Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

भैरवनाथ यात्रा शुक्रवारी

$
0
0

नाशिक : चारशे वर्षांची परंपरा असलेल्या सिन्नर येथील श्री भैरवनाथ महाराजांची यात्रा यंदा शुक्रवारी, ३० मार्च रोजी होणार आहे. पहाटे त्र्यंबकबाबांच्या हस्ते मूर्तीला महाभिषेक होईल. त्यानंतर सहाला मंदिराच्या प्रांगणातून रथयात्रा सुरू होईल. लाल चौकापर्यंत सिन्नर भजनी मंडळाची दिंडी यात्रेच्या अग्रभागी राहील. पाच हजार बैलजोड्यांचा सहभाग हे यात्रेचे वैशिष्ट्य आहे. सूर्यास्तापर्यंत नगरप्रदक्षिणा होईल. सायंकाळी मंदिरात रथयात्रा आल्यावर सुवासिनी औक्षण करून स्वागत करतील. नंतर महाआरती होईल. रात्री नऊला आतषबाजी होईल. शाहीर दत्ता महाडिक पुणेकर यांचा लोकनाट्य कार्यक्रम होईल. बाराद्वारी येथे ३१ मार्च रोजी सायंकाळी पाचला कुस्त्यांची दंगल होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चित्रकला प्रदर्शन

$
0
0

नाशिक : एसएमआरके, बीकेएके महिला महाविद्यालयाच्या चित्रकला विभागातर्फे २८ ते ३० मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत चित्रकला प्रदर्शन होणार आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथील 'छंदोमयी' कलादालनात हे प्रदर्शन होईल. गेल्या दहा वर्षांतील आजी- माजी विद्यार्थिनींचा अनोखा संगम हे या वर्षीच्या रंगस्पर्श प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य आहे. प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते २८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. विभागप्रमुख संध्या केळकर यांनी ही माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोतील भाजपमध्ये अनेक वर्षांपासून धुसफूस सुरू असून, ती शमविण्याचे आव्हान आता वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसमोर आहे. मंडलाध्यक्ष असो की आमदारकीपासून मनपाची उमेदवारी मिळविण्यापर्यंत झालेल्या गटातटाच्या राजकारणाचे पडसाद आता उमटू लागले आहेत. आगामी निवडणुका पाहता, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना यात लक्ष घालून नाराजांना राजी करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे येत्या काळात सिडकोतील भाजपमध्ये काय काय घडामोडी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सिडको हा सुरुवातीला भाजपचा बालेकिल्ला असला तरी मध्यंतरी या ठिकाणी शिवसेना व मनसेने स्वतःचे अस्तित्व निर्माण करून भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा प्रकार केला होता. त्यामुळे मागील पंचवार्षिकला भाजपचा एकही नगरसेवक या ठिकाणाहून निवडून आलेला नव्हता. त्यानंतर आमदारकीच्या निवडणुकीतही उमेदवारी वाटपावरून भाजपमध्ये अनेक वादंग झाले होते. इच्छुकांनी एकत्र येऊन केवळ विद्यमान आमदार सीमा हिरे यांना उमेदवारी न देता आमच्यापैकी कोणा एकाला उमेदवारी द्या अशी मोट बांधली होती. मात्र, इच्छुकांचे हे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर या विभागाच्या आमदारकीची उमेदवारी हिरे यांना मिळाली आणि त्या विजयीही झाल्या. या वेळीही कोणी कोणाचे काम केले यावरून वादविवाद झाले होते. त्यानंतरच भाजपच्या मंडलाध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होताच, शिक्षक आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी त्यांच्या गटातील कार्यकर्त्याला मंडलाध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला. या वेळीही आमदार हिरे व आमदार डॉ. अपूर्व हिरे यांच्यातील गटातटाचे राजकारण तापले होते. हा वाद थेट प्रदेशाध्यक्षांपर्यंत जाऊन अखेरीस डॉ. हिरे यांच्या गटाचा अध्यक्ष करण्यात आला होता. यावेळेपासूनच दोन्ही आमदारांमध्ये चांगलेच राजकारण सुरू झाल्याचे दिसून आले. त्यानंतर गेल्या वर्षी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीतही दोन्ही हिरेंच्या गटातील काही उमेदवारांना उमेदवारी मिळाली तर काहींना टाळण्यात आले. त्या वेळी तर काही जणांनी थेट बंडखोरीही केली होती.

गेल्या दोन महिन्यांपूर्वी मंडलाध्यक्षपदाचा वाद पुन्हा निर्माण होऊन शहराध्यक्षांनी बाळासाहेब पाटील यांच्यावर पदाची धुरा सोपवली. यानंतर काल झालेला वाद तर सर्वांना धक्‍का देणाराच होता. भारतीय जनता युवा मोर्चाची सूत्रे नगरसेवक मुकेश शहाणे यांच्याकडे होती. हे पद त्यांचेच निकटवर्तीय अंकुश वराडे यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, ऐनवेळी वराडे यांचे नाव जाहीर न झाल्याने संतप्त झालेले नगरसेवक शहाणे यांनी शहरातील पदाधिकाऱ्यांसह आमदार सीमा हिरे यांच्याशी वादविवाद करून ही कार्यकारिणी चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप केला. या वेळी नगरसेवक शहाणे यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. त्यानंतर भाजपमधीलच जुने कार्यकर्ते चारुहास घोडके यांनाही कोणत्याही पदावर नियुक्‍त न केल्याने त्यांनीही नाराजी व्यक्‍त करून काम करणाऱ्यांना पदे नाहीत व काम करणाऱ्यांना पदे, असे पक्षात सुरू असल्याचा आरोप केला. त्याचबरोबर अनेक बंडखोरांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले असून, निष्ठावंतांना डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपने कार्यकारिणी जाहीर केली असली तरी आगामी काळात पक्षाचे कार्य कशा प्रकारे उभे राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी स्वतंत्र पद्धतीने प्रचाराला सुरुवात केली असून, त्यांचे वैयक्तिक कार्यक्रम सुरू झाले आहेत. त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकंदरीतच भाजपमध्ये सुरू असलेल्या या वादाचे पडसाद येत्या निवडणुकीत निश्चितच दिसून येणार असून, या गटातटाचा फायदा विरोधक घेतल्याशिवाय राहणार नाहीत, असे बोलले जात आहे.

ज्‍या व्यक्‍तीला पद हवे आहे, त्यांनी सांगितलेच पाहिजे. मात्र, अन्य कोणी सांगणे हे चुकीचे आहे. त्यामुळे गैरसमज निर्माण होतात. कार्यकारिणी सर्वांना विश्वासात घेऊनच करण्यात आलेली आहे. कोणीही नाराज नाही.

