Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सलग तीन दिवस बँका बंद

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सलग तीन दिवस सुटी आल्यामुळे बँका बंद राहणार आहेत. यामुळे आज, गुरुवारी बँकांमध्ये गर्दी होणार आहे. बँकेने ऑनलाइन व एटीएमची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. असे असूनही बहुतांश व्यवहारांसाठी बँकेत रोज ग्राहकांची गर्दी असते. त्यामुळे सलग बँका बंद असल्यामुळे अनेकांची अडचण होणार आहे.

प्रजासत्ताक दिनाची सुटी असल्यामुळे शुक्रवारी (दि. २६) बँका बंद राहणार आहे. त्यानंतर २७ जानेवारीला चौथा शनिवार व २८ला रविवार असल्यामुळे सलग तीन दिवस सुटी असणार आहे. नोटाबंदीनंतर बँका व एटीएम बंद असल्यामुळे अनेकांची अडचण झाली होती. त्यानंतर मात्र व्यवहार सुरळीत झाले. तरी एटीएमची अडचण अनेक ठिकाणी होती. पण, गेल्या काही महिन्यांपासून एटीएमची अडचण दूर झाल्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. आता या तीन दिवसांत मात्र एटीएमवरही गर्दी होणार आहे. त्यासाठी बँकेने तयारी केली असली तरी एकाच ठिकाणी गर्दी झाल्यास कॅश शॉर्टेजचा प्रश्न येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समृद्धीबाधित करणार इच्छामरणाचा ठराव

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समृद्धी विरोधात अनेक आंदोलने करूनही राज्य सरकार त्याची फारशी दखल घेत नसल्याने समृद्धीबाधितांनी राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. २६ जानेवारीच्या ग्रामसभेत याबाबतचा ठराव केला जाणार आहे.

सरकार शेतकरीविरोधी भूमिका घेत असून, समृद्धी महामार्गाकरिता जबरदस्तीने जमिनी घेतल्या जात आहेत. यातून बागायती क्षेत्र वगळावे, भूसंपादन कायदा २०१३ ची अंमलबजावणी करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र सरकारने अद्याप त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी ग्रामसभेत ठराव करून राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी करण्याचा निर्णय समृद्धीबाधित संघर्ष समितीने घेतला आहे.

पिकाऊ व बागायती जमीन संपादित करू नये, यासह शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. याउलट आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिस गुन्हे दाखल करीत आहेत. या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी २६ जानेवारी २०१८ रोजी ग्रामसभेत राष्ट्रपतींनी इच्छामरणाची परवानगी द्यावी, असा ठराव मांडून निषेध व्यक्त करणार असल्याचे समितीने सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोडलाही बंदोबस्तात शो

0
0

नाशिकरोडलाही बंदोबस्तात शो

नाशिकरोड : 'पद्मावत' चित्रपटाचा पहिला शो सात वाजता सिनेमॅक्स रेजिमेन्टल प्लाझा येथे झाला. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पहिल्या शोला फारशी गर्दी नव्हती. रोज दोन शो होणार असल्याची माहिती थिएटरचे व्यवस्थापक नीलेश चव्हाण यांनी दिली.

विरोध करणाऱ्यांवर कारवाई

मालेगाव : गेल्या काही दिवसांपासून वादात सापडलेला 'पद्मावत' सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित होत असून या पार्श्वभूमीवर येथील अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी या सिनेमाच्या प्रदर्शनास विरोध करणाऱ्यांवर किंवा कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. सर्वोच्च न्यायलयाने या सिनेमावर बंदी घालता येणार नसल्याचे आदेश दिले असून या आदेशाचे मालेगाव पोलिसांकडून पालन केले जाणारा असल्याचे पत्रकारांना सांगितले. मालेगावच्या सिनेमॅक्स मल्टिप्लेक्ससह मोहन, सुभाष, दीपक या सिनेमागृहांत शुक्रवारी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अरे देवा... आता 'आधार'लाही जीएसटी!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारने आधार कार्ड अनिवार्य केले असून, आता त्यावरही जीएसटी लावण्याचा अजब निर्णय घेतला आहे. याबाबतचे निर्देश जिल्हा प्रशासनाला नुकतेच प्राप्त झाले आहेत. आधार दुरुस्तीसाठी नागरिकांना आता २५ ऐवजी ३० रुपये मोजावे लागणार आहेत.

नागरिकांनी आधार कार्ड बाळगावे हा सरकारचाच आग्रह आहे. त्यामुळे ही सेवा मोफत मिळणे अपेक्षित असताना लोकांच्या खिशात हात घातला जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बँक खाते, विमा कंपन्या, भविष्य निर्वाह निधी कार्यालय, मोबाइल कंपन्यांसह बहुतांश ठिकाणी आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य झाले आहे. बोटांचे ठसे जुळत नसल्याने अनेकांना आपले आधारकार्ड अपडेट करावे लागत आहे. आधार कार्डवर पूर्ण जन्मतारीख, मोबाइल क्रमांक, अचूक नाव, पत्ता आणि सुस्पष्ट फोटो असणे गरजेचे आहे. परंतु, बहुतांश नागरिकांकडे अजूनही अपडेटेड आधार कार्ड नाहीत. आधार दुरुस्तीअभावी नागरिकांची कामे प्रलंबित राहत असून, त्यामुळेच हे काम प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या आवारातील आधार सेंटर्सवर नागरिकांची गर्दी वाढते आहे. अपडेशनसाठी मूल्य निर्धारीत करण्यात आले आहे.

१८ टक्के जीएसटी

या अपडेशनसाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने २५ रुपये एवढे शुल्क निर्धारीत केले आहे. परंतु या शुल्कावरही १८ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना आता आधार दुरुस्तीसाठी चार ते पाच रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. बायोमेट्रिक अद्यावतीकरण, नाव, लिंग, पत्ता, मोबाइल क्रमांक, जन्मतारीख यांसारख्या दुरुस्त्यांसाठी २५ रुपये, आधार क्रमांक शोधून त्याच्या रंगीत प्रिंटसाठी २० तर ब्लॅक अँड व्हाइट प्रिंटसाठी १० रुपये शुल्क आकारण्यात येते. या सर्व सेवांवर १८ टक्के जीएसटी लावण्यात आला असून, त्यामुळे अनुक्रमे ३०, २४ आणि १२ रुपये मोजावे लागणार आहेत.

