Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी सोनल पटणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला
इनरव्हील क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ मावळत्या अध्यक्ष शैला कलंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच झाला. कलंत्री यांच्याकडून सोनल पटणी यांनी क्लबच्या नूतन अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.
क्लबच्या अध्यक्षपदी पटणी तर डॉ. संगीता पटेल यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली आहे. पिनल वर्मा (सेक्रेटरी), अंकिता सोमानी (खजिनदार), सुचेता मंडलेचा (आयएसओ), वसुधा गुजराथी (सीसी) तर भारती पाटील (टीच ऑर्डिनेटर) असे निवड करण्यात आलेले क्लबचे इतर पदाधिकारी आहेत. पदग्रहण समारंभास क्लबच्या सदस्या उषा शिंदे, शुभा पैठणकर, वंदना सोनवणे, माया टोणपे, नीता शाह, नीता आहुजा, शीतल उदवंत, पूजा काबरा, जयश्री शाह, अनिता पांढरे, नीलम पटणी, माधवी शेंडे, सरोज भावसार, विजया पाटील, योगिता खैरनार, हर्षा छाजेड आदींची उपस्थिती होती.
मावळत्या अध्यक्षा शैला कलंत्री यावेळी गेल्या वर्षभरात क्लबच्या वतीने करण्यात आलेल्या समाजपयोगी उपक्रमांचा आढावा घेतला. क्लबच्या वतीने पुढील काळात गरजू विदयार्थ्यांना गणवेश वाटप, शालेय मुलांना शालेय साहित्याचे वाटप, लहान विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान, चित्रकला, सायकल स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. क्लबच्या माध्यमातून आवश्यक त्या ठिकाणी सॅनीटरी नॅपकिन मशिन, वॉटर प्युरिफायर, अन्नधान्य वाटप, कपडे वाटप आदींसह वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाची कामे या वर्षात हाती घेण्यात येणार असल्याकडे यावेळी नूतन अध्यक्ष पटणी यांनी सांगितले. पिनल वर्मा यांनी अहवाल वाचन केले. उपाध्यक्षा डॉ. संगीता पटेल यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हिवाळी अधिवेशनात पेन्शनर्स समस्या मांडणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर
पेन्शनर्सच्या विविध समस्या सोडविण्यासाठी मंत्रालय व जिल्हा परिषद स्तरावर सर्वोतपरी सहकार्य करू तसेच त्यांच्या प्रश्नांबाबत हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याचे आश्वासन आमदार निर्मला गावित यांनी दिले.

त्र्यंबकेश्वर येथे तालुकास्तरीय जुनी पेन्शन निर्धार मेळावा उत्साहात झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. पंचायत समिती सभापती ज्योती राऊत आणि उपसभापती रवींद्र भोये यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आगामी महिन्यातील पंचायत समिती सहविचार सभेमध्ये २००५ नंतरच्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी हा ठराव सर्वानुमते पारित करण्याचे आश्वासन उपसभापती भोये यांनी उपस्थित कर्मचारी व पदाधिकाऱ्यांना दिले. तसेच पंचायत समिती स्तरावर पेन्शनधारकांच्या कपात रकमेच्या हिशोबासंदर्भात अधिकृत सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत स्लिपा देणार असल्याचे जाहीर केले. संघटनचे राज्य प्रतिनिधी राजेश कडू यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना संघटनची आगामी ध्येय धोरणे, द्यावयाचा लढा याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा कोषाध्यक्ष योगेश माकोणे यांनी नवीन योजनेतिल त्रुटींसंदर्भात मार्गदर्शन केले.

मेळाव्यास जुनी पेन्शन हक्क संघटनचे जिल्हा अध्यक्ष सचिन वडजे जिल्हा मुख्य संघटक माणिकराव घुमरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख किरण शिंदे, जिल्हा सहकार्याध्यक्ष प्रदीप पेखळे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन सूर्यवंशी, दिंडोरी तालुका अध्यक्ष दिगंबरर बादाड, कार्याध्यक्ष पेलमहाले, नाशिक तालुकाध्यक्ष मधुकर दोबाडे हे सर्व पदाधिकारी तसेच त्र्यंबकेश्वर येथील विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. श्रीकांत चौरे यांनी सूत्रसंचालन केले व संदीप शिरसाठ यांनी प्रास्ताविक केले. किसन दडस यांनी आभार मानले. अर्पण रक्त पेढी नाशिक यांच्या सहकार्याने स्वामी समर्थ मंदिर रोडवरील निरंजनी अखाडा सभागृहात रक्तदान शिबिर झाले. सभासदांनी रक्तदान करून त्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

त्र्यंबक तालुका पदाधिकारी हनुमान इंगळे, अजित जथे, विशाल सोनलकर, रामकृष्ण मेढे, रामेश्वर शेंडगे, हेमंत शेंडे, विजय गवळी, अरुण मौले, रघुनाथ राठोड, कन्हैया गमे, सोमनाथ वाघ, चंद्रमणी बोबडे, श्रीहरी सुरवसे, नारायण शिंदे, सोमेश्वर कनकट्टे, प्रवीण मनोहर, अमोल नरवटे, विक्रम जगदाले, दिनेश महाले, विजय तुरकने, औदुंबर मदने, सोनू बुंगे, नामदेव डहाळे, सोमनाथ सोनलकर, शशिकांत चापेकर, हिरामन भोये आदिंनी परिश्रम घेऊन मेळावा यशस्वी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार महिन्यांत ८४ लाख लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
मागील चार महिन्यात शहरात घडलेल्या २३ पैकी १८ गुन्ह्यात चोरट्यांनी तब्बल ८२ लाख रुपयांवर डल्ला मारला. यातील २० लाख रुपये परत मिळवण्यात पोलिसांना यश मिळाले असून, ऑनलाइन प्रकारातील तीनपैकी दोन तर फसवणुकीचे १५ पैकी आठ गुन्हे उघडकीस आणण्यात सायबर पोलिसांना यश मिळाले आहे.
सायबर गुन्ह्यांची विस्तारणारी कक्षा लक्षात घेता शहर पोलिसांनी मे महिन्यात स्वतंत्र सायबर पोलिस स्टेशन सुरू केले. एक लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कमेचे सायबर फसवणुकीचे, विनयभंगाचे तसेच ऑनलाइन केले जाणारे इतर गुन्हे या पोलिस स्टेशनमध्ये नोंदवले जातात. मे ते ऑगस्ट या चार महिन्यात सायबर पोलिस स्टेशनमध्ये एकूण २३ गुन्हे दाखल करण्यात आले. यातील १४ गुन्हे उघडकीस आले आहेत. यातील चार गुन्ह्यांमधील संशयितांविरोधात कोर्टात चार्जशीट देखील दाखल करण्यात आले आहे. याबाबत सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार यांनी सांगितले, की ऑनलाइन कॉल करून आर्थिक फसवणूक केल्या जाणाऱ्या गुन्ह्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. बोगस कॉल सेंटरमधून हे काम सुरू असते. समोरील व्यक्ती कधी बँकेतील अधिकारी असल्याचे बतावणी करते तर कधी तुम्हाला बक्षिस लागल्याचे सांगून चोरटे बँक खात्याची माहिती, पासवर्ड इत्यादी संकलीत करतात. चोरट्यांच्या हातात माहिती पडताच पैसे चोरी होतात. हे प्रकार रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सजग राहयला हवे. मोबाइल बँकिंग अथवा कम्प्युटरचा वापर करताना सुरक्षेस प्राधन्य न दिल्यास फसवणूक होण्याची शक्यता वाढते, असे पवार यांनी स्पष्ट केले.

किचकट तपास प्रकिया
सरासरी महिन्याभरात पाच ते सहा प्रकरणे समोर येत असून, फसवणुकीचे आकडेही मोठे आहेत. या गुन्ह्यांचा तपास मोठा तसेच किचकट असल्याने कधीकधी वेळ खर्ची होतो. सायबर पोलिसांनी राजस्थान, दिल्ली तसेच झारखंड सारख्या राज्यातील दुर्गम भागातून संशयितांना अटक केली आहे.