- आमदार सीमा हिरे

भाजपच्या बैठकीबाबत कोणतीही कल्पना नव्हती. त्याचबरोबर पूर्वी भाजपचा या ठिकाणी एकही नगरसेवक नसताना आज किती नगरसेवक दिले आहेत, याची माहिती पक्षाला आहे. कार्यकारिणी तयार करताना कल्पना देण्यात आलेली नाही. आम्ही काय काम केले आहे, याची पक्षाला माहिती आहे.

- आमदार डॉ. अपूर्व हिरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नाशिक सुरक्षित शहर व्हावे’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

वाहतुकीच्या बाबतीत नाशिक सर्वाधिक सुरक्षित शहर असल्याची ओळख होणे काळाची गरज असून, आता लहान मुलांनाच वाहतुकीच्या नियमांचे धडे देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रतिपादन नाशिक पोलिस आयुक्‍त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले.

नाशिक फर्स्टच्या वतीने झालेल्या दुचाकी प्रशिक्षणाच्या प्रारंभाप्रसंगी ते बोलत होते. नाशिक फर्स्ट आणि हिरो ॲटोकॉपच्या वतीने आता सुरक्षित दुचाकी चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, या प्रशिक्षणाचा प्रारंभ मंगळवारी पोलिस आयुक्‍त सिंगल यांच्या हस्ते झाला. या वेळी हिरोचे राजेश मुखिजा, आरटीओचे भरत कळसकर, एन बालसुब्रह्मण्यम, नाशिक फर्स्टचे चेअरमन अभय कुलकर्णी, संचालक सुरेश पटेल आदी उपस्थित होते. सिंगल यांनी सांगितले, की शहरात वाहतुकीची समस्या मोठी आहे. मात्र, त्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असून, लवकरच नाशिक हे वाहतुकीच्या नियमांच्या बाबतीत अग्रेसर शहर म्हणून ओळखले जाईल. आता पोलिसांकडून लहान मुलांना नियमांची माहिती देण्यात येत असल्याने हीच मुले आपल्या पालकांना नियमांची अंमलबजावणी करण्याची सक्‍ती करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्‍त केला. कळसकर यांनी सांगितले, की गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत ३८ टक्के रस्ते अपघात कमी झाले आहेत. पूर्वी हेल्मेटचा वापर फारच कमी होता. मात्र, आता हेल्मेटचा वापर चांगल्या प्रमाणात दिसत आहे. वाहन विक्रेत्यांनी ग्राहकांना हेल्मेटची सक्‍ती केली पाहिजे, अशीही सूचना त्यांनी मांडली. भारतात केवळ नाशिकमध्येच १८ ते २५ वयोगटातील तरुण-तरुणींना वाहन चालविण्याचा परवाना काढण्याआधी प्रशिक्षण दिले जाते. सध्या अवजड वाहनचालकांना प्रशिक्षित करण्याचे काम सुरू असून, एप्रिलमध्ये शहरातील प्रत्येक स्कूल बसचालकाला वाहतूक प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राजेश मुखिजा यांनी सांगितले, की, शहरातील नाशिक फर्स्टचे कार्य कौतुकास्पद आहे. हिरो कंपनी नेहमीच वाहतूक आणि वाहनचालकांची सुरक्षा यावर काम करीत असते. वाहन कोणीही चालवू शकते. मात्र, ती शास्त्रीयदृष्ट्या चालविणे अत्यंत गरजेचे आहे. सुरक्षित वाहनचालक तयार करणे ही गरज असल्यानेच आजपासून नाशिक फर्स्ट येथे दुचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी नाशिक फर्स्टचे चेअरमन अभय कुलकर्णी यानी नाशिक फर्स्टच्या कार्याचा आढावा प्रास्ताविकातून मांडला. पोलिस आयुक्‍तांनी दुचाकीस्वारांना झेंडा दाखवून या प्रशिक्षणाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. या वेळी नाशिक फर्स्टचे संचालक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिसऱ्या आघाडीसाठी भेटीगाठी

$
0
0

तिसऱ्या आघाडीसाठी भेटीगाठी

भाजप आणि काँग्रेसविरोधात तिसरी आघाडी उभी करण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. ममतांनी शिवसेनेलाही सोबत येण्यासाठी गळ घातली आहे.

मटा अॅप डाउनलोड करा app.mtmobile.in

मिस्ड् कॉल द्या 1800-103-8973

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावीर जन्मकल्याणक महोत्सवाची पर्वणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्री जैन सेवा संघ आणि जैन सोशल ग्रुप, नाशिक परिवार यांच्यातर्फे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त गुरुवारी (दि. २९) विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत भव्य शोभायात्रा, विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

चोपडा बँक्वेट हॉल येथे सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत भगवान महावीर यांच्या जीवनावर मार्गदर्शक संतांच्या माध्यमातून आधारित तत्त्वज्ञान प्रवचन आणि मांगलिक सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमानंतर गौतमी प्रसादाचे वितरण होणार आहे. भाविकांनी या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन श्री जैन सेवा संघाचे अध्यक्ष पवन पटणी, कार्याध्यक्ष महेश शाह आणि सचिव सचिन गांग यांनी केले आहे.

दिवसभर विविध उपक्रम

रविवार कारंजा येथील श्री जैन श्वेतांबर स्थानकवासी श्रीसंघातर्फे गुरुवारी जीवदया अभियान राबविण्यात येईल. श्री वर्धमान जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघातर्फे सायंकाळी ६ वाजता कार्यक्रम सादर होईल. श्री दिगंबर जैन मंदिर दूध बाजार यांच्यातर्फे सकाळी ८ वाजता पंचामृत अभिषेक व सायंकाळी ७ वाजता पाळणा होईल. श्री दिगंबर जैन तीर्थक्षेत्र, गजपंथ, म्हसरूळ यांच्यातर्फे सकाळी ६.३० ते ८ या वेळेत प्रभात फेरी, सायंकाळी ७.३० वाजता संगीतसंध्या, नाटिका आणि पाळणा असे कार्यक्रम होतील. यावेळी नाशिक मध्यवर्ती कारागृहातील कैदी आणि जिल्ह्यातील विविध शाळांमधील एक लाख विद्यार्थ्यांना भगवान महावीर यांच्या सिद्धांतांवर चालण्याची प्रतिज्ञा देण्यात येईल. टिळकवाडी येथील श्री चिंतामणी पार्श्वनाथ जैन संघातर्फे टिळकवाडी येथील श्री महावीर जिनालय येथे सायंकाळी ६ वाजता कार्यक्रम होईल. जैन सोशल ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर, जीतो वूमेन्स विंगतर्फे रस वाटप आणि जे. ए. जी. मिडटाऊनतर्फे सर्व मंदिरांमध्ये विविध कार्यक्रम होतील.

