Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

​ पंचवटीतील तरुणीची एकलहरेत हत्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

एकलहरे येथील किर्लोस्कर कंपनीच्या कंपाउंडलगत मृतावस्थेत आढळून आलेल्या तरुणीची ओळख पटली आहे. हर्षदा भास्कर अहिरे (२१, रा. आकाश पेट्रोलपंपजवळ, दिंडोरी रोड, पंचवटी) असे असून या तरुणीचा सोमवारी रात्री धारदार शस्त्राने खून करून तिला जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी आरोपींच्या तपासासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.

किर्लोस्कर कंपनी कंपाउंडजवळ आणि गवळीबाबा मंदिरासमोरील जागेवर जळालेल्या अवस्थेतील मृतदेह असल्याची माहिती मंगळवारी सकाळी नाशिकरोड पोलिसांना मिळाली होती.

पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, उपायुक्त (गुन्हे) विजय मगर, सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर, नाशिकरोडचे पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, उपनगरचे बाजीराव महाजन, अंबडचे मधुकर कड, देवळालीचे सुभाष दौले, गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस निरिक्षक नारायण न्याहळदे, सूरज बिजली आदींनी घटनास्थळी भेट दिली. संबंधित तरुणी हरविल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी गंगापूर पोलिस ठाण्यात दाखल झालेली होती. मृतदेह हर्षदाच्या पालकांनी ओळखल्याचे पोलिसांनी सांगितले. या हत्येप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मैत्रिणीच्या मोबाइलवर शेवटचे संभाषण

हत्या झालेली तरुणी हर्षदा ही गंगापूररोडवरील विद्यासागर क्लासेस या खासगी क्लासेसमध्ये समुदेशक म्हणून कार्यरत असल्याची माहिती समजते. तिची स्कुटी एकलहरे परिसरात पोलिसांना आढळली. याशिवाय हर्षदाच्या मोबाइलवरून शेवटचे संभाषण झालेला मोबाइल क्रमांकाचे लोकेशन अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळून आले. संभाषण झालेला मोबाइल क्रमांक हर्षदाच्या मैत्रिणीचा असल्याचे पोलिस तपासातून उघड झाले. नाशिकरोड पोलिसांकडून अंबड पोलिसांच्या सहकार्याने हर्षदाच्या मैत्रिणीचा तपास मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

मटा भूमिका

गंभीर गुन्ह्यांचे केंद्र अशी नाशिकरोडची नवी ओळख निर्माण होऊ पाहते आहे. पाच महिन्यांत खुनाच्या आठ घटनांमुळे हा भाग हादरला आहे. चार दिवसांपूर्वीच गावगुंडांच्या टोळी युद्धातून जेलरोडला एका अल्पवयीन मुलाचा हकनाक बळी गेला. या प्रकरणातील मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिस यंत्रणा व्यस्त असताना खुनाची आणखी एक घटना उघडकीस आली. वाढत्या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्येही दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांच्या अस्तित्वावरच आता प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी तातडीने विशेष अभियान हाती घेऊन गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्यात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरवायकेचा प्रतीक बच्छाव अव्वल

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक राज्य मंडळाच्या वतीने बारावीच्या जाहीर झालेल्या निकालात शहरातील विविध ज्युनिअर कॉलेजेसने भरघोस यश मिळविले आहे. एचपीटी आणि आरवायके आणि शहरातून प्रतीक बच्छाव हा ९५.६९ टक्के गुण मिळवून अव्वल आला, तर केटीएचएममधून विदिस्कर बाविस्कर याने ९०.९२ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. एसएमआरकेमधून सरिता यादव हिने ८४.१५ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.

मंगळवारी बारावीच्या विद्यार्थी व पालकांमध्ये निकालाबाबत मोठ्या प्रमाणावर उत्कंठा दिसून आली. काही विद्यार्थ्यांनी त्यांचे निकाल घरातील कम्प्युटर, स्मार्ट फोनद्वारे पाहिला. कॉलेजेस आणि विविध क्लासेसमध्येही यासाठी व्यवस्था करण्यात आली होती.

शहरातील विविध ज्युनिअर कॉलेजेसनेही त्यांच्याकडील तपशील जाहीर केला. त्यानुसार मंगळवारी सायंकाळपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एचपीटीची आणि आरवायकेच्या प्रतीक मनोहर बच्छाव याने ९५.६९ टक्के गुण मिळवून शहरातून पहिला क्रमांक पटकावला.

_ _ _

आरवायकेचा ९९.२३ टक्के निकाल

एचपीटी आणि आरवायके कॉलेजचा सायन्सचा निकाल ९९.२३ टक्के लागला. एमसीव्हीसी शाखेचा निकाल ९३.५ टक्के लागला. सायन्स शाखेतून प्रतीक बच्छाव याने ९५.६९ टक्के मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. स्नेहल जयकर हिने ९४.१५ टक्के मिळवत द्वितीय, पूर्वा परांजपे हिने ९३.६९ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. संस्कृत विषयात साक्षी जाधव, आकाश वाघ आणि रीना साळवे यांनी १०० पैकी १०० गुण मिळवून विषयाची पारितोषिके पटकावली.

---

एचपीटीचा ८४.८७ टक्के निकाल

एचपीटी आर्टसचा निकाल ८४.८७ टक्के लागला. आर्ट शाखेतून इंद्रायणी आपटे हिने ९३.३८ टक्के गुण मिळवून प्रथम, तेजल कुलकर्णी हिने ९२.९२ टक्के गुण मिळवून द्वितीय, तर श्रुती शेलार हिने ९२.९२ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.

_ _

एचपीटी व्होकेशनल ९३.५ टक्के

व्होकेशनल (एमसीव्हीसी) शाखेतून नेहा साळुंके हिने ७५.३८ टक्के गुण मिळवून प्रथम, मोनिका जगताप व केदार तारापुरे यांनी ७४.३१ टक्के मिळवून विभागून द्वितीय, तर क्षितिज चोपडे याने ७३.६१ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.

_ _ _

केटीएचएम सायन्स ९८.५९ टक्के

केटीएचएमच्या सायन्स शाखेत १६३४ विद्यार्थ्यांपैकी १६११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेचा निकाल ९८.५९ टक्के लागला. विदिस्कर बाविस्कर हा विद्यार्थी ९०.९२ टक्के गुण मिळवून कॉलेजमध्ये प्रथम आला. तेजस डापसे याने ८९.५३ टक्के गुण मिळवून द्वितीय, तर गौरी सोनवणे हिने ८९.३८ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.

_ _

केटीएचएम आर्टस ७१ टक्के

केटीएचएमच्या कला विभागाचा निकाल ७१ टक्के लागला. आकाश दिलीप चव्हाण ८५.८४ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. आकाश चव्हाण हा विद्यार्थी दिव्यांग आहे. रविना पाडवी ८३.०७ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने, तर पूनम निमसे ही विद्यार्थिनी ८२.७६ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.

_ _

केटीएचएम कॉमर्स ९३.५६ टक्के

केटीएचएमच्या कॉमर्स विभागाचा निकाल ९३.५६ टक्के लागला. पायल जगताप ही विद्यार्थिनी ९०.४६ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने, वेदांत मुंदडा हा विद्यार्थी ९०.३० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. वेदांत मुंदडा दिव्यांग आहे. प्रियंका खाडे ही विद्यार्थिनी ८८.४६ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.

--

एसएमआरके ९२.७ टक्के

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एसएमआरके महिला कॉलेजचा सायन्स शाखेचा निकाल ९८.२७ टक्के लागला. सरिता यादव हिने ८४.१५ टक्के मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. होमसायन्स शाखेचा निकाल ९२.७ टक्के लागला. प्रणाली कटारे हिने ९२.४६ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. आर्ट शाखेचा निकाल ७७.५ टक्के लागला. गायत्री तांबे हिने ८०.४६ टक्के मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. कॉमर्सचा निकाल ९५.८ टक्के लागला. क्षितिजा जाधव हिने ८५.५३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. एमसीव्हीसी शाखेचा निकाल ९३.७५ टक्के लागला. यात सारंग काशीकर हिने ८५.३५ टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कॉलेजचा एकूण निकाल ९२.७ टक्के लागला.

