Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नववसाहतींचा मार्ग खडतर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

मुंबई-आग्रा महामार्गालगत जत्रा चौक भागातील नववसाहतींत मूलभूत सुविधांची वानवा दिसून येत आहे. येथे मोठ्या प्रमाणावर गृह संकुलांची उभारणी झालेली असून, मोठ्या संख्येने नागरिकही येथे राहत आहेत. मात्र, तरीही रस्ते, पथदीप, ड्रेनेज आदी सुविधांअभावी नागरिकांना गैरसोय सहन करावी लागत आहे.

महापालिकेचा प्रभाग तीन हा नव्याने वाढणाऱ्या लोकवस्तीच्या विस्ताराचा भाग आहे. त्यातील महालक्ष्मीनगर, मडवाई हाइट्स, शिवसाई अपार्टमेंट, गजानन कॉलनी आदी नववसाहतींना विविध समस्या भेडसावत आहेत. आडगाव शिवाराचा भाग विकसित होत असताना त्या भागात बंगले, सोसायट्या, कॉलनी, अपार्टमेंट बांधण्यात आलेले आहेत. अनेक प्रकल्प तयार होऊन त्यात रहिवासी राहण्यास आलेले आहेत. मात्र, तरीही येथे मूलभूत सुविधांचा अभाव दिसत आहे. या भागात पाणी पोहोचले असले, तरी ड्रेनेज लाइनची सुविधाच झालेली नाही. पथदीप बसविण्यात आलेले नसल्यामुळे रात्री उशिरा या भागातील रस्त्याने अंधारातून जाणे येथील नागरिकांना अवघड होत आहे. रस्त्याच्या बाजूला मोकळे पडलेले भूखंड, वाढलेले गवत अशा भागातून रात्रीच्या वेळी जाताना जीव मुठीत धरून जाण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. अंधार असल्यामुळे भुरट्या चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे.

भाजीबाजारानेही अडचण

या भागात पाण्याची सुविधा झालेली असली, तरी कमी व्यासाच्या वाहिन्यांमुळे नव्या वसाहतीला पाणीपुरवठा योग्य दाबाने होत नाही. परिणामी कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना गैरसोय सहन करावी लागत आहे. गुरुवारी येथील रस्त्यावरच भाजीबाजार भरतो. बाजार भरल्यानंतर येथून मार्ग काढणे वाहनचालकांनाच नव्हे, तर पादचाऱ्यांनाही अवघड होच आहे. येथील भाजीबाजारला योग्य ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्यास येथील समस्या सुटू शकेल, असे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

(स्वतंत्र चौकट)

घरे झाली, रस्त्यांची प्रतीक्षा!

या भागातील प्रमुख समस्या रस्त्यांची असून, निवासासाठी घराची व्यवस्था झाली. पण, त्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी पक्के रस्तेच नसल्यामुळे उन्हाळ्यात धुळीचा आणि पावसाळ्यात चिखलाचा त्रास सहन करण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. पावसाळ्यात या रस्त्यांमध्ये खड्डे पडतात. वाहने चालविण्यासाठी कसरत करावी लागते. पायी जाणाऱ्यांना अशा रस्त्यातून मार्ग काढणे कठीण होते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्या पूर्वी तरी येथील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.

--

(लीड, फोटो आहे. निष्पक्षचा लोगो घेणे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिग्नल परिसरात अपघातांत वाढ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

औरंगाबादरोडवरील कैलासनगर येथे वारंवार विस्कळीत होणारी वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसविण्यात आलेल्या सिग्नल परिसरातच अपघातांत वाढ झाली आहे.

औरंगाबादरोडवर उत्तरेकडून अमृतधाम, दक्षिणेकडून जेजुरकर मळा परिसराकडून सिग्नलकडे येण्याचे मार्ग आहेत. त्यामुळे येथे कायमच कोंडी होऊन वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार वाढले होते. नागरिकांनी वारंवार मागणी केल्यानंतर येथे सिग्नल बसविण्यात आला. मात्र, हा सिग्नल सुरू असतानाही त्याचे पालन केले जात नसल्यामुळे आता येथे वारंवार अपघात होत आहेत. सिग्नलच्या बाजूला गतिरोधक नसल्यामुळे वाहने सुसाट वेगाने येत असल्याने हे अपघात होत असल्याने येथे गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

------

(थोडक्यात)

सिग्नलवरच थांबा

पंचवटी : नांदूर नाका येथे बसविण्यात आलेल्या सिग्नलवरच बस आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सींचा थांबा करण्यात आलेला आहे. त्यामुळे सिग्नलवर थांबलेल्या इतर वाहनांना या थांब्याची अडचण होते. बसेस या थांब्यावर थांबल्यानंतर सिग्नल सुटलेला असतानाही बसच्या मागील वाहनांना पुढे जाण्यासाठी मार्ग मिळत नाही. काळ्या-पिवळ्या टॅक्सीदेखील येथे थांबलेल्या असतात. त्यांचाही अडथळा निर्माण होतो. हा थांबा सिग्ननपासून दूरवर करावा, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

--

संभाजी महाराज जयंती

जेलरोड : छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आज, सोमवारी (दि. १४) सकाळी आठ वाजता सर्वपक्षीय समन्वयक समितीतर्फे प्रतिमापूजन होणार आहे. नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ हा कार्यक्रम होईल. मंगळवारी (दि. १५) सायंकाळी साडेसहाला याच ठिकाणी प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांचे संभाजी महाराजांच्या जीवनावर व्याख्यान होईल. समितीचे अध्यक्ष विकास भागवत, कार्याध्यक्ष सचिन हांडगे, उपाध्यक्ष संतोष पिल्ले, उपाध्यक्ष राजेश फोकणे, राहुल तुपे, शिवाजी हांडगे आदी संयोजन करीत आहेत.

--

पोलिसांचा सत्कार

पंचवटी : पोलिस कृतज्ञता दिनानिमित्त पंचवटी पोलिस ठाण्यात उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. पंचवटी शांतता समितीचे अध्यक्ष पद्माकर पाटील, देवांग जानी, किशोर गरड, लक्ष्मण धोत्रे, सचिन पाटील, अतुल शेवाळे आदी उपस्थित होते. म्हसरूळ पोलिस ठाण्यात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा चिवडा व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख, संजय बेडवाल, प्रदीप वाघचौरे, मनोज हिरे, चांदनी पाटील, सुरेश माळोदे, मनीषा मल्ला, शिल्पा अवस्थी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनगराध्यक्षपदाची भगूरला उद्या निवड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेल्या भगूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी सोमवार (दि. १४) सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पालिका सभागृहात होणार आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी प्रतिभा पाटील व ज्येष्ठ नगरसेवक संजय शिंदे यांनी दिली आहे. सभेचा अजेंडा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सर्व नगरसेवकांना मिळाला आहे.

