Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

ञ्यंबकेश्वर विशेष प्रतिनिधी

0
0

००००००

दोन गाडीचालक

अपघातात ठार

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

नाशिक-त्र्यंबक मार्गावर दोन वाहनांच्या समोरासमोरील अपघातात दोन्ही गाडीचालक ठार झाले. खंबाळे येथील वाहनतळाजवळ सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

नाशिकहून मोखाड्याला जात असलेली कार (एमएच ०४  एचयू १६०४) आणि नाशिककडे रिकामे कॅरेट घेऊन जाणारा छोटा टेम्पो (एमएच ४८ ए वाय १८३५) यांची खंबाळे शिवारात समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्हीही वाहनांचे चालक ठार झाले. तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले. सुरेश धोंडू ठोंबरे (वय ३९, रा. आनंद हेरिटेज, कामटवाडा, अंबड) असे ठार झालल्यांपैकी कारचालकाचे नाव आहे. टेम्पोचालकाचे नाव समजू शकले नाही. जखमींमध्ये शामराव पुंडलिक नवसात (४५) , सुवर्णा सुरेश देवरे (४५), किरण सोमनाथ देवरे (३४, सर्व रा. कामटवाडा) व  दिलीप शामराव शिंपी (५१, रा. सातपूर) यांचा समावेश आहे. त्यांना नाशिकमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अपघातात कार चक्काचूर झाली. टेम्पोच्याही पुढील भागाचे नुकसान झाले आहे. त्र्यंबक रस्त्यावर दुभाजक असताना अपघात झालाच कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. छोटा हत्ती दुभाजकाच्या पलीकडे जाऊन कारवर आदळला आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवीकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलिस हवालदार कोरडे करीत आहेत.

--

केशव वाळू ढोन्नर

 ञ्यंबकेश्वर जि.नाशिक

9822816242

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सटाण्यात शेतकरी आत्महत्या

0
0

जिल्ह्यातील १९ वी तर तालुक्यातील तिसरी घटना

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, सटाणा तालुक्यातील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला सोमवारी प्राप्त झाला आहे. शेतकरी आत्महत्येची ही गेल्या १० दिवसांमधील चौथी घटना असून, या वर्षातील सटाणा तालुक्यातील ही तिसरी शेतकरी आत्महत्या आहे.

आनंदा बापू चौरे (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पिंपळगाव माळ जवळील तताणी गावचे ते रहिवाशी आहेत. २४ मार्च रोजी पहाटे त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सकाळी उघडकीस आले. सोमवारी सटाणा तहसीलदारांकडून याबाबतचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. आनंदा चौरे यांच्या वडिलांच्या नावे शेती आहे. जिल्ह्यात चालू वर्षात १९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. सटाणा तालुक्यात चालूवर्षी अशोक दगा काकुळते (वय ५३, रा. कंधाणे), कृष्णा भावराव वाघ (वय ५३, रा. निकवेल) यांनी आत्महत्या केली आहे. जिल्ह्यात चालू वर्षात घडलेल्या शेतकरी आत्महत्येच्या १९ घटना घडल्या असून, यापैकी नऊ शेतकरी कुटुंब सरकारकडून मिळणाऱ्या एक लाख रुपयांच्या मदतीस अपात्र ठरले आहेत. तर सहा कुटुंब मदतीस पात्र ठरले असून चार प्रकरणे पुढील बैठकीत निर्णयासाठी ठेवण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरण

0
0

ग्रामपंचायतींकडे १६२ कोटींची थकबाकी

वीजबिले भरण्याचे महावितरणकडून आवाहन

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महावितरणच्या नाशिक परिमंडळात ग्रामपंचायतींकडे पथदिव्यांच्या वीजदेयकापोटी चार हजार ८७८ वीजजोडण्यांचे तब्बल १६२ कोटी रुपये थकीत आहेत.

शासनाच्या ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना राज्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवरील विजेच्या दिव्यांच्या थकीत देयकांबाबत निर्देश दिले आहेत. राज्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवरील दिव्यांची बहुतांश बिले थकीत असल्याचे दिसून आले आहे. सदर थकीत बिलांसाठी महावितरण विद्युत कंपनी वीजजोडणी खंडित करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी गैरसोय टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या स्वनिधीतून, चौदावा वित्त आयोग किंवा इतर निधीतून ही थकीत बिले भरावीत व त्याबाबतची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत शासनास पाठविण्यात यावी, असे महावितरणने जारी केलेल्या पत्रात निर्देश दिले आहेत.

..

नाशिक मंडळ स्थिती

ग्रामपंचायत.......पथदीप जोडण्या .... थकीत रक्कम (रुपये)

नाशिक ग्रामीण......९९८.......३८ कोटी ७१ लाख

चांदवड विभाग.......३३८.......१२ कोटी ८४ लाख

नाशिक शहर.......३८४.......दोन कोटी २२ लाख

एकूण.......१,७२०.........................५३ कोटी ७८ लाख

..

मालेगाव मंडळ स्थिती

ग्रामपंचायत.......पथदीप जोडण्या .... थकीत रक्कम (रुपये)

कळवण विभाग....२५६............७ कोटी २६ लाख

मनमाड विभाग....२७१.........५ कोटी ७९ लाख

मालेगाव विभाग....२६६......५ कोटी ५९ लाख

सटाणा विभाग.....२२८....४ कोटी ७९ लाख

एकूण.....१,०२१.......२३ कोटी ३२ लाख

..

अहमदनगर मंडळ स्थिती

ग्रामपंचायत.......पथदीप जोडण्या .... थकीत रक्कम (रुपये)

अहमदनगर ग्रामीण.......४५४.......२५ कोटी १ लाख

कर्जत विभाग.......६२९..............२३ कोटी ६० लाख

संगमनेर विभाग.......४२८.......१२ कोटी ४७ लाख

श्रीरामपूर विभाग.......७.......१ लाख ६२ हजार

एकूण.......२,१३७.......८४ कोटी ६१ लाख

..

स्थानिक स्वराज्य संस्थानी अखंडित वीजसेवेसाठी सरकारच्या ग्रामविकास विभागाकडून प्राप्त निर्देशानुसार त्यांच्या स्वनिधी, चौदावा वित्त आयोग किंवा इतर निधीतून पथदिव्यांचे चालू व थकीत वीजदेयके भरून सहकार्य करावे

- दीपक कुमठेकर, मुख्य अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

…रंगभूमीने दिला जोडीदार…...

0
0

कोणती गोष्ट कुणाला काय देऊन जाईल हे सांगता येत नाही, आपल्याच क्षेत्रातला जोडीदार मिळाला तर सोन्याहून पिवळे. काहींना खेळाने जोडीदार दिलेत, काहींना नोकरीने, तर काहींना रंगभूमीने जोडीदार दिलेत. हे जोडीदार त्यांना कसे मिळाले, हे त्यांच्याच शब्दांत…...

'योगायोगा'चा जीवन नाट्यारंभ

प्रसंग १ :

एनडीसीए संगीत नृत्य समारोह. वर्ष १९८१-८२ (नीटसे स्मरत नाही. कारण, आठवतो तो फक्त एक चेहेरा!)

पं. जितेंद्र अभिषेकींचे गाणे संपते. मागे तानपुऱ्यावर साथीला बसलेला मी स्टेजवरून बाहेर येतो. समोर काही युवा कलाकार पुढील नृत्याच्या कार्यक्रमासाठी आलेल्या पं. बिरजू महाराजांना बघण्यासाठी थांबलेले. त्यातील एक नजरेत भरणारी युवती मात्र आठवत राहते.

(काही काळ लोटलेला...)

वर्ष १९८३, मोसम पावसाळी, दिवस पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचे.

एकांकिका 'चिमणीचे मत कुणाला' लेखक अर्थात, विवेक गरुड. दिग्दर्शक अर्थात, मी.

मी सूत्रधाराची भूमिकाही करीत होतो. नटी हवी होती. शोध सुरू होता...

प्रसंग २ :

वेळ दुपारच्या चहाची. संभाव्य नटीच्या म्हणजे विद्या दांडेकर- सध्याच्या विद्याहरीच्या, घरात.

तिच्या वडिलांचा पहिला प्रश्न : चार दिवसांत कसे करणार नाटक?

