Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मनमाड

$
0
0

वाहनाच्या धडकेने

पोलिस कर्मचारी जखमी

मनमाड : चारचाकी वाहनाने धडक दिल्याने पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि. १७) मध्यरात्री मनमाड-मालेगाव मार्गावर कानडगाव येथे घडली. या अपघातात जखमी झालेल्या पोलिसाला मालेगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी चांदवड पोलिस ठाण्यात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल तुकाराम मोरे असे जखमी झालेल्या पोलिसाचे तर विकास वाघ (रा. मनमाड) असे वाहनचालकाचे नाव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणी संवर्धन चळवळीत मोठे योगदान

$
0
0

भारतीय जैन संघटनेच्या कार्याची अमिर खानकडून दखल

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळाविरुद्धच्या लढ्यात केवळ जेसीबी, पोकलेनसारखी यंत्रणा उपलब्ध करून न देता भारतीय जैन संघटनेच्या सभासदांनी श्रमदानालाही प्राधान्य दिले आहे. गावोगावी त्यांनी पाणी बचतीबाबत प्रबोधनाची मोहीम हाती घेतली असून अभिनेता अमिर खाननेही त्यांच्या या कार्याची दखल घेतली आहे.

पाणी फाउंडेशनने उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबारमध्ये एकूण १३ तालुक्यांत दुष्काळमुक्तीसाठी अभियान सुरू केले आहे. या अभियानात भारतीय जैन संघटनेनेही पोकलेन, जेसीबीसारखी यंत्रणा पुरवून मदतीचा हात पुढे केला आहे. या पाचही जिल्ह्यातील तसेच तालुका पातळीवरील संघटनेचे प्रकल्प संचालक आणि कार्यकर्त्यांचे चर्चासत्र धुळे येथे नुकतेच झाले. यावेळी अमिर खान, किरण राव यांच्यासह नाशिकचे प्रकल्प संचालक नंदकिशोर साखला, विनय पारख, डॉ. कांतिलाल टाटिया, विजय दुगड, आदेश चंगेडिया, प्रकाश छाजेड, सुभाष रांका, रमेश चोरडिया, नरेश कांकरिया, सचिन कोठारी, चंद्रकांत डागा, प्रमोद गोलेछा, मनोज भंडारी, प्रवीण चोरडिया, सुभाष रांका, अमित बोरा, चंदन भळगट आदी उपस्थित होते. शांतीलालजी मुथ्था यांचे पाणी संवर्धनाबाबतचे विचार ऐकून प्रेरणा मिळत असल्याचे, समस्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो, अशी भावना अमिर खान यांनी यावेळी व्यक्त केली. दुष्काळाविरोधातील लढा जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी संघटनेने व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगारनगरी ‘आऊट ऑफ रेंज’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

कामगारनगरी सातपूरमधील बहुतांश परिसर 'आऊट ऑफ रेंज' झाल्याने परिसरातील रहिवाशांना नाहक गैरसोय सहन करावी लागत आहे. केवळ काही ठराविक कंपन्यांच्या टॉवरलाच परिसरात परवानगी दिली गेल्याने अन्य कंपन्यांचे मोबाइल वापरणारे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे येथे पुरेसे मोबाइल टॉवर उभारावेत, अशी मागणी परिसरातून होत आहे.

सातपूर परिसरातील श्रमिकनगर, चुंचाळे शिवार, ध्रुवनगर, शिवाजीनगर आदी भागात मोबाइल कंपन्यांच्या टॉवरला परवानगी मिळत नसल्याने घराच्या छतावर जाऊन मोबाइलवर बोलण्याची वेळ अनेकांवर येत आहे. त्यामुळे किमान घरात मोबाइलची रेंज येईल याकरिता नवीन टॉवरची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. रेंजच मिळत नसल्याने महागडे मोबाइलदेखील निकामी ठरत असल्याची भावना कामगार व्यक्त करीत आहेत. एकीकडे केंद्र व राज्य सरकारने सर्वसामान्यांना शासकीय कार्यालयांत पायपीट करावी लागू नये म्हणून सर्वच व्यवहार ऑनलाइन करण्याचे ठरविले आहे. त्याचा फायदा सर्वांनाच होणार असला, तरी मोबाइल टॉवरची संख्या पाहिजे त्याप्रमाणात नसल्याने कामगारनगरी असलेल्या सातपूर भागात अनेकांचे मोबाइलच आऊट ऑफ रेंज राहत असल्याने ते ऑनलाइन व्यवहारांना मुकत असल्याचे चित्र आहे.

येथील रहिवासी त्रस्त

सातपूर भागात सातपूर कॉलनी, अंबड लिंकरोडवरील जाधव टाऊनशिप, चुंचाळे शिवार, आशीर्वादनगर, पिंपळगाव बहुला मळे परिसर, राधाकृष्णनगर, श्रमिकनगर, शिवाजीनगर व ध्रुवनगर आदी भागात मोबाइल टॉवर कमी असल्याने रेंजच मिळत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातो. सातपूर भागात ठराविक मोबाइल कंपन्यांनाच टॉवरची परवानगी देण्यात आल्याने ही स्थिती उद्भवली असून, इतर कंपन्यांनाही महापालिकेने परवानगी द्यावी, अशी मागणी सातपूरकरांनी केली आहे.

मर्यादित टॉवरचा फटका

सातपूर भागात अनेकांनी मोबाइल टॉवरची मागणी केली आहे. परंतु, केवळ परवानगीसाठी महापालिकेकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप केला जातो. काहींनी महापालिकेकडे प्रस्ताव सादर करून मोबाइल टॉवरचे कामही सुरू केले. महापालिकेकडून मात्र टॉवरची परवानगीच दिली जात नसल्याने केवळ टॉवरचे केवळ सांगाडेच उभे असल्याचे चित्र पाहायला मिळते. सातपूर भागात मोबाइलचे ४० टॉवर आहेत. त्यात मोजक्याच कंपन्यांचा समावेश असल्याने अन्य कंपन्यांचे सिम कार्ड वापरणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे महापालिकेने सर्वच कंपन्यांच्या टॉवरसाठी परवानगी देण्याची मागणी परिसरातून होत आहे.

सातपूर भागात नव्याने मोबाइल टॉवर उभारावेत, अशी मागणी सातत्याने महापालिकेकडे केली जाते. परंतु, बंगले भागात राहणाऱ्यांकडूनच मोबाइल टॉवरला विरोध केला जात असल्याने गैरसोय होत आहे. पुरेशा मोबाइल टॉवर्ससाठी परवानगी दिली जावी.

