Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘फेरफार’ला मंजुरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेची विशेष अंदाजपत्रकीय महासभा सोमवारी महापालिका सभागृहात पार पडली. अवघ्या अर्धा तासात कुठल्याही चर्चेविना महासभेत सन २०१७-१८च्या ३७८.९९ कोटीच्या अंदाजपत्रकात महापौरांना अंदाजपत्रकातील वाढ व घट करण्याचे अधिकार देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सदस्यांचीदेखील विशेष महासभेत निवड करण्यात आली.

महापौर रशीद शेख, उपमहापौर सखाराम घोडके, आयुक्त संगीता धायगुडे, नगरसचिव राजेश धसे यांच्या उपस्थ‌ितीत ही अंदाजपत्रकीय महासभा पार पडली. महापालिकेचे सन २०१७-१८ वर्षासाठीची अंदाजपत्रकी महासभा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमुळे आचारसंहिता लागल्याने लांबले होते. दरम्यान मागील स्थायी समितीने अंदाजपत्रकीय बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. सोमवारी हे ३७८.९९ कोटीचे अंदाजपत्रक नवनिर्वाचित महासभेपुढे ठेवण्यात आले. प्रारंभी उपायुक्त (कर) कमरुद्दीन शेख यांनी याबाबत सभागृहापुढे निवेदन केले. तसेच उपमहापौर सखाराम घोडके यांनी पालिकेचे निव्वळ महसुली उत्पन्न किती व शासनानाची विविध योजनांची अनुदाने किती याबाबत विचारणा केली. यावर शेख यांनी पालिकेचे निव्वळ महसुली उत्पन्न १६४.६६ कोटी इतके असल्याचे सांगितले. तसेच एप्रिल महिन्यापासून वर्क ऑर्डर निघालेल्या कामांबाबत गटनेते डॉ. खालिद परवेज यांनी प्रश्न उपस्थित केला.

दरम्यान काँग्रेस नगरसेवक अस्लम असारी यांनी चर्चेदरम्यान अंदाजपत्रकात वाढ किंवा घट करण्याचे अधिकार महापौरांना देण्यात यावे, अशी सूचना मांडली. त्याला शेख युनुस इसा यांनी अनुमोदन दिले. सभागृहात हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.

हरकतींवर चर्चा नाहीच

सभा संपल्याचे सांगताच महागठबंधन आघाडीचे घटनेते बुलंद एकबाल यांनी हरकतीचे मुद्दे उपस्थित केले. मात्र महापौर रशीद शेख यांनी लगेचच राष्ट्रगीताची घोषणा केल्याने अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले.

स्थायी सदस्यांची निवड

सोमवारी अंदाजपत्रकीय महासभेच्या आधी स्थायी व महिला बालकल्याण समिती सदस्यांची निवड करण्यासाठी विशेष महासभा बोलावण्यात आली होती. यावेळी सभागृहातील पक्षाच्या गटनेत्यांनी आपल्या संख्याबळानुसार आपापल्या सदस्यांची नावे बंद पाकिटात महापौरांकडे दिली. १६ सदस्यीय स्थायी समितीत काँग्रेस व महागंठबंधन यांना समसमान ५ सदस्य तर सेना ३, भाजप २ व एमआयएमच्या एका सदस्याची निवड करण्यात आली आहे .तसेच महिला बालकल्याण समितीच्या ९ सदस्यांत काँग्रेस व महागठबंधन आघाडीला समसमान ३, सेना, भाजप, एमआयएमला अनुक्रमे एक सदस्यपद मिळाले आहे.

स्थायी समिती सदस्य

काँग्रेस
सलीम अनवर
फारुख खान फैजुल्ला खान
मंगलाबाई धर्मा भामरे
हमीदा बी साहेबा अली
कमरुंनिसा मोह. रिजवान

भाजप
काळे संजय रमण
शेलार सुवर्णा राजेंद्र

महा गठबंधन आघाडी
अन्सारी मन्सूर अह. शब्बीर अहमद
अन्सारी असफा मोह. राशीद
अन्सारी तन्वीर मोह. झुल्फेकार
नाबी अहमद अहमदुल्ला
शाने ए हिंद निहाल अहमद

शिवसेना
राजाराम बाबुराव जाधव
पुष्पा राजेश गंगावणे
प्रतिभा सचिव पवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाप्पांच्या मूर्तींना लागली भक्तांची ओढ!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दीड महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी ‌शहरात विविध ठिकाणी बाप्पा आकार घेऊ लागले असून, रंगकामास सुरुवात होत आहे.

नाशिकमधील गणेशमूर्ती परराज्यासह सातासमुद्रापार पोहोचल्या आहेत. मूर्ती तयार करण्यातील सुबकता आणि आकर्षक रंगसंगती यामुळे नाशिकचे नाव या क्षेत्रात मोठे होताना दिसत आहे. यामागे कारखानदार, कलाकार, कारागिरांचे अविरत कष्ट, त्यांची चिकाटी, प्रामाणिकपणा, नवे देण्याचा प्रयत्न, कुशलता या साऱ्या बाबी कारणीभूत आहेत.

गणेशाच्या आगमनाची तयारी मोठ्या कारखान्यांमध्ये वर्षभर सुरूच असते. शाडूच्या मूर्तीसाठी पेण प्रसिद्ध असले तरी नाशिकलाही या मूर्ती आता तयार होऊ लागल्या आहेत. आकर्षक गणेशमूर्ती तयार करणे आणि त्या रंगविणे यात नाशिकचे कलाकार अव्वल ठरत आहेत. मूर्ती साच्यातून काढणे, घासणे, आकर्षक रंगसंगतीत ती रंगविणे, प्लास्टिकच्या वेष्टनात गुंडाळून खोक्यात गवत भरून मूर्तीचे पॅकिंग करणे अशी कामे रात्रंदिवस सुरू असतात. हजारो हात या कामात राबत असतात. ऑक्टोबर महिन्यापासूनच गणेशमूर्ती बनविण्याची लगबग सुरू होते. सध्या शाडू मातीच्या मूर्तींना अधिक मागणी असल्याने नाशिकच्या कलाकारांनी या मूर्ती बनविण्यावर भर दिला आहे.

२५ ऑगस्ट रोजी बाप्पाचे आगमन होत असून त्यासाठी मूर्तीकार सज्ज झाले आहेत. मोठ्या मूर्तीवर बारीक काम करण्यास सुरुवात झाली आहे. जुलैअखेर मूर्ती तयार होऊन बुकिंग सुरू होईल.

मूर्ती बनविणे, फिनिशिंग व रंगकाम अशा तिन्ही आघाड्यांवर काम सुरू आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मूर्ती विकण्यासाठी तयार होतील. जानेवारीपासूनच बुकिंग सुरू होते.
-मयूर मोरे, मूर्तीकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सौभाग्यनगर उद्यान येणार पूर्वपदावर...