मी धिटाईने उत्तरलो : हल्ली चार दिवसांत नाटक बसते. अनुभव बराच आहे मला आणि ही नवी पिढी खूप हुशार झाली आहे. त्यातून विद्या एक डान्स परफॉर्मर आहे.

(मी दिग्दर्शकाच्या भासात उत्तरलो. अंदर की बात कशी सांगणार? आधीची नटी गायब झाली वगैरे.......वडील इंप्रेस्ड!)

प्रसंग ३ :

(बाजूच्या रूमचा दरवाजा उघडत दुपारच्या झोपेतून उठून नटीची एन्ट्री. मेरे मेहेबूबच्या साधनासारखी).

बॅकग्राऊंडला गाणे नसतानाही ऐकू येऊ लागलेले...

ऐ हुस्न जरा जाग तुझे इश्क जगाये

बदले मेरी तकदीर जो तू होश में आये...

प्रसंग ४ :

कॉलेजरोड, मलेरिया स्टॉप. सूत्रधार अर्थात, मी कंपनीतून सुटी घेऊन भरदुपारचा प्रॅक्टिसला निघालेला.

स्कूटर कॉलेजरोडवरून चाललेलो. नटी बसची वाट पाहत आहे. नेहमीप्रमाणे बस नाहीच.

भेटीचा योगायोग. नटी थोडे ओढेवेढे घेऊन स्कूटरवर बसते...

(बॅकग्राऊंडला गाणे ऐकू येऊ लागलेले, भर दुपारी.)

दिलके फसाने, दिल भी न जाने

तुमको सजन, दिलकी लगन, कैसे बताये

ठंडी हवाए लहराके आएँ...

प्रॅक्टिस सुरू... नाटकाची हो..!

पसंती लाभली पुरुषोत्तमची

सुरुवात यशस्वी नाटकाची!

-सुनील देशपांडे, लेखक-दिग्दर्शक

--------------------------

नाटकातील स्वयंवर.. जीवनातील साथ...

असं म्हणतात, की लग्नाच्या गाठी या स्वर्गातून बांधल्या जातात आणि आपण या जगाच्या रंगभूमीवरील कलाकार केवळ आपापल्या भूमिका करीत असतो. असाच काहीसा योग आमच्याबाबतीत आला.

१९७८ च्या राज्य नाट्य स्पर्धेत 'कला-अर्घ्य'ने प्रा. श्रीरंग गुणे लिखित, रामदास बरकले दिग्दर्शित 'रामलीला' हे नाटक सादर केले होते. पौराणिक रामायण नाट्यरूपात सादर करणाऱ्या कलाकारांच्या कौटुंबिक जीवनात घडणारे रामकथेशी साम्य असलेले अनेक प्रसंग घडत जातात आणि एक आगळेवेगळे नाट्य कसे घडते, हे त्या नाटकात दाखवले होते. त्या नाटकाचा नायक हा रामकथेतीलही नायक राम असतो आणि नायिका ही रामकथेतीलही सीता असते. रंगमंचावर रामाची भूमिका केली होती यशवंत जोशीने, तर सीतेची भूमिका केली होती मी, सुहास जोशी म्हणजे पूर्वाश्रमीची रोबा ऊर्फ रोहिणी बापटने.

प्रयोगाच्या दिवशी साईखेडकर नाट्यगृहावर प्रत्यक्ष विवाह सोहळ्याचे वातावरण निर्मिले होते. त्यासाठी नाट्यगृहाच्या फलकावर स्वयंवराची सुंदर पत्रिकाच रंगवली होती. प्रवेशद्वार केळीचे खांब लावून सुशोभित केले होते. तुतारीवाले स्वागत करीत होते. प्रेक्षागृहात सनईचे सूर वाजत होते. प्रेक्षकांना अक्षताही वाटल्या होत्या. रंगमंचावर शिवधनुष्य भंगून आम्ही रामायणातील स्वयंवराचे प्रेक्षकांना दर्शन घडवले. त्यावेळी मी चित्रकला महाविद्यालयात शिकत होते. नेहमी काहीतरी वेगळे करण्याची माझी आवड होती. त्या वर्षी दसऱ्याला मी आपट्याची पाने वाटली होती. पण, त्यांना सोनेरी रंग लावून ती वाटली होती. त्या सोनेरी पानांनी यशवंतची व अधिक माझी ओळख ही घडवली. 'रामलीला' नाटकातील भूमिकांनी ती घट्ट केली. कला-अर्घ्यच्या वर्धापनदिनी आम्ही साखरपुडा केला व पुढे आम्ही जीवनसाथी झालो. योगायोग म्हणजे संस्थेने अनेक नाटके बसवली, पण आम्हा उभयतांची भूमिका असलेले हे एकमेव नाटक होते, त्यापुढे खरेखुरे जीवननाट्य...

-सुहास जोशी, अभिनेत्री

-------------------

सहजीवनाचा 'चंदेरी' प्रारंभ

माझी आणि दीपकची भेट एका नाटकात झाली, नाटकाचे नाव 'चंदेरी'. नाशिकला या नाटकाचे प्रयोग होणार होते. पण, नाटकाची हीरोइन दोन दिवस आधी नाही म्हणाली म्हणून नवीन प्रोफेशनल अभिनेत्री घेण्याचे ठरवले आणि मी ते नाटक केले, तेव्हा प्रथम आमची भेट झाली. मी त्यावेळी म्हणजे १९८६ मध्ये मुंबईत व्यावसायिक अभिनेत्री म्हणून काम करीत होते. त्या नाटकामुळे आमची मैत्री झाली आणि पुढे १९८७ मध्ये आम्ही लग्न केले. त्यावेळी दीपक नाशिकमध्ये क्रॉम्प्टनला काम करीत होता, म्हणून मी मुंबई सोडून नाशिकला आले आणि आम्ही इथेच स्थायिक झालो. नाशिकला आल्यावर आम्ही बरीच नाटके, एकांकिका, आकाशवाणी व इतर कार्यक्रम केले. मी वृत्तपत्रांत नोकरी करू लागले. पण हौशी, प्रायोगिक नाटके मात्र सुरूच होती. लग्नाआधी मी 'आईशपथ', 'निष्पाप', 'भ्रमाचा भोपळा', 'वट वट सावित्री', 'ब्रह्मचारी' अशी प्रोफेशनल नाटके करीत होते. नाशिकमध्ये राहून तेव्हा व्यावसायिक नाटके करणे शक्य नव्हते. फक्त घर आणि संसार असेच चालू होते. दरम्यान, आमच्या दोन मुलांचा जन्म झाला. वैदेही आणि वर्धन. पुढे दीपकला अमेरिकेत नोकरी मिळाली आणि आम्ही सगळेच अमेरिकेत स्थायिक झालो. दहा वर्षे अमेरिकेत राहून इथे परत आल्यावर खऱ्या अर्थाने आमची सेकंड इनिंग सुरू झाली. इथे आल्या आल्याचं आमचं दोघांचं व्यावसायिक नाटक 'त्या एका वळणावर' खूप गाजले. दीपकला झी गौरव, मटा सन्मान, राज्य नाट्य व इतर बक्षिसे मिळाली. या क्षेत्रात त्याचं नाव होऊ लागल. नंतरही बरीच नाटके व चित्रपट आम्ही एकत्र केले. 'जोगवा' हा चित्रपट, 'प्रेमाच्या गावा जावे, 'भय इथले संपत नाही', 'कसाब आणि मी' इत्यादी नाटके केली. याव्यतिरिक्त अनेक सीरियल्स व चित्रपट केले आहेत. त्यात मी केलेल्या शुभंकरोती, हे बंध रेशमाचे, विवाह बंधन, तू तिथं मी, पुढचे पाऊल, रुंजी, महासंग्राम, लगोरी, अस्मिता, हंड्रेड डेज, तुझ्यावाचून करमेना आणि सध्या सुरू असलेली 'राधा प्रेम रंगी रंगली', चित्रपट जोगवा, वंशवेल, भेट, नासुर, अरुणा ६७, कृतांत, दीपकने केलेल्या सीरियल्स लक्ष्मणरेषा, अग्निहोत्र, अमरप्रेम, पुढचं पाऊल, देवयानी, लगोरी आणि फुलपाखरू, चित्रपट जन्म, जोगवा, बदाम राणी गुलाम चोर, अकिरा, हीरोईन, शूटर, नाटके गांधी आणि सावरकर, दोघांमधले नाते, अर्धसत्य आदींचा समावेश आहे.

