Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दुचाकी उचलण्यास वाहनचालकांचा मज्जाव

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहरातील सर्वात व्यस्त असलेल्या महात्मा गांधीरोडवर दुचाकी, चारचाकी हटवण्याचा मुद्दा मंगळवारी पुन्हा ऐरणीवर आला. ‘नो पार्किंग’मध्ये लावलेल्या दुचाकी वाहतूक विभागाच्या टोइंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांनी उचलल्यानंतर वादास सुरुवात झाली. चारचाकी वाहनांवर कारवाई का करीत नाही, असा प्रश्न उपस्थित करून नागरिकांनी उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांना कारवाई करण्यास मज्जाव केला. या गोंधळामुळे अर्धा तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास महात्मा गांधीरोडवर टोइंग व्हॅनने काही दुचाकी उचलल्या. मात्र, याठिकाणी दुचाकींच्या जागी कार पार्क करण्यात आल्या होत्या. सातत्याने कारवाई होत असल्याने हैराण झालेल्या दुचाकीचालकांनी वाहतूक पोलिसांना याबाबत जाब विचारला. दुचाकी पार्किंगच्या जागेवर चारचाकी वाहने लावलेली असतात. त्यामुळे दुचाकी पार्क करण्यासाठी जागाच राहत नाही, याकडे दुचाकीचालकांनी लक्ष वेधले. दुचाकीधारकांच्या थेट प्रश्नांमुळे पोलिसांची चांगलीच पंचाईत झाली. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी लागलीच सरकारवाडा पोलिसांशी संपर्क साधून अधिक मदत बोलावली. मात्र, अतिरिक्त कुमक आल्यानंतरही दुचाकीधारक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. चारचाकी वाहने उचलण्यासाठी टोइंग वाहन का नाही, असा प्रश्न सातत्याने उपस्थित करण्यात आला. पोलिसांकडे याचे कोणतेही उत्तर नसल्याने त्यांनी संबंधित नागरिकांची कशीबशी समजूत काढून एम. जी. रोडवरून काढता पाय घेतला.

रोजचेच रडगाणे
एम. जी. रोड परिसरात दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते. मात्र अवघ्या पाच ते दहा मिनिटांसाठी वाहन पार्क केलेले असताना टोइंग करण्यात आले तर ३०० रुपयांचा भुर्दंड सहान करावा लागतो. याउलट चारचाकी वाहने उचलण्यासाठी टोइंग व्हॅनच नसल्याने त्या कोठेही उभ्या केल्या जातात. कारवाईत होत असलेला हा दुजाभाव कमी होऊन वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी पोलिसांकडून प्रयत्न होणे गरजेचे झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रामसेवकाचा कार्यालयातच गळफास

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे तालुक्यातील गोंदूर येथील ग्रामसेवक संजय वाघ यांनी सोमवारी (दि. १५) सायंकाळी ग्रामपंचायत कार्यालयातील स्वच्छता गृहात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. या वेळी मृत ग्रामसेवकाने लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. त्यात जिल्हा परिषद सदस्यांना उद्देशून ‘आपले काम करू शकलो नाही, मला माफ करा’ असा मजकूर लिहिला आहे. त्यामुळे आता या आत्महत्येमागे काय कारण असू शकते याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

गोंदूर येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सोमवारी, या घटनेमुळे दिवसभर प्रशासन दोषींवर कारवाई करीत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याचे आंदोलन ग्रामसेवक संघटनेने सुरू केले आहे. ते सदस्य कोण? त्यांचे कोणते काम मृत संजय वाघ हे ग्रामसेवक करू शकले नाहीत, असे अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहे. दरम्यान, शवविच्छेदन गृहाजवळ मंगळवारी (दि. १६) सकाळी ग्रामसेवक कर्मचारी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक पातळीवर या घटनेची गंभीर दखल घेण्याची मागणी केली असल्याचे सांगितले.

संजय भालेराव वाघ यांचा मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयातील स्वच्छता गृहात एका हुकला दोरी बांधून त्यांचा गळफास लावून घेतलेल्या अवस्थेतील आढळला. उपविभागीय पोलिस अधिकारी हिंमत जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या वेळी मृत संजय वाघ यांच्या भाच्याने त्यांचे शव फासावरून उतरवण्यास विरोध दर्शविला. तथापि मृत संजय वाघ यांचे भाऊ घटनास्थळी आल्यावर त्यांचे शव फासावरून उतरविण्यात आले. मंगळवारी (दि. १६) सकाळी जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहाजवळ संजय वाघ यांच्या नातलगांसह ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. कामाच्या तणावातून हा प्रकार घडला असल्याने संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात होती.

जिल्हाभर काम बंद आंदोलन

ग्रामसेवक संजय वाघ यांच्या आत्महत्येचे गुढ वाढले असून, कामाच्या तणावामुळेच ही आत्महत्या झाली असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेने केला आहे. यासंदर्भात संघटनेतर्फे जिल्हा परिषद सीईओ यांना निवेदन देण्यात आले असून, त्याची प्रत जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाला देण्यात आली. या वेळी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भामरे, प्रवीण मोरे, एन. ए. बिरारीस, एस. के. पावरा, सुनंदा राठोड, एस. पी. पाटील उपस्थित होते. वाघ यांच्या भ्रमणध्वनीचे मागील १५ दिवसांचे कॉल रेकॉर्डची तपासणी करावी, अशी मागणीही फे केली आहे. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

राहत्या घरात वृद्धाचा मृत्यू

जळगाव : शहरातील रिंग रोड परिसरात असलेल्या हरेश्वर नगरात सोमवारी (दि. १५) सकाळी राहत्या घराच्या वरील मजल्यावर असलेल्या खोलीत एका वृद्धाचा मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसांपासून घरी कोणीही नसल्याने मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. शिवाजी धुडकू पाटील (वय ८५) असे वृद्धाचे नाव आहे. ते हरेश्वर नगरात पत्नीसह राहत होते. गेल्या तीन दिवसांपूर्वी त्यांची पत्नी बर्‍हाणपूर (मध्य प्रदेश) जवळील सारोळा या गावी गेली होती. दरम्यान, जाण्यापूर्वी त्यांनी पतीला घराच्या वरील मजल्यावर असलेल्या खोलीत सोडून जेवण दिले होते. पत्नी गावाला गेल्यापासून शिवाजी पाटील हे खोली बाहेर निघालेले

नव्हते.

तरुणाची आत्महत्या

गेंदालाल मील परिसरात राहणारा जितेंद्र मुरलीधर कदम हा तरुण रेल्वेस्थानक परिसरात रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करीत होता. मंगळवारी (दि. १६) पहाटेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. विशाल सोनवणे यांनी दिलेल्या खबरीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

ट्रॅक्टर चालक दोषी

गौणखनिजाची चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी ट्रॅक्टर चालकास दोषी ठरविण्यात येऊन न्यायाधीश नीलिमा पाटील यांनी १ वर्षाची शिक्षा व दोन हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. नाना बाबूराव सपकाळे (वय ३१, रा. कांचन नगर) असे शिक्षा झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. ट्रॅक्टर मालकाची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

हल्ल्याप्रकरणी शिक्षा

एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे किरकोळ कारणावरून आजोबा व नातवावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पाटील दाम्पत्यासह मुलास दोषी धरीत मंगळवारी (दि. १६) न्यायाधीश आर. जे. कटारीया यांनी ५ वर्षाची शिक्षा सुनावली. सुनंदाबाई सुपडू पाटील, सुपडू दगा पाटील, दीपक सुपडू पाटील असे दोषींची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्तथरारक, ‘लक्ष्य’वेधी!

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

शत्रूच्या उरात धडकी भरविणाऱ्या तोफांमधून बरसणारे आगगोळे, डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच अचूक लक्ष्यभेद करणारे रॉकेट लाँचर, बॉम्बवर्षाव करणारे अत्याधुनिक फायटर हेलिकॉप्टर, शत्रूची क्षणात चाळणी करणाऱ्या अत्याधुनिक रायफली... ही चित्तथरारक प्रात्यक्षिके याचि देही याचि डोळा अनुभवताना भारतीयांची छाती गर्वाने फुलली होती. निमित्त होते शिंगवे बहुला यथील फायरिंग रेंज परिसरात देवळालीच्या आर्टिलरी सेंटरतर्फे मंगळवारी झालेल्या भारतीय तोफखाना विभागाच्या शस्त्रास्त्रांच्या प्रात्यक्षिकांचे.

