Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

उत्पादन शुल्क विभाग झाला मालामाल

$
0
0

मटा विशेष

चार कारखान्यांकडून १,८४० कोटी; मद्यपरवाना शुल्कातून ४० कोटींची कमाई

Gautam.Sancheti@timesgroup.com

Tweet : SanchetigMT

नाशिक : राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यालयाला दारूच्या उत्पादन शुल्कापोटी २०१७-१८ या आर्थिक वर्षात १,८४० कोटी रुपये मिळाले आहेत. दारुच्या उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यात चार कारखाने असून त्यांच्या उत्पादनावरील हे शुल्क आहे. तसेच ४० कोटी रुपये हे केवळ जिल्ह्यातील दारु दुकानाच्या लायसन्स फी फोटी मिळाले आहेत. त्यामुळे या आर्थिक वर्षात उत्पादक शुल्क कार्यालयाला १,८८० कोटी रुपयाचे उत्पन्न मिळाले असून गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यात १३ टक्के वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात हेच उत्पादन शुल्क १,६६२ कोटी रुपये होते.

मार्च संपल्यानंतर अनेक सरकारी कार्यालयाचे आर्थिक ताळेबंद समोर येऊ लागले असून त्यात राज्य उत्पादन शुल्कचा आकडा लक्षवेधी ठरला आहे. विशेष म्हणजे या उत्पन्नामध्ये मोठा भाग हा दारू, बिअर व देशी दारुच्या उत्पादनावरील आहे. जिल्ह्यातील दारू बनवणाऱ्या चार फॅक्टरीमधून उत्पादन झाल्यानंतर ते राज्यात व देशभरात जाते. पण, त्याचे उत्पादन शुल्क हे त्या जिल्ह्यात भरावे लागते. त्यामुळे उत्पादन शुल्कला हा फायदा झाला आहे.

विशेष म्हणजे या दारुच्या तीन फॅक्टरी दिंडोरी तालुक्यात आहे. तर एक फॅक्टरी इगतपुरी तालुक्यातील गोंदे येथे आहे. या फॅक्टरीमधून मोठ्या प्रमाणात दारु उत्पादन केले जाते. त्याचा फायदा उत्पादन शुल्कला झाला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात ४० हून अधिक वायनरी असल्या तरी सरकारने २०२१ पर्यंत त्यांना करात सूट दिली आहे. त्यामुळे त्यातून उत्पादन शुल्कला आर्थिक फायदा नाही.

लायसन्स फीमध्येही फायदा

सुप्रीम कोर्टाने राज्य मार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि प्रमुख मार्गांपासून ५०० मीटर परिसरात कोणत्याही प्रकारे दारू विक्री करण्यास बंदी घातल्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारू दुकाने बंद झाली होती. पण, त्यानंतर आता हळूहळू सर्वच दुकाने सुरू झाल्याने त्यातून उत्पादन शुल्कला लायसन्स फी सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळाली असून ती ४० कोटी पर्यंत पोहचली आहे.

जिल्ह्यातील चार कारखान्यातून झालेल्या दारू उत्पादनातून २०१७-१८ या आर्थिक वर्षात १,८४० कोटी रुपये उत्पन्न मिळाले. तसेच ४० कोटी रुपये हे जिल्ह्यातील दारू दुकानांच्या लायसन्स फी पोटी मिळाले. गेल्या वर्षी हे उत्पन्न १,६६२ कोटी होते. त्यात आता २१८ कोटीने वाढ झाली आहे.

- सी. बी. राजपूत, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पक्क्या अतिक्रमणांवर हातोडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

नाशिक महानगर पालिकेच्या वतीने सर्वत्र अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविली जात असताना कामटवाडे शिवारातील मोगलनगर भागातील दोन अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली.

नाशिक महानगर पालिकेच्या नवीन नाशिक विभागाच्यावतीने ही कारवाई राबविण्यात आली. यावेळी मोगलनगर येथे राकेश व्यवहारे यांचे पहिल्या मजल्यावरील अनधिकृत बांधकाम काढण्यात आले तर या परिसरातील दिलीप पाटील यांचे तळमजला व पहिल्या मजल्यावरील पक्‍के अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले. पालिकेच्या वतीने सिडको परिसरातील रस्त्यालगतचे अतिक्रमण काढल्यानंतर आता पक्‍के अतिक्रमणही काढले जात आहे. सिडको परिसरात सर्वाधिक अतिक्रमणे असून, यापूर्वी सिडको आणि मनपा यांच्यात अतिक्रमण काढण्यावरून वाद होते. आता सिडकोचे संपूर्ण हस्तांतरण झाल्याने महानगरपालिका सिडकोतील पक्‍क्‍या अतिक्रमणांवरही हातोडा मारणार का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. आज ही कारवाई विभागीय अधिकारी सुनीता कुमावत, निर्मला गायकवाड, कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण, सुशील शिंदे, एम. डी. पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयडीसीने आरक्षण काढले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील वाडीवर्हे येथील २४५.११ हेक्टर जमीन दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यासाठी अधिग्रहित करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे या जमिनीवरील आरक्षण काढण्यात आले असून, शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरिल अधिग्रहनाच्या नोंद देखील कमी करण्यात आल्या आहेत.

