Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

एकाच घरातील तीन दुचाकी जाळल्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक शहरात वाहने जाळपोळीचे प्रकार सुरूच असून, प्रबुद्धनगरमधील एकाच घरातील तिघा भावांच्या दुचाकी टवाळखोरांनी पेटवून दिल्याने परिसरात घबराट पसरली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सात संशयितांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे ताब्यात घेतलेल्यांपैकी कोणाशीच काही संबंध नसल्याचे दुचाकीमालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे केवळ दहशत पसरविण्यासाठीच असे प्रकार सुरू आहेत की काय, अशी चर्चा परिसरात सुरू होती. याबाबत सातपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसीतील प्रबुद्धनगरला रामसिंग, करमसिंग व मिथून माचरेकर हे भाऊ राहतात. नेहमीप्रमाणे तिघांच्या दुचाकी बाहेर लावलेल्या असताना मध्यरात्री अचानक या तिघांच्या दुचाकी पेटवून दिल्याचे लक्षात आले. या तीनही दुचाकींचा अक्षरशः कोळसा झाला. याबाबत सातपूर पोलिसांना माहिती दिल्यावर सहाय्यक पोलिस निरीक्षक देवरे घटनास्थळी दाखल झाले. दुचाकी जाळल्याचा प्रकार समोरच महिंद्रा कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलिसांनी त्या आधारावर तपास सुरू केला. त्या आधारे पोलिसांनी सात संशयितांना ताब्यात घेतले.

यापैकी कोणाशी माचरेकर कुटुंबाचा काहीच संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे या कुटुंबाचा कोणाशी काहीच वाद नसताना हा प्रकार घडला. माचरेकर यांची दोन मुले चारचाकी वाहने चालवतात तर एक भाऊ दुकानावर कामाला असतो. नेहमीच कामात व्यस्त राहणाऱ्या तिघांच्या दुचाकींची जाळपोळ करण्यात आल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. यातून केवळ दहशत पसरविण्याचाच उद्देश असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

शेळ्याचोरीतील संशयिताचा सहभाग

काही महिन्यांपूर्वी नगरसिंग माचरेकर यांच्या मुलीच्या शेळ्या चोरीला गेल्या होत्या. याबाबत सातपूर पोलिसांकडे तक्रारही दाखल करण्यात आली होती. विशेष म्हणजे दुचाकी जाळपोळ प्रकरणात संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेल्या एकानेच शेळ्या चोरल्या असल्याचे माचरेकर कुटुंबाचे म्हणणे आहे. याबाबत त्यांनी पोलिसांकडे माहिती दिली असल्याचे सांगितले. कष्टकरी कामगारांची वसाहत असलेल्या प्रबुद्धनगर भागात नेहमीच असे प्रकार होत असल्याने यावर पोलिसांनी आळा घालावा, अशी मागणी होत आहे.


टवाळखोरांचा त्रास

कामगारनगरी असलेल्या सातपूर भागात स्लम भागातील टवाळखोरांच्या उपद्रवामुळे रहिवाशी त्रस्त झाले आहेत. दिवसभर नवीन भागात टेहळणी करत मिळेल ती वस्तू चोरण्यावर या तरुणांचा भर असतो. काही सराईत गुन्हेगार स्लम भागातील टवाळखोरांचा वापर दहशत पसरविण्यासाठी करतात. सातपूर भागातील अशोकनगर, राधाकृष्णनगर, श्र्रमिकनगर, शिवाजीनगर, ध्रुवनगर, सोमेश्वर कॉलनी आदी भागात स्थानिक गुंडांकडून स्लम भागातील टवाळखोरांना अभय दिले जाते. यामध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग अधिक असल्याने पोलिसांनादेखील कारवाई करताना हात आखडता घेण्याची वेळ येते. परंतु, यात रहिवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. सातपूर भागात नव्याने वसत असलेल्या भागात स्लम भागातील टवाळखोरांचा सर्वाधिक वावर असतो. त्यांच्याबाबत कोणी तक्रार केल्यास संबंधित व्यक्तीला मारहाण करण्याचे प्रकार होतात. त्यामुळे त्यांची तक्रार करण्यासही कोणी धजावत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘विरोधकांना संपवा; शिवसेनेला वाढवा’

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

येत्या विधानसभेची ही निवडणूक तयारी असून, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बसविण्यासाठी भाजपला आडवे करा, काँग्रेसला झोपवा, राष्ट्रवादीला बाजूला सारा, आणि शिवसेनेला वाढवा, असे आवाहन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले. ज्वाला माता लॉन्स, शिर्डी रोड येथे शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

शिवसेना नेते व उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत व शिवसेना नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख आमदार अजय चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, तालुका संपर्कप्रमुख संजय बच्छाव, आमदार राजाभाऊ वाजे, पंचायत समिती सभापती सुमन बर्डे, नगराध्यक्ष किरण डगळे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन नामदेव सांगळे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात आला होता.

खासदार राऊत पुढे म्हणाले, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याने उत्सव साजरे करीत आहे. कर्जमाफीची घोषणा करून एकही शेतकऱ्याला मात्र कर्जमाफी मिळालेली नाही. फसव्या घोषणा करून सरकार शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहे. राज्यात विरोधी पक्ष निष्प्रभ ठरल्याने शिवसेनेला सत्तेत असूनही विरोधी पक्षाची भूमिका बजवावी लागत आहे. अच्छे दिन येतील या आशेने लोकांनी भाजपला निवडून दिले. मात्र लोकांचा भ्रमनिरास झाला असून, काळा पैसा बाहेर येऊन प्रत्येकाच्या खात्यावर पैसे आले नाहीत. लोकांना फसवून हे सरकार सत्तेत आले, मात्र कोणाचाच विकास झाला नाही, अशी टीका राऊत यांनी केली. दरम्यान, जलक्रांतीने सिन्नर तालुक्याचा खऱ्या अर्थाने दुष्काळ हटला असून, आमदार राजाभाऊ वाजे यांनी केलेल्या कामाने सिन्नरचा दुष्काळ संपला आहे, असेही त्यांनी नमूद केले. शिवसेना समृद्धी महामार्गाबाबत शेतकऱ्यांच्या बरोबर असल्याचेही राऊत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट परीक्षेत संशोधन पध्दतीवर भर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएच. डी. आणि एम. फिल.च्या नियमावलीत केलेल्या बदलानंतर या पदवीसाठी घेण्यात आलेली पेट (पीएचडी. एन्टरन्स एक्झाम) रविवारी पहिल्यांदाच पार पडली. शहरातील मोजक्या केंद्रांवर पार पडलेल्या या परीक्षेत कुठेही गोंधळ जाणवला नाही. यंदा बदलेल्या पॅटर्ननुसार ही परीक्षा पार पडली. शंभर गुणांसाठी बहुपर्यायी पध्दतीने घेतलेेल्या परीक्षेत परीक्षार्थींनी निवडलेल्या विषयाचे ज्ञान आणि रिसर्च मेथडॉलॉजी या विषयावर भर देण्यात आला होता. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनांप्रमाणे पुणे विद्यापीठाने या अभ्यासक्रमांच्या नियमावलीत बदल करून वेळापत्रक तयार केले आहे. पीएच.डी.च्या २०३५ जागा, तर एम.फिल.च्या २६५ जागा यासाठी उपलब्ध आहेत.