-स्वप्निल आव्हाड, नागरिक

---

देवळाली कॅम्पमध्येही समस्या

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळाली कॅम्प परिसरात अनेक मोबाइल कंपन्यांची रेंजच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. देवळाली परिसरासह अनेक ग्रामीण भागात गेल्या काही वर्षांत मोबाइल कंपन्यांचे ग्राहक प्रचंड वाढले आहेत. मात्र, अनेक कंपन्यांची पुरेशी रेंजच मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. घरामध्ये रेंज गायब होण्याचे प्रकार होतात. काही खासगी कंपन्या फायबर ऑप्टिकल केबल टाकून ग्राहकांना ४ जी सेवा देत आहेत. मात्र, बऱ्याचदा ४ जी नव्हे, तर ३ जी व २ जीचे नेटवर्क सेलफोनमध्ये दिसून येते. स्थानिक कर अथवा शासकीय महसूल बुडविण्यासाठी एकाच टॉवरवर चार-चार कंपन्यांचा संसार सुरू आहे. कंपन्यांच्या वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत कोठेही तक्रार केली, तरी काही फरक पडत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. शिंगवे बहुला, वडनेररोड, लामरोड, रेस्ट कॅम्परोड, विजयनगर परिसरात अशी समस्या दिसनू येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुवांशिकतेमुळे वाढतो लठ्ठपणा

$
0
0

डॉ. जयश्री तोडकर यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशात लहान मुलांमधील लठ्ठपणाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अनुवांशिकता, आहारातील वाईट सवयी, शारीरिक क्रिया आदी बाबींमुळे लठ्ठपणाचा आजार जडतो, असे प्रतिपादन पुणे येथील आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री तोडकर यांनी केले.

गोदाघाटावरील देवमामलेदार पटांगणावर वसंत व्याख्यानमालेचे अठरावे पुष्प 'करू या लठ्ठपणावर मात' या विषयावर डॉ. तोडकर यांनी गुंफले. मानेवर काळेपणा, मानेला कुबड, पोटाचा वाढता घेर ही लठ्ठपणा वाढत असल्याची लक्षणे आहेत. लठ्ठपणा हा वय, जात, लिंगभेद पाहत नाही. लवकर झोपून लवकर उठणे, मोकळ्या मैदानात खेळणे, फास्ट फूडऐवजी फळे खाणे या चांगल्या सवयींमुळे लठ्ठपणाला अटकाव घालता येऊ शकतो, अशी माहिती डॉ. तोडकर यांनी दिली. आजवर अनेक वेडगळ समजुतींमुळे लठ्ठपणाकडे समृद्धीचे लक्षण म्हणून पाहिले गेले. त्यामुळे हा आजार साथीच्या आजाराप्रमाणे फोफावत आहे. भारतात पाचपैकी तीन व्यक्ती लठ्ठ असल्याचे समोर आले असून, लठ्ठपणात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे. लठ्ठपणा हे ताकद नव्हे, तर अशक्तपणाचे लक्षण आहे. स्थूलत्वामुळे क्षयरोग, मधुमेहासारख्या अनेक आजारांची सुरुवात होते, असेही त्या म्हणाल्या.

व्याख्यानाच्या प्रारंभी लघुपट दाखविण्यात आला. मंचावर पंचवटी ग्रुपचे व्यवस्थापक नीलेश भुतडा, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल उपस्थित होते. मुक्तेश्‍वर मुनशेट्टीवार यांनी चांडक यांना आदरांजली अर्पण केली. श्रीकांत येवलेकर यांनी परिचय करून दिला.

आजचे व्याख्यान

वक्ते : रुपाली शाईवाले (डोंबिवली)

विषय : पर्यावरण

स्थळ : यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट

लोगो : वसंत व्याख्यानमाला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जातप्रमाणपत्रांसाठी पालकांची फरफट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जातीचे दाखल्यांवर स्वाक्षरी होत नसल्याने असे सुमारे ४५० दाखले नाशिक प्रांतधिकारी कार्यालयात अडकून पडले आहेत. शैक्षणिक प्रवेशासाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचाही जीव या दाखल्यांअभावी टांगणीला लागला आहे.

दहावी, बारावीसह अन्य शैक्षणिक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले, की पुढील शैक्षणिक प्रवेशासाठीची धावपळ सुरू होते. प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जातीचा दाखल्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. अन्य दाखल्यांचे वितरण सुरळीत सुरू असले तरी प्रशासनाकडे सद्यस्थितीत तब्बल ४५० जातीच्या दाखले स्वाक्षरीअभावी वितरीत होऊ शकलेले नाहीत. नाशिकचे प्रभारी प्रांतांधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या सोपान कासार यांच्यावर या दाखल्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्याकडे उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) तसेच ग्रामपंचायत विभागाचाही पदभार आहे. विधान परिषद निवडणुकीबाबतच्या कामातही कासार यांना सहभागी करून घेण्यात आले आहे. परंतु, या सर्व कामाचा परिणाम दाखल्यांच्या निपटाऱ्यावर होत असून त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजे संभाजी स्टेडियमची ‘अशीच’ व्हावी साफसफाई!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडको परिसरात उभारण्यात आलेल्या राजे संभाजी स्टेडियमची स्थापनेनंतर प्रथमच अगदी कानाकोपऱ्यासह साफसफाई करण्यात आली. केवळ आयुक्त येणार म्हणून झालेली साफसफाई वारंवार केली, तर निश्चितच या मैदानाचा वापर वाढू शकेल, असे मत नागरिकांसह क्रीडाप्रेमींनी व्यक्त केले आहे.

महापालिका आयुक्तांच्या वॉक विथ कमिशनर या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सिडकोतील महापालिकेचे बहुतांश अधिकारी व कर्मचारी राजे संभाजी स्टेडियमच्या स्वच्छता मोहिमेला जुंपल्याचे दिसून आले. राजे संभाजी स्टेडियमची उभारणी केल्यानंतर या ठिकाणी काही वर्षांतच जॉगिंग ट्रॅक करण्यात आला. त्यानंतर ग्रीन जिम उभारण्यात आली. मात्र, या सर्व बाबी केवळ देखाव्यापुरत्याच उभारल्या असून, या मैदानावर कधीही स्वच्छता विभागाचे कर्मचारी फिरकतच नसल्याचे दिसून येते. या ठिकाणी असलेले इनडेाअर स्टेडियमसुद्धा कचऱ्याच्या विळख्यात सापडल्याचे चित्र होते. मात्र, आज, शनिवारी (दि. १९) वॉक विथ कमिशनर उपक्रम येथे होणार असल्याने या स्टेडियमची साफसफाई करण्यात आली. येथील झाडांना कधी पाणीसुद्धा घातले जात नाही. मात्र, दोन दिवसांपासून येथील झाडांना पाणी घालण्यात येत आहे. स्टेडियमच्या आवारात असलेला कचरा, पालापाचोळा उचला गेल्याने त्याचे रुपडेच पालटले आहे. त्यामुळे नागरिकांनी आश्चर्ययुक्त समाधान व्यक्त करीत केवळ आयुक्त येणार असल्याने या स्टेडियमची झालेली स्वच्छता अशीच कायमस्वरूपी होत राहिली, तर निश्चितच फायदा होईल, असे मतही व्यक्त केले आहे.

