Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

कूलर वापरताना दक्षता बाळगा

0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

वाढलेल्या तापमानापासून बचावासाठी सामान्यत: घरोघरी कूलरला पसंती असते. कूलरचा वापर करताना अनेकवेळा कूलरमध्ये विद्युत प्रवाह उतरून अपघात होण्याची शक्यता असते. कूलरचा गारवा अनुभवताना विद्युत सुरक्षेबाबत नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

अज्ञान, निष्काळजीपणा, फाजील आत्मविश्वास ही वीज अपघाताची मूळ कारणे आहेत. प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक दक्षता बाळगून, प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब करून सुरक्षित राहणे गरजेचे आहे. कूलरमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी खालील बाबींचे कटाक्षाने पालन होणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयुक्तांची सुट्टी रद्द!

0
0

अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या आनंदावर विरजन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंच्या १५ दिवसांच्या सुट्टीसंदर्भात तर्क-वितर्क सुरू झाले असले तरी, मुंढेंनी आपली नियोजित सुट्टी मातोश्रींच्या प्रकृतीच्या कारणास्तव रद्द केली आहे. त्यामुळे मुंढे महापालिकेचे नियमित कामकाज करणार असून, मुंढेंच्या सुट्टीमुळे खुशीत असलेल्या अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींच्या आनंदावर विरजन पडले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाने मात्र सुटी रद्दचे पत्र अद्याप प्राप्त झाले नसल्याचे सांगत जिल्हाधिकारी शनिवारी पदभार घेणार आहेत.

आयुक्त मुंढे हे २ ते ११ मेपासून खासगी विदेश दौऱ्यावर जाणार असल्याने त्यांचा पदभार जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी स्वीकारणार होते. जिल्हाधिकारी शुक्रवारीच पदभार स्वीकारणार असल्याची चर्चा होती. परंतु, आयुक्त मुंढेंच्या मातोश्रीची प्रकृती चांगली नसल्याने मुंढेच्या सुट्टीबाबत संभ्रम होता. शुक्रवारी आयुक्तांनी आपली नियोजित सुट्टी रद्द केल्याची माहिती प्रशासनाने दिली. मुंढेंच्या मातोश्रीची प्रकृती खराब असल्याने ते सुटीवर जाणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे मुंढे नियमित कामावर हजर राहणार आहेत. मुंढेंच्या गैरहजेरीत बिले काढण्याच्या तयारीत असलेल्या ठेकेदारांच्या आनंदावर पाणी पडले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाने मात्र सुटीबाबत हात वर केले असून, अद्याप सुटी रद्दचे पत्र आले नसल्याचा दावा केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किम फोटो

निषेध

0
0

निषेध...

कठुआ आणि उनावो येथील बलात्कार प्रकरणाचे अद्यापही देशभरात पडसाद उमटत आहेत. पुण्यात शांतता मोर्चा काढून दोन्ही घटनांचा निषेध करण्यात आला. सुमारे तीनशे लोकांनी मोर्चात सहभागी होत मृतांना आदरांजली वाहिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२१ टन हापूस आंबा न्यूयॉर्कला रवाना

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

गेल्या पंधरवड्यात अमेरिकेच्या वारीला निघणारा हापूस आंबा यावर्षी तांत्रिक कारणामुळे १० ते १२ दिवस उशिराने निघाला आहे. लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन केंद्रात विकिरण प्रक्रिया केल्यानंतर हापूसचा पहिला कंटेनर न्यूयॉर्कला रवाना झाला. दोन दिवसात २१ टन आंबा रवाना झाल्याची माहिती विकिरण सुरक्षा अधिकारी संजय आहेर व महेंद्र आवधने यांनी दिली.

फळांचा राजा असलेला कोकणचा हापूस व केसर या आंब्यांवर विकिरण प्रक्रिया केल्यानंतर २६ एप्रिलपासून सर्वप्रथम अमेरिकेला निर्यात करण्यात आले. या हंगामातील पहिली विकिरण प्रक्रिया ११.५ मेट्रिक टन आंब्यांवर करण्यात आली. एकूण ३४०० बॉक्स हापूस, बदाम आणि केशर आंबा हंगामाच्या सुरुवातीला विकिरण करून अमेरिकेला पाठविण्यात आला. मागील वर्षी ५४५ टन आंबा निर्यात झाला होता.

अमेरिकेला निर्यात होणाऱ्या हापूसवर फळमाशीच्या प्रादुर्भावाचे कारण युरोपीय महासंघाने देऊन भारतातून आयात होणाऱ्या हापूससह इतर जातींच्या आंब्यांवर २०१३ साली बंदी घातली होती. त्यावर उपाय म्हणून विकिरण प्रक्रिया करण्याच्या प्रक्रियेमुळे ही चिंता कायमस्वरूपी मिटली आहे.

लासलगावच्या या केंद्रात मुंबईच्या अँग्रो सर्च या कंपनीच्या वतीने २६ एप्रिल ते १५ जुलै या कालावधीत विकिरण प्रक्रिया केली जात आहे. निर्यात केल्या जाणाऱ्या आंब्यामध्ये हापूस, केशर, दशरा, बेंगणपल्ली, लंगडा या जातीच्या आंब्यांचा समावेश आहे. लासलगाव येथून आंब्यांवर विकिरण प्रक्रिया पूर्ण करून हा हापूस सॅन फ्रान्सिस्को, लॉस एन्जेलिस, शिकागो, न्यू जर्सी, ह्यूस्टन, कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क या शहरांमध्ये पाठविला जाणार आहे.

