Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अखेर नासर्डी बंधारा उद्‍ध्वस्त

$
0
0
महापौरांनी पाहणी करून आदेश दिल्यानंतर नासर्डी नदीवरील बंधारा फोडण्यात आला आहे. बंधाऱ्यातील पाणी बाहेर काढल्याने रहिवाशांची आता डासांपासून सुटका होणार आहे.

CBSE च्या १० वी, १२ वी परीक्षेचा निकाल जाहीर

$
0
0
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) दहावीचा निकाल रविवारी अचानकपणे जाहीर करण्यात आला. पाठोपाठ सोमवारी बारावीचा निकाल ठरल्याप्रमाणे जाहीर झाला. सीबीएसईने श्रेणीमापन पद्धती लागू केल्याने विद्यार्थ्यांचे गुणवत्ता यादीतील क्रमांक आणि त्यांची नावेही द्यायला शहरातील शाळांनी नकार दिला.

जेलरोडच्या भूमिगत तारांचा प्रश्न प्रलंबितच

$
0
0
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अश्वासन देऊनही शहरातील भूमिगत तारांचा प्रश्न प्रलंबित आहे. नाशिकरोडच्या जेलरोड परिसरात अनेक घरांवरून हायटेंशनच्या तारा गेल्याने लोकांना जीव धोक्यात घालून वास्तव्य करावे लागत असल्याने या तारा भूमिगत कराव्यात, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.

मालेगावला २५ टक्के प्रवेशाबाबत मार्गदर्शन

$
0
0
आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यशर्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येणाऱ्या २५ टक्के जागांची प्रवेश प्रक्रिया कशी राबवायची याबाबत मालेगावमध्ये मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

...तर सर्वांची बदली करा

$
0
0
शहरात एलबीटी लागू झाल्यानंतरही एस्कॉर्ट कर बंद करण्यात आलेले नाही. या करप्रणालीस वाहतूकदार संघटनेने विरोध केला असून एस्कॉर्ट कर्मचारी लूट करीत असल्याचा आरोप केला आहे.

सरकारी इमारतींना करा रेनवॉटर हार्वेस्टिंग

$
0
0
आगामी काळात पाण्याचे नियोजन करण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग राबवणे गरजेचे आहे. त्याची सुरुवात सर्व सरकारी इमारतींपासून करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे करण्यात आली.

कमी कालावधीत अॅडिशनल डिग्री

$
0
0
पुणे विद्यापीठामार्फत यंदापासून इंजिनीअरिंगच्या अभ्यासक्रमामध्ये अॅडिशनल डिग्री या संकल्पनेचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना कमी कालावधीत अॅडिशनल स्पेशलायझेशन मिळवून देणाऱ्या या संकल्पनेबाबत विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग विभागाचे डीन डॉ. गजानन खराटे यांनी 'मटा'शी संवाद साधला.

सोळा हजार संस्थांचे हिशेब वा-यावर

$
0
0
धर्मदाय तथा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात निरनिराळ्या क्षेत्रातील १६ हजार ३१३ संस्थांची नोंदणी झाली आहे. या संस्थांची अनेक वर्षांपासून हिशेब पत्रके सादर करण्यात आलेली नाहीत, असे माहितीच्या अधिकारात स्पष्ट झाले आहे.

'BPCL'चे पेट्रोल पंप 'रिझर्व्ह'वर

$
0
0
भारत पेट्रोलिअमच्या टँकरचालक आणि मालकांनी संप पुकारल्यामुळे शहरासह जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप 'रिझर्व्ह'वर लागले आहेत. बीपीसीएलचे जिल्ह्यातील सर्व पंप मंगळवारी पूर्णपणे कोरडेठाक होतील, असे चिन्ह असल्याने वाहनधारकांना पेट्रोलसाठी चांगलीच पायपीट करावी लागण्याची शक्यता आहे.

'एलबीटी'मुळे महागाईत भर

$
0
0
महापालिका हद्दीत लागू झालेल्या एलबीटी करप्रणालीमुळे महागाईत भर पडली आहे. एलबीटीमुळे साखर आणि पेट्रोलच्या ​किंमती वाढल्या असून दुष्काळसदृष्य परिस्थितीचा विचार करून राज्य सरकारने यांच्यावरील एलबीटी कर कमी करावा अशी मागणी शिवसेनेने पदाधिकाऱ्यांनी केली.

