Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

'सुधर्मा'च्या साथीने यशाला गवसणी

$
0
0
गुरुवारी बारावीचा निकाल जाहीर झाला आणि गुणवंतांवर कौतुकाचा वर्षावही... या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये जळगावमधील सचिन, समाधान व दीपक यांची कामगिरी मात्र विशेष उल्लेखनीय ठरली आहे.

उत्कृष्ट विद्यापीठांत उमविला स्थान

$
0
0
इंडिया टुडे या देशातील प्रतिष्ठीत अशा नियतकालिकाने नेल्सन कंपनीच्या सहकार्याने देशभरातील विदयापीठांच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत केलेल्या सर्वेक्षणात देशातील उत्कृष्ट अशा ५० विद्यापीठात जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने स्थान पटकावले आहे.

खासगी विद्यापीठांनाही भासणार जागेची चणचण

$
0
0
स्वयंअर्थसहाय्यीत खासगी विद्यापीठांच्या स्थापनेला राज्य सरकारने ग्रीन सिग्नल दिला असून त्यासाठी घातलेल्या निकषांनुसार मुंबई-पुण्यात जागा मिळवणे इच्छुक संस्थांना महागडे ठरण्याची शक्यता आहे.

छायाचित्रकाराचे अपघाती निधन

$
0
0
लग्नसमारंभाचे छायाचित्रण करून घरी परतणा-या छायाचित्रकाराच्या बाइकला व्हॅनने धडक दिली. या अपघातात छायाचित्रकाराचे निधन झाले. येथील राजकमल फोटो स्टुडिओचे संचालक मुकूंद भालचंद्र जाधव (वय ५१)हे आसखेडा येथील विवाह समारंभातील हळदीच्या कार्यक्रमाचे छायाचित्रण करुन गुरूवारी रात्री परतत होते.

वार्षिक रिटर्न भरण्यापासून दिलासा

$
0
0
गेल्या आर्थिक वर्षात हाताळलेल्या प्रत्येक अन्न प्रकाराचे माहितीपत्रक (रिटर्न) अन्न व औषध प्रशासनाला सादर करण्यापासून ट्रेडर्स, डिस्ट्रिब्युटर्स, रेस्टॉरंटला दिलासा मिळाला आहे. फुड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथोरिटीने तसे स्पष्ट केले आहे.

जळगावच्या मुलांना ‘सुधर्मा’चा हात

$
0
0
जळगावमधील दीपक, समाधान आणि सचिन या कष्टकरी विद्यार्थ्यांच्या बारावीच्या यशात ‘सुधर्मा’चा वाटाही मोठा आहे. या तिन्ही तरुणांच्या आजुबाजूला दारू गाळणारे, पाकीटमार, भुरटे चोर अशा लोकांचा वावर आहे. मात्र, ‘सुधर्मा’च्या संपर्काने त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली.

वाहतूकदारांचे आंदोलन चिघळणार

$
0
0
मनमाडज‍वळील पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम कंपनीच्या विरोधात इंधन वाहतूकदारांनी पुकारलेल्या टँकर बंद आंदोलनाच्या नवव्या दिवशीही कोणताच तोडगा निघाला नाही.

सेनेकडून भास्कर जाधव यांचा निषेध

$
0
0
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या राज्यमंत्री भास्कर जाधव यांना शिवसेनेने जसास तसे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. नाशिकमध्ये विविध ठिकाणी रास्ता रोको, पुतळादहन व घोषणाबाजी करत जाधव यांचा निषेध करण्यात आला.

चिखलीकर, वाघला सशर्त जामीन

$
0
0
ठेकेदाराकडून २२ हजार रुपयांची लाच स्वीकारणारा आणि कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमा केलेला सार्वजनिक बांधकाम विभागाचा एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर सतीश चिखलीकर आणि इंजिनीअर जगदीश वाघ या दोघांनाही कोर्टाने शुक्रवारी सशर्त जामीन मंजूर केला.

कष्टाने यशाला गवसणी

$
0
0
तिघांनीही जगण्याची भ्रांत भागवून अभ्यास केला... दीपक कचरा वेचण्याचे काम करतो. समाधान आणि सचिन या दोघांनाही ‘रात्री काम, दिवसा अभ्यास’ करण्याशिवाय पर्याय नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत तिघांनी आयुष्यात मोठे होण्याची स्वप्न बघितली आणि ती साकारही होताना दिसताहेत.

