Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

उन्हाच्या तीव्रतेने नाशिककर त्रस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात उन्हाळ्याने रौद्र रूप धारण केले असून, उष्णतेच्या त्रासाने नागरिकांच्या जिवाची लाहीलाही होत आहे. दिवसेंदिवस तापमान वाढत असल्याने सकाळी जॉगिंग ट्रॅकवर फिरणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात उष्णतेची लाट आली असून, रविवारी शहरात ३८.६ इतकी तापमानाची नोंद झाली आहे.

नाशिककरांच्या दृष्टीने य़ंदाचा उन्हाळा जास्त कडक असल्याचे म्हटले जाते. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उष्णतेत वाढ होत असून, अनेकांनी कूलर व एसी घेणे पसंत केले आहे.

सकाळचे कोवळे ऊनही नकोसे वाटू लागल्याने जॉगिंग ट्रॅकवर येणाऱ्यांची गर्दी कमी झाली आहे. उन्हाळ्याची तीव्रता घरातही जाणवत असून, तहानेने घसा कोरडा पडतोय. अनेकांनी दुपारचा चहा सोडून पन्हे, कोकम सरबत, आवळ्याचे सरबत याला पसंती दिली आहे. जिवाची लाही होत असताना कितीही पाणी प्यायले तरी तहान काही भागत नाही. बदलत्या वातावरणाचा शरीरावर खूप परिणाम होत असून, नाकाचा घोळणा फुटणे, ताप येणे, सर्दी-खोकला, उष्माघात यांसारख्या आजारांमध्ये वाढ होऊ लागली आहे. एप्रिलमध्ये नाशिकने ३८.६ अंशांवर पारा चढताना पाहिला असल्याने नागरिकांनी अधिक दक्षता घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.

शहराचा पारा वाढतच असून, हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी काही दिवस उन्हाचा तडाखा कायम राहणार असल्याने नाशिककरांना उन्हाच्या झळांना सामोरे जावे लागणार आहे. उन्हाळ्यात घाम जास्त येतो. त्यामुळे पाण्याच्या कमतरतेचा धोका जाणवू नये म्हणून पाणी जास्त प्यावे. गरज असेल तरच उन्हात बाहेर जावे. उन्हात जाताना पोट रिकामे नसावे, पाणी जवळ असावे. तसेच उन्हापासून बचाव करणारी सर्व साधने सोबत असावीत. लहान मुले आणि वृद्धांसाठी हा ऋतू विशेष देखभालीचा आहे. दोघांची रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत असल्यामुळे कुठल्याही रोगाचा हल्ला यांच्यावर चटकन परिणाम करतो. पाणी जास्त प्यावे आणि साधे जेवण करावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

थंडपेयांच्या विक्रीत वाढ

उन्हाळ्यात घसा कोरडा पडत असल्याने रस्त्यावरील रसवंतीमध्ये उसाचा रस घेण्यासाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहे. रेडिमेड आवळ्याचे सरबत, कोकम सरबत अशा सरबतांच्या विक्रीत वाढ झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कविता मातीशी नाळजोडणाऱ्या असाव्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कवीच्या कविता या मातीशी नाळ जोडणाऱ्या असल्या तर त्या जास्त भावतात. नाशिकचे प्रथितयश कवी संतोष हुदलीकर यांची प्रत्येक कविता ही मातीशी नाळ जोडणारी आहे. त्यांना कोणत्याही विषयाचे बंधन नसल्याने ते सामान्यांपर्यंत पोहोचले असल्याचे प्रतिपादन गायक नंदेश उमप यांनी केले.

द्वादश प्रकाशनाच्या वतीने लेखक-कवी संतोष हुदलीकर यांच्या 'डोह माझा' या गेय कवितासंग्रहाचे प्रकाशन रविवार १ एप्रिल रोजी परशुराम साईखेडकर नाट्यगृहात करण्यात आले. त्या वेळी उमप बोलत होते. नंदेश उमप, पं. अविराज तायडे, पं. मकरंद हिंगणे, संजय गिते, मीना निकम, रागिणी कामतीकर प्रमुख पाहुणे होते. उमप म्हणाले, की संतोष हा हरहुन्नरी कवी आहे. त्याला कोणत्याही विषयाचे बंधन नाही. प्रत्येक विषय हा ताकदीनेच तो पुढे नेत असतो. त्याने ज्याप्रमाणे मातीशी नाळ जोडली आहे त्याचप्रमाणे माणसांशीदेखील नाळ जोडली आहे. मराठी सुफी, गझल असे अनेक प्रकार त्यांनी हाताळले आहेत. पाण्यात रंग टाकल्यानंतर त्या रंगाचे पाणी होते त्याप्रमाणे संतोष हुदलीकरांची लेखणी आहे. आजवर त्यांनी अनेक कथा, लेख लिहिले असून, विक्रमी पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. मुक्त मनाचा कवी आहे त्यामुळे त्याचा हा नवीन 'डोह माझा' हा काव्य संग्रह सामान्यांच्या मनाला भावेल असी नक्की ग्वाही देतो.

हुदलीकर प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला एका पुस्तकाचे प्रकाशन करीत असून, वर्षभरात ते १२ पुस्तकांचे प्रकाशन करणार आहेत. पैकी चार पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे. यावेळी नंदेश उमप यांचा सत्कार कवी हुदलीकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी हिंगणे आणि गिते यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात हुदलीकर व गिते यांनी कवितांचे वाचन केले. कवी संजय चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. मनीषा क्षेमकल्याणी यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिक वापरणाऱ्यांवरनाशिकरोड येथे कारवाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

महापालिकेच्या नाशिकरोड विभागातर्फे प्लास्टिक कॅरिबॅग वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. कारवाईत अनेक हातगाडीवाल्यांना दंड करण्यात आला. महापालिकेने दुकानांचीही तपासणी करण्यात आली. आरोग्य विभागाने ३० मार्च ते १ एप्रिल यादरम्यान कॅरिबॅग तपासणीसाठी मोहीम हाती घेतली होती. तीन दिवसांत प्लास्टिक कॅरिबॅग, कचरा वर्गीकरण, अस्वच्छतेबाबत कारवाई झाली. ५३ हजार ४२० इतका दंड वसूल करण्यात आला. विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी, विजय जाधव, राजू निरभवणे आदींनी मोहिमेत सहभाग घेतला.