देवळाली येथील स्कूल ऑफ आर्टिलरीतर्फे दरवर्षी शस्त्रास्त्र क्षमतेची प्रात्यक्षिके सादर केली जातात. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी फायरिंग रेंजवर ही चित्तथरारक प्रात्यक्षिके झाली. भारतीय जवानांसह भूतान, नेपाळ, रशिया, सिंगापूर, श्रीलंकेतील प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. या वार्षिक अभ्यासाला तोप्ची असे म्हणतात. इंग्रजीत त्याला गन्नर असे म्हणतात. सर्जिकल स्ट्राइकदरम्यान अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टरमधून सुमारे १४ हजार फूट उंचीवरून उडी घेणाऱ्या पॅराट्रूपरना पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. लष्कराच्या चेतक, चिता व अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टरसह एचएएल विभागाने बनविलेल्या लाइट कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टरची चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहून नागरिक थक्क झाले. आर्मी ट्रेनिंग कमांडचे अतिविशिष्ट सेवापदकप्राप्त लेफ्टनंट जनरल एम. एम. नरावणे, देवळाली विभागाचे लेफ्टनंट जनरल आर. एस. सलारिया आदी या वेळी उपस्थित होते.

महत्त्वाकांक्षी उपक्रम

भारतीय तोपखाना हा देशाच्या सुरक्षेसाठी अभेद्य सुरक्षा कवच निर्माण करणारा ठरत असून, त्यात अद्ययावत सुविधा उपलब्ध झाल्याने लष्करासाठी हा विभाग अतिशय महत्त्वाकांशी ठरत आहे. आधुनिक तोफेचा मारा, आर्मी एव्हिएशनच्या सुरक्षा यंत्रणेत झालेले आधुनिकीकरण यामुळे देशाच्या सुरक्षेत आणखी भर पडली आहे. या वार्षिक उत्सवातून देशाला आपली फायर पॉवर, आर्मी एव्हिएशनची ताकद दाखवून देण्याचे काम हा विभाग करीत असतो.

- एस. के. पाणिग्रही, डेप्युटी कमांडंट आणि चीफ इन्स्ट्रक्टर, स्कूल ऑफ आर्टिलरी

या शस्त्रास्त्रांच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण

- ३ ते ९० किलोमीटरपर्यंत मारकक्षमता असलेले २१४ एमएम पिनाका मल्टिबॅरेल रॉकेट लाँचर सिस्टीम

- १२० एमएम मोटर, १३० एमएम लाइट इंडियन फिल्ड गन, १५५ एमएम हायड्रोलिक सिस्टीमवर आधारित बोफोर्स तोफ

- २१ मल्टिबॅरल सेल्फ प्रॉपेल्ड रॉकेट लाँचर

- मल्टिपल स्मर्च लाँच रॉकेट सिस्टीम

- ब्राह्मोस मिसाइल

- मानवरहित आधुनिक हेलिकॉप्टर व युद्धभूमीशी निगडित असलेले लक्ष्यसंपादन करण्यासाठी आवश्यक असलेली रडार सिस्टीम, रॅकी सिस्टीम

- मालवाहू गाड्या, रॉकेट लाँचिंग व्हेइकल, कमांड स्टाफ व्हेइकल, युलिप्का मेट सिस्टीम व्हेइकल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेक इन इंडिया’ कृषीशिवाय अपूर्ण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सत्तेतील भाजप सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयांपैकी ‘मेक इन इंडिया’ हा निर्णय आहे; पण कृषी क्षेत्राच्या समावेशाशिवाय ही संकल्पना अपूर्ण आहे. कृषी क्षेत्राचा आर्थिक दर झपाट्याने वाढीला लागल्याशिवाय ‘मेक इन इंडिया’ शक्य नाही. कृषी क्षेत्राला सरकारने उद्योगाच्या बरोबरीने न्याय द्यावा, अशी अपेक्षा कृषितज्ज्ञ मिलिंद मुरूगकर यांनी व्यक्त केली.

गंगापूर रोडवरील केडीएसपी कृषी जैवतंत्रज्ञान कॉलेजमध्ये विवेकवाहिनी आणि विवेक युवा विचार सप्ताह समितीतर्फे झालेल्या उपक्रमात मुरूगकर बोलत होते. मुरूगकर म्हणाले, की देशात वस्तू तयार होऊन तिची बाह्य जगात विक्री करण्याची मूळ संकल्पना चीनची आहे. जगभरातून भांडवल आणून त्यावर प्रक्रिया करून त्या मालाचा खप संपूर्ण जगभरात कोठेही व्हावा, ही त्यामागची मूळ संकल्पना आहे. यामुळे तरुणाईला रोजगाराची आशा असते; परंतु देशाला ‘मेक इन इंडिया’सोबतच ‘मेक फॉर इंडिया’ची जोड असणे आवश्यक आहे. कृषी क्षेत्राचा आर्थिक दर झपाट्याने वाढल्याशिवाय ‘मेक इन इंडिया’ यशस्वी होऊ शकत नाही. शेतीचा विकास ही ‘मेक इन इंडिया’ची पूर्वअट आहे, असे ते म्हणाले.

‘मेक इंडिया व भारतीय शेती’ या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘मेक इन इंडिया’चे स्वरूप समजावून त्याचे शेतीशी असलेले नाते त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले. १९९० मध्ये भारतात मोठ्या प्रमाणावर आर्थिक स्थित्यंतरे झाली व भारत इतर जगाशी जोडला गेला. भारताचा आर्थिक वृद्धिदर झपाट्याने वाढल्याचे ते म्हणाले.

या वेळी विवेक युवा विचार सप्ताह समितीचे आयोजक सुरेश नखाते व मुकुंद पिंगळे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. आय. बी. चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. आकांक्षा डोंगरे व हृषिकेश दजगुडे यांनी सूत्रसंचालन केले. शंकर दिघे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. दीपिका चव्हाण यांनी आभार मानले. पल्लवी चिंचवडे, विशाल पाटील, बोधित रामटेके, सनी महुरले, रूपाली भामरे, किरण तडवी यांनी सहकार्य केले.
के. एस. के. डब्लू. महाविद्यालयात आज, १७ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊला ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने यांचे ‘समाज, माध्यमे आणि आजचा तरुण’ या विषयावर व्याख्यान होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझी आक्का!

0
0

फर्स्ट पर्सन : डॉ. विजया वाड

__

माझी आक्का!

--

लहानपणी आमच्या मोगऱ्याला पहिले मोगऱ्याचे फूल आले, ते चिमुकल्या ओंजळीत पकडून मी जिच्यासाठी धावत तिच्या अभ्यासिकेत घेऊन गेले होते ती माझी आक्का गेली... गोरीपान, नाकेली, सडसडीत नि हुशार तर इतकी, की मालतीताई बेडेकर या सुप्रसिद्ध साहित्यिका एसएससीची तिची बक्षिसे देताना म्हणाल्या, ‘मला वाटते रजनीची बक्षिसे संपतात की नाही!’

होय! एसएससीला ती पहिली आली होती. कधीच दुसरी नव्हती. हो! इंटरला, एमएला, मतिमंदांच्या कोर्सला... तिचा झेंडा उंच सर्वांत... दादा, नाना, आक्का, नीरू सारे बरोबरीचे. मी तेवढी नऊ वर्षांनी लहान. एक अपघाती अपत्य! साऱ्यांचा खर्च भागवताना आई मेटाकुटीस येई. पण, आक्का नेहमी सारे बक्षिसाचे पैसे आईस देई. माझे बाबा मी अकराची असताना गेले. आक्का इंटरला. दोघे भाऊ एम.एस्सीला. प्रिन्सिपॉल घरी आले. ‘रजनीला कॉलेजातून काढू नका!’ पण, तिने ऐकले नाही. लग्नच करून टाकले. अठराव्यात! म्हणाली, ‘बाबा अकाली गेले. दादावर भार नको.’

