Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मखमलाबादरोड भागात पैठणींचे दुकान फोडले

$
0
0

मखमलाबादरोड भागात पैठणींचे दुकान फोडले (फोटो)

पंचवटी : मखमलाबादरोडवरील जगझाप मार्गाजवळ नव्याने सुरू करण्यात आलेल्या पैठणी साडीचे दुकान शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी फोडले. या दुकानातील दीड ते दोन लाख रुपयांच्या साड्या चोरट्यांनी लंपास केल्या. मखमलाबादरोडवरील वैशाली अपार्टमेंटमधील राहुल तानाजी फडोळ यांच्या येवलेकर पैठणी या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून पैठणी लंपास केल्या. पैठणींची खोकी फेकून केवळ साड्याच घेऊन चोरटे पसार झाले. राहुल फडोळ सकाळी दहा वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी पंचवटी पोलिस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली. हा रस्ता निर्मनुष्य असतो. येथे पोलिसांची गस्तही कमी असते. त्याचा फायदा घेत ही चौरी झाली.

--

हातमाग कापड स्पर्धा

नाशिक : राज्यातील हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या उत्पादित वाणाला सन्मान मिळावा या दृष्टिकोनातून राज्यात विभागीय हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीसपात्र नमुन्याकरिता अनुक्रमे २५ हजार, २० हजार व १५ हजार रुपयांचे प्रत्येकी एक बक्षीस देण्यात येईल. हातमाग कापडाचे नमुने विहित कालावधीत दाखल करून सोबत संपूर्ण नाव व पत्ता, वापरण्यात आलेल्या धाग्याचा प्रकार तसेच कापडाचे विवरण किमतीसह देणे आवश्यक आहे. कमीत कमी एक नग व कमीत कमी दोन मीटर कापड प्रादेशिक उपसंचालक, वस्त्रोद्योग, मुंबई, सातवा मजला, चरई टेलिफोन एक्स्चेंज बिल्डिंग, मावळी मंडळरोड, ठाणे (पश्चिम)- ४००६०१ येथे पाठवावे. ०२२- २५४०५३६३ दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

--

घंटागाडी उलटली (फोटो)

सातपूर : परिसरात कचरा संकलन करून खत प्रकल्पाकडे निघालेली घंटागाडी पपया नर्सरीच्या वळणावर अचानक उलटली. त्यामुळे घंटागाडीतील कचरा रस्त्यावर पसरून वाहतूक विस्कळीत झाली होती. ट्रॅक्टरला लावण्यात येणारी स्टीलची प्लेट फिरल्याने घंडागाडीची स्ट्रॉली पलटल्याचे चालकाने सांगितले. ट्रॅक्टरचे स्टेअरींग चालकाच्या छातीला लागल्याने दुखापत झाली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही वेळानंतर नंतर दुसऱ्या घंटागाडीत कचरा भरून खत प्रकल्पावर नेण्यात आला. क्रेनच्या साहाय्याने स्ट्रॉली सरळ करीत रस्ता मोकळा करण्यात आला.

---

पॉइंटर्स

--

कॅम्पसच्या पदरी उपेक्षाच -२

चेन स्नॅचर वरचढ -३

तलाव तसा चांगला, पण आकाराने तोकडा -४

कौशल्याची 'परीक्षा' -५

स्वच्छ, सुंदर दिवेआगर -६

---

(लीडखाली सिंगल)

उंटवाडीत म्हसोबा यात्रेने रंगत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उंटवाडी येथील श्री म्हसोबा महाराज यात्रोत्सवाला जयघोषात सुरुवात झाली असून, शनिवारी पहिल्याच दिवशी ग्रामस्थांसह भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. सायंकाळी श्री दत्तगिरीबाबा भजन, भारुड, कला, नाटक पथकाने भारुडाद्वारे समाजप्रबोधन केले. हा यात्रोत्सव ९१ वर्षांपासून अखंडितपणे साजरा केला जातो. यंदाही सिटी सेंटर मॉललगतच्या म्हसोबा महाराज देवस्थान येथे उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात यात्रोत्सवाला सुरुवात झाली. दोन दिवस हा यात्रोत्सव सुरू राहणार असून, श्री म्हसोबा महाराज यात्रा कमिटीच्या वतीने यंदाही भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी नऊ वाजता महाराजांची महापूजा करण्यात आली. कमिटीचे पदाधिकारी विठ्ठल तिडके, मधुकर तिडके, सदाशिव नाईक, फकिरराव तिडके, राजेश गाढवे, विलास जगताप, दिनकर तिडके, अॅड. राहुल तिडके, संतोष कोठावळे आदी उपस्थित होते. यात्रोत्सवांतर्गत आज, रविवारी (दि. २२) दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत येथील श्री म्हसोबा महाराज देवस्थान पटांगणावर कुस्त्यांचा फड रंगणार आहे. अनेक नामांकित पहिलवान या फडात हजेरी लावणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहराध्यक्षपदी ठाकरे?

$
0
0

एकमेव अर्ज; राष्ट्रवादीत संघटनात्मक निवडणुका

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांतर्गत शनिवारी शहराध्यक्षपदासह विधानसभा अध्यक्ष आणि ब्लॉक अध्यक्षांच्या निवडणुका पार पडल्या. शहराध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष रंजन ठाकरे यांचेच एकमेव नाव आले असून, सर्वानुमते त्यांच्या नावाची शिफारस प्रदेशस्तराकडे करण्यात आली आहे. त्यामुळे रंजन ठाकरेंच्या गळ्यात दुसऱ्यांदा शहराध्यक्षपदाची माळ पडणार असून, निवडीची औपचारिकताच शिल्लक राहिली आहे. दरम्यान, विधानसभा आणि सहा ब्लॉक अध्यक्षांसाठी जास्त नावे आल्याने, त्यांच्या निवडीचा फैसला आता प्रदेश पातळीवर होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, सध्या तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू आहे. राज्य निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप वळसे पाटील यांनी नाशिकच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दत्तात्रय महसूरकर यांची नियुक्ती केली असून, शनिवारी त्यांच्या उपस्थितीत शहराध्यक्षासह विधानसभा अध्यक्ष आणि ब्लॉक अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली. यावेळी शहराध्यक्ष पदासाठी विद्यमान शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांचेच एकमेव नाव समोर आले. शहरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमताने शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या नावाची शिफारस केली. निवडणूक निर्णय अधिकारी महसूरकर यांनी शहराध्यक्ष पदासाठी रंजन ठाकरे यांचे एकमेव नाव आले असले तरी, त्यांच्या निवडीची घोषणा केली नाही. शहराच्या बैठकीचा अहवाल प्रदेशकडे सादर केला जाणार आहे. प्रदेश पातळीवरून त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे ठाकरेंची दुसऱ्यांदा शहराध्यक्षपदी नियुक्ती होणार आहे.

