Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

१३१ थकबाकीदारांचे पालिकेने तोडले पाणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सध्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता मनपाने महसूल वाढीसाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या असून, थकबाकी वसुलीसाठी आता थेट पाणीपुरवठा खंड‌ित करण्याची कारवाई सुरू केली आहे. मालमत्ता थकबाकीदारावर कारवाई केल्यानंतर पाणीपट्टी थकवणाऱ्यांकडे कारवाईचा मोर्चा पालिकेने वळवला आहे. सूचनापत्र व अंतिम नोट‌िसा देऊनही थकबाकी न भरणाऱ्या १३१ जणांचे नळकनेक्शन बंद करण्यात आले आहेत. ही कारवाई आता सुरूच राहणार असल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे.

शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असल्याने या योजनेच्या कामांसह शहरातील विविध विकासकामे, मनपाचा प्रशासकीय खर्च भागविण्यासाठी निधीची चणचण भासत आहे. राज्य सरकारकडून मिळणारा निधी आणि मालमत्ता कर आणि पाणीपट्टीतूनच महापालिकेला मोठा निधी मिळत आहे. यामुळे आता प्रशासनाने पाणीपट्टी व मालमत्ताकरावरच्या वसुलीवर भर देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. महापालिकेने मालमत्ता कर वसुली पाठोपाठ पाणीपट्टीपोटी थकबाकीदार असलेल्या ६५ हजार मालमत्ताधारकांचे नळकनेक्शन तोडण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. या थकबाकीदारांकडे जवळपास १४ कोटींची थकबाकी आहे. या थकबाकीदारांना नोटीस दिल्यानंतर त्यातील २५ हजार थकबाकीदारांकडून साडेसात कोटींची वसुली मनपाने केली आहे. गेल्या महिन्यापासून यासंदर्भातील कारवाई केली जात आहे. त्यात आतापर्यंत २५ हजार नळकनेक्शनधारकांनी मनपाच्या कारवाईच्या भीतीपोटी थकबाकी भरली असून, ही रक्कम सात ८० लाखांच्या वर गेली आहे. तीन दिवसांपासून या थकबाकीदारांचे नळकनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू केली आहे. त्याअंतर्गत तीन दिवसांत शहरातील १३१ पाणीपट्टी थकबाकीदारांचे नळकनेक्शन तोडण्यात आले आहे. पालिकेने सुरू केलेल्या या कारवाईने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आमदारांचे प्रगतिपुस्तक- दिंडोरी-पेठ

$
0
0

आमदारांचे प्रगतिपुस्तक


मतदारसंघ ः दिंडोरी-पेठ


वीजप्रश्न सोडविला, पण आदिवासींचा वनवास कायम


दिंडोरी-पेठ मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जात असून, केंद्रामध्ये मोदींची लाट असतानाही दिंडोरी तालुक्याने शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीची साथ सोडली नाही. कादवा साखर कारखान्याभोवतीच मतदारसंघाचे राजकारण फिरत असल्याने मतदारसंघातील रस्ते, पिण्याचे पाणी, औद्योगीकरण, शिक्षणाचा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर अभाव आहे. औद्योगीकरणाला अनुकूल वातावरण असतानाही त्यासाठी प्रयत्न केले जात नसल्याने मतदारसंघात बेरोजगारीचा प्रश्न कायम आहे. आमदार नरहरी झिरवाळ यांनी तीन वर्षांत मतदारसंघातील विजेचा प्रश्न सोडविण्यात यश मिळविले असले, तरी रस्ते, पाणी, शिक्षण, बेरोजगारी व आरोग्य यांसारख्या सुविधांचा वनवास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे निकटवर्तीय समजले जाणारे श्रीराम शेटे यांचे या तालुक्यावर राजकीय वर्चस्व आहे.

या ठिकाणी २००४ च्या निवडणुकीत नरहरी झिरवाळ आमदार म्हणून निवडून आले होते. परंतु, २००९ च्या निवडणुकीत जनता दलाचे माजी खासदार हरिभाऊ महाले यांचे चिरंजीव धनराज महाले यांनी शिवसेनेच्या तिक‌टिावर निवडणूक लढवून विजय आपल्याकडे खेचून आणला. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत धनराज महाले यांना ही जागा टिकवता आली नाही. नरहरी झिरवाळ यांनी पुन्हा या मतदारसंघावर आपले वर्चस्व सिद्ध करीत पुनरागमन केले. त्यामुळे त्यांनी आता मतदारसंघातील कामांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.

वीज प्रश्नाला प्राधान्य

या भागातील पेठ तालुक्यात व‌जिेचा प्रश्न गंभीर होता. बऱ्याचदा दिवसभर वीज उपलब्ध होत नसे. ही महत्त्वाची बाब हेरून नरहरी झिरवाळ यांनी हा तालुका प्रकाशमय करण्याचा विडा उचलला. पेठ तालुक्याचा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी पेठव्यतिरिक्त करंजाळी येथे स्वतंत्र सब स्टेशन (विद्युत उपकेंद्र) कार्यान्वित करण्यात आले. त्याचप्रमाणे दिंडोरी तालुक्यातील पूर्व भागाचा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी दिंडोरीव्यतिरिक्त कोऱ्हाटे या ठिकाणी विद्युत उपकेंद्र मंजूर करून कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील विजेचा प्रश्न काही प्रमाणावर मार्गी लागल्याचे चित्र दिसून येत आहे.


पाणी योजनांचा पाठपुरावा

दिंडोरी-पेठ मतदारसंघातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जागा उपलब्ध नव्हती, तसेच पुस्तके उपलब्ध नव्हती. त्यासाठी शैक्षणिक साहित्याने सुसज्ज असे दिंडोरी येथे १ कोटी रुपये खर्च करून, तसेच करंजाळी येथे ८० लाख रुपये खर्चाचे वाचनालय बांधण्यात आले. वणी शहरात पाणीपुरवठा योजना मंजूर करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला. मांजरपाडा प्रकल्पासाठी झिरवाळ यांनी विविध स्तरांवर प्रयत्न करून योजनेस मंजुरी मिळविली. त्यामुळे पेठ व दिंडोरी तालुक्यांना याचा फायदा होणार आहे. दिंडोरी शहरात अद्ययावत सांस्कृतिक भवन नव्हते. त्याची उण‌ीव आमदार झिरवाळ यांनी भरून काढली. दिंडोरी शहरात १ कोटी ३० लाख रुपये खर्च करून आदिवासी सांस्कृतिक भवनाची भव्य इमारत साकारली आहे.

राजकारणाला मर्यादा

पेठ तालुक्यावर काही वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व असल्याचे दिसून येते. दिंडोरीत राष्ट्रवादीचे प्राबल्य असले, तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत मात्र शिवसेनेचा दबदबा वाढला आहे. दिंडोरीत असलेला कादवा कारखाना हा राजकारणाचा केंद्रबिंदू समजला जातो. या ठिकाणी श्रीराम शेटेंचे वर्चस्व आहे. त्याचा फायदा राष्ट्रवादीला होत असतो. दिंडोरी आणि पेठ हे दोन्ही तालुके अदिवासीबहुल असल्यामुळे येथे बहुजन समाजाच्या राजकारणाला मर्यादा आहेत. दिंडोरी तालुका शेतीच्या उत्पादनात अग्रेसर आहे. येथील द्राक्ष, ऊस, फुलशेती प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे येथे नव्याने झालेल्या वायनरींनीही बस्तान बसविले आहे. कृषिसंपन्न असलेला तालुका ऑनलाइन खरेदीतही अग्रेसर आहे. या ठिकाणी भाजप व कॉँग्रेस पक्षाचे फारसे काम नसल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीचेच प्राबल्य आहे.

प्रस्तावित कामे

दिंडोरीत जनता विद्यालय व कॉलेजसमोर पादचारी उड्डाणपूल उभारणे, पेठ तालुक्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करणे, वणी शहरात अद्ययावत क्रीडा संकुल उभारणे, दिंडोरी शहरात जलतरण तलाव उभारणे, पेठचे मॉडेल बसस्थानक बनविणे, दुर्गम भागात दिवाबत्तीची सोय करणे आदी विकासकामे या मतदारसंघात प्रस्तावित आहेत.


