Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दशरथाचे वंशी, पुत्र जन्मले ह्रषिकेशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'दोन प्रहरिं कां ग शिरीं सूर्य थांबला। राम जन्मला ग सखी राम जन्मला।', 'सियावर रामचंद्रकी जय', 'जय श्री राम' अशा घोषणांच्या निनादात, चैतन्यदायी, भक्तीमय वातावरणात शहरभर रामजन्म सोहळा साजरा झाला. शहराची ओळख असलेल्या काळाराम मंदिरात दुपारी १२ वाजता मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी हजारो भक्तांनी गर्दी केली होती.

चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या गेलेल्या रामाचा जन्म झाला. हा दिवस रामनवमी म्हणून साजरा केला जातो. नाशिक शहरातील काळाराम, गोरा राम, मुंठ्यांचा राम, बायकांचा राम, तेल्यांचा राम, अहिल्याराम, 'भोसला'तील कोदंडधारी राम, नाशिकरोडच्या बिर्ला मंदिरातील राम आदि मंदिरांमध्ये रविवारी दुपारी बारा वाजता रामजन्माचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी मंदिरांना फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सर्व मंदिरांमध्ये पाळणे बांधून, त्यांना विविध सुवासिक फुलांनी सजवून मोठ्या भक्तिभावाने पाळणे गात रामजन्म साजरा करण्यात आला. रामाच्या मूर्तीस इतर हारांबरोबरच गाठीचाही हार घालण्यात आला. श्रीरामाला केवडा, चंपा, चमेली अन् जाई ही फुले वाहण्यात आली. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटण्यात आला. रामनवमीनिमित्त सर्वच मंदिरांमध्ये भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काही ठिकाणी रामायणाचे वाचन, रामकथा निवेदन, गीत रामायण गायन आदी कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.

काळाराम मंदिर

शहरातील सर्वाधिक महत्त्व असलेल्या काळाराम मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम द्वादशीपर्यंत सुरू राहणार आहेत. रामनवमीनिमित्त पहाटेपासूनच कार्यक्रमांना सुरुवात झाली. पहाटे ५.३० वाजता चंद्रशेखरबुवा पुजारी यांच्या हस्ते काकडआरती करण्यात आली. सकाळी ७ वाजता श्रींच्या महापूजेला सुरुवात झाली. अंतर्मातृका, बहिर्मातृकांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पुरुषसुक्ताची १६ आवर्तने, स्त्रीसुक्ताचे १ आवर्तन व ऋषिन्यास करून न्यासविधीसह विविध प्रकारच्या राजोपचार पजा करण्यात आल्या. यंदाच्या उत्सवाचे मानकरी पुष्करबुवा पुजारी यांनी ही पूजा केली. त्यानंतर देवाला अभिषेक घालून नवी वस्त्रे परिधान करण्यात आली. देवाचा साजश्रृंगार करून हिरे, माणिक, मोतीजडीत हार परिधान करण्यात आले. त्यानंतर दुपारी ११ वाजून ५५ मिनिटांनी पडदा लावून गाभारा बंद करण्यात आला. १२ वाजता राम जन्मासाठी पडदा बाजूला करण्यात येऊन पंजेरी, खडीसाखर, साखर फुटाणे आदी तीन हजार किलो प्रसादाचे वाटप करण्यात आले. रात्री ७ वाजता राम मंदिरात अन्नकोट झाला. यावेळी ३५० पदार्थांचा महानैवेद्य प्रभूरामाला दाखविण्यात आला. रोज रामाचे शयन होते. परंतु, रामनवमीच्या दिवशी शयन होत नसल्याने रात्री उशिरापर्यंत दर्शन सुरू होते. काळाराम मंदिराच्या पूजेचे पौरोहित्य महंत सुधीरदास पुजारी यांनी केले.

मान्यवरांची उपस्थिती

रामजन्माच्या वेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आडके यांच्यासह गरसेवक व मान्यवर उपस्थित होते. यंदा भाविकांची उपस्थिती जास्त असली तरीही पोलिसांच्या नियोजनामुळे दर्शनरांग पटापट पुढे सरकत होती. यावेळी पंचवटी पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली होती.

गोरेराम मंदिरात पूजा

पंचवटी : गोदाकाठवर नीलकंठेश्वर महादेव मंदिरालगत असलेल्या श्रीराम मंदिरात जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. हेमंत पद्मनाभी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. ह. भ. प. कुलकर्णी यांचे श्रीराम जन्मोत्सव या विषयावर कीर्तन झाले. दुपारी १२ वाजता गोरेराम मित्रमंडळातर्फे ढोल-ताशांचे वादन करण्यात आले. माजी आमदार नितीन भोसले, गजानन शेलार आदी उपस्थित होते. रात्री ८ वाजता आरती करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


क्षयरोगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्षयरोगाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन संकुचित असून, तो बदलावा यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान होणे ही महत्त्वाची बाब आहे. यासाठी प्रयत्न करणाऱ्या अक्षय लंग फाउंडेशनचे काम विशेष असून, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेनशतर्फे (डब्लूएचओ) शक्य ती मदत केली जाईल, असे आश्वासन डब्लूएचओचे सल्लागार डॉ. वैभव शहा यांनी दिले.

जागतिक क्षयरोग दिन तसेच, अक्षय लंग फाउंडेशनच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान डॉ. शहा बोलत होते. या पार्श्वभूमीवर संस्थेने जागर क्षयरोग मुक्तीचा हे अभियान हाती घेतले असून, यात सहभागी झालेल्यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम शनिवारी गंगापूररोडवरील आयएमआरटी सभागृहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मविप्रचे चिटणीस सुनील ढिकले होते. त्यांनी फाउंडेशनच्या कार्यांचा उल्लेख करीत क्षयरोगाबाबत जनजागृतीसाठी घेतलेल्या मेहनतीचं कौतुक केले.

