाऱ्यांच्या अंगी सेवाभाव असणे ही सुध्दा महत्त्वाची पात्रता आहे. अकरावी व बारावीस सायन्स शाखेत सखोल अभ्यासाचा पाया तयार करणे महत्त्वाचे ठरते.

या शिक्षणात अभ्यासासोबतच कौशल्य विकसनास विशेष महत्त्व आहे. कौशल्याशिवाय यात तग धरणे शक्य नाही. त्यामुळे संयम ठेवून नवी कौशल्य आत्मसात करायला हवी. डॉक्टर व्यवसायाच्या पलिकडे या विषयातील उच्च शिक्षणानंतर आरोग्य शिक्षण क्षेत्रातही अनेक संधी उपलब्ध आहेत. तर संशोधनात रस असणाऱ्या विद्यार्थ्यांनी दंत आरोग्यशास्त्रात संशोधन केल्यास आगामी पिढ्यांसाठी तो मोलाचा ठेवा राहील, असेही डॉ. भावसार म्हणाले. त्यांनी यावेळी बीडीएस प्रवेश प्रक्रिया, नीट परीक्षेची तयारी, कॉलेजेसचे फॉर्म भरतांना घ्यायची काळजी आदींबाबत माहिती देतानाच पालकांच्या शंकांचे निरसन यावेळी डॉ. भावसार यांनी केले.

आजच्या कार्यक्रमाचा मला उपयोग झाला, मेडिकल फिल्डमध्ये जाण्याबाबत अनेक बाबींची माहिती माझ्याकडे नव्हती. पण आता त्याबाबत आजच्या सत्रात पूर्ण माहिती मिळाली. एक करिअर म्हणून मी ‘बीडीएस’चा पण विचार करू शकते. प्लॅनेट कॅम्पस हा मुलांसाठी फायदेशीर उपक्रम आहे.
- युक्ती पाटील, विद्यार्थिनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फार्मसीच्या विद्यार्थ्यांना स्कोप

$
0
0

स्वप्निल देवकर, कॉलेज क्लब रिपोर्टर

औषधनिर्माणशास्त्रासह (फार्मसी) आरोग्य क्षेत्रात वेगाने प्र्रगती होत आहेत. जागतिक स्तरावर देशांतर्गत वाढणारे सहकार्य आणि निर्माण होणाऱ्या व्यावसायिक संधींच्या परिणामी फार्मसी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. यातून फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेण्यासाठी फार्मसी आणि आरोग्य क्षेत्राची करिअरसाठी निवड करावी, असे प्रतिपादन पंचवटी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. आर. तांबे यांनी केले.

महाराष्ट्र टाइम्सच्या प्लॅनेट कॅम्पस आणि महात्मा गांधी विद्यामंदिर यांच्या वतीने आयोजित करिअर मेळाव्याच्या मालिकेत डॉ. तांबे यांचे व्याख्यान झाले. ‘फार्मसी आणि आरोग्य क्षेत्रातील करिअर संधी’ या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना विविध पैलू उलगडून दाखविले. फार्मास्युटिकल क्षेत्रात अनेक बड्या कंपन्या देशात विशिष्ट भागांमध्येच विस्तारल्या होत्या. या पुढील काळात वाढत्या संख्येमुळे या कंपन्या इतर शहरांमध्येही विस्तारीत होतील. परिणामी अनुभवी व कौशल्यपूर्ण मनुष्यबळास यात कायम वाढती मागणी राहील, असे ते म्हणाले. फार्मसी अभ्यासक्रमांसाठी आवश्यक असणारी पात्रता, एन्टरन्स परीक्षा, या परीक्षेची तयारी, गुणवत्तायादी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, आरक्षण तपशील याचीही यावेळी माहिती देण्यात आली. ‍

फसव्या संस्थांचा धोका

बी.फार्मसीनंतर एम. फार्मा, एमएस, एमबीए, एमटेक, पीएचडी असे पर्याय खुले आहेत. मात्र, या शाखांमध्ये प्रवेश घेताना दलालांशी गाठ पडून आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपण प्रवेश घेत असलेल्या कॉलेजच्या परवानग्या, तेथून होणारी प्लेसमेंट, फी स्ट्रक्चर , फी भरण्याचे इन्स्टॉलमेंटसारखे पर्याय, स्कॉलरशीप आदी गोष्टी तपासून पहाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

