Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

'व्ही एन नाईक' यांच्या पुतळ्याचे आज अनावरण

$
0
0
केवळ मुख्यमंत्र्याच्या हस्ते अनावरण व्हावे या अट्टहासापायी गेल्या काही महिन्यांपासून कपड्यात झाकलेला क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या मोरवाडीतील पुतळ्याचे आजपासून सर्वांना दर्शन होणार आहे.

अर्धवट बांधकामांनाही भरावा लागणार एलबीटी

$
0
0
एलबीटी लागू झाला त्यावेळी अर्धवट स्वरुपात असलेल्या बांधकामांना एलबीटी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २२ मे नंतर कमिन्समेंट घेतलेल्या प्रकल्पांना ५० टक्के एलबीटी तातडीने भरावा लागणार आहे.

'स्मार्ट फोटोग्राफी'त नाशिक रायझिंग

$
0
0
फोटोग्राफीत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 'स्मार्ट फोटोग्राफी' या मॅगेझिनमध्ये एखाद्या फोटोग्राफरचा फोटो छापून येणं म्हणजे सोने पे सुहागा. एकदा तरी आपण काढलेला फोटो यात यावा अशी मनोकामना जगभरातील फोटोग्राफर्सची असते.

वसतिगृह निवडताय सावधान!

$
0
0
कॉलेजमधील प्रवेश निश्चिती सोबतच शहरातील वसतिगृहामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू होते.

कचरा नव्हे, हा तर पैसाच!

$
0
0
घंटागाडीचा ठेका देणे, ठेकेदारांचे बिले वेळेत अदा करणे, खतप्रकल्पासाठी वाहने खरेदी करणे, नविन यंत्रणेची खरेदी करणे अशी कितीतरी ‘समाजपयोगी’ कामांना सर्वच पक्षांनी वेळवेळो ‘उचलून’ धरले आहे. ही कामे करताना अनेकदा राजकीय पक्षांमध्ये ‘संघर्ष’ झाल्याची उदाहरणे आहेत.

मोरवाडी परिसरात अस्वच्छतेचे वातावरण

$
0
0
जून महिन्यातील एक-दोनच पावसाने मोरवाडी परिसरात अस्वच्छतेने थैमान घातले आहे. कुंड्यांच्या बाहेर पडलेला तसेच अरूंद गल्ल्यांमध्ये साठलेला कचरा सडण्याच्या अवस्थेत असून तो उचलण्याचे कष्टही महापालिका प्रशासन घेत नाही.

शालेय साहित्यावर कार्टुन्सची छाप

$
0
0
डोरेमॉन, पोकेमॉन, छोटा भिम, राजू, शिनचान आणि व्टिटी यासारख्या अनेक कार्टुन्सनी लहान मुलांना अक्षरश: वेड लावले आहे. घरी बसल्यानंतर टीव्ही आणि कम्प्युटर गेमच्या माध्यमातून मुलांचे मनोरंजन करणारी कार्टुन्स त्यांना आता शाळेतही सोबत करित आहेत.

बेमिसाल बना ‘मटा’सोबत

$
0
0
गेल्या दोन वर्षांपासून तुम्हाला विविध इव्हेंट्सच्या माध्यमातून रीफ्रेश करणाऱ्या ‘महाराष्ट्र टाइम्स’चा नुकताच दुसरा वर्धापनदिन साजरा केला. या दोन वर्षात तुम्ही ‘मटा’ बरोबर अनेक इव्हेंट्सची धमाल लुटली आहे.

नेत्याला दंडाचा दम

$
0
0
सतत विविध कारणांनी चर्चेत राहणारे व अबालवृध्दांमध्ये क्रेझ असलेले लालूजी नुकतेच नाशिक दौऱ्यावर येऊन गेले. आदल्या दिवशी आपला वाढदिवस साजरा करुन देवदेव करण्यासाठी लालूजी परिवारासह नाशिक मुक्कामी आले होते.

साठ लाखांचा मद्यसाठा जप्त

$
0
0
पंजाबहून नाशिककडे नेण्यात येणारा ६० लाख रुपयांचा बनावट मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धुळे पथकाने जप्त केला आहे. संशयावरून केलेल्या ट्रकच्या तपासणीत विविध कंपन्यांचे लेबल लावलेला हा मद्यसाठा आढळून आला.

सांगा काम कसं करायचं?

