Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

प्रकल्पग्रस्तांना वाटाण्याच्या अक्षता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शहारतील एमआयडीसीसाठी शेतजमिनी देणाऱ्यांच्या मागण्यांकडे एमआयडीसीचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. गतवर्षी प्रकल्पग्रस्त बचाव संघर्ष समितीतर्फे आयमा या औद्योगिक संघटनेची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर एमआयडीसीने प्रकल्पग्रस्तांना न्याय दिला जाईल, असे सांगितले होते. परंतु, आजही स्थिती जैसे थे असल्याचे चित्र आहे. मागण्या मान्य न झाल्याने लवकरच उद्योग भवनाला घेराव घालत आंदोलन छेडले जाईल, असा इशारा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी दिला आहे.

नाशिक शहरात औद्योगिक वसाहतीची स्थापना झाल्यावर हजारो एकर शेतजमिनी सातपूर व अंबड एमआयडीसीतील शेतकऱ्यांनी कारखान्यांसाठी दिल्या. परंतु, त्याच शेतकऱ्यांच्या मुलांना कारखान्यांमध्ये काम मिळविण्यासाठी आजही झटावे लागत आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना किमान छोटा व्यवसाय करण्यासाठी भूखंड मिळावेत, अशी मागणी सातत्याने करण्यात येते. मात्र, त्याकडे एमआयडीसीकडून दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी आमच्यावर अन्याय होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातच औद्योगिक संघटनेत काम करणाऱ्यांना एमआयडीसीकडून भूखंड मिळतातच कसे, असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी वर्षभरापूर्वी आयमा या औद्योगिक संघटनेची प्रतीकात्मक अंत्ययात्रा अंबड गावातून काढली होती. मात्र, त्यावेळी देण्यात आलेल्या आश्वासनाची अजूनही पूर्तता झालेली नाही. त्यामुळे आता उद्योग भवनालाच घेराव घालण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.

सातपूर व अंबड गावांतील शेतकऱ्यांनी कारखान्यांसाठी शेकडो एकर जमिनी दिल्या. त्यावेळी शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या अथवा व्यवसायासाठी जागा देण्यात येईल, असे एमआय़डीसीकडून सांगण्यात आले होते. परंतु, आजही शेतकऱ्यांच्या मुलांना एमआयडीसीकडून काहीही मिळाले नसल्याने लवकरच उद्योग भवनाला घेराव घालून आंदोलन करणार आहोत.

-साहेबराव दातीर, अध्यक्ष, प्रकल्पग्रस्त बचाव संघर्ष समिती

लोगो : वर्षभरानंतर...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिरावणीत रंगला गहिनीनाथ यात्रोत्सव

$
0
0

महिरावणीत रंगला गहिनीनाथ यात्रोत्सव

सातपूर : त्र्यंबकेश्वररोडवरील महिरावणी गावात गहिनीनाथ यात्रोत्सव पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. यात्रेनिमित्त गावात उत्साहाचे वातावरण होते. विविध धार्मिक कार्यक्रमांसह ग्रामस्थांसाठी लोकसंगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा आनंद पंचक्रोशीतील रहिवाशांनी लुटला. यात्रेनिमित्त विरंगुळा म्हणून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनादेखील उतस्फूर्त प्रतिसाद लाभला. उपसरपंच रमेश खांडबहाले , तसेच परिसरातील रहिवाशांनी यात्रोत्सव यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

--

उन्हाळी वर्गाचा समारोप (फोटो)

नाशिक : नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळांतील विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या उंटवाडी शाळेत झालेल्या क्रिकेट प्रशिक्षण वर्गाचा नुकताच समारोप झाला. संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर अध्यक्षस्थानी होते. रणजीपटू अमित पाटील, प्रशिक्षक अमित झडप, संस्था कार्यवाह राजेंद्र निकम, शिक्षक मंडळ उपाध्यक्ष दिलीप अहिरे, निमंत्रक राजेंद्र कापसे, मंगल मुसळे आदी उपस्थित होते. यावेळी प्रशिक्षण वर्गात सहभागी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अनेक खेळाडूंनी मनोगत व्यक्त केले.

--

विवाहात रोपवाटप (फोटो)

पंचवटी : विवाहाप्रसंगी उपस्थित राहणाऱ्या वऱ्हाडी मंडळींना नवनाथपंथी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे प्रकाश बर्वे यांनी कडुनिंबाच्या रोपांचे वाटप केले. ही रोपे लावण्याचा आग्रह धरून पर्यावरणांचे संरक्षण करण्याची विनंतीही केली. प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर केल्याने होणारे दुष्परिणाम सांगून प्लास्टिक न वापरण्याची शपथ घेण्याबाबतही त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांना एस. के. आर्टसचे कलाकार चेतन भांडारकर, अविनाश दळवी, आकाश मुर्तडक, गौरव तांबोळी आदींचे सहकार्य लाभत आहे.

--

जिमखान्यावर गर्दी

जेलरोड : नाशिकरोड प्रेसच्या जिमखान्यावर सकाळी व सायंकाळी जॉगिंगसाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जिमखाना परिसरात घनदाट झाडी आहेत. प्रेसच्या आवारात जुन्या काळातील बंगले आहेत. झाडांमुळे हवाही थंड असते. त्यामुळे येथे व्यायामप्रेमींची गर्दी होत आहे. लहान मुलेदेखील येथे विविध क्रीडाप्रकारांचा आनंद लुटताना दिसत आहेत. येथील स्वच्छता आणि मूलभूत सुविधांबाबत नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोट सुस्थितीत; कर्मचारी अपूरेच

$
0
0

अग्निशमनच्या आपत्कालीन विभागाची परिस्थिती

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण परिसरात सुट्यांमध्ये फेरफटका मारण्यासाठी तरुण जात असतात. यात अनेकदा धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यावेळी कामात येणाऱ्या आपात्कालीन बोटी या सध्या चांगल्या अवस्थेत असून, त्यांची वर्षभरापूर्वीची अवस्था सुधारली आहे. मात्र, नवीन कर्मचाऱ्यांच्या भरतीची अपेक्षा करण्यात येत आहे.

निर्सगाचा आनंद घेण्यासाठी गंगापूर धरण परिसरात पर्यटकांची उन्हाळ्यात गर्दी होत असते. धरणाचा पाणीसाठा कमी झाल्याने निर्सगाचा आस्वाद घेण्यासाठी येत असलेल्या तरुणांना धरणाच्या पाण्याचा अंदाच येत नसतो. यात तरुण पाण्यात उतरण्याचा मोह आवरता येत नसल्याने अनेकवेळा त्यांना प्राणही गमवावे लागले आहेत. अशावेळी कामाला येणाऱ्या अग्निशमन दलाकडे आपत्कालीन बोटी देण्यात आल्या होत्या. त्यांची सज्जता असल्यास बुडणाऱ्यांना तातडीने वाचवता येऊ शकते. मात्र, अशावेळीच जर कर्मचारी संख्या कमी असेल तर त्यामध्ये कसूर राहू शकते. ही संख्या वाढवल्यास कार्य तत्परतेने होईल.