शोभायात्रेचे आकर्षण

भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी सकाळी ८ वाजता शोभायात्रेस दहीपूल परिसरातून प्रारंभ होईल. दहिपूल-जुनी तांबट लेन-भद्रकाली जैन मंदिर-गाडगे महाराज पुतळा-धुमाळ पॉइंट-रविवार कारंजा-अशोक स्तंभ-गंगापूररोडमार्गे चोपडा हॉल येथे शोभायात्रेचा समारोप होईल. २४ तीर्थंकरांचे रथ हे या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण राहणार आहे. शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी चोपडा लॉन्स येथे वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथून यात्रामार्गावर जाण्यासाठी वाहनव्यवस्था राहणार आहे. शोभायात्रा मार्गावर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून, गोशाळा मदतीसाठी गो रथाचेही नियोजन करण्यात आले आहे.

(लोगो- सोशल कनेक्ट)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योग्य पर्याय नसल्याने गुण देण्याची मागणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

दहावीच्या विज्ञान भाग १ च्या प्रश्नपत्रिकेत 'योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा' या प्रश्नात योग्य पर्यायच नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा घोळ झाला. योग्य पर्याय नसल्यामुळे अनेकांनी उत्तर लिहिलेच नाही, तर काही जणांनी योग्य उत्तराच्या जवळचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे या प्रश्नास सरसकट एक गुण देण्याची मागणी विज्ञान शिक्षकांनी केली आहे.

नुकतेच इयत्ता दहावीचे पेपर संपले असून, उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिक्षकांकडे आल्या आहेत. मात्र दहावीच्या विज्ञान १ च्या प्रश्नपत्रिकेमध्ये  प्रश्न क्र १ ब मध्ये  'जेव्हा कॉपर सल्फेट स्फटिकांना उष्णता दिली जाते, तेव्हा परीक्षा नळीत मिळणारा अवक्षेप........'हा उपप्रश्न विचारण्यात आला होता. पर्यायात तांबडा, निळा , हिरवा, आणि रंगहीन असे पर्याय होते. या प्रश्नाचे खरे उत्तर पांढऱ्या रंगाचा असतो असे आहे. रंगहीन आणि पांढरा रंग या दोन्ही संज्ञांमध्ये खूप फरक असून पांढऱ्या रंगाचा पर्याय देणे अपेक्षित होते.  परंतु तो रिकाम्या जागेच्या दिलेल्या पर्यायांमध्ये नसल्याने विद्यार्थ्यांनी वेगवेगळे पर्याय लिहिले. मंडळातर्फे रंगहीन या पर्यायास गुणदान करावे अशी सूचना देण्यात आली. परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून पांढरा रंग हा पर्याय त्यात नसल्याकारणास्तव ज्या विद्यार्थ्यांनी सदर रिकाम्या जागेचा प्रश्न सोडविला असेल त्यास सरसकट एक  गुण देण्यात यावा अशी मागणी मंडळाच्या नाशिक विभागीय सचिव यांच्याकडे टीडीएफचे अध्यक्ष तसेच र. वी. शाह विद्यालयाचे विज्ञान विषयशिक्षक मंगेश सूर्यवंशी , काबरा विद्यालयाचे महेश  बागड यांनी मंडळाकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मार्चमध्येच टंचाईच्या झळा

$
0
0

नामदेव पवार, गंगापूररोड

महापालिकेतील सर्वाधिक पसंतीचा भाग म्हणून गंगापूररोड भागातील प्रभाग ७ ची ओळख आहे. बहुतांश क्षेत्रांतील मान्यवरांचे वास्तव्य या प्रभागात असून, नगरसेवकांनी सर्व प्रकारच्या सुविधा पुरविण्याचा पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. अत्याधुनिक रस्ते, उद्याने, वाचनालये व जॉगिंग ट्रॅकचा आनंद प्रभागातील नागरिक घेताना दिसतात. मात्र, या प्रभागातील रहिवाशांना यंदा मार्चमध्येच पिण्याच्या पाण्याची टंचाई सहन करावी लागत आहे.

येथील पाणीटंचाईच्या समस्येचे कारण सांगायचे झाल्यास नव्याने वाढलेल्या लोकवस्तीत एकही नवीन जलकुंभ झाला नसल्याने इतर ठिकाणांहून पाणीपुरवठा होताना तो कमी दाबानेच होत असल्याचे दिसते. याबाबत प्रभागातील चारही नगरसेवकांना विचारले असता नवीन जलकुंभाची निर्मिती समर्थ मित्रमंडळाच्या जागेवर केली जाणार असल्याचे सांगितले. टिळकवाडीतून पंडित कॉलनी व कॅनडा कॉर्नर परिसरात नव्याने जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत. दादोजी कोंडदेवनगर, आकाशवाणी टॉवर परिसरातदेखील नव्याने जास्त व्यासाच्या वाहिन्या टाकल्यास नक्कीच पिण्याचे मुबलक पाणी रहिवाशांना पुरविले जाईल, असे नगरसेवकांनी सांगितले.

या प्रभागात सर्वाधिक उद्याने असली, तरी स्वच्छतेचे काम वेळेवर केले जात नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. चकाचक रस्त्यांवर गरजेच्या ठिकाणी गतिरोधक टाकण्याची गरज व्यक्त होत आहे. वेगाने विकसित झालेल्या या प्रभागात शाळा, कॉलेजेस व खासगी क्लासेसची संख्या अधिक असल्याने विद्यार्थ्यांच्या दुचाकींचा प्रश्नही मोठा आहे. पंडित कॉलनीत सर्वाधिक क्लासेस असल्याने दुतर्फा वाहनांचे पार्किंग केली जाते. परिणामी अरुंद रस्त्यांवरून वाहने चालविणे जणू शिक्षेसारखेच ठरत आहे. प्रभागातील मोकळ्या भूखंडांवरील कचऱ्याचीही मोठी समस्या आहे. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर महापालिकेने दंडात्मक, तसेच फौजदारी कारवाई करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

रस्त्यांवरच होतेय पार्किंग

उच्चभ्रू लोकवस्तीचा म्हणून ओळख असलेल्या या प्रभागात रस्त्यांवर दुतर्फा वाहने पार्किंगची मोठी समस्या भेडसावत आहे. वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे चारचाकी वाहने पार्किंगची योग्य सोय नसल्याने रस्त्यांवरच वाहने पार्क केली जात असून, त्याचा त्रास इतरांना सहन करण्याची वेळ येते. पंडित कॉलनी, राका कॉलनी, समर्थ जॉगिंग ट्रॅकसमोरीलरोड, शहीद सर्कलसमोरील रस्ता व अशोक स्तंभ परिसरात दुतर्फा उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे नेहमीच अनेकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. भविष्यात वाहनांच्या पार्किंगसाठी महापालिका व स्थानिक नगरसेवकांनी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबात विचार केला पाहिजे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