हंगाम लांबणीवर

यावर्षी परतीचा पाऊस, ओखी वादळाचा परिणाम, बेमोसमी पाऊस यामुळे यंदा आंब्याचा मोहोर गळून गेल्याने उत्पादनात ३० ते ३५ टक्के नुकसान आले आहे. त्यामुळे यंदा निर्यातक्षम आंब्यांची उपलब्धता वेळेत न झाल्याने आंबा परदेशात निर्यात करण्याची प्रक्रिया १५ ते २० दिवस लांबणीवर पडली आहे. मागील वर्षी पहिला कंटेनर ४ एप्रिलला अमेरिकेला रवाना झाला होता. निर्यात १२ जूनपर्यंत सुरू होती. मागील वर्षी प्रथमच ऑस्ट्रेलियालाही आंबे रवाना झाले होते.

यंदा निर्यातक्षम आंबे उपलब्ध नसल्याने २६ एप्रिलपासून निर्यात सुरू झाली आहे. यावर्षी १००० मेट्रिक टन आंब्याची निर्यात होण्याची अपेक्षा आहे. सध्या कोकण, गुजरात, कर्नाटक राज्यातील हापूस, केसरी, बदाम या जातीच्या आंब्यांवर लासलगाव येथे प्रक्रिया करून तो मुंबईमार्गे अमेरिकेसाठी रवाना करण्यात आला आहे.

- प्रणव पारेख, प्लांट इंचार्ज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उच्चशिक्षितांत लागलीय वृक्षप्रेमाला ओहोटी...

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

राज्यात वनाच्छादनाचे प्रमाण वाढविण्यासाठी सरकारने ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प सोडला आहे. या योजनेत सामान्य नागरिकांना सहभागी होण्याची संधी मिळावी, यासाठी ग्रीन आर्मी उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यात प्रशासकीय उदासीनतेमुळे ग्रीन आर्मी सदस्य नोंदणीत अगोदरच खोडा निर्माण झाला आहे. त्यातच इंजिनीअर्स, डॉक्टर्स, आयटी आणि पीएच.डी. यांसारख्या अवघ्या ६ हजार ९४५ उच्चशिक्षितांनीच आजवर ग्रीन आर्मीचे सदस्यत्व स्वीकारल्यामुळे उच्चशिक्षितांतही याबाबत उदासीनता दिसून येत आहे.

राज्यातील वृक्ष लागवडीच्या उपक्रमात सामान्य नागरिक, नोकरदार, व्यावसायिक, सेवाभावी संस्था, शालेय विद्यार्थी अशा सर्वच क्षेत्रांतील नागरिकांना सहभागी होता यावे यासाठी सरकारने ग्रीन आर्मी हा उपक्रम सुरू केला आहे. ग्रीन आर्मीत नावनोंदणी करण्याचे आवाहनही सरकारतर्फे करण्यात आले होते. मात्र, उच्चशिक्षितांकडूनही सरकारच्या या आवाहनाला कवडीमोल किंमत दिली गेल्याचे उच्चशिक्षितांच्या ग्रीन आर्मीतील सहभागातून उघड झाले आहे. नाशिक जिल्ह्यात इंजिनीअर्स, डॉक्टर्स, आयटी आणि पीएच.डी.धारकांची संख्या खूप मोठी आहे. मात्र, प्रत्यक्षात या चारही क्षेत्रांतून आतापर्यंत ६ हजार ९४५ नागरिकांनीच ग्रीन आर्मीचे सदस्यत्व स्वीकारून वृक्ष लागवड आणि संवर्धनाच्या कामात रस दाखविला आहे. त्यात २६१८ इंजिनीअर्स आणि २३६३ डॉक्टर्सची संख्या आहे. मात्र, आयटी आणि पीएच.डी.धारकांची संख्या अत्यल्प आहे.

मालेगाव, बागलाण आघाडीवर

जिल्ह्यातील मालेगावमधून २८४०, तर बागलाणमधून १०९२ उच्चशिक्षितांनी ग्रीन आर्मीचे सदस्यत्व स्वीकारले आहे. यात मालेगावमधील १२७०, तर बागलाणमधील ७६३ डॉक्टरांचा समावेश आहे. उर्वरित तालुक्यांतील डॉक्टरांनी वृक्ष लागवड व संवर्धनात रस दाखविलेला नाही. नाशिक शहरात डॉक्टरांची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक असूनही नाशिकमधून अवघ्या १४५ डॉक्टरांनी याकामी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील देवळा, कळवण, निफाड, सुरगाणा, पेठ व येवला या तालुक्यांतूनही डॉक्टरांचा ग्रीन आर्मीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे.

चांदवड, देवळा, निफाड, येवला पिछाडीवर

चांदवड, देवळा, निफाड आणि नांदगाव या चार तालुक्यांतील एकाही पीएच.डी.धारकाने ग्रीन आर्मीत सहभाग नोंदविलेला नाही. चांदवड, देवळा, निफाड व येवला या चार तालुक्यांतील इंजिनीअर्स, डॉक्टर्स, आयटी आणि पीएच.डी.धारकांत वृक्षप्रेमाला ओहोटी लागलेली असल्याचे ग्रीन आर्मीतील सहभागातून उघड झाले आहे.

तालुकानिहाय झालेली नोंदणी

तालुका इंजिनीअर डॉक्टर आयटी पीएच.डी. एकूण

बागलाण १५४ ७६३ १६१ १४ १०९२

चांदवड ४७ १० ५ ० ६२

देवळा १३ १ २ ० १६

दिंडोरी ९१ ३४ ३६ २ १६३

इगतपुरी ७४ १९ ८८ ३ १८४

कळवण २९ ८ ४४ ६ ८७

मालेगाव ५४७ १२७० ९३६ ८७ २८४०

नांदगाव ३९ १३ ९३ ० १४५

नाशिक ६५८ १४५ १७३ ५ ९८१

निफाड ५४ ६ ६ ० ६६

पेठ ३३ १० १७ २ ६२

सिन्नर ३२० ३९ १४२ ११ ५१२

सुरगाणा ३७ ६ ५० २ ९५

त्र्यंबकेश्वर ५०३ ३४ ५९ २ ५९८

येवला २९ ५ ६ २ ४२

एकूण २६२८ २३६३ १८१८ १३६ ६९४५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कूलरचा गारवा अनुभवताना दक्षता गरजेची

0
0

वाढलेल्या तापमानापासून बचावासाठी सामान्यत: घरोघरी कूलरला पसंती दिली जाते. कूलरचा वापर करताना अनेक वेळा त्यात विजेचा प्रवाह उतरून अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे कूलरचा गारवा अनुभवताना पुरेशी दक्षता बाळगणे गरजेचे ठरते. कूलरमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी खालील बाबींचे कटाक्षाने पालन होणे आवश्यक असल्याचे महावितरण कंपनीनेदेखील अधोरेखित केले आहे.