-विद्या करंजीकर, अभिनेत्री

---------------------

नाटकाने दिलेली देणगी

माझा नाट्यप्रवास सुरू झाला तो शालेय जीवनापासून. खरं तर आमच्या घराण्यात कुणी तोंडाला रंग लावलेला मला तरी आठवत नाही. त्यामुळे वारसाहक्काने मिळालेली ही देणगी निश्चित नाही. पण, मग माझ्यात नाटकाची आवड कशी निर्माण झाली हे सांगता येणार नाही. मी १९६३ मध्ये प्रथम तीनअंकी नाटक केले आणि तिथूनच माझा नाट्यप्रवास जोरात सुरू झाला. १९६८ मध्ये मी व उपेंद्र दाते, दोघांनी मिळून संस्था काढली. नाव ठेवलं नाट्य नम्रता. येथूनच माझ्या प्रवासात अनेक वळणे आली. खरं तर मला नाटक खऱ्या अर्थाने समजू लागलं. नाटकाच्या अभ्यासाची भूक वाढू लागली आणि त्याच वेळी मला कै. बाबुराव सावंत यांच्यासारखा गुरू मिळाला. ही पहिली कलाटणी. नंतर संस्थेच्या आग्रहाखातर प्रथम दिग्दर्शक व मग प्रकाशयोजनाकार बनलो. एव्हाना नाटक माझ्यात भिनू लागलं होतं. १९७४ मध्ये 'वासनाचक्र' ही एकांकिका दिग्दर्शित करताना माझी रोहिणी देशमुख हिच्याशी ओळख झाली. त्याचवेळी उपेंद्रची 'रंगमंच' ही व्यावसायिक संस्था सुरू झाली होती व 'रायगडाला जेव्हा जाग येते' हे नाटक करायचे ठरले. यात रोहिणी भूमिका करीत होती व मी प्रकाशयोजना करीत होतो. त्यामुळे सहवास वाढू लागला. पुढे सहवासाचं मैत्रीत आणि मैत्रीचं प्रेमात रुपांतर कधी झालं ते आम्हा दोघांनाही कळलं नाही. १९७६ मध्ये आमचा प्रेमविवाह झाला. ही मला नाटकाने दिलेली दुसरी देणगी. पुढे आम्ही बरीच नाटकं, एकांकिकांत बरोबर कामं केली. हे सगळं होत असताना आयुष्यात स्थैर्य नव्हतं. ३/४ वर्ष मी नोकरीनिमित्त भिवंडी व मुंबईला काढली. परिस्थिती बेतासबात होती, तरी नाटक सुरूच होतं आणि १९८० मध्ये मी मायको कंपनीत नोकरीला लागलो आणि कंपनीच्या मायको फाइन आर्टसतर्फे नाटक करू लागलो. ही नाटकांनी दिलेली आणखी एक देणगी. पुढे स्थैर्य आल्यामुळे नाटक जोमाने सुरू झालं ते आजतागायत सुरू आहे. एकूणच नाटकामुळे मला रोहिणीसारखी पत्नी, मायको कंपनीत नोकरी, प्रसिद्धी, मोठमोठ्या लोकांच्या ओळखी, मानसन्मान सर्व काही मिळाले. नाटक हा माझ्या जीवनातला अविभाज्य घटक आहे.

-रवींद्र ढवळे, दिग्दर्शक

----------------------

...अन् विवाहबंधनात अडकलो

१९७४ साल. महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव. बाळ भाटे सरांनी लिहिलेलं 'आर्टिस्ट युनायटेड' या संस्थेचं, 'ही एक धर्मशाळा' हे नाटक. दिग्दर्शक कुमुदताई अभ्यंकर. 'शास्त्रीबुवा' एक इतिहास संशोधक आजोबा या भूमिकेसाठी माझी निवड. मी २३ वर्षांचा, भूमिकेचं वय ८५! या नाटकानंतर हे आजोबा आणि ती नात विवाहबंधनात अडकले. २५ नोव्हेंबर १९७६ ला आम्ही विवाहबद्ध झालो. आज बेचाळीस वर्षे झालीत. दोघेही समाधानी आहोत. एकमेकांच्या कल्पना सांभाळत उणिवा भरून काढत आनंद वाटत वाटचाल करीत आहोत. ही सर्व नाटकाचीच देणगी आहे असं मी म्हणेन.

नाटकाने आम्हाला अजूनही बरंच काही दिलं. नाटकाने आम्हाला परस्परांच्या भूमिकेत जाऊन एकमेकांना समजून-सांभाळून घेणं शिकवलं. किरकोळ मतभेदांत समन्वय साधायची दीक्षा दिली. अनेक नाट्य लेखकांचे उत्तम विचार आणि दिग्गज दिग्दर्शकांद्वारे आशय आकलनाची दृष्टी दिली. नाटकानं आदर्श टीमवर्कची सवय लावली. मीपण विसरून कामात एकाग्र-एकरूप व्हायला बिंबवलं. परकाया प्रवेश शिकवला. व्यक्तिमत्त्व ओळखता येऊ लागली. त्यामुळे मित्र, नातेसंबंध, माणसं जपता आली. यश आणि अपयश पचवायची सवय लावली. धैर्य वाढवलं. वक्तृत्व बहाल केलं. कर्तृत्व सकस केलं. आचरणातली लोकाभिमुखता वाढवली. ओघाने लोकसंग्रह आपोआप वाढला.

अगत्य अंगवळणी पडलं. ज्या भूमिका वठवल्या त्यातून आपल्याला शोभणारी वेषभूषा, केशभूषा, शब्दांचे उच्चार, हावभाव, चालणं, बोलणं, उठणं, बसणं कसं असावं किंवा कसं नसावं हे कळालं. शरीरसौष्ठव घडवायला आणि जपायला शिकवलं. त्यासाठी नियमित व्यायामाची सवय लावली. आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढायला शिकवलं. क्षणात मूड बदलायला, व्यक्तिगत व्यथा, अडचणी झाकून सर्वसमावेशक अभिनित व्हायला शिकवलं.

नाटकाने घराची नेटकी सजावट आकर्षक करताना अनावश्यक गोष्टींचा वापर कसा आणि का टाळायचा याचा संस्कार दिला. नेहमी वापरले जाऊ शकणारे साहित्य सहज हाताशी येईल असं मांडायला शिकवलं. जिथली वस्तू तिथंच ठेवायची सवय नाटकानंच जडवली. शरीराचं वय वाढलं तरी मन तरुण ठेवलं. जगणं समृद्ध केलं. आमच्या बऱ्याचशा आवडीनिवडी भिन्न आहेत. पण, तीच खरी आमची परस्परपूरकता आहे. अजून काय हवं असतं माणसाला? याहून काय असतो सुखी संसार?

-सी. एल. कुलकर्णी, अभिनेता

---

शब्दांकन : फणिंद्र मंडलिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीपाला घसरला; शेतकरी वैतागला

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

घोटी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात टोमॅटो, फ्लॉवर, वांगी, काकडीची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने भाजीपाल्याचे दर कोसळले आहेत. लाखो रुपये खर्च करून उत्पादित केलेल्या बागायती भाजीपाला पिकाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी संताव व्यक्त केला आहे. टोमॅटो, फ्लॉवरला दीड ते दोन रुपये दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही.

