Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

लसणाच्या नव्या वाणाचा शोध

0
0
उत्तर भारतासह महाराष्ट्रात लागवड होईल अशा ‘यमुना सफेद ५’ या लसणाच्या नव्या वाणाचा शोध चितेगाव येथील नॅशनल हॉर्टिकल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशनने (एनएचआरडीएफ) लावला आहे. प्रत्येक राज्यात हे वाण उपलब्ध होणार असून या वाणामुळे देशातील लसणाचे उत्पादन वाढण्यात मदत होणार आहे.

पुलाच्या उद्घाटनानंतर अपघात, २ ठार

0
0
नाशिकचा नेकलेस म्हणून ओळखल्या जाणा-या मुंबई-आग्रा महामार्गावरील नव्या उड्डाणपुलाचे शुक्रवारी कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. उद्घाटनानंतर काही तासातच दोन मोटारसायकलींची धडक होऊन दोघांना आपला जीव गमवावा लागला.

‘अमूल्य’ कायम

0
0
शहर स्वच्छतेसाठी नेमणूक केलेल्या 'अमूल्य क्लिनअप' या संस्थेविरोधात तक्रारी करूनही महापौर अॅड. यतीन वाघ यांनी 'अमूल्य' कायम राहील अशी घोषणा केली. शनिवारी झालेल्या महासभेत काही सदस्यांनी 'अमूल्य'च्या कार्यपध्दतीचा विरोध करत हा ठेका रद्द करण्याची मागणी केली.

नासाका अखेर पार्टनरशिपमध्ये

0
0
नाशिक सहकारी साखर कारखाना पार्टनरशिपमध्ये चालविण्याचा ठराव कारखान्याच्या विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. मात्र, कारखान्याच्या कारभाराबाबत सभासदांनी तीव्र रोष व्यक्त करीत संचालकांना धारेवर धरले.

नासाका, निसाका टॉपर थकबाकीदार

0
0
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकीदारांची नावे प्रशासक ज्ञानदेव मुकणे यांनी जाहीर केली आहेत. त्यात नाशिक आणि निफाड सहकारी साखर कारखाना यांची नावे टॉपवर असून जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्थांकडे बँकेचे मोठे येणे बाकी आहे.

नाशिकला गतिमान शहर बनवू

0
0
जगातील सर्वाधिक गतिमान शहर म्हणून नाशिकला नावारुपाला आणू अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. नाशिक शहरात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे प्रदूषण कमी होण्याबरोबरच नाशिकचा गतिमान विकास होण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

१६ बालकामगारांची सुटका

0
0
नाशिक- पुणे महामार्गावरील गोंदे शिवारात आंब्यापासून रस बनविणा-या फुड्स अँण्ड इनस् कंपनीतून शुक्रवारी १३ बालकामगारांची तर आडगाव येथील हॉटेल महाराजा येथून तीन बालकांची शनिवारी सुटका करण्यात आली.

पुण्यापर्यंत रुंदीकरण करा

0
0
नाशिक-सिन्नर महामार्गाचे काही दिवसात रुंदीकरण होणार असल्याने अनेक वर्षांपासून प्रलंबFत असलेला प्रश्न मार्गी लागणार आहे. छगन भुजबळांनी सिन्नरपर्यंत रुंदीकरण न करता पुण्यापर्यंत करावे असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

बाफणा हत्येप्रकरणी आरोपी पकडले

0
0
ओझरसह नाशिकला हादरवरून सोडणाऱ्या बिपीन बाफणाच्या मृतदेह सापडल्यानंतर काही तासांत पोलिसांनी चार आरोपींना जेरबंद केले. चार आरोपींपैकी एक जण ओझरचा तर तीन नाशिकचे आहेत. गेल्या शनिवारी (८ जून) अपहरण झालेल्या ओझर येथील बिपीन बाफणाचा मृतदेह शुक्रवारी आडगाव शिवारात सापडला.

'खैराई पाली' गडावर २३ जूनला श्रमदान

0
0
त्र्यंबकेश्वर ठाणापाडा येथून उत्तरेस असलेल्या 'खैराई पाली' या प्राचीन किल्ल्यावर 'शिवकार्य मोहीम' या संस्थेच्यावतीने रविवार, २३ जूनला शिवभक्त तरुण श्रमदानातून शिवकालीन तळ्याची साफसफाई करण्यात येणार आहे.

