Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘नंदुरबार-पुणे’ शिवशाहीनेनाशिककरांचंही चांगभलं

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्य परिवहन महामंडळाची वातानुकूलित आरामदायी 'नंदुरबार-पुणे' स्लीपरकोच शिवशाही बस शुक्रवारपासून (दि. २५) सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे नंदुरबारकरांबरोबरच नाशिककरांचीही सोय झाली आहे. ही गाडी नाशिकमार्गे असून, मध्यरात्री ती नाशिक थांबा घेईल. प्रवाशांनी या बसचा लाभ घ्यावा, असे आवाहन नंदुरबार आगारप्रमुख नीलेश गावित यांनी केले आहे.

धुळे जिल्ह्यानंतर आता नंदुरबार जिल्ह्यातूनही शिवशाही सुरू करण्यात यावी, अशी अनेक दिवसांपासून मागणी होती. ती मान्य करीत राज्य परिवहन महामंडळाने 'नंदुरबार-पुणे' या धुळे, नाशिकमार्गे जाणाऱ्या शिवशाहीची सुरुवात केली आहे. यामुळे नंदुरबारसह नाशिकमधील विद्यार्थी, नोकरदार वर्गास फायदा होणार आहे. नंदुरबार बसस्थानकातून ही शिवशाही रोज रात्री ८ वाजता सुटणार असून, पुण्याहून येणारी 'पुणे-नंदुरबार' शिवशाही पुणे बसस्थानकावरून रात्री साडेनऊ वाजता सुटेल. प्रायोगिक तत्त्वावर ही बस सुरू करण्यात आली असून, तिचे एका बाजूचे भाडे ९७२ रुपये असल्याची माहितीही गावित यांनी दिली.

यापूर्वी शहादा येथून निघणारी शिवशाही दोंडाईचा, धुळेमार्गे जात होती. त्यामुळे नंदुरबार-पुणे स्लिपर कोच शिवशाही सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. शिवशाहीचा जाण्याचा मार्ग नंदुरबार, साक्री, सटाणा, नाशिक, संगमनेर व पुणे असा राहील, तर परतताना पुणे, संगमनेर, नाशिक, सटाणा, साक्री व नंदुरबार असा आहे. यामुळे निजामपूर-जैताण्यासह माळमाथा परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाविकांनी फुलला रामकुंड परिसर

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

अधिकमास आणि एकादशी असा योग शुक्रवारी (दि. २५) जुळून आल्याने या मुहूर्तावर रामकुंडात स्नान करण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली. स्नानानंतर पूजा, मंदिरात दर्शनासाठी जाण्याच्या भाविकांच्या लगबगीने पंचवटी परिसर फुलून गेला. गोदेचे मनोभावे पूजन करून अधिकमासाचे वाण आणि दिवे अर्पण करण्यात येत होते.

अधिकस्य अधिक फलम असे अधिक महिन्याचे महत्त्व सांगितले गेले आहे. यंदाच्या अधिक मासास बुधवारी (दि.१६) पासून सुरुवात झाली आहे. त्या दिवसापासून रामकुंडावर सकाळपासून स्नान करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. काही भाविक ओल्या वस्त्राने मंदिरांचे दर्शन घेत आहेत. स्नानानंतर वयाने मोठे असलेल्या कुटुंबातील तसेच नात्यातील व्यक्तींना सन्मानाने स्नान घालण्यात येत होते.

कपालेश्वर, काळाराम, सीतागुंफा, तपोवन आदी ठिकाणच्या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमध्ये कुपोषणाचा आकडा वाढताच

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर तालुक्यात कुपोषितांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्र्यंबक पंचायत समिती कार्यालयातून मिळालेल्या आकडेवारीनुसार तिव्र कुपोषित ८३ तर मध्यम कुपोषित २५० बालके असल्याची नोंद झाली आहे.