पण, नागेश लिमयांनी रजनी दातारला शिकविले. स्वत: पाणी भरले, केर काढला, मुलीस सांभाळले... पण रजनीस शिकवले. आक्काची अंजू आता आजारपण काढताना भक्त पुंडलिकासाठी किती सेवा!

आक्काचा गौतम मतिमंद झाला म्हणून ती रडत बसली नाही. नाशिकमध्ये तिने मतिमंदांसाठी शाळा काढली. दारोदार जाऊन मुलं जमवली. कुमुदताई ओकांनी आपल्या सिनेमागृहात एक शेड दिली. आक्का ४ मुलांसकट गौतम शाळा भरवी. आज चारशे मुलं प्रबोधिनीच्या भव्य इमारतीत आपलं जग शोधत आहेत. आणखी एक शाळा सुनंदा केले. सातपुरात वाढतेय मतिमंदांसाठी होस्टेल आहे. कॅनडाच्या वाणी साहेबांचा फार जीव! वाणी साहेबांनी तिला अमेरिका, कॅनडा येथल्या शाळा (मतिमंदांच्या) दाखवल्या. तिची व्याख्याने ठेवली.

आक्का ग्रेट होती! राष्ट्रपती पुरस्कार, सावित्रीबाई पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गतवर्षी सन्मान. १५ लाख रुपये शाळेस!

सर्वस्व शाळा! ध्यानीमनी प्रबोधिनी! ना गर्व ना अहंकार. परवाच मी, निशिगंधा, दीपक तिला भेटायला गेलो होतो. चांगली जागती होती. दीपकला म्हणाली, ‘चॅनल हेड झालास ना! शाळेला देणगी पाठव.’ सदाही प्रबोधिनीचाच विचार.

सिंगापूरला व्याख्यानाला गेली तर कमिटीने विचारले, ‘पैसे कोणाच्या परवानगीने काढले?’ आक्काने आपले पासबूक दाखवले. ‘स्वखर्चाने गेले हो’ कमिटी गप्पगार! अशी सत्त्वशील आक्का.

माझ्या भाचीच्या लग्नात ती ठाण्यास आली होती. गौतमला आमच्यापाशी ठेवून दोन तास म. पा. भावे यांच्याकडे कविता ऐकायला गेली होती. पण, गौतम जो घाबरून टेबलाखाली बसला तो येईनाहो बाहेर. आई आल्यावर रडायला लागला.

‘किती उशीर?’ नीरू म्हणाली, जीव रमला गं ! पण तुम्हाला माझं उणं लेकरू नाही सांभाळता आलं दोन तास, मी जीवनभर सांभाळतेय. तुम्ही कसले गं बहीणभाऊ? तुम्हीही बघेच.’ आमची तोंडे उतरली, किती रडलो.

माझ्या प्राजू, निशूंना दर सुटीत आक्कामावशीच हवी असे. अवघ्या नाशिकला लिमयेबाईंचा अभिमान! आक्का तू कधीच पुसली जाणार नाहीस...

जोवर प्रबोधिनी आहे.. तू आहेस, तू आहेस...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांच्या’ जीवनात पेरला आनंद...

0
0

‘त्यांच्या’ जीवनात पेरला आनंद...

--

विशेष मुलांच्या जीवनात आनंद पेरणाऱ्या रजनीताईंबाबत मान्यवरांनी व्यक्त केलेल्या भावना...

--

साधी, सात्त्विक अन् प्रामाणिक

माझी मावशी आम्हा सर्वांसाठी आदर्श होती. माझी मोठी बहीण प्राजक्तासह आम्हा सर्वांवर तिचा अतोनात जीव होता. ती खरोखर कर्मयोगिनी होती. साधी, सात्त्विक अन् प्रामाणिक. तिने स्वत:साठी कधीच कोणाकडे काही मागितले नाही. तिचे घर आजही अत्यंत साधे आहे. जे करायचे ते माझ्या शाळेतील मुलांसाठी करा, असे ती म्हणे. देहदान व नेत्रदान करीत तिने अखेरपर्यंत कशाचाच मोह ठेवला नाही.

-निशिगंधा वाड, अभिनेत्री व रजनीताईंच्या भाची

--

श्रेष्ठ कर्मयोगिनी...

प्रतिकूल परिस्थितीला शरण न जाता त्यावर मात करणे हे रजनीताईंकडून शिकण्यासारखे आहे. मानसिक विकलांग मुलगा जन्माला आल्यानंतर आजचे पालक हातपाय गाळून बसतात. मात्र, बाईंनी त्यांच्यासाठी शाळा सुरू केली. या मुलांच्या जीवनात आनंद फुलवला. त्या श्रेष्ठ कर्मयोगिनी होत्या असेच त्यांचे वर्णन करता येईल.

-श्रीकांत पूर्णपात्रे, अध्यक्ष, आधाराश्रम

--

पालकांनाही दिला दिलासा

रजनीताईंनी स्वत:च्या मुलासाठी संस्था सुरू केली. मात्र, अनेक मुलांचे भवितव्य उज्ज्वल केले. अनेक मानसिक विकलांग मुलांना स्वत:च्या पायावर उभे केले. नॉर्मल नसलेल्या मुलांच्या पालकांनाही दिलासा दिला. आपण काही करू शकतो, असा आत्मविश्वास दिला. त्यांचे कार्य अतुलनीय असेच होते.

-प्रा. निशा पाटील, समाजसेविका

--

या मुलांना धीट बनवा!

बाईंचा व माझा परिचय २०१२ मध्ये झाला. मतिमंद मुलांसाठी नाटक बसवावे असा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी त्यांनी मला बोलावले होते. मी, माझ्या सौ तेथे जात असू. या मुलांच्या बोलण्यात प्रगती करून घेणे असा त्यांचा त्यामागचा हेतू होता. बाई सांगायच्या, की या मुलांना धीट बनवा. त्यांनी संपूर्ण जीवन मतिमंद मुलांसाठी खर्ची घातले. मी त्या मुलांमध्ये रमलो. बाईंचे जाणे आमच्यासाठी धक्का आहे.

-रवींद्र ढवळे, ज्येष्ठ दिग्दर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रबोधिनी ट्रस्टच्या रजनीताईंचे ‌निधन

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मानसिक अपंगांच्या विकासासाठी असलेल्या प्रबोधिनी ट्रस्ट संस्थेच्या संस्थापिका, राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या रजनीताई नागेश लिमये (वय ८१) यांचे त्र्यंबकरोडवरील निमा हाऊसशेजारील मुथा हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या पश्चात पती नागेश लिमये, मुलगी गितांजली हत्तंगडी व मुलगा गौतम असा परिवार आहे. रजनीताई यांचे मेडिकल कॉलेजला देहदान व नेत्रदान करण्यात आले.

रजनीताईंचा जन्म १७ मे १९३७ मध्ये झाला. त्यांना सर्वजण बाई म्हणूनच ओळखत. मानसिक विकलांगता हे आयुष्याला लागलेले पाप आहे असा समज पसरलेला असताना, या समाजाच्या विरोधात खंबीरपणे उभे राहण्याचे धाडस रजनीताई लिमये यांनी दाखवले. त्यांनी मानसिक विकलांगांसाठी नाशिकमध्ये पहिली शाळा काढली. दरम्यान, अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव प्रबोधिनी शाळेच्या अंगणात ठेवण्यात आले होते.


आनंदभूवनात शाळेचा रचला पाया

१ जानेवारी १९७७ या दिवशी सम्राट हॉटेल शेजारील ‘आनंदभुवन’ या वास्तूत पाच मानसिक विकलांग मुलांना घेऊन शाळेला त्यांनी सुरुवात केली. मानसिक विकलांगांना वेडे ठरविले जात होते, त्या काळात रजनीताईंनी दाखवून दिले की, या मुलांना योग्य शिक्षण दिल्यावर ती त्यांच्या पायावर उभी राहू शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेवाभावाचा आदर्श; रजनीताई

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

१ जानेवारी १९७७ या दिवशी सम्राट हॉटेलशेजारील ‘आनंदभुवन’ या वास्तूत पाच मानसिक विकलांग मुलांना घेऊन रजनीताईंनी शाळेचा श्रीगणेशा केला. या धाडसी कामासाठी रजनीताईंना थोर शिक्षक प्र. ग. अकोलकर यांचे मार्गदर्शन, डॉ. शिरीष सुळे यांचे वैद्यकीय साहाय्य, कमलताई सारडा यांची आर्थिक मदत व रावसाहेब ओक यांनी शाळेसाठी दिलेली जागा, अशी मदत मिळाली.

