Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दोषींवर कारवाई होणारच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे कामगारांना लक्ष्य बनवत असून, यामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे आयुक्तांनी कामगारांवर कारवाई करू नये, अशी मागणी करीत कामगार संघटनांनी आयुक्तांची भेट घेतली. मात्र, आयुक्तांनीच कामगार संघटनांवर पलटवार करीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.

कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आयुक्त म्हणाले की, जे कामगार दोषी आहेत अशांवर निश्चित कारवाई केली जाईल. जे कामगार कामचुकार आहेत त्यांच्यावर कायम लक्ष असणार आहे. कुणाचीही यातून सुटका केली जाणार नाही. कामगार संघटनांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेतील कर्मचारी नियमित काम करीत असतात. कामाच्या पद्धतीत वेळोवेळी बदल होत असतो. राज्य कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते. त्या तुलनेत माहापालिकेतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात नाही. कामगारांची इच्छा नसताना अनावधानाने चुका होतात. या चुका माफ होण्यासारख्या असतानाही कामगारांना सुधारण्यासाठी वेळ न देता त्यांचे निलंबन, वेतनरोखी तथा शास्ती नोटिसा इत्यादी केलेली कार्यवाही मागे घ्यावी. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भीतीमुळे आणखी चुका होण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे, ती मागे घेण्यात यावी. नाशिक महापालिकेचे कर्मचारी स्वच्छता करीत असल्यानेच शहरात स्वच्छता दिसत आहे. आजपर्यंत शहरात अस्वच्छतेमुळे कोणतीही रोगराई पसरलेली नाही. आयुक्तांनी या कर्मचाऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा. आयुक्तांच्या कामाची कार्यपद्धती, अचूक वेळ मर्यादा यांचे आम्ही निश्चित स्वागत करतो. कर्मचाऱ्यांचे वय, त्यांच्याकडे असलेला कामाचा भार बघता निर्णय घेण्यात यावा. त्याचप्रमाणे कर्मचारी संघटनांनी कामगारांच्या मागण्यांबाबत पत्रव्यवहार केला आहे. त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा, असेही नमूद करण्यात आले आहे. यावेळी मागासवर्गीय कर्मचारी युनियन, म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेना, मेघवाळ वाल्मिकी मेहतर समाज कामगार संघटना, सफाई कामगार संघटना, रिपब्लिकन फेडरेशन आदी कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी हजर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बीट, कोबी अन् वांग्याने केला घात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, वेगवेगळी नगदी पिके घ्यावीत, असे शेतकऱ्यांना मिळणारे सल्ले आपण नेहमीच ऐकत असतो. पण हे असे सल्ले ऐकून काही निर्णय घेणे खूप तोट्याचे ठरते. याबाबत कडू अनुभव तालुक्यातील सारोळे येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने घेतले आहेत.

वसंत पिराजी यळवंडे यांच्याकडे पाच बिघे शेती आहे. त्यातील दोन बिगे क्षेत्रात त्यांनी द्राक्षबाग केली आहे. या वर्षी या बागेतून ४० क्विंटल द्राक्षे निघाली. त्यातून ५० हजाराच्या आसपास उत्पन्न आले. त्यांच्या कुटुंबात सहा सदस्य आहेत. द्राक्षशेतीसह आणखी भाजीपाला घेण्याचा त्यांनी विचार केला. त्यामुळे त्यांनी एका बिघ्यात बीट लावले. पण बीट अवघे दोन ते तीन रुपये प्रतिकिलोने विक्री होऊ लागले. त्यातून मजुरी तर सोडा पण गाडीभाडेही सुटत नसल्याने त्यांनी बीट सोडले आणि कोबीची लागवड केली होती. पण कोबीनेही दगा दिला. त्यामुळे त्यांनी कोबी पिकावर ट्रॅक्टर फिरवला. शेवटी नुकसान वाढत असल्यामुळे त्यांनी त्यातून सावरण्यासाठी गँलोन जातीची वांगी घेतली. मात्र ही वांगी अक्षरश: दोन ते तीन रुपये किलोने विकली जात आहेत. त्यामुळे मजुरीही सुटत नाही. ही वांगी बाजारात आणली तरी त्यातून गाडीभाडेसाठीही पैसे येत नाहीत. नाशिक बाजारात वांगी विक्रीसाठी आणली. एका क्रेटला ५० रुपये दर मिळाला. यावर उतारा म्हणून ही वांगी गुजरातमध्ये चांगली मागणी असल्याने त्यांनी तेथे ही वांगी नेली. मात्र तेथेही प्रतिकिलो पाच ते सात रुपये असा दर मिळाला.

बीट, कोबी आणि वांग्याने वांदा केल्यामुळे यळवंडे कुटुंबाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांच्याकडे दोन गाई असून त्यांच्या दूधा विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक - इनोव्हेशन डे

$
0
0

'इनोव्हेशन डे'मध्ये

३०० नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट

कुलरमधून थंड हवेबरोबरच फ्रिज सारख्या सुविधा... पाण्यावर चालणारी सायकल... कचऱ्यातून खत बनविण्याचा प्रोजक्ट... यासारख्या अनेक भन्नाट कल्पना 'इनोव्हेशन डे'निमित्त प्रकल्पाच्या माध्यमातून साकार करण्यात आल्या. या प्रदर्शनात जिल्ह्यातील ३०० विद्यार्थींनी १०० नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले.

जिल्हा प्रशासन आणि नाशिक इंजिनीअरींग क्लस्टर यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक इंजिनीअरींग क्लस्टर येथे दोन दिवशीय 'इनोव्हेशन डे'चे आयोजन करण्यात आले आहे. बु‌धवारी त्याचे उद्घाटन खासदार हेमंत गोडसे, उद्योजकता व कौशल्य विकास आणि ग्रामीण विकास मंत्रालायचे मुख्य सचिव असिम गुप्ता, नाशिक जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., एनईसीचे उपाध्यक्ष के. एस. पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी यांच्या उपस्थित झाले. या इनोव्हेशन प्रदर्शनाचा समारोप ५ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता होणार आहे. उदयोन्मुख उद्योजकांच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी याचे आयोजन केले आहे.

'इनोव्हेशन डे'च्या निमित्ताने आयोजित प्रदर्शनात स्पर्धेच्या युगात वावरणाऱ्या विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील संशोधनाची चुणूक दाखवली. आपल्या वैज्ञानिक कौशल्याच्या सहाय्याने त्यांनी अभिनव प्रकल्प सादर केले. इंजिनीअरिंग, फार्मसी, आणि आयटी अशा विविध क्षेत्रांतील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला आहे. त्यामध्ये व्ही. एन. नाईक कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, के. के. वाघ कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, ब्रम्हा व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, एनडिएमव्हीपी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, टिएमईडी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, संघवी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, संडे व इस्पायर शाळा इत्यादी विविध शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी आहेत.

कुलरमध्ये फ्रिजच्या सुविधा

मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या इंजिनीअरींग महाविद्यालयाच्या मुलींनी सादर केलेला कुलरमध्ये फ्रिजच्या सुविधा आहेत. थंड हवेप्रमाणे थंड पाणी व भाज्या ताज्या ठेवण्याचे काम एकाच वेळी हा कुलर करत असल्याचा प्रोजेक्ट वेगळा ठरला. इस्पेलिअर या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने पाण्यावर चालणारी सायकल, शुज पॉलीश करणारे मशीन, हॅण्ड जनरेटर, हायड्रोलिक जेसीबी यासारखे प्रकल्प सादर केले. संडे सायन्सच्या विद्यार्थ्यांनी चंद्रयानाचा रोबोट हा प्रकल्पही लक्षवेधी होता.