     सन २००७ साली वाडीवर्हे-गोन्दे येथील २४५.११ हेक्टर जमिनी उद्योग ऊर्जा व कामगार विभाग मंत्रालय यांच्या आदेशाने शासनाने अधिग्रहित केल्या होत्या. या प्रकल्पास शेतकाऱ्यांनी विरोध केला होता. विरोधास न जुमानता सरकारने सातबारा उताऱ्यावर 'महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्र'असा शेरा नोंदविला हेाता. शेतकऱ्यांनी याआधी तालुक्यातील जमिनी औद्योगिकीकरणासाठी संपादित केल्या निदर्शनास आणून दिले होते. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना आमदार निर्मला गावित यांनी याबाबत विनंती केली होती. त्यानुसार हे क्षेत्र औद्योगिकीकरणाच्या या आरक्षणातून वगळण्यात आले आहे.

या अगोदरच आमच्या शेतकऱ्यांनी विविध प्रकल्पांसाठी जमीन दिली आहे. असे असतांना पुन्हा जमिनी संपादित करणार म्हणजे शेतकरी भूमीहीन होणार होते. आता मात्र सातबाऱ्यावरील नोंदी कमी झाल्याने शेतकरी आनंदात आहेत, असे शेतकरी कृती समितीचे विलास मालुंजकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिकच्या वस्तू जमा करा

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने प्लास्टिकच्या पिशव्यांबाबत कडक धोरण अवलंबिले असून, ज्या व्यापाऱ्यांकडे प्लास्टिकच्या वस्तूंचे साठे आहेत अशा व्यापाऱ्यांनी ते दि. २२ एप्रिलपर्यंत महापालिकेने ठरवून दिलेल्या केंद्रात जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. दिलेल्या वेळेत जे व्यापारी अशा वस्तू जमा करणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारादेखील देण्यात आला आहे.

राज्य सरकारने २३ मार्च रोजी राज्यात प्लास्टिकबंदी जाहीर केलेली आहे. त्याबाबत राज्यातील सर्व महापालिकांना अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आलेले असून, नाशिक महापालिकेनेदेखील प्लास्टिकविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ज्या व्यापाऱ्यांकडे प्लास्टिकच्या वस्तूंचे साठे आहेत अशा व्यापाऱ्यांनी आपल्याकडील साठे विभागीय केंद्रात जमा करावेत, असे आदेश दिले आहेत. त्यासाठी महापालिकेने सात ठिकाणी केंद्रे सुरू केली असून, त्या ठिकाणी व्यापारी अथवा ज्यांच्याकडे प्लास्टिकच्या वस्तूंचे साठे आहेत, अशा नागरिकांनी ते जमा करायचे आहेत.

ही होणार कारवाई

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास प्रथम गुन्ह्यात पाच हजार रुपये दंड, असाच प्रकारचा गुन्हा दुसऱ्यांदा झाल्यास दहा हजार रुपये दंड, असाच गुन्हा तिसऱ्यांदा झाल्यास त्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सर्व उत्पादक, विक्रेते, किरकोळ विक्रेते, व्यापारी, वितरक, वापरकर्ते यांना हे आदेश देण्यात आले आहेत.

हे वापरण्यास बंदी

प्लास्टिकपासून बनविण्यात येणाऱ्या पिशव्या, द्रव पदार्थ साठविण्यासाठी एकदाच वापरात येणारे प्लास्टिकचे पाऊच, कप, पॅकेजिंगसाठी वापरात येणारे प्लास्टिक आदी.

विभागनिहाय संकलन केंद्रे

विभाग - ठिकाण- संबंधित अधिकारी

नाशिक पूर्व - महापालिकेचे गुदाम, द्वारका - सुनील शिरसाठ ९४२३१७९१७३

नाशिक पश्चिम - हजेरी शेड, कल्पनानगर - पी. डी. पाटील ९४२३१७९१७२

सातपूर - क्लब हाऊस, सातपूर - रमेश गाजरे ९४२३१७९१७५

सिडको - विभागीय कार्यालय- संजय गांगुर्डे ९४२३१७९१७१

नाशिकरोड - विभागीय कार्यालय - संजय गोसावी ९४२३१७९१७६

पंचवटी - विभागीय कार्यालय - संजय दराडे ८२७५०८८५१३

खत प्रकल्प - खत प्रकल्प, विल्होळी - बाळू बागुल ९९२१८७८२९६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावचे आयुक्त रजेवर

$
0
0

मालेगाव : महापालिका आयुक्त संगीता धायगुडे सोमवारपासून सात दिवसांच्या रजेवर गेल्या असून, त्यांच्या रजा कालावधीत प्रभारी आयुक्तपदाचा कार्यभार जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन पाहणार आहेत. नगरविकास विभागाचे तसे आदेश येथील महापालिका प्रशासनास सोमवारी सायंकाळी प्राप्त झाले आहेत. आयुक्त धायगुडे ९ ते १३ एप्रिलदरम्यान रजेवर असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नर-शिर्डी मार्गासाठी थ्रीडी इमेज सर्वेक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिन्नर-शिर्डी मार्गाच्या कामाला गती देतानाच या मार्गाच्या रुंदीकरणासाठी थ्रीडी इमेज सर्वेक्षण करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