लहान मुलांना ठेवावे दूर

अज्ञान, निष्काळजीपणा, फाजील आत्मविश्वास ही वीज अपघातांची मूळ कारणे आहेत. प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक दक्षता बाळगून, प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करून सुरक्षित राहणे गरजेचे आहे. अनेक वेळा अपघाताच्या घटनांमध्ये कूलरच्या जवळपास खेळणाऱ्या लहान मुलांचा समावेश असतो. त्यामुळे कूलरच्या सान्निध्यात लहान मुले येणार नाहीत, अशा पद्धतीने कूलर ठेवले जावे. कूलरच्या पंख्यासमोर जाळी लावलेली असल्यास लहान मुलांसाठी ते अधिक सुरक्षित ठरते.

पाणी भरताना घ्यावी काळजी

कूलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी वीजपुरवठा बंद करावा. कूलरमधील वीजतारांचे (वायर्सचे) आवरण सुस्थितीत असल्याची खात्री करावी. कूलरमध्ये वीजतार पाण्यात बुडाली नसल्याची खात्री करून घ्यावी, तसेच ऒल्या हाताने कधीही कूलरला स्पर्श करू नये, ते जीवघेणे ठरू शकते. कूलरमधून पाण्याची गळती होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.

अर्थिंगची करावी तपासणी

घरातील अर्थिंग सुस्थितीत असल्याची तपासणी परवानाधारक ठेकेदाराकडूनच नियमित कालावधीत करणे गरजेचे आहे. कारण, त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळण्यास निश्चितच मदत होऊ शकते. जुन्या वायरिंगची तपासणी करणे, खराब झालेली, तसेच आवरणाची रोधक क्षमता कमी झालेली वायरिंग तात्काळ बदलण्याची आवश्यकता असते.

'थ्री पिन प्लग'चा वापर योग्य

कूलरला नेहमी थ्री पिन प्लग व सॉकेटचा वापर करावा. त्यामुळे कूलरला अर्थिंग व्यवस्थित मिळते. वीजप्रवाहाची गळती झालेली असल्यास प्रसंगी धोका टळू शकतो. तायमुळे आयएसआय चिन्ह आणि योग्य दर्जाची विद्युत उपकरणे वापरणे हितकारक ठरू शकते. त्यासाठी योग्य तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणे उपयुक्त ठरेल.

आणीबाणीप्रसंगी करावयाचे उपाय...

कूलरमध्ये कोणताही प्रकारचा बिघाड झाल्यास दुरुस्तीचे काम जबाबदार व्यावसायिक व्यक्तीकडूनच करून घ्यावे. कूलरचा पंप दुरुस्त करण्यापूर्वी वीजपुरवठा बंद करावा. पंपास वीजपुरवठा करणारी वीजतार पाण्यात बुडाली नसल्याची खात्री करावी. पंपाची अर्थिंग योग्य असल्याचे तपासून घ्यावे. विजेचा धक्का बसल्यास त्या व्यक्तीला स्पर्श करू नका. कोरड्या लाकडाने त्याला बाजूला करावे, त्वरित कृत्रिम श्वासोच्छवास देत रुग्णालयात न्यावे. घरातील विद्युत उपकरणे तात्काळ बंद करावीत. घरात अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर्स बसविणे आवश्यक आहे. विजेमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी तो तांत्रिकदृष्ट्या उत्तम उपाय आहे. त्यामुळे विजेचा धक्का लागल्यास वीजप्रवाह खंडित होऊन पुढील अनर्थ टळतात.

(संकलन : डॉ. बाळकृष्ण शेलार)

(लोगो : मटा गाइड)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्तासुरक्षा जीवन रक्षा

0
0

घोटीत रस्ता सुरक्षा अभियानात राबविले अनेक उपक्रम

म. टा. वृत्तसेवा, घोटी

जिल्हा वाहतूक शाखा व घोटी ग्रामीण पोलिस यांच्या माध्यमातून २९ व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत घोटी येथील आठवडे बाजाराच्या पार्श्वभूमीवर रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. वाहतूक नियमांसंदर्भात शालेय विद्यार्थ्यांची प्रबोधन रॅली, वाहनचालकांना मार्गदर्शन, विद्यार्थ्यांमार्फत पालकांना वाहतूक नियमांच्या सूचना व वाहनांना रिफ्लेक्टर लावणे आदी उपक्रम राबविण्यात आले.

घोटी शहरात जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर, घोटी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक पंकज भालेराव यांच्या नेतृत्वाखाली जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून सुरक्षित वाहतूक नियमांबाबत आवाहन करण्यात आले. तसेच, या विद्यार्थ्यांना शाळेत मार्गदर्शन करण्यात आले. त्यांच्यामार्फत पालकांपर्यंत वाहतूक सुरक्षिततेचे धडे देण्यात आले.