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड

इमारतीचे बांधकाम सुरू असताना मजुराचा तोल गेल्याने मृत्यू झाल्याची घटना विहितगावात कारडा कन्स्ट्रक्शनच्या हरिकिरण इमारतीमध्ये रविवारी घडली. विहितगाव येथे नरेश कारडा या बांधकाम व्यावसायिकाच्या हरिकिरण या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इमारतीच्या सातव्या मजल्यावर फ्लास्टरचे काम सुरू असताना हालिम सलीम शेख (वय ३४, रा सिडको, लेखानगर) हा मजूर तोल गेल्याने पडला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. बिटको रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शेख यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे. नातेवाइकांनी भरपाईची मागणी केली असता, मृताच्या नातलगांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली. याबाबत उपनगर पोलिस ठाण्याचे हवालदार गणपत काकडे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेची २० टक्के वसुली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राबविलेल्या धडक वसुली मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळाला असून ३१ मार्च अखेर बँकेची एकूण ८२० कोटींची वसुली झाली आहे. तर जप्त केलेल्या १४९ पैकी ४९ वाहनांचे लिलाव करत बँकेने १.३६ कोटींची वसुली केली. वसुलीचे हे प्रमाण एकूण वसुलीच्या २० टक्के असून गत वर्षीच्या तुलनेत यात १५ टक्यांनी वाढ झाली आहे.

जिल्हा बँकेची एकूण २७६४.९१ कोटींची वसुली पात्र रक्कम आहे. परंतु कर्जमाफीच्या रकमेचा बँकेला आधार मिळाला आहे. ३१ मार्च अखेर यातील ५५२.५८ कोटींचे मुद्दल तर ३६२.९ कोटींची व्याजाची वसुली झाली आहे. त्यामुळे एकूण वसुली ही ८२०.३४ कोटींची झाली आहे. हे प्रमाण एकूण वसुलीच्या २० टक्के आहे. ३१ मार्च २०१७ अखेर केवळ ५ टक्के बँकेची वसुली झाली होती. यंदा मात्र यात १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कर्जमाफीतील एक वेळ समझोता योजनेतंर्गत १२० हजार ८७१ सभासदांनी ८६.५६ कोटींचा भरणा केला आहे. त्यापोटी शासनाकडून बँकेला ८८ कोटींची कर्जमाफी प्राप्त झाली आहे. जिल्ह्यातील विविध विभागातून १७४ वाहन जप्तीची कारवाई झाली होती. आतापर्यंत यातील ४९ वाहानांचे लिलाव बँकेने केले आहेत. यातून १.३६ कोटींची वसुली झाली आहे. वसुलीपात्रातील ५५ वाहनांचे ५५ लाख रुपयांचा भरणा झाला आहे. ही वसुली प्रक्रिया १५ एप्रिलपर्यंत सुरू राहणार असल्याने यात वाढ होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधी दिला तो गेला कुठे?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा नियोजन मंडळाने आर्थिक वर्षात जवळपास सर्वच निधी खर्च करण्याचा प्रयत्न केला असला तरी ५३ कोटींचा निधी विविध कारणांनी राज्य सरकारकडे वर्ग झाला आहे. यात जिल्हा परिषदेच्या ३२ कोटी रुपयांच्या निधीचा समावेश आहे. विशेष म्हणजे हा निधी देऊनही नव्या सिस्टीममुळे जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे हा निधी का वर्ग झाला नाही, याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाठपुरावा केला जाणार आहे. त्यामुळे तूर्त तरी या निधीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

जिल्हा परिषदेच्या ३२ कोटीप्रमाणेच १२ कोटी रुपयेसुद्धा राज्य सरकारला जिल्हा नियोजन मंडळाने परत वर्ग केले आहे. केंद्राच्या योजनेसाठी हे पैसे दिले होते. त्यात ५० टक्के वाटा केंद्र व राज्याचा होता; पण राज्याने पैसे देऊनही केंद्राने पैसे न दिल्यामुळे २४ कोटींच्या विकासकामांना यातून फटका बसला आहे. त्याचप्रमाणे शिष्यवृत्तीसाठी असलेला ९ कोटींचा निधी लाभार्थी न मिळाल्यामुळे वर्ग झाला आहे. जिल्ह्यात नियोजन मंडळाने सर्वसाधारण निधीतून ३२१ कोटींचे नियोजन केले होते. त्यातील ३०९ कोटी रुपये खर्च केले आहे, तर १२ कोटी केंद्राने निधी न दिल्यामुळे परत गेला आहे. त्याचप्रमाणे आदिवासी विकासासाठी ४५६ कोटींचे नियोजन केले होते. त्यातील ४२२ कोटी खर्च झाले असून, त्यातील ३२ कोटी तांत्रिक कारणामुळे अडकले आहेत. त्याचप्रमाणे विविध योजनांसाठी असलेल्या ९७ कोटींच्या निधीतून ९ कोटी केवळ लाभार्थी न मिळाल्यामुळे परत गेला आहे.