प्रकार...दाखल गुन्हे...उघड गुन्हे...उघड नसलेले...दोषारोप दाखल
ऑनलाइन....३....२...१...१
फसवणूक.....१५....८....७....२
विनयभंग.....५....४....१.....१
एकूण....२३....१४....९.....४

महिना....रक्कम चोरी.....मिळालेली रक्कम
मे.....१,४८,२९३....००००
जून....६,५४,०००.....००००
जुलै....१५,०६,४५५....२०,३१५२
ऑगस्ट....५८,९१,३३५....००००
एकूण.....८२,००,०८३......२०,३१५२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेगवेगळ्या अपघातात बालकासह दोघे ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी / मनमाड
नाशिक-कळवण मार्गावर दिंडोरी जवळील हॉटेल राजयोग समोर दुपारी तीन वाजता दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने एक जण ठार झाला. दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मनमाड-लासलगाव मार्गावरील अन्य अपघातात आठ वर्षीय बालक ठार झाला.
नाशिक-कळवण मार्गावरील हॉटेल राजयोगसमोर रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास बजाज दुचाकी (एमएच १५ एटी ६५०५) आणि हिरो होंडा (एमएच १५ बीव्ही ४२१४) या दुचाकींची समोरा-समोर धडक झाली. यात विजय सोमाभाई दाभोर (रा. कोटा पंचमहाड, गुजरात) हे जागीच ठार झाले. तर चंदर देवराम वाघमारे व अन्य एक जण गंभीर जखमी झाले. घटनेचे वृत्त समजताच दिंडोरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक वाघ, आव्हाड यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याबाबत पुढील तपास पो. नि. मधुकर गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

बालकाला पिकअपची धडक
मनमाड : मनमाड-लासलगाव मार्गावर भारतनगर येथे पिकअपने धडक दिल्याने झालेल्या अपघातात आठ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी चांदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. शाम अरुण माळी असे अपघातात ठार झालेल्या बालक नाव आहे. भारतनगर येथे घरासमोर खेळत असताना मनमाड-लासलगाव मार्गावरून जाणाऱ्या पिकअप वाहनाची धडक बसल्याने बालक ठार झाला. घटनेनंतर वाहनचालक फरार असून चांदवड पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी हवालदार चव्हाण पुढील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोडीतील आरोपीस बेड्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
जेलरोडच्या त्रिवेणी पार्क परिसरात तीन महिन्यांपूर्वी झालेल्या घरफोडीतील आरोपीस नाशिकरोड पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने सामनगाव रोडवरील म्हाडा कॉलनी येथून मुद्देमालासह अटक करण्यात यश मिळविले. सोमनाथ शंकर काळे (२१, मुळ रा. वेळापूर पालखी मैदान, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

जेलरोडवरील त्रिवेणी पार्क परिसरातील प्रथमेश पार्कमधील रुम नंबर ४०२ मध्ये १३ जून रोजी घरफोडीची घटना घडली होती. यात ५० हजार रुपये रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची फिर्याद शाम सुभाष पानसरे यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर पोलिस या घरफोडीतील आरोपींच्या मागावर होते. रविवारी अखेरीस या घरफोडीतील आरोपीस नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक उत्तम दळवी, प्रकाश भालेराव, श्रीकृष्ण पडोळे, प्रकाश आरोटे, सचिन वाटाने, राजेंद्र जाधव यांच्या पथकाने मुद्देमालासह अटक केली. सोमनाथ काळे यांच्याकडून ३० हजार रुपयांची सोन्याची लगड, मोटारसायकल व चार मोबाइल फोन असा सुमारे ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यास नाशिकरोड कोर्टात पोलिसांनी हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. सोमनाथ काळे याच्या विरोधात मोटारसायकल चोरीचे गुन्हे यापुर्वीच नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल आहेत.

अश्विनी कॉलनीत गुन्हेगारांचा आश्रय
सामनगाव रोडवरील अश्विनी कॉलनी येथे महापालिकेच्या जागेवर दोन वर्षांपूर्वी म्हाडाची वसाहत उभारण्यात आली. तेव्हापासुन शहरातील विविध गुन्ह्यातील आरोपी या कॉलनीतच पोलिसांना मिळाले आहेत. गेल्या आठवड्यातही जालना येथुन गुजरातमध्ये सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाला नाशिकरोडच्या उड्डाणपुलावर अडवून चाकुहल्ला करीत रोख रक्कम व मोबाइल फोन लुटणारे तीन आरोपी अश्विनी कॉलनीतच पोलिसांना सापडले होते. अश्विनी कॉलनी परिसर आता गुन्हेगारांचे आश्रयस्थान म्हणून नावारुपास येत असल्याचे या घटनांमधून स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'समोपचाराने वाट मिटवावेत'

$
0
0

मनमाड : महा लोकअदालतचा लाभ घेऊन पक्षकारांनी आपले वाद समोपचाराने मिटवून आपला वेळ व पैसा दोन्ही वाचवावा तसेच भविष्यात वादाची प्रकरणे उद्भवणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन मनमाड न्यायालयाच्या न्यायाधीश स्वाती फुलबांधे यांनी मनमाड येथे केले.

मनमाड न्यायालयात शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या महा लोकअदालतचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी महा लोकअदालत संदर्भात उच्च न्यायालयाची व्यापक भूमिका व न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता याबाबत विचार मांडले पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट मुख्याधिकारी डॉ दिलीप मेनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महा लोकअदालतचा शुभारंभ झाला वकील संघाचे अध्यक्ष अँड सुधाकर मोरे यांनी प्रास्ताविक केले. या अदालतमध्ये दिवाणी

फौजदारी दाखल पूर्व असे ११६ प्रकरण निकालात काढण्यात आले. लोकअदालतीचे अॅड. राजेंद्र पालवे, अॅड. बी. एस. निकम, अॅड. बापट यांच्यासह वकील संघ सदस्यांनी यशस्वी संयोजन केले. प्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सुभाष डमरे, अॅड. आनंदराव पाटील, अॅड. माळवतकर, अॅड. मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. अॅड. किशोर चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले.

चांदवडला करवसुलीत वाढ

मनमाड : चांदवड येथे झालेल्या लोक अदालतीत चांदवड नगरपरिषद प्रशासन आणि कर थकबाकीदारात समझोता झाला. त्यात गावातील थकबाकीदारांनी राहिलेली पाणीपट्टी व घरपट्टी भरल्याने चांदवड नगर परिषदेची मोठ्या प्रमाणावर कर वसुली झाली आहे. नगरपरिषदेच्या पाणीपट्टी, घरपट्टीची जास्त थकबाकी होती. याबाबत थकबाकीदारांना नोटीस दिल्या होत्या. यावेळी न्यायाधीश चौधरी, नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, मुख्याधिकारी मर्ढेकर, कर अधीक्षक भास्कर ताडगे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिम-आधारकार्ड लिंकसाठी गर्दी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिम आणि आधार एकमेकांशी फेब्रुवारी २०१८ पर्यंत जोडलं न गेल्यास, त्याचं व्हेरिफिकेशन न झाल्यास सिम कार्ड बंद होणार असल्याची सक्त ताकीद केंद्र सरकारने मोबाइल कंपन्यांना दिली आहे. यामुळे नाशिकच्या मोबाइलच्या कंपन्याच्या मोठ्या शोरुमध्ये ग्राहकांची गर्दी वाढली आहे. या गर्दीमुळे या कंपन्यांनी जीओसारखी काही स्किम तर दिली नाही ना असाही प्रश्न काही ग्राहकांना पडला आहे.

आपल्या मोबाइलचं सिमकार्ड तुम्ही आधारकार्डशी लिंक केलंत का? असे मेसेज कंपनीकडून येऊ लागल्यामुळे गेल्या काही दिवसांत ही गर्दी सर्वत्र वाढली आहे. लोकनीती फाउंडेशनने केलेल्या याचिकेवर फेब्रुवारी महिन्यात सुनावणी झाली होती. त्यावेळी माजी सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने केंद्र सरकारला ठोस उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर केंद्रानेही मोबाइल कंपन्यांना सक्त ताकीद दिली आहे. त्यामुळे देशातील १०० कोटींहून अधिक मोबाइल ग्राहकांची ओळख पडताळून पाहण्यासाठी सिमकार्ड आधारकार्डशी जोडणं बंधनकारक करण्यात आलं आहे. वर्षभरात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारतर्फे देण्यात आली. फेब्रुवारी २०१८ पर्यंत जे सिम-आधार लिंक करणार नाहीत, ते नंबर बंद केले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साग, खैराच्या तीन तस्करांना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

सुरगाणा वनक्षेत्रात साग व खैराची झाडे तोडून गुजरातमध्ये तस्करी करणाऱ्या तिघांना सुरगाणा वन अधिकाऱ्यांनी अटक केली. या प्रकरणात खैराचे ६७ नग आणि ट्रक असा साडेपाच लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. संशयितांनी गाडीच्या नंबर प्लेट बदलली होती. गणेश मोतीराम वाघमारे (२९, रा. खुंटविहिर ता. सुरगाणा) तसेच प्रवीणभाई किकुभाई पटेल (५२, रा. वापी, गुजरात) आणि संताभाई दाजीभाई काळात (४१, रा. अरनाई, गुजरात) अशी तिघांची नावे आहेत.

न्यायालयाने त्यांना वनकोठडी दिल्यानंतर नाशिकरोड कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. ही कारवाई सहाय्यक वनसंरक्षक सुजित नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली वनाधिकारी वाय. पी. सातपुते, व्ही. बी. पाटील, के. एस. गायकवाड, ए. जी. शेख, पी. एम. पवार, एस. ए. भोये, एन. ए. हिरे, नामदेव ठाकरे आदींनी केली.

