Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

लोकशाहीदिनातील अर्ज तातडीने निकाली काढा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

विभागीय लोकशाहीदिनात दाखल करण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रार अर्जावर संबंधित विभागाने त्वरित कार्यवाही करून अर्ज निकाली काढावेत, तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयास सादर करण्यात यावा, अशी सूचना विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने यांनी अधिकाऱ्यांना दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयातील समिती कक्षात आयोजित विभागीय लोकशाहीदिनात ते बोलत होते. यावेळी उपायुक्त दिलीप स्वामी, रघुनाथ गावडे, सुखदेव बनकर,अर्जुन चिखले, सहाय्यक आयुक्त उन्मेश महाजन यांच्यासह सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

विभागीय लोकशाहीदिनात सोमवारी ३० नवीन तक्रारी दाखल करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

फार्स ठरू लागल्याची भावना

प्रशासनातील विविध विभागांतील जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडून न्याय न मिळाल्यास अशा नागरिकांकडून विभागीय लोकशाहीदिनात न्याय मागितला जातो. परंतु, येथेही तक्रारकर्त्यांच्या पदरी काही पडत नाही. कारण, विभागीय लोकशाहीदिनात दाखल तक्रारीवर येथे फक्त चर्चा होते. तात्काळ निर्णय होत नाही. पुन्हा या तक्रारी जिल्हा स्तरावरील संबंधित विभागप्रमुखांकडे पाठविल्या जातात. त्यामुळे तक्रारदारांचा हिरमोड होतो. पुन्हा शासकीय कार्यालयांच्या पायऱ्या झिजविण्याची वेळ येते. या अर्जांचा निपटारा करण्यासाठी तीस दिवसांची मुदत असते. वास्ताविक सर्व विभागप्रमुख विभागीय लोकशाहीदिनाला हजर असतात. त्यामुळे तक्रारकर्त्यांचा अर्ज तात्काळ निकाली काढणे अपेक्षित आहे. मात्र, सर्व विभागप्रमुख हजर असतानाही तक्रारी अर्ज पुन्हा तीस दिवसांच्या कालावधीसाठी जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येत असल्याने विभागीय लोकशाहीदिन केवळ फार्स ठरू लागल्याची भावना तक्रारदारांकडून व्यक्त होत आहे.

--

शिंदे टोल नाकाप्रश्नी शिवसेनेचे आज आंदोलन

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गावाजवळील टोल नाका बंद करण्यासाठी आज, मंगळवारी (दि. १०) शिवसेना व ग्रामस्थ आंदोलन करणार आहेत.

आमदार योगेश घोलप व सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के, जगन आगळे, केशव पोरजे, सुदाम ढेमसे, योगेश म्हस्के, नितीन चिडे, योगेश देशमुख, नितीन खर्जुल, उत्तम कोठुळे, पोपट जाधव, बाळासाहेब गोडसे, शिवाजी भोर, मसूद जिलानी, अजीम सय्यद, राहुल धात्रक, किरण डहाळे, दिनकर पाळदे आदी त्यात सहभागी होणार आहेत. काही महिन्यांपूर्वी शिंदे गावाजवळ टोल नाका सुरू झाला आहे. वाहनचालक, शेतकरी, तसेच ग्रामस्थांनी टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याची तक्रार केली आहे. टोल नाका सुरू झाला तेव्हा शिवसेनेने आंदोलन करून तो बंद करण्याचा इशारा दिला होता.

सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांची घोलप यांनी भेट घेतली असता मंत्री शिंदे यांनी त्यांना दिलासा दिला होता. मात्र, टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची मनमानी सुरूच असून, वाहनधारकांची लूट केली जात आहे. त्यामुळे जनता त्रस्त झाली असून, आमदार घोलप यांनी जनता व वाहनचालकांना न्याय मिळण्याची मागणी केली. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच या टोल नाक्यावर तोडफोड आंदोलन करण्याचा इशारा आमदार घोलप यांनी दिला होता. घोलप म्हणाले, की टोल नाक्यामुळे शेतकरी व सामान्यांची लूट होत आहे. त्याचा त्रास शिंदे, पळसेबरोबरच सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनाही सहन करावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आमदार राजासिंहविरोधात गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील डी. के.कॉर्नर समोरील प्रांगणात ७ एप्रिल रोजी हिंदू धर्मजागृती सभेत प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल सभेचे प्रमुख मार्गदर्शक आमदार टी. राजासिंह उर्फ राजाभैय्या यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याबद्दल मालेगाव कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

शहरात शिनवारी हिंदू धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित जनसमुदायला मार्गदर्शन करण्यासाठी हिंदू धर्मजागृती सभेचे प्रमुख मार्गदर्शक आमदार टी. राजासिंह आले होते. आपल्या फिर्यादीत कॅम्प पोलिसांनी सांगितले आहे की, राजाभैय्या भाषणात कोणत्याही धर्मावर कुठल्याही प्रकारचे प्रक्षोभक भाषण व भडकाऊ वक्तव्य करणार नाही असे लेखी नोटीस दिलेली असतांना देखील त्यांनी आपल्या भाषणात मुस्लिम धर्मियांचा भावना दुखावून त्यांना अपमानित करण्याचा उद्देशाने भडकाऊ भाषण केले. त्यामुळे त्यांनी प्रशासनाचा आदेशाचे उल्लंघन केले म्हणून त्यांच्यावर कायद्याचा १३५ कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महासभेत ‘दंड’कारण!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महिला व बालकल्याण समितीचा निधी भाजपचे गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी पळविण्याचा प्रयत्न केल्यावरून सोमवारी महासभेत विरोधकांनी चांगलाच राडा घातला. महिला सदस्यांनी सुचविलेली कामे बाजूला ठेवत, मोरुस्कर यांच्या प्रभागात नियमबाह्य ग्रीन जिम बसविण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या महिला सदस्यांनी उधळून लावत, कामे रद्द करण्याची जोरदार मागणी केली. परंतु, महापौरांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने विरोधकांनी वेलमध्ये धाव घेऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली. गोंधळातच विषय समित्यांची नावे जाहीर करणाऱ्या महापौर रंजना भानसी यांच्यासमोरील राजदंड पळविण्याचा प्रयत्न झाल्याने अखेर महापौरांनीही सभा गुंडाळली. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या या मिली-जुलीमुळे शहरातील करवाढीचा विषय दुर्लक्षित राहिल्याने आयुक्तांचे फावल्याची चर्चा आहे.

महापालिकेतील महिला व बालकल्याण, विधी, शहर सुधारणा आणि आरोग्य समितीच्या सदस्य नियुक्तीसाठी सोमवारी महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली महासभा बोलाविण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीला गेल्या महासभेचे इतिवृत्त मंजुरीचे विषय आले. या इतिवृत्तावर राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार यांनी आक्षेप घेत, करवाढीला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असताना इतिवृत्तात सर्वसंमतीने विषय मंजूर असल्याच्या उल्लेखावर हरकत घेतली. त्यामुळे यात दुरुस्ती करण्याची मागणी केली, तर शिवसेनेच्या नयना गांगुर्डे यांनी महिला व बालकल्याण समिती सदस्यांनी सुचविलेल्या कामांचा समावेश न करता काही प्रभागांमध्ये समितीच्या निधीमधून ग्रीन जिम बसविण्याचा विषय इतिवृत्तात आल्याची बाब निदर्शनास आणून देत ही कामे रद्द करण्याची मागणी केली. महिला व बालकल्याणच्या आदेशात कुठेही ग्रीन जिम बसवण्याचा उल्लेख नसतानाही, भाजपचे गटनेते संभाजी मोरुस्कर यांच्या प्रभाग क्रमांक वीसमध्ये सर्व जिम बसविण्याचे विषय आल्याने गांगुर्डे, सत्यभामा गाडेकर यांच्यासह विरोधी नगरसेवकांनी हौदात उतरून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. महापौरांनी दुरुस्ती करू, अशी सूचना केली. परंतु, सर्व विरोधकांनी ही कामे रद्द करण्यावर ठाम राहत, भाजपविरोधात घोषणाबाजीला सुरुवात केली.

महापौरांनी विरोधकांकडे दुर्लक्ष करीत, गोंधळात समिती सदस्यांची नावे घोषित करण्यास सुरुवात केली. परंतु, भाजप तसेच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक हौदात एकमेकांसमोर येऊन आरोप-प्रत्यारोप करू लागले. या गोंधळातच शिवसेनेच्या दीपक दातीर यांनी व्यासपीठावर चढत राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभागृहात एकच गदारोळ सुरू झाला. यात नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या पायाला, तर पुष्पा आव्हाड यांच्या हाताला दुखापत झाली. नगरसेवकच हमरी-तुमरीवर आल्याने महापौरांनी सभा गुंडाळत, राष्ट्रगीताला सुरुवात केल्याने सर्व विषयांवर पाणी फेरले गेले.

करवाढीला बगल

सत्ताधाऱ्यांनी १८ टक्के करवाढीला मंजुरी दिल्यानंतरही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या अधिकारात मोकळ्या भूखंड, इमारतीमधील सामासिक अंतरासह शेतीवर तीन पैशांहून चाळीस पैसे करवाढ केल्याने शेतकऱ्यांसह जनतेत प्रचंड असंतोष आहे. आयुक्तांच्या या निर्णयाविरोधात गावोगावी बैठकांमधून निषेध व्यक्त करताना आंदोलनाची भाषा बोलली जात आहे. या करवाढीविरोधात नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणाऱ्या नगरसेवकांना महासभेत बोलण्याची संधी मिळणार होती. पंरतु, नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय सोडून थेट ग्रीन जिमवरच महासभा गुंडाळली गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमधल्या काही नगरसेवकांनी आयुक्तांच्या खेळीला चाल देण्यासाठी हा ड्रामा रचल्याची चर्चा नगरसेवकांमध्ये आहे. त्यामुळे आता नागरिकांना काय तोंड द्यावे, अशा चिंतेत भाजपचे नगरसेवक पडले आहेत.