लोगो : चर्चा तर होणारच!

(पेज फोटोशेजारी घेणे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये बुद्धिबळाच्या पटावर नवी संघटना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात बुद्धिबळाच्या पटावर 'दि अमॅच्युअर चेस असोसिएशन' या नावाची नवी संघटना स्थापन झाली असून, संघटनेला ऑल मराठी चेस असोसिएशन (एएमसीए) या राज्य संघटनेने संलग्नता दिली आहे. पुणे येथे नुकत्याच झालेल्या एएमसीएच्या बैठकीत या संघटनेला संलग्नता देण्यावर शिक्कामोर्तब झाले. लवकरच संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती अमॅच्युअर संघटनेचे सचिव संदीप नागरे यांनी पत्रकाद्वारे दिली.

जिल्ह्यात यापूर्वी नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटना कार्यरत होती. मात्र, धर्मादाय कार्यालयाने गेल्या महिन्यात नऊ जणांचे नवे विश्वस्त मंडळ नियुक्त केल्यानंतर एएमसीएने या संघटनेला संलग्नता दिली नाही. त्यामुळे गेल्या महिन्यापासून नाशिकमध्ये राज्य संघटनेची मान्यता असलेली संघटना कार्यरत नव्हती. त्यामुळे संदीप नागरे यांच्यासह काही जणांनी नुकतीच द अमॅच्युअर चेस असोसिएशनची स्थापना केली. या संघटनेला एएमसीएने संलग्नता दिल्याने निवड चाचण्यांसह जिल्हास्तरीय, राज्य व राष्ट्रीय स्पर्धा अधिकृतपणे घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

संघटनेच्या अध्यक्षपदी भरत वानखेडे, उपाध्यक्षपदी ओंकार जाधव, सचिवपदी नागरे, तर खजिनदारपदी वीरेंद्र गायकवाड आहेत. याशिवाय समीर पानसरे, राम माळवे, किशोर वाकचौरे सदस्य आहेत. खेळाडूंचे हित लक्षात घेता राज्य संघटनेने जिल्ह्यातील बुद्धिबळपटूंना आपले हक्काचे व्यासपीठ द अमॅच्युअर चेस असोसिएशनच्या रूपाने उपलब्ध करून दिले आहे. जिल्ह्यातील खेळाडूंना आता सर्व अधिकृत राज्य, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करता येणार असल्याचे संघटनेचे सचिव नागरे यांनी म्हटले आहे. संलग्नता मिळाल्याने खेळाडूंचा शासकीय व निमशासकीय सवलतींचाही मार्ग मोकळा झाल्याचे संघटनेने म्हटले आहे.

नवी कार्यकारिणी लवकरच

अमॅच्युअर चेस असोसिएशनची सध्या सात जणांची कार्यकारिणी जाहीर झाली आहे. मात्र, बुद्धिबळप्रेमी, खेळाडू, प्रशिक्षक, पंच व पालकांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेण्यात येणार असून, त्यानंतर कार्यकारिणीचा विस्तार व पुढील कार्यक्रमांची दिशा स्पष्ट करण्यात येणार असल्याची माहिती एएमसीएचे कोशाध्यक्ष राजेंद्र कोंडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांची सावली उद्या होणार गायब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिककरांना रविवारी (दि. २०) शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे. दुपारी बारा वाजता सूर्य माथ्यावर असतानादेखील सावली पडत नाही, असा अनुभव यानिमित्ताने मिळत असल्याने या दिवसाविषयी विशेष उत्सुकता खगोल अभ्यासकांबरोबरच सामान्यांनाही आहे.

पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडेच्या भागात तर कर्क वृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्‍यावर येत नाही. तो सदैव क्रमशः उत्तर किंवा दक्षिणेकडेच दिसतो. पण या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्‍यावर आलेला अनुभवयाला मिळतो. जेव्हा सूर्य डोक्‍यावर असतो, तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही ती सावली गायब होते. त्यामुळे शून्य सावलीचा हा सर्वांसाठीच रोमांचकारी अनुभव आहे. राज्यात ७ मे पासून विविध जिल्ह्यांमध्ये याचा अनुभव येत असून नाशिक व औरंगाबाद येथे २० मे रोजी हा अनुभव मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रामपंचायतीला कारवाईचा इशारा

$
0
0

सीईओ डॉ. गिते यांच्याकडून दूषित पाण्याची दखल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावर होत असलेल्या दूषित पाणी पुरवठ्याची गंभीर दखल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली आहे. याप्रकरणी ग्रामसेवकाची वेतनवाढ रोखतानाच संबंधित ग्रामपंचायतीवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे गडावर दूषित पाण्याचा प्रश्न तत्काळ निकाली निघण्याची चिन्हे आहेत.

कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गड येथे सतत होत असलेल्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत नोटीस देऊनही दखल न घेणाऱ्या ग्रामसेवकाची एक वेतनवाढ बंद करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले आहेत. पाण्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर दुर्लक्ष करून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रसंगी मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार कारवाई करण्याचा इशाराही डॉ. गिते यांनी दिला आहे. ग्रामपंचायत अधिनियमानुसार गावास शुद्ध व निर्जंतुक पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामपंचायतीची आहे. मात्र, अनेक ग्रामपंचायती पाणी नमुने तपासणीसाठी देत नाहीत तसेच टीसीएलची तपासणीही अनेक ठिकाणी करण्यात येत नाही. याबाबत तालुका आढावा बैठकींमध्ये सविस्तर आढावा घेण्यात येत आहे. पाणी नमुने तपासणीत सप्तशृंग गडावरील पिण्याच्या पाण्याचे नमुने दूषित असल्याचे निदर्शनास आले आहे. दूषित पाणी नामुण्याबाबत यापूर्वीही ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आर. बी. जाधव यांना नोटीस देण्यात आली आहे. मात्र, तरीही जबाबदारीने काम न केल्याने सप्तशृंग गडावरील पाणी नमुने दूषित आले आहेत.

