Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

तळीरामांसाठी तीन ‘मद्य’रात्री!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ख्रिसमस पाठोपाठ सरत्या वर्षाला निरोप देणाऱ्या तळीरामांचा आनंद वाढवण्यासाठी प्रशासनाने सर्व मद्य विक्रीची दुकाने पहाटेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नाताळातील २४ व २५ आणि त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी ही दुकाने पहाटेपर्यंत सुरू असणार आहे.

थर्टी फर्स्टच्या पार्टीचे शहरात सर्वत्र आयोजन केले जाते. वर्ष सरताना तसेच नवीन वर्षाचे स्वागत करताना ओल्या पार्ट्यांना विशेष महत्त्व असते. या दरम्यान मद्य विक्रीचा उच्चांक गाठला जातो. वेगवेगळ्या प्रकारच्या मद्यास मोठी मागणी असते. समाजाचा हा बदलेला दृष्ट‌िकोन लक्षात घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने महसूल वाढीस त्याचा फायदा करून घेण्याचा निर्णय घेतला. मद्यपींना या दिवशी त्यांच्या मागणीनुसार मद्य पुरवठा झाला नाही, तर बेकायदा मद्य विक्रीचे प्रमाण वाढते. यामुळे महसूल तर बुडतोच; पण बनावट मद्यामुळे नागरिकांचा जीवही जाण्याचा धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर काही वर्षांपासून ठराविक दिवशी पहाटेपर्यंत मद्य विक्रीची दुकाने, हॉटेल्स सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. यांच्याकडे शुक्रवारी सकाळी झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी शासनाच्या आदेशाची माहिती देत अंमलबजावणीचे आदेश दिले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे, उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत, सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते आदी उपस्थित होते.

पहाटे पाचपर्यंत बार राहणार सुरू

या आदेशानुसार सकाळी साडेअकरा वाजता सुरू झालेले परमीट रूम आणि बिअर बार दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत उघडे ठेवता येणार आहेत. यापूर्वी यासाठी रात्री दीड वाजेपर्यंत सवलत देण्यात येत होती. तर वाइन शॉपी, बीअर शॉपी, देशी दारू विक्रीची दुकाने रात्री दहा ते साडेदहाऐवजी आता एक वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. यामुळे तळीरामांच्या झिंगाट पार्ट्यांचा जोर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कायम राहणार आहे.

आयोजनासाठी धावपळ

शहरात थर्टी फर्स्ट पार्ट्यांचे हॉटेल्स, पब, विविध फार्म हाऊस अशा ठिकाणी आयोजन होते. शक्यतो तरुणाईचे ग्रुप्स यासाठी पुढाकार घेत आहेत. ‘साग्रसंगीत’ पार्ट्यांची तयारी सुरू असून, यासाठी आवश्यक असलेले परवाने घेण्यासाठी व्यावसायिकांची धावपळ सुरू आहे. पार्ट्यांसाठी खर्च करण्यापेक्षा काहींनी फार्म हाऊसला पसंती देत नियोजन आखले आहे.

नाताळातील २४ व २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर या तीन दिवशी मद्यविक्रीची दुकाने पहाटेपर्यंत सुरू ठेवण्यास शासनाने परवानगी दिली आहे. याची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

- चरणसिंग राजपूत, अधीक्षक, उत्पादन शुल्क

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एचएएल कामगारांचे आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

ओझर येथील एचएएल विमान कारखान्यातील कॅज्युअल कामगारांच्या विविध मागण्यांसाठी नाशिक वर्कर्स युनियनतर्फे नेहरूनगर येथील श्रम आयुक्त कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

अधिकारी कमलेश शेलार यांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले. युनियनचे नेते डॉ. डी. एल. कराड, तुकाराम सोनजे, दिलीप पगारे, अशोक सोनवणे, जगदीश गायकवाड, राजेंद्र परिहार, नंदू गोवर्धने, महेश दाणेकर, चिंधू धोंगडे, राजू कानडे आदींसह कामगार उपस्थित होते.

यावेळी श्रम आयुक्त कार्यालयातीसल अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनाचा आशय असा ः एचएएल कारखान्यात हजारो कामगार गेल्या तीस-पस्तीस वर्षांपासून काम करीत असून, कॅज्युअल, कंत्राटी कामगारांना बी झोनमधील किमान वेतन फरकासह द्यावे. कंपनी महापालिकेपासून १५ किलोमीटरच्या आत आहे आणि बी झोनमध्ये आहे. मात्र, असे असूनही या कामगारांना सी झोनचे वेतन दिले जात आहे. कारखान्यात कामगारांकडून कंत्राटी पद्धतीने उत्पादन करवून घेतले जात आहे. वस्तुतः हे काम नियमित स्वरुपाचे आहे. अशा कामावर कंत्राटी कामगार लावणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे एचएएलच्या सर्व विभागांत सखोल तपासणी करावी व कंत्राटी पद्धतीचे निर्मूलन करावे. या कामगारांना कायम करावे. सर्वोच्च न्यायालयाने समान कामाला समान वेतन देण्याबाबत निर्वाळा दिला आहे, त्याचे उल्लंघन संबंधितांकडून केले जात आहे. याबाबत चौकशी करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्ज केल्यानंतर तीन वर्षांनी मिळाले मतदार कार्ड

$
0
0

नाशिक ः भारत हे लोकशाही राज्य असून तेथे मतदान करणे हा पवित्र हक्क समजला जातो. मतदारांनी मतदान करावे यासाठी दिल्ली ते गल्ली मतदार जागृती अभियानही राबविण्यात येते. मात्र, म्हसरुळ येथे रहाणाऱ्या प्रज्ञा हर्षल इंगळे या महिलेला मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी तब्बल तीन वर्षांचा लढा द्यावा लागला. प्रशासनाचा हलगर्जीपणाही यानिमित्ताने उघड झाला आहे.