विविध आधार सेवांचे निर्धारीत शुल्क

सेवा - शुल्क

आधार नोंदणी- नि:शुल्क

५ व १५ वयाच्या मुलांचे बायोमेट्रिक अद्ययावतीकरण- नि:शुल्क

नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता, मोबाइल क्रमांक ई-मेल अद्यावतीकरण- ३० रुपये

आधार क्रमांक शोधणे व त्याची ए ४ रंगीत प्रत- २४ रुपये

आधार क्रमांक शोधणे व त्याची ए ४ ब्लॅक अँड व्हाइट प्रत- १२ रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट मतदारकार्डांना ब्रेक

0
0

ठरणार pravin.bidve@timesgroup.com
Tweet : BidvePravinMT

नाशिक : बदलत्या काळाची पावले ओळखत निवडणूक आयोगही डिजिटल इंडियाच्या मार्गावर आरूढ झाला आहे. कृष्ण धवल कागदी मतदार ओळखपत्रांची जागा आता आकर्षक रंगसंगतीतील इपिक (elector photo identification card) या स्मार्ट कार्डने घेतली असून नाशिककरांनाही ते भावले आहे. यावरील बारकोडमुळे बनावट मतदार ओळखपत्रांना ब्रेक लागणार असून पोलिसही त्याच्या सत्यतेची सहजतेने शहानिशा करू शकणार आहेत. यामुळे मतदारांच्या मतदानाच्या हक्काची जपणूक होणार आहे.

मतदार हा लोकशाहीचा खरा आधारस्तंभ असून त्यामुळेच त्याला राजा म्हटले जाते. मतदानाचा हक्क बजावता यावा आणि मतदाराची ओळखही स्पष्ट व्हावी यासाठी मतदारांना भारत निवडणूक आयोगातर्फे ओळखपत्र दिले जाते. गेली कित्येक वर्ष कृष्णधवल आणि लॅमिनेटेड स्वरुपात नागरिकांना या ओळखपत्रांचे वितरण केले जात होते. परंतु, बदलत्या काळानुसार निवडणूक विभागानेही कात टाकली असून निवडणूक प्रक्रिया अधिक गतीमान करण्यासाठी डिजिटल क्रांतीच्या दिशेने आयोगाची पावले पडू लागली आहेत. जिल्ह्यातील मतदानकेंद्रांचे डिजिटायजेशन अंतिम टप्प्यात आले असून जगभरात कोठेही असणाऱ्या मतदाराला त्याच्या मतदान केंद्र, कक्षासह सर्व तपशील घरबसल्या पहाता येणार आहे. मतदार यादी अद्ययावत आणि परिपूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगाने 'इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर' ही प्रणालीही अलीकडेच देशभर कार्यान्वित केली आहे. यापुढच्या टप्प्यात आता मतदार ओळखपत्रही स्मार्ट बनविण्यात आली आहेत. पूर्वीच्या ओळखपत्रांवर स्टीकररुपात बारकोड होता. परंतु, त्याच्याही डुप्लीकेशनचे प्रकार उघडकीस आल्याने आता स्मार्ट कार्डवर स्मार्ट बारकोडचे प्रिंटींग करण्यात आले आहे. त्याच्या लिंकिंगची प्रक्रिया सध्या सुरू असून हे मतदार ओेळखपत्र खरे की खोटे हे त्याद्वारे तपासता येणार आहे. नव्याने नोंदणी करणाऱ्या प्रत्येक मतदाराला आता इपिक कार्ड दिले जात असून ऑक्टोबरपासून ३५ हजार मतदार कार्डांचे वाटप करण्यात आले आहे. नवीन ३१ हजार कार्डही निवडणूक शाखेला प्राप्त झाली असून त्यांचे वाटपही बीएलओ घरोघरी जाऊन करणार आहेत. विशेष म्हणजे मतदारांचे अर्ज एकगठ्ठा स्कॅन करून ते ऑनलाइन पद्धतीनेच मुंबईत 'अतिशय इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड'कडे पाठविली जातात. तेथे हे स्मार्ट कार्ड प्रिंट करून ते जिल्हा निवडणूक शाखेकडे पाठविले जातात.


अधिकृत पुरावा ठरणार

स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभा निवडणुकीपर्यंत म्हणजेच गल्लीपासून दिल्लीपर्यंत मतदानाद्वारे जनतेचा प्रतिनिधी ठरविताना मतदाराची ओळख आणि वयाचा पुरावा म्हणून हे ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. परंतु, त्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी जन्माचा पुरावा म्हणून हे स्मार्ट ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार नाही, असे या ओळखपत्राच्या मागील बाजूस स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. मतदानासारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण कामासाठी जे ओळखपत्र ग्राह्य धरले जाते ते अन्य ठिकाणी ग्राह्य धरले जाऊ नये ही मतदारांना खटकणारी आणि बुचकळ्यात पाडणारी बाब ठरते आहे.

आयोगाच्या निर्देशांमुळे निवडणूक प्रक्रियेची डिजिटल युगाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. प्रत्येक नवीन मतदाराला स्मार्ट मतदार ओळखपत्र दिले जात असून ते १५ ते २० वर्षे टिकेल, अशा गुणवत्तेचे आहे. त्यासाठी मतदार स्वत:चा सद्यस्थितीतील फोटो आणि निवासाचा पुरावा जोडून आठ नंबरचा अर्ज करू शकतो.
- गणेश राठोड, तहसीलदार, निवडणूक शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महागठबंधनचा काँग्रेसवर प्रहार

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस व त्याचे सहयोगी पक्ष पालिकेच्या आर्थिक स्थितीवरून चिंता व्यक्त करीत असले, तरी शहरातील कित्तेक खुल्या भूखंडांवर काँग्रेसच्या भूमाफियांचा कब्जा आहे. एकीकडे सामान्य नागरिकांकडून पालिका सक्तीने करवसुली करीत असताना काँग्रेस त्यांच्याच भूमाफियांना मात्र पाठीशी घालीत आहे. पालिकेच्या आर्थिक स्थितीचे कारण देत शहरातील शैक्षणिक संस्थांकडून भाडे वसूल करण्याचा काँग्रेसचा निर्णय हा राजकीय वैमनस्यातून घेतला आहे, असा आरोप येथील महागठबंधन आघाडीचे गटनेते बुलंद इक्बाल यांनी केला.

