Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

लग्नाला विरोध : तरुणीची आत्महत्या

0
0
लग्नासाठी घरातून विरोध झाल्याने प्रेमीयुगुलाने मध्यरात्री आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रयत्नात तरूणीचा मृत्यू झाला असून तरूण अत्यवस्थ आहे. जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील निवृत्ती अरूण चौधरी (२२) याचे त्याच्याच समाजातील १७ वर्षीय तरूणीवर प्रेम होते.

चंदन तस्कर पोलिसांच्या ‌ताब्यात

0
0
कळवण तालुक्यातील पाळे खुर्द येथे चंदनाचे झाड तोडून तस्करी करणाऱ्याला उसतोड करणाऱ्या मजुरांनी पकडले तर एक जण फरार झाला.

खड्ड्यांनी घेतला एकाचा बळी

0
0
आडगाव शिवारातील खड्ड्यांत आदळून म्हसरूळ येथील वाहनचालक विष्णू शंकर गबाले (५२) यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावठाण परिसराकडे झालेले महापालिकेचे दूर्लक्ष व तेथील रस्त्यांची दूरवस्था पुढे आली आहे.

सिंहस्थासाठी १२०० कोटींची तरतूद

0
0
नाशिकमध्ये २०१५-१६ मध्ये भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आगामी आर्थिक वर्षात १ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद होण्याचे संकेत आहेत. तशी तरतूद झालीच तर त्यातील ९०० कोटी नाशिक शहरासाठी, तर ३०० कोटी त्र्यंबकेश्वर विकासासाठी असतील.

सहकार विभागाची नोटीस चुकीची

0
0
आनंद शेतकरी विविध कार्यकारी सहकारी संस्था नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे थकबाकीदार नसतानाही सहकार विभागाने जिल्हा बँकेचे संचालक पद रद्द करण्याची नोटीस बजाविली, असा दावा माजी खासदार देविदास पिंगळे यांनी केला आहे.

अधिका-यांची मालमत्ता गुलदस्त्यात

0
0
वाढत्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर मंत्री आणि सनदी अधिका‍-यांच्या मालमत्तेविषयी ना‌गरिकांना विशेष उत्सुकता असते. म्हणून केंद्र सरकारने भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) अधिका-यांनाही मालमत्तेचा तपशील सादर करणे बंधनकारक केले आहे.

बारा बलुतेदरांना राजकारणात न्याय

0
0
राजकीय स्तरावर बारा बलुतेदार घटकांना राजकारणात समानतेच्या स्तरावर न्याय मिळावा, यासाठी अर्थिक विकास महामंडळ सरकारने जाहीर करावे, याकरीता उत्तर महाराष्ट्रातील नाशिक विभागीय अधिवेशनात समाजाचे संघटन करावे, असे प्रतिपादन बारा बलुतेदार संघाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत गवळी यांनी केले.

पालिका गहाण ठेवण्याचा घाट

0
0
महापालिकेला कर्जाच्या खायीत लोटण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून स्थायी समितीच्या येत्या सभेत विविध वित्तीय संस्थांकडून व्याज दर मागवून कर्ज उभारणीच्या तत्त्वास मंजुरी मिळण्याचा प्रस्ताव मुख्यलेखाधिका-यांनी सादर केला आहे.

राज्यातील दोनच अधिकारी प्रामाणिक

0
0
वाढत्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्यांना मालमत्तेचा तपशील सादर करणे बंधनकारक केले आहे. महाराष्ट्रातील २८२ पैकी फक्त अंशु सिन्हा व डॉ. निपुण विनायक या दोनच अधिकाऱ्यांनी मालमत्तेचा तपशील सादर केला आहे.

पुतळा दहनाने खोळंबली वाहतूक

0
0
जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर सतत आरोप करत असलेल्या भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांच्या निषेधार्थ त्यांच्या पुतळ्याचे महात्मा फुले समता परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दहन केले. यामुळे जवळपास तासभर वाहतुकीचा खोळंबा झाला.

ऐश्वर्य पाटेकर यांना काव्यवाचनाचे निमंत्रण

0
0
भुईशास्त्राच्या माध्यमातून परंपरेचे गीत गाणारे व पहिला युवा साहित्य अकादमी मिळविणारे कवी ऐश्वर्य पाटेकर यांना दिल्ली येथे साहित्य अकादमीतर्फे २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या 'भारतीय कविता : नई फसल' या काव्य महोत्सवासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

यशवंतराव प्रतिष्ठानतर्फे शनिवारी व्याख्यान

0
0
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्रातर्फे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ज्ञ व केंद्रीय नियोजन मंडळाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांचे 'बोल महामानवाचे' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

प्रेमप्रकरणातून तरुणीची आत्महत्या

0
0
प्रियकराने विश्वासघात करून परस्पर लग्न केल्याने प्रेयसीने आत्महत्या केल्याची घटना वडाळानाका परिसरातील मोठा राजवाडा येथे घडली. संशयिताविरुद्ध भद्रकाली पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पेट्रोल पंपावर होतेय ग्राहकांची लूट

0
0
पेट्रोल भरण्यासाठी सर्वत्र अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असताना नाशिकचे पेट्रोल पंपचालक मात्र जुन्याच पद्धतीचा अवलंब करीत आहेत.

अतिक्रमणावरून गाजली नाशिकरोडची प्रभाग सभा

0
0
जेलरोडच्या अतिक्रमणाचा मुद्दा अनेक दिवसांपासून गाजत असून गुरुवारी झालेल्या प्रभाग समितीच्या सभेत पुन्हा याचे पडसाद उमटले. नाशिकरोडच्या सर्वच नगरसेवकांनी अतिक्रमण निर्मूलन अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला.

धावपटूंना देणार महिंद्रा स्पिरिट

0
0
'नाशिकच्या धावपटूंना चांगल्या आणि आंतरराष्ट्रीय स्थरावरील सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी महिंद्रा अॅण्ड महिंद्रा पूर्ण सहकार्य करेल,' असे आश्वासन महिंद्रा अण्ड महिंद्राचे नाशिक युनिटचे प्रमुख एच. डी. आहेर यांनी गुरुवारी दिले.

उद्धव ठाकरे शनिवारी जळगावात

0
0
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज्याचा दौरा करत आहे. ठाकरे शनिवार, ९ मार्च रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जळगाव शहरात सागरपार्क मैदानावर त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

हायेवच्या अपघातांना 'स्विडन रोप'चा ब्रेक

0
0
भरधाव जाणाऱ्या वाहनांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याचे प्रमाण राज्यात वाढले आहे. हायवेवरील वाहनांच्या वेगाला नियंत्रण घालणे शक्य नसल्याचे लक्षात घेत राष्ट्रीय महामार्ग प्रा​धिकरणाने मुंबई-आग्रा हायवेवरील गोंदे ते विल्होळी या ठिकाणीच्या दुभाजकावर स्वीडन तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेली 'ब्रीफन वायर रोप' बसवली आहे.

देवळाली कॅम्पला एकदा पाणीपुरवठा

0
0
गंगापूर, दारणा धरणातील पाणीसाठा व भविष्यात होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन देवळाली छावणी परिषदेने शुक्रवारपासून एक वेळा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

कला निकेतन महोत्सवाचा समारोप

0
0
नाशिक कला निकेतन संस्थेच्या वतीने ३ ते ७ फेब्रुवारी या दरम्यान आयोजित वार्षिक कला प्रदर्शनाचा गुरुवारी समारोप झाला. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण याप्रसंगी झाले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images