मार्गी लावलेली कामे


-डोंगरी विकास निधीअंतर्गत १५ कोटींचे रस्ते

-दिंडोरीत १ कोटी रुपये खर्चून वाचनालय

-दिंडोरीत १ कोटी ३० लाख रुपये खर्चून आदिवासी सांस्कृतिक भवन

-करंजाळी येथे ८० लाख रुपये खर्चून वाचनालय

-मांजरपाडा प्रकल्प मंजुरीत यश

-वणी शहरात ट्रॉमा केअर इमारत पूर्ण

-वणी शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला

-करंजाळी येथे स्वतंत्र सब स्टेशन

-कोऱ्हाटे येथे विद्युत उपकेंद्र

-दिवाबत्ती, मोऱ्या, शाळांना संगणक, क्रीडा साहित्य, श्रवणयंत्रे आदी

-आदिवासी भागांत आरोग्य केंद्रांचे बांधकाम

--


या प्रश्नांकडे दुर्लक्ष

दिंडोरी आणि पेठ तालुक्यांत उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. येथील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी नाशिकला यावे लागते. या ठिकाणी सर्व सोयींनी युक्त अभ्यासक्रमांची विविध कॉलेजेस आली, तर येथील विकास होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे या भागात अनेक चांगले खेळाडू आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे या भागात टॅलेंट सर्च कॅम्प घेतल्यास अनेक राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू सापडू शकतील. वणी येथे असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यांना त्या प्रमाणात सुविधा मिळत नाही, तसेच ग्रामीण भागात आजही १२ तास वीज नसते. या ठिकाणी अखंडित वीजपुरवठा व्हावा, अशीही या भागातील नागरिकांची मागणी आहे. मतदारसंघात रस्त्यांचे जाळे फारसे नाही. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न बिकट आहे. मतदारसंघातील बेरोजगारीचा प्रश्न कायम आहे.

--


विध‌िमंडळात सहभाग

आमदार नरहरी झिरवाळ यांनी वेळोवेळी दिंडोरी आणि पेठ तालुक्यांचे प्रश्न विध‌मिंडळात मांडले आहेत. पेठ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. या ठिकाणी पाणी साठविण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. त्याचप्रमाणे जास्त पाऊस झाल्यास या ठिकाणी दळणवळण यंत्रणा ठप्प होते. अनेक भागात पुलांची आवश्यकता आहे. त्यासाठीही विधिमंडळात आवाज उठविला. दिंडोरी मतदारसंघ आदिवासीबहुल असल्याने निधीची कमतरता भासू नये यासाठी पाठपुरावा केला. वणी येथे अद्ययावत रुग्णालय व्हावे, जेणेकरून येणाऱ्या भाविकांची सोय होईल, त्यासाठीही मागणी केली. तालुक्यात पर्यटनाचा विकास व्हावा यासाठी सरकारकडे वेळोवेळी मागणी केली आहे.

--

आमदार म्हणतात...

सरकारचा असहकार

असहकाराच्या धोरणामुळे अनेक कामे झालेली नाहीत. पेठ आणि दिंडोरी या तालुक्यांतील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. येथील खड्डे बुजविण्याचे कामदेखील हाती घेण्यात आलेले नाही. पेठ तालुक्यात अनेक भागांत पावसाळ्यात दळणवळण ठप्प होते. या ठिकाणी पूल व्हावेत यासाठी पाठपुरावा केला. परंतु, त्याला केराची टोपली दाखविण्यात आली. शेतीसाठीही पाणी नाही. साठवण तलावांचे प्रस्ताव पाठविले आहेत. परंतु, त्यांना मान्यता मिळालेली नाही. दिंडोरी मतदारसंघात एमआयडीसी, वणी येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या भागात रुग्णालय झाले, तर वणी येथे येणाऱ्या भाविकांचीही सोय होणार आहे. या ठिकाणी मेड‌किल कॉलेज व्हावे यासाठीदेखील प्रयत्न सुरू आहेत.

- नरहरी झिरवाळ, आमदार, दिंडोरी-पेठ

--


विरोधक म्हणतात...

ठोस कामे करण्यात अपयश

आमदार नरहरी झिरवाळ हे ठोस कामे करण्यात अपयशी ठरले आहेत. दिंडोरी-पेठ हा मतदारसंघ अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. ग्रामीण भाग शहराशी जोडण्यासाठी रस्त्यांचे जाळे विणू, असे सरकारने जाहीर केले. परंतु, या मतदारसंघातील खड्डे बुजवायलादेखील सरकारने निधी दिलेला नाही. तेव्हा नवीन रस्ते कसे होतील, हा मोठा प्रश्न आहे. या मतदारसंघात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. गेल्या काही वर्षांत यासाठी ठोस उपाययोजना मतदारसंघाच्या वाट्याला आलेल्या नाहीत. अनेक गावे आजही तहानलेली आहेत. आमदारसाहेब म्हणतात, आमचे सरकार नसल्याने योजना मार्गी लागत नाहीत. हे म्हणणे चुकीचे आहे. आपण किती पाठपुरावा करतो यावर कामे अवलंबून असतात. कामांचा पाठपुरावा करण्यात ते अपयशी ठरले आहेत.

-धनराज महाले, माजी आमदार

--

शब्दांकन ः फणिंद्र मंडलिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंग्यू आवाक्याबाहेर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पावसाने उसंत देऊन थंडी सुरू झाली असली तरी, शहरातील डेंग्यूचा प्रकोप मात्र कायम आहे. ऑक्टोबरमध्ये डेंग्यूने रेकॉर्ड केले होते. नोव्हेंबरमध्ये तो आवाक्याबाहेर गेला आहे. पहिल्या बारा दिवसांत शहरात डेंग्यू संशयितांची संख्या २७१ वर पोहचली आहे. बारा दिवसांत डेंग्यूचे १२६ रुग्ण पॉझ‌िट‌िव्ह आढळून आल्याने शहरातील डेंग्यूने राज्यात तिसरा नंबर मिळवला आहे. त्यामुळे नाशिककरांचे आरोग्य आता रामभरोसे झाले असून, सत्ताधाऱ्यांचा आरोग्य विभागावर अंकुश नसल्याचे चित्र आहे.

नाशिक शहरात १७६ कोटींचा घंटागाडी ठेका आणि १९ कोटींचा पेस्ट कंट्रोलचा ठेका देऊनही नाशिककरांच्या आरोग्याचा खेळ मात्र थांबत नसल्याचे चित्र आहे. स्वाइन फ्लूपाठोपाठ डेंग्यूने शहरात थैमान घातले असताना पालिकेच्या उपाययोजना कागदारवर मात्र जोरात आहेत. एकीकडे आरोग्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असताना डेंग्यूचा प्रकोप कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. गेल्या चार मह‌िन्यांच्या आकडेवारीनुसार डेंग्यू कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याचे चित्र आहे. ऑगस्टमध्ये डेंग्यूचे ९७ रुग्ण सापडले होते. सप्टेंबर महिन्यात हा आकडा आणखी वाढून १०५ वर पोहोचला होता. ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक २४८ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. डेंग्यू संशय‌ितांचा आकडा ४७७ पर्यंत पोहचला आहे. त्यामुळे नाशिकसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. पावसाळा संपल्यानंतर आणि थंडीची चाहूल लागल्याने डेंग्यूची तीव्रता कमी होईल, अशी अपेक्षा होती.

नोव्हेंबरमध्ये पहिल्या बारा दिवसांतच शहरात डेंग्यूचे १२६ रुग्ण पॉझ‌िटिव्ह आढळून आले आहेत. संशय‌ितांचा आकडा २७१ पर्यंत पोहचला आहे. त्यामुळे ही धोक्याची घंटा मानली जात आहे. चालू मह‌िन्यात अजून १८ दिवस शिल्लक असून, डेंग्यू संशय‌ितांचा आकडा पाचशेच्या पार जाणार असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या वतीने डेंग्यूबाबत जनजागृती केली जात असल्याचा दावा केला जात असला तरी, तो वाढलेल्या आकडेवारीवरून फोल ठरला आहे. त्यामुळे नाशिककरांचे आरोग्य आता रामभरोसे झाल्याचे चित्र आहे.

