Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शिवशक्ती चौकात आढळला मृतदेह

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

शिवशक्ती चौकातील अजिंक्य व्हील येथे एक व्यक्तीचा मृतदेह असल्याचे लक्षात आले. याबाबतची अंबड पोलिसांना तातडीने माहिती देण्यात आली आहे.

शिवशक्‍ती चौकातील अजिंक्य व्हीला येथे अत्यंत दुर्गंधी असल्याचा संदेश सोशल मीडियावर फिरत होता. याची माहिती मिळताच नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांचे पती राकेश ढोमसे यांनी त्यांच्या साथीदारांसह या परिसरात पाहणी केली. दुर्गंधी येत असलल्या ठिकाणी एक मृतदेह असल्याचे लक्षात आले. त्यानंतर याबाबतची माहिती तातडीने अंबड पोलीसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृतदेह पुरुषाचा आहे की महिलेचा हे ओळखणे सुद्धा अवघड झाले आहे. त्यामुळे आता मृतदेह कोणाचा व कोणी याठिकाणी टाकला याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्यासह उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहउपयुक्त सचिन गोर्हे यांनी पाहणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देवळालीतील इन्क्युबेटर ‘सिव्हिल’ला देणार?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंट बोर्ड हॉस्पिटलकडे अडीच वर्षांपासून वापराविना पडून असलेले दोन इन्क्युबेटर सिव्हिल हॉस्पिटलकडे लवकरच वर्ग केले जाण्याची शक्यता आहे.
इन्क्युबेटर सिव्हिलकडे वर्ग करण्यात यावेत, अशी सूचना आमदार जयंत जाधव यांनी केली आहे. देवळाली कॅम्पला देण्यात आलेले दोन्ही इन्क्युबेटर आमदार जाधव यांच्याच आमदार नि‌धीतून देण्यात आलेले आहेत. मात्र, त्याचा अद्याप वापर करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांचा वापर ‘सिव्हिल’ला करता यावा यासाठी जाधव यांनी काही दिवसांपूर्वीच कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलला स्मरणपत्र दिलेले आहे.

कॅन्टोन्मेंटची झोळी फाटकी

‘दात्याने दिले मात्र आमचीच झोळी फाटकी’ अशी अवस्था कॅन्टोन्मेंट बोर्डाची झाली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात न आल्याने इन्क्युबेटरचा वापर होऊ शकलेला नाही. अनेक वर्षांपासून सुसज्ज आयसीयू विभाग व एक ‘एमडी फिजिशियन’ व एक ‘एमएस जनरल सर्जन’ यांची २४ तास गरज आहे. मात्र, ते उपलब्ध होऊ शकलेले नाही.

देवळाली कॅम्प हॉस्पिटलमध्ये आमदार निधीमधून देण्यात आलेले इन्क्युबेटर तज्ज्ञ डॉक्टर व इतर सुविधांअभावी पडून आहे. ते त्वरित सिव्हिल हॉस्पिटलकडे वर्ग करण्याबाबत बोर्डाच्या आगामी बैठकित निर्णय घेण्यात येईल.
- डॉ. जयश्री नटेश

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुश्श.. खड्डे बुजविण्यास प्रारंभ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पावसाळ्यात रस्त्यांची चाळण झाल्यानंतर जिल्हाभरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन दिवसापासून सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील राज्य महामार्गाचे काम हे १० नोव्हेंबरपर्यंत तर प्रमुख जिल्हा मार्गाचे काम हे १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे.

जिल्ह्यात ३४०० किलोमीटरचे रस्ते असून त्यात २ ते ३ टक्के खड्डे असल्याचे सांगितले जाते. पण, त्याची संख्या यापेक्षा अधिक आहे. या अगोदर या रस्त्यांवर खड्डे पडलेलेल होते. त्यात पावसाळ्यात अजून भर पडली आहे. या रस्त्यावरून गाडी चालवणेही अवघड झाल्यामुळे ठिकठिकाणाहून या रस्त्याबाबत ओरडही होत होती. काही ठिकाणी अपघातही झाले.

एकीकडे खड्डयांची संख्या वाढलेली असताना दुसरीकडे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करणारे कंत्राटदारच संपावर गेले. त्यामुळे या खड्ड्यांचे काम रखडले होते. या दोन्ही मार्गासाठी डेडलाइनही सरकारने घालून दिली असली तरी मुदतीपूर्व हे काम करण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाने केला. त्यासाठी काही ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डेमुक्त रस्त्यांसाठी जेटपॅचर यंत्राचा वापर सुरू केला आहे. या मशिनच्या सहाय्याने अवघ्या काही मिनिटांमध्ये रस्ता पूर्ववत केला जातो. तसेच काही ठिकाणी पारंपारिक पद्धतीने खड्डे बुजविले जात आहे.

दर्जेदार कामाची अपेक्षा

जिल्हा खड्डेमुक्त व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग सरसावले असले तरी हे खड्डे बुजविण्याचे काम किती दिवस टिकते हे महत्त्वाचे आहे. काही रस्त्यांवर सर्वत्र ठिगळच दिसत असल्याने रस्त्यांचे काम पूर्ण करणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील रस्त्यांकडे पूर्णत दुर्लक्ष झाल्यामुळे सर्वांनाच त्याचा त्रास सहन करावा लागला आहे. संप आणि नंतर दिवाळी यामुळे काम थांबले होते. आता ते लवकर पूर्ण आणि दर्जेदार व्हावे ही सामान्य माणसांची अपेक्षा आहे.

जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे. राज्य महामार्गाचे काम हे १० नोव्हेंबरपर्यंत तर प्रमुख जिल्हा मार्गाचे काम हे १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे.
- रणजित हांडे, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल हिसकावून पोबारा

$
0
0

म. टा. प्रत‌िनिधी, नाशिक

मोबाइलवर बोलत चाललेल्या तरुणीच्या हातातील मोबाइल हिसकावून चोरट्यांनी पोबारा केला. मुंबईनाका आणि कॉलेजरोड परिसरात मंगळवारी या घटना घडल्या.

अशोकस्तंभ भागातील सुकरी दादू जाधव (२३) ही तरुणी मंगळवारी (दि. २४) रात्री आठच्या सुमारास महामार्ग बसस्थानकाकडून चिरंजीव हॉस्पिटलकडे पायी चालली होती. त्यावेळी ती मोबाइलवर बोलत होती. मोटारसायकलवरून आलेल्या भामट्यांनी तिच्या हातातील मोबाइल हिसकावून पोबारा केला. मुंबईनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोबाइल चोरीची दुसरी घटना कॉलेजरोड परिसरात घडली. कस्तुरबानगर भागात राहणाऱ्या सचिन रायभान उबाळे हा तरुण मंगळवारी (दि. २४) सायंकाळी सातच्या सुमारास क्रोमा शोरूम कडून हॉलमार्क चौकाकडे मोबाइलवर बोलत पायी चालला होता. यावेळी मागून मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी त्याच्या हातातील मोबाइल हिसकावून नेला. गंगापूर पोलीस तपास करीत आहेत.

जिल्हा बँकेत बनावट नोटा

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सम्राट हॉटेलजवळील शाखेत सुमारे ३० हजार रुपयांच्या बनावट नोटा मिळून आल्या आहेत. अज्ञात ग्राहकाने या नोटा खऱ्या भासवून बँकेत चलन भरणा केला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. वर्षभरापूर्वी हा भरणा करण्यात आला असून हा प्रकार आता उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नितीन गुलाबराव पाटील यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात ग्राहकाने १४ नोव्हेंबर २०१६ ते २४ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत बँकेच्या सीबीएस जवळील शाखेत हा बनावट नोटांचा भरणा केला. त्यामध्ये पाचशे रुपयांच्या २६ तर एक हजार रुपयांच्या १६ नोटांचा समावेश आहे. सदर नोटा बनावट असताना त्या खऱ्या असल्याचे भासवून ग्राहकाने त्या चलनात आणल्याची फिर्याद देण्यात आली आहे.

दिंडोरी रोडला बुलेटची चोरी

सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली सुमारे ७० हजार रुपयांची बुलेट चोरट्यांनी पळवून नेली. दिंडोरी रोड परिसरात ही घटना घडली. आठवडाभरातील बुलेट चोरीची ही दुसरी घटना आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिनेश प्रभाकर आहेर (रा. मातृकृपा अपार्टमेंट, दिंडोरी रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. आहेर यांची इनफिल्ड बुलेट सोमवारी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये चोरीस गेली.

तरुणाची आत्महत्या

तिडके कॉलनीतील तरुणाने पाथर्डी गावात विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. मंगळवारी हा प्रकार घडला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. इंदिरानगर पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे. तुषार साहेबराव विधाते (१९, रा. बाजीरावनगर, तिडके कॉलनी) असे त्याचे नाव आहे. तुषारने मंगळवारी (दि. २४) सकाळी साडेनऊच्या सुमारास विषारी औषध सेवन केले. त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटी, त्र्यंबकला समस्यांचे पर्यटन

$
0
0

नाशिक, त्र्यंबक या दोन शहरांना देशातच नव्हे तर संपूर्ण जगभर धार्मिकदृष्ट्या महत्त्व आहे. त्यामुळे दररोज हजारो भाविक येथे भेट देत असतात. मात्र, त्यांना हव्या त्या किमान पायाभूत सुविधाही उपलब्ध होत नाहीत, हे दुर्दैव आहे. बारा वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्यामुळे जगात प्रसिद्ध असलेल्या या दोन्ही शहरांचा वनवास अजूनही संपलेला नाही. अरुंद रस्ते, वाहनांचा बेशिस्तपणा, बाहेरगावहून आलेल्या पर्यटकांची विविध मार्गांनी होणारी लूट, निवास, भोजन, प्रवास आदि सुविधांचा अभाव यामुळे पर्यटकांना अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागते. या दोन्ही स्थळांच्या विकासासाठी भरपूर वाव असून, खूप काही करणे गरजेचे आहे.

