Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शहर स्वच्छतेचा बिगुल!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंतप्रधानांचे स्वच्छ भारतचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांनी नाशिक शहराला स्वच्छतेत देशात पहिल्या दहामध्ये आणण्याची घोषणा केल्यानंतर महापालिकेने त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे. स्वच्छतेतल्या इंदूर पॅटर्नचा अभ्यास केल्यानंतर शहराच्या स्वच्छतेसाठी आवश्यक ती पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी महापालिकेत स्वतंत्र स्वच्छ भारत सिटी युनिट स्थापन करण्याचा निर्णय आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी घेतला आहे. या युनिटमार्फत स्वच्छतेचे सर्वेक्षण, नियोजन, सूचना आणि निरीक्षणाचे काम केले जाणार आहे. त्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशपातळीवर नियुक्त केलेल्या पॅनलसोबत करार केला जाणार असून, त्यांचे सल्लागार महापालिकेत नियुक्त केले जाणार आहेत.

केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानाला सर्वोतोपरी प्राथमिकता दिली असून, त्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. देशातील स्वच्छ शहरांसाठी त्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. गेल्या वर्षी स्वच्छ भारत अभियानांतर्गत घेतलेल्या सर्वेक्षणात महापालिकेची कामगिरी घसरली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेत घेतलेल्या आढावा बैठकीत नाशिकला स्वच्छतेत देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये आणण्याची सूचना प्रशासनाला केली होती. त्यानुसार आयुक्तांनी आरोग्याधिकाऱ्यांचे पथक देशात पहिल्या आलेल्या इंदूरला पाठविले होते. आरोग्याधिकाऱ्यांनी आपला अहवाल सादर केला असून, त्यात विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. त्यानुसारच आता स्वच्छतेच्या देखरेख आणि निगराणीसाठी महापालिकेत स्वतंत्र सिटी युनिट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या युनिटकडून शहरातील स्वच्छतेेचे सर्वेक्षण, स्वच्छतेसाठीचे नियोजन, आवश्यक सूचना, सफाई कर्मचाऱ्यांचे नियोजन, तसेच स्वच्छतेच्या कामाचे निरीक्षणही केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेवर प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. स्वच्छतेसाठी सूक्ष्म आराखडा तयार केला जाणार असून, त्या आराखड्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

--

केंद्राच्या पॅनलचा सल्ला

केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियासाठी देशपातळीवर एका पॅनलची नियुक्त केली अाहे. त्यातील सल्लागार हे स्वच्छतेसंदर्भातील उपाययोजनांचे प्लॅनिंग करून देतात. केंद्राच्या या पॅनलवरील सल्लागारांशीही करार करून त्यांचा सल्ला घेतला जाणार आहे. या पॅनलवरील सल्लागार हे महापालिकेच्या या युनिटला स्वच्छतेबाबत मार्गदर्शन आणि सल्ला देणार आहेत. घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेसंदर्भातील सर्व जबाबदारी ही या युनिटवर राहणार आहे. त्यात महापालिकेतील कर्मचारी कार्यरत राहणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे स्वच्छतेेचे काम सोपे होणार असल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आदिवासी पट्ट्यातही एसटीचा ‘स्मार्ट टच’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

राज्यातील कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेली एसटी आता अधिक स्मार्ट होण्याचा प्रयत्न करीत आहे. वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी आणि एसटीचा प्रवास कंटाळवाणा असतो, त्रासदायक असतो ही ओळख पुसून काढण्यासाठी एसटीने काही बसेसमध्ये मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे प्रवाशांचे मनोरंजन होत आहे. दिंडोरी तालुक्यातील काही बसेसमध्ये ही सुविधा मिळत असल्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

राज्य परिवहन मंडळाच्या एसटीने कुठे जायचं म्हंटले की कंटाळवाणा आणि त्रासदायक प्रवास डोळ्यासमोर उभा राहतो. त्यात आणखीन भर पडते ती एसटीत लावलेल्या जाहिरातींमुळे. हे कमी की काय बसस्थानकांत फेरीवाल्यांचा आरडाओरडमुळे प्रवास खूपच मनस्ताप देतो. मात्र आता या कटकटीच्या प्रवासाला करमणुकीची जोड मिळाली आहे. एसटीतील प्रवाशांचे मनोरंजन व्हावे यासाठी वायफायद्वारे इंटरनेट सेवा मोफत दिली जात आहे. स्मार्टफोनधारकांसाठी लाईव्ह टीव्ही, बातम्या, चित्रपट पाहणे अगदी सहज उपलब्ध झाले आहे. एसटीच्या या उपक्रमाचे प्रवाशांनी स्वागत केले आहे. सुरगाणा तालुक्यात जाणाऱ्या नाशिक-उंबरठाण या बसमध्ये ही सुरू झाल्यामुळे स्मार्ट प्रवाशांचा प्रवास अधिकच स्मार्ट होत आहे. रेल्वे प्रशासनाने विविध रेल्वे स्टेशन वायफाय करण्याचे काम हाती घेतले आहे. मुंबई-गोवा तेजस एक्स्प्रेमध्ये इंटरनेट सेवा पुरवली जात आहे. मात्र त्या गाडीचे प्रवास भाडे वाढविण्यात आले आहे. परंतु राज्य परिवहन महामंडळाने बसमध्ये मोफत वाय फाय सुविधा देत सगळ्याच प्रवाशांना सुखद धक्का दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हरित ब्रह्मगिरी’अंतर्गत वृक्षलागवड उपक्रम

$
0
0

वृक्षदिंडी काढून केला जागर

कॉलेज क्लब रिपोर्टर

पावसाळा सुरू झाल्याने शहर परिसरात वृक्ष लागवडीसाठी बीज संकलनाच्या आवाहनास लाभलेल्या उदंड प्रतिसादानंतर हरित विश्व ग्रुपने प्रत्यक्ष वृक्ष लागवडीस प्रारंभ केला आहे. शहरातील आयुर्वेदिक डॉक्टर्सची टीम वृक्ष लागवडीचे कार्य करत आहे. 'हरित विश्व हरित ब्रह्मगिरी' आणि वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्र्यंबकेश्वर येथे वृक्षदिंडीचे आणि वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते.

वृक्ष संवर्धनासाठी सध्या सर्वच स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहेत. विद्यार्थी, नागरिक, डॉक्टर्स वृक्ष संवर्धनासाठी पुढे येत आहेत. नाशिकमधील आयुर्वेदिक डॉक्टर्स 'हरित विश्व' या छताखाली नाशिक व जवळपासच्या परिसरात वृक्षारोपणाचे कार्य करत असून, गेल्या दोन महिन्यांपासून ब्रम्हगिरी येथे एक हजारपेक्षा जास्त औषधी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.हरित विश्व तर्फे ९ जुलै ला त्र्यंबकेश्वर येथे वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

या वृक्षदिंडीदरम्यान गावकऱ्यांना औषधी वृक्षांचे महत्त्व सांगण्यात आले. सकाळी ६ वाजता वृक्षदिंडी आंबेडकर चौक ते निवृत्तीनाथ मंदिर या मार्गावर वृक्षदिंडी काढण्यात आली. वृक्षदिंडीमध्ये वृक्षारोपणाचे महत्त्वही गावकऱ्यांना सांगण्यात आले. त्याचप्रमाणे हरित विश्व ग्रुपच्या वतीने संकलित करण्यात आलेल्या बीजांचे रोपण करण्यात करण्यात आले. सीड बॉल्सद्वारे वृक्षारोपण करण्यात आले. हरित विश्व हरित ब्रह्मगिरी' आणि वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमानेे आयोजित करण्यात आलेल्या वृक्षदिंडीमध्ये ग्रामस्थ, विद्यार्थी, डॉक्टर्स, पोलिस, वनाधिकारी यांचा सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपंग कामगार नुकसान भरपाईपासून वंचित

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक जिल्ह्यातील विविध कारखान्यांमध्ये प्रत्यक्ष काम करताना अपघातग्रस्त झालेल्या कामगारांना शासनाचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे. कारखान्यात काम करताना अपंग झालेल्या कामगारांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. कंपनी व्यवस्थापनाकडून कुठलीही मदत दिली जात नसल्याचा आरोप कामगार विकास मंचचे कैलास मोरे यांनी केला आहे. सरकारच्या सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडून न्याय मिळावा, यासाठी कामगारांनी नुकतेच ठिय्या आंदोलन केले. या वेळी सुरक्षा व आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डी. बी. गोरे यांनी व्यवस्थापनाशी चर्चा करून अपघातात अपंग झालेल्या कामगारांना न्याय देणार असल्याचे सांगितले.

