Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मालमत्ता लिलावाला प्रतिसाद नाही

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने बड्या थकबादाराकडून घरपट्टीच्या वसुलीसाठी जप्त केलेल्या १०४ मालमत्तांचा शुक्रवारी लिलाव काढण्यात आला. परंतु, महापालिकेने काढलेल्या लिलावाला शून्य प्रतिसाद मिळाला असून कोणीही खरेदीदार या मालमत्ता घेण्यासाठी फिरकले नाही. त्यामुळे मालमत्तांचा लिलाव गुंडाळण्याची नामुष्की पालिकेवर आली. दरम्यान, या मालमत्तांचा फेरलिलाव काढला जाणार असल्याची माहिती उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली.

महापालिकेने उत्पन्नवाढीसाठी थकबाकीदारांना रडारवर घेतले असून, बड्या थकबाकीदारांच्या जवळपास साडेचारशे मालमत्ता जप्त केल्या होत्या. यातील पहिल्या टप्प्यात ५० मालमत्तांचा लिलाव काढला होता. त्यावेळी जवळपास ७५ लाख रुपये थकबाकी जमा झाली होती. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा १०४ मालमत्तांचा लिलाव काढण्यात आला होता. त्यासाठी दादासाहेब गायकवाड सभागृहात लिलाव घेण्यात आला. परंतु, या लिलावाकडे खरेदीदारांनी पूर्णत: पाठ फिरवली आहे. दिवसभर एकही खरेदीदार या लिलावाच्या बोलीकडे फिरकला नाही. त्यामुळे पालिकेला लिलाव गुडांळावा लागला. त्यामुळे आता १०४ पैकी ८५ मालमत्तांसाठी फेरलिलाव काढले जाणार असून त्यांनतरही प्रतिसाद मिळाला नाही, तर थेट मालमत्तांवर पालिकेचे नाव लावले जाईल असा दावा उपायुक्तांकडून करण्यात आला आहे.

१९ लाख वसूल

दरम्यान महापालिकेने लिलाव काढण्यापूर्वीच १०४ पैकी १९ थकबाकीदारांनी आपली थकबाकी जमा केली आहे. त्यामुळे पालिकेला या सर्व १९ थकबाकीदारांकडून तिजोरीत १९ लाख २५ हजार रुपये जमा झाले आहेत. त्यामध्ये सिल्व्हर ओक कमर्शिअल, व्हिक्टर स्वीचगिअर, दंदणे कॉम्प्लेक्स यांच्यासह बड्या थकबाकीदारांचा समावेश आहे. तिसरा लिलाव लवकरच काढला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वडिलांसोबत ईद साजरी करण्याचे स्वप्न राहिले अधूरे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

घरापासून दूर मुंबईत राहणाऱ्या वडिलांना भेटण्यासाठी, त्यांच्यासोबत रमजान ईद साजरी करण्यासाठी फैजाबाद येथून रेल्वेने आपल्या आई अन् काकासोबत निघालेल्या अवघ्या तीन वर्षाच्या मुलीचा रेल्वेप्रवासात प्रकृती बिघडल्याने शुक्रवारी रात्री मनमाड येथे अकस्तात मृत्यू झाला. अचानक ओढावलेल्या मृत्युमुळे वडिलांसोबत ईद साजरी करण्याचे त्या चिमुकलीचे स्वप्न हवेतच विरले. भुसावळ-मनमाड दरम्यान साकेत एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या या घटनेने रेल्वप्रवासीही गहिवरले. चिमुकल्या सायमाच्या मृत्यूने तिचे कुटुंब हादरून गेले. त्यांनी मनमाड रेल्वे स्थानकात, उपजिल्हा रुग्णालयात फोडलेला टाहोने अनेकांचे ह्रदय पिळवटून निघाले. सायमाचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे.

फैजाबाद येथून शुक्रवारी साकेत एक्स्प्रेसने तीन वर्षांची चिमुकली आई, भाऊ व काका यांच्यासोबत मुंबईला जाण्यासाठी निघाली. मात्र वडिलांची भेट होण्याआधीच ती जग सोडून गेली. दोन महिने ती वडिलांना भेटली नव्हती. प्रवासादरम्यान सायमाची तब्येत बिघडली. क्षणाक्षणाला तहानेने ती व्याकुळ होत होती. पाणी पिवूनही तिचा त्रास कमी होत नव्हता. त्यातच तिला उलट्या झाल्या. ती अत्यवस्थ झाली. मनमाड रेल्वे स्थानकात गाडी आल्यावर तिला उपचारासाठी रेल्वे व उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अचानक घडलेल्या या घटनेमुळे तिच्या आईला मानसिक धक्का बसला. ती सारखी तिच्या नावाने हंबरडा फोडत होती. तिची ही अवस्था पाहून रेल्वे स्थानकातील प्रवाशांनाही अश्रू अनावर झाले.

उपजिल्हा रुग्णालयात तिचे शवविच्छेदन करण्यात आले. आपल्या लाडक्या मुलींचा मृत्यू झाल्याचे कळताच तिच्या वडिलांनी मनमाडला धाव घेतली. येथील कब्रस्तानमध्ये सायमाचा दफनविधी करण्यात आला.

रेल्वे लेट झाली आणि...