रस्ता सुरक्षा जीवन रक्षा हा संदेश घेऊन सुरक्षित वाहतूक नियमावलीची पत्रके वाहनचालकांना वाटण्यात आली. वाहतूक शाखा पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर, घोटी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक पंकज भालेराव यांनी शहरातील वाहनांना रिफ्लेक्टर लावले. यावेळी पोलिस निरीक्षक कोळेकर व सहायक निरीक्षक पंकज भालेराव यांनी वाहनचालक, नागरिक व विद्यार्थ्यांशी या संदर्भात संवाद साधला.

वाहनचालकांना सुरक्षिततेबाबत सूचना

वाहतूक सुरक्षिततेबाबत वाहनचालकांना सूचना करण्यात आल्या. वाहतूक व सुरक्षा नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे केली तर होणारे अपघात टाळले जाऊ शकतात, वाहनचालकांनी अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी, मोबाइलवर बोलत असताना वाहन चालवू नये आदी सूचना वाहनचालक व नागरिकांना देण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुपोषणाचा सुटेना विळखा

0
0

त्र्यंबकमधील स्थिती; सरकारी यंत्रणा सुस्त

मध्यम कुपोषित बालके : १९२

तीव्र कुपोषित बालके : ५३

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर तालुक्यात वाढीस लागलेल्या कुपोषणाला आळा घालण्यात शासन यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. रोजगाराचा अभाव व त्यामुळे आलेली आर्थिक दुर्बलता आदी कारणांनी कुपोषण वाढत आहे. शासन यंत्रणांनी याबाबत अद्यापही गांभीर्याने लक्ष दिलेले नाही.

काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर येथे राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत येथे आले असता, कुपोषणावर चर्चा झाली होती. त्यानंतर नाशिक येथे बालविकास खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनीही आढावा घेतला होता. त्र्यंबकेश्वर तालुक्यात दोन बालविकास प्रकल्प आहेत. त्यामध्ये मध्यम कुपोषित १९२ आणि तीव्र कुपोषित ५३ बालके आहेत. रोजगाराचा अभाव व त्यामुळे आलेली आर्थिक दुर्बलता आदी कारणांनी कुपोषण वाढत आहे. शासन यंत्रणांनी याबाबत अद्यापही गांभीर्यार्न लक्ष दिलेले नाही. तालुक्यात हरसूल प्रकल्पात २०९ आणि त्र्यंबक प्रकल्पात १६८ अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांच्या माध्यमातून गर्भवती महिलांसह लहान बालकांना पोषण आहार दिला जातो. अंगणवाडी पोषण आहाराच्या बिलांबाबत वेळीच अदा न होण्याच्या तक्रारी सातत्याने होत असतात. गर्भवती महिलांना जेवण दिले जाते. त्यासाठी २५ रुपये शासन देत असते. अवघ्या २५ रुपयांत चौरस पोषक आहार बाजारात कोठे विकत मिळतो, याची शासनाने संबंधित कर्मचाऱ्यांना माहिती देण्याची आवश्यकता आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. अंगणवाडी इमारतींचा प्रश्न असाच प्रलंबित आहे. अत्यंत अल्प मानधनावर आणि तेदेखील वेळेत मिळत नाही तशात पोषण आहाराची बिले वर्षभर मिळत नाहीत. अशा विपरीत परिस्थितीत अंगणवाड्यांचे काम सुरू आहे. शासनाने याबाबत असलेल्या समस्या दूर केल्यास कुपोषण दूर होण्यास मदत होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अशी तयार होते पत्रावळी!

0
0

चित्रवृत्त

अशी तयार होते पत्रावळी!

राज्य सरकारने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्याने पळसाच्या पानांपासून तयार केल्या जाणाऱ्या पत्रावळ्यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. पण ही पत्रावळी नेमकी कशी तयार होते, याची माहिती देणारे हे चित्रवृत्त…

फोटो १ : आदिवासी बांधवांनी जंगलातून गोळा करून आणलेल्या पळसाच्या मोठ्या पानांची माळ विकत घेतली जाते.

फोटो २ : पळसाची पाने पत्रावळी बनविण्यासाठी मुलायम रहावी, यासाठी त्यावर पाणी मारले जाते.

फोटो ३ : पत्रावळीची पाने एकमेकांशी जोडण्यासाठी लागणारा बोरू साळला जातो.

फोटो ४ : पाण्याने भिजवून ठेवलेल्या पळसाच्या पानांची माळ मोकळी केली जाते.

फोटो ५ : पळसाची पाने बोरूच्या सहाय्याने एकसंधपणे एकमेकांशी जोडली जातात.

फोटो ६ : तयार झालेली पत्रावळी वजनदार दगडी वजनदार जात्याची तळी ठेवून कात्रीच्या सहाय्याने गोलाकार कापून घेतात.

फोटो ७ : पळसाची पाने आणि बोरू यापासून अशा प्रकारे गोलाकार पत्रावळी तयार होते.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्वस्तपदासाठी मोर्चेबांधणी

0
0

अधिसूचना जाहीर होण्यापूर्वीच इच्छुक लागले कामाला

केशव ढोन्नर, त्र्यंबकेश्वर

मकरसंक्रांतपूर्वी अवकाशात झेपावणाऱ्या पतंगांची काटाकाटी सुरू व्हावी, तशी येथे त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तपदासाठी इच्छुकांनी परस्परांचे दोर कापण्यास प्रारंभ केला आहे. स्वत:साठी मोर्चेबांधणी करीत असताना इतरांचे दोर कसे कापले जातील याची व्यूहरचनादेखील आखली जात आहे. खरोखरच योग्य व्यक्ती विश्वस्त म्हणून संस्थेवर नियुक्त झाली पाहिजे, अशी रास्त अपेक्षा काहींच्या अर्जामागे आहे, तर त्याचसोबत कुरघोडीच्या राजकारणात यापूर्वीचे हिशेब चुकते करण्यासाठी देखील जोरदार प्रयत्न होत आहेत.

