Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सातपूरमधील बँकेत सापडले बनावट चलन

$
0
0
सातपूरमधील राष्ट्रीयकृत बँकेत सापडणाऱ्या बनावट चलनाचा शोध लावणे अजूनही पोलिसांना शक्य झालेले नाही. ठराविक दिवसांनंतरही बँकेने फिर्याद देणे आणि पोलिसांनी ती नोंदवून घेणे, असे काम सुरू असून बनावट चलनाचे रॅकेट चालवणारे त्याचा फायदा घेत आहेत.

'रासबिहारी'च्या पालकांची शिक्षणमंत्र्यांकडे धाव

$
0
0
पंधरा दिवसांपासून शाळेबाहेर असलेल्या रासबिहारी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांची भेट घेऊन याबाबत त्वरित निर्णय घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.

'सुपर'च्या समस्यांवर पुन्हा नुसतीच चर्चा

$
0
0
विभाग‌ीय आयुक्तांबरोबर सुपर स्पेशालिटी हॉस्प‌िटलमधील समस्यांवर झालेल्या बैठकीत हॉस्प‌िटलच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचा व याबाबत सरकारकडे पाठपुरावा करण्यावर नुसतीच चर्चा झाली. यामुळे अडचणीत सापडलेल्या 'सुपर' हॉस्प‌िटलला घरघर लागण्याची भीती अधिक आहे.

शहीद अहिररावच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार

$
0
0
उत्तराखंडमध्ये मदतकार्य करताना हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेल्या गणेश अहिरराव या जवानाची ओळख अखेर पटल्यानंतर त्याचे पार्थिव आज, मंगळवारी चाळीसगाव येथे आणण्यात आले. उद्या, बुधवारी वडाळा-वडाळी या गणेशच्या जन्मगावी त्याच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

६ हजार रिक्षा इलेक्ट्रोनिक मीटरविनाच

$
0
0
सरकारने काढलेल्या अधिसूचनेनुसार प्रत्येक रिक्षाला इलेक्ट्रॉनिक मीटर बसविणे सक्तीचे आहे. मात्र मुदत संपूनही शहरातील केवळ पन्नास टक्के रिक्षांनाच इलेक्ट्रॉनिक मीटर बसले आहेत. शहरात असलेल्या ११ हजार ५०० रिक्षांपैकी केवळ ५२६८ रिक्षांनाच मीटर बसविण्यात आले आहेत.

स्कूलबसच्या धडकेत चिमुरड्याचा अंत

$
0
0
स्कूलबसमधून स्टॉपवर उतरलेल्या एका चार वर्षीय चिमुरड्याला त्याच स्कूलबसने धडक दिल्याने जीव गमवावा लागला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास उत्तमनगर परिसरातील मोरे मळा येथे घडली.

दाव्याची सुनावणी होणार उद्या

$
0
0
शहरातील वृक्षांची सर्रासपणे कत्तल सुरू असून त्याकडे लक्ष देण्यास महापालिका प्रशासनाला वेळ नाही, असा आरोप करीत मानव उत्थान मंचने दाखल केलेल्या दिवाणी दाव्याच्या नियमित कामकाजास गुरुवारी सुरुवात होणार आहे.

NDCCवर प्रशासक मंडळाची नियुक्ती

$
0
0
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची खालावलेली आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी निबंधक सहकारी संस्थांच्या सहकार आयुक्तांनी बँकेवर प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशांनुसार प्रशासकासह दोन सदस्य असे त्रिसदस्यीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे.

वृत्तपत्र विक्रेत्यांनी घेतले दत्तक

$
0
0
सामाजाचे काहीतरी देणे लागतो, या उदात्त भावनेने नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेच्या वतीने गतीमंद शाळेतील कर्णबधीर विद्यार्थ्यास दत्तक घेऊन पालकत्व स्विकारले.

पर्यटन विकास आराखडा तयार

$
0
0
जळगाव जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना मिळावी, याकरिता ८०० कोटींचा आराखडा मंगळवारी जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला. या आराखड्यात जिल्हयातील ३४ पर्यटनस्थळांचा समावेश करण्यात आला आहे.

शिक्षण मंडळच गणितात 'कच्चे'

$
0
0
महापालिका शिक्षण मंडळाकडून खरेदी करण्यात आलेले गणवेश, बुट आणि सॉक्स यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत असताना, आता विद्यार्थ्यांच्या आहार भत्त्यावर देखील डल्ला मारण्यात आल्याचा पुरावा समोर आला आहे.

एसटी उलटली, ३० जखमी

$
0
0
औरंगाबाद-जळगाव रस्त्यावर उमाळघाटाजवळ एक एसटी उलटली.

आंब्याची अमेरिकावारी व्हाया नाशिक

$
0
0
महाराष्ट्रासह परराज्यातील आंबा अमेरिकेला नाशिक मार्गेच जातो. भाभा अणुसंशोधन केंद्राने उभारलेल्या लासलगाव येथील विकीरण (रेडीएशन) प्रकल्प हे त्यामागचे कारण आहे. दरवर्षी आंब्याची निर्यात वाढतच असून 'केसर'ने 'हापूस'ला कधीच मागे टाकले आहे.

प्रेस कामगारांनी जमा केली उत्तराखंडसाठी ४८ लाखांची मदत

$
0
0
उत्तराखंडवर कोसळलेल्या नैसर्गीक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले आहे. येथील नागरिकांच्या मदतीसाठी नाशिकरोडच्या 'सीएनपी', 'आयएसपी' मधील सर्व कामगारांनी पुढाकार घेतला असून प्रत्येकाने एक दिवसांचा पगार मदतीसाठी दिला आहे.

रेल्वे वसाहतीला समस्यांची रांग

$
0
0
नाशिकरोड येथील सुभाषरोडवर असलेल्या रेल्वे वसाहतीला समस्यांनी ग्रासले आहे.

जिल्ह्यातील धरणसाठा १० टक्क्यांवर

$
0
0
नाशिक जिल्ह्यात जून महिन्यामध्ये झालेल्या सरासरीपेक्षा अधिक पावसामुळे धरणसाठ्यात वाढ झाली आहे. मे अखेरीस सहा टक्क्यांवर असलेला जलसाठा आता दहा टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे.

जप्त मालमत्तांचे लिलाव करा

$
0
0
अडचणीतील बँका व पतसंस्थांच्या ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी जप्त मालमत्तांचे लिलाव करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिले आहेत. सरकारी जिल्हा कृती समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

३.५ वर्षांच्या मुलाचा कुपोषणाने मृत्यू

$
0
0
साडेतीन वर्षांच्या एका मुलाचा कुपोषणाने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री निफाड येथे घडली. या मुलाच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. हर्षल दीपक जाधव असे या दुर्दैवी मुलाचे नाव असून तो निफाडच्या जोशीवाडा परिसरात राहत होता.

गुन्हेगाराच्या शोधासाठी क्राइम ब्रँच सक्रिय

$
0
0
पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे करून बेपत्ता झालेल्या १ हजार २०८ आरोपींच्या शोधासाठी क्राइम ब्रँचने विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांना सापडत नसलेल्या आरोपींच्या संख्येबाबत 'मटा'ने ८ जून रोजी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते.

पैशांसाठी पत्नीला पेटवले

$
0
0
दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, म्हणून पतीने पत्नीला पेटवून देण्याची धक्कादायक घटना ओढा रेल्वेस्टेशनजवळील हमालवाडी येथे मंगळवारी घडली. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी पतीला अटक केली असून महिलेवर सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images