Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बांधकाम कचरा व अतिक्रमण हटवा

$
0
0
शहरातला बांधकामाचा कचरा (डेब्रि), अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे तात्काळ हटवा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले. सोमवारी महापालिका पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत राज यांनी हे आदेश दिले.

तर होणार नाशिक गतिमान...

$
0
0
देशातील क्रमांक तीनच्या उड्डाणपुलाचे नाशिकमध्ये थाटात लोकार्पण झाले. या सोहळ्यासाठी आलेल्या नेतेमंडळींनी या उड्डाणपुलासह नाशिकच्या प्रगतीचे कौतुकही केले. खुद्द मुख्यमंत्र्यांनी 'नाशिकला गतिमान शहर बनवू' असे आश्वासित केले.

पांडवलेणीला प्लॅस्टिकचा विळखा

$
0
0
शहराचे वैभव म्हणून ओळख असलेल्या पांडव लेणी डोंगराभवती शहरीकरण वेगाने सुरू आहे. याचा विचार करून लेणीच्या डोंगराच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.

औरंगाबाद हायवेवर वाइन चौपाटी

$
0
0
औरंगाबाद हायवेवर विंचूरलगत असलेल्या गोदावरी वाइन पार्कच्या लगत वाइन चौपाटी साकारण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. वाइन उद्योगासह वाइन पर्यटनासारख्या क्षेत्राला चालना देण्यासाठी ही संकल्पना विशेष प्रभावी ठरणार असल्याचे यानिमित्ताने सांगितले जात आहे.

'ब्लू प्रिंट'चा तज्ज्ञांकडून आढावा

$
0
0
महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी नाशिकला आलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे अधिकाऱ्यांची बैठक, पत्रकार परिषद, पदाधिकाऱ्यांशी चर्चा यात व्यस्त असताना दुसरीकडे मुंबई-पुण्याहून आलेली तज्ज्ञ मंडळी राज यांच्या नाशिकमधील ड्रीम प्रोजेक्टचा आढावा घेत होते.

...तर मीही चर्चांचा तपशील सांगेन

$
0
0
'माझ्या पक्षाने काय करायचे तो निर्णय मी घेईन, तुमच्या चर्चा सुरूच राहिल्या तर माझ्याशी काय चर्चा झाली हे मी उघड करेन' असा सज्जड दम भरत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीतील मनसेच्या समावेशावरून होणाऱ्या चर्चांना लगाम घालण्याचे आदेश दिले.

बॉशची आज स्वच्छ हवा मोहिम

$
0
0
स्वच्छ हवा मोहिमेअंतर्गत बॉश कंपनीने बुधवारी (२६ जून) वाहन पियुसी तपासणीचे आयोजन केले आहे. शहरात १७ ठिकाणी एकूण पाच हजार वाहनांची तपासणी करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

शहराला बसतोय व्यसनाधिनतेचा विळखा

$
0
0
शाळा , कॉलेजमधील विद्यार्थ्यांत मद्यपान आणि अमली पदार्थ सेवनाचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. मद्यपानाची ही लागण शहरापुरतीच आता मर्यादित राहिली नाही, युवकांबरोबर लहान मुलेही आज दारुच्या आहारी गेल्याचे दिसून येते.

पावसाळ्यात 'तारे जमीं पर'!

$
0
0
महापालिकेच्या कर्मदारिद्र्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद अवस्थेत असलेले तारांगण येत्या काही दिवसात खुले होणार आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात 'तारे जमीं पर' आल्याचा अनुभव नाशिकरांना घेता येणार आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात तारांगण खुले होईल.

नाशिकरोड स्थानकावर सज्ज होणार श्वानपथक

$
0
0
नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात असून सुरक्षेच्या उपाययोजनांवर जास्त भर दिला जात आहे. स्थानकात श्वानपथक तयार केले जाणार असून त्यासाठी तयारी केली जात आहे.