विद्यमान विश्वस्तांची निवड ४ जून २०१३ रोजी झालेली आहे. पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण होण्यास अद्याप ४० दिवसांचा अवधी आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाची याबाबतची अद्याप कोणतीही सूचना जाहीर झालेली नाही. गतवेळी मे २०१३ मध्ये जाहीर सूचना प्रसिध्द झाली होती. अर्थात गतवेळेस झालेली निवड ही प्रदीर्घ न्यायालयीन प्रक्रियेने विश्वस्त मंडळाचा आराखडा निश्चित झाला. त्यानंतर निवड प्रक्रिया राबविण्यात आली होती. संबंधित विभागाची निवडणूक प्रक्रिया जाहीर होण्यापूर्वीच विश्वस्त कामाला लागले आहेत.

या पाच वर्षात विश्वस्तपदाला फारच महत्त्व आले आणि अनेकांना त्याचे आकर्षण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये विश्वस्त मंडळाने वेळोवेळी घेतलेले निर्णय नेहमीच चर्चेत राहिले. त्यातून आपणही विश्वस्त का होऊ नये? अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर शहराची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. येथे विश्वस्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी या सर्व घटकांचा विचार झाला तरच येथील अर्थकारणास गती प्राप्त होण्याची आशा आहे. त्र्यंबकेश्वर येथील नगरपरिषद या संस्थेच्या कारभाऱ्यांनी येथील अर्थव्यवस्थेस सकारात्मक परिणाम साधेल असे नियोजन करणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे देवस्थान ट्रस्टनेदेखील दर्शनाचे नियोजन करणे गरजेचे आहे. आजमितीस २०० रुपये देणगी शुल्क आकारून देवस्थान आपल्या उत्पन्नात वाढ करत आहे. परंतु, या उत्पन्नवाढीचा शहरातील बेरोजगार घटकांना कितपत फायदा होतो? असा प्रश्न येथील ग्रामस्थांना भेडसावतो. फूल, प्रसाद, नारळ आदी साहित्य विक्रीतून येथे व्यावसायिक उदरनिर्वाह करीत असताना मध्यंतरी फुलबंदी आणि आतापर्यंत नारळबंदी करून नेमके काय साध्य केले जाते? अशा एक ना अनेक अनुत्तरीत प्रश्नांच्या मालिका या पाच वर्षात निर्माण झाल्या आहेत. त्यातूनच यापुढे विश्वस्त नेमणूक होताना काय निकष बाळगावेत याचे संदेश सोशल मीडियावर फिरत आहेत. यामध्ये काही सामाजिक संघटनादेखील उतरल्या असून, यपुढील कालावधीत अर्ज आणि निवेदनांचे युध्द सुरू झाल्यास नवल वाटायला नको.

सुविधा पुरवण्यास अपयशी

वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न दानाच्या स्वरूपात मिळविणारे देवस्थान येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना उभे राहण्याची सुखदायी सुविधा देण्यास असफल ठरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाविकांच्या सेवा-सुविधांबाबत अशाच प्रकारची उदासीनता कायम आहे. सर्वसामान्य नागरिकांना विश्वस्त कोण होणार याची काळजी नाही. मात्र भाविकांच्या सेवा-सुविधांची जाण असलेल्यांनीच तेथे जावे, अशी रास्त अपेक्षा व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दररोज चौघांची घराला ‘सोडचिट्टी’

0
0

पाच वर्षात शहरातून साडेसात हजार जण बेपत्ता

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घरगुती भांडणे आर्थिक विवचंना, प्रेमप्रकरण, आजारपण विकृती अशा एक ना अनेक कारणांमुळे शहरात दररोज चौघे जण घर सोडून पळून जातात. मागील पाच वर्षांच्या काळात शहरातून सात हजार ५२९ नागरिक बेपत्ता झाले. त्यातील सहा हजार ४३१ जणांना पोलिसांनी शोधून परत आणले. मात्र, तरीही अकराशे नागरिक बेपत्ता असून, यात महिलांचे प्रमाण अधिक आहे, हे विशेष चिंतेची बाब.

अल्पवयीन मुलां-मुलींसोबत १९ ते ३५ वयोगटातील महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण मोठे आहे. त्याचे मुख्य कारण प्रेमविवाहाला घरातून होणारा विरोध असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तर लहान मुलींना लग्नाची फूस लावून पळवून नेण्याचे प्रकारही वाढत आहेत. यासाठी टीव्ही, इंटरनेट आणि बदलेली सामाजिक परिस्थिती कारणीभूत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. केवळ मौजमजा करायची म्हणून अल्पवयीन मुलं, मुली घरातून निघून जातात. तसेच आई-वडील रागावले म्हणून घरातून पलायन केलेल्या मुलांची संख्याही कमी नाही. छोट्या-छोट्या कारणांवरून घरातून निघून जाण्याचे प्रमाण वाढल्याने बेपत्ता झालेल्यांच्या तक्रारींचा ओघ वर्षागणिक वाढत आहे. पळून गेलेल्यांपैकी काही जणांचे अपहरण झाले असल्याची शक्यता असली तरी त्याचे प्रमाण एक टक्काही नसल्याचे पोलिसांची आकडेवारी सांगते.

याबाबत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले, की प्रत्येक व्यक्तीची कहाणी वेगळी असते. मागील काही वर्षांच्या आकडेवारीचा अभ्यास करता पळून जाणाऱ्यांचा शोध लागलीच घेतला जातो हे स्पष्ट होते. अनेकदा काही व्यक्ती पुन्हा यायचेच नाही म्हणून घरातून निघून जातात. अशा व्यक्तींचा शोध घेणे एक आव्हानच असते.