‘जेनरिक’ही करिअरसाठी पर्याय

सध्या जेनरिक औषधांची बाजारातील मागणी वाढत असल्याने या क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअर करण्यासाठी वाव आहे. स्वतःचा बिझनेस मेडिकल, याव्यतिरिक्त शासकीय क्षेत्रात ड्रग इन्सपेक्टर, एफडीए, एअर इंडियासारख्या संस्थांमध्ये नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. औद्योगिक क्षेत्रात रिर्सच अॅण्ड डेव्हलपमेंट, क्वालिटी अॅश्युरन्स, क्वालिटी कन्ट्रोल असे अनेक ठिकानी विद्यार्थी आपले करियर घडवू शकतात. अॅडमिशन घेतेवेळी सरकारच्या जीआरनुसार विद्यार्थ्याजवळ मतदान ओळखपत्र असले पाहिजे. ते नसेल तर किती दिवसात ते काढले जाईल, हे लिहून देणे बंधनकारक असल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

जूनमध्ये ‌सेमिनार

महाराष्ट्र टाइम्स ‘प्लॅनेट कॅम्पस’ या उपक्रमांतर्गत महात्मा गांधी विद्यामंद‌रिच्या पंचवटी कॉलेजमध्ये २ व ३ जून रोजी करिअर गाईडन्स सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकमधील अनेक भागांतून विद्यार्थी व पालकांकडून ‘मटा’च्या पुढाकाराने घेतल्या जाणाऱ्या प्लॅनेट कॅम्पस सेमिनारला चांगला प्रतिसाद दिला. या उपक्रमाच्या पुढील टप्प्यात पंचवटी कॉलेजमध्ये २ व ३ जून रोजी हॉटेल मॅनेजमेंट, अॅग्रीकल्चर, मॅनेजमेंट, फाइन आर्टस या विषयांवरील तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. पालकांसह विद्यार्थ्यांसाठी हे सेमिनार मोफत आहेत. या कार्यक्रमांचा करियरबाबत जागरुक आणि उत्सूक असलेल्या विद्यार्थी व पालकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीन हजार उमेदवारांची एमपीएससी परीक्षेला दांडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) रविवारी राज्य ऊत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षकपदासाठी रविवारी (दि. २८) घेण्यात आलेल्या परीक्षेला तीन हजार १२० उमेदवार गैरहजर राहिले. परीक्षा प‍्रक्रिया शांततेत पार पडली असून नऊ हजार ३७६ उमेदवारांनी ही परीक्षा दिल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक पदासाठी रविवारी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला जिल्ह्यातून १२ हजार ५०० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. या परीक्षेला नऊ हजार ३७६ उमेदवार सामोरे गेले तर तीन हजार १२० उमेदवार गैरहजर राहिले. शहरातील ३१ केंद्रावर सकाळी ११ वाजता ही परीक्षा झाली. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी ९०० अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यंदा प्रथमच परीक्षेपूर्वी उमेदवारांकडून ओळखपत्र म्हणून आधारकार्ड किंवा पॅनकार्डची झेरॉक्स घेण्यात आली. या ओळखपत्राच्या झेरॉक्सवर उमेदवारांचा परीक्षा क्रमांक, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका क्रमांक आणि स्वाक्षरी घेण्यात आली. बहुतांश परीक्षाकेंद्रांवर विद्यार्थ्यांना पिण्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समृद्धी’बाधित शेतकऱ्यांना रोखले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समृध्दी महामार्गाला विरोध दर्शविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भगूर येथील सभेला जात असलेल्या सहा शेतकऱ्यांना पोलिसांनी रस्त्यातच अडवित ताब्यात घेतले. सरकार पोलिसांच्या माध्यमातून दडपशाही करीत असल्याचा आरोप करीत संतप्त शेतकऱ्यांनी निषेध नोंदविला. ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांना सोडावे, अशी मागणी करीत देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनच्या आवारात मोठ्या संख्येने शेतकरी जमले. त्यामुळे काहीवेळ गोंधळाची परिस्थ‌िती निर्माण झाली.