नोंद मूळ सेवा पुस्तकातही

सप्तशृंगी गडावर पाणीगळती होत असल्याचे निदर्शनात आले असून ग्रामपंचायतीस सतत दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत कळवून देखील ग्रामसेवक आर. बी. जाधव यांनी यावर योग्य ती कार्यवाही केली नाही. जाधव यांनी कर्तव्यात कसूर केल्याने त्यांची एक वेतनवाढ पुढील एका वेतनवाढीवर परिणाम होणार नाही अशा रितीने थांबविणेबाबत डॉ. गिते यांनी कार्यवाही केली असून ग्रामपंचायत विभागामार्गात ग्रामसेवकास याबाबतचे आदेश बजावण्यात आले आहे. तसेच याबाबतची नोंद मूळ सेवा पुस्तकातही घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

म्हणून लाल कार्ड

जिल्हा पाणी व स्वच्छता व आरोग्य विभागाच्या वतीने दरमहा पाणी नमुने गोळा करण्यात येत असून पाणी व स्वच्छता व आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येणाऱ्या स्वच्छता सर्वेक्षणात पाण्याचे स्त्रोत तीव्र जोखमीचे असलेल्या सप्तशृंगी गडास लाल कार्ड देण्यात आले आहे. याबाबत देखील सर्व संबंधिताना नोटिसा बजावण्यात आल्या असून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैलासनगर सिग्नलचा खांब पुन्हा वाकला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

औरंगाबादरोडवरील कैलासनगर परिसरातील चौफुलीवर बसविण्यात आलेल्या सिग्नलच्या खांबाला अज्ञात वाहनाने रात्रीच्या वेळी धडक दिल्याने येथील खांब पुन्हा वाकला आहे.

या अगोदर दुसऱ्या बाजूचा खांब वाहनाच्या धडकेने वाकला होता. सिग्नल सुरू केल्यापासून येथे वारंवार होणाऱ्या अपघातांत सिग्नलच्या खांबालाच धडक बसून खांब वाकण्याची ही दुसरी वेळ आहे. या वाकलेल्या खांबाची दुरुस्ती करण्याची काम शुक्रवारी दिवसभर सुरू होते.

औरंगाबादला उत्तरेकडून येणारा अमृतधाम रस्ता, विडी कामगार वसाहतीकडून, दक्षिणेकडून जेजूरकर मळ्याकडून येणारा रस्ता या कैलासनगर चौफुलीवर मिळतो. मात्र, येथे सुरू करण्यात आलेल्या सिग्नलच्या नियमांचे पालन फारसे केले जात नाही. लाल सिग्नल असतानाही वाहने सुसाट जात असल्याचे चित्र नित्याचे झालेले आहे. त्यामुळे सिग्नलवर वाहनांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढलेले आहेत. रोज येथे अपघात होत असल्यामुळे येथील हिरवा सिग्नल सुरू असतानादेखील वाहनचालकांना पुढे वाहन नेण्याची भीती वाटत असते.

तीन महिन्यांपूर्वी पहाटेच्या वेळी दोन चारचाकी वाहने एकमेकांना धडकल्यानंतर एक वाहन सिग्नलच्या खांबावर आदळले होते. सिग्नलच्या दक्षिण-पश्चिम बाजूच्या खांबांवर वाहन आदळून झालेल्या अपघातांमुळे येथील खांब व दिवे बदलावे लागले होते. शुक्रवारी पहाटे उत्तर-पश्चिम बाजूच्या खांबावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा खांब वाकला आहे. त्यामुळे हा सिग्नल दिवसभर बंद होता. अत्यंत धोक्याच्या बनलेल्या सिग्नलजवळ औरंगाबादरोडवर, तसेच दोन्ही बाजूंनी जोडणाऱ्या रस्त्यांवर गतिरोधक बसविण्यात आल्यानंतर येथील वाहनांच्या वेगावर मर्यादा येतील. या सिग्नलवर वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे सुसाट जाणाऱ्या वाहनांना आळा घालण्यास मदत होईल, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शौचालयातून पिण्याचे पाणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

स्मार्ट सिटी येाजनेतून चोवीस तास संपूर्ण शहराला पाणी देण्याची घोषणा होत असली तरी सध्या सिडकोत शौचालयातील पाणी पिण्यासाठी किंवा वापरासाठी घ्यावे लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे सिडकोत पाण्याच्या नियोजनाची गरज असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्‍त केले जात आहे. मनपा आयुक्‍तांनी सिडकोतील पाणी प्रश्नाकडे लक्ष देऊन पुरेसा पाणीपुरवठा केला पाहिजे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्‍त होत आहे.

स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नाशिकमध्ये शौचालयातील पाणी पिण्यासाठी वापरले जात असल्याचा प्रकार सिडकोत नागरिकांना राजरोसपणे बघायला मिळत आहे. पाणीपुरवठ्याबाबत महापालिकेच्या विभागीय कार्यालयात असंख्य तक्रारी पडून असतात. नित्याची बाब म्हणून की काय, याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असते. काही दिवसांपासून चक्क पिण्याकरिता शौचालयाचे पाणी वापरण्याची वेळ यावी असा प्रकार सिडकातील उत्तम नगर भागात उघडकीस आल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

एकीकडे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आयुक्‍तांकडून 'वॉक विथ कमिशनर' हा कार्यक्रम घेण्यात येत आहे आणि दुसरीकडे मात्र नागरिकांना एक नाही तर हजारो समस्यांना तोड द्यावे लागत असल्याचे दिसत आहे. सिडको आणि पाणी समस्या हे जणू समीकरणच झाले असून, सिडकोतील पाणी प्रश्नासाठी बऱ्याचदा नगरसेवकांनीसुद्धा आंदोलने केली आहेत. त्यानंतरही पाणीपुरवठा विभागाला जाग येत नाही. यावरून आश्चर्य व्यक्‍त होत आहे. सिडको परिसरात आजही अनेक ठिकाणी पाणी पुरवठाच होत नसल्याने सिडकोत चोवीस तास पाणी पुरवठा प्रशासन कसे देणार, याबाबत तर्कविर्तक काढले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाळ्यापूर्वीच करावी कॅम्पमध्ये नालेसफाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या पावसाळ्यापूर्वीच देवळाली कॅम्प शहरातील सर्व नाल्यांची सफाई करून घेणे गरजेचे आहे. अन्यथा पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याबाबत दक्षता घेणे गरजेचे असून, गतवर्षीसारखे प्रकार घडणार नाहीत, या दृष्टीने कॅन्टोन्मेंट प्रशासनाने नियोजन करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

शहरातील आनंदरोड, नागझिरा या महत्त्वाच्या नाल्यांसह लामरोड, देवी मंदिर, शिगवे बहुला, विजयनगर, स्टेशनवाडी, सहा चाळ आदी भागातील छोट्या-मोठ्या नाल्यांमुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रकार वाढतात. गतवर्षी आनंदरोड नाला प्रचंड प्रमाणात भरून वाहिल्याने अनेकदा वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. याशिवाय जागोजागी हा नाला बुजविण्यात आल्यानेदेखील समस्या वाढत आहेत.

