Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘हॅनाची सुटकेस’ अभिवाचनाचे गारुड

$
0
0

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक

'आयाम'निर्मित आणि 'ग्रंथ तुमच्या दारी' आयोजित अक्षरबाग वाचनकट्टा चळवळीअंर्तगत रविवारी 'हॅनाची सुटकेस' या कादंबरीचे अभिवाचन डिसुझा कॉलनी येथील प्रौढ नागरिक संघाच्या सभागृहात झाले. ओवी हिने या कादंबरीशी समरसून केलेल्या अभिवाचनाने उपस्थितांवर चांगलेच गारुड केल्याचे दिसून आले.

कॅरेन डिव्हाइन यांच्या कादंबरीचे माधुरी पुरंदरे यांनी भाषांतर केले असून, दिग्दर्शन जयेश आपटे यांनी केले आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझींच्या छळ छावणीमध्ये मारल्या गेलेल्या हॅनाची ही कथा आहे. हॅनाची सुटकेस एका म्युझियममध्ये दिसते आणि त्यावरूरुन कथेला सुरुवात होते. ही सुटकेस तपकिरी रंगाची असते. त्यात बऱ्यापैकी साहित्य ठेवता येईल, असा तिचा आकार असतो. मोठ्या प्रवासासाठी ती वापरली गेली असेल, हे तिच्या आकारावरून स्पष्ट होते. १९३९ ते १९४५ दरम्यान झालेल्या दुसऱ्या महायुद्धात ज्यू लोकांचा अतोनात छळ झाला. त्यांना उपाशी डांबण्यात आले. त्यांच्यावर अतोनात अत्याचार करून ठार मारण्यात आले. या काळात ६० लाख ज्यू लोकांचा अंत झाल्याचे मानले जाते. त्यात १५ लाख लहान मुलांचा समावेश होता. हॅना हीदेखील त्यात असलेली एक मुलगी होती. तिला स्केटिंगसह अनेक खेळांची आवड असते. मात्र, युद्धजन्य स्थितीत तिची आणि आईची ताटातूट होते. भाऊदेखील तिच्यापासून दुरावतो, अशी ही कथा आहे. एक तासाच्या या कथेचे वाचन ओवी हिने ओघवत्या शैलीत केले. सुवर्णा क्षीरसागर हिने त्याला साजेसे पार्श्वसंगीत दिले. निर्मिती संकल्पना आणि दिग्दर्शन जयेश आपटे यांचे होते. ध्वनी संकलनांची जबाबदारी आदित्य रहाणे यांनी चपखलपणे पार पाडली.\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘भारत ज्ञान विज्ञान’च्या अधिवेशनात मंथन

$
0
0

'भारत ज्ञान विज्ञान'च्या अधिवेशनात मंथन

नाशिकरोड : महिला सबलीकरण, अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षण, आरोग्य, विज्ञान आणि शेती आदी क्षेत्रांत देशभर कार्यरत असलेल्या भारत ज्ञान विज्ञान समुदाय संस्थेचे नाशिका तालुकास्तरीय ग्रामीण विभागाचे पहिले द्विवार्षिक अधिवेशन पळसे येथील संत आईसाहेब महाराज इंग्लिश स्कूलमध्ये नुकतेच पार पडले. त्यात संबंधित क्षेत्रांतील विविध विषयांवर मंथन झाले. संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रदीप जायभावे यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन झाले. अधिवेशनास पळसे, शिंदे, भगूर, शेवगेदारणा, मोहगाव, जाखोरी येथील शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते. संस्थेचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत गायखे, राज्य सहसचिव राहुल गवारे, जिल्हा सचिव लक्ष्मण जाधव, सहसचिव नीता कोष्टी यांच्यासह जिल्हा समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी नाशिक तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी नारायण जाधव, उपाध्यक्षपदी संतोष सोनवणे, उज्ज्वला कासार, सचिवपदी विजया बंदरे, सहसचिवपदी धनजय तुंगार, योगिता देवराळे, खजिनदारपदी सतीश टिळे, तर सदस्य म्हणून जयदीप जोशी, संजय जाट, नानासाहेब सरोदे, योगिता कासार आणि रामेश्वर खांडेबराड यांची निवड करण्यात आली.

फांद्यांची छाटणी

सातपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट जलवाहिनीसाठी महावितरण कंपनीने स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. त्यासाठीच्या महावितरण कंपनीच्या वीजतारांना वृक्षांच्या फांद्या स्पर्श करीत असल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले होते. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पंपिग स्टेशनचा वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी वीजतारांना स्पर्श करणाऱ्या वृक्षांच्या फांद्या छाटण्यास महावितरणने प्रारंभ केला आहे. सातपूर एमआयडीसीच्या पोल फॅक्टरीतून गंगापूर पंपिग स्टेशनला स्वतंत्र वीजपुरवठा दिलेला आहे. पंपिग स्टेशनचा वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी तारांना लागणाऱ्या फांद्या छाटण्याचे काम सुरू असल्याचे अभियंता गायकवाड यांनी सांगितले.

बॅरिकेड पडले नाल्यात

सातपूर : अंबड एमआय़डीसीत पश्चिम मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी वेअर हाउसच्या मुख्य रस्त्यांवर पोलिस ठाण्यांच्या वतीने बॅरिकेडिंग करण्यात येते. मतमोजणीचे काम संपल्यानंतर येथे लावलेले बॅरिकेड्स पुन्हा पोलिस ठाण्यांमध्ये नेले जातात. परंतु, त्यापैकी एक बॅरिकेड गेल्या कित्येक महिन्यांपासून परिसरातील नाल्यात पडून असल्याचे आढळून येत आहे. पोलिसांनी हे नाल्यात पडलेले बॅरिकेड त्वरित उचलून न्यावे, अशी अपेक्षा स्थानिक रहिवाशांसह कामगारवर्गाने व्यक्त केली आहे.

(थोडक्यात)

((((महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी संस्थेने कोणत्या उपक्रमांचे आयोजन केले पाहिजे याविषयी डॉ. जायभावे यांनी मार्गदर्शन केले. या अधिवेशानातील विविध सत्रांत महिला आरोग्य, अंधश्रद्धा निर्मूलन आणि शेती या विषयांवर सहभागी सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले.))))

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार संभाजीराजेंची रामशेज किल्ल्यास भेट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी रविवारी (दि. २२) रामशेज किल्ल्यास भेट दिली. छत्रपती युवा सेनेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. छत्रपती युवा सेना, शिवप्रेमी आणि रामशेज आशेवाडी ग्रामस्थ यांनी त्यांचे स्वागत केले.

रामशेज किल्ला बघण्याचे निमंत्रण स्वीकारल्यानंतर खासदार संभाजीराजे यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली. स्वागताप्रसंगी उद्योजक किरण चव्हाण, इतिहास संशोधक गिरीश टकले, छावा संघटनेचे करण गायकर, राम खुर्दळ, वन विभागाचे अधिकारी शिव बाला आदी उपस्थित होते.