ब्लॉक अध्यक्षपदासाठी चुरस

विधानसभा आणि ब्लॉक अध्यक्षपदासाठीही निवडणूक घेण्यात आली असून सातपूर, पश्चिम विधानसभा अध्यक्षांसह नाशिकरोड ब्लॉकसाठी मोठी चुरस आहे. अन्य चार विधानसभा व आणि पाच ब्लॉक अध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज आले आहेत. त्यामुळे यांच्याही नावांची शिफारस प्रदेशकडे करण्यात आली आहे. यावेळी बैठकीला माजी मंत्री तुकाराम दिघोळे, खासदार देवीदास पिंगळे, गजानन शेलार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाणा बाजार समितीसाठी दोन अर्ज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी ८५ उमेदवारी अर्जांची विक्री झाली. त्यापैकी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा चांदवडचे प्रातांधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी दिली.

सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १५ गणांसाठी उमेदवारी अर्ज विक्री सुरू झाली आहे. शेतकरी गटासाठी सटाणा, अजमीर सौंदाणे, व ब्राम्हणगांव गणातून सर्वाधिक उमेदवारी अर्ज विक्री झाले आहेत. आज अखेर ८५ उमेदवारी अर्ज विक्री झाली असून चौगाव गणातून शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख अनिल हरी सोनवणे यांनी तर ब्राह्मणगाव गणातून नरेंद्र उखाजी अहिरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान बागलाण तालुका काँग्रेसच्या वतीने सटाणा व नामपूर बाजार समिती निवडणुकीसंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्यरंगात रंगले नाशिककर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शंकराचार्य न्यासाचा सांस्कृतिक विभाग आणि नांदेड मित्रमंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी नाट्यसंगीताच्या उज्ज्वल परंपरेची वाटचाल मांडणारा नाट्यरंग कार्यक्रम रंगला. यावेळी सूरमणी धनंजय जोशी (नांदेड) यांनी शास्त्रीय गायन आणि नाट्यगीत सादर केले. शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात ही मैफल झाली.

प्रारंभी जोशी यांनी 'राखो पत मोरी' हे पद असलेली बंदिश सादर केली. त्यानंतर 'जागो जागो श्याम कन्हैय्या' ही छोटी बंदिश सादर केली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात त्यांनी नाट्यसंगीत सादर केले. त्यात १३६ वर्षांची परंपरा असलेले, संगीत सौभद्र नाटकातील अण्णासाहेब किर्लोस्कर लिखित व संगीतबद्ध केलेले गुरूची महिमा कथन करणारे 'कोण तुज सम सांग मज गुरूराया कैवारी सदया' हे नाट्यपद सादर केले. त्यानंतर विद्याधर गोखले लिखित नाटकातील 'सुखसंचारक पवन असे मी, समता सांभाळी' हे पद सादर केले. त्यानंतर त्यांनी काही प्रसिद्ध नाटकातील पदे सादर केली. त्यांना तबल्याची साथ पंडित नितीन वारे यांनी संवादिनीची साथ पंडित सुभाष दसककर यांनी केली. कार्यक्रमाचे निरूपण गोविंद पुराणिक यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आचारसंहिता करवाढीच्या पथ्यावर

$
0
0

महासभेत निर्णय घेण्यास बंदी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आयुक्त तुकाराम मुंढेंनी लागू केलेल्या भरमसाठ करवाढीच्या विरोधातील आंदोलनाला आता विधानपरिषदेच्या निवडणूक आचारसंहितेची झळ बसली आहे. येत्या सोमवारी(२३ एप्रिल) होणारी महासभाही आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली असून, जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला पत्र पाठवून मतदारांना आकर्षित करता येईल, असा निर्णय घेता येणार नसल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे करवाढी विरोधात होणाऱ्या महासभेत केवळ चर्चाच झडणार असून, आचारसंहिता मुंढेंच्या पथ्यावर पडली आहे. महिनाभर आता करवाढीबाबत कोणतीच घोषणा पालकमंत्र्यांसह महापौरांना करता येणार नसल्याने भाजपचीही कोंडी झाली आहे.

आयुक्त मुंढेंनी त्यांच्या अधिकारात मालमत्ता करयोग्य मूल्यदरात मोठी वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यात मोकळे भूखंड, पार्किंग व सामासिक अंतरातील जागांसह पिवळ्या पट्ट्यातील शेतीवर देखील कर लागू करण्यात आला आहे. तीन पैसे प्रतिचौरस फुटावरून तो दर चाळीस पैसे करण्यात आला. नंतर पन्नास टक्के दरवाढ मागे घेण्याची घोषणा आयुक्तांनी केली असली तरी कर नकोचं, अशी भावना शेतकरीवर्गातून व्यक्त होत आंदोलनाची तयारी करण्यात आली आहे. गावोगावी बैठकांमधून भाजप विरोधात संताप व्यक्त होत असल्याने नगरसेवकांसह भाजपचे तीनही आमदार धास्तावले आहेत. नागरिकांचा रोष लक्षात घेऊन भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे व अन्य राजकीय पक्षांनी करवाढी विरोधाच्या आंदोलनात उडी घेतली आहे. या आंदोलनात नाशिककरांसोबत असल्याचे जाहीर करताना महासभेला विश्‍वासात न घेता करवाढ केल्याने सत्ताधारी भाजपने २३ तारखेला विशेष महासभा बोलावली. महासभेबाहेर या दिवशी मोठे आंदोलन उभारले जाणार आहे. या महासभेत आयुक्तांना घेरण्याची तयारी केली असतानाच शुक्रवारी विधानपरिषद निवडणुका जाहीर झाल्याने जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे करवाढी विरोधातील आंदोलनाला या आचारसंहितेचा फटका बसला आहे. या महासभेसाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी पत्र पाठवत नागरिकांवर प्रभाव पडणार नाही, असा निर्णय न घेण्याचे बंधन घातले आहे. यामुळे या महासभेत केवळ चर्चा होणार असून, आदेश किंवा ठराव करता येणार नसल्याचे चित्र आहे. करवाढीसंदर्भात पालकमंत्र्यांनाही बैठक घेता येणार नसल्याचे चित्र आहे. आचारसंहितेमुळे मुख्यमंत्रीसुध्दा करवाढ मागे घेऊ शकणार नसल्याने भाजपची मोठी अडचण झाली आहे. महिनाभर आता करवाढीत कोणाचाही हस्तक्षेप होणार नसल्याने मुढेंना काहीसा दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रवादीचा पाठिंबा

करवाढीच्या विरोधात येत्या २३ रोजी होणाऱ्या महासभेबाहेर अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने जनआंदोलन होणार आहे. भाजपसह शिवसेनेनेही पाठिंबा देत आंदोलनात उडी घेतली आहे. माकपही या आंदोलनात सहभागी होणार असून, पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही या जनआंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी पत्र काढून जाहीर पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होतील, अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे या आंदोलनाचे बळ वाढले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपच्या चालीवर शिवसेनेच्या विजयाचे गणित

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी आचारसंहिता जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधान परिषदेसाठी शिवसेनेचे संख्याबळ अधिक असले तरी भाजपच्या मदतीशिवाय विजयाचा आकडा गाठणे अशक्य असल्याने युतीच्या निर्णयाकडे इच्छुकांचे डोळे लागले आहे, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. भाजपच्या चालीवरच विजयाचे गणित अवलंबून असले तरी गेल्या वेळेप्रमाणेच या वेळीही निवडणूक अटीतटीची होणार आहे.

