Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

असिफाला न्याय मिळायलाच हवा...!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जम्मू-काश्मीर येथील कठुआतील आठ वर्षीय असिफा या बालिकेवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या संशयितांना कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी शहरात रविवारी ठिकठिकाणी कँडल मार्च काढण्यात आले. असिफाला न्याय मिळायलाच हवा, अशी मागणी करतानाच यापुढे अशा घटना घडून नयेत, यासाठी समाजाने सजग राहण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथील प्रवेशद्वाराजवळ असिफाची प्रतिमा उभारण्यात आली होती. या ठिकाणी असिफाला न्याय द्या, असा आशय असलेले फलक घेऊन बालिका उभ्या होत्या. या वेळी महाविद्यालयीन तरुणाईने प्रतिक्रिया व्यक्त करताना, अशा घटना घडण्यापूर्वीच समाजाने दुष्कृत्ये रोखण्यासाठी पुढे यायला हवे, असे आवाहन केले. महिलांच्या संरक्षणासाठी कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. यानंतर पेटलेल्या मेणबत्त्या, तसेच न्याय मागणारे फलक हाती घेऊन कँडल मार्च काढण्यात आला. हा मार्च चांडक सर्कल, गडकरी चौक सिग्नल, त्र्यंबक नाकामार्गे पुन्हा अनंत कान्हेरे मैदानावर पोहोचला. येथे असिफाला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मोर्चामध्ये १ ते ५ वर्षांच्या बालिकांचा सहभाग लक्षणीय होता. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी पुढाकार घेण्याचा संकल्पही या वेळी करण्यात आला. अब्दुल्ला टिनवाला, ताहेर काचवाला, मुफ्तीनल मर्चंट, युसुफ बवाहीर व जाफर शेख, सोनाली शेलार या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने हा मार्च काढण्यात आला. त्यामध्ये विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, जागरूक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. नेटिझन्स ग्रुपने सहकार्य केले. भारतीय मानवाधिकार परिषदेच्या वतीने गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन उद्यानात मेणबत्त्या पेटवून पीडितेसाठी प्रार्थना करण्यात आली. या वेळी सुनील परदेशी, शरद केदारे, उषा गवई, संध्या राजपूत, सुषमा बोराडे, सविता खंदारे, आरती निकम, समर शेख आदी उपस्थित होते. भोसला मिलिटरी हायस्कूलजवळूनही अशाच प्रकारचा कँडल मार्च काढण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जग में सुंदर दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'जग में सुंदर दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम' या पदावर अनोखे पदलालित्य साधत भगवान राम आणि भगवान कृष्ण यांच्या जीवनचरित्रातील कथाप्रसंगांमधला भाव अतिशय तरल पद्धतीने कथ्थकच्या माध्यमातून ठाण्याच्या भावना लेले यांनी सादर केला. या सादरीकरणाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निमित्त होते नटराज पं. गोपीकृष्ण जयंतीच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजित 'नृत्यानुष्ठान' या कार्यक्रमाचे.

प. सा. नाट्यगृहात कीर्ती कलामंदिरच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. महोत्सवाचे हे आठवे पुष्प आहे. लेले यांच्या पाठोपाठ पुण्यातील धनश्री नातू-पोतदार यांनीही सादर केलेली साडेसहा मात्रांची भिन्नलोभा तालातील नि:बद्ध रामवंदना प्रेक्षकांची दाद मिळवून गेली.

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात संजीवनी कुलकर्णी यांच्या ज्येष्ठ शिष्या भावना लेले यांनी कथ्थकचे सादरीकरण केले. दोन्हीही सत्रातील सादरीकरणासाठी यंदा श्रीरामनवमीचे औचित्य साधून 'राम' ही संकल्पना निवडण्यात आली होती. याच संकल्पनेस अनुसरून कलावंतांनी सादरीकरण केले. सुरुवातीला पं. नरेंद्र शर्मा रचित 'नीलांभुजं श्यामल कोमल अंगम्' या रामस्तुतीचे सादरीकरण केले. यानंतर शुद्ध नर्तनात त्यांनी १७ शिखरमात्रांचे तालबद्ध सादरीकरण केले. त्यांना गायक म्हणून श्रीरंग टेंबे, हार्मोनिअमवर हिमांशू गिंडे, तबल्यावर अथर्व कुलकर्णी व पढंतसाठी पल्लवी लेले यांची साथसंगत लाभली.

यानंतरच्या सत्रात रोशन दाते यांच्या शिष्या धनश्री नातू-पोतदार यांनी साडेसहा तालप्रस्तुतीमध्ये सुंदर पदन्यास साधत प्रेक्षकांची मने जिंकली. यानंतर द्रुत तीन तालात गिनतीयाँ , गतनिकास आणि टुकडे सादर करत कार्यक्रमाची रंगत वाढविली. नातू-पोतदार यांना तबल्यावर मंगेश करमरकर, गायन आणि संवादिनीसाठी मनोज देसाई, पढंतसाठी रसिका कुलकर्णी यांची साथसंगत लाभली. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ. पल्लवी धर्माधिकारी, अभिनेत्री अनुराधा राजाध्यक्ष प्रमुख पाहुणे होते. पियू आरोळे यांनी निवेदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शायदा पुन्हा सिव्हिलमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सुटकेची संधी दिसताच पसार झालेली गर्भवती शायदा शफिक पठाण ही महिला कैदी अखेर वेदना आणि दोन वेळच्या जेवणासाठी पुन्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये परतली. विशेष म्हणजे जेलरोड येथून परतीच्या प्रवासासाठी तिला एकेक रुपया मागावा लागला.