या संस्थेमार्फत फुप्फुस आरोग्य व विकास या विषयावर जनजागृती करण्यात येते. रुग्णांसाठी मोफत शिबिर आयोजित करण्यात येतात. संस्थेमार्फत करूया जागर क्षयरोग मुक्तीचा या अभियानाला १५ जानेवारी रोजी सुरुवात झाली आहे. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त यंदा संस्थेने क्षयरोग मुक्त जगासाठी शिलेदार होऊया सारे मिळून नवा इतिहास घडवूया ही संकल्पना हाती घेतली असल्याची माहिती संस्थेच्या संस्थापिका व अध्यक्ष डॉ. गौरी आचार्य-कुलकर्णी यांनी दिली. कार्यक्रमादरम्यान चिन्मय या मुलाने टीबी प्रबोधन गीत सादर केले. अक्षय आणि मनस्वी यांनी टीबीचा बरगुंडा ही नाटीका सादर केली. यावेळी टीबी झालेल्या एका विद्यार्थिनीने आपले अनुभव मांडत टीबीकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहू नये, असे आवाहन केले. वैद्य कौसर तांबोळी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी संस्थेचे सुहास कुलकर्णी, डॉ. सुषमा दुगड, भास्कर आचार्य, मीना आचार्य, संदीप कुलकर्णी यांनी सहकार्य केले. प्रसाद बुडूक यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन स्थगित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतमालाला हमीभाव जाहीर करावा, या मागणीसाठी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज (२६ मार्च) सकाळी ९ वाजता मनमाड येथे पूर्वनियोजित रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार होते. परंतु, मुंबई येथे डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर निघणाऱ्या एल्गार मोर्चाला रेल्वेने जाणाऱ्या कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी हे रेल्वे रोको आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांनी दिली.

एल्गार मोर्चा हा सरकारच्या विरोधात असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे रेल्वे रोको आंदोलनदेखील सरकारच्याच विरोधात आहे. त्यामुळे एल्गार मोर्चाला सहकार्य करण्यासाठीच नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रेल्वे रोको आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल आहे, असे अॅड. पगार यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

शेतकऱ्यांचा कांदा, टोमॅटो व अन्य शेतमाल कवडीमोल भावाने विकला जात असून, उत्पादन खर्चदेखील वसूल होत नसल्याने सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करून कांदा, टोमॅटोसह शेतमालाला हमीभाव जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मनमाड येथे रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये किमान तापमान १०.५ अंशांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये एकीकडे उन्हाचा चटका जाणवू लागला असतानाच रविवारी कमाल तापमानही ३७.३ अंश सेल्सियस ऐवढे नोंदविण्यात आले. विशेष म्हणजे गेल्या आठ दिवसांत सर्वाधिक नीचांकी तापमान आणि सर्वाधिक कमाल तापमानाची नोंदही या एकाच दिवशी झाली आहे. राज्यातील सर्वाधिक किमान तापमान नाशिकमध्ये नोंदविण्यात आले असून, तापमानातील हे चढउतार नागरिकांच्या आरोग्यासाठी तापदायक ठरू लागले आहेत.

नाशिककरांना उन्हाळा घाम फोडतो, तर थंडी हुडहुडी भरविते. गेल्या काही दिवसांपासून शहरात उन्हाचा कडाका जाणवू लागला असतानाच रविवारी सकाळी तापमानाचा पारा १०.५ अंशांपर्यंत खाली घसरला. त्यामुळे सकाळी गारठा, तर दुपारी उन्हाचा कडाका असा अनुभव नाशिककरांनी घेतला. गेल्या आठ दिवसांत शहरात कमाल तापमान ३३ ते ३७ अंशांच्या दरम्यान राहिले. किमान तापमान २१ अंशांवरून १० अंशांपर्यंत खाली घसरले आहे. तापमानातील हे चढउतार आजारांना निमंत्रण देणारे ठरत आहेत. त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी भेडसावत असून, दवाखान्यांमध्ये गर्दी वाढू लागली आहे.

दिनांक कमाल तापमान किमान तापमान

२५ मार्च ३७.३ १०.५

२४ मार्च ३६.३ १५.३

२३ मार्च ३३.३ १६.४

२२ मार्च ३३.० १४.६

२१ मार्च ३४.७ १६.९

२० मार्च ३४.५ २१.०

१९ मार्च ३४.९ १८.५

१८ मार्च ३३.६ १५.६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवरी चुकली रेल्वेगाडीत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नागपुरहून लग्नासाठी नाशिकला रेल्वेने आलेले वऱ्हाड नाशिकरोड रेल्वे स्टेशनला उतरले. मात्र, जिचे लग्न होते ती नवरीच रेल्वे गाडीत राहून गेल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. 'नवरी चुकली बस स्टँडवर' असे आजवर ऐकले होते. परंतु, या घटनेत नवरी चुकली रेल्वेगाडीत असे म्हणायची वेळ वऱ्हाडींवर आली.

नागपूरच्या रजनी या युवतीचे नाशिकमध्ये लग्न होते. त्यामुळे नागपूरहून रजनीसह तिचे नातेवाईक सुरेशराम विष्णू मिरेगे, नरेश रामचंद्र नवले आणि इतर वऱ्हाडी मंडळी सेवाग्राम एक्सप्रेसने रविवारी सकाळी नाशिकरोडला साडेआठच्या सुमारास पोहचली. नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर रजनीसोबतचे सर्व नातेवाईक सामान उतरवून घेत गाडीतून प्लॅटफार्मवर उतरले. गाडी थांबलेली असल्याचा विचार करून याच वेळी नवरी रजनी स्वच्छतागृहात गेली. नेहमीप्रमाणे सेवाग्राम एक्सप्रेस नाशिकरोड रेल्वे स्थानकातून पुढे रवाना झाली. परंतु, नवरी रेल्वे प्लॅटफॉर्मवर दिसून न आल्याने सर्व वऱ्हाडी मंडळींची धांदल उडाली. नवरी रजनी गाडीतच राहून गेल्याचे लक्षात आल्याने तिच्या नातेवाईकांनी तत्काळ नाशिकरोड रेल्वे सुरक्षा बल पोलिस ठाण्यात संपर्क केला. रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी इगतपुरी रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक सतीश विधाते यांच्याशी संपर्क करून या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी सेवाग्राम एक्सप्रेस इगतपुरी रेल्वे स्थानकात आल्यावर गाडीची तपासणी केली व गाडीतच राहून गेलेल्या रजनीचा शोध घेऊन तिला इगतपुरीला उतरवून घेतले. नवरी रजनीच्या नातेवाईकांनी इगतपुरी गाठून ओळख पटवून वऱ्हाडापासून चुकून गाडीतच राहून गेलेल्या रजनीला ताब्यात घेतले व माघारी नाशिकला आणले. चित्रपटातील कथानक शोभावे अशा या घटनेतील नवरीला शोधण्याकामी इगतपुरी रेल्वे सुरक्षा बलाचे बलवंतसिंह, गजानन जाधव, अनिता गवई, विकास साळूंके, इगतपुरी रेल्वे स्टेशन मास्तर आदींनी मदत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवमतदारांचा वाढला टक्का