घोटी बाजार समितीत जिल्ह्यातील सर्वाधिक भाजीपाला आवक होतो. हा भाजीपाला चार-पाच तासात थेट मुंबईला जात असल्याने या बाजार समितीतील भाजीपाल्याला मोठी मागणी असते. गेल्या काही दिवसांपासून या बाजार समितीत मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने भाजीपाल्याचे दर कमालीचे कोसळले आहेत. भाजीपाल्याचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. टोमॅटोला दोन रुपये किलो, फ्लावर व कोबिचा कंद दीड ते दोन रुपये नगाने जात असल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा हजारांची लाच घेतांना दोघांना अटक

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

वार्षिक लेखा परीक्षणात कोणतेही आक्षेप नोंदवू नये किंवा वसूल केलेल्या पाणीपट्टी पावत्यांबाबत कोणतीही हरकत घेऊ नये यासाठी नांदगाव

पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून दहा हजार रुपयांची लाच घेताना कनिष्ठ लेखा परीक्षक आणि शिपाईला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सोमवारी नांदगाव येथे अटक केली. नाशिक येथील कनिष्ठ लेखा परीक्षक संजय बुरकुल व पालिकेचे शिपाई राजेंद्र पाटील यांचा समावेश आहे. नांदगाव नगरपालिकेच्या संबंधित वसूल केलेल्या  पाणीपट्टी बिलासंदर्भात वार्षिक लेखा परीक्षणात कोणतेही आक्षेप वा हरकत घेऊ नये यासाठी बुरकुल यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याची  तक्रार लाचलुचपत खात्याकडे आली होती. त्यानुसार 'लाचलुचपत'च्या अधिकाऱ्यांनी सोमवारी नांदगाव येथे सापळा लावून दहा हजार रुपये घेताना शिपाई पाटील यांना पकडले. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करून नांदगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस वसाहतीत पाण्यासाठी वणवण

0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच शहरातील पोलिस वसाहतीला टंचाईने ग्रासले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील स्नेहबंधन पार्क येथे गुढीपाडव्यापासून अपुरा पाणीपुरवठा होत असून, गेल्या तीन दिवसांपासून तर तो बंदच झाला आहे. त्यामुळे पोलिस कुटुंबीयांचे प्रचंड हाल होत आहेत. मात्र, या समस्येची दखल लाइन सार्जंट व इतर अधिकाऱ्यांनी अद्यापही घेतलेली नाही.

गुढीपाडव्यापासून स्नेहबंधन पार्क पोलिस वसाहतीत दिवसाकाठी एकवेळ पाणी पुरवठा बंद होता. मात्र, तीन दिवसांपासून येथील पाणीपुरवठा बंदच झाला आहे. त्यामुळे त्रस्त रहिवाशांनी पाणीपुरवठा का होत नाही याबाबत लाइन सार्जंट यांच्याकडे विचारणा केली, तेव्हा वसाहतीत पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभातील व्हॉल्व्ह खराब झाला आहे, पाणी इमारतींच्या टाकीमध्ये खेचणारी मोटार खराब झाली आहे, पाइपमध्ये कचरा अडकला आहे, वरिष्ठांकडे माहिती दिली असून, प्रस्ताव मंजूर झाल्यावर पुरवठा सुरळीत होईल, अशी विविध उत्तरे रहिवाशांना देण्यात आली. ही वसाहत सरकारी असल्याने पीडब्ल्यूडीनेदेखील या समस्येची दखल घेत नसल्याचे रहिवाशांनी सांगितले. या वसाहतीत सुमारे १८० पोलिस कुटुंबीय राहतात. सकाळी पोलिस कर्मचाऱ्यांना ड्युटीवर जाण्याची घाई असते. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. मात्र, पाणीच येत नसल्याने महिलांना सकाळपासूनच पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. वसाहतीत तीनच सार्वजनिक नळ असल्याने तेथे पाणी भरण्यासाठी मोठी गर्दी होते. इमारतीत तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर पाणी वाहणे शक्य होत नसल्याने सार्वजनिक नळावरच धुणीभांडी करावी लागत असल्याच्या तक्रारी आहेत.

मुलांच्या परीक्षा सुरू असून, नेमका याच काळात पाणीपुरवठा होत नाही. पाणी नसल्याने सार्वजनिक नळावरून पाणी चौथ्या मजल्यावर नेणे त्रासदायक होत आहे. लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागायला हवा.

-सुभद्रा बोडके, रहिवासी

सार्वजनिक नळावरून चौथ्या मजल्यावर पाणी न्यावे लागते. दिवसरात्र पाणी भरावे लागत असल्याने शारीरिक त्रास होत आहे. या समस्येकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे सर्व रहिवासी त्रस्त झाले आहेत.

-मनीषा कासार, रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुक्त विद्यापीठाने भवितव्याचा विचार करावा

0
0

डॉ. राम ताकवले यांचा इशारा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारने पारंपरिक विद्यापीठांना मुक्त शिक्षण देण्याविषयी सूचना केल्या असून, हा निर्णय दूरशिक्षण देणाऱ्या मुक्त विद्यापीठांच्या मुळावर येणारा आहे. मुक्त विद्यापीठांचे कार्य मुक्त शिक्षण देणे हा असून, पारंपरिक विद्यापीठ त्यांना स्पर्धेसाठी उतरले तर 'मुक्त'ला शिक्षण देण्याच्या पध्दतीत बदल करावा लागणार असल्याचे प्रतिपादन डॉ. राम ताकवले यांनी केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे डॉ. राम ताकवले यांना डी. लीट प्रदान करण्यात आली त्यावेळी सन्मानाला उत्तर देताना ते बोलत होते. डॉ. ताकवले पुढे म्हणाले की, डिजिटल युगातील मुक्त विद्यापीठाची शिक्षणप्रणाली व समाजपद्धती सहकारावर, सहजीवनावर व नैसर्गिक आणि आत्मिक विकासावर आधारली गेली, तर ते विद्यापीठ चांगले 'लोकविद्यापीठ होईल. त्यातील शिक्षणाचे मार्ग व सध्या हे औद्योगिक युगापेक्षा भिन्न समाजाच्या विकासावर व उन्नतीवर आधारलेले असावे. त्यातून आपले खरे स्वराज्य व स्वनियंत्रित समाज विकसित होईल. दूरशिक्षण पध्दतीसमोरील सध्याची आव्हाने पाहता मुक्त शिक्षणाचा नवा मार्ग शोधावा लागेल, असे सांगून आता पुन्हा एकलव्याची शिक्षणपद्धती आणावी लागेल असेही स्पष्ट केले.

नवे शिक्षण नव्या मार्गाने देण्याची वेळ जवळ आली असून, एकलव्याचा मार्ग अवलंबावा लागणार आहे. तो स्वअध्ययनातून ज्या पातळीवर गेला त्या पातळीवर जाऊन मुक्त विद्यापीठाला शिक्षण द्यावे लागणार आहे. तशी शिक्षणपध्दती आपण निर्माण करणे ही काळाची गरज असून, येत्या पाच ते सहा वर्षात नवे विद्यापीठ निर्माण करावे लागणार आहे, असेही डॉ. ताकवले म्हणाले.

रोबोट करणार कामे

सन २०३५ मध्ये सर्व कामे रोबोट करणार असून, माणसांच्या नोकऱ्या जाणार आहेत. त्यांना करण्यासाठी कामच शिल्लक राहणार नाही. स्मार्ट फोन ही त्याची नांदी आहे. यातून पुढे आता ड्रोन काम करणार आहेत. हे युगांतर आहे, आपल्याला काही गोष्टी टाळता येणार नाही त्यातलीच तंत्रज्ञान ही गोष्ट आहे, असेही डॉ. राम ताकवले यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


४३ हजारांची बोली

0
0

नाशिक : शहरातील जलतरण तलावावरील स्विमिंग सूट विक्रीसाठीच्या जागांच्या लिलावातून महापालिका मालमाल झाली असून, स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाच्या जागेवर महापालिकेला रेकॉर्डतोड महसूल मिळाला आहे. येथील पाच बाय पाच जागेसाठी एका महिन्याला तब्बल ४३,४०० रुपयांची बोली लागल्याने कर विभागही थक्क झाला आहे. महापालिकेने या जागेसाठी दीड हजारांची बोली ठेवली असतानाच, चक्क ४३ हजारांची बोली मिळाल्याने महापालिकेचे अधिकारीही चक्रावले असून, लिलावाची खातरजमा सुरू केली आहे.