--

फ्रावशीचा निकाल १०० टक्के

फ्रावशी कॉलेजच्या सायन्स व कॉमर्स शाखेने १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली. सायन्स शाखेत ८३.०८ टक्के गुणांसह राघव पोतदार प्रथम आला. दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या नम्रता जगवानीला ८१.८५ टक्के गुण मिळाले. अनम टायरवालाने ८०.९२ टक्के गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला. कॉमर्स शाखेत प्रथम येण्याचा मान लितिका राजपालने मिळवला तिला ९२. ६२ टक्के गुण मिळाले. दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या मुजेन कोकणी व अनिका नायरला अनुक्रमे ९०.६२ टक्के व ९०.४६ टक्के गुण मिळाले.

--

व्होकेशनल ९३.३९ टक्के

केटीएचमच्या व्होकेशनल विभागाचा निकाल ९३.३९ टक्के लागला. लीना देवलकर ही विद्यार्थिनी ८१.०७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने, सविता रिकामे ही विद्यार्थिनी ८०.६१ टक्के गुण मिळवून द्वितीय, तर पायल गोसावी विद्यार्थिनी ८०.१५ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. आकाश चव्हाण आणि वेदांत मुंदडा या दिव्यांग विद्यार्थ्यांनी जे उज्ज्वल यश संपादन केले.

--

सीएमसीएस ९४.९४ टक्के

सीएमसीएस कॉलेजच्या सायन्स शाखेतून मानसी अशान ही विद्यार्थिनी ८०.७६ टक्के गुण मिळवून प्रथम आली. कॉमर्स शाखेतून तेजस वाघ याने ८८.४६ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला, तर कॉलेजचा एकूण निकाल ९४.९४ टक्के लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिंदे येथे शेतकऱ्याची आत्महत्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

कर्जाला कंटाळून शिंदे (ता. जि. नाशिक) येथील नामदेव देवराम झाडे (वय ६५) या शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे.

झाडे यांना नाशिकरोड येथील पालिकेच्या बिटको रुग्णाल्यात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. झाडे यांच्या नावे सुमारे ७० हजार रुपयांचे कर्ज होते. त्यांची दीड एकर शेती असून, त्यांचा एक मुलगा रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतो, तर तर दुसरा रोजंदारी करतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात अकरावीसाठी २५ हजार जागा

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
नाशिक महानगरपालिका व देवळाली कॅण्‍टोन्मेंट हद्द‌ीतील सर्व माध्यमांच्या ज्युनियर कॉलेजेसमध्ये इयत्ता ११ वीच्या प्रवेशांसाठी यंदा प्रथमच ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. मनपा आणि कॅन्टोन्मेंट हद्दीत सर्व कॉलेजांमध्ये अकरावीच्या २४५५५ जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. २ जून ते १० वीच्या ऑनलाइन रिझल्टपर्यंत सर्व माध्यमिक शाळांतून अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग पहिला भरावा लागणार आहे, अशी माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी मंगळवारी दिली.
मुंबई-पुण्यानंतर यंदा नाशिकसह औरंगाबाद, अमरावती व नागपूर या शहरांतही यंदा अकरावीचे प्रवेश ऑनलाइन व केंद्रीय पद्धतीने होणार आहेत. नाशिक मनपा व देवळाली कॅन्टोन्मेंट हद्दीतील ५७ ज्युनियर कॉलेजांतील सर्व शाखांसाठीच्या २४ हजार ५५५ जागांसाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया येत्या २ जूनपासून सुरू होणार आहे. प्रवेश अर्जाचा भाग पहिला ऑनलाइन भरण्याची सुविधा विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत शिक्षण खात्याने उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना दीडशे रुपयांची माहितीपुस्तिका शाळेतून विकत घेणे बंधनकारक असणार आहे. दहावी बोर्डाचा ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग दुसरा ऑनलाइन भरावा लागणार आहे.

ग्रामीण भागातही ऑनलाइन

नाशिक मनपा व देवळाली कॅण्‍टोन्मेंट हद्दीत यंदा ऑनलाइन केंद्रीय पध्दतीने अकरावीचे प्रवेश होणार आहेत. ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांतील विद्यार्थीही या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज भरू शकणार आहेत. आज ३१ मे रोजी दुपारी १ वाजेनंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत माहितीपुस्तिका विकत मिळणार आहेत.


नाशिक मनपा व देवळाली कॅण्‍टोन्मेंट हद्दीत यंदा अकरावीसाठी ऑनलाइन केंद्रीय पद्धतीने प्रवेश दिले जाणार आहेत. सर्व माध्यमिक शाळांत त्यासाठीच्या माहितीपुस्तिका उपल्ब्ध झालेल्या आहेत. सायबर कॅफे, खासगी क्लासेस येथे विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरता येणार नाहीत. शहरातील कोणत्याही माध्यमिक शाळेत विद्यार्थी प्रवेश अर्ज भरू शकतो. प्रवेशप्रक्रियेसाठी माहितीपुस्तिकेच्या व्यतिरिक्त फी आकारणाऱ्या शाळांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- रामचंद्र जाधव, शिक्षण उपसंचालक, नाशिक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कला, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमधील प्रसिद्ध तबलावादक प्रमोद भडकमकर यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने नाशिकच्या कला व सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना कलाप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

प्रमोद भडकमकर यांनी बालपणापासूनच कलेची उपासना सुरू केली होती. अभ्यासू व्यक्तिमत्त्व असल्याने पुढे त्यांनी बारावीनंतर पंडित सुरेश तळवलकर यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेतले. त्यासाठी त्यांनी बँकेतील नोकरीचादेखील त्याग केला. पंडितजींच्या आशीर्वादानेच त्यांच्यासह पंडिता रोहिणी भाटे, उस्ताद शाहीद परवेझ, पद्मा तळवलकर, पंडित रत्नाकर पै, पंडित राजा काळे, जयतीर्थ मेहुंडी, शौनक अभिषेकी, आरती अंकलीकर यांच्यासारख्या दिग्गजांना भडकमकरांनी तबल्याची साथसंगत केली. भडकमकर २७ वर्षांपासून एसएमआरके महिला महाविद्यालयात संगीत विभागात कार्यरत होते. ऋग्वेद तबला अकादमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तबल्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देत होते. पारनेरकर महाराज महोत्सवात त्यांनी अनेक नवोदित कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ते उत्तम लेखकही होते. एक पुस्तक लवकरच प्रकाशित करण्याचा त्यांचा मानस होता. भडकमकर यांना अध्यात्मातही विशेष रस होता. पूर्णवाद परिवारावर त्यांची श्रद्धा होती. पारनेरकर महाराजांचे चरित्रलेखनही त्यांनी केले होते.

दरम्यान, भडकमकर यांच्या सावरकरनगर येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी गर्दी झाली होती. अमरधाममध्ये अंत्यसंस्काराप्रसंगी संगीत, नाट्य, कला, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तबलावादक प्रमोद भडकमकर यांचे निधन

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमधील प्रसिद्ध तबलावादक प्रमोद भडकमकर (वय ५२) यांचे मंगळवारी सकाळी १० वाजेच्या दरम्यान हिरा गार्डन, सावरकरनगर येथे राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी अर्चना, मुलगी वैष्णवी असा परिवार आहे. त्यांचा तबल्याचा वारसा त्यांची मुलगी वैष्णवी समर्थपणे पुढे नेत आहे.

प्रमोद मंगळवारी सकाळी फेरफटका मारून आले. मात्र, सकाळी दहाच्या सुमारास त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले. त्यांना मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूट येथे हलविण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. जिल्हा शासकीय रुग्णालयात दुपारी शवविच्छेदन करून कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी सहा वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भडकमकर हे पंडित भानुदास पवार, नाना मुळ्ये, तसेच पंडित सुरेशदादा तळवलकर यांचे पट्टशिष्य होते. त्यांनी अनेक दिग्गजांना साथसंगत केली होती. भडकमकर यांचा जन्म नाशिकचाच. रविन्द विद्यालय आणि पेठे विद्यालयात त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. महाविद्यालयीन शिक्षण बीवायके महाविद्यालयात झाले. त्यांच्या घरी पौरोहित्याचे काम चाले. मात्र, त्यांच्या मातोश्रींना संगीताची आवड असल्याने त्यांनाही संगीताची गोडी निर्माण झाली. शास्त्रशुद्ध शिक्षण हवे म्हणून त्यांनी पंडित भानुदास पवार यांच्याकडून तबल्याचे शिक्षण घेतले. येथे त्यांची ओळख पंडित कमलाकर (नाना) मुळ्ये यांच्याशी झाली आणि भडकमकरांनी त्यांच्याकडूनही तबल्याचे शिक्षण घेतले.