दरम्यान, विधान परिषदेसाठी इच्छुक असलेल्या शिवाजी सहाणे आणि नरेंद्र दराडे यांनी गाठीभेटींना जोर दिला आहे. जागेसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी शिवसेना- भाजप यांची युतीत शिवसेनेकडून स्वबळाची भाषा केली जात आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील विधान परिषदेचे आमदार जयंत जाधव यांची मुदत ३१ मे २०१६ ला संपत आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने नाशिकसह राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेवर २०१२ मध्ये राष्ट्रवादीचे जयंत जाधव यांनी शिवसेनेचे ॲड. शिवाजी सहाणे यांचा पराभव करत बाजी मारली होती. राष्ट्रवादीकडे संख्याबळ जास्तीचे असतानाही सहाणेंनी जोरदार टक्कर देत, छगन भुजबळांच्या तोंडचे पाणी पळवले होते. मात्र, सहा वर्षांत जिल्ह्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदललेली असून, जिल्ह्यात भाजप, शिवसेनेचा बोलबाला आहे. या निवडणुकीसाठी एकूण ६५१ मतदार आहेत.

युतीबाबत संभ्रमावस्था

पक्षीय बलाबल पाहता शिवसेनेचे सर्वाधिक २०७ मतदार असून, त्यापाठोपाठ भाजपचे १६७ मतदार आहेत. काँग्रेसकडे ७१, राष्ट्रवादी १००, तर अपक्ष आणि छोट्या पक्षांचे सख्याबळ हे शंभरच्या आसपास आहे. गेल्या वेळेस शिवसेना आणि भाजप युतीत शिवसेनेच्या वाट्याला ही जागा आली होती. मात्र, सहा वर्षांत पुलाखालून बरेच पाणी गेले असून, भाजप आणि शिवसेनेतील वितुष्ट वाढले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत युती न करण्याची घोषणा केली आहे. युतीवरून दोन्ही पक्षांत आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने युतीसंदर्भात सध्या संभ्रमावस्था आहे.

राज्यात युतीबाबत संभ्रमावस्था असताना, नाशिकमध्ये मात्र युतीसाठी देव पाण्यात घातले जात आहेत. शिवसेनेला भाजपच्या मदतीशिवाय आपला उमेदवार विजयी करता येणार नाही. स्पष्ट बहुमत नसतानाच उमेदवारीवरून शिवसेनेतील गटबाजी उफाळून आली. सहाणेंनी हकालपट्टीनंतरही निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. शिवसेनेकडून जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे प्रबळ दावेदार असून, त्यांच्याकडून प्रचाराला सुरुवातदेखील झाली आहे. भाजपने निवडणुकीची तयारी ठेवली असून, त्यासाठी माजी आमदार वसंत गिते, माणिकराव कोकाटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, परवेझ कोकणी यांच्या नावांची चर्चा आहे. सहाणेही राष्ट्रवादी व भाजपच्या संपर्कात आहेत. या निवडणुकीत शिवसेना व भाजप यांची युती होते की नाही, यावर भाजपचा उमेदवार ठरणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या हातातच शिवसेनेचा विजय आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे बलाबल तुलनेने कमी आहे. मात्र, प्रदेश पातळीवर दोन्ही पक्षांनी आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत. आघाडी करून इतर छोट्या पक्षांची मूठ बांधण्याचे काम सुरू असल्याचे कळते.

चौकट

पक्षीय बलाबल

शिवसेना : २०७, भाजप : १६७, राष्ट्रवादी : १००, काँग्रेस : ७१, मनसे : ५, बसप : १, आरपीआय : ५, एमआयएम : ७, जनता दल : ६, शहर विकास आघाडी : १८, जनशक्ती पॅनल : ५, माकप : १३, अपक्ष : ३८.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंढे आले अन् लगेच गेले!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांच्या तक्रारी व सूचना जाणून घेण्यासाठी शनिवारी गोल्फ क्लबवर आयोजित केलेला 'वॉक विथ कमिशनर' हा उपक्रम आठवडाभरासाठी स्थगित करण्यात आला आहे. आयुक्त मुंढेंच्या मातोश्रींची प्रकृती अचानक बिघडल्याने हा उपक्रम स्थगित करण्यात आला असून, आता येत्या शनिवारी (दि. २८) हा उपक्रम याच मैदानावर होणार आहे.

नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून आयुक्तांनी स्वत: दोन मिनिटांसाठी उपक्रमाच्या ठिकाणी हजेरी लावून दिलगिरी व्यक्त करीत उपस्थितांना संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी व सूचना देण्याचे आवाहन केले. या उपक्रमांतर्गत ६९ नागरिकांकडून १०६ तक्रारी प्राप्त झाल्या असून, या तक्रारींचा निपटारा प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आला आहे.

महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार घेतल्यापासून नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यावर भर देतानाच कामकाजाला शिस्त लावण्यासाठी मुंढे यांनी नाठाळ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा होण्यासाठी त्यांनी एनएमसी ई कनेक्ट अॅप सुरू केले आहे. परंतु, करवाढीच्या मुद्द्यावरून मात्र राजकीय पक्षांसह विविध संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे आयुक्त मुंढे नवी मुंबईच्या धर्तीवर थेट जनतेच्या दरबारात उतरले आहेत. नवी मुंबईत हिट ठरलेला वॉक विथ कमिशनर हा उपक्रम त्यांनी नाशिकमध्येही सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. शनिवारी सकाळी गोल्फ क्लब मैदानावर साडेसहा वाजता हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार, शनिवारी सकाळी सहा वाजता गोल्फ क्लबवर उपक्रमाची तयारी करण्यात आली होती. तक्रारी आणि सूचना देण्यासाठी नागरिकही दाखल झाले होते. तक्रारदार नागरिकांना टोकन दिले जात होते. यावेळीच तेथे मुंढे यांचे आगमन झाले. मुंढेंनी व्यासपीठावर जाऊन आपल्या मातोश्रींची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती उपस्थितांना देऊन आजचा उपक्रम पुन्हा एकदा पुढील शनिवारी (दि. २८) घेण्याचे जाहीर केले. मुंढेंनी दोन मिनिटे नागरिकांशी संवाद साधत दिलगिरीही व्यक्त केली. त्यानंतर ते मातोश्रींच्या उपचारांसाठी निघून गेले. यावेळी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे आणि रमेश पवार यांच्या उपस्थितीत तक्रारी स्वीकारण्यात आल्या. या उपक्रमांतर्गत ६९ नागरिकांकडून १०६ तक्रारी व सूचना प्रशासनाकडे प्राप्त झाल्या. या तक्रारींचे तातडीने निराकरण करून संबंधितांना त्याची माहिती दिली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. करवाढ, पाणीपुरवठा, अतिक्रमण,पथदीपांसंदर्भात तक्रारी घेऊन नागरिक मोठ्या संख्येने आले होते.