येथील उर्दू मीडिया सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल, मो. मुस्तकीन मो. मुस्तफा यांच्यासह महागठबंधन आघाडीचे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. महापालिकेत २० जानेवारी रोजी झालेल्या महासभेत बुलंद इक्बाल यांच्या चिराग प्री प्रायमरी शाळेच्या भूखंडाच्या भाडेवसुलीच्या मुद्द्यावरून महापौर शेख व बुलंद इक्बाल यांच्यात खडाजंगी झाली होती. या पार्श्वभूमीवर महागठबंधन आघाडीने पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका स्पष्ट केली. सत्ताधारी काँग्रेसच्या निर्णयांवर टीका केली. बुलंद इक्बाल म्हणाले, एकिकडे शहरात पालिकेची थकबाकी असलेल्यांना नोटीस बजावून वसुली केली जात आहे, तर दुसरीकडे पालिकेच्या अनेक भूखंडांवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कब्जा केला आहे. काँग्रेस अशा भूमाफियांना पाठीशी का घालते आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

रविवारी करणार भंडाफोड

काँग्रेस, शिवसेना व एमआयएम यांनी महासभेत मनपाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे कारण देत पालिकेच्या भूखंडांवर असेल्या शैक्षणिक संस्थांवर भाडे वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. चिराग शाळेच्या भूखंडा संबंधी ३० वर्षाचा करार झाला आहे. त्या जागेसाठी कर भरण्याबाबत पालिकेकडून सूचित करण्यात आलेले नाही त्यामुळे काँग्रेस केवळ राजकीय वैमनस्यातून कारवाईची भाषा करीत आहे, असा आरोप बुलंद इक्बाल यांनी केला. तसेच काँग्रेसच्या भूमिकेचा लेखाजोखा मांडण्यासाठी महागठबंधन आघाडीतर्फे २८ जानेवारी रोजी सैलानी चौक येथे सभा घेण्यात येणार आहे. त्यात पालिका मालमत्तेच्या रखवालदार म्हणवणाऱ्यांची माहिती उघड करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सत्ताधाऱ्यांकडून तिजोरीची लूट

माजी आमदार मौलाना मुफ्ती यांनी आयुक्त आणि सत्ताधारी यांच्यातील वादावर टीका केली. धायगुडे यांच्याकडून पारदर्शक कारभाराचा आग्रह असून सत्ताधारी मात्र त्यांच्या बदली किंवा अविश्वासासाठी राजकीय खेळीत आहेत. काँग्रेसचा शहर विकासाचा नारा खोटा असून केवळ शहराची तिजोरी लुटण्याचे काम ते करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला'

'त्या' विकासकावर मेहरबानी का?

बुलंद इक्बाल यांनी शहरातील इस्लामपुरा भागातील पालिकेच्या भूखंडावर बीओटी तत्त्वावर बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलाच्या विकासकाकडून मनपा थकबाकी का वसूल करीत नाही असा मुद्दा उपस्थित केला. पालिकेच्या मालकीच्या जागी सन २०१३ मध्ये एम. एम. खान या विकासकाने व्यापारी संकुल उभारले. करारानुसार मनपास १८ महिन्याच्या आत २ कोटी ३५ लाख रुपये अदा करणे अपेक्षित होते. मात्र त्या विकासकाकडे अद्याप १ कोटी ८३ लाख ५० हजार रुपये गेल्या तीन वर्षांपासून थकीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिल्लीसह सात शहरांसाठी सेवा

0
0

उडानच्या दुसऱ्या टप्प्यात घोषणा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत दुसऱ्या टप्प्यामध्ये नाशिक हे अहमदाबाद, दिल्ली, हैदराबाद, गोवा, बेंगळुरू, भोपाळ आणि हिंदण (गाझियाबाद) या शहरांसाठी कनेक्ट होणार आहे. तशी घोषणा केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री अशोक गणपती राजू यांनी नवी दिल्लीत केली आहे. या टप्प्यात नाशिकहून विमानसेवा सुरू करण्यासाठी स्पाइसजेट, इंडिगो, ट्रुजेट, जेट एअरवेज आणि एअर अलायन्स या कंपन्या इच्छुक आहेत. यामुळे नाशिक देशातील महत्त्वाच्या शहरांशी दळणवळण वाढणार असून, त्याचा फायदा उद्योग-व्यवसायाला होणार आहे.

उडान योजनेच्या पहिल्या टप्प्यात एअर डेक्कन या कंपनीच्या माध्यमातून ओझरहून मुंबई आणि पुणे या शहरांसाठी विमानसेवा गेल्या महिन्यात सुरू झाली आहे. या योजनेचा पहिला टप्पा हा राज्यांतर्गत सेवा सुरू करण्यासाठी होता. दुसऱ्या टप्प्यात परराज्यातील महत्त्वाच्या शहरांना जोडण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील सोडतीचा निकाल केंद्रीय मंत्री राजू यांनी जाहीर केला. त्यानुसार महाराष्ट्रातील चार शहरांना दुसऱ्या टप्प्यात लाभ मिळणार आहे. त्यात नाशिक, सोलापूर, जळगाव आणि कोल्हापूर यांचा समावेश आहे. नाशिकमधील ओझर विमानतळाच्या ठिकाणाहून अहमदाबाद, दिल्ली, हैदराबाद, बेंगळुरू, गोवा, भोपाळ आणि हिंदण (गाझियाबाद) या शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू होणार आहे. जळगावहून अहमदाबाद, कोल्हापूरहून हैदराबाद, तिरुपती आणि बेंगळुरू, सोलापूरहून बेंगळुरू आणि हैदराबाद या शहरांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील नाशिक-मुंबई-नाशिक आणि नाशिक-पुणे-नाशिक या सेवेला नाशिककरांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. आता दुसऱ्या टप्प्यात स्पाइसजेट, इंडिगो, ट्रुजेट, जेट एअरवेज आणि एअर अलायन्स या कंपन्या नाशिकहून सेवा देण्यासाठी इच्छुक आहेत. या सात शहरांपैकी किमान एका शहरासाठी नाशिकहून पुढील महिन्यात सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे.