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

सौभाग्यनगरमधील नाना-नानी पार्कमध्ये साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्याच्या उद्देशाने येथे त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासन महापालिकेचे अधिकारी व नगरसेवकांनी सोमवारी (दि. १०) नागरिकांना दिले. येथे साचलेल्या पाण्याबाबत ‘उद्यानाचे झाले तळे’ या शीर्षकाखाली सोमवारी ‘मटा’मध्ये चित्रवृत्त प्रसिद्ध होताच त्याची तातडीने दखल घेत नगरसेवक केशव पोरजे यांच्यासह महापालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांसह अभियंत्यांनी या पार्कमधील स्थितीची पाहणी करून वरील आश्वासन दिले. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

लामरोडमधील शांतताप्रिय परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौभाग्यनगर भागातील एकमेव नाना-नानी पार्कमध्ये बालगोपाळांसह ज्येष्ठ नागरिकांचा सतत राबता असतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाचे पाणी उद्यानातील खेळण्यांच्या खाली साचून तळे निर्माण झाले आहे. याशिवाय गाजरगवतही फोफावले आहे. उद्यानाच्या जॉगिंग ट्रॅकशिवाय सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरल्याने बालगोपाळांचा हिरमोड होत होता. अशा परिस्थितीमुळे कोणीही नागरिक या उद्यानात फिरकेनासे झाल्याची समस्या ‘मटा’ने मांडली होती. त्यानंतर तत्काळ नगरसेवक केशव पोरजे, उद्यान निरीक्षक बी. डी. कटारे, शाखा अभियंता एजाज शेख, लिपिक विजय गायकवाड, हेडमाळी रमेश गिरी आदींनी येथे पाहणी करीत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन स्थानिक नागरिकांना दिले.

यावेळी अभिजित मोरे, नीलेश कर्डिले, संतोष पवार, दत्ता सोनवणे, दिनकर हगवणे, बाळासाहेब देशमुख, पुष्पा शेटे, रजनी धायकर, कविता कोडवानी आदींसह स्थानिक नागरिकांनी यावेळी उद्यानाबाबतच्या समस्या मांडल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ रस्त्याचा खर्च पाण्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था होणे ही बाब मोठ्या प्रमाणावर घडताना दिसते. त्यास नैसर्गिकएेवजी मानवनिर्मित घटकच प्रामुख्याने कारणीभूत ठरताना दिसतात. पळसे ते नानेगावदरम्यानच्या रस्त्याबाबतही अशीच स्थिती असून, सुमारे १ कोटी ८६ लाख रुपये खर्चाच्या या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत सोडून ठेकेदार गायब झाल्याने मोठा खर्च पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे. या रस्त्यावर मोठ्याप्रमाणावर पाणी साचत असल्याने नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

सुमारे १८ हजार लोकसंख्या असलेल्या पळसे गावातून नानेगावकडे जाण्यासाठी असलेल्या सुमारे ७ किलोमीटरच्या रस्त्यासाठी देवळालीचे आमदार योगेश घोलप यांच्या निधीमधून सुमारे १ कोटी ८६ लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. या रस्त्याचे पाच किलोमीटरपर्यंतचे कामदेखील झालेले आहे. मात्र, संबंधित ठेकेदार ज्ञानेश्वर महाजन याने उर्वरित दोन किलोमीटरचा रस्ता डांबरीकरण न करता सोडून दिल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय बनविलेला नवीन रस्तादेखील पावसाने महिनाभरात उखडून गेला आहे. जागोजागी मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या रस्त्यावरून वाहन चालविताना वाहनधारक आदळत आहेत.

गेल्या चार महिन्यांपासून अर्धवट स्थितीत असलेल्या या रस्त्याची आता पावसाळ्यात आणखी दुरवस्था झाल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागत आहे. याबाबत छत्रपती युवासेनेने रस्त्यावर उतरत निषेध नोंदविला असून, या अर्धवट स्थितीतील रस्त्याला स्थानिक प्रशासन व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी जबाबदार असल्याचा असल्याचा आरोप केला आहे. थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन येणार आहे.

अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे

रस्त्याच्या दुरवस्थेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे ठेकेदार व या रस्त्याला जबाबदार असणाऱ्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी, तसेच संबंधित ठेकेदाराचे बिल अदा न करण्याचे साकडे पंचक्रोशीतील नागरिक व छत्रपती युवासेनेतर्फे घालण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

पळसे ते नानेगाव रस्ता ग्रामीण भागातील ३० गावांना जोडणारा असून, याच रस्त्यावर नाशिक कारखानादेखील आहे. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण होणे गरजेचे असताना संबंधित ठेकेदार अर्धवट स्थितीत काम ठेवून गायब झाला आहे.

-विलास गायधनी, तालुकाध्यक्ष, छत्रपती युवासेना

--

या रस्त्याचा वापर सर्वच स्तरांतील नागरिक करीत असून, आमच्यासारख्या दिव्यांग नागरिकांना रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ये-जा करणे कठीण झाले आहे. संबंधित ठेकेदाराला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा गुन्हा दाखल करावा.

-बाळू गायधनी, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूर पंपिंगची सुरक्षा रामभरोसे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणावर कुणीही बिनदिक्कतपणे फिरताना आढळत असून, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर पंपिंग स्टेशनवरदेखील ‘आओ, जाओ घर तुम्हारा’ अशीच काहीशी स्थिती पाहायला मिळत आहे. रविवारी सुटीचा दिवस असल्याने गंगापूर पंपिंग स्टेशनवर फेरफटका मारला असता तेथे एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचे आढळून आले. त्यातच गंगापूर पंपिंग स्टेशनच्या जबाबदार अधिकाऱ्यांनीदेखील येथे सुरक्षारक्षकच दिले गेले नसल्याचे ‘मटा’ला सांगितले. त्यामुळे या पंपिंग स्टेशनची सुरक्षा रामभरोसे असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. भविष्यात एकाद्या माथेफिरूने येथे काही घातपाताचा प्रयत्न केल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे महापालिकेने येथे तत्काळ सुरक्षारक्षक नेमावेत, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

अतिमहत्त्वाचे ठिकाण असलेल्या गंगापूर पंपिंग स्टेशनला सुरक्षारक्षकच नसल्याचे समोर आल्याने याबाबत जबाबदार अधिकाऱ्यांना विचारले असता, सुरक्षारक्षकच दिले गेले नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, पंपिंग स्टेशनवर नेमणूक असलेले अधिकारी व कर्मचारी रविवारी कुठे गायब झाले होते, असाही सवाल उपस्थित होतो. केवळ एकच हजर असलेला कर्मचारीदेखील गाढ झोपल्याचे आढळून आले.

--


‘एमआयडीसी’साठी सुरक्षारक्षक!

गेल्या काही वर्षांपासून गंगापूर धरणाची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. गंगापूर धरणासह बॅक वॉटरलादेखील अनेकांचा मुक्तसंचार दिसून येतो. त्यातच हौशी पर्यटक धरणाच्या पाण्यात उतरत असल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटनाही घडल्या आहेत. दरम्यान, गंगापूर धरणातून महापालिका व एमआयडीसीला लागणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी दोन स्वतंत्र पंपिंग स्टेशन्स आहेत. एमआयडीसीच्या पंपिंग स्टेशनवर सुरक्षारक्षकांसह मुख्य प्रवेशद्वार कुलूप लावून ठेवण्यात येते. परंतु, नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर पंपिंग स्टेशनवर मात्र रविवारी ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी स्थिती पाहायला मिळाली.

--

गंगापूर धरण परिसरात जाण्यासाठी जलसिंचन विभागाची परवानगी घ्यावी लागते. परंतु, कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता पर्यटक बिनदिक्कतपणे धरण परिसरात जातात. पंपिंग स्टेशन सुरक्षारक्षकांविनाच असल्याची स्थिती आहे. येथे तत्काळ सुरक्षारक्षक नेमावेत.