दोन महिन्यांपूर्वीच्या माहितीनुसार तिव्र कुपोषित ५३ आणि मध्यम कुपोषित १९२ अशी संख्या होती. कुपोषितांच्या संख्येत वाढ झालेली असताना संबंधित अधिकारी याबाबत बेदखल असून, अद्यापही गांभीर्याने या समस्येकडे कोणीही पाहत नसल्यामुळे नाराजी पसरली आहे. दोन महिन्यांपूर्वी त्र्यंबकेश्वर येथे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत येथे आले असता व्यासपीठावर जाहीरपणे त्र्यंबक तालुक्यात कुपोषण वाढीस लागल्याची चर्चा झाली. त्यानंतर जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी संपूर्ण जिल्ह्यात गावोगाव भेटी देण्यास व आढावा घेण्यास सुरवात केली. बालकांचे वजन घेणे सुरू झाले असताना कुपोषितांच्या संख्येत वाढ झाली आहे. अर्थात अद्यापही वास्तव आकडेवारी नसल्याचे बोलले जात आहे. वाढीस लागलेल्या कुपोषणाला आळा घालण्यात सरकारी यंत्रणेला अपयश आले आहे. पाणीटंचाई, रोजगारासाठी स्थलांतर हे प्रश्न न सुटल्याने तालुक्यातील कुपोषणाचा विळखा वाढत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात दोन बालविकास प्रकल्प आहेत. रोजगाराचा अभाव व त्यामुळे आलेली आर्थिक दुर्बलता आदी कारणांनी कुपोषण वाढते आहे. यामध्ये अज्ञान, अंधश्रद्धा यांची जोड लाभल्याने कुपोषणाचा विळखा सहजासहजी सुटणारा राहीलेला नाही. तालुक्यात आमदार निर्मला गावित यांनी उपसा जलसिंजन योजनांचा केलेला प्रयोग या सर्वसमस्यांवर मात करणारा ठरला आहे. उपसा योजना असलेल्या पंचक्रेाशीतील गावांमध्ये बारमाही शेती व त्यामुळे आर्थिक सुबत्ता आणि सकस आहार मिळण्यास अडचण येत नाही. या परिसरात कुपोषीत बालकांचे प्रमाण कमी दिसून येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापाऱ्यांचा तिढा सुटला

0
0

सोमवारपासून मुंगसेत कांदा लिलाव होणार

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व मुंगसे कांदा खरेदी विक्री केंद्रावरील व्यापारी असोसिएशनमधील तिढा अखेर सुटला आहे. शुक्रवारी बाजार समिती संचालक, प्रशासन व व्यापारी असो. यांच्या बैठकीत तोडगा निघाला आहे. त्यामुळे सोमवारपासून मुंगसे कांदा खरेदी विक्री केंद्रावर लिलाव पूर्ववत सुरू होणार आहे.

मुंगसे येथील केंद्रावरील लिलाव प्रक्रिया गेल्या १५ दिवसांपासून बंद होती. व्यापाऱ्यांचे परवाने नुतनीकरण, शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक अशा वेगवेगळ्या कारणाने बाजार समिती व व्यापारी असो. यांच्यातील संबंध ताणले गेले होते. त्यामुळे लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांसह सर्वच घटकांचे आर्थिक नुकसान होत होते. व्यापारी असो.ने नुकतीच पत्रकार परिषद घेवून शेतकऱ्यांना रोखीने पेमेंट देण्याची तयारी दर्शवली होती.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी बाजार समिती सभागृहात याबाबत माजी सभापती व विद्यमान संचालक प्रमोद बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली संचालक प्रशासन व व्यापारी असो. प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. यावेळी बैठकीस सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, पुरुषोत्तम बच्छाव, वसंत कोर, संग्राम बच्छाव, अनिल बच्छाव, काशिनाथ पवार, विश्वनाथ निकम, सचिव अशोक देसले आदींसह सर्व संचालक मंडळ व व्यापारी असो. अध्यक्ष जितेंद्र कापडणे उपस्थित होते. बैठकीत झालेल्या चर्चेअंती व्यापाऱ्यांनी परवाना नुतनीकरणसाठी पणन कायद्यानुसार व नियमाप्रमाणे कागदपत्र पूर्तता करणे , शेतकऱ्यांना शेतमालाचे ५ ते १० हजार पर्यंतचे पेमेंट रोखीने देणे, शेतमाल विक्री तारखेचाच चेक देण्यास तयारी दर्शवली आहे. त्यामुळे सोमवारी (दि. २८) मुंगसे येथील कांदा खरेदी विक्री केंद्रावर लिलाव पूर्ववत सुरू होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नंदुरबार-पुणे’ शिवशाहीनेनाशिककरांचंही चांगभलं

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्य परिवहन महामंडळाची वातानुकूलित आरामदायी 'नंदुरबार-पुणे' स्लीपरकोच शिवशाही बस शुक्रवारपासून (दि. २५) सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे नंदुरबारकरांबरोबरच नाशिककरांचीही सोय झाली आहे. ही गाडी नाशिकमार्गे असून, मध्यरात्री ती नाशिक थांबा घेईल. प्रवाशांनी या बसचा लाभ घ्यावा, असे आवाहन नंदुरबार आगारप्रमुख नीलेश गावित यांनी केले आहे.