महापालिका आयुक्तांनी लक्ष द्यावे

गंगापूर धरणात पाण्यात बुडालेल्यांना शोधण्यासाठी अग्निशमन दलाकडे आपत्कालीन बोटी आहेत. त्या गेल्यावर्षी धूळ खात पडून असल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. परंतु, सद्यस्थितीत या आपत्कालीन बोटींची सुस्थिती असल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले. यामध्ये चार रबरी आपत्कालीन बोट शिंगाडा तलाव येथील मुख्य अग्निशमन केंद्रावर तैनात आहेत. त्यामधील एक लाकडी असलेल्या बोट आपत्कालीन घटनेत नेण्यासाठी अवजड असल्याने ट्रकचा सहारा घ्यावा लागतो. त्यातच तिला उचलण्यासाठी तब्बल पंधराहून अधिक कर्मचाऱ्यांची गरज भासते. यामुळे लाकडी बोट सातपूरच्या अग्निशमन केंद्रात आजही पडून आहे. अग्निशमन दलाकडे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी रबरी चार बोटी तयार असताना कर्मचारी संख्या मात्र आजही अपुरीच असल्याचे सांगण्यात आले. याबाबत महापालिका आयुक्तांनी अग्निशमन दलात नव्याने भरती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमध्ये जल जनजागृती रॅली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेतर्फे नगरविकास दिनाचे औचित्य साधत कुशावर्तावर गंगापूजन करून जल जनजागृती रॅली काढण्यात आली. गोदावरीच्या पुनरुज्जीवनासाठी उगमस्थानापासून नदीला मिळालेले जलस्रोत पुनरुज्जीवित करण्याचे काम त्र्यंबकेश्वर नगरपालिका व नमानी गोदा फाउंडेशनच्या वतीने हाती घेण्यात आले आहे.

त्र्यंबकेश्वर येथे जल जनजागृती रॅलीसोबत कुशावर्त येथे मान्यवरांच्या हस्ते गंगापूजन करण्यात आले. यावेळी नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संजय दराडे, महामंडळेश्वर स्वामी सोमेश्वरानंद महाराज, नमानी गोदाचे राजेश पंडित, अभिनेता चिन्मय उदगीरकर, धनश्री क्षीरसागर, लक्ष्मण सावजी, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष स्वप्निल शेलार, मुख्याधिकारी डॉ. चेतना केरुरे उपस्थित होते.

जलजागृती रॅलीच्या समारोप शिवनेरी चौकात करण्यात आल्यानंतर मान्यवरांनी आपले विचारधन प्रकट केले. देशाच्या विकासात गोदावरीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भविष्यात गोदावरी नदीचे पावित्र्य टिकून राहण्यासाठी तसेच नदी बारमाही होण्यासाठी ब्रह्मगिरी पर्वत सुजलाम सुफलाम करणे आपली जबाबदारी आहे. त्याची जाणीव ठेवत गोदावरी पुनर्जिवित करण्यासाठी सर्वांनी सोबत येण्याचे ऐतिहासिक कार्य केले असून, आता नमानी गोदा प्रकल्प लोकचळवळ होणे गरजेचे असल्याचे पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात नगरविकास दिन साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते गोदावरी पुनर्जिवित करण्यासाठी मदत करणाऱ्या सामाजिक संस्था यांचा तसेच, नगरपालिकेत उत्कर्ष कार्य करणारे कर्मचारी अमोल दोंदे, विनय गोसावी यांचा सत्कार करण्यात आला. अभिनेती चिन्मय उदगीरकर व पोलिस अधीक्षक संजय दराडे, लक्ष्णम सावजी, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर आदींनी मनोगत व्यक्त केले. गटनेता समीर पाटणकर यांनी प्रस्तावनेतून गेल्या चार महिन्यांत गोदावरी पूर्वजीवित करण्यासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. यावेळी नगरसेवक श्याम गंगापुत्र, सागर उजे, विष्णू दोबाडे, श्रीकांत गायधनी यांच्यासह सर्व नगरसेवक, पोलिस निरीक्षक रविकांत सोनवणे व ग्रामस्थ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतीसह सासच्यांनी जाळल्याची तक्रार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

स्टोव्हच्या भडक्याने नव्हे तर पतीसह सासू व नंणदेने रॉकेल टाकून पेटवून देत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद ज्योती दीपक साठे (रा. चंदनवाडी, देवळालीगाव) या महिलेने नाशिकरोड पोलिस ठाण्यात दिली आहे. संबंधित महिला स्टोव्हच्या भडक्याने भाजल्याचे प्रकरण फेब्रुवारीमध्ये दाखल होते.

पती दीपक अशोक साठे याने प्लास्टिकच्या बाटलीतील रॉकेल टाकून २५ फेब्रुवारीस रात्री साडेदहाच्या सुमारास ज्योतीला पेटवले. त्यावेळी सासू मुक्ताबाई साठे हिने तिला पकडून ठेवले. याशिवाय नणंद राणी साठे हिने घराच्या दरवाजाला कडी लावली. या तिघांनी ज्योतीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, ज्योतीने आराडाओरड केल्याने परिसरातील लोक जमा झाल्याने दीपकने तिला बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या घटनेनंतर खरा जबाब दिल्यास पती, सासू व नातेवाइकांनी दोन्ही मुलींना मारून टाकण्याची धमकी दिली होती. त्यामुळे पोलिस व न्याय दंडाधिकाऱ्यांना दिलेला जबाब दोन्ही मुलींना वाचविण्यासाठी खोटा दिला होता, अशी फिर्याद ज्योती साठे यांनी दिली आहे.

प्रकरणाला कलाटणी

विशेष म्हणजे या प्रकरणातील पीडित महिलेचा पती इगतपुरी न्यायालयात शिपाई म्हणून कार्यरत आहे. तो मोबाइलद्वारे मोरे नावाच्या तरुणीशी वारंवार चॅटिंग करीत असे. हा प्रकार लक्षात आल्यावर ज्योतीने याबाबत विचारणा केली. यानंतर दीपकने मारहाण करून रॉकेल टाकून पेटवून दिल्याचे ज्योतीने नव्याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिरे महाविद्यालयात ‘एनसीसी’तर्फे स्वच्छता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी कॉलेजचा परिसर स्वच्छ करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ भारत अभियान राबविले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी परिसरातील कन्नमवार पूल ते कॉलेज परिसरात स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली. या दोन्ही ठिकाणच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी हा परिसर स्वच्छ करण्यासाठी उत्स्फूर्त योगदान दिले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. जगदाळे, उपप्राचार्य डॉ. रवींद्र देवरे, प्रा. डी. एस. शिंदे, एनसीसी विभागाचे प्रमुख प्रा. सचिन सोनवणे यांच्या उपस्थितीत एनसीसीच्या विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहिर समाजाची आज सभा

$
0
0

अहिर समाजाची वार्षिक सभा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकरोड देवळाली येथील अहिर सुवर्णकार समाज संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज, रविवारी (दि. २९) आयोजित करण्यात आली आहे. ही सभा जेलरोडवरील दसक गाव येथील मारुती मंदिराजवळ होणार आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दुसाने राहणार आहेत.

या वार्षिक सर्वसाधारण सभेत समाजाचे नियोजित मंगल कार्यालय बांधकाम, त्यासाठी लागणारा निधी, समाजातील आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षण निधी उभारणे त्यासाठी तज्ज्ञांची शिक्षण समिती स्थापन करणे यांसह विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. संस्थेच्या आजीव सभासदांसह सर्व समाजबांधवानी या सभेस आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र दुसाने, उपाध्यक्ष रवींद्र जाधव, सचिव संतोष सोनार, खजिनदार विनोद खरोटे आदींसह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कमी मोबदला हा प्रशासनाच भंपकपणा

$
0
0

शेतकरी संघर्ष समितीचा आरोप

म. टा. प्रतिनिधी,नाशिक

भूसंपादन कायद्याद्वारे जमीन संपादित करताना प्रकल्पग्रस्तांना बाजारभावाच्या चारपट आणि रेडिरेकनरच्या पाचपट मोबदला द्यावा लागतो. त्यामुळे थेट भूसंपादन कायद्याद्वारे जमीन संपादित केल्याने शेतकऱ्यांचे २५ टक्के आर्थिक नुकसान होईल, हा जिल्हा प्रशासनाचा भंपकपणा असल्याचा दावा समृद्धीबाधित शेतकरी संघर्ष समितीने शनिवारी केला.