-ज्ञानेश्वर गांगुर्डे, पर्यटक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नूतन विद्यालयाचे विभाजन कधी?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर तालुक्यात इयत्ता बारावीच्या परीक्षेचे नूतन त्र्यंबक विद्यालय हे एकमेव केंद्र असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी केंद्राचे विभाजन करण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांकडून होत आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात नूतन त्र्यंबक ज्युनिअर कॉलेज, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय ञ्यंबकेश्वर, ब्रम्हाव्हॅली पब्लिक स्कूल अंजनेरी, कर्मवीर भाऊसाहेब हिरे महाविद्यालय हरसूल, कला विज्ञान महाविद्यालय हरसूल, शासकिय आश्रमशाळा बोरीपाडा, गजानन महाराज उच्च माध्यमिक विद्यालय आव्हाटे, गाडगे महाराज माध्य व उच्च माध्य., आश्रमशाळा मुलवड, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आश्रमशाळा खरशेत, आर्किड इंटरनॅशनल स्कूल अशी दहा कनिष्ठ महाविद्यालय आहेत. या सर्व महाविद्यालयांमध्ये दीड हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी फेब्रुवारी ते मार्च २०१७ दरम्यान झालेल्या बारावीच्या परीक्षेस बसले होते. यावर्षी पटसंख्येत झालेल्या वाढीनुसार ही विद्यार्थी संख्या १ हजार ८०० च्या दरम्यान असेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

त्र्यंबकेश्वर येथील नूतन त्र्यंबक विद्यालय हे बारावीसाठी केंद्र क्रमांक ०११६ हे केंद्र मार्च १९९७ पासून देण्यात आला आहे. या विस वर्षांत कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या आणि पर्यायाने विद्यार्थ्यांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुटुंब नियोजनात अद्यापही पुरुष मागेच!

$
0
0

उत्तर महाराष्ट्रात केवळ ३० टक्केच पुरुषांनी केली शस्त्रक्रिया

नाशिक : कुटुंब नियोजन करणे ही दोघांची सारखीच जबाबदारी असताना प्रत्यक्षात पुरुषांकडून शस्त्रक्रिया करण्यासाठी टाळाटाळ केली जाते. उत्तर महाराष्ट्रात केवळ ३०.८६ टक्केच पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केली आहे. त्यातही नंदुरबारसारखा आदिवासी जिल्हा आघाडीवर असून, येथे ११९ टक्के पुरुषांनी शस्त्रक्रिया केल्या आहेत. पुढारलेल्या नगर जिल्ह्यात मात्र, पुरुषांचे प्रमाण नगण्य असल्याचेही पुढे आले आहे.

कुटुंब नियोजनाची शस्त्र‌क्रिया करायची झाल्यास पुरुषांवरची शस्त्रक्रिया कमी वेळेची व कमी जोखमीचे असते. परंतु, आजही नसबंदीबाबत पुरुषांची मानसिकता तयार झालेली नाही. लोकसंख्येचा दर जास्त वाढत होता, त्यावेळी महिलांनीच कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घ्यावी या आशयाची जाहिरात केली जात असे. मात्र पुरुषांनी कुटुंब नियोजन करून घ्यावे याची वाच्यता फारशी झाली नाही. कुटुंब नियोजनाची साधने पूर्वी प्राथमिक अवस्थेत असल्यामुळे पुरुषांची शस्त्रक्रिया करताना अनेकदा इनफेक्शनमुळे मृत्यू देखील झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. म्हणून घरचा धनी वाचला पाहिजे या विचारातून महिला देखील पुरुषांच्या कुटुंब नियोजनाला विरोध करीत असायच्या.

काँग्रेस सरकारच्या काळात या चळवळीने मोठ्या प्रमाणात जोर धरला होता. आरोग्य केंद्रांना टार्गेट दिल्यामुळे अनेकांना कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करून घ्याव्या लागल्या. त्यानंतर काही वर्षांनी यात आमूलाग्र बदल झाले. शस्त्रक्रियेत सुलभता आली. परंतु, पुरुष मंडळी या मानसिकतेतून बाहेर पडलेले नाहीत.

नगर पिछाडीवर

सहकार क्षेत्रात आघाडरीवर असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत सर्वात कमी पुरुषांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. २०१६ मध्ये ९९८ शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट देण्यात आले. यापैकी केवळ ६४ शस्त्रक्रिया पार पडल्या. २०१७ मध्ये २२१० शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी केवळ ५६ शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. यामुळे येेेथे जनजागृती करण्याची गरज आहे.

नंदुरबार आघाडीवर

पुरुषांच्या कुटुंब नियोजनाची सर्वात चांगली कामगिरी नंदुरबार जिल्ह्यात झाली. २०१६ मध्ये ३३७ शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट देण्यात आले. यापैकी १०५१ शस्त्रक्रिया पार पडल्या. २०१७ मध्ये ९३० शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यापैकी १११५ शस्त्रक्रिया पार पडल्या. मागील वर्षी एकूण उद्दिष्टांपैकी ३११.८७ टक्के शस्त्रक्रिया झाल्या, तर २०१७ मध्ये ११९.८९ टक्के शस्त्रक्रिया झाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाइक वर्कशॉपला भरघोस प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पावसाळ्यात बाइकची काळजी कशी घ्यावी, याविषयी महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे शनिवारी १५ जुलै रोजी वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. त्र्यंबकरोडवरील मोहरीर यामाहा शोरूममध्ये सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत वर्कशॉप होणार आहे. हा कार्यक्रम कल्चर क्लब सदस्यांसाठी मोफत आहे. वर्कशॉपमध्ये नोंदणी करण्यासाठी वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. थोड्याच जागा शिल्लक असल्याने जास्तीत जास्त बाइकप्रेमींनी त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र टाइम्सतर्फे करण्यात आले आहे.

पावसाळा आला की तरुणांना सर्वात जास्त चिंता सतावते ती आपल्या बाइकची. कधी गाडी स्लिप होते तर कधी इंजिनमध्ये पाणी जाते, त्यामुळे गाडी बंद पडते. अशी एक ना अनेक कारणे गाडी बंद पडण्यासाठी कारणीभूत ठरतात. हीच अडचण ओळखून महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. हे वर्कशॉप कल्चर क्लब सदस्यांसाठी मोफत आहे तर इतरांसाठी दोनशे रुपये आकारण्यात येणार आहेत. या वर्कशॉपसाठी रजिस्ट्रेशन करणे सक्तीचे आहे. रजिस्ट्रेशनसाठी ७०४०७६२२५४, ०२५३-६६३७९८७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

यामाहा बाइकसाठी ऑफर

तुमची जर यामाहा कंपनीची बाइक असेल आणि तुम्ही कल्चर क्लब सदस्य असाल, तर तुम्हाला नियमित बाइक सर्व्हिसिंगवर २० टक्के डिस्काऊंट मिळणार आहे. ही सूट ३० जुलैपर्यंत राहील. या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आंदोलनाची नव्याने मोट

$
0
0

२६ जुलैपासून तीव्र आंदोलनाचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तत्वत: कर्जमाफी देणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक केली. तरीही ऐतिहासिक कर्जमाफी दिल्याचा आव फडणवीस सरकार आणत असून, ही शेतकऱ्यांची ऐतिहासिक फसवणूक आहे. शेतकऱ्यांच्या विश्वासाचा फडणवीस सरकारने गळा घोटला असून, या गद्दारीला २६ जुलैपासून आंदोलनातून व्यापकस्तरावर उत्तर देण्याचा निर्धार शेतकरी सुकाणू समितीने सोमवारी नाशिकमध्ये केला.