पुणे विद्यापीठाच्या युवक महोत्सवात त्यांनी सुवर्णपदक मिळवले होते. अभ्यासू व्यक्तिमत्त्व असल्याने पुढे त्यांनी बारावीनंतर पंडित सुरेश तळवलकर यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेतले. त्यासाठी त्यांनी बँकेतील नोकरीचादेखील त्याग केला. पंडितजींच्या आशीर्वादानेच त्यांच्यासह पंडिता रोहिणी भाटे, उस्ताद शाहीद परवेझ, पद्मा तळवलकर, पंडित रत्नाकर पै, पंडित राजा काळे, जयतीर्थ मेहुंडी, शौनक अभिषेकी, आरती अंकलीकर यांच्यासारख्या दिग्गजांना भडकमकरांनी तबल्याची साथसंगत केली. भडकमकर २७ वर्षांपासून एसएमआरके महिला महाविद्यालयात संगीत विभागात कार्यरत होते. ऋग्वेद तबला अकादमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तबल्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देत होते. पारनेरकर महाराज महोत्सवात त्यांनी अनेक नवोदित कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ते उत्तम लेखकही होते. एक पुस्तक लवकरच प्रकाशित करण्याचा त्यांचा मानस होता. भडकमकर यांना अध्यात्मातही विशेष रस होता. पूर्णवाद परिवारावर त्यांची श्रद्धा होती. पारनेरकर महाराजांचे चरित्रलेखनही त्यांनी केले होते.

भडकमकर यांच्या सावरकरनगर येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी गर्दी झाली होती. अमरधाममध्ये अंत्यसंस्काराप्रसंगी संगीत, नाट्य, कला, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक विभागाचा निकाल ८८.२२ टक्के

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत नाशिक विभागाचा निकाल ८८.२२ टक्के लागला आहे. गेल्या तीन वर्षांतील हा उच्चांकी निकाल असून, बोर्डाच्या कॉपीमुक्त अभियानासह गुणवत्ता सुधारसारख्या उपक्रमांचे हे फळ असल्याची माहिती मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र गोधने यांनी दिली. नाशिक जिल्ह्याचा निकाल ८७.९ टक्के लागला आहे.

बारावीचा निकाल मंगळवारी सकाळी ११ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. दुपारी एकनंतर मंडळाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे हा निकाल विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला. यामुळे दहावीचे विद्यार्थी असणाऱ्या घराघरांत उत्कंठेचे वातावरण होते. विभागीय मंडळाने दिलेल्या माहितीनुसार यंदा बारावीच्या परीक्षेसाठी नाशिक विभागातून १ लाख ५९ हजार ३३७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. पैकी १ लाख ४० हजार ५७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात नाशिक जिल्ह्यातून ७० हजार ९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी ६१ हजार ४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात निकालाचे वाटप शुक्रवारी (९ जून) त्यांच्या कॉलेजांमधून करण्यात येणार आहेत.


तीन वर्षांतील उच्चांकी निकाल

गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा नाशिक विभागाचा निकाल उच्चांकी लागला आहे. २०१५ मध्ये ८८.१३ टक्के निकाल होता. २०१६ मध्ये ८३.९९ टक्के निकाल लागला. यंदा ८८.२२ टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेचा नाशिक विभागाचा निकालही उच्चांकी असून, तो राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इन सर्च ऑफ विठ्ठल’ देशात सर्वोत्कृष्ट

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

‘शॉर्ट फिल्म थिएटरच्या ऑनलाइन शॉर्ट फिल्म फेस्टिवल’ मध्ये देशभरातून आलेल्या शॉर्ट फिल्म्समधून ‘इन सर्च ऑफ विठ्ठल’ ही नाशिकची फिल्म देशभरात सर्वोत्कृष्ट ठरली. प्राजक्त देशमुख लिखित, अभिषेक कुलकर्णी दिग्दर्शित आणि छायाचित्र‌ित या शॉर्ट फिल्मने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासहीत सर्वोत्कृष्ट लघुपट पारितोषिकावर आपले नाव कोरले. हे पारितोषिक एक लाखाचे आहे.

शॉर्ट फिल्म थिएटर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या या फेस्टिवलमध्ये भारतभरातून ८०० पेक्षा जास्त लघुपटांचा सहभाग होता. यापैकी अंतिम २० लघुपटांची निवड करण्याचे जिकिरीचे काम एसएफटीच्या तज्ज्ञ परीक्षकांनी केले. यात नाशिकच्या ‘शोध विठ्ठलाचा’ (In searth of Vitthala’) या लघुपटाने अंतिम वीसमध्ये स्थान पटकवण्याचा बहुमान मिळवला होता. ३० मे रोजी पुण्यातील एनएफएआय येथे दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अभिषेक कुलकर्णी यांना मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सर्वोत्कृष्ट लघुपटास मानचिन्ह, एक लाख रुपये आणि प्रमाणपत्र असे पारितोषिक देण्यात आले.

‘इन सर्च ऑफ विठ्ठल’ हा वारीवर आधारीत लघुपट गेल्या आषाढी एकादशीच्या मुहुर्तावर प्रदर्शित केला होता. सोशल साइट्सवर या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. अनेकांच्या पसंतीस उतरलेला हा व्हिडिओ अजूनही मोठ्या संख्येने बघितला जातोय. कारा स्टुडिओची निर्मिती असलेल्या ह्या लघुपटाचे दिग्दर्शन आणि छायाचित्रण अभिषेक कुलकर्णी यांनी केलेले आहे. सहाय्यक छायाचित्रणकार म्हणून रोहित खैरनार आणि संकेत कुलकर्णी यांनी काम पाहिले. तसेच पार्श्वसंगीत आनंद ओक यांचे असून, सदानंद जोशी यांचा आवाज या लघुपटाला लाभलेला आहे. या लघुपटाचे लेखन आणि पटकथा प्राजक्त देशमुख यांची आहे. देशभरातून आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, पंजाबी, तमिळ, तेलगू, मूक अशा विविध भाषांमधील तब्बल आठशेंहून जास्त लघुपटांमधून नाशिकच्या मराठमोळ्या लघुपटाने सर्वोत्तमतेची मोहोर उमटवली आहे.

हे सगळं अनपेक्षित आहे. दिग्दर्शनाला माझे नाव असले तरी पांडुरंगाने हे करुन घेतलं. जितका विश्वास मला माझ्या कॅमेरावर आहे तितकाच प्राजक्तच्या लेखनावर आहे. माझ्या कुटुंबाला आणि गुरुंना हा पुरस्कार समर्पित करतो.

- अभिषेक कुलकर्णी दिग्दर्शक, छायाचित्रण

अभिषेक आणि मी अखंडपणे या विषयावर चर्चा करत असायचो. वारी ही केवळ एक परंपरा नसून जगणे आहे. स्व-शोध आहे. हेच संस्कार झाले, तेच लेखनात उतरले. पांडुरंग सगळे घडवून आणतो हेच खरं. तो पूर्व होतोय म्हणून आपण आपलं उगवायचा अट्टहास करायचा.

- प्राजक्त देशमुख, लेखक

पांडुरंग आणि प्राजक्त हे समीकरण माझ्यासाठी खूशखबर देणारे झालेय. ‘संगीत देवबाभळी’ नाटकापासून सुरू झालेला संगीताचा प्रवास या लघुपटापर्यंत आला आहे. अशीच अनेक कामं करत राहू.

- आनंद ओक, संगीतकार

एके सकाळी प्राजक्तचा अचानक फोन येतो काय, तो मला हक्काने ‘आज अमूक ठिकाणी, अमूक वेळी या’ असं सरळ सरळ दरडावतो काय आणि हे पारितोषिक मिळतं काय! सगळंच अद्भुत. मी या लघुपटाचा एक भाग आहे, हा सुरेख योगायोग आहे. मला या लघुपटाचा आवाज होता आला हे भाग्य. आजच्या तरुणाईची ऊर्जा कमाल आहे.