आता दुसऱ्या टप्प्यात देशातील महत्त्वाच्या शहरांसाठी सेवा सुरू होणार असल्याने त्याचा फायदा येथील उद्योग आणि व्यवसायांना होणार आहे. या सात शहरांसाठी सेवा सुरू होणार असल्याने त्याचे नाशिकमधील विविध संघटनांनी स्वागत केले आहे.

गोडसेंनी केला पाठपुरावा

पहिल्या टप्प्याची घोषणा झाल्यानंतर या योजनेतून नाशिकचे नाव वगळण्यात आले होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी हवाई वाहतकूक मंत्रालयाकडे पाठपुरावा केला आणि चूक निदर्शनास आणली. त्यामुळे पुन्हा नाशिकचे नाव या योजनेत दुसऱ्या टप्प्यासाठी समाविष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समस्यांचा पाढा कायम

0
0

सातपूर प्रभाग बैठकीत अस्वच्छता, असमतोल पाणी पुरवठ्याचे विषय गाजले

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेच्या सातपूर प्रभागाची सभा बुधवारी (दि. २४) सभापती माधूरी बोलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत विविध विषयांना मंजुरी दिल्यानंतर सदस्यांनी समस्यांचा पाढा कायम ठेवला. विशेष म्हणजे, स्वच्छ सर्वेक्षण सुरू असताना अस्वच्छतेचा आरोपातच प्रभाग बैठक रंगली.

सातपूर प्रभाग सभेत उपस्थित सर्वच सदस्यांनी प्रभागात स्वच्छता केली जात नसल्याचा आरोप केला. तसेच अनियमित येणाऱ्या घंटागाडीच्या तक्रारीही सदस्यांनी केला. प्रभागात असमतोल पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांचे रोजच बोलणे नगरसेवकांना ऐकावे लागत असल्याचा आरोप नगरसेविका हेमलता कांडेकर यांनी केला. नाशिक शहराचा स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या दहामध्ये नंबर यावा याहेतूने स्वच्छता मोहीम जोमाने सुरू आहे. परंतु, सातपूरच्या प्रभाग सभागृहात झालेल्या बैठकीत ही स्वच्छता मोहीम केवळ दिखाव्या पुरतीच असल्याचा आरोप करण्यात आला.

गटनेते विलास शिंदे यांनी केवळ मुख्य रस्त्यांची स्वच्छता करत स्वच्छ नाशिक दाखविले जाते का, असा प्रश्न उपस्थित केला. गेल्या तीन महिन्यांपासून लहान घंटागाडी प्रभागात पाहिजे अशी मागणी केली. परंतु, याकडे आरोग्य विभाग दुर्लक्षच करत असल्याचे शिंदे म्हणाले. त्यातच अंतर्गत रस्त्यांवर साचलेला घाण, कचरा नगरसेवकांनी सांगितल्यावर उचलणार का, अधिकारी त्यांच्या जबाबदारीचे काम करत नसतील तर त्यांच्या तत्काळ बदल्या कराव्या, अशी मागणी सर्व नगरसेवकांच्याकडून गटनेते शिंदे यांनी सभापतींकडे केली. प्रभाग क्रमांक ११ च्या नगरसेविका सीमा निगळ यांनीदेखील स्वच्छ सर्वेक्षणात सातपूरकरांच्या आरोग्य बिघडले असल्याचा आरोप केला. मुख्य रस्त्यांवर अनेक ठिकाणी असलेल्या ब्लॅक स्पॉटवर रोजच कचऱ्याचे ढिग पडलेले असतात. याकडे आरोग्य विभाग केवळ डोळेझाक करत आपले काम टाळत असल्याचे निगळ म्हणाल्या. जाधव टाऊनशिपला पिण्याचे पाणीच रहिवाशांना मिळत नसल्याने टँकरने पाणीपुरवठा केला जातो. परंतु, तोही वेळेवर दिला जात नसल्याने महिलांच्या रोषाला नगरसेवकांनाच तोंड द्यावे लागत असल्याचे नगरसेविका हर्षदा गायकर म्हणाल्या. सदस्यांच्या समस्या तात्काळ मार्गी लावाव्यात अशी सुचना सभापती बोलकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. याप्रसंगी प्रभारी विभागीय अधिकारी सुनीता कुमावत, आरोग्य उपसभापती योगेश शेवरे, रवींद्र धिवरे, भागवत आरोटे, संतोष गायकवाड, नगरसेविका डॉ. वर्षां भालेराव, अलका आहिरे, नयना गांगुर्डे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

नंदिनीची स्वच्छता कोण करणार?

महापालिकेने नदी स्वच्छता करण्यासाठी मोठे अभियान उभे केले होते. नुकतेच बदलून गेलेले विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांनी गोदावरी व नंदिनी नदीत स्वच्छता मोहीम राबवत घाण, कचरा नदीत टाकू नये असे आवाहनही केले होते. सातपूर भागातून जाणाऱ्या नंदिनीत घाण, कचरा पडला असताना त्याची स्वच्छता कोण करणार, असा सवाल नगरसेविका दीक्षा लोंढे यांनी उपस्थित केला. महापालिकेने नंदिनीच्या स्वच्छतेबाबत गांर्भियाने घ्यावे अन्यथा जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन छेडण्याचा इशारा दीक्षा लोंढे यांनी दिला.

पुढील सभेला येण्यास नकार

प्रभाग बैठकीत सदस्यांनी मांडलेल्या समस्या सुटत नसल्याने सर्वच नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. या वेळी प्रभाग क्रमांक ८ चे नगरसेवक संतोष गायकवाड यांनी पुढील सभेला अधिकाऱ्यांकडून समस्या सोडवल्या गेल्या नाही, तर बैठकीला येणार नसल्याचे सांगितले. दिलेल्या समस्यांची पुर्तता अधिकारयांनी केली नाही तर चारही नगरसेवक पुढील बैठकीला गैरहजर राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकचे तापमान ८.८ अंशांवर

0
0

राज्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या काही दिवसांपासून काहीसा गायब झालेला थंडीचा कडाका शहरवासीयांना पुन्हा जाणवू लागला आहे. गेल्या चार दिवसांमध्ये तापमानात तीन अंशांनी घट झाली असून, २० जानेवारी रोजी ११.२ अंश सेल्सिअसवर असलेले तापमान बुधवारी ८.८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. राज्यातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद नाशिकमध्ये झाली. तसेच कमाल तापमानातही घट झाली आहे.