प्रज्ञा इंगळे या लग्न झाल्यानंतर नाशिकला आल्या. येथे त्यांनी आपल्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली. कोणतेही सरकारी कागदपत्र तयार करायचे झाल्यास प्रथम मतदान ओळखपत्र लागते. यासाठी २०१५ मध्ये त्यांनी मतदार यादीत नाव यावे यासाठी अर्ज केला. काही दिवसानंतर यादी प्रसिद्ध झाली, परंतु त्यात नाव समाविष्ट झाले नाही. आपल्याकडून काही कागदपत्रे राहून गेली असतील म्हणून त्यांनी पुन्हा नाव नोंदवले. पुन्हा तोच अनुभव आला. यावरुन त्यांनी नाशिक तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या निवडणूक शाखेत संपर्क साधला. येथे त्यांना ८ नंबरचा फॉर्म भरुन द्या असे सांगण्यात आले. तो देखील त्यांनी भरून दिला. त्यानंतर २०१६ मध्ये यादीत नाव समाविष्ट करण्यात आले. परंतु, ओळखपत्र मिळाले नाही. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अनेकदा चकरा मारल्या व अर्ज केले. प्रत्येक वेळी थोड्याच दिवसांत तुम्हाला ओळखपत्र दिले जाईल, असे सांगण्यात येत होते. परंतु, ते मिळत नव्हते. यावरून इंगळे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. तेथेदेखील तुमचे नाव यादीत समाविष्ट करण्यात आले आहे, असे सांगण्यात आले. नाशिक महापालिकेच्या झालेल्या निवडणुकीत मतदान ओळखपत्राविना त्यांना मतदान करता आले. मात्र, अनेक सरकारी कामांसाठी ओळखपत्र आवश्यक असल्याने त्यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे मतदान ओळखपत्र मिळावे यासाठी ई-मेलद्वारे संपर्क साधला. त्यालाही सुरुवातीला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, इंगळे यांनी मतदान ओळखपत्र मिळवेनच, असा निर्धार करत दिल्ली येथील निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. तेथेही बराच पाठपुरावा केला. अखेर मुख्य निवडूक आयुक्तांकडून प्रज्ञा इंगळे यांना नुकतेच ओळखपत्र प्राप्त झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेला लढा अखेर संपुष्टात आला.

माझे नाव मतदार यादीत समाविष्ट व्हावे म्हणून तीन वर्षांपासून लढा देत होते. शासकिय यंत्रणा ढिम्म असली तरी तुम्ही सातत्याने पाठपुरावा केला तर यश निश्चित मिळते.

- प्रज्ञा इंगळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एक शून्य तीन’ची पर्वणी दोन दिवसांवर!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर गाजणारे ‘एक शून्य तीन’ हे नाटक साेमवारी (दि. २५) सायंकाळी ६.३० वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सादर होणार आहे.

अभिजित साटम आणि ऋजुता चव्हाण हे या नाटकाचे निर्माते आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन नीरज शिखईकर आणि सुदीप मोडक यांनी केले आहे. महाराष्ट्रात अतिशय गाजत असलेल्या या नाटकाचे लेखक सुदीप मोडक आहेत. या नाटकात सुमित राघवन आणि स्वानंदी टिकेकर यांची प्रमुख भूमिका आहे. ‘दिल दोस्ती’फेम स्वानंदी टिकेकर हिचे हे पहिलेच नाटक असून, सुमित राघवन हा कसलेला कलाकार बऱ्याच वर्षांनंतर मराठी नाटकात भूमिका साकारत आहे.

कल्चर क्लब सदस्यांना २५० रुपयांच्या एका तिकिटावर एक तिकीट मोफत मिळणार आहे, तसेच नव्याने सदस्य होणाऱ्यांना या नाटकाची दोन तिकिटे मोफत मिळणार आहेत. कल्चर क्लबचे सदस्य होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


येथे साधावा संपर्क

तिकिटासाठी महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड (वेळ ः सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत) फोन ः ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४ येथे, तसेच परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे सकाळी ९ ते १२ व सायंकाळी ५ ते ८.३० वाजेपर्यंत संपर्क साधता येईल. ऑनलाइन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्भक चौकशी अहवालात गोलमालच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतल्या इंदिरा गांधी रुग्णालयातील अर्भक मृत्यु प्रकरणातील चौकशी अहवालावर शिवसेनेने संशय व्यक्त केला असून चौकशी अहवाल गोलमाल असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. संबंधित अर्भकाला जीवनदायी योजनेअंतर्गत उपचाराला नेले तर बिल घेतलेच कसे, असा सवाल त्यांनी केला. रुग्णालयातील डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांना वाचविण्याचे प्रयत्न वैद्यकीय विभाग करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ३५ लाख रुपये खर्च करून घेतलेली कार्डियाक व्हॅन गेली कुठे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पंचवटीतल्या इंदिरा गांधी रुग्णालयातील अर्भक मृत्यूप्रकरणी वैद्यकीय अधीक्षकाने केलेल्या प्राथमिक चौकशी अहवालात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना क्लिनचीट देण्यात आली आहे. त्यावर शिवसेनेने शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन वैद्यकीय अधीक्षकांच्या अहवालावर आक्षेप घेतला. चौकशी अहवाल हा गोलमाल असून अर्भकाला खासगी रुग्णालयात शिफ्ट करताना संबंधित डॉक्टरांशी चर्चा झाली होती काय, असा सवाल बोरस्ते यांनी केला. तसेच जीवनदायी योजनेअंतर्गत अर्भक शिफ्ट केले तर त्यांच्याकडून ब‌िल का घेतले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वैद्यकीय अधीक्षकाचा अहवाल हा दोषींना पाठीशी घालण्याचाच प्रकार असल्याचा आरोपही त्यांनी केला. संबंधित चौकशी अधिकाऱ्यांनी अर्भकाच्या नातेवाईकांची बाजू ऐकून न घेताच हा अहवाल तयार केल्याचा आरोप बोरस्ते यांनी केला. येत्या महासभेत या रुग्णालयातील प्रश्नावर चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांग‌ितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दलित निधीची पळवापळवी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अपंगांसाठीच्या राखीव पाच टक्के निधी खर्चाची बोंब असताना, पालिकेत आता दलित वस्ती सुधार योजनेच्या पाच टक्के निधीचा घोळ समोर आला आहे. शहरातील दलित वस्त्यांमधील विकासकामांसाठी राखीव असलेल्या पाच टक्के राखीव निधीवर भाजपच्याच नगरसेकांनी डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे दलित वस्ती सुधार योजनेचा निधी हा सोयीने सवर्ण वस्त्यांमध्ये वळविण्यात आला आहे. महापौरांच्या प्रभागातही गरज नसताना दलित वस्ती सुधार योजनेचा निधी वापरण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आणि नगरसेवक प्रशांत दिवे यांनी केला आहे. दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीच्या पळवापळवीवरून शिवसेना आक्रमक झाली असून, महासभेत भाजपला घेरण्याची रणनीत‌ि आखली आहे.