प्रशासनाकडून दर वर्षी महिनाभर आधीच नालेसफाईची कामे हाती घेतली जातात. जेणेकरून पावसाळ्यात नागरिकांना त्रास होणार नाही. मात्र, यंदा याबाबत कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात जनतेला समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

रस्तेदुरुस्तीकडेही दुर्लक्ष

शहरासह प्रत्येक वॉर्डातील भुयारी गटारींसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांची दुरवस्था, ही बाब पावसाळ्यात त्रासदायक ठरणार आहे. प्रशासनाने याबाबत तातडीने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. नालेसफाईसह गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना विविध भागात खोदलेल्या रस्त्यांमुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जागोजागी अपघातही घडत आहेत. रखडलेल्या रस्तेदुरुस्तीस प्राधान्य देण्याबाबत बोर्डाने विचार करावा, लोकप्रतिनिधींनीदेखील याप्रश्नी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंढेंच्या करवाढीला सत्ताधाऱ्यांचेच अभय

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील भरमसाट करवाढीच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांसह नाशिककरांच्या पाठीशी राहणारे भाजपचे दोन आमदार आणि महापौरांनी आपली पदे वाचवण्यासाठी नाशिककरांचाच विश्वासघात केला आहे. २३ एप्रिलच्या महासभेत राणा भीमदेवी थाटात आयुक्त तुकाराम मुंढेंच्या करवाढीच्या आदेशाला स्थगिती देणाऱ्या महापौर रंजना भानसी यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर घूमजाव करीत करवाढीला स्थगिती दिली नसल्याचा बचाव केला आहे. केवळ चर्चा झाल्याचे सांगत विषय तहकूब ठेवल्याचे इतिवृत्त जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर केल्याने भाजपने मुंढेंच्या करवाढीच्या प्रस्तावाला केवळ पदे वाचवण्यासाठी अभय दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

महासभेने शहरात सरसकट १८ टक्के करवाढीला मंजुरी दिली असताना आयुक्त मुंढेंनी आपल्या अधिकारात ३१ मार्च रोजी अधिसूचना काढत, नव्या व जुन्या मिळकतींवर भरमसाट करवाढ लादली होती. शेतीसह शाळा, मोकळ्या जमिनींवर लादलेल्या करवाढीने शहरभर असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे करवाढीच्या विरोधात भाजपलाही उतरावे लागले होते. विधान परिषदेची आचारसंहिता असतानाही, महापौर रंजना भानसी यांनी २३ एप्रिल रोजी महासभा बोलवली, तसेच महासभेबाहेर शहरातील नागरिकांनी केलेल्या आंदोलनात भाजपचे आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे सहभागी झाले होते. त्यामुळे करवाढ टळेल असे चित्र होते. महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी तब्बल दहा तास राणा भीमदेवी थाटात करवाढीला एका सुरात विरोध केला होता. त्यामुळे जोशात आलेल्या भाजपने व महापौरांनी एका झटक्यात या करवाढीला स्थगिती देण्याचे आदेश दिले. आयुक्त मुंढेंनी आचारसंहितेच्या काळातच करवाढीची अधिसूचना काढल्याने त्यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार करण्याचे फर्मानही काढले होते. मात्र, नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या बचावासाठी थेट महापौरांनाच नोटीस काढून आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवला. त्यामुळे सत्ताधारी भाजपसह महापौरही बॅकफूटवर आले होते.

नगरसचिव विभागाने २३ एप्रिल रोजी झालेल्या महासभेचे इतिवृत्त गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले असून, त्यात बचावात्मक पवित्रा घेतला आहे. महापौरांनी घूमजाव करत, करवाढीला स्थगिती दिल्याचा ठरावच झाला नसल्याचा दावा केला आहे. केवळ या महासभेत चर्चा झाली असून, आचारसंहिता असल्याची जाणीव आपण नगरसेवकांना करून दिल्याची जाणीव केली आहे. महासभेत स्थगिती दिली नसून, हा विषय तहकूब ठेवल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या इतिवृत्तामुळे महापौरांसह नगरसेवकांचे पद वाचणार असले, तरी नाशिककरांचा मात्र विश्वासघात झाला आहे. महापौरांच्या या पवित्र्यामुळे प्रशासन करवाढीच्या अंमलबजावणीला आता मोकळे झाले असून, ज्यांच्यावर भरवसा आहे, त्या भाजपकडूनही नागरिकांचा अपेक्षाभंग झाल्याने आता दत्तक नाशिककरांना करवाढीच्या यातना सोसण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

दत्तक नाशिककरांची फसवणूक

महासभेनंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्थगिती देण्यासोबतच मुख्यमंत्र्यांनीही करवाढीच्या अधिसूचनेची अमलबजावणी करू नका, असे फर्मान आयुक्तांना काढल्याचा दावा केला होता. मात्र, स्थगितीपाठोपाठ आता मुख्यमंत्र्यांना दिलेले आश्वासनही फोल ठरले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना दत्तक गेलेल्या नाशिककरांची भाजपने थेट फसवणूकच केल्याची भावना अन्याय निवारण कृती समितीने व्यक्त केली आहे. यापुढे भाजपला वगळूनच लढू, असा पवित्रा घेतल्याने भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तर ऊस उत्पादकांना पैसे मिळवून द्या!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना (वसाका) चालवित असताना काही असंतुष्ट राजकीय मंडळी शेतकरी, ऊस उत्पादकांना चुकीची माहिती देत कारखान्याला कुलूप लावून आर्थिक नुकसान करीत आहेत. अशा मंडळींनी सर्व नुकसानाची जबाबदारी घेत आणि ऊस उत्पादकांचे पैसे उपलब्ध करून द्यावेत; अन्यथा पुन्हा कुलूप उघडून वसाका व्यवस्थापनाला सुरळीत कामकाज करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन वसाकाचे मुख्य प्राधिकृत अधिकारी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले.

मागील दोन दिवसांपूर्वी 'वसाका'ला काही उस उत्पादक शेतकऱ्यांनी कुलूप लावल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. आहेर यांनी शुक्रवारी देवळा येथील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलत होते. देशात साखरेचे भाव कमालीचे कोसळलेले असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे देणे देण्यासाठी साखर व्यापाऱ्यांशी समजोता करून अधिकाधिक भाव मिळविण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यात आपण काही प्रमाणत यशस्वीही झालो; मात्र कारखान्याला काही असंतुष्ट व्यक्तींनी कुलूप लावल्याने पुढील काळात पैसे मिळणे अवघड होणार आहे. सर्व ऊस उत्पादकांच्या पदरात दोन पैसे मिळावेत या उद्देशाने पहिला हप्ता म्हणून एक हजार रुपये देण्याचे वसाका व्यवस्थापनाचे नियोजन आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत कारखान्यांना केंद्र सरकार ३० कोटी रुपये देणार आहे. असा निधी 'वसाका'ला लवकरच प्राप्त होणार आहे. उर्वरित साखर कारखान्याच्या तुलनेतील सर्व रक्कमदेखील १५ ऑगस्टपर्यंत देण्यास आपण कटिबद्ध आहोत, असे डॉ. आहेर यांनी सांगितले.