सरकारच्या फसव्या कर्जमाफी घोषणेच्या निषेधार्थ शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या वतीने एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी सरकारच्या फसव्या धोरणांचा चांगलाच समाचार घेतला. एकीकडे उद्योगपतींच्या मालाला परदेशात बाजारपेठा खुल्या होत असताना शेतकऱ्यांच्या अन्नधान्याला निर्यातबंदी आहे. उद्योगपती सरकारचे बाप लागतात का? असा सवाल रघुनाथ पाटील यांनी उपस्थ‌ित केला. कर्जमुक्ती आणि शेतमालाला हमीभाव मिळविल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही असा निर्धार योगेन्द्र यादव, व्ही. एम. सिंग यांनी यावेळी व्यक्त केला.

सत्तेबाबतचा निर्णय २५ जुलैला

शेतकरी संपाला धार चढल्यानंतर खासदार राजू शेट्टी हे सत्तेमध्ये राहणार, की बाहेर पडणार याबाबतचा प्रश्न वारंवार उपस्थित होऊ लागला होता. एल्गार सभेच्या निमित्ताने शेट्टी नाशिकमध्ये आले असताना त्यांनी सत्तेमधून बाहेर पडणार, की नाही याचे उत्तर २५ जुलै रोजी मिळेल, असे पत्रकारांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समन्वयकपदी अॅड. जायभावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अॅडव्होकेट अॅक्टमधील प्रस्तावीत तरतुदींचा तसेच तयार करायच्या मसुद्यासाठी अखिल भारीत विधिज्ञ परिषदेच्या बैठकीत कार्यकारणाची घोषणा करण्यात आली. या समितीत समन्वयक म्हणून अॅड. जयंत जायभावे यांची सर्वानुमते नियुक्त करण्यात आली आहे.

अॅडव्होकेट अॅक्टमधील बदलांबाबत केंद्र सरकारला द्यावयाच्या मसुद्यांच्या चर्चेसाठी अखिल भारतीय विधिज्ञ परिषदेची बैठक ८ व ९ जुलै रोजी दिल्ली येथे झाली. देशातील सर्व राज्य वकील परिषदेचे प्रतिनिधी व हायकोर्टाचे सर्व वकील संघाचे प्रतिनिधी येथे उपस्थित होते. दुरुस्तीसाठी राष्ट्रीय मसुदा समितीमध्ये देशातील आठ प्रख्यात वकिलांचा समावेश करण्यात आला आहे. या राष्ट्रीय मसुदा समितीचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य अॅड. जयंत जायभावे यांची एकमताने नियुक्ती या बैठकीत करण्यात आली. राष्ट्रीय मसुदा समिती, अॅडव्होकेट अॅक्टचे दुरुस्तीबाबत देशातून आलेल्या सर्व सूचनांचा विचार करून या कायद्याचा मसुदा तयार करील. तसेच तो मुद्दा चर्चेअंती लोकसभेच्या स्थायी समितीसमोर मांडला जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

८४ टक्के वकिलांचे मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक बार असोसिएशनच्या ११ जागांसाठी मंगळवारी शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यातील वकिलांनी मतदानासाठी उत्साह दाखवल्याने एकूण ८४ टक्के मतदान झाले. तीन हजार ५४ पैकी ५११ वकील मतदारांनी मात्र मतदानाकडे पाठ फिरवली. दिवसभर मतदान प्रक्रिया सुरू असल्याने कोर्टाच्या दैनंदिन कामावर परिणाम झाल्याचे दिसून आले.

बार असोसिएशच्या ११ जागांसाठी ५६ उमेदवार रिंगणात असून, त्यांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झाले. मतमोजणीची प्रक्रिया १२ आणि १३ जुलै अशी दोन दिवस चालणार आहे. मतदानास सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. जिल्हा न्यायालयातील नवीन कोर्ट इमारत, पहिला मजला येथील आयटी लायब्ररीमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत ८४ टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील अडीच हजार पेक्षा जास्त वकीलांची गर्दी झाल्याने जिल्हा कोर्टाचा आवार गर्दीने फुलून गेला. सायंकाळपर्यंत गर्दी कायम होती. निवडणुकीचा थेट परिणाम कोर्टाच्या दैनंदिन कामावर झाला. दरम्यान, या निवडणुकीतून तब्बल ५११ मतदार वकिलांनी अंग काढून घेतल्याचा फायदा तोटा कोणात्या गटाला होणार याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत. दोन्ही गटांना विजयाची अपेक्षा असून, बुधवारी सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. निवडणुकीसाठी अॅड. एस. जी. सोनवणे, अॅड. व्ही. एम. जुन्नरे, अॅड. एम. एन. बस्ते हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

आज पदाधिकारी मतमोजणी

मतमोजणीची प्रक्रिया दोन टप्प्यात होणार असून, बुधवारी (दि. १२) सकाळी नऊ वाजता पदाधिकाऱ्यांसाठी झालेल्या मतदानाची मोजणी सुरू होईल. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, सहसचिव (महिला) या पदासाठी मतमोजणी होणार असून, त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येतील. उर्वरित पदांची १३ जुलै रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपट्टी तुंबली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेचे उत्पन्न वाढीसाठी प्रशासनाने मालमत्ता सर्वेक्षण सुरू केले असतांना हक्काच्या पाणीपट्टीच्या महसूलाकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. पाणीपट्टी विभागात कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने वर्षभरापासून वाटप रखडले आहे.

एक-एका कर्मचाऱ्याकडे आठ ते दहा हजार मिळकतींचे बील वाटप करण्याची जबाबदारी आहे. बील वेळेवर पोहचत नाही. त्याचा परिणाम थेट वसुलीवर झाला आहे. दुसरीकडे बीले वाटपाचे काम आउटसोर्सिंगद्वारे देण्याचा ठरावही लालफितीत अडकला आहे. त्यामुळे महापालिकेला आपल्या हक्काच्या सुमारे ४० कोटींच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. महापालिकेच्या पाणीपट्टी विभागाकडे एक लाख ९५ हजार नळजोडणी आहे. या नळजोडणीधारकांना दर तीन महिन्यांनी पाणीपट्टीचे बीले देणे बंधनकारक आहे. परंतु, पाणीपट्टी विभागात कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने ही बीले वेळेवर पोहचत नाही. महापालिकेने चालू वर्षी वसुलीचे उद्दिष्ट्य हे ४८ कोटी रुपये आहे. पहिल्या चार महिन्यात आतापर्यंत फक्त पाच कोटींचीच वसुली झाली आहे. गेल्या वर्षातीलच बीले अद्यापही ग्राहकांपर्यंत पोहचलेली नाहीत. त्यामुळे वसुली कशी करायची असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. सध्या या विभागाकडे ११२ कर्मचारी आहेत. त्यांच्याकडेच घरपट्टीचे बिलेही वाटपाची जबाबदारी आहे. घरपट्टीचे चार लाख आणि पाणीपट्टीचे दोन लाख बिले अशी सहा लाख बिले वाटपासाठी केवळ ११२ कर्मचाऱ्याकडून होते. विशेष म्हणजे या कामांसह अन्य कामेही त्यांना करावी लागतात.

