Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दोनशे कोटींचा कर्ज प्रस्ताव वेटींगवर

$
0
0
शहरातील विविध विकास कामांसाठी लागणारा निधी कर्ज स्वरूपात उपलब्ध व्हावे म्हणून महापालिकेने पाठवलेला २०० कोटी रूपयांचा कर्ज प्रस्ताव राज्यसरकारकडे मान्यते अभावी धुळ खात पडला आहे.

नाशिकच्या तरूणीला संशोधनाचे पेटंट

$
0
0
कामाच्या कागदपत्रांना स्टेपल करताना ऐनवेळी पिनाच संपल्याचे लक्षात येते अन् ऐनवेळी गोंधळ होतो. ही बारीकशी बाब हेरून नाशिकच्या अंकिता नगरकरने यावर पर्याय शोधण्यास सुरूवात केली अन् तिची ही जिज्ञासू वृत्ती तिला पेटंट पर्यंत घेऊन गेली.

प्रवाशांना भुर्दंड 'विनावाहक'चा

$
0
0
विना थांबा जलद प्रवास व कमीत कमी मनुष्यबळात अधिकाधिक बसेस चालविण्याच्या हेतूने एसटीने सुरू केलेल्या 'विनावाहक बसेस'मुळे प्रवाशांची मात्र आर्थिक पिळवणूक होते आहे. या बसेसच्या तिकिटदरात पाच रुपये आरक्षण शुल्क द्यावे लागत असल्याने प्रवाशांची मात्र चांगलीच कोंडी झाली आहे.

मातोश्रीवरून गोडसेंचा शिवसेना प्रवेश

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक हेमंत गोडसे यांनी रविवारी संध्याकाळी मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला.

५०० क्विंटल कांदा जळून खाक

$
0
0
कळवण तालुक्यातील ओतूर येथील शेतकरी विश्वास गणपत बागड यांच्या कांदा चाळीला अचानक आग लागून पंधरा ट्रॅक्टर म्हणजेच अंदाजे पाचशे क्विंटल कांदा जळून खाक झाला.

उद्यानांमध्ये कचरा कुंड्या

$
0
0
गंगापूर रोड आणि कॉलेजरोड परिसरातील उद्याने महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोमजली असताना त्यात भर म्हणून की काय, या उद्यानांमध्ये झाडांचा पालापाचोळा टाकण्याचा 'प्रताप' पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. नुकत्याच आलेल्या पावसामुळे तर हा कचरा कुजू लागला आहे.

पंचवटी एक्सप्रेसमध्ये 'रिसेप्शन ऑन व्हील'

$
0
0
सनईचे मंजुळ स्वर, पाहुण्याची लगबग, येणाऱ्या पाहुण्यांचे गुलाबाच्या फुलांनी स्वागत अशी लगबाग आपण नेहमीच लग्नकार्यात अनुभवतो. हिच लगबग सोमवारी सकाळी पंचवटी एक्सप्रेसमध्ये पाहायला मिळाली. निमित्त होते रिसेप्शनचं.

इंजिनीअरिंगबरोबर मॅनेजमेंटची डिग्री

$
0
0
मातोश्री एज्युकेशन ट्रस्ट संचलित मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये विद्यार्थ्यांना यंदापासून इंजिनीअरिंगबरोबरच मॅनेजमेंटची डिग्रीही घेता येणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) व पुणे विद्यापीठामार्फत यंदापासून या कॉलेजला इंटिग्रेटेड द्विपदवी अभ्यासक्रम राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

वाळू माफियांमुळे चिमुरडीचा मृत्यू

$
0
0
वाळू माफियांनी नदीपात्रात वाळूचा उपसा करण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून एका दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी साक्री तालुक्यात घडली. तिच्यासोबत बुडालेल्या तिच्या तीन भावंडांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले. आठ दिवसांतील अशा स्वरुपाची ही दुसरी घटना आहे.

एसटीच्या अधिका-यांची बनवाबनवी

$
0
0
सिन्नरला 'हिरकणी कक्ष' स्थापन झाला असे सांगणाऱ्या विभाग नियंत्रकांचा दावा म्हणजे केवळ बनवेगिरी असल्याचे उघडकीस आले आहे. आगार व्यवस्थापकांचा हवाला देत विभाग नियंत्रकांनी जिल्ह्यात सिन्नरला असा कक्ष सुरू झाल्याचा दावा दोनच दिवसांपूर्वी केला होता.