गणेश कदम यांनी प्रास्ताविक करताना सांगितले, की रामशेज किल्ल्यावर दहा वर्षांपासून जन्मोत्सव केला जातो. स्वराज्याची पताका फडकवत ठेवणारा हा रामशेज किल्ला उपेक्षित राहिलेला आहे. या किल्ल्याचे संवर्धन व्हावे, येथील ऐतिहासिक वास्तूचे जतन व्हायला हवे. हा किल्ल्या पर्यटन स्थळ व्हावे यासाठी पुढाकार घ्यावा, अशीही त्यांनी मागणी केली.

छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त १३ व १४ मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमाची पत्रिकाही खासदार संभाजीराजे यांनी देण्यात आली. तुषार भोसले, यश बच्छाव, विलास गायधनी, ज्ञानेश्वर भोसले, दीपक जाधव, विजय उगले, शुभम बोडके आदींनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५२ हजार प्रकरणे लोक अदालतीत मार्गी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणमार्फत आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत तब्बल ५२ हजार प्रकरणे निकाली काढण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सकाळी लोकअदालतीचे कामकाज सुरू करण्यात आले.

लोकसंख्येबरोबर न्याय व्यवस्थेवर वाढत जाणारा ताण आणि त्यामुळे न्यायदानात होणारा विलंब लक्षात घेता लोकअदालत हा सक्षम पर्याय सर्वांसमोर असल्याचे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी न्यायिक अधिकारी, विधीज्ञ, समाजसेवक, पक्षकार व संबंधित विभागाचे अधिकारी हजर होते.

लोक अदालतीमध्ये नाशिक जिल्ह्यातील कोर्टांमध्ये प्रलंबितपैकी आठ हजार ६५५ प्रकरणे ठेवण्यात आली होती. तर, दावा पूर्व दाखल प्रकरणांची संख्या लक्षणीय म्हणजे एक लाख ९० हजार ५७ इतकी होती. कोर्टांमध्ये प्रलंबितपैकी एक हजार ९०२ प्रकरणे आजच्या लोकअदालतीत निकाली निघाली. तर, दावा दाखल पूर्व प्रकरणांपैकी ५० हजार ३७१ निकाली काढण्यात यश मिळाली. दोन्ही मिळून तब्बल ५२ हजार २७२ प्रकरणांचा निपटारा झाला. दावा दाखल प्रकरणांमध्ये एकूण १५ कोटी ९९ लाख ४० हजार ९३३ इतकी रक्कम वसूल झाली. तसेच मोटार अपघात प्रकरणांमध्ये दोन कोटी ९४ लाख ३७ हजार ८६७, एनआय अॅक्ट प्रकरणाशी निगडीत केसेसमध्ये आठ कोटी १६ लाख २९ हजार ३८९ रुपये वसूल करण्यात आले. मागील वर्षांपासून दर तीन महिन्यांनी आयोजित होणाऱ्या लोक अदालतीत किमान ५० हजार केसेस निकाली काढण्यात जिल्हा कोर्टाला यश मिळाले असून, दंड अथवा वसुलीचे प्रमाणही वाढते आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुधीरकुमार एम. बुक्के यांनी लोक अदालतीसाठी प्रयत्न करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व न्यायिक अधिकारी, पक्षकार तसेच कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आई सोशल’तर्फे सीड बँकेचा प्रारंभ

$
0
0

'आई सोशल'तर्फे सीड बँकेचा प्रारंभ

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त नाशिकरोड येथील आई सोशल ग्रुपने सीड बँक सुरू केली आहे. नागरिकांनी आपल्याकडी फळांच्या बिया संस्थेकडे द्याव्यात, असे आवाहन अध्यक्ष संतोष बोराडे, सचिव दीपक भागवत, उपाध्यक्ष श्याम आकुल यांनी केले आहे. नागरिकांनी जांभूळ, सीताफळ, चीकू, फणस आदी फळांच्या बिया संस्थेकडे जमा कराव्यात. या बिया संस्था इगतपुरी, घोटी, त्र्यंबकेश्वर येथे येत्या पावसाळ्यात रोवणार आहे. बिया जमा करण्यासाठी ग्रुपचे अध्यक्ष संतोष बोराडे (८०८७०० १३४२), सचिव दीपक भागवत (८४११९७००९९), उपाध्यक्ष श्याम आकुल (९३७०३७२६८५) यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पर्यावरणाची गरज लक्षात घेऊन नागरिकांनी कचरा विलगीकरण करून घंटागाडीत द्यावा, वस्तूंचा पुनर्वापर करावा, वाहतुकीच्या सार्वजनिक साधनांचा वापर करावा, शक्य असेल तेथे पायी जावे, कापडी पिशव्यांचा जास्तीत जास्त वापर करावा, पर्यावरणपूरक जीवनशैली अवलंबावी. यापैकी किमान एक उपक्रम सुरू करावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘झेडपी पॅटर्न’ची चाचपणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक विधान परिषदेच्या २१ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. या निवडणुकीत एकाही पक्षाकडे ३२६ हा मतांचा जादुई आकडा नाही. परिणामी निवडून येण्यासाठी दुसऱ्या पक्षाच्या कुबड्या घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचा पॅटर्न या निवडणुकीत वापरता येईल का, याबाबत आता चाचपणी सुरु झाली आहे. त्यामुळे भविष्यात शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादी-भाजप एकत्र येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पण,तोंडावर लोकसभा निवडणुका आल्यामुळे याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर होणे अवघड आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक सदस्य निवडून आल्यानंतर त्यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्ता ताब्यात घेतली. या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपबरोबर आघाडी केली होती. आता विधान परिषदेमध्ये याच पॅटर्नचा वापर करावा, असा एक मतप्रवाह सुरू झाला असून, त्याची चाचपणी सुरू झाली आहे. शिवसेना व भाजप हे सत्ताधारी पक्ष असले, तरी या दोन्ही पक्षांत युती होणे अवघड आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचेही काँग्रेसबरोबर जिल्ह्यात सख्य नाही. त्यामुळे भविष्यात एकमेकांच्या विरोधात असलेले हे पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या सर्व पक्षांची विचारधारा वेगळी आहे. त्यामुळे या निवडणुकीत हा मोठा अडथळा आहे. पण, सत्ता मिळवण्यासाठी याअगोदर हे पक्ष एकत्र आलेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत हे पक्ष नेमकी कोणती भूमिका घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.

शिवसेनेला ११९ मतांची गरज

एकूण ६५१ सदस्य असलेल्या या निवडणुकीत निवडून येण्यासाठी ३२६ चा आकडा पार करावा लागणार आहे. शिवसेनेकडे सर्वाधिक २०७ मते असली, तरी त्यांना निवडून येण्यासाठी ११९ मतांची गरज पडणार आहे. काँग्रेसने पाठिंबा दिला, तरी या पक्षाला ४८ मतांची गरज पडणार आहे. त्यामुळे अपक्षांची ३८ व माकपची १३ मते बाजूला वळवलीस तर शिवसेनेला ही निवडणूक सोपी होणार आहे.