रेल्वे भुसावळ स्थानकावरून निघाल्यानंतर सायमाची तब्येत बिघडली. तिला आम्ही मनमाडला दवाखान्यात दाखविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र गाडी एका ठिकाणी तासभर थांबली. त्यामुळे मनमाडला पोहोचण्यास उशीर झाला. जर गाडी तेथे थांबली नसती तर कदाचीत सायमा वाचली असती, असे तिचे काका सांगत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणथळाच्या बाबतीत नाशिक समृद्ध

$
0
0

पर्यावरणतज्ज्ञ रूपाली शाईवाले यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पर्यावरणाचे रक्षण करायचे म्हणजे पाणी वाचवण्याचे संदेश द्यायचे, पर्यावरणदिन साजरे करायचे असाच नसून, आपल्याला ज्या छोट्या गोष्टी करता येतील त्या करणे म्हणजे पर्यावरणाचे रक्षण आहे. नाशिक पाणथळाच्या बाबतीत खूप समृद्ध असल्याचे प्रतिपादन डोंबिवली येथील पर्यावरणतज्ज्ञ रूपाली शाईवाले यांनी केले.

गोदाघाटावरील देवमामलेदार पटांगणावर वसंत व्याख्यानमालेचे एकोणिसावे पुष्प शाईवाले यांनी शनिवारी गुंफले. डॉ. दौलतराव आहेर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या पुष्पात शाईवाले यांनी 'पर्यावरण' या विषयावर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, की सणांमागील मूळ विचार जाऊन भपकेबाजपणा आल्याचा फटकाही पर्यावरणाला बसतो. देखाव्यांच्या सजावटीसाठी थर्माकोलला पर्याय म्हणून कागदाचा वापर केला जातो. मात्र, कागददेखील लाकडापासून तयार होतो व त्यासाठी वृक्षतोड केली जाते, हे लक्षात घ्यायला हवे. विज्ञान कितीही प्रगत झाले असले, तरी पाऊस पाडण्याचे तंत्रज्ञान अवगत झालेले नाही. त्यासाठी झाडेच आवश्यक असतात. अधिकाधिक झाडे लावून पर्यावरण संवर्धन करता येऊ शकते. सध्या सर्वांना शहरांची ओढ लागली असून, मानवकेंद्रित विकास सुरू आहे. त्यावर चिंतन होणे गरजेचे आहे. व्यासपीठावर बाळासाहेब आहेर उपस्थित होते. अरुण शेंदुर्णीकर यांनी दौलतराव आहेर यांना आदरांजली अर्पण केली. प्रा. संगीता बाफना यांनी परिचय करून दिला.

आजचे व्याख्यान

वक्ते : अंजली तापडिया (पुणे)

विषय : जीवन : एक आनंदयात्रा

स्थळ : यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढल्या पाणीटंचाईच्या झळा

$
0
0

मालेगाव तालुक्यात ७ गावे, २२ वाड्यांना टँकरने पाणी

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

पंधरा दिवसांपासून शहर व तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. दिवसेंदिवस पाणीटंचाईच्या झळाही तीव्र होता आहेत. एप्रिलच्या प्रारंभी केवळ एका गावासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. आता त्यात वाढ झाली असून, तालुक्यातील एकूण सात गावे व बावीस वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे.

शहरात अद्यापदेखील एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. मात्र तालुक्यातील गावांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. अनेक गावांतील पाणीपुरवठा योजनांचे नियोजन कोलमडले असून, पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. त्यातही दुंधे, चौकटपाडे, वऱ्हाणे या गावांची परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. करद्वारे पाणी पुरवठा होता असला तरी पाण्यासाठी एकाच झुंबड उडत असल्याचे चित्र आहे .

दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्याने गावागावात असलेले पाझर तलाव, विहिरी, हातपंपचे पाणी आटले असून, पाणीपातळी खोल गेली आहे. यामुळे जनावरांनाच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सध्या तालुक्यातील सात गावे व बावीस पाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. एकूण ७ टँकर दिवसभरात २४ फेऱ्यांद्वारे या गावांची तहान भागवित आहेत. पाण्याची टंचाई भीषण असल्याने अजून चार गावांचे टँकर प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत.

नऊ विहिरींचे अधिग्रहण

टंचाई असलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी शहर व तालुक्यातील नऊ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यात कळवाडी, टिपे, गरबड, गाळणे, कोठुरे येथील प्रत्येकी एक तर डाबली व संगमेश्वर येथील प्रत्येकी दोन विहिरींवरून पाणीटंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवले जात आहे.

पुनदच्या आवर्तनाने दिलासा

गेल्याचा आठवड्यात राज्यमंत्री दादा भुसे यांनी पुनद धरणातून गिरणा नदीसाठी आवर्तन देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानुसार पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने गिरणा काठच्या गावांना एन उन्हाळ्यात नदीत पाणी मिळाले असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

टँकरने पाणीपुरवठा सुरू असलेली गावे

दुंधे, वऱ्हाणे, टाकळी, मेहुणे, चौकटपाडे, झाडी, कोठरे बु.