$
0
0
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वीज जाण्याचे प्रकार घडत आहेत. हे थांबविण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून दुरुस्तीचे प्रयत्न केले जात आहेत. परंतु या कर्मचाऱ्यांना दुरुस्तीसाठी मटेरियल मिळत नसल्याने कामात अडचणी निर्माण झाल्या आहे.

सीटूचा उद्या ‘जवाब दो’ मोर्चा

$
0
0
किमान वेतन दहा हजार रुपये करावे यासह विविध मागण्यांसाठी भारतीय ट्रेड युनियनतर्फे (सीटू) शनिवारी (१५ जून) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

हॉटेलच्या वेटरला जिवंत जाळले

$
0
0
श्रीरामपूरजवळ एका हॉटेलमध्ये काम करणा-या दोघा वेटरमध्ये झालेल्या भांडणात एका वेटरने डिझेल टाकून दुस-याला जिवंत जाळले. गुरुवारी पहाटे घडलेल्या या घटनेतील आरोपी वेटर फरार आहे.

पायाभूत सुविधांचे ‘उड्डाण’!

$
0
0
मुंबई-आग्रा हायवेवरील बहुप्रतिक्षित असलेला सर्वाधिक लांबीचा उड्डाणपूल वाहतुकदारांसाठी खुला होतानाच प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले द्वारका ते नाशिकरोड या मार्गाचे सहापदरीकरण आणि नाशिकरोड ते सिन्नर या मार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमीपूजन शुक्रवारी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

अपहृत बिपीन बाफनाचा खून

$
0
0
एक कोटी रूपयांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या ओझर येथील बिपीन बाफणा याचा खून करण्यात आल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. आडगाव येथील निर्जनस्थळी त्याचा मृतदेह सापडला. दोन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या विपीनचे अपहरणकर्ते ना​शिक शहरात असल्याचे स्पष्ट होऊनही पोलिसांच्या नाकर्तेपणामुळेच त्याचा बळी गेल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पशु व मत्स्य विद्यापीठाचे नाशिक विभागाला प्राधान्य

$
0
0
आगामी कालावधीत कृषी क्षेत्रात उपलब्ध होणाऱ्या मुबलक संधी आणि तोकडे कौशल्यपूर्ण मनुष्यबळ लक्षात घेऊन नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाला महाराष्ट्र पिंजून काढावा लागतो आहे. कृषीपुरक शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढण्यासाठी नागपूरच्या या विद्यापीठाने कृषी डिप्लोमाच्या प्रसारासाठी नाशिक विभागाला प्राधान्य दिले आहे.

राज्य ग्राहक आयोग अध्यक्षाविना ‘पोरका’

$
0
0
ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, तसेच त्यांना विनाविलंब न्याय मिळावा यासाठी शासनाने ग्राहक मंचाची स्थापना केली. जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा ग्राहक मंच आणि राज्य स्तरावर राज्य ग्राहक आयोगाची स्थापना करण्यात आली. मात्र, सध्या राज्य ग्राहक आयोगालाच अध्यक्ष नसल्यामुळे हा आयोग अध्यक्षाविना ‘पोरका’ झाला आहे.

हॉस्पिटल्स परवान्याचे नूतनीकरण करा

$
0
0
हॉस्पिटल्समधील फायर सेफ्टीच्या अटी पूर्ण करू न शकणाऱ्या हॉस्पिटल्सचे परवाने नूतनीकरणाचे काम महापालिकेने रोखून धरले आहे. परिणामी २०१३-१४ या वर्षासाठी परवाने नूतनीकरणाचे काम पूर्णतः थंडावले असून डॉक्टरांनी फायर सेफ्टीच्या नियमांची पूर्तता करून लवकरात लवकर परवान्यांचे नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे.

‘फ्रावशी’च्या शार्दुलची क्रिकेटमध्ये चमक

$
0
0
फ्रावशी अकॅडमीच्या इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या शार्दुल दिवाण या विद्यार्थ्याने क्रिकेटमध्ये नेत्रदीपक कामगिरी बजावली. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनमार्फत त्याला यावर्षीचा उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून गौरविण्यात आले.

निवृत्तीनाथ पालखीसाठी मदत करण्याचे आवाहन

$
0
0
जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात निवृत्तीनाथ महाराजांची पालखी नाशिकला येत आहे. रविवार, २३ जून रोजी वीर सावरकर तरणतलाव येथे सकाळी नऊ वाजता ही पालखी येणार असून त्यासाठी महापालिकेतर्फे योग्य ती मदत करावी, अशी विनंती संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा स्वागत समिती नाशिकतर्फे निवेदनाने करण्यात आली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images