रामकुंडातील पाणी

नाशिकला येणारा भाविक पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामकुंडात स्नान करीत असतो. जेव्हा रामकुंडातील पाण्याचा प्रवाह वाहता असतो. तेव्हा पाणी स्वच्छ असते. मात्र, पाण्याचा प्रवाह जेव्हा बंद असतो, त्यावेळी येथील पाणी अगदी गटारगंगेसारखे दूषित होते. त्याची दुर्गंधी येते. येथील पाणी स्वच्छ, निर्मळ रहावे, यासाठी अजून तरी व्यवस्था झालेली नाही.

माफक निवास व्यवस्था

पंचवटीत येणारे भाविक आणि पर्यटक हे सर्वच श्रीमंत नसतात. कित्येकांना निवास करण्याची गरज भासते. पूर्वी त्यांच्यासाठी धर्मशाळांची व्यवस्था असायची. पंचवटीतील धर्मशाळांची संख्या एकदमच कमी झाली आहे. ज्या आहेत, त्यांचे दर जास्त असल्याने सर्वसामान्यांना परवडत नाहीत. त्यामुळे गंगाघाटाच्या परिसरातच हे भाविक उघड्यावर झोपत असल्याचे दिसते. रात्रीच्या वेळी त्यांची लूटमार होण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत.

अरुंद रस्त्यांची समस्या गंभीर

पंचवटीतील अनेक रस्ते अरुंद असल्यामुळे तेथून मोठी वाहने ये-जा करीत असताना ट्रॅफीक जाम होण्याचे प्रकार रोजच घडतात. अरुंद रस्त्यांची समस्या गंभीर असल्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. सुट्यांच्या काळात येथे वाढणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेता, येथे किमान चारचाकी वाहनांना बंदी घालण्यात यावी, अशी मागणी होत आहे.


वस्त्रांतरगृहाचा उपयोग व्हावा

रामकुंडाच्या पूर्वेला बांधण्यात आलेले वस्त्रांतरगृह विविध कारणांनी वादग्रस्त ठरत गेले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात ते पाडून टाकण्याचीही चर्चा रंगली होती. रामकुंडात स्नान करण्यासाठी येणाऱ्या महिलांना वस्त्रे बदलण्यासाठी या वस्त्रांतरगृहाचा वापर व्हावा, अशी अपेक्षा असताना विविध राज्यांतून आलेल्या महिला भाविकांना या वस्त्रांतरगृहाची माहितीही दिली जात नाही. या इमारतीवर तसा फलकही लावण्यात आलेला नाही. या इमारतीच्या पायऱ्यांजवळच अनेकदा श्राध्दाच्या पूजा मांडल्या जात असल्यामुळे महिलांना जाण्यासाठी मार्गही नसतो. त्यामुळे महिलांना उघड्यावरच कपडे बदलण्याची वेळ येते. काही महिलांनी तर गांधी स्मारकाच्या खालच्या बाजूला पडदा लावून तेथे कपडे बदलण्याची तात्पुरती व्यवस्था केली आहे. गंगाघाट परिसरात सुलभ शौचालयांची व्यवस्था आहे. मात्र, त्याचा वापर करताना महिलांना पैसे द्यावे लागतात.

रिक्षांची वर्दळ त्रासदायक

सुट्यांच्या काळात पर्यटनासाठी आलेल्यांची संख्या जास्त असते. त्यावेळी त्यांना विविध तीर्थस्थाने आणि पर्यटनस्थळे दाखविण्यासाठी रिक्षांचा वापर करावा लागतो. त्या पर्यटकांना सोडण्यासाठी आलेल्या रिक्षा या स्थळांच्या बाहेर थांबलेल्या असतात. असे चित्र रामकुंड, कपालेश्वर, काळाराम मंदिर, सीतागुंफा व तपोवन येथे हमखास दिसते. काही रिक्षाचालक उगाच इकडून तिकडे रिक्षा फिरवत असतात. त्यांची ही वर्दळ स्थानिक रहिवाशांना तसेच पर्यटकांनाही त्रासदायक ठरत असते. या रिक्षांसाठी वेगळ्या जागेची व्यवस्था नसल्यामुळे ही अडचण वाढत आहे.

मार्गदर्शक फलकांचा अभाव

रामकुंडाकडे येण्यासाठी मालेगाव स्टॅण्ड, पंचवटीचा वाचनालयाचा उतार रस्ता, पुरिया मार्ग, गंगाघाट हे मार्ग आहेत. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना रामकुंड परिसरात नेमक्या कोणत्या रस्त्याने बाजूने यायचे, कोणत्या रस्त्याने बाहेर पडायचे हे समजत नाही, त्यांच्यासाठी मार्गदर्शक फलक मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषेत असावेत.


परिसरातील मंदिरे

गंगा गोदावर

बाणेश्वर मंदिर

सिद्धपाताळेश्वर मंदिर

कर्पूरेश्वर महादेव मंदिर

कपालेश्वर

नारोशंकर

नीलकंठेश्वर

यशवंतराव महाराज देवमामलेदार मंदिर

एकमुखी दत्तमंदिर

सांडव्यावरची देवी

अर्धनारी नटेश्वर मंदिर

काळाराम मंदिर

सीतागुंफा

श्रीराम पर्णकुटी

लक्ष्मण-शूर्पणखा मंदिर

बडा लक्ष्मीनारायण मंदिर


कपिला संगम दुर्लक्षित

तपोवनातील मुख्य आकर्षण असलेल्या कपिला संगमाकडे दुर्लक्ष झालेले आहे. प्रत्येक सिंहस्थ कुंभमेळ्यानंतर हा भाग ओसाड पडल्यासारखा होतो. येथे श्रीराम पर्णकुटी, लक्ष्मण मंदिर, शूर्पणखा मंदिर, संगमावरील अग्निकुंड बघण्यासाठी पर्यटक येत असतात. कपिला संगमावर स्नान करण्याची भाविकांची इच्छा असते. मात्र, येथे येणारा पाण्याचा प्रवाह हा घाण आणि दुर्गंधीयुक्त असल्यामुळे त्याचा त्रास येथे येणाऱ्यांना होत असतो. येथे येणारे भाविक आणि पर्यटक लगेच काढता पाय घेतात. येथील स्वच्छतेबाबत तर कायम बोंब असते. ड्रेनेजचे चेंबर फुटून त्यातून झिरपणारे पाणी थेट गोदापात्रात मिसळते. कपिला नदीच्या पात्रात थेट ड्रेनेज लाइनमधून पाणी सोडण्यात येते. या सर्व प्रकारामुळे येथील भागाला पवित्र कसे म्हणायचे, हा प्रश्न पडतो. येथील खडकाळ भागातून नदी ओलांडून जाणे शक्य नसल्यामुळे येथे लोखंडी पूल तयार करण्यात आला आहे. हा पूल पावसाळ्यात नदीच्या वाढणाऱ्या पाण्यामुळे कायम नादुरुस्त होतो. त्यामुळे पर्यटकांना पलीकडच्या बाजूला जाता येत नाही.

भाविक आणि पर्यटकांची निवास, भोजन आणि रिक्षाचालक यांच्याकडून लूट होत असल्याचे प्रकार घडतात. या प्रकारातून अनेकदा वाद होत असतात. बाहेरून आलेल्या प्रवाशांना कमी दरात सुविधा मिळायला हव्या.

- प्रीतम पटेल, पर्यटक

नाशिकच्या धार्मिक स्थळांची चांगली माहिती असलेला आणि इतर राज्यांतील आलेल्या भाविकांना व पर्यटकांना समजेल अशा त्यांच्या भाषेत संवाद साधणाऱ्या गाईडची कमतरता आहे. त्यामुळे अत्यंत त्रोटक माहिती मिळते.

- जगदीश नायर, पर्यटक


राज्यातील अन्य धार्मिक स्थळांप्रमाणे नाशिकला स्वस्तात किंवा मोफत भोजनालयाची व्यवस्था नाही. नाशिकला आल्यानंतरही ही फार मोठी समस्या गरीब भाविकांना सतावते.

- उत्तम यादव, भाविक


तपोवनात येणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना येथील स्थळांची माहिती व्हावी, यासाठी प्रशिक्षित गाईडची नेमणूक करावी. या भागातील महत्त्व दर्शविणारे फलक लावण्यात यावेत. येथे पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टरची व्यवस्था करावी.

- महंत बैजनाथ महाराज, श्रीराम पर्णकुटी


रामकुंड परिसरात भिकाऱ्यांचा प्रचंड सुळसुळाट झालेला आहे. या भागात पर्यटनासाठी आणि अभ्यासासाठी परदेशातून पर्यटक येतात. त्यांना येथील भिकाऱ्यांचे दर्शन घेण्याची वेळ येते. म्हसोबा पटांगणाच्या पार्किंगजवळ मांसाहारी पदार्थांची विक्री केली जाते, ही बाब भाविकांना खटकते.

- किरण खैरे, स्थानिक रहिवाशी


परराज्यातून आलेल्या टुरिस्ट गाड्या गंगाघाट पार्किंगमध्ये पार्क केल्यानंतर तेथून रामकुंड, काळाराम मंदिर, सीतागुंफा आणि तपोवन अशा साधारणतः एक ते दीड किलोमीटरच्या अंतरासाठी पर्यटक रिक्षांचा वापर करतात. मात्र, या रिक्षांचे भाडे किती असावे, याची निश्चिती केलेली नसल्यामुळे अनेकदा पर्यटकांची फसवणूक होते.

- मोहन मिश्रा, स्थानिक रहिवासी

मंदिर प्रशासन, पालिकेचे दुर्लक्ष

एक महत्वाचे आद्य ज्योर्तिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर, दक्षिण गंगा गोदावरीचे उगमस्थान ब्रह्मगिरी पर्वत, वारकरी संप्रदायचे आद्यप्रवर्तक संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचे संजीवन समाधी मंदिर, कुंभमेळ्याचे ठिकाण असलेले कुशावर्त तीर्थ या स्थानांना भेटी देण्यासाठी वर्षभर येथे देशविदेशातून भाविक येत असतात. पर्यटकांना सुविधा देताना नगरपालिका प्रशासन आणि देवस्थान ट्रस्ट यांना नेहमीच अपयश आलेले गर्दीच्या कालावधीत ठळकपणाने पुढे आले आहे. दिवाळीनंतर गर्दीत वाढ होते, हे नेहमीचेच असताना याबाबत नगरपालिका आणि मंदिर प्रशासन या दोन्ही संस्थांचे दुर्लक्षच झाल्याने पूर्वनियोजनाचा अभाव अधोरेखित झाला आहे.