समृद्धी महामार्गासाठी २०१३ च्या भूसंपादन कायद्यामध्ये दुरुस्तीला राष्ट्रपतींनी मान्यता दिल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी सांगण्यात आले. या दुरुस्तीमुळे थेट खरेदीने जमिनी देण्यास शेतकरी तयार नसतील तर भूसंपादन कायद्यान्वये प्रशासनाला जमिनी घेता येणार आहेत. थेट खरेदीने पाचपट मोबदला दिला जात असून या कायद्यान्वये चारपटच मोबदला मिळेल अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध होण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी आर्थिक मोबदल्याचा लाभ पदरात पाडून घ्यावा, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे. प्रशासनाच्या या आवाहनाचा समृद्धीबाधित शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी समाचार घेतला आहे. भूसंपादन कायदा हा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. या कायद्यान्वये शेतकऱ्यांना अधिक मोबदला आणि अधिक फायदे मिळावेत, अशी मागणी आहे. मात्र, ७० टक्के भूसंपादनाचे उद्दिष्ट पूर्ण केल्याशिवाय सरकारला आणि प्रशासनालाही कामे अॅलॉट करणे शक्य होत नाही. त्यामुळेच हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याचा आरोप राजू देसले यांनी केला आहे. या कायद्यान्वये बाजारभावाच्या चारपट आणि रेडीरेकनरच्या पाचपट मोबदला मिळू शकतो. असे असताना शेतकऱ्यांना २५ टक्के नुकसान सहन करावे लागेल, असे अधिकाऱ्यांनी सांगणे हा भंपकपणा असल्याचा दावाही देसले यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नोकराने लांबविले साडेतीन लाख रुपये

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बँकेत भरणा करण्यासाठी दिलेले तब्बल साडेतीन लाख रुपयांचा परस्पर अपहार केल्याप्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये एका नोकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सतिश हरिश्चंद्र तावडे यांनी फिर्याद दिली आहे.

अबिद साहेबखान पठाण (रा. पखालरोड, साईदर्शन अपार्ट. वडाळागाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. संशयिद अबिद कॉलेजरोडवरील एका शूज विक्री दुकानात कामाला असून, त्याच्याकडे दुकानातील पैसे बँकेत जमा करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. अबिद २६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास दुकानातून पैसे घेऊन बाहेर पडला. मात्र, त्याने ही रक्कम बँकेत भरलीच नाही. अबिद परत न आल्याने तावडे यांनी चौकशी करण्यास सुरुवात केली असता तो पळून गेल्याचे समोर आले. त्यानुसार, तावडे यांनी गंगापूर पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली. घटनेचा अधिक तपास पीएसआय कोल्हे करीत आहेत.

सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक

सरकारी नोकरीला असल्याचे सांगत विवाह करणाऱ्या तरुणाविरोधात पंचवटी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी विवाहितेने तक्रार दिली असून, सासरच्यांनी कौटुंबिक छळ केल्याचेही विवाहितेने तक्रारीत नमूद केले आहे. फसवणुकीचा प्रकार दिंडोरी रोडवरील पोकार कॉलनीत घडला.

या प्रकरणी स्वाती प्रवीण गांगुर्डे (२९, रा. गणेश अपार्टमेंट, पोकार कॉलनी, दिंडोरी रोड) यांनी फिर्याद दिली आहे. विवाहापूर्वी प्रवीण हिरामण गांगुर्डे हा सरकारी नोकरीस असल्याचे खोटे सांगून संशयित हिरामण रामजी गांगुर्डे (सासरे), लिलाबाई हिरामण गांगुर्डे (सासू), सागर हिरामण गांगुर्डे (दीर), संतोष वाघ, निर्मला राजेंद्र भडांगे यांनी स्वाती यांचा प्रवीणशी विवाह लावून दिला. मात्र, विवाहानंतर पती व संशयितांनी १ एप्रिल २०१५ त २६ मार्च २०१६ या एक वर्षाच्या कालावधीत शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच माहेरून दिलेले स्त्रीधन काढून घेतले, स्वाती यांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीनुसार म्हसरूळ पोलिसांनी तरुणीच्या पतीसह त्याच्या नातेवाइकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमची सोसायटी...

$
0
0

'क्लासिक' आमुची वास्तू...

--

आमच्या सोसायटीमधील अनेक जण मुंबई, पुणे, नागपूरपर्यंत नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक झाले. परंतु, त्यांचे आमच्याशी अन् आमच्या सोसायटीशी असलेले स्नेहाचे नाते आजही कायम आहे. प्रत्येक सणावाराला आम्ही त्यांच्या सोबत आणि ते आमच्या सोबत नाहीत याची खंत वाटत राहते. असे गेली १५ वर्षे आपुलकीचे नाते जपणारी अन् नवनवीन संकल्पनांद्वारे रहिवाशांमध्ये खेळीमेळीचे वातावरण निर्माण करणारी आमची वास्तू क्लासिक ही सोसायटी आहे! ही भावना या सोसायटीचे सभासद अभिमानाने व्यक्त करतात...

संकलन : प्रवीण बिडवे

--

काठे गल्लीतून टाकळीकडे जाताना गणेशनगर परिसरात स्वामी समर्थ केंद्राच्या समोरच वास्तू क्लासिक या सोसायटीचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारालगतच रखवालदाराची केबिन अन् सोसायटीच्या आवारात बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे येथील सुरक्षाव्यवस्थेची साक्ष देतात. ए, बी आणि सी अशा तीन विंग या सोसायटीच्या आवारात आहेत. प्रत्येक विंगमध्ये १४ सदनिका याप्रमाणे एकूण ४२ सदनिका असून, पार्किंगलगतच सोसायटीचे छोटेखानी कार्यालय आहे. सणवार आणि सार्वजनिक उत्सवांमध्ये आनंद द्विगुणित करणारी म्युझिक सिस्टीम या कार्यालयात ठेवण्यात आली आहे. बँका, पोलिस, राज्य उत्पादन शुल्क, राज्य मार्ग परिवहन महामंडळ, विमा निगम अशा सरकारी सेवेतील नोकरदारांसह शिक्षक, अभियंता, डॉक्टर, खासगी कंपन्यांमधील अधिकारी, व्यापारी या सोसायटीमध्ये एकोप्याने राहतात. विशेष म्हणजे महाराष्ट्रासह अन्य राज्यांतून आलेले आणि रोजगारानिमित्त नाशिकमध्ये स्थायिक झालेले रहिवासीदेखील या सोसायटीचे सभासद आहेत. त्यामुळे आमची सोसायटी 'मिनी इंडिया' असल्याचेही सभासद आनंदाने सांगतात. सोसायटीतील रहिवासी सहलही काढतात. आतापर्यंत अशोका धबधबा आणि केशरबाग येथील सहलींत सभासदांनी एकत्रितरीत्या धम्माल केली आहे. महापालिका जे पिण्याचे पाणी पुरविते त्याचा वेगळा नळ प्रत्येक सदनिकेपर्यंत पोहोचविण्याची सुविधा सोसायटीने करवून घेतली आहे. वापरासाठी बोअरच्या पाण्याची व्यवस्था आहे. अथर्वशीर्षाचे पठण, भजनी मंडळाचे कार्यक्रम, व्याख्यानांचेही येथे आयोजन केले जाते. गणेशोत्सवात ट्रेझर हंट या कार्यक्रमाची सारेच आतुरतेने वाट पहातात. नृत्य, गाण्यांचा समावेश असलेल्या या कार्यक्रमात प्रत्येक सदस्य सहभागी होतो. सोसायटी दर वर्षी प्रत्येक सभासद कुटुंबाकडून १० हजार रुपये घेते. यामध्ये तीन हजार रुपये सिंकिंग फंड म्हणून, तर सात हजार रुपये मेंटेनन्स म्हणून घेतले जातात. गणेशोत्सवात प्रत्येक सभासदाकडून १५०० रुपये वर्गणी घेतली जाते. त्यामुळे सोसायटीकडे मोठ्या प्रमाणावर आर्थिक निधी जमा झाला आहे. सोसायटीत कुणी सदनिकामालक भाडेकरू ठेवणार असेल, तर त्याला सोसायटीच्या कार्यकारिणीकडे भाडेकरू व्हेरिफिकेशनचा पोलिसांचा दाखला सादर करावा लागतो.