अधिका-याला लाच स्वीकारताना अटक

$
0
0
सेवानिवृत्त मुख्याध्यापकाकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना नंदूरबार येथील शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकारी संतोष जैन याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. जैनविरुद्ध नंदूरबार शहर पोल‌िस ठाण्यात गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.

'स्तंभ ते आरके'चे होणार रूंदीकरण

$
0
0
शहरातील मध्यवस्तीत असलेल्या अशोकस्तंभ ते रविवार कारंजा या रस्त्याचे विकास आराखड्यानुसार १८ मीटर रूंदीकरण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. आगामी सिंहस्थापूर्वी हा रस्ता रूंद करण्यात येणार असून व्यापाऱ्यांनी मात्र रस्त्याच्या रूंदीकरणाविरोधात आक्रमक भुमीका घेतली आहे.

पहिल्याच पावसाने शहर अंधारात

$
0
0
नाशिक शहरात रविवारी झालेल्य़ा पावसाने अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यातच घरातील पंखे बंद झाल्याने आणि वातावरणातील उष्णतेने नागरिक हैराण झाले होते. रात्री दीड वाजता गेलेली वीज सोमवारी संध्याकाळपर्यंत न आल्याने लोक हवालदील झाले होते.

गटाराचे पाणी घरात

$
0
0
नाशिक महापालिकेने केलेल्या मान्सूनपूर्व कामाचा फोलपणा सिध्द झाला असून मोटवानीरोड येथील अनेक घरांमध्ये गटारीचे पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. सकाळी अचानक शौचालयातून व बाथरुममधून पाणी आल्याने नागरिकांची धावपळ झाली.

२५ टक्के प्रवेशाची ऐसीतैसी

$
0
0
केंद्र सरकारने बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार प्राथमिक शाळांमध्ये २५ टक्के जागा गरीब मुलांसाठी राखून ठेवण्याची सक्ती केली आहे. तरीही जळगाव शहरात पाल्यांच्या प्रवेशासाठी पालकांची पायपीट सुरूच आहे.

चांगले हत्याकांडातील एक संशयित हजर

$
0
0
गंगापूररोडवरील हॉटेल विसावा येथे ८ मे रोजी झालेल्या चांगले-सोनवणे हत्याकांडातील फरारी झालेला एक संशयित आरोपी अखेर पोलिसांना शरण आला आहे. संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे दिवसभर चौकशी सुरू होती.

इंधन वाहतूकदारांचा संप सुरूच

$
0
0
भारत पेट्रोलियम कंपनीतील इंधन वाहतूकदारांनी सुरू केलेल्या संपावर कोणताच तोडगा न निघाल्याने सोमवारी बाराव्या दिवशीही सुरू होता. रविवारी रात्री या संपाला अज्ञात व्यक्तींनी हिंसक गालबोट लावण्याचा प्रयत्न केला; तर सोमवारी हिसवळजवळ तीन टँकरच्या काचा फोडण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली.

व-हाडाच्या गाडीला अपघात

$
0
0
पेठ तालुक्यातील खावणशेत येथे लग्नासाठी निघालेल्या एका क्रुझर गाडीला अपघात होऊन वऱ्हाडींपैकी दोन जण जागीच ठार झाले. हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान एका किशोरवयीन मुलाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या तीन झाली आहे. या अपघातात १५ जण जखमी झाले आहेत.

कोथिंबीरीची जुडी नव्वद रुपयाला

$
0
0
नशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोथिंबीरीच्या भावाने उच्चांक गाठला असून संध्याकाळी झालेल्या लिलावात नऊ हजार रुपये शेकड्याने कोथ‌िंबीर विकली गेली.

दहा लाखांची जकातचोरी

$
0
0
महापालिका हद्दीत येणाऱ्या मालावर नियमानुसार जकात आकारण्याऐवजी जकात अधिकारी आणि एजंटांनी निम्मी रक्कम स्वीकारत अनेक ट्रक बिनभोबाट शहरात सोडल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी केला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images