..म्हणे ३० टक्के घट!

शहराच डेंग्यूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असताना महापालिकेचा मलेरिया विभाग मात्र आकड्यांच्या खेळात अडकला आहे. गेल्या वर्षापेक्षा डेंग्यूचे प्रमाण तीस ते पस्तीस टक्के कमी असल्याचा दावा डॉ. राहुल गायकवाड यांनी केला आहे. तसेच प्रबोधन व जनजागृती केली जात असून, आता डेंग्यू नागरिकांच्या घरातच शिल्लक राह‌िल्याचा दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे डेंग्यूच्या रुग्णांबाबत नाशिक हे राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असतानाही अधिकारी नाशिककरांची दिशाभूल करण्यात व्यस्त आहेत.

मह‌िना डेंग्यू रुग्ण

जुलै १९

ऑगस्ट ९७

सप्टेंबर १०५

ऑक्टोबर २४८

नोव्हेंबर (दि. १२पर्यंत) १२६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२१ पासून वाजणार सनई-चौघडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मानवी जीवनातील १६ संस्कारांपैकी महत्त्वाच्या असणाऱ्या विवाह सोहळ्यास यंदा २१ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिना मध्यावर आला असतानाच तुळशीचे लग्नही उरकले असून, आता सनई-चौघड्यांचे स्वर पुन्हा एकदा गुंजणार आहेत. पुढील वर्षीच्या डिसेंबर महिन्यापर्यंत ६० विवाह मुहूर्त आहेत.

दि. २१ नोव्हेंबरपासून मुहूर्त सुरू होत असल्याने त्या दृष्टीने लगीनघरी आतापासूनच तयारीला सुरुवात झाली आहे. मंगल कार्यालये, लॉन्स, बॅण्ड, टेंट हाऊस, केटरिंग, फुलमाळा आदींच्या बुकिंगसाठी संबंधितांची धांदल उडाली आहे. सराफ बाजारात मंगळसूत्र, अंगठी व अन्य दागिन्यांची मागणी वाढली आहे. वधू-वरांच्या पसंतीने कपडे खरेदी होत आहे. पालकही आपल्या उपवर मुलामुलींचे विवाह याच काळात जमावेत म्हणून धावपळ करताना दिसत आहेत.

--

दीड महिन्यात दहा मुहूर्त

गतवर्षीच्या तुलनेत यंदा काहीसे कमी विवाह मुहूर्त आहेत. यंदा नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये एकूण १० मुहूर्त आहेत. जानेवारी महिन्यात लग्नासाठी एकही मुहूर्त नाही. त्यामुळे वधु-वरपित्यांना फेब्रुवारी उजाडू द्यावा लागणार आहे. फेब्रुवारी महिन्यात ६, मार्च महिन्यात ७, तर एप्रिल महिन्यात ८ मुहूर्त आहेत. मात्र, सध्या मुहूर्तापेक्षाही सर्वांना सवड ज्या वारी आहे तो लग्नवार, असा प्रघात पडत चालला आहे.

--

डिसेंबर २०१८ पर्यंतचे विवाह मुहूर्त

--

नोव्हेंबर- २१, २३, २५, २८, २९

डिसेंबर- ३, ४, १०, ११, १२

जानेवारी- एकही विवाह मुहूर्त नाही.

फेब्रुवारी- ५, ९, ११, १८, १९, २०

मार्च- ३, ४, ५, ६, १२, १३, १४

एप्रिल- १९, २०, २४, २५, २६, २७, २८, ३०

मे- १, २, ४, ६, ७, ८, ९, ११, १२

जून- १८, २३, २८, २९

जुलै- २, ५, ६, ७, १०, १५

डिसेंबर- २, १३, १७, १८, २२, २६, २८, २९, ३०, ३१

--

यंदा विवाहाचे ६० मुहूर्त आहेत. गेल्या वर्षी ही संख्या अधिक होती. मुहूर्त अधिक होते. जानेवारी महिन्यात तर एकही मुहूर्त नाही. तुळशी विवाहानंतर मुहूर्तांना प्रारंभ झाला आहे. परंतु, २१ तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

-अमोलशास्त्री किरपेकर, पुरोहित

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेच्या बैठकीत ठेकेदारावर चर्वितचर्वण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील फैलावत जाणाऱ्या डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरलेल्या आरोग्य यंत्रणेला कामाला लावण्याऐवजी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी मंगळवारी ठेकेदारांच्या प्रश्नांबाबतच आदळआपट केल्याने स्वच्छतेबाबतची बैठकच भरटकली.

डेंग्यू तसेच अस्वच्छतेवर उपाययोजना करण्याऐवजी प्रत्येकानेच ठेकेदाराच्या चुकांवर बोट ठेवण्यास प्राधान्य दिल्याने स्वच्छतेची बैठक थेट आरोग्य अधिकाऱ्याचा पदभार काढण्यापर्यंत गेली. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपच्याच नगरसेवकांनी अधिकारी ऐकत नसल्याची तक्रार करत, आपल्याच पदाधिकाऱ्यांचा प्रशासनावर वचक नसल्याची बाब उघड केली. नगरसेवकांच्या तक्रारी आणि अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे संतप्त झालेल्या महापौर रंजना भानसी यांनी थेट आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाने यांचा कार्यभार काढून घेण्याचे पत्र आयुक्तांना देणार असल्याचे स्पष्ट केले.

महापालिकेच्या आरोग्य विभागाची बैठक महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृनेते दिनकर पाटील, भाजपचे गटनेते संभाजी मोरुस्कर, शहर सुधार समितीचे भगवान दोंदे, विधी समितीच्या शीतल माळोदे, आरोग्य समितीचे सतीश कुलकर्णी यांच्यासह सहा प्रभाग समिती सभापती व नगरसेवक उपस्थित होते. आरोग्य व स्वच्छतेसंदर्भातील बैठकीत प्रामुख्याने डेंग्यू नियंत्रण व स्वच्छतेच्या उपाययोजनांवर चर्चा होईल, असे अपेक्षित होते. परंतु, प्रभाग समिती, स्थायी समिती, आरोग्य समितीच्या बैठकीत पेस्ट कंट्रोल ठेकेदार काम करत नाही, घंटागाडी येत नाही, ठेका रद्द करा या विषयांवरच चर्वितचर्वण झाले. दोन तासांच्या बैठकीत ठोस चर्चा होऊन निर्णय होणे अपेक्षित असताना ठेका रद्द करा, अधिकाऱ्यांवर कारवाई करा, यापलिकडे बैठक सरकलीच नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनीही बैठक गांभीर्याने न घेता, काढता पाय घेतला.

औषध फवारणी, धूर फवारणी, घंटागाडी आदी कामांच्या ठेकेदारांच्या कार्यपद्धतीवरच दोन तास चर्चा करण्यात आली. प्रभागात औषध आणि धूर फवारणी वेळच्या वेळी होत नसल्याच्या तक्रारी उपस्थित नगरसेवकांनी केल्या. यावेळी महापौरांनी आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाने यांना फैलावर घेत औषध फवारणी आणि धूर फवारणीच्या ठेक्यावर किती खर्च होतो, असा प्रश्न केला. हा ठेका १९ कोटींपर्यंत असल्याचे स्पष्ट करीत ठेकेदाराकडील २३८ कर्मचारी या कामासाठी कार्यरत असल्याचे स्पष्टीकरण डॉ. बुकाने यांनी दिले. सभागृह नेते दिनकर पाटील यांनी डॉ. बुकाने यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत त्यांची तातडीने बदली करण्याची मागणी केली. सिडकोतील एकाच गल्लीत डेंग्यूचे ५५ रुग्ण आढळल्याचे सांगत मलेरिया ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची मागणी आरोग्य सभापती सतीश कुलकर्णी यांनी केली. संबंधित ठेकेदाराला दोन कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याचे डॉ. राहुल गायकवाड यांनी स्पष्ट केले. या नोट‌िसांच्या उत्तराची वाट न बघता विहीत कालावधीत समाधानकारक खुलासा न आल्यास संबंधितांचा ठेका तातडीने रद्द करण्याचे आदेश महापौरांनी दिले.