जन्मोत्सवानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी सकाळी नाशिकमध्ये दाखल झाले. भगूर येथे सावरकरांच्या जन्मस्थळी हा जाहीर कार्यक्रम होता. आपल्या व्यथा मुख्यमंत्र्यांपुढे मांडता याव्यात यासाठी बाधित शेतकरी आणि त्यांची संघर्ष समिती दोन दिवसांपासून भाजप पदाधिकारी आणि पोलिसांकडे पाठपुरावा करीत होती. परंतु, चर्चेसाठी त्यांना निश्च‌ित वेळ देण्यात आली नाही. भेट होईल की नाही याबाबत साशंक असलेल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भगूर येथील सभेला हजेरी लावण्याचा निर्णय घेतला. सभास्थळी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न होता. मुख्यमंत्र्यांच्या मार्गावर शेतकऱ्यांची गर्दी वाढू लागली. सुमारे १०० शेतकऱ्यांचा जमाव येथे जमला. त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिवडे येथील ज्ञानेश्वर चव्हाणके या शेतकऱ्यासह सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये दिवसभर बसवून ठेवले. अनुचित प्रकार घडण्याची शक्यता गृहीत धरून ही कारवाई करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला. पोलिसांच्या या कारवाईचा समृध्दी महामार्ग शेतकरी संघर्ष समितीने निषेध नोंदविला.

शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

भगूरपासून अवघ्या १० ते १५ किलोमीटरवर पांढुर्ली आणि शिवडे ही गावे आहेत. या परिसरातून समृध्दी महामार्ग जात असून तेथेच त्यास अधिक विरोध होतो आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस काय भूमिका मांडतात, समृध्दी महामार्ग आणि शेतकऱ्यांच्या समस्या याविषयी काय बोलतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. सिन्नरसह इगतपुरी तालुक्यातील अनेक शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी भगूर येथे आले होते. परंतु, पोलिसांनी पिटाळून लावल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

चर्चेसाठी गेस्ट हाऊसवर या असे आम्हाला सांगितले जाते. त्याचवेळी शेतकऱ्यांचा एकमेकांशी संपर्क होणार नाही याची काळजी घेऊन त्यांना पोलिस ताब्यात घेतात. सरकार व प्रशासनाच्या अशा रणनीतीतून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजप सरकारला जनतेशी संवाद साधायचा आहे का असा प्रश्न उपस्थ‌ित होतो.
- राजू देसले, निमंत्रक शेतकरी संघर्ष समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शेतकऱ्यांशी संपाबाबत चर्चा’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कर्जमाफीसह विविध मुद्यावर राज्यातील शेतकऱ्यांनी संपाची हाक दिली असून हा शेतकरी संप मागे घेण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर चर्चा करत असून त्यावर तोडगा काढला जाईल, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

समृद्धी महामार्गात विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचे पाच वर्षात चित्र बदलण्याची क्षमता असून शेतकऱ्यांच्या समाधानाशिवाय व जबरदस्तीने जमीन संपादित करणार नाही. समृद्धी महामार्गाची केवळ ३० हेक्टर क्षेत्राचीच मोजणी शिल्लक असून मोजणीशिवाय चर्चा कशी होणार? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे. महापालिका कार्यालयात बैठकीनंतर मुख्यमंत्र्यानी शेतकऱ्यांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले. शेतकरी संपाबाबत कृषिमंत्री स्वतः शेतकऱ्यांशी चर्चा करत आहेत. काही शेतकऱ्यांशी चर्चा झाली असून काहींना चर्चेचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार संवेदनशील आहे. समृद्धी महामार्गासाठी सातशेपैकी ६७० किलोमीटर मार्गाची मोजणी झाली आहे. केवळ ३० किलोमीटरचे अंतर शिल्लक असून त्यासाठी शेतकऱ्यांवर जबरदस्ती केली जाणार नाही, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवेदन न स्वीकारता मुख्यमंत्री परतले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांना उद्‍ध्वस्त करणारा समृध्दी महामार्ग रद्द करावा तसेच राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सुरू असलेला अत्याचार त्वरित थांबवावा, अशा मागणीचे निवेदन घेऊन मुख्यमंत्र्यांमागे फिरणाऱ्या शेतकऱ्यांची रविवारी घोर निराशा केली. मुख्यमंत्र्यांशी चर्चा दूरच त्यांनी निवेदनही न स्वीकारल्याचा आरोप समृध्दी महामार्ग संघर्ष समितीने केला आहे. भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि पोलिसांनी‌ही चर्चा घडवून आणू, असे आश्वासने देत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याबद्दलही नाराजी व्यक्त होते आहे.