 रोटेशन पद्धत असल्याने उपनगराध्यक्षा मनीषा कस्तुरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तो मंजूर करत नव्याने उपनगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आाहे. सोमवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ही निवड प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. भगूरनगर पालिकेत शिवसेनेचे वर्चस्व आहे. उपनगराध्यक्षपदी शिवसेना उमेदवाराचीच वर्णी लागणार आहे. या पदाच्या शर्यतीत नगरसेविका प्रतिभा घुमरे, अनिता ढगे, संगीता पिंपळे आदींच्या नावाची चर्चा आहे. ज्येष्ठतेनुसार व कामाचा अनुभव पाहता घुमरे यांनी नगरसेविका पदाची हॅट्‌ट्रिक केली आहे. त्यामुळे त्यांचे नाव आघाडीवर आहे. आता शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर उपनगराध्यक्षापदाची माळ कुणाच्या गळ्यात टाकतात याकडे भगूरवासीयांचे लक्ष लागलेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजांत सायबर सिक्युरिटी ऑडिटच नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ई-मेल हॅक करून पेपर फोडला गेल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील एका सिनेट सदस्याने महाविद्यालयांचे सायबर सिक्युरिटी ऑडिटच होत नसल्याची तक्रार शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्याकडे केली आहे. केवळ पुणे विद्यापीठच नाही, तर राज्यातील इतर कुठल्याही विद्यापीठातील महाविद्यालय या स्थितीस अपवाद नसून, राज्यात सर्वच महाविद्यालयांना सायबर सिक्युरिटी ऑडिट बंधनकारक करावे, अशी मागणी सिनेट सदस्य अमित पाटील यांनी वायकर यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

गेल्या महिन्यात पुणे विद्यापीठाचा २८ एप्रिल रोजी 'लिनिअर अल्जेब्रा' या विषयाचा पेपर होता. एसवायबीएससीच्या या पेपरच्या आदल्या दिवशीच नाशिकमधील दोन विद्यार्थी हॅकर्सने पुणे विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाचा ई-मेल आयडी हॅक करत प्रश्नपत्रिका चोरली होती. या प्रश्नपत्रिकेची प्रत सोशल मीडियावरून व्हायरल होण्यासोबतच या पेपरची विक्री झाल्याचीही वार्ता पसरली होती. या प्रकरणी चौकशी समिती नेमून आता नाशिक जिल्ह्यासाठी ही परीक्षा पुन्हा घेण्याची वेळ विद्यापीठावर आली आहे. या पार्श्वभूमीवर सिनेट सदस्य पाटील यांच्या या पत्रास महत्त्व आहे.

विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेणारे शिकाऊ विद्यार्थी विद्यापीठाचा ई-मेल हॅक करण्यात यशस्वी ठरू शकत असतील तर या विषयातील तज्ज्ञांना काहीही शक्य आहे. यामुळे विद्यापीठांसारख्या संस्थांची गोपनीयता धोक्यात येऊ शकते, हे लक्षात घेऊन राज्यातील विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये याबाबत उपाययोजना करण्याची मागणी यात केली आहे.

\Bसायबर क्लब स्थापन व्हावेत\B

आगामी काळात सर्वच परीक्षा पद्धती ऑनलाइन यंत्रणेशी निगडीत असणार आहे, असे तज्ज्ञांचे अनुमान आहे. परिणामी, ऑनलाइन माध्यमाचा वापर शैक्षणिक क्षेत्रात वाढत असल्याने विद्यापीठासारख्या जबाबदार संस्थांवरील गोपनीयतेची जबाबदारी नक्कीच वाढते. शिवाय विद्यार्थी प्रयोग म्हणून प्रश्नपत्रिकाच फोडण्याचा प्रकार सायबरद्वारे करू शकत असतील तर इतरही क्षेत्रांमध्ये ते उपद्रवी ठरू शकतात. सायबर क्राइमच्या अशा घटना वाढू नये, यासाठी विद्यार्थ्यांचे वेळीच प्रबोधन व्हावे. यासाठी प्रत्येक महाविद्यालयात सामाजिक संस्था आणि पोलिस यंत्रणेच्या मदतीने सायबर क्लबची स्थापना करावी. ज्या माध्यमातून सायबर क्राइम रोखण्याबाबत महाविद्यालयीन तरुणांचे प्रबोधन केले जावे. याशिवाय महाविद्यालय व विद्यापीठाचे ई-मेल आयडी आणि वेबसाईट्सना एनआयसी प्रमाणपत्र बंधनकारक असावे, असेही पाटील यांनी म्हटले आहे.

\Bउपकेंद्राचे काम कधी?

\Bया पत्रात पाटील यांनी पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राबाबतही प्रश्न उपस्थित केला आहे. दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथे या उपकेंद्रासाठी विद्यापीठाने निवडलेल्या जागी उपकेंद्रासाठी अद्याप काहीच हालचाल नाही. नाशिक जिल्ह्यातील मोठ्या विद्यार्थी संख्येला छोट्या शैक्षणिक कामांसाठीही थेट पुणे गाठावे लागते. यामुळे उपकेंद्राचा हा प्रश्न लवकर मार्गी लावावा, अशी मागणीही यात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलवारी बाळगणाऱ्या दोघांना आडगावात अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

औरंगाबाद रोडवरील नीलगिरी बागेजवळील कालव्यालगत शनिवारी (दि. १२) रात्रीच्या सुमारास आडगाव पोलिस गस्त घालत असताना त्यांना दोघे तलवारधारी संशयित मिळून आले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात विनापरवाना बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अक्षय उत्तम आव्हाड (२२, रा. बसकी चाळ, नीलगिरी बाग) आणि पंकज नानासाहेब देसले (२५, रा. बिल्डींग नं. १/४३, नीलगिरी बाग) असे गजाआड केलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांना गस्त घालीत असताना शनिवारी (दि.१२) रात्री अकराच्या सुमारास विडीकामगार नगरकडून नीलगिरी बागेच्या दिशेने कालव्याजवळून जाणाऱ्या रस्त्यावर हे  दोघे संशयित संशयास्पद हालचाली करताना गस्त घालताना आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. तपासणी केली असता पोलिसांना त्यांच्याकडे नऊ इंचाच्या दोन तलवारी आढळून आल्या. 

आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनीलकुमार पुजारी व निरीक्षक (गुन्हे) पुंडलिक भोंडवे यांच्या मार्गदर्शनानुसार उपनिरीक्षक धनश्री पाटील, हवालदार नाजीम शेख, विनोद पाटील, वैभव परदेशी यांच्यासह आदींनी ही कामगिरी केली. लग्नसराईनिमित्त परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटिझन रिपोर्टर

$
0
0

नांदूर नाका

कोंडीवर शोधावा तोडगा

लग्नसराईमुळे नांदूर नाका चौकात शनिवारी सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. सिग्नल असूनही असा प्रकार झाला. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विवाह मुहूर्त असलेल्या दिवशी या भागात वारंवार अशी वाहतूक कोंडी होताना दिसते. या समस्येवर प्रशासनाने योग्य तोडगा काढावा.

-आकाश घाडगे

मुंबई नाका

बसचालकांमुळे अडथळा

मुंबई नाका येथील संदीप हॉटेलसमोरील खासगी बसस्थानकात ट्रान्स्पोर्टद्वारे येणारा माल अनेक वाहनचालक रस्त्यावरच टाकतात. त्याचा मालक किंवा ट्रान्स्पोर्टर येत नाही तोपर्यंत अशी पार्सल तेथेच पडून असतात त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. याप्रश्नी वाहतूक पोलिसांनी कडक भूमिका घ्यावी.