६० टक्के फवारणीत पाणी

धूर फवारणीमुळे डास मरतच नसल्याचे डॉ. हेमलता पाटील यांनी सांगितले. औषधांमध्ये ६० टक्के पाणी मिसळून फवारणी केली जात असल्याने ती परिणामकारक ठरत नसल्याचा दावा त्यांनी केला. महापालिकेकडून ठेकेदाराला औषध दिले जाते. परंतु, ठेकेदार पुढे औषधांचे काय करतो, असा प्रश्न उपस्थित करत सर्व गोलमाल असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. आस्थापना परिशिष्टावरील स्वच्छता कर्मचाऱ्यांची ७२ पदे तातडीने भरावीत, अशीही मागणी त्यांनी केली.


पेस्ट कंट्रोल ठेका रद्द करा

धूर फवारणी व औषध फवारणीसाठी महापालिकेने तीन वर्षांसाठी १९ कोटींचा पेस्ट कंट्रोलचा ठेका दिला आहे. परंतु, ठेकेदार महापालिकेला जुमानत नसल्याने संबंधिताचा ठेका रद्द करावा अशी मागणी नगरसेवकांनी केली. संबंधित ठेकेदार किमान वेतन देत नाही, प्रत्येक प्रभागात फॉगिंग मश‌िन पुरवत नाही. त्यामुळे कराराचा भंग झाला असून, त्याचा ठेका रद्द करण्याची एकमुखी मागणी करण्यात आली. त्यावर ठेकेदाराला दोन वेळा नोटीस दिली असून, त्यानंतर आता ठेका रद्द करण्याचीच प्रक्रिया सुरू करा, असे आदेश महापौरांनी दिलेत.


चहापाणी करतो, तरी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बैठकीत भाजपच्या नगरसेविका शांताबाई हिरे यांनीच भाजपच्या कारभाराची पोलखोल केली. आरोग्य विभागाच्या कारभारावर रोष व्यक्त करीत त्या म्हणाल्या की, स्वच्छता अधिकाऱ्यांना आपण चहापाणी करुनही ते समस्यांकडे दुर्लक्ष करतात. आम्ही सहकार्य करतो, पण ते सहकार्य कधीही करीत नाहीत. तक्रार करूनही घंटागाडी मिळत नाही. नागरिक रस्त्यावरच कचरा टाकतात. यापुढे हा कचरा उचलून डॉ. बुकानेंच्या कक्षात टाकला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

नाशिक विभागीय आयुक्त यांच्या आदेशान्वये श्रमदान वनराई बंधारा उपक्रमाला कळवण तालुक्यातील धार्डेदिगर शिवारापासून सुरुवात करण्यात आली. या वेळी नाल्यात उतरून वनराई बंधारा श्रमदानासाठी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पवार, नितीन पवार, उपसभापती विजय शिरसाठ व पंचायत समिती कळवणचे गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम यांसह विविध विभागाचे अधिकारी व ग्रामस्थांनी योगदान दिले.

कळवण तालुक्यातील वनराई बंधारे उपक्रमाला धार्डेदिगर ग्रामपंचायतमधील बरड पाडा ताकबारी धरणातील नाल्यावर ४० फूट रुंद मातीनाला वनराई बंधारा बांधण्यात आला. सुमारे विभागीय आयुक्त यांनी सुचविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीने गाव परिसरात किमान ५ वनराई बंधाऱ्याची बांधणी श्रमदानातून करायची आहे. यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, बचत गट, स्वयंसेवी संस्था अशा विविध सामाजिक घटकांचा व लोकसहभाग महत्त्वाचा समावेश करून गाव परिसरातील पाण्याच्या पातळीत वाढ होईल यासाठी प्रयत्न करावयाचे असल्याचे नितीन पवार यांनी सांगितले आहे.

उपक्रमाला जिल्हा परिषद सदस्या जयश्री पवार, नितीन पवार, उपसभापती विजय शिरसाठ, गटविकास अधिकारी बहिरम यांच्या समवेत सरपंच ललिता जाधव, कनिष्ठ अभियंता के. आर. चव्हाण, उपसरपंच काशिनाथ बहिरम, ग्रामसेवक एस. वाय. महाले, सचिन मुठे, सुनीता देशमुख, दीपक देशमुख, पोपट बहिरम, त्रंबक ठाकरे, सीताराम देशमुख, शिवराम चौधरी, शांताराम बहिरम, वाळू बर्डे, विश्वनाथ बर्डे, उत्तम बहिरम, रत्नाकर भोये, राजेंद्र पवार, सुरेश बहिरम, भाऊसाहेब भोये, पंडित चव्हाण, साहेबराव चव्हाण, राम बहिरम उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतागृहांचा मैला थेट नदीपात्रात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

वालदेवी नदीत देवळालीगाव, विहितगाव, वडनेर, चेहेडी येथे गटारींचे पाणी प्रक्रिया न करताच सोडले जात आहे. परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचा मैलादेखील नदीत सोडला जात असल्याने या नदीला गटारगंगेचे स्वरूप आले आहे. त्यामुळे देवळालीगावातून वाहणारी वालदेवी नदी प्रदूषणमुक्त करून घाट बांधण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

या नदीवर वालदेवी धरण असून, त्यातून नियमित पाणी सोडले जाते. मात्र, त्याचा उपयोग काठावरील नागरिकांना होत नसल्याची स्थिती आहे. परिसरातील नदीपात्रात डुकरे डुंबत असतात. त्यामुळे रोगराई फैलावण्याचा धोका वाढला आहे. साचलेल्या पाण्यामुळे डास व माश्यांचा उपद्रव वाढल्याने सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. या नदीच्या दुरवस्थेबाबत पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या जनता दरबारात प्रश्न उपस्थित करून नाशिक ग्रीन अॅण्ड क्लीन क्लबतर्फे उदय थोरात यांनी निवेदन दिलेले आहे.

विविध घटकांचा पुढाकार

वालदेवी स्वच्छता मोहिमेसाठी प्रभाग सभापती सुमन सातभाई, नगरसेविका सत्यभामा गाडेकर, सरोज आहिरे, सुनीता कोठुळे, केशव पोरजे आदींनी पाठिंबा दिला आहे. नाशिक ग्रीन अॅण्ड क्लीन क्लबतर्फे जनता दरबारात वालदेवी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे.


प्रभाव तात्पुरता

सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, पर्यावरणवादी व महापालिका यांच्याकडून वालदेवी स्वच्छतेसाठी अनेकदा मोहिमा घेण्यात आल्या. मात्र, तेवढ्यापुरतीच नदी स्वच्छता होते. कारण, मलजल वाहिन्या थेट नदीपात्रात सोडल्याने या मोहिमेचा परिणाम हा तात्पुरताच राहतो. याबाबत कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषीथॉन युवा सन्मान पुरस्कार जाहीर

$
0
0

म. टा. प्रत‌िन‌िधी , नाशिक

मेहनत आणि कल्पकतेव्दारे कृषी संशोधन व कृषी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी युवक आणि महिलांचा गौरव करण्यासाठी ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स प्रा. लि. यांच्या वतीने राज्यस्तरीय ‘कृषीथॉन युवा सन्मान’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. प्रयोगशील युवा शेतकरी (पुरुष व महिला), प्रयोगशील युवा कृषी संशोधक, प्रयोगशील युवा कृषी उद्योजक या तीन गटात या पुरस्कारांचे वितरण होणार, अशी माहिती कृषीथॉनचे आयोजक संजय न्याहारकर यांनी दिली.

या पुरस्कारासाठी विविध जिल्ह्यातून प्रस्ताव प्राप्त झाले होते. पुरस्कार निवड समितीत राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठानचे माजी सहसंचालक डॉ. सतीश भोंडे व ज्येष्ठ कृषीशास्रज्ञ डॉ. जयराम पुरकर निर्णयानुसार या पुरस्कारांची निवड करण्यात आली.