अतिक्रमण, पाणीपुरवठ्याच्या तक्रारी

वॉक विथ कमिशनर उपक्रमाअंतर्गत शनिवारी करण्यात आलेल्या सर्व तक्रारींचा रोख पाणीपुरवठा, अतिक्रमण व नगररचना विभागाकडेच होता. अनेक ठिकाणी पाणी येत नसल्याच्या तक्रारी होत्या, तर अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या तक्रारी सर्वाधिक होत्या. टपऱ्या, शेड काढण्यासंदर्भातील तक्रारींचा त्यात समावेश होता. अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी लावलेल्या शुल्कासंदर्भातही नागरिकांचा आक्षेप होता. काही तक्रारी किरकोळ स्वरूपाच्या होत्या. आयुक्तांनी दिवसभरात या तक्रारींचा निपटारा करण्याचे आदेश दिल्याने प्रशासन दिवसभर या तक्रारी सोडविण्यात व्यग्र होते.

अधिकाऱ्यांची झाडून हजेरी

आयुक्त मुंढे यांच्या वॉक विथ कमिशनर उपक्रमासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली होती. अतिरिक्त आयुक्तांपासून सर्व विभागप्रमुख, विभागीय अधिकाऱ्यांसह महापालिकेतील सर्व अधिकारी या उपक्रमासाठी झाडून उपस्थित होते. नागरिकांच्या किरकोळ तक्रारींचा निपटारा तात्काळ घटनास्थळीच होण्यासाठी आयुक्तांच्या आदेशानुसार अधिकाऱ्यांनी सर्व जय्यत तयारी केली होती. विशेष म्हणजे आयुक्त या मैदानावर येणार असल्याने पूर्ण मैदानाची पूर्णपणे साफसफाई करून मैदान चकाचक करण्यात आले होते.

सावजीं मुंढेंच्या समर्थनार्थ!

दरम्यान, करवाढीच्या मुद्द्यावरून एकीकडे भाजपसह सर्वच पक्षांनी आयुक्त तुकाराम मुंढेंच्या लढाई सुरू केली असतानाच भाजपचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी मुंढेंच्या समर्थनार्थ उतरले आहेत. भाजपचे दोन आमदार, महापौरांनी मुंढेंच्या करवाढीला विरोध करीत थेट मुंढेंनाच आव्हान देण्यासाठी महासभा व जनआंदोलन करण्याची तयारी केली असतानाच मुंढेंच्या चांगल्या कामाच्या समर्थनार्थ सावजी मैदानावर उतरले आहेत. अनेक नागरिकही यावेळी मुंढेंना समर्थन देण्यासाठी आले होते. आपण आयु्क्तांनी घेतलेल्या चांगल्या निर्णयाच्या पाठीशी असून, करवाढीचा अधिकार महासभेचा असल्याचा दावा सावजींनी केला. भाजपचे आमदार व महापौरांनी मुंढेंविरोधात मोहीम सुरू केली असतानाच सावजींच्या या भूमिकेमुळे भाजपमध्येच गटबाजी सुरू झाल्याची चर्चा आहे.

--

मातोश्रींची प्रकृती बिघडल्याने आजचा उपक्रम स्थगित करण्यात आला आहे. गैरसमज होऊ नये म्हणून मी येथे आलो आहे. येथे आलेल्या सर्व नागरिकांच्या तक्रारी स्वीकारल्या जाणार असून, त्यांचा तातडीने निपटारा केला जाईल. येत्या शनिवारी याच ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे.

-तुकाराम मुंढे, आयुक्त, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तो’ चेन स्नॅचर पोलिसांना वरचढ

$
0
0

पाच दिवसांत तीन लाखांहून अधिकचे दागिने लंपास; महिलांमध्ये भीती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एकटा फिरणारा, रात्री ७ ते १० या वेळेत महिलांना लक्ष करणारा एक चेन स्नॅचर्स सध्या पोलिसांना वरचढ ठरला आहे. या महिन्यात त्याने पाच दिवसांत सात वेळा चेन स्नॅचिंग करून तब्बल तीन लाखांहून अधिक रकमेचे दागिने हातोहात लंपास केले. इंदिरानगर, उपनगर, आणि मुंबईनाका भागात वरचेवर हात साफ करणारा हा भामटा पोलिसांच्या हाती केव्हा लागणार, असा प्रश्न सर्वांना सतावतो आहे.

शहरात वरचेवर चेन स्नॅचिंग करणाऱ्या इराणी गँग, काही स्थानिक सराईत तसेच पर जिल्ह्यातून येणाऱ्या चोरट्यांना पोलिसांना पायबंद घातला. मागील वर्षी चेन स्नॅचिंगचे सर्वाधिक गुन्हे उघडकीस आणणाऱ्या शहर पोलिसांसमोर मागील काही दिवसांपासून एका २५ ते २७ वयोगटातील तरुणाने आव्हान निर्माण केले आहे. हा चोरटा दर दोन दिवसांआड एक किंवा दोन ठिकाणी महिलांच्या गळ्यातील आभूषण ओरबाडून अंधारात बेपत्ता होतो.

छोट्या रस्त्यांवर जास्त घटना

विशेष म्हणजे, तो एकटाच गुन्हा करतो. सडपातळ असलेला चोरटा कधी हेल्मेट, कधी डोक्याला स्कार्फ तर कधी मास्क लावतो. शक्यतो मोठ्या रस्त्यांना संलग्न असलेल्या छोट्या रस्त्यांवर महिलांना टारगेट करतो. अशोकामार्ग, बोधलेनगर, भाभानगर अशा ठिकाणी तो अधूनमधून दिसतो. शक्यतो वृद्ध महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडण्याकडे कल असलेला हा एकमेव चोरटा पोलिसांना सतत चकवा देण्यात यशस्वी ठरतो आहे.

फारशी वर्दळ नसलेल्या रस्त्यांवर हा चोरटा कार्यभाग साधतो. आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिस स्टेशनसह क्राईम ब्रँचही प्रयत्नशील असून, आज ना उद्या तो पोलिसांच्या हाती लागेल, असे क्राईम ब्रँचचे सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते यांनी सांगितले. सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत महिला घराबाहेर पडतात किंवा बाहेरून घराकडे येतात. या काळात महिलांनी शक्यतो दागिने वरच्यावर दिसणार नाही, याची खबरदारी घ्यावी. हा आरोपी एकटाच असून, तो महिलेच्या समोरून येतो. अचानक वेगात येताना दुचाकीचा तीव्र प्रकाश महिलेच्या डोळ्यात पडला की संधी साधून तो एका हाताने चेन ओढून धूम ठोकतो. चोरट्याने काही ठिकाणी केलेल्या गुन्ह्यांचे व्हिडीओ फुटेज सापडले असले तरी ते पुरेसे स्पष्ट नाही. हायवेलगत असलेल्या रहिवाशी भागात महिलांनी काळजी घ्यावी, तसेच या भागातील तरुणांनी अनोळखी व्यक्तींवर नजर ठेवल्यास फायदा होऊ शकतो, असेही नखाते म्हणाले.