-अनिल लवटे

शहर परिसर

नियम केवळ सर्वसामान्यांसाठीच?

कोणत्याही वाहनाच्या नंबर प्लेटवर नंबरशिवाय इतर कोणताही उल्लेख असू नये असा नियम असताना तो मोडीत काढला जातो, तोही कायद्याच्या रक्षकांकडूनच! असे का? वाहतुकीचे नियम काय फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठीच तयार केलेले असतात का? अशा प्रकारांमुळे तरुणांमध्ये चुकीचा संदेश जातो.

-राजू धिंगण

अमृतधाम

चौफुलीवर वाहतूक कोंडी

अमृतधाम चौफुलीवर वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. हिरावाडी आणि अमृतधाम परिसरातून येणारी वाहने महामार्गावर याच चौफुलीवरून जाताना प्रामुख्याने कोंडी होते. येथे काम करणे वाहतूक पोलिसांनाही जिकिरीचे ठरते. उड्डाणपुलाच्या कामामुळेही वाहनांची गर्दी वाढत असल्याने कोंडीत भर पडत आहे.

-एम. रामनाथ

शहर परिसर

...तरच थांबेल 'खडखडाट'

स्टेट बँकेच्या एटीएममध्ये सुटीच्या दिवशी अनेकदा खडखडाट असतो. छोट्याशा बाबीसंदर्भातही दंड वसूल करण्यात कसूर न करणाऱ्या बँकेने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. एटीएममध्ये पैसे टाकणाऱ्या कंपनीला ही बाब लक्षात आणून देऊन त्यांच्याकडूनच दंड आकारला पाहिजे, तरच खडखडाटाला आळा बसेल.

-मनोहर पवार

मेरी परिसर

स्वच्छतेचा घ्यावा आदर्श

मेरीरोड, पेठरोड, रिंगरोडवर साफसफाई करताना आध्यात्मिक संस्थेचे साधक, युवक वर्ग दिसून आला. कुठेलीही चमकोगिरी न करता शहर, देशाच्या विकासाला ते हातभार लावत आहेत, हा आदर्श आपणही घ्यावा. स्वच्छता, पाणी वाचविणे, झाडे लावणे हा मंत्र युवापिढीत रुजविण्यासाठी असे उपक्रम उपयुक्त ठरणारे आहेत.

-राजेंद्र राजधर

(सिटिझन रिपोर्टर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावरकर जयंती समितीची बैठक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

दरवर्षी प्रमाणे यंदाही भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी समितीच्या वतीने भगूर येथील प्रभू श्रीराम मंदिरात कार्याध्यक्ष वसंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. समितीच्या वतीने २८ मे रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबई येथील आहारतज्ज्ञ डॉ. किरण वाटारे यांचे आहार विषयावर व्याख्यान, तर सायंकाळी ७ वाजता चैताली म्युझिकल हार्मोनी, मुंबईचे गायक मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला ५० कलाकारांचा 'जल्लोष २०१८' हा कार्यक्रम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार आहे. याप्रसंगी तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेता नागेश मोरवेकर, अभिनेत्री धनश्री दळवी आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष वसंत पाटील यांनी दिली. याप्रसंगी प्रास्ताविक अशोक मोजाड तर आभार प्रताप पवार यांनी मानले. बैठकीस रमेश पवार, राजेंद्र कापसे, शामराव शिंदे, शेखर बागडे, मुकुंद देशमुख, राजन गायकवाड, ज्ञानेश्वर गणोरे, अनिल पवार, उत्तमराव जाधव, राजेंद्र बागडे, अॅड. जगदीश बलकवडे, दीपक बलकवडे, प्रशांत कापसे आदींसह समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता गावातच होणार रक्ताच्या तपासण्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

केंद्र सरकारच्या सीएससी उपक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यात प्रत्येक गावात रक्त तपासणी केंद्र उभारण्यात येत आहे. त्यासाठी नाशिक येथील आस्था पॅरामेडिकल संस्था दिंडोरी रोड येथे १० दिवसांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे.

सीएससीद्वारे प्रत्येक गावात विविध प्रकारच्या तपासणीसाठी लागणारे रक्ताचे नमुने कसे घ्यायचे याविषयी प्रशिक्षण देण्यात येत आहे. सुरुवातीला नाशिक जिल्ह्यातील ५० गावातील प्रशिक्षणार्थींना ही सेवा सुरू करण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये तीन दिवसीय कार्यशाळा आणि नंतर एक आठवड्याचे प्रात्यक्षिक ग्रामीण रुग्णालयात होणार आहे. त्यानंतर प्रशिक्षित विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

हा उपक्रम केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना विविध प्रकारच्या टेस्ट करण्यासाठी खासगी लॅबमधून जास्त प्रमाणात दर आकारले जातात. त्यावर आळा घालण्यास या उपक्रमामुळे मदत होणार आहे. सीएससीमार्फत या सर्व तपासण्या अत्यल्प दरात उपलब्ध होणार असून, या सेवेद्वारे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.

या प्रशिक्षणास ग्रामीण भागातील ५० प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आली असून, त्यांना हिंद लॅबतर्फे पॅथॉलॉजिस्ट डॉ. विजय गवळी, डॉ. अतुल पानट हे प्रशिक्षण देत आहेत.

सीएससीच्या होमियोपॅथी, टेलिपॅथी, जनऔषधीसारख्या सेवा ग्रामीण भागात प्रचलित होताना दिसत आहेत. त्यात अजून एक नवीन सेवा आल्यामुळे सीएससी केंद्रचालकांचा उत्साह वाढण्यास मदत होत आहे, अशी माहिती सीएससी जिल्हाव्यवस्थापक महेश देशमुख आणि महेश कोलते यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुलींच्या घटत्या जन्मदरप्रश्नी मानसिकता बदलण्याची गरज

$
0
0

नाशिकमध्ये मुलींचा जन्मदर घटला हे नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. हजार मुलांमागे १२०० पर्यंत गेलेला मुलींचा जन्मदर यंदा ९२१ वर आला आहे, ही खूपच धक्कादायक आणि चिंता वाढविणारी बाब आहे. एकीकडे स्त्रीभ्रूणहत्या थांबाव्यात म्हणून सरकार चांगली पावले उचलत असतानाही छुप्या पद्धतीने गर्भलिंगनिदान चाचण्या, तसेच गर्भपात होत आहेत. हे चित्र सुधारण्यासाठी आणि लोकांची मानसिकता बदलण्याकरिता जनजागृती करण्यासह प्रबोधनपर उपक्रम राबविण्याबरोबरच कायदा आणखी कठोर करावा, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. मुलीदेखील मुलांच्या बरोबरीने प्रगती साधत असताना असे प्रकार करणाऱ्या नागरिकांनी आपली पारंपरिक भूमिका बदलण्याची आवश्यकता असल्याची भावनादेखील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

आकडेवारी चिंता वाढविणारी

नाशिकमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत मुलींच्या जन्मदर मोठ्या प्रमाणावर घटला आहे. त्याची आकडेवारी धक्कादायक आणि चिंता वाढविणारी आहे. याचा अर्थ स्त्रीभ्रूणहत्या सुरूच आहे. छुप्या पद्धतीने सुरू असलेले असे प्रकार रोखले गेले पाहिजेत. मुलींच्या जन्माचे स्वागत गावागावांत नव्या उमेदीने व्हायला हवे. स्थानिक प्रशासनाने गर्भलिंग चाचणी करणाऱ्यांवर करडी नजर ठेवत कारवाई केली पाहिजे.

