Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

विजेच्या धक्क्याने शेतमजूराचा मृत्यू

$
0
0
शेतात लोंबकळणा-या विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने शेममजूराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी आसोदा येथे घडली. याप्रकरणी तालुका पोलिस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यासाठी टुरिझम प्लॅन

$
0
0
जळगाव जिल्हयातील दुर्लक्षित पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी ३६ कोटींचा टुरिझम प्लॅन केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी रविवारी अमळनेर येथे पत्रकारांशी बोलतांना दिली.

गॉगलमागची शंका

$
0
0
दिल्लीतल्या प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सगळीकडेच संवेदनशील बनलाय. एवढा की, आता चारचौघात वावरतानाही तरुण जरा जास्तच सावधगिरी बाळगू लागलेत.

विल्होळी-अंबड लिंकरोड दुरुस्तीची मागणी

$
0
0
विल्होळी-अंबड लिंकरोड हा पर्यायी मार्ग दुरुस्त झाल्यास आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी सोपे जाणार असून अवजड वाहतुकीची समस्या मार्गी लागणार आहे.

फेरफारप्रकरणी चौकशीचे आदेश

$
0
0
कपालेश्वर पतसंस्था व श्रीराम बँकेकडील जप्त मालमत्तेच्या सातबारा उता-यांवर परस्पर फेरफार केल्याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी सोमवारी दिले. या बनवेगिरीत तलाठी व सर्कल दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले.

धन्य धन्य निवृत्ती देवा... काय महिमा वर्णावा

$
0
0
वाहनांनी गजबजलेल्या शहरात, हॉर्नच्या कर्कश आवाजात एक नादमधूर आवाज ऐकू येतो... टाळ मृदुंगाचा. विठोबा-रखुमाईच्या स्वरांनी धरलेल्या तालावर वारकरी आनंदाने विभोर झालेले असतात.

१ कोटीचे रक्तचंदन सापडले

$
0
0
मुंबई-आग्रा हायवेवरील कसारा-शहापूरलगत लतिफवाडीत छापा टाकून वनविभागाने सुमारे १ कोटी रुपये किमतीचे ८ हजार ९५ किलो रक्तचंदन जप्त केले. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार संदीप भांगले पथकाचा सुगावा लागताच फरार झाला.

दूषित पाण्यावर प्रयोगशाळेचा उतारा

$
0
0
शहरांमध्ये दूषित पाण्याचे प्रमाण ८ टक्के, तर ग्रामीण भागात १६ टक्के असल्याचा निष्कर्ष राज्य आरोग्य प्रयोगशाळेने काढला आहे. त्यामुळे पाण्याच्या तपासणीचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य प्रयोगशाळांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुरूषांचा पुढाकार आवश्यक

$
0
0
बलात्कार ही पुरूषांनी निर्माण केलेली कीड आहे. ही समस्या आहे ही नष्ट करण्यासाठी पुरूषांनीच पुढाकार घेतला पाहिजे. कायद्यातील अनेक तरतुदी, सुधारणा व सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय यांच्या अंमलबजावणीसाठी कुणीही लक्ष दिले नाही, त्यामुळे ही समस्या अधिक गंभीर बनली असल्याचे प्रतिपादन मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते अॅड. असीम सरोदे यांनी केले.

सांडव्यावरची 'आदिमाया सप्तशृंगी'

$
0
0
नाशिकसाठी संजीवनी ठरलेली जीवनदायिनी गोदावरी नदी अमृतासारख्या गोड पाण्यासाठी प्रसिद्ध आहेच; परंतु तिचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे घाटावर असलेली पुरातन मंदिरे.

मूर्ती लहान, पब्लिसिटी महान

$
0
0
एखादी कला किंवा गुण यामुळे अनेकजण नाव कमावतात. परंतु आपल्या कमकुवत बाजूलाच जमेची बाजू बनवत ज्योती अमगेने 'मूर्ती लहान पण पब्लिसिटी महान' अशी ख्याती मिळवली आहे.

नाशकात मासे महागले

$
0
0
केंद्र सरकारने केलेल्या डिझेलवाढीच्या निषेधार्थ काही दिवसांपासून मुंबई व जवळील बंदरातील मासेमारीचे संपूर्ण कामकाज ठप्प आहे. त्याचा नाशिकच्या मासळी बाजारावर परिणाम झाला असून माशांचे दर वधारले आहेत.

वीज कनेक्शन मिळवा विनाकटकट!

$
0
0
नवीन वीज कनेक्शन घ्यायचे असेल तर 'महावितरण'च्या ऑफिसमध्ये वारंवार चकरा माराव्या लागणार, हे ग्राहकांनी गृहीतच धरलेले असते. नवीन कनेक्शनसाठी लागणा‍-या विविध कागदपत्रांची जुळवाजुळव करताकरता जीव मेटाकुटीला येतो.

तळवाडेला शेतकरी मेळावा

$
0
0
प्रलंबीत असलेल्या हरणबारी धरणाच्या तळवाडे भामेर पोहोच कालव्याच्या कामाला नुकताच निधी उपलब्ध झाला आहे.

कावनईला दुर्लक्षाचे ग्रहण!

$
0
0
कुंभमेळ्यातील शाहीस्नानाची एक पर्वणी कावनईला होते. येथेच प्रभू श्रीराम व भगवान शंकर यांची भेट झाली. या भूमीत हनुमानाने कालनेमी राक्षसाचा वध केला.

नाशिकरोडला पाणीपुरवठा नाही

$
0
0
नाशिक पूर्व विभागामध्ये गांधीनगर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पंपाच्या पाइपलाइन क्रॉस कनेक्शनचे काम करायचे असल्याने नाशिकरोड विभागातील काही भागांत पाणीपुरवठा करण्यात येणार नसल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

शनिवारपासून सोलापूरला ओबीसी साहित्य संमेलन

$
0
0
सत्यशोधक ओबीसी परिषदेतर्फे दुस-या राज्यस्तरीय सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलनाचे आयोजन ९ व १० फेब्रुवारी रोजी सोलापूरमध्ये करण्यात आले आहे.

किलबिल शाळेबाहेर ठिय्या

$
0
0
किलबिल शाळेच्या प्रवेश प्रक्रियेविरुद्ध आवाज उठवत मंगळवारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शाळेबाहेर ठिय्या आंदोलन केले. गंगापूर पोलिस स्टेशनच्या हस्तक्षेपानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

मृतांच्या कुटुंबियांना सामाजिक न्यायमंत्र्यांची भेट

$
0
0
राज्याचे सामाजिक न्याय व व्यसनमुक्ती कार्यमंत्री शिवाजीराव मोघे यांनी सोनई हत्याकांडातील मृत तरुणांच्या नातेवाईकांची नाशिक व मालेगांव येथे प्रत्यक्ष येऊन नुकतीच भेट घेतली.

भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने शेतकरी चिंतेत

$
0
0
दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यातील शेतक-यांना पुरेशा पाण्याअभावी घाऊक पिके घेता आली नाहीत, त्यामुळे शेतक-यांनी थोड्या पाण्यावर भाजीपाल्याची लागवड केली आहे. त्यामुळे भाजीपाल्याची आवक वाढल्याने बाजारभाव कमी झाला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images