यापूर्वीही एकदा मी पुणे विद्यापीठाची पीएच.डी. प्रवेश परीक्षा दिली होती. यंदाच्या परीक्षेचा पॅटर्न मोठ्या प्रमाणावर बदलला आहे. संशोधन पध्दती आणि निवडलेली विद्याशाखा या दोन प्रमुख विषयांचा प्रश्नपत्रिकेत समावेश असल्याने परीक्षा फारशी कठीण वाटली नाही.

- स्वरूप गाडगीळ, पीएचडी एन्टरन्स परीक्षार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सकारात्मकतेने होते नैराश्य दूर

0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

आनंदी आणि निराशामुक्त जीवनासाठी सकारात्मक विचार असलेल्या लोकांशी घट्ट मैत्री करा, असा सल्ला ‘मना सज्जना’ च्या व्यासपीठावर विविध मानसशास्त्र अभ्यासक आणि समुपदेशकांनी दिला आहे. सकारात्मक विचारांमध्ये तणाव आणि नैराश्य दूर करण्याचीही मोठी क्षमता आहे.

आपल्या भोवतालच्या वातावरणाचा प्रभाव आपल्यावर मोठ्या प्रमाणात पडतो. त्या वातावरणास अनुकूल रसायने शरीरात स्त्रवली जातात. त्यामुळे तणावमुक्त जीवनासाठी सकारात्मक विचारांचीच उपासना करा, यासोबतच समतोल आहार, मेडिटेशन, योगा आणि मनोरंजनात्मक उपक्रमांचा दिनचर्येतील समावेश तुमची मुद्रा प्रसन्न करण्यात मोठी मदत करेल, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

संगीतातील योग्य प्रकारांचे श्रवण केल्याने अवघ्या तीन महिन्यांत एका तणावग्रस्त तरुणाचा जीवनक्रम पूर्वरत झाल्याचा अनुभव विख्यात गीतकार संजय गिते यांनी सांगितला. दिनचर्येत ध्यान, योगा, समतोल आहारासारख्या मुद्द्यांचा समावेश तुमचे जीवन प्रसन्न करून जाईल, यासोबतच संगीताचाही दिनचर्येत अंतर्भाव केल्यास जीवन प्रफुल्लीत होईल, असा दाखला देताना गिते यांनी दिला. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील (शहराचे नाव बदलले आहे) अनामिक (व्यक्तीचे नाव बदलले आहे) हे कर्मचारी नाशिकमधील एका मानसोपचार केंद्रात उपचार घेत असल्याची वार्ता कानावर आली. तणावातून घरात होणारी प्रचंड चिडचिड, या प्रकारची त्यांची वर्तनसमस्या होती. आमच्या संशोधनपध्दतीनुसार संगीतोपचाराने या केसमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा होण्याची आशा असल्याने त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना सुचवून बघितले. त्यांनी रूकार दिल्यानंतर संगीतोपचारांच्या आधाराने अत्यंत टोकाला जाणारी ही केस नियंत्रणात आणली गेली. आज अनामिक त्यांचे समाधानाचे पूर्वायुष्य जगत आहेत.

कारणे समजून घ्या

सर्वात पहिल्यांदा अगोदर तुमच्या दैनंदिन जीवनातील तणावाची कारणे समजून घ्या. त्या कारणांच्या मुळाशी जा. तुमच्या तणावाचा उतारा तुमच्याच जवळ सापडेल. इतर कुणाजवळ नाही.

भावना मांडायला शिका

तुम्ही एखाद्या कारणामुळे दु:खी असाल, तर ते दु:ख मनात दाबून ठेवू नका. तुमचे खास मित्र किंवा जवळत्या नात्यासोबत ते दु:ख वाटून घेऊन मन हलके करा.

प्राधान्यक्रम समजून घ्या

अनेकदा तुमच्या कामातील प्राधान्यक्रम चुकीचा असणे हे तुमच्या गोंधळ आणि तणावाचे कारण असू शकते. कामांचा प्राधान्यक्रम ठरविल्यास तुमची कामे वेळेत पूर्ण होतील आणि वैयक्तिक गोष्टींसाठी तुम्ही पुरेसा वेळ देऊ शकाल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मजुराच्या मारहाणीत धुळ्यात दोघांचा मृत्यू

0
0

ठेकेदारावर हल्ला; पैशांवरून वाद

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील गादी कारखान्यात काम करणाऱ्या मजुराने ठेकेदाराचा डोक्यात क्रिकेटच्या बॅटने हल्ला करून खून केल्याची घटना शनिवारी (दि. २८) रात्री चाळीसगाव रोड परिसरात घडली. यात ठेकेदार आतिषकुमार सैनी व त्याचा भाऊ राकेशकुमार या दोघांचा मृत्यू झाला असून, हल्ला करणारा राहुलकुमार धोबी हा जखमी झाला आहे.

चाळीसगाव रोड परिसरातील या घटनेत जखमीला उपचारासाठी शासकीय हिरे मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील आरोपीविरुद्ध चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेत राकेश सैनी हा जखमी झाला होता. मात्र रविवारी (दि. २९) दुपारी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. गेल्या दहा दिवसांत शहरात तिसरी खूनाची घटना घडली.

चाळीसगाव रोडवरील बोरसे नगरात रोशन हाजी पिंजारी यांच्या मालकीचे परविन कॉटन वेस्ट फॅक्टरी आहे. त्याठिकाणी गाद्या व कापसाच्या इतर वस्तू तयार केल्या जातात. त्याठिकाणी आतिषकुमार शांतारामसिंग सैनी (वय २३, रा. खेडा अपरोला. ता. अमरोहा जि. अमरोहा, उत्तरप्रदेश, ह. मु. बोरसेनगर) यांच्याकडून उत्तर प्रदेशातील काही जणांना कामगार कामासाठी आणण्यात आले होते. त्यांची राहण्याची व्यवस्थाही फॅक्टरीच्या परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये केली गेली. काही दिवसांपूर्वी तेथे राहुलकुमार ध्यानसिंग दिवाकर (धोबी) रा. खेडा अपरोला ता. जि. अमरोहा हा कामासाठी आला. त्याला परत आपल्या मूळ गावी जायचे असल्याने दोन दिवसापासून तो ठेकेदार आतिषकुमार सैनी याच्याकडे कामाचा हिशोब करून मजुरीच्या पैशांची मागणी करीत होता. शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारात आतिषकुमार सैनी, राकेश कुमार, जहीर अहमद फुरशद अली हे सगळेजण जेवण करीत असताना त्याठिकाणी राहुलकुमार धोबी हा दारूच्या नशेत आला. त्याने ठेकेदार आतिषकुमार याच्याकडे मजुरीच्या पैशांची मागणी केली. त्यानंतर ठेकेदारासह त्याचा भाऊ राकेशकुमार यालाही राहुलने मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शेतकऱ्यांना वीज कंपनीने मदत करावी’

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

ऐन रब्बी पीक हंगामाच्या तोंडावर वीज महावितरण कंपनी वीज बिल वसुलीसाठी सर्रासपणे ट्रान्सफॉर्मरचा वीजपुरवठा बंद करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची कुचंबना होत आहे. गुरांचादेखील पाण्याचा प्रश्न निर्माण होत असून, याबाबत वीज महावितरण कंपनीने सकारात्मक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी अपेक्षा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केली.