- सदानंद जोशी, आवाज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगावमध्ये मुलींची बाजी

0
0

मालेगाव ः मालेगाव महापालिका क्षेत्रातील कॉलेजांचा बारावीचा निकाल ८९.५८ टक्के, तर तालुक्यातील कॉलेजांचा निकाल ८४.४२ टक्के लागला. यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. वर्धमान उच्च माध्यमिक विद्यालय, या. ना. जाधव विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला. ग्रामीण भागात ९०.८९ टक्के मुली, तर ८०.२० टक्के मुले उत्तीर्ण झाली. शहरात ९५.५४ टक्के मुली व ८३.७२ टक्के मुले उत्तीर्ण झाली. यंदा शहरी व ग्रामीण भागातील निकालांची टक्केवारी सरासरी सातने वाढली आहे.

कॉलेजनिहाय निकाल असा ः आरबीएच कन्या विद्यालय, ज्यू कॉलेज- ९७.१० टक्के, केबीएच विद्यालय, ज्युनिअर कॉलेज- ९६.९३, वर्धमान उच्च माध्यमिक विद्यालय- १००, एमएसजी कॉलेज- ९२.८७, या. ना. जाधव कॉलेज- १००, जेएटी हायस्कूल- ९८.३७, आर. के. काकाणी कॉलेज- ९७.६५, मालेगाव हायस्कूल, कॉलेज- ८२.६८, एटीटी हायस्कूल, कॉलेज- ८६.३०, टी. आर. हायस्कूल, दाभाडी- ९५.४५, समता उच्च माध्यमिक विद्यालय, टेहरे- ८९.१६, जनता विद्यालय, कॉलेज, झोडगे- ७४.८४, महात्मा फुले माध्यमिक विद्यालय, कुकाणे- ९५.७४ टक्के.

--

त्र्यंबकचा ८४.२० टक्के निकाल

त्र्यंबकेश्वर ः तालुक्याचा बारावीचा निकाल ८४.२० टक्के लागला असून, निकालात मुलींनी आघाडी घेतली आहे. यावर्षी १३३६ परीक्षार्थींनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ११२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ब्रह्मा व्हॅली पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचा निकाल यावर्षीदेखील १०० टक्के लागला. विज्ञान शाखेत पूजा सुनील पवार हिने ७२ टक्के गुण मिळवून आणि वाणिज्य शाखेत सिद्धी प्रशांत गायधनी हिने ७८.४६ टक्के गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला. वाढोली येथील आर्किड इंटरनॅशनल स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. नूतन त्र्यंबक ज्युनिअर कॉलेज- ६६.२६ टक्के, केबीएच विद्यालय व कॉलेज, हरसूल- ८४.५१ टक्के, शासकीय कॉलेज, बोरीपाडा- ९५.१६ याप्रमाणे अन्य कॉलेजेसचा निकाल लागला.

--

मनमाडला विज्ञान अव्वल

मनमाड ः मनमाड केंद्रातील छत्रे विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून, मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९८.९१, तर कला, विज्ञान, वाणिज्य कॉलेजचा विज्ञान शाखेचा निकाल ९२ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल उत्कृष्ट लागला असून, वाणिज्य शाखेचा ९० टक्के, तर कला शाखेचा निकाल सर्व शाखांत कमी ६५.६६ टक्के एवढा लागला आहे

छत्रे विद्यालयात डिंपल हिरा कौरानी ८७.०७ टक्के मिळवून प्रथम आली. समीक्षा संजय कुलकर्णी ८५.६१ टक्के मिळवून द्वितीय, तर कृतिका विजय जगताप ८४ टक्के मिळवून तृतीय आली आहे. ‘मरेमा’ची नाकिया बहारीनवाला ८७.५३ गुण मिळवून प्रथम आली. समीर मुख्तार शेख ८४.३० व मधुरा कैलास देसले ८०.९२ टक्के यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.

मनमाड ः चांदवडच्या महाराणी उषादेवी होळकर सायन्स कॉलेजच्या मिथिलेश दत्तात्रय बारगळ याने बारावी परीक्षेत ६५० पैकी ६१९ म्हणजे ९५.२६ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. नाशिक बोर्डात दुसरा, तर ग्रामीण भागासह मागासवर्गीयात तो राज्यात प्रथम असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. होळकर कॉलेजचा निकाल ९८.१४ टक्के लागला आहे.

मिथिलेशने फिजिक्स, बॉयोलॉजी आणि मॅथ्समध्ये १०० पैकी १०० तर इन्व्हायर्नमेंट विषयातही पैकीच्या पैकी गुण संपादन केले आहेत. मिथिलेशचे वडील दत्तात्रय बारगळ हे होळकर कॉलेजचे प्राचार्य असून, आई माध्यमिक शिक्षिका आहे. मिथिलेशचा भाऊ प्रथमेश याने दहावीला केंद्रात, तर बहीण श्रुती हिने दहावी व बारावी दोन्ही परीक्षांत केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळविलेला आहे. होळकर शिक्षण संस्थेचे पदाधिकारी व माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी मिथिलेशच्या यशाचे कौतुक केले आहे. मिथिलेश उत्कृष्ट खेळाडू असून, आयएएस अधिकारी होण्याची त्याची महत्त्वाकांक्षा असल्याने यूपीएससीचा अभ्यास सुरू केल्याचे त्याच्या वडिलांनी ‘मटा’ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दत्तू भोकनळच्या कष्टांचे चीज

0
0



म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चांदवडच्या तळेगाव रोहीचा ऑलिंपिकपटू दत्तू भोकनळ कला शाखेतून ५७ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. लासलगावच्या दत्ताजी पाटील विद्यालयातून त्याने परीक्षा दिली होती. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे नववीनंतर शिक्षण अर्धवट सोडणारा व नंतर तीन वर्षांनी जिद्दीने दहावीच्या परीक्षेला बसून पास होत नंतर तब्बल सहा वर्षांनी बारावीची परीक्षा सतरा नंबरचा फॉर्म भरून देणाऱ्या दत्तूने जिगर आणि कष्टाच्या जोरावर स्वप्ने साकार होतात, हे दाखवून दिले आहे. रोइंग या खेळात राष्ट्रीय स्तरावर दैदीप्यमान कामगिरी बजावणारा दत्तू सध्या पुणे खडकी येथे लष्करी सेवेत असून, विश्व चॅम्पियनशिपसाठी त्याचा सराव सुरू आहे. मार्क काहीसे कमी पडल्याची भावना व्यक्त करून दत्तूने ग्रॅज्युएट व्हायचे असल्याची प्रतिक्रिया दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभ्यासू अन् उमदा कलावंत

0
0

प्रसिद्ध तबलावादक प्रमोद भडकमकर यांचे मंगळवारी निधन झाले. अभ्यासू आणि उमदा कलावंत म्हणून ते परिचित होतेच; परंतु सुस्वभावी असल्याने त्यांनी बराच मित्रमेळा जमा केलेला होता. त्यांच्या निधनाने नाशिकच्या सांस्कृतिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत असून, अभ्यासू अन् उमद्या कलावंताला आपण मुकलो असल्याची श्रद्धांजलीपर भावना नाशिककरांनी व्यक्त केली आहे...

--

उत्तम तबलावादक गेला

एक तरुण, तडफदार, अभ्यासू तबलावादक आपल्यातून गेला. गाण्याची आवड असणारा, समज असणारा, गाण्याला समजून घेणारा उत्तमतबला वादक निघून गेला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत.

-कमलाकर वारे, ज्येष्ठ तबलावादक

शब्दच सुचत नाहीत

आम्ही आयुष्यभर सोबत राहिलो, हातपाय गळून गेलेत, शब्दच सुचत नाहीत.

-पंडित सुभाष दसककर, ज्येष्ठ संवादिनीवादक

प्रयोगशील कलावंत

गेली २७ वर्षे एकाच ठिकाणी काम करतोय. रोजचा रियाज सोबत करायचो. एकही दिवस असा गेला नाहीस की रियाज केला नाही. प्रमोद अत्यंत प्रयोगशील कलावंत होता. चांगल्या रचना, नवे प्रयोग, चर्चा व्हायची. आता डिपार्टमेंटमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्याच्या सहवासाला आम्ही पोरके झाले आहोत.