१ ते २१ एप्रिलदरम्यान केलेले गुन्हे

पोलिस स्टेशन.....दागिन्यांची किंमत.....महिलेचे वय.....वेळ.....ठिकाण

उपनगर.....६० हजार.....६२.....सकाळी ७.४५.....बोधलेनगर

मुंबई नाका.....६० हजार.....३५.....रात्री ९.१५.....अशोकामार्ग

इंदिरानगर.....५४ हजार.....५१.....रात्री ८.३०.....चार्वाक चौक रस्ता

गंगापूर.....२८ हजार.....४०.....रात्री ९.२०.....आकाशवाणी केंद्रासमोर

अंबड.....६० हजार.....५०.....रात्री ८.००.....शिवाजीचौकाकडे जाणारा रस्ता

इंदिरानगर.....२५ हजार.....३९.....रात्री ८.००.....राजीवनगर, गणपतीमंदिराजवळ

इंदिरानगर.....२१ हजार.....३७.....रात्री ८.४५.....पाथर्डी फाटा, ज्ञानेश्वरनगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कचरा फेकून महिलांसोबत हुज्जत

$
0
0

कचरा फेकून महिलांसोबत हुज्जत

कचरा विलगीकरणाचे प्रबोधन करणाऱ्या महिलांना धमकावले

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ओला व सुका कचरा वेगळा करून संकलित करण्यात यावा, असे आदेश आरोग्य विभागाला दिले आहे. त्यानुसार म्हाडाच्या जुन्या इमारतींच्या वसाहतीत शनिवारी (दि. २१) घंटागाडीजवळ कचरा विलगीकरणाबाबत दोन महिला सांगत होत्या. या वेळी एका पुरुषाने त्या महिलांशी हुज्जत घालत डस्टबिन घेण्यासाठी पैसे, द्या अशी मागणी केली. तसेच त्याच्याजवळ असलेला कचरा महिलांच्या समोर टाकून निघून गेला. तसेच पुन्हा कचरा घेतला नाही, तर पुन्हा रस्त्यावर टाकेल, असे महिलांनाच धमकावले. याबाबत घंटागाडी चालकाने तत्काळ आरोग्य विभागाकडे तक्रार केली. परंतु, यावर आरोग्य विभागाने कुठलीही कारवाई केली नसल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

सातपूर कॉलनीतील जुन्या म्हाडा वसाहतींच्या इमारती भागात शनिवारी (दि. २१) घंटागाडी कचरा टाकताना ओला व सुका वेगळा करून टाकावा, असे महिला प्रबोधन करत होत्या. याप्रसंगी एका महिलेने ओल्या कचऱ्यासाठी डस्टबिनच आणली नसल्याने संबंधित महिलेला ओला कचरा डस्टबिनमध्येच जमा करून तो घंटागाडी देण्याचे सांगितले. यानंतर संबंधित महिलेच्या पतीने प्रबोधन करणाऱ्या महिलांशी हुज्जत घातली. कचरा घ्यायचा तर घ्या नाही, तर रस्त्यांवरच टाकेल, असेही त्याने महिलांना धमकावले. यानंतर मुजोर पुरुषाने चक्क महिलांच्या समोरच कचरा टाकत निघून गेला. याबाबत घंटागाडी चालकाने आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती दिली. मात्र, त्या पुरुषावर कारवाई करण्यात आलेली नाही.

घरोघरी प्रबोधन सुरू

'घंटागाडी आली दारा कचरा टाका भरा, भरा' अशी म्हण घेत नाशिक महापालिकेने घरोघरी कचरा संकलन करण्यासाठी घंटागाडीची अभिनव योजना सुरू केली. यामुळे रस्त्यांवर टाकला जाणारा कचरा थेट घंटागाडीतून खत प्रकल्पावर टाकला जातो. नूतन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तर ओला व सुका कचरा वेगळा करूनच घंटागाडी टाकण्याबाबत सूचना आरोग्य विभागाला केल्या. आरोग्य विभागानेदेखील घंटागाडीत कचरा टाकतांना येणाऱ्यांना कचरा वेगळा करून टाकावा, अशी विनंती केली. यासाठी दोन स्वतंत्र डस्टबिनचा वापर करावा, असे प्रबोधनही महिलांकडून केले जात आहे.

ढकलगाडीतही कचरा

महापालिकेतील गल्लीबोळात स्वच्छता करण्यासाठी कर्मचारी नेमले आहेत. स्वच्छता झाल्यावर कचरा संकलन करतांना कर्मचाऱ्याला ढकलगाडी दिली जाते. परंतु, या गाडीतही महिलांकडून कचरा टाकला जातो. घंटागाडी नियमित येऊनदेखील केवळ वेळ मिळाला नाही याचे कारण सांगत ओला व सुका एकत्रित असलेल्या कचरा ढकलगाडीत टाकला जात असल्याने गाडी ढकलताना महिला कर्मचाऱ्यांना अधिक त्रास सहन करावा लागतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३७ शाळांचे विलीनीकरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थ्यांची पटसंख्या, प्रत्यक्ष उपस्थिती, शिक्षक व विद्यार्थ्यांचे गुणोत्तर प्रमाण, उपलब्ध इमारती, वर्गखोल्या, दोन शाळांमधील अंतर लक्षात घेऊन महापालिकेने ३७ शाळांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. दि. १ मे २०१८ पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांचे समायोजन, कागदपत्रे, मूळ रेकॉर्ड, भौतिक साहित्य समायोजित करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली आहे.

नाशिक महापालिकेच्या सद्य:स्थितीत १०९ मराठी, ४ हिंदी आणि १३ ऊर्दू माध्यमाच्या अशा एकूण १२६ शाळा सुरू आहेत. या शाळांमध्ये २९ हजार ०६ विद्यार्थी शिक्षण घेत असून, ९४० शिक्षक अध्यापनाचे काम करतात. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये पडताळणी केली असता या शाळांमधील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती ही पटावरील विद्यार्थ्यांच्या प्रमाणात अत्यल्प असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे अशा शाळांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे प्रतिविद्यार्थी दरमहा दोन हजार रुपयांची बचत होणार आहे. त्याचबरोबर इमारत दुरुस्ती, रिक्त पदे भरणे आदी प्रकारचा खर्चदेखील वाचणार असून, महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी त्याचा लाभ होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याशिवाय ज्या विद्यार्थ्यांना क्रीडांगण, पुरेशा वर्गखोल्या, संगणक सुविधा, डिजिटल रूम उपलब्ध नव्हत्या अशा विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे त्या सुविधा उपलब्ध होऊ शकतील, असेही संबंधित यंत्रणेचे म्हणणे आहे.