ड्रामा पूर्वनियोजित?

आयुक्तांच्या करवाढीच्या विषयाला बगल देण्यासाठी आणि पालिकेतल्या एका बड्या अधिकाऱ्यासाठी सभेपूर्वी हा ड्रामा रचला गेल्याची चर्चा आहे. भाजपच्याच काही नगरसेवकांनी बांधकाम विषयाशी संबंधित प्रश्नोत्तरे महासभेत विचारली होती. जवळपास सहाशे कोटींच्या या कामांवरून सवाल जबाब होण्याची शक्यता होती. संबंधित अधिकारी हा याच महिन्यात नोकरीतून निवृत्त होत आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून महासभा होऊ नये यासाठीची फिल्डिंग लावली जात होती. त्यासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील काही नगरसेवकांनाही गळाला लावण्यात आले. सभेपूर्वी गोंधळाचा ड्रामा रचल्याची चर्चा रंगल्याने सुनील खुनेंचा वारसा पालिकेत कायम राहिल्याची चर्चा आहे.

महापौर नामधारी

महासभेच्या प्रमुख या महापौर असून त्यांचेच अधिकार हे महासभेत चालतात. परंतु, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सध्या महासभांवर ताबा घेतला असून, महापौरांनी काय बोलायचे, रुलिंग द्यायचे याबाबतचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे महापौरही निर्णय देताना गोंधळत असल्याचे चित्र आहे. आयुक्तांच्या या प्रयत्नांमुळे महापौरच आता नामधारी बनल्या आहेत. महापौरांचे अधिकार शिल्लक असलेल्या एकमेव महासभेतही ते चालत नसल्याबद्दल भाजपच्याच नगरसेवकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेनस्नॅचिंग सांजवेळी जोमात

$
0
0

नाशिक पोलिसांनी शोधला चेन स्नॅचर्सचा ट्रेंड


म. टा. प्रतिनिधी, नाशिक


सायंकाळी सहा ते रात्री १० या वर्दळ असलेल्या वेळेतच चेन स्नॅचर्स महिलांना लक्ष्य करतात. मुंबई नाका, इंदिरानगर आणि पुढे उपनगर अशा हायवेलगत परिसरांमध्ये महिलांच्या गळ्यातील सौभाग्य लेणे हिसकावून चोरटे अंधारात गुडप होतात.

शहरात २०१७ या वर्षात चेन स्नॅचिंगच्या १०२ घटना घडल्या आहेत. यातील सर्वाधिक घटना सायंकाळी ६ ते ८ आणि ८ ते १० वाजेदरम्यान अशा चार तासात झाल्या आहेत. वास्तविक ही वेळ वर्दळीची मानली जाते. मात्र हीच वेळ चोरट्यांच्या फायद्याची ठरल्याचे दिसते. हायवेलगत असलेल्या रहिवाशी भागातील रस्त्यांवर एकट्या किंवा ग्रुपमध्ये असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील दागिन्यांवर डल्ला मारला गेला.

याबाबत बोलताना क्राईम ब्रँचचे सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते यांनी सांगितले की, संध्याकाळी ६ ते रात्री १० या चार तासात ४५ चेन स्नॅचिंग झाल्या. यातील बहुतांश चेन स्नॅचिंग हायवेलगत झाल्या आहेत. याबाबत जिओ मॅपिंगदेखील करण्यात आले असून, इंदिरानगर पोलिस स्टेशन हद्दीतील वडाळा पाथर्डी रोड, कलानगररोड, बजरंग सोसायटी रोड अशा ठिकाणी या घटना घडल्या आहेत. तेच मुंबई नाका पोलिस स्टेशन हद्दीतील गोविंदनगर, अशोक मार्ग, भाभानगर आणि पुढे उपनगर पोलिस स्टेशन हद्दीतदेखील हायवे किंवा हायवेपासून जवळ असलेल्या रस्त्यांवर चेन स्नॅचिंग झाल्या आहेत.

नेमक्या सायंकाळच्या सुमारास महिला कामावरून परतात, देवदर्शनासाठी मंदिरात जातात, काही जेवण केल्यानंतर शतपावलीसाठी घरातून बाहेर पडतात. अंगावर दागिने असले की संधीच्या शोधत असलेले चोरटे संधी साधतात. यासाठी महिलांनी शक्यतो जास्त दागिने परिधान करू नये. दागिने असल्यास शक्य ती काळजी घ्यावी, असे नखाते यांनी स्पष्ट केले.

महिलांनी घ्यावी काळजी

सध्या काही दिवसांपासून एक आरोपी रात्री ८ ते १० या वेळेत चेन स्नॅचिंग करतो आहे. काळ्या तसेच लाल रंगाची दुचाकी वापरणारा चोरटा शतपावलीसाठी निघालेल्या किंवा थोडाफार अंधार असलेल्या ठिकाणी महिलांना टार्गेट करतो. कधी हेल्मेट तर कधी स्कार्फ बांधलेला चोरटा शक्यतो समोरील बाजुने येऊन चेन ओढतो. या आरोपीने आजवर वेगवेगळ्या ठिकाणी स्नॅचिंग केली असून, पोलिस त्याचा शोध घेत असल्याचे नखाते यांनी स्पष्ट केले. हायवेलगत परिसर असलेल्या रहिवाशी भागातील महिलांनी थोडीशी काळजी घेतली. तसेच या भागातील तरूणांनी अनोळखी व्यक्तींवर नजर ठेवल्यास फायदा होऊ शकतो. सीसीटीव्ही हा एक चांगला पर्याय असून, त्याचाही वापर वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेबल टेनिस बातमी

$
0
0

मनिका बत्रा

उपांत्य फेरीत

टेबल टेनिस

गोल्ड कोस्ट : भारताच्या मनिका बत्राने राष्ट्रकुलमधील टेबल टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. मौमा दासला मात्र उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला.

दिल्लीच्या मनिकाने सिंगापूरच्या यिहान झ्होयूवर ११-५, ११-६, ११-२, ६-११, ११-९ असा विजय मिळवला. दुसऱ्या उपांत्यपूर्व लढतीत सिंगापूरच्या यू मेन्ग्यूने मौमावर १५-१३, ११-७, ११-५, ७-११, ११-५ असा विजय मिळवला. तत्पूर्वी, एकेरीत मनिकाने ऑस्ट्रेलियाच्या ट्रेसी फेंगवर ११-६, ११-६, ९-११ असा, तर मौमा दासने इंग्लंडच्या टिन-टॅन होवर ११-७, ७-११, ९-११, ११-८, ११-१३, ११-७, ११-८ असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला होता. मधुरिका पाटकरला मात्र उप-उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. इंग्लंडच्या सिब्लेने मधुरिकाचे आव्हान ११-९, ११-८, २-११, ११-३, ८-११, ११-६ असे परतवून लावले. पुरुष एकेरीत शरथ कमलने ऑस्ट्रेलियाच्या हेमिंग हू याला ११-८, १२-१०, ८-११, ११-६, ११-५ असे, तर हरमीत देसाईने मलेशियाच्या ची फेंग लिआँगला ११-५, ११-७, ११-५, ७-११, ११-४ असे पराभूत केले. महिला दुहेरीत मनिका बत्रा-मौमा दासने श्रीलंकेच्या हन्सनी - ईशरा जोडीवर ११-४, ११-४, ११-१ असा विजय मिळवला. यानंतर उपांत्यपूर्व फेरीत मनिका-मौमा जोडीने इंग्लंडच्या हो टीन टीन- मारिया जोडीवर १२-१४, ११-३, ११-७, ११-६ अशी मात केली. यानंतर सुतिर्था - पूजा जोडीने अॅलिसिया - मो जोडीवर ११-६, ११-७, १४-१२ असा विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली. मिश्र दुहेरीत शरथ कमल- मौमा दास जोडीने इंग्लंडच्या डेव्हिड - केली जोडीवर ११-५, ११-९, ११-९ असा, तर साथियन- मनिका जोडीने कॅनडाच्या मार्को - अॅलिसिया जोडीवर ११-८, ११-१३, १०-१२, ११-८, ११-४ असा विजय मिळवला. सानिल - मधुरिका जोडीने मॉरिशसच्या टाउकूरी - एलोडीए जोडीवर ११-४, ११-५, ११-६ अशी मात केली. पुरुष दुहेरीत शरथने साथियनच्या साथीने आगेकूच केली. यानंतर हरमीत देसाई आणि सानिल शेट्टी जोडीनेही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोल्डन बॉइज’

$
0
0

सुशीलकुमार, राहुल आवारेला सुवर्ण, बबिताला रौप्य, किरणला ब्राँझ

कुस्ती

वृत्तसंस्था, गोल्ड कोस्ट

मूळचा बिडचा आणि सध्या पुण्यात सराव करत असलेल्या राहुल आवारेने राष्ट्रकुलमधील कुस्ती स्पर्धेत ५७ किलो गटात सुवर्णपदक मिळवले. दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेत्या सुशीलकुमारनेही (७४ किलो) आपल्या गटात निर्विवाद वर्चस्व राखून सुवर्णयश मिळवले. बबिता फोगटला (५३ किलो) रौप्यपदक, तर किरणला ब्राँझपदक मिळाले. कुस्तीमध्ये पहिल्याच दिवशी भारताने चार पदकांची कमाई केली.

