Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

वायरींग बदला! 'भोसला'ला सूचना

$
0
0
समर कॅम्पदरम्यान विजेचा शॉक लागून झालेल्या‌विद्यार्थ्याच्या अपघाती मृत्युनंतर पब्लिक वर्कस् डिपार्टमेंटने (पीडब्लूडी) मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षर मंडळाला संबंधित वायरींग बदलण्याची सूचना दिली आहे.

मनमोहन सिंग यांचे सरकार भ्रष्ट

$
0
0
मनमोहन सिंग यांचे सरकार भ्रष्ट असून त्यांनी जनतेची घोर फसवणूक केली आहे. केंद्राप्रमाणेच राज्य सरकारही अकार्यक्षम आहे.

गंगापूर धरणात दोघे बुडाले

$
0
0
गंगापूर धरणात पोहण्यासाठी उतरलेले दोन तरुण बुडाल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली. रविवारी सकाळी त्यातील एकाचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला, तर दुसऱ्याचा शोध रविवारी उशिरापर्यंत सुरू होता. तर सोमवारी पुन्हा शोधकार्य हाती घेतले जाणार आहे.

ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय हवे

$
0
0
आपापसात हेतूपुरस्सर वाद लावून राजकीय विरोधक या दुफळीचा फायदा उचलतात. हेच तंत्र उपयोगात आणून आजवर ओबीसींची फसगत केली गेली. यापुढे ओबीसींनी आपापसातील भेद विसरून एकत्रित यावे, असे आवाहन करतानाच ओबीसींसाठी मंत्रालय व्हावे, अशी जोरदार मागणीही खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केली.

'हवाहवाई' होणार नाशिककर

$
0
0
आपल्या मोहक अदांनी संपूर्ण बॉलीवूडला वेड लावणारी व तब्बल २१ वर्षांनी कमबॅक करत तितक्याच ताकदीने अभिनय करून सर्वांना कोड्यात टाकणारी 'हवाहवाई' श्रीदेवी चक्क नाशिककर होणार आहे.

जैविक विविधतेची व्हॅली

$
0
0
प्रभु श्रीरामांनी वनवासासाठी दंडकारण्यातील पंचवटी आणि तपोवनाची निवड केली होती. आजचे नाशिक त्याकाळी दंडकारण्याने वेढलेले होते, नव्हे तर दंडकारण्यातच वसलेले होते.

सोसायट्या होणार ऑनलाईन !

$
0
0
नाशिकमधील गृहनिर्माण सोसायट्यांची अद्यावत माहिती जनतेला उपलब्ध व्हावी आणि त्यांच्या कारभारात पारदर्शकता रहावी यासाठी सहकार विभागाने सर्व सोसायट्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे.

दहावी-बारावीचा 'निकाल' कधी?

$
0
0
दहावी-बारावीच्या परीक्षेनंतरची दीर्घ सुटी एन्जॉय केल्यानंतर वेध लागतात ते या परीक्षांच्या निकालाचे. परंतु मे चा शेवटचा आठवडा संपत आला तरी यंदा या निकालांची तारीखच जाहीर झालेली नसल्याने पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष निकालाकडे लागले आहेत.

शाबासकी, पण विचारुन..!

$
0
0
मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक विभागाचा आढावा नुकताच घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या या बैठकीत प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद सीईओ त्या-त्या जिल्ह्याच्या सद्यस्थितीची माहिती देत होते.

शिक्षकांच्या उपोषणामुळे मुख्याध्यापकांचे निलंबन मागे

$
0
0
शिरसोंडी येथील (ता. मालेगाव) सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकाच्या निलंबनाच्या निर्णयाला माध्यमिक शिक्षणाधिकारी एन. बी. औताडे यांनी सोमवारी स्थगिती दिली.

जिल्ह्याच्या भूजल पातळीत लक्षणीय घट

$
0
0
उन्हाची तीव्रता अधिक वाढून पावसाळ्याची तीव्र लागलेली असतानाच जिल्ह्यातील भूजल पातळीत लक्षणीय घट झाल्याचे स्पष्ट होत आहे. अनेक तालुक्यांची भूजल पातळी जवळपास तीन मीटर खाली गेली आहे.

...अखेर ती ताटातूट झालीच !

$
0
0
दुष्यंत-शकुंतलेची कथा तशी पुराणातली. एकमेकांना भेटण्यासाठी त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला वगैरे. त्यानंतर त्यांची भेट झाली, कधीकाळी आपणच तिला दिलेल्या अंगठीची खुण दुष्यंताला पटते मग त्यांची गाठभेट होते व शेवट मंगलमय होतो.

कारागृहात अवतरला 'बुलेट राजा'

$
0
0
नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात 'बुलेट राजा' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सोमवारी सकाळी सुरुवात झाली. पहिल्या दिवशी सैफअली खान याने चित्रीकरणात भाग घेतला. येथे दोन दिवस चित्रीकरण होणार असल्याचे कारागृह प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

सुरक्षित वाहतुकीसाठी उपाययोजना करा

$
0
0
'मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रांच्या ठिकाणी योग्य त्या सुरक्षित वाहतुकीच्या उपाययोजना करा,' असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

पाणीपुरवठ्याला मोटारींचे ग्रहण

$
0
0
बंगले व इमारतींवरील टाक्यांपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी थेट नळालाच विद्युत मोटारी जोडण्याच्या प्रकारामुळे पंचवटीतील अनेक भागांतील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागते आहे. महापालिकेने ही समस्या सोडवावी अशी मागणी नागरिकांकडून होते आहे.

पावसाळा तोंडावर नालेसफाईचा पत्ता नाही

$
0
0
पावसाळा तोंडावर आला तरी महापालिकेकडून शहरातील गटारी, नाले स्वच्छता मोहीमेला सुरुवात झालेली नाही. आरोग्य विभागाच्या उदासीनतेमुळे ऐन पावसाळ्यात लोकांचे हाल होण्याची चिन्हे दिसत आहेत.

चोरट्यांनी फोडल्या दानपेट्या

$
0
0
पैशांसाठी विविध शक्कल लढविणाऱ्या चोरट्यांनी मंदिरातील दानपेट्यांना लक्ष्य केले आहे. जेलरोडवरील अशाच घटनांत चोरट्यांनी तीन मंदिरांतील दानपेट्या फोडून पैसे लांबविले.

टँकरचालक-मालकांचे सामूहिक मुंडण

$
0
0
पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम कंपनीच्या डेपोतील टँकरधारकांनी गेल्या पाच दिवसांपासून इंधन वाहतूकदराच्या कारणावरून टँकर बंद आंदोलन पुकारले आहे. याची दखल कंपनीने न घेतल्यामुळे अखेर दोनशेपेक्षा जास्त टँकरचालक व मालकांनी सामूहिक मुंडण करून निषेध नोंदवला.

१५० वर्षांचा वटवृक्ष कोसळून १ ठार

$
0
0
कालिदास कलामंदिर येथील सुमारे दीडशे वर्षांपूर्वीचा वटवृक्ष सोमवारी सकाळी अचानक उन्मळून पडला. त्यावेळी तिथून जात असलेल्या बाइकवर हा वृक्ष कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले.

पुन्हा व्हावी 'सावाना' सभा

$
0
0
सार्वजनिक वाचनालयासमोर उभ्या असलेल्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी पंधरा दिवसांच्या आत विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे 'सावाना' च्या काही सभासदांनी अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांच्याकडे केली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images