इलेक्ट्रिकल क्लस्टरसाठी आज बैठक

0
0
शहरात इलेक्ट्रिकल क्लस्टर साकारण्याबाबत उद्योग सहसंचालकांनी सोमवारी औद्योगिक संघटना आणि उद्योजकांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत विचारमंथन करून राज्य सरकारला प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

उपेंद्रनगर समस्येच्या गर्तेत

0
0
पवननगर तसेच उत्तमनगर या परिसरातील काही सखल भागात पावसाळ्यामुळे पाणी साचत असून या भागात नाले नसल्याने ही अडचण निर्माण होत आहे. उपेंद्रनगर, विजयनगर या परिसराची रचनाही लेनमध्ये विभागलेली असल्याने येथे पावसाळी गटार योजना नसल्यातच जमा आहे.

नॉन-क्रिमी लेयरलाही केंद्राच्या तरतूदीचा दिलासा ?

0
0
केंद्राने नॉन-क्रिमीलेयर मर्यादा सहा लाख केली आहे. मात्र राज्य सरकारने ती मर्यादा साडेचार लाख केल्याने राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना याचा फटका बसला होता. राज्याने ही मर्यादा वाढविता येणार नसल्याचे म्हटल्याने विद्यार्थ्यांनी कोंडी झाली होती.

अवास्तव फी विरोधात संभाजी ब्रिगेडचे निदर्शने

0
0
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत सर्व इंग्रजी शाळांना मध्यमवर्गीयांना परवडेल अशी फी ठेवणे बंधनकारक असताना इंग्रजी शाळा अवास्तव फी आकारत असल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडतर्फे नाशिकरोडच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयात शनिवारी निदर्शने करण्यात आली.

गांधी विचार परीक्षेत कैद्यांचे यश

0
0
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या परिक्षेत नाशिकरोड कारागृहातील कैद्यांनी यश संपादन केले आहे. पहिल्या गटात राजाराम ढोणे (प्रथम), गौतम सौरे (द्वितीय) आठवी ते दहावी गटात दीपक खोडे (प्रथम), राजकुमार यादव (द्वितीय), राजाराम नेमी (तृतीय) तर पदवीधर गटात यशवंत कारभारी (प्रथम), राजू चव्हाण (द्वितीय) व सुनील बत्तीशे (तृतीय) यांनी यश मिळवले.

पालखीत न कोणी...!

0
0
पालखी हा विषय धार्मिक भावनांना वाट मोकळी करून देणारा असतो. वाटेने चालत असताना एखादी पालखी दिसली तरीही आपले हात नकळत जोडले जातात. अशाच एका पालखीचा हा किस्सा. नुकताच एका मोठ्या नाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ कलामंदिरात उरकण्यात आला.

जिल्ह्यात २० शाळा अनधिकृत

0
0
सरकारच्या मान्यतेविना राज्यभरात अनेक शिक्षण संस्थांनी शाळा सुरू केल्या आहेत. या शाळांमार्फत विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास त्याला शिक्षण विभाग जबाबदार नसल्याचे ‌जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत जाहीर करण्यात आले आहे.

लाचखोर तलाठी ताब्यात

0
0
खातेफोड करणे व ७/१२ चा सुधारीत उतारा देण्यासाठी वीस हजार रुपयाची लाच स्विकारताना निफाड तालुक्यातील राजा आहेरगावचे तलाठी दादा नामदेवराव घोडेराव यांना लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांनी पकडले आहे.

ग्राहकांनो, दक्ष रहा

0
0
हल्ली बऱ्याच वेळा असे आढळून येते की, दुकानदार कमाल किरकोळ विक्री किंमती (एमआरपी)पेक्षा जास्त दराने वस्तू विकतात. बरेच दुकानदार हे ‘कूलिंग चार्जेस’ या सबबीखाली हमखास एक-दोन रुपये जास्त घेतात. तसेच बऱ्याच मॉल्स आणि मल्टिप्लेक्समध्ये ही लुटमार चालते.

आजपासून किलबिलाट

0
0
जवळपास दीड महिन्याच्या सुट्टीनंतर सोमवारी पुन्हा एकदा शहरातील शाळांचा परिसर आज, सोमवारपासून गजबजणार आहे. उन्हाळ्याची सुट्टी संपल्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्राकरिता शाळाही सज्ज झाल्या असून यंदा धुमधडाक्यात शाळांची सुरूवात होणार आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images