कामगार कायदे नेमके कुणासाठी, असा प्रश्न काही वर्षांपासून कामगारांसमोर उभा राहिला आहे. एकीकडे किमान वेतन देण्यात यावे असे सरकारकडून आदेश दिले जातात. मात्र, प्रत्यक्षात कामगारांना किमान वेतनाचा लाभ मिळताना दिसत नाही. विशेष म्हणजे दिवसेंदिवस कायमस्वरूपी कामगारांची संख्या कमी होत असून, ठेकेदारी पद्धतीने व्यवस्थापन कामगारांकडून काम करून घेतात. मात्र, कारखान्यात प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी झालेल्या अनेक अपघातांमध्ये जीव गमावल्याच्याही घटना घडल्या आहेत. यामध्ये काम करताना यंत्रामुळे अपघातात अपंग झालेले अनेक कामगारांनाही मदत मिळालेली नाही. अपघातग्रस्त कामगारांनी उद्योग भवनातील सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करत नुकसानभरपाईची मागणी केली. कामगार विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष मोरे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत अपंग कामगारांना न्याय देण्याची मागणी केली. दरम्यान, अनेक कामगारांना कंपनीच्या यंत्रणांवर काम करताना अधू होण्याची वेळ आली आहे. ज्या कारखान्यात काम करताना कामगारांना अपंगत्व आले आहे, त्याच कारखाना व्यवस्थापनाकडून कामगारांना दोषी असल्यासारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोप कामगारांनी केला. भरपाईही दिली जात नाही व कामावरही घेतले जात नसल्याची तक्रार या वेळी कामगारांनी केली. सरकारच्या सुरक्षा व आरोग्य संचालनालय विभागाने दोषी कारखाना व्यवस्थापनावर कारवाई करावी, अशी मागणी कामगार विकास मंचचे मोरे यांनी केली. न्याय मिळत नसल्याने अपंग कामगारांनी थेट सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमटेक प्रवेशप्रक्रियेला सुरुवात

$
0
0

हर्षल भट, कॉलेज क्लब रिपोर्टर

इंजिनीअरिंग चा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची एमई व एमटेक या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ही प्रवेश प्रक्रिया डीटीई म्हणजे तंत्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत होणार आहे. मंगळवार (दि. ११) एमई व एमटेकसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ११ जुलै ते २९ जुलै या काळात होणार आहे. या प्रवेश प्रक्रियेविषयी संपूर्ण माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुख्य म्हणजे यावर्षापासून एमई व एमटेक साठीच्या प्रवेश प्रक्रियेची फी ऑनलाइन स्वरुपात म्हणजे क्रेडिट कार्ड अथवा नेट बँकिंगच्या सहाय्यानेच भरावी लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थांनी रजिस्ट्रेशन करते वेळी क्रेडिट कार्ड जवळ ठेवणे अनिवार्य आहे. प्रवेश प्रक्रियेसंबंधी अधिक माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेसंबंधी अधिक माहिती http://me2017.dtemaharashtra.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

ही कागदपत्रे आवश्यक

दहावी, बारावी / डिप्लोमा आणि डिग्रीचे मार्कशीट, लिव्हिंग सर्टीफिकीट, जन्म दाखला, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड / पॅन कार्ड, डोमिसाईल.

महत्त्वाच्या गोष्टी

प्रवेश अर्जाची फी नॉन रिफंडेबल असल्याने विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाची फी ऑनलाइन भरताना काळजी घेणे आवश्यक आहे. फी भरण्याचा योग्य पर्याय निवडून आवश्यक डेबिट कार्ड व क्रेडिट कार्डचा कार्ड नंबर ही सर्व अचूक भरावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक कोंडी कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वर्दळीच्या जुना आडगाव नाक्याजवळ होणारी वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. नाशिक शहरात येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमुळे दुचाकी वाहनांची कोंडी नेहमीचीच बनली आहे.

रिक्षा स्टॉपवर रिक्षा उभ्या राहत नसून त्या रस्त्यातच उभ्या असल्याने वाहनांना त्यांचा त्रास होतो. या समस्येकडे वाहतूक पोलिसांकडून तेवढ्यापुरता बंदोबस्त करण्यात येतो. पुढे मात्र जैसे थे परिस्थिती राहते. त्यामुळे वाहतूक प्रशासनाने ही समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे.

गोदावरीत अस्वच्छता

नाशिक : गोदावरी नदीच्या स्वच्छतेवर पालिकेकडून दुर्लक्षच होत आहे. या परिसरात घाणीचे साम्राज्य वाढले आहे, तसेच या ठिकाणी भरणाऱ्या आठवडे बाजारानेही गोदावरी काठी बाजार झाल्यानंतर उरलेला भाजीपाल्याचा कचरा त्याच ठिकाणी टाकण्यात येतो. यामुळे गोदावरीकाठी अस्वच्छता पसरली आहे. कलशांमध्येही नागरिक घाण टाकत नसल्याने अस्वच्छता आणखी वाढली असून, गोदावरीच्या पाण्यामध्ये पुन्हा निर्माल्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. या अस्वच्छतेने नदीच्या पाण्याला दुर्गंधी येत आहे. याचा पर्यटकांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. त्यामुळे याची प्रशासनाने दखल घेणे गरजेचे झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका कार्यालयाचीच हेळसांड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीत महापालिकेचे नाशिकरोड विभागीय कार्यालय आघाडीवर आहे. त्यात जेलरोड उपकार्यालयाचा महत्त्वाचा वाटा आहे. तरीही या उपकार्यालयाची हेळसांड सुरू आहे. बारा कर्मचारी आणि एक संगणक, जुने फर्निचर, शेड नाही, कपाट नाही अशी जेलरोड कार्यालयाची विदारक स्थिती आहे. महापालिकेने या कार्यालयाकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

दुर्गा गार्डनशेजारी नाशिकरोडला महापालिकेचे विभागीय कार्यालय, तर जेलरोड येथे उपकार्यालय आहे. महसूल वसुलीत शहरातील सहा विभागांत नाशिकरोड दुसऱ्या स्थानी आहे. त्यात जेलरोडचे योगदान मोलाचे आहे. या कार्यालयाला सुविधा दिल्यास महसुलात आणखी वाढ होऊ शकते, असे नागरिकांचे मत आहे.

या आहेत समस्या

शिवाजीनगर येथे असलेले जेलरोडचे कार्यालय पूर्वीपासून समस्यांनी घेरलेले आहे. जेलरोडची लोकसंख्या वाढली आहे. या कार्यालयात तीस हजार मिळकतींची नोंद आहे. तीस हजार घरपट्टी आणि सुमारे पंधरा हजार पाणीपट्टी वसुली केली जाते. येथे १२ कर्मचारी आहेत. त्यांना तीन संगणक होते. आता कार्यालयामागे ई-सेवा केंद्र ठेकेदारी पद्धतीने सुरू करण्यात आले. त्यांना यातील दोन संगणक देण्यात आले आहेत. फक्त वसुलीचे काम मनपा कर्मचारी करतात. बिल स्वीकारणे, पावत्या देणे हे काम ई-सेवा केंद्र करते.