प्रबोधिनीला सरकारी मान्यता मिळविताना समाजकल्याण विभागाने घातलेल्या तीन अटी पूर्ण करताना रजनीताईंची दमछाक झाली. परंतु, त्या ठाम राहिल्या. शाळेला मोठी जागा, मुलांची सरासरी हजेरी पंधरा व शिक्षक प्रशिक्षित असावा, ही अट थोडी कठीण होती. प्रशिक्षित शिक्षक कुठून आणायचे, हा प्रश्न होता. मानसिक विकलांगांच्या पालनपोषणाचे शिक्षण पुण्याला जाऊन घ्यायला कुणीही तयार होत नव्हते. त्यावेळी ताईंनी स्वतः पुण्याला जाऊन ते प्रशिक्षण पूर्ण केले. त्यावेळी त्यांचे पती भाई अर्थात, नागेश लिमये यांनी मोलाची साथ दिली. हळूहळू प्रबोधिनीचा विस्तार होत गेला. पाच मुलांना घेऊन एका रूममध्ये सुरू केलेली शाळा मोठ्या इमारतीत भरू लागली.

रजनीताईंनी सेवाभावीवृत्तीने हे काम केले. द्रष्टा विचार करून त्यांनी मानसिक विकलांगांसाठी शाळा सुरू केली नसती, तर काय झाले असते, हा विचारदेखील आज असह्य करणारा आहे. या शाळांमधून आज कितीतरी पालकांना आपली चिमुरडी भविष्य कवेत घेताना दिसतात, त्याचे श्रेय सर्वस्वी रजनीताई लिमये यांनाच जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालिका बाजार एक ‘समृद्ध अडगळ’

0
0

रामनाथ माळोदे, पंचवटी

पेठरोड, फुलेनगर परिसरातील रहिवाशांना विविध वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून ‘पेठरोड पालिका बाजार’ची इमारत बांधण्यात आली. मात्र, सध्या ही इमारत ‘समृद्ध अडगळ’ ठरली आहे. या इमारतीत एकूण २२ गाळे आहेत. मात्र, भाडेवाढीमुळे व्यावसायिकांनी २० गाळ्यांना कुलूप लावले आहे. तूर्तास दोनच गाळे सुरू असून, इमारतीला अवकळा प्राप्त झाली आहे. भंगार आणि अतिक्रमणातील जप्त केलेल्या वस्तू ठेवण्यासाठीच या इमारतीचा वापर होत आहे. यावरून या इमारतीची वाताहत स्पष्ट होते.

पेठरोडच्या फुलेनगरसारख्या झोपडपट्टी भागात २००१ मध्ये या पालिका बाजाराच्या कामाला मंजुरी मिळाली. इमारत तीन वर्षांत उभी राहिली आणि २००४ मध्ये तिचे लोकार्पण झाले. दोन मजली असलेल्या या इमारतीत २२ गाळे उपलब्ध करून देण्यात आले. सुरुवातीला या सर्व गाळ्यांमध्ये विविध प्रकारचे व्यवसाय थाटण्यात आले होते. त्या वेळी ९०० रुपये भाडे आकारले जात होते. आता भाडेवाढ केल्यामुळे येथील व्यावसायिकांना ते परडवत नाहीत. त्यामुळे त्यांनी हे गाळे सोडले आहेत. त्यामुळे येथे फक्त दोनच गाळे सुरू आहेत. त्यात एक दवाखाना आणि दुसऱ्या गाळ्यात किरकोळ वस्तूंच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू आहेत.

धर्मार्थ दवाखानाही बंद
पालिका बाजारात (कै.) रामाशेठ धोत्रे चॅरिटेबल ट्रस्ट या सेवाभावी संस्थेने धर्मार्थ दवाखाना सुरू केला होता. त्यात पॅथॉलॉजी कलेक्शन आणि ट्रिपल पोलिओ सेंटरही सुरू करण्यात आले होते. झोपडपट्टी भागासाठी ही चांगली सुविधा होती. आता तीही बंद पडल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याच इमारतीसमोर आमदार निधीतून पिकअप शेड उभारण्यात आले आहे. या शेडचीही दुरवस्था झालेली आहे. त्याच्या फरशा उखडल्या आहेत. जवळच असलेली गटार उघडी पडली आहे. तिच्या आजूबाजूला उंदरांचा सुळसुळाट वाढला असून, बिळांमुळे हा भाग पोखरला गेला आहे. त्यात एखाद्या व्यक्तीचा पाय अडकून गंभीर दुखापत होण्याची भीती आहे. तेथेच विजेचे लोखंडी खांबही आडवे पडलेले आहेत. परिसराची स्वच्छता होत नसल्यामुळे हा भाग गलिच्छ बनला आहे.

इमारतीचे गोदाम
महापालिकेने राबविलेल्या अतिक्रमण मोहिमेनंतर जप्त केलेला माल या पालिका बाजारातच टाकण्यात येतो. मंदिराचे अतिक्रमण काढल्यानंतर त्या मंदिराचे दगड, लोखंडी रेलिंग आदी साहित्यही या इमारतीत टाकण्यात आलेले आहे. काही हातगाडे, कॉट, रस्त्यावर दुकाने मांडणाऱ्यांचे टेबल, होर्डिंग आदी वस्तूंचेही ही इमारत म्हणजे गोदाम झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉकर्स झोनला राजकीय खोडा

0
0

विनोद पाटील/ प्रवीण बिडवे, नाशिक
शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे पुनर्वसन करण्याचे थेट सुप्रीम कोर्टाचे आदेश असतानाही, केवळ राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप आणि प्रशासनाने निवड केलेल्या चुकीच्या जागांमुळे हॉकर्स झोन समोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. प्रशासनाने घाईघाईत थेट नागरी वस्त्यांमध्येच हॉकर्स झोन तयार केल्याने फेरीवाल्यांसह स्थानिकांच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या दबावामुळे राजकीय नेत्यांकडून वारंवार जागा बदलाच्या सूचना केल्या जात आहेत, तर फेरीवाल्यांच्या फेरसर्वेक्षणाच्या मागणीपुढे हॉकर्स झोनची अंमलबजावणी रखडली आहे. सोबतच हॉकर्स झोनच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडे स्वतंत्र मनुष्यबळ नसल्याने अंमलबजावणीत मोठा खोडा निर्माण झाला आहे.
सुप्रीम कोर्टाचाच आदेश असल्याने महापालिका प्रशासनाने शहरातील हॉकर्स आणि ‘नो हॉकर्स झोन’चे सर्वेक्षण केले. उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र कक्ष स्थापन करून त्याची कारवाई करण्यात आली. या कक्षाकडून सर्वेक्षण केल्यानंतर १६५ हॉकर्स झोन, ६१ रिस्ट्रिक्टेड हॉकर्स झोन आणि ८३ नो हॉकर्स झोनची निश्चिती करण्यात आली. या जागा निवडताना प्रशासनाने आपल्या मर्जीप्रमाणे जागांची निवड केल्याने अंमलबजावणीतला तो मोठा अडथळा ठरला आहे. प्रशासनाने हॉकर्स झोन तयार करताना फेरीवाल्यांना विश्वासात घेतले नाही. प्रशासनाने रस्त्यावरील फेरीवाल्यांची वर्दळ कमी करण्यासाठी हॉकर्स झोनसाठी नागरी वस्त्यांमधील कमी वर्दळीच्या जागांची निवड केली आहे. परंतु, प्रशासनाने निवड केलेल्या जागांना फेरीवाल्यांचा विरोध असून, मालाची विक्री होणार नसल्याचे सांगत, स्थलांतरास नकार दिला आहे. त्यासाठी शहर फेरीवाला समितीच्या बैठकीतही सदस्यांनी तीव्र विरोध केला आहे. विशेष म्हणजे समितीच्या बैठकीत हे हॉकर्स झोन व नो हॉकर्स झोनची मंजुरी न घेताच थेट महासभेकडून मंजूर केल्याचा फेरीवाल्यांचा आक्षेप आहे. फेरीवाल्यांच्या विविध संघटनांकडून महापालिकेवर धडक मोर्चे काढून थेट अंमलबजावणीलाच आव्हान दिले गेले आहे. त्यामुळे प्रशासनाने आस्तेकदम घेत, सोयीच्या हॉकर्स झोनवर भर दिला आहे. सोबतच प्रशासनाने निवडलेल्या ९ हजार ६२० हॉकर्सच्या संख्येवरही आक्षेप घेत नव्याने फेरसर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा हॉकर्सचा शोध घेऊन फेरसर्वेक्षण सुरू केले आहे. त्यामुळे अंमलबजावणीला उशीर होत आहे.