महापालिकेच्या बजेटमध्ये दरवर्षी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत दलित वस्त्यांसाठी पाच टक्के निधी राखीव ठेवला जातो. नियमानुसार हा निधी दलित वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा, मलनिस्सारण व्यवस्था, मनोरंजनाची सुविधा करणे, कर्मचाऱ्यांना घरे देणे, स्नानगृहे, वैद्यकीय केंद्रे, शौचालये आदि कामांसाठी वापरण्याची पद्धत आहे. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत दिवे यांनी दलित वस्ती सुधारणा योजनेंतर्गत राखीव असलेल्या पाच टक्के निधीतून शहरात कुठे व किती कामे झाली, याबाबत लेखा विभागाकडून माहिती मागविली होती. त्यातून धक्कादायक बाब समोर आली असून भाजपच्या नगरसेवकांनी सवर्ण वस्त्यांमध्येच हा निधी वापरल्याचे उघड झाले आहे. या निधीतून भाजप नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये दलित वस्त्या नसतांनाही, अभ्यासिका, गार्डन, रस्ते, यासाठी त्याचा वापर करण्यात आला आहे.

दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सन २०१७-१८- या आर्थिक वर्षात १३ कोटी २४ लाख रुपये निधीची तरतूद आहे. त्यातून आतापर्यंत ८७ लाख ६३ हजारांची देयके अदा करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांत दलित वस्ती सुधार योजनेवर २६ कोटी ६१ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचा दावा लेखा विभागाने पत्रात केला आहे. परंतु, सदरचा निधी दलित वस्तीसाठी खर्च न होता सवर्ण भागात खर्च झाला असून, विशेषतः भाजप नगरसेवकांच्या प्रभागांमध्येच खर्च झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते व नगरसेवक प्रशांत दिवे यांनी पत्रकार परिषदेत केला. प्रभाग १७मध्ये सर्वाधिक १६ हजारांपेक्षा जास्त दलितांची संख्या असतानाही या प्रभागात निधी नाही. या भागाचे नगरसेवक असलेल्या प्रशांत दिवे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभाग सतरामध्ये दलित वस्ती सुधारणेचे एकही काम झाले नाही.

या प्रभागांमध्ये खर्च

दलित वस्ती सुधार योजनेचा सर्वाधिक निधी पंचवटी विभागात पळविला गेल्याचा आरोप केला जात आहे. प्रभाग चारमधील तारवालानगर, सहकारनगर, लामखेडेमळा, श्रीरामनगर गार्डन या उच्चभ्रू भागांमध्ये खर्च करण्यात आला. प्रभाग दोनमधील मराठानगरमध्ये २४ लाख रुपयांची कामे दलित वस्ती सुधार निधीतून करण्यात आली. प्रभाग तीसमधील वडाळा चौक ते रवीशंकर मार्ग तयार करण्यासाठी एक कोटी सोळा लाख रुपये दलित विकास निधी खर्च करण्यात आला. प्रभाग २६ मधील रामकृष्ण नगर, प्रभाग एकोणीसमध्ये घरकुल योजनेसाठीदेखील निधी वळविण्यात आला आहे. महापौर रंजना भानसी यांच्या केतकी सोसायटीमध्ये ७७ लाख रुपये खर्च करून अभ्यासिका बांधली जाणार आहे.

प्रभाग १७ मध्ये सर्वाधिक दलित लोकसंख्या असतानाही, या प्रभागात राखीव निधी देण्यात आलेला नाही. अन्य प्रभागांमधील दलित वस्त्यांनाही निधीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे याचे ऑडिट करण्याची गरज आहे.

- प्रशांत दिवे, नगरसेवक, शिवसेना


भाजपचे नगरसेवक आपल्या प्रभावाचा वापर करून दलित वस्ती सुधार योजनेचाही निधी पळवून नेत आहे. त्यामुळे दलित वस्त्यांच्या विकासासाठी निधी मिळत नाही. त्यामुळे हा परिसर विकासापासून वंचित आहे. येत्या महासभेत यावर चर्चा केली जाईल.

- अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेता, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार फरांदे यांचा शेतकऱ्यांकडून निषेध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील बांधकामांसंदर्भातील प्रीमियम दरवाढीचा महापालिकेचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असतानाच, या दरवाढीला भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी विधानसभेत विरोध दर्शवला आहे. फरांदे यांच्या भूमिकेमुळे शेतकरी संतप्त झाले असून, शहर परिसरातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि. २२) तपोवनातील साधूग्राममध्ये एकत्र येत आमदारांच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी आमदार फरांदे यांचा निषेध करत, त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तपोवनात हे आंदोलन केले. सध्या शहरात ४० टक्के प्रीम‌ियम असताना महापालिकेने तो ७० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. सध्याच्या ४० टक्के प्रीमियम दरामुळे आरक्षणाखाली जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या टीडीआरचे योग्य मूल्य मिळत नाही. त्यामुळे टीडीआरचे भाव कोसळले असून, प्रीम‌ियम वाढविण्यासाठी शेतकरी आक्रमक आहेत. परंतु, नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात नाशिक मध्यच्या भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी सदर दरवाढीस विरोध करण्याची भूमिका घेत दरवाढीचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली होती. आमदार फरांदे यांनी घेतलेल्या या भूमिकेच्या विरोधात शहर व परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत तपोवनातील साधूग्राममध्ये आंदोलन केले आणि आमदार फरांदे यांचा निषेध केला. ‘प्रीमियम वाढवा, शेतकरी वाचवा’ अशा घोषणा देत, आमदार फरांदे या बिल्डरधार्जिण्या असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.


जोडे मारण्याचा प्रयत्न

शेतकरी आंदोलकांनी आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी हस्तक्षेप करत प्रतिमा ताब्यात घेतली. त्यामुळे आंदोलकांचा प्रयत्न फसला. या आंदोलनात दातीर यांच्यासह, केरू पाटील, कुंदन मौले, ताराबाई मौले, महेंद्र जाधव, हिराबाई दातीर, विमल दातीर, राजाराम बोराडे, सोमनाथ बोराडे, छबुराव नागरे, बाळासाहेब विधाते, जयंत अडसरे, संजय पाटील, समाधान जेजुरकर, सुनील काठे, भारती सरनाईक आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जप्तीला मुदतवाढ

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील वेगवेगळ्या भागातील सहा भूसंपादन प्रकरणात पालिकेवर वारंवार जप्तीची नामुष्की ओढवली आहे. शुक्रवारी देखील शहरातील प्रकाश चौधरी यांच्या भूसंपादनप्रकरणी पुन्हा एकदा जप्तीची कारवाई ओढवली. भूसंपादन दाव्यापोटी १२ कोटी ८३ लाख रुपये पालिकेने अदा करावेत, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. शुक्रवारी दिवसभर याविषयी चौधरी यांचे वकील व पालिका प्रशासन यांच्यात चर्चा झाली. अखेर सायंकाळी उशिरा याबाबत पालिकेने २ जानेवारीपर्यंतची मुदत मागून घेत जप्तीच्या नामुष्कीला मुदतवाढ मिळवली आहे.