युतीला निवडणूक सोपी

भाजपकडे १६७ मते असून, त्यांना निवडून येण्यासाठी १५९ मतांची गरज पडणार आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला, तर १०० मतांची फायदा होऊ शकतो. पण, ५९ मतांसाठी या पक्षालासुद्धा अपक्ष व इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. या निवडणुकीत भाजप व शिवसेनेने एकत्र निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली, तर त्यांना कोणाची गरज पडणार नाही. पण, तशी शक्यता तूर्त कमी आहे.

राष्ट्रवादी-काँग्रेससाठी अवघड

राष्ट्रवादी व काँग्रेसने या निवडणुकीत आपला उमेदवार रिंगणात एकत्रित उभा केला, तर या दोन्ही पक्षांकडे १७१ मते राहणार आहेत. त्यांना निवडणुकीसाठी १५५ मतांची आवश्यकता लागणार आहे. त्यासाठी त्यांना अपक्षांसह इतर छोट्या पक्षांची मोट बांधावी लागणार असून, ती अवघड आहे.

जास्त उमेदवार असल्यास

विधान परिषदेच्या या निवडणुकीत तीन किंवा चार तुल्यबळ उमेदवार असल्यास या निवडणुकीचे गणितही बदलणार आहे. त्यात हे उमेदवार वेगवेगळ्या पक्षांचे असल्यास या निवडणुकीचे गणित छोटे पक्ष व अपक्षांभोवतीच फिरणार आहे.

((स्ट्रिप : विधान परिषद निवडणूक

नेतेमंडळींची इमेज घेणे.))

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र व राज्य सरकारच्या सर्व कार्यालयांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यालयाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, की अंगीकृत उद्योग, व्यवसाय, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका, तसेच, खासगी क्षेत्रातील २५ किंवा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यापार, व्यवसाय, कारखाने यांना सेवायाजन कार्यालये (रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा) कायदा १९५९ व त्या अंतर्गत नियमावली १९६० नुसार त्रैमासिक विवरणपत्र ई-आर १ तिमाही संपल्यानंतर ३० दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. त्याप्रमाणे नियोक्त्यांच्या लॉग-इनमध्ये सदर विवरणपत्र https://rojgar.mahaswayam.in या वेब पोर्टलवर ऑनलाइन सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. याचा वापर करून दि. ३० एप्रिलपर्यंत विवरणपत्र ई-आर १ सादर करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक संपत चाटे यांनी केले आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाचा सर्व नियोक्त्यांचा पूर्वीच्या महारोजगार वेब पोर्टलवरील डाटा https://rojgar.mahaswayam.in या नवीन महास्वयम वेब पोर्टलवर मायग्रेट करण्यात आलेला असून, तिमाही विवरणपत्र ईआर-१ सादर करण्याची सुविधा या वेब पोर्टलवर १ जुलैपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही वेबसाइट ओपन करून एम्लॉयर (लीस्ट अ जॉब)वर क्लीक करून एम्प्लॉयर लॉग-इनवर यूजर आयडी व पासवर्ड वापरून लॉग-इन करून ईआर रिपोर्टमध्ये ई-आर १ या ऑप्शनवर क्लिक करून ऑनलाइन सादर करणे आवश्यक आहे.

त्यासाठी काही तांत्रिक अडचण आल्यास किंवा अधिकच्या सहाय्यासाठी सोमवार ते शनिवार (दुसरा व चौथा शनिवार आणि सार्वजनिक सुट्या वगळून) सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत (०२५३) २५००६५३ या कार्यालयाच्या दूरध्वनीवर संपर्क करावा किंवा संकेतस्थळ मुखपृष्ठावरील उजव्या भागातील खालील बाजूस उपलब्ध असलेल्या सुविधेचा उपयोग करावा. यात कसूर झाल्यास कसूरदार आस्थापनांनवर कायदेशीर कारवाई होऊ शकेल, असेही चाटे यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फोर जी’नेही जपलीय वाचनसंस्कृती

$
0
0

नाशिक :

मोबाइल, इंटरनेटच्या युगात वाचनसंस्कृतीचे कसे होणार, अशी कळवळून चिंता व्यक्त होत असेल तर ती वृथा आहे. कारण फोर जीच्या जमान्यातही म्हणजे नेटसॅव्ही चौथ्या पिढीनेही वाचनसंस्कृती आपलीशी केली आहे. विशेष म्हणजे नवी पिढी पुस्तकांबाबत अधिक सजग झाली आहे. हे निरीक्षण नोंदवले आहे पुस्तकांच्या जगात वावरणारी प्रकाशक मंडळी, वाचक, तरुणाई आणि हातगाड्यावर पुस्तके विकणाऱ्या विक्रेत्यांनी. त्यामुळे वाचनसंस्कृती वाढीस लागली आहे. शहरात प्रसिद्ध असलेली पुस्तक पेटी, तसेच अखंड चालणारी पुस्तक भिशी तरी किमान हेच सांगत आहे.

शहरात विनायक रानडे या वाचनप्रेमीच्या माध्यमातून पुस्तक पेटी नावाचा उपक्रम अतिशय वेगाने सुरू असून, आता तर राज्याबाहेर, देशाबाहेर, जगातील अनेक मोठ्या देशांमध्ये हा पुस्तक पेटी उपक्रम गेला आहे. त्यांना अनेक ठिकाणाहून, मराठी मंडळांकडून मागणी असून दिवसेंदिवस हा पसारा वाढत चालला आहे. पुस्तक भिशी हा उपक्रमदेखील मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरत असून, एकदा वाचलेले पुस्तक देऊन दुसरे पुस्तक घेण्याचा उपक्रमही शहरात सुरू आहे. यात तरुणाई विशेष रस घेत असून, अनेकांनी याला तंत्रज्ञानाची जोडदेखील दिलेली आहे. www.donateyourbooks.in नावाची एक वेबसाइट ओंकार गंधे नावाच्या सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुणाने तयार केली असून, या वेबसाइटच्या माध्यमातून तुम्ही गरजूंना पुस्तके दान करू शकता. अशा काही उपक्रमांतून पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवली जात आहेत.

पुस्तकं माणसाला नक्की देतात तरी काय, या प्रश्नाचं उत्तर एकच ठोसपणे काही देता येईल असे नाही. व्यक्तिपरत्वे या उत्तरात भिन्नता असू शकते; पण पुस्तके जे काही देतात ते मात्र चांगलेच असते. आज ठिकठिकाणी ग्रंथालये उभी आहेत; पण ती दिवसागणिक प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकांनी समृद्ध होताहेत का आणि वाचकांचा आनंद द्विगुणित होतो आहे का, हा खरा प्रश्न आहे. 'वाचनसंस्कृती समृद्ध व्हायला हवी' अशी व्यासपीठावरची पॉप्युलर विधाने ग्रंथालय समृद्ध करू शकत नाहीत. त्यासाठी आंतरिक उमाळ्याने काम करणारा कुणी तरी असावा लागतो आणि त्यानं वाचकांचा आनंद द्विगुणित करण्याचा ध्यासही घ्यावा लागतो. हाच ध्यास सध्या शहरातील पुस्तकांविषयीच्या अनेक योजना घेत असून, वाचकांना समाधान देत आहेत.