राजकीय अडथळा
प्रशासनानेही निवड केलेल्या बहुतांश जागा या नागरी वस्त्या आणि उपनगरांमध्ये आहेत. उपनगरांमध्ये रस्त्यांवर व्यवसाय थाटणारे व्यवसायिक लोकप्रत‌िनिधींचे किंवा राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्यांचे मतदार, कार्यकर्ते असतात. चरितार्थाचा प्रश्न असल्याने कारवाई होऊ नये, यासाठी हे कार्यकर्ते लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करतात. त्यामुळे त्यांना सांभाळण्यासाठी लोकप्रतिनिधीच अनेकदा पाठबळ पुरवितात. तर दुसरीकडे नागरी वस्त्यांमधील मतदारांचाही या हॉकर्स झोनला विरोध असतो. त्यांच्याकडूनसुद्धा थेट हॉकर्स झोनला विरोध केला जातो. त्यामुळे फेरीवाल्यांसह मतदारांना डोळ्यासमोर ठेवून राजकीय नेते अंमलबजावणीत अडथळा आणत आहेत. त्याचे पडसाद स्थायी समिती, महासभेत उमटून जागांची अदलाबदल, फेरसर्वेक्षणासारखे मुद्दे पुढे केले जात असल्याने हॉकर्स झोनच्या यशस्वी अंमलबजावणीला मर्यादा येऊ लागल्या आहेत. सिडको, सातपूरसह शहराच्या बहुतांश भागात त्यामुळेच ‘नो हॉकर्स’च्या अंमलबजावणीला अपयश आल्याचे दिसून येत आहे.

प्रशासनाने महासभेकडून मंजूर केलेल्या हॉकर्स झोन व नो हॉकर्स झोनबाबत महासभेचीही दिशाभूल केली आहे. शहर फेरीवाला समितीने मंजुरी दिली नसतानाही, प्रशासनाने मर्जीप्रमाणे झोन तयार केले आहेत. त्यामुळे हे झोन आम्हाला मान्य नाहीत. तसेच संघटनांनी सुचविलेल्या पर्यायांवरही विचार विनिमय केला जात नसल्याने आमचा याला विरोध कायम आहे.
- शांताराम चव्हाण, अध्यक्ष, नाशिक जिल्हा हॉकर्स व टपरीधारक युनियन

तयार केलेले हॉकर्स झोन आणि नो हॉकर्स झोनसंदर्भात लोकप्रतिनिधींचेही आक्षेप आहेत, तर काही ठिकाणी नागरिकांचा विरोध आहे. त्याबाबत फेरविचार सुरू आहे. हॉकर्सचेही फेरसर्वेक्षण सुरू आहे. त्यामुळे थोडा कालावधी लागत आहे.
- हरिभाऊ फडोळ, उपायुक्त, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला स्वच्छतागृह कधी?

0
0

मटा इम्पॅक्ट

--

वाट स्वच्छ आरोग्याची

---

महिला स्वच्छतागृह कधी?

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
शहरातील मुख्य बाजारपेठांत स्वतंत्र महिला स्वच्छतागृह नसल्याने मॉल आणि शोरूम्समध्ये महिला खरेदीला पसंती देत आहेत. यामुळे बाजारपेठेतील व्यावसायिकांवर परिणाम होत असल्याच्या ‘मटा’तील वृत्ताची दखल राष्ट्रवादी महिला काँग्रेसने घेतली आहे. या प्रकरणी महिला पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह कधी उभारण्यात येईल, अशी विचारणा केली आहे.
नाशिक शहरात दैनंदिन कामांसाठी वारंवार महिलांना खरेदी करण्यासाठी मुख्य बाजारपेठेत जावे लागते. सोबत घरातील लहान मुलीदेखील असतात. अशा वेळी शहरातील वर्दळीच्या ठिकाणी दहिपूल, अशोक स्तंभ, रविवार कारंजा, मेनरोड, भाजी बाजार, सिडको या ठिकाणी महिलांना स्वच्छतागृहाची उणीव जाणवते. अनेकदा गर्भवती आणि मधुमेही महिलांना स्वच्छतागृहाअभावी आरोग्याची समस्या उद्भवते. लहान मुलींचीदेखील यामुळे गैरसोय होते. अनेकदा मागणी करूनही महिलांच्या बाबतीत महापालिका महिला स्वच्छतागृहांसंदर्भात अकार्यक्षम ठरत आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नाशिक शहराध्यक्ष अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेतली. संपूर्ण शहरात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था तातडीने करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. एकीकडे संपूर्ण देशभरात स्वच्छ भारत अभियान राबवीत असताना नाशिक महापालिका मात्र महिलांसाठी किमान स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध करून देत नाही, ही बाब चिंताजनक आहे, असे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातील बजेटमध्ये तरतूद करावी, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली. स्वच्छतेसाठी महिला कर्मचाऱ्यांचीच नेमणूक करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. स्वच्छतागृहाची मागणी पूर्ण होईपर्यंत राष्ट्रवादी महिला काँग्रेस शांत बसणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी प्रदेश उपाध्यक्षा भारती पवार, कार्याध्यक्षा सुषमा पगारे, नगरसेविका समीना मेमन, शोभा साबळे, माजी जिल्हाध्यक्ष शोभा मगर, रजनी चौरसिया, संगीता गांगुर्डे, सुरेखा पठाडे, रशिदा सय्यद, पंचशीला वाघ आदी महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या.
--
११९ ठिकाणी नियोजन
याप्रसंगी आयुक्त कृष्णा यांनी सांगितले, की शहरात ११९ ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधकामासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५५ ठिकाणचे काम सध्या सुरू आहे. मात्र, उर्वरित ठिकाणी स्थानिक नगरसेवकांनी स्वच्छतागृहे बांधकामास विरोध केल्याने काम बंद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजी-माजी आमदारांच्या घरांवर आयकरचे छापे

0
0

धुळे

काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अमरीश पटेल आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या घरावर आज आयकर विभागाने छापे टाकले. आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी या दोघांच्या घरांसह त्यांच्या उद्योगांचीही कसून चौकशी केली.

धुळे व शिरपूर शहरात आयकर विभागाचे पथक आज सकाळी दाखल झाले. आमदार अमरीश पटेल आणि माजी आमदार कदमबांडे या दोघांच्या घरांवर छापा टाकत त्यांच्या संपत्तीची कसून चौकशी केली. शहरात आयकर विभागाची धाड पडल्याची बातमी पसरताच काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत उलटसुलट चर्चा सुरू झाली. अमरीश पटेल यांच्यासह त्यांचे सहकारी राजगोपाल भंडारी, प्रभाकर चव्हाण, अशोक कलाल, अॅड. सी. बी. अग्रवाल, बबन अग्रवाल, कर सल्लागार विजय राठी, किसान अॅग्रो, देवता गरमेंट्स यांची देखील चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. परंतु, यांची चौकशी करण्यात आल्यानंतर आयकर विभागाने त्यांच्याविरोधात काय कारवाई केली याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पचरित्र

0
0


अल्पचरित्र


मानसिक विकलांग मुलांसाठी शाळा सुरू करून रजनीताईंनी समाजावर फार मोठे उपकार करून ठेवले आहेत. त्या चिमुरड्यांच्या सेवेत जशा तत्पर होत्या तशाच साहित्यसेवेतही मागे राहिल्या नाहीत. त्यांच्या नावावर तीन पुस्तके आहेत.