एकूण टँकर ७

दिवसातून २४ फेऱ्या

एकूण नऊ विहिरींचे अधिग्रहण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्वस्त संख्यावरून सुप्रीम कोर्टात पिटीशन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टवर विश्वस्तांची संख्या ९ वरून १३पर्यंत वाढविणे आणि ५० टक्के महिलांना प्रतिनिधीत्व मिळणेसाठी विश्वस्त ललिता शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केले आहे. पब्लिक ट्रस्ट असल्यामुळे अध्यक्षपद हे ते लोकांमधून निवडलेल्या प्रतिनिधीलाच मिळायला हवे असे देखील शिंदे यांनी म्हंटले. शनिवारी त्यांनी पत्रकार परिषद घेवून ही माहिती दिली.

धर्मदाय आयुक्तांकडून भाविक प्रतिनिधी चार सदस्य नियुक्त होतात. त्यांची संख्या आठ करावी लागणार आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट हे नोंदणीकृत ट्रस्ट आहे. या ट्रस्टचा कारभार पाच वर्षांच्या कार्यकालात बहुमताचा वापर करीत अत्यंत चुकीच्या पद्धतीने झाला आहे, असा आरोप त्यांनी केला.

विश्वस्थ संख्या ९ वरुन १३ करणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या निकालाप्रमाणे ५ सदस्य हे कायम तेथे असतात व ते आपापले हितसंबंध यामध्येच गुंतलेले आहेत. कुठलाही ठराव मांडतांना तो बहुमताने पारीत होतो. भाविकांच्या बाजूने काही करण्याचा प्रयत्न केला तर तो बहुमताने

हाणून पाडला जातो असे त्यांनी न्यायालयाला कळविले आहे. धर्मदाय आयुक्तांकडून निवडलेले चार सदस्य अल्पमतात येतात आणि परंपराने येणारे ५ सदस्य बहुमताने ठराव पारीत करून तो आमलात आणातात. अशा प्रक्रियेमुळे निर्णय चुकतात आणि बेकायदेशीर निर्णय पारीत झाल्यामुळे सकारात्मक विकास कार्यास खिळ बसते. यामुळे पारदर्शकता दिसून येत नाही. त्यामुळे सर्व भ्रष्टाचाराचे आरोप होवून देवस्थानची बदनामी होत असल्याचे त्या म्हणाल्या.

विश्वस्त मंडळाची मुदत दोन आठवड्यावर

४ जून २०१३ रोजी विश्वस्त मंडळाच्या चार भाविक प्रतिनिधींची धर्मदाय आयुक्तांनी नियुक्ती केली होती. त्यांची मुदत पाच वर्षांसाठी असल्याने येत्या दोन आठवड्यात नवीन सदस्य नियुक्त होण्याची शक्यता आहे. पुजारी तुंगार प्रतिनिधी, पुजक प्रतिनिधी आणि पुरोहित प्रतिनिधी यांनी आपल्या नव्या प्रतिनिधींची निवड करून त्यांचे पत्र धर्मदाय आयुक्त यांना सादर केले आहे. अद्यापपर्यंत भाविक प्रतिनिधींसाठी अर्ज प्रकिया धर्मदाय आयुक्त कार्यालयाने जाहीर केलेली नाही. मात्र न्यायालयाने आखून दिलेल्या आराखड्यास शिंदे यांनी हरकत घेतल्याने नियुक्ती प्रक्रिया रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्ज भरण्याचा आज अंतिम दिवस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिशएन (आयमा) या संस्थेच्या दि. २९ मे रोजी २५ पदांसाठी होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकीत विरोधी गटातर्फे अध्यक्षपदासाठी तुषार चव्हाण आज, रविवारी (दि. २०) नामनिर्देशनपत्र दाखल करणार आहेत.

या निवडणुकीत बिनविरोधाचे प्रयत्न यशस्वी न झाल्यामुळे निवडणुकीत आता रंगत वाढली आहे. आतापर्यंत या निवडणुकीसाठी ३९ इच्छुकांनी अर्ज नेले असले तरी अद्यापर्यंत एकही अर्ज दाखल झाला नाही. अर्ज भरण्याची अंतिम तारीख दि. २० मे असून, त्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीसाठी एकता पॅनलने अध्यक्षपदासाठी वरुण तलवार यांची उमेदवारी अगोदरच जाहीर केली आहे. त्यानंतर विरोधी गटानेही तुषार चव्हाण यांना संमती दिली असून, ते नामनिर्देशनपत्र रविवारी दाखल करणार आहेत. उद्योजकांच्या संघटनेची ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी तलवार यांना दोन वर्षे अध्यक्षपद द्यावे व उपाध्यक्षपदी तुषार चव्हाण यांची निवड करावी, दोन वर्षांनंतर होणाऱ्या पुढील निवडणुकीत चव्हाण यांना अध्यक्षपदाची संधी देण्यात यावी, असा प्रस्ताव ठेवण्यात होता. पण, तो नाकारण्यात आल्यामुळे या निवडणुकीसाठी विरोधी गटानेही तयारी केली आहे. 'आयमा'च्या या द्विवार्षिक निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, जनरल सेक्रेटरी, दोन सेक्रेटरी व खजिनदारबरोबरच २० कमिटी सदस्य निवडले जाणार आहेत. दि. २९ मे रोजी निवडणूक होणार आहे. ३० मे रोजी मतमोजणी, तर ३१ मे रोजी वार्षिक सभेत या निवडणुकीचा निकाल घोषित केला जाणार आहे. 'आयमा'चे १५०० उद्योजक सदस्य आहेत.