सुरगाणा वनक्षेत्रातील वनकर्मचारी गस्त घालत असताना आंबाठा परिमंडळातील सराईत फरार गुन्हेगार वाघमारेला इशर पायरी (उंबरपाडा) येथे अटक केली. गेल्यावर्षी त्याला साग तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली होती. गुजरातच्या संशयितांना अटक करण्यासाठी उंबरठाण वनक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी वापी येथे दोन दिवस घरावर पाळत ठेवून प्रवीणभाईला अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाल शहिदांना नंदुरबारला नमन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या नंदुरबारच्या बाल शहिदांच्या बलिदानाला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे बाल शहीदांना नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा पोलिस प्रशासनाने शासकीय मानवंदनासह रविवारी (दि. १०) सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली. याप्रसंगी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते.

शहरातील शिरीषकुमार मित्र मंडळातर्फेही शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सुहास जानवे, महादू हिरणवाळे, डॉ. गणेश ढोले, योगेश्वर जळगावकर, कैलास गवळी, प्रकाश घुगरे आदी उपस्थित होते.

स्मृतींना उजाळा

महात्मा गांधींनी स्वातंत्र्य चळवळीत इंग्रजांना 'चले जाव'चा नारा दिल्यानंतर १ महिन्यानंतर शहरातील शाळकरी विद्यार्थ्यांनी इंग्रजांच्या विरोधात मोर्चा काढला होता. ही घटना ९ सप्टेंबर १९४२ मध्ये घडली होती. या मोर्चात इंग्रजांनी लाठीमारांसह केलेल्या गोळीबारात नंदुरबारचा बाल क्रांतीकारक शिरीषकुमार मेहता यांच्यासह ४ जण शहीद झाले होते. त्यांच्या बलिदानाच्या स्मृतींना यावेळी उजाळा देण्यात आला. जिल्हा पोलिस दलाच्यावतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी या घटनेचा जिवंत देखावा सादर केला. हा कार्यक्रम शहीद स्मृती प्रतिष्ठानाने आयोजित केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याची धाव रोखण्यासाठी...

$
0
0

गेल्या काही दिवसांपासून गोदावरीच्या डाव्या कालव्यालगत बिबट्याचा वावर आढळून येत आहे. दबा धरून असलेल्या या बिबट्याने परिसरात भीतीचे वातवरण निर्माण केले आहे. बिबट्या मानवी वस्ती किंवा शहरात शिरल्याच्या घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. किंबहुना त्या वाढतच आहेत. त्यामुळेच बिबट्याची मानवी वस्तीकडील धाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेसह नागरिकांनीदेखील पुरेशी सजगता दाखविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी विविध उपाययोजना केलेल्या असल्या, तरी पुरेशी दक्षता घेणेदेखील अनिवार्य बनले आहे.

--

अनोख्या फिल्मद्वारे प्रबोधन

बिबट्या मानवी वस्तीकडे येणे, शेतात लपून बसणे, गावातील शेळ्या, तसेच मेंढ्याची शिकार करणे, लहान मुलांना उचलून नेणे, धुमाकूळ घालणे असे अनेक प्रकार अलीकडे सातत्याने होत आहेत. जंगलांचा परिसर विरळ होणे, तसेच बिबट्यांचा अधिवास नष्ट होणे यांसारख्या प्रकारांमुळे बिबट्यांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. यामुळेच बिबटे सैरभैर होताना दिसतात. याचा फटका मानवी वसाहतींना बसत आहे. ही बाब ओळखून ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यासाठी वन विभागाने अनोखी मोहीम सुरू केली आहे. बिबट्यांच्या अभ्यासक विद्या अत्रेय यांनी तयार केलेली फिल्म शाळांमध्ये, तसेच ग्रामसभेत दाखविण्यात येत आहे. ही फिल्म पुढील काळात शाळांसह विविध गावांच्या ग्रामपंचायतींमध्ये, ग्रामसभांमध्ये, चावडीवर, तसेच अनेक शेतकऱ्यांच्या गटांना दाखविण्यात येणार आहे. त्यासाठी वन विभागाने या फिल्मची उपलब्धता तालुका स्तरावर केली आहे. टीव्ही, एलसीडी प्रोजेक्टर, लॅपटॉप याद्वारे ही फिल्म दाखविण्यात येत असून, त्याला चांगला प्रतिसादही लाभत आहे. बिबट्यांचा वावर असलेल्या आणि बिबट्या-मानव संघर्ष निर्माण होणाऱ्या भागात जनजागृतीची ही मोहीम राबविली जात आहे.

--

रेस्क्यू टीमची स्थापना

वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी लेपर्ड रेस्क्यू टीम स्थापन करण्यात आलेली आहे. त्यात पाच जणांचा समावेश आहे. नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, मालेगाव, संगमनेर आणि अहमदनगर अशा पाच विभागांसाठी प्रत्येकी एक टीम देण्यात आली आहे. म्हणजेच पाच टीममध्ये एकूण २५ जणांचा समावेश आहे. या टीमला विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. खासकरून बिबट्याच्या सवयी, त्याचा संचार आदींबाबत माहिती देण्यात आली आहे. बिबट्याला कसे पकडावे, गर्दीवर नियंत्रण कसे मिळवावे, याचे प्रशिक्षण या टीमच्या सदस्यांना मिळाले आहे. एक टीम लीडर आणि चार सदस्य अशा या टीममुळे त्या-त्या विभागातील बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पाचारण करण्यात येते.

--

रेस्क्यू व्हॅनची सज्जता

रेस्क्यू टीमसाठी अत्यंत सुसज्ज अशी एक रेस्क्यू व्हॅन उपलब्ध असते. सर्चलाइट, पिंजरा ठेवण्यासाठी प्रशस्त जागा, आवश्यक औषधे, अनाउन्सिंगसाठीची यंत्रणा अशी सुसज्ज अॅनिमल रेस्क्यू व्हॅन आहे. या व्हॅनमुळे एखादा कॉल आल्यानंतर त्या ठिकाणी तातडीने पोहोचता येते. या रेस्क्यू व्हॅनमध्ये एखाद्या घटनेप्रसंगी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यात संपूर्ण पिंजरा सामावू शकेल एवढी जागा आहे, तसेच वन विभागाच्या रेस्क्यू टीमला बसण्यासाठीही व्यवस्था आहे. रात्रीच्या वेळी शोधमोहीम सुकर होण्याच्या दृष्टीने गाडीच्या बॅटरीवरच चालू शकेल असा सर्चलाइट देण्यात आला आहे. या व्हॅनमुळे रेस्क्यू टीमची कार्यक्षमता अधिक वाढणार असून. वन्य प्राण्यांच्या दृष्टीने ही व्हॅन उपयुक्त आहे.

--

रेस्क्यू साहित्याची उपलब्धता

प्रत्येक रेस्क्यू टीमला आधुनिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यात अत्याधुनिक पिंजरा, टॉर्च, मेगाफोन, फ्लुरोसेण्ट जॅकेट, हेल्मेट, सर्चलाइट, दोर, जाळी, स्ट्रेचर, बॅफल बोर्ड, फायबर स्टिक, ट्रँक्विलायझर गन आदींचा समावेश आहे.

--

आधुनिक पिंजऱ्याची निर्मिती

पूर्वीचे पिंजरे हे लोखंडी गजांचे होते. जेरबंद झाल्यामुळे संतप्त झालेला बिबट्या या गजांना धडक द्यायचा. त्यामुळे तो जखमी व्हायचा. बहुतांशवेळा रक्तही यायचे. त्यामुळे आता आधुनिक पिंजरा बनविण्यात आला आहे. त्यात बिबट्या जखमी होऊ नये याची विशेष काळजी घेतली गेली आहे. ट्रँक्विलायझर गनमुळे बिबट्याला त्वरित पकडणे शक्य होते. कारण, या गनमुळे साधारण एक किलोमीटर अंतरावरून बिबट्याला बेशुद्ध करता येणे शक्य आहे. प्रत्येक टीमला एक गन देण्यात आलेली आहे.

--

अधिवासात सोडणे हाच पर्याय

बिबटे दिवसा न फिरता रात्रीच्या सुमारास फिरतात. आपल्या घराजवळ राहून बिबटे आपल्या पिलांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्यांना काही इजा होत असेल किंवा त्यांच्या अधिवासात हस्तक्षेप होत असेल, तर बिबट्या स्वसंरक्षणासाठी हल्ला करतो. त्यामुळे बिबट्या अत्यंत क्रूर असून, तो मानवावर सतत हल्ला करतो असे म्हणणे चुकीचे आहे. बिबट्याला पकडून दूर कुठेतरी सोडणे अत्यंत चुकीचे आहे. त्याला कितीही दूरवर सोडले, तरी तो पुन्हा आपल्या घराकडे, अधिवासाकडे येतो हे अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे बिबट्याला शक्यतो त्यांच्या अधिवासातच सोडायला हवे.