-अॅड. शरद वाघ

सर्वच स्तरांवर व्हावे प्रबोधन

मुलींनी प्रत्येक क्षेत्रात स्वतःला सिद्ध केले आहे. अनेक क्षेत्रांत मुलींनी नेत्रदीपक यश मिळवून कुटुंब आणि देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. मात्र, तरीही मुलींच्या जन्माचे स्वागत का केले जात नाही? समाजाची मुलगाच हवा ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. मानसिकता बदलल्याशिवाय मुलगी-मुलगा हा भेद दूर होणार नाही. त्यासाठी सर्वच स्तरांवर प्रबोधन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

-सोनाली जाधव

नकारात्मक मानसिकता कारणीभूत

कितीही उपाययोजना केल्या, तरी मुलींचा जन्मदर घटत असल्याचे चित्र दिसत आहे. हे वास्तव भयावह आहे. याला नकारात्मक मानसिकता हे एकच कारण आहे असे वाटते. सरकार, प्रशासन प्रयत्न करते. पण, मुलगाच हवा अशी अनेकांची मानसिकता प्रबोधनानंतरही बदलत नाही, हे दुर्दैव आहे. एकविसाव्या शतकात जगणाऱ्या अनेक मुला-मुलींचीही मुलगा व्हावा हीच अपेक्षा दिसते. त्यामुळे राजरोसपणे गर्भलिंगनिदान होत असल्याने हा मुलींचा जन्मदर घटत आहे. ग्रामीण भागात हवे तेवढे प्रबोधन होताना दिसत नाही.

-प्रिया कदम

कायदा करावा आणखी कठोर

१९८०-८५ च्या काळात पुरेशा सुविधा नव्हत्या. परिणामी मुलगा होईल की मुलगी याची काळजी नव्हती. मुलांबरोबरच मुलींचाही आनंदाने स्वीकार केला जात होता. मात्र, तंत्रज्ञानाने आणलेल्या यंत्रणेचा कसा दुरुपयोग होतो याचा अनुभव अशा प्रकारांमुळे येत आहे. अलीकडच्या काळात बदलत्या राहणीमानामुळे एक मुलगा, एक मुलगी अशी छोट्या कुटुंबाची संकल्पना पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर मुलाच्या अपेक्षेने मोठ्या प्रमाणावर गर्भलिंगनिदान चाचण्या आणि गर्भपात होताना दिसून येत आहेत. कायदा आणखी कठोर करून हे प्रकार रोखण्याची गरज आहे.

-जिजाबाई खेलुकर

...तर टळू शकेल स्त्रीभ्रूणहत्या

वाढत्या स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी सध्या विविध पातळ्यांवरून केले जाणारे प्रबोधन अत्यंत तोकडे पडत असल्याचे दिसेत. कारण, असे प्रकार तांबण्याऐवजी वाढतच असल्याची बाबी यंदाच्या आकडेवारीमुळे अधोरेखित झाली आहे. हे प्रकार रोखण्यासाठी सरकारने गावागावांत मुलींच्या जन्मावर विशेष सवलत किंवा नोकरीत प्रथम आरक्षण असे काहीतरी निकष लागी करायला हवेत म्हणजे छुप्या पद्धतीने होणारी स्त्रीभ्रूणहत्या टळू शकेल.

-प्रतीक रायते

(आमचा आवाज)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नामजपात मोठी शक्ती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

जीवनात आमुलाग्र बदल घडविण्याची इच्छा असल्यास प्रत्येकाने मनापासून 'रामकृष्ण हरी' हा जप करावा. नामजपात मोठी शक्ती असून, या मंत्रामुळे सकारात्मक भाव निर्माण होत असल्याचे प्रतिपादन बाबा महाराज सातारकर यांनी रविवारी केले.

सिडको येथे राष्ट्रीय कीर्तन महोत्सवात ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, कोणतीही गोष्ट करण्यासाठी त्यात तल्लीन होणे आवश्यक असते. त्यामुळे निश्चितच यश मिळते. कोणत्याही कार्यात मनुष्याचे रमणे थांबले, की जीवन नीरस वाटू लागते. सेवा करण्यासाठी नामाचे महत्त्व सर्वाधिक आहे. नामजपात मोठी शक्ती असून, 'रामकृष्ण हरी' या जपात मोठी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अभंगही सादर केला. रामायणचार्य रामराव महाराज ढोक यांनी राम आणि सीतेच्या वनसातील प्रवासाची माहिती चित्ररुपाने उपस्थितांसमोर मांडली.

यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आमदार डॉ. अपूर्व हिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. राहुल महाराज साळुंके, समाधान चुंभळे आदी संयोजन करीत आहेत. अजून दोन दिवस सुरू राहणाऱ्या या कीर्तन महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी महाप्रसाद वाटप होणार आहे.

(स्वतंत्र चौकट)

'देव भक्तीचा भुकेला'

देव हा भक्तीचा भुकेला असून, मनापासून भक्ती केली, तर देवाकडून काहीही सहजगत्या मिळू शकत असते, असे प्रतिपादन हभप बाबासाहेब महाराज इंगळे यांनी शनिवारी राष्ट्रीय कीर्तन महोत्सवात केले. रामायण, महाभारतातील विविध कथांची माहितीही त्यांनी रामायणाचार्य रामराव ढोक यांनी राम वनवासाला निघाल्यानंतर अयोध्येत काय परिस्थिती झाली, याचे चित्र उभे करून श्रीराम वनवसाची कथा सांगितली.

(लोगो : सोशल कनेक्ट)

२ फोटो आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीसह काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी चर्चा

$
0
0

दौऱ्याच्या पूर्वसंध्येला अजित पवार शहरात दाखल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारीच नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांचा मुक्काम हॉटेल एमराल्ड पार्क येथे असेल. प्रमुख नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी अॅड. शिवाजी सहाणे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते. निवडक नेत्यांबरोबर त्यांनी रात्री सुद्धा चर्चा केली.