चौधरी यांच्या मालकीचे १ हे २४ आर जमीन भूसंपादन पालिकेकडून झाल्यानंतर या जमिनीचा पूर्ण मोबदला न मिळाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाकडून सप्टेबर महिन्यात पालिका आयुक्तांचे वाहन व चल मालमत्ता जप्तीचे आदेश दिले होते. त्यावेळी चौधरी यांना ७५ लाख रुपयांचा चा धनादेश पालिकेकडून अदा करण्यात आल्याने जप्तीची नामुष्की टळली होती. मात्र त्यानंतर देखील उर्वरित रक्कम न मिळाल्याने पालिकेवर शुक्रवारी जप्तीकारवाई करण्यासाठी चौधरी व त्यांचे वकील दाखल झाले होते.

दुपारी ११ वाजता जप्तीसाठी पथक आले असता आयुक्त संगीता धायगुडे यांच्यासमवेत चर्चेअंती सायंकाळी ५ पर्यंत मुदत मागून घेण्यात आली. दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत महापौर रशीद शेख, आयुक्त संगीता धायगुडे यांच्यासह चौधरी व त्यांचे वकील यांच्यात बंद दरवाज्याआड चर्चा सुरू होती. पालिकेकडून १२ कोटी ८३ लाखांपैकी २ कोटी ७५ लाख अदा झाले असून, उर्वरित १० कोटींपैकी सहा कोटी देण्यास पालिका प्रशासन राजी होते. मात्र चौधरी यांनी उर्वरित १० कोटी रक्कम पालिकेने अदा करावी यावर ठाम होते. पालिकेची आर्थिक स्थिती नसल्याने ही रक्कम अदा करणे कठीण असल्याचे महापौर रशीद शेख यांनी पत्रकारांना सांगितले. अखेर याप्रकरणी पालिकेने २ जानेवारीपर्यंत मुदत मागून घेतल्याने शुक्रवारची जप्तीची कारवाई पुढे ढकलली गेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


येवल्यात आजपासून व्याख्यानमाला

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला शहरात शनिवारपासून सेनापती तात्या टोपे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्याते डॉ. प्रकाश पाठक, नंदन रहाणे व्याख्यानमालेतील पुष्प गुंफणार आहेत.

शनिवारपासून सोमवारपर्यंत सलग तीन दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेच्या निमित्ताने शहरवासियांना मोठी पर्वणी मिळणार आहे. १८५७ च्या स्वातंत्र्य समरातील थोर सेनानी सेनापती तात्या टोपे यांच्या नावाने धनंजय कुलकर्णी, किशोर सोनवणे, नारायण क्षीरसागर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. विंचूर रोडवरील महात्मा फुले नाट्यगृहात दररोज सायंकाळी ६ वाजता ही व्याख्यानमाला होणार आहे. भोसला मिलिटरी स्कूलचे सरचिटणिस प्रकाश पाठक ‘वारकरी संप्रदायाचे सामाजिक योगदान’ या विषयावर पहिले पुष्प गुंफणार असून, स्वामी मुक्तानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब रहाणे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. नंदन रहाणे हे ‘मराठी भाषा व आपण’ या विषयावर दुसरे, तर ‘महाराष्ट्र म्हणजे काय’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफणार आहेत. निवृत्त अभियंता साहेबराव सैद, प्रा. एम. पी. गायकवाड हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रह्मगिरीच्या कुशीत पाणीटंचाईच्या झळा

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर शहराच्या बाजूस ब्रह्मगिरी पर्वतराईत वसलेल्या मेटघर वस्तीला पावसाळ्यात दरडींचा धोका तर हिवाळ्यात पाणीटंचाईच्या झळा भेडसावत आहेत. या वस्तींमध्ये आतापासूनच पाणीटंचाईच्या झळा बसत असून, यावर लकवर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

मेटघर किल्ला ग्रामपंचायत अंतर्गत सहा पाडे आहेत. त्यामधील विनायक खिंड येथील वस्ती ब्रह्मगिरीच्या अगदी लगत आहे. या वस्तीवर चार जून २०१७ रोजी दरड कोसळून एका युवकाला प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर येथील २०० घरे स्थलांतरित करून काही अंतरावर वसव‌ण्यिात आली. तथापि डिसेंबर पासूनच येथे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गतवर्षी देखील उन्हाळ्याच्या प्रारंभी पाणीटंचाई भेडसावत होती. गोदावरीच्या उगमस्थानी निर्माण झालेली पाणीटंचाई गंभीर बाब आहे. पर्यावरणाच्या हानीमुळे पाण्याचा उद्भव खोल गेला आहे. नैसर्गिक स्त्रोतही बंद झाले आहेत.

शासनाकडे पाणी देण्यासाठी तरतूद नसल्याचे अधिकारी सांगतात. त्या करिता या वस्तीला टँकर पुरविण्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला साकडे घालण्यात आले आहे. त्याद्वारे पाणीपुरवठा करता यणार आहे.

ग्रामस्थांचे पुनर्वसन कधी?

विनायक खिंड आणि पठारवाडी येथील ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्याचे आव्हान पंचायत समिती प्रशासनापुढे आहे. पावसाळ्यात दरड कोसळते. तर उन्हाळयात पिण्यासाठी पाणी नसते. येथील जवळपास ५० कुटुंबांचे सखल भागात घरकुल योजना राबवून पक्की घरे आणि पाणी पुरवठा आदी सुविधा निर्माण करून पुनर्वसन करण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बोगस’मुळे अपंग शिक्षकांचे हाल

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

प्रशासकीय बदलीत सवलती मिळविण्यासाठी अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र दाखल केल्यामुळे जिल्हा परिषदेच्या दहा शिक्षकांचे निलंबन करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गेल्या आठवड्यात दिले आहेत. याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील अपंग शिक्षकांचे प्रमाणपत्र तपासणी करण्याचे कारवाई गुरुवारी येथील पंचायत समितीत करण्यात आली. यामुळे बोगस अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणाऱ्या शिक्षकांचे धाबे दणाणले आहे. मात्र यामुळे खरे अपंगत्व असलेल्या शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अपंग प्रमाणपत्र तपासण्यासाठी पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आनंद पिंगळे हे या समितीचे प्रमुख असून, त्यांच्या उपस्थितीत गटशिक्षणाधिकारी शोभा पारधी, डॉ. शैलेशकुमार, शिवाजी निकम, अभिजित सोनजे, इक्बाल अब्दुल नाबी, सुनील पवार या समितीने दिवसभर शिक्षकांच्या अपंग प्रमाणपत्रांची पडताळणी केली. या तपासणीसाठी एकूण १६१ अपंग शिक्षकांना बोलावण्यात आले होते. यात स्वतः अपंगत्व असलेले १४१ तर दुर्धर आजर, मेंदूज्वर, कर्करोग, मतीमंद पालक, कर्णबधीर असे विविध अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणाऱ्या शिक्षकांचे प्रमाणपत्र तपासणी करण्यात आली. ज्या शिक्षकांनी जिल्हाअंतर्गत बदल्यामध्ये विशेष संवर्ग भाग १ मधून अर्ज भरलेले आहे, अशा सर्व शिक्षकांचे प्रमाणपत्र वैधता तपासण्यात आली. या तपासणीत अपंग प्रमाणपत्राची वैधता संपुष्टात आल्यावर देखील ज्या शिक्षकांनी विशेष संवर्ग भाग १ मधून अर्ज भरलेला असेल अशा शिक्षकांविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्यासाठी विभागीय चौकशीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश गटशिक्षणअधिकारी यांना देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी सरपंचांवर बिबट्याचा हल्ला