--

स्ट्रिप : आयमा निवडणूक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावरान करवंदे खाताहेत भाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

करवंदांची गोडी चाखण्याची लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांनाच हौस असते. अशी ही उन्हाळी हंगामात येणारी काळीशार करवंदे अर्थात, डोंगराची काळी मैना सध्या चांगलाच भाव खाताना दिसत आहे. करवंदे घेण्यासाठी नागरिकांची चांगलीच गर्दी होत असून, उत्पादनाअभावी यंदा करवंदांचे भावही वधारले आहेत. एका किलोसाठी पन्नास ते साठ रुपयांचा दर आकारला जात आहे. छोटे माप पाच रुपये, मोठे माप दहा रुपये अशा पद्धतीने करवंदांची शहरातील सीबीएस, शालिमार, रेल्वेस्थानक व नाशिकरोड बसस्थानक परिसरात आदिवासी भागातून आलेल्या नागरिकांकडून विक्री केली जात आहे. जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर, कळवण, पेठ सुरगाणा आदी ठिकाणी असलेल्या डोंगराळ भागातून ही करवंदे शहरात विक्रीसाठी आणली जातात. पिकलेली करवंदे जाळ्यांमध्ये शिरून तोडण्याचे काम येथील स्थानिक महिला व मुले करीत असतात. करवंदांची जाळी काटेरी असते, त्यामुळे काट्यांतून करवंदे तोडने जिकिरीचे काम असते. विविध प्रकारच्या पानांचे द्रोण तयार करून ते द्रोण दहा रुपये याप्रमाणेदेखील हे आदिवासी बांधवबाजारपेठेत विक्री करीत असतात. गोड व काळ्या करवंदांना यंदा चांगली मागणी दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणपूर्तीअभावी महासभा तहकूब

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषदेच्या निवडणुकीचा परिणाम महासभेवर झाला असून, शनिवारी गणपूर्तीअभावी महापौरांवर महासभा तहकूब करण्याची वेळ आली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेचे सदस्य सहलीवर गेले आहेत, तर भाजपचे नगरसेवक दिशा नसल्याने सैरभैर झाले आहेत. अनेक नगरसेवक आकडेमोडीत व्यस्त आहेत. त्यामुळे १२२ पैकी जेमतेम १५ नगरसेवकांनीच हजेरी लावल्याने अखेरीस महासभा तहकूब करावी लागली.

महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी महासभा बोलविण्यात आली होती. विधान परिषदेची आचारसंहिता असल्याने या महासभेत गेल्या महासभेत झालेले इतिवृत्त मंजुरीचेच विषय होते. त्यामुळे अगोदरच नगरसेवकांमध्ये निरुत्साह होता. त्यातच विधान परिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने बहुसंख्य नगरसेवक सहलीवर गेले आहेत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे व अपक्ष नगरसेवकही सहलीवर गेले आहेत. त्यामुळे महापालिकेत यांची उपस्थिती शक्यच नव्हती. मात्र, भाजपने विधान परिषदेसंदर्भात कोणासोबत जायचे, याचा अद्याप निर्णय घेतला नसून, त्यांचे नगरसेवक सहलीवर गेलेले नाहीत. त्यामुळे भाजपचे नगरसेवक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. मात्र, भाजपच्याही नगरसेवकांनी दांडी मारली. जेमतेम १२ ते १५ नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे कोरमअभावी महापौरांनी महासभा तहकूब करण्याची घोषणा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ड्रग्ज तस्कराचा शस्त्र विक्रीचा धंदा उघड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या तिघांपैकी रणजीत मोरे (३२, रा. हरिविश्व सोसायटी, पाथर्डी फाटा) या संशयिताचा शस्त्र खरेदी विक्रीचा धंदाही क्राईम ब्रँचने मोडून काढला आहे. मोरेने वेगवेगळ्या तिघा संशयितांना विक्री केलेल्या ७ देशी बनावटीच्या पिस्टलसह २५ काडतुसे हस्तगत करीत पोलिसांनी खरेदीदारांना अटक केली.

निगाहेबेन इम्तीयाज खान (रा. ओंकार रेसीडन्सी, टिटवाळा, कल्याण), दीपक राजेंद्र जाधव (रा. पंचवटी) आणि अमोल भास्कर पाटील (रा. म्हसरूळ टेक, शिवाजी चौक) अशी या तिघा खरेदीदारांची नावे आहेत. क्राईम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने १६ मे रोजी मध्यरात्री मोरेसह त्याच्या दोघा साथिदारांना ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात पाथर्डी फाटा येथे अटक केली होती. पोलिसांना तपासात मोरेच्या अवैध शस्त्र विक्रीची माहिती मिळाली. त्यानुसार क्राईम ब्रँचने वेगवेगळ्या ठिकाणी सापळा लावून अटक केली. या गुन्ह्याचा तपास अद्याप सुरू असून, मोरे सदर कट्टे कोठून आणयाचा, खरेदीदारांनी हे कट्टे कशासाठी खरेदी केले हे समोर येणे बाकी असल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी दिली. मुंबईतील ड्रग्ज तस्करांना अटक करणे तसेच अवैध शस्त्र विक्रीचे रॅकेट उघडकीस आणण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी, सचिन खैरनार, दीपक गिरमे, सहायक पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत पळशीकर, पोपट कारवाळ, जाकीर शेख आदींनी प्रयत्न केले.