--

गणनेबाबत संभ्रमाची स्थिती

राज्यात किती बिबटे आहेत याची कुठलीही माहिती या घडीला वन विभागच काय, पण राज्य सरकारकडेही नाही. खरं तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. राज्यात बिबट्यांची गणना न झाल्यामुळेच ही अनभिज्ञता आहे. पण, १०० स्क्वेअर किलोमीटरमध्ये पाच बिबटे आणि पाच तरस राहत असल्याचे एका संशोधनातून सांगितले जाते. १८८३ चे नाशिकचे गॅझेटिअर पाहिल्यावर लक्षात येते, की त्यावेळीही बिबट्यांची संख्या नाशिकमध्ये मोठी होती. तसेच, गावपरिसरात ये-जा करणाऱ्या बिबट्यांची संख्या पूर्वीपासूनच आहे. गणना करून काही उपयोग होणार नाही. संख्या कळाली, तरी त्यावर फार काही होऊ शकत नाही. पण, कुठल्या परिसरात बिबटे आहेत, याची माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी ही गणना महत्त्वाची आहे.

--

असमन्वय आणि विभागांमधील विसंवाद

बिबट्या हा पूर्वीपासूनच मानवी वस्तीच्या परिसरातच राहत आहे. त्याला असुरक्षित वाटल्यास किंवा स्वसंरक्षणासाठी तो हल्ला करतो. त्यामुळे बिबट्या मानवी वस्तीत आला, तर त्याला बंदिस्त कसे करता येईल, याचा विचार केला पाहिजे. गोंधळ, गर्दी किंवा त्याच्यावर हल्ला करून फायदा नाही. एखाद्या खोलीत किंवा घरात बिबट्या बंदिस्त करता आला, तर त्याला पकडणे शक्य होते. बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडते. अशा प्रसंगी नागरिकांनी वन विभागाला सहकार्य करणे गरजेचे आहे. वन विभाग आणि नागरिकांमध्येही संवाद असणे आवश्यक आहे. तो फारच अल्प आहे, ही तशी चिंतेचीच बाब आहे. बिबट्या आल्याची माहिती देण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन केला, तर हे आमच्या हद्दीत नाही तुम्ही त्या तालुक्याच्या अधिकाऱ्यांना फोन करा, असे सांगणारे बहाद्दरही वन विभागात आहेत. या समस्येप्रश्नी ‘जगा आणि जगू द्या’ या नैसर्गिक सूत्राचा अवलंब करण्याची आवश्यकता आहे. परदेशात वन्यप्राणी मानवी वस्तीत आले की त्यांना मारले जाते. आपल्याकडे मात्र पूर्वीपासून अनेक प्राण्यांना देवाचा दर्जा दिलेला आहे. गाव स्वच्छ ठेवले, की बिबट्याचे गावात येण्याचे प्रमाण कमी होईल. वन विभागाच्या आर्थिक मदतीने शेतकऱ्यांनी प्राण्यांसाठीचे निवारा शेड उभारले पाहिजे. बिबट्याविषयी भीती असण्याची काहीच गरज नाही. तो आपल्यातीलच एक आहे. बिबट्या मानवी वस्तीत किंवा शहरात येतो, तेव्हा अापत्तिसदृश परिस्थिती निर्माण होते. बिबट्या आल्याचे कळाले, तरी त्याला प्रत्यक्ष पकडण्यात आणि सर्व कारवाई होण्यात चार ते पाच तासांचा वेळ जातो. वन विभाग, अग्निशमन विभाग, पोलिस कर्मचारी असे तीन विभागांचे कर्मचारी घटनास्थळी असले, तरी कुणी पुढाकार घ्यायचा आणि परिस्थिती हाताळायची याबाबत मोठ्या प्रमाणात संभ्रम राहतो. त्यामुळे बिबट्याला पकडण्यात विलंब होतो. मात्र, याचवेळी काही दुर्घटना घडण्याचीही शक्यता असते. त्यामुळे या तिन्ही विभागांतील अधिकाऱ्यांमधील विसंवाद दूर होणे गरजेचे आहे.

--

पुरेशी स्वच्छता राखणे गरजेचे

वास्तविक बिबट्या हा अत्यंत लाजाळू आणि घाबरट प्राणी मानला जातो आहे. जिल्ह्यातील दाट असलेले वनक्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यातच प्रत्येक बिबट्याला त्याचा स्वतंत्र अधिवास आवश्यक असतो. हा अधिवास मिळत नसल्यानेच बिबट्या मानवी वस्तीकडे येतो. त्यातच गावपरिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असते. या अस्वच्छतेवरच कुत्रे, मांजरी, डुकरे आदी प्राणी आपली गुजराण करीत असतात. परिणामी गावाकडे आलेल्या बिबट्याला कुत्रे आणि डुकरांसारखे प्राणी भक्ष्य म्हणून मिळतात. त्यामुळे बिबट्यांचे गावाकडे येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ज्या पद्धतीने शेतकरी आपले शेत अत्यंत स्वच्छ आणि हिरवेगार ठेवतात, तसाच गावाचा परिसरही स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. असे झाल्यास बिबट्यांचा त्रास नक्की कमी होऊ शकेल. त्यासाठी ग्रामस्थांमध्ये प्रबोधन करण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यायला हवा.

--

जिल्ह्यातील वनक्षेत्र

एका सरकारी आकडेवारीनुसार जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र १५ हजार ५३० चौरस किलोमीटर आहे. त्यात वनांचा वाटा ३ हजार ४३० चौरस किलोमीटर म्हणजेच ३ लाख २० हजार ६६८ हेक्टर आहे. भौगोलिकदृष्ट्या ही टक्केवारी २०.५ टक्के आहे. वन विभागाच्या अखत्यारीत ३ हजार १९२ चौरस किलोमीटर क्षेत्र, तर महसूल विभागाच्या अखत्यारित ४५ चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. ३२ चौरस किलोमीटर खासगी वनक्षेत्र आहे. वन विकास महामंडळाचे क्षेत्र १६१ चौरस किलोमीटर आहे. जिल्ह्यात केवळ नांदूरमध्यमेश्वर हे संरक्षित क्षेत्र आहे. प्रामुख्याने सुरगाणा, पेठ, कळवण, दिंडोरी, नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये वनांचे क्षेत्र जास्त आहे. साग, शिसव, बांबू यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

--

नाशिकचे वनक्षेत्र

--

वनपरिक्षेत्रांची संख्या- २०

परिमंडळांची संख्या- ७९

नियत क्षेत्रांची संख्या- २७८

साधारण क्षेत्रे- १५७

संवेदनशील क्षेत्रे- ६०

अतिसंवेदनशील क्षेत्रे- ६१

एकूण वनक्षेत्र- ३,१०,०५९ हेक्टर

--

पूर्व नाशिक

वनपरिक्षेत्रांची संख्या- ९ (सुरगाणा, उंबरठाण, कनाशी, कळवण, देवळा, चांदवड, नांदगाव, येवला, दिंडोरी)

परिमंडळांची संख्या- ३०

नियत क्षेत्रांची संख्या- ११५

साधारण क्षेत्रे- ४९

संवेदनशील क्षेत्रे- २७

अतिसंवेदनशील क्षेत्रे- ३९

एकूण वनक्षेत्र- १,३५,६०१ हेक्टर

--

पश्चिम नाशिक

वनपरिक्षेत्रांची संख्या- ८ (हरसूल, पेठ, बाऱ्हे, ननाशी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक)

परिमंडळांची संख्या- ३६

नियत क्षेत्रांची संख्या- १२६

साधारण क्षेत्रे- ८७

संवेदनशील क्षेत्रे- १९

अतिसंवेदनशील क्षेत्रे २०

एकूण वनक्षेत्र- ८९,७२३ हेक्टर

--

मालेगाव उपविभाग

वनपरिक्षेत्रांची संख्या- ३ (मालेगाव, सटाणा, ताहाराबाद)

परिमंडळांची संख्या- १३

नियत क्षेत्रांची संख्या- ३७

साधारण क्षेत्रे- २१

संवेदनशील क्षेत्रे- १४

अतिसंवेदनशील क्षेत्रे- २

एकूण वनक्षेत्र- ८४,७३३ हेक्टर

--

हॅलो फॉरेस्ट...