गुरूवारी होणार बैठक

संपूर्ण 'कसमादे'मधील सहकाराचा आधारस्तंभ असलेल्या 'वसाका'ला उर्जितावस्था आणण्यासाठी आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्यांना वैयक्तिक विरोध करायचा असेल त्यांनी इतर ठिकाणी करावा, 'वसाका'ला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून वसाका व्यवस्थापनाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. आहेर यांनी केले. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक, सभासद, कामगार यांच्या प्रमुख उपस्थितीत 'वसाका' कार्यस्थळावर गुरूवारी (दि. २४) महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी वसाकाचे माजी उपाध्यक्ष रामदास देवरे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधुनिक बस टर्मिनल सहा महिन्यांत

$
0
0

शुभवार्ता

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खासगी प्रवासी बस थांबविण्यासाठी अत्याधुनिक बस टर्मिनल उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तपोवनातील जनार्दन स्वामी लॉन्सलगतच्या मोकळ्या भूखंडावर हा टर्मिनल उभारण्यात येणार असून, तेथे ऑटो आणि टॅक्सी स्टँडसह अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या टर्मिनलसाठी १० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, सहा महिन्यांत तो सज्ज व्हावा, यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

शहरातील पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होतो आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. पार्किंग सुविधांअभावी खासगी प्रवासी बस, तसेच ट्रक, ट्रेलर रस्त्यांलगतच उभे केले जात असल्याचे अनेकदा पाहावयास मिळते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या समस्येवर कायमचा उपाय शोधताना ट्रक टर्मिनल आणि बस टर्मिनलचा पर्याय पुढे आला आहे. या संदर्भात शुक्रवारी महापालिकेत बैठक झाली. बैठकीला महापालिकेच्या सार्वजनिक वाहतूक व नियोजन विभागाचे महाव्यवस्थापक स. वि. घुगे, नाशिक ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष जयपाल शर्मा, नाना फड, नाशिक बस असोसिएशनचे अध्यक्ष राजू इंदाणी, सचिव दिलीप बेनिवाल, राहुल पारिक, सुभाष जांगडा आदी उपस्थित होते. महापालिका क्षेत्रात ट्रक आणि ट्रेलर उभे करण्यासाठी आडगाव, विल्होळी येथे आधुनिक ट्रक टर्मिनल विकसित करण्यात येणार आहे. याशिवाय सातपूर एमआयडीसीमध्येही अशा प्रकारचा टर्मिनल उभारण्यासाठीची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

तपोवनात खासगी प्रवासी बसेससाठी स्वतंत्र टर्मिनल उभारण्यात येणार असून, ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने या निर्णयाचे स्वागत केले आहे. साधुग्रामच्या परिसरात हा आधुनिक स्वरूपाचा टर्मिनल उभारण्यात येणार असून, तेथे सुलभ शौचालयासह आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सिंहस्थ काळात वर्षभर ही सुविधा साधूंना उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. पर्यटनवाढीसाठी हा टर्मिनल फायदेशीर ठरणार असून, ऑटो आणि टॅक्सी स्टँडमुळे पंचवटी आणि तपोवन परिसर पर्यटकांसाठी सोयीचा होईल, असा विश्वास ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. महामार्गांवरील जुन्या जकात नाक्यांवरही ट्रकचालकांसाठी टप्प्याटप्प्याने आराम कक्ष, सायबर कॅफेसह विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर बैठकीत चर्चा झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मतदान केंद्रांवर मोबाइलबंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषद निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानास आता अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असून, जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतच्या तयारीचा शुक्रवारी सायंकाळी आढावा घेतला. मतदान केंद्रांवर मतदाराला मोबाइल, डिजिटल कॅमेरा असलेले घड्याळ, पेन नेण्यास प्रतिबंध असून, उमेदवारांसह निवडणूक कर्मचाऱ्यांनाही हा नियम लागू असेल.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रज्ञा बढे मिसाळ, डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार गणेश राठोड यांच्यासह राष्ट्रवादीचे उमेदवार अ‍ॅड. शिवाजी सहाणे, शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे आदी उपस्थित होते. उमेदवारांना या वेळी निवडणुकीच्या नियमांची माहिती देण्यात आली, तर निवडणूक कर्मचाऱ्यांना कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बॅलेट पेपरची विशिष्ट पद्धतीने घडी करण्यासह निवडणूक आयोगाकडून दिल्या जाणाऱ्या जांभळ्या शाईपेनचाच वापर करून पसंतिक्रम टाकावा, असे आवाहन करण्यात आले. अन्य पेन वापरल्यास मतपत्रिका बाद होईल, असा इशाराही देण्यात आला. जिल्ह्यात ६४४ मतदार असून, १५ ठिकाणी मतदानप्रक्रिया पार पाडली जाणार आहे. अंध, अपंग आणि अशिक्षित मतदाराला मदत हवी असेल तर त्याने अगोदर तसा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे भरून देणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने उमेदवारांना स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाँग मार्चसाठी निर्णयाची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा शासन सेवेत समावेश होत नाही, तोपर्यंत समान काम समान वेतन मिळावे या मागणीसाठी शुक्रवारी (दि. १८) नाशिकला जमले आहेत. नाशिक ते मुंबई (आझाद मैदान) लाँग मार्चसाठी आलेल्या या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईला मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीसाठी बोलावले. यातील निर्णयानंतर या लाँग मार्चची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, सायंकाळी ६ वाजेपर्यंत कोणताही निर्णय आला नसल्याने कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचारी नाशिकला निर्णयाची प्रतीक्षा करीत थांबून होते.

न्यायालयीन आदेशान्वये समान काम समान वेतन या अन्वये शासनासमोर विविध प्रकारे आंदोलनांद्वारे मागण्या मान्य करण्याचा आणि शासनासमोर दाद मागण्यासाठी राज्यभरातील ३३ जिल्ह्यांतून सुमारे ८ हजार अधिकारी व कर्मचारी नाशिकहून मुंबईकडे लाँग मार्चला जाण्यासाठी दि. १७ रोजी दुपारपासून तपोवनातील जनार्दन स्वामी आश्रमात जमले आहेत. या मागण्या मान्य करण्यासाठी दि. ११ ते २१ एप्रिल २०१८ या कालावधीत बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात आले. त्यात आरोग्यमंत्री डॉ. दिलीप सावंत यांनी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ या संघटना प्रमुखांना मंत्रालयात बोलावून मागण्या येत्या १० दिवसांत पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे संघटनेने आंदोलन १० दिवसांसाठी स्थगित केले होते.