--

जानेवारीपासून २८ कट्टे जप्त

शहर पोलिसांनी जानेवारी ते मे या महिन्यापर्यंत तब्बल २८ गावटी कट्टे जप्त केलेत. या प्रकरणी ३२ संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, विविध पोलिस स्टेशनमध्ये १७ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विदया इंटरनॅशनल स्कूलचे घवघवीत यश

$
0
0

विद्या स्कूलचे घवघवीत यश

येवला  : 'आयसीएसई' मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर होताना येवल्यातील विद्या इंटरनॅशनल स्कूलच्या मुलांनी घवघवीत यश संपादन केले. शाळेचा यंदा एकूण निकाल शंभर टक्के लागला आहे. आस्था पटेल ही ९५ टक्के गुण मिळवून विद्यालयात पहिली आली. सिद्धेश कुशारे (९३ टक्के), साक्षी वाणी (८९ टक्के), पार्थ शिंदे (८८.४ टक्के), कशक ठाकूर (८८ टक्के), राजवीर परदेशी (८६.४ टक्के) तर लब्दी संकलेचा (८५ टक्के), सिद्धेश्वरी झाल्टे (८४.४ टक्के), साक्षी चोरडिया (८४.२ टक्के) व सय्यम साबद्रा (८०.६ टक्के) असे यश संपादन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला मंडळ आवाहन

$
0
0

महिला मंडळ कॉलमसाठी आवाहन

--

प्रिय सखी,

आपलंही महिला मंडळ आहे? दर आठवड्याला किंवा महिन्याला सगळे जण भेटतात? विविध प्रकारचे उपक्रम आपण राबवित असालच! त्याचा प्रत्यक्षात किती जणांना फायदा झाला? आपल्या मंडळाची आजवरची कारकीर्द कशी आहे? आगामी काळाचे नियोजन काय आहे? हे सारे आपण 'मटा'ला कळवू शकता. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या नावांसह आपल्या मंडळाची माहिती आपण पाठवू शकता. त्यासाठी अश्विनी कावळे यांच्याशी ashwini.kawale@timesgroup.com या इ मेल आयडीवर संपर्क साधावा. तसेच, आपल्या मंडळाविषयीची माहिती महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड या पत्त्यावरही पाठवू शकता. तेव्हा कुठलाही वेळ न दवडता तातडीने मंडळाची माहिती पाठवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाइम्स ग्रुपतर्फे २६ पासून प्रॉपर्टी फेस्टिवल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडियातर्फे नाशिककरांसाठी प्रॉपर्टी फेस्टिवलचे होणार आहे. गंगापूर रोडवरील जुना गंगापूर नाका येथील इंद्रप्रस्थ हॉलमध्ये २६ आणि २७ मे रोजी सकाळी साडेदहा ते रात्री नऊ या वेळेत हा प्रॉपर्टी फेस्टिवल होईल.

या उपक्रमात शहरातील नामवंत विकसक सहभागी होणार आहेत. प्रदर्शनात आवाक्यातील घरे, लक्झरी फ्लॅट, टाउनशिप, रो हाउसेस, व्हिला, फ्लॅट, प्लॉट्स, वीक अँड होम, कार्यालये आदींच्या खरेदीसाठी माहिती उपलब्ध असणार आहे. इच्छुकांसाठी सहभागी विकसकांच्या वतीने आकर्षक योजनाही ठेवण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य आहे. प्रदर्शनात रुंगटा ग्रुप, सम्राट ग्रुप, ड्रीम शेल्टर्स, श्रीयोग बिल्डर्स, मालपाणी ग्रुप, अनमोल नयनतारा ग्रुप, जय डेव्हलपर्स, एचडीएफसी आणि कारडा कन्स्ट्रक्शन्ससह विविध ग्रुप सहभागी होणार आहेत. घराचं स्वप्न साकारण्यासाठी या प्रदर्शनास उपयुक्त ठरेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनकोंडी फुटण्यासाठी हवे नियोजन

$
0
0

उपनगर सिग्नलवर फायबर कोन बसविण्याची मागणी 

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर सिग्नल येथे उपनगरमध्ये जाणाऱ्या गाड्यांसाठी सिग्नलवर उभ्या असलेल्या अन्य वाहनांमुळे अडचणीचे ठरत आहे. अशा परिस्थितीत महापालिकेने या ठिकाणी लेन कटिंगसाठी ' फायबर कोन' ठेवल्यास सोयीचे होईल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.  त्यामुळे येथेील वाहनकोंडी फुटून वाहनचालकांना सोयीचे होईल.

गेल्या अनेक वर्षांपासून उपनगर नाक्यावर सिग्नल  यंत्रणा कार्यान्वित आहे. मात्र दिवसेंदिवस वाढत असलेली वाहनांची संख्या यामुळे रस्त्याने चालणे जिकरीचे होत आहे. ट्रॅफिक सिग्नलवर नेहमी डावीकडे वळणाऱ्या वाहतुकीसाठी थांबणे बंधनकारक  नसते.

मात्र,  या ठिकाणी वळण्यासाठीदेखील अगोदर उभ्या असलेल्या वाहने जाण्याची प्रतीक्षा करावी लागते. अशावेळी उपनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती असल्याने या सिग्नलवरून डावीकडे वळणारे रिक्षाचालक, चारचाकी व दुचाकीस्वार यांना डावीकडे वळण्यासाठी सिग्नलवर उभ्या राहणाऱ्या बेशिस्त वाहनांमुळे मनस्ताप सहन करावा लागतो.