वाहनावर सोसायटीचे स्टीकर

प्रत्येकाच्या वाहनासाठी जागा नेमून दिलेली नसतानाही (अॅलॉटेड पार्किंग) वाहने उभी करण्यावरून गेल्या १५ वर्षांत कुणाची आपापसात भांडणे झाली नसल्याचे सोसायटीचे पदाधिकारी आणि सभासद आवर्जून सांगतात. जागा मिळेल तेथे वाहन उभे करावे या एका नियमावर वाहन पार्किंगचा विषय सोसायटीने मार्गी लावला आहे. सोसायटीतील सभासदांच्या कार आणि मोटारसायकल्सवर सोसायटीच्या नावाचे स्टीकर लावण्यात आले आहेत. त्यामुळे बाहेरील व्यक्तीचे वाहन सोसायटीच्या आवारात थांबविण्याचा प्रश्नच उरत नाही. सणवाराच्या दिवशी सर्वांची वाहने सोसायटीच्या बाहेर रस्त्याच्या दुतर्फा उभी केली जातात. त्यामुळे एकत्रितरीत्या सण साजरे करणे शक्य होते.

वर्षात अनेकदा स्नेहभोजन

एकमेकांमधील नाते अधिक घट्ट करण्यासाठी स्नहेभोजन हा एक चांगला पर्याय आहे. प्रजासत्ताकदिन, गुढीपाडवा, धूलिवंदन, गणेशोत्सव अन् वार्षिक सर्वसाधारण सभा यानिमित्ताने सोसायटीतील सर्व कुटुंबांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. कोजागरीसह, दसरा, दिवाळी, दहीहंडी, संक्रांत असे सर्वच सण येथे उत्साहाने साजरे केले जातात. सामाजिक बांधिलकीतून रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाते. आदिवासी पाड्यांपर्यंत गरजेच्या वस्तू पोहोचविण्याचे काम सोसायटीतील सभासद करतात.

गप्पांची मैफल अन् बरेच काही

सोसायटीच्या आवारात बॅडमिंटन कोर्टसाठी मोकळी जागा असून, अबालवृद्धांसाठीदेखील ही हक्काची जागा मानली जाते. सोसायटीचे छोटेखानी गेट टूगेदर याच ठिकाणी होतात. तेथे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले असून, हॅलोजनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे येथे सायंकाळी उशिरापर्यंत क्रिकेट, बॅटमिंटन यांसारखे खेळ खेळले जातात. गप्पांची मैफलही जमते. येथे नारळ, बदाम, अशोका, आंबा, बोर आदी झाडांचे संवर्धन करण्यात आले आहे.

'सुंदर माझे घर' स्पर्धा

सोसायटीतील रहिवाशांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी येथे काही ना काही निमित्ताने विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात. बालके, महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. विजेत्या स्पर्धकांना बक्षीस रूपाने कौतुकाची थाप दिली जाते. सोसायटीतील पुरुषांनी एकदा अचानक सुंदर माझे घर स्पर्धेचे आयोजन केले. सोसायटीतील प्रत्येक घराला काही पुरुष सदस्यांनी भेट दिली. कोणाचे घर नीटनेटके आवरले आहे, कोठे पसारा कमी आहे, कोठे स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे यांसारख्या बाबींची पाहणी करून घर सुंदर ठेवणाऱ्या गृहिणीला बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. असे कल्पक विचार पुढे आले, की त्याची अंमलबजावणी केली जाते. सोसायटीतील महिलांचा, तसेच पुरुषांचा वेगवेगळा व्हॉट्सअॅप ग्रुप असून, एकोपा वाढीस लागावा याकरिताच्या कल्पकतेवर त्यामध्ये चर्चा केली जाते. सोसायटीतील महिलांचे भिशी मंडळ आहे. त्याबाबतच्या बैठकांमध्ये पुरुष आणि लहानग्यांनाही प्रवेश नसतो.

सोसायटीची कार्यकारिणी

अध्यक्ष : नीलेश खैरे

सचिव : संदीप बंब

खजिनदार : पीयूष कुलकर्णी

समन्वयक : धनंजय चतुर

सांस्कृतिक मंडळ कार्यकारिणी

अध्यक्ष : सचिन मोटकरी

खजिनदार : रामदास कुलकर्णी

(आमची सोसायटी आमची शान)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन् रस्तादुरुस्ती झाली

$
0
0

नाशिकरोड

अन् रस्तादुरुस्ती झाली (इम्पॅक्ट)

नाशिकरोड येथील सिनेमॅक्ससमोरील रस्त्याच्या दुरवस्थेसंदर्भातील समस्या मी मटा सिटिझन रिपोर्टर अॅपद्वारे मांडली होती. ही समस्या 'मटा'मध्ये प्रसिद्ध होताच या भागातील रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात आली. त्याबद्दल 'मटा' आणि ही दुरुस्ती करणाऱ्या संबंधित यंत्रणेचे आभार.

-उदय शिवदे

गंगापूररोड

रस्त्याचे काम निकृष्ट

गंगापूररोड ते मखमलबाद लिंकरोडचे काम सध्या सुरू आहे. हे काम करताना आधीचे मटेरियल, डांबर काढून नवीन खडी टाकणे अपेक्षित आहे. परंतु, हा रस्ता जेसीबीने उकरून जुन्याच डांबरासह खडी जागेवरच रोडरोलरने दाबली जात आहे. संबंधित यंत्रणेने याची दखल घ्यायला हवी.

-संदीप कापरे

सीबीएस

रिक्षाचालकांची दादागिरी

हे दृश्य आहे जुन्या सीबीएस परिसरातील. येथे नेहमीच 'नो पार्किंग'मध्ये रिक्षा लावलेल्या असतात. त्यामुळे येथे बसचालक व रिक्षाचालकांमध्ये वादावादी-हाणामारीचे प्रकार वारंवार घडताना दिसतात. याकडे वाहतूक पोलिसांसह महामंडळ प्रशासनादेखील लक्ष देणे गरजेचे आहे.

-कृष्णा सराफ

पंचवटी

गोदापात्रात कपडे धुणे सुरूच

गोदावरीच्या पाण्याचे प्रदूषण होऊ नये यासाठी गोदापात्रात कपडे धुण्यास मनाई असतानाही स्नानाबरोबरच येथे कपडे धुण्याचे प्रकार सुरूच आहेत. या परिसरात सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आलेली असली, तरी त्यांच्या नजरा चुकवून असे प्रकार येथे सुरूच असल्याचे दिसते.

-एम. रामनाथ

शहर परिसर

महापालिकेकडील नोंद हास्यास्पद

शहर परिसरात सध्या मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडल्याचे दिसून येत आहे. त्यांच्याकडून अनेकांना चावा घेण्याचे प्रकारही वारंवार घडत आहेत. मात्र, तरीही महापालिका त्याकडे दुर्लक्ष करताना दिसते. शहरात अवघी १,२५३ कुत्री असल्याची महापालिकेकडील नोंद हास्यास्पदच म्हणावी लागेल.