-नितीन वारे, तबलावादक

धडपडणारा कलाकार...

प्रमोद हा अतिशय नवनवीन कल्पना मांडणारा, त्या अंमलात आणणारा कलावंत. अत्यंत जीवलग मित्र. वडिलांचा पहिला विद्यार्थी. धडपडणारा कलाकार.. शब्दच संपलेत...

-नितीन पवार, तबलावादक

पिढीला जोडणारा दुवा

नाशिकचा खूप छान तबलावादक, माझा खूप जवळचा मित्र गेला. तो चतुरस्र तबलावादक होता. सोलोसाठीही तितकाच दमदार. साथसंगत व नृत्य या तिघांसाठी अभ्यासू तबलावादक म्हणूनच तो परिचित होता. स्वभावाने खूप छान होता. आमच्या तर घरातलाच मनुष्य गेला. संगीतातील आमच्या पिढीला जोडणारा दुवा होता. तो काहीतरी देण्यासाठी नेहमीच उत्सुक असायचा. त्याची देण्याची वृत्ती छान होती.

-शंतनू गुणे, शास्त्रीय गायक

सगळ्यांच्याच स्मरणात राहील

एक अत्यंत मनस्वी कलाकार, संगीत क्षेत्रातील प्रतिभावान, प्रत्येक कार्यक्रमात अत्यंत मनापासून सहभाग घेणारा, खळखळून हसणारा आमचा मित्र प्रमोद अचानक काळाच्या पडद्याआड गेला, यावर अजूनही विश्वास बसत नाही. सगळ्या कलाक्षेत्रावर एक आपली वेगळी छाप सोडून प्रमोद गेला आहे, तो कायमच सगळ्यांच्या स्मरणात राहील.

-पं. मकरंद हिंगणे, शास्त्रीय गायक

उमदा कलाकार गमावला

एक अत्यंत गुणी कलाकार आपल्यातून गेला आहे. सर्वांशी मिळून मिसळून वागणारा, व्यासंगी, अभ्यासक. तो वेगवेगळे विषय तयार करायचा. एक उमदा कलाकार नाशिकने गमावला आहे. आम्ही ४० वर्षांपासून सोबत होतो. त्याचे सगळे काळ मी बघितले आहेत. एक उत्तम शिक्षक, उत्तम जाणकार, उत्तम कलाकार. स्वत:च्या विषयात तर उत्तम होताच, परंतु त्याचा वेगवेगळ्या विषयांत अभ्यासही फार दांडगा होता. आजचा दिवस फार वाईट आहे.

-विद्या देशपांडे, ज्येष्ठ नृत्यांगना

मनमिळाऊ अन् हजरजबाबी

प्रमोद एक अत्यंत चांगला तबलावादक. विचारी, अभ्यासू सतत तबल्याचा विचार करणारा, अत्यंत मनमिळाऊ नृत्य, गायन, वाद्यांसोबत विविध अंगांनी साथ करणारा कलाकार होता. त्याच्या खूप महत्त्वाकांक्षा होत्या. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. अत्यंत हजरजबाबी, विनोदबुद्धीच्या प्रमोदचे तबल्यावर अतोनात प्रेम होते. एक चांगला कलाकार गमावल्याचे दु:ख आहे.

-पं. अविराज तायडे

उत्तम साथ देणारा कलावंत

प्रमोद भडकमकर व मी लहानपणापासूनचे मित्र. भानुदास पवार, नाना मुळ्ये, सुरेश तळवलकर यांनी त्याला घडविले. उत्तम तबलावादक, उत्तम साथ देणारा हा उमदा कलावंत. त्याची कन्याही उत्तम तबला वाजवते. सतत हसतमुख असणारा हा कलाकार गेल्याने मित्रांवर फार मोठा आघात झाला आहे. शहरात शास्त्रीय संगीताची पायाभरणी ज्यांनी केली, त्यापैकी त्याचे नाव अत्यंत महत्त्वाचे. परमेश्वर त्याच्या आत्म्याला चिरशांती देवो.

-प्रशांत महाबळ, संगीतकार

चर्चेला समेवर आणणारे व्यक्तिमत्त्व

आडनावाप्रमाणे वेलांटी ना उकार असे सरळ व्यक्तिमत्त्व असलेला प्रमोद ग्रुपवर होणाऱ्या चर्चेमध्ये मध्येच विनोद टाकून चर्चेला समेवर आणण्याचे काम करायचा. आज सकाळीदेखील साडेसात वाजता त्याने जनस्थान ग्रुपवर विनोदी पोस्ट टाकली होती. असे होईल असे वाटलेही नव्हते. अतिशय मनमिळाऊ, अभ्यासू तबलावादकाला नाशिक मुकले आहे.

-अभय ओझरकर, अॅडमिन, जनस्थान ग्रुप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे जिल्ह्यात २१,७०५ विद्यार्थी उत्तीर्ण

0
0

धुळे : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी ते मार्च २०१७ या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. निकालामध्ये मुलींनीच बाजी मारली असल्याची दिसून आले. धुळे जिल्ह्यातील पंधरा कॉलेजेसचा निकाल शंभर टक्के लागला आहे. जिल्ह्यातून एकूण २५,५७३ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी २१,७०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांना दि. ९ जून रोजी आपापल्या शाळेत गुणपत्रिका वाटप करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी दि. ३१ मे ते ९ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. जिल्ह्यात १,३६६ विद्यार्थी उच्च, १२,१९८ प्रथम, ८,४०२ द्वितीय आणि २२० विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायन्समध्ये विभाग तिसरा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बारावीच्या एकूण निकालात गत तीन वर्षांच्या तुलनेत यंदा उच्चांक प्रस्थापित करणाऱ्या नाशिक विभागाने सायन्स शाखेतही ठसा उमटविला आहे. नाशिक विभागाचा सायन्स शाखेचा निकाल ९६.७७ टक्के लागला असून, सायन्स विभागाचा हा राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचा निकाल असल्याची माहिती एसएससी व एचएससी मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र गोधने यांनी दिली.

यंदा जाहीर झालेल्या निकालात नाशिक विभागाचा निकाल गत तीन वर्षांच्या तुलनेत चांगला लागला आहे. राज्यात सायन्स शाखेच्या निकालात कोकण विभाग अव्वल स्थानी असून, त्यांचा या शाखेचा निकाल ९७.४४ टक्के लागला. कोल्हापूर त्यापाठोपाठ द्वितीय स्थानावर आहे. त्यांचा सायन्स शाखेचा निकाल ९७.७७ टक्के लागला आहे. त्यापाठोपाठ नाशिकने तिसरे स्थान पटकावले आहे.

--

शाखानिहाय निकाल

नाशिकचा २०१५ मधील निकाल ८८.१३ टक्के होता. २०१६ मध्ये म्हणजे गेल्या वर्षी ८३.२२ टक्के इतका हा निकाल नोंदविला गेला, तर यंदाचा निकाल ८८.२२ टक्के नोंदविला गेला आहे. यंदाच्या निकालात सायन्स शाखा ९६.७७ टक्के, कॉमर्स शाखा ९१.८५ टक्के, तर आर्ट शाखेचा निकाल ७९.५९ टक्के नोंदविला गेला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांचा निकाल ८१.४० टक्के नोंदविला गेला आहे.

--

मुलींच्या तुलनेत मुले ७ टक्क्यांनी कमी हुशार!

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बारावीच्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. राज्यासह नाशिक विभागातही वेगळे चित्र नाही. राज्याच्या आकडेवारीत उत्तीर्णतेच्या बाबतीत मुली मुलांना सरस ठरल्या आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेचे सुमारे साडेसहा टक्के अधिक प्रमाण आहे. नाशिक विभागातही मुलांना मागे टाकत मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ७ टक्क्यांनी जास्त आहे.

यंदा राज्यात १४ लाख ३१ हजार ३६५ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १२ लाख ७९ हजार ४०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामधून ७ लाख ९४ हजार १४२ मुले, तर ६ लाख ३७ हजार २२३ मुली प्रविष्ट झाल्या होत्या. राज्यात मुलांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८६.६५, तर मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९३.०५ टक्के आहे. सुमारे साडेसहा टक्के मुली राज्यात मुलांच्या तुलनेत अधिक प्रमाणात उत्तीर्ण झाल्या आहेत.