वाहनचालकांना मनस्ताप

या सिग्नलवर बेशिस्त वाहतुकीमुळे वारंवार छोटेमोठे अपघात घडत असतात. त्याचबरोबर वाहनचालकांमध्ये हमरीतुमरी होऊन थेट मारामारीपर्यंत वाद पोहोचतो. त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्याकरिता महापालिकेच्या नगररचना विभागाने येथील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन जुना गंगापूर नाका सिग्नलप्रमाणे या ठिकाणीही त्वरित लेन कटिंगसाठी फायबर कोनची व्यवस्था करायला हवी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली असून, हे करणे क्रमप्राप्त झाले आहे. 

अनेक परिसरातील रहिवासी वळण्यासाठी या सिग्नलवर अनेकदा ताटकळत उभे राहतात. यामुळे येथे लेन कटिंग करण्यासाठी व्यवस्था करणे गरजेचे बनले आहे.

- प्रवीण जगताप, नागरिक  

अनेकदा या भागातून अंध, अपंग यांची ये-जा होत असते. याशिवाय इच्छामणी मंदिरासह  उपनगरच्या अन्य भागात  जाणाऱ्या  रिक्षाचालकांना डावीकडे  पुणे महामार्गाकडून डावीकडे वळण घेण्यासाठी उपाययोजना होणे अनिवार्य आहे.

-  राजू बेंद्रे, रिक्षाचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नगाठी जुळविण्याची संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात सर्वजातीय वधू-वरांना लग्नगाठी जुळविण्याची संधी उपलब्ध होत आहे. महाराष्ट्र टाइम्स व अनुपमशादी डॉट कॉमतर्फे दि. २७ मे रोजी सर्वजातीय वधू-वर मेळावा (स्वजातीय व आंतरजातीय) आयोजित करण्यात आला असून, त्याद्वारे लग्नगाठी जुळविल्या जाणार आहेत.

हॉटेल एमराल्ड पार्क, मायको सर्कलजवळ, नाशिक येथे सकाळी १० वाजता या मेळा‌व्यास प्रारंभ होणार आहे. अनुपमशादी डॉट कॉमतर्फे आजपर्यंत विविध समाजांचे वधू-वर मेळावे / वेडिंग स्वयंवर झाले. या सर्व वधू-वर मेळाव्यांतून अनेकांचे लग्न जुळले आहेत. या पद्धतीने वधू-वर मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र टाइम्स व अनुपमशादी डॉट कॉमने प्रथम नोहेंबर २०१३ मध्ये केले होते. तेव्हापासून झालेल्या सर्व वधू-वर मेळाव्यांना उदंड प्रतिसाद मिळाला आहे. या मेळाव्यामध्ये सहभागी होणाऱ्या उपवधू-वर यांना लग्न जमेपर्यंत मदत व वेबसाइटवर नोंदणी ही सेवा मिळणार आहे. या मेळाव्यात ब्राह्मण, मराठा, सोनार, शिंपी, माळी, तेली, सुतार, चांभार, वंजारी, कोळी, जैन, श्वेतांबर व इतर सर्व समाजांचे वधू-वर संपूर्ण महाराष्ट्रातून येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक उपवर-वधू यांना आपल्याच समाजातील व आंतरजातीय विवाह स्थळे बघता येतील, असे संचालक संजय लोळगे यांनी सांगितले.

यामध्ये स्वजातीय व आंतरजातीय, प्रथम विवाह, घटस्फोटित, विधूर, विधवा, अपंग, अंध इत्यादी सर्व वधू-वर सहभागी राहणार आहेत. आपणही या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा. अंध, अपंग वधू-वरांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. मुलींसाठी खास पैठणी भेट योजनाही ठेवण्यात आली आहे, असे आयोजकांनी सांगितले.

--

नोंदणीसाठी साधा संपर्क

या वधू-वर मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी अनुपमशादी डॉट कॉम, शीतल कॉम्प्लेक्स, आयडीबीआय बँकेसमोर, द्वारा- नाशिक (मोबाइल : ७४४७७८७४४७ किंवा ८३७८९१०९९९) येथे संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसचा नाशिकमध्ये जल्लोष

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कर्नाटक विधानसभेत भाजपच्या बी. एस. येड्डियुरप्पा यांनी बहुमत सिद्ध करण्याआधीच राजीनामा दिला आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये लोकशाहीचा विजय झाला असून, देशात सुरू असलेल्या भाजपच्या दंडेलशाहीला कर्नाटकात रोखले गेल्याने नाशिकमध्ये युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला. कर्नाटकमध्ये आता काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार येणार असल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली. या निकालानंतर सर्व कार्यकर्त्यांनी लोकशाहीवरील विश्वास व्यक्त करून लोकशाही भारतात रुजलेली आहे हे आजच्या कर्नाटकातील राजकीय घडामोडींनंतर लक्षात आले आहे. यापुढे देशातील जनता भाजपची दंडेलशाही सहन करणार नाही, असे मत व्यक्त केले. याप्रसंगी माजी शहराध्यक्ष आकाश छाजेड, नगरसेवक राहुल दिवे, सुनील आव्हाड, नितीन काकड, सचिन भुजबळ, महेश बाफना, अनिकेत गांगुर्डे, संदीप दिवे, गणेश आठवले, सचिन पगारे आदी उपस्थित होते. या वेळी कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रामसेवकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी त्रिस्तरीय समिती