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार जिल्हा प्रशासनामार्फत मतदार यादी पुनर्रिक्षण कार्यक्रमानंतर जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील सर्व १५ विधानसभा मतदारसंघांतील मतदार संख्या ४३ लाख १५ हजार ५८० वर जाऊन पोहचली आहे. या एकूण मतदार संख्येत नवमतदारांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने येत्या सार्वत्रिक निवडणुकीत नवमतदारांची भूमिका किंगमेकरची ठरणार आहे. नवमतदारांच्या संख्येत मोठी वाढ झालेल्या मतदारसंघांत नाशिक व मालेगाव शहरांतील मतदारसंघांसह ग्रामीण भागातील कळवण, चांदवड, इगतपुरी, दिंडोरी, सिन्नर आणि नांदगाव या मतदारसंघांचा समावेश आहे.

जिल्हा निवडणूक शाखेने मतदार यादी पुनर्रिक्षणानंतर जानेवारी महिन्यात सर्व १५ मतदारसंघांची अंतिम मतदार यादी जाहीर केलेली आहे. या मतदार यादीनुसार ३ लाख ६९ हजार ७१४ मतदार संख्या असलेला नाशिक पश्चिम हा सर्वात मोठा मतदारसंघ ठरला. त्या खालोखाल नाशिक पूर्व (३,४२,२२२), आणि मालेगाव बाह्य (३,२३,४६५) या दोन शहरी मतदारसंघांतील मतदार संख्येने तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. ग्रामीण विभागात तीन लाखांचा टप्पा पार करणारा नांदगाव (३,१०,५७३) हा एकमेव मतदारसंघ ठरला आहे. इगतपुरी (२,४७,३३०) हा सर्वांत कमी मतदार संख्येचा मतदारसंघ ठरला असून, त्या खालोखाल देवळाली (२,५०,९०७), निफाड (२,५८,०१७) हे कमी मतदार संख्येचे मतदारसंघ ठरले आहेत.

नवमतदार ठरणार किंगमेकर

जिल्ह्यातील नाशिक (पश्चिम), नाशिक (मध्य), नाशिक (पूर्व), इगतपुरी, दिंडोरी, सिन्नर, कळवण, चांदवड, मालेगाव बाह्य, मालेगाव मध्य आणि नांदगाव या अकरा मतदारसंघांत नवमतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या अकरापैकी भाजपच्या ताब्यात चार, दोन राष्ट्रवादीच्या, दोन काँग्रेसच्या, शिवसेनेच्या ताब्यात दोन मतदारसंघ आहेत. त्यामुळे नवमतदारांची भूमिका या राजकीय पक्षांना आव्हान देणारी ठरणार आहे. १८ व १९ वर्षांच्या नवमतदारांची संख्या ७० हजार ५७८ इतकी असून, २० ते २९ वयोगटातील मतदारांची संख्या ८ लाख १४ हजार ७१७ इतकी आहे. एकूण मतदार संख्येपैकी सुमारे १५ टक्के नवमतदार आहेत. नवमतदार सोशल मीडिया फ्रेंडली असल्याने या मतदारांची भूमिका येत्या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे.

ज्येष्ठ नागरिक मतदार संख्या १७ टक्के

जिल्ह्यात एकूण मतदार संख्येपैकी ७ लाख ४६ हजार ८६५ मतदार ज्येष्ठ नागरिक असून, त्यांचे प्रमाण १७.३१ टक्के इतके आहे. त्यात ८० वर्षांपुढील मतदार संख्या १ लाख २९ हजार ५८९ इतकी आहे. ८० वर्षांवरील मतदारांची संख्या नांदगाव मतदारसंघात सर्वात जास्त, तर नाशिक पश्चिममध्ये सर्वांत कमी आहे. मालेगाव (बाह्य), येवला आणि चांदवड या मतदारसंघांतही ८० वर्षांवरील मतदारांची संख्या १० हजाराच्या पुढे आहे. शहरी मतदारसंघांत मात्र ज्येष्ठ मतदारांच्या संख्येत घट आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यासाठी ४४ कोटींचा निधी

$
0
0

आदिवासी उपयोजनेतून निधी वर्ग

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना दरवर्षी आदिवासी उपयोजनेच्या एकूण तरतुदीपैकी पाच टक्के निधी उपलब्ध करून देण्याच्या योजनेतून जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील ११३२ ग्रामपंचायतींना ४४ कोटी ६३ लाख ९५ हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. जिल्ह्यातील या ग्रामंपचायती कळवण, पेठ, दिंडोरी, इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, बागलाण, देवळा या तालुक्यातील आहेत. राज्यात असा २१४ कोटींचा निधी देण्यात आला आहे.

या निधीतून पायाभूत सुविधा, वनहक्क अधिनियम व पेसा कायद्याची अंमलबजावणी, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण व वनीकरण, वन्यजीव संवर्धन, जलसंधारण, वनतळी, वन्यजीव पर्यटन व वनउपजीविका या बाबींकरिता उपलब्ध निधींपैकी प्रत्येकी २५ टक्के निधी या प्रमाणात खर्च करावा लागणार आहे. पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या निधीसाठी ग्रामसभा कोषाचे स्वतंत्र बँक खाते आहे. शासनाकडून प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ग्रामसभाकोषाच्या खात्यावर निधी थेट बँकेमार्फत वितरीत करण्यात येतो. त्यामुळे गावाच्या विकासासाठी नियोजनबद्ध पद्धतीने तो वापरणे सोपे जाते. ग्रामपंचायतींतर्गत असलेली गावे, पाडे व वाड्या यांच्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात हा निधी वितरीत करण्यात येत असल्यामुळे त्याचा सर्वांना लाभ होतो. ग्रामपंचायतींना मिळालेल्या निधीतून घ्यावयाची कामे ग्रामसभेमध्ये सर्वानुमते ठरवल्यानंतर त्याची अंमलबजावणी तत्परतेने होते. त्यामुळे हा निधी उपयोगी पडतो.