खुटवडनगर येथील श्रीसिद्धी बॅक्वेट हॉल येथे सोमवारी (दि. १४) सकाळी १० वाजता अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकारी व मतदारांसोबत बैठक होणार आहे. त्यात पुढील रणनीती ठरवली जाणार आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने या निवडणुकीत आपला उमेदवार निवडून आणला. पण, यंदा मतदारांचे संख्याबळ कमी असल्याने राष्ट्रवादीसमोर आव्हान आहे. त्यामुळे या निवडणुकीत अजित पवार यांनी लक्ष घातले आहे. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर दुपारी एक वाजता पवार हे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

कार्यकर्त्यांसोबत सेल्फी

शहरात येताच अजित पवार यांचे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढले. दरम्यान, सोमवारी (दि. १४) सकाळी साडेनऊ वाजता जुने नाशिक येथे संभाजी महाराज पुतळा अभिवादन सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता बैठक, त्यानंतर दुपारी १ वाजता पत्रकारांशी संवाद साधतील. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सायंकाळी सहाला जेलरोड येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी होणार आहे. जेलरोडच्या ज्ञानेश्‍वरनगर मैदानावर अजित पवारांच्या हस्ते शंभू राजे गौरव पुरस्काराचे वितरण होणार आहे. त्यानंतर सत्यपाल महाराजांचे खंजिरीवादन होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक मतदारासंघ; मतदान आठ जूनला

$
0
0

१२ जूनला मतमोजणी

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

विधान परिषद नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ही द्विवार्षिक निवडणूक आठ जूनला तर मतमोजणी १२ जूनला होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

राजाराम माने हे निवडणूक निर्णय अधिकारी असून विभागातील पाचही जिल्हाधिकारी सहाय्यक निवडणूक अधिकारी असतील. निवडणुकीसाठी प्रत्येक तहसीलस्तरावर मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. मतदार संघात ९४ मतदान केंद्रे असतील. आयुक्त माने म्हणाले, की विभागातील नाशिक, नगर, नंदुरबार, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. निवडणुकीसाठी विभागीय आयुक्तालय, नाशिक विभाग व जिल्हास्तरावर आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आचारसंहिता काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना शासकीय वाहने वापरण्यास निर्बंध आहेत. केंद्र व राज्याचे मंत्री, खासदार, आमदार व इतर पदाधिकारी यांना शिक्षक मतदारांवर प्रभाव पडेल अशी घोषणा करता येणार नाही की, शिक्षण व तत्सम संस्थांचे उद्धाटन करता येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी मालमत्तेवर फलक लावणे, निवडणूक चिन्ह लावणे आदी कारणाने मालमत्ता विद्रुपीकरण करण्यास बंदी आहे. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही माने यांनी दिला आहे.

निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षक नेमला जाणार आहे. मतदानासाठी जम्बो मतपेट्यांची व्यवस्था करण्यात आली असून मतपत्रिकांचा वापर केला जाईल. मतदारांनी पसंतीक्रमानुसार मतदान करावे. गेल्या १९ जानेवारी अखेर निवडणुकीसाठी एकूण मतदार संख्या ५२ हजार २०१ असून त्यामध्ये पुरूष ३९ हजार ६२४ तर स्त्री मतदार १२ हजार ५७७ आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

अधिसूचना जारी : १५ मे

उमेदवारी अर्जाचा अंतिम दिनांक : २२ मे

उमेदवारी अर्ज छाननी : २३ मे

उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम मुदत : २५ मे

मतदान : आठ जून (सकाळी ८ ते सायंकाळी ४)

मतमोजणी : १२ जून

निवडणूक प्रक्रिया समाप्ती : १५ जून

एकूण मतदार : ५२,२०१

पुरूष : ३९,६२४

स्त्री : १२,५७७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवासभाडे स्पर्धेत शिवशाही मागेच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

खासगी बस वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने नाशिकहून नागपूर व कोल्हापूर या दोन शहरांसाठी शिवशाही स्लीपर कोच सुरू केली असली, तरी त्याचे भाडे मात्र खासगी बसपेक्षाही २०० ते ३०० रुपये जास्त आहे. खासगी बसचे दर शिवशाहीपेक्षा कमी असल्यामुळे या सेवेला कसा प्रतिसाद मिळतो, यावरच एसटीच्या या स्लीपर कोचचे भविष्य ठरणार आहे.

एसटीने आठ महिन्यांभरापूर्वी राज्यभर शिवशाही बस सुरू केल्या असून, त्यात ६० बसेस या नाशिकला आल्या आहेत. या सर्व वातानुकूलित असलेल्या बस 'चेअर कार'सारख्या आहेत. पण, एसटीने लांब पल्ल्याच्या मार्गासाठी दहा दिवसांपूर्वी नाशिक-नागपूर ही शिवशाही स्लीपर कोच सुरू केली. या बसचे भाडे १६०३ रुपये व १० रुपये आरक्षण चार्ज असे १६१३ रुपये ठेवले. पण, खासगी बसचे भाडे या मार्गावर १२०० ते १४०० च्या आसपास आहे. त्यामुळे दोन्ही बसच्या भाड्यातील अंतर हे २०० ते ३०० रुपयाच्या आसपास आहे. नागपूर सेवा सुरू केल्यानंतर रविवारपासून कोल्हापूर येथेही ही स्लीपर कोच बस सुरू केली. त्यासाठी भाडे १०१३ व आरक्षणासाठी १० रुपये अतिरिक्त ठेवले. त्यामुळे एकूण भाडे १०२३ रुपये झाले. या मार्गावर खासगी बसच्या स्लीपर कोचचे भाडे सरासरी ७०० ते ९०० रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे दोन्ही मार्गांवरील खासगी बसही २०० ते ३०० रुपयांहून अधिक स्वस्त असल्यामुळे त्याचा फटका शिवशाहीला बसण्याची शक्यता आहे.

भाडे कमी केल्यास फायदा

एसटीने खासगी बसला स्पर्धा करण्यासाठी या बस सुरू केल्या असल्या तरी भाड्याशी स्पर्धा न केल्यामुळे प्रवाशांचा कल खासगी बसकडे वळला तर त्याचा परिणाम या नव्या मार्गावर होणार आहे. एसटी बसमध्ये सुरक्षितता, वेळ व इतर गोष्टींच्या सुविधा असल्या तरी भाडे हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. त्यामुळे एसटीने भाडे खासगी बसच्या बरोबरीने केल्यास या बसेसला अधिक फायदा होणार आहे. खासगी बसचे सरासरी स्लीपर कोचचे भाडे हे कमी असले तरी काही खासगी बसचे भाडे मात्र एसटीपेक्षा जास्त आहे. त्यात व्हॉल्व्हो व इतर सुविधाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या बसच्या तुलनेत एसटीचे दर कमी असले तरी बसमध्ये फरक आहे.

एसटीचे स्लिपर कोचचे आरक्षणासह भाडे

नाशिक - नागपूर - १६१३ रु.

नाशिक - कोल्हापूर - १०२३ रु.

-

नाशिक - नागपूर खासगी बस भाडे

राजलक्ष्मी ट्रॅव्हल्स -१२२२

सैनी ट्रॅव्हल्स - ११६५

खुराणा ट्रॅव्हल्स - १२२५

प्रसन्ना पर्पल ग्रॅण्ड - १४७२

-

नाशिक - कोल्हापूर खासगी बस भाडे

पारिख ट्रॅव्हल्स -७०० रु.

लवबाइक ट्रॅव्हल्स - ७५० रु.

चौधरी व वैभव - ७६४ रु.