-नितीन पाटील

(सिटिझन रिपोर्टर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हवाई सेवेच्या तक्रारींबाबत यंत्रणांचे दुर्लक्ष अक्षम्य

$
0
0

हवाई सेवेच्या तक्रारींबाबत यंत्रणांचे दुर्लक्ष अक्षम्य

केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाच्या वेबसाइटवर एअर डेक्कनच्या विमानसेवेबाबत तक्रार करण्याची सुविधाच नसल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे देशात उडान योजनेंतर्गत एअर डेक्कन कंपनीने सेवा सुरू केली असली, तरी त्याबाबत तक्रार कुठे करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या एकूणच कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक जर केंद्रीय मंत्रालयानेच उडान योजनेंतर्गत एअर डेक्कन या कंपनीला हवाई सेवेची परवानगी दिलेली आहे, तर त्यासंदर्भातील तक्रारी मांडण्यासाठीची सुविधाही देणे क्रमप्राप्त ठरते. मात्र, अशी सेवा देण्याकडे संबंधित यंत्रणांचे झालेले दुर्लक्ष अक्षम्य असल्याचे मतही नागरिकांनी व्यक्त केले आहे.

धक्कादायक बाब

कोल्हापूर येथील विमानतळ एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाकडून, पुणे विमानतळ संरक्षण विभागाकडून, तर मुंबई विमानतळ जीव्हीके कंपनीकडून चालविले जाते. त्यांच्या तक्रारींसाठीचा पर्याय मंत्रालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. मात्र, एअर डेक्कनच्या सेवेची तक्रार करण्याची सुविधाच उपलब्ध नाही, ही बाब धक्कादायकच म्हणावी लागेल. याबाबत त्वरित निर्णय व्हावा.

-ललित ठुबे

तक्रार मांडायची तरी कोठे?

वेबसाइटवर तक्रार करण्यासाठी विमानतळांची जी यादी आहे त्यात जळगाव आणि नाशिक या दोन ठिकाणांचा समावेशच नाही. त्यामुळे या दोन्ही विमानतळांच्या ठिकाणी असुविधेबाबत तक्रार करण्यासाठी कुठलाही पर्याय नाही. त्यामुळे येथून विमान प्रवास करणाऱ्यांनी विमानसेवेविषयक तक्रार मांडायची तरी कोठे, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो.

-प्रभाकर पगार

मूलभूत हक्कांवरच गदा

हवाई वाहतूक सेवेविषयी काही तक्रार असल्यास संबंधित मंत्रालयाची वेबसाइट असते. त्यावर तात्काळ दखल घेतली जाऊन तक्रारदाराला त्याबाबतचा मेलदेखील येतो. मात्र, एअर डेक्कन कंपनीने अशी सुविधाच सुरू केलेली दिसत नाही. वेबसाइटवर एअर डेक्कनचे नावच उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांच्या मूलभूत हक्कांवरच गदा आली आहे, असेच म्हणावे लागेल.

-विनय कोठावदे

'त्या' शहरांतील प्रवाशांपुढे संभ्रम

विमानसेवेसंदर्भातील तक्रारींबाबत वेबसाइटवर एअर डेक्कनचे नावच येत नसल्याने राज्यात नाशिक, पुणे, जळगाव, मुंबई, कोल्हापूर या पाच शहरांमधील प्रवासी संभ्रमात पडले आहेत. हवाई वाहतूक मंत्रालयाने उडान योजनेत एअर डेक्कनची निवड केली, मग त्यांचा समावेश वेबसाइटवर का नाही? यासंदर्भात नागरिकांनी दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न पडतो.

-पी. के. दुसाने

प्रवाशांना मिळवून द्यावा हक्क

सध्या सर्वच क्षेत्रांत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे बनले आहे. विमान प्रवाशांच्या तक्रारींच्या सेवेबाबतही तसे अपेक्षित आहे. मात्र, आपल्याकडे या सेवेबाबत अनेक ठिकाणी त्रुटी आढळतात. एअर डेक्कनच्या सुविधेच्या बाबतीतही अशीच स्थिती असल्याचे दिसते. हवाई वाहतूक मंत्रालयाने तातडीने याप्रश्नी लक्ष घालून प्रवाशांना त्यांचा हक्क मिळवून द्यावा.

-विजय बधान

(आमचा आवाज)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ सतरा कुंडांचा श्वास होईना मोकळा!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक शहराचे वैभव असलेल्या गोदावरी नदीच्या पवित्र अशा रामकुंडाच्या परिसरातील सतरा कुंडे काँक्रिटीकरणामुळे बुजविली गेली आहेत. या कुंडांचे करण्यात आलेले काँक्रिटीकरण काढण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र, त्यानंतरदेखील या सतरा कुंडांचा श्वास मोकळा झालेला नाही. ही कुंडे बुजविल्यामुळे गोदावरीच्या पात्रातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत बंद झाले आहेत. त्यामुळे गंगापूर धरणातून पाणी सोडले नाही, तर गोदावरी कोरडीठाक पडत असल्याचे चित्र नजरेस पडते.

गोदावरी पात्रातील होळकर पुलापासून गाडगे महाराज पुलापर्यंतच्या भागात तब्बल १७ कुंडे असून, २००३-०४ च्या सिंहस्थाच्या कामात ही कुंडे बुजविण्यात आलेली आहेत. या कुंडांवर करण्यात आलेल्या काँक्रिटीकरणामुळे काही कुंडांचे तर अस्तित्वच नष्ट झाले आहे. पेशवाईच्या काळात गोदावरी घाटावर मंदिरे, कुंडे आणि घाट बांधण्यात आलेले आहेत. त्यातील बहुतांश कुंडे बुजविली गेली आहेत.

होळकर पुलाच्या दक्षिणेला गोपिकाबाई तास असून, सन १७६१-१७७२ च्या काळात चौथे पेशवा माधवराव पेशवा यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांनी या तासाची निर्मिती केली होती. त्यावरही काँक्रिटीकरण करण्यात आलेले असल्याने त्याचे अस्तित्वच नष्ट झालेले आहे. सरसुबेदार महादाजी गोविंद काकडे यांनी १७५८ मध्ये लक्ष्मणकुंड बांधलेले आहे. या कुंडात जिवंत पाण्याचे झरे आहेत. १८७७-१८७८ मध्ये संपूर्ण नदीपात्र कोरडेठाक पडले होते, त्यावेळी लक्ष्मणकुंड पाण्याने भरलेले होते. या कुंडातही अर्धेअधिक काँक्रिटकरण केलेले असून, त्याची खोली कमी करण्यात आली आहे. लक्ष्मणकुंडाकडून पाणी वळसा घेऊन रामकुंडाकडे जाते. या मार्गावर धनुषकुंड आहे. याच कुंडातून गोदावरीचा प्रवाह पूर्वेकडून दक्षिणेकडे वळसा घेतो. त्यामुळेच गोदावरीला दक्षिणगंगा म्हटले जाते.

रामकुंडातही काँक्रिटीकरण

अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या रामकुंडाला १६९६ मध्ये साताऱ्याचे जमीनदार चित्रराव खटाव यांनी सध्याचे स्वरूप दिले. सन १७८२ मध्ये गोपिकाबाई यांनी रामकुंडाची दुरुस्ती केली. मात्र, थेट रामकुंडातदेखील काँक्रिटीकरण करण्यात आलेले आहे. रामकुंडाच्या दक्षिणेला असलेले सीताकुंड, अहिल्यादेवी मंदिरासमोरील अहिल्याकुंड, त्याच्या पश्चिमेला असलेले सारंगपाणीकुंड, दुतोंड्या मारुतीकुंड आणि सूर्यकुंड ही पाच कुंडे कॉंक्रिटीकरणाने पूर्णपणे बुजविण्यात आलेली आहेत.