वन विभागाची हॅलो फॉरेस्ट ही हेल्पलाइन आहे. १९२६ हा वन हेल्पलाइनचा टोल फ्री क्रमांक आहे. २४ तास सेवा असलेल्या या हेल्पलाइनचा नियंत्रण कक्ष मुंबईत आहे. या हेल्पलाइनच्या माध्यमातून आलेली माहिती ही उपवनसंरक्षक, मुख्य वनसंरक्षक, प्रधान मुख्य वनसंरक्षक, वनसचिव ते वनमंत्री अशी सर्वांपर्यंत पोहोचते. ज्या वन परिसरातून ही माहिती मिळाली त्या भागातील उपवनसंरक्षक, मुख्य वनसंरक्षकांच्या मोबाइलवर मेसेजद्वारे ती पोहोचावी, या पद्धतीने ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

--

हेल्पलाइनद्वारे अशी देता येईल तक्रार

-० क्रमांक- आपत्कालीन व्यवस्था, शिकार, वृक्षतोड, अतिक्रमण

-१ क्रमांक- ग्रीन महाराष्ट्र, ग्रीन आर्मी, तीन कोटी वृक्ष लागवड

-२ क्रमांक- वन विभागातील इको टुरिझम, जंगल सफारी आदी

-३ क्रमांक- वन विभागात व्यापार, गौण वनउपज, तेंदुपत्ता, सागवान

-४ क्रमांक- जंगलाबाबत माहिती, शेती नुकसान, वन्यप्राण्यांवर हल्ला आदी

-५ क्रमांक- वने, वन्यजीवांबाबत तक्रारी देण्याची सुविधा

--

--

नाशिक वन विभागाचे संपर्क क्रमांक

--

-मुख्य वनसंरक्षक – २५९७८४५, २५९८५४५

ई मेल - ccftnashik@mahaforest.gov.in

-उपवनसंरक्षक, पश्चिम - २५७२७३०

ई मेल - dycfwnsk_nsk@sancharnet.in

-उपवनसंरक्षक, पूर्व - २५७२७७५

ई मेल - dycfensk_nsk@sancharnet.in

-उपवनसंरक्षक, मालेगाव - ०२५५४-२५४७५३

ई मेल - subdfomalegaon@rediffmail.com

--

बिबट्यांचा प्रश्न अस्वच्छतेमुळेही वाढतो आहे. अस्वच्छतेवरच कुत्री आणि भटकी जनावरे जगतात. यांनाच बिबट्या लक्ष्य करतो. त्यामुळे बिबट्यांचा प्रश्न सोडवायचा असेल, तर स्वच्छतेला प्राधान्य द्यायला हवे.

-विद्या अत्रेय, बिबट्यांच्या अभ्यासक

--

बिबट्या आढळला, तर तातडीने वन विभागाला कळविणे आवश्यक आहे. विभागाकडे सुसज्ज अशी रेस्क्यू टीम आहे. नागरिकांनी घाबरण्याचे कुठलेही कारण नाही. आजवर आपण असंख्य बिबटे जिल्ह्यात पकडले आहेत.

-सुनील वाडेकर, रेस्क्यू टीम सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत अंत्यसंस्कार योजना मृत्युशय्येवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महापालिकेच्या गैरकारभाराने शहरातील स्मशानभूमींमध्ये सुरू असलेली मोफत अंत्यसंस्कार योजना मृत्युशय्येवर असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. ही योजना चालविणाऱ्यांना वेळेत बिले न मिळणे, रॉकेलची टंचाई, लाकडांसाठी शेड नसणे आदी समस्या भेडसावत आहेत. महापालिकेने ही लोकसेवा चालविली की बाजार मांडला आहे, असा संतप्त सवाल संबंधितांकडून उपस्थित केला जात आहे.

मोफत अंत्यसंस्कारासाठी प्रतिव्यक्तीमागे १८२४ रुपये तोटा सहन करावा लागत असल्याचा दावा करून आपल्या मागण्यांबाबत शहरातील ठेकेदारांनी महापालिकेला निवेदनही दिले आहे. महापालिकेने फेब्रुवारी २००३ मध्ये मोफत अंत्यसंस्कार योजना सुरू केली. त्याअंतर्गत अंत्यसंस्कार, दफनविधीसाठी सर्व साहित्य नागरिकांना मोफत दिले जाते. या कामासाठी महापालिका ठेका देऊन मोकळी होते.

--

दरवाढ ठरूनही कृती नाही

शहर व उपनगरांत ३० स्मशानभूमी आहेत. सुविधांअभावी फक्त अकराच कार्यरत आहेत. नाशिकरोडला फक्त दसक-पंचक आणि देवळालीगाव स्मशानभूमीत ठेकेदार आहे. शहरात दरमहा सरासरी ५० व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले जातात. बाजारभावाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीमागे खर्च येतो ३१०० रुपये आणि महापालिका देते १७४१ रुपये, असे ठेकेदारांचे म्हणणे आहे. ठेका देताना प्रत्येक वर्षी दहा टक्के दरवाढ देण्याचे, तसेच तीन वर्षांनी दरवाढीचे ठरूनही कृती झालेली नाही. ही लोकसेवा आहे, त्यामुळे दरवाढीचा आग्रह धरू नका, असे महापालिका सांगते. तोटाच होत असल्याने काही ठेकेदारांनी ठेका सोडून दिला आहे. उर्वरित ठेकेदार पुढील ठेक्यात तोटा भरून निघेल या आशेवर कायम आहेत.

--

पुरेशा सुविधांचा अभाव

स्मशानभूमीत पूर्णवेळ कामगार ठेवा, त्यांना फंड, पेन्शन द्या, असा महापालिकेचा आग्रह आहे. मात्र, मृत्यूदर कमी असल्याने त्याला रोज काम नसते. इमर्जन्सी सेवा असल्याने त्याला साप्ताहिक सुटीही नसते. राहण्यासाठी निवारा नाही. अंत्यसंस्कारासाठी तीन लिटर रॉकेल व ८ ते १४ मण लाकूड लागते. सध्या ७० रुपयाने ब्लॅकने रॉकेल घ्यावे लागते. त्यामुळे डिझेल वापरावे लागत आहे. जेलरोड व अन्य स्मशानभूमींत लाकडांसाठी शेडच नाही. ओल्या लाकडांना जास्त रॉकेल लागते. काही स्मशानभूमींत नळही नाहीत. दफनभूमीत लाइट नसतात. गवत, झुडपे वाढल्याने धोका पत्करून खोदकाम करावे लागते, अशी व्यथाही त्यांनी मांडली.

--

या आहेत मागण्या

मोफत अंत्यसंस्कारांसाठी दर वर्षी दहा टक्के वाढ मिळावी, ठेक्यासाठी किमान तीन वर्षांच्या अनुभवाची अट करावी, जीएसटीप्रमाणे तरतूद करावी, अंत्यविधीवेळी अर्पण होणारे नारळ, कापड, बांबू आदी साहित्य घेण्याचा अधिकार ठेकेदारांना मिळावा, लाकडांसाठी शेड मंजूर करावे, ठेकेदाराच्या साहित्याचा विमा उतरवावा, अंत्यविधीचे साहित्य टाकण्यासाठी कचराकुंडी मिळावी, रक्षा विसर्जनासाठी दर वर्षी बादल्या मिळाव्यात अादी मागण्या संबंधितांकडून महापालिका प्रशासनाकडे करण्यात येत आहेत.

---

ठेका बंद करण्याचा सल्ला!

बहुतांश नगरसेवक आमच्या समस्या सोडविण्यास मदत करतात, असे नमूद करून ठेकेदारांनी सांगितले, की अनेक महिने बिले पास होत नाहीत. त्यामुळे महापालिकेत विविध टेबल्स सांभाळावी लागतात. जास्त बोलले तर ठेका बंद करण्याचा सल्ला भाऊसाहेब देतात. लोकसेवेच्या नावाखाली तोटाही सहन करा, सहकार्यही करा आणि तोंड दाबून बुक्क्यांचा मारही सहन करा, अशी आमची अवस्था झाल्याचे ठेकेदारांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काकस्पर्शासाठी तास न् तास वेटिंग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

देशभरातून येणाऱ्या भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून रामकुंडाची ओळख आहे. पितृपक्षात भाविक दूरवरून रामकुंडावर पितरांना नैवेद्य देण्यासाठी येत असतात. त्यामुळे सध्या रामकुंडावर सकाळपासून काकस्पर्शाच्या प्रतीक्षेत शेकडो भाविक थांबलेले असतात. ज्यांच्या नैवेद्याला काकस्पर्श होतो, ते आनंदाने निघतात. बाकीचे मात्र, तास न् तास प्रतीक्षेत थांबून राहतात.

रामकुंडावरील गंगा-गोदावरी मंदिराच्या वरच्या बाजूला वृक्षवल्लीच्या सान्निध्यात काकस्पर्शासाठी घास ठेवण्यात येतो. पितृपक्षाच्या वेळी ही जागा अपुरी पडत आहे. कित्येक भाविकांना आपण ठेवलेला नैवेद्य कोणता हा प्रश्न पडतो. त्यामुळे एकदा घास ठेवला की त्यावर त्या भाविकांची नजर खिळून राहते. कावळा त्या भागात आल्यानंतर तर या नजरा आणखी रोखल्या जातात. रामकुंडाप्रमाणेच पंचवटी अमरधाम शेजारच्या उद्यानाच्या भिंतीवरही नैवेद्य ठेवण्यात येतो. येथेही भाविक काकस्पर्शाच्या प्रतीक्षेत थांबलेले असतात. अनेकजण घराच्या छतावरही नैवेद्य ठेवतात. मात्र, कावळेही इतके हट्टी, की तास न् तास दृष्टीसही पडत नाहीत.