सिंहस्थासाठी हवा सर्वंकष आराखडा

$
0
0
'सिंहस्थ कुंभमेळा हा वैश्विक सोहळा असल्याने त्यात लाखो जण सहभागी होतात. त्यामुळे या सोहळ्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करण्याचे मोठे आव्हान असते. ते पेलले तरच हा सोहळा उत्तमरित्या पार पडू शकतो,' असे प्रतिपादन नगररचनातज्ज्ञ पी. व्ही. के. रामेश्वर यांनी केले.

एलबीटीतून स्थानिक खरेदीदारांची मुक्तता

$
0
0
महापालिका क्षेत्रात स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू झाल्यापासून आता या कराबाबत अधिकाधिक सुटसुटीतपणा येत आहे. या करातून स्थानिक आणि लहान व्यापाऱ्यांची सुटका झाली असून कर भरण्यासाठी १० दिवसांचीही मुदतवाढ मिळाली आहे.

कारवाईचा बडगा

$
0
0
महापालिकेच्या कामकाजात सुधारणा व्हावी अशी सर्वच नागरिकांची अपेक्षा आहे. ती कर्मचाऱ्यांनी पुरी करावी असेही सर्वाना वाटते; पंरतु ते काही होतांना दिसत नाही, सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखांनी नुकतीच नाशिकला भेट दिली.

जळगाव जिल्ह्यात पावसाची संततधार

$
0
0
सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात पाऊस पडत असून सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात चोवीस तासात २७५ मिमी पाऊस पडला आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या २७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. समाधानकारक पावसाने आतापर्यंत ६४ टक्के पेरण्या झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

केमिस्टच्या आंदोलनाचा रुग्णांना फटका

$
0
0
ऐन पावसाळ्यात औषध विक्रेत्यांनी सुरू केलेल्या आठ तास काम आंदोलनामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व प्रकरणात प्रशासन ढिम्म असल्याने सर्वसामान्यांचे हाल होत असून केमिस्ट संघटना त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत.

उपनगरला गटारीचे पाणी रस्त्यावर

$
0
0
उपनगर परिसरात इच्छामणी मंदिराच्या रस्त्यावर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून भूमीगत गटार तुंबल्यामुळे गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. या परिसरात दुर्गंधी पसरली असून संतप्त नागरीकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घेराव घालूनही परिस्थिती जैसे-थे आहे.

कॅनॉलरोड परिसरात घाणीचे साम्राज्य

$
0
0
उपनगर ते जेलरोड रस्त्याला जोडणाऱ्या कॅनॉलरोड रस्त्यालगतच्या झोपडपट्टी परिसरात रस्त्यावर ठिकठिकाणी कचरा, घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे या परिसरात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. परिसरात डासांचाही त्रास होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

लोकसभेसाठी मनसेची चाचपणी?

$
0
0
नाशिक दौऱ्यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे लोकसभा निवडणुकीची चाचपणी म्हणून मोजक्या सदस्यांबरोबर गुफ्तगू केली असून यात मनसेच्या संभाव्य उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे.

४० टक्क्यांची अट शिथिल

$
0
0
दहावीला सायन्समध्ये ४० टक्क्यांपेक्षा कमी मार्क मिळाल्यानंतरही आता विद्यार्थ्यांना अकरावीला सायन्स शाखेला अॅडमिशन मिळणार आहे. अकरावी सायन्स शाखेच्या प्रवेशासाठी दहावी सायन्समध्ये किमान ४० टक्के मार्क मिळविण्याची अट नुकतीच शिथिल करण्यात आली.

जिल्हा प्रशासनावर 'आपत्ती'

$
0
0
गेल्या तीन महिन्यांपासून न मिळालेले वेतन आणि जबाबदारीचा मोठा डोंगर अशा गर्तेत असलेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी कार्यमुक्त होण्याचा निर्णय घेतल्याने ऐन पावसाळ्यात जिल्हा प्रशासनावर आपत्ती आली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images