अनुदान गेले कुठे?

त्र्यंबक नगरीचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता येथे सन १८५४मध्ये नगरपालिका स्थापन झाली. तत्कालीन ब्रिट‌िश शासनाने ग्रामपंचायतीचीदेखील लोकसंख्या नसताना केवळ येथे येणाऱ्या भाविकांना सुविधा निर्माण करण्यासाठीच या संस्थेची निर्मिती केली होती. पूर्वी या स्थानिक स्वराज्य संस्था यात्रेकरूंना दरडोई कर आकारत असत. तो राज्य सरकारने १९७७ मध्ये रद्द केला आणि यात्राकर अनुदान सुरू केले. पूर्वी दहा हजार असलेले हे अनुदान आता थेट कोटी झाले आहे. मात्र, या अनुदानातून अद्याप सव्वा रुपया देखील खर्च झालेला नाही. या अनुदान खर्चाचे नव्याने निकष तयार करण्यात आले. त्यामध्ये यात्रेकरू, भाविकांच्या सुविधांसाठीच खर्च करता येणार आहे.

निवाराशेडची गरज

त्र्यंबकेश्वर येथील अधिक पर्जन्यमानाचा विचार करता येथे जागोजागी निवारा शेड निर्माण होणे गरजेचे आहे. शुद्ध पाणी आणि स्वच्छता गृह. अल्पदरात निवासव्यवस्था अशा सुविधा अधिकाध‌िक प्रमाणात होणे गरजेचे आहे. शहरात आलेल्या भाविकांना पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध नाही. निवासाच्या सुविधा निर्माण केल्यास त्यापासून उत्पन्न मिळेल. त्याचसोबत भाविक येथे अधिक काळ राहतील, त्याचा येथील अर्थकारणास फायदा होईल. आज असलेल्या धर्मशाळा नगरपालिकेने ठेका पद्धतीने चालवायला दिलेल्या आहेत. नगरपालिका स्तरावर अशी उदासीनता असताना मंदिर प्रशासनदेखील फार काही वेगळे करत नाही.

दर्शन मिळणेही अवघड

आजकाल त्र्यंबकेश्वर देवस्थानचे दर्शन घेणेही भाविकांना अवघड झाले आहे. येथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश असे तीन देवतांचे स्थान आहे आणि अखंड जलस्त्रोत तेथून होत असतो. अशा आगळ्या वेगळ्या देवस्थानाचे दर्शन घेण्यासाठी हजारो किलोमीटर दूर अंतरावरून आलेल्या भाविकांना चार तास रांगेत उभे रहावे लागते. गर्भगृहाच्या समोर येताच काही सेकंदात त्याला बाजूला लोटले जाते. दररोज लाखाच्या घरात दान मिळविणारे देवस्थान संस्थान यात्यातून भाविकांना सुविधा देईल, तरच खऱ्या अर्थाने सेवा घडेल.

येथे भाविकांना चप्पल ठेवण्यासाठीदेखील जागा मिळत नाही. बॅग, मोबाइल आदि सांभाळण्यासाठी खासगी लॉकर सेवा मिळते. त्यासाठी भाविकांना शे-पन्नास रुपयांचा भूर्दंड बसतो. ही व्यवस्था तरी देवस्थानाने करावी. चप्पल ठेवण्यासाठी जागा आणि कर्मचारी पुरविल्यास सेवा घडेल.

वाहन प्रवेश फी

वाहन प्रवेश फी हा त्र्यंबक नगरपालिकेस हमखास उत्पन्न देणारा स्‍त्रोत ठरला आहे. गर्दीच्या कालावधीत सलग सुटीत तीन दिवसांत दीड-दोन लाख रुपये कमाई होत असते. वाहनांची ही प्रवेश फी पूर्वी तळ फी नावाने घेतली जात होती. मध्यंतरी नगरपालिकेच्या वाहनतळावरून चोरीस गेलेल्या कारची भरपाई ग्राहक न्यायमंचाने नगरपालिकेस देण्याचा आदेश दिला आहे. येथे वाहनांना सुरक्षा नाही. त्यामध्ये सुधारणा करण्याचे दूरच, उलट नगरपालिका प्रशासनाने वाहनतळ फी असे पावतीचे शीर्षक बदलून आता ते वाहन प्रवेश फी, असे केले आहे. वसुलीसाठी येथे ठेकेदारीत कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्यांनादेखील सेवेचा मोबदला पुरेसा दिला जात नाही आणि वाहनतळावरदेखील सुविधांचा अभावच आहे.

वाढते अतिक्रमण

शहरात व्यावसायिकांचे अत‌िक्रमण वाढते आहे. वाहनतळाचे नियोजनच चुकीचे झाल्याने मंदिरासमोरील रस्त्यावर भाविक पर्यटकांचा भार वाढतो आहे. याचा दुसरा परिणाम म्हणजे भाविकांना येथे आल्यानंतर मंदिराव्यतिरिक्त इतर ठिकाणांची माहितीच होत नाही. दर्शनबारीत बहुतांश वेळ घालवून मंदिराच्या बाहेर पडलेल्या भाविकास कुशावर्त तीर्थ, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर, संत जनार्दन स्वामी आश्रम, स्वामी समर्थ गुरूपीठ आदि ठिकाणी भेट दिल्यास त्यास निश्चीतच येथे आल्याचे समाधान वाटेल. या करिता नगर पालिका प्रशासनाने पुढकार घेऊन वाहनतळाचे सुयोग्य नियोजन करणे तसेच पथदर्शन फलक तयार करणे आवश्यक आहे.

दर्शनासाठी भाविकांना रांगेत उभे राहण्याची सुविधा पूर्वदरवाजास केली आहे. तेथे मंडप उभारला आहे. त्याचप्रमाणे टॉयलेट बॉक्स आदि सुविधा आहेत. मंदिर प्रांगण आणि दर्शनबारी येथे पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध केले आहे. कायमस्वरूपी सुविधा निर्माण करण्यास पुरातत्व खात्याच्या नियमांनी बांधकाम करण्यास परवानगी नाही.

- अॅड. श्रीकांत गायधनी, विश्वस्त, त्र्यंबकेश्वर मंदिर

भाविकांचा वाढलेला ओघ लक्षात घेता स्वच्छता, पाणीपुरवठा विभागांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्र्यंबक नगर परिषद कार्यालयात भाविकांच्या सेवेसाठी पब्ल‌िक अनाउंसमेंट सिस्ट‌िम उपलब्ध करण्यात आली आहे.

- अरूण गरूड, सहाय्यक कार्यालय निरीक्षक, नगर परिषद

दोनशे रुपये देणगी दर्शन ही सुविधा चांगली आहे. दर्शन समाधानकारक झाले. शहरात स्वच्छतेचा अभाव दिसतो. याची दक्षता प्रशासनाने घेतली पाहिजे.

- दुर्गेंद्र देवसिंग, मध्यप्रदेश

दर्शनबारीत लहान मुले असलेल्या मातांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात यावा. शिर्डी, शेगाव आदि बहुतेक धर्मस्थळावर अशी सुविधा आहे. येथेदेखील स्तनपानासाठी स्वतंत्र कक्ष असावा.

- विना पाटोळे, कोल्हापूर

मंडपाची दाट सावली पडत नसल्याने उन्हाचा त्रास होतो. अशाप्रकारे पेंडाल टाकायचा होता, तर त्याची सावली पडेल याची काळजी घ्यायला हवी होती. येथे पंख्यांची सुविधा करायला हवी.

- कल्पना पाटील, डोंबीवली


वाहनतळावर सुविधा नाहीत. वाहनाची पावती घेतली जाते. परंतु, येथे अगदीच गैरसोय आहे. याचे व्यवस्थापन पाहणारी यंत्रणाच येथे दिसून येत नाही.

- राहुल चव्हाण, वाहनचालक

दर्शनबारीत डस्ट बीन ठेवले पाहिजे. येथे पाण्याच्या बाटल्या आणि फ्रुटीचे बॉक्स यांच्यासाठी कचरा पेटी आवश्यक आहे. त्यांचा कचरा भाविकांना अस्वस्थ करतो.

- तेजश्री भोसले, औरंगाबाद

(संकलन ः रामनाथ माळोदे, केशव ढोन्नर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयडीसी सीईओंकडून आयटी पार्कची पाहणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शेठी यांनी बुधवारी (दि. २५) अचानक जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी सर्वप्रथम शेठी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून धूळ खात पडून असलेल्या आयटी पार्कची पाहणी केली.

याप्रसंगी एमआयडीसीचे सर्वच अधिकारी उपस्थित होते. परंतु, शेठी यांच्या दौऱ्याबाबत कुठल्याही अधिकाऱ्यांनी अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे अचानक दौरा असल्याचे बोलले जात आहे. भारतातील नावाजलेल्या अदानी समूहाला शंभर एकर जागा उद्योगासाठी लागणार असल्याने शेठींचा दौरा असल्याचेही एमआयडीसी भवनात बोलले जात होते. तसेच मालेगाव व इतर ठिकाणी आरक्षित करण्यात आलेल्या एमआयडीसीच्या भूखंडांचा दौरा शेठींनी केला आहे.

अचानक नाशिक जिल्ह्याचा दौरा संजय शेठी यांनी केल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहे. याबाबत मात्र कुठल्याच औद्योगिक संघटनेला कळविण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. बुधवारी (दि. २५) सकाळी ११ वाजेला आयटी पार्क व त्यानंतर जिल्ह्यातील एमआयडीसीचा दौरा शेठी यांनी केला. त्यांच्या समवेत प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, अधीक्षक अभियंता नितीन वानखेडे, कार्यकारी अभियंता दुशांत उईके व अधिकारी वर्ग उपस्थित होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिकल कॉलेज निर्मितीला ग्रहण!