वृक्षतोडीमुळे घटले कावळे

नाशिक शहरात वाढती वृक्षतोड अन् काँक्रिटीकरणामुळे पक्षीजीवनावर मोठा परिणाम झाला आहे.कावळ्यांची संख्याही दिवसेंदिवस घटत आहे. याचा दुष्परिणाम म्हणून पितृपक्षात महत्त्व असलेल्या कावळ्यांना साधा घास टाकणेही कठीण झाले आहे. शहरात कावळे दिसणे दुर्मिळ झाल्याने नागरिक गर्द झाडी असलेल्या तपोवन पंचवटी लिंक रोडवरील स्मशानभूमीच्या परिसरात कावळ्यांना घास टाकण्यासाठी गर्दी करीत आहेत.

भुकेल्यामुखी जावा घास

आपले पूर्वज कावळ्याच्या रुपाने येऊन घास घेतील, या भावनेने आपण नैवेद्य म्हणून हे काम गेल्या कित्येक वर्षांपासून करत आलो आहोत. मात्र, पितरांच्या स्मरणार्थ एखाद्या अनाथालयात किंवा गरीबांना जेऊ घातले तर पूर्वजही प्रसन्न होतील. अनेकजण असा नवीन विचार रुजवितानाही दिसत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक राष्ट्रउभारणी करतात

$
0
0

सभापती प्रतिभा सूर्यवंशी यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शिक्षक हा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधत राष्ट्रासाठी सक्षम नागरिक घडविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पडतो. अशा गुणवंत कर्तृत्वाचा गौरव रोटरी करते हे प्रेरक असल्याचे प्रतिपादन सभापती प्रतिभा सूर्यवंशी यांनी केले.

येथील रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊनतर्फे आयोजित राष्ट्र शिल्प शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रतिभा सूर्यवंशी बोलत होत्या. यावेळी उपसभापती अनिल तेजा, उपप्रांतपाल अॅड. सुभाष डमरे, राजेंद्र अहिरे, प्रेसिडेंट प्रमोद देवरे व सेक्रेटरी राजेंद्र दिघे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रोजेक्ट चेअरमन रवींद्र जटिया यांनी प्रास्ताविक करून रोटरीच्या उपक्रमांची माहिती दिली. कुंदन चव्हाण व प्रवीण वाणी यांनी सूत्रसंचालन केले तर आभार डॉ. मनोज भामरे यांनी मानले. यावेळी गटशिक्षणाधिकारी शोभा पारधी, लकी गिल, डॉ. टी. पी. देवरे, सुरेश मुसळे, रवींद्र देशमुख, दीपक शेलार, विलास सोनजे, संदीप पवार, रवीश मारू आदींसह मोठ्या प्रमाणात शिक्षक उपस्थित होते.

या कार्यक्रमात सतीश कलंत्री, अॅड. सुभाष डमरे, राजेंद्र अहिरे, प्रमोद देवरे यांनीही मनोगत व्यक्त केले. शिक्षक दिनाच्या निमित्ताने मालेगाव शहर व तालुक्यातील बारा शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्ड या प्रोजेक्टअंतर्गत आशा सोनवणे, घनश्याम अहिरे, प्रवीण शिंदे, सुनील देशमुख, स्मिता पाटील, प्रा. ज्ञानेश्वर सोनवणे, भरत पाटील, शरद ठाकुर, राजेंद्र देवरे, सचिन लिंगायत, उदय पाटील, लता सूर्यवंशी या बारा शिक्षकांना सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेत कामकाजास गती

$
0
0

कर्जमाफीमुळे १५ सप्टेंबरपर्यंत सर्व सुट्या रद्द

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेतकरी कर्जमाफीसाठी विविध कार्यकारी सोसायटींकडून माहिती घेऊन ती कॉम्प्युटरमध्ये फिड करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्याने रविवारीसुध्दा बँक सुरू होती. याअगोदर सेकंड सॅटर्डेची सुट्टी रद्द केली असून, कोणतीही रजा न देण्याचा निर्णय बँक प्रशासकाने घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांची अडचण झाली आहे. १५ सप्टेंबरपर्यंत ही माहिती पूर्णतः फिड करावी लागणार आहे.

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन फॉर्म भरण्याची मुदतही १५ सप्टेंबरपर्यंत देण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे त्यांची गर्दी सर्वत्र दिसत असताना जिल्हा बँकेतही वेगाने काम सुरू आहे. जिल्ह्यात ९०० कोटींच्या आसपास कर्जमाफी होणार असून, जिल्हा बँकेचे सर्व आकडे फिड झाल्यानंतर खरा आकडा समोर येणार आहे. राज्य शासनाने या बँकांना १५ तारखेची मुदत दिली आहे. त्यानंतर हे आकडे व ऑनलाइन फॉर्मचे आकडे टॅली करून १ ऑक्टोबरपासून कर्जवाटप प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरून देण्याची घोषणा केल्यानंतर जिल्ह्यातील १४५० महाऑनलाइन सेंटरमधून अवघ्या ७५२ शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या दहा दिवसांत अर्ज भरले होते. पण, नंतर हा आकडा एक लाखाहून अधिक झाला. कर्जमाफीचा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत असल्याच्या तक्रारीसुध्दा होत्या. शासनाने त्यात दुरुस्ती केल्यानंतर या फॉर्मची संख्याही वाढली. राज्य शासनाने विविध सरकारी कार्यालयातून यासाठी अर्जवाटप केले होते.

राष्ट्रीय बँकांचा डाटा तयार

शेतकऱ्याचे ८० टक्क्यांहून अधिक कर्ज हे जिल्हा मध्यवर्ती बँकेतून घेतले आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेत कर्ज घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. तरीपण या बँकेने आपला सर्व डाटा तयार केला आहे. तो शासनाला ते देणार आहेत.

माहिती फिड करण्यास सुरुवात

नाशिक जिल्ह्यात दीड लाखाहून अधिक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार असून, त्यांचे ९०० कोटींच्या आसपास कर्जमाफ होणार आहे. जिल्ह्यातील १०४५ विविध कार्यकारी सोसायटींमार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जवाटप केले आहे. पण या सोसायटीचे गटसचिवच कर्जमाफीनंतर संपावर गेल्यामुळे अनेक अडचणी आल्या होत्या. त्‍यांचा संप मिटला असून, त्यांनी जिल्हा बँकांना माहिती दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २१२ जिल्हा बँकेच्या शाखेत सुट्टीला बुट्टी मारून कर्मचारी व अधिकाऱ्यांचे माहिती फिड करण्याचे काम सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलतज्ज्ञ हरिभाऊ जाधव यांना ‘जीवनगौरव’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्ह‌िल इंजिनीअरच्या नाशिक शाखेतर्फे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार नाशिकचे प्रख्यात जलतज्ञ इंजिनीअर हरिभाऊ जाधव यांना जाहीर झाला आहे. अभियंता दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशनचे एमडी विवेक सावंत यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. रावसाहेब थोरात सभागृहात १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

शेतकऱ्यांना पाणी मिळवून देण्यात त्यांनी विशेष काम केल्यामुळे त्यांना ‘पाणीवाले इंजिनीअर’ म्हणून जिल्ह्यात ओळखले जाते. हरिभाऊ जाधव यांनी सात वर्षे जलसंपदा विभागात नोकरी करून राजीनामा दिला. त्यानंतर १९७२ साली महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळात नाशिक, नगर जिल्ह्यातील ५०० पेक्षा जास्त पाझर तलावांचे संकल्पन केले. ही कामे शासनाच्या रोजगार हमी योजनेतून पूर्ण होऊन ग्रामीण भागात सिंचनास त्यामुळे मोठी मदत झाली. नाशिक-नगर-मराठवाड्यातील जवळपास ४० साखर कारखान्यांना सल्लागार अभियंता म्हणून सेवा देऊन ऊस उत्पादन वाढीसाठी ५० मोठ्या लिफ्ट इरिगेशन स्क‌िम्सचे डिझाइन केले. त्यामुळे ५० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले. कोपरगाव येथे गोदावरी नदीवर उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या हिंगणी कोल्हापूर बंधाऱ्याचे डिझाइन केले व इतर १० कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे नियोजन केले. त्यामुळे २ टीएमसी पाणी गोदावरी नदीत साठले. १९८२ मध्ये पैठण तालुक्यातील १६ गावांसाठी जायकवाडी धरणाच्या जलाशयातून ५००० हेक्टर क्षेत्रासाठी पाणी परवानगी मिळवली. अकोला तालुक्यातील पंधरा गावांतील आदिवासी लोकांसाठी भंडारदरा धरणातून लिफ्ट डिझाइन केली.