द्वारकाच्या ट्रॅफिकला पर्याय

संघवी कॉलेजचा व्दारका सर्कलच्या ट्रफिकला पर्याय देणार अंडर ग्राऊंड मार्ग सारखा प्रोजेक्टही कौतुकास्पद होता. या महाविद्यालयाचा कचऱ्यापासून खत निर्माण करणारा प्रकल्पही वेगळा होता. त्याचप्रमाणे के. के. वाघ महाविद्यालयाचा जंगलात आग लागल्यानंतर सुचना देणारा सेन्सॉर व लिकेज करंट अनायलाझर हा प्रोजेक्टही वेगळा होता. के. व्ही. एन. नाईक महाविद्यालयाचा वॉटर टेबल वाढवण्यासाठी प्रकल्पही नावीन्यपूर्ण होता. त्याचप्रमाणे प्लॅस्टिकला पर्यायी ठरु शकणाऱ्या सुपारीच्या पानापासून बनवलेल्या विविध वस्तूनीं सर्वांचे लक्ष वेधले.

'डिजीटल एम्पॅक्स स्केअर'

'डिजीटल एम्पॅक्स स्केअर' हे यंत्र तयार केले. या यंत्रामुळे अलार्मच्या सहाय्याने रुग्णांना औषधे मिळतील आणि औषधे घेतली की, नाही हे मोबाइलवरील संदेशाने रुग्णांच्या कुटुंबियांना समजेल. संघवी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पाच्या माध्यमातून पेट्रोल चोरी तसेच पेट्रोल गाडीमध्ये व्यवस्थित भरले गेले की नाही याचे उत्तर मिळते. 'स्मार्ट टँक' या उपकरणाद्वारे पेट्रोलचे मोजमाप ते गळती यासंदर्भात तत्काळ संदेश संबंधितांना मिळतो. ब्रम्हा व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगने दुचाकी वाहनामध्ये एकाचवेळी दोन इंजिन लावुन वेगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चालकास स्पोर्टस बाईक आणि साध्या बाईकचा आनंद घेता येईल.

'थ्री इन वन ॲग्री मशिन'

एनडिएमव्हीपी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगने शेतकऱ्यांच्या हितासाठी सोलर ऑपरेटिंग 'थ्री इन वन ॲग्री मशिन' तयार केले आहे. त्यामध्ये कटिंग मशीन, फवारणी यंत्र आणि डस्टिंग यंत्र असे तीन उपकरण एकाच वेळी सौर ऊर्जेच्या सहाय्याने चालू शकतात. चांदवड येथील एसएनजेबी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी पिकअप वाहनाद्वारे माल वाहतुकीसाठी हायड्रोलिक सुविधा तयार केली आहे. नदीच्या काठावरील कचरा काढण्यासाठी रिव्हर क्लिनिंग मशीन, भिंतीवरील डागडुजी पाहण्यासाठी व्हॅक्यूम प्रेशर, फ्लोटरच्या सहाय्याने पाण्यावर चालणारी सायकल, अशा अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्पांचा प्रदर्शनात समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक - स्किल युनिव्हर्सिटी

$
0
0

फोटो - सतीश काळे

राज्यात स्किल युनिव्हर्सिटी

कौशल्य विकास मुख्य सचिव असिम गुप्ता यांची माहिती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यात कुशल मनुष्यबळ निर्मितीवर भर दिला जात असून, त्यासाठी स्किल डेव्हलमेंट युनिव्हर्सिटी स्थापन करण्याचा राज्य सरकार विचार करत असल्याची माहिती उद्योजकता व कौशल्य विकास आणि ग्रामीण विकास मंत्रालायचे मुख्य सचिव असिम गुप्ता यांनी नाशिकमध्ये 'इनोव्हेशन डे' निमित्त आयोजित कार्यक्रमात दिली.

राज्यात २०२२ पर्यंत ४ कोटी ५० लाख मनुष्यबळाचे कौशल्य विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे गुप्ता यांनी या युनिव्हर्सिटी स्थापन करण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले. तरुणांना कौशल्य विकासाद्वारे कुशल आणि सक्षम करुन त्यांना अधिक मागणी असलेल्या उद्योग सेवा व तत्सम क्षेत्रात रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न सुरू आहे. यावेळी गुप्ता यांनी विविध क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्याकरिता राज्यासाठी इनोव्हेशन धोरण तयार करण्याचे विचाराधीन असल्याचेही सांगितले. स्टार्ट अपच्या माध्यमातून नवीन उद्योजक पुढे येत आहेत. अनेकांना संधी मिळत आहे. नाशिकमध्ये स्टार्ट अप व्हिलेज, संशोधन केंद्र अशा मागण्या असून, त्याबाबतही शासन पातळीवर विचार केला जाईल, असे गुप्ता यांनी सांगितले.

'इनोव्हेशन हब' व्हावे

जिल्हाधिकारी राधाकृष्णन म्हणाले, 'जिल्ह्यात अनेक मोठे उद्योग असून, त्यांच्या गरजा पूर्ण करताना अनेक छोट्या उद्योजकांना काम मिळते. मात्र लघुउद्योजकांनी त्यावरच न थांबता नाविन्यपूर्ण दृष्टीकोन ठेवण्याची गरज आहे. नाशिकमध्ये 'इनोव्हेशन हब' देखील विकसित व्हावे, असा प्रयत्न केला जात आहे. अशा उपक्रमांना प्रोत्साहीत करण्याचे शासनाचे धोरण आहे. या अनुषंगाने डिजीटल शिक्षण देणाऱ्या सुविधायुक्त स्कूल, टेलिमेडीसिनमधील महत्त्वपूर्ण असे डायग्नोस्टीक टूल आदींचा वापर वाढविण्याकडे भर दिला जात आहे.

संशोधन केंद्र, स्टार्ट अप व्हिलेजची मागणी

'स्टार्ट अप' संकल्पना जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे नेऊ शकते. राज्याच्या विकास धोरणाच्या माध्यमातून जिल्ह्यात जास्तीत जास्त विकास साधण्यात येईल. यासाठी संशोधन केंद्र, स्टार्ट अप व्हिलेज आदी माध्यमातून काम केले जावे, असे खासदार गोडसे यांनी यावेळी मांडले. यावेळी त्यांनी नवसंशोधक व उद्योगांद्वारे मांडलेल्या संशोधन संकल्पना प्रकल्पांची पाहाणी करुन माहिती जाणून घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधी उधळपट्टी, भ्रष्टाचार रोखा

$
0
0

करसवलत रद्द केल्याने मनपावर नाराजी

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नागरिकांनी घरपट्टी, पाणीपट्टी वेळेत भरावी यासाठी देण्यात येत असलेली दोन ते पाच टक्के सवलत महापालिकेने एप्रिलपासून रद्द केल्यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याचा फटका महापालिकेलाही बसणार आहे.