--

विभागातही मुलीच अव्वल

नाशिक विभागातही ८५.११ टक्के मुले, तर ९२.३८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींची ही संख्या मुलांच्या तुलनेत ७.२५ टक्क्यांनी जास्त आहे. त्यामुळे नाशिक विभाग यंदाच्या वर्षीही मुलीच अव्वल ठरल्या आहेत.

--

गणित-इंग्रजीचा वाढता निकाल

काही वर्षांपूर्वी धास्ती बनलेल्या गणित आणि इंग्रजीच्या विषयांचा निकाल अलीकडे चांगला लागत आहे. नाशिक विभागात यंदा गणित या विषयाचा ८७.३८ टक्के निकाल लागला. इंग्रजी या विषयाचा ९७.६२ टक्के निकाल लागला. बोर्डामध्ये एकूण १६३ विषयांचा समावेश आहे. नाशिक विभागात १३१ विषय समाविष्ट आहेत. त्यापैकी ४७ विषयांचा निकाल १०० टक्के लागल्याची माहिती राज्य मंडळाच्या सूत्रांनी दिली. विभागातील सहा सैनिकी शाळांपैकी पाच शाळांमध्ये यंदा सामान्यज्ञानाची ऑनलाइन चाचणी घेण्यात आली. या परीक्षेचाही निकाल १०० टक्के लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तळ‌ीरामांसाठी रस्ते पुन्हा खुले

0
0

त्र्यंबकरोड - दिंडोरीरोड पालिकेकडे वर्ग

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका हद्दीत असलेल्या दोन राज्यमार्गांना पालिकेकडे हस्तांतरीत करण्याच्या खासदार हेमंत गोडसे यांच्या सत्ताधारी आमदारांच्या प्रयत्नांना यश आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने नाशिक त्र्यंबक रोड आणि नाशिक दिंडोरी रोड महापालिकेकडे अवर्गीकृत केल्याचा आदेश काढला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने या दोन रस्त्यांवर बंद पडलेली बियरबारची ३५ दुकाने आणि रेस्टॉंरट आता तळ‌ीरामांसाठी खुले होणार आहेत. महापालिकेची आर्थिक परिस्थिती चिंताजनक असतानाही राजकीय नेत्यांच्या दबावापायी सार्वजनिक बांधकाम विभागाने हे दोन रस्ते पालिकेकडे हस्तांतरीत केले आहेत.
सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या पाचशे मीटरच्या परिघात असलेली दारूची दुकाने, ब‌ियर बार, परमीट हॉटेल्स बंद करण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे दारू व्यावसायिकांवर आभाळ कोसळले आहे. या अध्यादेशातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारसह लोकप्रतिनिधींनीही पळवाटा शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दारू दुकानांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याने यातून मार्ग काढण्यासाठी थेट महापालिका व नगरपालिकांना हाताशी धरण्यात आले आहे. नाशिकमध्येही या निर्णयाने जवळपास शंभरच्या वर दारूची दुकाने व परमीट हॉटेल बंद पडली आहेत. शिवसेनेचा विरोध असतानाही व महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक होत असताना केवळ काही बार मालकांच्या भल्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी राष्ट्रीय व राज्यमार्ग महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यासाठी आटापिटा सुरू केला होता.
नाशिक-त्र्यंबक आणि नाशिक-दिंडोरी या दोन राज्यमार्गांची देखभाल व दुरुस्ती महापालिकेकडे आहे. त्याचाच आधार घेत, काही बारमालकांनी आणि सत्ताधारी भाजपच्या आमदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हे दोन्ही रस्ते पालिकेकडे अवर्गीकृत करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्यासाठी पालिकेच्या साध्या पत्राचा आधार घेण्यात आला आहे. या दोन्ही रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती पालिका करत असल्याचा दाखला प्राप्त झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेरीस हे दोन्ही रस्ते पालिकेकडे हस्तांतरीत केले आहेत. त्यामुळे नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील २५ तर नाशिक दिंडोरी रस्त्यावरील १० असे जवळपास ३५ बार, हॉटेल्स आणि परमीटरुम नव्याने सुरू होणार आहेत.

पालिकेवरचा ताण वाढणार

नाशिक-त्र्यंबक, नाशिक-दिंडोरी या दोन्ही रस्त्यांची मालकी ही पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होती. आता या नव्या निर्णयाने या दोन्ही रस्त्यांची मालकी महापालिकेकडे येणार आहे. त्यामुळे या दोन्ही रस्त्यांची संपूर्ण जबाबदारी पालिकेकडे येणार आहे. याआधी पालिका या रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती करत असली, तरी अंतिम दायित्व मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे होते. परंतु, आता या दोन्ही रस्त्यांचा पूर्ण भार हा पालिकेवर येणार आहे. पालिकेची आर्थिक स्थिती आधीच डामाडोल आहे. त्यामुळे केवळ दारू दुकानदारांच्या भल्यासाठी या रस्त्यांवरचा संपूर्ण खर्च पालिकेला उचलावा लागणार असल्याने पालिकेच्या तिजोरीवर ताण वाढणार आहे.

मोठा ‘अर्थ’पूर्ण व्यवहार
त्र्यंबकरोड, पंचवटीतल्या दिंडोरी रस्त्यासह मालेगाव स्टॅण्डवरील दारू दुकाने बंद करण्यासाठी आंदोलने होत असताना अचानक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निर्णयामुळे नव्याने दुकाने सुरू होणार आहेत. या सर्व घडामोंडीमागे मोठी आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइनच्या निषेधार्थ मेडिकल्स ‘ऑफ’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ई-पोर्टलची सक्ती आणि ऑनलाइन औषधविक्रीविरोधात नाशिक केमिस्ट असोसिएशनने पुकारलेल्या बंदला शहरासह जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंगळवारी दिवसभर दुकाने बंद ठेवण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून व्यावसायिकांनी सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविला. बंदची माहिती नसलेल्या रुग्णांचे हाल झाले तर गरजू रुग्णांना संघटना तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने औषधे उपलब्ध करून देण्यात आली.
औषध विक्रेत्यांना मारक ठरणारी धोरणे राबविण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून होत असून त्यास विरोध दर्शविण्यासाठी अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने देशव्यापी बंदचे आवाहन केले होते. नाशिक केमिस्ट असोसिएशनशी संलग्न शहरातील सुमारे तेराशे आणि जिल्ह्यातील साडेचार हजाराहून अधिक औषध विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेऊन सरकारचे लक्ष वेधले. संपूर्ण जिल्ह्यात औषधांचा पुरवठा करणाऱ्या गोळे कॉलनीतील होलसेल दुकानेही बंद असल्याने सकाळपासूनच येथे शुकशुकाट होता. शहरातील उपनगरे, तालुक्याची ठिकाणे तसेच गावांमधील दुकाने बंद ठेऊन व्यावसायिकांनी संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. अनेक ठिकाणी हॉस्प‌िटल्सशी संलग्न मेड‌िकल्सदेखील बंद ठेवण्यात आली.

मूक मोर्चाद्वारे निषेध
मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास औषध विक्रेते मोठ्या संख्येने गोळे कॉलनीतील केमिस्ट भवन येथे जमले. तेथून अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल, सीबीएसमार्गे मोर्चा घेऊन ते सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आले. हातात सरकारी धोरणांच्या निषेधाचे फलक, दंडावर लावलेल्या निषेधाच्या काळ्या फिती आणि हातात मूक मोर्चाचा फलक घेत नागरिकांचे लक्ष वेधून घेण्यात आले. मागण्यांच्या निवेदनाची प्रत निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना देण्यात आली. विक्रेत्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवाव्यात अशी विनंती प्रशासनाला करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र धामणे आणि सचिव प्रशांत पवार यांनी दिली.

९० गरजूंना पुरविली औषधे

औषध दुकाने बंदमुळे गरजेच्या वेळी रुग्णांची हेळसांड होऊ नये याची काळजी संघटनेने घेतली. त्यासाठी गोळे कॉलनीतील नाशिक केमिस्ट असोसिएशनच्या कार्यालयातून गरजू रुग्णांना औषधे पुरविली जात होती. उपनगरांतही अत्यावश्यक औषधे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली होती. सायंकाळपर्यंत केमिस्ट भवनमधून ५० रुग्णांना तर शहराच्या अन्य भागातून ४० रुग्णांना औषधे पुरविण्यात आली.

