Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मिरांडा खंडणीप्रकरणातील कैदी मुंबईकडे

$
0
0
मुंबईतील नगरसेवक व बांधकाम व्यावसायिक ब्रायन मिरांडा यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी नाशिकरोड कारागृहातून मुंबई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते. या दोघांना घेऊन पोलिस मुंबईला रवाना झाले आहे.

पावसाचा पहिला फटका, एक ठार

$
0
0
सटाणा व देवळा परिसरात दुपारी साडे तीनपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली. कडाक्याच्या पावसाने खामलोण गावात आंब्याचे एक झाड कोसळून गणेश सजन धोंडगे (२०) या तरूणाचा जागीच मृत्यू झाला.

रेव्हेन्यू स्टॅम्प पाच रुपयाला

$
0
0
पोस्ट ऑफिस आणि राज्य सरकार यांच्यात दरवर्षी होणारा करार वेळेवर न होण्याचा परिणाम थेट रेव्हेन्यू स्टॅम्पच्या विक्रीवर झाला आहे. कमिशन मिळत नसल्याने पोस्टाने रेव्हेन्यू स्टॅम्पची खरेदी आणि विक्री बंद केल्याने खुल्या बाजारात हा स्टॅम्प चक्क पाच रुपयांना विकला जात आहे.

एसटी झाली ६५ वर्षांची

$
0
0
राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी एसटी महामंडळाचा मोठा हातभार लागला आहे एसटीने १ जून रोजी ६५ वर्षे पूर्ण केली त्यानिमित्त...

कुंटनखान्यावर छापा, तिघांना अटक

$
0
0
शहरातील अशोका मार्गावरील एका इमारतीत चालणा-या कुंटनखान्यावर छापा टाकून उपनगर पोलिसांनी दोन महिलांसह तिघांना अटक केली. स्वतःच्या फायद्यासाठी मुलींना फसवून वेश्याव्यवसायात ढकलत या महिलांनी हा कुंटनखाना सुरू ठेवला होता.

हेमंत गोडसेंचा मनसेला रामराम

$
0
0
गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यातील राजकीय वातावरणात चर्चेत असलेल्या मनसे नगरसेवक हेमंत गोडसे यांच्या शिवसेना प्रवेशाची शनिवारी अधिकृत घोषणा झाली. स्वतः गोडसे यांनी पक्षातील एकाधिकारशाही व अन्यायाला कंटाळून आपण आज (रविवार) सेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले.

नाशिकरोड विकासात पॉझिटिव्ह

$
0
0
नाशिक शहराच्या विकासात नाशिकरोडचा वाटा मौलाचा आहे. यामुळे नाशिकरोडला स्वतंत्र ओळख मिळू लागली आहे. परिसराच्या विकासाला गती देण्यासाठी विविधअंगांनी प्रयत्न होत आहे. नाशिक रायझिंगच्या माध्यमातून नाशिकरोडचे अनेक पैल्यू सर्वांसमोर आले.

प्रशासकीय कामकाजात नाशिकरोडचे महत्त्व

$
0
0
नाशिकरोडला रेल्वे स्थानकामुळे जेवढे महत्त्व आहे. तेवढेच महत्त्व शासकीय कामकाजाच्या दृष्टीने नाशिकरोडला लाभले आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे नाशिक महसुल विभागाचे नाशिकरोड हे मुख्यालय आहे.

'मुक्त'चा दीक्षांत सोहळा २९ जूनला

$
0
0
वारंवार खो मिळालेला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा आता २९ जूनला होणार आहे. विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या प्रकृती अस्वस्थामुळे यापूर्वी हा सोहळा पुढे ढकलावा लागला होता. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर हे उपस्थित राहणार आहेत.

कळवणमध्ये पावसामुळे लाखोंचे नुकसान

$
0
0
कळवण तालुक्यातील पिळकोस, विसापूर, भादवण, गांगवन, जुनिबेज, नविबेज परिसरात शनिवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले. मुसळधार कोसळलेल्या या पावसात घराचे पत्रे उडून गेले, भिंती कोसळल्या तसेच शेतमालाचेही लाखोंचे नुकसान झाले.