‘गोडुली गाणी’ हे बालकांची गाणी असलेले पुस्तक, ‘जागर’ हे या क्षेत्रात काम करताना आलेल्या अनुभवांचे संकलन आणि ‘ध्यानी मनी प्रबोधिनी’ ही तीन पुस्तके त्यांनी लिहिली. २५ वर्षे माध्यमिक शाळेत सेवा, सहशिक्षिका म्हणून कार्यास प्रारंभ व उपप्राचार्या म्हणून १९८९ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्या प्रबोधिनी न्यासाच्या कार्यवाह, प्रबोधिनी शिक्षक प्रशिक्षण केंद्राच्या प्रमुख समन्वयक, तसेच प्रबोधिनी ट्रस्टच्या अध्यक्षा होत्या.

रजनीताईंना १९८६ चे माध्यमिक शिक्षकांसाठीचे राष्ट्रपती पारितोषिक तत्कालीन राष्ट्रपती आर. व्यंकटरामन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले होते. मागासवर्गीय जनतेसाठी उपयुक्त कार्य केल्याबद्दल त्यांना महाराष्ट्र सरकारचे राज्यस्तरीय पारितोषिक दलितमित्र सन्मान मिळालेला आहे. १९९९ चा लोककल्याण पुरस्कार, आदर्श माता पुरस्कार, ममता पुरस्कार, संस्कृतिवैभव पुरस्कार, दादरचा वनिता समाज पुरस्कार समाजसेविका पुरस्कार, सेवाभावी समाजकल्याण संस्थेचा सेवादीप पुरस्कार, पुणे विद्यापीठाकडून जीवन साधना गौरव पुरस्कार, हेल्पर्स ऑफ दी हँडिकॅप कोल्हापूरतर्फे अपंगमित्र पुरस्कार आदींनी त्यांना गौरविले गेले. त्या पुणे विद्यापीठ सिनेट सदस्यादेखील होत्या.



रजनीताईंनी १९९१, ९२, ९४ मध्ये राज्य पातळीवरील लेख लिहिले. ‘कौटुंबिक सहानुभूतीची आवश्यकता’ या विषयावर १९९४ मध्ये नवी दिल्ली येथे सहाव्या आंतरराष्ट्रीय परिसंवादात त्यांनी शोधनिबंध वाचन केले होते. कॅनडा, अमेरिका, इंग्लंड या देशांतील ४० दिवसांचा अभ्यासदौरा, विविध प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्रांना भेटी, सिंगापूर येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिसंवादात त्यांनी शोधनिबंध वाचन केले होते. प्रबोधिनी पालक समितीच्या त्या अध्यक्षा होत्या, तसेच मानसिक विकलांग मुलांच्या पालकांच्या राष्ट्रीय संघटनेच्या त्या सदस्या होत्या. प्रबोधिनी ट्रस्ट ही सुसज्ज शाळा त्यांनी उभारली. फिजिओथेरपी सेंटर, मोठी कार्यशाळा, बालवाडी, सुंदर बगीचा, बसेस या गोष्टी त्यांनी देणगीदारांच्या मदतीने केल्या. प्रबोधिनी विद्यामंदिर, प्रबोधिनी संरक्षित कार्यशाळा, सुनंदा केले विद्यामंदिर, हे मानसिक विकलांगांसाठी जणू वटवृक्षच झाले. मुलांच्या वर्तनसमस्या कमी करून त्यांना त्यांच्या कुटुंबात व समाजात सुरक्षित स्टँडर्ड मिळवून देणे, हे मुख्य ध्येय डोळ्यासमोर ठेवून मतिमंदत्त्व या विषयावर दीर्घ अभ्यास, संशोधन करून वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेल्या इमारती ट्रस्टने उभ्या केल्या. मुलांच्या बौद्धिक व शारीरिक कुवतीनुसार छोटे छोटे गट पाडून त्यांच्याकडे व्यक्तीशः लक्ष देण्यात येते. शाळेच्या पहिल्या पाचमधील एका विद्यार्थ्याचे वय आज पन्नास वर्षे आहे, त्यांचे आई-वडील पंच्याऐंशीच्या घरात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी शनिवारी शिक्षा

0
0

नाशिक :

सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी नाशिकच्या जिल्हा सत्र व सत्र न्यायालयाने दोषी ठरवलेल्या सहा जणांना शनिवारी २० जानेवारी रोजी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. ​सोनई हत्याकांडाने रामायणातील राक्षसांची आठवण झाल्याचं सांगत सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई येथे १ जानेवारी २०१३ रोजी प्रेम प्रकरणातून हे हत्याकांड झाले होते.

सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी नाशिकच्या जिल्हा सत्र व सत्र न्यायालयाने १५ जानेवारी रोजी सहा जणांना दोषी ठरवले होते. या सहाही जणांना आज शिक्षा ठोठावण्यात येणार होती. त्यामुळे विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम या सुनावणीला आज न्यायालयात हजर होते. संपूर्ण राज्याचे लक्षही या सुनावणीकडे लागले होते. न्यायालय परिसरात प्रचंड गर्दी झाल्याने यावेळी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. आज दोन्ही पक्षाच्या वकिलांचा शिक्षेवरील युक्तीवाद पूर्ण झाल्याने आता शनिवारी आरोपींना शिक्षा ठोठावण्यात येणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं.

यावेळी निकम यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी १३ मुद्दे उपस्थित केले. ​आरोपींनी केलेलं कृत्य हे राक्षसांप्रमाणे क्रूर आहे. थंड डोक्याने आरोपींनी पीडितांची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे केले. नियोजन आणि कट रचून हे हत्याकांड करण्यात आलं. प्रत्यक्षदर्शींचा पुरावा राहू नये म्हणून सचिनच्या मित्रांचाही खून करण्यात आला. या कृत्यामुळे रामायणतील राक्षसांची आठवण झाली. तसेच राक्षस आजही जमिनीवर आहेत. त्यांनी गोठलेल्या रक्ताने हे हत्याकांड केलं. ज्या पद्धतीने तुकडे करून खून केला आहे हे खूपच दुर्मिळ आणि निर्घृण आहे, असा युक्तिवाद निकम यांनी केला.

या हत्याकांडाचा आरोपींना कुठला पश्चाताप झालेला नाही, त्यांनी तशी भावना कोर्टात व्यक्त केली नाही. हा कट असून परिस्थितिजन्य पुराव्यांआधारे सिद्ध झालं आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधीच्या प्रकरणासारखंच हे प्रकरण आहे. त्यामुळे आरोपींना मृत्यूदंड द्यावा, अशी मागणी निकम यांनी केली. तर आरोपींचे वकील एस. एस. आदास यांनी कमीत कमी शिक्षेची मागणी केली. एका आरोपीचं वय खूपच कमी आहे, तर अन्य आरोपीचं वय खूपच जास्त आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती पाहता कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी केली.