स्पर्धेतील ५७ किलो गटातील पहिल्या लढतीत राहुलने इंग्लंडच्या जॉर्ज रॅमला ४-०ने नमविले. यानंतर राहुलने ऑस्ट्रेलियाच्या थॉमस सिचिनीवर मात केली आणि उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. या फेरीत राहुलने पाकिस्तानच्या महंमद बिलालला अस्मान दाखविले आणि अंतिम फेरी गाठली. या फेरीत त्याच्यासमोर कॅनडाच्या स्टीव्हन ताकाहाशीचे आव्हान होते. ताकाहाशीदेखील त्याच्याच तोडीचा मल्ल होता. पण, याचे दडपण न घेता राहुलने आश्वासक सुरुवात केली. त्याने ६-४ अशी आघाडी घेतली. यानंतर त्याच्यासमोर ताकाहाशीचा निभावच लागला नाही. राहुलने ही लढत १५-७ अशी जिंकली. तिरंगा हातात घेताच, त्याचे डोळे भरून आले. एकाच दिवसात त्याने चार मल्लांना लोळविले. तो म्हणाला, 'सलगच्या कुस्त्यांनी पायाला वेदना जाणवत होत्या. हे पदक मी माझे गुरू हरिश्चंद्र बिराजदार यांना अर्पण करतो. माझ्या मेहनतीचे फळ आज मला मिळाले. कुटुंबीयांचे स्वप्न साकार करू शकलो, याचा आनंद आहे.'

स्पर्धेतील ७६ किलो गटात किरणने पहिल्या लढतीत कॅमेरूनच्या डॅनिएल सिन्हो गुएमदेवर विजय मिळवला. किरणला उपांत्य फेरीत नायजेरियाच्या ब्लेसिंग ऑनयेबुचीकडून पराभव पत्करावा लागला. पण ब्लेसिंगने अंतिम फेरी गाठल्याने किरणला रिपेचेजमध्ये खेळण्याची संधी मिळाली. ब्राँझपदकाच्या लढतीत त्याने मॉरिशसच्या कातोयुस्किया परिधावेनला पराभूत केले.

बबिताचे सुवर्णयश हुकले

स्पर्धेतील ५३ किलो फ्रीस्टाइलमध्ये बबिताने पहिल्या फेरीत नायजेरियाच्या बोस सॅम्युएलला नमविले. यानंतर दुसऱ्या फेरीत बबिताने श्रीलंकेच्या दीपिका दिलहानीवर ४-०ने मात केली. यानंतर बबिताने ऑस्ट्रेलियाच्या कॅरिसा होलँडलाही हरविले. अंतिम फेरीत बबिताला कॅनडाच्या डायना वेस्केरकडून २-५ पराभव पत्करावा लागला आणि रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. २०१४च्या राष्ट्रकुलमध्ये बबिताने सुवर्णपदक, तर २०१०मध्ये रौप्यपदक मिळवले होते. 'माझ्यापरीने मी सर्वोत्तम प्रयत्न केले. पण, आक्रमकता कमी पडली,' असे बबिता म्हणाली.

सुशीलचा धडाका

- ३४ वर्षीय सुशीलला सुवर्णपदक मिळवण्यासाठी अवघ्या एक मिनिट, २० सेकंदांचा वेळ पुरेसा ठरला.

- दिल्लीच्या सुशीलचे हे राष्ट्रकुलमधील सलग तिसरे सुवर्णपदक ठरले.

- त्याने २०१०मध्ये ६६ किलो, तर २०१४मध्ये ७४ किलो गटात सुवर्णपदक मिळवले होते.

- स्पर्धेतील ७४ किलो गटातील पहिल्या लढतीत सुशीलने कॅनडाच्या जेव्हॉन बल्फोरला सहज नमविले.

- दुसऱ्या फेरीत सुशीलने पाकिस्तानच्या महंमद असद बटला सहज लोळविले.

- उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा कोन्नोर एव्हन्स सुशीलला आव्हान देऊ शकला नाही.

- सुशीलने सुवर्णपदकाच्या लढतीत अवघ्या काही सेकंदांत आफ्रिकेच्या योहाना बोथाला नमविले.

...

मागील दहा वर्षांपासून या पदकाची प्रतिक्षा करत होतो. त्यामुळे या पदकाचा आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. २०१४च्या राष्ट्रकुल स्पर्धेला निवड चाचणी न होताच, संघ पाठविण्यात आला होता. त्यामुळे मला त्यात संधीच मिळाली नाही. सरतेशेवटी पदकाचे स्वप्न साकार करू शकलो, याचा आनंद आहे.

- राहुल आवारे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांना सूर्य बनवण्याचे काम करा

$
0
0

ज्येष्ठ कवियत्री नीला सत्यनारायण यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाजात अनेक महिला या धाडसाने काम करीत आहेत. केवळ चूल आणि मूल ही संकल्पना न धरता बहुविध क्षेत्रामध्ये त्यांनी बाजी मारली आहे. अशा महिलांना समोर आणून त्यांना सूर्य बनवण्याचे काम करा, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवियत्री व राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केले. मधुरा वुमन एम्पॉवरमेंट अॅण्ड वेलफेअर ट्रस्ट यांच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

प. सा. नाट्यगृहात गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात मधुरा ट्रस्टच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या 'सखी सुखप्रदा' या त्रैमासिकाचे प्रकाशन, मधुरा ट्रस्टच्या वेबसाइटचे अनावरण व गौरवशाली महिलांच्या सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास माजी मंत्री पुष्पाताई हिरे, प्रशांत हिरे, स्मिता हिरे, आमदार डॉ. अपूर्व हिरे, योगिता हिरे, अद्वय हिरे, संपदा हिरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी सत्यनारायण म्हणाल्या, की महिलांना आपले प्रश्न मांडण्यासाठी योग्य ते व्यासपीठ नाही. आज घराघरांमध्ये संवाद होत नाही. सखी सुखप्रदा या त्रैमासिकाच्या निमित्ताने हा संवाद साधला जाणार आहे. या त्रैमासिकात सर्व क्षेत्रातील महिलांना स्थान देण्यात आले आहे. महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात शक्ती आहे. हे शक्तीरूप एकत्र येण्याची आवश्यकता आहे. महिला या नेटवर्किंगमध्येही कमी पडतात. ते या व्यासपीठाच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. यावेळी माजी मंत्री प्रशांत हिरे म्हणाले, की आज शाळांमधेये योग्य ते शिक्षण दिले जात नाही. कुटुंबाची व्याख्या बदलत चालली आहे. यातून समाज घडत नाही. आज ज्या कर्तत्ववान महिला आहेत त्यांना पुढे आणण्याचे काम मधुरा ट्रस्टने केले आहे. पुढील वर्षी या सत्कारात रोख रक्कमेचा समावेश करावा, असाही सल्ला त्यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपदा हिरे यांनी केले.

यांचा झाला सन्मान

यावेळी समाजसेवेसाठी वासंती दीक्षित, उज्ज्वला जगताप, शिक्षण क्षेत्रासाठी मंगला गायवान, स्वाती सावंत, उद्योग क्षेत्रासाठी मनीषा धात्रक, अरुणा जाधव, क्रीडा क्षेत्रासाठी मोनिका आथरे, निकिता काळे, कला क्षेत्रासाठी शुभदा तांबट, अर्पिता लाड यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्काराला उत्तर देतांना वासंती दीक्षित म्हणाल्या, की तपस्विनी हा शब्द खूप मोठा आहे. या पुरस्कारामुळे जबाबदारी आणखी वाढली आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना, समाजात वावरताना माणुसकी समजावून घेण्याचे काम केल्यास यश मिळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इमारतींमधून होते संस्कृतीची ओळख

$
0
0

आर्किटेक्ट धनंजय शिंदे यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशात आर्किटेक्चरच्या उत्तमोत्तम कलाकृतींचे दर्शन घडविणाऱ्या अनेक इमारती असून या इमारतींमधूनच देशाची आणि संस्कृतीची ओळख होत असते, असे मत नाशिकचे प्रसिद्ध आर्किटेक्ट धनंजय शिंदे यांनी व्यक्त केले.

विद्यावर्धन ट्रस्ट संचलित आयडिया कॉलेजच्या आर्किटेक्चरची 'परिचय' यावर आधारित 'एक्सक्लेम २०१८' या वार्षिक प्रदर्शनाचे उद्घाटन आर्किटेक्ट धनंजय शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी झाले. गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारकात १५ एप्रिलपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. यावेळी आर्किटेक्ट शिंदे म्हणाले, की देशामध्ये यापूर्वीही अनेक मानवंत आर्किटेक्ट लोकांनी उत्तम काम केले आहे. मात्र, अजून उत्तम वास्तूची निर्मिती करणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात स्वत:ला झोकून देत कार्य करावे. तसेच जुन्या वास्तूंच्या कलाकृतींमधून प्रेरणा घेत लोकपयोगी वास्तू निर्माण केल्या पाहिजे. आधुनिक भारतीय आर्किटेक्चरचे शिल्पकार म्हणून कै. आर्किटेक्ट अच्युत कानविंदे, आर्किटेक्ट बाळकृष्णा दोशी आणि कै. आर्किटेक्ट चार्ल्स कोरिया यांना ओळखले जाते. यांच्या कामावर आधारित असलेले आणि त्यांच्या नावाच्या आद्याअक्षराने सुरुवात करत आर्किटेक्चरची एबीसी अर्थात 'परिचय' यात 'आधुनिक भारतीय आर्किटेक्चरची पायाभरणी' या विषयावर आधारित एक्सक्लेम हे प्रदर्शन आहे.