स्वच्छतागृहांची वानवा

या महत्त्वाच्या प्रभागात स्वच्छतागृहांची वानवा असल्याचे पाहायला मिळते. अशोक स्तंभापासून ते जेहान सर्कलपर्यंत एकही चांगले स्वच्छतागृह नसल्याने अनेकांची मोठी अडचण होते. नैसर्गिक विधीसाठी हॉटेल अथवा शासकीय कार्यालयांचा सहारा घेण्याची वेळ नागरिकांवर येते. मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी स्वच्छतागृहे उभारावीत, अशी मागणी नगरसेवकांनी महापालिकेकडे केली आहे. गंगापूररोडच्या मध्यभागी असलेल्या समर्थ जॉगिंग ट्रॅकवर लवकरच पाणी फवारणी करणारी यंत्रणा कार्यान्वित होणार असून, तरणतलावाचे काम मार्गी लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रभागात येणारा परिसर

जेहान सर्कल, नरसिंहनगरचा काही भाग, माणिकनगर, दादोजी कोंडदेवनगर, आकाशवाणी टॉवर, पंपिग स्टेशन, महाजन उद्यान, आनंदनगर, चोपडा लॉन्स परिसर, थोरात सभागृहाजवळील भाग, पंडित कॉलनी, अशोक स्तंभ, घारपुरे घाट, मल्हार खाण, गोळे कॉलनी, जिल्हा न्यायालय, पोलिस वसाहत व शरणपूररोडचा प्रभागात समावेश आहे.

प्रभागाची लोकसंख्या ४४०००

लोकप्रतिनिधी म्हणतात....

विस्ताराने व लोकवस्तीने मोठ्या असलेल्या प्रभागात सुविधा देण्याचे काम नगरसेविका म्हणून सुरू आहे. यात प्रामुख्याने पाण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी नवीन जलकुंभाची उभारणी करण्यात येणार आहे. उद्याने सुशोभीकरणाचे काम उद्यान विभागाने हाती घेतले आहे.

-हिमगौरी आडके-आहेर, सभापती, स्थायी समिती

पंडित कॉलनी व कॅनडा कॉर्नर परिसरात पिण्याचे मुबलक पाणी मिळावे, याकरिता नवीन जलवाहिनी टिळकवाडी जलकुंभावर टाकण्यात येणार आहे. महापालिकेकडून रहिवाशांना सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न नगरसेवक म्हणून आम्ही करीत आहोत.

-अजय बोरस्ते, नगरसेवक तथा गटनेता

प्रभागात पाण्याची समस्या भेडसावत आहे. परंतु, गंगापूररोडवर एकाही ठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी केली गेली नसल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो. याबाबत महापालिकेकडे पाठपुरावा करून गरजेच्या ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्याची मागणी करणार आहे.

-योगेश हिरे, नगरसेवक

सर्व सुविधांयुक्त प्रभागात पिण्याच्या पाण्याची समस्या महिला सातत्याने मांडत असतात. याकरिता प्रभागात मोठ्या व्यासाच्या जलवाहिन्या टाकण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येईल. जास्तीत जास्त सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.

-स्वाती भामरे, नगरसेविका

नागरिक म्हणतात...

प्रभागात सर्व सुविधा असल्या, तरी अतिमहत्त्वाची असलेली सेवा म्हणजेच पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळत नाही. नव्याने जलकुंभाची उभारणीच करण्यात आलेली नसल्याने पाणीटंचाईच्या झळा रहिवाशांना सहन कराव्या लागतात.

-उषाताई पवा

पोलिस वसाहतीत स्वच्छतेच्या बाबतीत लक्ष दिले जात नसल्याने दुर्गंधीचा त्रास पोलिसांच्या कुटुंबीयांना सहन करावा लागतो. जुन्या वसाहतींच्या पाठीमागील जागेवर वाढलेले गाजरगवत काढण्याची गरज आहे. साईडपट्ट्यांची कामे महापालिकेने हाती घेतली पाहिजेत.

-सरिता शिंदे

वाढलेल्या वाहनांची संख्या पाहता पंडित कॉलनी व इतर परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. रस्त्यांवर दुतर्फा वाहने पार्क केली जात असल्याने इतर वाहनांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. महापालिकेने वाहने पार्किंगची योग्य सुविधा केली पाहिजे.

-युवराज पांडे

(वर्षपूर्ती सत्तेची प्रभाग ७)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आमदार चव्हाणांचा वसुलीबाबत स्थगन प्रस्ताव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा बँकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जप्तीमोहिमेमुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली असून, वसुलीसाठी शेतकऱ्यांना केल्या जाणाऱ्या दमदाटीविरोधात राष्ट्रवादीच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी विधानसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे. जिल्हा बँकेच्या वतीने सुरू असलेल्या जबरदस्तीच्या मोहिमेविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष असून, यावर सरकारने निवेदन करावे, अशी मागणी आमदार चव्हाण यांनी केली आहे.

जिल्हा बँकेकडून सध्या वसुली मोहीम राबवली जात असून, मालमत्तांसह ट्रॅक्टर ओढून नेले जात आहे. बँकेच्या वसुली पथकामुळे सिन्नर तालुक्यात महिला शेतकऱ्याने विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. कर्जदार शेतकऱ्यांकडून बळजबरीने ट्रॅक्टर जप्त केले जात असून, त्यांचा लिलावही केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी दहशतीखाली असल्याचा आरोप आमदार चव्हाण यांनी केला. सरकारने सरसकट कर्जमाफी करण्याची गरज आहे. सध्याच्या कर्जमाफीचा कोणताही फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही. बागलाण, कळवण, देवळा, सिन्नर, निफाडमध्ये शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने वसुली केली जात आहे. त्यामुळे ही वसुली शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे. वसुलीपायी शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. बँकेच्या या पावलामुळे शेतकरी संकटात सापडले असून, या कारवाईचा तीव्र निषेध केला जात आहे. त्यामुळे विधानसभेत या मुद्द्यावर नियम ९७ अन्वये स्थगन प्रस्ताव आमदार चव्हाण यांनी सादर केला असून, त्यावर चर्चेची मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुकाणू समितीची आज बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा सुकाणू समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असून, एक एप्रिलच्या सभेच्या नियोजनासाठी बुधवारी, २८ मार्च रोजी शासकीय विश्रामगृहात बैठक होणार आहे. बैठक सकाळी साडेदहा वाजता होणार असून, जिल्ह्यात शेतकरी चळवळीत काम करणाऱ्यांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुश्श...! बॅँका पाच नव्हे, तर दोनच दिवस बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बॅँका सलग पाच दिवस बंद राहणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावरून फिरत असल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, या बॅँका पाच नव्हे, तर फक्त दोन दिवस बंद राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याने अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

