Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

वारकरी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

$
0
0
वणी (खुर्द) येथे एकनाथी भारुड गायल्याने दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे राज्यभरातील वारकरी संप्रदायात संतापाचे वातावरण आहे. एकनाथी भारुड समाज जोडते, ते गायल्याने गुन्हे दाखल होतातच कसे, याबाबत वारकरी चिंतन बैठकीत चर्चा झाली.

कळवणनजीक अपघातात तीन ठार

$
0
0
ट्रक व मारुती ओम्नी यांच्यातील अपघातात तीन जण जागीच ठार झाले. ही दुर्घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. तिघेही मृत तालुक्यातील गांडूळमोक गावातील रहिवासी असून, त्यात एका शिक्षकाचा समावेश आहे.

मिशन अॅडमिशनसाठी सुरू !

$
0
0
दहावीच्या निकालाचा जल्लोष ओसरतो न ओसरतो तोच अकरावी प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. शनिवारी (१५ जून) विद्यार्थ्यांना दहावीचे मार्कलीस्ट मिळाल्याने लगेचच शहरातील कॉलेजनी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे कॉलेज अॅडमिशनच्या फॉर्मखरेदीसाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या आहेत.

कार आणि रेनकोट

$
0
0
शहरात सोमवारी झालेल्या एका बैठकीसाठी काहीजण उद्योग भवनाजवळ उपस्थित झाले. बैठकीला सुरुवात झाली. त्यानंतर काही जण पुन्हा बैठकीला हजर झाले. साधारण तासभर चाललेल्या या बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली.

ठकबाजांना पोलिस कोठडी

$
0
0
भारतीय सैन्य दलात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोघा भामट्यांना कोर्टाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ग्रामीण पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अटक केली होती.

पुन्हा पाच बालमजुरांची सुटका

$
0
0
नाशिकरोड येथील हॉटेल बादशाह आणि सरस्वती स्विट्स या दुकानांमध्ये काम करणाऱ्या पाच बालमजुरांची चाईल्ड लाईनच्या सदस्यांनी ना​शिकरोड पोलिसांच्या मदतीने सोमवारी दुपारी सुटका केली.

मधुकर पिचड आज नाशिकमध्ये

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून आदिवासी विकास मंत्रीपदी नियुक्ती झालेले मधूकर पिचड आज, मंगळवारी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. मंत्री झाल्यानंतरच्या पहिल्या दौऱ्यात ते आदिवासी विभागातील अधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची चर्चा करणार आहेत.

एफवायबीएच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

$
0
0
दोन विषयात नापास झाल्याने नाशिकरोडला महाविद्यालयीन विद्यार्थिनीने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

अंबासन आरोग्य केंद्रासाठी गेटबंद आंदोलन

$
0
0
अंबासन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी टाळे ठोकले. चार महिन्यात दुस-यांदा या प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप लावण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या २० टक्के पाऊस

$
0
0
सलग तीन दिवस झालेल्या पावसाने जळगाव जिल्हा चिंब भिजला आहे. तापी नदीवरील हतनूर धरणाचे ३६ दरवाजे पूर्ण उघडले गेले असून तापीला पूर आला आहे. जिल्ह्यात आज अखेर वार्षिक सरासरीच्या २०.१ टक्के पाऊस झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

पोलिसांना गुंगारा देण्यात राखी यशस्वी

$
0
0
ओझर येथील बिपीन बाफणा हत्याकांडातील संशयित आणि फरार झालेल्या राखी नावाच्या युवतीचा कोणताही ठावठिकाणा पोलिसांना लागलेला नाही. पोलिसांनी तिच्या शोधासाठी तीन पथके तयार केली असून पोलिस तिचा नाशिकसह, धुळे आणि अहमदनगर जिल्ह्यात शोध घेत आहेत.

क्लस्टर देणार आदिवासींना बळ

$
0
0
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने शेती आणि विविध प्रकारचे गृहोद्योग करणाऱ्या आदिवासींना आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे क्लस्टर बळ देणार आहे.

प्राचार्यांनाही बायोमेट्रिक हजेरी सक्तीची

$
0
0
अनुदानित कॉलेजच्या प्राचार्यांच्या घरभाडे भत्त्यात १० टक्के कपात करण्याचा निर्णय अमलात आणल्यानंतर आता राज्य सरकारच्या उच्च शिक्षण विभागाने प्राचार्यांना दररोज बायोमेट्रिक प्रणालीव्दारे हजेरी सक्तीची असल्याचा आदेश जाहीर केला आहे.

वीज चोरी करणा-या खडीक्रशर चालकावर गुन्हा

$
0
0
आकडा टाकून वीज चोरी केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील खडीक्रशर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायरनवाली सफारी, रिक्षा आणि विघ्नहर्ता!

$
0
0
दिवस रविवारचा. वेळ रात्री साडेनऊची. पावसाची रिपरिप. खरेदी-खाणंपिणं-फिरणं आटोपून जो-तो घरी परतण्याच्या लगबगीत. सिटी सेंटर मॉलच्या परिसरातील रस्ते नेहमीप्रमाणेच वाहनांच्या पार्किंगने आणि विक्रेत्यांनी व्यापलेले. अशातच एक रिक्षावाला भर रस्त्यातच ब्रेक लावून 'सिट' भरू लागतो.

विस्थापितांची सुविधा कुचकामी

$
0
0
नर्मदा परिसरातील विस्थापितांच्या पुनर्वसनात अडथळा येत असून सरकारतर्फे देण्यात येत असलेल्या सुविधांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केला. या सुविधा 'सरकारी' अर्थातच कुचकामी असल्याचे पाटकर यांचे म्हणणे आहे.

शहरात अस्वच्छतेचा कळस

$
0
0
पावसाळ्याला प्रारंभ होताच शहरातील अस्वच्छतेनेही डोके वर काढले आहे. शहर स्वच्छतेसाठी महापालिकेने ठेका दिलेली घंटागाडीही अनेक भागातून बेपत्ता झाली आहे. यामुळे अस्वच्छतेचे साम्राज्य परसले असून डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे शहरवासिय प्रचंड हैराण झाले आहेत.

राज ठाकरेंचा दौरा पुढे ढकलला

$
0
0
शहर कार्यकारिणीतील बदलांसह संघटनात्मक आढाव्यासाठी मंगळवारपासून तीन दिवसीय नाशिक दौऱ्यावर येणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला दौरा पुढे ढकलला आहे. मुंबईतील महत्त्वाच्या कार्यक्रमामुळे राज यांनी आपला दौरा पुढे ढकलल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे यांनी दिली.

विद्यार्थ्यांना तातडीने शाळेत घ्या

$
0
0
मागणी न करताच दाखले माथी मारलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने शाळेत घ्या असे आदेश जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी रासबिहारी शाळा प्रशासनाला सोमवारी दिले.

अडकलेले नाशिककर सुखरूप

$
0
0
पावसाच्या थैमानामुळे उत्तराखंड व हिमाचल प्रदेशमध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे गंगोत्री, यमुनोत्रीसह उत्तर काशीत हजारो पर्यटक अडकले आहेत. यात नाशिकमधील दोनशेहून अधिक पर्यटकांचा समावेश असला तरी हे सर्व जण सुखरूप असल्याचा दावा यात्रा कंपन्यांनी केला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images