$
0
0

जि.प.च्या सीईओंनी दिली आठवडाभराची मुदत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ग्रामविकासात महत्त्वाचा घटक असलेल्या ग्रामसेवकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी पुढाकार घेतला असून, यासाठी त्रिस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. ग्रामसेवकांचे सर्व प्रलंबित प्रश्न पुढील आठवड्यापर्यंत निकाली काढण्यासाठी समितीला आदेश देण्यात आल्याचेही डॉ. गिते यांनी सांगितले. यामुळे ग्रामसेवकांशी संबंधित सर्व महत्त्वाच्या प्रकरणांचा निपटारा होणार असून, प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

सिन्नर येथील ग्रामसेविकेच्या रजेचा अर्ज मंजुरीसाठी विलंब झाल्याने ग्रामसेवकांची प्रकरणे प्रलंबित राहत असल्याची बाब मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिते यांच्या निदर्शनास आली. याबाबत तत्काळ माहिती घेऊन ग्रामसेवकांच्या विविध प्रलंबित संचिका कोणाकडे व किती दिवसांपासून प्रलंबित आहेत, याची तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील लेखाधिकारी एम. एस. कदम, सहाय्यक लेखाधिकारी के. एम. पटेल व कनिष्ठ प्रशासन अधिकारी रवी आंधळे यांची समिती यासाठी नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती डॉ. गिते यांनी दिली. या समितीने पुढील आठवड्यात विविध प्रलंबित विषयांबाबत माहिती घ्यायची आहे. यामध्ये कोणाकडे किती दिवसांपासून प्रकरण प्रलंबित आहे, याबाबत विहित प्रपत्रांत माहिती घ्यायची असून, प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढायची आहेत. पुढील आठवड्यात याबाबचा अहवाल सादर करण्याचे आदेशही डॉ. गिते यांनी दिले आहेत. ग्रामविकासात ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची आहे. ग्रामसेवकांचे रजा प्रकरण, वैद्यकीय देयके, कालबद्ध पदोन्नती, स्थायित्व प्रमाणपत्र आदी विषय तत्काळ निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. गिते यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकृषक कराची नवीन नियमानुसार आकारणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

न्यायालयीन लढाईमध्ये तब्बल १८ वर्षे अडकून पडलेला अकृषक सारा वाढविण्याबाबतची स्थगिती न्यायालयाने उठवली आहे. या निर्णयामुळे जिल्हा यंत्रणेला महसूल वसुली करणे अधिक सोपे होणार असून, नवीन नियमानुसार सुधारित अकृषक कराची आकारणी करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिले आहेत.

कृषक जमिनीवर शेतसारा आणि एनए झालेल्या अकृषक जमिनीवर सरकारकडून कर आकारला जातो. त्यापैकी अकृषक जमिनीवरील करात साधारणत: दर दहा वर्षांनी वाढ करण्याची तरतूद आहे. सरकारने यापूर्वी २००१ मध्ये अकृषक कर वाढविले होते. मात्र, २००५ ला त्या विरोधात आक्षेप घेण्यात आल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले. २०१० मध्ये अकृषक साऱ्यात वाढ होणे अपेक्षित होते. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेमुळे २००१ पासून २०१७ पर्यंत अकृषक कराच्या दरात सरकारकडून वाढच केली गेली नाही. यंदाच्या आर्थिक वर्षापासून अकृषक कराच्या दरात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसे आदेश सरकारने जिल्हा यंत्रणेला निर्गमित केले आहेत. अकृषक करवाढीची आकारणी गटनिहाय होणार असून, त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर महसूल मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयाच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी बैठक घेतली. बैठकीला मंडल अधिकारी, तलाठी उपस्थित होते. नवीन नियमानुसार सुधारित अकृषक कराची आकारणी करण्याबाबतच्या सूचना त्यांना देण्यात आल्या. जिल्ह्यात मालेगाव आणि नाशिक हे दोन मोठे विभाग आहेत. २००५ नंतरच्या टप्प्यानुसार सुधारित करातून नागरिकांनी भरलेल्या कराची रक्कम वळती करीत, उर्वरित थकीत व नवीन अकृषक कर नेमका किती होतो, याची माहिती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगारनगर येथे तरुणाची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

कामगारनगर येथे एका फायनान्स कंपनीची रिकव्हरी एजन्सी चालविणाऱ्या स्वप्निल पुंड (वय २५) या तरुणाने कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

सातपूर कॉलनीत राहणाऱ्या स्वप्निलने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळली असून, त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, त्याने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत पैशाची देवाणघेवाण असल्याचा उल्लेख आल्याने सातपूर पोलिस त्या दिशेने तपास करीत आहेत. हवालदार दराडे अधिक तपास करीत आहेत.