महापालिकेचे नूतन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेतील भ्रष्टाचार व उधळपट्टीवर नियंत्रण ठेवल्यास करसवलत बंद करण्याची वेळच येणार नाही, असेही नागरिकांचे म्हणणे आहे. त्यांनी या दोन्हींवर लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे. महापालिकेच्या कलम १४० नुसार नागरिकांनी वेळआधी किंवा वेळेवर कराचा भरणा केल्यास त्यांना करात सवलतीची तरतूद आहे.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या कलमाला छेद देत सवलत रद्द करून धक्काच दिला आहे. डिजिटल योजेनेला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू असलेल्या ऑनलाइन कर भरण्याला दिली जाणारी सवलतही रद्द केली आहे. नाशिकमध्ये फक्त सोलर वापरकर्त्यांनाच बिलात सवलत मिळणार आहे. त्यामुळे या प्रकारांवरील करसवलतींबाबत रद्द करण्याच्या निर्णयावर नाशिककरांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

पाणीपट्टी घरपट्टीचा कर वेळेत भरल्यास एक टक्का अतिरिक्त सूट देण्यात येत होती. त्यामुळे नागरिकांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळत होता. आता ही सवलत बंद केल्याने नागरिकांबरोबरच महापालिकेलाही फटका बसणार आहे.

-रमाबाई बागूल

घर व पाणीपट्टी करात सवलत फार मोठी नाही. नागरिकांना शिस्त लागावी, मानसिकता तयार व्हावी, हा उद्देश त्यामागे आहे. करसवलत रद्द करण्याऐवजी पालिकेच्या उधळपट्टी व भ्रष्टाचारावर नियंत्रण आणून आयुक्तांनी महसूल वाढवावा.

-कुणाल जगताप

सवलतीमुळे नागरिक घर व पाणीपट्टी दोन्ही एकाचवेळी भरत होते. आता सवलत मिळणार नसल्यामुळे उदासीनता वाढणार आहे. सवलतीमुळे महापालिकेला पहिल्या तिमाहीतच सुमारे चाळीस कोटींचा कर मिळत होता, आता तोही मिळणार नाही.

-प्रभाकर मोरे

डॉ. गेडाम आयुक्त असताना घर व पाणीपट्टी करांत दोन ते पाच टक्के सवलत योजना सुरू झाली होती. या योजनेमुळे नागरिक व महापालिकेचा फायदा होत होता. मात्र, सध्याच्या आयुक्तांनी ही योजना रद्द करून सर्वांचीच निराशा केली आहे.

-ज्ञानेश्वर भगुरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंब्रिज

$
0
0

बेकायदा फी वसुली भोवणार

'केंब्रिज'विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड

वारंवार तक्रार करूनही नाशिक केंब्रिज स्कुलवर शिक्षण विभागाने आजवर कोणतीही कायदेशीत कारवाई न केल्याने नाशिक केंब्रिज पालक संघाने मंगळवारी (ता. ३) नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालकांना घेराव घालत संबंधित शाळेवर गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला. पालकांची आक्रमक भूमिका लक्षात घेऊन विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी नाशिक केंब्रिज स्कूलवर आठ दिवसांच्या आत शासकीय विधिज्ञांच्या सल्ल्याने पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालिका शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांना दिले आहेत. एखाद्या शाळेविरोधात थेट पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे लेखी आदेश देण्याची शहरातील पहिलीच घटना असल्याने आता या प्रकरणाकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागून राहणार आहे.

नाशिक केंब्रिज स्कूल या सीबीएससी बोर्डाचा अभ्यासक्रमाच्या शाळेच्या प्रशासनाकडून बेकायदा अवाजवी शैक्षणिक फी वसूल करण्याबरोबरच पालक शिक्षक संघाची नियमाप्रमाणे स्थापना न करणे, दरवर्षी बेकायदेशीरपणे फी वाढ करणे, शाळेतून पुस्तके व इतर साहित्य खरेदी करण्याची सक्ती करणे अशा प्रकारची मनमानी होत असल्याची तक्रार पालक संघाने यापूर्वीच शिक्षण विभागाकडे केली होती. हे प्रकरण गेल्या वर्षीच विभागीय शुल्क विनिमयन समितीपुढेही गेले होते. प्रारंभी या शाळेने या समितीच्या अधिकार कक्षेलाच आव्हान दिले होते. परंतु, या समितीने शाळेच्या विरोधात निकाल दिला. त्यानंतरही या शाळेकडून बेकायदा व अवाजवी शिक्षण फी वसुली सुरूच राहिल्याची तक्रार घेऊन या शाळेच्या पालक संघाने मंगळवारी विभागीय शिक्षण उपसंचालकांना घेराव घालत या शाळेवर कारवाई का झाली नाही, असा सवाल उपस्थित केला. नवीन शासन आदेशानुसार खाजगी विनाअनुदानित शाळांवर कारवाई करण्याचे अधिकार शिक्षण उपसंचालकांना देण्यात आलेले असल्याची बाब या पालकांनी विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्या लक्षात आणून देत या शाळेवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी लावून धरली. या पालकांची समजूत काढण्याचा जाधव व नितीन उपासनी यांनी प्रयत्न केला. परंतु, केंब्रिज स्कूलवर कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत कार्यालय न सोडण्याची स्पष्ट भूमिका यावेळी पालकांनी घेतली. त्यानंतर जाधव यांनी संबंधित शाळेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश नितीन उपासनी यांना दिले. परंतु उपासनी यांनी अशा प्रकारच्या कारवाईला सुरुवातीला नकार दिला. त्यामुळे उपस्थित आंदोलक पालकांनी संताप व्यक्त केला. या प्रकारानंतर आंदोलक पालकांनी तोंडी आदेशांऐवजी लेखी आदेशाची मागणी केल्यावर रामचंद्र जाधव यांनीही पालकांकडून दंडेलशाही होत असल्याचे वक्तव्य केले. परंतु, पालक आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने शेवटी आठ दिवसांत केंब्रिज स्कूलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जाधव यांनी नितीन उपासनी यांना दिल्याने सायंकाळी साडेसहा वाजता पालकांनी आंदोलन मागे घेतले. पुण्यातील शाळांवर ज्याप्रमाणे कारवाई करण्यात आली, त्याप्रमाणे नाशिकमध्ये शाळांवर कारवाई का होत नाही असा सवालही पालकांनी जाधव यांना केला.

'सहज ब्लॉसम'चीही मुजोरी

सातपूरच्या शिवाजीनगर भागात असलेल्या सहज ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूलनेही हिमानी महापात्रा, लता महापात्रा आणि सुभद्रा महापात्रा या तीन विद्यार्थिनींना त्यांच्या पालकांनी शाळेची फी एक रकमी न भरल्याच्या कारणावरुन थेट घरचा रस्ता दाखवल्याबाबत या शाळेविरोधात या मुलींचे पालक आचार्य राजकुमार महापात्रा यांनी विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार करून शाळेच्या मुजोरीचे पाढेच वाचले. या तक्रारीची दखल घेत या तिन्ही मुलींना शाळा बाह्य करणे शिक्षण हक्काचे उल्लंघन असून त्यांना शाळेत घेण्याचे लेखी आदेश शिक्षण उपसंचालक जाधव यांनी या शाळेच्या मुख्याध्यापकांना दिले. या आदेशाचे पालन न केल्यास संबंधित पालक शाळेविरोधात गुन्हा दाखल करतील, अशी तंबीही त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरणाला मिळाले जीवदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

घोटभर पाण्यासाठी पानेवाडी गावात भटकंती करणाऱ्या हरणावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्याला जखमी केले. मात्र गावातील माणुसकीच्या देवदूतांनी कुत्र्यांच्या तावडीतून जखमी हरणाला सोडवून त्याचे प्राण वाचवले. मानवतेचे दर्शन घडविणारी ही घटना बुधवारी मनमाडनजीक पानेवाडी येथे घडली.