००००००००००००००००

महापालिकेच्या जलतरण तलावात स्विमींग सूटच्या जागेसाठी दरवर्षी लिलाव काढले जातात.पालिकेच्या पाचपैकी चार ठिकाणांची बोली रविवारी काढण्यात आली. स्वातंत्रवीर सावरकर जलतरण तलावासह नाशिकरोड येथील राजमाता जिजाऊ, सिडकोतील विवेकानंद व सातपूर जलतरण तलावावर स्विमिंग सुट जागेच्या विक्रिसाठी लिलाव घेण्यात आले. आतापर्यंत दिड ते अडिच हजार रुपयांना विकल्या जाणाऱ्या स्वातंत्रवील जलतरण तलावाच्या जागेतून पालिकेला मासिक तब्बल ४३ हजार ४०० रुपयांचा लिलाव मिळाला आहे. चार महिन्यांसाठी ही बोली लावण्यात आल्याने या अनपेक्षित बोलीने पालिकेचे अधिकारी चक्रावून गेले होते. सावरकर जलतरण तलावावर फरिद शेख यांनी मासिक ४३ हजार ४०० रुपयांना एप्रिल, मे, ऑक्‍टोंबर व नोव्हेंबर महिन्यांसाठी लिलाव घेतले आहे. यातून दोन लाख तीन हजार रुपये चार महिन्यांचा महसुल पालिकेला मिळणार आहे. अवघ्या पाच बाय पाच जागेतून लिलाव खरेदीदार कसे उत्पन्न घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिकरोड जलतरण तलावाचा लिलाव २३०० तर सिडको येथील लिलाव अडिच हजार रुपयांना गेला. सातपूर जलतरण तलावासाठी झालेल्या बोलीत कोणीचं सहभागी झाले नसल्याने येथील जागा जैसे थे ठेवण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक - जिल्हा परिषद

0
0

जिल्हा परिषदेच्या नादुरुस्त

शाळांचा अहवाल पाठविण्याच्या सूचना

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेच्या कामांना कमी वेळेत वेग देण्यासाठी नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा वापर सुरू केला आहे. गेल्या महिनाभरात त्यांनी चार ते पाच वेळा या तंत्राचा वापर केला आहे. त्यामुळे कामांनाही गती मिळाली आहे. गिते यांनी सोमवारी जिल्ह्यातील शाळा दुरुस्ती विषय घेऊन त्यावर अधिकाऱ्यांनी सूचना केल्या. या वेळी गटशिक्षण व गटविकास अधिकाऱ्यांना अहवाल पाठविण्याचेही निर्देश दिले. या कॉन्फरन्समध्ये बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनीही सहभाग घेतला. या सर्व अधिकाऱ्यांचा समन्वय साधत त्यांनी प्रत्यक्ष शाळेवर जाऊन शाळेच्या दुरुस्तीसंदर्भात पाहणी करण्याचे सांगितले. या शाळांना आवश्यक असल्यास तत्काळ दुरुस्तीसंदर्भात अहवाल पाठविण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यातील जिल्हा परिषेदेच्या प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीबाबत अनेक वेळा सदस्यांकडून मागणी केली जाते, तर नागरिकांकडूनही शाळांच्या दुरुस्तीसंदर्भात अनेक तक्रारी असल्याने त्याची दखल गिते यांनी घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोजगाराचा टक्का घटला

0
0

२० हजार उद्योगांमधून फक्त २ लाख तरुणांना नोकरी

Gautam.Sancheti@timesgroup.com

Tweet : sanchetigMT

नाशिक : उद्योगातून रोजगार मिळावा यासाठी सर्वत्र प्रयत्न केले जात असले तरी जिल्ह्यातील नोंदणीकृत २० हजार उद्योगांमुळे फक्त २ लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. जिल्ह्यातील ६१ लोकसंख्येच्या तुलनेत ती ३.५ टक्के आहे. यामुळे येत्या काळात येणाऱ्या नव्या उद्योगांतून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे.

नव्या उद्योगांसाठी एमआयडीसी जिल्ह्यात विविध ठिकाणी जागा संपादीत करत असली तरी १५ हजार उद्योग हे खासगी व सहकार तत्वावर चालणाऱ्या ठिकाणी आहे. तर चार हजाराच्या आसपास हे उद्योग एमआयडीच्या जागेवर सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात सातपूर, अंबड, सिन्नर, दिंडोरी, मालेगाव, विंचूर, पेठ या ठिकाणी एमआयडीचे भूखंड असून त्याची संख्या ४,२०० च्या आसपास आहे. त्यातील २,८३१ भूखंड हे नाशिकमध्ये तर १,१२१ भूखंड हे सिन्नरमध्ये आहे. यातील काही उद्योगांनी मोठ्या प्रमाणात रोजगार दिला असला तरी काही उद्योग मात्र क्षमतेनुसार सुरू नाही. तर काही ठिकाणी फक्त जागा अडवून ठेवल्याचेही तक्रारी आहे. एमआयडीसीप्रमाणे जिल्ह्यात सहकार तत्वावर नाशिक, सिन्नर, पिंपळगाव, ओझर, मालेगाव, मनमाड, कळवण येथे उद्योग असून त्याची संख्याही पाचशेच्या आसपास आहे. त्यात नाशिकमध्ये नाईस ही सर्वात मोठी सहकारी औद्योगिक संस्था आहे. जिल्ह्यातील या सहकारी औद्योगिक संस्थांनी ४५ हजार रोजगार दिला आहे. इतर उद्योग मात्र खासगी जागेवर असून त्यांनाही औद्योगिक क्षेत्रात बळकटी दिली आहे.

मायक्रो उद्योगातून मोठा रोजगार

एकूण २० हजार उद्योगांपैकी मायक्रो उद्योगांची संख्या ही १३ हजार आहे. तर छोटे उद्योग ५ हजार ९६१, मध्यम ६६ व मोठे उद्योग १९१ च्या आसपास आहे. या सर्व उद्योगांपैकी उद्योग हे सूक्ष्म उद्योगातून ८५ हजार ५८५ रोजगार मिळाला आहे. तर छोटे उद्योगामधून ६३ हजार ५१७ रोजगार मिळाला आहे. तसेच मध्यम उद्योगातून ६ हजार ४३० आहे. मोठ्या उद्योगांनी ४६ हजार ४१ रोजगार दिला आहे.

रोजगाराला हवी प्राथमिकता

जिल्ह्यात मोठे उद्योग यावे व मोठी गुंतवणूक व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. पण, यातून रोजगाराची संधी शोधणे महत्त्वाचे आहे. उद्योगामुळे आर्थिक बळकटी येत असली तरी त्यातून रोजगार उपलब्ध होणे याला प्राथमिकता असणे गरजेचे आहे.

काही उद्योगांमध्ये ३० ते ३५ कामगारांची संख्या कमी असली तर दुसरीकडे तरुण बेरोजगार आहे. उद्योगांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची जाण असलेल्या तरुणांना संधी आहे. जिल्ह्यात अन्न प्रक्रिया, डिफेन्स, इलेक्ट्रिक व अॅटोमोबाइल सेक्टरची वाढ होणार आहे. त्यासाठी पुढील काळात स्किल कामगार लागणार आहे.
- धनजंय बेळे, माजी अध्यक्ष, निमा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने मंत्रालयातील उंदीर मारण्याचे कंत्राट खासगी ठेकेदाराला दिले असून, यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाच्या नाशिक शाखेने सोमवारी केला. 'मंत्रालयात उंदीर दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस मिळवा' असा फलक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लावत अनोख्या पद्धतीने या घोटाळ्याचा निषेध नोंदविण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी घोटाळ्याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकार व घोटाळेबाज अधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांबाबतचे निवेदन दिले. त्यामध्ये म्हटल्यानुसार, आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्रालयातील उंदीर मारण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राटाबाबत विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जनतेच्या करातून आलेल्या पैशांची भ्रष्ट मागार्ने सुरू असलेली ही लूट आहे. या प्रकाराकडे मुख्यमंत्री जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. मंत्रालय सर्वप्रथम भ्रष्टाचारमुक्त करावे त्यानंतरच राज्य भ्रष्टाचारमुक्त होईल, असेही निवेदनात नमूद केले आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अथवा या घोटाळ्याची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अनिल भडांगे, महेश आव्हाड, दत्तू बोडके, प्रकाश चव्हाण, सचिन पानमंद, बबलू मिर्झा, जगन काकडे आदींनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहाणेंची हकालपट्टी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सोशल मीडियावरील प्रचाराची गंभीर दखल घेत रविवारी विधान परिषदेसाठी इच्छुक असलेले अॅड. शिवाजी सहाणे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. हकालपट्टीनंतर अॅड. सहाणे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले. राऊत सुपारीबहाद्दर असल्याचा आरोप अॅड. सहाणे यांनी केला आहे. आपण कोणत्याही परिस्थितीत विधान परिषदेची उमेदवारी करणार असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितल्याने शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत.