प्रिंटर नादुरुस्त

जेलरोड कार्यालयात जुने फर्निचर आहे. कपाटे नसल्याने महापालिकेचे दफ्तर सुरक्षित ठेवता येत नाही. काही महिन्यांपूर्वी रात्री कार्यालयातून आयपॅड चोरीस गेला होता. सध्या येथे एक संगणक आहे. त्याला रेंजअभावी नेटची समस्या होती. आता डोंगल घेतल्याने ती दूर झाली आहे. मात्र, प्रिंटर नादुरस्त असल्याने विभागीय कार्यालयाला डेटा पाठवता येत नाही. बॅटरी बॅकअपही बंद आहे.

शेड कधी होणार?

जेलरोडचे मनपा कार्यालय महापालिका गार्डनच्या एका कोपऱ्यात आहे. भरपूर जागा असतानाही महापालिका कार्यालय छोटे बांधण्यात आले. नागरिकांना बसण्यासाठी सोडाच, उभे राहण्यासाठीही जागा नाही. त्यामुळे बाहेर शेड बांधण्यात आले होते. मात्र, अतिक्रमित असल्याने महापालिकेनेच ते तीन वर्षांपूर्वी मोहिमेत पाडले. आता ऊन व पावसात नागरिकांना बाहेर उभे राहावे लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फॅशन म्हणून व्यायाम नको!

$
0
0

व्यायाम करताना तो शास्त्रशुद्ध पद्धतीने करायला हवा. दुसऱ्याच्या व्यायामाशी आपल्या व्यायामाची बरोबरी न करता आपल्याला झेपेल इतकाच व्यायाम करणे गरजेचे आहे. परंतु, सध्या तसे होताना दिसत नाही. व्यायाम ही केवळ फॅशन झाली आहे. शेजारच्या माणसाने महागडी सायकल घेतली म्हणून मीदेखील सायकलिंग सुरू करतो, ओळखीची चार माणसे धावायला लागली म्हणून मीदेखील धावायला सुरुवात करतो, ही भावना समाजात जास्त रुजत चालली आहे. परिणामी अनेकांकडून आपल्या शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम होत असल्याने दुर्घटना घडत आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने यासंदर्भात आयोजित केलेल्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये केवळ फॅशन म्हणून व्यायाम न करता, योग्य प्रशिक्षक असल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा खेळ अथवा व्यायामाचा अतिरेक करू नये, असा सूर क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला.

(शब्दांकन ः फणिंद्र मंडलिक, सौरभ बेंडाळे)

--

प्रशिक्षकाविना व्यायाम घातकच

कोणत्याही प्रकारचा व्यायाम करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहेच; परंतु आपली शारीरिक क्षमता ओळखणेदेखील गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीवर ऑफिस, सोसायटी, इकॉनॉमिक, मेंटल अशा अनेक क्षेत्रांचा ताण असतो. त्याचबरोबर शारीरिक ताणदेखील असतो. हा सर्व ताण विचारात घेऊन व्यायामाची आखणी करणे गरजेचे आहे. व्यायाम करताना प्रोग्रेसिव्ह व्यायाम करणे गरजेचे आहे. कोणताही व्यायाम करताना सुरुवातीला वॉर्मअप, त्यानंतर व्यायाम व त्यानंतर कूलडाउन अशा पद्धतीने केलेला व्यायाम महत्त्वाचा ठरतो. एका मॅरेथॉनमध्ये भाग घेतल्यानंतर शारीरिक कमजोरी भरून काढण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागतो. तो आपल्याकडे कुणी विचारात घेत नाही. आपला मित्र धावतो म्हणून आपणही धावतो, असे करून चालत नाही. व्यायाम झाल्यानंतर कुणीही पल्स रेट घेत नाही, ही बाब सगळ्यात धोकादायक आहे. व्यायाम करताना बेसिक चेकअप करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ऑक्सिजन घेण्याची पद्धतदेखील चुकीची आहे. सध्या जिममध्ये एसी लावले जातात, त्यामुळे स्वच्छ ऑक्सिजनयुक्त हवा शरीराला मिळत नाही, हेदेखील शरीरासाठी घातक आहे. त्याचप्रमाणे तुमचा आहारदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. रनिंग करून आल्यानंतर पचनाला हलक्या असलेल्या कार्बोहायड्रेडयुक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे. एकंदरीतच प्रशिक्षकाविना व्यायाम म्हणजे जणू आत्महत्या करण्यासारखेच आहे.

-विजेंद्र सिंग, प्रशिक्षक, ‘साई’

---

फिटनेस गोल ठरविणे गरजेचे

भारतातील बहुतांश व्यक्ती वयाच्या ३५ वर्षांनंतर आपल्या प्रकृतीची काळजी घ्यायला सुरुवात करतात. तरुणपणी मजा करीत असताना शरीराची आठवण होत नाही. ३४ वर्षे तुम्हाला व्यायामाची सवय नसते आणि ३५ व्या वर्षी एकदम व्यायाम सुरू केल्यानंतर शरीराला ते झेपवत नाही. कोणत्याही प्रकारचा व्यायाम सुरू करण्याअगोदर पुरेशी खबरदारी घेणे आवश्यक आहे. व्यायाम करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा असतो. परंतु, अनेक लोक डॉक्टरांचा सल्ला घेत नाहीत आणि व्यायाम सुरू करतात. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या व्यायामाची गरज आहे, हे डॉक्टरच चांगल्या प्रकारे सुचवू शकतात. ज्या व्यायामाची तुमच्या शरीराला आवश्यकता आहे, अशा प्रकारचा व्यायाम केल्याने तुमचे शरीर बळकट होऊ शकते. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर प्रशिक्षित प्रशिक्षकाला मेडिकल रिपोर्ट दाखवून व्यायामाबाबत सल्ला घेणे गरजेचे असते. तुमची फिटनेस लेव्हल पाहूनच प्रशिक्षक तुमचा व्यायाम ठरवत असतो. व्यायाम करतानादेखील तो हळूहळू वाढवला पाहिजे. वजन उचलण्याच्या शास्त्रीय पद्धती असतात, त्यानुसार व्यायाम करणे गरजेचे असते. व्यायाम करताना शेजारच्या व्यक्तीने २० किलो वजन उचलले म्हणून मीही २० किलो वजन उचणार, एखादी व्यक्ती १० किलोमीटर धावाली म्हणजे मीसुद्धा १० किलोमीटर धावलेच पाहिजे, असे म्हणून चालणार नाही. कोणत्याही प्रकारच्या व्यायामाला सुरुवात करताना प्रत्येकाने फिटनेस गोल ठरवला पाहिजे, त्याशिवाय व्यायाम करू नये.