पाण्यासाठी आसुसलेले एक हरिण पाण्याच्या शोधात पानेवाडी गावात शिरले. या हरणावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. सरपंच अंकुश कातकडे व इतर ग्रामस्थांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत कुत्र्यांच्या तावडीतून या हरणाची सुटका केली. त्यानंतर जखमी हरणावर उपचार करून त्याला वनविभागाकडे सोपविण्यात आले.

मनमाडपासून सात कि.मी. अंतरावर असलेल्या पानेवाडी लगत वन विभागाचे मोठे जंगल आहे. त्यात हरीण, मोर, ससे यांसह इतर वन्य पशू पक्षी मोठ्या प्रमाणात आहे. सध्या पारा ४० अंशांपर्यंत गेला असल्याने जंगलातील नदी-नाले कोरडे पडले आहेत. जंगलात वन्य प्राण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे पाण्यासाठी आसुसलेले वन्यजीव पाण्याच्या शोधात गावाकडे येत आहेत. त्यातच हे हरिण पानेवाडी गावाजवळ भटकत असताना कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. जीव वाचविण्यासाठी ते सैरावैरा पळत होते. मात्र कुत्र्यांनी त्याला पकडून लचके तोडण्यास सुरुवात केली. सुदैवाने सरपंच अंकुश कातकडे, धनराज कातकडे, अक्षय कातकडे, भीमराज कातकडे, वाल्मिक कातकडे यांचे तिकडे लक्ष गेले. त्यांनी कुत्र्यांच्या तावडीत या हरणाची सुटका केली. त्यानंतर त्याच्यावर उपचार करून वनविभागाकडे सोपविण्यात आले.

दोन शेळ्यांचा फडशा

भटक्या कुत्र्यांच्या टोळीने खादगावला दिनकर यमगर यांच्या गोठ्यावर हल्ला करून दोन शेळ्यांचा फडशा पाडला. तर काही शेळ्यांना जखमी केले. यमगर यांचे २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या शहरापासून ग्रामीण भागापर्यंत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तापदायक एप्रिल

$
0
0

- नाशिकचा पारा ४१ अशांपार

- एप्रिल पहिल्या चार दिवसातील उच्चांकी तापमान

- सन २००७ मध्ये पारा ४० अंशांवर

- २४ एप्रिल १९५८ मध्ये एप्रिलमधील उच्चांकी तापमान ४२.२ अंश सेल्सिअस

-

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये तापमानाने चाळिशी ओलांडली असून, यंदाचा एप्रिल आतापर्यंतचा सर्वाधिक तापदायक असणार आहे. सन २००७ मध्ये पहिल्यांदा एप्रिलच्या सात तारखेला तापमानाचा पारा ४० अंशांच्या वर गेला होता. यंदा तो पहिल्या चार दिवसांतच चाळिशीपार गेला असून, त्यामुळे नाशिककरांना तीव्र उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत आहे.

बुधवारी (४ एप्रिल) उन्हाने नागरिकांचा घाम काढला. कमाल तापमान ४०.१ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले. तप्त उन्हाच्या झळांनी नाशिककर पोळून निघत आहेत. एप्रिलच्या पहिल्या चार दिवसांत ही अवस्था असल्यामुळे यंदा प्रखर झळा सोसाव्या लागणार या शक्यतेनेच नागरिक धास्तावले आहेत. त्यामुळे फार महत्त्वाचे काम नसेल तर दुपारी घर, कार्यालये आणि आस्थापनांबाहेर पडणे लोक टाळत आहेत.

- सविस्तर वृत्त...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रवादी उपक्रम

$
0
0

पशु-पक्ष्यांसाठी राष्ट्रवादीची पाणपोई

तहानलेल्या प्राण्यांसाठी घराबाहेर पाणी ठेवण्यांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उष्णतेच्या झळा दिवसेंदिवस वाढ होत असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. माणूस पिण्याच्या स्वच्छ पाण्याची कुठूनही सोय करू शकतो. परंतु पशु व पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे शहरात पशु-पक्ष्यांसाठीच्या सामुहिक पाणपोर्इंचा स्तुत्य उपक्रम राबवित आहेत. तसेच नागरिकांनीही घराबाहेर पाणी ठेवण्यांचे आवाहन त्यांनी केले आहे.

उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात पक्ष्यांना दूरवर भटकंती करावी लागते व त्यामुळे पाण्याअभावी शेकडो पक्ष्यांचा मृत्यू होतो. यावेळी उन्हाळा तीव्र असून, पाण्याचे साठे झपाट्याने आटु लागले आहेत. शहरात देखील पाणी टंचाई जाणवू लागली आहे. याचा फटका भटके श्वान, मांजर, खारुताई, चिमणी, कावळा, साळूंकी, कबुतर आदींसारख्या विविध पशु व पक्ष्यांना बसत आहे. अशा पशु-पक्ष्यांसाठी आपण स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय कशी करू शकतो यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या विचारातून हा उपक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. त्यातुन शहरातील आवश्यक अशी ठिकाणं निवडून तेथे पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार आहे. याची सुरवात उपाध्यक्ष दीपक पाटील यांच्या माध्यमातून त्रिमूर्ती नगर, हिरावाडी येथून करण्यात आली. याप्रसंगी शहराध्यक्ष अंबादास खैरे, कार्याध्यक्ष अॅड. चिन्मय गाढे, दीपक पाटील, निलेश कर्डक, भूषण गायकवाड, कमलाकर गोडसे, सुशांत कुऱ्हे, संतोष पुंड, राज रंधावा, सागर तांबे, प्रकाश भोर, रोहित जाधव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

पाणी ठेवण्यासाठी घमेल्याच्या आकाराची सिमेंटची भांडी शहरातील आवश्यक ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. यंदाचा उन्हाळा पाहता पहिल्यांदाच पशु-पक्षी पाणपोईची संकल्पना राबविण्याचा विचार शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केला. नागरिकांनी देखील आपापल्यापरीने बाल्कनी, बगीचा व घरासमोरील अंगणात पक्ष्यांसाठी व शक्य झाल्यास पशुंसाठी पाणी व अन्नाची सोय करावी, अशी विनंती खैरे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वा. वि. दा. सावरकर वाचनालय