'रिव्हर बेड'मध्येच स्लॅब

जुन्या भाजीबाजारासमोर असलेले अनामिककुंड, तसेच नीलकंठेश्वर महादेव मंदिरासमोर असलेले दशाश्वमेघकुंड या कुंडांमध्ये रस्ता बांधण्यात आलेला आहे. नारोशंकर मंदिरासमोर असलेल्या रामगयाकुंड येथे पूर्वी श्राद्धविधी केले जात असल्याचे सांगितले जाते. वरुणा, सरस्वती, गायत्री, सावित्री आणि श्रद्धा अशा पाच छोट्या नद्यांचा प्रवाह जेथे मिळतो तेथे पेशवा अथवा शिंतोडे महादेवकुंड आहे, तेदेखील काँक्रिटीकरणात बुजले आहे. खंडोबाकुंड, ओककुंड, वैशंपायनकुंड आणि मुक्तेश्वरकुंड अशी ही १७ कुंडे २००३-०४ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांच्या वेळी रिव्हर बेडमध्ये काँक्रीटचा स्लॅब टाकून बुजविण्यात आल्याने त्यांचा श्वास कोंडला गेला आहे.

गोदावरी नदी पुन्हा प्रवाहित करण्यासाठी नदीपात्रातील काँक्रीट काढणे, सर्वच प्राचीन व पवित्र कुंडे मोकळे करून जिवंत पाण्याचे स्रोत पुनर्जीवित करणे गरजेचे आहे. त्यासाठी गोदाप्रेमींसह संबंधित यंत्रणांनीदेखील पुढाकार घेण्याची गरज आहे.

-देवांग जानी, गोदाप्रेमी

लोगो : वर्षभरानंतर...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साखरेच्या पाकात पडून बालिकेचा मृत्यू

$
0
0

म.टा. वृत्तसेवा, पंचवटी

खेळता खेळता पाय घसरून साखरेच्या उकळत्या पाकात अडीच वर्षाची बालिका पडून ९० टक्के भाजल्याची घटना रविवारी(दि.२९) अमृतधाम परिसरात घडली. तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

स्वरा प्रवीण शिरोडे (रा.साईनाथ रो हाऊस, कालिकानगर, अमृतधाम) असे या बालिकेचे नाव आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद दाखल करण्याचे काम सुरू होते. रविवारी सकाळी आठच्या सुमारास स्वरा चे वडील गुलाबजाम बनविण्यासाठी साखरेचा पाक करीत होते. त्याच वेळी स्वरा खेळत असताना फरशीवर पाय घसरून उकळत्या पाकात पडली.

कुटुंबीयांनी तिला जुना आडगाव नाक्यावरील सदगुरु हॉस्पिटलमध्ये सकाळी दहा वाजता दाखल केले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप शिरोडे कुटुंबीयांनी केला असून, संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केल्याचं वृत्त आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्या आठवणीने अजूनही शहारते 'विजयानंद'

$
0
0

ही घटना १९१३ सालची. चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या 'राजा हरिश्चंद्र' या पहिल्या मूकपटाद्वारे भारतीय चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली. या घटनेला आता १०५ वर्षे झाली आहेत. हा चित्रपट नाशिकला सर्वप्रथम दाखवला गेला होता तो 'विजयानंद' मध्ये. त्या वेळी अमावस्येच्या रात्री चेटूक करता म्हणून दादासाहेब फाळके व शंकरशेठ चुंबळे यांना मारण्यासाठी काही जणांनी लाठ्याकाठ्या आणल्या होत्या त्या आठवणीने 'विजयानंद' अजूनही शहारते.

१९१३ मध्ये विजयानंद हे सिनेमा टॉकीज नव्हते, तर नाट्यगृह होते. येथे नाटकांचे प्रयोग चालतात. बालगंधर्वांनीही अनेकदा येथे काम केले आहे. दादासाहेब फाळके यांनी येथेच ' राजा हरिश्चंद्र' चित्रपट दाखवण्याचे ठरवले आणि नाट्यगृहाबोहेर असलेल्या दोन झाडांना दोरी बांधून त्यावर धोतराचा नवाकोरा तागा टाकण्यात आल. दादासाहेबांनी स्वतः हातगाडयावर मॅन्युअल प्रोजेक्टर टाकून आणला व चित्रपट सुरु करण्यात आला. अंधार असावा म्हणून अमावस्येची रात्र निवडण्यात आली होती.प्रोजेक्टरमधून जसजशी चित्रे बाहेर पडू लागली तसतसा ते अप्रूप पाहण्यासाठी जमलेल्या नाशिककरांचा तोल सुटला आणि तेथे उपस्थित अनेकांनी घरी जाऊन मिळेल ते हत्यार आणले व प्रोजेक्टर फोडून टाकला. ती झाडे तोडून टाकली, तसेच तागाही फडून टाकला. हातगाडी आणि हे सर्व साहित्य जाळण्यात आले व फाळके, चुंबळे काळी जादू करीत आहेत असे एकमत होऊन त्यांनी या दोघांनाही नाशिकबाहेर हद्दपार केले. सरकारवाडा पोलिस स्टेशनला तशी तक्रार देखील काही जणांनी नोंदवली होती.

फाळके त्र्यंबकेश्वरी राहत असल्याने ते तिकडे निघून गेले. मात्र, चुंबळे यांना त्यानंतर काही काळ नाशिकबोहेरच राहावे लागले. कालांतराने काही ब्रिटीश अधिकारी तेथे आल्यावर त्यांनी हा चित्रपट आहे, असे सर्वांना सांगितले चुंबळेंना शहरात पुन्हा घेण्यात आले. अशी आठवण विनय चुंबळे यांनी जागवली.

आठवणीतला कॅमेरा
दादासाहेब फाळके यांचा काही वस्तू नाशिकमध्ये होत्या. 'हिंद सिने जरकाश्रम' या त्यांच्या घरातून या वस्तू काही संग्रहालायांना देण्यात आल्या, तसेच त्यांच्या हौदाचा बंगला येथील काही वस्तूदेखील महापालिकेला देण्यात येणार आल्या. विनय चुबळे याच्याकडे फाळके यांनी वापरलेला स्टील कॅमेरा होता. रोली फ्लेक्स कंपनीचा हा कॅमेरा दादासाहेबांना खूप उपयोगात येत असे. आता या कॅमेऱ्याचे केवळ छायाचित्र उरले असून, कॅमेरा आठवणीत गेला.

दादसाहेब फाळके यांचे आमच्या घराशी खूप सलोख्याचे संबंध होते. शंकरशेठ चुंबळे यांच्याबरोबर अनेकदा ते गप्पा मारत. त्यातून त्यांना नवनवीन कल्पना सुचत. माझे खापर पणजोबा (चुंबळे) फाळके यांना नाशिकमधून हद्दपार केल्याची घटना तेव्हाचीच.
- विनय चुंबळे, संचालक, विजयानंद थिएटर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगावच्या चेतनचे युपीएससीत यश

$
0
0

देशात ७८१ वा क्रमांक

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून, यंदादेखील मालेगावातील तरुणाने यश संपादन केले आहे. तालुक्यातील मथुरपाडे सारख्या दुर्गम खेड्यातील चेतन मेघराज शेळके याने देशात ७८१ वा क्रमांक मिळवत गावाचा नावलौकिक वाढवला आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातून शिक्षण घेऊनदेखील यशाला गवसणी घालता येते हे चेतनने सिद्ध केले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यंदादेखील मथुरपाडे येथील चेतनने यूपीएससी परीक्षेत यश मिळवून मालेगावच्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे. चेतनचे वडील मेघराज शेळके हे निमगाव पोस्टात पोस्टमास्तर असून, आई अंगणवाडी सेविका आहे. अत्यंत कष्टप्रद जीवन जगत शेळके कुटुंबाने मुलांना चांगले शिक्षण देत त्यांच्या मनात जिद्द निर्माण केली.