-अनिरुद्ध अथनी, सर्टिफाइड मॅरेथॉन ट्रेनर

--

शरीराच्या संवादानुसार आखावी दिनचर्या

नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष जसपालसिंग यांच्या निधनाचा व्यायामाशी संबंध जोडणे योग्य होणार नाही. दहा हजारांतील सहा लोक हे झोपेतच अॅटॅक येऊन जातात, तर दहा हजारांतील एखादी व्यक्ती व्यायाम करताना जाते. त्यामुळे व्यायामाला दोष देणे उचित होणार नाही. अनेक लोक व्यायामाच्या आधी आणि नंतर पुरेशी विश्रांती घेत नाहीत. सकाळी व्यायाम करण्याच्या अगोदर सहा तास झोप होणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही सकाळी झोपेतून उठता त्याच वेळी तुमच्या शरीराची स्थिती तुम्हाला समजलेली असते. तुमचे शरीर तुमच्याशी संवाद साधत असते, त्या संवादाला धरूनच तुम्ही तुमची दिनचर्या आखली पाहिजे. ज्या पद्धतीने शालेय स्तरावर लहान मुलांकड़ून व्यायामाचे तास घेतले जातात, ती पद्धत अत्यंत चुकीची आहे. लहानपणापासून व्यायामाची गोडी लागावी यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. व्यायाम हा तुमच्यासाठी आहे, तुम्ही व्यायामासाठी नाही, ही बाब ध्यानात घेतली पाहिजे. काही लोक फक्त देखाव्यासाठी व्यायाम करतात. त्यामुळे अपघात होतात. काही लोक थोडासा व्यायाम करतात, त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकतात. बघा आम्ही किती व्यायाम करतो, असे जगाला दाखवतात. मात्र, असे व्हायला नको. व्यायामाला सुरुवात केली म्हणजे मला काहीच होणार नाही, असा अनेकांमध्ये संभ्रम असतो, तोदेखील दूर होणे गरजेचे आहे. व्यायाम सुरू असला, तरीही डॉक्टरांनी सांगितलेली औषधे वेळेवर घेतली गेली पाहिजेत. व्यायामाप्रमाणेच तुमच्या डाएटवरदेखील तुमचे लक्ष असणे गरजेचे आहे. तुमच्या शरीराला आवश्यक असेल तेवढेच अन्न सेवन करणे गरजेचे आहे. सध्या मोठ्या प्रमाणात जिम ट्रेनरचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे आपल्याला प्रशिक्षण देणारी व्यक्ती प्रशिक्षित आहे की नाही, याचीदेखील काळजी घेणे आवश्यक आहे.

-महेंद्र छोरिया, सेक्रेटरी, नाशिक रनर्स

---

शारीरिक क्षमतेनुसारच करावा व्यायाम

प्रत्येक व्यक्तीने आपली शारीरिक क्षमता ओळखावी आणि त्यानुसार डॉक्टर, तसेच ट्रेनरच्या साहाय्याने व्यायाम करावा. ट्रेनरदेखील व्यायामातील बारकावे जाणणारा असायला हवा. सध्या कोणीही ट्रेनर म्हणून येतो आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करणाऱ्यांना मग समस्यांना सामोरे जावे लागते. कोलेस्टेरॉल, हृदय याची योग्य सांगड व्यायाम करतेवेळी असणे महत्त्वाचे आहे. सुरुवातीला वॉर्मअप आणि शेवटी कूलडाउन करणे अशाप्रकारे व्यायाम गरजेचे आहे. जेवढा आपला स्टॅमिना आहे तितकाच व्यायाम करायला हवा. जास्त व्यायाम केल्यास शरीरातील अंतर्गत अवयवांवरही परिणाम होतो. आपले शरीर फिट राहण्यासाठी व्यायाम हा गरजेचा आहे. व्यायामाचे दुष्परिणाम नाहीत. पण, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नकोच. सायकलिंगचे फॅड सध्या नाशिकमध्ये वाढत आहे. पण, सायकलिंगसाठीदेखील योग्य प्रशिक्षण असणे खूप महत्त्वाचे आहे. सायकल खरेदी केली आणि कित्येक किलोमीटर चालवली, तरी त्याला अर्थ राहात नाही. योग्य प्रशिक्षण आणि हेल्थ चेकअपशिवाय असे केल्यास त्याचे दुष्परिणाम जाणवतात. पण, निरोगी जीवनासाठी शारीरिक क्षमतेनुसार व्यायाम हा करायलाच हवा.

-विशाल उगले, प्रेसिडेंट, नाशिक सायकलिस्ट

--

अतिरेक टाळायलाच हवा

प्रत्येक जण स्वतःची शारीरिक क्षमता जाणून असतो. त्यामुळे आपली क्षमता जाणून घेऊनच व्यायाम पद्धती ठरवावी. सायकलिंग हा खेळ आहे, त्याच्याकडे खेळ म्हणूनच पाहावे. सायकलिंग म्हणजे फॅशन नाही, तर त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहायला मदत होते. त्यासाठी सायकलिंग आणि रनिंग हे आपल्याला जितके शक्य आहे किंबहुना जितके झेपणार आहे तितकेच करायला हवे. आजकाल समोरचा करतो तसे करून आपण खूप ग्रेट आहोत असे दाखवायचा प्रयत्न केला जातो. ही भावना खूप गैर आहे. व्यायाम हा आपल्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी असावा. व्यायामाने शरीर निरोगी राहते. पण, त्यासाठी कोणत्याही प्रकारचा अतिरेक टाळायलाच हवा.

-योगेश शिंदे, नाशिक सायकलिस्ट

---

योग्य मार्गदर्शन अन् डाएट महत्त्वाचे

आपले शरीर तंदुरुस्त राखण्यासाठी व्यायाम गरजेचा आहे. मात्र, त्याचा अतिरेक करणे टाळायला हवे. सायकलिंग व मॅरेथॉन सध्या फॅशन झाली आहे. पण, केवळ फॅशन म्हणून व्यायाम करण्यापेक्षा गरज म्हणून आणि योग्य मार्गदर्शनाखाली व्यायाम होणे गरजेचे आहे. बायोकेमिस्ट्री आणि अॅनाटॉमीच्या आधारे आपले आरोग्य फिट ठेवण्यासाठी हेल्थ चेकअप करूनच व्यायामास सुरुवात करायला हवी. व्यायामासोबतच डाएट आणि डिटेक्शन महत्वाचे आहे. स्वतःची फिटनेस लेव्हल ओळखूनच व्यायाम करायला हवा. एखाद्याची बॉडी पाहून त्यासारखे बनण्याचा विचार करणे म्हणजे फिटनेसवर गदा आणणे आहे. व्यायाम हा अपेक्षित आहेच, पण त्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि डाएट फॉलो करावाच लागतो. व्यायाम हा फिट राहण्यासाठी असावा, फॅशनसाठी नव्हे. अनेकदा जिममध्ये येणारे तरुण त्यांच्या कपॅसिटीपेक्षा अधिक वजन उचलतात, हे थांबले पाहिजे. शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या व्यायामामुळे कोणालाच अपाय होत नाही. पण, त्याचा अतिरेक झाल्यास मात्र तापदायक ठरू शकते.

-नितीन शिरसाठ, जिम ट्रेनर

---

केवळ स्वतःशीच असावी स्पर्धा

आपल्याला मिळालेले आयुष्य चांगल्या रीतीने जगण्यासाठी व्यायाम गरजेचा आहे. प्रत्येकाने रोज धावणेही आवश्यक आहे. मात्र, प्रत्येकाने स्वतःची शारीरिक क्षमता ओळखूनच व्यायाम करायला हवा. व्यायाम करताना केवळ स्वतःशीच स्पर्धा असली पाहिजे. फिटनेस राखण्यासाठी अभ्यास गरजेचा आहे. शास्त्रशुद्ध अभ्यास केला, तरच त्याची चांगली फलनिष्पत्ती होऊ शकते. व्यायाम करताना श्वासोच्छवासाची गतीही महत्त्वाची असते. पण, अनेक जण चुकीच्या पद्धतीने श्वासोच्छवास करतात. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन श्वासाची गती ठरवावी व त्या पद्धतीने सराव करावा. श्वासोच्छवास व्यवस्थित झाला, तर शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होईल व होणारे अपघात टळू शकतील. मात्र, अनेक जण चुकीच्या पद्धतीने व्यायाम करताना दिसतात, ते टाळायला हवे.