महामार्ग विकास विभागाने राज्यातील प्रमुख मार्गांच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत काही दिवसांपूर्वी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला होता. सिन्नर-शिर्डी या ४५ किलोमीटर मार्गाच्या कामाची माहितीही या बैठकीत घेण्यात आली. मुंबईहून मोठ्या प्रमाणावर भाविकांचा ओघ असल्याने या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. या मार्गावर काही ठिकाणी अतिक्रमणे असून काही ठिकाणी लोकवस्ती आहे. लोकवस्तीमधील रहिवाशांच्या जागा जाणार असल्याने त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी या मार्गाचे 'जीपीएस'द्वारे सर्वेक्षण करावे, यामध्ये अचूकता यावी यासाठी प्रशासनाने थ्रीडी इमेज सर्वेक्षणाचा निर्णय घेतला आहे. अशा सर्वेक्षणामुळे कोणाचे नेमके किती नुकसान होणार याचा अचूक अंदाज येण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

>सर्वाधिक प्रतिक्रिया मिळालेली बातमी:

$
0
0

> सर्वाधिक प्रतिक्रिया मिळालेली बातमी:

भारताची १९ पदकांची कमाई

राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्या ५ दिवसांत भारताने १० सुवर्ण, ४ रौप्य आणि ५ कांस्य अशी १९ पदकांची कमाई केली आहे.

मटा अॅप डाउनलोड करा app.mtmobile.in

मिस्ड् कॉल द्या 1800-103-8973

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नंदिनी’ला पूर्वीचे रूप येईल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

शहरातून जाणाऱ्या नासर्डीचे पूर्वीचे 'नंदिनी'रूप पुन्हा आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असून, यापुढे नंदिनी हाच उल्लेख करण्यात येईल. त्यासाठी नदी पात्रालगत नंदिनी नावाचे फलक लावण्याचे काम सुरू केल्याचे प्रतिपादन आमदार सीमा हिरे यांनी केले.

सिडको व नाशिकमधील अनेकांनी एकत्र येऊन 'नाशिकची आई, गोदामाई' या संस्थेच्या माध्यमातून नंदिनीचे पावित्र्य जपण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्थेने मागणी केल्यानुसार आमदार हिरे यांनी नंदिनीच्या पात्रालगत फलक लावून या उपक्रमाला सुरुवात केली. यावेळी नगरसेविका भाग्यश्री डोमसे, छाया देवांग, प्रियांका घाटे, सिडको भाजप मंडलाध्यक्ष बाळासाहेब पाटील, महेश हिरे, राजेश पंडित, शिवउपासक अप्पासाहेब उपासनी, उदय सोनवणे, रवी जन्नावार, सुनील मेंदेकर आदी उपस्थित होते. नदीच्या किनारी सर्वत्र नंदिनी नदी असे फलक लावण्यात यावेत, अशी मागणी 'नाशिकची आई, गोदामाई' संस्थेचे अध्यक्ष सचिन महाजन, उपाध्यक्ष दर्शन शिरुडे, रोहन कानकाटे, संदीप दिघे, मयूर लवटे, रवी वाघ, रामेश्वर महाजन, मयूर जाधव, स्वप्नील जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महाराष्ट्र टाइम्स

$
0
0

महाराष्ट्र टाइम्स

--

मंगळवार १० एप्रिल २०१८ च्या अंकात वाचा...

--

इंग्रजीच्या अभ्यासक्रमात

ई-पत्रांचा समावेश

दहावीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये काळाशी सुसंगत असे बदल करण्यात आले आहेत. पारंपरिक पत्र लेखनाला छेद देत ई-पत्रांचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.

महारेराचा नाशिकमध्ये

पहिला निकाल

घराचा ताबा वेळेत न दिल्याने महारेराअंतर्गत एका बिल्डरला न्यायालयाने दंड ठोठावला आहे. ग्राहक मुकेश देसाई यांनी बिल्डरविरोधात तक्रार दाखल केली होती.

महासभेत

'दंड'कारण!

निधी पळविण्यात आल्याचा आरोप करीत महासभेत विरोधकांनी अभूतपूर्व गोंधळ घातला. राजदंड पळविण्याचा प्रयत्नही करण्यात आला. या झटापटीत दोन सदस्य जखमी झाले.

आला उन्हाळा,

घरे सांभाळा!

उन्हाळ्याच्या आगमनाबरोबरच नाशिकमध्ये घरफोड्यांचे सत्रही सुरू झाले आहे. शहर व उपनगरात घरफोडीच्या तीन घटना घडल्या आहेत. बंद घरांना टार्गेट केले जात आहे.

--

यांसह इतर महत्त्वाच्या बातम्या आणि इतर सदरांसाठी वाचत राहा महाराष्ट्र टाइम्स... नाशिक प्लस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयएमए राबविणार ‘हॉसपीस’ योजना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तत्सम दुर्धर आजारात रुग्णाच्या अखेरच्या काळात देखभाल, उपचार करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन 'हॉसपीस' ही संकल्पना राबविणार आहे. मुंबईचा अपवाद वगळता इतर ही संकल्पना कोठेही राबवली जात नाही. नाशिकमध्ये दिंडोरी रस्त्यावरील महाराष्ट्र टीबी सॅनिटोरियममध्ये प्रथमच ही योजना हाती घेण्यात येणार असून, अखेरच्या काळात नातेवाईक नसलेल्या पेशंटला या व्यवस्थेद्वारे मानसिक आधार दिला जाणार असल्याचे 'आयएमए'चे नूतन अध्यक्ष डॉ. आवेश पलोड यांनी सांगितले.