कधीही डिलेव्हरी होईल, अशा स्थितीत असलेली शायदा शुक्रवारी दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमधून सुरक्षारक्षकांना चकवा देऊन पसार झाली होती. मालेगाव येथील शायदा आणि तिच्या पतीवर खुनाचा आरोप असून, दोघेही नोव्हेंबर २०१७ पासून सेंट्रल जेलमध्ये आहेत. शायदाबरोबर दोन वर्षांचा अरबाज असून, जेलमध्ये आली त्या वेळी शायदा गर्भवती होती. दिवस भरल्याने शायदाचे पोट दुखू लागले. त्यामुळे तिला गुरुवारी दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, जेल प्रशासनाच्या महिला कर्मचाऱ्याची नजर चुकवून शायदा अरबाजसह फरार झाली होती. तिचा तपास सुरू असताना शायदा रविवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्वत: हजर झाली. हॉस्पिटलमधून बाहेर पडलेली शायदा टप्पा टप्पा करीत जेलरोडवरील एका दर्ग्यात येऊन थांबली होती. उन्हाचा तडाखा, पोटातील भूक आणि पैशांची कमी यामुळे तिने कसेबसे दोन दिवस काढले. जेलच्या चौकटी तोडून पळाली तरी शायदाकडे करण्यासारखे काहीच नव्हते. त्यामुळे शनिवारी एकेक रुपया मागून कसे तरी रिक्षाच्या भाड्यापुरते पैसे जमा केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंटेनरनेच घेतला चालकाचा प्राण

$
0
0

एमआयडीसीतील घटना; तीन मोटारसायकलींचे नुकसान

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

औद्योगिक वसाहतीत कंटेनर बाजूला उभा करून कंपनीचा पत्ता विचारणाऱ्या चालकाचा त्याच कंटेनरखाली मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. मृत्युमुखी पडलेल्या चालकाचे नाव रामबाण साहू (वय ४३) असे आहे. यात तीन मोटारसायकलींचे मोठे नुकसान झाले, तर एक टपरीचालक जखमी झाला. सातपूर पोलिस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून, हवालदार सय्यद तपास करीत आहेत.

मुंबईवरून नाशिकला माल खाली करण्यासाठी रविवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास तीन कंटनेर आले होते. कंपनीचा पत्ता माहिती नसल्याने चालकांनी बॉश

(मायको) कंपनीच्या नवीन गेटवर कंटेनर उभे केले. कंटेनर उभे करताना ते न्युट्रल करून सुरूच ठेवण्यात आले. मात्र, उतारामुळे कंटेनर सुरू झाला. चालक रामबाणने कंटेनरमध्ये चढण्याचा प्रयत्न केला असता पाय घसरून तो कंटेनरच्याच चाकाखाली आला. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

मोटारसायकलमुळे थांबला कंटेनर

चालकाच्या मृत्यूनंतर उतारावरील कंटेनर रस्त्याच्या पुढे गेला. अखेर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन मोटारसायकलींमुळे कंटेनर थांबला; अन्यथा कंटेनरच्या धडकेने मोठी दुर्घटना घडली असती. यात मोटारसायकलींचे मोठे नुकसान झाले. या वेळी टपरीचालकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. वेळेवर कंपनीत मटेरियल रिकामे करण्यासाठी जाणाऱ्या कंटेनरचालकाने प्रसंगसावधान राखले असते तर कदाचित त्याचे प्राण वाचले असते. मात्र, घाईत सुरू असलेला कंटेनर पार्क करीत पत्ता विचारण्यासाठी गेलेल्या चालकाचे प्राण त्याच्याच वाहनाने घेतल्याने वाहनचालकांनी हळहळ व्यक्त केली. हवालदार सय्यद तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात १५५४ शिधापत्रिकांनी घेतला पोर्टेबिलिटी सेवेचा लाभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मोबाइल कंपन्यांप्रमाणेच शिधापत्रिकाधारकांनाही आता जिल्ह्यात 'पोर्टेबिलिटी'ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे पात्र लाभार्थ्यांना जवळच्या कुठल्याही स्वस्त धान्य दुकानातून धान्य खरेदी करण्याची मुभा असून, आतापर्यंत दीड हजाराहून अधिक शिधापत्रिकाधारकांनी याचा लाभ घेतला आहे.

केंद्रीय अन्न व सार्वजनिक पुरवठा व्यवस्था मंत्रालयाने कामगार, मजूर, नोकरदार व्यक्तींच्या सोयीसाठी रेशन धान्य वितरणाबाबत विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेला 'आधार' कार्डची जोड देण्यात आली असून, आधार क्रमांकाच्या आधारे जुने रेशनकार्ड दाखवून नव्या किंवा बदलीच्या ठिकाणी पुरवठा अधिकाऱ्याकडून नोंदणी करता येऊ शकणार आहे. नागपूरपाठोपाठ नाशिकमध्येही 'पोर्टेबिलिटी'ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुरुवातीला ही योजना राज्यांपर्यंत किंवा त्याअंतर्गत शहर, गावपातळीवरच चालविण्यात येणार होती. स्मार्ट कार्डवर आधारित रेशनकार्डमुळे स्वस्त धान्य वितरण योजनेंतर्गत पायलट प्रोजेक्ट म्हणून काही राज्यांत त्याची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या सोयीच्या दुकानातून धान्य खरेदी करणे शक्य होऊ लागले आहे. जिल्ह्यात याच सुविधेद्वारे आतापर्यंत १५३४ शिधापत्रिकाधारकांनी याचा लाभ घेतला आहे.