तंत्रज्ञानाच्या युगात मुलांना वाचनाची भूक आहे का, या प्रश्नाचे उत्तर सकारात्मक येते. 'माझं ग्रंथालय'सारख्या उपक्रमांतून याचा प्रत्यय आला आहे. पुस्तकांना मुलांपर्यंत नेणे गरजेचे आहे. त्यात मुले आपल्या जगण्याचा आशय शोधत असतात. मराठी भाषेशी, भाषेच्या वेगळेपणाची नाळ त्यांच्याशी नकळत जोडली गेली. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या प्रेरणेतून सुरू झालेला हा ज्ञानयज्ञ आस्थेवाईकपणे केलेल्या कामांचे फळ आहे हे मला कायम वाटत राहते.

- विनायक रानडे, पुस्तकप्रेमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुट्यानिश्चितीबाबत आवाहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये उन्हाळा व दिवाळीच्या सुट्ट्यांबाबत सुसूत्रता राहावी म्हणून शिक्षण संचालनामार्फत दरवर्षी सुट्यांची निश्चिती करण्यात येते. यंदाही ही निश्चिती प्राथमिक शिक्षण संचालनामार्फत जाहीर करण्यात आली असून मुख्याध्यापकांच्या अखत्यारित असलेल्या सुट्ट्यांबाबत मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकाऱ्यांशी समन्वय राखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच उन्हाळा व दिवाळीची दीर्घ सुटी कमी करुन त्याऐवजी गणेशोत्सव, नाताळ यांसारख्या सणांना सुटी देण्यात यावी, असे सुचविण्यात आले आहे.

सध्या शाळांना उन्हाळ्याची सुटी लागली असून १ मे रोजी निकाल मिळणार आहे. १५ जून रोजी नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. विदर्भातील शाळा २६ जून रोजी सुरू होणार आहेत. राज्यभरातील शाळांमध्ये सुट्यांबाबत सुसूत्रता राहावी, यासाठी शिक्षण संचालनामार्फत या बाबी सुचविण्यात आल्या आहेत. यामध्ये प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांशी मुख्याध्यापकांनी समन्वय साधून शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या अखत्यारितील सुट्या कळविणे बंधनकारक असणार आहे. तसेच स्थानिक सुट्ट्या व सरकार स्तरावरुन जाहीर करण्यात आलेल्या सर्व सुट्ट्या शाळांना घेणे बंधनकारक असणार आहे, असेही सांगण्यात आले आहे. याशिवाय, इयत्ता पहिली ते पाचवीसाठी किमान २०० दिवस म्हणजे आठशे घड्याळी तास तर इयत्ता सहावी ते आठवीसाठी किमान २२० दिवस म्हणजे एक हजार घड्याळी तास शाळेचे कामकाज सुरू ठेवणे आवश्यक असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवाढीविरोधात आज जनआंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेकडून अन्यायकारक आणि जनभावना चिरडणारी भरमसाठ करवाढ करण्यात येत असून, या तुघलकी करवाढीविरोधात शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीने आंदोलन पुकारले आहे. सोमवारी (दि. २३) सकाळी ११ ते सायंकाळी सहा या वेळेत राजीव गांधी भवनसमोर हे धरणे आंदोलन होणार आहे.

नाशिक महापालिकेने ३१ मार्च २०१८ रोजी काढलेल्या आदेश क्र. ५२२ अन्वये शहरातील शेतजमिनी, मोकळ्या जागा, मैदाने, वॉचमन केबिन, हॉस्पिटल्स, हॉटेल, शाळा, विद्यार्थी वसतिगृह अशा सर्व प्रकारच्या मिळकतींवर नव्यानेच करवाढ केली आहे. भाडेकरू असलेल्या मिळकतींवर तिप्पट करवाढ करण्यात आली असून या माध्यमातून नाशिककरांची आर्थिक कोंडी केली जात आहे. जनविरोध लक्षात घेऊन महापालिका आयुक्तांनी हरित पट्ट्यातील शेतीवरील कर रद्द करून पिवळ्या पट्ट्यातील शेतीवरील कर निम्मा केल्याची घोषणा केली आहे. कार्पेट क्षेत्राऐवजी बिल्टअप क्षेत्रावर कर, गावठाणातील मोडकळीस आलेल्या इमारतींचे नवीन बांधकाम केल्यास त्यावर पाचपट कर, सर्व सोसायट्या व बंगल्यांच्या साइड मार्जिन जागेवर देशात प्रथमच कर लादल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळेच समितीने आंदोलन पुकारले असून त्यास भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेसह विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा दिला आहे. जास्तीत जास्त नाशिककरांनी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन महापालिकेला आदेश क्र. ५२२ रद्द करण्यासाठी भाग पाडावे, असे आवाहन कृती समितीचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, उन्मेष गायधनी, दत्ता गायकवाड, अॅड. नितीन ठाकरे, त्र्यंबकराव गायकवाड, गजानन शेलार आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हा आठवडा तापदायकच!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सध्या शहर आणि जिल्ह्यात उन्हाचा तडाखा कमी झाला असला तरी पुढील आठवडा तापदायक जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सध्या ३७ ते ३८ अंश सेल्सियसपर्यंत असलेले तापमान ४१ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून उन्हापासून बचावासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

यंदाचा उन्हाळा घाम फोडणार असे संकेत मार्च महिन्यापासूनच मिळत आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला. परंतु, आता पुन्हा हा पारा काहीसा खाली घसरला आहे. रविवारी नाशिकमध्ये कमाल तापमान ३७.३ अंश सेल्सियस तर किमान तापमान १९ अंश सेल्सियस एवढे नोंदविण्यात आले. परंतु हेच तापमान २५ आणि २६ एप्रिल रोजी ४१ अंशांपर्यंत पोहोचेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यानंतरही २८ एप्रिलपर्यंत हे तापमान ४० अंश सेल्सियसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ नये याकरीता नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, गरज नसताना दुपारी घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन करण्यात येत आहे.

गेल्या आठवड्यातील तापमान

दिनांक- कमाल- किमान

१७ एप्रिल- ४०.२-२४.६

१८ एप्रिल- ३८.८-२३.०

१९ एप्रिल- ३९.२-२०.२

२० एप्रिल- ३६.३-२२.०

२१ एप्रिल- ३६.३-२०.६

२२ एप्रिल- ३७.३-१९.८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावी ऑनलाइन नोंदणीसाठी आजची मुदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठीही अकरावी प्रवेशांकरीता शहरात ऑनलाइन प्रक्रिया राबविली जाणार आहे. या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी किंवा माहितीत बदल करण्यासाठी महापालिका हद्दीतील कॉलेजांना उद्या (दि. २४) अंतिम मुदत देण्यात आली आहे.