बऱ्याचदा व्यक्ती बेपत्ता झाली की नातलग पोलिस स्टेशनला येऊन तक्रार देतात. मात्र, बेपत्ता व्यक्ती पुन्हा घरी आल्यानंतर तशी माहिती पोलिसांना कळवित नाही. यामुळे बेपत्ता व्यक्तींचा आकडा वाढलेला दिसतो. याबाबत एक विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

बेपत्ता झालेल्यांची माहिती (प्रौढ व्यक्ती)

वर्ष....महिला....(सापडल्या)....पुरुष....(सापडले)

२०१३....६०९....(५७९)........५१४........(४५५)

२०१४....६१९....(५७७)........५१९........(४४५)

२०१५....६०१....(५२७)........६४३........(५२२)

२०१६....६७३....(५४९)........६०८........(५०९)

२०१७....७३०....(५८४)........६२३........(४९१)

२०१८....१८३....(१४२)........१४२........(१०७)

(आकडेवारी मार्च २०१८ पर्यंतची)

बेपत्ता व्यक्ती (लहान मुले-मुली)

वर्ष........मुले....(सापडले)....मुली....(सापडल्या)

२०१३....११५....(११४)........२०९....(२०६)

२०१४.....९८........(९७)........२००....(१९८)

२०१५....५०........(४८)........१०९....(१०४)

२०१६....४६........(४५)........६३.......(५८)

२०१७....४६........(३०)........८३........(६४)

२०१८....१६........(११)........३३........(१२)

(आकडेवारी मार्च २०१८ पर्यंतची)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समित्यांना बरखास्तीची नोटीस

0
0

देवळा, मनमाड, उमराणे, येवला व मालेगावचा समावेश

ही आहेत कारणे

- शेतमाल विक्रीनंतर २४ तासांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यात अनियमितता

- शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कामकाज न करणे

- कर्तव्य पार पाडण्यात जाणून बुजून कसूर करणे

म. टा. वृत्तसेवा, कळवण

शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीनंतर २४ तासांत त्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यात अनियमितता, शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कामकाज न करणे, आपली कर्तव्य पार पाडण्यात जाणून बुजून कसूर करणे अशा विविध कारणांमुळे देवळा व उमराणा बाजार समिती रद्द करून प्रशासक का नेमू नये, अशा आशयाची नोटीस जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी बजावल्याने खळबळ उडाली आहे. यासह सहकार विभागाने मनमाड, येवला व मालेगाव या बाजार समित्यांनाही बरखास्त का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावली आहे.

बाजार समितीत व्यापाऱ्यांनी आपली हेकेखोरी सुरू ठेवत शेतकऱ्यांना योग्यवेळी शेतमालाची रक्कम परत न केल्याचे निदर्शनास आले आहे. एका व्यापाऱ्याच्या लाखो रुपयांच्या देणीवरून ही नोटीस बजावण्याची नामुष्की देवळा बाजार समितीवर ओढवली आहे. संबंधित व्यापाऱ्याकडून येत्या दोन दिवसात थकीत येणी वसूल केली जाण्याची शक्यता असून, निर्धारित वेळेत ज्या कारणांमुळे नोटीस बजावण्यात आली आहे, त्यांची पूर्तता होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नुकतीच कळवण बाजार समितीने शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीनंतर रोख पेमेंट देण्यास सुरुवात केली असून, दोन लाख रुपयांपर्यंतचे पेमेंट रोख देताना वित्तीय संस्था व व्यापारी बांधव यांना सध्यातरी कुठलीही अडचण निर्माण होत नाही. शेतकऱ्यांना वेळेवर पेमेंट उपलब्ध झाल्यास बाजारपेठा गजबजून जातात. मात्र, नोटबंदीपासून शासन कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देत असल्याने त्यातच वित्तीय संस्थांमध्ये होणारा चलन तुटवडा यामुळे शेतकरी, व्यापारी हतबल ठरत आहेत.

देवळा बाजार समितीला ११ मेपर्यंत नोटिशीला उत्तर देण्यासाठी वेळ दिला असून, त्याआधी सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी बाजार समितीची यंत्रणा सज्ज झाली आहे. सहकार खात्याच्या या नोटिशीवर अपेक्षित पूर्तता होऊ शकली नाही, तर १४ मे रोजी सुनावणी घेण्यात येईल.

- संजय गिते, सहाय्यक उपनिबंधक, देवळा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी ‘वेटिंग’वर!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकात प्रतिष्ठानतर्फे २००७ पासून अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. निसर्गरम्य वातावरण आणि शांतचित्ताने होणारा अभ्यास यासाठी ही अभ्यासिका प्रसिद्ध असून, विद्यार्थ्यांना प्रवेश संपले आहेत असे सांगण्याची वेळ येते. येथे विद्यार्थी वेटिंगवर असतात अशी स्थिती आहे.

या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी २०० रुपये महिना असे शुल्क आकारले जाते. सकाळी ९ ते रात्री ९ अशी येथील वेळ असून, अनेक जण या अभ्यासिकेला प्राधान्य देतात. पार्टिशनसह टेबल, खुर्ची, लाइट, फॅन अशा सर्वच सुस्थितीतील सुविधा या अभ्यासिकेत असल्याने असंख्य विद्यार्थ्यांना येथे प्रवेश मिळावा म्हणून बराच कालावधीसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे. पिण्याच्या पाण्यासाठी असलेली चांगली व्यवस्था, तसेच दोन अत्याधुनिक स्वच्छतागृहे येथे असल्याने प्राधान्यक्रमाने कुसुमाग्रज अभ्यासिकेचे नाव विद्यार्थ्यांसमोर असते. स्मारकात सहा सेवकवृंद असून, येथील काम अत्यंत सुरळीत चालते. अभ्यासिकेची, तसेच वाचनालयाची देखभाल हा सेवकवर्ग करतो. येथे नियमित साफसफाई केली जाते, तसेच अतिशय शांततापूर्ण वातावरण असल्याने अभ्यासाला वाव मिळतो.