तालुकानिहाय पोर्टेबिलिटी केलेल्या शिधापत्रिकाधारकांची संख्या

तालुका संख्या

नाशिक (श) ५१४

नांदगाव २१३

चांदवड १४५

मालेगाव १२४

मालेगाव (ग्रा) ११२

बागलाण ९४

दिडोरी ९३

नाशिक (ग्रा) ८३

निफाड ६२

देवळा २७

येवला १९

इगतपुरी १७

कळवण ११

पेठ ०९

सिन्नर ०७

सुरगाणा ०२

त्रंबकेश्वर ०२

एकूण १५३४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेल टेबलवरच आयपीएलवर सट्टा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आयपीएल या क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या चौघांना गंगापूर पोलिसांनी अटक केली. गंगापूर रोडवरच एका हॉटेलमध्ये टेबलवर बसून हे चौघे बेटिंग लावत होते. त्यांच्यावर गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास कारवाई झाली. या प्रकरणी संशयितांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

आयपीएलमध्ये सामना कोण जिंकणार, हरणार, एवढेच नव्हे तर कोणता फलंदाज किती धावा करणार, कोणत्या बॉलवर सिक्सर बसणार अशा वेगवेगळ्या पद्धतीने सट्टेबाज बेटिंग लावतात. क्रिकेट सामन्यांवर बेटिंग हा नवीन प्रकार नसला तरी प्रत्येक मोसमात पोलिसांना नवनवीन संशयित सापडतात. अशाच एका टोळीबाबत गंगापूर पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शोधपथकाने गंगापूर रोडवरील हॉटेल रिगल बार अँड रेस्टॉरंटच्या पहिल्या मजल्यावर बेटिंग करणाऱ्या सचिन दादाभाऊ फरकडे (वय २३, रा. आनंदनगर, सिडको), अजय शंकर धुमाळ (रा. गंगापूर नाका), सनी सुनील शिंदे (रा. इंदिरानगर) आणि हर्षद दामोदर घुले (रा. आडगाव टप्पा) या चौघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी छापा मारला त्यावेळी संशयित ऑनलाइन जुगार खेळताना आढळून आले. संशयितांकडून काही मोबाइल जप्त करण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती गंगापूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक के.डी. पाटील यांनी दिली. चौघांना अटक करून जामिनावर सोडण्यात आले आहे. हवालदार उगले तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओला अन् सुका कचरा विलगीकरणाचा संकल्प

$
0
0

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक

जर्मन सरकारच्या पर्यावरण मंत्रालयातर्फे विल्होळी परिसरात साकारण्यात आलेल्या 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाला 'मटा'च्या वाचकांनी रविवारी भेट देत हा प्रकल्प समजावून घेतला. यावेळी सर्वांनीच ओला अन् सुका कचरा विलगीकरणाचा संकल्प केला. 'मटा'तर्फे आयोजित या उपक्रमात वाचकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत महापालिकेच्या सहकार्याने सुरू असलेल्या या 'पायलट प्रोजेक्ट'ची तपशीलवार माहिती घेतली.

शहरातील विविध प्रकल्प, संस्था आदींच्या कामकाजाची माहिती वाचकांनाही व्हावी आणि त्यांचे प्रबोधन व्हावे, या उद्देशाने 'जाणून घेऊ या मटासंगे' हा उपक्रम आयोजित करण्यात येतो. त्याअंतर्गत 'वेस्ट टू एनर्जी' हा महापालिकेचा वीजनिर्मितीचा पथदर्शी प्रकल्प जाणून घेण्यास इच्छुक वाचकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. निवडक वाचकांना रविवारी प्रकल्प भेटीसाठी नेण्यात आले होते.

महापालिका क्षेत्रातील २० मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून येथे वीजनिर्मिती केली जाणार आहे. जर्मनीची जीआयझेड कंपनी या प्रकल्पाची सल्लागार कंपनी आहे. हैदराबादच्या रामकी या कंपनीला हा प्रकल्प उभारण्याचे काम देण्यात आले आहे. या प्रकल्पाची मालकी महापालिकेचीच राहणार आहे. दरमहा एक लाख युनिट वीज मिळविण्याचे प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी २० टन ओला कचरा व १० टन मलजल महापालिकेतर्फे उपलब्ध करून दिले जाण्याचा प्रयत्न महापालिकेकडून केला जात आहे. मात्र, जोपर्यंत सामान्य नागरिकांमध्ये ओला आणि सुका कचरा विलगीकरण करण्याविषयी प्रबोधन होत नाही, तोपर्यंत या प्रकल्पासाठी आवश्यक तेवढा कचरा जमा होणे शक्य होत नाही. त्याचा प्रतिकूल परिणाम अपेक्षित वीजनिर्मितीवर होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कटाक्षाने ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे जमा करावा, असे आवाहन प्रकल्प अधिकाऱ्यांनी यावेळी 'मटा'च्या वाचकांशी संवाद साधताना केले. या आवाहनाला शहराच्या विविध भागातून उपस्थित असलेल्या नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कचरा विलगीकरणाचा संकल्प केला.

पहिलाच 'पायलट प्रोजेक्ट'

शहरातील विविध हॉटेल्समधून वाया जाणाऱ्या अन्नपदार्थांचे संकलन करून जैविक कचरा या प्रकल्पाच्या ठिकाणी जमा केला जातो. या प्रकल्पासाठी जर्मन सरकारने सात कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. अशाप्रकारे ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणारा हा देशातील पहिलाच 'पायलट प्रोजेक्ट' असल्याने देशाचे याकडे लक्ष लागले आहे. या प्रकल्पाचे अभियंते तथा समन्वयक सुनील खैरनार, साइट इन्चार्ज वसिम, सहकारी प्रवीण कांबळे आदींनी यावेळी वाचकांना या प्रकल्पाविषयीची माहिती सांगितली.

तज्ज्ञ अन् नागरिक म्हणतात...

'वेस्ट टू एनर्जी' हा राज्यातील पहिलाच प्रकल्प उत्तम रीतीने उभारला आहे. या ठिकाणी अनेक कामे कर्मचारीवर्गाकडून केली जात असली, तर काही यंत्रे वापरली तर निश्चितच फायदा होईल. येथून जादा प्रमाणात वीजनिर्मिती झाली पाहिजे.

-सी. व्ही. इंगळे, उपकार्यकारी अधिकारी, महावितरण

या प्रकल्पाला चांगल्या पद्धतीने चालविण्यासाठी नाशिककरांचे योगदान आवश्यक आहे. याबाबत असंख्य नाशिककर अनभिज्ञ असून, अधिकाधिक नागरिकांना या प्रकल्पाची माहिती दिली, तर अनेक जण कचरा विलगीकरणास प्राधान्य देतील. येथे तसे करण्यात खूप वेळ जात आहे.