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, निफाड

भोजापूर खोऱ्यातल्या नळवाडी शिवारात बिबट्याने गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास माजी सरपंच सुभाष दराडे यांच्यावर हल्ला केला. नांदुरशिंगोटे येथून ते घराकडे डोंगरगाव रस्त्याने वस्तीकडे परतत होते. अंगात जॅकेट असल्याने ते बचावले. या बिबट्याने दुचाकीस्वारावर केलेला हा चौथा हल्ला आहे. याआधीही नागरिकांनी वनविभागाकडे तक्रारही केली. त्यानंतर दोन कर्मचारी गस्तीसाठी नेमले होते. हा बिबट्या पूर्ण वाढ झालेला असून, गेले दोन दिवसांपासून तो नागरिकांना ‌आढळत आहे.

नळवाडी शिवारात हल्ला होण्याच्या भीतीने ग्रामस्थ सायंकाळनंतर अजूनही दुचाकी वापरत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांचे रात्रीच्यावेळी बाहेर पडणे बंद झाले आहे.

एक बिबट्या जेरबंद

दरम्यान, नळवाडी-डोंगरगाव सरहद्दीवर दोन वर्षे वयाचा बिबट्या पिंजऱ्यात अडकला. सुरेश हांडे यांच्या वस्तीवर अकोले वनविभागाने पिंजरा लावला होता. सावज शोधण्यासाठी आलेला बिबट्या अलगद पिंजऱ्यात अडकला. तो दोन वर्षे वयाचा नर असून, वनविभागाने त्यास तेथून हलविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधिमंडळ कामकाजाचा दर्जा खालावला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

महाराष्ट्र विधिमंडळातील कामकाजाला अनेक अभ्यासू आमदारांमुळे उच्च दर्जा प्राप्त झाला आहे. मात्र सध्या विधिमंडळातील कामकाजाचा खालावत जाणारा दर्जा ही बाब अतिशय चिंताजनक आहे. खालावलेल्या दर्जामुळेच जनतेचे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत, असे प्रतिपादन साहित्यिक सूत्रसंचालक सुरेशकुमार वैराळकर यांनी व्यक्त केले.

येथील प. बा. काकाणी नगर वाचनालयाच्या ग्रंथालय सप्ताह व्याख्यानमालेत ‘विधिमंडळाच्या गॅलरीतील माझी तीन दशके’ या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. सुरेशकुमार हे १९८१ ते २०१४ या कालखंडात आमदार विठ्ठल तुपे, दादा जाधवराव, कमलताई ढोले पाटील, महादेव बाबर या आमदारांचे स्वीय सचिव म्हणून काम पाहत असत. त्यांच्या एकूण बत्तीस वर्षाच्या कारकिर्दीत तेरा मुख्यमंत्री, त्यांची मंत्रिमंडळे आणि तत्कालीन विरोधी पक्ष व त्यांचे नेते यांचे विधिमंडळातील कामकाज अनुभवल्याचे नमूद करून महाराष्ट्र विधिमंडळातील अनेक महत्त्पूर्ण आणि मनोरंजक आठवणी त्यांनी सांगितल्या.

जनता दलचे निहाल अहमद अर्थात निहाल भाईंच्या कार्यकाळतील अनेक प्रसंग त्यांनी सांगितले. निहालभाई मोठे राजकीय व्यक्तिमत्व असले तरी सामान्य माणसांशी त्यांची नाळ जोडलेली होती. त्यामुळे साधी राहणी व मनमोकळा स्वभाव त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य होते असे त्यांनी आवर्जून नमूद केले. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या मृत्यूची चुकीची बातमी आणि त्यानंतर लोकसभेत व महाराष्ट्र विधी मंडळात घडलेले नाट्य त्यांनी मांडले. तत्कालीन सभापती शिवराज पाटील चाकूरकर यांनी बातमीची शहानिशा केल्यावर ती बातमी चुकीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे विधानसभेची देशभर वाहवा झाली होती, असे गौरवशाली क्षणही विधिमंडळाने अनुभवले असे त्यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी अजय शाह हे होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंजलीच्या सरावटींत सांज झाली ‘सुनहरी’

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शास्त्रीय संगीतापासून ते चित्रपट गीतांपर्यंत एका पेक्षा एक बहारदार गीतांचे सादरीकरण करीत सा रे ग म प लिटील चॅम्प २०१७ ची विजेती अंजली गायकवाड हिने मालेगावकर रसिकांना मंत्रमुग्ध केले. आपल्या सुरेल आवाजात तिने सादर केलेल्या गीतांनी शहरातील रसिकांची संध्याकाळ सुनेहरी झाली होती. निमित्त होते सुनहरे पल या कार्यक्रमाचे.

येथील मालेगाव आर्टिस्ट असो. च्या वतीने सा रे ग म प लिटील चॅम्प विजेत्या अंजली गायकवाड व शहरातील कलावंतांच्या गायनाचा सुनहरे पल हा कार्यक्रम आयोजित केला होता. शहरातील सटाणा रोड यशश्री कंपाउंड येथे आयोजित संगीतिक कार्यक्रमास मालेगावकरांनी चांगलीच गर्दी केली होती. थंडीमुळे पारा चांगलाच खाली आलेला असला तरी श्रोत्यांनी गायकवाड आणि अन्य सहाकलाकारांच्या गायनास प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या प्रारंभी असो अध्यक्ष अंकुश वाल्हे यांनी शहरातील कलावंताना व्यासपीठ मिळावे, आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे प्रास्ताविकात सांगितले.