आउटसोर्सिंग धूळखात

ग्राहकांना पाणीपट्टी बिले वेळेत पोहचवितात. यासाठी गेल्या वर्षी ही बिले आउटसोर्सिंगद्वारे वाटपाचा ठराव मंजूर झाला होता. हा ठराव महासभेने अंमलबजावणासाठीही पाठवला होता. परंतु, स्मार्ट सिटीत नवीन पाणीमीटर घेण्याचा घाट घालण्यात आल्याने हा प्रस्तावही लालफितीत पडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेकेदाराचे मापात पाप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या मोफत अंत्यसंस्कार योजनेत मृतांच्या अंत्यविधीसाठी पुरवठा केल्या जाणाऱ्या साहित्यामध्ये मापात पाप केले जात असल्याचा आरोप स्थायी समिती सदस्य जगदीश पाटील यांनी केला आहे. त्यामुळे कंत्राट रद्द करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादी टाकण्याची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी दिले.

पंचवटी अमरधाममध्ये महापालिकेकडून मोफत अंत्यसंस्कार योजना राबवली जाते. यासाठी ठेकेदाराला महापालिका प्रतिव्यक्ती अंत्यसंस्कारासाठी पैसे मोजते. ठेकेदाराने प्रति व्यक्ती आठ मन लाकूड, पाच लिटर रॉकेल आणि एक पाटी गोवऱ्या देणे बंधनकारक आहे. मात्र, ठेकेदार तेथेही मापात पाप करत असल्याचा आरोप सदस्यांनी स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत केला. जगदीश पाटील यांनी स्थायीत पुराव्यासह ठेकेदार कसे गैरव्यवहार करीत असल्याचे सप्रमाण मांडले. त्यासाठी त्यांनी आपबिती सभागृहात कथन केली. ठेकेदार बियरच्या दोन बाटल्यांमध्येच दीड ते दोन लीटर रॉकेलचा पुरवठा करत आहे, तर मृत व्यक्ती प्रकृतीवर लाकडाचा पुरवठा केला जात असल्याचा आरोप पाटील यांनी केला. तसेच गोवऱ्याही दोन ते तीनच देत असल्याचा दावा त्यांनी स्थायीत केला. आता पावसाळ्यात लाकूड ओलेच दिले जात असून रॉकेल अभावी चिता पेटतही नाही. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र, ठेकेदाराला त्याचे कोणतेही सोयरसूतक नाही. तेथे तक्रारपेटीही नसते. त्यामुळे सदरील ठेकेदाराची चौकशी करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी पाटील यांनी केली.

सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी पाटील यांच्या आरोपाची गंभीर दखल घेत, आरोग्याधिकाऱ्यांना यासंदर्भात तात्काळ जाब विचारला. त्यावर सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांनी विभागीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जाईल, असे सांगितले. त्यावर सभापतींनी तात्काळ नवीन ठेक्यासाठी निविदा काढण्याच्या सूचना करत, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

ठेकेदार जावई आहे का?
मोफत अंत्यसंस्काराचा ठेका दिलेल्या ठेकेदारालाच नवीन काम देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेवर ठेवला होता. विरोधी पक्षनेत्यांनी आक्षेप घेतल्यानंतर प्रशासनाचा हा प्रयत्न फसला. तसेच मोफत अंत्यसंस्काराचे काम आपल्यालाच मिळावे यासाठी संबधित ठेकेदाराने हायकोर्टात दावा दाखल केला. त्यावर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे सदस्य चांगलेच संतप्त झाले आहेत. संबधित ठेकेदारावर एवढी मेहरबानी का? हा ठेकेदार पालिकेचा जावई आहे का? असा प्रश्न पाटील यांनी केला आहे.

‘आरोग्य’ची मेहरबानी
संबंधित ठेकेदाराची मुदत संपण्यापूर्वी तीन महिने अगोदरच नव्या ठेक्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. तरीही आरोग्य विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. संबंधित ठेकेदाराला मुदतवाढ कशी मिळेल यासाठी प्रयत्न केले. आरोग्य विभागाच्या अनास्थेमुळे स्थायीच्या गेल्या बैठकीत ठेकेदाराला पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे ठेकेदारावर एवढी मेहरबानी का? असा सवालही सदस्य करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वीकृत’ची निवड लांबणीवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत संख्याबळानुसार पाच स्वीकृत सदस्यांच्या नियुक्ती प्रक्रियेसंदर्भात सोमवारी आयुक्तांसह झालेल्या बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एक सदस्यावर दावा ठोकला आहे. संख्याबळानुसार भाजपचे तीन तर शिवसेनेचे दोनच सदस्य नियुक्त होणार असतानाही आघाडीने एका जागेवर दावा ठोकल्याने नियुक्ती प्रक्रियेत ट्विस्ट निर्माण झाले आहे. आघाडीच्या दाव्यामुळे प्रशासनाने कायदेशीर पडताळणीसाठी वेळ मागवून घेतली आहे. त्यामुळे ही नियुक्ती लांबणीवर पडली आहे. दरम्यान आघाडीच्या मागणीमुळे आता भाजप आणि शिवसेनाला प्रस्ताव दाखल करण्यासाठी २१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे ही निवड सप्टेंबर नंतरच होणार असल्याने इच्छुकांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे.

महापालिकेची निवडणूक होऊन चार महीने उलटले तरी अद्यापही पालिकेत स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आलेली नाही. पालिकेतील संख्याबळानुसार भाजपचे तीन तर शिवसेनेचे दोन सदस्य नियुक्त होणार आहेत. परंतु या सदस्यांसाठीही आता अटी व शर्ती असल्याने निवड प्रक्रिया किचकट झाली आहे. वैद्यकीय, विधी, शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींची निवड करणे बंधनकारक असून, त्यासाठी पाच वर्षाचा अनुभव सक्तीचा करण्यात आला आहे. त्यामुळे या विषयांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेते दिनकर पाटील, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, विलास शिंदे, संभाजी मोरुस्कर, शाहू खरै, गजानन शेलार, दीक्षा लोंढे उपस्थित होते. या वेळी आयुक्तांनी तौलनिक संख्याबळानुसार पाच सदस्यांचा कोटा सांग‌ितला. त्यात भाजप तीन तर शिवसेनेला दोन जागा मिळत असल्याचे स्पष्टीकरण दिले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मात्र यावेळी आघाडीला एक सदस्याचा कोटा द्यावा, अशी मागणी केली. आम्ही एकत्र‌ित गटनोंदणी करू पण एक जागा सोडा, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर आयुक्तांनी आघाडीला लेखी म्हणणे सादर करण्याची मुदत दिली. यानंतर कायदेशीर बाबी पडताळून पाहू, असे स्पष्टीकरण आयुक्तांनी दिले. या सर्व प्रक्रियेसाठी आघाडीने वेळ मागून घेतला. त्यामुळे नियुक्तीची प्रक्रिया काही काळासाठी लांबणीवर पडली आहे. या प्रक्रियेला उशीर होणार असल्याने आयुक्तांनी शिवसेना आणि भाजपला आपल्या सदस्यांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी २१ ऑगस्टची मुदत दिली आहे. त्यानंतर प्रस्तावांची छाननी केली जाणार आहे.