मार्च महिनाअखेर राष्ट्रीयीकृत बॅँका सलग पाच दिवस बंद राहणार असल्याचे मेसेज व्हॉट्सअॅपवरून फिरत होते. मात्र, हे वृत्त खोटे असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. श्री महावीर जयंती गुरुवारी, २९ मार्च रोजी व गुड फ्रायडे ३० मार्च रोजी असल्याने सलग दोन दिवस सुट्या लागून आल्या आहेत. मात्र, ३१ मार्च रोजीसुद्धा बॅँका बंद राहणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावरून फिरत होते. त्यामुळे नागरिकांनी बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र, शनिवारी नेहमीप्रमाणे बॅँका सुरू राहणार आहेत. त्याचप्रमाणे रविवारी बँकेला साप्ताहिक सुटी आहे व सोमवारपासून बॅँकेचे कामकाज नियमित सुरू राहणार असल्याचे बॅँक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

व्यापाऱ्यांना मनस्ताप

बॅँका सलग पाच दिवस बंद राहणार असल्याच्या अफवेमुळे व्यापाऱ्यांनी बहुतांश व्यवहार आधीच उरकून घेतले आहेत. काहींनी रोख व्यवहार न करता चेकनेच व्यवहार केले आहेत. बँका सलग दोन दिवस बंद राहणार असल्याने शनिवारी बँकेच्या कामकाजावर ताण येणार आहे. त्यामुळे या दिवशी कामे होणार नाहीत, या बेतानेच व्यवहार उरकल्याने व्यापाऱ्यांना आता मनस्ताप होत आहे.

एटीएमवर गर्दी

बँका बंद असल्याच्या अफवेमुळे अनेक नागरिकांनी मंग‌ळवारपासूनच पैसे काढण्यासाठी एटीमएमसमोर गर्दी केली होती. एटीएममध्ये होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन बॅँकांनी निवेदनही दिले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे बँकेतर्फे सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनसाखळी चोऱ्यांविरोधात पोलिसांकडून जनजागृती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

वाढत्या सोनसाखळी चोऱ्या रोखण्यासाठी इंदिरानगर पोलिसांनी मंगळवारपासून परिसरात रिक्षातून ध्वनिक्षेपकांद्वारे जनजागृती सुरू केली आहे. इंदिरानगर भागात वारंवार होणाऱ्या सोनसाखळी चोऱ्यांचे वृत्त 'मटा'मध्ये प्रसिद्ध होताच पोलिसांनी जनजागृती सुरू केली असली, तरी लोकप्रतिनिधींसुद्धा चौकाचौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत परिसरातून व्यक्‍त केले जात आहे.

इंदिरानगर परिसरातील वृंदावन कॉलनी परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीला गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर पोलिस व लोकप्रतिनिधींनी अशा सोनसाखळी चोऱ्या रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत व जनजागृती करावी, अशा आशयाचे वृत्त 'मटा'मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी तातडीने एका रिक्षातून ध्वनिक्षेपकांद्वारे नागरिकांची जनजागृती सुरू केली आहे.

या सूचनांची उद्घोषणा

इंदिरानगर परिसरातील गजबजलेल्या भागात ही रिक्षा सायंकाळी फिरत असल्याचे दिसून आले. नागरिकांनी अंगावर दागदागिने कमी घालावेत, रस्त्यात उभे राहून पैसे मोजू नयेत, अनेाळखी व्यक्‍तीशी संभाषण करू नये, यांसारख्या सूचना दिल्या जात आहेत. या उपक्रमामुळे नागरिकांनी काय दक्षता घेतली पाहिजे, याची माहिती नागरिकांना मिळत आहे. त्याचबरोबर आता लोकप्रतिनिधींनीसुद्धा पुढाकार घेऊन इंदिरानगर परिसरातील चौकाचौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे असल्याचे मत व्यक्‍त होत आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास निश्चित त्याचा फायदा होऊन गुन्हेगारीला आळा बसेल, असे मत नागरिकांनी व्यक्‍त केले आहे. 

(लोगो- मटा इम्पॅक्‍ट)

---

'त्या'भाईंवर अखेर गुन्हा

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

कामगार वस्ती असलेल्या सातपूर भागातील अशोकनगर येथे एका 'भाई'चा वाढदिवस उघड्यावर साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे पोलिस चौकीबाहेर साजरा करण्यात आलेल्या वाढदिवसाला संबंधित 'भाई'नी चक्क एकमेकांवर अंडाफेक केली होती. हा प्रकार करणाऱ्या 'भाईं'वर सातपूर पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे.

सातपूर पोलिस याबाबतचा अधिक तपास करीत असून, यामागे नक्की कुणाचा हात आहे, याचा शोध सुरू आहे. अशोकनगर पोलिस चौकीच्या समोरील चौकात शुक्रवारी एका टोळक्याने प्रचंड गोंधळ करीत आपल्या सहकारी 'भार्इं'चा वाढदिवस साजरा केला होता. हा वाढदिवस साजरा करताना या टोळक्याने कोणताही विचार न करता एकमेकांवर अंडाफेक केली. अचानक झालेल्या गोंधळामुळे नागरिकांत दहशत पसरली होती. काहींनी खरेदी परिसरातून पळ काढला होता. काही जागरूक नागरिकांनी संबंधितांच्या गोंधळाची माहिती पोलिसांना दिली होती. त्यावर उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्वत: लक्ष घालून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने सातपूर पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. सहायक निरीक्षक योगेश देवरे तपास करीत असून, यातील काही संशयित फरारी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुकीची धारणा इपिलेप्सीसाठी घातक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जागतिक फिट दिवस हा 'पर्पल डे' म्हणून साजरा केला जातो. इपिलेप्सी अर्थात मिर्गी अथवा फिटबाबत जनजागृती व्हावी, यासाठी जगभर इपिलेप्सी डे साजरा केला जातो. या दिवशी जांभळ्या रंगाचे कपडे घालून आजाराबाबतचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. समाजात या आजाराबाबत अनेक गैरसमज असून, चुकीची धारणाच रुग्णांसाठी घातक असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करतात. फिटच्या आजाराबद्दल गैरसमजुती वाढल्या असून, यामध्ये फिट हा मतिमंदतेचा भाग आहे. फिट येणाऱ्या स्त्रियांनी लग्न करू नये, फिटच्या रुग्णांनी काही काम करू नये, शाळा शिकू नये, हा पूर्वजन्मीचा शाप, भूतबाधा आहे, हा आजार कधीच बरा होऊ शकत नाही, असे चुकीचे गैरसमज समाजात झाले आहेत. हा आजार कुणालाही व कुठल्याही वयात होऊ शकतो, तसेच या आजाराची औषधे घेऊन दैनंदिन कामे करता येऊ शकतात. शाळा शिकणे, नोकरी करणे, व्यायाम करणे, लग्न करणे, गर्भवती होणे, तसेच अंगावर दूध पाजणे अशी कामे सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे हे रुग्णदेखील करू शकतात. हा आजार औषधाने बरा होऊ शकतो, ज्यांचा औषधाने आजार बरा होत नाही, त्यापैकी काहींना शस्त्रक्रियेद्वारे हा आजार घालवता येऊ शकतो. याबाबत बोलताना मेंदुविकारतज्ज्ञ डॉ. आंनद दिवाण यांनी सांगितले, की या आजाराबाबतचे गैरसमज दूर झाल्याशिवाय रुग्ण डॉक्टरपर्यंत पोहोचणार नाहीत. योग्य उपचार मिळाले नाही तर आजार बळावत जाऊन उपचारांची जागा अंधश्रद्धा घेते.