शिवसेनेतून रविवारी हकालपट्टी केल्यानंतर अॅड. सहाणे यांनी खासदार राऊत यांच्यावर सोमवारी आरोपांच्या फैरी झाडल्या. उमेदवारीसाठी नरेंद्र दराडेंसोबत केलेल्या आर्थिक तडजोडी उघड होऊ नये म्हणूनच राऊतांनी आपल्याला उद्धव ठाकरेंची भेट घेऊ दिली नाही, असा आरोपही त्यांनी केला. राऊतांसह, उद्धव ठाकरेंचे सचिव मिलिंद नार्वेकर, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यावरही त्यांनी आरोप केले.

अॅड. सहाणे म्हणाले, की शिवसेनेबद्दल किंवा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल माझी कोणतीही तक्रार नाही. मात्र, राऊतांसारखे नतद्रष्ट लोक शिवसेना संपवायला निघाल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. २०१२ च्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे केवळ ७० मतदार असताना ठाकरे यांनी, मला न मागता मला उमेदवारी दिली. त्या वेळी मी ७० मतांवरून २२५ मतांपर्यंत मजल मारली आणि निवडणूकही जिंकलो. मात्र, कोर्टात हा वाद गेला. या पार्श्वभूमीवर मी यंदाही प्रचाराला सुरुवात केली होती. मला उमेदवारी मिळणार नाही हे संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, दादा भुसे यांनी यांनी मला आधीच सांगून टाकले. उद्धव ठाकरेंची भेट मी मागितली होती; परंतु ही भेट राऊत यांनी होऊ दिली नाही. मराठा क्रांती मोर्चात मी अग्रणी सहभाग घेतला होता. सोबतच शिवजयंती १९ फेब्रुवारी रोजीच साजरी व्हावी, अशी माझी भूमिका होती; परंतु या दोन गोष्टी राऊत यांना सहन झाल्या नाहीत. मराठाद्वेष असल्याने त्यांनी मला ही कारणे सांगून हकालपट्टी केल्याचा आरोपही सहाणे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा न करताच ही हकालपट्टी करण्यात आल्याचा आपल्याला संशय असल्याचे अॅड. सहाणे यांनी नमूद केले. दरम्यान, सहाणे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवडणूक लढवावी अशी मागणी समितीचे पदाधिकारी करण गायकर, तुषार जगताप यांनी पत्रकार परिषदेत केली.

सेनेत संघर्ष अटळ!

खासदार राऊत आणि नाशिकची शिवसेना असे वादाचे समीकरण कायम राहिले आहे. राऊतांची उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुखपदी निवड झाल्यानंतर वाद उफाळून येणार ही चर्चा होती. मात्र, त्याला अॅड. सहाणे निमित्त ठरले असून, राऊतांच्या राजकीय खेळीमुळे पुन्हा सेनेतील गटबाजीला ऊत येणार आहे. गेल्या आठवड्यातच महानगरप्रमुखपदाच्या बदल्यांनंतर अॅड. सहाणेंवरील कारवाईने पुन्हा राऊतांच्या विरोधात मोर्चेबांधणीला जोर येणार आहे. शिवसेनेकडून जिल्हाप्रमुखांनाही बदलण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या सर्व बदलामुळे राऊतांचा नाशिकमधील गट पुन्हा सक्रिय झाला असून, त्याचे थेट परिणाम विधान परिषद निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे. राऊतांनी आपल्या मर्जीतल्या पदाधिकाऱ्यांसाठी सुरू केलेली खेळी ही शिवसेनेच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. अॅड. सहाणे यांनी राऊतांवर थेट आर्थिक देवाणघेवाणीचे आरोप केल्याने शिवसेनेची बदनामीही झाली आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेत संघर्ष अटळ असल्याची चर्चा आहे.

अॅड. सहाणेंचे आरोप

- मराठा द्वेषातून राऊतांकडून माझी हकालपट्टी

- राऊत सेनेला लागलेला कॅन्सर

- भुजबळ समर्थकाला उमेदवारी देण्याचा घाट

- राऊत हा महाराष्ट्रातील एका नेत्याचा दत्तकपुत्र

- नतद्रष्ट राऊतांमुळेच सेनेचे नुकसान

- मिलिंद नार्वेकरामुळेही सेनेचे नुकसान

- उद्धव ठाकरेंना बडव्यांनी घेरले

- नरेंद्र दराडेंसोबत आर्थिक तडजोडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गतिरोधकांची गरज

0
0

राजीवनगर

गतिरोधकांची गरज

नाशिक-मुंबई महामार्गावर स्प्लेंडर हॉल येथे सर्व्हिसरोडवर येण्यासाठी नवीन रस्ता आहे. या ठिकाणी महामार्गावरून बाहेर येणाऱ्या गाड्या आणि सर्व्हिसरोडवरील गाड्या समोरासमोर येतात. त्यामुळे येथील सर्व्हिसरोडवर गतिरोधकांची गरज आहे, जेणेकरून अपघात होणार नाहीत.

-मनोहर पवार

पंचवटी

मार्केट यार्डात अस्वच्छता

मार्केट यार्ड पंचवटी, भाजी मार्केट हा शहरातील मुख्य परिसर आहे. मात्र, येथे मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरल्याचे दिसून येते. स्वच्छतागृहांना रंग देणे, पार्किंग सुविधा देणे, शिस्तबद्ध एकेरी वाहतूक करणे त्याचप्रमाणे अन्य मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी बाजार समितीने पुढाकार घ्यावा.

-राजेंद्र राजधर

--

पंचवटी

पुन्हा खळाळली गोदावरी

गोदा पार्क परिसरात काही दिवसांपूर्वी काहीच पाणी नसल्याची बाब मटा सिटिझन रिपोर्टर अॅपद्वारे नुकतीच मांडली होती. आता नदीपात्रात मुबलक पाणी सोडण्यात आले आहे. त्याबद्दल 'मटा'चे व संबंधित यंत्रणेस धन्यवाद गोदापात्र साफ करून गोदावरी प्रदूषणमुक्त करायला हवी.

-जय जोशी

--

सिडको

पाणी वाचवा...

उन्हाळा लागला असला, तरी नाशिककर पाणी सांभाळून वापरताना दिसत नाहीत. पवननगर येथे अशी स्थिती आहे. आपण पाण्याचे मूल्य कधी ओळखणार. महापालिकेने पाणीकपात करावी, अशी वाट तर उधळपट्टी करणारे पाहत नसावेत ना? आपण सारे सतर्क होणार तरी केव्हा?

-चंद्रकांत महाले

--

कॉलेजरोड

रोजच वाहतूक कोंडी

कॉलेजरोड, मॉडेल कॉलनी सर्कलजवळील नंदन स्वीटसमोर बहुसंख्य ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे येथे दररोजच वाहतुकीची कोंडी होताना दिसून येते. परिणामी विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिकांची गैरसोय होते. संबंधित यंत्रणा याची दखल का घेत नाहीत?

-वैभव सारंगधर

--

शहर परिसर

सिलिंडरच्या वजनाचा घोळ

घरगुती गॅस सिलिंडरचे वजन २५० ते ३०० ग्रॅम कमी येणे ही नित्याची बाब झाली आहे. सिलिंडरचे वज मोजण्साठी वापरले जाणारे काटे अधिकृत मापदंडानुसार असण्याची खात्री नाही. पूर्ण पैसे देऊन, काही ग्राहकांनी सबसिडी सोडून दिल्यावरही कमी वजन स्वीकारावे लागते, ही खेदजनक बाब आहे.

-विद्येश बांद्रे

(सुधारित- सिटिझन)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी योग्य नियोजनाची गरज

0
0

नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचे हल्ले सुरूच आहेत. विशेषत: निफाड तालुक्यातील गोदाकाठ भागातील नागरिक बिबट्यांच्या दहशतीखाली आहेत. बिबट्याकडून लहान मुलांचे बळी घेतले जात असून, पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बिबट्यांच्या भीतीने शेती करायची की नाही, असा प्रश्न परिसरातील शेतकऱ्यांना पडला आहे. बिबट्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, पिंजरे वाढवावेत, कर्मचारी संख्या वाढवावी, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया वाचकांनी आणि गोदाकाठ भागातील राहणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांनी पुरेशी सतर्कता बाळगण्यासह लहान मुले आणि पशुधनाची विशेष काळजी घेतली पाहिजे, अशी भावनाही व्यक्त केली आहे.