पुरस्कार पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे :

प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कार (पुरुष गट ) : योगेश पवार (नाशिक विभाग), अप्पा कारमकर (पुणे विभाग), विष्णू मुसळे (औरंगाबाद विभाग ), राहुल रौंदळ (अमरावती विभाग ), राहुल सुपारे (नागपूर विभाग)

प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कार (महिला गट ) : ज्योत्स्ना सुरवाडे (नाशिक विभाग ), विभावरी जाधव (पुणे विभाग), रेखा वहाटूळे (औरंगाबाद विभाग ), श्रद्धा पोतदार ( कोकण विभाग ), कल्पना दामोदर (अमरावती विभाग ), रुपाली पाटील (नागपूर विभाग )

प्रयोगशील युवा कृषी संशोधक पुरस्कार : डॉ. अंकुश चोरमुले (नाशिक विभाग), डॉ. मिलिंद जोशी (पुणे विभाग), डॉ. अर्चना कवडे (औरंगाबाद विभाग ), दीपक क्षीरसागर (कोकण विभाग ), डॉ. दिप्ती वानखेडे (अमरावती विभाग), डॉ. स्मित रमेश लेंडे (नागपूर विभाग )

प्रयोगशील युवा कृषी उद्योजक पुरस्कार : सरोजिनी फडतरे (नाशिक विभाग ), रोहन उरसळ (पुणे विभाग ),

अभिजित वाडेकर (औरंगाबाद विभाग ), समृद्धी परांजपे (कोकण विभाग), उद्धव नेरकर (अमरावती विभाग ), ब्रम्हानंद पांगुळ (नागपूर विभाग)

विशेष गौरव पुरस्कार : डॉ. अमित शर्मा (युवा कृषी संशोधक–करणाल, हरयाणा),

आकाश चौरसिया (युवा शेतकरी–सागर, मध्य प्रदेश), रोकडेश्वर फार्मर प्रोडूसर कंपनी, निमगाव ता. सिन्नर (आदर्श शेतकरी उत्पादक कंपनी), भागवत बलक(उत्कृष्ट सेंद्रिय शेतकरी-वडगाव ता. सिन्नर )

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नियोजन आराखडा ९०० कोटींचा

$
0
0

पुढील महिन्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा नियोजन समितीच्या सन २०१८-२०१९ चा आराखडा बनविण्याचे काम नियोजन विभागाने सुरू केले आहे. पुढील वर्षासाठी साधारणपणे ९०० कोटींचा संभाव्य आराखडा असून, विविध विभागांकडून नियोजन विभागाने प्रस्ताव मागविले आहेत. या आराखड्यात सरकारकडून ५० कोटींची वाढ अपेक्षित आहे.

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पुढील महिन्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत हा आराखडा सादर केला जाणार आहे. जिल्हा नियोजन समितीकडून सर्वसाधारण योजनांसाठी सुमारे ३२१ कोटी, आदिवासी उपयोजनांसाठी ४८१ कोटी, तर अनुसूचित जाती उपयोजनांवर ९७ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात येत आहे. सर्वसाधारण योजनेत मुख्यमंत्री ग्राम सडक, ग्रामपंयातींना सहायक अनुदाने, सुक्ष्म सिंचन योजना, ग्रामीण रूग्णालयांचे विस्तारीकरण, नाविन्यपूर्ण योजनांसाठी हा न‌धिी प्रस्तावित आहे. आदिवासी योजनेत ठक्कर बाप्पा योजना, ग्रामीण स्वच्छता अभियान, लघु पाटबंधारे योजना तर अनुसुचित जाती योजनेत दलित वस्ती सुधार योजना, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा फी, ग्राम स्वच्छता अभियान आदि योजनांसाठी निधी प्रस्तावित केला जातो. गतवर्षी ८७३.२७ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातव्या दिवशीही चालला हातोडा

$
0
0

१६ धार्मिक स्थळे हटविली; बागवान पुरात तणाव

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळाविरोधातील महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची सातव्या दिवशी सुरूच राहिली. मंगळवारी १६ अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई करण्यात आली. अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या जुने नाशिक परिसरातील बागवान पुरात कारवाईदरम्यान मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले. पालिकेची कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करीत भाविकांनी अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. परंतु, पोलिस बळावर महापालिकेने विरोध मोडीत काढत कारवाई पूर्ण केली. आतापर्यंत १५० पैकी १३० अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाईत पालिकेला यश आले आहे.

हायकोर्टाच्या निर्देशांनुसार महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कारवाईच्या सातव्या दिवशी जुने नाशिक भागातील संवेदनशील समजल्या भागातील अनधिकृत धार्मिक स्थळांकडे महापालिकेने मोर्चा वळविला. नानावली येथून या मोहिमेला सुरूवात करण्यात आली. येथील कोळीवाडा परिसरातील धार्मिक स्थळ हटविण्यात आल्यानंतर शिवनेरी चौक भागातील दोन अनधिकृत धार्मिक स्थळे जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आली. बागवान पुरात असलेल्या धार्मिक स्थळाबाबत परिसरातील नागरिकांनी पालिकेने कारवाई न करता स्वत:हून हटविण्याचा आग्रह धरला. यासाठी महापालिकेने वेळ द्यावा, अशी मागणी संबंधितांकडून

करण्यात आली. परंतु, महापालिकेने १५ दिवसांपूर्वीच नोटिसा दिलेल्या असल्याने आता अधिक वेळ देता येणार नाही, असे सुनावत अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केल्याने याठिकाणी स्थानिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात काहीसा तणाव निर्माण झाला होता. सदर धार्मिक स्थळ पुरातन असून यासंदर्भातील वाद न्यायप्रविष्ठ असल्याने पालिकेने कारवाई करू नये, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली. परंतु, न्यायालयाचे कुठलेही स्थगिती आदेश नसल्याने कारवाई क्रमप्राप्त असल्याची भूमिका पथकातील अधिकाऱ्यांनी घेतल्याने याठिकाणी गोंधळाला सुरूवात झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करीत विरोधकांना शांत करत पोलिस बळावर ही कारवाई पूर्ण केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शौचालये ग्राहकांसाठीच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शहरातील सहा ही पेट्रोलपंपावरील शौचालय सार्वजनिक वापरासाठी १३ पासून खुले करण्यात आले असल्याची अधिसूचना मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी प्रसिद्धीस दिली असतांना सटाणा पेट्रोलपंप चालकांनी सदरच्या अधिसुचनेस विरोध केला आहे. पेट्रोल पंपावरील शौचालये ही केवळ आमच्या ग्राहकांसाठीच असतील असा ठाम निर्धार केल्याने संबंधित वादाला वेगळे वळण मिळण्याची चिन्हे आहेत.

सटाणा नगरपरिषदेने अधिसुचनेनुसार १३ नोव्हेंबरपासून सटाणा शहरातील पेट्रोलपंप सार्वजनिक जनतेसाठी खुले केल्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर सटाणा शहरातील पेट्रोल चालकांनी यांस विरोध दर्शविला आहे.

स्वच्छ भारत अभियानामध्ये सटाणा शहराच्या सर्वेक्षणाची मोहीम सुरू आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ च्या तरतुदी अनुसार शहरातील सहाही पेट्रोल पंपावरील शौचालय सामान्य लोकांच्या वापरांसाठी खुले करण्यात आले असल्याची माहिती सटाणा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी दिली एका अधिसुचनेद्वारे दिली आहे.

तर दुसरीकडे शहरातील सर्वच पेट्रोलपंप चालकांनी या अधिसूचनेला विरोध करतांना शहरात असलेल्या पेट्रोल पंपावरील शौचालये ही केवळ आमच्या ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार आहेत. यामुळे ही शौचालये सार्वजनिक पातळीवर खुली करण्यास आमचा विरोध असणार आहे. बुधवारी पेट्रोलपंप चालकांच्या वतीने देण्यात येणार आहे. यामुळे पालिका व पेट्रोलपंप चालकांमध्ये संघर्षनिर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. सटाणा पालिकेने जारी केलेल्या अधिसूचनेला पेट्रोल पंप चालकांचा विरोध कायम आहे.
पेट्रोलपंपावरील शौचालये ही केवळ आमच्या ग्राहकांसाठीच खुली असतील सार्वजनिक जनतेसाठी आमचा विरोध असणार आहे.