शंभर टक्क्यांचे उद्दिष्ट अपूर्णच

विशेष म्हणजे निधी खर्च करण्यामध्ये नियोजन मंडळाची चूक नसतानाही १०० टक्के निधी खर्च झाल्याचा आकडा त्यांना पूर्ण करता आलेला नाही. जिल्हा परिषदेच्या ३२ कोटींचा निधी वर्ग करण्याची सिस्टीम पहिल्यांदाच वापरण्यात आली. मात्र, या सब स्कीममधून हे पैसे जिल्हा परिषदेला वर्ग झाले नाहीत. १२ कोटींचा निधी केंद्राने दिला नाही म्हणून वर्ग झाला, तर ९ कोटी रुपयांच्या निधीला लाभार्थीच मिळाले नाहीत.

पत्रामुळे सर्वांनाच फटका

केंद्राच्या योजनेसाठी ५० टक्के केंद्राचा निधी आला नाही. त्यामुळे राज्य सरकारने अगोदरच दिलेला १२ कोटींचा निधी शिल्लक होता. त्यामुळे हा निधी दुसरीकडे वर्ग करण्यासाठी नाशिकच्या जिल्हा नियोजन मंडळाने राज्य सरकारबरोबर पत्रव्यवहार केला; पण या पत्रावरून राज्य सरकारने हा निधी वर्ग करण्याचे निर्देश नाशिकबरोबरच सर्व जिल्ह्यांना दिले. त्यामुळे या पत्राचा सर्वांनाच फटका बसला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल, डिझेलची दरवाढ सामान्यांवर अन्याय करणारी

$
0
0

पेट्रोल व डिझेलची दरवाढ अत्यंत चुकीच्या पद्धतीने झाली असून, भारताने दरवाढीचा उच्चांक गाठला असल्याने ही सामान्यांवर अन्याय करणारी गोष्ट असल्याचे मत नागरिकांनी व्यक्‍त केले आहे. पेट्रोल व डिझेलवर कर कपात केली, तर निश्चितच भाव कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे सरकारने ही दरवाढ तातडीने रद्द केली पाहिजे, असे मत नागरिकांनी व्यक्‍त केले आहे. पेट्रोलप्रमाणेच डिझेलचीदेखील घसघशीत दरवाढ होत असल्याने त्याचा मालवाहतुकीच्या भाड्यावर परिणाम होऊन महागाई अधिकच भडकण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सरकारने इंधनदरवाढीसंदर्भात सर्वच समाजघटकांचा विचार करून निर्णय घेण्याची अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सामान्यांच्या हिताचा व्हावा विचार

पेट्रोल व डिझेलची दरवाढ केल्याने सामान्यांचे कंबरडे मोडणार आहे. जनतेचे आर्थिक गणितच बिघडणार असून, डिझेलचे भाव वाढले तर सर्वच भाववाढ होत असते. त्यामुळे ही दरवाढ अत्यंत चुकीची आहे. सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करून डिझेल व पेट्रोलवरील जीएसटी रद्द केला पाहिजे.

-महेश चव्हाण

गाड्या वापरणेही होणार अवघड

पेट्रोल दर हे कायम वाढतच आहेत. जगाच्या तुलनेत भारतातच सर्वाधिक दर आहेत. मागील काही महिन्यांत ही दरवाढ खूपच झाली आहे. आता नागरिकांना गाड्या वापरणेसुद्धा अवघड होणार आहे. वेळप्रसंगी सायकली वापराव्या लागतील, असेच चित्र दिसत आहे. त्यामुळे सरकारने तातडीने ही दरवाढ रद्द केली पाहिजे.

-रवींद्र वाटेकर

सरकारने कराव निर्णयाचा फेरविचार

सरकार सामान्यांचा विचार न करता निर्णय घेत आहे. पेट्रोल व डिझेलच्या वारंवार होणाऱ्या दरवाढीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. ही दरवाढ झाल्यावर वाहतुकीचीही दरवाढ होते. मात्र, ती परत कधीही कमी होत नाही. दुचाकीवर फिरून व्यवसाय करणाऱ्यांचेही हाल होणार आहेत. त्यामुळे सरकारने या निर्णयाबाबत फेरविचार करावा.

-हेमंत काळे

...तरच मिळेल सामान्यांना दिलासा

या दरवाढीमुळे आता सामान्यांचे महिन्याचे गणितच बिघडणार आहे. वारंवार होणाऱ्या दरवाढीची झळ चांगलीच बसू लागली आहे. सरकारने याबाबत योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. त्याचबरोबर एकदा हे दर निश्चित करणे आवश्यक आहे. सरकारने तातडीने ही दरवाढ रद्द करून भाव कमी केले पाहिजेत. तरच सामान्यांना दिलासा मिळेल.

-अनिल जाचक

दरवाढ चुकीच्या पद्धतीची

पेट्रोल व डिझेलची दरवाढ आता नित्याचीच झाली आहे. गाड्यांचा वापर दिवसेंदिवस वाढत असून, पेट्रोल ही मूलभूत गरज झालेली आहे. सरकारकडून होणारी दरवाढ अत्यंत चुकीच्या पद्धतीची असून, भारताबाहेर पेट्रोल व डिझेलचे दर कमी असूनही त्यांना कसे परवडते, यावर विचार होणे आवश्यक आहे. सरकारने ही दरवाढ मागे घेतली पाहिजे.