काही महत्त्वाचे उपाय

मिर्गी किंवा फिट येत असल्याने पेशंट सोबत असलेल्यांनी घाबरून जाऊ नये, पेशंटला एका अंगावर झोपू द्यावे, दातखिळी बसल्यास तोंडात चमचा, बोटे घालू नये, कांदा, चप्पल नाकाला लावू नये, पेशंटचे कपडे सैल करावेत तसेच तो पूर्ण शुध्दीवर येईपर्यंत एका कुशीवर झोपवावे. तोपर्यंत पेशंटला तोंडवाटे काहीही देऊ नये. या आजाराच्या सर्व तपासण्या जसे एमआरआय, ईईजी, व्हीडीओ ईईजी आणि इपिलेप्सी शस्त्रक्रिया करण्याची सुविधा बहुतांश ठिकाणी उपलब्ध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेत धूमशान

$
0
0

अंतर्गत गटबाजी उफाळली; राऊत समर्थक, विरोधक आमने-सामने

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अॅड. शिवाजी सहाणेंची हकालपट्टी आणि त्यानंतर झालेल्या आरोप-प्रत्यारोपाने निवडणुकांपूर्वीच शिवसेनेत धूमशान सुरू झाले असून, या गटबाजीचा थेट फटका विधान परिषदेपाठोपाठ लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही पक्षाला बसणार आहे. विशेषत: सहाणेंच्या आरोपांनंतर खासदार संजय राऊत यांच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला राऊत समर्थकांनीच हजेरी लावल्याने सेनेतील गटबाजी पुन्हा उफाळून आली आहे. नरेंद्र दराडेंच्या उमेदवारीवरून शिवसेनेत उभी फूट पडणार असल्याची चर्चा असून, नाशिकचे संपर्कप्रमुख अजय चौधरी यांनीही या सर्व घडामोडींपासून अंतर राखल्याने सेनेतल्या अंतर्गत गटबाजीने पुन्हा जोर धरला आहे.

निवडणुका आणि शिवसेनेत गटबाजी आणि आरोप-प्रत्यारोप हे ठरलेले समीकरण आहे. विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या या पंरपरेने पुन्हा डोके वर काढले आहे. महानगरप्रमुखांच्या खांदेपालटावरून सेनेत एकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली असतानाच, अॅड. सहाणेंच्या हकालपट्टीने पुन्हा अंसतोषाला फोडणी मिळाली आहे. सहाणेंनी उत्तर महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख खासदार राऊत यांच्यावर आर्थिक तडजोडीचे गंभीर आरोप करीत त्यांच्यावर मराठाद्वेषाचा शिक्का मारला आहे. त्यामुळे शिवसेनेने डॅमेज कंट्रोलसाठी मंगळवारी मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन राऊत यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला; परंतु पत्रकार परिषदेला राऊत समर्थकांचीच हजेरी हा चर्चेचा विषय होता. सेनेच्या जिल्हाप्रमुखासह मनपा विरोधी पक्षनेता, गटनेता यांच्यासह डझनभर नेत्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनली आहे. नरेंद्र दराडेंच्या उमेदवारीवरून शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्याचा फटका शिवसेनेला विधान परिषदेसह आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही बसण्याची शक्यता आहे. दराडेंच्या उमेदवारीवरून शिवसेनेत धूमशान सुरू झाले असताना नाशिक संपर्कप्रमुख अजय चौधरी यांनी अंग काढून घेतले आहे. त्यामुळे सेनेत आता राऊत समर्थक आणि राऊत विरोधक अशी गटबाजी सुरू झाल्याची चर्चा आहे. पक्षप्रमुख ही गटबाजी कशी रोखतात, यावरच विधान परिषदेचे यशापयश अ‌वलंबून राहील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोघा मुलांसह पित्याचे विषारी औषध प्राशन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

देवगाव (ता. निफाड) येथील नारायणगिर हेमगिर गोसावी (वय ४०) यांनी दोन मुलांसह विषारी औषध देऊन आत्महत्या केली. यात नारायनगीर यांचा मृत्यू झाला. तर दोन्ही मुलांना उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायनगीर हेमगिर गोसावी हे त्यांच्या साई व रुद्र या दोन मुलांना घेऊन नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील म्हसोबा माथा येथील म्हसोबा मंदिराजवळ असलेल्या वनक्षेत्रात आले. तेथे त्यांनी स्वत: विषारी औषध प्राशन केले. तसेच साई (७) आणि रुद्र(५) या आपल्या दोन्ही लहान मुलांना शीतपेयातून विषारी औषध दिले. घटनास्थळी तिघांना नागरिकांनी पाहिले. त्यांनी पोलिसांना फोन करून माहिती दिली आणि तिघांना निफाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी नारायनगीर गोसावी यांचा मृत झाला होता. तर त्यांचे दोन्ही मुले अत्यवस्थ असल्याचे स्पष्ट झाले. मुलांना उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले. आत्महत्येची घटना कौटुंबिक वादातून घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. नारायणगीर गोसावी याच्या मागे पत्नी, आई व भाऊ असा परिवार आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कीर्ती जावरे करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसेनेला बदनाम करण्याचे राजकारण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर अॅड. शिवाजी सहाणे यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर शिवसेनेचे पदाधिकारी खासदार संजय राऊत यांच्या पाठीशी उभे ठाकले आहेत. शिवसेनेला बदनाम करण्याचे हे राजकारण असून, सेनेत कधीही जातीपातीचे राजकारण केले जात नसल्याचा खुलासा माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांनी केला आहे. नरेंद्र दराडेंशी आर्थिक व्यवहाराचे आरोप फेटाळतानाच कोणालाही उमेदवारी जाहीर केली नसल्याचेही गायकवाड यांनी या वेळी स्पष्ट केले. सहाणेंनी आत्मपरीक्षण करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच शिवसेनेत धूमशान सुरू झाले असून, सोशल मीडियावरील प्रचारावरून अॅड. सहाणे यांची पक्षातर्फे हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर सहाणे यांनी राऊत हे मराठाद्वेषी असल्याचा आरोप करतानाच दराडेंसोबत आर्थिक तडजोडी केल्याचा आरोपही केला होता. या आरोपांनंतर नाशिकमधील राऊत गट सक्रिय होऊन त्यांनी शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन आरोप फेटाळले. महानगप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, माजी जिल्हाप्रमुख गायकवाड, विनायक पांडे, सुधाकर बडगुजर, जगन आगळे, बाळासाहेब कोकणे यांनी सहाणेंचे आरोप खोटे असल्याचा दावा केला. मराठा क्रांती मोर्चात सर्वपक्षीय नेते सहभागी असल्याचे सांगत, अॅड सहाणे दिशाभूल करीत असल्याचा दावा बडवे यांनी केला. गेल्या विधान परिषदेच्या वेळी अॅड. सहाणे मराठा होते. आता कोण आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मनपा निवडणुकीत सहाणेंनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, असा आरोपही बडवेंनी केला आहे. शिवसेनेत जातीपातीचे राजकारण केले जात नसल्याचे सांगत, प्रत्येक वेळी तुम्हालाच उमेदवारी कशी मिळेल, असा सवाल सचिन मराठे यांनी केला आहे. सहाणेंनी पक्षासाठी काय केले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पक्षातून कोणाला काढायचे, याचा सर्वस्वी अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाच असल्याचे सांगत, ठाकरेंच्या आदेशानेच सहाणेंची हकालपट्टी झाल्याचा दावा गायकवाड यांनी केला. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या उमेदवारीबाबतच्या बैठकीत बहुसंख्य पदाधिकाऱ्यांचा कल नरेंद्र दराडेंच्या बाजूने होता. मात्र, उमेदवारी जाहीर झालेली नसताना सहाणेंनी सुरू केलेला प्रचार योग्य नव्हता, असा दावा त्यांनी केला.