आयएमए नाशिक शाखेचा २०१८-१९ या वर्षाच्या नूतन कार्यकारिणीच्या पदग्रहण सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना डॉ. पलोड यांनी आपले धोरण स्पष्ट केले. गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी चांदवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर तर प्रमुख अतिथी म्हणून स्थायी समितीच्या अध्यक्ष हिमगौरी आडके-आहेर होत्या़ हॉस्पिटल नियमावलीमुळे डॉक्टरांना परवाना नुतनीकरणासाठी अडचणी येत आहेत़ हॉस्पिटल परवाना नूतनीकरणासंदर्भात सामंजस्य तसेच वास्तवदर्शी तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही आडके यांनी दिली.

आयएमएतर्फे राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक करताना डॉ. आहेर यांनी स्पष्ट केले, की वेगवेगळ्या परिस्थितीमुळे कायदे व प्रशासनाच्या धोरणात बदल होतो आहे. यापूर्वी वैद्यकीय सेवेतंर्गत प्रशासनाकडून सवलत मिळत गेल्याने वैद्यकीय व्यावसायिकांचे मूळ कायद्यांकडे दुर्लक्ष झाले. भविष्यात सर्वांनाच याबाबत जागरुक रहावे लागणार आहे. शहरातील बायोमेडिकल वेस्टच्या कराराची मुदत येत्या दोन-तीन महिन्यांत संपणार असून, हा प्रकल्प आयएमएने चालविण्यास घेण्याबाबत महापालिकेला प्रस्ताव सादर करावा, असा सल्लाही आहेर यांनी दिला़

पदग्रहण सोहळ्याची सुरुवात राहुल पाठक या विद्यार्थ्याने सादर केलेल्या गणेशवंदनेने झाली़ यानंतर मावळते अध्यक्ष डॉ़ मंगेश थेटे यांनी वर्षभर राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली़ आयएमएचे नूतन अध्यक्ष डॉ़ पलोड यांनी डॉ़ थेटे यांच्याकडून तर डॉ़ हेमंत सोननीस यांच्याकडून नूतन सचिव डॉ़ नितीन चिताळकर यांनी पदभार स्वीकारला़ याबरोबरच उपाध्यक्ष डॉ़ नीलेश निकम, डॉ़ प्रशांत देवरे, डॉ़ विशाल गुंजाळ, डॉ़ सुषमा दुगड, डॉ़ वैशाली काळे, डॉ़ विशाल पवार यांनीही आपला पदभार स्वीकारला़ यावेळी मान्यवरांच्या हस्ते आयएमएच्या व्हाईस या मासिकाचे अनावरण करण्यात आले़ डॉ़ प्राजक्ता लेले व डॉ़ पंकज भदाणे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समृद्धी’ मोजणीसाठी औरंगाबादचे पथक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समृद्धी महामार्गाकरीता भूसंपादन सुरू असले तरी अनेक खातेदारांच्या जमिनींचे पोटहिस्से मोजण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता भासते आहे. त्यामुळे या मोजणीसाठी अन्य जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची मदत मागविण्यात आली असून औरंगाबादचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे या कामाला आता गती मिळणार आहे.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यातील इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. जिल्ह्यात ११०० हेक्टर जमीन संपादित करावयाची असून आतापर्यंत ६५ टक्के जमिनीचे संपादन झाले आहे. मात्र, अनेक ठिकाणी भाऊबंदकीचे वाद असून पोटहिस्से यामुळे जमीन देण्याची इच्छा असूनही अनेक शेतकरी ती देऊ शकत नाहीत. शेतकऱ्यांशी संवाद साधून हे वाद मिटविण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. परंतु, यंत्रणा तोकडी ठरत असल्याने या कामाला अपेक्षित गती मिळू शकलेली नाही. प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन या कामाला गती देण्यासाठी अन्य जिल्ह्यांतून काही अधिकारी, कर्मचारी मिळावेत, अशी मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य रस्ते विकास महामंडळाकडे केली होती. त्यानुसार औरंगाबाद येथील एक पथक नाशिकमध्ये दाखल झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे. डुबेरे,पाथरे, गोंदे, मऱ्हळ, पाथरे या गावांमध्ये पोटहिस्सेधारकांचे अधिक वाद आहेत. त्यांच्या जमिनी मोजणीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताबा न दिल्याने बिल्डरला दंड

$
0
0

नाशकात महारेराचा पहिला निकाल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या बांधकाम क्षेत्राशी संबंधित महारेराचा पहिला निकाल हाती आला आहे. गंगापूररोड येथील एका बांधकाम प्रकल्पातील घर वेळेत न दिल्याने ग्राहकाने महारेराकडे तक्रार केली होती. त्यावर महारेराने निकाल दिला असून विहित वेळेत ताबा न दिल्याप्रकरणी महारेराने बिल्डरला दंड ठोठावला आहे.

महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीची (महारेरा) स्थापना झाल्यानंतर प्रथमच नाशिकच्या बांधकाम प्रकल्पाबाबत महारेराकडे तक्रार अर्ज सादर करण्यात आला. मुंबई येथील रहिवासी मुकेश देसाई यांनी त्यांच्या आई-वडिलांसाठी सुयोजित इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या बांधकाम कंपनीच्या गंगापूररोड येथील सुयोजित बाग या बांधकाम प्रकल्पात फ्लॅट बुक केला. त्यासाठी त्यांनी ६० लाख ३७ हजार २०७ रुपये बिल्डरला अदा केले. मात्र, फ्लॅटचा ताबा विहित वेळेत देण्यात आला नाही. याप्रकरणी देसाई यांनी वारंवार बिल्डरकडे घराच्या ताब्याबाबत विचारणा केली. पण सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. अखेर पैसे परत मिळावेत, अशी मागणी त्यांनी केली. त्यासही दाद न मिळाल्याने अखेर देसाई यांनी महारेराकडे याचिका दाखल केली. या प्रकरणावर सुनावणी झाली. त्यानुसार विहित वेळेत ताबा देण्यात न आल्याचे निष्पन्न झाले. याची दखल घेत महारेरा कायद्यातील तरतुदीनुसार ग्राहकाने दिलेली सर्व रक्कम देईपर्यंत दररोज एक हजार रुपये दंड आणि संबंधित फ्लॅटच्या ५ टक्के रक्कम दंड म्हणून देण्याचे महारेराने निर्देशित केले आहे. या निर्णयामुळे नाशिकमधून महारेराकडे इतरही ग्राहक तक्रार करण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुकट्या प्रवाशांकडून नऊ कोटींची वसुली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने फुकट्या प्रवाशांविरोधात मोहीम तीव्र केली आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात विभागाने एक लाख २५ हजार ६२ फुकट्या प्रवाशांकडून ९.३८ कोटींचा दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षी हाच आकडा ७.९१ कोटी होता, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

फुकट्या प्रवाशांमुळे रेल्वेवर बोजा पडतो. इतर प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागते. असे प्रवासी हुडकून काढण्यासाठी रेल्वेने कर्मचाऱ्यांना विशेष वर्ग घेऊन प्रशिक्षण दिले. विशेष मोहिमा राबविल्या. व्यवस्थापकांनीही रात्रीच्या रेल्वे गाड्यांमध्ये शोधमोहीम राबविली. सुट्या, तसेच सणासुदीच्या काळात रेल्वेला गर्दी होते. फुकटे प्रवासीही याच काळात वाढतात. त्यामुळे रेल्वेने आपल्या इतर विभागांतील कर्मचाऱ्यांची मदत रेल्वे स्थानकात, तसेच रेल्वे गाड्यांमध्ये तपासणीसाठी घेतली. या सर्वांचा चांगला परिणाम झाला. गेल्या आर्थिक वर्षात रेल्वेने एक लाख सात हजार ७४१ फुकट्या प्रवाशांना पकडून ७.९१ कोटी रुपये दंड वसूल केला होता. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात रेल्वेने एक लाख २५ हजार ६२ फुकटे प्रवासी शोधून त्यांच्याकडून ९.३८ कोटींचा दंड वसूल केला. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये फुकटे प्रवासी जास्त आढळतात. मुंबईला जाणारे किंवा उत्तर भारत, पूर्व भारतात प्रवास करणाऱ्यांमध्ये फुकटे प्रवासी जास्त असतात. त्यामुळे या भागातील रेल्वे गाड्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येते.

२९ कोटींवर महसूल

सरकारने रस्तेबांधणी मोठ्या प्रमाणावर केली आहे. त्यामुळे प्रवासी रस्ता वाहतुकीकडे वळू लागल्याचा फटका रेल्वेला बसला आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवाशांना चांगल्या दर्जाच्या सेवा देण्यास सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम दिसू लागला आहे. भुसावळ विभागात २०१७-१८ या आर्थिक वर्षात प्रवाशांकडून २९ कोटी ७७ लाखांचा महसूल मिळाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ पाच टक्के आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी रेल्वेचा चेहरामोहरा बदलून विविध सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुर्वेदिक उपचारासाठी नाशिकला पसंती

$
0
0

लोगो- नाशिक रायझिंग

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या आल्हाददायक वातावरणात योगसाधना, विपश्यना एक वेगळी अनुभूती देतात. मेडिटेशनसाठी स्वर्ग ठरलेल्या नाशिकची राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंद घेतली जाते. आता यात भर पडते आहे आयुर्वेदिक उपचार पद्धतींची! नाशिकमध्ये बॉलीवूडमधील काही नामवंत कलाकार, परदेशी पाहुणे पंचकर्मासाठी नियमित हजेरी लावत आहेत. यामुळे केरळच्या धर्तीवर आयुर्वेदिक टुरिझम वाढवण्यास येथे मोठा वाव असल्याचे या निमित्ताने समोर येते आहे.