अंजली व नंदिनी गायकवाड या दोघींनी बिते न बिताई रैना, माही रे मै कैसे गाऊ, नैनो मे बदरा छाये, ही गाणी सादर करून रसिकांची दाद मिळवली तर ‘कट्यार’ या मराठी सिनेमातील घेई छंद मकरंद ही जुगलबंदी सादर करून दोघींनी कार्यक्रमात वेगळाच रंग भरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एक शून्य तीन’ची उद्या प्रत्यक्षानुभूती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर गाजणारे ‘एक शून्य तीन’ हे नाटक साेमवारी (दि. २५) सायंकाळी ६.३० वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सादर होणार आहे.

अभिजित साटम आणि ऋजुता चव्हाण हे या नाटकाचे निर्माते आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन नीरज शिखईकर आणि सुदीप मोडक यांनी केले आहे. महाराष्ट्रात अतिशय गाजत असलेल्या या नाटकाचे लेखक सुदीप मोडक आहेत. या नाटकात सुमित राघवन आणि स्वानंदी टिकेकर यांची प्रमुख भूमिका आहे. ‘दिल दोस्ती’फेम स्वानंदी टिकेकर हिचे हे पहिलेच नाटक असून, सुमित राघवन हा कसलेला कलाकार बऱ्याच वर्षांनंतर मराठी नाटकात भूमिका साकारत आहे.
कल्चर क्लब सदस्यांना २५० रुपयांच्या एका तिकिटावर एक तिकीट मोफत मिळणार आहे, तसेच नव्याने सदस्य होणाऱ्यांना या नाटकाची दोन तिकिटे मोफत मिळणार आहेत. कल्चर क्लबचे सदस्य होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

येथे साधावा संपर्क

तिकिटासाठी महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड (वेळ ः सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत) फोन ः ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४ येथे, तसेच परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे सकाळी ९ ते १२ व सायंकाळी ५ ते ८.३० वाजेपर्यंत संपर्क साधता येईल. ऑनलाइन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जखमी जनावरांसाठी धावणार अॅम्ब्युलन्स

$
0
0

म. टा. प्रत‌िनिधी, नाशिक

जखमी आणि जायबंदी जनावरांना सेवा-सुश्रुषेसाठी घेऊन जाणे आता अधिक सुकर होणार आहे. जिल्ह्यात प्रथमोपचारांच्या किटसह अद्ययावत असलेली अॅनिमल अॅम्ब्युलन्स आज, रविवार (दि. २४ डिसेंबर)पासून धावणार आहे. या अॅम्ब्युलन्समुळे मुक्या जिवांना योग्य वेळी उपचार मिळणे शक्य होणार आहे.

गौळाणे फाटा येथे खत प्रकल्पाजवळील प्राण्यांसाठीच्या शेल्टरमध्ये या अॅम्ब्युलन्सचे उद्घाटन करण्यात येणार आहे. पीपल फॉर अॅनिमल या संस्थेंतर्गत शरण एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर सोसायटी गेली अनेक वर्षे पाळीव आणि मोकाट जनावरांच्या सेवा-सुश्रुषेचे काम करीत आहे. विल्होळी परिसरात अशा प्राण्यांवर उपचार आणि देखभालीसाठी शेल्टर कार्यान्वित करण्यात आले आहे. कुत्रा, मांजर व तत्सम प्राण्यांसाठी गेल्या काही वर्षांपासून छोटी अॅम्ब्युलन्स कार्यरत आहे. परंतु, गाय, बैल, म्हैस, घोडा, गाढव यांसारखी जनावरे अपघातात जखमी झाल्यास किंवा आजारी पडल्यास त्यांना उपचारांसाठी घेऊन जाण्याकरिता अॅम्ब्युलन्सची सुविधा नव्हती. सुमारे तीन लाख रुपये खर्चून अशी अॅम्ब्युलन्स तयार करण्यात आली असून, तिचे उद्घाटन रविवारी होणार आहे. शहर आणि आसपासच्या परिसरातील जखमी जनावरांना शेल्टरमध्ये नेऊन तेथे त्यांच्यावर उपचार करणे या अॅम्ब्युलन्समुळे शक्य होणार आहे.

ग्रामीणसाठीही पूरक

संस्थेशी संबंधित दोन रेस्क्यु ग्रुप जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात जनावरांची सेवा-सुश्रुषा केली जाते. खूपच आवश्यकता भासल्यास शहराच्या जवळच्या ग्रामीण भागातही ही अॅम्ब्युलन्स उपयोगात येऊ शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विचाराने आजही तरुण आहोत

$
0
0

संमेलनाध्यक्ष कॉ. नजूबाई गावित यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

आम्ही चळवळी करून थकलो पण विचाराने आज तरुण आहोत, असे प्रतिपादन कॉ. नजूबाई गावित यांनी केले. आता लिहण्यासाठी व चळवळीसाठी पुढे यावे, असेही त्या म्हणाल्या. शिवाजी महाराजांना जनमानसात पोहचविण्यासाठी जसा नाटकांचा, ग्रंथाचा सहारा घेतला जातो. तसा शबरी, बाबुजी नाईक यांनाही या माध्यमातून पोहचवले गेले पाहिजे, अशी अपेक्षाही कॉ. गावित यांनी व्यक्त केली.

तेरावे विद्रोही साहित्य आणि संस्कृती संमेलनाला शनिवारी (दि. २३) शहादा येथील मीरा प्रताप लॉनमध्ये सुरुवात करण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. संमेलनाचे आयोजन अंबरसिंग महाराज साहित्य नगरी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून, ते दोन दिवस चालणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात मिरवणूक व ग्रंथ दिंडीने करण्यात आली. ही मिरवणूक कृषी उत्पन्न बाजार समितीतून सुरू झाली. मिरवणुकीत वेगवेगळी पथके सहभागी झाली होती. त्यात तोरणमाळ व साक्री येथील कला पथकांनी सहभाग नोंदविला. मिरवणूक पुढे शहरातील गांधी पुतळा डॉ. आंबेडकर पुतळ्यापासून दोंडाईचा रोडवरून मोहिदा रोड लगत मीरा प्रताप लॉनपर्यंत काढण्यात आली. यानंतर कार्यक्रमाचे उद््घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पुरोगामी साहित्यिक कॉ. नजूबाई गावीत तर स्वागताध्यक्ष कवि वहारू सोनवणे उपस्थित होते. तर उद््घाटक म्हणून ज्येष्ठ नाटककार आतमजितसिंग पंजाब, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आयु. अरविंद कुवर तर प्रमुख अतिथी म्हणून मुडनाकुडु चिन्नास्वामी, डॉ. गणेश देवी, डॉ. छाया दातार, डॉ भारत पाटणकर, कॉ. डोंगर बागूल, डॉ. भालचंद्र कांगो, साथी काळुराम धोधडे, डॉ. बाबुराव गुरव, राजा शिरगुप्पे, डॉ सुरेखा देवी, प्रा. रणजीत परदेशी, कॉ. सुहास परांजपे, कॉ. कुमार शिराळकर, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, प्राचार्य विनोदकुमार ओखे, गौतम कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