- प्रल्हाद पाटील, अध्यक्ष, पेट्रोल डिलर असोशिएशन, सटाणा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाळे बांधण्यास स्थगिती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून कोणतीही पूर्व परवानगी घेतलेली नसताना नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन ६२ गाळे तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले. याची माहिती मिळताच जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी मंगळवारी दुपारी बाजार समितीत येऊन पाहणी केली आणि येथे गाळे तयार करण्यास स्थगिती दिली.
बाजार समितीमधील जुन्या दोन सेल हॉलमध्ये शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करून त्याच‌े पॅकिंग व्यापारी करतात. या सेलहॉलचा १२ व्यापारी वापर करतात. व्यापाऱ्यांचे लायसन्सचे नुतनीकरण झाले आहे, त्यांची वर्षभराची मुदत संपलेली नाही. तरीही तेथे ६२ गाळे बांधण्याचा घाट बाजार समितीने घातला. त्यास व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला. व्यापाऱ्यांना नोटिसा पाठविण्यात आले. त्यांचे गाळे सील करण्यात आले. या निर्णयास विरोध करीत व्यापाऱ्यांनी लिलावही बंद पाडले होते.
व्यापाऱ्यांचा विरोध असतानाही बाजार समिती सभापती शिवाजी चुंभळे यांनी १२ बाय २५ फूट आकाराचे गाळे बनविणे सुरू केले होते. या कामासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून परवानगी घेणे आवश्यक होती. मात्र, त्यांना तसा प्रस्ताव पाठविण्यात आला नाही. असे असताना या सेल हॉलचे जुने शेटर तोडण्यात आले. नवीन शेटर बसून १२ बाय २५ फूट या आकाराचे गाळे तयार करण्याचे कामही सुरू करण्यात आले. बाजार समितीला अंतर्गत कामकाजासाठी ५० हजार रुपयांपर्यंत काम करण्याची परवानगी आहे. त्यापेक्षा जास्त रकमेच्या कामकाजासाठी जिल्हा उपनिबंधकांची परवानगी घेणे गरजेचे आहे. असे असतानाही हे काम सुरू करण्यात आले.

जिल्हा उपनिबंधकांनी पाहणी केली. शेतकरी या ठिकाणी शेतमाल आणतात, म्हणून व्यापारी, अडते व्यवसाय करतात, त्यामुळे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कामकाज करावे, अशा शब्दात जिल्हा उपनिबंधक करे यांनी बाजार समिती प्रशासनाला फटकारले. यावेळी सभापती शिवाजी चुंभळे, सचिव महेंद्र निकाळे, कनिष्ठ अभियंता आर. जी. रहाडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टॉर्क २०१७’ नोंदणीस आज अखेरची मुदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘टाइम्स ऑफ इंडिया’ आणि स्पेक्ट्रम यांच्या वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘टॅलेंट रिवॉर्ड एक्झाम २०१७’ चे आयोजन करण्यात आले आहे. यात नोंदणीसाठी बुधवार (दि. १५) अखेरची मुदत देण्यात आली आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांमधील प्रतिभा आणि बौद्धिक गुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदा ही परीक्षा १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमातील विज्ञान, गणित आणि मानसिक क्षमता या विषयांचा समावेश राहणार आहे. परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी देण्यात येईल. यामध्ये ७५ प्रश्नांचा समावेश असेल. इंग्रजी माध्यमातून ही परीक्षा होणार आहे. बहुपर्यायी पद्धतीचे प्रश्न यात राहतील. या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंगही लागू राहणार आहे.
तीन वर्षांपासून या परीक्षेचे आयोजन केले जात आहे. नाशिकमधूनही या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रम रोख १० हजार रुपये, रोख ७ हजार रुपये आणि रोख ५ हजार रुपयांची पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय पहिल्या शंभर क्रमांकात असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय स्पर्धेत सहभागी होऊन पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपही देण्यात येणार आहे. या परीक्षेसंदर्भात माहिती देताना स्पेक्ट्रमचे कपिल जैन यांनी सांगितले की, ‘टॅलेंट रिवार्ड एक्झाम’ चा उद्देश दहावीनंतर होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांना विद्यार्थ्यांनी कसे सामोरे जावे यासाठी तयारी करवून घेणे हा आहे.

स्पर्धा सहभागासाठी

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १०० रुपये परीक्षा शुल्क आहे. विद्यार्थ्यांनी दोन रंगीत फोटो, शाळेच्या ओळखपत्राची झेरॉक्स या अर्जासोबत जोडणे अपेक्षित आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी अर्ज स्पेक्ट्रमच्या गंगापूर रोड आणि नाशिकरोड शाखेत उपलब्ध आहे. रविवारच्या दिवशीही विद्यार्थी या उपक्रमासाठी नाव नोंदणी करू शकतात. या परीक्षेत पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा ३ डिसेंबर रोजी रावसाहेब थोरात सभागृह, केटीएचएम कॉलेजच्या जवळ, गंगापूर रोड येथे होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जादूचे प्रयोग अनुभवची संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
असाध्य गोष्टी साध्य होताना पहायचे तर जादूच्या प्रयोगांमध्येच. जादूचे प्रयोग आपल्याला आश्चर्यचकीत करतात; परंतु त्याचबरोबर कुतुहलही निर्माण करतात. अशाच जगप्रसिद्ध जादुच्या प्रयोगांची सफर महाराष्ट्र टाइम्स घडविणार आहे. येत्या शुक्रवारी (दि. १७) खास ‘मॅजिक शो’चे आयोजन करण्यात आले आहे. भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात सायंकाळी सात वाजता हा अत्यंत रंजकदार शो होणार असून कल्चर क्लब सदस्यांना सवलतीच्या दरात या शोचा आनंद लुटता येणार आहे.

जादुच्या क्षेत्रात गेल्या नऊ पिढ्यांपासून हुकुमत गाजविणारे सरकार कुटुंब एक दंतकथाच बनले आहे. ‘बंगाल का जादू’ या विशेषणाने सुरू झालेला प्रवास जगभरात मॅजिक ऑफ इंडिया या नावाने प्रसिद्ध आहे. पी. सी. सरकार (सिनिअर) यांनी खऱ्या अर्थाने या जादूच्या प्रयोगांना तीन तासाच्या खेळात गुंफले. त्याचे प्रयोग जगभरात पोहोचले. सरकार यांची युवा पिढी जादूगार पौरुष यांच्या माध्यमातून पुढे आली असून आजच्या डिजिटल एंटरटेनमेंटच्या जमान्यात भावी पिढीला पी. सी. सरकार पौरुष आपल्या ‘स्टेज शो’द्वारे अहोरात्र प्रयत्न करून पुन्हा जादू या वैभवशाली कलेची ओळख करून देत आहेत. सरकार यांचे जादूचे प्रयोग नाशिककरांना पहावयास मिळणार आहेत. या कार्यक्रमाचे तिकीट दर ७००, ५०० आणि ३०० रुपये आहेत. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्या सदस्यांना कुठल्याही एका तिकिटावर ५० टक्के सूट मिळणार आहे. कल्चर क्लब सदस्यांना कालिदास कलामंदिरातील बुकिंग ऑफिसमधून सकाळी ९ ते १२ तसेच सायंकाळी ५ ते ८.३० या वेळेत तिकिटे उपलब्ध होतील. मात्र, त्यासाठी महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबचे कार्ड दाखवणे आवश्यक आहे.