व्याख्याने, उपक्रम लाभदायक

या ठिकाणी शहरातील मान्यवर संस्थांतर्फे व्याख्याने, संगीत मैफली, नृत्याचे कार्यक्रम, चित्रकलेचे डेमो, शिल्पकलेचे डेमो असे विविध कार्यक्रम नियमितपणे होत असल्याने विद्यार्थी विरंगुळ्यासाठी येथे येतात. व्याख्यानांमध्ये अनेक विषय असल्याने त्याचा एमपीएससी, यूपीएससी, तसेच अन्य स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला उपयोग होत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

किरकोळ दुरुस्तीची गरज

दरम्यान, बरीच वर्षे झालेली असल्याने आता या अभ्यासिकेला रंग देण्याची गरज असून, काही ठिकाणी पाण्यामुळे ओल येऊन भिंतींचे पोपडे निघालेले आहेत, तेथेही दुरुस्तीची गरज आहे. इतर सुविधा मात्र मनासारख्या असल्याचे विद्यार्थी सांगतात. येथील विद्यार्थी अनेकदा गॅलरीत येऊनही अभ्यास करतात, तसेच पार्किंगमध्ये, सायंकाळच्या वेळी लॉन्सवरही अभ्यासाला बसतात. परिसर सीसीटीव्हीच्या कक्षेत असल्याने विद्यार्थिनींना सुरक्षित वाटते.

या अभ्यासिकेतील असंख्य विद्यार्थी सध्या विविध क्षेत्रांत मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत. असे पूर्वीचे, परंतु नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेले विद्यार्थी येथे अधूनमधून आवर्जून भेट देऊन समाधान व्यक्त करतात. असे विद्यार्थी आताच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरतात.

-रामदास जगताप, व्यवस्थापक

--

अभ्यासासाठी वेळ सोयीची आहे. परिसरात लॉन असल्यामुळे कंटाळा आल्यास फिरून येता येते. साफसफाई वेळेवर होते. अभ्यासास पूरक वातावरण आहे. वाचनालय असल्यामुळे वर्तमानपत्रे, तसेच मासिके, साप्ताहिके वाचनासाठी उपलब्ध असतात.

-प्रांजली निकम, विद्यार्थिनी

--

ही आभ्यासिका गंगापूररोडलगत असल्याने येणे-जाणे सोयीचे होते. पार्किंगसाठी उत्तम सोय आहे. वाचनालयाचा उपयोग करता येतो. सीसीटीव्हींमुळे सुरक्षितता असते. येथे होणारी विविध व्याख्याने, तसेच इतर कार्यक्रमांचा लाभ घेता येतो. सेवकांचे सहकार्य मिळते.

-स्वप्निल ठाणगे, विद्यार्थी

---

मटा मालिका

'परीक्षा' अभ्यासिकांची

कुसुमाग्रज अभ्यासिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटी पोलिसांकडून १०९ मोबाइल जप्त

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक शहरासह ग्रामीण भागात धारदार शस्त्राचा धाक दाखवून मोबाइल हिसकावणारे तसेच जबरी लूट करणाऱ्यांना पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच लाख ४६ हजार रुपयांचे १०९ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.

पंचवटी परिसरात सुनील उर्फ गटऱ्या नागू गायकवाड (रा. सिद्धार्थनगर झोपडपट्टी, कॅनडा कॉर्नर),  संपत लक्ष्मण वाघ (रा. वडगाव, ता. जि. नाशिक) आणि त्यांचा एक साथीदार तसेच विकी उर्फ गट्ट्या संजय जाधव (रा. अवधूतवाडी, दिंडोरी रोड, पंचवटी) आणि याचे दोन साथीदार यांनी नाशिक शहरासह सायखेडा, दिंडोरी, वणी, आडगाव, निफाड, पिंपळगाव आदी भागात दुचाकीवरून फिरून अंधाराचा फायदा घेत निर्जन स्थळी लोकांना अडवून त्यांच्याकडील मोबाइल हिसकावून घेतले होते. तसेच हत्याराचा धाक दाखवून जबरी चोरी व लूट केली आहे. भाजीबाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या खिशातील मोबाइलही त्यांनी हातचलाखीने लंपास केले आहेत, अशी त्यांनी कबुली दिली आहे. या संशयितांकडून ५ लाख ४६ हजार रुपयांचे १०९ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाइल हॅण्डसेट जप्त केले आहेत. पंचवटी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर, उपनिरीक्षक महेश इंगोले, बाळनाथ ठाकरे, विलास बस्ते आदींनी हा तपास केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इंदिरानगर भागात भारनियमाचा फटका

0
0

इंदिरानगर भागात भारनियमाचा फटका

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

शहरात दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असतानाच वीज वितरण कंपनीने इंदिरानगरसह सिडकोतील काही भागात अचानकपणे भारनियमन सुरू केल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या आहेत. भारनियमनमुक्‍तीची घोषणा केली जात असली, तरी शनिवारी इंदिरानगरसह सिडको परिसरात किमान चार ते पाच तास वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. इंदिरानगर भागात सकाळी दहा वाजता वीजपुरवठा बंद करण्यात आला तो थेट दुपारी दोन वाजताच सुरू करण्यात आला. याबाबत नागरिकांनी वीज वितरण कंपनीशी संपर्क साधून विचारले असता दुरुस्तीच्या कामासाठी हे भारनियमन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, ऐन उन्हाळ्यात भारनियमन करण्याची गरजच काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. गत आठवड्यापासून इंदिरानगर भागातील राजीवनगर व परिसरात दररोज वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून, ऐन उन्हाळ्यात अशा प्रकारे भारनियमन करू नये, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्‍त केली आहे. कामटवाडे व अन्य भागातही अनेकदा अशा प्रकारे अचानकपणे वीजपुरवठा खंडित होत असून, हे भारनियमन थांबवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्टची आज विशेष सभा

0
0

मालेगाव : येथील मालेगाव केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन आज (२९ एप्रिल) करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता टेहरे चौफुली येथील अमेय लॉन्स येथे ही सभा होणार आहे. अखिल भारतीय तसेच महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे या सभेस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे व आमदार असिफ शेख हे देखील प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत.