नाशिक यंदा अनेकदा राज्यातील सर्वात कमी तापमानाचे शहर ठरले आहे. मागील आठवड्यात थंडी कमी झाल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला होता. दुपारी कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाळ्याप्रमाणे ऊन पडत असल्याच्या चर्चा शहरात रंगत होत्या. मात्र, थंडी पुन्हा परतली असून, ठिकठिकाणी शेकोट्या पेटत आहेत. बुधवारी तापमान तब्बल चार अंशांनी घटले. यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरली होती. संपूर्ण राज्यात सध्या कोरडे हवामान असून, येत्या काही कालावधीपर्यंत थंडीचे प्रमाण असेच राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत आहे.

गेल्या पाच दिवसांचे तापमान

दिनांक किमान कमाल

२४ जानेवारी ८.८ २९.८

२३ जानेवारी १२.६ २९.९

२२ जानेवारी १०.८ ३०.३

२१ जानेवारी १०.८ २८.०

२० जानेवारी ११.२ २८.०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळांसाठी लढा उभारणार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व आमदार छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या कथित अन्यायाच्या निषेधार्थ माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या निवासस्थानी बुधवारी बैठक झाली. यात न्यायालयीन लढाईसोबतच लोकशाही मार्गाने सुरू असलेला लढा अधिक तीव्र करण्याचा सूर समर्थकांच्या चर्चेत निघाला.

बैठकीला माजी खासदार पिंगळे यांच्यासह माजी उपमहापौर गुरुमित बग्गा, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, गोकुळ पिंगळे, अॅड. संदीप गुळवे, जि. प. सदस्य हिरामण खोसकर, डॉ. सयाजीराव गायकवाड, मधुकरराव जेजुरकर, वसंतराव मुळाणे, बहीरू मुळाणे, भारत कानडे, ज्ञानेश्वर निकम, अनिल काकड, शहादराव धोंडगे, शंकरराव वायचळे, किरण काकड, रामदास पिंगळे, बाळासाहेब पाटील, ज्ञानेश्वर वाघ, हिरामण ढेरिंगे, सोमनाथ ढेरिंगे, भास्करराव उगले, योगेश कमोद, भालचंद्र भुजबळ, सुनील सूर्यवंशी, संदीप सोनवणे, समाधान जेजुरकर, चेतन बागूल, विजय पगार आदी उपस्थित होते.

भुजबळांवर अन्याय होत असल्याच्या भावना उपस्थितांनी बैठकीत व्यक्त केल्या. गुरुमित बग्गा म्हणाले, की देशाच्या इतिहासात आजवर विरोधी पक्षातील नेत्यांवर कधीही इतक्या सूडबुद्धीने कारवाई झालेली नाही. सध्या लोकसंघटन करणाऱ्या व अन्यायाला वाचा फोडणाऱ्या नेत्यांना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्रात भुजबळ यांच्यासारख्या बहुजन व विकासाची दृष्टी असलेल्या नेत्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. सरकारी यंत्रणेकडे कुठलेही ठोस पुरावे नसतानाही भुजबळांना सरकारकडून तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न केला जात आहे.

देशातील गैरकारभाराविरोधात जो नेता आवाज उठवेल त्याला कुठल्यातरी मार्गाने अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही लोकशाही व्यवस्थेला काळिमा फासणारी बाब आहे. तरीही या सर्व प्रकरणातून भुजबळ तावून सुलाखून निर्दोष म्हणून बाहेर येतील, अशी आशा समर्थकांनी व्यक्त केली. भुजबळांवर होणाऱ्या अन्यायावर पत्रके वाटण्यात यावी असेही मत उपस्थितांनी मांडले. कायदेशीर लढाई अधिक तीव्र करत सामान्य जनतेच्या न्यायालयात जाण्याचा सूर यावेळी निघाला.

ग्रामीण भागात चाय पे चर्चा

भुजबळ समर्थकांनी शुक्रवारी (दि. २६) राज्यभरातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत अन्याय विरोधात ठराव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वातावरण निर्मितीसाठी 'चाय पे चर्चा' सुरू केली आहे. त्यात भुजबळांवर कशा पद्धतीने अन्याय करण्यात आला, याची माहिती दिली जात आहे. त्यानंतर ठराव करण्याबाबत आवाहन केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलसमाधी आंदोलन रोख

0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

'पद्मावत'विरोधात राजपूत संघटनांच्या वतीने गंगापूर धरणावर जलसमाधी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता. परंतु, प्रशासनाच्या चोख बंदोबस्तामुळे गंगापूर धरणावरील जलसमाधी आंदोलन हाणून पाडले. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत तालुका पोलिस स्टेशनला हजर केले. 'पद्मावत' चित्रपटावर बंदी आणावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे महासचिव आनंदसिंग ठोके यांनी दिला आहे. आंदोलनात शेकडो राजपूत कार्यकर्त्यांसह महिलाही सहभागी झाल्या होत्या.

गंगापूर धरणावर दुपारी एक वाजता राजपूत समाजातील बांधव आंदोलन करण्यासाठी एकत्र जमत धरणाच्या प्रवेशद्वारावर पोहचले. यावेळी जिल्हा प्रशासन व पोलिसांनी धरण परिसरात जाण्यास मज्जाव केला. आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केल्याने पोलिसांनी अखेर तीन महिला व ३५ आंदोलकांना ताब्यात घेत पोलिस वाहनातून तालुका पोलिस स्टेशनला हजर केले. आंदोलनात राष्ट्रीय राजपूत करणी सेना, क्रांतिदल, आखिल भारतीय महाराणा प्रताप क्रांतिदल, महाराणा प्रताप युवा सेना, महाराणा प्रताप राजपूत महासंघ, युवा मंच यांसह संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. याप्रसंगी राजपूत संघटनेचे संतोष पवार, जितेंद्र सूर्यवंशी, लखन पवार, करणसिंग देवरे, गोकुळ पवार, वंदना राजपूत, सुरेखा राजपूत यांसह कार्यकर्ते हजर होते. आंदोलनात राजपूत संघटनेचे पदाधिकारी व पोलिसांमध्ये किरकोळ वादही झाला. यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना शांत करत कायदा हातात घेऊ नका असा सल्ला देत ताब्यात घेतले.