'जीवनचक्राचा वेध' घेत कालिदास झाले अंतर्मुख

$
0
0
मानवाच्या दैनंदिन व्यापारातील अव्याहत चक्राचा वेध घेणारे 'किनाऱ्यावरचा कालपुरुष' नाटक कालिदास कलामंदिर येथे नुकतेच सादर झाले. ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या खंडकाव्यावरून लेखक दत्ता पाटील यांनी हा नाट्याविष्कार केला होता.

नाशिकरोड खड्ड्यात

$
0
0
नाशिकरोडच्या अनेक भागात रस्त्यांवर खड्डे आहेत ते बुजवावे अशी मागणी वारंवार होत असताना महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजविण्याचे काम करण्याऐवजी पालिका पावसाने खड्डे भरतील याची प्रतीक्षा करत आहे.

गोदावरीत आढळले स्त्री अर्भक

$
0
0
पंचवटीच्या गंगाघाट परिसरातील नदीपात्रात शनिवारी दुपारच्या सुमारास मृतावस्थेतील स्त्री अर्भक आढळून आले. अनैतिक संबंधांतून जन्मलेले असल्याने अज्ञात महिलेने ते फेकून दिले असावे, असे पोलिसांतील तक्रारीत म्हटले आहे.

फेटेवाला सांगा कुणाचा

$
0
0
टळटळीत उन्हातून झोकात आलेला फेटेवाला त्याच तंद्रीत थेट लग्नसोहळ्यात सर्वात पुढे गादीवर मस्त रेलून बसतो. हौसे-नवसे-गवसे यापैकी कुणी एक असावा, म्हणून त्याच्या आजूबाजूचे थोडंसं दुर्लक्षच करत असतात. समोर मंगलाष्टकांना काही वेळ असतो.

महिला पोलिसासह सहा जणांना अटक

$
0
0
हळदीच्या दिवशीच तरुणाने आत्महत्या केल्याप्रकरणी आडगाव पोलिसांनी ग्रामीण पोलिस हेडक्वॉर्टरमधील महिला पोलिसासह सहा जणांना अटक केली आहे. त्याशिवाय पोलिस कर्मचारी असलेल्या तिघा महिला कर्मचा-यांनाही अटक करण्याची प्रक्रीया रविवारी उशिरापर्यंत सुरू होती.

नाशिकरोडला पावसाची हजेरी

$
0
0
दोन दिवसाच्या उकाड्यानंतर रविवारी दुपारी नाशिकरोडला पावसाने हजेरी लावली. नाशिकरोड व पूर्व भागातील अनेक गावांमध्ये दुपारी साडेतीनच्या सुमारास पाऊस दाखल झाला. हा पाऊस तासभर सुरू होता.

MSW च्या विद्यार्थ्यांवर गुणांची 'मुक्त' उधळण

$
0
0
पुस्तके अन् प्रॅक्टिकल शिवाय एमएसडब्ल्यू या अभ्यासक्रमांतर्गत शिक्षण घेणा-या व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या 'मुक्त' कारभाराचा प्रत्यय घेतला. मुक्त विद्यापीठातर्फे चालविण्यात येणा-या या अभ्यासक्रमाचा दुस-या वर्षाचा निकाल तब्बल ८३ टक्के लागला.

चाळीसगाव परिसरात वीज पडून २ ठार

$
0
0
चाळीसगाव परिसरात शनिवारी सायंकाळी वादळीवाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यावेळी वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला. कळमडू येथे १९ वर्षीय नवविवाहितेच्या अंगावर वीज पडल्याने तिचा मृत्यू झाला.

यशवंतरावांकडे शब्द जिवंत करण्याची हातोटी'

$
0
0
माणसाचे खरे पैलू त्याच्या एकूण अभ्यासातून न उलगडता नाते दृढ करण्यातून उलगडतात. यशवंतराव हडप यांनी तेच केले. त्यांच्याकडे माणसाला हाताळण्याची एक विलक्षण हातोटी होती, त्यामुळेच ते शब्द जिवंत करू शकले, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व पॉप्युलर प्रकाशनाचे प्रकाशक रामदास भटकळ यांनी केले.

फेसबुकवरील 'आक्षेपार्ह पोस्ट'प्रकरणी गुन्हा

$
0
0
फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणा-या तरुणाविरुद्ध कारवाई करत सरकारवाडा पोलिसांनी शनिवारी रात्री याप्रकरणाची दखल घेतली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images