११३२ ग्रामपंचायतींना लाभ

कळवण ग्रामपंचायत समिती क्षेत्रातील ८६ ग्रामसभांमधील १५१ गावे, पेठ पंचायत समिती क्षेत्रातील ७३ ग्रामसभांमधील २१३ गावे, दिंडोरी पंचायत समिती क्षेत्रातील १०३ ग्रामसभांमधील १३८ गावे, इगतपुरी पंचायत समिती क्षेत्रातील ६३ ग्रामसभांमधील ६७ गावे, नाशिक पंचायत समिती क्षेत्रातील ३२ ग्रामसभांमधील ७५ गावे, त्र्यंबकेश्वर पंचायत समिती क्षेत्रातील ८४ ग्रामसभांमधील १२४ गावे, सुरगाणा पंचायत समिती क्षेत्रातील ६१ ग्रामसभांमधील १९० गावे, बागलाण पंचायत समिती क्षेत्रातील ५० ग्रामसभांमधील ७५ गावे, देवळा पंचायत समिती क्षेत्रातील २२ ग्रामसभांमधील ४१ गावांना हा निधी मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​नाशिक: मंगला एक्स्प्रेसचा अपघात टळला

$
0
0

नाशिक: हजरत निजामुद्दीन ते एर्नाकुलम या दरम्यान धावणाऱ्या सुपरफास्ट मंगला एक्स्प्रेसचा आज मोठा अपघात टळला. एक्स्प्रेसच्या बी-२ डब्याच्या एका चाकाची स्प्रिंग तुटल्याचे टीसीच्या लक्षात आल्याने हा अनर्थ टळला. नाशिकरोड रेल्वे स्थानकात हा प्रकार उघडकीस आला.

मंगला एक्स्प्रेस सकाळी ६.४० वाजताच्या सुमारास नाशिकरोड स्थानकात आली असता, एक्स्प्रेसमधून मोठा आवाज येत असल्याचं टीसीच्या निदर्शनास आलं. त्यामुळं तात्काळ एक्स्प्रेस थांबवण्यात आली. तपासणी केली असता एका चाकाची स्प्रिंग तुटली होती. त्यामुळं चाक निखळून मोठा अपघात घडला असता. त्यानंतर लगेच दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं. तब्बल चार तासांनी दुरुस्तीचं काम पूर्ण झालं. त्यानंतर एक्स्प्रेस मुंबईकडे रवाना करण्यात आली.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लुटमारीला मोकळी वाट

$
0
0

शहर परिसर

लुटमारीला मोकळी वाट

बाटलीबंद पाणी छापील किमतीपेक्षा जास्त दराने विकता येण्याची मुभा न्यायालयाच्या निर्णयामुळे व्यावसायिकांना मिळाली आहे. व्यावसायकांनी काहीही किमतीत विकायचे आणि ग्राहकांनी ते का घ्यायचे? त्यामुळे छापील किंमत द्यायचीच कशाला? ही लुटमारीला मोकळी वाटच आहे.

-सुभाष काळे

कॉलेजरोड

दररोज वाहतूक कोंडी

कॉलेजरोडवर सध्या दररोज सायंकाळी वाहतुकीची कोंडी होताना दिसते. त्याची कुठलीही दखल घेतली जात नाही. येथे पोलिसदेखील तैनात नसतात. त्यामुळे येथील वाहतुकीला शिस्तच राहिलेली दिसत नाही. त्याचा जाच अन्य वाहनचालक व स्थानिक रहिवाशांनी किती दिवस सहन करायचा.

-सागर घुगे

पेठरोड

घंडागाडी आणि कचरा

ओंकारनगर, पेठरोड येथे एसटी वर्कशॉपच्या भिंतीलगत असा कचरा कायमच साचलेला असतो. तो वेळच्या वेळी उचलला जात नाही. त्यामुळे या परिसराची जणू कचराकुंडीच झाली आहे. येथे घंटागाडी चार दिवसांनी येत असल्याचा हा परिणाम आहे. संबंधितांनी याची दखल घ्यावी.

-संदीप कापरे

लेखानगर

जीवघेणा खड्डा

लेखानगर येथील स्टेट बँकेजवळ पाणी सोडण्यासाठी केलेला खड्ड्यावर झाकण न ठेवता तो उघडा ठेवलेला आहे. तेथे पाणीगळती होते व कचराही साचलेला आहे. या ठिकाणी गाडी पार्क करताना किंवा पायी चालणाऱ्या व्यक्तीस खड्डा न दिसल्यास अपघात होऊ शकतो. येथे त्वरित उपाययोजना व्हावी.

-हेमंत काळे

सिडको

कबुतराला जीवनदान...

गणेश चौक परिसरातील गणपती मंदिराच्या आवारात नुकतेच जखमी कबुतर आढळून आले. परिसरातील पक्षीप्रेमींना त्याची माहिती समजताच त्यांनी त्याला पाणी देऊन प्राथमिक उपचार केले. पक्षीप्रेमींनी वेळीच केलेल्या धावपळीमुळे या कबुतराला जीवनदान मिळाळे. त्याची भरारी पाहून सर्वांनी समाधान व्यक्त केले.

-संदीप देवांग

(सिटिझन रिपोर्टर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंदाजपत्रकास मंजुरी

$
0
0

किरकोळ फेरबदलासह ४१२ कोटीचे अंदाजपत्रक

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेत सोमवारी आयोजित अंदाजपत्रकीय महासभेत चर्चेअंती जमा व खर्च बाजूत किरकोळ फेरबदल सुचवीत महासभेने मंजुरी दिली. महापौर रशीद शेख यांना फेराफारीचे अधिकार महासभेत प्रदान करण्यात आले. अंदाजपत्रकात सुमारे १५ कोटीची  वाढ अपेक्षित असून एकूण ४१२ कोटी रुपयांचेचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. 

येथील महापालिकेच्या जुन्या सभागृहात सोमवारी अंदाजपत्रकीय महासभेचे आयोजन करण्यात आले होते. महापौर रशीद शेख, उपमहापौर सखाराम घोडके, आयुक्त संगीता धायगुडे, नगरसचिव राजेश धसे आदींच्या उपस्थिती महासभा झाली. धायगुडे यांनी नागरिकांच्या मुलभूत सोई सुविधांना प्राधान्य देत ३८२ कोटीचे अंदाजपत्रक स्थायी समितीस सादर केले. स्थायी समितीच्या बैठकीत अंदाजपत्रकावर चर्चा होवून स्थायीने १५ कोटीची वाढ सुचवीत महासभेपुढे ३९७ कोटीचे अंदाजअपत्रक मंजुरीसाठी सादर केले होते. 