येथील पंचायत समिती सभागृहात बागलाण तालुक्यात विजयी झालेल्या ग्रामपंचायत सरंपच व सदस्यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी राज्यमंत्री डॉ. भामरे बोलत होते. व्यासपीठावर सटाणा बाजार समितीचे सभापती रमेश देवरे, भाजपचे उपजिल्हाध्यक्ष डॉ. विलास बच्छाव, शेषराव पाटील, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब सोनवणे उपस्थित होते. डॉ. भामरे पुढे म्हणाले, की सततच्या दुष्काळ व कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी बांधव जगत आहे. यामुळे कृषिपंपाचे वीज कनेक्शन तोडताना कमीतकमी एक महिन्याची नोटीस शेतकऱ्यांना द्यावी, वीज बिल वसुलीसाठी सरसकट वीजपुरवठा बंद करणे हा शेतकऱ्यांवर अन्याय होईल. यासाठी आपण तत्काळ ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बोलणार असल्याचेही यावेळी डॉ. भामरे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर सर्वतोपरी सहकार्य करू

0
0

आमदार अनिल कदम यांची ग्वाही

म. टा. वृत्तसेवा, निफाड

थकीत कर्जामुळे बंद असलेला निफाड सहकारी साखर कारखाना पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती चालवायला घेत असेल, तर त्याला सर्वतोपरी सहकार्य करू, असे आमदार अनिल कदम यांनी म्हटले आहे.

माजी आमदार आणि पिंपळगाव बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांनी नुकतीच सायखेडा येथे झालेल्या जाहीर बैठकीत निफाड सहकारी साखर कारखाना चालवायला घ्यायची आपली तयारी आहे, असे सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर आमदार अनिल कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. निफाड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

आमदार कदम म्हणाले, की पिंपळगाव बाजार समितीची निवडणूक ही आपण एक पाऊल मागे येऊन बिनविरोध करून दिली होती. राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप बनकर हे आपले राजकीय प्रतिस्पर्धी असले तरीही त्यांनी पिंपळगाव बाजार समिती सध्या बंद असलेला निफाड सहकारी साखर कारखाना चालवायला घेत असेल, तर त्यासाठी मी तालुक्याचा आमदार या नात्याने सहकार, शासकीय पातळीवर जे सहकार्य लागेल ते करायला तयार आहे.

कोणत्यातरी माध्यमातून निफाड साखर कारखाना सुरू झाला तर ती तालुक्याच्या दृष्टीने अतिशय एक मोठी जमेची बाजू आहे. आमदार अनिल कदम आणि दिलीप बनकर यांनी निसाकाप्रश्नी एकत्र यावे, अशी अनेक दिवसांपासूनची शेतकरी व कामगारांची अपेक्षा होती.

निसाका भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा

निसाकावर नाशिक जिल्हा बँकेचे कर्ज, कामगार, महसूल विभाग, इन्कम टॅक्स विभागाची देणी अशी सुमारे तीनशे कोटींच्या आसपास देणी थकीत आहे. कारखान्यावर नाशिक जिल्हा बँकेने जप्तीची कारवाई केली असून, बँकेचे अधिकारी कारखान्याचे अवसायक आहेत. नुकतीच जिल्हा बँकेने कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी जाहीर निविदा काढली होती. त्याला अनुसरून सध्या या घडामोडी घडत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्याने नसल्यासारखीच!

0
0

सातपूरला मोजक्याच उद्यानांची देखभाल; दुरुस्तीसाठी मनपाला साकडे

नामदेव पवार, सातपूर

नाशिक महापालिकेने सातपूर विभागात तब्बल ४० उद्याने उभारली आहेत. परंतु, यात अनेक उद्याने असून नसल्यासारखीच असल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यातच महापालिका व खासगी ठेकेदारांकडून ठरावीकच उद्यानांची देखभाल केले जात आहे. तरी महापालिकेने सर्वच उद्यानांची देखभाल करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

या परिसरातील मोठी असलेली गोदावरी परिचय, कानेटकर, महात्मा ज्योतीबा फुले या उद्यानांची दुरवस्था झाली आहे. तर बळवंत नगर, महाराणा प्रताप नगरमधील उद्यानांची योग्य देखभाल केली जात असल्याने त्याचठिकाणी बाळगोपाळांसह वृद्धांची गर्दी होताना दिसते. शहराच्या वाढत्या लोकवस्तीत उद्यानांसाठीही महापालिकेने जागा आरक्षित केल्या होत्या. नगरसेवक व स्थानिक रहिवाशांच्या मागणीवरून आरक्षित उद्यानांच्या जागेवर उद्याने उभारली आहेत.

परंतु, या उद्यानात बसविण्यात आलेली खेळणी तुटल्याने त्याकडे लक्ष महापालिका कधी देणार, असा सवाल रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे. काही ठिकाणी तर उद्यानाच्या जागेवर केवळ खेळणी उभ्या केल्या आहेत. सातपूर गाव, सातपूर कॉलनी, नीलकंठेश्वरनगर, राज्य कर्मचारी वसाहत, वास्तूनगर, राधाकृष्णनगर, श्रमिकनगर, शिवाजीनगर, ध्रुवनगर, गंगापूरगाव, गंगापूररोड बळवंतनगर, सिरीन मेडोल, आनंदवली गाव, गणेशनगर, अंबड-लिंकरोड, जाधव टाऊनशीप आदी ठिकाणच्या उद्यानांची देखभाल मनपा व खासगी ठेकेदारामार्फत केली जाते.

खेळणी तुटलेल्या अवस्थेत

सातपूर विभागातील अनेक उद्यानांमध्ये महापालिकेने लाखो रुपये खर्च करून खेळणी बसवली आहेत. बसविण्यात आलेली अनेक खेळणी नादुरूस्त झाल्याने मुलांना खेळण्यासाठी काहीच नसल्याचे चित्र आहे. महापालिकेने किमान बसविलेल्या खेळण्यांची दुरूस्ती करावी जेणेकरून मुलांना खेळता येईल. या परिसरातील रहिवाशांच्या मागणीनुसार महापालिकेने उद्यानांची उभारणी केली आहे. परंतु, अनेक उद्यानांकडे लक्ष दिले गेले नसल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे.

टवाळखोरांचे अड्डे

महापालिकेच्या सातपूर विभागात शेकडो मोकळ्या भूखंडांवर खेळणी बसविण्यात आल्या आहेत. परंतु, अनेक ठिकाणी बसविण्यात आलेल्या खेळणी तुटलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहेत. महापालिकेने आरक्षित असलेल्या भूखंडांवर अगोदर उद्याने उभारावी व त्यांची निगा कशी राहिल याची व्यवस्था करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. इतर उद्यानांमध्ये व्यवस्थित देखभाल केली जात नसल्याने त्याठिकाणी टवाळखोरांचेच अड्डे तयार झाले आहेत.

राज्य कर्मचारी वसाहतीतील उद्यान सर्वांचेच आवडीचे ठिकाण आहे. मुलांना खेळण्यासाठी व्यवस्थित खेळणी व वृद्धांना गप्पा मारण्यासाठी योग्य जागी त्याठिकाणी आहे. महापालिकेने सर्वच उद्याने चकचकीत ठेवण्याची गरज आहे.