नागपूर ते मुंबई महामार्गासाठी राज्यात हजारो हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातून १०१ किलोमीटरचा महामार्ग जाणार असून त्यासाठी जिल्ह्यातील बागायती जमिनी संपादित करण्याचा घाट प्रशासनाकडून घातला जातो आहे. इगतपुरी तालुक्यातील मोठे क्षेत्र यापूर्वीही विविध प्रकल्पांसाठी संपादित झाल्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा समितीचा प्रयत्न होता. जमीन मोजणीसाठी पोलिस बळाचा वापर करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. समृध्दी महामार्गाला लेखी हरकती घेऊनही त्याची प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. समृध्दी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा पोलिसांनी शारिरीक व मानसिक छळ केला. त्यांच्यावर चाप्टर केसेस दाखल केल्या अशी कैफियत या निवेदनातून मांडण्यात आली होती.

सिन्नर तालुक्यातील शिवडे परिसर बागायती आहे. त्यावर एक हजारहून अधिक शेतकऱ्यांची उपजिविका अवलंबून आहे. समृध्दी महामार्गामुळे सामाजिक, आर्थिक प्रश्न निर्माण झाले असून नवीन महामार्ग रद्द करून आहे. त्याच मार्गाचे रुंदीकरण करावे, असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांपुढे या निवेदनाद्वारे ठेवण्याचा समितीचा प्रयत्न होता. परंतु, भगूरपासून गेस्ट हाऊसपर्यंत वारंवार पाठपुरावा करूनही मुख्यमंत्र्यांची भेट होऊ न शकल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली.

‘राष्ट्रवादी’च्या महिला पदाधिकाऱ्यांकडूनही निषेध

नाशिक : जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकरी कर्जमुक्ती, भगूर शहरातील नागरिकांच्या समस्यांबाबत निवेदन देण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, आपणास अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांना दिलेले आपले निवेदन वाहनातून बाहेर फेकण्यात आल्याचा दावाही बलकवडे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांना मनोरंजनाच्या कार्यक्रमास हजेरी लावण्यास वेळ मिळतो; परंतु आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या व्यथा समजून घेण्यास वेळ नाही, असा आरोप करीत निषेध नोंदविण्यात आला. यावेळी गोरख बलकवडे, विशाल बलकवडे, सायरा शेख, मुन्ना अन्सारी, प्रशांत बच्छाव, शहराध्यक्ष मुन्ना दोंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अबब, १८ हजार कोटींची मागणी!

$
0
0

नाशिक : शहराच्या विकासासाठी महापालिका प्रशासननाकडून दोन हजार १७३ कोटींचा विकास आराखडा सादर केला असतांनाही, दत्तक नाशिकच्या विकासासाठी महापौर रंजना भानसी यांनी मुख्यमंत्र्याकडे चक्क १८ हजार कोटींच्या आर्थिक मदतीची मागणी केली आहे. महापौरांच्या या अवाढव्य मागणीमुळे मुख्यमंत्र्यासह सत्ताधारी भाजप पदाधिकारीही भांबावले. या भल्या मोठ्या मागणीमुळे मुख्यमंत्र्यानी आर्थिक मदतीचा हात आखडता घेतल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

दत्तक नाशिकच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणीस यांनी रविवारी महापालिकेला भेट देत सद्यस्थितीचा आढावा घेतला. नाशिकच्या विकासासाठी पाच वर्षात नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, प्रशासनाने दोन हजार १७३ कोटींचा कृती आराखडा तयार केला होता. बैठकीत या आराखडा सादरीकरणानंतर महापौर भानसी यांनी मुख्यत्र्यांकडे शहराच्या विकासाठी भरीव अशी १८ हजार कोटी रुपयांची मागणी केली. यात मेट्रो रेल्वेसाठी दहा हजार कोटी, रिंगरोड उड्डाणपूलासाठी एक हजार कोटी, जैवविविधता संर्वधनासाठी पाचशे कोटी, सीसीटीव्ही पाचशे कोटी, मलनिस्सारणसाठी एक हजार कोटी, भूसंपादन कामासाठी एक हजार कोटी, साधुग्राम जागा आरक्षणासाठी अडीच हजार कोटी, विद्युत विभागासाठी एक हजार कोटींची मागणी केली आहे. तसेच जलसंपदाकडून पाणीपट्टीपोटी आकारण्यात येणारे ५२ कोटी माफ करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महापौरांच्या या भल्या मोठ्या आर्थिक मदतीच्या पत्राकडे पाहिल्यावर मुख्यमंत्र्याचे भुवया उंचावल्या. याउलट मुख्यमंत्र्यानी महापौरांना उपदेशाचे डोस पाजत, लंडनच्या महापौरांचा दाखला देत, स्वतःच्या सोर्सेसमधून शहर विकास करण्याचा सल्ला दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images