Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दुष्काळाची किंमत ३१ कोटी!

$
0
0
गेल्यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीला तोंड देताना सुमारे ३१ कोटी रुपये खर्ची पडले आहेत. टँकर्सच्या पुरवठ्यासह विविध दुष्काळी कामे जिल्ह्यात करण्यात आली आहेत.

पंतप्रधान निधीचे योग्य नियोजन करा

$
0
0
उत्तराखंड येथे झालेल्या महाप्रलयाने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून त्यांना मदतीची आवश्यकता आहे. शहरात अनेक संघटनांनी मदत जमा केली असून ती कुठे जमा करायची याबाबत त्यांना माहीत नव्हते. प्रशासनासही माहिती नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.

शहीद पवार यांच्यावर अंत्यसंस्कार

$
0
0
उत्तराखंडातील गौरीकुंड येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेतील शहीद जवान शशिकांत पवार यांच्या पार्थिवावर शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथे शासकीय इतमामात शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

कर्मचा-यांच्या प्रश्नासाठी कास्ट्राईब कटिबध्द

$
0
0
मागासवर्गीय कर्मचारी व वरिष्ठ अधिका-यांमध्ये प्रशासकीय कामात समन्वय होत नसून कर्मचा-यांच्या अहिताचे निर्णय प्रशासन घेत असल्याची बाब उघडकीस आली आहे. याबाबत मुख्य सचिवांनी प्रशासनाला आदेश देऊनही त्यांच्या आदेशाचे पालन होत नसल्याचे कास्ट्राईब संघटनेचे म्हणणे आहे.

विमानतळाचा मुहूर्त नोव्हेंबरमध्येच !

$
0
0
ओझर येथील विमानतळाच्या पॅसेंजर टर्मिनलचे काम युद्धपातळीवर सुरू असून नोव्हेंबर अखेरीसच ते सेवेत आणण्याचे प्रयत्न आहेत. पर्यावरण मंजुरीअभावी जिल्ह्यात बंद असलेल्या खडी, क्रशरचा कुठलाही परिणाम टर्मिनलच्या कामावर झालेला नाही. त्यामुळे डिसेंबरमध्ये हे टर्मिनल सेवेत येणार आहे.

खासगी कारखानदारी हा दरोडा!

$
0
0
‘सहकारी कारखाने काढणाऱ्यांचे वंशज खासगी कारखाने काढत आहेत. खासगी कारखाने काढणे म्हणजे पुरूषार्थाचे लक्षण समजत असले तरी ते दरोडखोरीचे लक्षण आहे, असा आरोप करतानाच, ‘राज्यकर्ते या प्रकाराला पाठिंबा देत असल्याबद्दल ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी खंत व्यक्त केली.

स्थित्यंतरामुळे विषमतेचा धोका

$
0
0
औद्योगिकीकरणाच्या प्रभावातून नव्याने साकारलेली अर्थव्यवस्था आणि केवळ ज्ञानार्जनावर भर देणारी पारंपरिक शिक्षणप्रणाली यांच्यात सांगड घालणे ही काळाची गरज आहे. या स्थित्यंतरात समाजात विषमता निर्माण होण्याचा धोका आहे, असा इशारा ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांनी दिला.

'आम आदमी'च्या फेरीतून १० हजाराची मदत जमा

$
0
0
उत्तराखंडमध्ये झालेल्या महाजलप्रलयातील आपदग्रस्त भाविकांच्या मदतीसाठी आम आदमी पार्टीतर्फे नाशिकरोड परिसरात मदत फेरी काढण्यात आली. या फेरीत दहा हजार रुपयाचा निधी जमा झाला.

संशयितांना १० दिवसांची कोठडी

$
0
0
पिंपळगाव-बसवंत येथील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर पोलिसांनी अटक केलेल्या चौघा संशयितांना निफाड येथील कोर्टाने १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. उर्वरित चौघांचा पोलिस शोध घेत असून या घटनेमुळे जिल्ह्याभरात संतपाचे वातावरण आहे.