जीवन बिबट्यांच्या दहशतीखाली

गेल्या अनेक वर्षांपासून निफाड तालुक्यातील वस्त्यांवर राहणारे शेतकरी बिबट्यांच्या दहशतीखाली आहेत. वन विभाग बिबटे पकडून नेतात, तरीही त्यांची संख्या आहे तेवढीच दिसते. तालुक्यात तीन निष्पाप चिमुरड्यांचा जीव गेला आहे. पिंजऱ्यांची संख्या कमी असून, बिबट्याला जपणाऱ्या वन विभागाने माणसांचीही काळजी करावी.

-प्रकाश जाधव

वन विभागाची बेपर्वाई

बिबट्यांनी आमच्या परिसरात दहशत पसरविली आहे. सध्या उसाची तोडणी होत असून, ऊस तोडणी कामगार बिबट्यांच्या दहशतीमुळे कामास तयार होत नाहीत. शाळेत मुलांना पालकांना सोबत घेऊन जावे लागते. शेतात वाडी-वस्तीवर एकटे राहणेही धोक्याचे झाले आहे. वन विभागाची बेपर्वाईच या प्रकारास कारणीभूत ठरत आहे.

-अॅड. प्रभाकर केदार

कर्मचारी संख्या वाढावी

निफाड तालुक्याबरोबरच गोदाकाठ भागात बिबट्यांचे हल्ले नेहमीचेच झाले आहेत. दररोज कुठे ना कुठे हल्ले होत असून, पाळीव प्राणी फस्त केले जात आहेत. येवला येथून सूत्रे हलत असल्याने घटना घडल्यास बराच कालावधी निघून जातो. त्यासाठी येथे उपविभागीय कार्यालय होणे गरजेचे असून, कर्मचारी संख्याही वाढवावी.

-धोंडिराम रायते

प्रभावी उपाययोजनाच नाहीत

आठवड्यातून एक-दोन वेळा बिबट्या गोदाकाठच्या भागात कोणाला तरी दिसतोच. शेळी, गाय, वासरू यांसारखे प्राणी तर बिबट्याचे नेहमीच भक्ष्य होतात. लहान बालकांना, तसेच प्रौढांनाही बिबट्याचा तेवढाच धोका आहे. बिबट्या दिसल्याची माहिती मिळाल्यावर वन विभागाकडून उपाययोजना सुरू होते, ती तकलादू ठरते.

-सचिन रायते

घराबाहेर निघणे झाले अवघड

गोदाकाठ भागात ऊस क्षेत्र मोठ्याप्रमाणात असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी मुबलक जागा दिसते. दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढत आहे. बिबट्यांच्या हल्ल्यात या भागातील पाळीव प्राणी फस्त होत आहेत. काही बालकांना जीव गमवावा लागला, तर अनेकांवर प्राणघातक हल्ले झाले आहेत. रात्री घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे.

-सोमनाथ कोटमे

(आमचा आवाज)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुन्हा दगडफेक;Ḥ दोघे जखमी

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

लहवित येथे गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा सुरू झालेल्या दगडफेकीत सोमवारी ग्रामपंचायत सदस्य मुकुंद पाळदे तर मंगळवारी हरी खराटे हे जखमी झाले आहेत.

लहवितमध्ये सध्या घरांवर दगड पडत आहेत. पोलिस दाखल झाल्यानंतर हे प्रकार बंद झाले होते. पण, रविवारी दि.२५ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पोलिसांच्या समक्ष नागरिकांच्या घरावर पुन्हा दगडफेक सुरू झाली. परिसरातील नागरिकांशी चर्चा करण्यासाठी गेलेले ग्रामपंचायत सदस्य मुकुंद पाळदे यांच्या पाठीत दगड लागल्याने ते जखमी झाले. तर मंगळवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास एमईएस कर्मचारी हरी खराटे पायाला दगड लागल्याने जखमी झाले. दगडफेकीच्या प्रकारामुळे येथील सुरेश गायकर यांनी तीन महिन्याचा नातू व सून यांना माहेरी पाठवून दिले. दगडफेकी ज्ञानेश्वर गायकर, निवृत्ती गायकर, पुंजाबाई पाळदे आदींच्या घरांचे नुकसान झाले आहे. दगड कुठून येतो हे नेमके समजत नाही. या परिसरात देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष डौले यांच्या मार्गदर्शनखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन माळी, हवालदार विशाल साळुंखे, संजय बोराडे, रवींद्र काकडे, सुरेश पाळदे, रमेश ढोन्नर आदी बंदोबस्तासाठी गावात तैनात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संदर्भ रुग्णालयाचा निषेध

0
0

टाळे ठोकण्याचा प्रयत्न; शिवाजी मुस्लिम ब्रिगेडसह राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संदर्भ रुग्णालयात येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना सुविधांअभावी गैरसोयींचा सामना करावा लागत असून याविरोधात छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अनोखे आंदोलन करून सरकारचा आणि आरोग्य विभागाचा निषेध नोंदविला.

शालिमार येथील संदर्भ हॉस्पिटलमध्ये अनेक दुर्धर आजारांवर उपचार केले जातात. उत्तर महाराष्ट्रातील गरीब रुग्णांसाठी हे गंभीर आजारांवर उपचार करणारे एकमेव सरकारी हॉस्पिटल आहे. गोरगरीब रुग्णांसाठी हे हॉस्पिटल वरदान असले तरी सुविधांअभावी रुग्ण आणि त्यांच्या नातलगांची हेळसांड होते आहे. या हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागातील एअर कंडिशनर (एसी) बंद आहे. या निषेधार्थ छत्रपती मुस्लिम ब्रिगेडने प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून सरकारचा निषेध नोंदविला. त्यानंतर हॉस्पिटलच्या बाहेरील प्रवेशद्वाराला टाळे ठोकून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. हॉस्पिटलमध्ये तीन महिन्यांपासून बंद असलेली लिफ्ट त्वरित सुरू करावी, १५ दिवसांपासून बंद असलेले अतिदक्षता विभागातील एसी सुरू करावे, नेहमी बंद होणाऱ्या वैद्यकीय उपकरणांची निगा राखावी, कर्मचारी तसेच प्रशिक्षीत डॉक्टरांची संख्या वाढवावी, येथील खाटांची संख्या वाढवावी आदी मागण्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजीज पठाण, संभाजी ब्रिगेडचे स्वप्नील इंगळे, राहुल बनकर, जिजाऊ ब्रिगेडच्या माधुरी भदाणे यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

'राष्ट्रवादी युवक'कडून पंखा भेट

नाशिकच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील एसी बंद पडल्याने रुग्णाला अॅडमिट करण्यापूर्वी पंख्याची व्यवस्था करा अशा सूचना एका रुग्णाच्या नातेवाइकास देण्यात आल्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने निषेध नोंदविला. शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी गांधीगिरी करत आरोग्य विभागाच्या उपसंचालिका डॉ. लोचना घोडके यांना पंखा भेट देऊन अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. या रुग्णालयात एसी बंद पडल्याने एका रुग्णाला प्राण गमवावे लागल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. बंद पडलेली एसी यंत्रणा तसेच इतर उपकरणे लवकर दुरुस्त करावीत, अशी मागणी करण्यात आली. आठ दिवसांच्या आत समस्या सुटल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी अॅड. चिन्मय गाढे, किरण पाणकर, अमोल नाईक, मुकेश शेवाळे, डॉ. संदीप चव्हाण, भूषण गायकवाड, विशाल डोखेआदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा अंदाजपत्रकात त्रुटी असल्याचा आरोप

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या स्थायी समितीला सादर केलेल्या बजेटमध्ये अनेक त्रुटी असल्याने दोष दुरुस्ती केल्याशिवाय बजेट महासभेत सादर करू नये, अशी मागणी शिवसेना नगरसेवक व स्थायी समितीचे सदस्य प्रवीण तिदमे यांनी आयुक्तांकडे केली आहे. आज (दि. २८) होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत बजेट सभेचे कार्यवृत्त मंजूर करू नये, अशी लेखी मागणीही तिदमे यांनी सभापतींकडे केली आहे.