आयुर्वेदिक उपचार पद्धती जगातील प्राचीन उपचार पद्धती मानली जाते. कालौघात आधुनिक उपचार पद्धतींमुळे याकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र, आता योग, विपश्यना याप्रमाणे आधुनिक वर्ग आयुर्वेदिक उपचारांकडे वळू लागला आहे. आयुर्वेदिक उपचार पद्धतीचे दीर्घकालीन चांगले परिणाम समोर येत आहेत. त्यात होणाऱ्या नवनवीन संशोधनाचा परिणाम चांगला असून, देशी तसेच परदेशी व्यक्ती याकडे आकर्षित होत आहेत. बॉलीवूडमधील दिलीप ताहील हे कलाकार दोन वर्षांपासून येथे सातत्याने आयुर्वेदिक उपचार घेत आहेत. मागील काही वर्षांत ब्राझील, कॅनडा, नेदरलँड आदी देशांमधील नागरिक उपचारासाठी येथे येऊन गेले. शहरातील काही वैद्य परदेशात जाऊन उपचार करतात. केरळमध्ये आयुर्वेदिक मेडिकल टुरिझम विकसित झाले आहे. नाशिकमध्ये यास वाव मिळण्याची शक्यता आहे. सरकारने याकडे लक्ष पुरवल्यास केरळनंतर आयुर्वेदिक उपचारासाठी विशेष हॉस्पिटल्स फक्त नाशिकमध्ये उपलब्ध होऊ शकतील, अशी अपेक्षा चौधरी यांनी व्यक्त केली. आयुर्वेदिक उपचारांचे पर्यटन वाढल्यास रोजगारनिर्मितीसही चालना मिळू शकेल.

नाशिकचे वातावरण आरोग्यास उत्तम आहे. शिवाय नाशिकमध्ये तज्ज्ञांची उपलब्धताही आहे. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी नाशकात आयुर्वेदिक उपचार घेण्यास येणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

- हितेश चौधरी, वैद्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांडक विद्यालयाच्या इमारतीचे उद्या उद्घाटन

$
0
0

\B

\Bनाशिक : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिन्नर संकुलातील मातोश्री चंद्रभागाबाई आणि अयोध्याबाई चांडक कन्या विद्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम होईल. उद्योजक राधाकिसन चांडक उपस्थित राहतील. मंडळाचे शतक महोत्सव समितीचे उपाध्यक्ष डॉ. विनायक गोविलकर अध्यक्षस्थानी असतील.

प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था

देवळाली कॅम्प : जसजसे ऊन वाढते आहे, तसतसे पिण्याच्या पाण्याची समस्याही तीव्र होत आहे. मनुष्य कुठूनही पाणी आणू शकतो; पण प्राणी, पक्ष्यांचे हाल होतात. त्यामुळे प्राण्यांसाठी भगूर येथील तरुणाईने पाण्याची व्यवस्था केली आहे. 'एक दिवस मुक्या प्राण्यांसाठी" ही संकल्पनेतून बारा बलुतेदार १८ पगडजाती संघटनेतर्फे भगूर येथील प्रत्येक चौकात ही व्यवस्था करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक संघाचे दादासाहेब देशमुख व शांतीलाल लुणावत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. संघटनेचे प्रमोद आंबेकर, विशाल बलकवडे, कैलास भोर, संदीप ताजनपुरे, प्रसाद आडके, निमीष झंवर, मनोज कुवर, पवन आंबेकर, नीलेश गायकवाड, गजानन आंधळे, योगेश बुरके, विवेक भागवत, दिनेश बेरड, वैभव ढगे, मयूर वाघचौरे आदी उपस्थित होते.

नाशिकरोड : रस्ता ओलांडण्यासाठी थांबलेल्या दुचाकीस्वाराला दुसऱ्या दुचाकीस्वाराने धडक दिल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना सिन्नर फाटा येथे घडली. अपघातातील जखमी मधुकर रामनाथ लहाने (वय ४७, रा. सोनगिरी, ता. सिन्नर) यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लहाने व त्यांचा मित्र राजेश बोडके दुचाकीने (एमएच १५/एफ एच ५१२६) महामार्ग ओलांडण्यासाठी उभे असताना समीर शिवराम मोगल (रा. कोठुरे, ता. निफाड) या दुचाकीस्वाराने (एमएच १५/ एफएल ५९३३) त्यांना जोरदार धडक दिली. यात सोनगिरी येथील मधुकर लहाने आणि राजेश बोडके गंभीर जखमी झाले.

गोठ्याला आग

पंचवटी : कपालेश्वर मंदिरामागील एका वाड्यातील गायीच्या गोठ्याला रविवारी (दि. ८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास भीषण आग लागली. गायींच्या गोठ्यातील वाळलेला चारा पेटल्याने ही आग लागली. गायींना तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. अग्निशामक दलाच्या दोन बंबांनी आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला. आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही. वाळलेल्या चाऱ्यामुळे काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. वाडामालक व नागरिकांनी तत्काळ गोठ्यातील जनावरांना सुरक्षित स्थळी हलविल्याने नुकसान टळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रवादीचा गुरुवारीमालेगावी रास्ता रोको

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सरकारने कांदा, टोमॅटोसह शेतमालाला हमीभाव जाहीर करावा या मागणीसाठी तसेच इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबई-आग्रा महामार्गावर मालेगावी टेहरे चौफुलीवर गुरुवारी सकाळी १० वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. सरकारने कांद्यासह शेतमालाला हमीभाव जाहीर करावा, पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसचे दर कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी १० वाजता होणाऱ्या या आंदोलनात शेतकरी, पक्षाचे नेते, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन अॅड. रवींद्र पगार यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरमसाठ करवाढीवर आयुक्त मुंढे ठाम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेची तिजोरी भरण्यासाठी आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी मोकळे भूखंड, इमारतीच्या सामासिक अंतरासह शेत जमिनीवरील करात भरमसाठ वाढ करण्याच्या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप उमटत असल्याने सत्ताधारी भाजपसह आमदारांवरील दबाव वाढला आहे. त्यातच नाशिक पूर्व, सातपूरमधील शेतकऱ्यांनी आक्रमक होत, आंदोलनाची भाषा सुरू केल्याने सोमवारी घाईगडबडीत महापौरांसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन करवाढ मागे घेण्याची मागणी केली. विशेषत: शेतकऱ्यांवर अन्याय नको अशी भूमिका घेणाऱ्या महापौरांसह पदाधिकाऱ्यांना आयुक्तांनी आपली करवाढ योग्य असल्याचा पाढा वाचत, त्यांना रिकाम्या हाताने माघारी पाठवले.