-मनीष चिंधडे, मॅरेथॉन रनर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाइक वर्कशॉपला तरुणांची पसंती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पावसाळ्यात बाइकची काळजी कशी घ्यावी, याविषयी ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’तर्फे शनिवारी १५ जुलै रोजी वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. त्र्यंबक रोडवरील मोहरीर यामाहा शो-रूममध्ये सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत वर्कशॉप होणार आहे. हा कार्यक्रम कल्चर क्लब सदस्यांसाठी मोफत आहे. वर्कशॉपमध्ये नोंदणी करण्यासाठी वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून, या वर्कशॉपसाठी तरुणांनी गर्दी केली आहे. थोड्याच जागा शिल्लक असल्याने बाइकप्रेमींनी त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे करण्यात आले आहे.

पावसाळा आला की तरुणांना सर्वांत जास्त चिंता सतावते ती आपल्या बाइकची. कधी गाडी स्लीप होते तर कधी इंजिनमध्ये पाणी जाते. त्यामुळे गाडी बंद पडते. अशी एक ना अनेक कारणे गाडी बंद पडण्यासाठी कारणीभूत ठरतात. हीच अडचण ओळखून ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’तर्फे या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. हे वर्कशॉप कल्चर क्लबच्या सदस्यांसाठी मोफत आहे, तर इतरांसाठी २०० रुपये आकारण्यात येणार आहेत. या वर्कशॉपसाठी रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. रजिस्ट्रेशनसाठी ७०४०७६२२५४, ०२५३-६६३७९८७ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

यामाहा बाइकसाठी ऑफर

तुमची यामाहा कंपनीची बाइक असेल आणि तुम्ही कल्चर क्लबचे सदस्य असाल, तर तुम्हाला नियमित बाइक सर्व्हिसिंगवर २० टक्के डिस्काऊंट मिळणार आहे. ही सूट ३० जुलैपर्यंत राहील. या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावीच्या पहिल्या यादीस लागला मुहूर्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑनलाइन केंद्रीय प्रवेशप्रक्रियेने यंदा नाशिकचा गोंधळ नाहीसा होण्याचा दावा करणाऱ्या प्रक्रियेचाच सोमवारी फज्जा उडाला होता. सोमवारी रात्री ही यादी तब्बल चार ते पाच तास उशिराने प्रसिद्ध झाली; पण बहुतांश विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंटचे अपेक्षित एसएमएस मिळाले नाहीत.

नियोजित वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांनी सोमवारी सायंकाळी पाच वाजेपासून वेबसाइटला भेट दिली. यावर चार ते पाच तासांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पहिल्या गुणवत्ता यादीस मुहूर्त लागला. विद्यार्थ्यांनी एसएमएसची वाट बघून स्वत: लॉगइन करून बघितल्यानंतर कॉलेज अलॉटमेंटचा तपशील त्यांना पाहण्यास मिळाला. लॉगइन केल्यानंतर विद्यार्थ्याला त्याची वैयक्तिक माहिती तपशीलवार मिळत असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत कॉलेज कॅम्पसमध्ये कुठेही गर्दीचा बोजवारा उडाला नाही. प्रक्रियेत बहुतांश पारदर्शकता दिसत असली तरीही स्पोर्टस आणि कल्चर कोट्यातून अर्ज करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना विनाअनुदानित जागांवर का प्रवेश देण्यात येत आहे, असा सवाल उपस्थित करून पालक वर्गाने नाराजी व्यक्त केली.

शहरात यंदाही सायन्स आणि कॉमर्स या विद्याशाखांची मेरिट लिस्ट नव्वदीपारच राहिली. यानुसार आरवायके कॉलेजने मेरिटचा सायन्समधील उच्चांक गाठला. येथे खुल्या गटासाठी गुणवत्ता यादी ९४.४ टक्क्यांवर, तर बीवायके कॉलेजमध्ये कॉमर्ससाठी ही यादी खुल्या वर्गाकरिता ९०.८ टक्क्यांवर बंद झाली.

या प्रक्रियेत प्रवेशासाठी सुमारे २६ हजार अर्ज दाखल आहेत. पैकी २४ हजार ५०० जागा उपलब्ध आहेत. पहिल्या यादीत १४ हजार ९२१ जणांचा समावेश करण्यात आला आहे. उर्वरित ९ हजार विद्यार्थ्यांना येत्या तीन प्रवेशयाद्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅरिकेड्सची मलमपट्टी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील नवीन बस स्थानक ते दरेगाव हा सर्वाधिक रहदारीचा रस्ता आहे. रस्त्यालगत असलेली अतिक्रमणे, बेशिस्त वाहनचालक, फेरीवाल्यांमुळे नेहमीच या रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या उभी राहते. वाहतूक पोलिसांच्याकडून यावर तात्पुरता उपाय करीत दुभाजक म्हणून बॅरिकेड्स लावण्यात आल्याने वाहतूक कोंडीतून काहीसा दिलासा मिळाला आहे.

बसस्थानक परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होते. या परिसरात दोन शाळा आणि कॉलेज असल्यामुळे विद्यार्थ्यांचीही संख्या अध‌िक असते. येथे अतिक्रमणही वाढले आहे. पालिकेकडून दरवर्षी हे अतिक्रमण हटवण्यात येते.दरम्यान दुभाजक नसल्याने प्रश्न जैसे थे होता. पालिकेने जरी दुभाजक टाकले नसले तरी स्थानिक वाहतूक पोलिसांनी यावर तात्पुरता उपाय शोधला आहे. या परिसरात रस्त्याच्या मध्यभागी बॅरिकेड्स लावले आहेत. त्रंबकेश्वर येथून मागव‌िण्यात आलेले हे बॅरिकेड्सचा यासाठी वापर करण्यात आला आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेसात हजार प्रवेश पूर्ण

$
0
0

अकरावीसाठीच्या पहिल्या गुणवत्ता यादीनंतरची स्थिती

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक महापालिका व देवळाली कॅन्टोन्मेंट हद्दीत शैक्षणिक वर्ष २०१७-१८ साठी राबविण्यात येत असलेल्या इयत्ता अकरावीच्या केंद्रीय प्रवेशप्रक्रियेंतर्गत विविध कोट्यांतर्गत ७ हजार ५९० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून, मंगळवार (दि. ११)पासून केंद्रीय प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेश गुरुवार (दि. १३)पर्यंत पूर्ण केले जाणार आहेत. अकरावीच्या प्रवेशासाठी एकूण २६ हजार १२७ ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीचे सचिव तथा विभागीय सहाय्यक शिक्षण उपसंचालक दिलीप गोविंद यांनी दिली.

महापालिका व देवळाली कॅन्टोन्मेंट हद्दीतील ५७ ज्युनिअर कॉलेजेसमध्ये २४ हजार ६०० जागांसाठी मुंबई-पुण्याच्या धर्तीवर यंदा प्रथमच इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने होत आहेत.

या प्रवेशप्रक्रियेत प्रत्यक्षात २६ हजार १२७ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे प्रवेशक्षमतेपेक्षा १ हजार ५२७ अर्ज जास्त प्राप्त झाले आहेत. कोट्यातील प्रवेशांशिवाय २४ हजार ८६५ प्रवेश अर्ज उर्वरित जागांसाठी शिल्लक असून, ही संख्या एकूण उपलब्ध प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त आहे.