-महादेव ठाकरे, रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘तारांगण’ची कसरत

0
0

मटा फोकस, संकलन ः अश्विनी कावळे

अंतराळ क्षेत्रात भारतीय विद्यार्थ्यांनी स्थान निर्माण करावं व त्यामध्ये विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा सहभागही मोलाचा असावा, यासाठी अंतराळ क्षेत्राची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे अतिशय महत्त्वाचे आहे. काही महानगर वगळता या क्षेत्राची माहिती इतर लहान शहरातील मुलांपर्यंत पोहोचत नसल्याचे वास्तव आहे. नाशिक महापालिकेने मात्र अंतराळाविषयी माहितीचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने यशवंतराव चव्हाण तारांगणाची निर्मिती केली. मात्र तारांगणवर महापालिकेचा होणारा खर्च व मिळणारे उत्पन्न यात मोठी तफावत असल्याने याचा समतोल साधताना महापालिकेची मोठी कसरत होत आहे. त्यामुळे आजच्या परिस्थितीत तरी ‘तारांगण’ हे सामान्य नागरिक व प्रशासन दोघांच्या दुर्लक्षितेत अडकले असल्याचे चित्र आहे. शिवाय महापालिकेचा यावर होत असलेला खर्च व मिळत असलेले तुटपुंजे उत्पन्न यामुळे ‘तारांगण’ची कसरत होत आहे.

यशवंतराव चव्हाण तारांगण व सायन्स सेंटरची पार्श्वभूमी

१९९९ साली तारांगण निर्मितीचा प्रकल्प प्रथम सादर करण्यात आला होता. या प्रकल्पात मनोरंजन आणि विज्ञान क्षेत्रातील जिज्ञासूंची भूक भागवावी म्हणून या प्रकल्पास महापालिकेच्या महासभेने मंजुरी दिली. त्र्यंबक रोडवरील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जलतरण तलावाजवळ ७९८५ चौरस मीटर जागेत मार्च २००० मध्ये तारांगणच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. तर २००७ साली डॉ. एम. अण्णा. दुराई यांच्या हस्ते तारांगणचे उद््घाटन करण्यात आले. तारांगण प्रकल्प राबवणारी नाशिक महापालिका ही भारतातील एकमेव आहे.

तारांगणची नाविन्यता हरवल्याने उत्पन्नाला घरघर

यशवंतराव चव्हाण तारांगणची स्थापना २००७ साली करण्यात आली. सुरुवातीचा काही काळ म्हणजे साधारणपणे दीड ते दोन वर्ष तेच ते प्रयोग दाखविण्यात येत असल्याने व त्यातील नाविन्यता हरवल्याने उत्पन्नाला घरघर लागली होती. त्यानंतरही अत्यल्प प्रतिसादामुळे तारांगणाचाच प्रकाश पडेनासा झाला होता. परिणामी हे तारांगण बंद पडण्याच्या मार्गावर गेले. त्यानंतर २०१५ साली महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या पुढाकाराने पुन्हा तारांगण सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचे तारांगण सल्लागार समितीच्या वतीने सांगण्यात येते. सध्या येथे नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, मालेगाव, चांदवड, सिन्नर आदी ठिकाणच्या शाळांमधील विद्यार्थ्यांकडून तारांगणला नियमित भेटी दिल्या जातात. मध्यंतरी गुजरातमधील विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरादेखील येथे आणण्यात आला होता. शिवाय नाशिकमधील पर्यटन स्थळांच्या यादीतही अग्रणी तारांगणचे नाव देण्यात आल्याने पर्यटकांना तारांगणकडे आणण्यासाठी मदत झाली आहे.

विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण करण्यासाठी मार्केटिंग तंत्राचा वापर

मार्केटिंग तंत्राचा वापर करून विद्यार्थी वर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न विविध उपक्रमांद्वारे अंतराळ प्रेमी, अभ्यासक यांच्याकडून करण्यात येतो. तारांगणकडे विद्यार्थी वर्गाचा ओढा वाढविण्यासाठी प्रभावी मार्केटिंग तंत्र वापरण्याचा लाभही काही प्रमाणात झाला आहे. शाळा कॉलेजांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ क्षेत्राविषयी गोडी निर्माण करणे, त्यांना ब्रम्हांड, ग्रह तारे, उल्का, विविध उपग्रह यांची माहिती देणे, निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धांचे आयोजन यांद्वारे विद्यार्थी वर्गाला तारांगणकडे वळवण्यात आले. संडे सायन्स स्कूल, वर्ल्ड स्पेस वीकसारखे उपक्रम यातून नाशिककरांना तारांगणकडे वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवाय अंतराळ प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते तारांगणची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले वाढदिवस, कुटुंबीयांचे वाढदिवस येथे साजरा करीत आहेत. तसेच काही सामाजिक संस्थांमार्फत आदिवासी पाड्यांवरील मुले, शाळाबाह्य मुले यांना येथे स्वखर्चाने शो स्पॉन्सर करून ते दाखवायला आणत असतात. तारांगणाचा उपयोग प्रत्येक घटकातील विद्यार्थ्यास व्हावा हा यामागील उद्देश असतो.

नकारात्मक पब्लिसिटीचा तोटा

कोणत्याही गोष्टीची माऊथ पब्लिसिटी झाल्यावर ती गोष्ट अधिक लोकप्रिय होण्यास मदत होते, असे मानले जाते. ही बाब सकारात्मक व नकारात्मक दोन्ही गोष्टींबाबत लागू पडते. तारांगणबाबत ही बाब नकारात्मक पद्धतीने पसरल्याचे सल्लागार समितीकडून सांगण्यात येते. मधल्या काळात तारांगण सुरू होऊनदेखील ते बंद पडले आहे, अशा चुकीच्या चर्चेमुळे तारांगणला मिळणारा प्रतिसाद कमी झाल्याचे सांगण्यात येते.

नाशिककरांचा थंड प्रतिसाद

विज्ञान क्षेत्राची गोडी नाशिकमध्ये निर्माण व्हावी, यासाठी तारांगणची मोठी उपलब्धता नाशिकमध्ये आहे. शहरातील धार्मिक, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक विषयांबरोबर शहराला विज्ञानाची जोड यामार्फत देण्यात येते. मात्र, नाशिककरांचा याबाबत असलेला अनुत्साहामुळे तारांगणला सामान्य नागरिकांचा प्रतिसाद अतिशय कमी आहे. राज्यातील विविध शाळांच्या सहली येथे आणून विद्यार्थ्यांना तारांगणमधील शोज दाखविले जातात. यातूनच सध्या तारांगणला प्रतिसाद मिळू शकत आहे. अंतराळाविषयी वेगवेगळ्या तेरा फिल्म्स तारांगणमध्ये उपलब्ध आहेत. मराठी, इंग्रजी, हिंदी अशा तिन्ही भाषांमध्ये शो होतात. मात्र, हिंदी भाषेला प्रतिसाद नसल्याने त्याचे शो क्वचितच होतात. दररोज दुपारी १.३० वाजता हिंदी, ३.३० वाजता इंग्रजी व ५.३० व ७.०० वाजता मराठी शोचे नियोजन करण्यात आले आहे.

वेबसाइट सुरू मात्र ऑनलाइन बुकिंग सुविधाच नाही

तंत्रज्ञानाचे वारे आता सर्व ठिकाणी प्रस्थापित झाले असले तरी तारांगण मात्र ऑनलाइन नोंदणीबाबत अद्याप मागेच आहे. चित्रपट, नाटकांच्या बुकिंगप्रमाणेच तारांगणमधील शोजचे बुकिंगही ऑनलाइन पद्धतीने व्हावे, अशी इच्छा अंतराळप्रेमींकडून व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार तारांगणची वेबसाइटही विकसित करण्यात आली. परंतु, त्यावरून शो बूक करण्याची कोणतीही सुविधा अद्याप उपलब्ध नाही. प्रौढांसाठी ५० तर बालकांसाठी २५ रुपये शुल्क आकारणी करण्यात येत असून, त्याची माहिती थेट तारांगणमध्येच जाऊन मिळते.