प्रसिद्ध इमारतींचे सादरीकरण

एक्सक्लेम या प्रदर्शनात प्रसिद्ध व वेगळी ओळख निर्माण केलेल्या इमारतींच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. यामध्ये अरण्या हौसिंग, प्रेमाभाई हॉल, आयआयटी कानपूर, पिनॅकल, डक्सटोन-सिंगापूर एआरसी स्टुडियो २००९, स्काय हॅबिटाट सिंगापूर-मोशे सफादी, डब्ल्यू ५७-मॅनहेटन न्यूयॉर्क, कॅप्सूल टॉवर, द इंटरलास सिंगापूर, कांचनजंगा अशा विविध संस्कृती व शैलीने नटलेल्या इमारती या प्रदर्शनात साकारण्यात आल्या आहेत. याशिवाय महापालिकेसाठी बाजार, सायन्स सेंटर, बिजनेस सेंटर आणि गरीब लोकांना परवडतील अशी कमी खर्चातील घेरे याबाबत विद्यार्थ्यांनी तयार केलेले आराखड्यांचाही प्रदर्शनात समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खिशात नाही आणा, अन् बाजीराव म्हणा

$
0
0

जिल्हा बँकेच्या सुरक्षेसाठी २१ गनधारी सुरक्षारक्षक; शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांची बँक अशी ओळख असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने आता शेतकऱ्यांना तसेच सर्वसामान्य ग्राहकांना बँकेपासून लांब ठेवण्यासाठी चक्क मुख्यालयासह केंद्रीय शाखांची सुरक्षा गनधारी सुरक्षारक्षकांच्या हातात सोपवण्याची तयारी सुरू केली आहे.

रोजच्याच आंदोलनाला कंटाळलेल्या जिल्हा बँकेने महापालिकेचा कित्ता गिरवत आता २१ गनधारी सुरक्षारक्षकासह एकूण ४१ सुरक्षारक्षकांची नियुक्तीचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या तिजोरीत खळखडाट असताना गनधारी सुरक्षारक्षकांच्या नियुक्तीने खिशात नाही आणा अन् बाजीराव म्हणा अशी गत झाली आहे. त्यामुळे वादग्रस्त सुरक्षारक्षकांची भरती वादात सापडली असताना अध्यक्षांच्या या नवलाईने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान जिल्हा बँकेच्या या अफलातून निर्णयाने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जिल्ह्याचे अर्थकेंद्र आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांची बँक अशी जिल्हा बँकेची ओळख आहे. परंतु, आर्थिक स्थिती खालावलेल्या जिल्हा बँकेने आता आपली ओळख पुसण्याची तयारी सुरू केली आहे. कर्जबाजारीपणाच्या आर्थिक दृष्टचक्रात कोंडल्या गेलेल्या जिल्हा बँकेत सध्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचीही वानवा आहे. तीन हजार कोटींच्या ठेवी असलेल्या या बँकेचे जवळपास २७०० कोटींचे कर्ज थकीत आहे. त्यामुळे आपल्या ग्राहकांना देण्यासाठी तिजोरीत खणखणाट असताना बँकेने आता ४१ सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून त्यात २१ गनधारी सुरक्षारक्षकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आधीच्या सुरक्षारक्षकांच्या भर्तीचा वाद सुरू असतांना आता खासगी एजन्सीमार्फात भर्ती केली जाणार आहे. जिल्हा बँकेने याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली असून जिल्हा बँकेच्या मुख्यालयासह केंद्रीय शाखांसाठी २१ गनधारी सुरक्षारक्षक नियुक्त केले जाणार आहेत. तर महापालिकेने जप्त केलेल्या नाशिक सहकारी साखर कारखाना, निफाड सहकारी साखर कारखाना, रेणुकादेवी यंत्रमाग संस्थेच्या सुरक्षेसाठी २० साध्या सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. बँकेच्या तिजोरीत रुपयाही नसतांना गनधारी सुरक्षारक्षकांची नियुक्ती कशासाठी, असा सवाल आता शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या निर्णयावरून वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

तुघलकी निर्णयाची परंपरा

जिल्हा बँकेसह शाखांमध्ये येणारा बहुसंख्य वर्ग हा गोरगरीब शेतकरी आणि नोकरदार असा वर्ग आहे. सध्या बँकेची अवस्था खराब असल्याने त्यांनी बँकेत ठेवलेल्या ठेवींसह जमा होणारे पगारही बँक परत करू शकत नसलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे अशा संकटसमयी बँकेने घेतलेल्या या तुघलकी निर्णयाने काय साध्य होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या आधीही नरेंद्र दराडे अध्यक्ष असताना जवळपास चारशे कर्मचाऱ्यांची बेकायदेशीर भर्ती करण्यात आली होती. त्यात सुरक्षारक्षकांचाही समावेश आहे. त्यामुळे आधीच सुरक्षारक्षक असताना नव्याने गरज काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या कर्जवसुलीच्या विरोधात रोज मोर्चे आंदोलने होत आहेत. तर, आपल्या पैशांसाठीच ग्राहकांना बँकेत चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे यांना दूर ठेवण्यासाठीच हा खटाटोप केला जात असल्याचा आरोप केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगर परिषदांत महाभरती!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारच्या नगर परिषद संचालनालयाने महाराष्ट्र नगर परिषद सेवेमधील गट 'क' श्रेणीतील १८८९ पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी संचालनायाने पूर्वपरीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज मागविले आहेत.

राज्यातील २३२ नगर परिषदांत सरळसेवेने रिक्त असलेल्या जागांवर ही पदे भरली जाणार आहेत. 'अ, ब व क' श्रेणीतील नगर परिषदांत ही भरती होणार आहे. श्रेणी 'अ' नगरपालिकांत १५३ , 'ब' श्रेणीतील नगर परिषदांत ६०४, तर 'क' श्रेणीतील नगर परिषदांत ११३२ पदे आहेत.

एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने नगर परिषदेची ही महाभरती प्रथमच होत असून, त्यामुळे नगर परिषदांनादेखील नवीन अधिकारी-कर्मचारी मिळणार आहेत. या भरतीअंतर्गत स्थापत्य अभियंत्यांची ३६७ पदे, विद्युत अभियंत्यांची ६३ पदे, संगणक अभियंत्यांची ८१, पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियंत्यांची ८४, लेखापाल व लेखापरीक्षकांची ५२८, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकाऱ्यांची ७६६ पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी २५ टक्के पदे ही नगर परिषद कर्मचाऱ्यांमधून भरली जाणार आहेत. राज्यात एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 'अ' श्रेणीतील २१ नगर पालिका आहेत. त्याचप्रमाणे ४० हजार ते १ लाख लोकसंख्या असलेल्या 'ब' श्रेणीतील ४७, तर २५ ते ४० हजार लोकसंख्या असलेल्या 'क' श्रेणीतील १६४ नगर पालिका आहेत.

जिल्ह्यात नऊ आस्थापना

नाशिक जिल्ह्यात नऊ आस्थापना असून, त्यात मनमाड, येवला व सिन्नर या 'ब' श्रेणीतील नगर पालिका आहेत. त्यानंतर नांदगाव, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सटाणा, चांदवड, भगूर या 'क' श्रेणीतील नगर पालिका आहेत. या भरतीमुळे या आस्थापनांनासुद्धा नवीन अधिकारी मिळणार आहेत.

सर्व तपशील ऑनलाइन

या भरतीचा सर्व तपशील ऑनलाइन देण्यात आलेला आहे. त्यात पदांची वेतनश्रेणी, संवर्गनिहाय सामाजिक व समांतर आरक्षणाचा तपशील व पदसंख्या, संबंधित पदासाठी आवश्यक किमान शैक्षणिक पात्रता व इतर अर्हता, तसेच नगर परिषद कर्मचाऱ्यांमधून भरावयाच्या पदांचा तपशील आहे. या भरतीसंदर्भातील माहिती www.mahapariksha.gov.in व www.mahadma.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

---

लोगो- शुभ वार्ता

००००

कचरादहनविरोधात मानव उत्थानचे प्रबोधन

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

कचरा पेटणाऱ्यांना महापालिका ५ ते २५ हजारांपर्यंत दंड आकारत आहे. मानव उत्थान मंचने 'मिशन ९७'अंतर्गत कचऱ्याचे ३० स्पॉट दाखवून महापालिकेला सहकार्य केले आहे. पालापाचोळा वा कचरा जाळण्याचे दुष्परिणाम व होणाऱ्या दंडात्मक कारवाईबाबत मंच प्रबोधन करीत आहे.