पहाटेपासूनच फौजफाटा

राजपूत संघटनेने जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिल्यावर महसूल, जलसिंचन विभाग व पोलिसांचा फौज फाटा पहाटेपासूनच गंगापूर धरणाच्या प्रवेशद्वारावर तैनात करण्यात आला होता. सकाळी दहा वाजेलाच दहा पोलिस अधिकाऱ्यांसह ६० पोलिस कर्मचारी आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी हजर होते. बंदोबस्तात ग्रामिणचे पोलिस उपअधीक्षक एस. एस. दळवी, तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, नाशिक तहसीलदार राजश्री अहिरराव, जलसिंचन विभागाचे रमेश मिसाळ, अनिल वाघ यांसह अधिकारी व कर्मचारी गंगापूर धरण परिसरात हजर होते. गंगापूर धरणाचे मुख्य प्रवेशद्वार तसेच दुसऱ्या बाजूच्या गेटवरही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

प्रजासत्ताक दिनावर बहिष्कार

'पद्मावत' चित्रपट प्रदर्शित केल्यास प्रजासत्ताक दिनावर बहिष्कार टाकण्याचा इशारा करणी सेनेचे ठोके यांनी दिला. राणी पद्मावतीची नाहक बदनामी चित्रपटातून होणार असल्यानेच राजपूत समाजाचा विरोध असल्याचेही ठोके यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजेट वास्तवदर्शी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या वर्षात प्रशासनाच्या बजेटमध्ये तब्बल आठशे कोटींचा फुगवटा केला असला तरी, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे स्थायी समिती जमिनीवर आली आहे. महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्पीय बजेट वास्तवदर्शी असेल, अशी माहिती स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी दिली. प्रशासनाच्या बजेटमध्ये फारशी वाढ केली जाणार नसल्याचे सांगत मुकणे धरण थेट पाइपलाइन योजनेच्या धर्तीवर पंचवटीकरांसाठी काश्यपी धरणातून थेट पाइपलाइन योजना राबविण्यासाठी या बजेटमध्ये तरतूद केली जाईल, अशी माहिती शिवाजी गांगुर्डे यांनी दिली.

महापालिकेचे प्रारूप अर्थसंकल्पीय बजेट फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केले जाणार आहे. या बजेटमधील प्रस्तावित जमा व खर्च बाजूच्या आकड्यांची जुळवाजुळव सध्या प्रशासनामार्फत सुरू आहे. ३१ जानेवारीपूर्वी प्रारूप अर्थसंकल्पीय बजेट सादर करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या होत्या. परंतु, सुधारीत बजेट तयार करण्यात झालेला विलंब आणि नवीन बजेटमध्ये खातेप्रमुखांच्या योजनानिहाय निधी मागणीची नोंदणी करण्याची मुदत आयुक्तांनी ३१ जानेवारीपर्यंत दिल्याने बजेटचा कार्यक्रम पुन्हा लांबला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हे बजेट आता सादर होणार आहे. त्यानंतर स्थायी समिती आठवडाभरात महासभेला ते सादर करणार असल्याचे सभापती गांगुर्डे यांनी सांगीतले.

नगरसेवकांना ५० लाख

चालू आर्थिक वर्षात नगरसेवक निधीसाठी स्थायी समितीने प्रत्येकी ५० लाखांची तरतूद केली होती. त्यात महासभेने वाढ सुचवित प्रत्येकी ७५ लाखांचा विकासनिधी नगरसेवकांना उपलब्ध करून दिला. आगामी आर्थिक वर्षातील महापालिकेवरील दायित्वे लक्षात घेता आगामी वर्षात नगरसेवकांसाठी प्रत्येकी ५० लाखांच्या निधीचीच तरतूद होणार आहे. रस्तेविकास योजनेमुळे नगरसेवकांना मोठा निधी मिळाला आहे. त्यामुळे वाढ होण्याची शक्यता कमीच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्डेमय रस्त्याच्या विरोधात आंदोलन

0
0

खड्डेमय रस्त्याच्या विरोधात आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसकडून रास्ता रोको

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

नाशिक शहराला लागून असलेल्या आनंदवल्ली, चांदशी मार्ग आणि मुंगसरा रस्त्याला मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांचा शेतकऱ्यांसह व्यापारी व शाळेत जाणाऱ्यांना त्रास होत असून त्यांना खडतर प्रवास करून जावे लागते. यासाठी खड्डेमय झालेल्या रस्त्याच्या विरोधात बुधवारी (दि. २४) राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रास्ता रोको करण्यात आला.

चांदशी गावातील मुख्य रस्त्यावर बुधवारी, सकाळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डिसेंबरच्या अगोदरच महाराष्ट्रातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करू असे सांगितले होते. परंतु, शहराला लागून असलेल्या चांदशी, मुंगसरा रोडचे खड्डे कधी बुजवाणार, असा सवाल अॅड. रवींद्र पगार यांनी बोलताना उपस्थित केला.

आनंदवल्ली ते चांदशी रस्त्यावर मोठ्या चार शाळा आहेत. येथील शाळेतील वाहनचालकांना रोजच खडतर प्रवास चांदशी रस्त्यावरून करावा लागतो. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी विष्णूपंत म्हैसधुणे यांनी केली. आंदोलनात हिरामण खोसकर, यशवंत ढिकले, रत्नाकर चुंबळे, दौलत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एचपीटीत मुलाखत तंत्र कार्यशाळा

0
0

एचपीटीत मुलाखत तंत्र कार्यशाळा सोमवारी

कॉलेज क्लब रिपोर्टर, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी विकास मंडळ आणि एचपीटी आर्टस अँड आरवायके सायन्स कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने 'मुलाखत तंत्र' या कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