-व्ही. डी. चौधरी

या प्रकल्पातून जास्तीत जास्त वीजनिर्मिती कशी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. या प्रकल्पाची माहिती आम्हालासुद्धा नव्हती. 'मटा'च्या उपक्रमामुळे ती आम्हाली मिळाली. सर्व नागरिकांना याची माहिती दिली पाहिजे, तरच नागरिकांचाही सहभाग यात वाढेल. हा प्रकल्प कायम सुरू राहावा.

-सुरज माळी

कचऱ्यापासूनही किती फायदा होऊ शकतो हे या प्रकल्पामुळे समजले. या प्रकल्पाची माहिती नागरिकांना प्राधान्याने करवून देणे गरजेचे आहे. खत प्रकल्प सर्वांनाच माहिती आहे. मात्र, हा प्रकल्प माहिती नसल्याने नागरिकांत जनजागृती दिसून येत नाही. नाशिककरांना हा प्रकल्प खुला केला पाहिजे.

-भय्यासाहेब कोठावळे

----

अँकर

लोगो : जाणून घेऊ या मटासंगे

---

(फोटो : सतीश काळे)

राजन जोशी या बातमीशी संबंधित प्रतिक्रिया व चौकट ऑफिसच्या इ मेल देणार आहेत. त्या बातमीस जोडाव्यात.)\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हॅनची अॅपेरिक्षाला धडक; दहा प्रवाशी जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

काळी पिवळी व्हॅन व अॅपे रिक्षा यांच्यात मनमाड-मालेगाव मार्गावर कानडगाव फाट्यानजीक रविवारी दुपारी झालेल्या अपघातात १० जण जखमी झाले. जखमींपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांना उपचारासाठी तातडीने मालेगाव येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

काळी पिवळी व्हॅन (एमएच १५ ई ३८५२) मनमाडकडून मालेगावकडे जात होती. त्याचवेळी मनमाडकडे येणाऱ्या (एमएच ४१ सी ५६६३) अॅपे रिक्षाला व्हॅनची जोरदार धडक बसली. या अपघातात १० प्रवासी जखमी झाले. कोणाच्या हाताला, पायाला तर काहींच्या डोक्याला मार बसला आहे. जखमींना तातडीने मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी असलेल्या दोघांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी चांदवड पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरकोळ जखमींना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. या अपघातात रिक्षा व व्हॅनचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींची नावे उशिरापर्यंत मिळू शकली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरपट्टीवाढविरोधास बळ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घरपट्टीवाढीविरोधातील शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीच्या धरणे आंदोलनाचे बळ वाढताना दिसत असून, 'निमा' आणि 'आयमा' या उद्योजकांच्या संघटनांनी या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. त्याचप्रमाणे आम आदमी पक्षानेदेखील आज, सोमवारी (दि. १६) घरपट्टीवाढीविरोधात ढोल बजाव आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे आगामी काळात या निर्णयाविरोधीतील आंदोलन आणखी जोर धरण्याची चिन्हे आहेत.

महापालिकेने नुकतीच मालमत्ता करात १८ टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी दि. १ एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. या घरपट्टीवाढीविरोधत शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीतर्फे येत्या २३ तारखेला धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याला 'निमा'ने पाठिंबा दिल्याची माहिती अध्यक्ष मंगेश पाटणकर यांनी दिली. कृती समितीच्या शिष्टमंडळाने निमा हाऊस येथे भेट दिल्यानंतर हा पाठिंबा जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या बैठकीत सदर घरपट्टीवाढीसंदर्भातील सर्व पैलूंवर चर्चा झाली. ही दरवाढ अन्यायकारक असून, याची झळ सामान्य नागरिक ते उद्योजक अशा सर्वांनाच सोसावी लागणार आहे. औद्योगिक वापराच्या पाणीदरात वाढ झाली आहे. विजेचे दर अन्य राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत. अशात झालेल्या या घरपट्टीवाढीमुळे उद्योजकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. ही घरपट्टीवाढ सर्वांसाठी अन्यायकारक असून, त्याबद्दल बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली.

महापालिकेची महासभा दि. २३ एप्रिल रोजी होत असून, याच दिवशी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या राजीव गांधी भवन या मुख्यालयात शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीतर्फे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनास 'निमा'ने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. बैठकीस निमा पायाभूत सुविधा समितीचे अध्यक्ष मनीष रावल, शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, सल्लागार उन्मेश गायधनी, सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सदस्य गजानन शेलार, ॲड. तानाजी जायभावे, शिवाजी म्हस्के यांची उपस्थिती होती.

'आयमा'चाही वाढीस विरोध

घरपट्टीवाढीविरोधातील शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीच्या धरणे आंदोलनास 'आयमा'नेदेखील पाठिंबा दिल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी दिली. घरपट्टीवाढीसंदर्भात शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीच्या शिष्टमंडळाने 'आयमा'च्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर हा पाठिंबा जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 'निमा' व 'आयमा' या उद्योजकांच्या संघटनांनी या आंदोलाला पाठिंबा दिल्याने या आंदोलनाचे बळ आणखी वाढले आहे.