$
0
0

नाशिक : सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध असताना आणि एज्युकेशन हब म्हणून नावारुपास आलेल्या नाशिकची अद्यापही मेडिकल कॉलेजची प्रतीक्षा संपलेली नाही. सरकारी काम अन् बारा महिने थांब या उक्तीप्रमाणे नाशिकच्या मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव सरकार दरबारी धूळ खात पडला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यात मेडिकल कॉलेज निर्मितीला लागलेले अडचणींचे ग्रहण सुटण्याची चिन्हे अद्यापही दिसत नाहीत. सरकारने नाशिकमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे, तेथील ३० टक्के जागा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित ठेवाव्यात, अशी नाशिककरांची मागणी आहे.

राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री यांच्याच जिल्ह्यात सरकारी मेडिकल कॉलेज कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही सलाइनवरच असल्याचे दिसून येत आहे. निव्वळ सरकारी वेळकाढूपणामुळे हे कॉलेज होऊ शकले नसून, गेल्या काही वर्षात त्याच्या घोषणाच नाशिककरांच्या कानी पडल्या आहेत. अद्यापही हे कॉलेज नक्की कधी आकाराला येईल याची सुचिन्हे दिसत नसल्याने विद्यार्थ्यांची फरफट सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

नाशिकमध्ये सरकारी मेडिकल कॉलेजची मागणी असून, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनीही ही मागणी पूर्ण केली जाणार असल्याचे संकेत नाशिक भेटीत वारंवार दिले आहेत. परंतु, अद्याप हे कॉलेज सुरू होऊ शकलेले नाही. एकट्या नाशिक जिल्ह्यात सहा खासगी मेडिकल कॉलेज असले तरी एकही सरकारी मेडिकल कॉलेज नाही. खासगी कॉलेजेसचे भरमसाठ प्रवेश शुल्क भरण्याची ऐपत नसल्याने सामान्य कुटुंबातील गुणवंत मुलांना प्रवेशापासून वंचित राहावे लागते. खासगी मेडिकल कॉलेजेसमधील जागांच्या तुलनेत सरकारी मेडिकल कॉलेजेसमध्ये वीसच टक्के जागा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेटिंगवरच राहावे लागते.

नाशिकमध्ये मेडिकल कॉलेज सुरू करण्याबाबत सकारात्मकता दर्शविणाऱ्या राज्य सरकारने अजूनही त्यास हिरवा कंदील दिलेला नाही. मेडिकल कॉलेजचा विषय अद्याप प्रस्तावाच्याच पातळीवर आहे. ‌सिव्हिल हॉस्प‌िटल आण‌ि शालिमार येथील सुपर स्पेशालिटी हॉस्प‌िटलमध्ये मिळून तब्बल साडेआठशे बेडची व्यवस्था आहे. सिंहस्थ काळात सिव्हिल हॉस्प‌िटलच्या आवारात नवीन इमारत उभारण्यात आली असून, तेथे लॅब, नर्सिंग कॉलेजदेखील आहे. सर्वसाधारण आजारांसाठी सिव्हिल हॉस्प‌िटल तर हृदयरोग, किडनी आणि तत्सम गंभीर आजारांसाठी संदर्भसेवा हॉस्पिटलचा पर्याय नाशिकरांना उपलब्ध आहे. त्यासाठीची महागडी आणि अत्याधुनिक मशिनरीदेखील उपलब्ध आहे. केवळ वर्गखोल्या, शैक्षणिक साधन सामुग्री आणि प्रशिक्षित प्राध्यापक वर्ग एवढ्या गुंतवणुकीवर मेडिकल कॉलेज सुरू करणे शक्य आहे. संदर्भ हॉस्प‌‌िटलमध्येच पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा प्रस्ताव सरकार दरबारी पडून आहे.

प्रस्ताव सरकार दरबारी धूळ खात

संदर्भ हॉस्पिटलमध्येच पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा प्रस्ताव सरकार दरबारी पडून आहे. हॉस्पिटलची इमारत प्रशस्त असून, ४० कोटींची यंत्रणाही उपलब्ध आहे. विशेष म्हणजे पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या डॉक्टरांना येथील सरकारी हॉस्पिटल्समध्येच नोकरी मिळू शकणार असली तरी प्रत्यक्षात कॉलेज केव्हा सुरू होणार याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

खासगी कॉलेजेसला १८ लाखांपर्यंत शुल्क

राज्यातील खासगी आणि सरकारी मेडिकल कॉलेजेसमध्ये मिळून एमबीबीएसच्या पाच हजार जागा आहेत. त्यापैकी ८० टक्के म्हणजेच ३८०० ते ४००० जागा राजकीय लागेबांधे असलेल्या खासगी कॉलेजेसमध्ये आहेत. केवळ १००० ते १२०० जागा सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये आहेत. सरकारी कॉलेजमधील प्रवेश शुल्क कमी असल्याने दरवर्षी सामान्य कुटुंबांमधील केवळ एक हजार विद्यार्थ्यांनाच एमबीबीएस करण्याची संधी मिळते. खासगी हॉस्प‌िटलमध्ये मात्र १५ ते १८ लाख रुपये शुल्क भरावे लागत असल्यानेच सरकारी मेडिकल कॉलेजची निकड प्रकर्षाने जाणवू लागली आहे. (क्रमश:)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनायक संकुल सुविधांविनाच

$
0
0

वीस वर्षांपासून वस्तीला मिळेना मुबलक पाणी

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक शहराची लोकवस्ती गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढली आहे. वाढलेल्या लोकवस्तीत नागरी सुविधा देण्यासाठी नगरसेवक सातत्याने प्रशासनाकडे मागणी करत असतात. परंतु, असे असतानादेखील अनेक कॉलनी परिसरात मूलभूत सुविधाच मिळत नसल्याचे चित्र आहे. विनायक संकुलाचीही परिस्थिती अशीच असून, गेल्या वीस वर्षांत याठिकाणी पाण्याची व्यवस्थाच योग्यरित्या करण्यात आलेली नाही. अनेकवेळा पाठपुरावा करूनही रहिवाशांच्या पदरी निराशाच आली आहे.

त्र्यंबकेश्वर रोडवरील विनायक संकुलातील रहिवाशांना आजही नागरी सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. १९९५ साली नव्याने तयार झालेल्या विनायक संकुलामध्ये पिण्याचे पाणी मुबलक मिळत नसल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. रस्ते, विद्युत पोल, उद्यान यांची तर समस्या आहेच. परंतु, नंदिनी नदीत वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे डासांचा सर्वाधिक त्रास विनायक संकुलातील रहिवाशांना होत आहे. या कॉलनीत आजही रस्ते, पाणी, वीज व उद्याने यांची समस्या रहिवाशांना भेडसावत आहे. तसेच कॉलनीला लागून असलेल्या नंदिनी नदीत वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे डासांचा सर्वाधिक त्रास रहिवाशांना सहन करावा लागत असल्याने यावर उपाय कोण शोधणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

संकुलात महापालिकेकडून कोणत्याही नागरी सुविधा दिल्या गेलेल्या नाहीत. परिणामी, येथील रहिवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याची मुबलक सुविधा द्यावी याकरिता अनेकवेळा महापालिका व नगरसेवकांकडे सातत्याने पाठपुरावा केला.

-प्रकाश महाजन, रहिवाशी

पाठपुरावा करूनही दुर्लक्षच

विनायक संकुलातील समस्येबाबत अनेकदा स्थानिक रहिवाशांनी महापालिकेकडे निवेदन सादर केले. तसेच नगरसेवकांनीदेखील कॉलनीच्या समस्या मनपा प्रशासनासमोर मांडल्या आहेत. मात्र गेल्या २० वर्षांच्या कालावधीत कॉलनीला मुबलक पिण्याचे पाणी मिळत नसल्याचे चित्र कायम आहे. तसेच रस्त्यांचीही दुरवस्था झाली असून, विद्युत पोलदेखील नादुरूस्त अवस्थेत पहायला मिळतात. दरम्यान, सभापती माधूरी बोलकर यांनी सर्वच विभागांच्या प्रमुखांची बैठक घेत विनायक संकुलातील रहिवाशांची समस्या मांडली होती. परंतु, आजही येथे मूलभूत सुविधा महापालिकेने दिल्या नसल्याने प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुरुस्तीविना उद्याने भकास

$
0
0

पंचवटीतील १०४ उद्यानांची देखभाल वाऱ्यावर; खेळणी नादुरुस्त

रामनाथ माळोदे, पंचवटी

नाशिक शहराच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच लोकवस्तींची वाढ झपाट्याने होत आहे. शहर परिसरात वाढणाऱ्या सिमेंटच्या जंगलात मोकळा श्वास घ्यायला मिळावा यासाठी ठराविक अंतराच्या जागेवर उद्यानांचा विकास केला जातो. या उद्यानांची उद््घाटने मोठ्या दिमाखदारपण‍े केली जातात. मात्र, काही थोड्याच दिवसात त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तींकडे दुर्लक्ष होते, त्यामुळे उद्याने भकास पडू लागली आहेत.

शहरातील पंचवटी विभागातील उद्यानांची अवस्थाही काहिशी चांगली नाही, त्यांना घरघर लागली असून, उद्यानांची देखभाल वाऱ्यावर आहे. येथील सहा प्रभागाच्या विभागात तब्बल १०४ उद्यानांचा विकास करण्यात आला आहे. मात्र त्यातील बोटावर मोजण्याइतकी उद्याने वगळली तर सर्वांची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे ही उद्यानांची शोकांतिकाच म्हणावी लागते.

पंचवटी विभागातील १०४ उद्यानांपैकी ७० उद्यानांची स्थिती चांगली आहे. त्यात ८ मोठी उद्याने असून या उद्यानामध्ये पावसाळ्यात वाढलेले गवत काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. काही उद्यानातील खेळणी दुरुस्त करण्यात आली आहे.