तिसऱ्या प्रयत्नात यश

आधीपासूनच जिद्दी असलेल्या चेतनने प्रशासकीय सेवेत जायचा निर्णय घेतला. गेल्या तीन वर्षांपासून तो परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी दिल्ली येथे गेला होता. दोनवेळा यशाने हुलकावणी देऊनदेखील चेतनने आपला प्रयत्न सुरूच ठेवला होता. अखेर त्यास यश मिळाले असून, पंचक्रोशीतील तरुणांसाठी त्याने आदर्श उभा केला आहे. त्याच्या या यशात त्याचे आई, वडील, कुटुंबीय, मित्रांनीदेखील त्याला प्रोत्साहित केल्याचे तो आवर्जून सांगतो. भविष्यात प्रशासकीय सेवेत समाजहिताच्या कामे करण्याचा त्याचा संकल्प आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुकीच्या कामगार चळवळीचा फटका

$
0
0

१ मे साठी प्रतिक्रिया : उद्योग

000000

चुकीच्या कामगार चळवळीचा फटका

- किसनलाल सारडा

नाशिकची संस्कृती ही आजही टिकून आहे. इतर मोठ्या शहरांमध्ये त्या शहरांची ओळख आज हरवलेली दिसते. उद्योग क्षेत्राबाबत मात्र नाशिक दुर्दैवी ठरले. खरे तर उद्योग क्षेत्राची भरभराट होते, त्या शहराचा विकास झपाट्याने होतो, असे म्हणतात. नाशिकमध्ये सातपूर, अंबडसारख्या वसाहती असल्या तरी त्यांचा एका मर्यादेनंतर हवा तसा विकास झाला नाही. चुकीच्या कामगार चळवळींचा फटका नाशिकच्या उद्योग क्षेत्राला बसला आहे. पुणे, चाकणसारखी ठिकाणे आज उद्योग विकासामुळे पुढारली आहेत. अशी प्रगती, विकास नाशिकमध्येही होणे अपेक्षित होते. परंतु, तसे झाले नाही. नाशिकपासून मुंबईजवळ आहे. त्यामुळे येथील उद्योगासाठी पूरक वातावरण आहे. शिवाय, पाण्याची मुबलकता असणे हीदेखील आपल्या शहरासाठी जमेची बाजू आहे. सिन्नरबाबत मला त्यामुळेच विशेष कौतुक वाटतं. नाशिकमधील पाण्याचा तिकडे वापर करून तेथील उद्योग वसाहत विस्तारत आहे. नाशिक मात्र योग्य कामगार नेतृत्व नसल्याने अद्याप मागे पडले आहे, असे वाटते.

(शब्दांकन : अश्विनी कावळे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील उद्यानांचे संगोपन होणे गरजेचे

$
0
0

माय मराठी सिडको वसंत व्याख्यानमाला

मधुकर झेंडे यांचे प्रतिपादन

म. टा. वत्तसेवा, सिडको

आशिया खंडातील दुसरे गोल्फ ग्राउंड नाशिक येथे होते. त्यामुळे त्यावेळी इंग्रज नाशिकमध्ये गोल्फ खेळण्यासाठी खास येत. आज त्याच मैदानाला आपण गोल्फ क्लब ग्राउड म्हणतो. मंत्रभूमीकडून यंत्रभूमीकडे वाटचाल सुरू आहे. महानगराचे रूप घेत असलेल्या नाशिक पूर्वीसारखेच थंड राहण्यासाठी झाडे, नदी आणि उद्यानांचे संगोपन झाले पाहिजे, असे आवाहन मधुकर झेंडे यांनी केले.

माय मराठी मोफत ग्रंथघर, सूर्यादय परिवार आणि नवीन नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने झालेल्या माय मराठी सिडको वसंत व्याख्यानमालाचे सातवे पुष्प मधुकर झेंडे यांनी नाशिकचा चौक्यांचा इतिहास या विषयावर गुंफले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत बेणी आणि शंकरराव बर्वे उपस्थित होते. मधुकर झेंडे यांनी सांगितले, की शेती शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राची साथ यामुळेच नाशिकचा चौफेर विकास होत आहे. आताचे सीबीएस म्हणजे पूर्वी गावाच्या वेशीबाहेर होते. पूर्वी जुने नाशिक आणि गोदावरी घाट म्हणजेच नाशिक गाव. आताचे शासकीय गेस्टजवळ असलेले बंगले इंग्रजांना राहण्यासाठी होती. दंडकारण्य, गुलशनाबाद, जनस्थान आणि नाशिक असे वेगवेगळे नावे काळानुसार पडली.

गोदावरी कशी वाहती होती, रेल्वे कशी आली, मिग कारखाना, नोटप्रेस, सातपूर-अंबड एमआयडीसी कशी स्थापन झाली, पूर्वी कुंभमेळा कसे होत असे, याची झेंडे यांनी माहिती दिली. नाशिकच्या वसंत व्याख्यानमालाच्या धर्तीवर आयोजित सिडको व्याख्यानमालाची श्रीकांत बेणी आणि शंकरराव बर्वे यांनी स्तुती केली. किरण सोनार यांनी सूत्रसंचालन केले. देवराम सैंदाणे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. प्रकाश काळे यांनी स्वागत केले. नंदकुमार दुसानिस यांनी आभार मानले.

..

'ताणतणाव मुक्‍तीसाठी चिंतन हाच मार्ग'

सिडको : ताणतणाव दिवसेंदिवस वाढत आहे. यातून मुक्‍त मिळण्यिासाठी चिंतन हा एकमेव उपाय आहे. जीवनात मन हे अधीर व उतावीळ होऊन मनुष्य अविवेकी वागू लागल्याचे दिसून येत आहे. अंतर्मनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. शैलेंद्र गायकवाड यांनी केले.

माय मराठी मोफत ग्रंथघर, सूर्यादय परिवार आणि नवीन नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळ यांच्यातर्फे आयोजित माय मराठी सिडको वसंत व्याख्यानमालाचे सहावे पुष्प गुंफतांना डॉ. गायकवाड बोलत होते. समाजातील सर्वच घटकांना रोज ताणतणाव व त्यातून उद्भवणाऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो. जीवन म्हटले की संघर्ष आलाच; परंतु संघर्षातून मार्ग कडण्यासाठी अंतर्मनाशी सवांद साधायला हवा. समस्या थेट आपल्या अंतर्मनातून काढून टाकणे म्हणजेच संमोहनशास्र होय. गतिमान सुविधा आणि त्यामुळे वाढलेली जीवनाची गती यामुळे मन हे अधीर, उतावीळ आणि अविवेकी बनण्याचे प्रमाण वाढले आहे. काळजी, नैराश्य, संशयग्रस्तता हे विकार बळावयास लागले असून या सर्व गोष्टींवर प्रत्येकाने चिंतन करावयास हवे. मनाला लवचिक बनविण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी वास्तवाची जाणीव स्वत: ला करून देत राहणे आणि त्यापासून प्रेरणा घेत राहणे यासाठी वेळ काढावाच लागेल. अन्यथा केवळ सुखसुविधांच्या आणि तथाकथित यशस्वी जीवनाच्या अतिरेकी हट्टाहासापायी आपले मौल्यवान जीवन मूल्यहीन आणि पराधीन होत राहील, असेही त्यांनी सांगिले. किरण सोनार यांनी सूत्रसंचालन केले. जनार्दन माळी यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. प्रकाश काळे यांनी आभार मानले.