१९८६ नंतर त्यांनी ‘नार-पार-दमणगंगा’ पाणी प्रश्नासाठी प्रयत्न सुरू केले. महाराष्ट्र-मध्यप्रदेश-गुजरात राज्यांतील सिंचन प्रकल्पांचा अभ्यास केला. वैतरणा धरण पूर्व वाह‌िनी करून मराठवाड्यास न्याय द्यावा, अशी संकल्पना १९८६ साली त्यांनी मांडली होती. ती आज शासनाने स्वीकारली आहे. ‘दमणगंगा-नार-पार’ खोऱ्यातील पाणी उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्याकडे कसे वळवता येईल, याचा तांत्रिक अभ्यास केला.

या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन एसीसीईचे वेस्ट झोनचे अध्यक्ष विजय सानप, नाशिक शाखेचे अध्यक्ष पुनीत राय, सदस्य अनिल कडभाने, महेंद्र शिरसाठ, नरेंद्र भुसे आदींनी केले आहे.

मुलगाही राजेंद्रही त्याच वाटेवर

त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांचे हे काम जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव हे करीत आहेत. गुजरातकडे जाणारे महाराष्ट्राचे हक्काचे पाणी मिळावे यासाठी त्यांचा लढा चालू आहे. हे पाणी उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात नेणारे नदी जोड प्रकल्प त्यांनी संकल्पित केले आहेत. त्यासाठी त्यांनी ‘नार-पार-दमणगंगेतून जलसमृद्धीकडे’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महालोकअदालतीत ५०९ प्रकरणे निकाली

$
0
0

टीम मटा

जिल्ह्यात मनमाड आणि निफाड, चांदवडला शनिवारी (दि. ९) पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण ५०९ प्रकरणे निकाली काढली. यात निफाडच्या ३९३ तर मनमाडच्या ११६ प्रकरणांचा समावेश आहे. चांदवडलाही नगरपरिषद प्रशासन आणि कर थकबाकीदार यांच्यात समझोता होऊन थकबाकीदारांनी पाणीपट्टी व घरपट्टी वसुली करण्यात आली.


प्रलंबित प्रकरणांचा निपटारा

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये शनिवारी (दि. ९) समजुतीच्या तोडग्याने जवळपास ३९३ प्रकरणे निकाली काढण्यात आले आहेत. हा न्यायव्यस्थेकडून एक दिलासादायक उपक्रम असून, पक्षकारासह, वकील व न्यायाधीश यांच्या सहकार्यातून ही अतिशय सुखद अशी घटना आहे, असा सूर या लोकअदालतीतून समोर आला आहे. यामुळे भरपूर लोकांच्या तक्रारींचे निरसन झाल्याचे समाधानही त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते.

निफाडचे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एस. सी. मगरे, न्या. आर. एस. घाटपांडे, न्या. ए. जी. मोहबे, निफाडचे वरिष्ठ सत्र न्या. आर. आर. हस्तेकर, आर. एम. सातव, एस. बी. काळे, निफाडच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. एस. कोचर, एस. के. दुगावकर आदींच्या उपस्थितीत एकूण आठ समन्वयक समित्यांद्वारे या महालोकादालतीचे कामकाज चालविण्यात आले.

राष्ट्रीय लोकअदालत यशस्वीतेसाठी निफाड सत्र न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक अशोक मोरे, दिवाणी न्यायालय अधीक्षक ए. एन. काशीकर, फौजदारी न्यायालयाचे अधीक्षक एम. आर. कुलकर्णी, वकील व्ही. पी. तासकर, अफरोज शेख, एस. सी. वाघ, एस. बी. दरेकर, वाय. एम. जाधव, एल. एस. वाघ आदींसह निफाड तालुका विधी सेवा समिती आणि निफाड वकील संघाने विशेष प्रयत्न केले.

समन्वयाने पक्षकारांचा वेळ श्रम‌, पैशांची बचत होते. त्यामुळे पक्षकार, वकीलांनी सहभाग घ्यावा.

-एस. जी. मगरे, जिल्हा व सत्र न्यायाधीश, निफाड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपचार नाकारल्याने जखमी पोलिसाची परवड

$
0
0

नाशिक : अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रामाणिक पोलिसावर मोठ्या हॉस्पिटल्सनेच उपचार नाकारल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एका सुसज्ज हॉस्पिटलने तर अॅम्बुलन्स पाठवली आणि नंतर फोन करून सांगितले, की आम्ही उपचार करू शकणार नाही! तर एका हॉस्पिटलने आधी पैसे भरा मग उपचार करू असा पवित्रा घेतला. एकूणच या संपूर्ण घटनाक्रमात एका प्रामाणिक पोलिसाची गंभीर जखमी अवस्थेत परवड झाल्याने संताप व्यक्त होत आहे. पोपट पवार असे या दुर्दैवी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

शहर वाहतूक शाखेतील प्रामाणिक व मनमिळावू कर्मचारी म्हणून पोपट पवार यांची ओळख आहे. आर्थिक स्थिती बेताचीच. दोन दिवसांपूर्वी पवारांची साप्ताहिक सुटी होती. दुचाकीवर घराबाहेर पडलेल्या पवारांचा बिटको परिसरात अपघात झाला. अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार बसला. त्याच वेळी तेथून जाणाऱ्या पोलिसांनी त्यांना व्हॅनमधून नजीकच्या जयराम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वरिष्ठांना ही माहिती समजली. त्यांनी पोलिस दलाशी टायअप असलेल्या सुसज्ज हॉस्पिटलशी उपचारासाठी संवाद साधला. या हॉस्पिटलने तातडीने रुग्णवाहिका पाठवली. पवार यांना जयराम हॉस्पिटलमधून संबंधित हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. मात्र, या हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी ऐनवेळी उपचार करण्यास नकार दिला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी समजावून सांगितल्यानंतरही हॉस्पिटल प्रशासनाने नकार दिला. पोलिस योजनेऐवजी रोख पैसे घेऊन उपचार करा, अशीही विनंती या हॉस्पिटल प्रशासनाकडे करण्यात आली. तरीही डॉक्टरांची नकारघंटा कायम होती. अखेर हतबल पोलिसांनी जखमी अवस्थेतील निपचित पडलेल्या पवार यांना घेऊन शहरातील दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आणले. येथेही पवारांची परवड थांबली नाही. एकेक हॉस्पिटल उपचार नाकारत होते. काही ठिकाणी अवाजवी पैशांची मागणी करण्यात आली, तर काही ठिकाणी जागा शिल्लक नसल्याचे कारण देण्यात आले. अखेर पंचवटीतील एका हॉस्पिटलमध्ये पवारांना प्रवेश मिळाला. मात्र, तोपर्यंत ‘गोल्डन हवर्स’ निघून गेला होता. आता पवारांची जीवन-मृत्यूशी झुंज सुरू आहे.

पोलिसांना उपचार देण्याची बांधिलकी असलेल्या हॉस्पिटलने उपचार करण्यास नकार का दिला? अपघातानंतर पोलिसाची ही अवस्था असेल तर सर्वसामान्यांचे काय? वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी फोन करूनही पवारांसाठी न्यूरो सर्जन वेळेत का उपलब्ध झाला नाही, अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ सध्या तीन हजार पोलिसांच्या डोक्यात घोघांवते आहे.

पोलिस कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला धक्का

पोलिस कर्मचारी पोपट पवार आदिवासी परिवारातील असून, त्यांच्या कुटुंबाला या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. पवार यांचा मोठा मुलगा कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे, तर लहान मुलगा शाळेत जातो. घरातील कर्त्या पुरुषावर आलेल्या या संकटाने पवार यांच्या पत्नीला काहीच कळेनासे झाले आहे. त्यांच्या या अवस्थेने वरिष्ठ अधिकारीही हेलावले. आर्थिक विवंचना पवार कुटुंबासमोर आ वासून उभी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्ड्यांच्या तक्रारीसाठी विधी सेवा प्राधिकरणात कक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रस्त्यावरील खड्डे, दुरावस्था यामुळे खड्ड्यांमध्ये रस्ता शोधण्याची वेळ येते. त्रस्त नागरिक संबंध‌ित विभागाकडे अर्ज-फाटे करतात. मात्र, अधिकारी त्यास वाटाण्याच्या अक्षता लावून मोकळे होतात. प्रशासनाकडून होणाऱ्या दिरंगाईचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर हायकोर्टाने विधी सेवा प्राधिकरणातच कक्ष सुरू करण्याचे आदेश दिले असून, खड्ड्यांनी त्रस्त नागरिक थेट आपली तक्रार या ठिकाणी नोंदवू शकतात.