सातपूर कॉलनीतील जिजामाता शाळेजवळ राहणाऱ्या स्वप्निलने एका खासगी फायनान्स कंपनीची रिकव्हरी करण्याची एजन्सी घेतली होती. कामगारनगर येथे त्या एजन्सीचे कार्यालयदेखील उघडले होते. शुक्रवारी या कार्यालयातच त्याने साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली होती. गळफास घेण्यासाठी वापरण्यात आलेली साडी नवीकोरी असून, त्या साडीचे लेबलदेखील काढलेले नव्हते. गुरुवारी स्वप्निल घरी आलाच नाही. शुक्रवारी सकाळी कार्यालयातील कामासाठी आलेल्या मुलीने कार्यालयाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हा प्रकार समोर आला. स्वप्निलच्या मोठ्या भावाचा विवाह नुकताच झाला होता. स्वप्निलच्या पश्चात आई, भाऊ, भावजय व बहीण असा परिवार आहे.

--

गुणवत्तेसाठी करार -२

अपघातांचे सत्र थांबेना -३

'आधार'साठी लगबगीस 'ब्रेक' -४

टार्गेट चुकतंय! -५

आम्ही ट्रेकवेडे -६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदान साहित्याचे आज वाटप

$
0
0

सोमवारी बॅलेट पेपरवर होणार मतदान

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषद निवडणूक एक दिवसावर येऊन ठेपली असून, जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी तयारीचा आढावा घेतला. मतदान केंद्राध्यक्षांना मतदानप्रक्रियेसाठीचे साहित्य वाटप रविवारी (दि. २०) करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पंधरा मतदान केंद्रे सोमवारी मतदानासाठी सज्ज होणार आहेत. निवडणुकीसाठी सोमवारी, २१ मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. मतदानासाठी बॅलेट पेपरचा वापर होणार असून, मतदारांना पसंतिक्रम नोंदवत मतदान करायचे आहे.

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे एकूण ६४४ सदस्य मतदान करणार आहेत. प्रत्येक तालुक्यातील नगरपंचायत, नगर परिषद, तालुक्यातील जिल्हा परिषद गटांचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती आणि नाशिक आणि मालेगाव महापालिकांचे सदस्य या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील. त्यासाठी संबंधित तालुक्यांच्या तहसील कार्यालयांत मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. नाशिकमध्ये महापालिका, भगूर नगर परिषद, देवळाली छावणी परिषद, नाशिक तालुक्यातील जिल्हा परिषद गटांचे सर्व सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती असे १६० मतदार जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) यांच्या दालनात मतदान करू शकतील.

मतदारांना मोबाइल, पेजर, कॅमेरा यांसारख्या वस्तू मतदान केंद्रात नेण्यास मनाई असेल. पसंतिक्रम नोंदविण्यासाठी केंद्राध्यक्षांकडे असलेल्या पेनचाच वापर करणे अनिवार्य आहे. याशिवाय कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रविवारी सकाळी मतदान केंद्राध्यक्ष व कर्मचाऱ्यांना मतपेटीसह मतपत्रिका, पेन, सील करण्याचे साहित्य, विविध प्रकारचे अर्ज अशा सुमारे ४३ प्रकारच्या वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. या साहित्याचा वापर कसा करावा, तसेच या साहित्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. निवडणुकीचे साहित्य बंदोबस्तात संबंधित केंद्रांवर रवाना करण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवरील तयारी सायंकाळपर्यंत पूर्ण होणार असून, कर्मचाऱ्यांना या केंद्रांवरच मुक्काम करावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ दरोडेखोर जेरबंद

$
0
0

चांदवड चौफुलीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्री चांदवड चौफुली परिसरात धडक कारवाई करीत आठ दरोडेखोरांना हत्यारांसह जेरबंद केले.

पोलिस निरीक्षक अशोक करपे यांना मालेगावकडून ७ ते ८ संशयीत एका पीकअप वाहनातून गुन्हा करण्याचे उद्देशाने नाशिकच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने चांदवड चौफुलीनजीक शुक्रवारी मध्यरात्री या वाहनाला गतीरोधाकाजवळ थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहनचालकाने भरधाव वेगाने गाडी पुढे नेली. त्याचवेळी पथकाने पाठलाग करून वाहन अडविले. चालक आणि अन्य तीन जणांना पोलिसांनी जागीच ताब्यात घेतले. गाडीच्या मागे बसलेले चार आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना पथकाने त्यांना देखील शिताफीने ताब्यात घेतले.

पोलिसांनी गाडीत असलेल्या दोन दुचाकींची तपासणी केली असता त्यात एक गावठी बनावट पिस्तुल, एक जिवंत काडतूस, दोन चॉपर, तलवार, टॉमी, दोन मिरची पूड पॅकेट असे शस्त्र आढळून आले. पोलिसांनी अजिजू रहेमान अतिक अहमद, मोहमद रफिक मोहम्मद युनुस, मोहमद मुन्नवर मोहम्मद फारुख, लईक अहमद अन्सार अहमद, असिफ खान उस्मान खान, शेख सईद शेख मज्जीद, मोहम्मद इस्माईल मोहम्मद इस्त्राइल, आरिफ अहमद मोहम्मद हुसेन (सर्व रा. मालेगाव ) या आठ जणांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांचा म्होरक्या अजिजू रहेमान यांच्या नियोजनानुसार हे सर्व मालेगाव-नाशिक महामार्गावर एखादे मालवाहू वाहन अडवून लूटमार करणार करणार होते. पोलिसांनी एकूण ३ लाख ६७ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चांदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images