नियुक्तीसाठी वेळकाढू धोरण

निवडणूक होताच पहिल्या महासभेनंतर तातडीने स्वीकृत सदस्यांची निवड करणे बंधनकारक आहे. परंतु भाजप आणि शिवसेनेतही इच्छुकांची संख्या ही जास्त आहे. त्यामुळे या पक्षांना निवडीचे आव्हान असल्याने निवड प्रक्रिया लांबवण्यासाठी वेळकाढू धोरण आखले जात आहे. त्यासाठी आता आघाडीचा चेंढू वापरण्यात आल्याचा संशय आहे. नियुक्ती प्रक्रिया लांबणीवर पडल्यास इच्छुकांचा त्रास कमी होईल. त्यानंतर अचानक नियुक्ती जाहीर करून वाद टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘श्रमाचा पैसा देतोय, मुलांकडून चीज व्हावे’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

‘गौरी, मला मुलगी नाही; पण मला तुझा अभिमान आहे. तुझी पूर्ण जबाबदारी घेऊ शकत नाही मी, ते माझ्या आवाक्याबाहेर आहे. खूप पैसा देऊ शकत नाही; पण जो देतोय श्रमाचा आहे. त्याचे चीज व्हावे ही अपेक्षा. तुझ्यासोबतच्या नऊ जणांचेही तोंडभरून कौतुकच! छोटीशी भेट देतोय...आशीर्वादासह.’ हे भावपूर्ण पत्र आहे सुरेश सूर्यवंशी यांचे.

रोजच शेकडोने पालक भेटतात, त्यांच्या व्यथा सांगतात. कित्येक पालक तर असे आहेत, की त्यांनी खूपच हालअपेष्टा सहन करीत शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांची अशी इच्छा आहे, की या मुलांना आपल्यासारखे दिवस काढावे लागू नये. ज्यांच्या स्वतःच्या मुलांच्या शिक्षणाचेही हालच आहेत, त्यांनीदेखील या मदतीमध्ये पुढाकार घेतला आहे. एक आजोबा लिहितात, की ‘मी मध्यमवर्गातला आहे, माझ्या नातवाचे शिक्षणही बरीच आबाळ करून झालेय. कर्ज काढावे लागले. या तिन्ही मुलांनी नाउमेद न होता शिकावे प्रवाहाविरुद्ध पोहून दाखवावे, माझे आशीर्वाद आहेतच. हेल्पलाइन वाचून एक वयस्कर व्यक्ती मोठ्या तळमळीने आली व या मुलांना देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत हो! पण माझ्या संपूर्ण आयुष्यात आलेले अनुभव मी यांना मार्गदर्शनासाठी देऊ इच्छितो. अल्ट्रेशनचा व्यवसाय करणारा एक जण चेक देण्यासाठी आला व अक्षरशः डोळ्यांत पाणी आणून त्याची व्यथा सांगून गेला, की ‘या मुलांना शिकू देत. आम्ही शिकलो नाही म्हणून आज या अवस्थेत आहोत.’

‘मटा हेल्पलाइन’मध्ये आवाहन केल्यावर दहाही मुलांसाठी मदत सुरू आहे. या दहा गरीब मुलांच्या शिक्षणासाठी प्रचंड पैसा उभा करावा लागणार आहे. पालक येतात, फोन येतात. कुणी या मुलांचे पालकत्व घेऊ पाहते, तर कुणी त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च करू इच्छित आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडून दहावीच्या परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा पुढील शैक्षणिक प्रवास सुकर व्हावा म्हणून वाचकांच्या सत्प्रवृत्तीला साद घालत हा ‘मटा हेल्पलाइन’चा उपक्रम हाती घेतला.

शे-दोनशेपासून हजारापर्यंतचे चेक जमा होऊ लागले. त्यांच्या दातृत्वाला दाद द्यायलाच हवी; पण ‘मटा हेल्पलाइन’ हा जगन्नाथाचा रथ आहे. तो वाचकांच्या हातूनच ओढला जावा, अशी अपेक्षा आहे. मदत मिळत आहेच, परंतु हा ओघ आणखी वाढल्यास ही मुले मोठेपणी नक्कीच नाव काढतील व त्याचे सर्वस्वी श्रेय या दानशूरांनाच राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थोडीसी तो लिफ्ट करा दे...

$
0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

प्रवाशांनी सातत्याने मागणी केल्यानंतर नाशिकरोड रेल्वे स्टेशनमध्ये दोन लिफ्टचे काम पूर्ण झाले आहे. त्यांचे टेस्टिंगही यशस्वी झाले आहे. परंतु, मुंबईतील सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप परवानगी न दिल्यामुळे महिनाभरापासून येथील लिफ्ट उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत.

नाशिकरोड स्थानकातून दररोज किमान शंभर ट्रेन्स धावतात. पंधरा ते वीस हजार प्रवासी प्रवास करतात. त्यांना अवघड जिने चढून दुसऱ्या व तिसऱ्या प्लॅटफॉर्मवर गाडी पकडण्यासाठी धापा टाकत जावे लागते. नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवास करणारे दररोजचे प्रवासी, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग यांच्यासाठी जिने चढणे दिव्य असते. हे विचारात घेऊन मुंबईसह महत्त्वाच्या स्थानकांमध्ये लिफ्ट बसविण्यात आल्या आहेत. नाशिकरोडला तीन वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. वर्षभरापूर्वी लिफ्ट उभारणीची प्रक्रिया सुरू होती. आता लिफ्ट तयार झाली, तर मुंबईच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी नसल्याने लिफ्ट वापरता येत नसल्याची स्थिती असून, त्या सुरू होण्यास एक महिना लागेल, असे समजते.

--

महिनाभरापूर्वीच पूर्ण झालेय काम

नाशिकरोडला चार फ्लॅटफॉर्म आहेत. त्यातील एक नंबरचा प्लॅटफॉर्म जास्त वापरात नाही. दोन व तीनवरच जास्त गाड्या थांबतात. चौथा नवा फ्लॅटफॉर्म क्वचितच वापरला जातो. दोन व तीन प्लॅटफॉर्मवर धावपळीत अवघड जिने चढून अनेकांना गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला आहे. या फ्लॅटफॉर्मना जोडण्यासाठी लिफ्टची सुविधा करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळचे वरिष्ठ व्यावसायिक व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी सांगितले, की दोन्ही लिफ्टचे काम महिनाभरापूर्वीच पूर्ण झाले आहे. मुंबईतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लिफ्ट विभागाकडून पाहणी करणे आणि परवानगी येणे बाकी आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर दोन्ही लिफ्ट आहेत. त्यातून ओव्हरब्रीजवर जाता येते. तेथून फ्लॅटफॉर्म क्रमांक दोन व तीनवर उतरता येते. रेल्वे स्टेशनवर लिफ्ट, तसेच सरकते जिने बसविण्यासाठी ‘मटा’ने वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.

--

ज्येष्ठांसह दिव्यांगांची गैरसोय

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांची लिफ्ट बसविण्याची जुनी मागणी होती. नाशिकरोडच्या प्लॅटफॉर्म एक व चारवर फार कमी गाड्या थांबतात. मुंबईहून येणाऱ्या २१ डब्यांच्या बहुतांश प्रवासी गाड्या या फ्लॅटफॉर्म दोनवर, तर मुंबईला जाणाऱ्या गाड्या फ्लॅटफॉर्म तीनवर थांबतात. गाडी चुकू नये म्हणून उत्साही युवक रूळ ओलांडण्याचा धोका पत्करतात. मात्र, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांगांचे हाल होतात. या गाड्या धावत-पळत जाऊन पकडण्यासाठी जिन्यावरून जाणे म्हणजे अनारोग्याला निमंत्रण देण्यासारखे असते.

--

सरकते जिने कधी?