मनपा आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केलेल्या अंदाजपत्रकात अनेक त्रुटी असून, विशिष्ट प्रभागांचीच कामे घुसविण्यासाठी नानाविध क्लृप्त्या अधिकाऱ्यांनी वापरल्या आहेत, असे तिदमे यांनी निवेदनात नमूद केले आहे. महापालिकेचे केवळ ३१ प्रभाग असताना भांडवली कामांच्या यादीत काही कामे जुने प्रभाग क्रमांक, तर काही कामे नवीन प्रभाग क्रमांक टाकून कामे समाविष्ट केली आहेत. नगरसेवकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठीच हा खेळ करण्यात आला आहे. विशिष्ट प्रभागांतील कामांना प्राकलन (इस्टिमेट) रकमेएवढी शंभर टक्के तरतूद बजेटमध्ये करण्यात आली असून प्रभाग क्र. २४ सारख्या काही प्रभागांतील अनेक कामांना कात्री लावत प्राकलन रकमेच्या केवळ साडेचार ते सात टक्के तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे त्रुटी, दोष दुरुस्ती करूनच बजेट महासभेला सादर करावे, अशी मागणी तिदमे यांनी केली आहे. भांडवली कामांच्या यादीत नवीन प्रभागनिहाय कामांची विभागवार माहिती दिल्यास बजेट पारदर्शक होईल, अशी सूचनाही तिदमे यांनी निवेदनात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यामध्ये दोन आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी,नाशिक

जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांनी आत्महत्या केली. उपनगर आणि सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे या घटना घडल्या.

उपनगर येथील ड्रीमसीटी परिसरात राहणाऱ्या अमर बोराडे (वय ४२) यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. उपनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तर सिन्नरमधील गुळवंच येथील ज्ञानेश्‍वर भाबड (वय ३८) यांनी विष पिऊन आत्महत्या केली. त्यांना सुरुवातीला नाशिकरोड येथील खासगी रुग्णालयात व नंतर आडगाव येथील मविप्र मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सोनसाखळी हिसकावून पोबारा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शरणपूररोड जवळील रामेश्‍वरनगर परिसरात सकाळी साडेसातच्या सुमारास महिलेच्या गळ्यातील चार तोळे वजनाची पोत हिसकावून चोरट्यांनी पोबारा केला.

एस. बी. जांगीड (रा. रामेश्‍वरनगर) यांनी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. मंगळवारी (दि. २७) सकाळच्या सुमारास त्या घराकडे जात असताना काळ्या मोटरसायकलवरून आलेल्या दोन संशयितांनी त्यांच्या गळ्यातील ८० हजार रुपयांची पोत ओरबाडून नेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामरंगी रंगले जन!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी आतुरलेले डोळे...रामरथाच्या स्वागतासाठी रेखण्यात आलेल्या सुबक रांगोळ्या...जागोजागी असलेला महाप्रसादाचा उत्सव आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेली रामरथाच्या मिरवणुकीने नाशिककरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात सनई चौघड्याच्या साथीने 'सियावर रामचंद्र की जय'च्या जयघोषात मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता श्रीरामरथ व गरुड रथोत्सवाला सुरुवात झाली. मानकऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजन करून रथ ओढण्यात आले.

ढोलताशांच्या निनादात, 'जय सीता, राम सीता', 'सियावर रामचंद्र की जय', 'महारुद्र हनुमान की जय'च्या जयघोषात प्रभूरामाच्या उत्सवमूर्ती वाजतगाजत मंदिराबाहेर आणण्यात आल्या. रामाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या भाविकांनी जयघोष केला. मंदिर प्रदक्षिणा केल्यानंतर यंदाचे मानकरी पुष्करबुवा पुजारी यांनी त्या गरूड रथात ठेवल्या. तेथे पुजारी कुटूंबियांतर्फे व राममंदिराच्या विश्वस्तांतर्फे मान्यवरांचे फेटे बांधून स्वागत करण्यात आले. दोन्ही रथ पूर्व दरवाजाजवळील रामनाम आधाराश्रमाजवळ येताच ब्रह्मवृंदाकडून गरूड रथातील मूर्तीची आरती पुष्करबुवा पुजारी यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर गरुड रथातील मूर्ती पालखीने राम रथात आणण्यात आल्या. तेथेही पुजारी यांच्या हस्ते आरती करण्यात आली. रामाच्या रथाला व गरुडाच्या रथाला आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली होती. राम रथ ओढण्याचा मान रास्ते आखाडा तालिम संघाकडे तर गरुड रथ ओढण्याचा मान अहिल्याराम व्यायामशाळेच्या कार्यकर्त्यांकडे होता. रथासमोर सनई चौघडे, झांजपथक, ढोलपथक यांनी परिसर दुमदुमून गेला होता. जागोजागी फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत होती. भव्य कमानी उभारण्यात आल्या होत्या. परिसरात महाप्रसादाचे वाटप करण्यात येत होते. संपूर्ण पंचवटी परिसर भाविकांच्या गर्दीने ओसंडून वहात होता. गरूडरथ वाजतगाजत गणेशवाडीमार्गे गंगाघाटावर आला. त्यानंतर दहीपुलावरुन मेनरोड, बोहरपट्टी, कापडबाजारमार्गे म्हसोबा पटांगणात येऊन फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रामाचा रथ व गरुडाचा रथ म्हसोबा पटांगणमार्गे रामकुंडावर नेण्यात आला. तेथे अवभृत स्नान झाले. अवभृत स्नानाचा सोहळा पाहण्यासाठी रामकुंडावर भाविकांनी गर्दी केली होती. यंदा गंगेला भरभरून पाणी असल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. अवभृत स्नानानंतर रामाच्या मूर्ती पुनश्च मंदिरात नेण्यात आल्या.

महावितरणतर्फे सालाबादप्रमाणे यंदाही खबरदारी घेऊन खास पथक तैनात करण्यात आले होते. गरूड रथावर दोन कर्मचारी नियुक्त करण्यात आले तर ज्या मार्गावरुन रथ मार्गस्थ होणार होता त्या मार्गावरदेखील कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. रथ ज्या मार्गावरुन जाणार आहे त्या मार्गावर मोठ्या प्रमाणात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी ध्वनीक्षेपक लावून येणाऱ्या भाविकांचे स्वागत करण्यात येत होते.

रथावरची गर्दी कायम

सालाबादप्रमाणे यंदाही रथावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने ती कमी करण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. परंतु, या आवाहनाला फारसे कुणी जुमानले नाही. त्यामुळे रथ तसाच पुढे नेण्यात आला. रथावरच्या गर्दीमुळे भाविकांना देवतांचे दर्शन न झाल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली. रथावरच्या गर्दीवर नियंत्रण ठेवावे यासाठी नियमावली करावी व योग्य त्या व्यक्तींना रथावर बसण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी होत आहे.

भाविकांचा अमाप उत्साह

काळाराम मंदिर महोत्सवासाठी भाविकांनी दहाही दिवस प्रचंड उपस्थिती दाखवली. रामरथासाठी नाशिककर गोदाघाटावर येणार हे समीकरण ठरलेलेच. रामकुंडापासून तर गौरीशंकर पटांगणापर्यंत भाविकांची प्रचंड गर्दी होती. दुतर्फा खेळण्यांची दुकाने, खाद्यपदार्थांची दुकाने, पाळणे आलेले होते. भाविकांनी रामरथ बघण्यासाठी एकच गर्दी केली होती. रथाच्या पुढे मानकरी, सनई चौघडे, तसेच पारंपरिक खेळ करण्यात येत होते.

राजकीय मंडळींची अनास्था

यंदाच्या वर्षी रामरथाची पूजा करण्यासाठी राजकीय मंडळींनी अनास्था दाखवली. प्रत्येक वर्षी राजकीय मंडळींचा उत्साह भरभरून वाहत असतो. परंतु, यंदा रामरथाकडे कुणी फिरकले नाही. आमदार बाळासाहेब सानप, उपमहापौर प्रथमेश गिते, गुरमित बग्गा, उद्धव निमसे यांनी रथावर पूजा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images