शाळा संख्या होणार ८९

महापालिकेच्या शाळांची १२६ असलेली संख्या या निर्णयामुळे आता ८९ वर येणार आहे. येत्या १ मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असून, समायोजित विद्यार्थ्यांना १५ जून रोजी संबंधित शाळांमध्ये उपस्थित राहण्याविषयी सूचना दिल्या जाणार आहेत.

या शाळांचा समावेश

या विलीनीकरणात महापालिका शाळा क्रमांक ५१, ८९, ३०, १५, ७१, ९, १२, ९३, ७४, ६४, ६७, ९८, ५९, ६२, १०४, १०५, १११, ११३, १२६, १३३, ५०, ३, २०, १०८, ४८, ६८, ८, ८२, १२५, ९६, ४५, ७०, महापालिका शाळा विद्यानिकेतन १५, महापालिका शाळा विद्यानिकेतन २२, महापालिका शाळा विद्यानिकेतन १४, महापालिका शाळा क्रमांक १२२ चे पहिला ते पाचवीचे विद्यार्थी, महापालिका शाळा क्रमांक १२२ चे सहावी ते सातवीचे विद्यार्थी याप्रमाणे शाळांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सट्टा लावणारे तीन बुकी अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेत खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावण्याचे काम करणाऱ्या तिघा संशयित आरोपींना क्राईम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली. ही कारवाई चेन्नई सुपर किंग्ज विरुध्द राजस्थान रॉयल दरम्यानच्या सामना सुरू असताना करण्यात आली.

गुरप्रतिसिंग हरबनसिंग जट (रा. फ्लॅट क्रमांक १, केवडीबन, तपोवन), अमित अनिल देसले (रा. फ्लॅट क्रमांक १३, हरिवंदन सोसायटी, टॅक्ट्रर हाऊसच्या मागे, पंचवटी) आणि सतनाम दिलीपसिंग राजपूत (रा. बळीराजानगर, रेखाराणी व्हिला बंगला, बळी मंदिराशेजारी) अशी या तिघांची नावे आहेत. आयपीएलमध्ये टी २० क्रिकेट सामन्यांचा झटपट निर्णय होतो. त्यामुळे सामना कोण जिंकणार, हरणार एवढेच नव्हे तर कोणता फलंदाज किती धावा करणार, कोणत्या बॉलवर सिक्सर बसणार अशा वेगवेगळ्या पध्दतीने साटोडी जुगार खेळतात. क्रिकेट सामन्यांवर बेटिंग हा नवीन प्रकार नसला तरी प्रत्येक मोसमात पोलिसांना नवनवीन संशयित सापडतात. याबाबत क्राईम ब्रँचला गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अंबड एमआयडीसी परिसरातील हॉटेल रिग्जच्या पहिल्या मजल्यावरील रूमसमोर असलेल्या पार्टेशनमध्ये सट्टा घेणाऱ्या वरील तिघा संशयितांना अटक केली. आयपीएल क्रिकेट सामन्याचे मोबाइल फोनवर होणाऱ्या थेट प्रेक्षपणाआधारे संशयित ग्राहकांकडून सट्टा स्वीकारत होते. सट्टेबाज प्रत्येक कॉल्सनंतर कोडवर्डच्या मदतीने त्याची नोंद एका रजिस्टरमध्ये करीत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी संशयितांकडून नऊ मोबाइल एक कार असा चार लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तसेच रोकड हस्तगत केली असून, त्यांच्याविरोधात अंबड पोलिस स्टेशनमध्ये जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी, सहायक पोलिस उपनिरीक्षक पोपट कारवाळ, हवालदार विजय गवांदे, पोलिस नाईक मोहन देशमुख, आसिफ तांबोळी, एस. बी. म्हसदे, विशाल काठे, गणेश वडजे, राहुल पालखेडे, चालक एएसआय संजय सूर्यवंशी आदींच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्पादक अन् ग्राहकांत संवाद हवा

$
0
0

मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई वायुनंदन यांची अपेक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुठल्याही वस्तूचा उत्पादक आणि तिचा उपभोग घेणारा ग्राहक यांच्यामध्ये थेट संवाद असायला हवा. कृषिप्रधान भारतात आपण अजूनही शेतकरी आणि ग्राहक यांच्यात सुसंवाद घडवून आणू शकलेलो नाही. त्यामुळे ना उत्पादकाला दाम मिळतो ना ग्राहकाला महत्तम समाधान, अशी खंत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई वायुनंदन यांनी शनिवारी व्यक्त केली.

मुक्त विद्यापीठामध्ये आयोजित अखिल भारतीय ग्राहक संरक्षण परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण आढावा बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ग्राहक संरक्षणचे रवींद्र साळुंखे, दिलीप फडके, दुर्गाप्रसाद सैनी, अरुण देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. शुक्रवारपासून सुरू झालेल्या परिषदेचे शनिवारी औपचारिक उद्घाटन झाले. यावेळी ग्राहक संरक्षण चळवळीमध्ये काम करणारे जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंतचे आणि गुजरातपासून आसामपर्यंतचे देशभरातील ४५० प्रतिनिधी या परिषदेमध्ये सहभागी झाले आहेत. डॉ. वायुनंदन पुढे म्हणाले, की कृषिप्रधान देशात शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये थेट संवाद असायला हवा. दुर्दैवाने तो तेवढ्या व्यापक स्वरूपात नाही. त्यामुळे शेतकरी दामापासून तर ग्राहक गुणवत्तापूर्ण मालापासून वंचित राहातो. मुक्त विद्यापीठाच्या आवारात पिकणारा केसर आंबा आणि नारळ आम्ही थेट ग्राहकांना उपलब्ध करून देतो. त्यामुळे ग्राहकांचा प्रतिसादही वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. ही वार्षिक सभा म्हणजे ग्राहक संरक्षण चळवळीबाबत अंतर्गत विचारमंथन असून, आतापर्यंतच्या कामकाजाचा आढावा त्यामध्ये घेण्यात येत आहे. भविष्यातील वाटचाल कशी करायला हवी, याबाबतही या सभेत विचारमंथन होत असून, काही ठराव रविवारी समारोपाच्या दिवशी मांडण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय ग्राहक संरक्षण परिषदेचे राष्ट्रीय सहसचिव दिलीप फडके यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कठुआतील दोषींवर कठोर कारवाई करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कठुआ घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करावी, यासह विविध मागण्यांसाठी भारतीय हितरक्षक सभेने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. त्याबाबत जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी स्वाक्षऱ्यांची मोहीमही राबविण्यात आली.