-जयवंत कुलकर्णी

(आमचा आवाज)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्याध्यापकांसाठी शनिवारी उद्बोधन शिबिर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ व जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग यांच्यातर्फे जिल्ह्यातील मुख्याध्यापकांसाठी शनिवारी (दि. ७)

उद्बोधन शिबिर होणार आहे. मातोश्री इंजिनीरिंग कॉलेज औरंगाबाद रोड येथे सकाळी १० ते ५ दरम्यान शिबिर होणार आहे. यात विविध विषयांवर मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

व्यक्तिमत्व विकास, सरल पोर्टल, संचमान्यता आदी विषयांवर यावेळी मार्गदर्शन करण्यात येणार असून रत्नाकर अहिरे, संदीप औटे, शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव मार्गदर्शन करणार आहेत. तर सर्व समित्याचे कामकाज या विषयावर मुंबई मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय पाटील या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. 'सेवा पुस्तक रजेच्या नोंदी' या विषयावर गणेश फुलसुंदर व लेखाधिकारी ठाकरे, 'परिवहन समिती विद्यार्थी वाहतूक' या विषयावर आरटीओ मार्गदर्शन करणार आहे. तर 'माहिती अधिकार' या विषयावर शहारे, आर. पी. पाटील व सुनिता धनगर मार्गदर्शन करणार आहेत. राज्याचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, विभागीय मंडळाचे सचिव आर. आर. मारवाडी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय या शिबिरात मुख्याध्यापक प्रशासकीय बाबी विविध प्रकारच्या शिष्यवृत्या, डीसीपीएस योजना, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील नियोजन या सर्व बाबींची माहितीदेखील मुख्याध्यापकांना मिळणार आहे. मुख्याध्यापकांसाठी शिबिर महत्त्वाचे असल्याने त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष एस. के. सावंत व सचिव एस. बी. देशमुख यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा वर्गीकरणासहपाठवा आपला सेल्फी

$
0
0

शहरात १ एप्रिलपासून ओला आणि सुका कचरा बंधनकारक करण्यात आला आहे. प्रत्येक घरापासून ते व्यावसायिकांपर्यंत साऱ्यांनाच आता कचरा वेगळा करणे क्रमप्राप्त झाले आहे. तसेच, याचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. आपले शहर स्वच्छ, सुंदर रहावे, कचऱ्याचा प्रश्न योग्य पद्धतीने हाताळला जावा यासाठीच ओला आणि सुका कचरा वेगळा करणे आणि तो घंटागाडीत देणे आवश्यक आहे. आपणही ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यास प्रारंभ केला असेल तर त्याचा सेल्फी आपण आम्हाला पाठवू शकता. हा सेल्फी mataanashik@gmail.com या ई-मेल आयडीवर तातडीने पाठवा. कचऱ्याचे वर्गीकरण करून आपण सुंदर आणि स्वच्छ नाशिकसाठी हातभार लावू या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकरोड येथे इस्टरनिमित्त रॅली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड येथील संत फिलिप चर्चतर्फे इस्टर सणानिमित्त नाशिक विभागातील ख्रिस्ती समाजातील सर्व पंथीयांची संयुक्त रॅली काढण्यात आली होती.

या रॅलीत नाशिक धर्मप्रांताचे सचिव व खजिनदार रुपेश निकाळजे, रेव्ह. प्रवीण घुले, चर्चचे सचिव सायमन भंडारे, सुभाष श्रीसुंदर, प्रदीप जाधव, अतुल घोरपडे, संजय अहिर, सचिन साबळे, बेंजामिन निकाळजे, सुहास साठे, सचिन साबळे, सुहास अर्सूड, सुहास गंगोदक, पप्पू सालिन्स, नाना साळवी आदी सहभागी झाले होते. प्रभू उठला आहे, खचित उठला आहे, येशू मसिहा की जय... अशा घोषणा देत व प्रभू येशूची भक्तिगिते गात ही रॅली निघाली.  अखिल मानवाच्या पापांच्या क्षमेसाठी  येशूंचा जन्म झाल्याची भावना आहे. त्यांना क्रुसावर खिळे ठोकून मारण्यात आले. त्यांच्या स्मरणार्थ गुड फ्रायडे सर्वत्र पाळण्यात आला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी येशू पुन्हा जिवंत झाले म्हणून इस्टर (पुनरुत्थान) सण उत्साहात साजरा करण्यात आला.  रॅलीचा प्रारंभ जेलरोडच्या नारायणबापूनगर पासून झाला. संत फिलिप चर्च नाशिकरोड येथे सांगता करण्यात आली. रॅलीदरम्यान भागवत मिशन, ख्रिश्चन कॉलनी, शशिकांत उन्हवणे यांच्या मंडळांनी पाणी, रसना, फळे आदींचे वाटप भाविकांना केले.

(लोगो- सोशल कनेक्ट)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वालदेवी नदीत बुडालेले दोघेही सिडकोतील

$
0
0

म. टा. वृत्तसेवा सिडको

वालदेवी नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या चौघाजणांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला असून, हे दोघेही सिडको परिसरातीलच रहिवासी असल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्‍त केली जात आहे.

वालदेवी नदीच्या परिसरता फिरण्यासाठी सागर दिलीप नेरे (रा. पंडितनगर), अनिल बाळू सुतार (रा. उत्तमनगर), ईबरान शेख व भरत वाघमारे (दोघे रा. पंडितनगर) हे चौघे मित्र काल वालदेवी नदीवर गेले होते. याठिकाणी या चौघांनही पोहण्याचा निर्णय घेऊन नदीत उडी टाकली. परंतु, त्यात सागर व अनिल हे दोघेजण परत न आल्याने याची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून वालदेवीच्या पात्रातून सागर व अनिल याचे मृतदेह बाहेर काढले. याबाबतची माहिती उत्तमनगर व पंडितनगर परिसरात पसरताच नागरिकांनी हळहळ व्यक्‍त केली. सागरच्या पश्चात आई-वडील व दोन विवाहीत बहिणी असा परिवार आहे. अनिल हा मुळचा राहणार कुठचा याबाबतची माहिती मिळाली नसून, त्याच्या पश्चात कोण-कोण आहे याची माहिती उशिरापर्यंत उपलब्ध होऊ शकलेली नाही.