-राहुल खांदवे, उद्यान निरीक्षक

उद्यानांना मरणकळा

पंचवटीतील उद्यानांचा विकास करताना चार-पाच गुंठ्यांपासून ते थेट पाच-सहा एकरच्या पर्यंतच्या जागेवर उद्यानांचा विकास करण्यात आलेला आहे. या उद्यानात सुशोभीकरणावर भर देण्यात आलेला आहे. हा भर देताना त्यात हिरवळीसाठी लॉन्स, विविध प्रकारची छोट्या वनस्पती, मोठ्या वृक्षांची झाडे लावण्यात आली होती. त्यातील छोट्या वनस्पतींना उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासल्यामुळे या वनस्पती पाण्याअभावी कोमेजून जाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. पावसाळ्यात याच वनस्पतींच्या जागेवर रानगवत मोठ्या प्रमाणात वाढते. उद्यानांची संख्या आणि त्यांची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या यांच्या मोठी तफावत असल्यामुळे उद्यानांची देखभाल होत नाही, त्यामुळे उद्घाटनाच्या वेळी शोभून दिसणारी उद्यानांना नंतर मरणकळा लागलेली दिसते.

हिरवळच नाही

पंचवटीतील अनेक उद्याने अशा प्रकारच्या रानगवतांनी भरलेली आहेत. या गवतामध्ये साप, विंचू यांच्यासारख्या विषारी प्राण्याची वावर असल्याची भीती असल्यामुळे गवत वाढलेल्या उद्यानांत कुणी जात नाहीत. सुटीच्या काळात मिळणारा वेळ घालविण्यासाठी लहान मुले, वृद्ध यांना हक्काचे ठिकाण म्हणून या उद्यानांकडे बघितले जाते. मग या उद्यानांची विकास करून काय फायदा असे म्हटले जात आहे. उद्यानात हिरवळ टिकून ठेवण्यासाठी त्याला वेळोवेळी पाणी देण्याची आवश्यकता आहे. मात्र, पाण्याची व्यवस्था असूनही उद्यानांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे हिरवळ टिकून राहत नाही.

कारंजे, दिवे बंद अवस्थेत

उद्यानाच्या सुशोभिकरणासाठी हिरवाई टिकून ठेवण्यापेक्षा कृत्रिम सौंदर्य आणण्याचा लोकप्रतिनिधी घाट घालतात. पंचवटीतील कृष्णनगर, गोपाळनगर, हिरावाडी आदी परिसरातील उद्यानात विद्युत रोषणाई असलेली शोभेची झाडे उभारण्यात आली होती. रात्रीच्या वेळी आकर्षक विद्युत झगमगाटात छान वाटणारी ही झाडे थोड्याच दिवसात मोडकळीस आली. कारंजे बसविताना त्यांच्यावर रंगीत दिव्यांचा प्रकाश सोडण्याचा प्रकार अनेक उद्यानात करण्यात आला. मात्र थोड्याच दिवसात हे कारंजे, दिवेही बंद पडले, कारंज्यांचा जागेच्या फरशा निखळून पडल्या, लोखंडी पाइपलाइनचे पाइप भुरट्या चोरट्यांनी लंपास केले अशी स्थिती पंचवटीतील बहुतांशी उद्यानात दिसत आहे.

जुगारींसाठी आवडीचे ठिकाण

उद्यानांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या भोवती भिंतीचे किंवा तारेचे संरक्षण कुंपण करण्यात येते. मात्र, थोड्याच दिवसात तारेचे कुंपणाच्या अँगलसह तारही गायब केली जाते. मोकाट जनावरांचा या उद्यानांमध्ये सुळसुळाट असल्याने उद्यानातील सौंदर्य नष्ट झाले. कृष्णनगर उद्यानाने सुरवातीच्या काळात नाशिक शहरातील सर्वात आदर्श उद्यान म्हणून नावलौकिक मिळविला होता. येथे लहान मुलांसाठी सर्व प्रकारची खेळणी तर होती. शिवाय येथील मिनी ट्रेन शहरातील आकर्षण ठरली होती. सायंकाळच्या वेळी गर्दीने फुलून जाणाऱ्या या उद्यानातील ही ट्रेन गेली कित्येक वर्षांपासून बंद पडलेली आहे. दुरवस्था झालेल्या गणेशवाडी उद्यानासारख्या उद्यान तर जुगारींसाठी अड्डा बनला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुलाबी थंडीची लागली चाहूल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑक्टोबर महिना संपत आला असून, शहरात आता हळुहळू थंडी जाणवू लागली आहे. ऑक्टोबर ह‌िटने कडाक्याच्या उन्हाचा अनुभव नाशिककरांना दिल्यानंतर शहरवासियांना आता थंडीची चाहूल लागली आहे. किमान तापमानातही घट झाली असून, पहाटे पडणाऱ्या धुक्यामुळे शहरात गारवा निर्माण होत आहे. त्यामुळे सकाळी व रात्री बाहेर फिरणाऱ्यांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे.

दिवाळी आणि थंडी हे समीकरणच असते. दिवाळी संपताच व काहीवेळा दिवाळीच्या काळातच थंडीची जाणीव होत असते. सध्या परतीचा पाऊस ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत स्थिरावल्याने यंदा थंडीचा कहर होणार, असा अंदाज सामान्य नागरिकांकडून बांधण्यात येत होता. त्याचाच अनुभव येऊ लागल्याचे चित्र सध्या आहे. गेल्या आठवडाभरापासून किमान तापमानात घट झाली आहे. दरम्यान, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून चांगली थंडी पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.


उबदार कपड्यांना मागणी

वर्षभरापासून कपाटात ठेवून दिलेले स्वेटर, कानटोपी, मफलर, जॅकेट्स थंडीमुळे आता बाहेर काढण्यात येत आहे. तर ऐन थंडीमध्ये उबदार कपड्यांचे भाव वाढतील की काय, या दृष्टीकोनातून आताच उबदार कपडे घेण्यासाठी पसंती दिली जात आहे. दिवाळी झाल्याने आता कपडे विक्रेत्यांनीही उबदार कपडे दुकानांच्या दर्शनी भागात लावण्यास सुरुवात केली आहे.

तापमानात घट

दिनांक कमाल किमान तापमान

२५ ऑक्टोबर ३२.३ १३.८

२४ ऑक्टोबर ३२.५ १३.४

२३ ऑक्टोबर ३१.८ १९.४

२२ ऑक्टोबर ३०.७ २१.६

२१ ऑक्टोबर ३२.२ २१.०

२० ऑक्टोबर ३३.७ १५.६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नगररचना’चा कारभार झाला ऑनलाइन!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या नगररचना विभागातील बांधकाम परवानगीचा संथ प्रवास थांबला असून, नगररचना विभागात जूनपासून ऑटो डीसीआर यंत्रणा कार्यान्वीत झाली आहे. त्यामुळे नगररचना विभागातील फाइल्सचा होणारा गमतीशीर प्रवास थांबला असून, गैरप्रकारांनाही चाप बसला आहे. जूनपासून सुरू झालेल्या ऑटो डीसीआर प्रणालीमुळे आतापर्यंत नगररचनाकडे २८१ प्रस्ताव ऑनलाइन दाखल झाले आहेत. त्यापैकी ५५ प्रस्ताव तांत्र‌िक चुकांमुळे फेटाळण्यात आले आहेत. दाखल २८१ पैकी आतापर्यंत ४५ बांधकामांना ऑनलाइन परवानगी मिळाली असून, १८१ प्रस्ताव पाइपलाइनमध्ये आहेत. त्यामुळे नगररचनेतील खाबूगिरीला काही प्रमाणात चाप बसला आहे.

महापालिका क्षेत्रात बांधकाम परवानगी, अभिन्यास मंजुरी, भोगवटा प्रमाणपत्रासह अनेक परवानग्या नगररचना विभागातर्फे दिल्या जातात. यापूर्वी या विभागातील फाइल्सचा प्रवास हा ‘मॅन्युअली’ होत असल्याने अनेक फाइल्समध्ये त्रुटी असतानाही त्या मंजूर केल्या जात होत्या. तसेच या विभागात केवळ वजनदार फायलींचाच प्रवास सुसाट होऊन कपाटांसारखे प्रश्न निर्माण झाले होते. बिल्डरांकडून फाइल्स बांधकाम नियमावलीनुसार मंजुरीला टाकली जात असली, तरी प्रत्यक्षात बांधकाम अतिरिक्त केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे हा विभाग नेहमीच वादात सापडतो. त्यामुळे या विभागातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ऑनलाइन परवानगी देण्याचा निर्णय आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी घेतला होता. त्यानुसार ही यंत्रणा सध्या पालिकेत कार्यान्व‌ित झाली आहे.

महापालिकेने पुण्यातील सॉफ्टेक इंजिनीअर्स प्रा. लि. कंपनीला काम दिले असून, जूनपासून नगररचना विभागात या प्रणालीद्वारे कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. त्यामुळे नव्या फाइल्सचा प्रस्ताव थांबला असून, नगररचना विभाग ऑनलाइन झाला आहे. जूनपासून आतापर्यंत जवळपास २८१ प्रस्ताव ऑनलाइन दाखल झाले आहेत. त्यात ४५ प्रस्ताव नियमानुसार असल्याने त्यांना मंजुरी मिळाली असून, १८१ प्रस्तावांची छाननी सुरू आहे. ५५ प्रस्ताव फेटाळण्यात आले आहेत. ऑटो डीसीआर प्रणालीत इमारत आराखडा अर्ज व नकाशे ऑनलाइन सादर केले जात असून, बिल्ड‌िंग बायलॉजनुसार आपोआप ऑनलाइन मंजुरी मिळत असल्याने वाढीव बांधकामांना आळा बसला आहे. इमारत आराखड्याची छाननी, मंजुरी प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर एसएमएस व इमेल अलर्ट, साईट व्हिजिट, सर्व शुल्क ऑनलाइन झाले आहे.


जाचातून सुटका

नगररचनात ऑटो डीसीआर यंत्रणा कार्यान्व‌ित झाल्याने बिल्डरांची व सर्वसामान्यांची ‘नगररचना’ च्या जाचातून सुटका झाली आहे. संबंधित बिल्डरने नियमावलीनुसार ऑनलाइन कागदपत्रांचे सादरीकरण केले असेल, तर त्याच्या फाइल्सला पंधरा दिवसात परवानगी दिली जात आहे. ऑटो डीसीआर प्रणालीमुळे ‘नगररचना’च्या कामात गतिमानता, पारदर्शकता येऊन महसुलाचे उद्दिष्ट वाढले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोडशेडिंग काळातील वीजखरेदी स्वस्तच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

लोडशेडिंगच्या काळात महावितरणने खरेदी केलेली वीज स्वस्तच असल्याचे स्पष्टीकरण महावितरणने दिले आहे.