नागरिकांवर कोणतीही करवाढ या अंदाजपत्रकात करण्यात आलेली नाही. तसेच नगरसेवकांना आपापल्या प्रभागात नगरसेवक निधी व्यतिरिक्त विकास कामांसाठी १६ लाख रुपयांचा निधी खर्च करण्याची तरतूद यात करण्यात आली. तर विकास निधीत सुमारे दहा कोटीची वाढ सुचविण्यात आली. सुमारे दोन तास चर्चेनंतर महासभेने किरकोळ फेरबदलासह महापौर शेख यांना अधिकार प्रदान करीत अंदाजपत्रकास मंजुरी दिली. यावेळी चर्चेत एमआयएम गटनेते डॉ. खालिद परवेज, आघाडीचे गटनेते बुलंद इक्बाल, भाजप गटनेते सुनील गायकवाड, शिवसेना गटनेते नीलेश आहेर, नगरसेवक अब्दुल मलिक आदींनी सहभाग घेतला. 

१५ कोटींची वाढ

अंदाजपत्रकीय महासभेत प्रारंभी स्थायी समिती सभापती सलीम अन्वर यांनी प्रास्ताविक करीत महासभेपुढे अंदाजपत्रक मांडले. यानंतर लेखाअपरीक्षक कमरुद्दीन शेख यांनी क्रमशः या अंदाजअपत्राकातील जमा व खर्च बाजूच्या तपशिलासह वाचन केले. यावेळी आयुक्त धायगुडे यांनी महापालिकेच्या मालमत्ता कर वसुली विषयी निवेदन करताना सांगितले की, पालिका प्रशासनास ९० टक्के वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले असून आत्तापर्यंत ६० टक्के वसुली झाली असल्याने पालिकेच्या जमा बाजूत मोठी वाढ झाली आहे. यानंतर महापालिका दर व कर यावर उपस्थित नगरसेवकांनी चर्चा करीत अपेक्षित वाढ सुचवली. यात स्थानिक संस्था कर, सिनेमा कर, बीफ व मटन स्लॉटर भाडे, हॉकर्स गाळे भाडे आदी उत्पन्नच्या बाजूंवर चर्चा होवून सुमारे १५ कोटीची वाढ सुचविण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साश्रू नयनांनी जवानास निरोप

$
0
0

साश्रू नयनांनी जवानास निरोप

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील गिगाव येथील लष्करातील जवान प्रवीण सुदाम पाटील (वय २४) याचा रविवारी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गिगाव ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी साश्रू नयनांनी प्रवीणला अखेरचा निरोप दिला. 

 १२ उत्तीर्ण झाल्यानंतर घरातील गरिबीची परिस्थिती असताना देखील त्याने जिद्दीने सैन्यदलात प्रवेश मिळवला होता. सध्या तो सिकंदराबाद येथील युनिटमध्ये लष्करी सेवेत होता.  आपल्या भावी आयुष्यातील जोडीदाराचा शोध घेण्यासाठी प्रवीण सुट्टीवर आला होता. रविवारी मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावर अपघातात प्रवीण जागीच ठार झाला. त्याचा साथीदार जयदीप मराठे जखमी झाला होता. सोमवारी त्याच्यावर शासकीय इतमामात गिगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैन्य दाल्याच्या वतीने त्यास मानवंदना देण्यात आली. प्रशासनाच्या वतीने तहसीलदार ज्योती देवरे, पोलिस निरीक्षक के. के. पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाळासाहेब सातपुते उपस्थित होते. प्रवीणच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस वसाहतीचा पाणी पुरवठा बंद -

यंदाचा उन्हाळा ठरणार तापदायक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदाचा उन्हाळा आताच तापदायक वाटत असला तरी नाशिककरांना घाम फोडेल अशी एक गरम बातमी आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात यंदा तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सियसच्या पुढे जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. तप्त झळांना सामोरे जाण्यासाठी नाशिककरांनी सज्ज राहावे, असे आवाहन हवामान तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.

रविवारी नाशिकचे कमाल तापमान ३७.३ अंश सेल्सियस ऐवढे नोंदविण्यात आले होते. सोमवारी हेच तापमान ३८.१ अंश सेल्सियसवर पोहोचले. किमान तापमानातही ६.१ अंश सेल्सियसने वाढ होऊन ते १६.६ अंशांपर्यंत पोहोचले. येत्या ४८ तासांमध्ये नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात कमाल तापमानात दोन अंश सेल्सियसपर्यंत वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दक्षिणेकडून उत्तरेकडे येणाऱ्या उष्ण लाटांमुळे उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रासह मुंबईतील तापमानात दोन अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाऊ लागली आहे. त्यामुळे नाशिक, मालेगावसह जळगावकरांना यंदा तप्त झळांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. यापूर्वी मुंबई, ठाण्यात १९५६, २०११ मध्ये तापमानाचा पारा ४१ अंशांच्या पुढे गेला होता. यंदाही तो ४१ अंश सेल्सियसच्या पुढे सरकरण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किरकोळ कारणावरून चाकू हल्ला

$
0
0

क्राइम डायरी

०००००००

किरकोळ कारणावरून

तरुणावर चाकू हल्ला

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

किरकोळ कारणातून चौघांनी तरुणावर चाकू हल्ला केल्याची घटना कॉलेजरोड भागात घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुह्याची नोंद करण्यात आली आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाला असून, पोलिस तपास करीत आहेत.

नाविन्या चव्हाण उर्फ डोन्या, ऋषीकेश गरड, अथर्व सानप आणि त्यांचा एक साथीदार अशी संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी आकाश मधुकर कुरणेकर (मिशनमळारोड, शरणपूररोड) या तरुणाने तक्रार दिली आहे. आकाश कुरणेकर हा शनिवारी सायंकाळी कॉलेजरोडवरील अकबर सोडा दुकान परिसरातील विजू दाबेली समोर उभा होता. तिथे आलेल्या संशयितानी आकाशला रंगपंचमीच्या दिवशी माज आला होता का? असा प्रश्न करीत त्याच्यावर हल्ला चढविला. संशयितांकडून लाथा बुक्यांनी मारहाण होत असतांना आकाशचा मित्र सुनंद आहिरे याने वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. यावेळी संशयित नाविन्या आणि ऋषीकेश गरड यांनी त्याच्यावर चाकू हल्ला केला. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बुराडे करीत आहेत.