'आप'चे आज 'ढोल बजाव'

घरपट्टीवाढीच्या निर्णयास सर्वच राजकीय पक्षांनी विरोध सुरू केलेला असतानाच आम आदमी पक्षानेही या निर्णयाविरोधात आज, सोमवारी (दि. १६) 'ढोल बजाव' आंदोलन पुकारले आहे. राजीव गांधी भवनसमोर दुपारी १२.१५ वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे घरपट्टीविरोधातील रस्त्यावरील लढाईस खऱ्या अर्थाने प्रारंभ होत आहे. 'आप'ने या घरपट्टीवाढीबाबत बोलताना सांगितले, की ही वाढ जीवघेणी, अवाजवी आणि अव्यवहार्य आहे. त्यामुळे आम्ही त्याचा निषेध करून अनावश्यक घरपट्टीवाढीविरुद्ध हे आंदोलन पुकारले आहे. नाशिककरांनीसुद्धा या आंदोलनात सहभागी व्हावे. याअगोदर या घरपट्टीवाढीविरोधात 'आप'ने स्वाक्षरी मोहीमदेखील राबविली होती. त्यानंतर हे आंदोलन केले जाणार आहे. घरपट्टीवाढीविरोधात राजकीय पक्षांबरोबरच सर्व क्षेत्रांतून त्याला विरोध होत आहे. त्यामुळे त्याविरुद्ध सभागृहाबरोबरच आता सभागृहाबाहेरही नाराजी व्यक्त केली जात आहे.

(महापालिका निष्पक्षचा लोगो)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीजे प्रकरणी २१ मंडळांना दणका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी २१ मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह डीजे चालकांवर गुन्हा दाखल केला. मध्यरात्रीच पोलिसांनी डीजे जप्तीची कारवाई केली आहे. आवाजाची मर्यादा भंग केल्याप्रकरणी सलग दुसऱ्या वर्षी पोलिसांनी कारवाई केल्याने डीजे चालकांचे धाबे दणाणले आहे.

पोलिसांनी या प्रकरणी परिमंडळ एकमध्ये १३, तर परिमंडळ दोनमध्ये आठ मंडळांविरोधात कारवाई केली. सार्वजनिक ठिकाणी डीजेच्या ध्वनीमर्यादेबाबत हायकोर्टाने स्पष्ट आदेश दिले असून, त्याचे पालन करण्याबाबत पोलिसांनी यापूर्वीच आदेश दिले आहेत. मात्र, वेगवेगळ्या मिरवणुकींदरम्यान कायद्याचे उल्लंघन होत असल्याने पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. दोन ते तीन वर्षांपासून या कायद्याची अंमलबजावणी सक्त पद्धतीने केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीबाबत झालेल्या शांतता समितीच्या बैठकीमध्ये पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, तसेच पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि श्रीकृष्ण कोकाटे यांनी डीजेच्या आवाजाबाबत मंडळांच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना केल्या होत्या. मात्र, मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करीत रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात गाणे वाजवले. शहरातील मोठा राजवाडा ते शिवाजीरोड मार्गावरील पारंपरिक मिरवणुकीत सुमारे २० मंडळांनी सहभाग घेतला होता. नाशिकरोड येथे १६ मंडळांचा सहभाग होता. अशा दोन मोठ्या पारंपरिक मिरवणुकांसह नवीन नाशिक, सातपूर व इतर भागात लहान- मोठ्या मिरवणुका झाल्या. या मिरवणुकांमध्ये सहभागी मंडळांना ध्वनिक्षेपकाची परवानगी घेताना पोलिसांनी ध्वनीमर्यादा ठरवून दिली होती. मात्र, मिरवणुकीचा प्रारंभ होताच पोलिसांनी आवाजाची तीव्रता तपासली असता सर्व मंडळांनी ध्वनीमर्यादा ओलांडून अधिक आवाजात गाणी वाजवल्याचे निदर्शनास आले. याबाबत पोलिसांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचनादेखील केल्या. या पार्श्वभूमीवर मध्यरात्री मिरवणुकीची सांगता होताच पोलिसांनी डीजे जप्तीची कारवाई सुरू केली. १२ ते २ वाजेच्या सुमारास पोलिसांनी डीजेसह वाहने जप्त केली. आज, रविवारी सकाळी संबंधित मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच डीजे चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले. या सर्वांवर कलम २९०, २९१, १८८, १०९, ११४, ३४, १३१, १३४, १३५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हापुसचे प्रमाण यंदा कमीच

$
0
0

फोटो : सतिश काळे

यंदा हापूस खातोय भाव

उत्पादन तब्बल ७० ते ८० टक्क्यांनी घटले

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अक्षय तृतिया अवघ्या दोन दिवसांवर आली असून, फळांच्या राजा हापूस बाजारात दाखल झाला आहे. बदलत्या हवामानाचा यंदा हापूस आंब्याला मोठा फटका बसला असून, देवगड आणि रत्नागिरी हापूसचे उत्पादन तब्बल ७० ते ८० टक्क्यांनी घटले आहे. त्यामूळे हापूस यंदा अधिक भाव खात आहे. चार ते सात डझनच्या पेटीमागे ग्राहकांना यंदा एक ते दीड हजार रुपये अधिक मोजावे लागत आहेत.

सालाबादाप्रमाणे यंदाही सीबीएस येथील नाशिक जिल्हा सहकारी बँकेच्या तळघरात कोकण आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि.१५) एप्रिल रोजी महोत्सवाला सुरूवात झाली. गतवर्षी आंबा विक्रेत्यांना स्टॉल लावण्यासाठी येथे जागा तोकडी ठरत होती. यंदा मात्र आंब्याचे उत्पादनच घटल्याने विक्रेत्यांची संख्याही ५० टक्क्यांनी रोडावल्याचे पहावयास मिळते आहे. कोकणात मोहोराचे रुपांतर फळात होत असतानाच पाऊस झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर फळ गळून पडले. त्यानंतर उष्णतेचे प्रमाण वाढल्याने आंब्याचा देठ सुकण्यास सुरूवात झाली. त्यामुळेही आंब्याचे प्रमाण कमी झाल्याची माहिती येथील स्टॉलधारक विक्रेत्यांनी दिली.