महावितरणने अल्पकालीन वीजखरेदी सरासरी ५ रुपये ५० पैसे दराने केल्याचा झालेला आरोप ग्राहकांची दिशाभूल व महावितरणविषयी गैरसमज पसरविणारा आहे. महावितरणने ग्राहकहीत लक्षात घेऊन नेहमीच अल्पकालीन कराराची वीज प्रतियुनिट ४ रुपयांपेक्षा कमी दराचीच घेतली आहे. कमाल मागणीच्या काळातही सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यासाठी घेतलेल्या विजेचा २४ ऑक्टोबर २०१७ पर्यंतचा प्रतियुनिट सरासरी दर हा ३ रुपये ८९ पैसे एवढाच राहिला आहे, असे कंपनीने पत्रकात म्हटले आहे.

महावितरणने ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांसाठी विजेची वाढलेली मागणी लक्षात घेऊन वीज नियामक आयोगाच्या परवानगीने अल्पकालीन कराराद्वारे वीज खरेदी केली आहे. या वीज खरेदीच्या प्रक्रियेमुळे ग्राहकांचे भारनियमन कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. सप्टेंबर व ऑक्टोबर २०१७ मध्ये कोळशाच्या उपलब्धतेत आलेल्या अडचणीमुळे तसेच महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून केलेल्या करारानुसार वीजपुरवठा कमी होत असल्याने विजेची उपलब्धता वाढविण्यासाठी महावितरणने ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात अल्पकालीन निविदा काढल्या होत्या. विजेची मागणी आणि पुरवठ्याचा मेळ घालण्यासाठी दररोज पॉवर एक्सचेंजमधूनही बोली लावून वीज मिळविण्यासाठी प्रयत्न केले. देशभरातच विजेची टंचाई असल्याने सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पॉवर एक्सचेंजचे दर ५ रुपये ६२ पैशांपासून कमाल मागणीच्या काळात ते ९ रुपये ३७ पैसे प्रतियुनिटवर पोहचले होते. अल्पकालीन निविदेचे जास्तीत-जास्त दर प्रतियुनिट ५ रुपये ५० पैसे इतके होते. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन अल्पकालीन वीजखरेदीची ४ रुपये प्रतियुनिटची मर्यादा वाढवून मिळावी, यासाठी महावितरणने आयोगाकडे याचिका दाखल केली होती. यासोबत अल्पकालीन निविदांची माहितीही आयोगाला दिली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरपुरचे चार पोलिस कर्मचारी निलंबित

$
0
0

अर्थपूर्ण व्यवहाराचा ठपका

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्ह्यातील शिरपूर पोलिस ठाण्यातील चार पोलिस कर्मचार्‍यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. शिरपूर पोलिस निरीक्षक संदीप सानप यांनी पाठवलेल्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक एम. रामकुमार यांनी दिली आहे.

निलंबित कर्मचारी हे शिरपूर टोल नाक्याजवळ दि. १८ ऑक्टोबरला एका घटनेत अर्थपूर्ण व्यवहारात अडकल्याची चर्चा आहे. यासंदर्भात शिरपूर पोलिस निरीक्षक सानप यांनी गोपनीय अहवाल पोलिस अधीक्षकांकडे पाठवला होता. त्यावर पोलिस अधीक्षक एम. रामकुमार यांनी चारही कर्मचार्‍यांना निलंबित केले आहेत. निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये युवराज पवार, प्रवीण नेरकर, साबीर शेख, पंकज राजपूत निलंबित झाले आहेत. या कारवाईमुळे जिल्हा पोलिस दल हादरून गेले असून, एकाच वेळी चार कर्मचारी निलंबित झाल्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे. दोषी कर्मचाऱ्यांसह असलेल्या अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई व्हावी, अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

असून थांबा, बस धावतात विनाथांबा!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, ओझर

शहर आणि ग्रामीण बस वाहतुकीचे केंद्र असलेल्या ओझर बस स्थानकात थांबा असूनही अनेक चालक बस स्थानकात न येताच सरळ पुढे निघून जातात. त्यामुळे बसस्थानकात प्रतीक्षा करत असलेल्या प्रवाशी वर्गाला मनस्ताप सहन करावा लागतो.

राज्य परिवहन महामंडळाची बस खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचली आहे. ‘गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी’ हे घोषवाक्य सार्थ ठरवित महांमडळाच्या एसटीने संबंध राज्य जोडले. मात्र, एसटीच्या ब्रिदांच्या विरूद्ध चित्र ओझर येथे पहायला मिळते. मुंबई-आग्रा महामार्गाचे विस्तारीकरण झाल्यापासून वाहनांचा वेग प्रचंड वाढला असून, अनेक एसटी बस ओझरला न थांबताच पुढे निघून जातात. त्यामुळे राज्याच्या विविध भागांत जाण्यासाठी बस स्टँडमध्ये आलेल्या प्रवाशांची पंचाईत होते. त्यांना दुसऱ्या गाडीची वाट पाहत ताटकळत बसावे लागते.


टॅक्सीने जाण्याची वेळ

नाशिक–सटाणा, नांदगाव मनमाड, मालेगाव अशा अनेक गावांतील बसेसला ओझर स्थानकाचा थांबा असला, तरी काही बसचालक त्याकडे दुर्लक्ष करीत गाडी पुढे दामटतात. त्यांच्या मुजोरीमुळे प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागतो. अनेकदा विद्यार्थी अथवा नोकरदार वर्गाला योग्य वेळी पोहचता येत नाही किंवा पर्यायी मार्गाने अथवा टॅक्सीने जाण्याची वेळ येते. त्यामुळे एसटी महामंडळाचे नुकसानदेखील होते.

अपमानास्पद वागणूक

प्रवाशांनी कर्मचाऱ्यांबाबत महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली तरी त्याकडे लक्ष दिले जात नाही. उलट कर्मचाऱ्यांच्या वागणुकीचे समर्थन केले जात असल्याचे प्रवाशी सांगतात. अनेकदा प्रवाशांना अपमानास्पद वागणूक दिली जाते, तसेच त्यांच्याशी अरेरावीची भाषाही केली जाते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन अशा मुजोर चालक आणि वाहकांवर कारवाई करून शिस्त लावावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

लांबच्या बसची मनमानी

एचएएलमुळे धुळे, जळगाव, नंदुरबार, सटाणा, मालेगाव येथील मोठा कामगारवर्ग ओझर येथे वास्तव्यास आहे. पण सुट्टीच्या वेळी गावी जाण्यासाठी लांब पल्ल्याच्या बसेस ओझर येथे थांबत नाहीत. त्यामुळे त्यांना बस पकडायला पुन्हा नाशिकला यावे लागते. यात वेळ आणि पैसा खर्च होतो. शिवाय मनस्ताप सहन करावा लागतो किंवा पर्यायी सोयीने जावे लागते.

ओझर बस स्थानकात थांबा असूनही बऱ्याचदा बसेस बाहेरूनच निघून जातात. त्यामुळे बसची वाट पाहत तास न् तास थांबावे लागते. अशा बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी.

- अजित कोकाटे, प्रवासी

नाशिक आगाराच्या नांदगाव, सटाणा, मालेगाव अशा सर्व गाड्यांना ओझरचा थांबा आहे. काही अपवाद वगळता सर्व गाड्या बस स्थानकात येतात. लांब पल्ल्याच्या गाड्या बाहेर थांबतात.

- एल. पी. डोंगरे, प्रभारी वाहतूक नियंत्रक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुविधांअभावी अभ्यासिका बंद पडण्याच्या मार्गावर

$
0
0

विहितगावच्या अभ्यासिकेकडे विद्यार्थ्यांची पाठ

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

स्पर्धा परीक्षांकडे विद्यार्थ्यांच्या कल वाढावा याकरिता विहितगावसह पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांची अभ्यासासाठी सोय व्हावी या उद्देशाने गेल्या ४ वर्षांपूर्वी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने अभ्यासिका सुरू करण्यात आली. या अभ्यासिकेकडे विद्यार्थी प्राथमिक सुविधांअभावी पाठ फिरवत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. खिडक्यांची दुरवस्था, कपाटात पुस्तकेच नाही अशा समस्यांनी ग्रस्त ही अभ्यासिका बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

नाशिक महापालिका हद्दीत समाविष्ट असलेल्या देवळालीगाव, विहितगाव, पिंपळगाव खांब, दाढेगावसह पंचक्रोशीतील अनेक गावांसाठी ही अभ्यासिका खूप महत्त्वाची आहे. सुमारे १२० विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या अभ्यासिकेत एका टेबलावर ४ विद्यार्थी असे १२ टेबल व बसण्याची सोय येथे आहे. नाशिकरोडच्या जवाहर मार्केट येथील अभ्यासिकेत विद्यार्थ्यांना जागा उपलब्ध होत नसल्याने दिवंगत नगरसेवक उत्तमराव हांडोरे यांचे स्वप्न असलेली ही अभ्यासिका गेल्या ४ वर्षांपूर्वी खासदार हेमंत गोडसे व नगरसेविका सुनीता कोठुळे यांच्या प्रयत्नाने साकार झाली. मात्र अभ्यासिकेत सुरुवातीपासूनच स्वच्छतागृहाची कुठलीच सोय करण्यात आलेली नसल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे.

विद्यार्थ्यांच्या भरवशावर व्यवस्थापन

सुरुवातीच्या काळापासून येथे अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थी सुविधा मिळेल या आशेने येथील नगरसेवकांकडे पाठपुरावा केला. मात्र आवश्यक सुविधा मिळत नसल्यामुळे विद्यार्थिनी तर येण्याचे टाळतात. यामुळे विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर गळती सुरू आहे. यासोबत अभ्यासिकेत कुणीही व्यवस्थापक नेमला नसल्याने विद्यार्थ्यांच्या भरोशावर मनपाची ही अभ्यासिका सुरू आहे. नुकतेच महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांचा दौरा नाशिकरोड विभागातील प्रभागांमध्ये विविध समस्यांची पाहणी करण्याकरिता आयोजित करण्यात आला होता मात्र वेळेवर आयुक्तांनी दौरा उरकता घेतल्याने ही समस्या पोहोचलीच नाही.