किरकोळ औषधविक्री ठप्प

औषध विक्रेत्यांच्या संपाबाबत अनेक नागरिकांना माहिती नव्हती. त्यामुळे रुग्णासाठी औषधे खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांचा गोंधळ उडाला. दुकाने बंद का आहेत, असा प्रश्न त्यांना पडला. त्यापैकी अनेकांना औषधे मिळविण्यासाठी शोधाशोध करावी लागली. काही रुग्णांच्या नातेवाईकांनी औषधे मिळावीत म्हणून डॉक्टरांनाच साकडे घातले. किरकोळ आजारांसाठी औषधांची शोधाशोध करणाऱ्या रुग्णांची मात्र चांगलीच दमछाक झाली.

बंद काळात अन्न व औषध प्रशासनाने नियंत्रण कक्षाद्वारे गरजू रुग्णांना सर्वतोपरी मदत केली. औषधे मिळत नसल्याने काही रुग्णांनी आमच्याशी संपर्क साधला. त्यांना औषधे देण्यात आली.
- मि. रा. पाटील, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते बंदमध्ये सहभागी झाले. मात्र, गरजू रुग्णांची हेळसांड होणार नाही याची काळजीही संघटनेने घेतली. सरकारी धोरणांबाबतच्या आमच्या भावना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारपर्यंत पोहचविल्या आहेत.
- राजेंद्र धामणे, अध्यक्ष, नाशिक केमिस्ट असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘नाशिक’चे ब्रँडिंग जगभर करणार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

‘मेक इन महाराष्ट्रा’बरोबरच जगभर ‘मेक इन नाशिक’चे ब्रँडिंग करून आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे उद्योग नाशिकला व्हावेत, यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील कार्यक्रमात केली. या वेळी त्यांनी मुंबई, पुणे येथे उद्योगांची गर्दी वाढल्याने तेथे जागा नाही. त्यामुळे नाशिकला मोठी संधी आहे. या उद्योगामध्ये विमानबांधणी व संरक्षण साहित्य, कृषीप्रक्रिया उद्योग, पर्यटन व वेलनेस हे महत्त्वाचे उद्योग असून, त्यात नाशिकला संधी आहे. उद्योजकांनी या उद्योगांवर फोकस करण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.

जगभरातील मोठ्या उद्योगांनी नाशिकमध्ये गुंतवणूक करावी, यासाठी मुंबई येथील नेहरू सेंटर हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, की जोपर्यंत आपल्या ब्रँडचे आपण मार्केटिंग करीत नाही, तोपर्यंत तो किती चांगला असला तरी तो विकत नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही गोष्ट ओळखून जगभरातील गुंतवणूक भारतात वाढवली. देशभर झालेल्या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्र अग्रेसर असून, ६८ हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. त्यानंतर दिल्ली, कर्नाटक, गुजरातसह इतर राज्ये आहेत. महाराष्ट्रातही सर्वाधिक गुंतवणूक पुण्यात झाल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे मुंबईसारखीच स्थिती पुण्याची झाली आहे. जागेचा प्रश्नही आता येथे उपस्थित होत आहे. त्यामुळे नाशिकला मोठी संधी असल्याचेही ते म्हणाले.

‘मेक इन नाशिक’चा दोन दिवसांचा कार्यक्रम झाल्यानंतर त्यावर बैठक घेऊ व त्यावर चर्चा करून आगामी दोन वर्षांचा प्लॅन तयार करू, असे सांगत नाशिकला मोठ्या प्रमाणात उद्योग आणू, अशी ग्वाही त्यांनी दिली. हा विषय केवळ चर्चेपुरता असणार नाही तर तो प्रत्यक्षात उतरेल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, उपाध्यक्ष मंगेश पाटणकर, ‘आयमा’चे अध्यक्ष राजेंद्र आहिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमजार राहुल आहेर, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल यांच्यासह निमा व क्रेडाईचे पदाधिकारी उपस्थित होते.

एचएएलमार्फत कॉन्फरन्स

विमानबांधणी व संरक्षण साहित्य उद्योगाबाबत नाशिकमध्ये एचएएलमार्फत कॉन्फरन्स घेऊन या उद्योगांना कशी चालना मिळेल, यासाठी राज्य सरकारतर्फे प्रयत्न केले जात आहेत. या उद्योगांमुळे वेंडरलाही फायदा होईल. हा उद्योग सध्या भरारीवर असून, यात मोठी गुंतवणूक होत आहे.

अॅग्रो प्रोसेसिंग डेव्हलप करा

कृषीवर आधारित प्रक्रिया उद्योग नाशिकमध्ये व्हावेत, यासाठी राज्य सरकार पुढील काळात फोकस करणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर आज चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. त्यात नाशिकमध्ये काही कृषी उद्योगांकडे जास्त लक्ष दिले जाते; पण येत्या काळात फ्रूट अँड व्हेजिटेबल बास्केटसाठी प्रयत्न केले जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टुरिझम अँड वेलनेस

नाशिकमध्ये पर्यटन व आरोग्य क्षेत्राला महत्त्व आहे. ते वाढविण्यासाठी सरकार आराखडा तयार करून इन्फ्रा स्ट्रक्चर उभे करेल. या सर्व्हिस सेक्टरमध्ये चांगला पैसा आहे. या शहरात अंतर्भूत क्षमता आहे. हे क्षेत्र महत्त्वाचे स्थान असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपाआधी भाजीपाल्याची आवक वाढली

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

येत्या १ जूनपासून शेतकरी संपावर जाणार आहेत. या संपात शेतकरी भाजीपाला, दूध, फळे आदी शेतमाल विक्रीसाठी आणणार नाहीत. संपाला दोन दिवस बाकी असल्यामुळे मंगळवारी बाजार समितीच्या आवारात सोमवारच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली आहे. भाजीपाल्याची आवक अचानक वाढल्यामुळे बाजारभावात घसरण झाली. दोन दिवस उशिरा तयार होणाऱ्या भाजीपाल्याचीही काढणी करून तो भाजीपाला बाजारात आणण्यावर सर्वच शेतकऱ्यांनी भर दिला आहे. त्यामुळे ही आवक वाढली आहे.

संपाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्याचा काही दिवसांसाठी स्टॉक करण्याच्या उद्देशाने भाजीपाल्याला चांगली मागणी आहे. व्यापारी तसेच स्थानिक भाजीबाजारातील विक्रेतेही जास्त प्रमाणात भाजीपाला खरेदी करण्यावर भर देत आहेत. असे असले तरी भाजीपाल्याची आवक वाढल्याने बाजारभावात सोमवारच्या तुलनेत मंगळवारी घसरण झाली. नाशिकमधून मुंबईसारख्या शहरात भाजीपाला पाठविणाऱ्या व्यापाऱ्यांनी भाजीपाला मोठ्या प्रमाणात भरून पाठविला आहे. हा भाजीपाला संप सुरू होण्याच्या अगोदर मोठ्या शहरात पोहचविण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचे दिसले.
संपामुळे शेतकरी भाजीपाला विक्रीस आणणार नाहीच, तरीही काही शेतकऱ्यांनी विरोधात जाऊन भाजीपाला आणण्याचा विचार केला तरी आपल्या वाहनाची तोडफोड होण्याच्या भीतीने असल्यामुळे वाहनधारकच शेतमालाची संपाच्या कालावधीत वाहतूक करण्याच्या तयारीत नाहीत. त्यामुळे मंगळवारी बाजार समितीच्या आवारात भाजीपाला घेऊन येणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली. बाजार समितीच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर वाहतूक ठप्प होत होती. मोठ्या आवारात वाहनांना जागा अपुरी पडत होती. दुपारचे लिलाव साधरणतः तीन ते साडेतीन वाजेपर्यंत आटोपतात. ते लिलाव मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होते. बुधवार हा नाशिकच्या बाजाराचा दिवस आहे. तसेच संप सुरू होण्यासाठी एकच दिवस बाकी असल्यामुळे उद्या (बुधवारीही) भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोकादायक पुलांबाबत बांधकाम विभाग गाफील