मला सुरुवातीला खूप गोष्टींना सामोरे जावे लागले. मी चौथी शिकलेली त्यामुळे बऱ्याच विरोधाला सामोरे जावे लागले. अक्षर समजत नाही, भाषा समजत नाही या व अशा कारणांनी साहित्य जनसामान्यात आणण्यास अडथळा आणण्यात आला, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. कॉ. शरद पाटील यांनी मला प्रोत्साहित केले. चौथी शिकलेली ही स्त्री काय लिहील, अशी टीका माझ्यावर झाल्याचे कॉ. गावित म्हणाल्या.
पोटासाठी झगडणाऱ्यांसाठीच आमचे साहित्य

जमीन, पाणी, वीजपासून आजही आपण वंचित आहोत. आमचे साहित्य अलंकारिक नाही, आम्ही खस्त्ता खाल्या आहेत. मातीत फिरणारे पोटासाठी झगडणाऱ्यांसाठीच आमचे साहित्य होय, अशा भावना कॉ गावित यांनी व्यक्त केल्या. कथा कवितात माझे मन कधीच रमले नाही, म्हणून कादंबऱ्यात माझा व्यथा मांडल्या आहेत. आपले दु:ख, वेदना या साहित्याच्या माध्यमातून मांडा हे आपले हक्काचे व्यासपीठ आहे. अगोदरचा धुळे येथील विद्रोही साहित्य संमेलनात मला बोलावले नाही, त्याची खंतदेखील त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष वहारू सोनवणे यांनी माणसात माणुसकीची जाणीव निर्माण झाली पाहिजे. विद्रोही म्हणजे काय? याबद्दल सांगताना, समता, बंधुता माणुसकीसाठी केलेला बंड म्हणजे विद्रोह होय, असे ते म्हणाले. सूत्रसंचालन किरण मोहिते यांनी तर आभार सुनील गायकवाड यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांची स्वप्नपूर्ती!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एअर डेक्कन कंपनीतर्फे नाशिककरांना मुंबई आणि पुणे या दोन शहरांसाठी विमानसेवा मिळणार असून, त्याचा प्रारंभ शनिवारी सायंकाळी झाला. गेल्या आठ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नाशिककरांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आता या सेवेला प्रतिसाद देण्याची जबाबदारी नाशिककरांवर असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी केले.

ओझर विमानतळावर एअर डेक्कनच्या विमानसेवेचा प्रारंभ थाटामाटात झाला. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाचे सचिव आर. एन. दुबे, ‘एचएएल’चे चेअरमन टी. सुवर्ण राजू, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे एमडी सुरेश काकाणी, खासदार हेमंत गोडसे, हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, नरहरी झिरवाळ, महापौर रंजना भानसी, नाशिक ‘एचएएल’चे सीईओ दलजितसिंग, नाशिकमधील विविध संस्था-संघटनांचे अध्यक्ष आदी यावेळी उपस्थित होते. दरम्यान, उडान योजनेनुसार ९ सीटचे दर हे १४०० रुपये राहतील. त्यापुढील दर हे कंपनी निश्चित करेल, असे गोपीनाथ यांनी सांगितले.

--

खासदार चव्हाण यांचे मौन

ओझर विमानतळाच्या पॅसेंजर टर्मिनलच्या ठिकाणी सर्व मान्यवर येत होते. त्याचवेळी खासदार हेमंत गोडसे यांचे आगमन झाले. त्याची दखल घेत अनेक संस्थांचे अध्यक्ष, तसेच अन्य मान्यवरांनी गोडसे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत अभिनंदन केले. याचवेळी मात्र खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे आगमन झाले. त्यांनी तेथील नजारा पाहून काही वेळाने काढता पाय घेतला. विमानतळ हा चव्हाण यांच्या मतदारसंघात असला, तरी गोडसे यांच्या प्रयत्नांतून सेवा सुरू होत असल्याने चव्हाण यांच्या मतदारसंघात गोडसे यांचे अभिनंदन होत होते.

--

भुजबळांची स्वप्नपूर्ती

ओझर विमानतळाच्या ठिकाणी अत्याधुनिक पॅसेंजर टर्मिनलची उपलब्धता, तसेच विमानसेवा सुरू करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पुढाकार घेतला होता. सध्या ते तुरुंगात असले, तरी विमानसेवा सुरू होत असल्याने भुजबळ यांची खरी स्वप्नपूर्ती होत असल्याचे होर्डिंग्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विमानतळाच्या रस्त्यावर लावण्यात आले होते.

--

सगळीकडे होर्डिंग्ज

विमानसेवा सुरू होणार असल्याने त्याचे श्रेय घेण्यासाठी सारेच सरसावल्याचे दिसून आले. खासदार गोडसे यांनी शहरात, तसेच विमानतळाच्या मार्गावर अनेक ठिकाणी होर्डिंग्ज लावले. पालकमंत्री महाजन यांचे आभार मानणारे होर्डिंग्ज भाजपच्या नगरसेवकांनी लावले. त्यामुळे मुंबई-आग्रा हायवे आणि विमानतळाचा रस्ता यावर मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज दिसून येत होते.

--

उपस्थित ताटकळले

सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी ओझर विमानतळावर एअर डेक्कनच्या विमानाचे आगमन अपेक्षित होते. जळगाव येथील उद्घाटन समारंभानंतर दोन तास उशिराने हे विमान मुंबईकडे झेपावले. त्यामुळे नाशिकलाही दोन तास उशिराने म्हणजेच सात वाजून चोवीस मिनिटांनी आले. या दोन तासांत मात्र सर्वच मान्यवर ताटकळले होते.

--

१४ प्रवासी रवाना

नाशिकहून पुणे या सेवेला मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखविला. त्यात १४ प्रवासी पुण्याकडे रवाना झाल्याचे एअर डेक्कनच्या वतीने सांगण्यात आले. या प्रवाशांना मान्यवरांच्या हस्तेच बोर्डिंग पास देण्यात आला. मुंबईहून नाशिकला आलेल्या एअर डेक्कनच्या विमानाची मोठी उत्सुकता नाशिककरांना होती. या १९ आसनी हे विमान असून, त्यात टॉयलेट, एअर होस्टेस यांची उपलब्धता आहे.