देखभालीअभावी विद्यार्थ्यांचा हिरमोड

मुंबईतील इन्फोव्हिजन टेक्नॉलॉजिस्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून डिजिटल टेक्नॉलॉजीवर आधारित शोज येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यासाठी इव्हान्स अँड सुदरलँड या अमेरिकन मशिनरी आहेत. १०५ प्रवेश क्षमतेचा वातानुकूलित डोम, बसण्यासाठी अत्याधुनिक व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. मात्र देखभालीच्या अभावाने यातील अनेक खुर्च्या तुटलेल्या, पडलेल्या अवस्थेत आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा येथे घेऊन येतात परंतु, अशी व्यवस्था पाहिल्यावर त्यांचाही हिरमोड होतो.

‘पीपीपी’ला खासगी एजन्सींचा प्रतिसाद नाही

महापालिकेने ‘पीपीपी’ म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप या धोरणाच्या आधारावर अनुभवी एजन्सीला तारांगण दहा वर्षांसाठी चालवण्याचा प्रस्ताव तीन महिन्यांपूर्वीच मंजूर केला आहे. त्या एजन्सीला तारांगणमध्ये अद्ययावत सुविधा, सायन्स म्युझियम, सायन्स लायब्ररी, कॉफी शॉप तारांगणशी संलग्न सुरू करुन त्यातून उत्पन्न मिळवण्याची मुभा देण्यात आली आहे. याचा वीज बिलापासून संपूर्ण खर्च मात्र त्या एजन्सीला करावा लागणार आहे. शिवाय, मिळणारे उत्पन्नही त्यांना वापरता येणार आहे. परंतु, त्यासही प्रतिसाद मिळालेला नाही.

विद्यार्थ्यांना तारांगणची माहिती व्हावी यासाठी आम्ही विविध उपक्रमांचे आयोजन करत असतो. २०१५ सालापासून तारांगण प्रकाशझोतात आणण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न केले असून, त्याला यश मिळाले. परंतु, नाशिक दर्शनसारख्या सहलींमध्ये तारांगणचा समावेश असावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नाशिकची धार्मिक आणि वाइन कॅपिटलपलीकडे ओळख व्हावी. नाशिक तारांगणमुळे किंवा विज्ञानविषयक शिक्षणामुळे अधिक प्रसिद्ध व्हावे, असे वाटते.

- अपूर्वा जाखडी, नासा स्पेस एज्युकेटर, तारांगण सल्लागार समिती

उत्तर महाराष्ट्रातील जितक्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्याशी समन्वय साधून तेथील विद्यार्थ्यांनी तारांगणला भेट द्यावी यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. महापालिका तारांगण व्यवस्थित सुरू राहावे यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र त्यावर होणारा खर्च व मिळणारे उत्पन्न यातील तफावत पाहता 'पीपीपी'चा विचार करण्यात आला आहे.

यू. बी. पवार, शहर अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीडशे वाहनधारकांवर कारवाई

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

देवळा पोलिसांनी विनापरवाना, विनाकागदपत्र असलेल्या वाहनांवर धडक कारवाईची मोहीम हाती घेतल्याने वाहनचालकांचे धाबे दणाणले आहे. सुमारे १०० ते १५० मोटरसायकलस्वारांकडे कोणतेही कागदपत्र तसेच वाहनपरवाना आढळून न आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

देवळा शहरासह परिसरातून काही महिन्यांपासून मोटरसायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्यातच देवळा येथील आठवडे बाजारात खेड्यातून आलेल्या नागरिकांची वाहने चोरण्याचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर देवळा पोलिसांनी विनापरवाना, विनाकागदपत्रे असलेल्या मोटरसायकलस्वारांवर दंडात्मक कारवाई केली. जवळपास १०० ते १५० मोटरसायकलस्वारांकडे कोणतेही कागदपत्र तसेच, वाहन परवाना आढळून आला नाही, अशी माहिती पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी दिली. या कारवाईत वाहतूक शाखेसह सहायक पोलिस निरीक्षक मदनसिंग पवार, रॅम राठोड, पोलिस नाईक आर. बी. मल्ले, विजयकुमार सोनवणे, अंकुश हेबांडे, सचिन भामरे, सुनील गांगुर्डे, प्रकाश सोनवणे आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवस्थानांना नोटिसा; भाविकांची नाराजी

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

न्यायालयाच्या आदेशावरून महापालिकेने सातपूर विभागात असलेल्या बारा देवस्थानांना नोट‌िसा बजावल्या आहेत. नोटिसांमुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्यावर येणारी देवस्थाने प्रशासनाने नक्कीच हटवावीत. पण, जी देवस्थाने अडथळा ठरत नाहीत, अशा देवस्थांना नोट‌िसा का देण्यात आल्या, असा सवाल भाविकांकडून उपस्थित केला जात आहे.

महापालिकेच्या सातपूर विभागाच्या वतीने १२ देवस्थांना नोट‌िसा बजावण्यात आल्या असून, पुढील १५ दिवसांत अतिक्रमण हटविण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहेत. पुढील काही दिवसांत देवस्थानांना बजावण्यात आलेल्या नोट‌िसांवर मोठे वादंग उभे राहण्याची चिन्हे आहेत. भाविकांच्या श्रद्धेशी प्रशासनाने खेळू नये, अशी भावना भाविक व्यक्त करीत आहेत.

काही महिन्यांपूर्वी न्यायालयाच्या आदेशावरून रस्त्यात येणारी देवस्थाने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटविली होती. सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत असलेल्या अनधिकृत देवस्थानांवर कारवाईही करण्यात आली

होती. परंतु, रस्त्यात येत नसतानादेखील सातपूर भागात १२ देवस्थांनांना नोट‌िसा का देण्यात आल्या, असा सवाल भाविकांनी उपस्थित केला आहे.

सातपूर कॉलनीतील दक्षिणेश्वर हनुमान मंदिर, निलधारा सोसायटीतील साईबाबा मंदिर, आठ हजार वसाहतीतील

महादेव मंदिर यांसह अनेक देवस्थानांना नोट‌िसा बजावण्यात आल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

देवस्थानांना देण्यात आलेल्या नोट‌िसांबाबत महापालिका आयुक्त, नगरसेवक व आमदारांना निवेदन देत कारवाई टाळण्याची मागणी केली जाणार असल्याचे भाविकांनी सांगितले.


सातपूर कॉलनीतील देवस्थाने कुठल्याही प्रकारे रस्त्यात येत नाहीत. असे असतानाही अनेक देवस्थानांना नोट‌िसा कुठल्या कारणास्तव दिल्या, असा आमचा सवाल आहे. प्रशासनाने भाविकांच्या धार्मिक भावनेची जाण ठेवत अडथळा न ठरणाऱ्या देवस्थानांवर कारवाई करण्याची गरज नाही. याबाबत आम्ही आयुक्त, नगरसेवक व आमदारांना निवेदन देणार आहोत.