गतवर्षी ज्या विक्रेत्यांनी विक्रीसाठी ५०० पेट्या माल आणला होता ते यंदा उणेपुरे ७० ते ८० पेट्या एवढाच माल आणू शकले आहेत. त्यामध्येही विक्रीसाठी आलेल्या देवगड हापूसचे प्रमाण खूपच कमी आहे. रत्नागिरी आणि देवगड हापूस ४५० ते ९०० रुपये डझन या दराने यंदा विक्री होतो आहे. आवक कमी झाल्याने हापूसचे दर चार ते सात डझनच्या पेटीमागे हजार ते दीड हजार रूपयांनी कमी झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांनी आंबा खरेदीसाठी या महोत्सवामध्ये गर्दी केली. दररोज सकाळी ११ ते रात्री ९ यावेळेत हा महोत्सव सुरू राहणार असून, सोमवारी (दि.१६ एप्रिल) रोजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्या मुख्य उपस्थितीत या महोत्सवाचे औपचारीक उद्घाटन होणार असल्याची माहिती आयोजक दत्ता भालेराव यांनी दिली.

यंदा हापूसचे प्रमाण ८० टक्क्यांनी घटले आहे. गतवर्षीपेक्षा अक्षय तृतिया यंदा लवकर असून, त्यामुळे देखील हव्या तेवढ्या प्रमाणात आंबा बाजारात दाखल होऊ शकलेला नाही. तिसऱ्या मोहोराचा आंबा चांगला असेल पण तो पाच मे नंतर बाजारात दाखल होईल. यंदा आंब्याचे प्रमाण मात्र कमीच राहणार आहे.

- दत्ता भालेराव, आयोजक कोकण आंबा महोत्सव

गेल्यावर्षी मी ५०० पेट्या देवगड हापूस विक्रीसाठी आणला होता. यंदा केवळ ७० पेट्या हापूस विक्रीसाठी आणू शकलो. यंदा आंब्याचे उत्पादनच कमी झाले असून पुरेसा माल उपलब्ध नाही. ४ ते ७ डझनच्या पेटीच्या दरात हजार ते दीड हजार रूपये वाढ झाली आहे.

- सागर देसाई, आंबा उत्पादक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूर औद्योगिक वसाहत पोटभाडेकरूंना आंदण!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमधील औद्योगिक भूखंडांबाबत तक्रारी वाढल्यानंतर 'एमआयडीसी'ने दीड महिन्यापूर्वी सातपूर औद्योगिक वसाहतीत सुरू केलेल्या सर्व्हेमध्ये मोठ्या प्रमाणात पोटभाडेकरू असल्याचे आढळले आहे. 'एमआयडीसी'ने आतापर्यंत ९० टक्के सर्व्हे पूर्ण केला असून, त्यानंतर ही माहिती पुढे आली आहे. सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर त्याद्वारे आढळलेले अनेक बेकायदेशीर प्रकार उघड होण्याची शक्यता आहे.

या सर्व्हेमधून प्रत्येक उद्योगाची स्वतंत्र माहिती प्रत्यक्ष जाऊन घेतली जात आहे. चार टीमकडून करण्यात आलेल्या या सर्व्हेमध्ये उद्योगांच्या जागेची मोजणी, अतिक्रमण झालेले आहे का, पोटभाडेकरू आहेत का, ज्या उद्योगासाठी भूखंड दिला तो सुरू आहे का, उत्पादनातील वापर, बंद कारखाने आदी बाबींची संपूर्ण माहिती घेतली जात आहे. त्यामुळे हा सर्व्हे महत्त्वाचा मानला जात आहे. मार्च महिन्यापासून या सर्व्हेला सुरुवात झाली. सहा दिवसांत हा सर्व्हे पूर्ण करणे अपेक्षित होते. पण, दीड महिन्यानंतरही विविध अडचणींमुळे हा सर्व्हे पूर्ण झालेला नाही. यासाठी सर्व्हेअर कमी पडत असल्याचे बोलले जात आहे.

या सर्व्हेमुळे अनेक उद्योजकांचे धाबे दणाणले आहेत. या सर्व्हेमध्ये प्रत्येक टीममध्ये सहा ते सात अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यांना २०० हून अधिक भूखंडांचे काम दिले आहे. सर्व्हे करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी मोठी असल्यामुळे हा सर्व्हे अचूक व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अनेक उद्योजकांनी भूखंड औद्योगिक कामासाठी घेतले व त्या जागेवर व्यापारी वापर सुरू केलेला आहे. असंख्य उद्योजकांनी पोटभाडेकरू भरले आहेत. त्यामुळे या सर्व्हेनंतर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. नाशिक औद्योगिक वसाहतीत अनेक उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे नवीन उद्योगांना संधी मिळत नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून अनेक जण ही तक्रार करीत आहेत. त्याची दखल वरिष्ठ पातळीवरून घेतली गेल्याने सर्व्हेचे काम सुरू झाले आहे.

अंबडचा सर्व्हे केव्हा?

सातपूर औद्योगिक वसाहतीप्रमाणेच अंबड औद्योगिक वसाहतीचा सर्व्हे केव्हा होणार, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे. सातपूरच्या सर्व्हेला जर दोन महिने लागणार असतील, तर अंबडचा सर्व्हे सुरू केल्यानंतर त्यालाही मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे. सातपूरच्या सर्व्हेमध्ये अनेक उद्योगांना मोठ्या जागा दिल्या असल्या, तरी त्यांचे उद्योग मात्र छोटे आहेत. त्यामुळे उर्वरित जागा पुन्हा ताब्यात घ्यावी, अशी मागणीदेखील होत आहे.

(लीडशेजारी घेणे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चारित्र्यावरील संशयावरून चांदवड येथे भैरवनाथनगर परिसरात राहणाऱ्या रमेश शिंदे (वय २७) याने पत्नीचा चारित्र्यावरील संशयामुळे साडीने गळा आवळून खून केला. या प्रकरणी रविवारी दुपारी चांदवड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी रमेशला अटक केली आहे.