कपाटे आहेत पण पुस्तके नाही

स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी या उद्देशाने मनपाने येथे कपाटे उपलब्ध करून दिली आहेत. मात्र त्या कपाटामध्ये वाचनासाठी आवश्यक असलेले एकही पुस्तक उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. त्यामुळे कपाटांचा वापर चपला बुट अन् झाडू ठेवण्यासाठी केला जात आहे. अभ्यास करताना व्यत्यय यायला नको म्हणून साऊंडप्रूफ दारे व खिडक्या अभ्यासिकेत असणे आवश्यक आहे. सध्या पत्र्याने बनवलेल्या खिडक्यांमुळे बाहेरील आवाज सहज आत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ऐकू येतो. यामुळे अभ्यासात व्यत्यय निर्माण होऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे विद्यार्थ्यांना अशक्य होत आहे.

नगरसेवकांचे आश्वासन

येथील विद्यार्थ्यांना प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत नगरसेवक केशव पोरजे व नगरसेविका सुनीता कोठुळे यांना 'मटा'ने विचारणा केली असता येत्या पंधरा दिवसांत विद्यार्थ्यांना भेडसावणारी प्रमुख स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. गेल्या ४ वर्षांत जे होऊ शकले नाही ते आता होणार का याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेले आहे.

या अभ्यासिकेच्या सुरुवातीच्या काळापासून येथे विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहाची कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. - अक्षय मुठाळ, विद्यार्थी

अभ्यासिकेच्या शेजारी असलेल्या शाळेच्या गोंगाटात विद्यार्थ्यांना अभ्यास करता येणे शक्य होत नाही. तसेच शेजारच्या मंगल कार्यालयात लग्न असले की, येणाऱ्या आवाजामुळे अभ्यास करणे जिकरीचे होऊन जाते. - रवी बोराडे, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवीन विकासकामांना ब्रेक

$
0
0

नवीन विकासकामांना ब्रेक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत सत्ताधाऱ्यांनी पालिकेत सुरू केलेल्या कोटीच्या कोटी उड्डाणांमुळे आठ मह‌िन्यांतच पालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. ७५ लाखांचा नगरसेवक निधी आणि २५७ कोटींच्या रस्ते डांबरीकरणामुळे तिजोरीवर साडेतीनशे कोटींचा भार पडला असून, स्पीलओव्हर ८११ कोटींवर पोहचला आहे. त्यामुळे लेखा विभागाने सर्व विभागांना अलर्ट दिला असून, नवीन विकास कामांना ब्रेक लावण्याचे फर्मान काढले आहे.

आता नवीन विकासकामांचे प्रस्ताव सादर करण्यापूर्वी लेखा विभागाशी सल्ला मसलत करावी लागणार आहे. पुढील पाच महिने पालिकेची स्थिती बिकट राहणार आहे. स्मार्ट सिटीच्या हप्त्यावरून त्याचा अंदाज आला असून, पालिकेने स्मार्ट सिटीचा आपला ४५ कोटींचा हप्ता अजूनही पूर्ण केलेला नाही.

महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपने आठ महिन्यांतच तिजोरीचे कंबरडे मोडले आहे. पालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसतानाही प्रशासनाने सादर केलेले चौदाशे कोटींचे बजेट २१०० कोटींवर नेले. ७५ लाखांच्या नगरसेवक निधीसाठी महापौरांनी प्रशासनाकडे हट्ट धरल्याने तिजोरीची क्षमता नसतानाही प्रशासनाला हट्ट पुरवावा लागला. मनसेच्या काळातील दोनशे कोटींची कामे कमी करून प्रशासनाने पालिकेचा स्पीलओव्हर जेमतेम ४५० कोटींपर्यत खाली आणला होता. त्यामुळे नगरसेवक निधीचा बोजा तिजोरीवर फारसा जाणवला नव्हता. नगरसेवक निधीमुळे तिजोरीवर शंभर कोटींचा बोजा पडला असतानाच, गरज नसतानाही सत्ताधाऱ्यांनी शहरात तब्बल २५७ कोटींचे रस्ते डांबरीकरणाचे काम हाती घेऊन पालिका दिवाळखोरीकडे नेली आहे.

९६ कोटींचा नगरसेवक निधी आणि २५७ कोटींच्या डांबरीकरणाच्या कामांमुळे पालिकेच्या स्पीलओव्हरने आठशे कोटींचा टप्पा पार केला आहे. भाजपने आठ महिन्यांतच जवळपास साडेतीनशे कोटींचा बार उडवल्याने स्पीलओव्हर ८११ कोटींवर जाऊन पोहचला आहे. सप्टेंबरपर्यंत पालिकेचे उत्पन्न साडेआठशे कोटींचे आहे. त्यामुळे ८११ कोटींचा स्पीलओव्हर हा तिजोरीला मानवणारा नाही. परिणामी, लेखा विभागाने सर्व विभागांना अलर्ट करत, यापुढे नवीन विकास कामांचे प्रस्ताव सादर न करण्याचे फर्मान काढले आहे. त्यामुळे मार्चपर्यंत नव्याने विकासकामे हाती घेणे शक्य नसल्याने पालिकेचा कारभार आता पाच महिने जवळजवळ थांबल्यातच जमा आहे. नवीन कामांसाठी आता नवीन आर्थिक वर्षाची वाट पहावी लागणार आहे.

स्मार्ट सिटीसाठी निधी नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्वाकांक्षी योजना असलेल्या स्मार्ट सिटीसाठी पालिकेच्या तिजोरीत पैसा नसल्याचे चित्र आहे. सत्ताधारी भाजपकडून रस्त्यांवरील डांबरासाठी कोट्यवधींचा बार उडवत असताना स्मार्ट सिटीसाठी पालिकेचा ४५ कोटींचा पहिला हप्ता देण्यासाठीही पुरेसा निधी नाही. जेएनएनयूआरएम, अमृत, मुकणे पाणीपुरवठा योजना, एसटीपीसाठी निधी लागत असल्याने स्मार्ट सिटीसाठी आतापर्यंत ३० कोटी रुपयेच देता आले आहेत. त्यामुळे अजूनही १५ कोटींची जमवाजमव लेखा विभाग करत असताना सत्ताधारी मात्र रस्त्यांवर कोट्यवधींची उधळण करीत आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या योजनाच अडचणीत आल्या आहेत.

पदाधिकाऱ्यांच्या वाहनांवर उधळण

महापालिकेचे सभागृहनेते, स्थायी समिती सभापती, विषय समित्यांचे सभापती व विरोधी पक्षनेत्यांसाठी दिवाळी गोड झाली असून, या पदाधिकाऱ्यांना नवीन आल‌िशान गाड्या मिळाल्या आहेत. पालिकेने या पदाधिकाऱ्यांसाठी ११ नवीन वाहने खरेदी केली असून, ही वाहने पदाधिकाऱ्यांच्या दिमतीला दाखल झाले आहेत. त्यामुळे पालिकेतील वाहनांची संख्या आता सव्वादोनशेवर पोहचली असून, उपसभापतींच्याही वाहनांची हौस पूर्ण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नाशिककरांऐवजी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाच ‘अच्छे दिन’ आले आहेत.

महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर भाजपने नगरसेवकांच्या सोयीसाठी भारंभार पदांची निर्मिती केली आहे. नव्याने तीन समित्यांची स्थापना करून त्या प्रत्येक सभापती व उपसभापतींना केब‌िन व नवीन वाहने देण्याचा चंग बांधला होता. यासाठी पालिकेच्या तिजोरीकडे दुर्लक्ष करण्यात आले. महापालिकेच्या तिजोरीवर त्याचा किती बोजा पडेल, याचा हिशेब न करता प्रत्येकाला वाहने खरेदीचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणीही करण्यात आली. नवीन ११ वाहने खरेदी करण्यासाठी पालिकेच्या तिजोरीतून एकूण ९४ लाख रुपये वाहनांवर खर्च करण्यात आले आहेत.

दिवाळी संपताच खरेदी केलेली नवीन ११ वाहने पदाधिकाऱ्यांच्या सेवेत दाखल झाली आहेत. स्थायी समिती सभापती, सभागृह नेता व विरोधी पक्ष नेत्यांसाठी प्रत्येकी एक अशा तीन सियाझ कार, सातपूर, नाशिकरोड, पूर्व व पंचवटी प्रभाग समिती सभापतींसाठी प्रत्येकी एक अशा चार डिझायर तर नव्याने स्थापन झालेल्या शहर सुधार समिती, विधी व वैद्यकीय व आरोग्य समिती सभापतींसाठी प्रत्येकी एक अशा तीन डिझायर, तर महिला व बालकल्याण समिती सभापतींसाठी एक स्विफ्ट डिझायर कार देण्यात आली आहे. महापालिकेचे पदाधिकारी व अधिकारी मिळून पालिकेच्या यांत्रिकी विभागाकडे सध्या सव्वादोनशेहून अधिक छोटी, मोठी वाहने आहेत. त्यात आता नव्याने अकरा वाहनांची भर पडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदिनी नदीपात्र ठरतेय प्लास्टिक कचऱ्याचे आगार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक-पुणे मार्गावरील नंदिनी नदीत प्लास्टिकचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. येथे केरकचराही टाकला जात असून, मातीमुळे नदीचे पात्र अरुंद झाले आहे. त्याचा त्रास वाढला असून, तातडीने या पात्रातील प्लास्टिक हटविण्याची मागणी होत आहे.

नंदिनी नदीवर पूर्वी एकच पूल होता. त्यानंतर वाहतूक वाढल्याने दुसरा पूल उभारण्यात आला आहे. तर द्वारकेपासून नाशिकरोड जाताना पुलाचा कठडा तुटलेला आहे. येथून नदीत जाण्यासाठी उतार असून, तेथेच जास्त प्रमाणात नागरिकांकडून कचरा टाकला जातो. यामध्ये प्लास्टिक कचरा जास्त असतो. या कचऱ्यामुळे नदीच्या पाण्याला अडथळा होत आहे. हा कचरा उचलण्याची तसदीही महापालिका प्रशासन घेत नाही, त्यामुळे याठिकाणी कचरा वाढतच आहे.