नव्या सदस्यांना फ्री पासेस

महाराष्ट्र टाइम्सच्या कॉलेजरोड येथील कार्यालयात कल्चर क्लबचे नव्याने सदस्य होणाऱ्या नागरिकांना मॅजिक शो चे २ पासेस फ्री दिले जाणार आहेत. रजिस्ट्रेशनसाठी ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगराध्यक्षपदावर सगळ्यांचाच डोळा

$
0
0

केशव ढोन्नर, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यापासून शहरातील वातावरण ऐन थंडीत चांगले तापले आहे. यंदा थेट नगराध्यक्ष निवड होणार असल्यामुळे ही निवडणूक खूपच रंगतदार ठरण्याची पूर्वचिन्ह दिसत आहेत. नगराध्यक्षांच्या उमेदवारीसाठी बरीच मोठी यादी आहे. त्यामध्ये त्र्यंबकेश्वर देवस्थान संस्थान ट्रस्टचे दोन विद्यमान विश्वस्त समोरासमोर उभे ठाकण्याची तयारी करीत आहेत. माजी नगराध्यक्ष कैलास घुले आणि मंदिराचे पूजक डॉ. सत्यप्रिय शुक्ल हे दोन विश्वस्त लढतीसाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत नगरसेवकांसह नगराध्यक्षाच्या निवडीतही प्रचंड स्पर्धा असेल.

कैलास घुले हे सिंहस्थ २००३च्या पूर्वनियोजनात नगराध्यक्ष होते. तर सत्यप्रिय शुक्ल शहराच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान असलेले स्व. डॉ. नानासाहेब शुक्ल परिवाराचा वारसा चालवत आहेत. नगराध्यक्ष आणि मंदिर विश्वस्त या दोन्ही पदांच्या अधिकाराचा समन्वय साधत शहराचा विकास करावयाचा आहे, अशी दोन्हींचा दावा आहे. कैलास घुले हे भाजपच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार आहेत. तर सत्यप्रिय शुक्ल यांनी काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली असून, वेळ पडल्यास अपक्षदेखील लढत देण्याची तयारी ठेवली आहे. नगराध्यक्षांसाठी भाजपकडून पुरूषोत्तम लोहगावकर, माजी नगराध्यक्ष डॉ. दिलीप जोशी, माजी नगराध्यक्षा सुचिता शिखरे, अॅड. पराग दीक्ष‌ित आदींनी उमेदवारीवर दावा ठोकला आहे. काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष सुनील अडसरे, नबियून शेख आदींसह आणखी काही उमेदवार आहेत. शिवसेनेकडून माजी नगराध्यक्ष धनंजय तुंगार तयार आहेत. या व्यतिरिक्त आणखी काही नवे उमेदवार अर्ज दाखल करतांना पुढे येतील अशी दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी, मनसेसह सर्वपक्ष आपले उमेदवार देतील असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. मागणी केलेल्या पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर इतर पक्षाची वा अपक्ष उमेदवारी करण्याची वरीलपैकी काहींची शक्यता आहे.

शेवटच्या दहा दिवसांत होणार धावपळ

अर्ज दाखल करण्यासाठी १६ ते २२ नोव्हेंबर हा सहा दिवसांचा कालावधी आहे. माघारी २८ नोव्हेंबर रोजी आणि मतदान १० डिसेंबर रोजी होणार आहे. शहराची एकूण मतदार संख्या १०६१४ आहे व माघारीनंतर दहा दिवसात या सर्व मतदारांपर्यंत पोहचावयाचे आहे. एकूणच पाहू वेळ आल्यावर ठरवू, असे म्हणत वेळ दवडणे घातक ठरणार आहे.

जाणकारांकडून तर्कवितर्क

यंदा भाजपकडे विजयाची उमेदवारी म्हणून पाहिले जाते. मात्र काँग्रेस राष्ट्रवादीचे एकत्र‌ित बळ आणि सामाज‌िक समीकरणांची जोड वेळेवर चित्र पालटविणारे ठरेल असा जाणकारांचा अंदाज व्यक्त होत आहे. शिवसेना आपली ताकद स्वतंत्र अजमावणार असे दिसते. शहरात भाजपचे दोन हजाराच्या आत मतदान आहे. ते देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीत नातेगोते व मित्रपरिवारांच्या माध्यमातून वाटणी होण्याची दाट शक्यता आहे.

भाजपने जिंकले होते नगराध्यक्षपद

सन २००२ मध्ये थेट नगराध्यक्ष निवडणुकीत अनुसुचित जमाती आरक्षण होते. तेव्हा अनुसुचित जमातीचे नऊ उमेदवार रिंगणात होते. भाजप-सेना युती होती. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची आघाडी होती. अर्थात जवळपास सर्वच पक्षातील बंडखोरांनी उमेदवारी करत आपला करारीबाणा कायम ठेवला होता. भाजपने पार्टी विथ द डिफरन्स असे म्हणत महिला उमेदवार पुष्पा मोहन झोले यांना उमेदवारी देऊन निवडणूक जिंकली होती. त्यावेळेस बाळकृष्ण झोले यांनी अपक्ष उमेदवारी करत सर्वच उमेदवारांना मागे टाकले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वच्छता दूतांच्या कार्याचा गौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या (नाएसो) विविध शाळांमध्ये जीएसके कंपनीच्या सहकार्याने अत्याधुनिक स्वच्छता गृह उभारण्यात आले आहेत. त्यांची स्वच्छता राखण्यासह स्वच्छ व सुंदर शाळा राखण्यासाठी प्रचार व प्रसार करण्याचे उत्तम कार्य करणाऱ्या २०० आदर्श स्वच्छतादूतांचा गौरव करण्यात आला.

संस्थेच्या सारडा कन्या शाळा, सागरमल मोदी, आश्रम शाळा, वेळुंजे (ता. इगतपुरी) आणि सीडीओ-मेरी हायस्कूल अशा चार शाळांमधील विद्यार्थ्यांचा पुरस्कारार्थींमध्ये समावेश आहे. आदर्श स्वच्छतादूतांना आकर्षक ट्रॉफी व कॅप देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर, जीएसके कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर वैदेश, टेक्निलकर डायरेक्टर राजू स्वामी, गरिमा दत्त, अशोक देशपांडे, राजेंद्र निकम, शशांक मदाने, सरोजिनी तारापुरकर, राजश्री वैशंपायन आदी उपस्थित होते.

‘नाएसो’च्या मुलांनी व मुलींनी शाळा व परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे उत्तम काम केले आहे. सर्वांनी कायम शाळा व परिसर स्वच्छ ठेवल्यास सर्वांचे आरोग्य निरामय व उत्तम राहील, असे प्रतिपादन वैदेश यांनी केले. शाळा व परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम सर्व घटक करीत असल्याने शहरात संस्थेने आदर्श निर्माण केला असल्याचे रहाळकर यांनी यावेळी सांगितले.

प्रा. सूर्यकांत रहाळकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. दिलीप अहिरे यांनी सूत्रसंचालन केले तर आशा डावरे यांनी आभार मानले. यावेळी कृष्णा राऊत, मुग्धा काळकर, मुक्ता सप्रे, सचिन निरंतर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या कन्येला गुगलचा सलाम; कॉर्नेलिया सोराबजी यांच्यावर डुडल

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर/ म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

नाशिक शहर जगाच्या पाठीवर कायमच ऐतिहासिक वारसा जपत आले आहे. बुधवारी जगाच्या पाठीवर पुन्हा एकदा नाशिकची नवी ओळख झळकत होती. निमित्त होते, देशातील पहिल्या महिला वकील कॉर्नेलिया सोराबजी यांच्या १५१ व्या जयंतीचे. कॉर्नेलिया यांच्या जयंती निमित्त गुगलने खास त्यांचे खास डुडल साकारले होते. कॉर्नेलिया यांच्या डुडलमधून नाशिकची आणखी एक छाप जगभरात पडली आहे.

कॉर्नेलिया सोराबजी यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८६६ साली नाशिकमधील देवळाली गावात एका पारशी कुटुंबात झाला. रेव्हरंड सोराबजी आणि पत्नी फ्रान्सिना फोर्ड यांच्या नऊ मुलांपैकी कॉर्नेलिया एक होत्या. त्यांचे वडील धर्मप्रचारक होते. कॉर्नेलिया यांच्या आईने पुणे येथे मुलींच्या शिक्षणासाठी शाळा स्थापन केली. महिलांचा वारसा आणि मालमत्ता अधिकारांशी संबंधित प्रकरणांमध्ये स्थानिक महिला या कॉर्नेलिया यांच्या आईचा सल्ला घेत असत. यामुळे सोराबजी यांच्या शैक्षणिक निर्णयांवर आईच्या विचारांचा खूप प्रभाव होता. यामुळे कॉर्नेलिया यांचे शिक्षण डेक्कन कॉलेजमध्ये झाले.