$
0
0

वाचनसंस्कृतीचे दुवे- नवनाथ वाघचौरे

सिन्नर फाट्यासारखा पूर्णतः झोपडपट्टीचा परिसर, कष्टकरी-कामगारांची वस्ती, नागरी सुविधा नसल्याने आलेला बकालपणा, गुन्हेगारीचा बसलेला शिक्का अन् जातीय दंगलींचे केंद्र अशी ओळख असलेल्या भागात सार्वजनिक वाचनालय सुरू करण्याची निव्वळ कल्पनाही अशक्य. परंतु, येथील दुर्बल आणि वंचित कुटुंबांना चार पुस्तके वाचण्याची सोय उपलब्ध झाली तर या परिसरातील वैचारिक बकालपणा दूर होण्यासाठी हातभार लागू शकतो. या उद्दात्त भावनेतून अंबादास शिंदे आणि सतीश बागूल या समाजहितैषी तरुणांनी २००० साली वाचनालय सुरू करण्याचा निर्धार केला अन् त्यांच्या प्रयत्नांतून ३ सप्टेंबर २००१ रोजी सिन्नर फाट्यावरील विष्णूनगर येथे पत्रकारयोगी स्वा. वि. दा. सावरकर सार्वजनिक वाचनालयाची भगूरचे साहित्यिक नंदन रहाणे यांच्या हस्ते मुहूर्तमेढ रोवली गेली. गेल्या सोळा वर्षांपासून या वाचनालयातील पुस्तकरूपी कुपीतील ज्ञानामृत चाखण्याची संधी परिसरातील बालगोपाळांपासून वडीलधाऱ्या मंडळींना उपलब्ध झालेली आहे. हे वाचनालय छोटेखानी असले तरी बालमनात वाचनसंस्कृती रुजविण्याचे मोठे कार्य या माध्यमातून सुरू आहे.

सिन्नर फाटा येथे विष्णूनगर या झोपडपट्टीयुक्त परिसरात अंबादास शिंदे आणि सतीश बागूल या सेवाभावी कार्यकर्त्यांनी २००१ साली वाचनालय सुरू केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साहित्याचा प्रभाव असल्याने या वाचनालयाचे नामकरणही स्वा. वि. दा. सावरकर सार्वजनिक वाचनालय असेच करण्यात आले. स्वतःची जागा नसल्याने सुरुवातीला काही वर्षे या वाचनालयाचे कामकाज सिन्नर फाटा येथे रेल्वे स्टेशन रोडवरील भाजीबाजारातील एका दुकानातूनच सुरू होते. जागेचा शोध सुरू असताना रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या पालिकेच्या शाळेच्या इमारतीतील एक खोली तत्कालीन नगरसेवक दिवंगत उत्तमराव हांडोरे यांच्या शिफारशीमुळे पालिकेने शंभर रुपये दरमहा भाडेतत्वावर दिली. जागा मिळाल्याने या वाचनालयाला एका अर्थाने संजीवनीच मिळाली. पुढे आठ वर्षे या वाचनालयाचे कामकाज याच ठिकाणाहून सुरू होते. परंतु, दोन वर्षांपूर्वीच्या सिंहस्थाच्या विकासकामांदरम्यान सिन्नर फाटा येथील पालिका शाळेची जुनी इमारत तोडण्यात आली व या ठिकाणी पार्किंगची सुविधा उभारण्यात आली. त्यामुळे सावरकर वाचनालयाला आपले बिऱ्हाड हलवावे लागले. इतरत्र जागा मिळाली नाही. त्यामुळे हे वाचनालय पुन्हा एका टपरीत स्थलांतरीत झाले. वर्षभरानंतर तरुण महाराष्ट्र मित्र मंडळ मदतीला आले आणि या मित्र मंडळाने विष्णूनगरातील हनुमान मंदिरावरील आपल्या मालकीचा हॉल या वाचनालयास भाडेतत्वावर उपलब्ध करून दिला. त्यामुळे आता या वाचनालयाचे कामकाज येथील हॉलमधूनच सुरू आहे. पुढे प्रा. भरत खंदारे, भाऊराव चव्हाण, सुनंदा गाडे, प्रा. जयंत भाभे, अनिल अस्वले, बाजीराव भागवत, संतोष खेडकर, कैलास कोरडे, जगदीश शिवदे, कल्पना वराडे आदी ग्रंथप्रेमींची भक्कम साथ मिळाल्याने या वाचनालयाच्या कामकाजाला चालना मिळाली.

ग्रंथ कमी, वाचक जास्त

या वाचनालयात आजमितीस तीन हजार पुस्तके उपलब्ध असून, हे शासनमान्य ड वर्गातील वाचनालय आहे. ऐतिहासिक, धार्मिक, पौराणिक, कथा, कादंबऱ्या, नाटके, विश्वकोष अशा स्वरुपाची ग्रंथसंपदा येथे उपलब्ध आहे. दररोज सुमारे ७० वाचक येथील पुस्तकांचे वाचन करण्यासाठी येतात. सभासदही ७० आहेत. २० ते २५ नागरिक दररोज पुस्तकांची देवाणघेवाण करून पुस्तके वाचण्यासाठी घरी नेतात. माजी मंत्री बबन घोलप, पदवीधर आमदार डॉ. सुधीर तांबे आणि कोलकात्याच्या राजा राम मोहन राय प्रतिष्ठान यांच्या निधीतून काही पुस्तके मिळाली आहेत.

मुलांसाठी विविध उपक्रम

या वाचनालयातर्फे लहान मुलांवर वाचनाचा संस्कार व्हावा या उद्देशाने खास प्रयत्न केले जातात. विद्यार्थ्यांसाठी निबंधलेखन, वक्तृत्व, अभिनय, साहित्य निर्मिती, चित्रकला स्पर्धा असे उपक्रम राबविले जातात. पुस्तक प्रदर्शनातून नवनव्या पुस्तकांची, मासिकांची ओळख करून दिली जाते. वाचन प्रेरणा दिन, विद्यार्थी दिवस, मराठी राजभाषा गौरव दिन यांसारखे दिवस साजरे केले जातात. समर्थकृपा नगर येथे साप्ताहिक फिरते वाचनालय उपक्रम राबविला जातो. येथे सुट्टीच्या दिवशी सुमारे ७० ते ७५ विद्यार्थी पुस्तके वाचण्यासाठी येतात. परिसरातील पालिकेच्या शाळांतही या वाचनालयातील पुस्तकांचे प्रदर्शन भरवून शालेय विद्यार्थ्यांत वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात.

सिन्नर फाटा येथे दीड दशकापूर्वी वाचनालय सुरू केले. मात्र, योग्य ठिकाणी जागा मिळाली नाही. आहे त्या जागेत कामकाज चालवून परिसरातील कुटूंबांत वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

- अंबादास शिंदे, अध्यक्ष, सावरकर वाचनालय

पुस्तके वाचण्याची सवय हल्लीच्या पिढीत कमी झाली आहे. शालेय वयातच विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी आम्ही वाचनालयातर्फे विविध उपक्रम राबवितो. पालिकेकडून भाडेतत्वावर पुरेशी आणि योग्य ठिकाणी जागा मिळाल्यास अधिक चांगले काम करता येईल. बऱ्याचदा खिशातून पैसे खर्च करावे लागतात.

- सतीश बागूल, सेक्रेटरी

सिन्नर फाटा परिसरातील सावरकर वाचनालयामुळे विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासासाठी आवश्यक माहिती मिळते. संदर्भ माहिती उपलब्ध होते. येथे मिळालेली माहिती शाळेत सांगता येते. माझे संपूर्ण कुटूंबच या वाचनालयात नियमितपणे पुस्तके वाचण्यास जाते.