राठी अमराईत लॅपटॉपची चोरी

दरवाजा उघडा असलेल्या घरात घुसून चोरट्यांनी लॅपटॉप चोरून नेला. ही घटना गंगापूररोड भागातील राठी अमराई परिसरात घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोमल अशोक राजगिरे (रा. महेश सोसा. राठी अमराईजवळ) यांनी दिलेल्या फियार्दीनुसार, १३ सप्टेंबर २०१७ रोजी राजगिरे सकाळी केटीएचएम कॉलेजमध्ये सेमिनारसाठी गेल्या होत्या. या दरम्यान उघड्या घरात प्रवेश करून चोरट्यांनी सुमारे १२ हजार रुपयांचा लॅपटॉप चोरून नेला. घटनेचा अधिक तपास हवालदार सातभाई करीत आहेत.

मैत्रिणीच्या दागिण्यांवर डल्ला

गप्पा मारण्याच्या बहाण्याने घरात घुसलेल्या महिलेने आपल्या मैत्रिणीच्या दागिण्यांवर डल्ला मारल्याची घटना सिडकोतील रायगड चौक भागात घडली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुह्याची नोंद करण्यात आली. पोलिसांनी संशयित महिलेस अटक केली आहे.

पल्लवी भदाणे (रा. रायगड चौक, सिडको) असे अटक केलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सुनिता नंदकिशोर सोनजे (रा. रायगड चौक) यांनी तक्रार दिली. शेजारी-शेजारी राहणाऱ्या दोघी महिला मैत्रिणी आहेत. संशयित पल्लवी भदाणे ही सुनिता सोनजे यांच्याकडे शनिवारी (दि. २४) दुपारी गप्पा मारण्यासाठी गेली. यावेळी सोनजे या कामात व्यस्त असल्याचे बघून संशयित महिलेने डब्यात ठेवलेले सुमारे ३८ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना घरातील लहान मुलाने बघितल्याने उघड झाली. संशयित महिलेस पोलिसांनी अटक केली आहे. घटनेचा अधिक तपास हवालदार सोनवणे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनमाहिती अधिकाऱ्यास २५ हजारांचा दंड

$
0
0

जनमाहिती अधिकाऱ्यास दणका

राज्य माहिती आयुक्तांकडून २५ हजारांचा दंड

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जुम्मा मस्जीद चॅरिटेबल ट्रस्टचे (वक्फ) अभिलेख जुम्मा चॅरिटेबल ट्रस्टकडे वर्ग का करण्यात आले नाहीत, ही माहिती देण्यास टाळटाळ करणाऱ्या जनमाहिती अधिकारी (विधी), धर्मादाय आयुक्त यांना राज्य माहिती आयुक्त अजितकुमार जैन यांनी २५ हजार रूपयांचा दंड ठोठवला आहे.

या प्रकरणी अॅड. दिलावरखान पठाण यांनी अर्ज सादर केला होता. जुम्मा मस्जीद चॅरिटेबल ट्रस्टच्या मिळकतींबाबत धर्मादाय आयुक्त विभागाने परिपत्रक जारी केले होते. याविरोधात नाशिकसह राज्यातील इतर धार्मिक संस्थांनी मुंबई हायकोर्टात २००४ मध्ये धाव घेतली होती. या प्रकरणी २०११ रोजी हायकोर्टाने आपला निकाल सुनावला. पण यानंतर पाच ते सहा वर्ष धर्मादाय आयुक्त कार्यालय, मुंबई यांनी धार्मिक संस्थांचे अभिलेख महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद यांच्याकडे वर्ग केले नाही. एवढ्या वर्षात हे काम झाले नाही याची माहिती अॅड. पठाण यांनी नाशिकच्या सहधर्मादाय आयुक्तांकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागितली. सदर प्रकरणात मुंबई हायकोर्टात रिट पिटीशन दाखल असून, म्हणून हे वर्ग करण्यात आलेले नसल्याचे उत्तर देण्यात आले. त्यामुळे पठाण यांनी मुंबईच्या धर्मादाय आयुक्तांकडे माहिती मागितली. पण त्यांना मुदतीत माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी प्रथम अपील केले. त्यामध्ये धर्मादाय आयुक्तांकडे सुनावणीच घेण्यात आली नाही. त्यामुळे पठाण यांनी राज्य माहिती आयोगाकडे धाव घेतली. १४ मार्च २०१७ रोजी सुनावणी घेऊन आयोगाने संबंधित प्रकरणात दंड का ठोठवण्यात येऊ नये, म्हणून आदेश दिले.

आदेशानंतरही गती नाही

आयोगाच्या आदेशानंतरही धर्मादाय आयुक्त कार्यालयातून हालचाली झाल्या नाहीत. संधी देऊनही धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे वि. मा. उकरुळकर हजर झाले नाहीत तसेच म्हणणेही मांडले नसल्याने ३ मार्च २०१८ रोजी माहिती आयोगाचे आयुक्त अजितकुमार जैन यांनी उकरुळकर यांना २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वांजुळ पाणीसाठी टेहरेतून संघर्ष यात्रेस प्रारंभ 

$
0
0

पाण्यासाठी संघर्षयात्रा

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील  येथील टेहरे येथे वांजुळपाणी संघर्ष समितीतर्फे संघर्ष यात्रेच्या पहिल्या टप्प्याला सोमवारी सुरुवात करण्यात आली. बैलगाडीवर संघर्ष यात्रेचे फलक लावून टेहरे गावातून जनजागृती फेरी  काढून राम मंदिर येथे बैठक घेण्यात आली. यावेळी गावातील युवक व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. 