- आबा शिंदे, भाविक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रानवड’ची फसवणूक

0
0

कारखाना चालवायला घेणाऱ्यांवर पिंपळगावला गुन्हा दाखल

म. टा. वृत्तसेवा, निफाड

खूप मोठ्या आशेने रानवड सहकारी साखर कारखान्याचे कामगार आणि परिसरातील ऊस उत्पादक यांनी रानवड साखर कारखाना बॉयलर प्रतिपदनाला हजेरी लावली होती. कारखाना सुरू होणार या आनंदात असलेल्या या सर्व घटकांची मात्र निराशा व फसवणूक झाली आहे. रानवड साखर कारखाना भाडेपट्ट्यावर चालवायला घेणारे डॉ. रॉनिटन लथ व भारत वाबळे यांनी रानवडच्या कामगारांचे तीन महिन्यांचे एक ते दीड कोटी रुपये थकवले असून, त्यांचा पत्ता नसल्याने रानवड साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी पिंपळगाव पोलिस स्टेशनमध्ये लथ व बाबळे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

रानवड कारखाना आठ वर्षांसाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या छत्रपती शिवाजी शूगर यांनी भाडेतत्त्वावर चालवायला घेतला आहे. त्यांच्याकडून लथ व वाबळे यांनी एक वर्षासाठी उपकरारावर भाडेकरू म्हणून कारखाना चालवायला घेतला होता. त्या दृष्टीने तीन महिन्यांपासून कारखाना मशिनरी स्वछता मोहीम राबवून दसऱ्याच्या दरम्यान बॉयलर प्रतिपदन समारंभही झाला होता. परंतु, अचानक काय झाले रथ व वाबळे यांनी या कारखान्याचा प्रक्रियेतून अंग काढून घेतले असून, कामगारांच्या म्हणणण्यानुसार त्यांनी शेतकरी व कामगार यांना गोड बोलून विश्वासात घेऊन फसवले आहे. विशेष म्हणजे सध्या कारखाना कार्यस्थळावर ऊसतोड कामगार, मजूर येऊन थांबले आहेत. त्यांनी रानवड करखान्यामुळे दुसऱ्या करखान्याशी करार केला नाही. ते ऊसतोड कामगारही आज उपाशी दिवस काढत आहेत. हीच गत ट्रक व ऊस वाहतूकदारांची झाली आहे.

आमदार अनिल कदम यांनी कामगारांकडून झालेला प्रकार समजावून घेतला. याबाबत झालेला करार व इतर बाबी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना भेटून चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले.

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यासह कामगार व ऊस उत्पादकांची फसवणूक करून रॉनिटन लथ व भारत वाबळे यांनी कायदा सुव्यवस्थेलाच आव्हान दिले आहे.

- सचिन वाघ, सभासद, रासाका

खूप मोठ्या अपेक्षेने आम्ही सर्व कामगार बॉयलर प्रतिपादन झाल्याने आनंदी होतो. मात्र दिवसाढवळ्या लथ आणि वाबळे यांनी घोर फसवणूक केली आहे. रासाकाला कोणी वाली आहे का? सहकार विभागालाही हे लोक जुमानत नाहीत. कायद्याचा धाक राहिला नाही का? असा प्रश्न आम्हाला पडला आहे.

- बळवंत जाधव, अध्यक्ष, रासाका कामगार युनियन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीईओ साहेब आले, कुणी नाही पाहिले!

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी यांनी जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींचा नुकताच दौरा केला. धोरणात्मक निर्णयासाठी त्यांनी जिल्हा दौरा केल्याचे एमआयडीसीतील अधिकृत सूत्रांनी सांगितले. मात्र, या दौऱ्याबाबत कुठल्याही माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी सर्मथता दाखविली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

उद्योगांसाठी जिल्ह्यातील जमिनी अधिग्रहण करण्याबाबत एमआयडीसी सीईओ सेटी यांचा दोन दिवसांचा दौरा नुकताच पार पडला. परंतु, या जिल्हा दौऱ्याबाबत कुणालाही माहिती देण्यात आली. उद्योगांचे प्रश्न मांडणाऱ्या संघटनांनाही या दौऱ्याची माहिती नसल्याचे दिसून आले आहे. सेठी यांच्या झालेल्या जिल्हा दौऱ्यात धोरणात्मक निर्णय घेतले जाणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. यात महतत्वाचे म्हणजे अंबड एमआयडीसीत अनेक वर्षांपासून पडून असलेल्या आयटीपार्कचा विषय मार्गी लागणार आहे. तसेच लघुउद्योजकांसाठी एमआयडीसीने उभारलेला दोनशे गाळ्यांचा प्रकल्पही लवकरच कार्यान्वित होणार असल्याने त्याचा गरजू उद्योजकांना फायदा होणार असल्याचे मानले जात आहे.

मालेगाव टेक्सस्टाईल क्लस्टरची उभारणीबाबत सीईओ सेठी यांनी व्यापाऱ्यांची भेट घेतली. यात धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे ठरले. मालेगावला लागून असलेले अजंग शिवारातील शेती महामंडळाची ३४५ हेक्टर जमीनही अधिग्रहित करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सायने बुद्रुक येथील उद्योगांना दिलेल्या जमिनींवर उद्योजकांनी तात्काळ उद्योग सुरू करणावेत; अन्यथा जमिनी पुन्हा एमआयडीसी ताब्यात घेण्याबाबत निर्णय घेणार आहे. दिंडोरी एमआयडीसी अनेक उद्योगांना रस्ते, वीज, पाणी यांच्या मूलभूत सुविधा नसल्याने त्या उपलब्ध करून देण्याबाबत मार्ग काढण्याबाबत दौऱ्यात ठरले. जिल्ह्यात झालेल्या एमआयडीसीच्या सीईओंच्या दौऱ्यात सह मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सुरवाडे, उद्योग विकास केंद्राचे जनरल मॅनेजर गजानन पाटील, मुख्य अभियंता एस. आर. तुपे यांसह नाशिकचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

बैठक अचानक रद्द

विशेष म्हणजे उद्योग भवनात एमआयडीसीच्या सर्वच विभागातील अधिकाऱ्यांची सीईओ सेठी हे बैठक घेणार होते. मात्र, या दौऱ्यात त्यांनी अचानक बैठक रद्द केली. तसेच एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना सीईओंनी दुसरीकडे बोलावत माहिती घेत तडकाफडकी मुंबईला रवाना झाल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीगावात गुंडांचे राज्य

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

गुंडगिरी, छेडछाडी, खून, हाणामाऱ्या, टोळीयुद्ध अशा रोजच्या घटनांना देवळालीगाव आणि परिसरातील नागरिक वैतागले आहेत.

पोलिसांनी सर्व प्रकारचा दबाव झुगारुन देवळालीगाव भयमुक्त करावे, आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी महिलांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, जिल्हाधिकारी आदींना पत्र पाठवून केली आहे. नागरिकांच्या भावनांची पोलिस, प्रशासन आणि राजकीय नेत्यांनी वेळीच दखल न घेतल्यास जनमाणसांच्या ज्वालामुखीचा स्फोट होण्याची भीती व्यक्त होत आहे. देवळालीगावात काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्यात आल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य सामोरे आले आहे. पोलिसांनी घेतलेल्या बैठकीत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केल्यानंतर याची दाहकता जाणवली.

हे काय चाललेय?