नाशिक शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काही रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे. सर्व टॅक्स वेळोवेळी भरूनही वाहनचालकांच्या नशिबी ‘बिकट वाटच’ असते. महापालिका, जिल्हा परिषद, बांधकाम विभाग, नॅशनल हायवे, नगरपालिका वा ग्रामपंचायत वेगवेगळी कारणे पुढे करीत रस्त्यांना डागडुजी करण्याचे कष्टही घेत नाही. रस्त्यांवरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे जीवघेणे अपघात होतात. यात अनेकांचे हकनाक जीव जातात. याबाबत मुंबई हायकोर्टात दाखल असलेल्या जनहित याचिकेची (क्र. ७१/२०१३) सुनावणी सुरू असताना हायकोर्टाने एक आदेश पारित केला. या आदेशानुसार रस्त्यावरील खड्डे आणि रस्त्यांची दुरावस्था याबाबतच्या तक्रारींसंदर्भात सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा कोर्टात विधी सेवा प्राधिकरणाचे स्वतंत्र कार्यालय असून, त्याचे सचिव म्हणून न्यायाधीश एस. एम. बुक्के काम पाहतात. याबाबत बोलताना बुक्के यांनी सांगितले की, हायकोर्टाच्या आदेशानुसार संबंध‌ित कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाकडे नाशिक शहरासह जिल्ह्यातील कोणतीही व्यक्ती रस्त्यांवरील खड्डे वा रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत तक्रार करू शकते. तक्रार आली की प्राधिकरणामार्फत तक्रारीची खातरजमा करून संबंध‌ित विभागाला त्या तक्रारीचे निराकारण करण्याबाबत प्राधिकरण पाठपुरावा करेल. यानंतर संबंधीत विभागाने केलेले काम, आलेली मूळ तक्रार याचा सविस्तर अहवाल हायकोर्टास सादर करण्यात येईल, असे बुक्के यांनी स्पष्ट केले.

या ठिकाणी करा संपर्क

रस्त्याबाबत तक्रार करावयाची असल्यास अथवा अन्याय होत असल्यास नागरिकांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या ०२५३-२३१४३०६ या क्रमांकावर किंवा dlsansk@gmail.com या मेलवर संपर्क साधावा. तसेच जिल्हा कोर्टाच्या मागील बाजूस असलेल्या प्राधिकरणाच्या कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहून गाऱ्हाणे मांडता येऊ शकते.

हायकोर्टाच्या आदेशानुसार तक्रार कक्ष सुरू झाला असून, रस्त्यावरील खड्डे अथवा रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत नागरिकांनी थेट तक्रार करावी. या तक्रारीची दखल घेऊन त्याचा सविस्तर अहवाल हायकोर्टाला सादर करण्यात येणार आहे.

- एस. एम. बुक्के, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरोग्याचा प्रश्न प्राधान्याचा व्हावा’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आरोग्याला अर्थसंकल्पात प्राधान्याचे स्थान मिळणे आवश्यक आहे, तसेच हे ज्ञान मराठीत येणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सातव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी येथे केले. सातवे विश्व संमेलन इंडोनेशियातील बाली या रम्य बेटावर सुरू झाले. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ. लहाने यांनी विस्ताराने मांडणी केली.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष नीलेश गायकवाड, संमेलनाचे मावळते अध्यक्ष संजय आवटे, प्रमोद गायकवाड, माजी महापालिका आयुक्त जीवन सोनवणे, ज्येष्ठ अधिकारी शिवाजी भोसले याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते. वैद्यकशास्त्रावर मराठीत अनेक पुस्तके आली असली, तरी अद्यापही तिथे संधी आहेत. त्याचप्रमाणे अवयवदानासारख्या चळवळीची आज आवश्यकता आहे. आरोग्यावरची आपली तरतूद अनेक छोट्या आणि विकसनशील देशांपेक्षा कमी आहे. ती तरतूद वाढवली पाहिजे. सार्वजनिक आरोग्य अधिक सशक्त झाले पाहिजे, असेही त्यांनी मांडले.

स्वागताध्यक्ष नीलेश गायकवाड म्हणाले, की भाषा बाजारपेठेत उभी राहिल्याशिवाय मोठी होत नाही. त्यामुळे आमचा प्रयत्न मराठी भाषेला अधिक व्यावहारिक आणि लोकाभिमुख करण्याचा आहे. त्याच भूमिकेतून हे संमेलन आरोग्य या विषयाभोवती गुंफले आहे. मराठी ज्ञानभाषा झाली नाही, तर इंग्रजीशरणता ही आपली अगतिकता ठरणार आहे.

संजय आवटे म्हणाले, की विश्व साहित्य संमेलनाने धारणाही वैश्विक करायला हव्यात. कारण, अभिव्यक्तीची माध्यमे वाढत असताना विचार आक्रसला जातोय. गौरी लंकेश यांची हत्या आणि डॉ. मेधा खोले यांनी दाखल केलेला एफआयआर ही याची ठळक उदाहरणे आहेत. मराठी माणूस व्यापक झाल्याशिवाय भाषा समृद्ध होणार नाही. एकविसाव्या शतकातील प्रगती आणि त्याचवेळी मध्ययुगीन मानसिकता हे दुभंगलेपण हे आपल्यासमोरचे आव्हान आहे. सामाजिक संदर्भात काम करण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे आणि ‘मी’ विस्तारला पाहिजे, असे जीवन सोनवणे म्हणाले.

दुपारच्या सत्रात वैद्यक साहित्यावर परिसंवाद झाला. पत्रकार संतोष आंधळे, प्रा. डॉ. वासंती वैद्य, सरल कुलकर्णी, डॉ. अरुणा पाटील, सुमन मुठे यांनी त्यामध्ये भाग घेतला. याच संमेलनात नीलेश गायकवाड यांनी लिहिलेल्या ‘आकाशपंख’, ‘थरार उड्डाणाचा’, ‘माझे अंदमान’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले. त्याचप्रमाणे डॉ. शुभा साठे यांच्या ‘त्या तिघी’, तसेच सुमन मुठे यांच्या ‘सहकार चळवळीतील महिला’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले. अरुंधती सुभाष यांनी सूत्रसंचालन झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिल्डरला सहा लाखांचा भूर्दंड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विक्री करारनामा करुन पाच महिन्यांत अंतिम खरेदीखत व घराचा ताबा न दिल्यामुळे बिल्डरला जिल्हा ग्राहक न्यायमंचाने मानसिक त्रासापोटी ५० हजारांचा दंड ठोठावला आहे. त्याचप्रमाणे अर्जाचा खर्च १० हजार रुपये देण्याचे आदेशही दिले आहेत. याबरोबरच दोन महिन्यांत घराचा ताबा देणे व २०१३ पासून बँकेचा दरमहा १० हजार रुपये कर्ज हप्ता नुकसानभरपाई म्हणून ताबा देईपर्यंत अदा करण्याचे म्हटले आहे. त्यामुळे बिल्डरला कर्ज हप्ता म्हणून ५ लाख ७० हजार व दंड ६० हजार असा एकूण ६ लाख ३० हजारांच्या आसपास भूर्दंड बसणार आहे.

नांदगाव तालुक्यातील वेहळगाव येथील विजया विलास भाबड व विलास भास्कर भाबड या बिल्डरविरुध्द मालेगाव तालुक्यातील तळवाडे येथील अंजना यादव कुवर यांनी तक्रार केल्यानंतर हा निकाल ग्राहक मंचाने दिला आहे. या तक्रारीत अंजना कुवर यांनी म्हटले आहे की, नांदगाव येथील सिध्दी विनायक रो - हाऊसेसमध्ये १२ लाख ७५ हजार रुपये रक्कम अदा करुन खरेदी करण्याबाबत विक्री करारनामा केला. त्यात पाच महिन्यांत ताबा देण्याचे ठरले. परंतु, बिल्डरने निकृष्ट दर्जाचे बांधकाम करुन आजतागायत ताबा दिला नाही. त्यामुळे नांदगाव पोलिस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असल्याचे म्हटले.

या तक्रारीवर बिल्डरने आपली बाजू मांडताना सांगितले की, बांधकाम निकृष्ट दर्जाचे केलेले नाही. कुवर यांनी काम चालू असताना महागड्या टाइल्स, रंग बाथ फिटिंग्ज व इतर कामे करुन घेतली. त्यापोटी २ लाख ६५ हजार रुपये अदा करण्याचे कबूल केले, पण ते दिले नाहीत. त्याबाबतची मागणी केल्यानंतर पोलिस स्थानकात खोटा गुन्हा दाखल केला. कुवर यांनी उर्व‌रित २५ हजार रुपयांची रक्कम दिल्यास सर्व जबाबदाऱ्यांची पूर्तता करण्यास तयार आहे. या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायमंचाने सेवेत कमतरता केल्याचे सांगत निकाल देऊन दंड ठोठावला. हा निर्णय न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, सदस्या प्रेरणा काळुंखे - कुलकर्णी यांनी दिला. कुवर यांच्याकडून अॅड. संतोष लोकरे यांनी युक्त‌िवाद केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images