- पदाधिकाऱ्यांचा खुलासा

- विधान परिषदेचा उमेदवार अद्याप जाहीर नाही

- आर्थिक तडजोडीचा आरोप चुकीचा

- बहुसंख्य पदाधिकारी दराडेंच्या बाजूने

- राऊतांवरील सर्व आरोप खोटे

- शिवसेनेला बदनाम करण्याचे राजकारण

- अॅड. सहाणे हकालपट्टीचे भांडवल करीत आहेत

- अन्य उमेदवार बघून उमेदवार जाहीर करू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावाना, काँग्रेसभवन जप्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वारंवार जप्तीच्या नोटिसा देऊनही मालमत्ता कर न भरणाऱ्या बड्या थकबाकीदारांविरोधात महापालिकेने कारवाईचा फास आवळला आहे. थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याचा धडाका लावला आहे. मोठे थकबाकीदार असलेल्या शहरातील ३९४ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. या मालमत्तांमध्ये काँग्रेस भवन, सार्वजनिक वाचनालय, सिकॉफ आणि आयमा या औद्योगिक संस्थांचाही समावेश आहे. या सर्व संस्थांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. २१ दिवसांत थकबाकी भरणा केला नाही, तर थेट या मालमत्तांचा लिलाव केला जाणार असल्याचे उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी सांगितले.

महापालिकेने घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी मार्च महिन्यात जोरदार मोहीम सुरू केली आहे. महापालिकेने ९० हजार थकबाकीदारांना मालमत्ता कर भरण्याच्या नोटिसा दिल्या असून, बड्या थकबाकीदारांची थेट मालमत्ताच जप्त करण्याची कारवाई केली जात आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पालिकेने शहरातील सहा विभागांतील बड्या थकबाकीदारांना रडारवर घेत, त्यांच्यावर जप्तीची मोहीम राबवली आहे. शहरातील जवळपास पाच हजार बड्या थकबाकीदारांची लिस्ट तयार करीत, त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. नोटिसा बजावूनही दाद न देणाऱ्या या बड्या संस्था आणि व्यक्तींच्या मालमत्ता आता थेट जप्त केल्या जात आहेत. महापालिकेने आतापर्यंत शहरातील ३९४ बड्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली. हायकोर्टाच्या आदेशान्वये मालमत्ता सील करता येत नसल्याने त्यांच्यावर जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये बड्या संस्था आणि व्यक्तींचा समावेश आहे.

३९४ पैकी २१ मालमत्ताधारकांनी थकबाकी जमा केली आहे. ७४ मिळकतधारकांनी भागश: रक्कम जमा केली आहे. या वसुलीमोहीमेत आतापर्यंत पालिकेच्या तिजोरीत ८४ लाख ८९ हजार रुपये जमा झाले आहेत. महापालिकेची ही जप्ती मोहीम सुरू राहणार असल्याने थकबाकादीर मालमत्ताधारकांचे धाबे दणाणले आहे.

तर जाहीर लिलाव

महापालिकेने या सर्व ३९४ मालमत्ता धारकांवर जप्तीची कारवाई केली आहे. या सर्व संस्थांना व व्यक्तींना थकबाकी जमा करण्यासाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीपर्यंत या संस्था किंवा व्यक्तींनी थकबाकी जमा केली नाही, तर थेट या मालमत्तांचा जाहीर लिलाव करण्याचा कायदेशीर अधिकार महापालिकेला आहे. यासंदर्भातील कारवाईची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. त्यामुळे या संस्था किंवा व्यक्तींवर लिलावाची नामुष्की ओढावण्याची शक्यता आहे.