कोंडुस्कर (व्हॉल्वो) - ९२१ रु.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षा प्रवास की शिक्षा?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या शहरातील काही रिक्षाचालकांची मुजोरी वाढू लागली आहे. याचा अनुभव घेणाऱ्या एका महिलेने थेट फेसबुकसारख्या सोशल मीडियावरच याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली असून, वाहतूक पोलिसांच्या शेळपट कारभाराचेही वाभाडे काढले आहेत. मुजोर रिक्षाचालकांसह कामचुकार वाहतूक पोलिसांवर अधिकारी कारवाई करणार का, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

रिक्षाचालकांची मुजोरी ही नाशिककरांसाठी नवीन नाही. नियम पाळण्यासाठी नसतातच जणू, अशा अविर्भावात रिक्षाचालक शहरात प्रवासी वाहतूक करताना दिसतात. याबाबत कोणी टोकण्याचा प्रयत्न केला तर त्याला अरेरावीची भाषा वापरली जाते. एका महिलेला दोन दिवसांपूर्वी असाच अनुभव आला. 'प्रवासी देवो भव' असे ब्रीद लिहिलेल्या 'एमएच- १५, इएच-१४६२' या क्रमांकाच्या रिक्षामध्ये कॉलेजरोड परिसरातून ही महिला बसली. चालकाने रिक्षामधील गाण्यांचा आवाज वाढविला. जोरजोरात हॉर्न वाजवित तो रिक्षा चालवत होता. महिलेने त्याला गाण्यांचा आवाज कमी करण्यास तसेच वारंवार हॉर्न न वाजविण्यास सांगितले. परंतु, महिलेशी उद्धटपणे बोलत तो जाणीवपूवर्क हॉर्न वाजवू लागला. त्यामुळे महिलेने रिक्षा थांबविण्यास सांगितले. ती रिक्षातून उतरून जाऊ लागली. त्यानंतरही तो तिला कट मारून पुढे थांब्यावर जाऊन थांबला. संतप्त महिलेने त्याच्या रिक्षाचा फोटो काढला. त्यावेळी तो खाली उतरला. 'रिक्षाचाच का? माझाही फोटो काढ' असे म्हणून अधिकच उर्मटपणे बोलू लागला. त्यामुळे ती महिला चालत पुढे गेली. सीबीएसजवळ राजपूत नावाचा वाहतूक पोलिस तिला करवंदे खरेदी करताना दिसला. तिने त्याला घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. संबंधित रिक्षाचालकावर कारवाई करा, अथवा त्याला समज तरी द्या, अशी विनंती त्यांना केली. परंतु, मी काही करू शकत नाही. तुम्ही सरकारवाडा पोलिस स्टेशनला तक्रार द्या, असा सल्ला देत तो तेथून निघून गेला. पोलिसच नागरिकांना मदत करणार नसतील, तर रिक्षा चालकांचे फावणारच. अशी भावना या घटनेमुळे बळावली आहे. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील मुजोर रिक्षाचालक आणि कामचुकार पोलिसावर काय कारवाई, करतात याकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरीप उद्दिष्टात वाढ

$
0
0

खरीप हंगाम आराखड्यातील आकडेवारीला कॉपीपेस्टची किड

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड

नाशिक विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने खरीप हंगामाचा आराखडा शासनाला सादर केला असून, सन २०१८-१९ च्या खरीप हंगामासाठी पेरणीयोग्य क्षेत्रात गतवर्षापेक्षा ५७० हेक्टर क्षेत्रात वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी खरीप हंगामासाठी पेरणीचे लक्ष्य २२ हजार ९२ हेक्टर इतके होते. यंदाच्या खरीप हंगामासाठी २२ हजार ६६० हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्टे ठेवण्यात आले आहे.

राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक नुकतीच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत झाली. या आढावा बैठकीत राज्यातील सर्वच विभागांनी खरीप हंगामाचे नियोजन सादर केले. विभागातील तब्बल २५ तालुक्यांतील भूजलपातळीत घट आलेली असताना कृषी विभागाने मात्र सर्वसाधारण पेरणीयोग्य क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर खरीप हंगामात पेरणी करण्याचा घाट घातला आहे. या सर्व आकडेवारीला निव्वळ जुळवाजुळवीचा वास येत आहे. बहुतांश आकडेवारी कॉपी पेस्ट केलेली आहे.

नाशिक विभागातील नाशिकसह, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांत सर्वसाधारण पेरणीयोग्य क्षेत्र २२ हजार ५५९ हेक्टर इतके आहे. यंदाच्या खरीप हंगामात भात, बाजरी, कापूस, ऊस, तूर, उडीद, मूग, खुरासणी, तीळ, मका, खरीप ज्वारी, नागली, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन या पिकांच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. सन २०१७-१८ च्या खरीप हंगामाच्या पेरणीक्षेत्रापेक्षा यंदाच्या खरीप हंगामाच्या पेरणी क्षेत्रात वाढ करण्यात आल्याने यंदा विभागात काही पिकांच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी २२ हजार ९२ हेक्टर क्षेत्रापैकी प्रत्यक्षात २१ हजार ७२७ हेक्टर क्षेत्रावरील पेरणीचे लक्ष्य साध्य झाले होते. विभागातील जळगाव जिल्ह्यातील भूजलपातळी सर्वांत जास्त घटलेली असतानाही या जिल्ह्यात उसाच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ करण्याचे मनसुबे कृषी विभागाने रचले आहेत. विशेष म्हणजे या आढावा बैठकीत विभागाच्या खरीप हंगाम आराखड्यावर कोणीही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ओरखडा न ओढता त्यास मंजुरी दिली आहे.

या पिकांच्या क्षेत्रात वाढ होणार

कापूस पिकाखालील क्षेत्रात नाशिकसह, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांत मोठी वाढ होणार आहे. उसाच्या पिकाचे क्षेत्रही नाशिक व जळगाव जिल्ह्यांत वाढणार आहे. भात पिकाचे क्षेत्र नंदुरबार व नाशिकध्ये स्थिर तर धुळ्यात घटविण्यात आले आहे. बाजरीचे क्षेत्र नाशिकमध्ये स्थिर, तर जळगावमध्ये वाढविण्यात आले आहे. मकाचे क्षेत्र जळगावमध्ये वाढणार आहे. नंदुरबार व धुळ्यात तुरीची लागवड कमी तर जळगावमध्ये काही प्रमाणात वाढणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षक मतदारसंघ निवडणूक लांबणीवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

विधान परिषद नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. सुधारीत कार्यक्रम नंतर जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त रघुनाथ गावडे यांनी दिली.

सुटींचा कालावधी सुरू असल्याने ही निवडणूक पुढील कालावधीत घेण्याची विनंती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत भारत निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यानुसार निवडणूक आयेागाने हा निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलला असून, सुधारीत कार्यक्रम नंतर जाहीर करण्यात येईल, असे आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. शिक्षक मतदारसंघाच्या विद्यमान सदस्यांची मुदत ७ जुलैला पूर्ण होत असल्याने त्यापूर्वी ८ जून रोजी निवडणूक घेण्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. मात्र सुट्यांमुळे निवडणूक घेऊ नये, अशी मागणी करण्यात आल्याने निवडणूक आयोगाने शेवटी ही निवडणूक पुढे ढकलली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नमामि गोदातर्फे त्र्यंबकमध्ये श्रमदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगरपालिका प्रशासनाने सुरू केलेल्या पाणलोट क्षेत्रातील श्रमदान मोहिमेत अभिनेता चिन्मय उदगीरकर यांच्यासह नमामि गोदा फाउंडेशनचे राजेश पंडित आणि पर्यावरणप्रेमींनी सहभाग नोंदवला. चिन्मय उदगीरकर आणि राजेश पंडित यांनी स्वत: टिकाव फावडे घेऊन वृक्ष लागवडीसाठी जमीन तयार केली. दोन दिवस आगोदर वृक्षप्रेमी न्या. अंबादास जोशी यांनी नुकतीच येथे भेट दिली. त्यांनी चारा बियाणे टाकण्याचा सल्ला दिला आहे. नगर पालिका प्रशासनाने पाणी फाउंडेशनपासून प्रेरणा घेम श्रमदान सुरू केले आहे. नगरपालिका कक्ष अधिकारी अरुण गरुड, संजय मिसर, अभियंता कांगणे, मधुकर माळी, सागर गायकवाड उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सर्व शिक्षा’साठी पुस्तकांचे वितरण सुरू