नाशिकरोडला रोगराईत वाढ

$
0
0
नाशिकरोड परिसरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून अस्वच्छतेमुळे रोगराईत वाढ झाली आहे. सरकारी आणि खाजगी दवाखान्यांमध्ये पेशंटची गर्दी झाली असून स्वच्छता न झाल्यास यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

मोहरलेल्या माहोलमध्ये झळकले 'नाशिक रायझिंग'

$
0
0
नाशिकचं अवघं संचित चित्रबद्ध केलेल्या नाशिकच्या लोगोचं अनावरण, नाशिकमधील विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा सहवास अन् सोबतीला रिमझिम बरसणारा पाऊस अशा मोहरलेल्या माहोलमध्ये रायझिंग स्टार्सच्या हस्ते 'नाशिक रायझिंग' या कॉफी टेबल बुकचं प्रकाशन शनिवारी करण्यात आलं.

'आयटीआय'च्या ऑनलाईन प्रक्रियेला ग्रहण

$
0
0
राज्यभरात यंदापासून ऑनलाईन पध्दतीने सुरू करण्यात आलेल्या नव्या पध्दतीला सुरूवातीपासूनच ग्रहण लागले आहे. २४ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असली तरी वेबसाईट बंद असल्याने विद्यार्थ्यांना प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही.

'एसटी'चा भाववाढीचा दणका

$
0
0
कामगारांची वेतनवाढ आणि डिझेलचे वाढते भाव यामुळे त्रस्त झालेल्या एसटी महामंडळाने आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी भाववाढीचा निर्णय घेतला असून १ जुलैच्या मध्यरात्रीपासून नवीन दर लागू होणार आहेत. या निर्णयाचा फटका शहरातंर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील सहन करावा लागणार आहे.

वर्षभरात १६९ घरमालकांना दणका

$
0
0
भाडेकरूंची माहिती लपवून ठेवली म्हणून पोलिसांनी वर्षभरात एकूण १६९ घरमालकांवर कलम १८८नुसार कारवाई केली आहे. विविध प्रकारे सवलती देऊनही माहिती देण्यास घरमालकांकडून टाळटाळ केली जाते.

विद्यापीठ कॅम्पसमध्ये 'मनविसे'चाही वाटा

$
0
0
पुणे विद्यापीठाशी संलग्न नाशिकमधील विविध विद्यार्थ्यांचे प्रश्न वेळोवेळी पुणे विद्यापीठांपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने पोहचविले आहेत.

नियम म्हणजे नियम !

$
0
0
नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर नेहमीच पर्यटकांची गर्दी असते, येथे त्र्यंबकला व शिर्डीला जाण्यासाठी भावीक नाशिकरोड स्थानकावर उतरतात. काही उत्तर भारतातील भावीक नाशिकरोड स्थानकावर उतरतात. भाविक खेड्यातील असल्याने शहराचा डोलारा पाहून थोडे गांगरुन गेले.

रेल्वेत हवेत महिला सुरक्षा रक्षक

$
0
0
महाराष्ट्रात रेल्वेच्या सुरक्षेची जबाबादारी 'जीआरपीएफ' व 'आरपीएफ' यांच्यावर आहे. रेल्वेत घडणारे बहुतांश गुन्हे हे महिलांच्या संबंधी असतात. परंतु त्याचा तपास करणारे अधिकारी मात्र पुरुषच आहेत. रेल्वे प्रवासादरम्यान महिलांच्या डब्यात व स्थानकावर महिला पोलिसांचा बंदोबस्त असायला हवा.

जिल्हा कोर्टात मेडिएशन क्लिनिक

$
0
0
जिल्हा कोर्टात २००९मध्ये मेडिएशन सेंटर सुरू केल्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या नवीन निर्देशानुसार आता मेडिएशन क्लिनिक सुरू करण्यात आले. रविवारी या क्लिनिकचे उद्‌घाटन झाले. यामुळे संबंधित खटला कोर्टापुढे जाण्यापूर्वीच तडजोड करणे यापुढे शक्य होणार आहे.

जात वैधतेला हमीपत्राचा पर्याय

$
0
0
व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे, या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना बंधनकारक करण्यात आले होते. परंतु आता ही अट शिथिल करण्यात आली असून विद्यार्थी याबाबतचे हमीपत्र सादर करून प्रवेश मिळवू शकतात.

सोने पुन्हा झळकणार ?

$
0
0
बाजारात सोन्याचे भाव कमी झाल्याने नाशिकच्या सराफ बाजारात मोठ्या प्रमाणात सोने खरेदीची उलाढाल झाली. शहरातील दुकानांमध्ये गर्दी उसळल्याने व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. सोन्याचा १० ग्रॅमचा भाव शनिवारी २५,८०० होता तर रविवारी हाच भाव २६ हजार झाला.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images