अहमदनगर जिल्ह्यातील सोनईच्या गणेशवाडी शिवारातील मुलगी नेवासा फाट्यावरील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलमध्ये बी. एड. चे शिक्षण घेत होती. संस्थेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या मेहतर समाजातील सचिन सोहनलाल घारू आणि तिच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. याबाबत तिच्या कुटुंबाला समजल्यानंतर प्रेमप्रकरणाने गंभीर वळण घेतले. रमेश विश्वनाथ दरंदले, प्रकाश विश्वनाथ दरंदले (चुलते), गणेश ऊर्फ प्रवीण पोपट दरंदले (भाऊ), संदीप माधव कुऱ्हे (मावसभाऊ), त्यांचा नातेवाईक अशोक रोहिदास फलके व अशोक सुधाकर नवगिरे यांनी दरंदले वस्तीवरील संडासचे सेफ्टी टँक दुरुस्तीचा बहाणा करून व वाजवीपेक्षा जास्त मजुरीचे आमिष दाखवून संदीप राजू थनवार, सचिन सोहनलाल घारू व तिलक राजू कंडारे यांना १ जानेवारी २०१३ रोजी बोलावून घेतले. यावेळी संशयितांनी संदीप थनवार यास सेफ्टी टँकच्या पाण्यामध्ये बुडवून ठार केले. त्यानंतर पळून जाणाऱ्या राहुल कंडारे याचा कोयत्याने, तर सचिन घारूचा वैरण कापण्याच्या अडकित्त्यामध्ये अडकवून खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'पद्मावत' चित्रपटावर बंदीची मागणी

0
0

मोर्चाने दणाणले जळगाव

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

'माँ पद्मावती राणी के सन्मान मैं क्षत्रिय मैदान मैं, छत्रपती शिवाजी महाराज की जय, राजमाता जिजाऊ की जय, आवाज कुणाचा राजपूतांचा' अशा गगनभेदी घोषणांनी शहर दणाणून गेले होते. माँ पद्मावती सन्मान मोर्चात शुक्रवारी (दि. १९) जिल्ह्यातून समाजबांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती दिली. मोर्चाद्वारे निवेदन देऊन संजय भन्साळी निर्मित चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली.

क्रांतीसूर्य महाराणा प्रताप यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून निर्माता संजय लिला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटाच्या विरोधात माँ पद्मावती सन्मान कृती समितीतर्फे शुक्रवारी, सन्मान मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सहभागी होण्यासाठी सकाळी १० वाजेपासून जिल्ह्यातून राजपूत समाजबांधव नूतन मराठा कॉलेजमध्ये येत होते. या वेळी मोर्चाच्या सुरुवातीला माँ पद्मावती सन्मान कृती समितीतील विद्यार्थिनींनी मनोगताद्वारे माँ पद्मावती यांच्या इतिहासाला उजाळा दिला.

या मोर्चासाठी जिल्ह्यातून येणार्या समाजबांधवांना एकत्र येण्यासाठी नूतन मराठा कॉलेजच्या प्रांगणावर मंडप टाकण्यात आला होता. मोर्चास्थळी येणार्या प्रत्येक समाजबांधवांना कृती समितीतर्फे प्रवेशद्वाराजवळ कुंकूवाचा क्षत्रिय टिळा लावण्यात येत होता. कॉलेजच्या प्रांगणात उपस्थित असलेले माजी आमदार आर. ओ. पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्यासह कृती समितीतील सदस्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर मोर्चाला सुरुवात करण्यात आली. या सन्मान मोर्चाचे नेतृत्व महिला व युवतींनी केले. अग्रस्थानी महिला व युवती होत्या. त्यानंतर पुरूष आणि तरुण सहभागी झाले होते. मोर्चात सहभागी झालेल्या तरूणांनी हातात भगवे झेंडे घेत ते फडकविले जात होते.

शिस्तबद्ध नियोजन

माँ पद्मावती सन्मान कृती समितीतर्फे काढण्यात आलेला मोर्चा हा अत्यंत शिस्तबद्ध होता. समाजबांधव दोन जणांच्या ओळीने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी झाले होते. हा मोर्चा नूतन मराठातून डॉ. सहस्त्रबुद्धे यांच्या रुग्णालयाजवळून रिंगरोड मार्गे महाराणा प्रताप पुतळ्याजवळ पोहोचला. मोर्चा बहिणाबाई चौकात आल्यानंतर याठिकाणी कृती समितीतर्फे महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर हा मोर्चा जिल्हापेठ मार्गे स्वातंत्र्य चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर मोर्चाचा समारोप करण्यात आला.

महिलांतर्फे प्रशासनाला निवेदन

जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चात सहभागी झालेल्या युवती आणि महिलांतर्फे माँ पद्मावती चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशा मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना देण्यात आले. माँ पद्मावती सन्मान मोर्चाच्या निमीत्ताने राजपुत समाजबांधवांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या मोर्चास हिंदु संघटनांनीही पाठिंबा दिला.

रावेरला बॅनर फाडल्याने तणाव

रावेर : रावेर तालुक्यातील खानापूर येथे राणी पद्मावती चित्रपटासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या मोर्चाबाबत बॅनर लावण्यात आले होते. ते फाडल्याची घटना शुक्रवारी (दि. १९) झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पद्मावती चित्रपटावर बंदी आणण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी, जळगावला मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याने समाज बांधवांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले. हा प्रकार उघडकीस आल्याने खानापूर येथील राजपूत समाजबांधव बसस्थानक परिसरात जमले होते. संबंधीत बॅनर फाडणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी करण्यात आली. पोलिसांनी कारवाई न केल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला. रावेर पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार केली असून, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश चौधरी, देवेंद्र राजपूत, सुनील राजपूत, युवराज राजपूत, शंभू राजपूत, बाळू राजपूत, जीवन राजपूत आदींसह राजपूत समाज बांधवांतर्फे कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

सिनेमागृहांना नोटीस

धुळे : नंदुरबार जिल्ह्यात 'पद्मावती' या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात अनेक संघटनांनी विरोध दर्शवला आहे. अशा परिस्थितीत नंदुरबार शहरातील चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदर्शित केल्यास कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल. यामुळे होणाऱ्या नुकसानास चित्रपटगृह मालक जबाबदार राहणार, अशा आशयाची नोटीस नंदुरबार शहर पोलिसांनी चित्रपटगृह मालकांना दिल्या आहेत. ही माहिती पोलिस निरीक्षक संजय मथुरे यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोनई हत्याकांड: सहा दोषींना फाशीची शिक्षा

0
0

नाशिक: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या अहमदनगर येथील सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयानं सहाही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या सहाही जणांना १५ जानेवारी रोजी दोषी ठरविण्यात आलं होतं. न्यायालयाच्या निकालानंतर पीडितांच्या कुटुंबीयांनी न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे.

नेवासा तालुक्यातील सोनई येथे १ जानेवारी २०१३ रोजी प्रेम प्रकरणातून हे हत्याकांड झाले होते. सोनईच्या गणेशवाडी शिवारातील मुलगी नेवासा फाट्यावरील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलमध्ये बीएडचे शिक्षण घेत होती. संस्थेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या मेहतर समाजातील सचिन सोहनलाल घारू आणि तिच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. याबाबत तिच्या कुटुंबाला समजल्यानंतर प्रेमप्रकरणाने गंभीर वळण घेतले. रमेश विश्वनाथ दरंदले, प्रकाश विश्वनाथ दरंदले (चुलते), गणेश ऊर्फ प्रवीण पोपट दरंदले (भाऊ), संदीप माधव कुऱ्हे (मावसभाऊ), त्यांचा नातेवाईक अशोक रोहिदास फलके व अशोक सुधाकर नवगिरे यांनी दरंदले वस्तीवरील संडासचे सेफ्टी टँक दुरुस्तीचा बहाणा करून व वाजवीपेक्षा जास्त मजुरीचे आमिष दाखवून संदीप राजू थनवार, सचिन सोहनलाल घारू व तिलक राजू कंडारे यांना १ जानेवारी २०१३ रोजी बोलावून घेतले. यावेळी संशयितांनी संदीप थनवार यास सेफ्टी टँकच्या पाण्यामध्ये बुडवून ठार केले. त्यानंतर पळून जाणाऱ्या राहुल कंडारे याचा कोयत्याने, तर सचिन घारूचा वैरण कापण्याच्या अडकित्त्यामध्ये अडकवून खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले.

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. 'आरोपींचं कृत्य हे राक्षसांप्रमाणे क्रूर आहे. थंड डोक्याने त्यांनी पीडितांची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले. नियोजन आणि कट रचून हे हत्याकांड करण्यात आलं. प्रत्यक्षदर्शींचा पुरावा राहू नये म्हणून सचिनच्या मित्रांचाही खून करण्यात आला. हे कृत्य खूपच निर्घृण आहे, असा युक्तिवाद निकम यांनी केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या पुरस्कारांची घोषणा

0
0

नाशिक

येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा 'गोदावरी गौरव' पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली.

