Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

विद्यार्थी बांधणार पिंचींग बंधारे

$
0
0
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परिसरात पाणी अडवा, पाणी जिरवा संकल्पनेतून जलसंधारणाच्या (पिंचींग बंधारे) उपक्रमाला कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम यांचे हस्ते यांचे हस्ते प्रारंभ झाला.

'ते झाड' पडण्यामागे महापालिकेचा निष्काळजीपणा

$
0
0
कालिदास कलामंदिर येथील सुमारे दीडशे वर्षांपूर्वीचा वटवृक्ष कोसळण्यामागे महापालिकेचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप गोदावरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष राजेश पंडीत यांनी केला आहे.

जूनमध्येच भरावा लागणार एलबीटी

$
0
0
महापालिका हद्दीत २२ मे पासून लागू झालेल्या एलबीटी कराचा पहिला हप्ता व्यवसायिकांना जुनच्या पहिल्या आठवड्यात भरावा लागणार असल्याची माहिती एस्कॉर्ट विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

द्वारका ते बिटको रस्ता वर्षभरात सहापदरी

$
0
0
द्वारका ते बिटको चौक या रस्त्याचे सहापदरीकरण येत्या वर्षभरात पूर्ण होणार आहे. साडेपाच किमी लांबीच्या या रुंदीकरणाला केंद्रीय भूपृष्ठ आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाने नुकतीच परवानगी दिली आहे.

अवघ्या दशकात साडेतीनशे हेक्टरवर 'आंबा'

$
0
0
द्राक्षपंढरी समजल्या नाशिक जिल्ह्याच्या भूमीत साडेतीनशे एकरावर आंब्याची लागवड झाली आहे. अवघ्या दशकभरात या प्रयोगाला यश येण्यामागे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी केंद्राचे प्रयत्न आहेत.

MIDC त बेकायदा कामांचा सुळसुळाट

$
0
0
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नाकर्तेपणामुळे शहरातील सातपूर आणि अंबड या औद्योगिक वसाहतीत तब्बल ७० ठिकाणी अनधिकृत बांधकामे असल्याची बाब उघडकीस आली आहे. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनीच या कामांना खतपाणी दिल्याने गेल्या अनेक वर्षांपासून ही कामे 'जैसे थे' आहेत.

चव्हाणांची नियुक्ती संघटनाविरोधी ठरेल

$
0
0
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळावरील कामगार प्रतिनिधी नियुक्तीचा वाद अजूनही धुमसतो आहे. या मुद्द्याचे कुठे राजकीय भांडवल सुरू आहे, तर कुठे संघटनेतीलच पदाधिकारी स्वतःची वर्णी लावून घेण्याच्या तयारीत आहे.

एस्कॉर्ट नाक्यावर पुन्हा राडा

$
0
0
ट्रान्सपोर्ट असोशिएशन आणि एस्कॉर्ट कर्मचाऱ्यांमध्ये सुरू झालेले शीतयुद्ध पोलिस स्टेशनपर्यंत पोहचले आहे. एस्कॉर्ट कर्मचारी जबरीने पैसे मागत असल्याचा आरोप करीत ट्रान्सपोर्ट असोशिएशनच्या सदस्यांनी आडगाव जकात नाक्यावरील कर्मचाऱ्यांशी मंगळवारी दुपारी हुज्जत घातल्याने तणाव निर्माण झाला होता.

इंजिनीअरिंगमध्ये येणार एकसूत्रता

$
0
0
इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम राबविण्याच्या पद्धतीमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी आता राज्यभरातील विद्यापीठांनी विचार सुरू केला आहे.

डॉ. कृष्णकुमारांचे होणार ‍पुनरागमन

$
0
0
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आर. कृष्णकुमार लवकरच कुलगुरु पदाची सुत्रे पुन्हा स्विकारणार असल्याची माहिती समोर आली आहे.

लोंढेंचे अतिक्रमण जमिनदोस्त

$
0
0
नगरसेवक प्रकाश लोंढें यांचे खुटवडनगरजवळील बहुचर्चित अतिक्रमण मंगळवारी जमिनदोस्त करण्यात आले. एमआयडीसीच्या जागेत उभारलेले हे अतिक्रमण हटविताना समोर आलेल्या हायफाय इंटिरिअर, छुपा मार्ग, तळघर या बाबी पाहून पोलिस, एमआयडीसी महापालिका अधिकाऱ्यांसह सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

खुडवडनगरमध्ये घरफोडी

$
0
0
खुटवडनगरमध्ये राहणाऱ्या उद्योजकाचे घर फोडून चोरट्यांनी तब्बल ३० तोळे सोने आणि पाच लाख रूपयांची रोकड चोरी केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी अंबड पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

हायवेलगत होणार जंक्शन

$
0
0
मुंबई-आग्रा हायवेच्या विस्तारीकरणाअंतर्गत इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकच्याठिकाणी होणारा वाहतुकीचा अडथळा दूर करण्यासाठी आता तेथे जंक्शन विकसीत होणार आहे. महापालिकेचे सहकार्य गतीने लाभल्यास महिनाभरात हे जंक्शन विकसीत होऊन वाहतूक कोंडी दूर होणार आहे.

टँकर संपाने इंधन पुरवठा प्रभावीत

$
0
0
मनमाडच्या पानेवाडी येथील भारत पेट्रोलिअमच्या प्लाण्टमधून इंधन पुरवठा करण्यास टँकर चालक-मालकांनी नकार दिल्याने १२ जिल्ह्यांतील इंधन पुरवठा प्रभावीत झाला आहे. प्लाण्टमधून निम्म्याहून कमी पेट्रोल पुरवठा होत आहे.

नऊ तहसीलदारांच्या बदल्या

$
0
0
नाशिक विभागातील अनेक तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी काढण्यात आले आहेत. त्यात विभागातील ९ तहसीलदारांचा समावेश आहे. अन्य तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश अजूनही प्रतिक्षेत आहेत.

मुळा-प्रवरा बरखास्तीला SCची स्थगिती

$
0
0
अहमदनगर जिल्ह्यातील मुळा प्रवरा सहकारी वीज संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या औरंगाबाद हायकोर्टाच्या आदेशाला मंगळवारी सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली.

शनिवारी राष्ट्रपती शिर्डीत

$
0
0
महाराष्ट्राच्या दौऱ्याअंतर्गत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी शनिवारी (१ जून) ओझर विमातळावर येणार आहेत. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ३१ मे पासून राज्याच्या दौऱ्यावर आहेत.

तीन हजार जात प्रमाणपत्रांचे वाटप

$
0
0
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे एकत्रित प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात सोमवारी एक हजार प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. आतापर्यंत तीन हजार प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे.

सहकारी बँकांमधून ३ कोटींची वसुली

$
0
0
जिल्हाभरातील आठ सहकारी पतसंस्थांची कलम ८८ नुसार सुरू करण्यात आलेली चौकशी आता पूर्ण झाली आहे. २०२ संचालक आणि काही कर्मचाऱ्यांवर सुमारे नऊ कोटी रूपये वसुली करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली. त्यापैकी तीन कोटी रूपयांची वसुलीही करण्यात आली आहे.

बारावीचा निकाल उद्या

$
0
0
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत यंदा घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी (३० मे रोजी) जाहीर केला जाणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या वेबसाइटवर सकाळी ११ वाजता विद्यार्थ्यांना हा निकाल पाहायला मिळेल.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images