महापालिकेने लादलेल्या या जुलमी करवाढीच्या विरोधात पंचवटीतल्या शेतकऱ्यांनी रविवारी महापौरांसह आमदार बाळासाहेब सानप यांची भेट घेऊन करवाढ मागे घेण्याची मागणी केली. वेळ पडल्यास आंदोलनाचाही इशारा त्यांनी दिला. विधानसभा निवडणुकीत शेतकरी मोठा फॅक्टर असल्याने नाराजी नको म्हणून मुख्यमंत्र्यांसह आयुक्तांकडे जाणार असल्याचे आश्वासन शेतकऱ्यांना यावेळी देण्यात आले. सोमवारी महापौर भानसी यांच्यासह उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके, भाजप गटनेते संभाजी मोरुस्कर, ज्येष्ठ नगरसेवक दिनकर आढाव, जगदीश पाटील, अजिंक्‍य साने, प्रशांत जाधव, मच्छिंद्र सानप, शरद मोरे आदींनी आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. नवीन मालमत्तांसह शेत जमिनीवर लावलेल्या कराबाबात महासभेची मान्यता घेतल्याशिवाय कार्यवाही करू नये अशी मागणी करण्यात आली. यापूर्वीचा तीन पैसे कर थेट चाळीस पैशांवर नेल्याने शेतकऱ्यांना वार्षिक एकरी लाखापेक्षा अधिक कर आकारणी होण्याची शक्‍यता असल्याने याविरोधात शेतकरी वर्गामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. भाजपचे सर्वाधिक नगरसेवक शहरातील ग्रामीण भागातून निवडून आले आहेत, तर पूर्व, पश्‍चिम व मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघातील तीनही आमदारांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात गावांचा समावेश असल्याने या गावांमध्ये शेतकऱ्यांनी बैठकांच्या माध्यमातून एल्गार पुकारला आहे. त्यामुळे करवाढ मागे घ्या, असे आर्जव त्यांनी केले. परंतु, आयुक्तांनी आपल्याच अधिकारात करवाढ केल्याचे सांगत, करवाढीचे समर्थन केले. त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परत फिरावे लागले. आयुक्तांच्या भेटीवेळी विरोधकांना मात्र टाळण्यात आल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्र्यांकडे धाव

महापालिकेची भरमसाठ करवाढ मागे घेण्याची आयुक्तांची मानसिकता नसल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपचा गड सावरायचा असेल तर, पदाधिकारी आता थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेण्याच्या तयारीत आहेत. विशेषत: शेतकऱ्यांचा रोष परवडणारा नसल्याने भाजपने मुख्यमंत्री भेटीची तयारी सुरू केली आहे. परंतु, या विषयावरही आमदार सीमा हिरेंसारखाच अनुभव येण्याची शक्यता असल्याने भाजपचे आमदार अजूनही चाचपडत आहेत. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विषय मार्गी लावला जाईल असा आशावाद महापौर रंजना भानसी व्यक्त करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दर्शन कासारचे यश

$
0
0

मालेगाव : मविप्र संस्था संचालित श्रीमती विमलाबेन खेमजी तेजुकाया महाविद्यालय देवळालीतर्फे विद्यापीठ स्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  या स्पर्धेत येथील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयातील रसायनशास्त्र विषयाचा विद्यार्थी दर्शन उदय कासार याने प्रथम क्रमांक पटकावला.  स्पर्धेकरिता सावरकरांचे सामाजिक कार्य हा विषय घेतला होता. दर्शनला तेजुकाया शेठ, प्राचार्य डॉ. विजय मेधाने, डॉ. भास्कर ढोके आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांविरोधात नगरसेविकेचा लेटर बाँम्ब