देवळालीगावातील टवाळखोर, गुंडांचे अड्डे ठरलेले आहेत. कुस्ती मैदान, सोमवार बाजारतळ, धनगर गल्ली विरोबा मंदिर, राममंदिर चावडी चौक, दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या आवारात टवाळखोर, गुंड बसलेले असतात. त्यांच्यामुळे महिलांना जीव मुठीत धरून जावे लागते. महिलांचे म्हणणे असे, की हे टवाळखोर आमच्याकडे घाणेरड्या नजरेने बघतात. शिट्या, वाजवतात, पाठलाग करतात, अश्लील शेरेबाजी करतात. वेगाने गाड्या चालवून मुलींना कट मारतात. रात्री दारु पिऊन धिंगाणा घालतात. दिवाळीत महिलांच्या अंगावर पटते फटाके फेकण्यात आले. गुंडांना जाब विचारला तर ते शिव्या देतात, अंगावर हात टाकतात, पदर ओढतात. बलात्काराची धमकी देतात. याच गुंडगिरीवरून अण्णा गणपतीजवळ दुहेरी खून झाला होता. विहीतगाव येथील गाडगेमहाराज पुतळा रोड, रोकडोबावाडी, सुंदरनगर, मालधक्का येथील राजवाडा, गुलाबवाडी, उपनगर, टाकळी येथेही गुंडांचा जाच आहे.

पोरींच्या जिवाची काळजी

चूल आणि मूल ही संस्कृती विसरून गावातील मुली शिकू लागल्या आहेत. उच्च शिक्षणासाठी नाशिक, नाशिकरोड परिसरात या युवती जातात. त्यांना पहाटे व सायंकाळी क्लासलाही जावे लागते. या मुलींना गुंडगिरीचा सर्वात जास्त त्रास होतो. मुली शाळा-कॉलेजमधून घरी येईपर्यंत पालकांचा श्वास अडकलेला असतो. पालक मनात भीती ठेऊनच जगत असतात.

बांगड्या भरल्या आहेत का?

महिलावर्गाची तक्रार अशी, की १५ ते २२ वयोगटातील या गुंडांविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत तरीही पोलिस कारवाई करत नाहीत. उपनगर पोलिस ठाण्यात त्यांच्यावर दर आठ दिवसांनी एक गुन्हा दाखल होतो. चोरी, दरोडे, चाकूने वार करणे अशा प्रकारचे गुन्हे असूनही पोलिस त्यांना धडा शिकवित नाहीत. गुन्हे दाखल करत नाहीत. पोलिस येथे येतच नाहीत. पोलिसांनी काय बांगड्या भरल्या आहेत का? काही गुंड स्वतःच्या परिवाराला बोलून दमबाजी करतात. नागरिकांनी विरोध केला तर गुंडाचे टोळके येऊन मारहाण करते. टवाळखोरांवर पोलिसांचा वचकच राहिलेला नाही, पोलिस आमचे काहीही वाकडे करु शकत नाही, असे हे गुंड खुलेआम म्हणतात.

नेत्यांचा वरदहस्त

महिलांनी सांगितले, की देवळालीगाव व परिसरातील गुंडांना नेत्यांचा वरदहस्त आहे. नेते मंडळींमुळेच गुंडगिरी फोफावते आहे. गुंडांना अटक केली तर त्यांना जामीन मिळण्यास नेते मदत करतात. जामीनावर सुटल्यावर हे गुंड बदला घेतात. त्यामुळे नागरिक तक्रार करत नाहीत. नेत्यांनी मनात आणले तर ते गुंडांना वेसण घालू शकतात. धनगर गल्लीतील सुलभ शौचालयामागे वीटभट्टीच्या शेजारी टवाळखोरांना मद्यपानासाठी बेकायदेशीर रुम तयार करण्यात आलेली आहे. तेथे नेत्यांचीही मुले येतात, अशी तक्रार आहे. एका माजी नगरसेवकाने टवाळखोरांना एकदा धडाही शिकवला होता.

अशा आहेत मागण्या

गुंडांचे अड्डे, अवैध धंदे उद्‍ध्वस्त करावेत, पोलिस गस्त वाढवावी, कुस्ती मैदानाजवळ पोलिस चौकी उभारावी, पोलिसांनी मासिक दरबार घेऊन दिलासा द्यावा, सुलभ शौचालयात महिला कर्मचारी नेमावेत, गावातील गटबाजी थांबवावी, युवकांनी माता भगिनींचे रक्षण करावे, बंद पथदीप करावेत, अशा परिसरातील नागरिकांच्या मागण्यात आहेत.

आम्हाला विष द्या

देवळालागावीतील एका त्रस्त महिलेने कैफियत मांडली, की पोलिस व लोकप्रतिनिधींनी आम्हाला न्याय दिला नाही तर ठीक, अन्यथा आम्ही महिला एक एक करून आमच्या मुलींसोबत जीव देऊन टाकू. एवढाच पर्याय आमच्याकडे उरला आहे. आम्हाला न्याय द्या. नाहीतर पोलिसांच्या हाताने विष देऊन आम्हाला मारून टाका. आम्हाला अशा परिस्थितीत नाही जगायचे, अशी व्यथा त्यांनी मांडली.

तीन नगरसेविका, तरीही...

देवळालीगाव हा प्रभाग क्रमांक २२ मध्ये येतो. येथे तीन नगरसेविका आहेत. त्यामुळे महिला वर्गाच्या अपेक्षा जास्त आहेत. सरोज आहिरे या महिला व बाल कल्याण बालसभापती आहेत. सत्यभामा गाडेकर या शिवसेनेच्या बुलंद तोफ व उत्तर महाराष्ट्र प्रमुख आहेत. तर सुनिता कोठुळे ज्येष्ठ नगरसेविका आहेत. केशव पोरजे हे चौथे नगरसेवक आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धमकी प्रकरणी ६ जणांवर गुन्हा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मदिना चौक येथे ट्रस्टीच्या कब्रस्थानात बांधलेला सिमेंटरोड अनधिकृत पद्धतीने ड्रील मशिनने तोडून पाइप टाकण्यास विरोध करणाऱ्यास शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रवींद्र म्हस्के, सारिका म्हस्के, रोहन म्हस्के, निकिता म्हस्के, रोझा मोरे अशी संशयितांची नावे आहेत. सतीश प्रसाद म्हस्के (४७, रा. जुना आग्रा रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित रस्ता फोडून पाण्याचा पाइप टाकत होते. यास फिर्यादीने विरोध केला असता संशयितांना राग आला. त्यांनी शिवीगाळ करत म्हस्के यांना ठार मारण्याची धमकी दिली. घटनेचा अधिक तपास पोलिस हवालदार शेजवळ करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंतप्रधान योजनेच्या नावाखाली फसवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंतप्रधान योजनेच्या लाभासाठी बँकेची माहिती आवश्यक असल्याचे सांगत एका भामट्याने बँकेची सर्व माहिती घेत एटीएम कार्ड तसेच डेबिट कार्डमधील ३० हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने काढून घेतल्याची घटना नवीन नाशिकच्या कामटवाडा येथे घडली.

संजय पुरुषोत्तम पाटील (रा. कमलनगर, नवीन नाशिक) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पाटील यांना ७ एप्रिल २०१७ मध्ये एका संशयिताने फोन कॉल केला. पंतप्रधान योजनेविषयी माहिती देत पुढील लाभ घेण्यासाठी बँकेची सर्व माहिती आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच न कळत एटीएम व पासवर्डची माहिती घेतली. यानंतर फिर्यादीच्या एटीएम व डेबिट कार्डमधून परस्पर ३० हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने काढून घेण्यात आले. या बाबतची माहिती बँककडून घेतल्यानंतर पाटील यांनी शनिवारी (दि. २८) अंबड पोलिसांकडे तक्रार दिली. संशयिताविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरिक्षक मधुकर कड करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचालकास टोळक्याची मारहाण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जुन्या भांडणाची कुरापत काढून तिघांच्या टोळक्याने एका रिक्षाचालकास मारहाण केली. ही घटना शांतीपार्करोड येथे दुपारच्या सुमारास घडली.