महापालिकेच्या स्वच्छता विभागात वेळोवेळी निवेदन देऊन कचरा जाळण्याचे थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. सायकल रॅलीही काढली आहे. या मिशनमध्ये मंचचे जगबीर सिंग, मनीष बाविस्कर, भारती जाधव, सुनंदा जाधव, धनश्री कुलकर्णी, प्रियंका बांगर, गौरव क्षत्रिय, पंकज जोशी, हेमंत जाधव, योगेश कापसे, हेमल जदानी आदी सहभागी झाले आहेत. कोणी कचरा जाळत असल्यास महापालिकेच्या NMC e-Connect App वर तक्रार करावी किंवा ७०३०३००३०० या हेल्पलाइन नंबरवर फोन करावा. महापालिकेने घंटागाडीतच पालापाचोळा व वाळलेल्या फांद्या स्वीकाराव्यात किंवा घंटागाडीसोबत उद्यान विभागाची गाडी पालापाचोळा व वाळलेल्या फांद्या स्वीकारण्यासाठी द्यावी, अशी मागणी मंचने केली आहे. जगबीर सिंग यांन सांगितले की, पालापाचोळा जाळल्यास कार्बन मोनॉक्साइडसारखा विषारी वायू तयार होऊन श्वसनासंबंधी आजार तसेच कॅन्सरही होऊ शकतो. पालापाचोळा हे झाडांचे खाद्य आहे. पालापाचोळा कुजून उत्तम खत तयार होत असते. पालापाचोळा, पिकांच्या अवशेषांमुळे जमिनीस उपयुक्त अशा स्थिर कर्बाचे प्रमाण वाढवून अतिउष्णतेपासून जमिनीचे रक्षण होते. दवबिंदूच्या रूपातील पाणी पाचोळ्याचे आच्छादन आपल्यात सामावून जमिनीत ओलावा ठेवते. पिकांना द्याव्या लागणाऱ्या नव्वद टक्के पाण्याची बचत करते. पालापाचोळ्याचा उपयोग करून घरच्या घरी विषमुक्त भाजीपाला आपण घेऊ शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तब्बल पंधरा मिनिटांचे उपोषण!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

काँग्रेसच्या उपवास आंदोलनाला उपवास आंदोलनानेच उत्तर देण्यासाठी निघालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच आत्मक्लेश करण्याची वेळ नाशिकमधील आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी आणली आहे. काँग्रेसच्या संसदेतील गोंधळाला उत्तर देण्यासाठी भाजपच्या खासदारांसह आमदारांनी एक दिवसाचा उपवास करून आत्मक्लेश करण्याचे आवाहन मोदींनी केले होते. त्यामुळे मोदी ते फडणवीस यांच्यासह राज्यात सर्वत्र उपवास दिवस पाळला जात असताना, नाशिकमध्ये भाजपच्या आमदारांनी कार्यालयातच पंधरा मिनिटांचे उपोषण करीत, मोदींच्या आत्मक्लेशाला बळ दिले. या अनोख्या उपवास आंदोलनाची सर्वत्र चर्चा रंगली होती.

काँग्रेससह विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ घालत, कामकाजाला ब्रेक लावला होता. पाठोपाठ दलित अत्याचाराचा मुद्दा पुढे करीत, काँग्रेसने देशभर एक दिवसाचा उपवास पाळत आत्मक्लेश आंदोलन केले होते. परंतु, काँग्रेसच्या खासदारांसह आमदारांच्या प्रतापामुळे हे उपवास आंदोलन फसले होते. काँग्रेसच्या गोंधळाला आणि उपवासाला प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही गुरुवारी एक दिवस उपवास करण्याचे आवाहन केले होते. नाशिकमध्ये उपवासाऐवजी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी आमदारांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयाची निवड केली. उपोषण हे आतापर्यंत सकाळी सुरू होण्याची प्रथा आहे. परंतु, भाजपच्या आमदारांनी मात्र ही प्रथा मोडीत काढत, सायंकाळची वेळ निवडली. भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनी वाजत-गाजत कार्यालय गाठले. शहरात भाजपचे तीन आमदार असताना, उपोषणाला के‌वळ फरांदे यांनीच हजेरी लावली. आमदार बाळासाहेब सानप यांनी उपोषण स्थळाला भेट दिल्याचा दावा कार्यालयातून करण्यात आला. तर आमदार सीमा हिरे यांनी या उपोषणापासून अंतर राखले. सहा वाजता मंत्री पंकजा मुंडे यांचा कार्यक्रम असल्याने फरांदे यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनी १५-२० मिनिटांत माध्यमांना फोटो दिल्यानंतर उपोषणाची सांगता केली. त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांच्या या अनोख्या उपोषणाची शहरभर चर्चा पसरली होती.

खासदार अमेरिकेत

आमदार फरांदे यांनी जाहीर उपोषण केले असले तरी, अन्य आमदारांनी मात्र मनातल्या मनात उपवास धरल्याचा दावा केला. जिल्ह्यातील भाजपचे एकमेव खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे बुधवारी रात्रीच अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यामुळे खासदारांचा उपवास होऊ शकला नाही. महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे नाशिक दौऱ्यावर असतानाही, त्यांनी उपवास धरला की नाही याबाबत मात्र कळू शकले नाही. त्यामुळे जिल्ह्यात भाजपची घौडदौड सुरू असतानाच, आमदारांसह पदाधिकाऱ्यांच्या या अफलातून उपवास आणि उपोषणाच्या स्टंटबाजीने भाजपची फसगत होऊन नागरिकांचीच करमणूक झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवाढीच्या पेचातून सुटण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कराव्यात उपाययोजना

$
0
0

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील शेतजमीन आणि मोकळ्या भूखंडांवरील करांची पुनर्रचना केल्याने शेतकरी व मिळकतधारकांवर अन्याय होत असल्याची ओरड काही नेत्यांनी सुरू केली आहे. त्यात खुद्द सत्ताधारी भाजपचे आमदार, नगरसेवकांचाही समावेश आहे. केलेली करवाढ मात्र नियमानुसारच असल्याचे महापालिका आयुक्तांचे म्हणणे आहे. करवाढ नियमानुसार असेल, तर आतापर्यंत हा नियम दुर्लक्षित का झाला? परिणामी महापालिकेचे किती आर्थिक नुकसान झाले? या नुकसानीस जबाबदार कोण? आताची करवाढ खरच नियमानुसार असेल, तर करवाढीला होणार विरोध केवळ राजकीय नौटंकी आहे का? असे अनेक प्रश्न सामान्यांना सतावत आहेत. एवढा मोठा निर्णय एखादा अधिकारी केवळ मनमानी म्हणून घेऊ शकणार नाही. त्यात काहीतरी तथ्य असले पाहिजे. या पेचातून सामान्यांची सुटका कशी होईल यासाठी सत्ताधाऱ्यांनी उपाययोजना कराव्यात, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

निर्णयाचा व्हावा फेरविचार

नव्याने केलेली करवाढ अवास्तव आहे. त्यामुळे सामान्य व शेतकरीवर्गाचे आर्थिक शोषण होईल. ज्यांना ठोस उत्पन्न असते अशा नोकरदारांप्रमाणे शेतकऱ्यांकडून करवसुली करणे अन्यायकारकच आहे. इतर मिळकतधारकांनाही ही करवाढ न झेपावणारी आहे. करवाढ नियमानुसार असली, तरी किती प्रमाणात करावी याविषयी आयुक्तांनी फेरविचार करावा.

-ॲड. शरद गायधनी

करवाढीचे राजकीय भांडवल

महापालिका आयुक्तांनी केलेली करवाढ नियमानुसार नसेल, तर त्यासाठी न्यायालयीन स्तरावर विरोध केला पाहिजे होता. मात्र, महापालिका आयुक्तांच्या निर्णयाविरोधात सामान्य नागरिकांना भडकावून देत या प्रश्नाचे राजकीय भांडवलच होताना दिसते. सामान्य नागरिकांचे हित प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही समजतच असेल ना?

-बापू ताजनपुरे

शहरविकासासाठी करवाढ योग्य

शहराचा विकास करावयाचा असेल, तर महापालिकेचे आर्थिक उत्पन्नाचे स्रोत अधिक बळकट झाले पाहिजेत. सत्ताधाऱ्यांना विकासही पाहिजे असतो. मात्र, उत्पन्नाचे स्रोत त्यांच्याकडून कधीही शोधले जात नाहीत. हा राजकारणाचा भाग असतो. शहराचा विकास व्हावा अशीच सर्वांची भावना असेल, तर करवाढ योग्यच आहे.

-अनिल गायखे

सामान्यांसाठी चुकीचा निर्णय

पाचपट करवाढ सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर आहे. महागाईचा विचार करता सर्वांत जास्त खर्च मिळकतीच्या करांवर होणार आहे. त्यामुळे गोरगरिबांचा, कामगारांचा विचार करून करवाढीच्या निर्णयात आवश्यक ते फेरबदल केले पाहिजेत. नाही तर सामान्यांसाठी करवाढीचा निर्णय चुकीचा ठरेल.

-नितीन बोराडे

सुसंवादाचा अभाव उघड

महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक आणि आमदारांनीच महापालिका आयुक्तांच्या करवाढीच्या निर्णयाविरोधात दंड थोपटले आहेत. या प्रकारातून सत्ताधारी आणि प्रशासनातील सुसंवादाचा अभाव उघड झाला आहे. करवाढीचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी सत्ताधारी व आयुक्त यांच्यात करवाढीच्या मुद्यावर साधकबाधक चर्चा होणे अपेक्षित होते.

-किशोर कलंत्री

(आमचा आवाज)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषधांचा तुटवडा

$
0
0

सिडको

औषधांचा तुटवडा

महापालिकेच्या सिडको येथील स्वामी समर्थ रुग्णालयात अलीकडच्या काळात रुग्णांची गर्दी वाढत असल्याचे दिसते. मात्र, त्या तुलनेत औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे येथे येणाऱ्यांचे हाल होत आहेत. महापालिकेने यासंदर्भात त्वरित दखल घ्यावी व परिसरातील गरजूंना दिलासा द्यावा.

-संदीप देवांग

शहर परिसर

अवैध मालवाहतूक

शहरात अशाप्रकारे सर्रास अवैध मालवाहतूक होते. याची दखल घेऊन वाहतूक पोलिस कारवाई का करीत नाहीत? की त्यांना फक्त दुचाकीस्वारच दिसतात? यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांप्रमाणेच लोकप्रतिनिधींनीदेखील दखल घेऊन कारवाई करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.

-विजय पाटील

शहर परिसर

वाहने सावकाश चालवा

अत्यंत वर्दळीच्या भागातील आदित्य पेट्रोलपंपाजवळ नुकताच अपघात झाला. त्यात दुचाकी वाहन चालविणारी महिला गंभीर जखमी झाली. तिच्या मेंदूलाही मार लागला. त्यामुळे प्रत्येकाने वाहन सावकाश चालविणे, तसेच वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक बनले आहे.