चौकशीची मागणी

वालदेवी नदीवर हे चौघे गेले असले तरी याच्यांबरोबर अजून कोणी होते का किंवा हे खरेच बुडाले की यांचा घातपात करण्यात आला याचा तपास होण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. ही आकस्मात गोष्ट नसून घातपात असल्याचीच चर्चा परिसरात सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन शालेय मुलींवर अत्याचार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,  सिडको 

 परिसरातील दोन शाळकरी मुलींना अश्लिल चित्रफित दाखवून त्यांच्यावर अत्याचार करणारा स्कूल बस वाहनचालक किशोर देवकर याच्यावर  अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. दरम्यान, दुसऱ्या  एका  घटनेत पाटीलनगर भागात शेजारी राहणाऱ्या पाच वर्षीय बालिकेवर लैगिंक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे.

 स्कूलबस वाहनचालक किशोर देवकर (वय २१, रा, बजरंगवाडी, पांडवलेणी, सिडको) परिसरातील शालेय  मुलींना  शाळेत सोडण्याचे काम करतो. सहा महिन्यांपासून या व्हॅनमधील सातवी व दहावीमध्ये शिकणाऱ्या दोन   मुलींना गंगापूर रोड परिसरात घेऊन जात असे. या मुलींना व्हॅनमध्येच मोबाइलवर घाणेरडे व्हिडीओ दाखवून लैंगिक अत्याचार करीत होता. याबाबत मुलींनी घरी सांगितल्यानंतर पालकांनी पोलिसांत फिर्याद दिली. या प्रकरणी अंबड पोलिसांनी स्कूल  व्हॅनचालक देवकर याच्यावर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पुष्पा निमसे करीत आहेत.

 दुसऱ्या घटनेत पाटीलनगर येथील पाच वर्षीय बालिकेवर शेजारी राहणाऱ्या आरोपी विद्यासागर पाटील (वय ३३) याने पैशांचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी मुलीच्या पालकाने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पाटील याच्यावर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक छाया देवरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अॅट्रॉसिटी’बाबत पुनर्विचार करावा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

अनुसूचित जाती-जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत (अॅट्रॉसिटी) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी, या मागणीसाठी अनुसूचित जाती-जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक समिती त्र्यंबकेश्वर व आदिवासी तालुका संघर्ष परिषद यांच्या  वतीने करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

 अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यामध्ये आरोपीला अटक होणार नाही तसेच मागासवर्गीय शासकीय कर्मचाऱ्याला तक्रार दाखल करायची असेल तर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयाविरोधात सोमवारी भारत बंदची हाक देण्यात आली. त्र्यंबक तालुक्यात हरसूल येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला. तर त्र्यंबक शहरात रॅली काढून प्रधानमंत्री मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी  तहसीलदार महेंद्र पवार यांनी निवेदन स्वीकारले.

अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी 'अॅट्रॉसिटी' कायदा संरक्षक आहे. सर्वोच्च न्यायलयाने निर्णय देऊन या कायद्याचा कमजोर केला आहे. यामुळे अन्याय अत्याचाराच्या घटनेत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे केंद्र सरकारने या निर्णयाविरोधात पुनर्विचाार याचिका दाखल करावी तसेच मागसवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत मोठया प्रमाणात कपात करण्यात आली आहे. याबाबत ठोस निर्णय घ्यावा अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या. यावेळी ज्येष्ठ नेते मधुकर लांडे, सामाजिक कार्यकर्ते  उमेश सोनवणे, आदिवासी संघर्ष  परिषद तालुकाध्यक्ष  बाळासाहेब जाधव, भागवत गांगुर्डे, नगरसेवक अशोक घागरे, नगरसेविका कल्पना लंहागे, युवा नेतृत्व विजय पुराणिक, श्रमजीवी संघटना शहराध्यक्ष अशोक लहांगे, भाजप उपाध्यक्ष दिलीप  सोनवणे, विनोद खोडे, नगरसेवक सागर उजे, माजी नगरसेवक बंडू खोडे, रवींद्र  गमे आदी उपस्थित होते.

हरसूलमध्ये कडकडीत बंद

हरसूल या आदिवासी पट्ट्यातही कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी  विविध मागण्याचे निवेदन पोलिस स्टेशनला देण्यात आले. युवा नेते मिथुन राऊत,  राहुल शार्दुल, विठ्ठल भोये, हिरामण गावित, स्वप्नील शार्दुल, भाऊराज धनगर, दत्ता व्यवहारे, संदीप शार्दुल, रघुनाथ पोटिंदे, विष्णु बेंडकुळी, अंबादास बेंडकुळी, सुरेश शेंडे, केशव लांघे, विष्णू बोरसे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाडेकरूची माहिती लपविल्याचा पोलिसांवर गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

घरमालक व भाडेकरू यांची माहिती स्थानिक पोलिस ठाण्यात देण्याचे सक्‍तीचे असतानाही इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी आपले फ्लॅट भाड्याने देऊनही त्याची माहिती पोलिसांना दिली नसल्याचे उघडकीस आले. इंदिरानगर पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. नाशिक शहरात प्रथमच पोलिस कर्मचाऱ्यांवर अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची चर्चा पोलिसांत सुरू होती. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक वेळा गुन्हेगारी वृत्तीचे लोक भाड्याने फ्लॅट घेऊन राहतात. पोलिस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी याचा तपास करून परिसरात असलेल्या फ्लॅटमधील नागरिकांची माहिती गोळा करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले आहे. या पथकातील ताहीर हुसेन पापा शेख व प्रवीण गीते हे दोन्ही कर्मचारी पाथर्डी परिसरातील घरांची माहिती तपासत असताना स्वराजनगर येथील शुक्रतारा - अ या इमारतीत फ्लॅट नंबर १ व २ मध्ये भाडेकरू राहत असल्याचे त्यांना समजले. त्यानुसार त्यांनी चौकशी केली असता, फ्लॅट क्रमांक १ हा दीपक तुळशीराम पाटील, (४६, रा. एसआरपीएफ, धुळे) यांच्या मालकीचा, तर फ्लॅट नं. २ खंडेराव अर्जुन वाकळे ( ४९, रा. नवी मुंबई) यांच्या मालकीचा असल्याचे स्पष्ट झाले. हे दोघेही पोलिस कर्मचारी असल्याचे समोर आले. पोलिसांनी दोन्ही भाडेकरूंची चौकशी केली असता त्यांनी तीन वर्षांचा भाडेकरारनामा केल्याचे समोर आले. भाडेकरार करूनही घरमालकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली नसल्याचे लक्षात आल्यानंतर इंदिरानगर पोलिसांनी या दोन्ही पोलिस कर्मचारी मालकांविरोधात गुन्हा दाखल केला.

इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतच सर्वाधिक भाडेकरू राहत असून, अनेकांनी याबाबतची माहिती दिलीच नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्याने त्यांनी थेट चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. यापुढेही ही मोहीम अशाच पद्धतीने सुरू राहणार असून, घरमालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक नारायण न्याळादे यांनी सांगितले. 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षेचे आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिवसेनेच्या युवासेनेमार्फत बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध अभ्यासक्रमांसाठी घेतल्या जाणाऱ्या एमएच-सीईटी व नीट या परीक्षांची तयारी व्हावी यासाठी १५ एप्रिल रोजी सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. कॅनडा कॉर्नर येथील व्ही. एन. नाईक एज्युकेशन संस्थेत सकाळी साडेनऊ वाजता ही परीक्षा होईल.

युवासेना ही कॉलेजच्या युवक युवतींच्या सर्वागिण विकासासाठी विविध उपक्रम राबवणारी युवक संघटना आहे. या अंतर्गतच हा उपक्रमही आयोजित करण्यात आला आहे. या परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी १२ एप्रिलपूर्वी www.ys-cet.com या वेबसाइटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी झाल्यानंतर वेबसाइटवरूनच प्रवेशपत्राची प्रिंट घेऊन कार्यक्रमाला उपस्थित राहायचे आहे. या उपक्रमाविषयी अधिक माहितीसाठी युवासेना महानगरप्रमुख आदित्य बोरस्ते (९९२२१६६६८०) यांच्याशी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वाशे झाडांवर कुऱ्हाड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिक शहरात झाडे तोडण्यास हायकोर्टची बंदी असतानादेखील जेलरोड-टाकळीरोडवरील जुन्नरे मळ्यातील तब्बल सव्वाशे झाडांची विनापरवना कत्तल करण्यात आली आहे.

महापालिकेच्या तक्रारीनंतर उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कायदे धाब्यावर बसवून पर्यावरणाची हानी करणाऱ्या संबंधित मालक आणि ठेकेदारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.

टाकळीतून जेलरोडकडे जाताना उजव्या हाताला सुरेश श्रीधर जुन्नरे यांचा मळा आहे. तेथे गेल्या काही वर्षांत विविध प्रकारची झाडे वाढलेली आहेत. जुन्नरे यांनी व्यवसायासाठी ही जागा विकसित करण्याचा दावा करीत छोटी-मोठी अशी सव्वाशे झाडे तोडली. ट्रक भरून लाकडे वाहण्याचे काम तीन दिवस खुलेआमपणे सुरू होते. मात्र, जागरूक नागरिकांमुळे ही बाब उघड झाली. सुरेश जुन्नरे (पंचवटी) आणि ठेकेदार अरुण विठोबा महाले (रा. गंगापूर कॅनॉलरोड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

मजुरांचे पाल

झाडे तोडण्यासाठी ठेकेदार महाले यांनी मजूर बोलावले होते. कुटुंबीयांसह हे मजूर तीन दिवसांपासून तेथे राहत होते. झाडे तोडण्याचे काम तीन दिवस सुरू होते. टाकळीरोडने प्रवास करणाऱ्या काही जणांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठेकेदाराने ही खासगी जागा असल्याने परवानगीची गरज नसल्याचे खोटेच सांगून त्यांना परतवले. काही नागरिकांनी पर्यावरणप्रेमी भारती जाधव, दीपक जाधव यांना फोन केल्यानंतर रविवारी ते घटनास्थळी आले. काही नागरिकांनी उपनगर पोलिस ठाण्याला फोन केला. वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर रायते यांनी निरीक्षक महेंद्र चव्हाण व सहकाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. महापालिकेचे उद्यान अधीक्षक महेश तिवारी, पूर्व विभाग अधिकारी जयश्री सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान निरीक्षक राजेंद्र पांडे यांनी कारवाई सुरू केली.

 

परवानगी घेणार होतो!

पोलिसांनी जागामालक जुन्नरे आणि ठेकेदार महाले यांना हजर होण्यास सांगितले. जागामालकाने आपल्या खासगी जागेतील झाडे तोडत असल्याचे सांगून बचावाचा प्रयत्न केला. मात्र, पांडे यांनी खासगी जागेतील झाड तोडण्यासाठीही कायदेशीर पूर्तता करावी लागते, असे सांगितले. आपण महापालिकेची परवानगी घेऊनच झाडे तोडणार होतो. मात्र, ठेकेदाराने त्याबाबत पूर्तता केली नाही, असा पवित्रा जुन्नरे यांनी घेतला. तथापि, पांडे यांनी पंचनामा करून कायदेशीर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले. सोमवारी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. वृक्षप्रेमी अश्विनी भट यांनी सांगितले, की हायकोर्टाचा स्टे असतानाही नाशिक परिसरात सर्रासपणे वृक्षतोड सुरू आहे. टाकळीरोडवर सव्वाशे झाडे तोडण्यात आली. हा हायकोर्टाचा अवमान असून, तसे कलम लावावे. खटला हायकोर्टात चालवावा. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध हे कलमही लावावे.