$
0
0

भाजप नगरसेविकेचा

महापौरांविरोधात ठपका

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत भाजपची सत्ता येवून जेमतेम एक वर्षाचा कालावधी लोटला असतांनाच, आता नगरसेवकांमधील अस्वस्थता वाढत चालली आहे. महासभेत महापौर सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेवकांची मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप भाजपच्या नगरसेविका प्रा. वर्षा भालेराव यांनी केला आहे. महापौरांना पत्र देवून याबाबत नाराजी व्यक्त केली असून, सभागृहातील कामकाजावरच बोट ठेवल्याने पक्षातील बेदीली उघड झाली आहे. विशेष म्हणजे महासभेत अभ्यासू नगरसेवकांनाच बोलू दिले जात नसल्याचा ठपका भालेरावांनी महापौरांवर ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महापालिकेतली पदे वाटण्यावरून नगरसेवकांमध्ये खदखद सुरू झाली आहे. शहराध्यक्षांकडून विशिष्ट नगरसेवकांवरच मेहरबानी केली जात असून, पक्षाचे आदेश धाब्यावर बसवले जात आहेत. त्यामुळे पालिकेतील सत्ताधारी भाजपचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नगरसेवकांमध्ये अस्वस्थता वाढीस लागली आहे. स्थायी समितीच्या निवडीवरून थेट शहराध्यक्षांनाच खरीखोटी सुनावल्याची घटना ताजी असतानाच, आता भाजपच्या एका नगरसेविकेने महापौरांविरोधात लेटरबाँम्ब फोडून खळबळ उडवून दिली आहे. महापौर महासभेत आपल्याला बोलू देत नसल्याचा आरोप प्रा. भालेराव यांनी केला आहे. महापौरांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महापालिकेची निवडणूक होऊन एक वर्ष एक महिना पूर्ण झाला. आतापर्यंत अनेक महासभा झाल्या, परंतू एकाही महासभेत मी तासनतास हात वर करूनही आपण मला एकदाही बोलू दिले गेले नाही. पालिकेत जे काही उच्च शिक्षित नगरसेवक आहेत, त्यापैकी मी एक आहे. परंतु असे असूनही आपण मला बोलू देत नसून, माझ्याबद्दल काहीतरी आकस असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी ज्या नगरसेवकांनी बजेट संदर्भात बोलावे त्यात माझेही नाव होते. परंतु वारंवार हात वर करूनही आपण मला बोलू दिले नाही. रामायण येथे बजेटची चर्चा चालू असताना आपण स्वतः मला येणाऱ्या महासभेत इंग्रजीतून भाषण करण्यास सांगितले. पण दिवसभर हात उंच करूनही आपण मला बोलू दिले नाही, असा ठपका त्यांनी महापौरांवर ठेवला.

यापूर्वी महासभेत मी वारंवार कलम कलम ४४ अंतर्गत प्रश्न उपस्थित केले. त्यामध्ये मी शहर परिवहनचा विषय उपस्थित केला होता. पण एकही विषयासंदर्भात बोलू दिले नाही व सभागृहात चर्चा होऊ दिली नाही. शेवटी या विषयात तर खुद्द मुख्यमंत्र्यांनीच शहर परिवहन सेवा महापालिकेनेचं चालवावी, असे आदेश दिले. मी पक्षाची एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे. आजपर्यंतच्या सर्व महासभेत शंभर टक्के उपस्थित असून, निधी खर्चातही आघाडीवर आहे. आपण लेखी उत्तर दिले नाही, तर मी थेट पक्षश्रेष्ठींकडे जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे वर्षा भालेराव या शहर भाजपचे उपाध्यक्ष अनिल भालेराव यांच्या पत्नी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजय कौशलजींच्या रामकथेचे आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उद्योजक पोद्दार बंधूंच्या वतीने १२ ते १८ एप्रिल दरम्यान रामकथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प. पू. श्री. विजय कौशलजी महाराजांकडून श्रीराम कथा ऐकण्याची संधी नाशिककरांना लाभणार आहे. हनुमानवाडी रोड येथील धनदाई लॉन्स येथे १२ ते १७ एप्रिल दरम्यान सायंकाळी ५ ते ८ आणि १८ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत रामकथा ज्ञानयज्ञ होणार आहे.

वृंदावन येथील प्रख्यात रामकथाकार प. पू. संत श्री. विजयजी कौशल यांच्या रसाळ वाणीद्वारे रामायणातील विविध प्रसंगाचे यथोचित सार विषद करणार आहेत. श्री विजयजी कौशल महाराज ३० वर्षांपासून रामकथा करत आहे, भारतात सर्वात प्रख्यात राम कथा वाचक आहेत, त्यात महाराजांचे नाव अगक्रमाने घेण्यात येते. दरमहा पाचशे विधवा महिलांच्या पालन पोषणाची जबाबदारी त्यांच्या ट्रस्टने स्वीकारली आहे. भारतातील प्रत्येक प्रांतात व विदेशातही २५ देशामध्ये त्यांच्या रामकथा झाल्या आहेत.

भक्तांनी कथा सुरू होण्यापूर्वी १५ मिनिट अगोदर आसनस्थ व्हावे, कथेनंतर महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. रामकथर यशस्वीतेसाठी नंदिनी गौशाळा, रामकृष्ण शारदा आश्रम, नाशिक सेवा समिती टस्ट, वनबंधू परिषद, नाशिक चॅप्टर, श्रीहरी सत्संग समिती नाशिक तसेच श्री शाम सेवक मंडल ट्रस्ट नाशिक या संस्थांचे पदाधिकारी व सदस्य प्रयत्नशील आहेत. या कथेचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक खुशालभाई पोद्दार व नेमीचंदजी पोद्दार यांनी केले.

भाविकांसाठी बससुविधा

कार्यक्रम स्थळावर भाविकांना येण्या-जाण्यासाठी जुना गंगापूर नाका येथील इंद्रप्रस्थ हॉल समोरून धनदाई लॉन्स येथे जाण्यासाठी बससेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सायंकाळी ४ ते ५ दरम्यान जाण्यासाठी तर रात्री ८ ते ९.३० दरम्यान परतण्यासाठी बस उपलब्ध असेल. तसेच नाशिकरोडहून धनदाई लॉन्सपर्यंत जाण्यासाठी दत्तमंदिर सिग्नल, बिझनेस बँकेजवळून सायंकाळी चार वाजता व परतण्यासाठी कथा स्थळापासून रात्री ८.४५ वाजता बस उपलब्ध असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images