$
0
0

३१ मेपर्यंत ९५ लाख प्रती वितरणाचे बालभारतीपुढे आव्हान

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सर्व शिक्षा मोहिमेअंतर्गत पाठ्यपुस्तक मंडळाच्या विभागीय भांडारात नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्या उपस्थितीत सोमवारी पुस्तक वितरणास प्रारंभ झाला. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्हा परिषदेंतर्गतच्या व नाशिक, धुळे, मालेगाव व जळगाव या महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ३८ कोटी ५० लाख १२ हजार ५७३ रुपयांच्या एकूण ९५ लाख ४२ हजार ८५ पुस्तक प्रती ३१ मेपर्यंत वितरित करण्यात येणार आहेत.

२०१८-१९ हे नवे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होणार असून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात सर्व विषयांची मोफत पाठ्यपुस्तके मिळावी यासाठी बालभारतीच्या विभागीय कार्यालयाकडून सोमवारपासून वितरण सुरू झाले.

शाळेच्या पहिल्या दिवसाची विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. नवीन अभ्यास, नवीन पुस्तके नव्या शैक्षणिक वर्षासाठी प्रोत्साहन देणारी ठरतात. सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. ही पुस्तके विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी मिळण्याच्या दृष्टीने शिक्षण विभाग, पाठ्यपुस्तक मंडळ आणि सरकारी वाहतूक ठेकेदार यांच्याकडून नियोजन आखण्यात आले असल्याचे बालभारतीच्या विभागीय कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यानुसार ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. तालुकास्तरापर्यंतचा पुस्तक पुरवठा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पाठ्यपुस्तक मंडळाचे विभागीय भांडार व्यवस्थापक लक्ष्मण डामसे यांनी यावेळी सांगितले. वितरणाप्रसंगी वाहतूक ठेकेदार नितीन गायकर, जिल्हा परिषद नाशिकचे सुनील दराडे, किशोर थोरात, आत्माराम पाटील, आदिनाथ घुले, प्रकाश माळी उपस्थित होते.

नव्या अभ्यासक्रमतील पुस्तकांची प्रतीक्षा

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून इयत्ता पहिली, आठवी व दहावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला आहे. सर्व शिक्षा अभियानात पहिली व आठवीचाही समावेश असला तरी या वितरणात अद्याप या इयत्तांच्या पुस्तकांचा समावेश नाही. तर दहावीची पुस्तके बाजारात उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे बालभारतीकडून सद्यस्थितीत दुसरी ते सातवीची पुस्तके वितरित केली जात आहेत.

सरकारी, महापालिका व अनुदानित शाळांमधील लाभार्थी विद्यार्थ्यांना सरकारच्या सर्व शिक्षण योजनेअंतर्गत शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. त्यामुळे कुणीही पाठ्यपुस्तके खरेदी करू नयेत.

- रामचंद्र जाधव, शिक्षण उपसंचालक

-

जिल्हा परिषद क्षेत्रातील मागणी

जिल्हा......प्रतींनुसार मागणी

- नाशिक : २८ लाख ६५ हजार ४२२

- धुळे : १२ लाख १८ हजार ६९५

- जळगाव : २५ लाख ३९ हजार ४७३

- नंदुरबार : १२ लाख १९ हजार ६६१

- एकूण प्रती : ७८ लाख ४३ हजार २५१

-

मनपा क्षेत्रातील मागणी

- नाशिक : ६ लाख ३७ हजार ८

- धुळे : ३ लाख १ हजार ३१५

- जळगाव : २ लाख ५१ हजार ७०१

- मालेगाव : ५ लाख ८ हजार ८१०

- एकूण प्रती : १६ लाख ९८ हजार ८३४

-

- जिप व मनपा क्षेत्रातील एकूण प्रतींची संख्या : ९५ लाख ४२ हजार ८५

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिमुकल्यांना बालनाट्यांची मेजवानी

$
0
0

किड्स कार्निवलमध्ये धम्माल मजा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उन्हाळ्याच्या सुट्टीत घराबाहेर पडून आजारी पडण्यापेक्षा घरीच बसून नाटक बसवू, असे ठरवत नाटकाच्या निमित्ताने घातलेला धिंगाणा सोमवारी चिमुकल्यांनी 'धांगडधिंगा' या नाटकातून प्रत्यक्ष अनुभवला. निमित्त होते बच्चेकंपनीसाठी महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे आयोजित बालनाट्यांचे.

महाराष्ट्र टाइम्सतर्फे ११ मेपासून किड्स कार्निवल सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी 'निंबोणीच्या झाडामागे', 'काबुलीवाला' आणि 'धांगडधिंगा' या तीन संस्कारक्षम नाटकांची मेजवानी बच्चे कंपनीला यानिमित्ताने मिळाली. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब आणि दामोदर प्रॉडक्शन यांच्यातर्फे या नाटकांचे आयोजन करण्यात आले. प. सा. नाट्यगृह येथे ही तिनही नाटके पार पडली.

'निंबोणीच्या झाडामागे' या नाटकात जाहिरात आणि जाहिरातीतील मम्मी मुलांना आवडते, या आशयावर प्रकाश टाकण्यात आला. जेव्हा एक मुलगा जाहिरातीचे शुटींग करतो, त्यातील मम्मी कशी आहे, ती पैशांसाठी आपल्या मुलांचे लाड करते, त्यांना जवळ घेते आणि इतरवेळी ती त्यांना जवळ येऊ देत नाही, असा अनुभव त्याला येतो. त्या अनुभवानंतर त्याला आपलीच आई कशी प्रेमळ असते याची जाणीव होते व चूक समजते, असा विषय मांडण्यात आला आहे. 'काबुलीवाला' या रवींद्रनाथ टागोरलिखित नाटकात एख लहान मुलगी आणि कंधार येऊन आलेला सुकामेवा विकणारा 'काबुलीवाला' यांच्यातील एक अतिशय प्रेमळ नात्याचा उलगडा करण्यात आला. तो तिच्या लग्नाला स्वत:च्या मुलीचे लग्न सोडून येतो. मात्र, ती त्याला ओळखतही नाही. हा धक्का तो सहन करू शकत नाही व स्वत:चे प्राण सोडतो. अतिशय संवेदनशील विषय मांडलेले हे नाटक उपस्थितांना विशेष आवडले. तर तिनही नाटकांचे सादरीकरण, अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.