लागेबांधे असल्याची संशय

हायकोर्टाची सक्त मनाई असतानाही नाशिकमध्ये खुलेआम झाडे तोडली जात असल्याबाबत पर्यावरणप्रेमी भारती जाधव, जगबीर सिंग यांनी सांगितले, की झाडे तोडणारे ठेकेदार, उद्यान विभाग आणि वखारमालक यांचे लागेबांधे असावेत. नाशिकरोडचा ठेकेदार मणियार तर महापालिकेची वाहने वापरून बेकायदेशीरपणे झाडे तोडत आहे. त्याचे व्हिडीओ महापालिका व पोलिसांनी देऊनही कारवाई झालेली नाही. वृक्षतोडप्रकरणी केवळ गुन्हा दाखल होतो. कठोर कारवाई झाली असती, तर यंत्रणेचा धाक राहिला असता. तक्रार करणाऱ्या नागरिकांची नावे मुद्दाम उघड केली जातात. आयुक्त तुकाराम मुंढे यांना भेटून हे निर्दशनास आणणार आहे.

वृक्षतोडीची तक्रार दाखल करुन घेण्यास पोलिस टाळाटाळ करतात. कठोर कारवाई करत नाहीत. त्यामुळेच झाडे तोडणाऱ्यांना धाक राहिलेला नाही. कठोर कारवाई केली, तरच नाशिकचे पर्यावरण टिकेल.

-दीपक जाधव, जिल्हा संचालक, जीवन नागरी पर्यायवरण संस्था

 

या प्रकरणात महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडाचे जतन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमानुसार कोर्ट एक झाड तोडल्याच्या बदल्यात एक आठवडा ते एक वर्षापर्यंत जेल, तसेच एक ते पाच हजारांपर्यंत दंड ठोठावू शकते.

-राजेंद्र पांडे, उद्यान निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सायकल ट्रॅकचा आराखडा सादर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

 शहरातील अत्यंत वर्दळीचा रस्ता अशी ओळख असलेल्या जेलरोडवर बिटको चौक ते जेलटाकी यादरम्यान सायकल ट्रॅक उभारण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे प्रभाग २० च्या नगरसेविका संगीता गायकवाड यांनी केली आहे. या सायकल ट्रॅकचा आराखडा पालिकेच्या बांधकाम विभागाच्या मागणीनुसार त्यांनी नुकताच उप अभियंता राजेश पालवे यांच्याकडे सोमवारी सादर केला. या आराखड्यास पालिका आयुक्तांनी मंजुरी दिल्यास स्वतंत्र सायकल ट्रॅक असणारा शहरातील हा पहिला रस्ता ठरणार आहे.

शहराची स्मार्ट नाशिकच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्यासाठी शहरातील वायू व ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी सायकल वापरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढणे गरजेचे आहे. परंतु, शहरात कोणत्याही रस्त्यावर सायकल ट्रॅक नसल्याने इच्छा असूनही सायकलचा वापर नागरिक करीत नाहीत. ज्या नागरिकांकडून सायकलचा वापर केला जातो त्यांनाही वाहनांच्या गर्दीतून जीवघेणा प्रवास करावा लागतो. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २० च्या नगरसेविका संगीता गायकवाड यांनी काही महिन्यांपूर्वीच जेलरोडवरील बिटको चौक ते जेल पाण्याची टाकी यादरम्यान सायकल ट्रॅक उभारण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली होती. त्यावर पालिकेच्या बांधकाम विभागाने त्यांना संबंधित सायकल ट्रॅकचा आराखडा सादर करण्याची सूचना केली होती. त्यानुसार सोमवारी त्यांनी तयार केलेला सायकल ट्रॅकचा आराखडा नगरसेवक पंडित आवारे यांच्या उपस्थितीत हेमंत गायकवाड यांनी पालिकेच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता राजेश पालवे यांच्याकडे सादर केला. याप्रसंगी  नितीन  खर्जुल  उपस्थित होते. जेलरोडला प्रेससह, फिलोमिना स्कूल, पुरुषोत्तम  स्कूल, कन्या कोठारी शाळा, र. ज. चौहाण कन्या हायस्कूल, आरंभ कॉलेज, बाल येशू हायस्कूल, के. एन. केला हायस्कूल आणि नवीन मराठी शाळा असल्याने या रस्त्याने सायकलचा वापर करणाऱ्या हजारो शालेय विद्यार्थी व कामगारांची मोठी वर्दळ असते. परंतु, हमरस्त्यानेच या शालेय विद्यार्थ्यांसह कामगारांना सायकलने प्रवास करावा लागतो. त्यामुळे या रस्त्यावर वारंवार अपघात होत असतात. स्वतंत्र सायकल ट्रॅक असल्यास सायकल वापरणाऱ्यांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.

बिटको चौक ते जेल पाण्याची टाकी हा रस्ता ३० मीटर रुंदीचा दुपदरी रस्ता असून, त्याला सेंटर दुभाजकासह फुटपाथही आहेत. फुटपाथला लागूनच दोन मीटरचा सायकल ट्रॅक उभारणे शक्य आहे. थर्मोप्लास्ट पेंट व सहा फुटांच्या अंतराने स्टँडपोस्टपोल उभारण्यासाठीचाच खर्च करावा लागणार आहे. स्मार्ट नाशिकसाठी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा सायकल ट्रॅक महत्वाचा ठरेल. त्याचा आराखडा पालिकेकडे सादर केला आहे.

- संगीता गायकवाड, नगरसेविका, प्रभाग २०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राणघातक हल्ल्यात तिघेजण जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

सिगारेटचे पैसे मागितल्याच्या रागातून सहा जणांनी दुकानचालकासह इतर तिघांवर प्राणघातक हल्ला करून दुकानातील मोबाइलसह पंधरा हजार रुपयांची रोख रक्कम लुटून नेली. ही घटना रविवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान नाशिकरोड बसस्थानकाजवळ घडली. या हल्ल्यात तिघेजण जखमी झाले असून, त्यात एका महिलेचाही समावेश आहे. हल्लेखोरांपैकी चौघेजण पोलिसांच्या हाती लागले असून, फरार झालेल्या दोघांचा नाशिकरोड पोलिसांकडून शोध सुरू आहे.