पंचायत समिती सदस्य अरुण  पाटील यांनी प्रास्ताविक केले. समितीचे अनिल निकम व कुंदन चव्हाण यांनी  वांजुळपाणी प्रकल्प  गिरणा मोसम खोऱ्यासाठी कसा लाभदायी आहे, याबाबत मार्गदर्शन केले. शेखर पवार यांनी टेहरे गावतील जुन्या आंदोलनाच्या आठवणींना उजाळा देत तरुणांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

प्रा. के. एन. आहिरे  जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले. महाजन आपल्या हक्काचे पाणी गुजरातला देत असून, त्याबदल्यात फक्त जळगावच्या पदरात काही प्रमाणात पाणी  मिळवून घेत आहेत. हा 'कसमादेना'च्या जनतेवर अन्याय  असून, यावर संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, खा.  हरिशचंद्र चव्हाण व स्थानिक नेते मोदींच्या दबावामुळे काहीही बोलायला तयार नाहीत, असाही आरोप त्यांनी केला. आपल्या हक्काच्या पाण्यासाठी प्रत्येकाने सज्ज झाले पाहिजे असे सांगत या संघर्ष यात्रेत जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. चंद्रकांत शेवाळे, विश्वास देवरे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा विजय शेवाळे यांनी आभार मानले. 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेमासाठी काय पण... मैत्रिणीसाठी आईला धमकी!

$
0
0

'अल्पवयीन' प्रेमवीराचा प्रताप; आईची पोलिसात तक्रार

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

प्रेयसीने आपल्या प्रियकराकडे तुझ्या आईचे काळीज आणून दे, असा हट्ट धरला. मुलाने आईस मारले. काळीज काढून घेतले. पळत निघाला... पडला... ते काळीज हातून पडले नि आवाज उमटला, बाळा तुला कुठे लागले तर नाही ना...ही लोककथा तुम्हाला आठवत असेलच! या कथेशी मिळती जुळती कथा प्रत्यक्षात घडली आहे. आपल्या अल्पवयीन मैत्रिणीसाठी मुलाने घरदार सोडले. एवढ्यावरच न थांबता तिच्यासाठी जन्मदात्या मातेला जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली आहे.

प्रेम हे आंधळे असते, असे म्हणतात. पण इतकेही आंधळे नसावे की ते आपल्या मातेच्या जीवावर उठावे. प्रेमा तुझा रंग कसा... असे म्हणण्यापुरते चांगले वाटत असले तरी त्या प्रेमाचे हिंसक 'रंग' नकोसे वाटतात.

मुंबईतील अल्पवयीन मैत्रिणीसाठी नाशिकमधील एका अल्पवयीन मुलाने घरदार सोडून दिले. तसेच, जन्मदात्या मातेला जीवे मारण्याची धमकीही दिली. ही माता पोलिस दलात सेवेत आहे. तिने मुलाच्या मैत्रिण व तिच्या आई-वडिलांविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल झाला असून, मुलीच्या आई-वडिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांनी दिली.

आईने काबाडकष्टाने वाढवलेला हा मुलगा पूर्ण १७ वर्षांचाही झालेला नाही. तो आई, आजी-आजोबांसह जयभवानीरोडला राहतो. या मातेवरच कुटुंब चालते. गेल्या काही महिन्यांपासून हा मुलगा कुटुंबीयांशी व्यवस्थित बोलत नव्हता. अरेरावीची भाषा करीत होता. आईने विश्वासात घेऊन विचारल्यावर मुंबईतील मुलीशी मैत्री झाल्याचे त्याने सांगितले. आईने समजावून सांगितल्यानंतरही, तो मैत्रिणीचे आई-वडील सांगेल तसेच वागत होता. आपल्या आईशी तो सतत वाद घालू लागला. आईकडे मोठी रक्कम व मोटारसायकलीसाठी तगादा लावत होता. अनेक दिवस तो घरीच येत नव्हता. मुंबईतील या मैत्रिणीच्या घरी मुक्कामी राहत होता.

मुलगा अल्पवयीन असल्याने आईने त्याला समजावून सांगण्याचा अनेकदा प्रयत्न केला. परंतु, त्याने आईला तू मध्ये पडल्यास, तुझा काटा काढीन अशी धमकी दिली.

पैशांसाठी आईवर उगारला चाकू

दि. २३ मार्चला आई रात्री साडेआठला कामावरून घरी आली. मुलाला कोठे होतास अशी विचारणा केल्यावर त्याने वाद घातला व स्वयंपाक घरातील चाकू उगारून पैशांची मागणी केली. तुला संपवून मी मैत्रिणीसोबत या घरात राहणार आहे. तू मध्ये कशी येते बघतोच, असे सांगून आईला ठार मारण्याची धमकी देऊन निघून गेला. तो मैत्रिणीच्या घरी गेल्याचा संशय व्यक्त करून आईने मैत्रिणीसह तिच्या आई वडिलांविरुध्द तक्रार दिली आहे. आपला मुलगा अल्पवयीन असल्याने त्याची दिशाभूल करून मुलीचे आई-वडील माझ्या जीवितास धोका निर्माण करून त्याच्याकडून आर्थिक फायदा करून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुलाला या कुटुंबाने मुंबईतील घरातच ठेवले आहे, असे तीने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी मुंबईला जाऊन मुलीच्या पालकांना नाशिकला आणले आहे. त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगला एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड

भुसावळकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मंगला एक्स्प्रेसच्या एका बोगीची बोलेस्टर लिंक निखळल्याने नाशिकरोड येथे ही गाडी मोठ्या अपघातातून बालंबाल बचावली. सोमवारी सकाळी सातवाजेच्या दरम्यान ही घटना घडली. गाडीतील एसीकंडक्टर विजय मसराम आणि अनिल झा या दोघांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