-दीपक शिंदे

पंचवटी

पथ आहे, दिवे नाहीत!

के. के. वाघ ते तारवालानगर लिंकरोडलगतच्या रस्त्यावर महापालिकेने पथदीप बसविण्याच्या उद्देशाने सुमारे पंधरा खांब उभारले आहेत. पण, या खांबांवर दिवेच बसविण्यात आलेले नाहीत. हे असे किती दिवस चालायचे? लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी नेमके काय करतात, असा प्रश्न यामुळे पडतो.

-दीपक चव्हाण

सातपूर

हा काय प्रकार आहे?

सातपूर गावाच्या ठिकाणी त्र्यंबकरोडवरच बिनदिक्कतपणे अशी दुचाकी लावण्यात आली. या रस्त्यासह परिसरातील अन्य वर्दळीच्या रस्त्यांवर असे प्रकार कायमच होताना दिसून येतात. एवढ्या वर्दळीच्या रस्त्यांवर होणाऱ्या अशा प्रकारांकडे पोलिस यंत्रणा कानाडोळा का करते?

-चंद्रकांत महाले

सीबीएस परिसर

शिधापत्रिकेसाठी कर्मचारीच नाही

ठिकाण : शिधापत्रिका विभाग, वेळ : दुपारी १२.५८. खिडकी क्रमांक ३... शहरातील अर्ज तपासणी व शिधापत्रिका वितरणसाठी येथे एकही कर्मचारी उपस्थित नाही! असे चित्र या कार्यालयात कायमच दिसून येते. मात्र, कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनीच दखल घ्यावी.

-बबलू शेख

(सिटिझन रिपोर्टर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वॉलमार्ट घेणार फ्लिपकार्टचा हिस्सा?

$
0
0

ईटी वृत्त, मुंबई

ई कॉमर्समधील भारतातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी फ्लिपकार्टमधील ५१ टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा वॉलमार्ट ही अमेरिकी कंपनी विकत घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भारतात सर्वाधिक ई व्यवसाय करणारी अॅमेझॉन ही कंपनीही फ्लिपकार्टमधील हा हिस्सा विकत घेण्यास उत्सुक आहे. मात्र फ्लिपकार्टने वॉलमार्टला झुकते माप दिल्याची माहिती या घडामोडींवर लक्ष असलेल्या अंतर्गत सूत्रांनी दिली आहे.

या व्यवहारासाठी वॉलमार्टने फ्लिपकार्टला १० ते १२ अब्ज अमेरिकी डॉलरची ऑफर दिल्याचे समजते. फ्लिपकार्टचा ५१ टक्के अथवा त्यापेक्षा अधिक हिस्सा या रकमेत वॉलमार्टला मिळेल. जूनपर्यंत हा व्यवहार होण्याची शक्यता आहे. यासाठी फ्लिपकार्टचे नवे व जुने समभाग विकत घेण्याची तयारी वॉलमार्टने दर्शवली आहे.

फ्लिपकार्टमध्ये जपानच्या सॉफ्टबँक ग्रुपचा साधारण २० टक्के भांडवली हिस्सा आहे. मात्र वॉलमार्टकडून अपेक्षेहून कमी ऑफर आल्याने त्यांनी आपले भांडवल न विकण्याचा निर्णय घेतला आहे.

स्पर्धा वाढणार

सद्यस्थितीत भारतातील ई कॉमर्समध्ये अॅमेझॉनचा वाटा ४० टक्के आहे. त्या पाठोपाठ फ्लिपकार्ट असून या स्पर्धेत ते अद्याप अॅमेझॉनला मागे टाकू शकले नाहीत. मात्र वॉलमार्टने त्यांचा मोठा भांडवली हिस्सा विकत घेतल्यास उभय कंपन्यांमधील स्पर्धा तीव्र होईल. वॉलमार्टमुळे फ्लिपकार्टला केवळ आर्थिक बळ मिळणार नसून किरकोळ विक्री, दळणवळण, पुरवठा यातील वॉलमार्टचा अनुभव फ्लिपकार्टच्या उपयोगी पडेल.

वाढता बाजार

भारतात ई कॉमर्सला वाढती मागणी असून येत्या १० वर्षात ही बाजारपेठ तब्बल २०० अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचेल, असा अंदाज मॉर्गन स्टॅनलेने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर फ्लिपकार्टचा मोठा हिस्सा विकत घेण्यासाठी वॉलमार्ट व अॅमेझॉनमध्ये चढाओढ आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऋतुरंग परिवारातर्फे उद्या ‘डॉक्टर तुमच्या भेटीला’

$
0
0

ऋतुरंग परिवारातर्फे उद्या 'डॉक्टर तुमच्या भेटीला'

जेलरोड : नाशिकरोड येथील ऋतुरंग परिवारातर्फे ऋतुरंग परिवारातर्फे 'डॉक्टर तुमच्या भेटीला' हा उपक्रम राबविला जातो. त्याअंतर्गतचे दुसरे पुष्प शनिवारी (दि. १४) सायंकाळी साडेसहाला प्रसिद्ध

डायबेटॉलॉजिस्ट व कार्डिओलॉजिस्ट डॉ. मनीष बोथरा घुफतील. ते आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. आहे. दत्त मंदिर चौकातील ऋतुरंग भवनमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात डॉ. बोथरा प्रेक्षकांच्या विविध प्रश्नांना उत्तरेही देतील. हा कार्यक्रम विनामूल्य असून, नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन परिवाराने केले आहे.

--

फुलेनगरला स्वच्छता अभियान

पंचवटी : समाजकल्याण विभागातर्फे सामाजिक समता सप्ताहात गुरुवारी पंचवटीतील फुलेनगर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तीन पुतळे येथे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून स्वच्छता मोहिमेस सुरुवात करण्यात आली. समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्त प्राची वाजे, विशेष अधिकारी देवीदास नांदगावकर, नगरसेविका शांता हिरे, बाळासाहेब वाघमारे आदी उपस्थित होते.

--

क्रिकेट सराव शिबिर (फोटो)

सिडको : नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या शारीरिक शिक्षण क्रीडा स्पर्धा ॲडव्हेंचर स्पोर्टस व आरोग्य समितीतर्फे आयोजित उन्हाळी क्रिकेट सराव शिबिराचा प्रारंभ नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्या हस्ते झाला. संस्थेच्या वतीने दर वर्षी संस्थापातळीवर हे शिबिर आयोजित करण्यात येते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी राजेंद्र निकम, दिलीप आहिरे, चंद्रशेखर मोंढे आदी उपस्थित होते. क्रीडा समिती निमंत्रक राजेंद्र कापसे यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रात वाव मिळावा म्हणून संस्थेतर्फे राबविण्यात येणारा उपक्रम स्तुत्य असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली. मुख्याध्यापिका रत्नप्रभा सूर्यवंशी, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका राजश्री खोडके, प्रियंका निकम आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. रवींद्र नाकील यांनी सूत्रसंचालन केले. विलास पाटील यांनी आभार मानले.

--

उद्या द्राक्षविषयक चर्चासत्र

पंचवटी : द्राक्ष विज्ञान मंडळातर्फे शनिवारी (दि. १४) सकाळी ११ वाजता 'द्राक्षपीक एप्रिल छाटणी व्यवस्थापन' या विषयावर चर्चासत्र होणार आहे. मानूर येथील शेवंता लॉन्स येथे होणाऱ्या चर्चासत्रात ग्रेप मास्टरचे संचालक सुनील शिंदे, मंगेश भास्कर, एन. डी. पाटील मार्गदर्शन करणार आहेत. ग्रेप मास्टर आयोजित सेल्फी विथ ग्रेप्स या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.

००००००

टॅक्स प्रॅक्टिशनरच्या अध्यक्षपदी चव्हाण (फोटो)

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी रंजन चव्हाण, तर उपाध्यक्षपदी प्रदीप क्षत्रिय यांची नुकतीच निवड झाली. असोसिएशनची सर्वसाधारण सभा त्र्यंबकरोडवरील नाइस हॉलमध्ये झाली. त्यात नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. मावळते अध्यक्ष जयप्रकास गिरासे अध्यक्षस्थानी होते. कार्यकारिणी सदस्य सतीश बूब यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी राजेंद्र बकरे यांची एकमताने निवड झाली. २०१८-१९ या वर्षासाठीची नवी कार्यकारिणी अशी, सचिव- प्रकाश सोनवणे, खजिनदार- सुनील देशमुख, सहसचिव- एन बी मोरे, संयोजक- राहुल भुतडा, सदस्य- जयप्रकाश गिरासे, अनिल चव्हाण, सुरेश बोथरा, उत्तमराव पाटील, राजेंद्र बकरे. या निवडीचे संस्थापक अध्यक्ष पी. सी. सुराणा यांनी स्वागत केले आहे. प्रदीप क्षत्रिय यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश सोनवणे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बिझनेस बँकेतर्फे प्रशिक्षण कार्यशाळा

$
0
0

बिझनेस बँकेतर्फे प्रशिक्षण कार्यशाळा (फोटो)

जेलरोड : नाशिकरोड येथील बिझनेस बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा झाली. बँकिंगतज्ज्ञ राजन लोंढे यांचे टेक्निकल बँकिंगवर, तर डॉ. शेखर जोशी यांचे मोटिव्हेशन, टीमवर्क, इमेज बिल्डिंग यावर मार्गदर्शन झाले. बँकेचे अध्यक्ष विजय चोरडिया, ज्येष्ठ संचालक वसंतराव नगरकर, विजय संकलेचा, डॉ. उमेश नगरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर आंबेडे, शाखाधिकारी शिवाजी बोराडे, वंदना संगतानी, विशाल दाणी, लक्ष्मी बोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती. संकलेचा यांनी हाउसकीपिंग, सकारात्मक दृष्टिकोन, भविष्यातील बँकिंग, मुलांचे बँकिंग आदींबाबत मार्गदर्शन केले. राजन लोंढे, शेखर जोशी यांनीही मार्गदर्शन केले. शिवाजी बोराडे यांनी आभार मानले.

