Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

खाद्यान्न परतावा भरणे अन्यायकारक

$
0
0
खाद्य सुरक्षा व मानके कायद्यातील परवानाधारकांना त्यांच्या व्यवसायाचा वार्षिक व अर्धवार्षिक परतावा भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र अद्याप अनेक व्यावसायिकांपर्यंत हा कायदा पोहोचलेला नाही.

पत्नींविरोधात गुन्हा दाखल

$
0
0
कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमा केलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर सतीश चिखलीकर आणि इंजिनीअर जगदीश वाघ यांच्या पत्नींविरोधात अँटी करप्शन ब्युरोने मंगळवारी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला.

अवतरलाय संकटमोचक अॅप!

$
0
0
वाढत्या गुन्हेगारीचा फटका सर्वसामान्यांनाही बसू लागलाय. कधी कुठे चेन स्नॅचिंग किंवा जीवघेणा हल्ला होईल हे सांगता येत नाही. मात्र हा हल्ला झाला तर काही सेकंदात तुमच्यावरील संकटाची खबर सर्वत्र जाईल. नाशिकच्या सागर वैष्णव या इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने तयार केलेल्या अनोख्या मोबाइल अॅप्लिकेशनद्वारे हे सहज शक्य होणार आहे.

अवघ्या दशकात साडेतीनशे हेक्टरवर आंबा

$
0
0
द्राक्षपंढरी समजल्या नाशिक जिल्ह्याच्या भूमीत साडेतीनशे एकरावर आंब्याची लागवड करण्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी केंद्राला यश आले आहे. अन् हे फक्त अवघ्या या दशकात घडले आहे.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ६०-४० पॅटर्न लागू करणार

$
0
0
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखांच्या पदवीच्या व्दितीय वर्षाच्या वर्गांना आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या वर्गांना शैक्षणिक वर्ष २०१३-१४ पासून ६० - ४० पॅटर्न लागू करण्याचा निर्णय झाला आहे.

वसुलीने थकबाकीदार धास्तावले

$
0
0
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक ज्ञानदेव मुकणे यांनी थकबाकी भरण्याचा दिलेला इशारा प्रभावी ठरल्याचे दिसून येत आहे. नोटीस मिळताच अनेकांनी थकबाकी भरण्याबाबत हालचाली केल्या आहेत. बुधवारी दोन मोठ्या थकबाकीदारांनी रक्कम भरल्याचे सांगितले जात आहे.

'ट्रीपल ए' आणि शरीफ

$
0
0
पाकिस्तानात सलग दुसऱ्यांदा लोकनियुक्त सरकार सत्तेवर येत आहे. अडथळ्यांची शर्यत पार करून तेथे झालेल्या निवडणुकीत नवाझ शरीफ विजयी झाले आहेत. अल्लाह, आर्मी आणि अमेरिका या पाकमधील 'ट्रीपल ए' समीकरणाला तोंड देत ते कसे कारभार करतात, यावर त्यांचे यश अवलंबून आहे.

पॉवर सहकारी बँकिंगची

$
0
0
नाशिक जिल्ह्याच्या बँकिंग क्षेत्रात सहकारी बँकिंगचे मोठे योगदान आहे. राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्राला अर्थपुरवठा करण्याचे काम सहकारी बँकांनी केले आहे.

हाराचा चुकला नेम

$
0
0
लग्नाचा सिझन म्हणजे धमाल आणि उत्साहपूर्ण वातावरण. त्यामुळे या वातावरणात दंगामस्तीही जोरदार सुरू असते. पण कधी कधी ही दंगामस्ती करताना असा एखादा किस्सा घडतो, की समोरच्याचं तोंड पाहण्यासारखं होतं.

आवक घटल्याने कांदा वधारला

$
0
0
आवक कमी झाल्याने सटाणा कृषी बाजार समितीतील कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली आहे. बुधवारी चांगल्या प्रतीच्या कांद्याला १,२७५ रुपयांपर्यंत भाव मिळाला. दिवसभर सरासरी बाजारभाव एक हजाराच्या आसपास राहिल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांनी उचल खाल्ली आहे.