या नाव नोंदणी व माहितीतील बदलाकरीता गंगापूर रोडवरील सीएमसीएस कॉलेजमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता या शिबिरास सुरुवात होणार आहे. या प्रक्रियेत महापालिका हद्दीतील कॉलेजांनी नावे नोंदविणे अपेक्षित आहे. कॉलेजने यात नावनोंदणी न केल्यास सर्वस्वी जबाबदारी प्राचार्यांवर निश्चित करण्यात येईल, असा इशारा शिक्षण उपसंचालकांनी दिला आहे.

गेल्या वर्षी ऑनलाइन प्रक्रियेत अपवादात्मक अडचणी वगळता प्रक्रिया सुरळीत पार पडली होती. गतवर्षीच्या अनुभवातून धडा घेत यंदा अधिक पारदर्शकता आणण्यासाठी शिक्षण विभागाचे नियोजन सुरू आहे. यंदा या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेतून देवळाली कटक मंडळ परिक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांना वगळण्यात आले आहे. यंदा नाशिक महापालिका हद्दीतील ५५ महाविद्यालयांमध्ये २७ हजार जागांसाठी ही प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. यामध्ये एसएमआरके महाविद्यालयातील गृहविज्ञान शाखा व हिंदी माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ऑफलाइन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे.

देवळाली परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. या विद्यार्थ्यांना ऑनलाइन नियोजनात शहरातील महाविद्यालय मिळाल्यास त्यांच्या प्रवासाच्या दृष्टीने गैरसोय होते, ही बाब लक्षात घेऊन कटक मंडळ हद्दीतून सुभाष गुजर कनिष्ठ महाविद्यालय, श्रीमती विमलाबेन खेमजी तेजुकाया महाविद्यालय व नूतन कनिष्ठ महाविद्यालय या तीन महाविद्यालयांना ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेतून वगळण्यात आले आहे.

मेळावे आयोजित करणार

या प्रवेश प्रक्रियेबाबत पालकांपर्यंत माहिती पोहचावी यासाठी या महिनाअखेर शिक्षण विभागाच्या वतीने पालकांचे मेळावे आयोजित केले जाणार आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीस माहिती पुस्तिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय शहरात विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी सात केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मंडळनिहाय मार्गदर्शन केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रवेशाच्या नियोजनासाठी शहरात पाच विभाग तयार करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाची निवड लांबणीवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत जिल्हाध्यक्षपदासाठी सात इच्छुकांचे अर्ज आल्यामुळे त्यासाठी मतदान न घेताच हे नाव राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी सर्व इच्छुकांनी सह्या केल्या आहेr. विद्यमान अध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांना दुसऱ्यांना संधी मिळेल ही त्यांच्या समर्थकांना अपेक्षा होती. पण, सात जणांनी या पदावर दावा केल्यामुळे ही निवड आता लांबणीवर पडणार आहे. २९ एप्रिल रोजी प्रदेशाध्यशांची निवड आहे. त्यानंतर ही निवड होणार असल्याची चर्चा आहे.

निवडणूक निरीक्षक अविनाश गोविंद आदीक यांच्या उपस्थित रविवारी सकाळी १० वाजता राष्ट्रवादी भवन येथे जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी बैठक झाली. त्यात विद्यमान जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश वडजे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील वाजे, जिल्हा कार्याध्यक्ष विष्णूपंत म्हैसधुणे, कोंडाजी मामा आव्हाड, सचिन पिंगळे यांनी या पदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले. एकापेक्षा जास्त इच्छुक आल्यामुळे या पदासाठी निवडीचा अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी घ्यावा अशी सर्वांनी इच्छा व्यक्त करून तसा ठराव केला. त्यामुळे ही निवड आता लांबणीवर पडली आहे.

जिल्ह्यातील सर्व ठिकाणी या संघटनात्मक निवडणुका झाल्या असल्या तरी मालेगाव, सिन्नर व नाशिक तालुक्याच्या अध्यक्षाची निवड इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे झाली नाही. त्याचप्रमाणे सिन्नर शहराध्यक्षाची निवडही याच कारणामुळे झाली नाही. आता येथेसुद्धा नंतरच निर्णय होणार आहे.

४२ प्रांतिक सदस्यांची निवड

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षाची निवड ही २९ मे रोजी होणार आहे. त्यामुळे १४ विधानसभा मतदार संघातील ३ प्रांतिक सदस्यांची निवड या निवडणूक प्रक्रियेत करण्यात आली. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व तालुका व शहर अध्यक्षांची फेरनिवड झाल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५२ हजार प्रकरणे मार्गी

$
0
0

विधी सेवा प्राधिकरणतर्फे लोक अदालतींचे जिल्हाभरात आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणमार्फत आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत तब्बल ५२ हजार प्रकरणे निकाली काढण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सकाळी लोकअदालत झाली.

लोकसंख्येबरोबर न्याय व्यवस्थेवर वाढत जाणारा ताण आणि त्यामुळे न्यायदानात होणारा विलंब लक्षात घेता लोकअदालत हा सक्षम पर्याय सर्वांसमोर असल्याचे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी न्यायिक अधिकारी, विधीज्ञ, समाजसेवक, पक्षकार व संबंधित विभागाचे अधिकारी हजर होते.

लोक अदालतीमध्ये नाशिक जिल्ह्यातील कोर्टांमध्ये प्रलंबितपैकी आठ हजार ६५५ प्रकरणे ठेवण्यात आली होती. तर, दावा पूर्व दाखल प्रकरणांची संख्या लक्षणीय म्हणजे एक लाख ९० हजार ५७ इतकी होती. कोर्टांमध्ये प्रलंबितपैकी एक हजार ९०२ प्रकरणे लोकअदालतीत निकाली निघाली. तर, दावा दाखल पूर्व प्रकरणांपैकी ५० हजार ३७१ निकाली काढण्यात यश मिळाली. दोन्ही मिळून तब्बल ५२ हजार २७२ प्रकरणांचा निपटारा झाला. दावा दाखल प्रकरणांमध्ये एकूण १५ कोटी ९९ लाख ४० हजार ९३३ इतकी रक्कम वसूल झाली. तसेच मोटार अपघात प्रकरणांमध्ये दोन कोटी ९४ लाख ३७ हजार ८६७, एनआय अॅक्ट प्रकरणाशी निगडीत केसेसमध्ये आठ कोटी १६ लाख २९ हजार ३८९ रुपये वसूल करण्यात आले.

मागील वर्षांपासून दर तीन महिन्यांनी आयोजित लोक अदालतीत किमान ५० हजार केसेस निकाली काढण्यात जिल्हा कोर्टाला यश मिळाले आहे. तसेच दंड अथवा वसुलीचे प्रमाणही वाढते आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुधीरकुमार एम. बुक्के यांनी लोक अदालतीसाठी प्रयत्न करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व न्यायिक अधिकारी, पक्षकार तसेच कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

..