कॉलेजचा पत्रकारिता व विद्यार्थी विकासमंडळ विभाग यांच्यातर्फे या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. दि. २९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेंतर्गत विद्यार्थ्यांना मुलाखतीचे विविध पैलू समजावून सांगत मुलाखतीच्या खास तंत्रांची माहिती देण्यात येणार आहे. कार्यशाळेत माध्यमतज्ज्ञ संजीव लाटकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी पत्रकारिता विभागात नावनोंदणी करण्याचे आवाहन कॉलेजने केले आहे. प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विजयकुमार वावळे, पत्रकारिता विभागप्रमुख डॉ. वृन्दा भार्गवे, विद्यापीठ प्रतिनिधी या कार्यशाळेचे संयोजन करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाकळीत रथसप्तमी उत्सव साजरा

0
0

टाकळीत रथसप्तमी उत्सव साजरा

समर्थांच्या पादुका व कुबडीचे पूजन

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

समर्थ रामदासांनी सन १६२० रथसप्तमीच्या दिवशी श्री रामदास स्वामी यांनी येथील गोदा-नंदिनीच्या संगमात कमरेपर्यंत पाण्यात उभे राहून 'श्रीराम जय राम, जय जय राम' या तेराक्षरी मंत्राने पूरश्चरणास प्रारंभ केला. या स्मरणार्थ येथील ट्रस्टच्या वतीने काल रथसप्तमी उत्सव साजरा करण्यात आला.

'जगी धन्य ही टाकळी पुण्य भूमी,अनुष्ठान केले असे रामनामी। असंख्यात सामर्थ्य गोमय मारुतीचे, गोदा तटी हे स्थान जागृतीचे॥' असा महिमा असलेल्या येथील आगर टाकळी मठात असलेल्या समर्थांच्या तत्कालीन पादुका व कुबडी यांची बुधवारी (दि. २४) सकाळी वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. मारुती देवस्थान आणि राष्ट्रसंत रामदास स्वामी मठ ट्रस्टचे व्यवस्थापक दत्तात्रय जुन्नरे यांच्या हस्ते पादुका व कुबडी गोदावरी-नंदिनी नेण्यात आल्या. तेथे परंपरेप्रमाणे विधिवत कुबडी व पादुकांना जलाभिषेक करण्यात आला. या वेळी १०८ वेळा रामनाम जपासह गायत्री मंत्राचे पठण करण्यात आले. त्यानंतर आरती होऊन पहिला नैवेद्य पाण्यातील माशांना देण्यात आला. पुढे पहिल्या गोमय हनुमानाची आरती करण्यात येऊन उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास सुधीर शिरवाडकर, ज्योतिराव खैरनार, डॉ. अरविंद चौधरी, चंद्रकांत कुलकर्णी, गोविंद जोशी, रत्नाकर अणेकर, सुरेश कुलकर्णी, रवींद्र नवसे यांसह गावकरी व समर्थभक्त उपस्थित होते. दिवसभर समर्थांच्या महान कार्याला उजाळा देण्यासाठी शेकडो समर्थभक्तांनी मंदिरात हजेरी लावत समर्थांच्या तपश्चर्या करण्याच्या गुहेस भेट देत गोमय मारुतीचे दर्शन घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाट्य परिषद निवडणूक बिनविरोध

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या नियामक मंडळाच्या २०१८ ते २०२३ या पाच वर्षांच्या निवडणुकीसाठी नाशिक शाखेकडून सुरेश गायधनी, सचिन शिंदे, सुनील ढगे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

या तीन जागांसाठी आठ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी दत्ता पाटील, नाशिक शाखेचे अध्यक्ष रवींद्र कदम, राजेंद्र जाधव, प्रफुल्ल दीक्षित व गिरीश गर्गे या पाच जणांनी स्वेच्छेने माघारी अर्ज दिल्याने हे तीन उमेदवार सर्वसंमतीने बिनविरोध निश्चित करण्यत आले. उर्वरित पाच जणांनी यांना बिनविरोध पाठींबा दिला. नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेवर भार नको म्हणून नाशिकची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सुरुवातीपासून येथील पदाधिकारी प्रयत्नशील होते; मात्र काही रंगकर्मींनी अर्ज भरल्याने आणि निवडणूक लढण्याचा दावा केल्याने त्यांचा नाईलाज झाला होता. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अर्ज भरलेल्या उमेदवारांची एक बैठक झाली. या बैठकीत निवडणुकीवर तोडगा निघाला\ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नाशिकमध्ये बिनविरोध झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूर्यनमस्काराने आरोग्यप्राप्तीसह दारिद्र्य नष्ट होत

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

योगासनांमध्ये सूर्यनमस्काराला सर्वश्रेष्ठ आसन मानले जाते. यामध्ये विविध आसनांचा समावेश असून ते आरोग्याला हितकारक आहे. यामुळे शरीर निरोगी राहते. मान्यतेनुसार दारिद्र्य नष्ट करण्याचीही शक्ती सूर्यनमस्कारामध्ये असल्याचे प्रतिपादन येथील डॉ. सुभाष गुजर शाळेचे मुख्याध्यापक बन्सीलाल गाडीलोहार यांनी केले. येथील देवळाली फेस्टिवलअंतर्गत जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधत सूर्यनमस्कार स्पर्धा शालेय स्तरावर घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यामध्ये येथील डॉ. सुभाष गुजर हायस्कूल, दर्शन अॅकेडमी, नूतन विद्यामंदिर, देवळाली हायस्कूल इंग्लिश प्रेप स्कूल, अमित पंड्या विद्यालय यांनी सहभाग नोंदविला. यावेळी आयोजक जीवन गायकवाड, संजय गीते यांसह शाळांचे क्रीडा शिक्षक यांनी सूर्यनमस्कार करवून घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायी सभापतिपदी अनिता करंजकर

0
0


म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

भगूर नगरपालिकेच्या विविध सहा विषय समित्यांची निवड करण्यात आली. त्यात स्थायी समितीच्या सभापतिपदी नगराध्यक्षा अनिता करंजकर, उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापतीपदी मनीषा कस्तुरे, बांधकाम सभापतिपदी उत्तम आहेर, आरोग्य सभापतिपदी संगीता पिंपळे, पाणीपुरवठा सभापतिपती रघुनाथ साळवे तर महिला व बालकल्याण सभापतिपदी अनिता ढगे यांची निवड करण्यात आली.