0
0

नाशिक : जिल्ह्यातील कमकुवत पुलांची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल वर्षभरानंतरही सादर केली नसल्याची बाब समोर आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या अध्यक्ष हे जिल्हाधिकारीच असून, त्यांच्याकडे माहिती न दिल्याने अखेर बांधकाम विभागाला १५ जूनचा अल्टिमेटम जिल्हा प्रशासनाने दिला आहे. विशेष म्हणजे, बांधकाम विभागाला स्मरणपत्र देण्याची नामुष्कीही जिल्हा प्रशासनावर ओढवली आहे. जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडल्यावर या विभागाला जाग येणार का, असा सवाल उपस्थ‌ित होऊ लागला आहे.
महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळला त्या दुर्घटनेच्या वेदना अजूनही ठसठसत आहेत. या दुर्घटनेनंतरच राज्यातील कमकुवत पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला. राज्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी तेव्हा दिले होते. वर्षभराच्या काळात सावित्री नदीवरील पुलासह काही जिल्ह्यांतही धोकादायक पूल पाडून त्या जागी नवीन पूल तयार झाले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन व सुरक्षा कालावधी संपलेल्या पुलांचा मुद्दाही या घटनेनंतर चर्चेत आला. धोकादायक पुलांवरील वाहतूक बंद करा, अशी मागणी होऊ लागली. जिल्ह्यातील पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे काम हाती घेण्यात आले. अशा धोकादायक पुलांची माहिती सादर करा, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे पदसिद्ध अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी गेल्या वर्षी दिले होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप ही माहिती सादर केली नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे आपत्ती निर्माण करू शकतील असे किती आणि कोणते धोकादायक पूल शहरात आणि जिल्ह्यात आहेत, याची अचूक आणि इत्थंभूत माहितीच जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीकडे उपलब्ध नसल्याची खेदजनक बाब पुढे आली आहे.

तहसीलदार करणार कार्यवाही

गेल्या वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने येथील पायाभूत सुविधांची वास्तवता चव्हाट्यावर आली. शहरात आणि जिल्ह्यात अनेक पूल पाण्याखाली गेले. सायखेडा आणि त्यापुढील ३२ गावांना नाशिक शहराशी जोडणाऱ्या चांदोरी-सायखेडा पुलाचाही त्यामध्ये समावेश होता. यंदाही अशी आपत्कालीन परिस्थ‌िती निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. धोकादायक पूल वाहतुकीसाठी बंद राहतील, यासाठी तहसीलदारांनी आपल्या स्तरावर योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह

घोटी येथे दारणा नदीवरील धोकादायक पूलही गेल्या वर्षी बांधकाम विभागाच्या सूचनेवरून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाममंत्री शिंदे यांच्या आदेशानंतर या विभागाने स्ट्रक्चरल ऑडिटला सुरुवात केली. हे काम प्रगतिपथावर असले तरी अद्याप अहवाल प्राप्त झाला नसल्याची माहिती डिसेंबरमध्ये नाशिक दौऱ्यावर आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाला अद्याप प्राप्त न झाल्यामुळे बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऑडिटच पूर्ण झाले नाही तर पुलांची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी केव्हा होणार, असा सवाल उपस्थ‌ित होऊ लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीस नगरसेवकांची पार्श्वभूमी गुन्हेगारी

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेची निवडणुकीचा धुराळा नुकताच शांत झाला. सध्याच्या नगरसेवकांची मुदत १४ जूनपर्यंत असल्याने १५ जून रोजी महापौर पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत ८४ नगरसेवक पालिकेच्या सभागृहात पाहोचले आहेत. मात्र या नगरसेवकांपैकी तब्बल ३० नगरसेवक हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. यापैकी १२ नगरसेवकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

असोसिएशन फॉर डेमॉक्रेटी‌क रिफोर्मस (एडीआर) आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉच या संस्थांनी नवनिर्वाचित ८४ पैकी ७९ नगरसेवकांच्या प्रतिज्ञापत्राचे विश्लेषण करून एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. यंदाच्या निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ५४ उमेदवारांना सर्वपक्षांनी उमेदवारी दिली होती. त्यापैकी तीस नगरसेवकांनी निवडणुकीत यश मिळवून सभागृह गाठले आहे. या तीस नगरसेवकांपैकी १२ नगरसेवकांवर तर खून, अपहरण, बलात्कार अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

१५ नगरसेवक कोट्यधीश

गुन्हेगारी पार्श्वभूमीसह काही नगरसेवक हे कोट्यधीश असल्याचेही या संस्थांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. आर्थिकदृष्ट्यादेखील मनपाचे नवनिर्वाचित शिलेदार श्रीमंत आहेत. १५ नगरसेवक कोट्यधीश असून सरासरी प्रत्येक नगरसेवक ६३ लाखाचा धनी आहे. कोट्यधीश नगरसेवकांमध्ये सर्वाधिक शिवसेनेचे ६ नगरसेवक आहेत. प्रभाग १४ क मधून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमद अहमद्दुला नबी हे सर्वात श्रीमंत नगरसेवक ठरले असून त्यांची संपत्ती ६ कोटीहून अधिक आहे. १५ नगरसेवकांची संपत्ती तीन लाखांपेक्षा कमी आहे. शिवसेनेच्या कविता किशोर बच्छाव यांची संपत्ती केवळ ७९ हजार ५०० रुपये इतकी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. डेकाटेंना माघारी पाठविण्याच्या हालचाली!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या घंटागाडी सेवेमुळे वादग्रस्त ठरलेले पालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांना त्यांच्या मूळ सेवेत परत पाठविण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत. वांरवार सूचना व नोट‌सिा देवूनही डॉ. डेकाटे यांच्या कारभारात सुधारणा होत नसल्याने प्रशासनाने आता त्यांच्या परतीची तयारी सुरू केली आहे. डॉ. डेकाटे यांच्यावर ठेकेदारांना पाठ‌शिी घालण्याचा ठपका ठेवण्यात आला असून, त्याचा पालिकेतील कार्यकालही पूर्ण झाला आहे. त्यामुळे पालिकेने त्यांना शासनाच्या आरोग्य विभागात परत पाठवण्यासंदर्भातील पत्रव्यवहार सुरू केला आहे.

महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांचा पालिकेतील कारभार चांगलाच वादग्रस्त ठरला आहे. डेकाटे प्रतिनियुक्तीवर पालिकेच्या सेवेत आले आहेत. शहराच्या स्वच्छतेऐवजी ठेकेदारांची भलामण करत असल्याचा आरोप नगरसेवकांकडून केला जात आहे. घंटागाडी ठेक्याचा आकडा फुगवणे आणि या ठेक्याची अंमलबजावणी न करण्याचा ठपका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी त्यांच्यावर ठेवून नोटीस बजावली होती. घंटागाडी ठेक्यात ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे बंधनकारक असतांनाही, डॉ. डेकाटे यांनी ठेकेदारांना अभय दिले. महापौरांनी केलेल्या पाहणीत ही बाब उघडकीस आली होती. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्याबाबत त्यांनी आयुक्तांना सादर केलेल्या खुलाशात समाधानकारक उत्तर नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. डॉ. डेकाटे यांनी यापूर्वीही तीन ते चार वेळा कारभारात सुधारणा करण्यासंदर्भात नोटीसा बजावलल्या आहेत. परंतु त्यांचीही डॉ. डेकाटे यांनी समाधानकारक उत्तरे दिलेली नाहीत.

डॉ. डेकाटे यांच्याकडे आरोग्य विभागासह वैद्यकीय विभागाचाही पदभार आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला ते न्याय देत नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. वारंवार नोटीस व समज देवूनही डॉ. डेकाटे यांच्या कारभारात सुधारणा होत नसल्याने व त्यांचा पालिकेतील कार्यकाल समाप्त झाल्याने त्यांच्या परतीची कारवाई सुरू केली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाला पत्र पाठवून त्यांची पालिकेतील प्रतिनियुक्ती रद्द करण्याची शिफारस पालिकेकडून केली जाणार आहे. त्यासंदर्भातील

फाईल तयार झाली असून, शासनाला त्यांच्या परतीची विनंती केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images