सुदर्शन शिंदे, महेश साबळे या दोघांना 'साहस'चा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पंडित सत्यशील देशपांडे यांना गायनसाठी तर डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे यांना लोकसेवेसाठीचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर (नाट्य-चित्रपट), डॉ. स्नेहलता देशमुख (ज्ञान) सुभाष अवचट (चित्र) यासाठीचा पुरस्कार देण्यात येणार आहेत. २१ हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून येत्या १० मार्च रोजी मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तरुण’म्हणून माफीची विनंती फेटाळली

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सोनई हत्याकांडात दोषी ठरवलेल्यांचे वय लक्षात घेऊन कमीत कमी शिक्षा व्हावी, असा मुद्दा बचाव पक्षाने शिक्षेवरील युक्तिवादादरम्यान उपस्थित केला होता. मात्र, हत्या झालेले तिन्ही युवक तरुण, अविवाहित होते. त्यांची हत्या करताना आरोपींनी हा विचार का केला नाही, असा प्रश्न जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी उपस्थित करत हा मुद्दा फेटाळून लावला.

प्रेमप्रकरणातून झालेल्या या हत्या प्रकरणात चार वर्षांच्या सुनावणीनंतर न्यायालयाने सहाही जणांना १५ जानेवारी रोजी दोषी ठरवले होते व शनिवारी शिक्षा सुनावण्यात आली. 'या हत्या प्रकरणामुळे जातीव्यवस्थेचा विखारी प्रकार यामुळे समोर आला असून, अशा प्रकारांना कडक शासन देऊन आळा घातला नाही, तर तो एड्स रोगासारखा फैलू शकतो', असे निरीक्षणही न्यायाधीशांनी मांडले.

सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम म्हणाले, 'या निकालामुळे जातीय द्वेष पसरविणाऱ्यांना चाप बसेल. घटनेतील क्रौर्य निर्घृण असून, दयामाया दाखवण्यासारखा हा प्रकारच नाही. सचिन घारू याचे एका सवर्ण मुलीवर प्रेम होते. याचा राग मनात धरून त्याचा आणि त्याच्या दोन मित्रांचा १ जानेवारी, २०१३ रोजी खून करण्यात आला. या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी मांडून गुन्हा सिद्ध करण्यात यश मिळाले'.

मृतांच्या कुटुंबीयांना समाधान

सुनावणीसाठी मृत तरुणांच्या कुटुंबीयांसह आरोपींच्या नातेवाइकांनीही गर्दी केली होती. निकाल जाहीर होताच मृतांच्या नातेवाईकांना आनंदाश्रू अनावर झाले. जिल्हा न्यायालयाच्या फाशीच्या निर्णयावर हायकोर्ट शिक्कामोर्तब करेल. येथेही दोषींना हीच शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा नातेवाईकांनी व्यक्त केली. मागील पाच वर्षांच्या दबावातून मुक्त झाल्यासारखे वाटत असल्याची भावना सचिन घारू याच्या भावाने व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसऱ्या पत्नीलाही पोटगीचा हक्क मंजूर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विवाह केलेल्या दुसऱ्या पत्नीलाही पतीकडे पोटगी मागण्याचा हक्क आहे. विवाहाचे आमिष दाखवून प्रस्थापित केलेले संबंध हा सर्वात मोठा कौटुंबिक हिंसाचार आहे, असे निर्वाळा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एच. मोरे यांनी दिला आहे. दिंडोरी तालुक्यातील एका आदिवासी विवाहितेसंदर्भात त्यांनी नुकताच ऐतिहासिक निकाल दिला. गेल्या १२ वर्षांपासून या महिलेचा संघर्ष सुरू होता.

पीडित विवाहितेचा दिंडोरीचे माजी सरपंचाशी परिचय होता. त्यांच्यामध्ये मधल्या काळात प्रेमसंबंध प्रस्थापित केले. तुझे १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर विवाह करेन, असे त्याने पीडितेला आश्वासन दिले होते. दरम्यानच्या काळात आरोपीमुळे पीडिता गर्भवती राहिली. विवाहाचे आश्वासन न पाळल्याने पीडितेने २००७ मध्ये पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत तक्रार केली. त्यानंतर माजी सरपंचाने पीडितेशी तडजोड करण्याची तयारी दर्शविली. यात त्यांनी तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला तसेच जन्म झालेल्या मुलाच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारत असल्याचा लेखी बाँड दिला. सन २०१२ मध्ये पीडितेशी पुन्हा विवाह केला आणि पंचवटी परिसरात भाडे तत्वाने घर घेऊन सोबत नांदण्यास सुरुवात केली. एक दिवस अचानक माजी सरपंचाने पीडितेकडे लेखी बाँड मागितला. मिळालेला बाँड त्यांनी फाडून टाकला. 'मी तुझा आणि तुझ्या मुलाचा स्वीकार करणार नाही', असे सांगत मारहाण करीत पीडितेला घराबाहेर काढून दिले. यानंतर पीडितेने कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दिली आणि दरम्यानच्या काळात मुलाच्या पालनपोषणासाठी कौटुंबिक न्यायालयात पोटगीसाठी अर्ज केला. डीएनए चाचणी अहवालाच्या आधारे कोर्टाने एप्रिल २०१५ मध्ये मुलासाठी दरमहा १० हजार रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले.

कौटुंबिक हिंसाचार गुन्ह्याखाली सुरू असलेल्या खटल्यात प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालयाने पीडितेचा अर्ज फेटाळून लावला. पहिली पत्नी असताना दुसऱ्या पत्नीस पतीविरूद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा दावा करता येणार नाही, असा निकाल तत्कालीन न्यायाधीशांनी दिला होता. या निकालास पीडितेने जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले.

बाँण्डसह साक्ष ठरली मोलाची

माजी सरपंचाने पीडितेशी तडजोड करताना २०१२ मध्ये केलेला बाँड या खटल्यात मोलाचा ठरला. पीडितेशी भांडण करताना माजी सरपंचाने तो बाँड फाडून टाकला होता. त्या बाँडचे सगळे तुकडे गोळा करीत पीडितेने ते जोडले. कोर्टात तो बाँड सादर करण्यात आला. कोर्टाने तो पुरावा म्हणून ग्राह्य धरला. या बाँडवर साक्षीदार म्हणून सही असलेल्या व्यक्तीची कोर्टात साक्ष नोंदविण्यात आली. तसेच पीडितेचे पतीच्या नावाने असलेले पॅनकार्ड व आधारकार्डही कोर्टाने मान्य केले. त्या आधारावर न्या. एस. एच. मोरे यांनी पीडितेला दरमहा सात हजार रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले. अॅड. मनीषा जाधव-फोफालिया यांनी फिर्यादीची कोर्टात बाजू मांडली.

विवाहाचे आमिष दाखवून पीडितेचे शोषण झाले होते. अशिक्षित आणि कोणताही कौटुंबिक आधार नसलेल्या या महिलेची आर्थिक जबाबदारी नाकारली जात होती. कोर्टाच्या या ऐतिहासिक निकालाने तिला दिलासा मिळाला आहे.
- अॅड. मनीषा जाधव-फोफालिया,फिर्यादीच्या वकील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हे दाम्पत्य, अवचट आदींना गौरव पुरस्कार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमधील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा ‘गोदावरी गौरव’ यंदा सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे, चित्रकार सुभाष अवचट, अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर, बालरोगतज्ज्ञ-शिक्षणतज्ज्ञ डॉ. स्नेहलता देशमुख, गायक पंडित सत्यशील देशपांडे आणि कमला मिल आगीवेळी बचावकार्यात मोलाची भूमिका बजावणारे सुदर्शन शिंदे व महेश साबळे यांना जाहीर झाला आहे. शनिवारी नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.कविवर्य कुसुमाग्रज यांच्या स्मृतीदिनी म्हणजेच १० मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता नाशिकमधील रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. २१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि शाल-श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

प्रारंभी कुसुमाग्रजांनी पुरस्काराची रक्कम ११ हजार रु. ठरवली होती परंतु कालमानानुसार ही रक्कम कमी होत असल्याचे निदर्शनास आल्याने कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे या रकमेत १० हजारांची भर घालून २१ हजार रुपये करण्यात आली.शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेस प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, आमदार हेमंत टकले, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संजय पाटील, कार्यवाह मकरंद हिंगणे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images