-साक्षी गवळी, वाचक विद्यार्थिनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवस-५एप्रिल

$
0
0

हेमंत राठी उद्योजक, नाशिक

डॉ. निलेश बेराड मॅनेजमेंट विभाग प्रमुख, एमईटी

भाऊसाहेब खातळे .......संचालक, मविप्र

मंगेश मालपाठक.....संचालक, समर्थ बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माय मराठी व्याख्यानमालेच्या अध्यक्षपदी सोनार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडको परिसरातील माय मराठी सिडको वसंत व्याख्यानमालेच्या अध्यक्षपदी किरण सोनार यांची निवड करण्यात आली. ही व्याख्यानमाला सोमवार (दि. २३) ते २९ एप्रिलदरम्यान जुने सिडकोतील बाळासाहेब ठाकरे उद्यानात होणार आहे.

सिडकोतील नागरिकांची वैचारिक भूक भागविण्यासाठी माय मराठी मोफत वाचनालय, सूर्योदय परिवार आणि ज्येष्ठ नागरिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने माय मराठी सिडको वसंत व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे हे दुसरे वर्ष आहे. व्याख्यानमालेच्या अध्यक्षपदी किरण सोनार यांची निवड करण्यात आली. सोनार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर उर्वरित कार्यकारिणी जाहीर केली. त्यात उपाध्यक्षपदी जनार्दन माळी, अरविंद वडिले, कृष्णराव बेधडे, विजय गुंजाळ यांची निवड करण्यात आली. सरचिटणीसपदी देवराम सैंदाणे, चिटणीसपदी रमेश सोनावणे, खजिनदारपदी प्रकाश काळे, सहखजिनदारपदी नंदकुमार दुसानीस यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर प्रसिद्धीप्रमुख म्हणून विकास बाविस्कर यांची निवड करण्यात आली. स्वागत समितीपदी व्ही. के. पवार, श्रीकांत सोनार यांची निवड करण्यात आली. कार्यकारणी सदस्यपदी शालिग्राम चौधरी, विजय गोसावी, अनिल देवरे, मधुकर पाटील, सुखदेव भामरे, देवीदास निकम, बाळकृष्ण गोरे यांची निवड करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंदिरानगरचा विकास साधणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

नाशिक शहराबरोबरच इंदिरानगर परिसराची लोकसंख्या वाढत असून, परिसराचा विकास सर्वार्थाने साधण्याच्या दृष्टीने नेहमी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केले.

इंदिरानगर परिसरातील बजरंग सोसायटीसह तीन ठिकाणी बसविण्यात आलेल्या ग्रीन जिमच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार फरांदे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, प्रा. सुहास फरांदे, विजय साने, गोपाळ पाटील, नगरसेवक सतीश सोनवणे, श्याम बडोदे, नगरसेविका सुप्रिया खोडे, डॉ. दीपाली कुलकर्णी, नगरसेवक चंद्रकांत खोडे, उत्तम उगले, सुनील देसाई, सचिन कुलकर्णी, अविनाश पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी फरांदे यांनी मतदारसंघात केलेल्या कामांची माहिती दिली. उड्डाणपुलासंदर्भातील समस्या सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांकडून ३७ कोटी रुपये मंजूर करून घेतले असून, ते कामही सुरू करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. ग्रीन जिमचा नागरिकांनी आणि विशेषत: महिलांनी लाभ घेऊन आरोग्य अबाधित ठेवावे, असेही त्यांनी सांगितले. महिलासांठी विविध योजना राबविल्या असून, पक्ष कार्यकर्त्यांनी त्याचा प्रचार आणि प्रसार करावा असे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविक सुनील देसाई यांनी केले. यावेळी मंगेश नागरे, फिरोज शेख, सुभाष वाघचौरे, अनिल रिकामे, मुबिन तांबोळी, तुषार जोशी, हनीफ शेख, प्रतीक दुसाने, संजय केळकर, उदय जोशी आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निमाणी बसस्थानकात धूळवड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

दिवसभर शेकडो बसेसच्या फेऱ्या आणि हजारोंच्या संख्येने येणारे प्रवासी अशी स्थिती असलेल्या पंचवटीतील निमाणी बस स्थानकावरची धूळवड अद्याप सुरूच आहे. पावसाळ्यात पाण्याचे तळे साचणाऱ्या या बसस्थानकाच्या आवारात पडलेले खड्डे बुजविण्यासाठी खडी-डांबराऐवजी माती टाकण्यात आली आहे. ही माती उडू नये म्हणून सकाळी पाणी मारले जात असले तरी उन्हाच्या तडाख्यात पाणी सुकून जाते आणि प्रवाशांना धुळीचा त्रास सहन करावा लागतो. येथील त्रासाविषयी प्रवाशांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे.

शहर बस वाहतुकीचे प्रमुख ठिकाण असलेल्या निमाणी बस स्थानकातील डांबरीकरण पूर्णपणे उखडले आहे. त्या जागेवर माती टाकण्यात आली आहे. येथे येणाऱ्या बसेस वळसा घेऊन आपापल्या नियोजित स्थळांकडे मार्गक्रमण करीत असतात. जेव्हा त्या वळसा घेतात, तेव्हा येथील धूळ प्रचंड प्रमाणात उडते. ही उडालेली धूळ येथे येणाऱ्या प्रवाशांना त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे प्रवासी तोंडावर रुमाल बांधूनच या ठिकाणी उभे असलेले दिसतात.

धूळ उडू नये यासाठी मातीवर पाणी टाकण्याचा उपाय केला जातो. मात्र, त्यामुळे चिखल होतो. सध्याच्या तीव्र उन्हात हा उपाय कूचकामी ठरत आहे. सकाळच्या वेळी गाळ तयार होतो, त्याचाही प्रवाशांना त्रास होतो आणि हा गाळ जेव्हा सुकतो, तेव्हा त्याची होणारी धूळही त्रासदायक ठरते. अशा दुहेरी संकटात येथे येणारी प्रवासी सापडतो. शिवाय यासाठी पाण्याचाही अपव्यय होत आहे. आजारापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती या बसस्थानकाची झाली आहे.

शहर बस वाहतूक महापालिकेकडे जाण्याच्या मार्गावर असताना या सेवेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. येथील परिस्थिती सुधारावी यासाठी काही संघटनांनी व राजकीय पक्षांनी आगार प्रमुखांची भेट घेऊन त्यांना निवेदनही दिले होते. त्यानंतरही परिस्थिती अजून सुधारली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकबाकी भरा, अन्यथा लिलाव

$
0
0

मालेगाव पालिकेचा इशारा; १४ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

महापालिकेने मार्चअखेर मालमत्ता कराची ७० टक्के वसुली केली असली, तरी अद्याप अनेक थकबाकीदारांनी पालिकेच्या आवाहनाला, पथकाला प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे अशा थकबाकीदारांकडे आता पालिकेने आपला मोर्चा वळविला आहे. शहरातील अनेक मिळकतधारकांकडे गृहकर व पाणीकर बाकी आहे. त्यांना पालिकेने वेळोवेळी सूचना देवूनही देखील त्यांनी मार्चअखेर थकबाकी भरली नाही. अशा थकबाकीदारांना पालिकेकडून १४ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली असून, तरीही त्यांनी बाकी भरली नाही तर त्यांच्या मिळकतीचा लिलाव करण्याची कारवाई करण्याचे संकेत प्रशासना दिले आहेत.