भगूर नगरपालिकेच्या सभागृहात पीठासन अधिकारी तथा तहसीलदार राजश्री अहिरराव यांच्या अध्यक्षतेखाली विषय समितीच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व नगरसेवक उपस्थित होते. सहाय्यक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी संगीता नांदूरकर व मुख्य लिपिक रमेश राठोड यांनी काम पाहिले.

विषय समित्या सदस्य

सार्वजनिक बांधकाम : संजय शिंदे, अश्विनी साळवे, जयश्री देशमुख, विजय करंजकर.

शिक्षण : प्रतीभा घुमरे, स्वाती झुटे, सुधेश वालझाडे, पंकज कलंत्री.

आरोग्य : मोहन करंजकर,दीपक बलकवडे,फरीद शेख,शकुंतला कुंडारिया.

पाणी पुरवठा : दीपक बलकवडे, भाऊसाहेब गायकवाड, सुदेश वालझाडे, विजय करंजकर.

महिला व बाल कल्याण : जयश्री देशमुख, स्वाती झुटे, अश्विनी साळवे, पंकज कलंत्री.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणवत्ता विकास साधण्यासाठी शिक्षणाची वारी

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

शिक्षकांना विविध आधुनिक पद्धतीने विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिकविता येऊ शकते, या उद्देशाने शिक्षण क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती शिक्षकांना होण्यासाठी नाशिकमध्ये २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत शिक्षणाची वारी आयोजित करण्यात आल्याची माहिती शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव व प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे उपसंचालक रवींद्र जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मागील तीन वर्षांपासून राज्यात शिक्षणाची वारी हा उपक्रम राबविला जात आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून ही वारी सुरु करण्यात आली असून यात गणित व भाषा वाचन विकास, तंत्रज्ञानाचा अध्यापनात प्रभावी वापर, पाठ्यपुस्तकांची बदलती भूमिका यांसारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. लातूर, अमरावती, रत्नागिरी व नाशिक या ठिकाणी ही वारी करण्याचे निश्चित करण्यात आले असून, यातील लातूर, अमरावती व रत्नागिरी याठिकाणी यापूर्वीच ही वारी पूर्ण झाली आहे. आता नाशिकमधील महिरावणी येथील संदीप फाउंडेशनच्या आवरात २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी या काळात ही वारी होणार आहे. यात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेले शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे असे ५४ स्टॉल उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या वारीला संपूर्ण राज्यातून सुमारे तीन हजार शिक्षक उपस्थित राहणार असल्याचे रामचंद्र जाधव यांनी सांगितले. यात सहभागी स्टॉल हे सर्वच ठिकाणी सारखे असून, राज्यपातळीवर या स्टॉलची निवड झाल्याचे त्यांनी सांगितले. या वारीला भेटी देण्यासाठी दररोज विशिष्ट जिल्ह्यांतील प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षक येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिकचा एकही स्टॉल नाही

ही या वर्षातील अखेरीची वारी आहे. या वारीत सहभागी करण्यात आलेले ५४ स्टॉल्स म्हणजे विविध प्रकल्पांची निवड करण्यात आली असली, तरी त्यात नाशिक शहर किंवा जिल्ह्यातील एकही स्टॉल नसल्याचे सांगण्यात आले. नाशिक शहर व जिल्ह्यातही अनेक विविध नवनवीन प्रकल्प झालेले असून, त्यांचा यात सहभाग नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिव्यांगाना घरपट्टीत सवलत

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिव्यांगासाठी राखीव असलेल्या तीन टक्के निधी खर्चावरून आमदार बच्चू कडूंच्या राड्याला सहा महिने पूर्ण झाले असून, या सहा महिन्यात हे 'कडू औषध' चांगलेच गुणकारी ठरले आहे. महापालिकेने दिव्यांगासाठीच्या योजनांना गती देत, २० कोटींचा आराखडा तयार केला आहे. युद्धपातळीवर त्यांची अंमलबजावणी सुरू केली आहे. दिव्यांगासाठीचा शाळेचा प्रस्ताव पाइपलाइनमध्ये असून ऑडीओ लायब्ररीचा प्रस्तावही अंतिम टप्प्यांत आहे. पेन्शन देण्याचा प्रस्ताव येत्या महासभेवर ठेवला जाणार आहे. पाठोपाठ आता शहरातील दिव्यांग व्यक्तींच्या नावावर घर असल्यास त्याला घरपटट्टीत सवलत देण्याचा विचारही महापालिकेत सुरू आहे. यासाठी राज्य सरकडून मार्गदर्शन मागविले जाणार आहे.

गेल्या वर्षी २४ जुलै रोजी महापालिकेत दिव्यांगासाठीचा तीन टक्के राखीव निधी खर्चावरून आमदार बच्चू कडू आणि आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यात राडा झाला होता. निधी खर्चावरून कडू यांनी थेट आयुक्तांवरच हात उगारला होता. त्यामुळे दिव्यांगाच्या निधी खर्चाला महापालिकेने गेल्या सहा महिन्यांत गती दिली आहे.

दिव्यांगांसाठी मदतीचा हात

शहरातील दिव्यांगाचे सर्वेक्षण

सात हजार दिव्यांगांची नोंद

पालिकेने दिव्यांगासाठी २० कोटींचा आराखडा

विविध सोयी सुविधा देण्यासाठी प्रयत्न सुरू

स्वतंत्र शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर

शहरात ३३ ठिकाणी ऑडीओ लायब्ररी सुरू करणार

मुख्यालयासह विभागीय कार्यालयांमध्ये व्हिलचेअर

दिव्यांग व्यक्तींना घरपट्टीत सवलत देण्याचा विचार

पेन्शनसाठी १८०० अर्ज

महापालिकेने दिव्यांगांना थेट आर्थिक लाभ देण्यासाठी नगरच्या धर्तीवर पेन्शन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रस्ताव येत्या महासभेत ठेवला जाणार आहे. महासभेच्या मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. पूर्वतयारी सध्या सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून अर्जाची छाननी तसेच बँकेचा तपशील दिव्यांगांकडून गोळा केला जात आहे. त्यासाठी पालिकेत कक्ष सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत १८०० व्यक्तींनी पेन्शनसाठी अर्ज दाखल केले आहेत. अजून तीन ते चार दिवस नोंदणीचे काम सुरू राहणार आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images