राजू रफीक शेख (३२, रा. बागनपुरा, जुने नाशिक) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दुपारी एक वाजता शेख प्रवाशांना घेऊन द्वारका येथून जेलरोडकडे जात होता. यावेळी संशयित तोसिफ शहा (रा. नानावली, जुने नाशिक) व इतर दोन संशयितांनी दुचाकीवर येऊन रिक्षाला अडवली. तसेच जुन्या भांडणाची कुरापत काढून लाकडी दांड्याने मारहाण केली. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच लाखांची घरफोडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाथर्डी फाटा तसेच उंटवाडी येथे झालेल्या घरफोडीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी जवळपास पाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला. यात सोने चांदीच्या दागिन्यांसह रोकडचा समावेश आहे.
पाथर्डी फाटा येथे केलेल्या घरफोडीत चोरट्यांनी चार लाख ६५ हजार रुपयांचे दागिने लंपास केले. बाळासाहेब पंढरीनाथ बोराडे (रा. ग्रीपार्ट अपार्ट. पाथर्डी फाटा) यांनी इंदिरानगर पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार, बोराडे कुंटुबीय दिवाळीनिमित्त बाहेर गावी गेले होते. चोरट्यांनी २५ ते २८ ऑक्टोबर दरम्यान कडी-कोयंडा तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला. तसेच कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोकड असा मुद्देमाल चोरून नेला. घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक जे. पी. गावीत करत आहेत.
घरफोडीची दुसरी घटना उंटवाडी येथे भर दिवसा घडली. अजय अनंत कुलकर्णी (तिडके नगर, उंटवाडी) यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली. कुलकर्णी कुटुंबीय शनिवारी (दि. २८) दुपारी २ ते ४ वाजेच्या दरम्यान बाहेर गेले असता चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. तसेच कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोकड असा २६ हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरी केला. अंबड पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दत्त मंदिर परिसरात चेन स्नॅचिंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सोने खरेदी करून घरी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावल्याची घटना दत्त मंदिररोड परिसरातील गुरुद्वारासमोर शनिवारी (दि. २८) सायंकाळी घडली.
या प्रकरणी शारदा कोठावदे (४८, रा. एलआयसी ऑफिसमागे, शिखरेवाडी) यांनी तक्रार दिली आहे. कोठवदे या शनिवारी सायंकाळी नाशिकरोड परिसरातील दत्त मंदिररोड भागातील एका ज्वेलरी शॉपमध्ये सोने खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. काम आटोपून त्या गुरुद्वार समोरून घराकडे परतत असताना चेन स्नॅचिंगचा प्रकार घडला. दुचाकीवरुन समोरून आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ६० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र गळ्यातून तोडून नेले. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक भडीकर करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हा सिद्धतेत नाशिक अव्व्ल

0
0

arvind.jadhav@timesgroup.com
Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक : शहर पोलिसांकडून सातत्याने होणाऱ्या प्रयत्नामुळे सेशन तसेच प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) यांच्या कोर्टात चालणाऱ्या खटल्यांमध्ये गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. गंभीर प्रकारच्या सेशन खटल्यांमध्ये मागील तीन वर्षात जवळपास तीनपटीने वाढ झाली असून, जेएमएफसी कोर्टातही गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण गत वर्षीच्या ३३ वरून ५१ टक्क्यांपर्यंत पोहचले आहे.
जेएमएफसी कोर्टात २०१६ मध्ये तब्बल एक हजार १२८ खटले निकाली निघाले. चोरी, दुखापत, किरकोळ हाणामारी अशा साधारणतः तीन ते सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद असलेल्या खटल्यांचा यात समावेश असतो. २०१६ मध्ये या कोर्टांमध्ये एक हजार १२८ पैकी ४५३ खटल्यांमध्ये गुन्हे सिद्ध झाले होते. तर, ६७५ खटले निर्दोष सुटले. गुन्हा सिद्ध होण्याचे सरासरी प्रमाण ४०.१६ इतके राहिले. २०१५ मध्ये हेच गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण २५.३१ इतके होते. २०१७ मध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण थेट ५१.५२ टक्क्यांवर पोहचले आहे. २०१४ च्या ३१.१ टक्क्यांचा विचार करता तीन वर्षात गुन्हा सिद्ध होण्याच्या प्रमाणात समाधानकारक वाढ झालेली दिसते. दरम्यान, खून, आत्महत्येस प्रवृत्त करणे, अपहरण अशा ७ वर्षांपेक्षा अधिक शिक्षा होऊ शकतात, अशा गुन्ह्यांची सुनावणी सेशन कोर्टात होते. २०१६ मध्ये अशा प्रकाराच्या १५३ खटल्यांची सुनावणी पूर्ण झाली. त्यातील ३३ खटल्यांमधील आरोपींना शिक्षा ठोठवण्यात आली तर १२० गुन्ह्यात सबळ पुराव्या अभावी निर्दोष सुटका झाली. तरीही गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण प्रथमच २१.५७ इतके झाले. २०१५ मध्ये १५.५८ टक्के आणि २०१४ मध्ये गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण अवघे ९.४० टक्के इतके होते. यंदा पहिल्या नऊ महिन्यात २५.९६ टक्के गुन्हे सिद्ध करण्यात पोलिसांना यश मिळाले.

सुधारणेस अजूनही वाव

याबाबत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल म्हणाले, की प्रगती चांगली असली तरी सुधारणा करण्यास अद्याप वाव आहे. त्यादृष्टीने उपाययोजना राबवण्यात येत आहे. गुन्हा शोधून काढणे, त्यादृष्टीने पुरावे सकंलित करणे आणि कोर्टात आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी पुराव्यांची मांडणी करणे ही मोठी प्रक्रिया आहे. तसे प्रशिक्षण पोलिस अधिकाऱ्यांना वा कर्मचाऱ्यांना वेळोवेळी देण्यात येते. यात, पैरवी अधिकारी तसेच कर्मचारी यांचे योगदान महत्त्वाचे ठरते. फॉरेन्सिक लॅब, फॉरेन्सिक व्हॅन यांचा प्रत्येक घटनेत खुबीने वापर केला जातो आहे. सरकारी पक्षाच्या वकिलांसोबत सतत संवाद सुरू असतो. नुकतेच यासंबंधी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला, असे डॉ. सिंगल यांनी स्पष्ट केले.

राज्यपातळीवर दखल

गुन्हा सिद्ध होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होत असल्याची दखल राज्य पातळीवर घेण्यात आली आहे. गुन्हा सिद्ध होण्यात सरकार पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरते. या पार्श्वभूमीवर जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांची कायदा आणि न्याय विभागाच्या प्रधान सचिवांनी निवड केली आहे. गुन्हा सिद्ध होऊन दोषींना शिक्षा होण्यातील अडसर दूर करण्यासाठी अॅड. मिसर राज्यभरात कोठेही प्रशिक्षणासाठी पोहचू शकतात. यासाठी सरकारतर्फे सर्व सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

गुन्हा सिद्ध होण्याचे वाढते प्रमाण

वर्ष...सत्र न्यायालय...जेएमएफसी (टक्केवारीमध्ये)
- २०१४...९.४...३२.१
- २०१५...१५.५८...२५.३१
- २०१६...२१.५७...३३.२६
- २०१७...२५.९३...५१.५२
(आकडेवारी सप्टेंबर २०१७ पर्यंत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images