शाळांमधील लैंगिक शिक्षण व स्वत:चे संरक्षण याबाबत विद्यार्थी व पालकांसाठी शिबिर घेण्यात यावे. पाठ्यपुस्तकांमध्ये महिला अत्याचार व कायद्याची माहिती द्यावी. कुठल्याही बलात्काराच्या घटनेमध्ये आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानामध्ये सामाजिक संस्थांना सोबत घेऊन बलात्कार, लैंगिक शोषण व छेडछाडीबद्दल जनजागृती करावी, देशात धर्म व जातीच्या नावाखाली समाजात द्वेष पसरविणाऱ्या संस्था, संघटना व राजकीय पक्षांवर बंदी घालावी यासह विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. आंदोलनात भारतीय हितरक्षक सभेचे किरण मोहिते, कृष्णा शिंदे, भागवत गागुंर्डे, शरद जाधव, सचिन जाधव यांसह विद्यार्थी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये पेट्रोल ८२.३० रुपये लिटर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शनिवारी नाशिक शहरात पेट्रोलसाठी ८२ रुपये ३० पैसे प्रतिलिटर दर नोंदविला गेला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झालेल्या इंधन दरवाढीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. गत पंधरवड्यापासून शहरात हे दर कमी होण्याची चिन्हे नाहीत. काही दिवसांच्या तुलनेत शहरात सुमारे पाच ते सात रुपयांची दरवाढ झाल्याचे गेल्या काही दिवसांच्या पेट्रोलदराच्या आकडेवारीवरून दिसून येते.

पेट्रोल दरवाढीसंदर्भात अधिक माहितीसाठी फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलरचे सदस्य नितीन धात्रक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होणाऱ्या इंधन दरवाढीमु‌ळे स्थानिक ठिकाणीही या किमतींमध्ये भर पडते आहे. नाशिकमध्ये तीन महिन्यांपासून 'डीपीसी' म्हणजे डेली प्राइज चेंज या नियमाची अंमलबजावणी पेट्रोलपंपांकडून होत आहे. यानुसार रोज बदलते दर जाहीर केले जाऊन त्यानुसार आकारणी करण्यात येते." दुसरीकडे पेट्रोलच्या या उच्चांकामुळे नागरिकांनी सरकारी धोरणांविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

सामान्यांच्या आवाक्यात इंधनाचे दर आणण्यासाठी नियोजन करणे ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारने ती गांभीर्याने पार पाडावी.

- अमोल शिंगणे, ग्राहक

इंधन खर्च हा आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा परिणाम असला तरीही देशातील इतर शहरांमध्ये या किमती इतक्या उंचीच्या नाहीत. धोरणांमध्ये सुलभता आणून काही प्रमाणात या दरवाढीची तीव्रता कमी करता येणे शक्य आहे.

- मधुकर पवार, ग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक आचारसंहितेने विकासकामांना ‘ब्रेक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषद निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाली असून, त्यामुळे प्रस्तावित विकासकामे आणि झालेल्या कामांची उद्घाटने लांबणीवर पडणार आहेत. साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ म्हणून ओळख असलेल्या श्री सप्तशृंगगडावरील फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या लोकार्पणाचा संभाव्य २५ एप्रिलचा मुहूर्तही टळला असून, भाविकांना आता ३१ मेनंतरच या ट्रॉलीद्वारे दर्शनाचा लाभ मिळू शकणार आहे.

वणी येथील सप्तशृंगगडावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगबांधव, तसेच लहान मुलांच्या सोयीसाठी खासगी कंपनीच्या माध्यमातून फ्युनिक्युलर ट्रॉली उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. ट्रॉलीचे कामही पूर्ण झाले आहे. 'यशदा'च्या पथकासह आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने या ट्रॉलीची पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान लिफ्टच्या फायर ऑडिटसह गर्दी व्यवस्थापनाबाबतही साशंकता उपस्थित करण्यात आली. त्यामुळे चैत्रोत्सवातील उद्घाटनाचा मुहूर्त टळला होता. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनीने पूर्तता करून ना हरकत प्रमाणपत्रही प्राप्त करून घेतले. त्यामुळे चैत्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी उद्घाटनाचा सोहळा घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, आपत्ती व्यवस्थापनाबाबतची साशंकता कायम राहिल्याने पुन्हा अडथळा निर्माण झाला. सध्या प्रायोगिक तत्त्वावर ट्रॉली सुरू आहे. कृषी महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे. याचदरम्यान उद्घाटन करण्याचे नियोजन प्रशासकीय पातळीवर सुरू होते. मुख्यमंत्री कार्यालयाने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून गडावरील परिस्थिती जाणून घेतल्याचेही समजते. त्यामुळे पुढील आठवड्यात उद्घाटन होण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने ट्रॉलीचा लोकार्पण सोहळा लांबणीवर पडला आहे. आचारसंहितेमुळे मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर येतील की नाही, याबाबतही साशंकता निर्माण झाली आहे. समृद्धी महामार्गाच्या कामाला एप्रिलअखेर सुरुवात करण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता. त्यादृष्टीने भूसंपादन प्रक्रियेनेही वेग घेतला आहे. परंतु, आचारसंहितेमुळे या कामाचे भूमिपूजनही लांबणीवर पडणार आहे.

विकास कामे पडणार लांबणीवर

विधान परिषदेची निवडणूक मेअखेरीस असून, त्यामुळे पुढील दीड महिना आचारसंहितेचे निर्बंध राहणार आहेत. २४ मे रोजी मतमोजणीनंतर निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता शिथिल केली जाऊ शकते. परंतु, त्यानंतरच्या काही दिवसांतच आमदार अपूर्व हिरे यांच्याही सदस्यत्वाची मुदत जुलैच्या पहिल्या आठवड्यात संपुष्टात येणार आहे. जुलैपूर्वीच या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार असून, त्यामुळे पुन्हा विकासकामे आचारसंहितेच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थोडक्यात- भारत ज्ञान विज्ञान संस्था अधिवेशन

सर्वाधिक वाचलेली बातमी3

$
0
0

सर्वाधिक वाचलेली बातमी

गडचिरोलीत चकमकीत १४ नक्षलवाद्यांचा खात्मा

भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगल परिसरात राबवलेल्या शोध मोहिमेदरम्यान पोलिसांनी चकमकीत १४ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं

मटा अॅप डाउनलोड करा app.mtmobile.in

मिस्ड् कॉल द्या 1800-103-8973

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांकडून जीएसटी वसुली नसावी

$
0
0

अखिल भारतीय किसान संघाचे संघटनमंत्री दिनेश कुलकणी यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुठल्याही वस्तूच्या अंतिम उपभोक्त्याकडून जीएसटी वसूल केला जावा असा सरकारचा निकष आहे. मात्र, शेतकरी जो माल पिकवितो त्याचा अंतिम उपभोक्ता अन्य कुणी असतानाही खते, अवजारे व तत्सम अनेक शेतीपयोगी वस्तूंच्या विक्रीवर शेतकऱ्यांकडून जीएसटी आकारला जातो. प्रत्यक्षात त्याला तेवढे उत्पन्नही मिळत नाही. परिणामी शेतकरी कर्जबाजारी होतो आहे. शेतकऱ्याला या कर्जाच्या दृष्टचक्रातून बाहेर काढायचे असेल तर त्याला उत्पादनावर आधारित हमीभाव द्यावा लागेल, असे प्रतिपादन अखिल भारतीय किसान संघाचे संघटनमंत्री दिनेश कुलकर्णी यांनी रविवारी नाशिकमध्ये केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आयोजित अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी कुलकर्णी म्हणाले, की सध्या पूर्ण देश कृषिक्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी चिंतीत आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढते आहे. परंतु जमीन आणि कृषीक्षेत्र आहे तेवढेच आहे. देशातील लोकसंख्येला भविष्यातही पोटभर जेवण मिळावे यासाठी पुरेशी शेती उत्पादने व्हायला हवीत. शेती फायद्याची ठरत नसल्याने देशातील ६० टक्के शेतकरी अन्य व्यवसाय करण्यास उत्सुक आहेत. ही परिस्थिती अत्यंत गंभीर आणि आव्हानात्मक असून कृषिक्षेत्र श्रीमंत होत असताना शेतकरी मात्र दिवसेंदिवस गरीब होत असल्याची खंत कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केली.