शहरातील ज्‍या मिळकतधारकांच्‍या मिळकतीवर पालिकेकडून जप्‍ती कारवाई करण्‍यात आलेली आहे, अशा मिळकतधारकांनी आपली थकीत रक्‍कम १४ एप्रिल पर्यंत महानगरपालिकेत भरण्‍याचे आवाहन करण्यात आले आहे. १४ एप्रिलपर्यंत थकीत रक्‍कम न भरल्‍यास जप्‍त केलेल्‍या मिळकतीचा जाहीर लिलाव करून महापालिकेची थकबाकीची रक्‍कम वसूल करण्‍यात येईल. त्यामुळे थकबाकीदरांचे धाबे दणाणले आहे. जप्ती झालेल्या मिळकतीचा लिलाव नामुष्की ओढवण्याआधीच थकबाकी भरावी व महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त संगीता धायगुडे यांनी केले आहे.

लोकअदालतीत मिळणार सवलत

येत्या १४ एप्रिलला येथील न्यायालयात लोकअदालातीचे आयोजन करण्यात आले आहे. पालिकेच्या थकबाकीदारांना या लोकअदालतीत थकीत रक्‍कम भरण्‍यास सवलत देण्‍यात येणार आहे. शहरातील थकबाकीदारांना थकीत रकमेवर नियमानुसार सवलत देण्‍याकरीता प्रभाग अधिकारी, प्र. क्र.१, २, ३ व ४ यांना प्राधिकृत करण्‍यात आलेले आहे. या लोकअदालतीचा लाभ घेवून थकबाकीदारांनी रक्कम भरावी असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

धाबे दणाणले

गेल्या दीड महिन्यापासून मालेगाव महापालिकेकडून मालकत्ता कर, पाणीपट्टी, घरपट्टी भरण्याबाबत आवाहन करण्यात येत होते. शहरातील अनेक थकबाकीदारांना या आवाहनाला प्रतिसाद देत आपली थकबाकीही भरली. मात्र काही थकबाकीदारांनी कोणतेही सहकार्य केले नाही. त्यामुळे पालिकेच्या वसुली पथकाने त्यांनी स्थावर मालमत्ता जप्त केली. आता पालिका प्रशासन मार्चएण्डच्या व्यापातून मुक्त झाले आहे. त्यामुळे त्यांनी थकबाकीपोटी जप्त केलेल्या मालमत्तांकडे लक्ष दिले आहे. येत्या दहा दिवसात जर या थकबाकीदारांनी कोणतेही सहकार्य केले नाही, तर त्यांच्या मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. त्यामुळे आता मालमत्ता वाचविण्यासाठी हे थकबाकीदार पैशांची जमवाजमव करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

बारावीची परीक्षा देऊन नाशिक येथे उन्हाळी वर्गासाठी स्कुटीने जात असताना भऊर (ता. देवळा) येथील रोशन दयाराम पवार (वय १८) या विद्यार्थ्यांचा भावडबारी घाटाच्या पायथ्याशी वळणावर अज्ञात वाहनाच्या धडकेने जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे भऊर गावावर शोककळा पसरली आहे.

भऊर येथील दयाराम नारायण पवार हे भाटगाव (ता. चांदवड) येथे प्राथमिक शिक्षक तर त्यांच्या पत्नी चांदवड तालुक्यातील सोग्रस येथे प्राथमिक शिक्षिका आहेत. त्यांचा लहान मुलगा रोशन दयाराम पवार याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली. त्यानंतर तो उन्हाळी वर्गासाठी नाशिक येथे स्कुटीने (एमएच ४१ आरके ५२१६) जात असताना देवळ्यापासून दहा किलोमीटर अंतरावरील भावडबारी घाटाच्या पायथ्याशी अज्ञात वाहनाने रोशनला जबर धडक दिली. त्यात रोशनचा जागीच मृत्यू झाला. अत्यंत हुशार व मितभाषी असलेल्या रोशनने लोहोणे येथील जनता विद्यालयातून नुकतीच बारावीची (विज्ञान) परीक्षा दिली होती. पुढील शिक्षणासाठी जेईईच्या उन्हाळी वर्गासाठी तो नाशिकला जात असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या अपघाती मृत्यूने संपूर्ण पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रोशनचा मोठा भाऊ अभियांत्रिकीची पदवी घेऊन नाशिकला खासगी कंपनीत नोकरीला आहे. त्याच्या सोबत उन्हाळी वर्गाचा अभ्यास करण्यासाठी रोशन नाशिकला जात होता. त्याचे वडील भाटगाव येथूनच नाशिकला जाणार होते. सदरचा अपघात झाल्यानंतर रोशनची आई सोग्रसकडून देवळ्याकडे येत होत्या. त्यांनाच आपल्या मुलाचा अपघात पाहण्याची दुर्दैवी वेळ आल्याने त्यांनी घटनास्थळी आक्रोश केला. देवळा पोलिसात याबाबत अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून भऊर ता. देवळा येथे अत्यंत शोकाकूल वातावरणात रोशनेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

गांधीनगर जलकुंभाला रॉ-वॉटरचा पुरवठा करणाऱ्या बाराशे मिमी व्यासाच्या जलवाहिनीला लागलेली गळती दुरुस्त करण्यात पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला दुसऱ्या दिवशी अखेर यश मिळाले. बुधवारी सायंकाळी गळती दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. त्यामुळे गुरुवारी पाणी पुरवठा सुरळीत होणार असला तरी सकाळी एकवेळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे.

गांधीनगर जलकुंभाला रॉ-वॉटरचा पुरवठा करणाऱ्या १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला गोविंदनगर येथे इंडिगो पार्कजवळ गळती लागल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत होता. त्यामुळे मंगळवारी या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी शहरातील बहुतांश भागाचा पाणी पुरवठा बंद ठेवावा लागला होता. परंतु, ऐनवेळी दुरुस्तीच्या कामाचे स्वरुप वाढल्याने नियोजित वेळेत जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण करणे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला शक्य झाले नव्हते. त्यामुळे ऐनवेळी बुधवारीही नाशिकरोडमधील बहुतांश प्रभागांत पाणीपुरवठा न करण्याचा निर्णय पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला घ्यावा लागला होता. त्यामुळे बुधवारी दिवसभर या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. सायंकाळी काम पूर्ण झाले.

या भागात 'पाणीबाणी'

गांधीनगर जलकुंभाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्ती कामामुळे पाणी पुरवठा बंद ठेवावा लागल्याने शहरातील उपनगर, शांतीपार्क, अयोध्या नगर, मातोश्री नगर, शिवाजी नगर, आर. टी. ओ. कॉलनी, तोरणा सोसायटी, समता नगर, टाकळी गाव, रामदास स्वामीनगर, उत्तरानगर, आदीवासी वाडा, जयभवानीनगर, पगारे मळा, श्रमनगर १ व २, सिंधी चाळ, इच्छामणी मंदिर परिसर, मकरंद कॉलनी, रघुवीर कॉलनी, कॅनॉल रोड, नारायण बापूनगर, चंपानगरी, गोदावरी सोसायटी, दसकगाव, एमएसईबी कॉलनी, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, अयोध्या कॉलनी, पवारवाडी, इंगळे चौक, पंचक गाव, सायखेडारोड, भगवा चौक, शिवशक्ती नगर, गोरेवाडी, चेहडी परिसर, नाशिक पुणे हायवे, एकलहरा रोड, सामनगाव, सहाणे मळा, लवटे नगर १ व २, रोकडोबा कॉलनी, आर्टिलरी सेंटररोड, दत्त मंदिर रोड, ‍विहीतगाव, सौभाग्यनगर, लामरोड, वडनेर गाव परिसर, वडनेररोड परिसर, दीपालीनगर, शिवाजी वाडी, भारत नगर, साईनाथ नगर, अशोका मार्ग, लिंगायत कॉलनी, कल्पतरू नगर, पखाल रोड, वडाळा रोड, जयदीप नगर, साईनाथ नगर, वडाळा गाव, वडाळा गावठाण या भागात दोन दिवस पाणीबाणीचे चित्र दिसून आले.