मालेगावी ९ हजार प्रकरणे निकाली

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

न्यायालयीन कामकाजात वेळ, पैसा व श्रम खर्च होत असल्याची जाणीवजागृती समाज होत असल्याने दिवसेंदिवस लोक अदालतीस प्रतिसाद वाढतो आहे ही चांगली बाब आहे. न्यायालयात रविवारी झालेल्या लोकअदालतीस नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. एकूण ९ हजार ४०५ प्रकरणे निकाली निघाली असून एकूण ४ कोटी ९७ लाख ५६ हजार १६० रुपयांची वसुली झाल्याची माहिती येथील जिल्हा मुख्य न्यायाधीश बी.एस. महाजन यांनी दिली.

लोकअदालतीत दाखलपूर्व ४५ हजार ३८० प्रकरणे तर कोर्टात प्रलंबित ८८२ असे एकूण ४६ हजार २६२ प्रकरणे ठेवण्यात आली. या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी १२ पॅनल नियुक्त करण्यात आले. जिल्हा न्यायाधीश महाजन यांच्यासह एस. एम. अली, एस. एम. बेलकर, एस. बी. लांडगे, एम. बी. कांबळे, ए. बी. मरलेचा, ए. आर. यादव, व्ही. एच. देशमुख व जे. जे. इनामदार या न्यायाधीशांचे मोलाचे योगदान राहिले.

लोकअदालतीत ठेवण्यात आलेल्या दाखलपूर्व प्रकरणातील ९ हजार १८९ प्रकरणे निकाली निघाली असून यातून २ कोटी १० लाख ९६ हजार ८१० रुपयांची वसुली झाली. तर प्रलंबित प्रकरणातील २१६ प्रकरणे निकाली निघाली असून त्यातून २ कोटी ८६ लाख ६९ हजार ३५० रुपये वसूल झाले. लोकअदालतीत मोटार वाहन अपघात, फौजदारी, दिवाणी, वैवाहिक, भूसंपादन, महावितरण, मनपा व ग्राप कर, धनादेश बाउन्स अशी विविध प्रकारणे ठेवण्यात आली होती. या लोकअदालतीसाठी संपूर्ण शहर व तालुक्यातून पक्षकार, थकबाकीदार यांची गर्दी होणे अपेक्षित असल्याने न्यायालय आवारात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

लोकअदालतीला वाढता प्रतिसाद

न्यायालयीन कामकाजात खर्च होणारा वेळ, पैसा, श्रम याची बचत होण्याच्या दृष्टीने आता पक्षकारांकडून आपली प्रकारने लोकअदालतीत निकाली काढण्याकडे कल वाढतो आहे. त्यामुळे दिवसेंदिवस लोकअदालतीला प्रतिसाद वाढतो आहे. फेब्रुवारीमध्ये झालेल्या लोकअदालतीत ९ एकूण हजार २८४ प्रकरणे निकाली निघाली होती तर एकूण ३ कोटी ३६ लाख ३३ हजार ७८६ रुपयांची वसुली झाली होती. रविवारी झालेल्या लोकअदालतीत निकाली निघालेल्या प्रकरणाची संख्याही वाढली असून वसुलीचा आकडा एक कोटीने वाढला आहे.

दाखलपूर्व प्रकरणे : ४५ हजार ३८० प्रकरणे

- निकाली : ९ हजार १८९ प्रकरणे

- रक्कम : २ कोटी १० लाख ९६ हजार ८१० रुपये

कोर्टात दाखल प्रकरणे (प्रलंबित) : ८८२ प्रकरणे

- निकाली : २१६

- रक्कम : २ कोटी ८६ लाख ६९ हजार ३५० रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेल्टर होमची प्रतीक्षा कायम

$
0
0

\Bवर्षभरानंतर (स्नॅप शॉट आहे)

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक

बेघर, रस्त्यावर भटकणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरात शेल्टर होमद्वारे त्यांना आधार देण्याचा निर्णय गेल्या वर्षी जाहीर करण्यात आला होता. वर्षभरानंतरही या निर्णयाला गती मिळाली नसल्याचे चित्र आहे.

रागावून घर सोडून आलेली, हरवलेली मुले चुकीच्या व्यक्तींच्या सानिध्यात जाऊ नयेत व त्यांच्या कुटुंबाकडे त्यांना सुपूर्द करण्यात यावे या चांगल्या हेतूने महिला व बालविकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्था, पुणे बालन्याय व संरक्षण अधिनियम २०१५ कलम ४३(१) अन्वये राज्यात प्रायोगिक तत्त्वावर अ व ब वर्ग महानगरपालिका क्षेत्रात ओपन शेल्टर होम स्थापन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र, बदलत्या नियम, कायद्यांमध्ये ही प्रक्रिया अडकल्याने ही मुले अद्याप दुर्लक्षितच असल्याचे वास्तव आहे.

लहान वयात कोणत्या ना कोणत्या कारणामुळे घरापासून दुरावलेली मुले वाईट संगतीत येण्याची शक्यता मोठी असते. अनेक चांगल्या घरातील मुले घरापासून दुरावून

रेल्वेस्टेशन, बस स्टॅण्ड आदी ठिकाणी भटकताना दिसतात. ही मुले चुकीच्या व्यक्तींच्या हाती जाऊन त्यांचा गैरवापर झाल्यास त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते. या घटनांमधील गांभीर्य लक्षात घेत तसेच मुलांचा वर्तमानकाळ व भविष्य सुरक्षित राहण्यासाठी या शेल्टर होमचा फायदाच होणार आहे. मात्र, सरकारी कामकाजातील कासवगतीमुळे लहानग्यांसाठी घेतलेले चांगले निर्णयदेखील अंमलबजावणीपासून दूर राहत आहेत. या प्रक्रियेची जाहिरात गेल्या वर्षी प्रसिद्ध झाल्यानंतर सर्व निकष पूर्ण करत नाशिकमधील चार संस्थांचे प्रस्ताव महिला व बालविकास आयुक्तालयाकडे पाठविण्यात आले होते. मात्र, पुढे त्यावर निर्णय न झाल्याने शेल्टर होमची प्रतीक्षा अद्यापही कायम असल्याचे दिसून येत आहे.

\Bपुन्हा प्रस्तावांचा घोळ\B

शेल्टर होमविषयी नियम बदलल्यामुळे पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करून प्रस्तावांचा घोळ घालण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा जाहिरात, प्रस्ताव, पडताळणी आदी प्रक्रिया पहिल्यापासून सुरू होणार आहे. यामुळे शेल्टर होम नाशिकमध्ये प्रत्यक्षात केव्हा होणार, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लोकअदालतीत ४४९ प्रकरणे निकाली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड न्यायालयात रविवारी आयोजित लोक अदालतीत दाखल विविध प्रकारच्या १४९५ केसेसपैकी तब्बल ४४९ केसेस निकाली काढण्यात न्याययंत्रणेला यश मिळाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात केसेस निकाली निघाल्याने लोकअदालतीचा मूळ हेतूही साध्य झाला.