द्राक्षविषयक चर्चासत्र

पंचवटी : द्राक्ष विज्ञान मंडळातर्फे शनिवारी (दि. १४) सकाळी ११ वाजता 'द्राक्षपीक एप्रिल छाटणी व्यवस्थापन' या विषयावर चर्चासत्र होणार आहे. मानूर येथील शेवंता लॉन्स येथे होणाऱ्या चर्चासत्रात ग्रेप मास्टरचे संचालक सुनील शिंदे, मंगेश भास्कर, एन. डी. पाटील मार्गदर्शन करणार आहेत. ग्रेप मास्टर आयोजित सेल्फी विथ ग्रेप्स या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.

गतिरोधकाने संताप

जेलरोड : नेहरूनगरमधील उपनगर पोलिस ठाण्याजवळील केंद्रीय शाळेसमोर एकऐवजी तीन ठिकाणी गतिरोधक टाकल्याने वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे. पूर्वी येथे खड्डे होते, तेव्हाही जाच होत होता. अनेक वर्षांनी रस्ता झाला, तर तीन ठिकाणी गतिरोधक टाकले आहेत. नाशिक-पुणे मार्गाने नेहरूनगरमधून जेलरोडला जाता येते. या मार्गावर केंद्रीय विद्यालय आहे. या रस्त्यावर एकही गतिरोधक नव्हता. आता शाळेजवळ तीन, आयलँडच्या पुढे तीन आणि बेला डिसूझा कॉलनीत एक असे सात ठिकाणी गतिरोधक झाले आहेत.

---

रिपब्लिकन सेनेचे आज आंदोलन

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

केंद्र व राज्य सरकारने देशभरातील प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी, या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेतर्फे आज, शुक्रवारी (दि. १३) विभागीय महसूल आयुक्त कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हाध्यक्ष प्रकाश बागुल यांनी ही माहिती दिली. प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला सरकराने पात्रता आणि कौशल्यानुसार सरकारी नोकरी दिली पाहिजे, या मागणीसाठी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यात आंदोलन सुरू करण्यात येणार असून, त्याची सुरुवात शुक्रवारी येथील विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये तरुणांना नोकरी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, केंद्रीय कामगार राज्यमंत्री संतोष गंगावार यांनी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार चार लाख १२ हजार ७५२ सरकारी पदे रिक्त आहेत. अाहेत. खासगीकरण व कंत्राटीकरणात मागासवर्गीयांतील एससीच्या एक लाख ५० हजार ३४८, तर एसटीच्या ८४ हजार ५७१ आणि ओबीसींच्या २ लाख ३४ हजार ९१९ नोकरदारांनी नोकऱ्या गमावल्या असल्याचा दावा रिपब्लिकन सेनेने केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलनी रस्त्याची ‘वाट’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

इंदिरानगर येथील प्रभाग ३० मध्ये सत्ताधारी पक्षाचेच चारही नगरसेवक असतानादेखील या प्रभागातील एकता कॉलनी परिसर समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेसह अनेक समस्यांना येथील नागरिक तोंड देत आहेत. वारंवार तक्रारी करूनदेखील कोणीही या भागाकडे लक्ष देत नसल्याने आता या परिसरातील नागरिकांनी थेट आयुक्‍तांनाच भेटून समस्यांचा पाढा वाचण्याचा निर्णय घेतला आहे.

इंदिरानगर परिसरातील या प्रभागाचे सर्वच नगरसेवक सत्ताधारी पक्षाचे असल्याने या प्रभागाचा विकास चांगल्या पद्धतीने होईल, असे नागरिकांना वाटले होते. मात्र, अद्याप एका वर्षात काहीही कामे झाली नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. प्रभागातील एकता कॉलनी परिसरात दोन वर्षांपूर्वी रस्त्याच्या कडेला केबल टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले होते. त्यानंतर केबल टाकली गेली आणि रस्तेदेखील बुजविले गेले. मात्र, अद्यापही या रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे अनेक अपघात होत असून, रस्ताही अपुरा पडू लागला आहे. रस्त्याच्या कडेला चालताना अक्षरशः खड्ड्यातून जावे लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

स्वच्छता कर्मचाऱ्यांची वानवा

सध्या शहरात सर्वत्र सफाई कर्मचारी फिरत असल्याचे दिसून येत असले, तरी एकता कॉलनी परिसरात कित्येक दिवसांत स्वच्छता कर्मचारीच आले नसल्याने रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढिगारे साचल्याचे दिसून येत आहे. या कॉलनीत असलेल्या खुल्या जागेवर नागरिकांनी स्वखर्चाने वृक्षारोपण केले असून, त्या वृक्षांचे पालकत्वसुद्धा स्वीकारले आहे. त्यामुळे या वृक्षांची देखभाल चांगली होत असल्याने या खुल्या जागेला संरक्षक भिंत बांधून या ठिकाणी ग्रीन जिम उभारावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र, या मागणीकडे एकाही नगरसेवकाने लक्ष दिले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

आयुक्तांनाच घालणार साकडे

या प्रभागात पाण्याची समस्या नित्याचीच झाली असून, परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. नाशिक स्मार्ट सिटीकडे जात असतानाच सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रभागात समस्याच समस्या असल्याने आता याबाबत थेट आयुक्‍त तुकाराम मुंढे यांचीच भेट घेण्याचा निर्णय परिसरातील नागरिकांनी घेतला आहे. आयुक्‍तांनीच आता या कॉलनीकडे लक्ष देऊन येथील समस्या सोडवाव्यात, असे साकडे घालण्याचा निर्धार नागरिकांनी केला आहे.

(सेकंड लीड, २ फोटो आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुलांचे कठडे ‘पाण्यात’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिक-पुणे महामार्गावरील नंदिनी नदीवरील दोन्ही पुलांच्या कठड्यांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी तर हे कठडे थेट नदीपात्रातच कोसळलेले आहेत. त्यामुळे दोन्ही मार्गांवर अपघातांची भीती वाढली आहे. संबंधित यंत्रणा याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांच्या जिवाशीच खेळ सुरू असल्याचा आरोप वाहनचालकांकडून होत आहे.

या पुलाच्या परिसरात योग्य ठिकाणी धोक्याची सूचना देणारे फलक लावावेत, जुन्या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, पुलांचे कठडे त्वरित दुरुस्त करण्याची मागणी परिसरातून करण्यात येत आहे. नाशिकरोडला नाशिकशी जोडण्याकरिता नंदिनी नदीवर अनेक वर्षांपूर्वी पूल बांधण्यात आला. त्यावरून शिर्डी, सिन्नर, पुणे, नगर आदी शहरांकडे वाहतूक होते. कालांतराने लोकसंख्या वाढली, वाहतूकही वाढली. त्यामुळे जुना पूल अपुरा ठरू लागला. नाशिकला जाणारी आणि नाशिकरोडहूला येणारी वाहने या छोट्या पुलावरून जाणे अवघड झाले. त्यामुळे साधारण वीसएक वर्षांपूर्वी समाजकल्याण कार्यालयाच्या बाजूला दुसरा समांतर पूल बांधण्यात आला. एकेरी वाहतूक होऊ लागल्याने अपघातही टळू लागले. मध्यभागी सुंदर वाहतूक बेट बांधल्याने पुलाला शोभा आली. मात्र, आता या पुलांच्या कठड्यांची दुरवस्था झाली आहे.

वळण बनलेय धोकादायक

नाशिकरोडच्या दिशेने जाणाऱ्या जुन्या पुलावरील सिमेंटचे कठडे जीर्ण होऊन तुटले आहेत. पिकअप वाहनाची धडक बसून मध्यभागी कठडे कोलमडले आहेत. पुलाची सुरुवात होते तेथील वळणावरील कठडे तर थेट नदीपात्रातच कोसळलेले आहेत. त्यामुळे हे वळण धोकादायक बनून अपघात वाढले आहेत. काही महिन्यांपूर्वी नाशिकरोडला जाणारी एक दुचाकी व कार पुलावरून थेट नदीपात्रात पडली होती. सुदैवाने जीवित हानी झाली नव्हती. तशीच परिस्थिती द्वारकाकडे जाणाऱ्या नवीन पुलाची आहे. या पुलाला लोखंडी कठडे आहेत. चार वर्षांपूर्वी या पुलाला कार धडकून समाजकल्याण कार्यालयाशेजारी असलेल्या नदीतील खडकावर पडली होती. तेव्हापासून पुलाचे लोखंडी कठडे तुटलेले, वाकलेले आहेत. त्यांच्या शेजारील कठ़ड्यांना धडक बसून तेदेखील वाकलेले आहेत. एका ठिकाणी कठड्याचे पाइपच चोरीस गेलेले आहेत.

स्ट्रक्चरला ऑडिटची गरज

जुन्या पुलावर पुरेसे पथदीपदेखील नाहीत. दोन्ही पुलांवरून एसटी बस, ट्रक, कार, विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने धावतात. त्यामुळे गंभीर अपघात होऊन जीवित हानी होण्याआधीच प्रशासनाने दोन्ही पुलांच्या कठड्यांची तातडीने दुरुस्त करणे आवश्यक आहे. जुन्या पुलावरील सिमेंटचे कठडे तोडून लोखंडी कठडे उभारावेत, पुलाचे स्ट्रक्चरला ऑडिट करावे, तर नव्या पुलावरील कठडे बदलावेत अशी मागणी परिसरातील रहिवाशांसह वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

--

(लीड, ३ फोटो आहेत. निष्पक्षचा लोगो घेणे.)