पसंतीक्रमानुसार १० हजार अर्ज

प्राप्त अर्जांनुसार विद्यार्थ्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार माध्यम व शाखानिहाय केंद्रीय प्रवेशाची पहिली गुणवत्तायादी सोमवारी जाहीर झाली असून, या यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश गुरुवारपर्यंत पूर्ण होणार आहेत. पहिल्या गुणवत्ता यादीत दिलेल्या पसंतीक्रमानुसार ९९०० विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीत समस्यांप्रश्नी निवेदन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळाली परिसरात रस्त्यांच्या कामांसह विविध सुविधांचा काही महिन्यांपासून अभाव असल्याने लवकरात लवकर नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात व नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा छावा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. मागण्यांबाबत कॅन्टोन्मेन्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांची संघटनेने भेट घेतली.

यावेळी युवा प्रदेशाध्यक्ष सुनील गुंजाळ, आदिवासी प्रदेशाध्यक्ष शत्रुघ्न झोंबाड, जिल्हाध्यक्ष रवी भारद्वाज, मुस्लिम आघाडी जिल्हाध्यक्ष राशीदभाई सय्यद, युवा जिल्हाध्यक्ष रतन मेढे पाटील, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष मोहित खालकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब खाडे, तालुकाध्यक्ष विजय खर्जूल आदींनी या वेळी निवेदन दिले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे, की शहरात भुयारी गटाराचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. सर्वच वॉर्डांमध्ये शौचालयाची दुरुस्ती करून व नव्याने शौचालय बांधण्यात यावे. आठवडे बाजाराच्या नागझिरा मार्ग शौचालयांकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण झाले पाहिजे, लेव्हिट मार्केट येथील मटण व मच्छी मार्केटची अवस्था बिकट झाली आहे. त्याची तातडीने दुरुस्ती करावी. सिंधी पंचायतजवळील स्वच्छतागृह नव्याने करावे, हाडोळा भागात नवीन शौचालये बनवून देण्यात यावीत, गोरगरीब जनतेला जुने घर दुरुस्ती करून नवीन घर बांधण्यासाठी परवानगी द्यावी, कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन व एमआरआय मशिनरी उपलब्ध करून देणे, गोरगरिबांसाठी घरकुल योजनेसाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाने पुढाकार घेऊन घरकुल योजना राबविण्यात यावी. या वेळी सुमित पारचा, नझफ सय्यद, सत्यम बेजकर, संतोष फडोळ, ऋतिक अनर्थ, दीपक शिंदे, वैभव अनर्थ, शरद घाटोळ, संतोष जाधव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलाव ठरताहेत जीवघेणे

$
0
0

केशव ढोन्नर, त्र्यंबकेश्वर

शहरातील प्रचीन तलावांचा वैभवशाली ठेवा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे जीवघेणा ठरत आहे. शहरात गुरूपौर्णिमेच्या दिवशी बिल्वतीर्थ तलावात कार बुडाल्याने बापलेकांना जीव गमवावा लागला. गतवर्षी गणेश विसर्जनप्रसंगी मुकुंद तीर्थ तलावात युवकाचा बळी गेला होता. वारंवार अशा गंभीर घटना घडत असतांना नगरपालिका प्रशासन आणि हे तलाव ज्यांच्या मालकीचे आहेत त्या संस्थांनी मात्र याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या गौतम तलावाबाबत असेच दुर्लक्ष झाले आहे. या तलावास पायऱ्यांचे सुंदर घाट होते. सिंहस्थ २००३ दरम्यान ते तोडले आणि कठडा बांधला. साधरणत: वर्षभरापूर्वी हा कठडा काही ठिकाणी ढासळला आहे. शहरात भाविक, प्रवाशांच्या वाहनांना बंदी असतानाही दररोज या तलावाच्या परिसरात अनेक वाहने पार्क केलेली असतात. यामुळे भाविष्यात काही दुर्घटना घडल्यास जबाबदार धरणार तरी कोणाला, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

गंगासागर

संत निवृत्त‌िनाथ संजीवन समाधी मंदिरालगत असलेला गंगासागर तलाव तीनशे फूट रुंद आणि ४०० फूट लांब आहे. श्रीमंत राजे बहादुर यांनी सन १७७८च्या दरम्यान हा तलाव बांधला आहे. शहरातील अहिल्या धरणाच्या निर्मिती पूर्व आणि त्यानंतर देखील कित्येक वर्ष याच तलावातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येत होता. इतर तलावांपैकी या तलावाची स्थिती ठिक असून, सर्वात स्वच्छ पाणी या तलावात आहे.

बिल्वतीर्थ

शहराच्या उत्तरेस असलेल्या नीलपर्वताचे बाजूस बिल्वतिर्थ हा तलाव १७३८ मध्ये नारो विनायक गोगटे यांनी २५ हजार रुपये खर्च करून बांधाला आहे. हा तलाव त्र्यंबकेश्वर देवस्थान संस्थानच्या मालकीचा आहे. गतवर्षीच्या उन्हाळ्यात देवस्थानने या तलावातील गाल काढला आहे. सिंहस्थ नियोजनात या तलावालगत रिंग रोड तयार करण्यात आला आहे. गाळ काढल्यामुळे हा तलाव खोल आणि धोकादायक झाला आहे. याच तलावात गुरूपौर्णिमाला बापलेकांचा जीव गेला. अपघात होऊ नये या येथे संरक्षक भिंत बांधण्याची गरज आहे.

गौतम तलाव

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दक्षिण बाजूस असलेला गौतम तलाव हा ६०० फूट लांब आणि ४०० फूट रुंद आहे. हा तलाव सर्वात मोठा आहे. श्रीमंत पंड‌ित झासीवाले यांनी ५० हजार रूपये खर्च करून या तलावाचे बांधकाम केले आहे. सिंहस्थ २००३ मध्ये पायाचे बांधकाम असलेले विस्तीर्ण देखणे घाट बुजविण्यात आले. गणेश विर्सजन होत असलेल्या या जालाशयात विविध प्रकारचे मासे सोडण्यात आले आहे. या तलावाचीही संरक्षक भिंत खचली आहे.

इंद्रतीर्थ तलाव

शहराच्या मध्यवर्ती कुशावर्ताचे जवळच असलेल्या इंद्रतीर्थ तलावाची बांधणी सन १७७८ मध्ये विष्णू महादेव गद्रे यांनी २२ हजार रूपये खर्च करून केली आहे. या तलावाचे बांधकाम दगडी आहे. सुंदर शिल्पकलेचा नमुना असलेला तलाव वर्षानुवर्ष दुर्लक्ष‌ित आहे.

मुकुंद तलाव

शहराचे लगत असलेला मुकंद तलाव अनेक वर्षांपासून दुर्लक्ष‌ित आहे. दोन वर्षांपूर्वी गाळ काढल्यामुळे खोली वाढली आहे. त्यामुळे गेल्यावर्षी गणेश विसर्जनप्रसंगी एका युवकाचा बळी गेला होता. या घाटांची पडझड झाली आहे. मुकुंद तीर्थाचा उल्लेख प्रचीन पौराणीक व ऐतीहासीक ग्रंथ आदिंमध्ये आढळतो. येथे सुंदर शिवमंदिर आहे. हा तलावदेखील असुरक्षित झाला आहे.

शहरातील गौतम तलाव, इंद्रतीर्थ तलाव यांचे सुशोभीकरण आणि संरक्षणाचे प्रयत्न सुरू आहेत. गौतम तलावाच्या तुटलेल्या भिंतीचे काम तातडीने सुरू करणार आहोत. बिल्वतीर्थ देवस्थान संस्थान मालकीचे आहे याबाबत देवस्थान ट्रस्ट आणि नगरपालिका यांच्या समन्वयाने या तलावाच्या सुरक्षेसाठी नियाजन करण्यात येणार आहे. - तृप्ती धारणे, नगराध्यक्षा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैद्यांना सरसकट माफी नाहीच!