दि. ७ मे २०१८ पर्यंत शासनाने दिलेले आश्वासन पाळले नाही. त्यामुळे संघटनेने दि. ८ मेपासून पुन्हा बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. तरीही शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना शासकीय सेवेत समायोजित करण्यासंदर्भात अभ्यास व शिफारस करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत केली. ही समिती कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना शासकीय सेवेत समायोजित करण्यासंदर्भात अभ्यास व शिफारस करील व सद्य:स्थितीत होऊ घातलेल्या आरोग्य व ग्रामविकास विभागातील पदभरती प्रक्रिया लक्षात घेऊन या समितीच्या प्रथम बैठकीत ही भरती प्रक्रियेमध्ये या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देईल, या नुसार समिती विचार करेल.

वैद्यकीय संघटनांचा पाठिंबा

संघटनेचे अध्यक्ष नंदू कासार, सचिव विजय सोनवणे, कोषाध्यक्ष किरण शिंदे, उपाध्यक्ष प्रशांत जोशी हे मुबंईला बैठकीसाठी गेलेले आहेत. मंत्रालयातील बैठकीत काय निर्णय झाला याबद्दल ते नाशिकला आल्यानंतर कळेल. त्या निर्णयाची प्रतीक्षा करीत आधीकारी व कर्मचारी थांबून आहेत. हे पदाधिकारी रात्री ११ वाजेपर्यंत नाशिकला पोहचण्याची शक्यता आहे. त्यानंतर लाँग मार्चची दिशा ठरविण्यात येईल. या लाँग मार्चला राज्यभरातील सर्वच वैद्यकीय संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधान परिषदेसाठी रात्र वैऱ्याची

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या मतदानाला आता केवळ दोन रात्रच शिल्लक राहिल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीने मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी 'लक्ष्मीचा प्रसाद' देण्यास सुरुवात केली आहे. भाजपने भूमिका घेण्यासाठी 'तारीख पे तारीख'चा खेळ सुरू केल्याने भाजपचे नगरसेवक सैरभैर झाले असून, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची वाट न पाहताच, सोयीने गटाची निवड सुरू केली आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार परवेझ कोकणींची हवा गूल झाली असून, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्येच आता प्रतिष्ठेची लढाई होणार आहे.

विधान परिषदेसाठी मतदारांना आता अवघे ४८ तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात पडद्यामागून सूत्रे फिरत असून, शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. शिवसेनेकडे जास्त संख्याबळ असले तरी भाजपच्या मदतीशिवाय शिवसेनेचा विजय अशक्य आहे. त्यामुळे भाजपच्या निर्णयाकडे शिवसेनेचे डोळे लागून आहे. भाजपची भूमिका मांडण्यासाठी भाजपच्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद सदस्यांना मुंबईत मंगळवारी तातडीने पाचारण करण्यात आले होते. या वेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीकास्र सोडत, १८ मे रोजी भूमिका स्पष्ट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, शुक्रवारी सायंकाळपर्यंत भाजपने भूमिका स्पष्ट केली नाही. याबाबत शनिवारी (दि.१९) पक्षाचे आदेश येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून आदेश येण्यापूर्वीच पक्षातील काही मतदारांनी राष्ट्रवादीशी, तर काहींनी भाजपशी जवळीक केल्याचे समजते. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी परस्पर काही उमेदवारांशी हातमिळवणी करत अंतर्गत बैठकी सुरू केल्याचे समजते. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी व शिवसेना या पक्षांकडून मतदारांना सहलीसाठी रवाना करण्यात आलेले आहे. तालुका स्तरावरील मतदारांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठविले जात आहे. यात शिवसेनेने आघाडी घेतलेले चित्र बघावयास मिळत आहे. काही मतदारांनी मात्र सहलीस जाण्यास स्पष्ट नकार दिल्याचे कळते.

'लक्ष्मीदर्शन' सुरू

विधान परिषद निवडणूक आणि घोडेबाजार हे समीकरणच झाले असून, उमेदवार जोरात असले तरी मतदारांमध्ये शुक्रवारपर्यंत फारसा उत्साह नव्हता. अनेकांना शुक्रवारी लक्ष्मीप्रसादाचा लाभ झाल्याने मतदारांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. 'लक्ष्मीदर्शन' खुले झाल्याने फोडाफोडीला वेग आला असून, आर्थिक ताकदीवर या निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उर्वरित ४८ तासांत होणाऱ्या आर्थिक घडामोडी निवडणुकीचे चित्र पालटणाऱ्या ठरणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्वारकेवरील अतिक्रमण काढण्याच्या हालचाली

$
0
0

द्वारकेवरील अतिक्रमण काढण्याच्या हालचाली

नाशिक : द्वारका येथील अतिक्रमणधारकांचा वाद कोर्टात प्रलंबित असतांनाच,महापालिकेने द्वारकावरील अतिक्रमणावर हातोडा फिरवण्याची तयारी सुरू केली आहे.द्वारकेवरील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी आजूबाजूला असलेले अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेने येथील अतिक्रमणांसदर्भात असलेल्या वादाची माहीती आयुक्त कार्यालयाकडून मागवण्यात आली आहे.येथील अतिक्रमण धारकांच्या कारवाईला स्थगिती नसली तरी,त्यांच्या अर्जावरील सुनावणी ही जूनमध्ये होणार आहे.त्यामुळे त्यापूर्वीच येथील अतिक्रमणावर कारवाई करण्याच्या तयारीत महापालिका आहे.त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच द्वारका येथील अतिक्रमणाचीही कोंडी फुटण्याची शक्यता आहे.

---

घंटागाड्यांची गर्दी (फोटो)

सातपूर : महापालिकेने अंबडलिंकरोडवरील अनाधिकृत भंगार बाजार हटविला असला, तरी जमा होणारे भंगार घेण्यासाठी शहरी भागात आजही दुकाने सुरू आहेत. सातपूर भागात घरोघरी जावून कचरा संकलन करतांना जमा झालेले भंगार देण्यासाठी घंटागाड्यांची महादेववाडीत एका दुकाना बाहेर नेहमीच गर्दी होत असते. प्लास्टिक बाँटल, काचेच्या बाटल्या, पुठ्ठा व इतर भंगाराचे साहित्य घंटागाडी चालक महादेव वाडीत असलेल्या भंगार व्यावसायिकाकडे देत असल्याने घंटागाड्यांची नेहमीच गर्दी होते. कचरा संकलन करतांना जमा होणारे भंगार देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी अशी मागणी घंटागाडी चालकांकडून केली जात आहे.