बारावी निकालात नाशिकच्या कॉलेजेसचा झेंडा

$
0
0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत एचपीटी आयवायके कॉलेजच्या सायन्स शाखेचा निकाल ९८.५२ टक्के लागला. तर, एमसीव्हीसी ९२.७३ व कला शाखेचा निकाल ६२.६३ टक्के निकाल लागला.

हा 'गेम' कुणाचा ?

$
0
0
वर्षभराने होणा-या लोकसभा निवडणुकीसाठी सगळेच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. मंत्री, नेत्यांचे दौरे, बैठका, मेळावे अशी संघटनात्मक तयारी सुरू असतानाच निवडणुकीतल्या राजकारणाचा अविभाज्य भाग मानल्या जाणाऱ्या डॅमेज पॉलिसीलाही सुरुवात झाली आहे.

विद्यार्थिनींच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

$
0
0
बारावीनंतरच्या टप्प्यावर सामान्य आर्थिक गटातील मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये उच्चशिक्षण घेता यावे, यासाठी सॅमसोनाइट कंपनीचे अध्यक्ष डॉ. रमेश तैनवाला यांनी तैनवाला फाऊंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थिनींसाठी शिष्यवृतीची योजना आखली आहे.

तोतया पोलिसांकडून दोघांची लूट

$
0
0
तोतया पोलिसांचा शहरातील वावर पुन्हा सुरू झाला असून, विविध भागांतील घटनांत या चोरट्यांनी दोघांची लूट केली. या दोन्ही प्रसंगांत ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून त्यांना सावध करण्याच्या बहाण्याने लूट करण्याची 'मोडस ऑपरेंडी' चोरट्यांनी वापरली आहे.

सातपुड्याला परत वैभव प्राप्त होईल ?

$
0
0
सातपुड्याच्या वैभवाला आता नजर लागली आहे. अतिक्रमणे आणि वृक्षतोडींच्या समस्येने त्याला ग्रासलंय. तो वाचवण्यासाठी उपाय आता हाती घ्यावे लागतील. निसर्गसंपन्न सातपुडा हे जळगाव जिल्ह्याचे नव्हे तर महाराष्ट्राचं वैभव आहे. जैवविविधतेने नटलेला हा सातपुडा आहे. दाट जंगल ही सातपुड्याची ओळख आहे.

कचरा उचलायचा कुणी ?

$
0
0
नाशिकरोड बसस्थानकावर कचऱ्याचे ढीग साचले असून ते कुणी उचलायचे याबाबत रेल्वे प्रशासन, एसटी महामंडळ व महापालिका यांच्यात वाद सुरt आहे. या वादात प्रवासी भरडला जात असून कचऱ्याच्या त्रासामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

$
0
0
बारावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आल्यानंतर पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. ऑनलाइन प्रवेशाच्या टप्प्यानंतर प्रत्यक्ष प्रवेशांना सुरुवात होणार आहे.

सिन्नर-खेड हायवेचा श्रीगणेशा दिवाळीत

$
0
0
नाशिक-पुणे हायवेच्या रुंदीकरणांतर्गत महत्त्वाचा टप्पा असलेल्या सिन्नर ते खेड या मार्गाचे चौपदरीकरणाला येत्या दिवाळीत प्रारंभ होणार आहे. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर होणारे हे काम येत्या अडीच वर्षात पूर्ण केले जाणार आहे.

लग्नाच्या आदल्याच दिवशी तरुणाची आत्महत्या

$
0
0
विवाहाच्या आदल्या दिवशी तरुणाने मैत्रिणीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी ग्रामीण पोलिस हेडक्वॉर्टरमध्ये कार्यरत असलेल्या महिला कर्मचा-यासह तिच्या कुटुंबियांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिर्लेकरांकडून सिन्नरच्या शिवसैनिकांची हजेरी

$
0
0
संपूर्ण देशात काँग्रेस विरोधी लाट असून या परिवर्तनाच्या लढाईत शिवसेनेला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत असतांना यामध्ये सिन्नरचा वाटा असेल काय असा सवाल करीत सिन्नरच्या शिवसैनिकांना रवींद्र मिर्लेकर यांनी चांगलेच धारेवर धरले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images