--

पेज फोटोची ओळ...

बसद्वारे धूरफवारणी!

घरघर लागलेल्या शहर बससेवेतील बहुसंख्य बस अशा धूर ओकताना दिसतात. त्यामुळे अन्य वाहनचालकांना त्रास होण्यासह प्रदूषणातदेखील मोठी भर पडते. मात्र, तरीही महामंडळ याकडे कानाडोळा करीत आहे. बसमधून निघणाऱ्या धुरामुळे इतरांना किती त्रास होतो, त्याचे हे बोलके छायाचित्र.

सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तेजस्विनीचे रूपेरी यश

$
0
0

महिलांच्या ५० मीटर रायफल प्रोनमध्ये रौप्यपदक

नेमबाजी

वृत्तसंस्था, ब्रिस्बेन

महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंतने राष्ट्रकुलमधील नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. तिने अंतिम फेरीत ६१८.९ गुणांचा वेध घेतला. हे तिचे राष्ट्रकुलमधील सहावे पदक ठरले. अंजुम मौदगिल मात्र ६०२.२ गुणांसह सोळाव्या स्थानी राहिली.

अंतिम फेरीत तेजस्विनीला सिंगापूरच्या मार्टिना लिंडसे व्हेलोसोकडून चांगली लढत मिळाली. तेजस्विनीने पहिल्या तीन सीरिजमध्ये अनुक्रमे १०२.१, १०२.४, १०३,३ गुण मिळवले. चौथ्या सीरिजमध्ये मात्र तिला १०२.८ गुणच घेता आले. याचा तिला फटका बसला. पाचव्या सीरिजमध्ये तिने १०३.७ आणि सहाव्या सीरिजमध्ये १०४.६ गुण मिळवले. मार्टिनाने ६२१.० गुण मिळवून स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक मिळवले. स्कॉटलंडच्या सेऑद मॅकइन्टोशने ६१८.१ गुणांसह ब्राँझपदक मिळवले. 'या पदकाचा आनंद आहे. आता ऑलिंपिकची तयारी करावी लागणार आहे. तत्पूर्वी एशियन गेम्समध्ये पदकाचे लक्ष्य बाळगले आहे. त्यानंतर दक्षिण कोरियातील जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आहे,' असे तेजस्विनी म्हणाली. पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूलच्या पात्रतेच्या पहिल्या टप्प्यात नीरजकुमार २९१ गुणांसह अव्वल स्थानी राहिला, तर अनिश २८६ गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिला.

तेजस्विनीची कामगिरी...

- २००६च्या मेलबर्न राष्ट्रकुलमध्ये १० मी. एअर रायफल आणि पेअरमध्ये सुवर्ण.

- २०१०च्या दिल्ली राष्ट्रकुलमध्ये ५० मी. रायफल ३ पोझिशन पेअरमध्ये रौप्य.

- २०१०च्या राष्ट्रकुलमध्ये ५० मी. रायफल प्रोनमध्ये रौप्य.

- २०१०च्या राष्ट्रकुलमध्ये ५० मी. रायफल प्रोन पेअरमध्ये ब्राँझ.

- २००९च्या वर्ल्ड कपमध्ये ब्राँझपदक.

- २०१०च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक.

0000

...

पान नं १ फ्लॅप

पदकतक्ता

ऑस्ट्रेलिया ६३ ४६ ४७ १५६

इंग्लंड २८ ३२ २७ ८७

भारत १४ ७ १० ३१

कॅनडा १२ २९ १९ ६०

आफ्रिका ११ ९ १२ ३२

0000

अॅथलेटिक्स

सीमाला रौप्य, नवजीतला ब्राँझ

अॅथलेटिक्स

वृत्तसंस्था, गोल्ड कोस्ट

भारताच्या थाळीफेकपटू सीमा पुनिया आणि नवजीत धिल्लाँ यांनी एकविसाव्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये गुरुवारी अनुक्रमे, रौप्य आणि ब्राँझपदकाची कमाई केली. सीमाने ६०.४१ मीटर इतकी थाळीफेक केली. नवजीत ५७.४३ मीटर इतकी फेक करून तिसऱ्या स्थानावर राहिली. ऑस्ट्रेलियाच्या डॅनी स्टिव्हेन्सने ६८.२६ मीटर इतकी फेक करून सुवर्णपदकावर नाव कोरले.

सीमाने पाच प्रयत्नांपैकी पहिल्याच फेकीत ६०.४१ मीटरची कामगिरी नोंदवली होती. तिने दुसऱ्या व चौथ्या फेकीत अनुक्रमे ५९.५७ मी. आणि ५८.५४ मी. अशी कामगिरी नोंदवली. तिने तिसऱ्या प्रयत्नावेळी फाउल केला, तर तिची पाचवी फेक अपात्र ठरवण्यात आली. सीमाने सलग चौथ्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकण्याचा पराक्रम केला, यापूर्वी, २००६ आणि २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिने रौप्यपदक पटकावले होते, तर २०१० च्या दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत तिला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले होते. भारताच्या नवजीतने पहिल्या तीन प्रयत्नांमध्ये अनुक्रमे ५५.६१ मी., ५६.२२ मी आणि ५४.०९ मी. अशी फेक केल्यामुळे ती पदकाच्या शर्यतीत नव्हती. मात्र, अखेरच्या प्रयत्नात ५७.४३ मी. अशी फेक करून तिने न्यूझीलंडच्या सोसिटिना हाकेई (५७.१६ मी.) हिला मागे टाकत तिसरे स्थान मिळवले.

अर्पिंदर, बाबू अंतिम फेरीत

भारताचे अॅथलिट अर्पिंदर आणि ए. व्ही. राकेश बाबू यांनी पुरुषांच्या तिहेरी उडी प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अर्पिंदरने तिहेरी उडीत 'ग्रुप बी'मध्ये १६.३९ मीटर इतके अंतर कापून आघाडी घेतली. बाबू 'ग्रुप ए'मध्ये १५.९८ मीटर इतके अंतर कापून पाचव्या स्थानावर राहिला. या प्रकारात आघाडीच्या बारा खेळाडूंना अंतिम फेरीत स्थान मिळाले. दरम्यान, महिलांच्या लांब उडी अंतिम फेरीत भारताच्या नेलिकल व्ही. नीना आणि नयना जेम्स यांना अनुक्रमे दहाव्या आणि बाराव्या स्थानावर समाधान मानावे लागले. नीलाने ६.१९ मीटर, तर नयनाने ६.१४ मीटर इतकी उडी मारली.

पूर्णिमा सातव्या स्थानी

भारताची हेप्टाथलिट पूर्णिमा हेम्बरम महिलांच्या हेप्टाथेलॉनमधील गोळाफेक प्रकारात सातव्या स्थानावर राहिली. तिने ११.७५ मीटर इतकी फेक केली. यातील २०० मीटर धावण्याची शर्यत २५.१२ सेकंदांमध्ये पूर्ण करून ती तिसऱ्या स्थानी राहिली. पूर्णिमाने १०० मी. धावण्याची शर्यत १३.५६ सेकंदांत पूर्ण करून दुसरे स्थान पटकावले. पूर्णिमाच्या खात्यात आता एकूण ६४५ गुण आहेत.

.....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कापडी पिशव्यांचे विभागामध्ये वाटप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

पर्यावरण असंतुलनाचा धोका वाढल्याच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिक पिशव्या वापराचे धोके व कापडी पिशव्या वापरण्याचे फायदे याविषयी नागरिक व विद्यार्थी वर्गाचे प्रबोधन करून नवी दिल्लीच्या छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समितीच्या नाशिक शाखेने विभागात तब्बल १७ हजाार कापडी पिशव्यांचे वाटप केले. नाशिकसह जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील विविध शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थी, शिक्षक यांच्यासह बार कौन्सिलच्या सदस्यांना या कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले आहे.

या समितीच्यावतीने देशातील महाराष्ट्रासह इतर आठ राज्यांत पर्यावरण संवर्धनासाठी कापडी पिशव्यांचे वाटप केले जात आहे. राज्यात महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे प्रवक्ते अनिकेत पाटील यांच्या नेतृत्वाखाली या समितीतर्फे राज्यातील नाशिक विभागासह पनवेल, नागपूर, औरंगाबाद, अमरावती आदी ठिकाणी आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त कापडी पिशव्यांचे वाटप केले आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर पर्यावरणीय समस्यांना कारणीभूत ठरू लागल्याने या समितीतर्फे कापडी पिशव्या वाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. नाशिक शहरातील विविध शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांना हजारो कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती या समितीचे गिरीश पाटील, संजय मोकळ, किरण देसले, विनोद पाटील आणि आनंद पाटील आदींनी दिली.

शहरातील नॅशनल उर्दू हायस्कूलमध्ये या समितीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दहावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रम शिक्षक प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेल्या दोनशे शिक्षकांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. या कापडी पिशव्या समितीने राज्यातील विविध ठिकाणच्या बचत गटांकडून तयार करवून घेतलेल्या असल्याने नकळतपणे बचत गटाच्या सदस्यांना मोठ्या प्रमाणात रोजगारही प्राप्त झाला आहे. यापुढेही कापडी पिशव्यांचे वाटपाचा उपक्रम राबविला जाणार असल्याचे समितीचे अनिकेत पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images