$
0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

राज्यातील कैद्यांच्या शिक्षेच्या कालावधीत सूट देण्यात ५० टक्के कैद्यांना योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. ही सूट देताना सरकारने कैद्याला ज्या कोर्टाने शिक्षा सुनावली त्याचा अभिप्राय सक्ताची केला आहे. तसेच पाच निकष लावले आहेत. त्यामुळे कैद्यांना सरसकट माफी मिळणार नाही हे स्पष्ट आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सरकार यंदा समता वर्ष साजरे करत आहेत. त्यानिमित्त राज्यातील ठराविक वर्गातील कैद्यांना (दंडाची शिक्षा वगळून) सरकारने आपल्या अधिकारातंर्गत राज्यमाफी देण्याचा आदेश (जीआर) जारी केला आहे.

अशी आहे सूट

तीन महिन्यांपर्यंत शिक्षा झालेल्या कैद्याचे राज्यमाफीचे प्रमाण सात दिवस, तीन ते बारा महिने शिक्षा असलेल्यांना १५ दिवस, एक ते पाच वर्षे शिक्षा असलेल्यांना दोन महिने आणि पाच वर्षांपेक्षा अधिक किंवा जन्मठेपेची शिक्षा झालेल्यांना शिक्षेच्या कालावधीत तीन महिन्यापर्यंत सूट मिळणार आहे. अभिवचन किंवा संचित रजेवरील कैद्यांनाही याचा लाभ मिळेल. मात्र, चॅप्टर प्रकरणातील कैदी, राज्यविरोधी कारवाईच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेले कैदी, केंद्रीय कायद्यांतर्गत शिक्षा झालेले कैदी, किशोर सुधारालयातील मुले, अनधिकृतपणे कारागृहाबाहेर असलेले शिक्षाधीन बंदी माफीस पात्र ठरणार नाहीत.

तरच शिक्षेत सूट

शिक्षा माफीसंबंधीची तरतूद विचारात घेऊन कारागृह अपर पोलिस महासंचालकांना सूचना करण्यात आली आहे, की सर्व कारागृह अधीक्षकांनी प्रत्येक शिक्षाधीन कैद्यांला माफी देण्याबाबत कोर्टाचा अभिप्राय मागावा. कैद्याला शिक्षा सुनावणाऱ्या कोर्टाचे मत अनुकूल असेल तरच शिक्षेत सूट मिळणार आहे.

अभिप्राय मागविणे जिकरीचे
राज्यातील कारागृहात हजारो कैदी आहेत. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात सव्वाशे महिलांसह सव्वा तीन हजार कैदी आहेत. त्यापैकी दोन हजार कैद्यांबाबत संबंधित कोर्टाकडे पत्रे पाठविण्यात आली आहेत. हे कैदी विविध जिल्ह्यातील आहेत. काही कैदी अनेक वर्षांपासून शिक्षा भोगत आहेत. राज्यातील हजारो कैद्यांच्या प्रकरणांबाबत संबंधित कोर्टांना पत्र पाठवून अभिप्राय मागविण्याचे काम जिकरीचे आहे. नाशिकरोड कारागृहाला आतापर्यंत सुमारे ७० अभिप्राय आले असून पैकी ६० टक्केच अनुकूल आहेत. रोज २० ते २५ अभिप्राय येत आहेत. काही कोर्टांनी सरकारनेच माफी द्यावी, असे म्हटले आहे. अनुकूल आणि प्रतिकूल अभिप्रायाचे प्रमाण पाहता ५० टक्के कैद्यांनाच माफी योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या आधीही माफी
सरकारने १९८८ मध्ये कैद्यांना अशी माफी दिली होती. देशाच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त १९९७ मध्ये सरकारने कैद्यांना माफी दिली होती. १९९१ हे डॉ. आंबेडकरांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने तेव्हाही राज्यमाफी देण्यात आली होती. त्यानंतर सुप्रिम कोर्टाने अशी सरसकट माफी न देता शिक्षा सुनावणाऱ्या कोर्टाचा अभिप्राय घ्यावा, अशी सूचना केली. तसेच सरकारने सर्व कारागृह अधीक्षकांना सूचना केली आहे. त्यामुळेच आता सर्वच कैद्यांना माफी मिळणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाम प्रकल्पग्रस्तांना केंद्रीय मंत्र्यांचे आश्वासन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

भाम धरण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनातील समस्या दूर करण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय जलसंपदा, नदीविकास व गंगा शुद्धीकरण राज्यमंत्री डॉ. संजीवकुमार बालियान यांनी केले.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील इगतपुरी तालुक्यातील भाम व वाकी धरण प्रकल्पांच्या कामांची पाहाणीसाठी जिल्हा दौऱ्यावर आले होते. याप्रसंगी भाम प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी जलसंपदा विभागाच्या आमदार निर्मला गावित, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) मधुमती सरदेसाई, उपविभागीय अधिकारी राहूल पाटील, माजी आमदार शिवराम झोले आदी उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री म्हणाले, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून देशात ९६ सिंचन प्रकल्प होत असून, त्यातील २६ प्रकल्प महाराष्ट्रात आहेत. भाम धरण प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्यात येईल. या धरण प्रकल्पांच्या कामाबरोबरच यासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाला प्राधान्य देण्यात येईल. भाम धरण प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्यांसाठी पुनर्वसित गावठाणामध्ये वीज, पाणी पुरवठा, रस्ते, सार्वजनिक सभामंडप आदी सर्व पायाभूत सुविधा उभारण्यात येतील. शेतकऱ्यांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष देण्याचे निर्देश बालियान यांनी दिले. याप्रसंगी आमदार श्रीमती गावित आणि उपस्थित आदिवासी शेतकरी, गावकरी, लोकप्रतिनिधी आदींनी प्रनर्वसन प्रश्नांबाबत मागण्या मांडल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गारपीटग्रस्त वेटिंगवरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्याच्या विविध भागात मे महिन्यात अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या भरपाईपोटी एक कोटी १९ लाख ६७ हजार ६१५ रूपयांचा निधी जिल्ह्यासाठी मिळावा, अशा मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे.

मे महिन्यात जिल्ह्यातील निम्म्या तालुक्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले. मालेगाव, सटाणा, कळवण, देवळा, नाशिक, इगतपुरी, निफाड या सात तालुक्यांमध्ये अवकाळीने शेतकऱ्यांची पिके हिरावून नेली. १३ मे रोजी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने ६८०.८७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. २३ गावातील ८२६ शेतकऱ्यांचे या पावसामुळे अतोनात नुकसान झाले. बागायती पिकांखालील ६४.०१ हेक्टर क्षेत्राला तडाखा बसला. बहुवार्षिक फळपिकांखालील बाधित ६१६.८६ हेक्टर क्षेत्राचेही मोठे नुकसान झाले. जिरायत तसेच वार्षिक फळपिकांखालील क्षेत्राचे फारसे नुकसान झाले नसल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. या नुकसानासाठी शेतकऱ्यांना भरपाई देणे आवश्यक असून नुकसानभरपाई म्हणून वाटपासाठी एक कोटी १९ लाख ६७ हजार ६१५ रूपयांचा निधी मिळावा अशी मागणी जिल्हा प्रशासनाने केली आहे.

एप्रिल अखेरीसही जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस तसेच गारपीट झाली होती. त्यावेळच्या नुकसान भरपाईपोटी पाच कोटी ६७ लाख रूपयांची निधीची मागणी केली आहे. नुकसानग्रस्तांना मदत केव्हा मिळणार, असा सवाल उपस्थ‌ित होऊ लागला आहे. ३० एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तीन हजार ४९४.५२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले.