नाटकात अमिषा डावरे, ओंकार क्षेमकल्याणी, राज सहाणे, नितीश फुलंब्रिकर, गार्गी ब्राह्मणकर, विराज दांडेकर, साक्षी जाधव, पूर्वा पानगव्हाणे, अग्रणी गिते, रजत जोशी, अर्णव खरे, प्रज्ञुम्न हिरे, सर्वज्ञ मते, कृतिका कडवे, श्रावणी कदम, शर्वरी कदम, शर्वरी महाजन, नाझिया यांनी भूमिका केल्या. तर नाटकाचे दिग्दर्शन डॉ. प्रशांत वाघ यांनी केले.

फोटो : पंकज चांडोले

कल्चर क्लब, किड्स कार्निव्हल लोगो, फेसबुक, ट्विटर लिंक, क्यू आर कोड वापरावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेदांत, हरिष ठरले टॉपर

$
0
0

आयसीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीचे निकाल जाहीर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आयसीएसई बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या सोमवारी जाहीर झालेल्या निकालात नाशिकमधील शाळांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

सोमवारी रात्री उशिरापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार विस्डम हायस्कूलचा दहावीचा विद्यार्थी वेदांत देव याने ९८.४० टक्के गुण मिळवत पहिला क्रमांक पटकाविला. तर अशोका युनिव्हर्सल ज्युनिअर कॉलेजचा बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी हरिष उथयाकुमार याने ९५.५ टक्के गुण मिळवून बारावीत प्रथम क्रमांक पटकाविला. शहरातील आयसीएसई बोर्डाच्या सर्वच शाळांचा उत्तुंग यश संपादन केले. सोमवारी दुपारी ३ वाजता हा निकाल जाहीर करण्यात आला. या निकालाकडे पालक अन् विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. आयसीएसई बोर्डाचा शाळानिहाय निकाल पुढीलप्रमाणे :

विस्डम हायस्कूल

विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयसीएसई दहावीच्या निकालात वेदांत देव याने ९८.४० टक्के गुण मिळवित शाळेतून पहिला क्रमांक पटकाविला. रात्री उशिरापर्यंत हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार वेदांतचे गुण शहरातील इतर शाळांमधूनही सर्वात जास्त होते. शाळेत द्वितीय क्रमांकावर विभागून श्रुती पाठक (९७.८० टक्के) आणि सम्यक जैन (९७.८० टक्के) यांनी यश मिळविले. एकूण १५८ पैकी ८५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपर्यंत गुण मिळविले, ३२ विद्यार्थ्यांनी ८५ ते ९० टक्क्यांदरम्यान, ३५ विद्यार्थ्यांनी ७५ ते ८५ टक्क्यांदरम्यान गुण मिळविले. सहा जणांना ७० टक्के गुण मिळाले. शाळेचा निकाल १०० टक्के लागला.

विस्डम ज्युनिअर

विस्डम हाय इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीच्या कॉमर्स शाखेतून काव्या गोखले हिने ९५.५० टक्के गुण मिळवत पहिला क्रमांक पटकाविला. बारावीसाठी एकूण २६ विद्यार्थी होते. पैकी सात जणांनी ९० टक्क्यांपर्यंत गुण मिळविले. ६ विद्यार्थ्यांनी ८५ टक्क्यांवर तर १३ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविले. कॉलेजचा बारावीचाही निकाल १०० टक्के लागला.

ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल

ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलमधून वैष्णवी गायधनी हिने ८९.१७ टक्के गुणांसह पहिला क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांकावर धीरज चौधरी याने ८९.०० टक्के मिळविले तर प्राजक्ता आचार्य हिने ८६.९३ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकाविला. वर्गामध्ये प्रतिविद्यार्थी मिळविलेल्या गुणांची सरासरी सुमारे ७६ टक्के आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र सपकाळ यांनी केले आहे.

फ्रावशी अॅकॅडमी

फ्रावशी अॅकॅडमीनेही दशकभराची १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली. मानसी कुलकर्णी हिने ९६.५० टक्क्यांसह शाळेत पहिला क्रमांक पटकाविला. कुणाल जोशी याने ९५.६५ टक्क्यांवर दुसरा क्रमांक पटकाविला. तर तिसऱ्या क्रमांकावर विभागून साक्षी जोशी आणि वैदेही खर्डे यांनी ९५.५० टक्के गुण मिळविले. शाळेत १५० विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ३९ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले. ६५ विद्यार्थ्यांना ८० टक्क्यांपेक्षा जास्त, ३३ विद्यार्थ्यांना ७० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले. उर्वरित १३ विद्यार्थी हे पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाले.

पोद्दार इंटरनॅशनल स्कूल

पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमधून अथर्व दुर्गाप्रसाद जाजू याने ९७.२ टक्के मिळवित शाळेत पहिला क्रमांक पटकाविला. क्रमांकावर प्रथमेश मंगेश गांधी याने ९६.५ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविला. शाळेचा निकाल १०० टक्के लागला. या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या एकूण ८२ विद्यार्थ्यांपैकी १३ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविले. २५ विद्यार्थ्यांनी ८० ते ९० टक्के गुण मिळविले. २७ विद्यार्थ्यांनी ७० ते ८० टक्क्यांदरम्यान गुण मिळविले. प्रतिविद्यार्थी सरासरी ७९ टक्के गुण विद्यार्थ्यांनी मिळविले. प्राचार्य रमेशचंद्र पंडा, उपप्राचार्य भूषण उपासनी, महाव्यवस्थापक समीर वागळे आदींनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

होरायझन अॅकॅडमी

मराठा विद्या प्रसारक संचलित होरायझन अॅकॅडमीत दहावीतून पूर्वा जाधव हिने ९६.६७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. सिद्धेश गायकवाड याने ९४.३३ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक तर ईशान गुंद्रे ९४.३३ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकाविला. शाळेची ही पाचवी तुकडी आहे. विद्यालयातील ८५ पैकी २८ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांवर, ४६ विद्यार्थी उत्कृष्ट श्रेणीत तर ११ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सरचिटणीस नीलिमा पवार, सभापती माणिकराव बोरस्ते व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

अशोका युनिव्हर्सल स्कूल

अशोका युनिव्हर्सल स्कूल व ज्युनिअर कॉलेजनेही या निकालात १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली. संस्थेच्या वडाळा शाखेतील दहावीची विद्यार्थीनी रिया पाटील हिने ९८.३३ टक्के गुण मिळवून प्रथम, राज सुराणा याने ९७.६७ टक्के गुण मिळवून द्वितीय, तसेच कल्याणी कासार हिने ९६.१७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.

अशोका युनिव्हर्सल ज्युनिअर कॉलेज

संस्थेच्या वडाळा शाखेतील बारावीच्या विद्यार्थ्यांपैकी विज्ञान शाखेतून हरिष उथयाकुमार याने ९५. ८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. शहरातील आयसीएसई बोडार्त विज्ञान शाखेत त्याला सर्वाधिक गुण आहेत. सिद्धी कांकरिया हिने ९४. ८ टक्के गुण मिळवून द्वितीय तसेच अथर्व जांगडा याने ९३.८ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. कॉमर्स शाखेत नंदिनी अरोरा हिने ९०.६ टक्के गुण मिळवून प्रथम, इल्सा भगड व अनमोल शर्मा यांनी ८७.६ टक्के गुण मिळवून द्वितीय, तसेच मुस्कान क्रिपलानी हिने ८७.२ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थाध्यक्ष अशोक कटारिया, सहसचिव श्रीकांत शुक्ला आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images