रमेश चांदवड येथे गॅस व स्टोव्ह दुरुस्तीचा व्यवसाय करतो. हे कुटुंब जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथून रोजीरोटीसाठी चांदवड येथे आले. रमेशला दारूचे व्यसन आहे. तो त्याची पत्नी अनिताच्या चारित्र्यावर संशय घेत असे. रमेशने शनिवारी सकाळी झोपडीसाठी कुडं आणण्याचे कारण सांगून पत्नीला मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल राजश्रीमागे जागी नेले. तेथे तिचा साडीने गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी स्वतःचा शर्ट काढून तो प्रेतावर झाकून त्याने पलायन केले. चांदवड पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून रमेशची चौकशी केली, असता त्याने खुनाची कबुली दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अक्षयतृतीयेसाठी बाजारपेठ सजली

$
0
0

अक्षयतृतीयेसाठी बाजारपेठ सजली

नाशिक : अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या अक्षयतृतीयेसाठी व्यापाऱ्यांची लगबग सुरू झाली असून, त्यासाठी बाजारपेठ सजली आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयाला 'कॅश' करण्यासाठी विविध व्यावसायिकांकडून अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. या दिवशी सोने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहने व रिअल इस्टेटमध्ये मोठी उलाढाल होण्याची आशा संबंधित व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आनंद हास्य क्लब

$
0
0

नाशिकरोड येथील आनंद हास्य योग क्लबतर्फे प्रतिमापूजनाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. क्लबचे अध्यक्ष वसंतराव पेखळे, उपाध्यक्ष रमेश नवले, डी. जी. पाटील, प्रकाश सौदागर, श्याम बोरकर, जयमाला भुतडा, चंद्रकला मालपाणी, विश्वनाथ जाधव, सुरेश सोनवने, सुरेश वडगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. पेखळे म्हणाले, की बाबासाहेब फक्त एका जातीचे नेते नव्हते, तर ते देशाचे नेते होते. अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करून त्यांनी भारतीय राज्यघटना लिहिली. ती जगासाठी आदर्श ठरली आहे. डी. जी. पाटील, प्रकाश सौदागर यांचीही भाषणे झाली.

फोटो : रामनाथ माळोदे, नवनाथ वाघचौरे, नामदेव पवार, डॉ. बाळकृष्ण शेलार, राजन जोशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चार कोटीचा निव्वळ नफा

$
0
0

'प्रेस कामगार'ला

चार कोटींचा नफा

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड प्रेस कामगारांच्या आयएसपी सोसायटीला २०१७-१८ या वर्षात तीन कोटी ९१ लाख रुपयाचा विक्रमी निव्वळ नफा झाल्याची माहिती अध्यक्ष जगदीश गोडसे, उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर जुंद्रे, सचिव विष्णू जगताप यांनी दिली.

संचालक भगवान मोरे, गणेश काळे, राजेंद्र चंद्रमोरे, साहेबराव गाडेकर, हिरामण आव्हाड, रमेश जाधव, संदीप गांगुर्डे, मंगला खर्जुल, सुनंदा कडाळे आदी उपस्थित होते. गोडसे म्हणाले, की पतसंस्था स्थापन होऊन ५९ वर्षे झाली असून संस्थेला ऑडिटमध्ये सतत अ वर्ग मिळाला आहे. ३१ मार्च २०१८ अखेर भाग भांडवल १९.९६ कोटी असून खेळते भांडवल १९७.९५ कोटी आहे. सभासद संख्या २,६९८ इतकी असून स्वनिधी २७.०६ कोटी आहे. १५७.२७ कोटीस सभासद ठेवी जमा असून ९६.२६ कोटी कर्ज वितरित करण्यात आले. एनपीए शून्य टक्के तर सीडी रेशो ५४ टक्के आहे. संस्थेने तरलतेपोटी ६४.८० कोटीची गुंतवणूक केली आहे. संस्थेचा सीआरआर १.७९ टक्के असून संस्था बँक कर्जमुक्त आहे. चालू वर्षात सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याचे नियोजन आहे. संस्था स्थापनेपासून संचालक मंडळाने व्यवसायवृद्धी व सभासद समाधानासाठी नवनवीन योजना राबविल्या आहेत. सभासदांचे सहकार्य, विश्‍वास व सेवकवर्गाची तत्पर सेवा यामुळे संस्थेची प्रगती झाली आहे. दरवर्षी गणेशोत्सव, गुणवंत विद्यार्थी सत्कार होतो. सभासदांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. सभासदांच्या मागणीचा विचार करून कर्ज मर्यादा १० लाखावरून १५ लाखापर्यंत करण्यात आली आहे. संस्थेस बँको पुरस्कार प्राप्त झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संत गोरा कुंभारांना शिवसेनेतर्फे आदरांजली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

श्री संत शिरोमणी गोरा कुंभार यांच्या पुण्यतिथिनिमित्त देवळालीगावात खासदार हेमंत गोडसे व आमदार योगेश घोलप यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले.

नाशिकरोड बँकचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, सुधाकर जाधव, नगरसेवक सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, केशव पोरजे, नगरसेविका सत्यभामा गाडेकर, सुनिता कोठुळे, शिवसेना उपविभाग प्रमुख योगेश शिंदे, किरण डहाले, चंदू

महानुभाव आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन दिनेश शिंदे, संतोष शिंदे, काशिनाथ क्षिरसागर, मधुकर शिंदे, शरद शिंदे, अरुण गोरे, सखाहरी जोंधळे, राजेंद्र

शिंदे, तुषार शिंदे, मयूर शिंदे ,प्रतिक शिंदे, केशव शिंदे, वाल्मीक शिंदे, सागर शिंदे, दीपक शिंदे, अजिंक्य शिंदे, नीलेश कोल्हापूरे, आनंद शिंदे, सचिन शिंदे, अमोल अल्हाट, विकास गिते आदींनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वाधिक गुन्हेगारीत नगरपाठोपाठ नाशिक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये गुन्हेगारी कारवायांसाठी अहमदनगर जिल्हा सर्वांत पुढे आहे, तर त्यापाठोपाठ नाशिक जिल्ह्याचा क्रमांक लागतो. विशेषत: खून, खुनाचा प्रयत्न, दंगे, सरकारी नोकरांवर हल्ले या प्रमुख चार गुन्ह्यांच्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली असून, ती चिंताजनक आहे. नाशिकखालोखाल जळगाव जिल्ह्याचा क्रमांक लागतो. धुळे आणि नंदुरबार हे दोन जिल्हे तुलनेने कमी प्रभावित आहेत.