पिकाच्या लागवडीपासून ते प्रत्यक्ष बाजारात विकण्यापर्यंत शेतकरी अनेक गोष्टींचे व्यवस्थापन करीत असतो. त्यामुळे त्याला व्यवस्थापकाचा दर्जा दिला जाऊन त्यानुसारच मोबदला मिळायला हवा. मात्र, दुर्दैवाने आपल्याकडे अजून तसे होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मध्ये या विषयाला स्पर्श केला असून त्यामुळे भविष्यात याबाबत काही होईल अशी अपेक्षा कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केली. ग्राहकांना गुणवत्तापूर्ण शेती उत्पादनांची गरज आहे. त्यांना सकस आणि पौष्टिक असे सेंद्रिय अन्नपदार्थ हवे आहेत. शेतकऱ्यांनी छोटे-छोटे गट करून त्या माध्यमातून सेंद्रिय उत्पादने निर्मितीवर भर द्यायला हवा, अशी अपेक्षा कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्याला कुशल मानावे

विपणन व्यवस्थेतील त्रुटींमुळे शेतीवर विपरित परिणाम झाला आहे. शेतकरी तीन रुपयांना विकणारी वस्तू ग्राहकांना १० रुपयांना मिळते. मार्केटिंग सिस्टममध्ये मोठ्या प्रमाणावर कमिशन काढले जाते. प्रत्यक्षात शेतकरी आणि ग्राहकाला त्याचा लाभ मिळत नाही. शेतकऱ्याला कुशल कामगार मानायला हवे, अशी किसान संघाची जुनी मागणी आहे. मात्र, सरकार त्याला सामान्य मजुराचा दर्जा देते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समृद्धी’साठी जिल्ह्यात ६५ टक्के भूसंपादन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यात आजमितीस ६५ टक्क्यांहून अधिक जमीन अधिग्रहण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सिन्नर तालुक्यातील शिवडेसह काही गावे वगळता बहुतांश गावांमधील संयुक्त मोजणीचे काम प्रशासनाने पूर्ण केले आहे.

समृद्धी महामार्ग हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी या दोन तालुक्यांमधील काही गावांमधील जमिनी संपादित कराव्या लागणार आहेत. दोन्ही तालुक्यांमध्ये जमीन अधिग्रहणासाठी प्रशासनाकडून कार्यवाही सुरू आहे. मात्र, शिवडे व आजूबाजूच्या काही गावांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवित जमिनी देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे प्रशासनापुढील पेच सुटू शकलेला नाही. परंतु, दुसरीकडे सिन्नरमधील इतर गावे आणि इगतपुरी तालुक्यात जमीन अधिग्रहणाला प्रशासनाने यश येते आहे. समृद्धीसाठी जिल्ह्यातील १२८० हेक्टर जमिनी आवश्यक आहे. त्यामध्ये १२०० हेक्टर खासगी तर उर्वरित क्षेत्र वनविभागाचे आहे. प्रशासनाने दोन्ही क्षेत्र मिळून आतापर्यंत ७०० हेक्टरपेक्षा अधिक जमिनीचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. मे अखेरपर्यंत अधिग्रहणाचे काम पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. त्यादृष्टीने दोन्ही तालूक्यात दोन पथकं कार्यरत आहेत.

अन्य जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची मदत

सिन्नर व इगतपुरी तालुक्यात एकाच प्रकल्पबाधित गटांची संख्या अधिक आहे. या गटांमध्ये दोनपेक्षा अधिक खातेदार आहेत. परिणामी खातेदारांची मनधरणी व त्यांच्याकडून जमीन हस्तांतरीत करून घेताना अधिकाऱ्यांची कमतरता भास होती. या सर्व प्रक्रियेला वेळ लागत होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अन्य जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची प्रकल्पासाठी मदत घेतली आहे. आठ अधिकारी व कर्मचारी प्रशासनाची मदत त्यासाठी घेण्यात आली आहे. प्रत्येकी चार जणांचे दोन पथके तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे दोन्ही तालुक्यांमध्ये दोन पथके काम करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवे आज शहरात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषद निवडणूक, घरपट्टी दरवाढ व भाजपअंतर्गत वाढलेला कलह या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आज, सोमवारी (दि. २३) नाशिकमध्ये येणार आहेत. या दौऱ्यात विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावून ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. विधान परिषदेसाठीचे इच्छुक त्यांची वैयक्तिक भेट घेण्याची चर्चा आहे.

गेल्या वेळेस भाजपच्या स्थापना दिवसाची तयारी करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत त्यांनी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला असला, तरी तो सभेसाठी होता. आता ते विविध विषयांवर कार्यकर्त्यांशी मनमोकळेपणाने बोलणार असल्याचेही बोलले जाते. यात भाजपच्या अंतर्गत कलहाचा विषयसुद्धा त्यांच्यासमोर चव्हाट्यावर येण्याची, तसेच घरपट्टीवाढीविरोधात होत असलेल्या विरोधाबाबतही ते पदाधिकाऱ्यांनी सूचना करण्याची शक्यता आहे.

या दौऱ्यात विधान परिषद निवडणुकीच्या विषयावरदेखील चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छुक असले, तरी त्यात कोण प्रबळ ठरेल याचा कानोसाही ते घेणार आहेत. भाजपकडे या निवडणुकीसाठी निवडून येण्याचा जादुई आकडा नाही. त्यामुळे कोणत्या पक्षांबरोबर आघाडी करायची, शिवसेनेबरोबर चर्चा करायची की नाही, अशा विविध अडचणी पदाधिकारी त्यांच्यासमोर मांडणार असल्याचेही बोलले जात आहे. तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचनाही ते पदाधिकाऱ्यांना देणार आहेत. यावेळी ते नाशिक लोकसभा मतदारसंघात स्वबळावर लढण्याची शक्यता धरून त्यावरही मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. सरकारचे काम लोकांपर्यंत पोहोचत आहे की नाही, बूथ रचना यांसारखे विषयसुद्धा ते या दौऱ्यात हाताळण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images