सोमवारी सकाळी मंगला एक्स्प्रेस मनमाडकडून नाशिकरोडकडे येत असताना गोदावरी नदीवरील पूल ओलांडल्यानंतर इंजिनपासून आठव्या क्रमांकावरील बी २ या बोगीच्या मागील चाकाखालून काहीतरी घासत असल्याचा मोठा आवाज आल्याचे एसी कंडक्टर विजय मसराम यांच्या लक्षात आले. गाडी ६.४० वाजता नाशिकरोड रेल्वे स्टेशनला येऊन थांबल्यावर विजय मसराम यांनी डाव्या बाजूस खाली उतरून बघितले असता, बोगी पूर्णपणे कललेली व बोगी आणि चाकाचे ॲक्सल यांना धरून ठेवणारी बोलेस्टर लिंक निखळून घासत आलेली आढळून आली. बोगी जमीनीला टेकण्यास अवघे काही इंच उरले होते. तोपर्यंत गाडीला हिरवा सिग्नलही मिळाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ चेन खेचून गाडी थांबवली व भुसावळला वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यामुळे गाडी नाशिकरोडलाच थांबविण्यात आली. टेक्निकल स्टाफ हजर झाल्यावर या अपघाताचे गांभीर्य लक्षात आले. उजव्या बाजूकडील बोलेस्टर लिंक निखळली असती तर बी २ बोगी प्लॅटफॉर्मला धडकून मोठा अपघात झाला असता. सुदैवाने हा अनर्थ टळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपट्टी, घरपट्टीची वसुली वाढली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या मूल्यनिर्धारण व करसंकलन विभागाने मार्चचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सुरू केलेल्या मालमत्ताजप्तीच्या नोटिसांची फलश्रुती चांगली झाली असून, यंदा गेल्या वर्षीपेक्षा घरपट्टी व पाणीपट्टीतून महापालिका मालामाल झाली आहे. मार्चअखेरपर्यंत महापालिकेला घरपट्टीतून ८७ कोटी ३४ लाख वसूल झाले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा तब्बल सात कोटींनी वाढ झाली आहे, तर पाणीपट्टीत यंदा विक्रमी वसुली झाली आहे. महापालिकेने यंदाचे उद्दिष्टही पूर्ण केले आहे. पाणीपट्टीचे ४१ कोटींचे उद्दिष्ट असताना महापालिकेच्या तिजोरीत थकबाकीसह तब्बल ४२ कोटी ३५ लाख रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे घरपट्टी आणि पाणीपट्टीने प्रथमच वसुलीचा सव्वाशे कोटींचा टप्पा गाठला आहे.

महापालिकेने मार्चअखेरपर्यंत घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंदा जोरदार मोहीम सुरू केली होती. ९० हजार घरपट्टीच्या थकबाकीदारांना तर ६७ हजार पाणीपट्टीच्या थकबाकीदारांना नोटिसा दिल्या होत्या. सोबतच थकबाकी वसुलीसाठी मालमत्ताजप्तीची मोहीम सुरू केली होती. त्याचा चांगला परिणाम झाला असून, यंदा घरपट्टी व पाणीपट्टीची विक्रमी वसुली झाली आहे. २६ मार्चपर्यंत घरपट्टीची ८७ कोटी ३४ लाखांची वसुली झाली आहे. गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेपर्यंत घरपट्टीतून महापालिकेला ८१ कोटी १३ मिळाले होते. यंदा त्यात सात कोटींची वाढ झाली आहे, तर पाणीपट्टीची वसुली ४२ कोटी ३५ लाखांपर्यंत गेली आहे. गेल्या वर्षी पाणीपट्टीची वसुली २६ कोटी २१ लाख रुपये होती. मात्र, यंदा त्यात तब्बल १६ कोटींनी वाढ झाली आहे. यंदा पाणीपट्टीचे उद्दिष्ट हे ४१ कोटी ठेवण्यात आले होते. अद्याप आठ दिवस बाकी असून, सुटीच्या दिवशीही कार्यालय भरणासाठी सुरू राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक - प्लास्टीक बंदी, अगोदर पर्याय द्या

$
0
0

प्लास्टिक वापरास पर्याय द्या

महाराष्ट्र चेंबरच्या सभेत व्यापारी-उद्योजकांचा ठराव

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने प्रथम प्लास्टिक वापरास पर्याय द्यावा व त्यानंतरच त्यावर बंदी घालावी असा ठराव व्यापारी व उद्योजकांच्या सभेत एकमताने करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने १ एप्रिलपासून राज्यात सर्वत्र प्लास्टिक व कॅरिबॅग वापरास बंदी करणारा आदेश जारी केला आहे. त्या आदेशाच्या अनुषंगाने व्यापारी व उद्योजकांना जाणवणाऱ्या अडचणीबाबत महाराष्ट्र चेंबरने आयोजित सभेत हा ठराव करण्यात आला.

बैठकीत चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, चेंबरचे माजी अध्यक्ष व विश्वस्त खुशालचंद्र पोद्दार, नाशिक प्लास्टिक ट्रेड असोसिएशनचे अध्यक्ष आशिष बाफणा, नशिक प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिअेशनचे अध्यक्ष राहुल कर्नावट, चेंबरचे सचिव चंद्रकांत दीक्षित उपस्थित होते. यावेळी चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी असे स्पष्ट केले की आम्ही सर्व व्यापारी व उद्योजक पर्यावरणाच्या बाजूलाच आहेात, पर्यावरणाला घातक ठरेल अशा प्लास्टिक व थर्माकोलच्या वस्तू वापरू नयेत याबाबत आम्हीही आग्रही आहोत. मात्र, सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेताना व्यापारी, उद्योजकांना विश्वासात घेणे आवश्यक होते. बंदी त्वरित लागू केल्याने व्यापारी व उद्योजकांमध्ये संभ्रम आहे. पॅकिंगला पर्याय दिला नसल्याने मालाची विक्री करणे अवघड झाले आहे. प्लास्टिक व थर्माकोल याला पर्याय द्यावा, त्यानंतरच अंमलबजावणी करावी, ठेास पर्याय दिल्याशिवाय निर्णयास स्थगिती द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सभेत शहरातील नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, सचिव राहुल डागा, धान्य किराणा किरकोळ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शेखर देशपुते, उपाध्यक्ष पटेल, सिडको किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विजय कुलकणी, नाशिक मोटार मर्चंट असोसिएशनचे सुरेश चावला, रेडिमेड होजिअरी मर्चंट असोसिएशनचे प्रवीण चांडक, मसाला उत्पादक संघटना, नाशिक मिठाई उत्पादक संघटनेचे अध्यक्ष मनोज कोटकर, सिमेट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मदन पारख, नशिक ट्रान्सपोर्ट असोसिअेशनचे अध्यक्ष श्रीजयपाल शर्मा, सचिव सुभाष जांगडा, हार्डवेअर मर्चंट असोसिएशनचे मोगरावाला, घाऊक कापड व्यापारी संघटना, चेंबरचे कार्यकारणी सदस्य भावेश माणेक, अंजू सिंगल, संजय खैरनार, राजेश मालपूरे, सचिन जाधव सुनिता फाल्गुणे, सलिम बटाडा, आदी संघटनांचे ५० हून अधिक पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images