--

आज 'अमोरस पॅरॉस'

नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र व विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने 'चित्रपट चावडी' उपक्रमांतर्गत शनिवार १९ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध मेक्सीकन सिनेदिग्दर्शक अलेक्झांडर इनारीतु यांचा 'अमोरस पॅरॉस' हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, सावरकरनगर, गंगापूर रोड येथे दाखविण्यात येणार आहे. येथे बॅबेल चित्रपटासारखीच मांडणी आहे. चित्रपटाचे कथानक मेक्सीको सिटी ह्या महानगरात घडते. तीन स्वतंत्र कथानकांचे धागे एका अपघाताने जोडलेले असतात. चित्रपटात माणसाचा सहचर असलेला कुत्रा अत्यंत खुबीने प्रतिकात्मकरीत्या वापरला आहे. कुत्र्यांच्या झुंजीच्या खेळाची काही चित्तथरारक दृष्ये चित्रपटात आहेत.

---

कालव्याच्या पाण्याची गळती (फोटो)

पंचवटी - गंगापूर धरणाच्या डाव्या कालव्यातून सध्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. या कालव्यातील पाण्याची नांदूर शिवाराच्या भागात असलेल्या सायपानाच्या ठिकाणापासून गळती होत आहे. कालव्याच्या प्रवाहात नाले असलेल्या भागात कालव्याचा प्रवाह जमिनी खालून काढण्यासाठी सायपणाचे बांधकाम करण्यात येते, त्याच ठिकाणाहून पाण्याची मोठी गळती होत आहे.

--

भगूरदर्शन मोहीम (फोटो)

देवळाली कॅम्प : 'भाग्यवान ते भगूर गाव हो नाशिक शेजारी....जिथे जन्मले प्रभू सावरकर राष्ट्र कैवारी 'अशा या भगूर गावात त्यांच्याच नावाने सुरु करण्यात आलेल्या स्वा.सावरकर फेसबुक समूह व महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या स्वा. वि.दा.सावरकर यांच्या जयंती दिनी म्हणजेच २८ मे रोजी सकाळी ११ वा.या भगूर दर्शन मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरासह देशभरातून स्वा.सावरकर प्रेमी या मोहिमेत सहभागी होणार आहे,दर्शन मोहिमेचे नियोजन पुढील प्रमाणे- १) स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक (सावरकर वाडा) २) पुरातन लक्ष्मी नारायण मंदिर ३) धोपावकर वाडा ४) सावरकर बंधुंनी प्राथमिक शिक्षण घेतलेली शाळा ५) पुरातन खंडोबा मंदिर (येथेच सावरकर घराण्यातील अष्टभुजा देवी आहे.) ६) पुरातन राम मंदिर ७) पुरातन शितळा देवी मंदिर ८) भृगुऋषी आश्रम ९) दारणा नदी तीर १०) पुरातन शिव मंदिर ११) स्वा.सावरकर अभ्यासिका (अद्ययावत) या मोहिमे अंतर्गत स्वातंत्र्यवीर सावरकरांसंबंधित ज्ञात अज्ञात प्रसंगावरील लेख,कविता,नाट्य,वाड़्गमयाचे देखील वाचन होणार आहे.मनोज कुवर,प्रशांत लोया(भगूर),हर्षल देव (वसई),प्रणव जोशी (पुणे),चंद्रकांत शहसाने (पुणे) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

----------

काहीसा गुंतागुंतीचा पण खिळवून टाकणारा हा चित्रपट इनारीतुच्या चित्रपट कारकीर्दीतील मानाचा तुराच आहे. जगभर ५४ विविध पारीतोषिकांनी गौरविलेला हा चित्रपट मानवी जीवन, त्यातील संघर्ष तसेच कुत्र्यासारखे मरण ह्यावर भेदक भाष्य करतो. मेक्सीको येथे २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अमोरस पॅरॉस' या सिनेमाचा कालावधी १५३ मिनीटांचा आहे. 'अमोरस पॅरॉस' हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधुनिक बस टर्मिनल सहा महिन्यांत

$
0
0

शुभवार्ता

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खासगी प्रवासी बस थांबविण्यासाठी अत्याधुनिक बस टर्मिनल उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तपोवनातील जनार्दन स्वामी लॉन्सलगतच्या मोकळ्या भूखंडावर हा टर्मिनल उभारण्यात येणार असून, तेथे ऑटो आणि टॅक्सी स्टँडसह अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या टर्मिनलसाठी १० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, सहा महिन्यांत तो सज्ज व्हावा, यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

शहरातील पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होतो आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. पार्किंग सुविधांअभावी खासगी प्रवासी बस, तसेच ट्रक, ट्रेलर रस्त्यांलगतच उभे केले जात असल्याचे अनेकदा पाहावयास मिळते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या समस्येवर कायमचा उपाय शोधताना ट्रक टर्मिनल आणि बस टर्मिनलचा पर्याय पुढे आला आहे. या संदर्भात शुक्रवारी महापालिकेत बैठक झाली. बैठकीला महापालिकेच्या सार्वजनिक वाहतूक व नियोजन विभागाचे महाव्यवस्थापक स. वि. घुगे, नाशिक ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष जयपाल शर्मा, नाना फड, नाशिक बस असोसिएशनचे अध्यक्ष राजू इंदाणी, सचिव दिलीप बेनिवाल, राहुल पारिक, सुभाष जांगडा आदी उपस्थित होते. महापालिका क्षेत्रात ट्रक आणि ट्रेलर उभे करण्यासाठी आडगाव, विल्होळी येथे आधुनिक ट्रक टर्मिनल विकसित करण्यात येणार आहे. याशिवाय सातपूर एमआयडीसीमध्येही अशा प्रकारचा टर्मिनल उभारण्यासाठीची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

तपोवनात खासगी प्रवासी बसेससाठी स्वतंत्र टर्मिनल उभारण्यात येणार असून, ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने या निर्णयाचे स्वागत केले आहे. साधुग्रामच्या परिसरात हा आधुनिक स्वरूपाचा टर्मिनल उभारण्यात येणार असून, तेथे सुलभ शौचालयासह आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सिंहस्थ काळात वर्षभर ही सुविधा साधूंना उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. पर्यटनवाढीसाठी हा टर्मिनल फायदेशीर ठरणार असून, ऑटो आणि टॅक्सी स्टँडमुळे पंचवटी आणि तपोवन परिसर पर्यटकांसाठी सोयीचा होईल, असा विश्वास ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. महामार्गांवरील जुन्या जकात नाक्यांवरही ट्रकचालकांसाठी टप्प्याटप्प्याने आराम कक्ष, सायबर कॅफेसह विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर बैठकीत चर्चा झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images