संस्था- रक्कम रुपये

जिल्हा काँग्रेस भवन- २६ लाख ६३ हजार

सावाना- ७ लाख ७८ हजार

'सिकॉफ' कार्यालय- १ लाख ३ हजार

आयमा कार्यालय-१४ लाख ७४ हजार

सिडको डाकघर- २४ हजार

जिल्हा सहकार भवन-१४ लाख १७ हजार,

हॉटेल वूडलॅँड-३५ लाख १९ हजार

आयसीआयसीआय बॅँक (ना. रोड)-१४ लाख

माथाडी कामगार मंडळ- २ लाख ७७ हजार

सेवाकुंज ट्रस्ट-१५ लाख ३८ हजार

लेवा समाज मंडळ-१३ लाख ११ हजार

वाणी हाऊस-१२ लाख ९ हजार

काँग्रेस भवनला यापूर्वीही नोटीस

महापालिकेने यापूर्वीही कॉँग्रेस कमिटीला जप्तीची नोटीस बजावली होती. दोन वर्षांपूर्वी कॉँग्रेस कमिटीने दहा लाख रुपयांचा भरणाही केला होता. आता महापालिकेने पुन्हा एकदा नोटीस बजावतानाच जप्तीची कारवाई केली असून, २१ दिवसांत थकबाकीचा भरणा न केल्यास कॉँग्रेस भवनाचा लिलाव करत ते विक्रीला काढले जाणार आहेत. याशिवाय, महापालिकेने सार्वजनिक वाचनालयावरही जप्तीची कारवाई केली आहे. सावानानेही मुदतीत रकमेचा भरणा न केल्यास नियमानुसार विक्री केली जाणार असल्याची माहिती उपआयुक्तांनी दिली. सावानाकडे ७ लाख ७८ हजार रुपये थकबाकी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतीचा मोबाइल पाहणे पत्नीला पडले महागात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवरा-बायकोची भांडण ही काही नवी नाहीत. क्षुल्लक कारणांवरूनही दोघांची भांडणे होतात. अलीकडे तर आपण मोबाइलच्या इतक्या आहारी गेलो आहोत की आजूबाजूला काय चालू आहे, याचे आपल्याला भानही नसते. मोबाइल म्हणजे जीव की प्राण झाला आहे. आपल्या मोबाइलला कुणी हात लावला तर राग अनावर होता. त्यातच नवरा-बायकोचं पटतं नसलं आणि पत्नीने मोबाइल उघडून पाहिलाचं तर मग भांडण ठरलेलंचं. याचाच प्रत्यय अंबडमध्ये आला. पतीचा मोबाइल पाहणे पत्नीला चांगलेच महागात पडले. मोबाइल पाहिला म्हणून पतीने पत्नीला लाथाबुक्यांनी मारहाण केली.

सोशल मीडियामुळे आपण मोबाइलच्या जाळ्यात अडकलो आहोत. यामुळे एकटेपणा वाढला आहे. कुटुंबातील सदस्यही सदा मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसतात. यावरून वादही होतात. अलीकडेच व्हॉट्सअॅप पाहू दिले नाही म्हणून एका अल्पवयीन तरुणीने घर सोडून पलायन केले होते. मोबाइलचे हे दुष्परिणाम वाढू लागले आहेत. पती-पत्नीच्या नात्यातही यामुळे दुरावा येऊ लागला आहे. यामुळेच पतीचा मोबाइल पहाणे पत्नीला महागात पडले. मोबाइल पाहिला म्हणून पतीने पत्नीला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. अंबडमधील दातीरनगर परिसरात शुक्रवारी (दि.२३ मार्च) हा प्रकार घडला. संबंधित महिलेने अबंड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

जीवे मारण्याची धमकी

मंजुषा संतोष जेऊघाले (वय २३) असे फिर्यादीचे नाव असून, संतोष जगन्नाथ जेऊघाले (वय २८, रा. पंचरत्न रेसिडेन्सी, दातीरनगर, अबंड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंजुषा यांनी सकाळी साडेसातच्या सुमारास पती संतोष यांचा मोबाइल पाहिला. ही बाब संतोष यांच्या लक्षात येताच त्यांना राग अनावर झाला. त्यांनी मंजुषा यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. लाकडी दांडके उगारून जीवे मारण्याची धमकी दिली. मुलाच्या व भावाच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी ‘युवा संवाद’

$
0
0

मालेगावी शुक्रवारी पोलिस दलातर्फे अभियान

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

समाजात वाढत असलेले अल्पवयीन गुन्हेगारांचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी नाशिक परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांमध्ये 'महाराष्ट्र पोलिस युवा संसद अभियान' सुरू करण्यात आले आहे. ३० मार्च रोजी येथील आयएमए हॉलमध्ये  या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील २४ शाळांचे विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. समाजातील ज्वलंत  विषयांवर विद्यार्थी मनोगत व्यक्त करणार  आहेत. या विचार मंथनातून सूचना व उपाय सुचविले जाणार असल्याची  माहिती अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.

राज्यात अल्पवयीन गुन्हेगारीचे प्रमाण लक्षणीय असून, बाल गुन्हेगारी वाढीची कारणे शोधतांना त्याचे समूळ उच्चाटन व्हावे म्हणून मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात हे अभियान राबविण्यात आले. थेट पोलिसांचा मुलांशी संवाद होत असल्याने गुन्हेगारीचे प्रमाण घटून सुमारे १५ लाख शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी या अभियानाशी जोडले गेले आहेत. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चोबे, जिल्हा पोलिस प्रमुख संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर या पाच जिल्ह्यात हा उपक्रम राबविला जात आहे.

परिक्षेत्रीय स्पर्धा एप्रिलमध्ये

या अभियानात विद्यार्थी भ्रष्टाचार, जातीयवाद, विद्यार्थी आत्महत्या, शेतकरी आत्महत्या, दहशतवाद, आतंकवाद, महिला अत्याचार, नक्षलवाद आदी विषयांवर विद्यार्थी भाष्य करून चर्चा करतील. विद्यार्थ्यांच्या विचारातून व्यक्त होणाऱ्या सूचना तसेच उपाययोजनांची योग्य दखल घेतली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पहिले तीन संघ परिक्षेत्रस्तरीय स्पर्धेसाठी निवडले जातील. परिक्षेत्रीय स्पर्धा नाशिक येथे १५ एप्रिलला होईल. यातून विजेता संघ निवडला जाणार असल्याचे पोद्दार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुबईमध्ये गुंजला गीतरामायणाचा स्वर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दशरथा घे हे पायसदान यासारखी गीत रामायणातील विविध २२ बहारदार गीते सादर करून कलावतांनी यूएई, दुबईमधील इंडियन कौन्सुलेट सभागृहात 'श्रीराम नवमी पर्व'मधून मंत्रमुग्ध वातावरण निर्माण केले.

ख्यातनाम लेखक ग. दि. माडगूळकर यांनी रचलेले आणि संगीतकार सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेले गीत रामायणाचा आस्वाद दुबईतील मराठी रसिकांनी घेतला. कर्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती उज्ज्वला देसाई यांनी केली. संगीत संयोजन पंडित जितेंद्र अभिषेकि यांचे शिष्य मेघन श्रीखंडे, दिग्दर्शन पंडित प्रभाकर कारेकर यांचे शिष्य अभय सामंत यांनी केले. गीत रामयाणाचे निरुपण डॉ. सुषमा शिरोडकर यांनी केले.

सलग तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात दुबईकर मंत्रमुग्ध झाले. गिरीश पांडे, जयंत धाबू, इरावती मुलमुले, सुमेधा बेळगांवकर, स्वाती पटवर्धन आणि बाल कलाकार अभिलाषा देसाई यांनी गीते सादर केली. मेघन श्रीखंडे (हार्मोनियम), अभय पटवर्धन (तबला), वैभव तांडेल (की-बोर्ड) आणि महादेव फडते (साईड रिदम) यांनी संगीतसाथ केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images