नाशिकमधील आठ अधिका-यांच्या बदल्या

$
0
0
प्रशासकीय आणि विनंती बदल्यांना पोलिस महासंचालकांनी परवनागी दिल्याने राज्यातील २७७ नि:शस्त्र पोलिस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये शहर पोलिस आयुक्तालयातील पाच, तर ग्रामीणमधील तीन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.

संपकरी वाहतूकदारांचा टँकर मोर्चा

$
0
0
शांततेच्या मार्गाने आंदोलन करूनही भारत पेट्रोलियम कंपनीचे अधिकारी त्याची दखल घेत नसल्याने इंधन वाहतूकदारांनी बुधवारी पानेवाडी प्रकल्प ते मनमाड पोलिस स्टेशन भव्य टॅँकर मोर्चा काढला.

दगडफेक : लोंढे पुत्राविरोधात गुन्हा

$
0
0
नगरसेवक प्रकाश लोंढे व त्यांचा मुलगा आणि इतर तिघाजणांवर सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका धम्मतीर्थाचे अतिक्रमण काढताना लोंढे व संबंधितांनी दगडफेक करून तणाव निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेमुदत ठिय्या आंदोलनाचा 'मंच'चा इशारा

$
0
0
रासबिहारी शाळेने विद्यार्थ्यांचे दाखले घरी पाठविल्याच्या प्रकाराबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयाने कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे संबंधित पालकांनी शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचच्या माध्यमातून बुधवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

उड्डाणपूलाच्या नावाचा अट्टहास फुकाचा

$
0
0
मुंबई-आग्रा हायवेवर नाशिक शहरालगत उभारण्यात आलेल्या ५.७१ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलास विविध नावे देण्याची मागणी आणि शिफारस जोर धरत असली तरी नावाचा हा अट्टहास केवळ फुकाचा असल्याची बाब पुढे आली आहे.

अॅक्टिव्ह नसलेल्या अध्यक्षांची उलबांगडी करू

$
0
0
अखिल भारतीय नाट्य परिषदेचा जो अध्यक्ष अॅक्टिव्ह नसेल त्याची उचलबांगडी करीत प्रसंगी नवा अध्यक्ष नेमण्याचाही निर्णय घेतला जाईल, असे परखड मत अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केले.

कोंडी सोडविणार तीन जंक्शन

$
0
0
मुंबई-आग्रा हायवेच्या विस्तारीकरण कामा अंतर्गत इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकच्या ठिकाणी निर्माण झालेला वाहतुकीचा तिढा सोडविण्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला यश येणार आहे. याठिकाणी एकूण तीन जंक्शन उभारण्यात येणार असून यातून वाहतुकीची कोंडी दूर होण्यात मदत होणार आहे.

समुपदेशक करणार टेन्शन गुल

$
0
0
पेपर कितीही सोपा गेला, तरी निकालाचा दिवस प्रत्येक विद्यार्थ्यासाठी टेन्शनफुल असतो. पण विद्यार्थ्यांचे हे टेन्शन गुल करण्यासाठी विभागीय शिक्षण मंडळाने पावले उचचलली असून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी समुपदेशकांची मदत मिळणार आहे.

युरोपियन शिष्टमंडळ आज नाशकात

$
0
0
कृषी प्रक्रिया उद्योगात गुंतवणूक करण्यासंदर्भात युरोपियन बिझनेस अँड टेक्नॉलॉजी सेंटरचे शिष्टमंडळ गुरुवारी नाशकात येणार आहे. दोन दिवसीय या भेटीत हे शिष्टमंडळ स्थानिक उद्योजकांशी चर्चा करण्यासह काही वायनरींनाही भेट देणार आहे.

बारावीचा निकाल आज

$
0
0
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत २१ फेब्रुवारी ते २६ मार्चदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (३० मे) सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images