तुटका कठडा

जुन्या पुलाचा कठडा तुटला आहे. काठे गल्लीचा सिग्नल सुटल्यावर वाहनचालक वेगाने नाशिकरोडकडे जातात. वाहनाचे नियंत्रण सुटले की, नंदिनी नदीत पडण्याचा धोका आहे. काही वर्षांपूर्वी जीप पुलाच्या कठड्याला धडकली होती. त्यानंतर एक दुचाकीचालक नदी पात्रात पडला होता. अशा अनेक अपघाताच्या घटना या रस्त्यावर झाल्याने हा रस्ता वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे पुलाचा कठडा तोडून नवीन कठडा बांधण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे. समाजकल्याण कार्यालयाच्या बाजूच्या पुलाचे लोखंडी पाइप तुटलेले आहेत. या बाजूच्या पात्रातही दोन वर्षांपूर्वी कार कोसळली होती. त्यामुळे याचीही दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन लाखांची लाच घेताना मुख्‍याधिकाऱ्यास अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर हरिभाऊ गवळी यांना बुधवारी (दि. २५) दुपारी दोन लाखांची लाच मागितल्याप्रकरणी नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. तक्रारदार शेतकऱ्याकडून गवळी यांनी शेतजमीन एन. ए. करण्यासाठी दोन लाखांची लाच मागितली होती. विशेष म्हणजे ज्यादिवशी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली त्याचदिवशी गवळी यांनी शेतकऱ्याकडून दोन लाख मागितले होते.

याप्रकरणी शहादा पोलिस ठाण्यात डॉ. सुधीर गवळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ट्रॅपनंतर संपूर्ण शहादा शहरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांनी नगरपालिकेत आणि पोलिस ठाण्यात गवळींना पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. ही कारवाई नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक शिरीष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पोलिस निरीक्षक संगीता पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समितीत लिलाव पाडले बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलहॉलच्या जागेतील गाळेधारकांना बुधवारी नोटिसा पाठवून गाळे सील करण्यात आल्याने व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त करीत लिलाव बंद पाडले. आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीला जाब विचारला. या मुद्यावर सभापती शिवाजी चंभळे यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर शेतकरी, व्यापाऱ्यांचा राग शांत झाला. थांबलेले लिलाव पुन्हा सुरू करण्यात आले.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलहॉलच्या जागेत केवळ १२ व्यापाऱ्यांचे गाळे आहे. या गाळ्यांचा सध्याचा आकार २४ बाय २७ ते ४७ बाय ५४ फूट असा मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनी येथील मोठी जागा व्यापली आहे. बाजार समितीच्या मते एका व्यापाऱ्याला एवढ्या मोठ्या जागेची आवश्यकता नसते. या जागेवर या व्यापाऱ्यांनी पोट भाडेकरून नेमले आहेत. त्यामुळे बाजार समितीला कमी प्रमाणात परवाना शुल्क मिळते. याच जागेवर १२ बाय २५ चौरस फुटाचे ६२ गाळे तयार करण्याचा बाजार समितीचा मानस आहे. या मोठ्या प्रमाणात गाळ्यांची उपलब्धता करून दिल्यानंतर १२ व्यापाऱ्यांच्या जागेवर ६२ व्यापाऱ्यांना गाळे उपलब्ध होतील. म्हणून या व्यापाऱ्यांना नोटिसा पाठविल्या. त्यांनी या नोटिसांना प्रतिसाद दिला नसल्याने बुधवारी त्यांचे गाळे सील करण्यात आले. त्याचा निषेध व्यक्त करीत व्यापाऱ्यांनी दुपारचे लिलाव करायचे नाही, असा निर्णय घेतला. लिलावाची वेळ होऊनही व्यापाऱ्यांनी लिलाव सुरू केले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप झाला. त्यांनी अगोदर व्यापाऱ्यांना घेरून जाब विचारला नंतर मोर्चा बाजार समितीच्या कार्यालयाकडे वळविला. नंतर शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेऊन सभापती चुंभळे यांना जाब विचारला आणि प्रश्नांची सरबत्ती केली. व्यापाऱ्यांनीही सभापती चुंभळे यांची भेट घेतली. यानंतर त्यांना बाजार समितीची भूमिका स्पष्ट करण्यात आल्यानंतर लिलाव सुरू करण्यात आले. संचालक जगदीश अपसुंदे यांनी अर्ध्या तासाच्या आत लिलाव सुरू करण्याची शेतकऱ्यांना ग्वाही दिली.

सभापती चुंभळेंशी चर्चा

व्यापाऱ्यांनी सभापती चुंभळे यांची भेट घेतली. यानंतर त्यांना सेलहॉलच्या जागेत बांधण्यात येणाऱ्या गाळ्यांमध्ये व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार जास्त जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे सभापतींनी सांगितले. यामुळे व्यापाऱ्यांनी बंद मागे घेत लिलावास सुरुवात केली. काही काळ तणावग्रस्त झालेले बाजार समितीतील वातावरण शांत झाले.

नेमक्या किती नोटिसा पाठविल्या?

बाजार समितीने सेल हॉलमधील केवळ १२ व्यापाऱ्यांना नोटिसा पाठविल्याचे सांगितले आहे. मात्र, दिवसातील २४ तास चालणाऱ्या बाजार समितीमध्ये कार्यरत ३५० व्यापाऱ्यांना नोटिसा पाठविण्यात आल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे नेमक्या नोटिसा पाठविल्या गेल्या तरी किती, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सेलहॉलच्या जागेत असलेल्या १२ व्यापाऱ्यांचाच हा विषय आहे. अधिकाधिक व्यापाऱ्यांना जागा उपलब्ध व्हावी, त्या दृष्टीने ६२ गाळे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात दुसऱ्या बाजूच्या पत्र्यांच्या शेडच्या गाळ्यातील व्यापाऱ्यांची काहीच अडचण नाही. मात्र, त्यांची दिशाभूल करण्यात आल्याने लिलाव बंद पाडण्याचा प्रयत्न झाला. वस्तूस्थिती समजावून सांगितल्यानंतर लिलाव सुरू झाले.
- शिवाजी चुंभळे, सभापती, बाजार समिती

अगोदरच अस्मानी संकटाने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातून कसेबसे वाचलेल्या पिकाला चांगला भाव मिळत असताना लिलाव बंद पाडण्याचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे. अगोदर कळविले असते तर भाजीपाला विक्रीसाठी आणलाच नसता.
- देविदास जाधव, शेतकरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकच्या जनतेला विचारेना कोणी!

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगरपालिकेस मुख्याधिकाऱ्यांची प्रतिक्षा लागली आहे. मुख्याधिकारी डॉ. चेतना केरूरे या वैद्यकीय रजेवर गेल्याने प्रशासनास प्रभारी मुख्याधिकारी म्हणून कोणाकडे कार्यभार देणार याचीच बुधवारी दिवसभर कार्यालयात प्रतिक्षा होती. सायंकाळी कार्यालय बंद झाले तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतीही हालचाल नव्हती. तसेच नगरसेवकही निवडणुकीच्या तयारीत असल्यामुळे त्र्यंबकच्या जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास कोणीही तयार नाही.

दरम्यान त्र्यंबकेश्वरचे नागरी जीवन समस्यांनी त्रस्त झाले आहे. सुमारे पंधरा दिवसांपासून पालिकेत मुख्याधिकारी आलेले नाहित. दिवाळीच्या निमित्ताने इच्छुक उमेदवार इच्छुक उमेदवार मिठाई भेटवस्तूंचा वर्षाव करत असतांना मूलभूत नागरी समस्यांसाठी मात्र नागरिकांना झगडावे लागत आहे.

दिवाळीसण साजरा करत असतांना एक दिवस सफाई विभागाच्या कामगारांनी बंद ठेवला. तेव्हा नगरपलिका फंडात खडखडाट असल्याने ठेकेदाराचे देयक रखडल्याचे समोर आले. विशेष म्हणजे याबाबत तोडगा काढण्यासाठी नगरपालिका प्रशासनाचे मुख्याधिकारीच येथे नसल्याने दीपोत्सवाच्या पहिल्या दिवशी शहर स्वच्छता झालीच नाही. दुसऱ्या दिवशी रखडलेले देयक मार्गी लावले. अर्थात तेव्हा पूर्ण थकलेले बील दिलेले नसल्याचे सांगण्यात येत होते. दिवाळीत सर्वत्र झगमगाट असतांना पाचआळी भागात आणि अन्य काही ठिकाणी पथदिप बंद होते. नगरपालिका पथदिप व्यवस्थापनाचा ठेका देण्यात आला आहे. संबंध‌ित ठेकेदाराने कर्मचारी कामावर आले नाही असे सांग‌ितले आहे. फटाका विक्रेत्यांच्या समस्येवर असाच घोळ आठवडाभर घालण्यात आला. नगरपालिका कर वसुली करतांना धडक मोहीम हाती घेत असते. मध्यंतरी थकबाकीदार नागरिकांची नावे ध्वनीक्षेपकाद्वारे जाहीर करण्यात आली. वसुलीचे उद्द‌िष्टे गाठण्यासाठी व जिल्हाप्रशासनाकडून शाबसकी मिळविण्यासाठी प्रशासन कायम अगेसर असते. मात्र अशी तत्परता मूलभूत सुविधा देतांना का दाखवत नाहीत असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत.

नगरसेवकांना निवडणुकीचे वेध

त्र्यंबक नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पुढील महिन्यात होत आहे. नगर सेवकांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे त्यांचे पालिकेत फिरकणे कमी झाले आहे. तर मुख्याधिकारी पंधरा दिवसांपासून रेजेवर आहेत. प्रशासनाचा गाडा असा सुस्तावला आहे. नागरिकांच्या समस्या दूर करण्यापेक्षा त्यांना शुभेच्छा देऊन खूष करण्यासाठी विद्यमान आणि इच्छुक पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या शुभेच्छा घेताना नागरिकांचा संताप होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images