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरात घुसून महिलेचा विनयभंग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

--

शेजारी राहणाऱ्या विवाहित महिलेचा घरात घुसून विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी तरुणास अटक केली. संशयिताने या दरम्यान महिलेच्या सासूस बेदम मारहाण करीत सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर टाकल्याचेही पीडितेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

प्रशांत गोरख देसले (वय २२, रा. ध्रुवनगर) असे अटक केलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. रविवारी, सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास तरुणाने महिलेच्या घरात प्रवेश केला. अचानक घुसलेल्या तरुणाने विवाहितेचे लक्ष नसल्याची संधी साधत विनयभंग केला. याचवेळी महिलेची सासू तेथे आल्याने संशयिताने वृद्ध सासूला मारहाण केली. सोशल मीडियावर महिलेचा बदनामीकारक मजकूर टाकल्याचा आरोप पीडित महिलेने केला असून, गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी संशयितास अटक केली.

--

पिकअपच्या धडकेत दाम्पत्य जखमी

भरधाव पिकअपने धडक दिल्याने दुचाकीस्वार दाम्पत्य गंभीर जखमी झाले. ही घटना औरंगाबाद रोडवर घडली असून, या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. रियाज उस्मान पठाण (५५) आणि हसिना रियाज पठाण (५० रा. संजरीमार्ग वडाळागाव) असे जखमी दाम्पत्याचे नाव आहे. गेल्या आठवड्यात हा अपघात झाला. पठाण दाम्पत्य दुचाकीवर (एमएच १५ डीई ८९९२) घराकडे परतत असताना समोरून भरधाव आलेल्या पिकअपने (एमएच १५ एफव्ही २९०४) त्यांना धडक दिली.

--

वीज कर्मचाऱ्यावर हल्ला

कार्यालय आवारात मद्यप्राशन करण्यास विरोध केल्याने एकाने वीज कर्मचाऱ्यावर हल्ला करून त्याचा दात तोडल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला.

राकेश संभाजी देशमुख, असे मारहाण करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. वीज कर्मचारी बाळासाहेब सोपान भास्करे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. रविवारी, दुपारी भास्करे कार्यालय आवारात सेवा बजावत असताना संशयित आरोपी इमारतीच्या आवारात मद्य सेवन करताना आढळून आला. भास्करे यांनी त्यास मद्यसेवनास विरोध केला असता संतप्त संशयिताने हातातील कड्याने तोंडावर फटका मारला.

--

सिडकोत ७४ हजाराची घरफोडी

बंद घर फोडून चोरट्यांनी रोकडसह सुमारे ७४ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना सिडकोतील लोकमान्यनगर भागात घडली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. केशव गणपत केंगे (६२ रा. लोकमान्यनगर, पवननगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, केंगे कुटुंबीय रविवारी, पहाटे चार वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून घरातील कपाटात ठेवलेली ४० हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिने असा सुमारे ७४ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला.

--

पित्याकडून मुलीचा विनयभंग

अल्पवयीन मुलीचा नराधम पित्यानेच विनयभंग केल्याची घटना शरणपूररोड परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी संशयितास बेड्या ठोकल्या असून, या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी रात्री पित्याने किरकोळ कारणातून वाद घालत हे कृत्य केले. मुलीची आई वाद मिटविण्यासाठी शेजाऱ्यांना बोलविण्यासाठी गेली असता नराधम पित्याने मुलीचा विनयभंग केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चला, प्राचीन गोवर्धनच्या हेरिटेज वॉकला!

$
0
0

हेरिटेज वॉकचा लोगो घ्यावा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहराची कधीकाळी मुख्य बाजारपेठ अन् जिल्ह्याचे ठिकाण म्हणजे गोवर्धन गाव ओळखले जाते. दोन हजार वर्षांची पार्श्वभूमी असलेल्या अशा प्राचीन खेड्याची सफर करण्याची संधी रविवारी, ६ मे रोजी 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे 'मटा हेरिटेज वॉक'च्या माध्यमातून मिळणार आहे. या वॉकमध्ये राज्य पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांच्याशी संवाद साधण्याचीही संधी मिळणार आहे.

त्रिरश्मी डोंगरावरील पांडव लेण्यांतील क्रमांक ३, ४, ५, १० व १२ अशा पाच शिलालेखांमध्ये बारा वेळा गोवर्धनचा उल्लेख मिळतो अन् गौतमीपुत्र सातकर्णीच्या युद्धाचा इतिहासही. यावरून गोवर्धन इसवीसनाच्या आरंभापासून वसलेले प्राचीन खेडे असल्याचे स्पष्ट होते. आंध्रभृत्य नावाच्या दिवाणाचे गोवर्धन मुख्य ठिकाण होते. पांडवलेणी खोदतांना त्यासाठी मोठ्याप्रमाणात महसूल व दान याच गावातून व्यापारी मंडळींकडून मिळाल्याचा उल्लेखही आहे. गोवर्धन गाव पूर्वी विणकरांचे गाव म्हणूनही ओळखले जायचे. त्यामुळे युरोपचे व्यापारी या काळात नाशिककडे आकर्षिले गेले होते. गोवर्धन येथे तयार होणारी रेशमी वस्त्रे त्याकाळी परदेशात प्रसिद्ध होती. तेराव्या शतकात मार्कोवोलो याला बगदाद येथे एक रेशमी कापडाचा नमुना मिळाला तो गोवर्धनच्या विणकरांनी विणलेला होता. एवढेच नाही तर १९६० मध्ये पुण्यातील डेक्कन कॉलेजने केलेल्या उत्खननात युरोपातील काचेच्या बाटल्याही सापडल्याने येथील व्यापारी युरोपपर्यंत देवघेव करत असावेत, असेही डेक्कन कॉलेजच्या संशोधकांनी नोंदविले आहे. हेरिटेज वॉकमध्ये राज्य पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, मुरलीधर पाटील, अॅड. सुदर्शन पाटील यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.

हेरिटेज वॉकमध्ये काय पहाल?

गंगापूर व गोवर्धन हे गाव आज वेगळे वाटत असले तरी ते पूर्वी गोवर्धन म्हणूनच ओळखले जाई. येथील १२ व्या शतकातील गोवर्धनेश्वरराचे महादेव मंदिर, त्याच्या शेजारीच बाणेश्वराचे पेशवेकालीन मंदिर आहे. बाणेश्वर मंदिरासमोर सुंदर घाट पेशवाईतील वैभवाची आठवण करून देतो. गोवर्धनच्या प्राचीन बाजारपेठेचे ठसे आजही पहायला मिळतात. ही बाजारपेठ सध्या गंगापुरात पेठगल्ली म्हणून अनुभवता येते. गावातील देवीचे मंदिर अनोखी परंपरा उलगडते तर पाटील वाडा, पंचवाडा, सोनवणी वाडा, देशपांडे वाड्याच्या रुपाने अनोखा इतिहास अनुभवता येतो. जलालपूरचे वैभव असलेले वऱ्हारेश्वराचे सुंदर मंदिर, दगडी कारंजे अन् पहिल्या मराठी महिला चरित्रकार लक्ष्मीबाई टिळकांच्या आठवणी या हेरिटेज वॉकमधून अनुभवता येणार आहेत.

नाव नोंदणी आवश्यक

मटा हेरिटेज वॉकमध्ये सहभागी होण्यासाठी ६ मे रोजी गोवर्धन गावातील दे. ना. पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजसमोर सकाळी ८ वाजता एकत्रित जमायचे आहे. वॉकमध्ये सहभागी होण्यासाठी रमेश पडवळ यांच्या ८३८००९८१०७ या क्रमांकावर आपले नाव व आपल्यासोबत येणाऱ्या व्यक्तींची संख्या व्हॉट्सअॅप करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images