रविवारी नाशिकरोड न्यायालयात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात तीन पॅनल होते. पहिल्या पॅनलमध्ये न्यायाधीश एम. आर. यादव व ॲड. बबन मुठाळ आणि ॲड. उन्मेष साठे यांचा समावेश होता. दुसऱ्या पॅनलमध्ये न्यायाधीश पी. एन. आवळे व ॲड. बी. एम. घुगरे व ॲड. एम. आर. गायधनी यांचा समावेश होता. तिसऱ्या पॅनलमध्ये न्यायाधीश श्रीमती आरती शिंदे व ॲड. ए. पी. कटारे व ॲड. बी. डी. रुपवते यांचा समावेश होता. रविवारी सकाळपासूनच या लोक अदालतीत दाखल प्रकरणांच्या सुनावणीस प्रारंभ झाला. निकाली निघालेल्या प्रकरणांत कोर्टातील प्रलंबित ६९४ केसेसपैकी २३१ तर ८०१ दाखलपूर्व प्रकरणांतील २१८ प्रकरणांचा समावेश आहे. १३८ कलमाखालील दाखल दाव्यात सुमारे १ कोटी ३९ लाख, तर दाखलपूर्व प्रकरणांत ४ लाख ३२ हजार रुपये मूल्याची तडजोड झाली. या लोकअदालतीत विविध बँका, वीज वितरण आणि टेलिफोन यांसारख्या आस्थापनांचे अधिकारीही हजर होते. वादी व प्रतिवादींना थेट न्यायालयापुढे आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळून झटपट न्याय मिळत असल्याने लोक अदालतीला प्रतिसाद वाढत आहे.

लोक अदालतीमुळे दाव्यांची प्रलंबितता कमी होऊन नागरिकांचा वेळ व खर्चही वाचतो. लोकअदालतीत निकाली निघालेल्या प्रकरणाबाबत वरिष्ठ न्यायालयात अपील करता येत नाही. स्टँप ड्यूटी पूर्ण परत मिळते. पोलिसांचेही मोठे सहकार्य मिळत असते.

- आरती शिंदे, न्यायाधीश, नाशिकरोड कोर्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘म्हाडा’च्या गाळ्यांची टेंडर पद्धतीने विक्री

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सर्वसामान्य माणसांना परवडणाऱ्या दरात घर मिळावे यासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणने (म्हाडा) नाशिकमध्ये सातपूर येथे १६ गाळे व्यापारी पद्धतीने विकायला काढले आहेत. त्यासाठी त्यांनी टेंडर नोटीस काढली असून, त्यात या गाळ्यांची किंमत १७ लाखांपासून २५ लाखापर्यंत दर्शविली आहे. या किमतीपेक्षा जास्त किंमत भरून हे गाळे इच्छुकांना घेता येणार आहेत. या गाळ्यांना मागणी असल्यामुळे 'म्हाडा'ने नफा कमावण्याची संधी साधली आहे.

'म्हाडा'ने नाशिकमध्ये विविध ठिकाणी बांधलेल्या घरांना मात्र किमती जास्त असल्यामुळे ग्राहक नाहीत. त्यामुळे ही घरे गेल्या कित्येक वर्षांपासून पडून आहेत. परिणामी 'म्हाडा'चे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. त्यामुळे 'म्हाडा'ने आता सातपूर येथील गाळे विकण्याचा निर्णय घेऊन त्याद्वारे आपल्या अडकलेल्या पैशाचा बोजा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून साडेतीन कोटींच्या आसपास रक्कम मिळण्याची शक्यता आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वररोडवर असणाऱ्या या गाळ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही टेंडर प्रक्रिया पारदर्शी व्हावी, अशी मागणी होत आहे.

असे गाळे, अशा किमती...

'म्हाडा'ने विक्रीसाठी काढलेले गाळे चार प्रकारचे असून, त्यात प्रत्येकाचे क्षेत्रफळ वेगळे आहे. २५.८९ चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या गाळ्यांची किंमत २५ लाख ३७ हजारांच्या आसपास आहे. १९.०४ चौरस मीटर गाळ्यांची किंमत १८ लाख ६६ हजार, १७.२० चौरस मीटर गाळ्यांची किंमत १८ लाख ८५ हजार, तर २४.०४ चौरस मीटर गाळ्यांची किंमत २३ लाख ५८ हजार आहे. हे गाळे टेंडर पद्धतीने विकले जाणार असल्यामुळे या मूळ किमतीपेक्षा जास्त किंमत देणाऱ्याला हे गाळे दिले जाणार आहेत. या गाळ्यांमधील दोन गाळे अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येकी एक गाळा अनुसूचित जमाती व भटक्या जमातींसाठी राखीव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५२ हजार प्रकरणे लोक अदालतीत मार्गी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणमार्फत आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत तब्बल ५२ हजार प्रकरणे निकाली काढण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सकाळी लोकअदालतीचे कामकाज सुरू करण्यात आले.

लोकसंख्येबरोबर न्याय व्यवस्थेवर वाढत जाणारा ताण आणि त्यामुळे न्यायदानात होणारा विलंब लक्षात घेता लोकअदालत हा सक्षम पर्याय सर्वांसमोर असल्याचे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी न्यायिक अधिकारी, विधीज्ञ, समाजसेवक, पक्षकार व संबंधित विभागाचे अधिकारी हजर होते.

लोक अदालतीमध्ये नाशिक जिल्ह्यातील कोर्टांमध्ये प्रलंबितपैकी आठ हजार ६५५ प्रकरणे ठेवण्यात आली होती. तर, दावा पूर्व दाखल प्रकरणांची संख्या लक्षणीय म्हणजे एक लाख ९० हजार ५७ इतकी होती. कोर्टांमध्ये प्रलंबितपैकी एक हजार ९०२ प्रकरणे आजच्या लोकअदालतीत निकाली निघाली. तर, दावा दाखल पूर्व प्रकरणांपैकी ५० हजार ३७१ निकाली काढण्यात यश मिळाली. दोन्ही मिळून तब्बल ५२ हजार २७२ प्रकरणांचा निपटारा झाला. दावा दाखल प्रकरणांमध्ये एकूण १५ कोटी ९९ लाख ४० हजार ९३३ इतकी रक्कम वसूल झाली. तसेच मोटार अपघात प्रकरणांमध्ये दोन कोटी ९४ लाख ३७ हजार ८६७, एनआय अॅक्ट प्रकरणाशी निगडीत केसेसमध्ये आठ कोटी १६ लाख २९ हजार ३८९ रुपये वसूल करण्यात आले. मागील वर्षांपासून दर तीन महिन्यांनी आयोजित होणाऱ्या लोक अदालतीत किमान ५० हजार केसेस निकाली काढण्यात जिल्हा कोर्टाला यश मिळाले असून, दंड अथवा वसुलीचे प्रमाणही वाढते आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुधीरकुमार एम. बुक्के यांनी लोक अदालतीसाठी प्रयत्न करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व न्यायिक अधिकारी, पक्षकार तसेच कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थेट कर्जाचे आश्वासन हवेतच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वर्षभरापूर्वी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विविध कार्यकारी सोसायट्यांना थेट शिखर बँकेकडून कर्जपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. पण, त्यानंतर पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यांची ही घोषणा हवेतच विरली आहे.

शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने गावपातळीवरील विविध कार्यकारी सोसायट्या सक्षम करण्याचा निर्णय घेतल्याचेही सांगितले. पण, त्यासाठी कोणती पावले उचलली हे आतापर्यंत पुढे आलेले नाही. विविध कार्यकारी सोसायटीकडे शेतकऱ्यांची बँक म्हणून बघितले जावे, असे सरकारचे प्रयत्न होते. पण, या सोसायटीच्या स्थितीत आजही काहीच बदल झालेला नाही.

गेल्या वर्षी सहकार विभागाने जिल्ह्यात मार्चअखेर ५६ हजार ३२३ सदस्य नोंदणी केली होती. त्यामुळे जिल्ह्यातील १०४५ विविध कार्यकारी सोसायट्यांची सभासद संख्या ७ लाख ९७ हजार ६९७ झाली होती. या सोसायट्यांना थेट शिखर बँकेकडून कर्जपुरवठा करणे व या संस्थांमार्फत विविध व्यवसाय सुरू करण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या ठेवी स्वीकारण्याचा आग्रह सहकार विभागाने त्यावेळी धरला होता. पण, त्यातही फारशी वाढ झाली नाही. विविध व्यवसाय सुरू करण्याचे काम मात्र सुरू असले, तरी ते अगोदरपासूनच प्रगतिपथावर होते.

गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी कर्जमाफी मिळावी म्हणून मागणी केली होती. पण, त्याला सरकारने नकार दिला. त्यावेळी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समक्ष करण्यासाठी राज्य सरकारने हा उपक्रम हाती घेतला होता. त्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांना या सोसायटीचे सभासद करून त्यांना सहकारात आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. त्यासाठी १०० टक्के शेतकऱ्यांना सभासद करून घ्यावे, असे आदेश दिले होते. पण, पुढे हे आश्वासनच ठरले.

ठेवींबाबतही उदासीनता

गतवर्षी नाशिक दौऱ्यावर आलेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विविध कार्यकारी सोसायट्यांना शेतकऱ्यांच्या ठेवी ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे गावातला पैसा गावात राहून शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल, असा त्यामागे हेतू होता. पण, त्यांची ही सूचनाही शेतकऱ्यांनी फारशी मनावर घेतलेली नसल्याची स्थिती आहे.

--

लोगो : वर्षभरापूर्वी...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनहिताच्या कामांना प्राधान्य

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड प्रभागाचे नूतन सभापती पंडित आवारे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच विविध समस्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. पक्षभेद बाजूला सारून जनहिताच्या कामांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. भाजपचे पंडित आवारे प्रथमच नगरसेवकपदी निवडून आलेले असून, अवघ्या वर्षभरातच नाशिकरोडचे चोविसावे सभापती म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

नाशिकरोड प्रभाग सभापतिपदासाठी विरोधी पक्ष शिवसेनेने पक्षीय संख्याबळ कमी असतानाही ज्योती खोले यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु, माघारीच्या अंतिम क्षणी ज्योती खोले यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला होता. शिवसेनेने उमेदवारी अर्ज भरण्याचा व माघार घेण्याचा केवळ फार्स पूर्ण केला होता. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील विभागीय कार्यालयाच्या सभागृहात ही निवडणूक झाली. नगरसचिव गोरखनाथ आव्हाळे, विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर उपस्थित होते. प्रभाग सभापतिपदासाठी भाजपचे पंडित आवारे आणि शिवसेनेच्या ज्योती खोले या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते.

नाशिकरोड प्रभागात भाजपचे १२, तर शिवसेनेचे ११ सदस्य असल्याने भाजपचे पारडे जड होते. मात्र, तरीही शिवसेनेने अर्ज दाखल केला होता. भाजपचे संख्याबळ जास्त असताना व भाजपच्या नगरसेवकांतून कोणीही फुटण्याची शक्यता नसतानाही शिवसेनेने ज्योती खोले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून केवळ राजकीय खेळी पूर्ण केली. केवळ वरिष्ठांचा आदेश म्हणून शिवसेनेने उमेदवारी अर्ज दाखल करून उमेदवारी अर्ज मागेही घेतल्याने केवळ औपचारिकता पूर्ण केली.

सर्वपक्षीयांकडून स्वागत

या निवडीनंतर पंडित आवारे यांच्या निवडीचे महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायीच्या सभापती हिमगौरी आडके यांच्यासह भाजपचे मंडल अध्यक्ष बाजीराव भागवत आदींसह सुमन सातभाई, संभाजी मोरुस्कर, संगीता गायकवाड, सरोज आहिरे, सीमा ताजणे, अंबादास पगारे, शरद मोरे, मीरा हांडगे, दिनकर आढाव, विशाल संगमनेरे, कोमल मेहरोलिया या भाजपच्या नगरसेवकांसह  मंगला आढाव, ज्योती खोले, सुनीता कोठुळे, रंजना बोराडे, प्रशांत दिवे, संतोष साळवे, जयश्री खर्जुल, रमेश धोंगडे, सूर्यकांत लवटे आणि केशव पोरजे या शिवसेनेच्या नगरसेवकांकडूनही स्वागत झाले. 

प्रभाग सभापतिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी विभागीय कार्यालयातील सर्व विभागप्रमुखांना नियोजनाच्या सूचना दिल्या आहेत. जनतेच्या हिताच्या कामांवर राजकीय पक्षभेद बाजूला सारून लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

-पंडित आवारे, सभापती, नाशिकरोड प्रभाग

------------------

आतापर्यंतचे प्रभाग सभापती

मधुकर गायकवाड, शंकर मंडलिक, सुरेश भालेराव, लंकाबाई हगवणे, डॉ. राजेंद्र जाधव, त्र्यंबक गायकवाड, पुंडलिक अरिंगळे, सरस्वती भालेराव, जिजाबाई गायकवाड, शांताबाई वाबळे, प्रताप मेहरोलिया, शिवाजी भागवत, सूर्यकांत लवटे, सुनील बोराडे, भारती ताजनपुरे, लता हांडोरे, पवन पवार, सुनीता कोठुळे, कोमल मेहरोलिया, केशव पोरजे, सुमन सातभाई आदींनी नाशिकरोड प्रभागाचे सभापतिपद भूषविलेले आहे. त्यापैकी त्र्यंबक गायकवाड आणि सूर्यकांत लवटे यांना प्रभाग सभापतिपदाची दोनदा संधी मिळाली होती.

फोटो (निष्पक्षचा लोगो वापरणे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images