भुसावळ विभागातील नाशिकरोड हे क्लास वन रेल्वे स्टेशन आहे. प्रवासीसंख्या, महसूलही हे स्थानक जास्त देते. परंतु, सुविधांबाबत भुसावळ आणि मनमाडला प्राधान्य मिळते. या दोन ठिकाणी जंक्शन आहे. पण, नाशिकरोडला नाही. भुसावळ विभागात नाशिकरोडखेरीज मनमाड, जळगाव रेल्वे स्टेशनवरही लिफ्ट उभारण्याचे काम सुरू आहे. खंडवा आणि अकोला येथे लिफ्टचे काम अद्याप सुरू होणे बाकी आहे. नाशिकरोडला सामान्य प्रवाशांसाठी सरकते जिने बसविण्याचे जाहीर झाले आहे. परंतु, त्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. ती झाल्यास लिफ्टवरील ताण कमी होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी कामगारांचे ‘चड्डी-बनियन’ आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेने सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली आहे. महागाई भत्ता त्वरित मिळाला नाही, मागील तीन वर्षांपासून गणवेशाची शिलाई मिळालेली नाही, तसेच कामगारांना यावर्षी कापड मिळाले नाही तर चड्डी-बनियन आंदोलन करू, असा इशारा या संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी दिली आहे. मागण्या मान्य न झाल्यास २० जुलैला विभागीय कार्यालये व मध्यवर्ती कार्यशाळेसमोर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

उपनगरच्या इच्छामणी मंगल कार्यालयात मंगळवारी नाशिक, धुळे, जळगाव, नगर येथील संघटना सदस्यांचा मेळावा झाला. त्यावेळी ताटे बोलत होते. व्यासपीठावर प्रदेश सचिव स्वप्निल गडकरी, विभागीय अध्यक्ष विजय पवार, महिला प्रतिनिधी शीला नाईकवाडे, राज्य अध्यक्ष संदीप शिंदे, नगर विभाग सचिव डी. जी. अकोलकर, धुळे सचिव राजेश वधिले, कैलास तुपे, माजीद शेख यांच्यासह कामगार बांधवांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियम न पाळणाऱ्यांचे लायसेन्स होणार रद्द

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

शहरातील अपघातांची संख्या शून्यावर नेऊन ठेवण्याचा पोलिसांचा मानस आहे. सर्वाधिक अपघात व अपघातात मृत्यू हे १८ ते ३५ वयोगटातीलच होत आहेत. यापुढे वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या व हेल्मेट न वापरणाऱ्यांचा परवानाच रद्द करण्याचे आदेश काढण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्‍त डॉ. रवींद्र सिंगल यांनी मंगळवारी सांगितले.

लर्निंग लायसेन्सनंतर पक्‍के लायसेन्स काढण्यासाठी आता खास प्रशिक्षण घेणे गरजेचे असून, प्रशिक्षणानंतर मिळणाऱ्या प्रमाणपत्रामुळेच पक्‍के लायसेन्स यापुढे उपलब्ध होणार आहे. या प्रशिक्षणाचा प्रारंभ मंगळवारी पोलिस आयुक्‍त व आरटीओ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नाशिक फर्स्टच्या चिल्‍ड्रेन पार्कमध्ये करण्यात आला. त्या वेळी डॉ. सिंगल बोलत होते.

ते म्हणाले, की कोणत्याही राज्यात अशा पद्धतीचे वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जात नाही. नाशिक शहरात प्रथमच असा उपक्रम राबविण्यात येत आहे. बेंगलुरू येथे वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले जात असल्याने त्याच धर्तीवर नाशिकमधील वाहतूकव्यवस्था करण्याच्या हेतूने या प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वाहतुकीचे नियम किंवा हेल्मेट न घालणे या गोष्टी पोलिस कर्मचाऱ्यांकडून झाल्या तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येत आहे.

या वेळी आरटीओचे भरत काळसकर, राजेंद्र कदम, वाहतूक शाखेचे लक्ष्मीकांत पाटील व नाशिक फर्स्टचे चेअरमन अभय कुलकर्णी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक करताना चेअरमन अभय कुलकर्णी यांनी सांगितले, की शहरातील वाहतूकव्यवस्था सुरळीत होण्यासाठी नाशिक फर्स्टचे कार्य सुरू आहे. वाहतुकीचे नियम पाळण्याबरोबरच शहराची वाहतूक सुरळीत करणे हा यामागील उद्देश असून, आरटीओ आणि पोलिसांच्या प्रयत्नामुळे हे आगळेवेगळे प्रशिक्षण शहरात सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.

आता लायसेन्सपूर्वी प्रशिक्षण बंधनकारक

आरटीओचे काळसकर यांनी सांगितले, की विविध अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत सूचना करण्यात येत असते. अनेक अपघात हे केवळ वाहतुकीचे नियम पाळले न गेल्याने होतात. त्यामुळेच आता लर्निंग लायसेन्सनंतर पक्‍के लायसन्स काढण्यापूर्वी नाशिक फर्स्ट येथे एक प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्रानंतरच लायसेन्स मिळेल.

शहरात २२ टक्क्यांनी अपघात कमी

कदम यांनी सांगितले, की अपघातांचे प्रमाण दरवर्षी किमान दहा टक्क्यांनी कमी झाले पाहिजे असे न्यायालयाचे निर्देश आहेत. नाशिकमध्ये गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत २२ टक्‍के अपघात कमी होऊन जीवित हानी झालेली नाही. चालकांना वाहतुकीचे सर्वच नियम काटेकोर पद्धतीने माहीत असणे आवश्यक असून या नियमांची अंमलबजावणी केली तर अपघात होणार नाहीत. पोलिस उपायुक्‍त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले, की चालक होण्याआधी त्यांना नियमांबाबत प्रशिक्षित करणे हा प्रशिक्षणामागचा हेतू आहे. या वेळी प्रशिक्षणाच्या पहिल्या बॅचमधील दहा जणांना प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. संजय देशपांडे यांनी आभार मानले. नाशिक फर्स्टचे पदाधिकारी व पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यात्रेकरूंवरील हल्ल्याचा निषेध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा शिवसेनेने निषेध केला असून, भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने मंगळवारी शिवसेना कार्यालयासमोर पाकिस्तानच्या झेंड्याला जोडे मारून, तसेच त्याचे दहन करून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी पाकिस्तानविरोधात घोषणाही देण्यात आल्या. पंतप्रधानांनी कडक भूमिका घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

सोमवारी रात्री अमरनाथ येथे यात्रेकरूंच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला. त्यात सात यात्रेकरूंचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्याचा शिवसेनेकडून मंगळवारी निषेध करण्यात आला. शालिमार येथे शिवसेनेकडून पाकिस्तानच्या झेंड्याला जोडे मारण्यात आले. त्यानंतर त्या झेंड्याचे दहन करण्यात आले. यावेळी पाकिस्तानविरोधी घोषणाही करण्यात आल्या. योगेश बेलदार, राजेंद्र क्षीरसागर, संदीप गायकर, अमोल सूर्यवंशी, देवाजी जाधव, अजय निकम यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