नाशिकरोड बसस्थानकाशेजारी स्वामी समर्थ मोबाइल विक्री व दुरुस्तीचे फिर्यादी विक्की बाळू शिरोळे (रा. चंदनवाडी, सुभाषरोड, नाशिकरोड) यांच्या मालकीचे दुकान आहे. या दुकानातच बीडी-सिगारेटचीही विक्री केली जाते. या दुकानात रविवारी रात्री नेहमीप्रमाणे फिर्यादीचा भाऊ विशाल बाळू शिरोळे हा काम करीत असताना रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास सिगारेट घेण्यासाठी सुनील रामराव वाघ (वय ३३) आला. त्याच्याकडे विशालने सिगारेटचे पैसे मागण्यावरून दोघांत वाद झाला. यावेळी फिर्यादीही दुकानात आला. त्याने व शेजारीच असलेल्या वाहीद शेखने वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. परंतु, सुनील वाघ याने शेजारीच रिक्षा स्टँडवर उभे असलेल्या विकास दोंदे (वय २७), प्रशांत दोंदे (वय ३२), शाहरुख बिस्मिल्ला शेख (वय २३) आणि इतर दोघा मित्रांना बोलावून विशाल व फिर्यादीस मारहाण केली. यावेळी सुनील वाघ याने प्राणघातक शस्त्राने विशाल शिरोळे याच्या डोक्यात व हातावर वार करून त्यास गंभीर जखमी केले. वाद सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या फिर्यादीची आत्या सत्यभामा म्हस्के व वाहीद शेख यांच्यावरही सुनील वाघ व त्याच्या मित्रांनी ढवला. यात ते दोघही गंभीर जखमी झाले. या हल्ल्यानंतर सुनील वाघ व त्याच्या मित्रांनी फिर्यादीच्या दुकानातील दोन मोबाइल फोनसह १५ हजारांची रोकडही लुटून नेली. पोलिसांत फिर्याद दाखल होताच नाशिकरोड पोलिसांनी सुनील वाघ व त्याच्या तीन मित्रांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले. उर्वरित दोघांचा पोलिस शोध घेत आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांवर पालिकेच्या बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोडला हटविली अतिक्रमणे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

पालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाने सोमवारीही अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली. सोमवारी जयभवानी रोड, बिटको चौक, गायकवाड मळा आणि जेलरोडच्या सैलानी बाबा चौकात राबविण्यात आलेल्या अतिक्रमण मोहिमेस विरोध झाला. परंतु, पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने कोणाच्याही दबावाला बळी न पडता अतिक्रमणे हटविली.

जयभवानी रोडवरील पाटील कॉप्लेक्समधील पार्किंगच्या जागेवरील पक्के बांधकाम पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जेसीबीच्या सहाय्याने हटविले. त्यानंतर अतिक्रमण निर्मूलन पथकाने आपला मोर्चा जेलरोडवरील सैलानी बाबा चौकाकडे वळवला. या ठिकाणी पालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून सहा  व्यावसायिकांनी उभारलेली पत्र्याची शेड्स तोडण्यात आली. काही ठिकाणी सामासिक अंतरातील मार्जिन बांधकामांवरही जेसीबी फिरवला. बिटको चौकातील पवन हॉटेल ते नाशिकरोड पोलिस ठाण्यादरम्यानच्या रस्त्यावरील फुटपाथवर ट्रॅव्हल एजंटांनी उभारलेली १२ बुकिंग शेडही पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने हटविली. त्यानंतर गायकवाड मळा रस्त्यावरील व्यावसायिकांचे हातगाडे, कुलर, समर्थ वडापाववाल्याचे दुकान हटविण्यात आले. ही मोहीम विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, सोनार यांच्या उपस्थितीत राबविण्यात आली. पोलिस बंदोबस्तात राबविण्यात आलेल्या या मोहीमेत एक जेसीबी, दोन अतिक्रमण विभागाची वाहने, आणि ३५ कर्मचारी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्गणी मागणाऱ्यांचा त्रास

$
0
0

गंगापूररोड : महापुरुषांची जयंती उत्सहात साजरी करण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे. मात्र शहरातील काही टवाळखोरांकडून वर्गणी मागणाऱ्यांचा त्रास व्यावसायिकांना सहन करावा लागत असल्याने याकडे पोलिसांनी माहिती घेत कारवाई करण्याची गरज आहे. धमकावत वर्गणी गोळा करणाऱ्यांना धडा शिकवावा, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी सैनिकाला ३६ हजाराला गंडा 

$
0
0

देवळाली कॅम्प : पैसे निघत नसल्याने एकाची मदत घेतल्याने सेवानिवृत्त लष्करी जवानास ३६ हजार रुपयांचा भुर्दंड बसला. शिवाजीनगर, सातपूर येथील माजी सैनिक ब्रिजलाल रामदास पवार हे २६ फेब्रुवारी रोजी लष्कराच्या रुग्णालयात उपचाराकरिता आले होते. औषधे घेण्यासाठी गेले असता स्टेट बँकचे कार्ड स्वॅप न झाल्याने रक्कम काढण्यासाठी एटीएम कार्ड घेऊन वडनेर रोडवरील एटीएमला गेले. तेथेही एटीएम कार्ड  रीड होत नसल्याने उपस्थित अज्ञात व्यक्तीने मदतची विचारणा करीत खात्यातून २५०० रोख रक्कम काढण्यास मदत केली. पण, त्याच व्यक्तीने परत त्या कार्डचा वापर करून खात्यातून न विचारता ३६ हजार रुपये परस्पर काढून फसवणूक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images