अशी झाली दुरुस्ती

गळती लागलेल्या ठिकाणचा काँक्रिट ब्लॉक तोडून फुटलेल्या ठिकाणी लिड व एमसीएल भरण्यात आले. त्यावर लोखंडी प्लेट बसविण्यात आली. त्यानंतर पाण्याच्या प्रेशरची चाचणी घेण्यात आली.

जलवाहिनी दुरुस्तीचे काम बुधवारी सायंकाळी पूर्ण झाले. पाणी भरण्यासाठी व आवश्यक दाब प्राप्त होण्यासाठी वेळ लागणार असल्याने गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल.

- अविनाश भोये, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मारकाच्या उद्घाटनाला पंतप्रधान येणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या निधीतून येवला शहरात थोर सेनानी सेनापती तात्या टोपे यांचे स्मारक अतिशय उत्कृष्ठ दर्जाचे झाले पाहिजे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. तसेच स्मारकाच्या उद्घाटनाला आपण येवू असे आश्वासनही मोदी यांनी दिले.

सेनापती तात्या टोपे यांचा उचित सन्मान करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने त्यांच्याजन्मभूमीत स्मारक उभे करण्यासाठी साडेदहा कोटींचा निधी मंजूर केला आहे. सेनापती टोपे यांचा उचित गौरव करण्यासाठी केंद्र सरकारकडून टाकल्या गेलेल्या पावलांचे कौतुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सेनापती तात्या टोपे राष्ट्रीय स्मारक नवनिर्माण समितीच्या सदस्यांनी मंगळवारी दिल्ली येथील संसद भवनात भेट घेतली. समितीच्या सदस्यांनी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही भेट घेतली. लोकसभेच्या व्यस्त कार्यक्रमात असताना देखील पंतप्रधान मोदी यांनी स्मारक समिती सदस्यांची भेट घेतली. मोदी यांनी चर्चेदरम्यान येवल्यातील स्मारकाच्या कामाकडे लक्ष देण्याच्या सूचना खासदार चव्हाण यांना केल्या. तसेच येणाऱ्या अडचणी सोडविण्याबाबतही मार्गदर्शन केले.

मोदींना येवल्याचा फेटा भेट

समितीचे अध्यक्ष आनंद शिंदे व इतर काही सदस्यांनी मोदींना 'गौरवचिन्ह' भेट दिले. याभेटीत श्रीकांत खंदारे यांनी मोदींना खास येवला शैलीतील फेटा बांधला. खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आनंद शिंदे, समितीचे सदस्य तथा माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, माजी नगरसेवक संजय कुक्कर, धिरज परदेशी, बडा शिंदे, संजय सोमासे, मयुर मेघराज, श्रीकांत खंदारे, डॉ. संदीप पवार यांच्यासह डॉ. राज नगरकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘व्हेकेशन डिजिटल कॉलेज’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून मार्च २०१९ मध्ये बारावी (सायन्स) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुण्यातील एस. पी. कॉलेज व डिजीभारती यांनी खास 'व्हेकेशन डिजिटल कॉलेज' या खास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील वर्षी बारावीची परीक्षा असणाऱ्या विद्यार्थ्यांना आताच्या सुटीतच अभ्यासाची तयारी करता यावी, यासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. 'महाराष्ट्र टाइम्स' या उपक्रमाचे मीडिया पार्टनर आहे.

२०१८-१९ या शैक्षणिक वर्षात राज्यातील जे विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत त्यांना विशेष सॉफ्टवेअरच्या माध्यमातून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित या महत्त्वाच्या विषयांचा अभ्यास करण्याची संधी या उपक्रमातून मिळणार आहे. या विषयांमधील ज्येष्ठ प्राध्यापक मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पूर्व नावनोंदणी करून आपल्या मोबाइल किंवा कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅबद्वारा ही व्याख्याने पाहता व ऐकता येणार आहेत. विद्यार्थ्यांना या संदर्भातील आपल्या शंका व अडचणी संबंधित प्राध्यापकांना विचारण्याची सोयही उपलब्ध असणार आहे.

व्याख्यानांचे चित्रिकरण १९ एप्रिलपासून एस. पी. कॉलेजमध्ये निवडक विद्यार्थ्यांसमोर केले जाणार आहे. त्यांचे प्रक्षेपण २६ एप्रिलपासून सुरू होणार आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांनाही याचा लाभ घेता यावा, यासाठी २००० रुपये अधिक ३६० रुपये जीएसटी असे शुल्क आकारण्यात येणार आहे. नावनोंदणी १५ करता येणार असून शुल्क ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने भरता येणार आहे. अधिक माहिती www.digibharati.in या लिंकवर उपलब्ध आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन, स. प. कॉलेजचे प्राचार्य डॉ. दिलीप सेठ, स्थानिक समितीचे अध्यक्ष सतीश पवार, 'डिजीभारती'चे अध्यक्ष हरी मिरासदार, कार्यकारी संचालक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल दरवाढीविरोधात रायुकाँचे आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

पेट्रोल डिझेलच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने त्रिमूर्ती चौकातील पेट्रोल पंपाजवळ निषेध फलक घेऊन निदर्शने करण्यात आली.

पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक गाठला असून, नाशिकमध्ये लागू असलेला दर मुंबईपेक्षा जास्त आहे. फेब्रुवारी २०१८ नंतर पेट्रोल-डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठलेला आहे. सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केल्यामुळे पेट्रोलियम कंपन्या रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत बदल करीत असतात. गेल्या वर्षभरात तर पेट्रोल ९ रुपये तर डिझेल ७ रुपयांनी महागले आहे. शहरातही प्रत्येक पेट्रोलपंपावर वेगवेगळे दर असून, त्यात पाच पैशांच्या आसपास फरक आहे. तसेच पंपावर होणारी अप्रत्यक्ष इंधन चोरी, भेसळयुक्त इंधन व वाढलेले इंधनाचे दर यामुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजी असल्याचे मत राष्ट्रवादी युवकचे काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले. पेट्रोलची मूळ किंमत कमी असताना जास्त दराने विक्री करून जनतेची आर्थिक लूट केली जात आहे. रोजच्या रोज दरवाढ करण्याऐवजी तीन महिन्यांनी दरांमध्ये फरक करावा. पेट्रोल-डिझेलचे इतर कर काढून वस्तू व सेवा कराच्या कार्यकक्षेत घ्यावे, तसेच महाराष्ट्र व लगतच्या राज्यातील पेट्रोल-डिझेलची किंमत एकसमान करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

यावेळी चिन्मय गाढे, अमोल नाईक, मुकेश शेवाळे, शिवराज ओबेरॉय, दीपक पाटील, मकरंद सोमवंशी, किरण पानकर, भूषण गायकवाड, कुणाल बागडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images