--

नाशिककर सुखरूप

दरम्यान, अमरनाथ यात्रेसाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातून ७०० भाविक गेलेले आहेत. सोमवारी झालेल्या हल्ल्यानंतर हे सर्व भाविक सुखरूप असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यात नाशिकमधील ३०० भाविकांचा समावेश आहे. या यात्रेसाठी नाशिकसह जळगाव, धुळे, शहादा येथून सुमारे ७०० भाविक गेले आहेत. त्यापैकी ५०० भाविक टूर ऑपरेटर्सच्या माध्यमातून या यात्रेसाठी जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचले आहेत. २०० भाविक रेल्वे, तसेच खासगी वाहनांद्वारे या यात्रेसाठी गेले आहेत. ७०० पैकी सुमारे ३०० भाविक नाशिकमधून गेल्याची माहिती टूर ऑपरेटर्सने दिली. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर या भाविकांना लगेच‍च स्थानिक पोलिस आणि सैन्य दलाने सुरक्षित स्थळी हलविले. त्यामुळे सर्व भाविक सुखरूप असून, त्यापैकी काही जण आज, बुधवारी (दि. १२) अमरनाथचे दर्शन घेतील, असे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेरिट लिस्टने धाकधूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सोमवारी रात्री उशिरा वेबसाइटचा तांत्रिक अडसर शिक्षण विभागाने दूर करून अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेदरम्यान पहिल्या मेरिट लिस्टसाठी सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांना एसएमएस केल्याचा दावा केला आहे. मात्र, मंगळवारीदेखील बहुतांश विद्यार्थ्यांना एसएमएस न मिळाल्याच्या तक्रारी होत्या. अखेरीस स्वत: वेबसाइटवर लॉग इन केल्यानंतर विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेल्या कॉलेजचे नाव वाचून हायसे वाटले. शहरात सायन्स विद्याशाखेसाठी ९४.४ टक्क्यांचे मेरिट, तर कॉमर्ससाठी ९० टक्क्यांचे मेरिट लागले.

पहिल्या मेरिट लिस्टची प्र्रसिद्धी सोमवारी सायंकाळी ५ वाजता होणे अपेक्षित होते. मात्र, रात्री दहा वाजून गेल्यानंतरही याबाबत वेबसाइटवर यादी अपलोड झालेली नव्हती. या प्रकाराने गोंधळलेल्या विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत शिक्षण विभागाकडेही तक्रारी केल्या होत्या. दरम्यान, मंगळवारी सकाळपासून विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागाच्या एसएमएसची पुन्हा वाट पाहून अखेरीला स्वत:चा पाठपुरावा करीत वेबसाइटवर लॉग इन केले. त्यानंतर त्यांना अलॉट झालेले कॉलेज पाहावयास मिळाले.

पहिल्या प्रवेश यादीअंतर्गत शहरात १४ हजार ९२१ विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, त्यापैकी सुमारे ७ हजार ५०० विद्यार्थ्यांचे प्रवेश पहिल्या दिवशी निश्चित झाल्याची माहिती शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी ‘मटा’शी बोलताना दिली. २४ हजार ५०० जागांसाठी सुमारे २६ हजारांवर अर्ज आलेले आहेत. प्रवेशप्रक्रियेतील उर्वरित नऊ हजार विद्यार्थ्यांना पुढील तीन मेरिट याद्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

--

सायन्सबरोबरच कॉमर्सही नव्वदीपार!

गेल्या वर्षीच्या मेरिटचा उच्चांक तोडत यंदा शहरात आरवायके कॉलेजमध्ये सायन्स शाखेचे मेरिट खुल्या वर्गासाठी ९४.४ टक्क्यांवर गेले. गतवर्षी हेच मेरिट ९३.८० टक्क्यांवर होते. कॉमर्स शाखेसाठी बीवायके कॉलेजमध्ये खुल्या वर्गासाठी ते ९०.८ टक्क्यांवर गेले. गतवर्षी बीवायकेमध्ये हेच मेरिट पहिल्या यादीत ८७ टक्क्यांवर होते. यंदा सायन्स व कॉमर्स या दोन्ही विद्याशाखांच्या मेरिटमध्ये वाढ झाली आहे.

--

कोट्यातील प्रवेशावरून नाराजी

यंदा ऑनलाइन प्रवेशांमुळे होणाऱ्या बदलांचे तर्क लावत अनेक पालकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश स्पोर्टस आणि कल्चर कोट्यातून करण्यास प्राधान्य दिले. मात्र, प्रत्यक्षात अलॉटमेंटमध्ये या विद्यार्थ्यांच्या वाट्याला काही कॉलेजने नॉन ग्रँट जागांवर प्रवेश दिला. तेथे या पालकांना ग्रँटेड जागांवर प्रवेश अपेक्षित असल्याने शिक्षण विभागाच्या या धोरणाबाबत पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

--

दुसरी लिस्ट २० जुलैला

पहिल्या मेरिट लिस्टचे प्रवेश १३ जुलैपर्यंत होतील. १४ जुलै रोजी रिक्त जागा व पहिल्या फेरीतील कट ऑफ प्रसिद्ध होईल. १५ ते १८ जुलैदरम्यान पसंतीक्रम भरला जाऊन २० जुलै रोजी दुसरी मेरिट लिस्ट जाहीर होणार आहे. त्या यादीतील प्रवेश २४ जुलैपर्यंत होतील.

--

गर्दीने फुलले कॅम्पस

---

पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर गुण आणि संवर्गनिहाय आडाखे बांधून संबंधित कॉलेजमध्ये जाणे अन् यादी तपासून शक्य झाल्यास प्रवेश घेणे असा पायंडा यंदा ऑनलाइन पद्धतीने तोडला गेला. विद्यार्थ्यांना लॉग इन केल्यानंतर त्यांना अलॉटमेंट झालेले कॉलेज बघायला मिळाल्याने त्या पावतीच्या आधारावर थेट प्रवेश देण्यात आले. परिणामी कॉलेज कॅम्पस गर्दीने फुलून गेले होते. मंगळवारी दुपारी उशिराने शिक्षण विभागाने पहिल्या प्रवेश यादीतील गुणनिहाय तक्ते जाहीर केले.

--

निवडक कॉलेजेसच्या मेरिट लिस्ट

_ _ _

आरवायके सायन्स कॉलेज

संवर्ग ........................गुण.....................टक्केवारी

जनरल ...................४७२......................९४.४

ओबीसी....................४५८....................९१.६

एसबीसी....................४४८....................८९.६

एनटी बी ....................४५३....................९०.६

एनटी ए ....................३७९....................७५.८

एनटी सी ....................४२६....................८५.२

एनटी डी ....................४५५....................९१.००

एससी ....................४२०....................८४.००

एसटी ....................४१० ....................८२.००

_ _ _ _ _ _

बीवायके कॉमर्स कॉलेज

संवर्ग ........................गुण.....................टक्केवारी

जनरल ...................४५० ...................... ९०

ओबीसी....................४०७ .................... ८१.४

एसबीसी....................३०० .................... ६०

एनटी बी ....................३८४ .................... ७६.८

एनटी ए ....................२६६ .................... ५३.२

एनटी सी ....................२७४ ....................५४.८

एनटी डी ....................३६१ .................... ७२.२

एससी ....................३०१ .................... ६०.२

एसटी ....................२५८ ....................५१.६

_ _ _ _ _ _

केटीएचएम सायन्स कॉलेज

संवर्ग ........................गुण.....................टक्केवारी

जनरल ....................४५६ .....................९१.२

ओबीसी....................४३८ .................... ८७.६

एसबीसी....................३२१ .................... ६४.२

एनटी बी ....................४१३ ....................८२.६

एनटी ए ....................३५६ .................... ७१.२

एनटी सी ....................३८६ ....................७७.२

एनटी डी ....................४३६ .................... ८७.२

एससी ....................३८४ .................... ७६.८

एसटी ...................४११ ....................८२.२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images