अध्यक्ष जगन्नाथ शिंदे व अनिल नावंदर यांचे विशेष मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष स्व. प्रमोदभाई मेहता यांच्या स्मरणार्थ होतकरू गरीब विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले जाणार आहे. तसेच २०२५ मध्ये टीबीमुक्त भारत व मुलगी वाचवा याविषयी देखील जनजागृतीपर कार्यक्रम होणार आहे. तसेच केमिस्ट ग्रंथालय व केमिस्ट पुस्तिकेचे लोकार्पण केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुगलद्वारे शोधणार अतिक्रमण

0
0

वनविभागाचा निर्णय; 'सॅटेलाइट इमॅजिनरी'चा होणार वापर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक पश्चिम क्षेत्रातील वन विभागाच्या जागेवर असलेल्या अतिक्रमणाचा शोध आता गुगलद्वारे घेतला जाणार आहे. गुगल अर्थ आणि सॅटेलाइट इमॅजिनरी सिस्टिमच्या माध्यमातून अतिक्रमणांचा छडा लावला जाणार आहे. त्यासाठी सेवानिवृत्त वनाधिकाऱ्यांचीही नियुक्ती केली जाणार आहे.

महाराष्ट्रात वन जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असल्याने मूळ आदिवासी असलेल्या व्यक्तींच्या अधिवासाला धोका उत्पन्न झाला आहे. त्यातच वन जमिनीच्या आसपास राहणारे नागरिक वनजमिनीवर अतिक्रमण करीत असल्याचे जंगलाचा ऱ्हास होत असल्याचे निर्दशनास आले होते. जंगलातील अतिक्रमण रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गुगल अर्थ सॅटेलाइट इमॅजिनरी सिस्टीमच्या आधारे शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. या शोध मोहिमेत नाशिक पश्चिम विभागातील अनेक गावांचा समावेश आहे. जंगलांचा विस्तार मोठा असल्याने अतिक्रमण शोधण्यास अडचण येत होती. ती आता या सिस्टीममुळे शोधणे सोयीचे होणार आहे. नाशिक पश्चिम विभागात २० अति संवेदनशील क्षेत्रे आहेत तेथे बहुतांश वेळा अतिक्रमण झाल्याच्या तक्रारी या अगोदर प्राप्त झाल्या होत्या. झालेले अतिक्रमण लगेच समजल्याने त्यावर कारवाई करणे लगेचच शक्य होणार आहे.

या भागात अधिक अतिक्रमण

नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, हरसूल, बाऱ्हे, त्र्यंबकेश्वर, ननाशी, इगतपुरी भागात मोठ्या प्रमाणात वनजमिनी आहेत त्यावरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण प्रत्यक्ष जाऊन शोधणे कठीण असल्याने ते शोधण्यासाठी गुगुल अर्थ सॅटेलाइट इमॅजिनरी सिस्टीमचा आधार घेतला जाणार असून त्यामुळे जंगलाच्या कोणत्या भागात अतिक्रमण झाले हे कळण्यास मदत होणार आहे.

सेवानिवृत्तांना प्राधान्य

पश्चिम भाग, नाशिक विभागांर्तगत अतिक्रमणाची पडताळणी करण्यासाठी गुगल अर्थ सॅटेलाइट इमॅजिनरी सिस्टीमचे ज्ञान असलेल्या एका व्यक्तीची नेमणूक करण्यात येणार आहे. शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या पात्र उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

पश्चिम नाशिक

वनपरिक्षेत्रांची संख्या : ८

वनपरिक्षेत्र : हरसूल, पेठ, बाऱ्हे, ननाशी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक

परिमंडळांची संख्या : ३६

नियतक्षेत्र संख्या : १२६

साधारण क्षेत्र : ८७

संवेदनशील क्षेत्र : १९

अतिसंवेदनशील क्षेत्र : २०

एकूण वनक्षेत्र : ८९,७२३ हेक्टर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कर्तव्य पालनावर प्रत्येकाने भर द्यावा’

0
0

कळवण : भारतातील नौदलाचे कार्य खूप महत्त्वाचे आहे. देशात केवळ हक्क गाजविण्यापेक्षा कर्तव्य पालनावर जर प्रत्येकाने भर दिला तर भारत जगावर राज्य करेल, असे मत भारतीय नौदलाचे व्हाईस अॅडमिरल सुनील भोकरे यांनी व्यक्त केले.

कळवण येथील लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात आयोजित सत्कार सोहळ्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी समाजाध्यक्ष डॉ. पी. एच. कोठावदे होते. यावेळी नाशिक विभागाचे अध्यक्ष भास्करराव कोठावदे तसेच, खान्देशरत्न पुरस्कार प्राप्त राजेश कोठावदे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास नगराध्यक्ष सुनीता पगार, उपनगराध्यक्ष भाग्यश्री पगार, मीनाक्षी मालपुरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. प्रतीभा जाधव यांना राज्यस्तरीय पुरस्कार

0
0

निफाड : लासलगाव येथील कला वाणिज्य व विज्ञान कॉलेजच्या प्रा. डॉ. प्रतीभा जाधव यांना सन २०१६-१७ चा राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सोमवारी (३० एप्रिल) सकाळी अकरा वाजता भालचंद्र ब्लड बँक हॉल, लातूर येथे माजी साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस व लातूर जि. प.चे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, खासदार सुनील नाईकवाडे यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images