दोन शिवसैनिकांचे झालेले खून आणि त्यापूर्वी सोनई हत्याकांड, कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरण यामुळे अहमदनगर जिल्ह्यात गुन्ह्यांचा आलेख विभागात सातत्याने उंचावल्याची बाब समोर आली आहे. नाशिक विभागात नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, तसेच नंदुरबार या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. २०१७ या वर्षात पाचही जिल्ह्यांचा विचार करता, सर्वाधिक खुनाच्या घटना अहमदनगरमध्ये, तर त्यानंतर नाशिक ग्रामीणचा क्रमांक येतो. या जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे ९३ आणि ८४ खून झाले. पाचही जिल्ह्यांमध्ये खुनाचा प्रयत्न करण्याचे गुन्हे वाढले असून, १२२ च्या संख्येने अहमदनगर सर्वांत पुढे आहे. नाशिक परिक्षेत्रात २०१७ मध्ये एकूण २२ हजार ४१५ गुन्हे दाखल झाले. यातील ५,६७१ गुन्हे खून, खुनाचा प्रयत्न, दंगे, मारहाण आणि सरकारी नोकरांवर हल्ला या प्रकारातील आहेत. बऱ्याच वादावादीच्या प्रकरणांनंतर पोलिस अदखलपात्र गुन्हा दाखल करून प्रकरण थंड करण्यावर भर देतात. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे दोन्ही गट काही वेळ शांत होत असले तरी त्यांच्यातील विस्तव जात नाही. परिणामी, खून किंवा खुनाचा प्रयत्न असे प्रकार घडतात. वास्तविक पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाल्याचे दिसते. पाच जिल्ह्यांत तब्बल ३६६ गुन्हे दाखल झाले आहेत.

गुन्ह्याचा प्रकार-अहमदनगर-जळगाव-नाशिक-धुळे-नंदुरबार-एकूण

खून-९३-५७-८४-४१-३५-३१०

खुनाचा प्रयत्न-१२२-६४-६५-५४-३१-३३६

दंगे-५६१-२५८-४७१-१७८-१२२-१५९०

दुखापत-८८६-६०४-१०३७-३३६-१७५-३०३८

सरकारी नोकरांवर हल्ला-१४६-११७-६८-४९-१७-३९७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंदिरातील दानपेटी फोडून चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

द्वारका येथील श्री अयप्पा मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्याने दानपेटीतील रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली. शनिवारी चोरीची घटना घडली असून, या प्रकरणी चेरियिल रामय्यन राजप्पन (६५, रा. नाशिकरोड) यांनी तक्रार दिली आहे. मंदिरातील दानपेटीचा पत्रा उचकटून चोरट्याने ४०० रुपये लंपास केले. राजप्पन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस नाईक आर. एस. काळोगे तपास करीत आहेत.

किरकोळ वादातून मारहाण

मागील भांडणाची कुरापत काढून पाच जणांनी मिळून दोन भावांसह घरातील इतर तिघांना बेदम मारहाण केल्याची घटना नाशिकरोड परिसरातील स्टेशनवाडी परिसरात घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी सुनील बर्वे, तेजस कडवे, आकाश कडवे, हर्षद मोरे आणि ए. मोरे या पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला. दिलीप हरिभाऊ साळवे (वय ४५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास साळवे घरी असताना, त्यांच्या घरासमोर संशयितांनी वाद घातला. संशयितांनी दिलीप यांना शिवीगाळ केली. दिलीप यांचा भाऊ विनायकने संशयितांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयितांनी दिलीप आणि विनायक या दोघांनाही बेदम मारहाण केली. त्यानंतर संशयितांनी घरातील दोन महिलांसह एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. पोलिस उपनिरीक्षक शंकर होनमाने तपास करीत आहेत.

बुलेटसह दुचाकीची चोरी

मुंबई नाकासह इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये दुचाकी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एका बुलेटचा समावेश आहे. सुनील सखाराम कंखरे (रा. बिग बाजार झोन, मूळ, भडगाव, जिल्हा जळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची २० हजारांची दुचाकी १३ एप्रिल रोजी चोरट्यांनी लंपास केली. ही घटना रात्री पावणेदहाच्या सुमारास गोल्फ क्लब ग्राउंडच्या गेटवर घडली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस उपनिरीक्षक आवारे तपास करीत आहेत. मेहबूबनगर परिसरातील प्लास्टिक गोडावूनबाहेर बुलेटचोरीचीही घटना रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी शेख रिजवान अब्दुल रौफ याने फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी १३ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बुलेट लंपास केली. इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, हवालदार भामरे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचारी सहकारी बँकेतर्फे अभिवादन

$
0
0

नाशिक : नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेत अध्यक्ष दिलीप भागवत थेटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली. याप्रसंगी मार्गदर्शक रमेश राख, महेश आव्हाड, उपाध्यक्ष दीपक अहिरे, संचालक भाऊसाहेब खातळे, सुधीर पगार, विजयकुमार हळदे, सुनील बच्छाव, बाळासाहेब ठाकरे-पाटील, शिरीष भालेराव, प्रशांत कवडे, सुनील गिते, प्रशांत गोवर्धने, संदीप पाटील, प्रवीण भाबड, महेश मुळे, अशोक शिंदे, मंगेश पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश क्षीरसागर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images