मालेगाव, सटाणा, कळवण, देवळा, नाशिक, इगतपुरी, निफाड या सात तालुक्यांत सर्वाधिक नुकसान झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वजनदार’ फायलींना लागतोय ब्रेक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नगरसेवकांना दिल्या जाणाऱ्या नगरसेवक निधीचे कव‌ित्व संपत नसल्याचे चित्र असून, ७५ लाखांवर महापौर ठाम असतांनाही प्रशासनाने तुर्तास ४० लाखांनाच हिरवा कंदील दाखवला आहे. त्यापेक्षा जास्त प्रस्तावाची फाइल बाजूला ठेवल्या जात आहेत. महासभेच्या मान्यतेनंतरच दोनशे कोटींच्या कामांना कात्री लावता येणार आहे. त्यामुळे नगरसेवक निधीची टोलवाटोलवी सुरू असून, यावरून पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.

एकिकडे पालिकेची आर्थिक स्थिती नसतांनाही महापौरांनी नगरसेवकांना ७५ लाखांचा निधी मंजूर केला आहे, तर दुसरीकडे प्रशासन ४० लाख देण्यास तयार आहे. परंतु महापौर ७५ लाखांवर ठाम राहील्या असून, त्यांनी तसा प्रस्तावही दिला आहे. प्रशासनाने त्यासाठी स्पील ओव्हर कमी करून देण्याची अट घातली असून, मनसेच्या काळात मंजूर जवळपास दोनशे कोटींच्या कामांना कात्री लावली जाणार आहे. हा प्रस्ताव पाइपलाइनमध्ये असतांनाच नगरसेवकांनी नगरसेवक निधीच्या कामांच्या फाइल्स फिरवण्यास सुरुवात केली आहे.

पदाधिकारी निधीला राजकीय अडसर

नगरसेवक निधीसोबतच पालिकेतील पदाधिकाऱ्यांना निधी मंजूर करण्यात आला आहे. काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या निधीतून नगरसेवकांना निधी वाटप केला आहे. परंतु प्रशासनाने तुर्तास पदाधिकाऱ्यांच्या निधीलाही ब्रेक लावला आहे. या निधीचे कामे मंजूर करू नयेत, अशा सूचना आल्या आहेत. सभागृहनेत्यांनी यासंदर्भात नगरसेवकांना पत्र दिले आहे. परंतु महापौरांसह स्थायी सभापती व उपमहापौरांनी या वाटपाला विरोध केला आहे. त्यांचीही अडचण वाढल्याने यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

तारेवरची कसरत

काहींनी ४० लाखांपर्यंतच्या कामांच्या तर काहींनी ५० लाखांपेक्षा अध‌िकच्या कामांच्या फाइल्स टाकल्या आहेत. लेखा विभागाने मात्र ४० लाखांपेक्षा जास्त रकमेची फाइल्स बाजूला ठेवल्या आहेत. त्यामुळे तुर्तास तरी नगरसेवक निधी ४० लाखच असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे दोनशे कोटींचा निधी नामंजूर करण्यासाठी महासभेचाच ठराव लागणार आहे. त्यामुळे हा निधी नामंजूर करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांची होते पायपीट

$
0
0

महिरावणीजवळील प्रकार; बस अचानक बंद केल्याने पालकांचाही संताप

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महिरावणी पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी शाळेत जाताना वाहतूक व्यवस्थेची सोयच नसल्याने त्यांची पायपीट होत आहे. याबाबत परिहवन महामंडळाकडे मिनीबस विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष रमेश खांडबहाले यांनी केली आहे. परंतु, याकडे एसटी महामंडळ दुर्लक्ष करत असल्याने अखेर विद्यार्थ्यांना सोबत घेत आंदोलनाचा इशारा खांडबहाले यांनी दिला.

महिरावणी ते शिवणगाव रोडवर असलेल्या जुन्या ब्रिटिशकालीन पूल अवजड वाहनांसाठी बंद केला होता. यात एसटी महामंडळाच्या बसही बंद झालेल्या विद्यार्थ्यांना मोठे हाल सहन करावे लागले होते. यानंतर एसटी महामंडळाने मिनी बस सुरू केल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची सोय उपलब्ध झाली होती. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने ब्रिटिशकालीन पुलाचे कामही दुरूस्तीसाठी हाती घेतले होते.


दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांची गैरसोय

दरम्यान, जून महिना सुरू झाल्याने आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालेले आहे. अशा परिस्थितीत या मिनी बस अचानक एसटी महामंडळाने बंद केल्या आहेत. त्यामुळे आता याचा थेट परिणाम हा या परिसरातील दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांवर झाला आहे. त्यांना यासाठी शाळेत जाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. येथील विद्यार्थी शाळेत अथवा कॉलेजला जाण्यासाठी तब्बल ८ किलोमीटरची पायी प्रवास करीत आपली शाळा किंवा कॉलेज गाठतात. ही गैरसोय तातडीने थांबवण्याची आणि विद्यार्थ्यांसाठी मिनी बस उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे.


अन्यथा आंदोलन करणार

महिरावणी पंचक्रोशीतील गणेशगाव, पिंपळगाव, शिवणगाव, राजेवाडी व नासलगाव येथील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी त्र्यंबकरोड परिसरात येत असतात. परंतु, एसटी बसची सुविधाच नसल्याने विद्यार्थ्यांवर पायपीट करण्याची वेळ येत आहे. एसटी महामंडळाने तात्काळ विद्यार्थ्यांसाठी मिनी बसची व्यवस्था न केल्यास महामंडळाच्या कार्यालयासमोर विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याचे मनसेचे तालुकाध्यक्ष खांडबहाले यांनी सांगितले.


सार्वजनिक ​ बांधकाम विभागानेही लक्ष द्यावे

गेल्या काही दिवसांपूर्वी या पुलाचे काम झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेला जाण्यासाठी रस्ता उपलब्ध झाला होता. मात्र काही दिवसांनी पुन्हा ते काम थांबविण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा त्रास वाढला आणि त्यांना आपल्या शाळेला मुकावे लागत आहे. त्यासाठी विद्यार्थी आठ किलोमीटर चालून आपली शाळा गाठत आहेत. तसेच परिसरातील कॉलेजियन विद्यार्थ्यांनाही याचा त्रास आहेच. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हा ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी सुरू केला तर विद्यार्थ्यांची शाळेसाठी होणारी दररोजची पायपीट थांबणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांकडून चारशे किलो कचऱ्याचे संकलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कचऱ्याच्या अयोग्य विल्हेवाटीमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासाला टाळण्यासाठी व पर्यावरण स्वच्छतेचा संदेश देण्याच्या भावनेतून के. के. वाघ इंजिनीअरिंग कॉलेजमधील प्रयास युवा मंच या सामाजिक संस्थेद्वारे ‘ट्रेक अँड क्लीनिंग’ हा अनोखा उपक्रम राबविला जातो. यंदाही हा उपक्रम राबविण्यात आला.

ब्रह्मगिरीवर ३७ स्वयंसेवकांनी हा उपक्रम राबविला. या उपक्रमामध्ये सुमारे चारशे किलो कचरा जमा करण्यात आला. तेथील गिर्यारोहकांनी या उपक्रमाला दाद देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आणि कचरा गोळा करण्यास मदत केली. या उपक्रमामध्ये प्राचार्य डॉ. के. एन. नांदूरकर, प्रा. एन. बी. गुरुळे, संगीता गुरुळे आणि चेतन नारखेडे यांनी मार्गदर्शन केले. उपक्रमाच्या अंतिम टप्प्यात विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. नेटवीन सिस्टिम्स अँड सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेडचे वेब डिझायनर सुफियान मिर्झा यांनीही या उपक्रमात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images