तिथीनुसार करावी सावरकर जयंती

$
0
0
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती सध्या इसवी कालगणनेप्रमाणे साजरी केली जात असून हा सावरकरांचा अपमान आहे. सावरकरभक्तांनी २८ मे या तारखेला सावरकर जयंती साजरी न करता वैशाख कृष्ण षष्ठीला साजरी करावी, असे मत सावरकर अभ्यासक व साहित्यिक नंदन रहाणे यांनी व्यक्त केले.

त्या ५ सट्टेबाजांना न्यायालयीन कोठडी

$
0
0
आयपीएल मॅचेसेसवर बेटींग लावणाऱ्या पाच संशयितांना कोर्टाने सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. मॅचेसवर सट्टा लावणाऱ्या संशयितांना क्राईम ब्रँचने गेल्या बुधवारी शिताफीने अटक केली होती.

जैनांसह ५२ जणांविरोधात आरोपपत्र

$
0
0
नगरपालिकेच्या घरकुल घोटाळा प्रकरणी सोमवारी कोर्टात आमदार सुरेश जैन तसेच राज्यमंत्री गुलाबराव देवकरांसह ५२ जणांविरोधात दोषारोपपत्र ठेवण्यात आले. यावेळी आ. जैन तब्येतीचे कारण पुढे करून गैरहजर राहिले.

पाथर्डी गावात पाणीगळतीची समस्या

$
0
0
पाण्याच्या टंचाईने गावेच्या गावे होरपळून निघत असताना पाथर्डी गाव परिसरात मात्र ठिकठिकाणी पाण्याची गळती होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून होणारी गळती रोखण्यासाठी महापालिकेच्या प्रशासन व लोकप्रतिनिधींनी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत.

नाशिकच्या अर्थव्यवस्थेचा कणा बँकिंग

$
0
0
नाशिकमधून शेतीमाल आणि औद्योगिक उत्पादनाची निर्यातही मोठ्या प्रमाणावर होते. वायनरी, हॉटेल, पर्यटन अशा सर्वच क्षेत्रांसाठी वित्तपुरवठा आवश्यक असतो. शहराच्या विस्तारणाऱ्या परिघाबरोबरच बँकिंगचे जाळेही वेगाने विस्तारत आहे. नाशिकमध्ये २५ राष्ट्रीयीकृत बँका आहेत.

'रासबिहारी'च्या पालकांचे उपसंचालकांसमोर धरणे

$
0
0
फी न भरलेल्या विद्यार्थ्यांचे दाखले घरी पाठवून रासबिहारी शाळेना नियमाचे उल्लंघन केल्यामुळे संबंधित पालकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

कारागृह सुरक्षेचे धिंडवडे

$
0
0
नाशिकरोड कारागृहात गेल्या दोन दिवसांपासून 'बुलेटराजा' चित्रपटाचे शुटींग सुरु असल्याने कारागृहाच्या सुरक्षेकडे झालेल्या दुर्लक्षामुळे कारागृहाची सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिसरात कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नसल्याने 'आवो जावो घर तुम्हारा' अशी अवस्था झाली आहे.

कार्यकर्ते दोन मफलर एक

$
0
0
आज या समाजाचा मेळावा, उद्या त्या समाजाचा मेळावा तर कधी कार्यकर्त्यांचा मेळावा अशा एक ना अनेक कारणांनी सध्या शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. परवा अशाच एका राष्ट्रीय पक्षाने कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजीत केला होता.

मराठी माणसाने कलेचे व्यापारात रूपांतर करावे

$
0
0
आत्मसंतुष्टता हा मराठी माणसाचा दुर्गुण असून हा दूर करत आपल्याजवळ जी कला आहे त्याचे व्यापारात रूपांतर करण्याचा मंत्र सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष माधवराव भिडे यांनी दिला.

जिल्हा बँकेच्या २९ संचालकांना नोटीस

$
0
0
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त झाल्यानंतर आता सहकार विभाग आणि बँकेचे प्रशासक ज्ञानदेव मुकणे आक्रमक झाले आहेत. बँकेतील वादग्रस्त व्यवहारांबाबत खुलासा मागविणारी नोटीस सहकार विभागाने सर्व २९ संचालकांना बजावली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images