--

देशातील ६७ ठिकाणी सेवा आम्ही देणार आहोत. प्रादेशिक विमानसेवेसाठी मुंबई विमानतळावर २५ टक्के वेळ राखीव ठेवावा. सरकारी परवानग्या आणि काही तांत्रिक अडचणी होत्या. त्यामुळे आम्ही ३० डिसेंबरपर्यंत बुकिंग घेतले नाही. पण, सर्व समस्या दूर झाल्या आहेत. त्यामुळे नाशिकची सेवा २४ डिसेंबरपासून नियमित सुरू होईल.

-कॅप्टन गोपीनाथ, सीईओ, एअर डेक्कन

--

नाशिकला विमानसेवेची प्रतीक्षा होती. पण, सरकारच्या प्रयत्नांना यश आले आहे. आता नाशिकच्या विकासाला मोठी गती मिळेल.

-गिरीश महाजन, पालकमंत्री

--

नाशिकला डावलून अन्य शहरांसाठी मुंबईत वेळ देण्यात आला. अखेर आंदोलन करावे लागले. पाठपुरावा केला. आता सेवा सुरू होत आहे. नाशिकच्या इतिहासात ही बाब मोलाची आहे. सर्व नाशिककरांचे आभार.

-हेमंत गोडसे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठवीतल्या गर्भवती मुलीची आत्महत्या!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव तालुक्यातील सावरगाव येथील आठवीत शिकणाऱ्या चौदा वर्षीय मुलीवर अज्ञात व्यक्तीने बलात्कार केला. त्यामुळे ही मुलगी गर्भवती राहिल्याने तिने विष प्राशन करून आत्महत्या केली. उपचारादरम्यान चाळीसगाव येथील खासगी दवाखान्यात तिचे निधन झाले.

दरम्यान, ती प्रसूत होऊन तिचे बाळदेखील दगावले. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून, आपल्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा शोध घेऊन त्याला कठोर शासन करावे. तिच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी फिर्याद मुलीच्या अगतिक पित्याने शनिवारी, २३ डिसेंबर रोजी सायंकाळी नांदगाव पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या फिर्यादीवरून नांदगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शनिवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सावरगाव येथील एका शेतमजूर पित्याने शनिवारी नांदगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की माझी चौदा वर्षीय मुलगी सावरगाव येथे आठवीत शिकते. तिने १३ डिसेंबर रोजी राहत्या घरी पिकांवर फवारणी करण्याचे कीटकनाशक प्राशन केल्याने ती अत्यवस्थ झाली. तिला चाळीसगाव येथे डॉ. देवरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ती आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिने १६ डिसेंबर रोजी एका मुलाला जन्म दिला. मात्र त्याच दिवशी मूल दगावले. आम्ही सावरगाव येथे अर्भकाचा अंत्यविधी केला. दरम्यान, २० डिसेंबर रोजी माझ्या मुलीचा चाळीसगाव येथे दवाखान्यात मृत्यू झाला. तिचे शवविच्छेदन करून तिच्यावर सावरगाव येथेच २० तारखेस अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगी धष्टपुष्ट असल्याने ती गर्भवती असल्याचे आमच्या लक्षात आले नाही, असे मुलीच्या पित्याने स्पष्ट केले. मुलीवर लैंगिक अत्याचार झाला असून, बदनामीला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे मुलीच्या पित्याने सांगितले. या प्रकरणी दोषींचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी या अगतिक पित्याने केली आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोटो नातवाचा, नाव आजोबांचे!

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, आडगाव


आधार कार्डवरील नवनवीन घोळ समोर येत असल्यामुळे सांगावे तरी कुणाला अशा प्रश्न नागरिकांसमोर उभा आहे. शहरातील एका नागरिकाने संपूर्ण कुटंबाचे आधार कार्ड नोंदणी केली. त्यातील काही सदस्यांचे कार्ड आले तरी काहींचे आलेच नाही. तसेच त्यांच्या स्वतःच्या कार्डवर फोटो, मोबाइल नंबर आणि पत्ता त्यांचा आणि नाव व जन्मतारीख मात्र त्यांच्या आजोबांची आली आहे. त्यामुळे आता हा घोळ सांगावा तरी कुणाला अशा पेचात ते पडले आहेत.

शहरातील आधार सेंटर्सची संख्या तोकडी असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यातच कसाबसा नंबर लागल्यानंतर आधीच्या कार्डवरील दुरुस्तीची नोंद करूनही हातात पडणाऱ्या कार्डवर दुरुस्ती झालेली नसल्यामुळे ना‌गरिकांना कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे.

त्यातच जेथे आधार केंद्र आहेत तेथील कर्मचाऱ्यांकडून मिळणारी वागणूक, त्यांच्या कामाच्या वेळा आणि इतर अडचणींमुळे नागरिक रडकुंडीला येत आहेत.

पंचवटीतील हनुमान नगरमधील रहिवासी विपुल मंडलिक यांनी काही वर्षांपूर्वी घरातील सगळ्या कुटुंबाचे आधार कार्ड नोंदणी केली. मात्र त्यापैकी कुणाचेही कार्ड आले नाही. त्यामुळे मंडलिक यांनी आधार सेंटवर जावून पुन्हा उपडेट केले. मात्र त्यानंतरही त्याच्या हातात आलेल्या कार्डवर असंख्य चुका आहेत. नवीन कार्डवर फोटो त्यांचा आणि नाव आणि जन्मतारीख मात्र त्यांच्या आजोबांची आहे. त्यामुळे विपुल यांना आता पुन्हा आधार सेंटरवर रांगांमध्ये उभे राहून दुरुस्ती करावी लागणार आहे.

कारवाई व्हायला हवी

आधार कार्डची माहिती अपडेट करूनही दुरुस्ती होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सरकारी कामाकाजांमध्ये आधारची सक्ती करण्यात आल्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ होत आहे. त्यातच कार्डवर असंख्य चुका असल्यामुळे त्या दुरुस्त करण्याच नागरिकांना घाम फुटत आहे. विशेष म्हणजे सेंटरवर जावून कार्डवरील चुका दुरुस्त करूनही त्या तशाच राहत असल्यामुळेही सामान्य नागरिक वैतागले आहेत. मात्र या चुकांबद्दल कुणावर तरी कारवाई व्हायला हवी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
काही वर्षांपूर्वी कुटुंबातील सगळ्यांचे आधारकार्ड काढले. पण काही जणांना आधार मिळालेच नाही. त्यामुळे पुन्हा माहिती अपडेट केली. तरीही आधारवरील माहिती चुकीची आली आहे. माझ्या कार्डवर तर फोटो, मोबाइल नंबर आणि पत्ता माझा आहे, तर नाव आणि जन्मतारीख मात्र आजोबांची आहे. वारंवार अपडेट केल्यास कार्ड ब्लॉक होण्याची भीती आहे.

- विपुल मंडलिक, हनुमाननगर, पंचवटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images