शिष्यवृत्ती नाकारली

पुढील शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये जाण्यासाठी त्यांना सरकारी शिष्यवृत्ती मिळेल, अशी आशा होती. मात्र, त्यांना शिष्यवृत्ती नाकारण्यात आली. त्याऐवजी गुजरातमधील एका बॉईज कॉलेजमध्ये इंग्रजी प्राध्यापक म्हणून त्यांची तात्पुरती नियुक्ती केली गेली. यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली. मुंबई विद्यापीठातून पदवीधर होणाऱ्या त्या पहिला महिल्या होत्या. तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठात जाऊन कायद्याचे शिक्षण घेणाऱ्यादेखील त्या पहिल्या महिला भारतीय होत्या. वकिलीबरोबरच कॉर्नेलिया सामाजिक कार्यातही सक्रीय होत्या. महिलांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी बराच संघर्ष केला. त्यांनी या विषयावर अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. कॉर्नेलिया सोराबजी यांचं संपूर्ण जीवन संघर्षाने भरलेले होते.

महिलांसाठी लढा

ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवतानाही त्यांना संघर्ष करावा लागला. भारतात परतल्यानंतर त्यांनी पदराआड राहणाऱ्या महिलांना अधिकार मिळवून देण्यासाठी लढा दिला. त्याकाळात महिलांना त्यांच्या पतीशिवाय कुणाशीही बोलण्याची परवानगी नव्हती. ही प्रथा बंद व्हावी म्हणून त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. १८९२ मध्ये कायद्याचा अभ्यास करण्यासाठी कॉर्नेलिया लंडनमध्ये गेल्या. १८९४ मध्ये वकिलीचे शिक्षणपूर्ण करत त्या पुन्हा भारतात परतल्या होत्या. त्याकाळात महिलांना वकिली करण्याचा अधिकार नव्हता. यामुळे विदेशातून कायद्याचे शिक्षण घेऊन आलेल्या सोराबजींनी या विरोधात आवाज उठवला. सोराबजींनी महिलांना कायदेशीर सल्ला देण्यास सुरुवात केली. कालांतराने महिलांना वकिली व्यवसायाची दारे खुली करुन देण्यात आली.

१५१व्या जयंतीनिमित्त अभिवादन

१९०७ साली कॉर्नेलिया यांची बंगाल, बिहार, ओडिशा व आसाममधील न्यायालयात सहाय्यक वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. महिलांना वकिली करण्यापासून रोखणारा कायदा बदलण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. अखेर १९२४ मध्ये तो अन्यायी कायदा रद्द करण्यात आला. १९२९ साली सोराबजी उच्च न्यायालयातून निवृत्त झाल्या. यानंतर त्या लंडनमध्ये जाऊन स्थायिक झाल्या. ६ जुलै १९५४ रोजी लंडन येथील मनोर हाऊस येथील ग्रीन लेन्सवर यांच्या लंडन येथील निवासस्थानी त्यांचे निधन झाले. कॉर्नेलिया सोराबजी यांच्या १५१व्या जयंतीनिमित्त गुगलने डुडलच्या रुपातून वाहिलेल्या अनोख्या आदरांजलीने नाशिकचा हा इतिहास पुन्हा जागा झाला.

देवळालीमध्ये ब्रिटिशकाळात अनेक महान व्यक्तींनी वास्तव्य केले आहे. त्यापैकी ‘सोराबजी’ परिवारदेखील आहे. गुगलने कॉर्नेलिया यांचे डुडल साकारल्याने त्यांची जन्मभूमी असलेल्या देवळाली शहराच्या मुकुटात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

- शेरजाद पटेल, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडजवळ कुत्र्याचा दहा जणांना चावा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाडपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या रापली येथे मंगळवारी भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने दहा जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मनमाडमध्येही चार जणांना कुत्र्याने चावा घेतल्याची चर्चा आहे. प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

मनमाड नजीक असलेल्या रापली येथे मंगळवारी भटक्या कुत्र्याने दहा जणांना चावा घेतला. काहींना हाताला, पायाला खोल जखमा झाल्या आहेत. काहींच्या शरिराचे कुत्र्यांनी लचके तोडल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर मनमाड उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान मनमाडमध्येही कुत्र्यांचा मोठा उपद्रव असून वाढला असून, चार जणांना कुत्र्याने चावा घेतल्याची चर्चा आहे. भटके कुत्रे टोळीने हिंडत असल्याने नागरिकांमध्ये घबराट असून प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताहाराबाद, मुल्हेरला वीजबिलांची होळी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेअंतर्गत महावीतरण कंपनीकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कृषी वीजपंपांच्या वाढीव वीजबिलांच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने ताहाराबाद व मुल्हेर येथील उपकेंद्रावरील अधिकाऱ्यांना मागण्यांची निवेदन देण्यात आले. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी व‌ीजबिले जाळले.

महाव‌तिरण कंपनीकडून शेतकऱ्यांना कृषी वीजपंपांची वाढीव बिले देण्यात आली आहेत. वीजबिल वसुलीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना देऊन शेतकरी वर्गाकडून ‘बोर देऊन आवळा’ काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्र‌यिा धुळे लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष सचिन कोठावदे यांनी दिली. शेतकऱ्यांच्या माथी वाढीव वीजबिले लादण्यात आली आहेत. यासर्व बाबींचा निषेध नोंदवत ताहाराबाद येथील वीजवितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता ए. जे. श्रीवास्तव, मुल्हेर येथील कनिष्ठ अभियंता स्नेहल सिसोदे यांना युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले. वीज उपकेंद्रावर वीज बिलांची होळी करण्यात आली. यावेळी मिलिंद चित्ते, रामदास सूर्यवंशी, संजय जोपळे, सरपंच चुनीलाल ठाकरे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धमकीप्रकरणी मंत्री भुसे निर्दोष

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

माजी मंत्री प्रशांत हिरे यांची गाडी अडवून धमकी दिल्याप्रकरणी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह तिघांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणी येथील सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. डी. कांबळे यांनी निकाल दिला.

तत्कालीन परिवहन राज्यमंत्री डॉ. प्रशांत हिरे हे ९ फेब्रुवारी २००१ रोजी आपल्या कुटुंबीयांसह लाल दिव्यांच्या गाडीतून जात असताना मोसमपूल चौकात दादा भुसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गाडी अडवून ‘तुम्ही सत्तेचा दुरुपयोग करतात’, असे आरोप करून धमकी दिल्याची तक्रार हिरे यांनी छावणी पोलिसांकडे दाखल केली होती. या फिर्यादीवरून पोलिसांनी भुसे यांच्यासह, प्रवीण बच्छाव, मनोज पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक केली होती. त्यानंतर

त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती.

हिरे यांच्यासह त्यांचे वाहनचालक, घटनास्थळावरील पोल‌सि निरीक्षक, उपनिरीक्षक यांची साक्ष नोंदविण्यात आली. मात्र घटनास्थळापासून अवघ्या ५०० फुटाच्या अंतरावर छावणी पोल‌सि ठाणे असताना हिरे यांनी फिर्याद देण्यास २४ तास उशीर केला. तसेच चालक व हिरे यांच्या साक्षीत तफावत आढळून आली असल्याचे भुसे यांच्या वतीने कामकाज पाहणारे वकील सुधीर अक्कर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. तसेच हा गुन्हा राजकीय दबावातून नोंदविला गेल्याचा युक्तिवाद केला. भुसे यांच्यावरील आरोप सिद्ध करणारा कोणताही पुरावा सरकारी पक्षास न्यायालयासमोर ठेवता आला नाही. त्यामुळे भुसे यांच्यासह तिघांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images