धुळे जिल्ह्यानंतर आता नंदुरबार जिल्ह्यातूनही शिवशाही सुरू करण्यात यावी, अशी अनेक दिवसांपासून मागणी होती. ती मान्य करीत राज्य परिवहन महामंडळाने 'नंदुरबार-पुणे' या धुळे, नाशिकमार्गे जाणाऱ्या शिवशाहीची सुरुवात केली आहे. यामुळे नंदुरबारसह नाशिकमधील विद्यार्थी, नोकरदार वर्गास फायदा होणार आहे. नंदुरबार बसस्थानकातून ही शिवशाही रोज रात्री ८ वाजता सुटणार असून, पुण्याहून येणारी 'पुणे-नंदुरबार' शिवशाही पुणे बसस्थानकावरून रात्री साडेनऊ वाजता सुटेल. प्रायोगिक तत्त्वावर ही बस सुरू करण्यात आली असून, तिचे एका बाजूचे भाडे ९७२ रुपये असल्याची माहितीही गावित यांनी दिली.

यापूर्वी शहादा येथून निघणारी शिवशाही दोंडाईचा, धुळेमार्गे जात होती. त्यामुळे नंदुरबार-पुणे स्लिपर कोच शिवशाही सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. शिवशाहीचा जाण्याचा मार्ग नंदुरबार, साक्री, सटाणा, नाशिक, संगमनेर व पुणे असा राहील, तर परतताना पुणे, संगमनेर, नाशिक, सटाणा, साक्री व नंदुरबार असा आहे. यामुळे निजामपूर-जैताण्यासह माळमाथा परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लग्नाचे आमिष दाखवून वर्षभरापासून वेगवेगळ्या ठिकाणी तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीनुसार, संशयित तरुणाविरुद्ध देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिष चंद्रकांत जंगे (वय ३५, रा. डायमंड रो हाउस, गोरेवाडी, नाशिकरोड) असे या संशयिताचे नाव आहे.

पीडित तरुणी आणि अतिषचे प्रेमसंबंध होते. त्याने लग्नाचे आमिष दाखवत तरुणीशी संपर्क वाढवला. १६ एप्रिल २०१७ ते २० मे २०१८ या दरम्यान संशयिताने गोरेवाडी येथील घरी, तसेच उल्हासनगर, कल्याण आणि देवळाली कॅम्प येथे फिरण्यास घेऊन जात वेळोवेळी बळजबरीने शरीरसंबध ठेवले. यानंतर तरुणीने विवाहाचा तगादा लावला असता संशयिताने लाथाबुक्क्यांनी तिला मारहाण केली, तसेच दमदाटी करीत विवाहास नकार दिला. त्यामुळे तरुणीने संशयिताविरुद्ध फिर्याद दिली. महिला उपनिरीक्षक सरोदे तपास करीत आहेत.

महिलेला ठार मारण्याचा प्रयत्न

अनैतिक संबंधाच्या संशयातून दुचाकीस्वाराच्या अंगावर ट्रॅक्टर घालीत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे येथे घडली. यात दुचाकीस्वार जखमी झाला असून, ट्रॅक्टरचालकास पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांताराम वाळू जुंद्रे (वय ३४, रा. लोहशिंगवे) असे अटक करण्यात आलेल्या ट्रॅक्टरचालकाचे नाव आहे. दत्तू चंद्रभान पाटोळे (वय ३६, रा. लोहशिंगवे) याने फिर्याद दिली आहे. पाटोळे याचे कुटुंबातील महिलेशी अनैतिक संबंध आहेत. या संशयातून हा प्रकार घडला.

दत्तू गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास श्रावण पाटोळे यांच्या शेतातील रस्त्याने दुचाकीवर प्रवास करीत असताना समोरून ट्रॅक्टर आला. त्यामुळे त्याने रस्त्याच्या कडेला दुचाकी थांबवली. अनैतिक संबंधाबाबत राग असल्याने जुंद्रेने पाटोळेचा काटा काढायचा, या उद्देशाने त्याच्या अंगावर ट्रॅक्टर घातले. मात्र, पाटोळेने वेळीच दुचाकी रस्त्याच्या खाली उतरवली. त्यामुळे तो बचावला. दुचाकीसह जमिनीवर कोसळल्याने पाटोळेच्या पायास दुखापत झाली. दरम्यान, ट्रॅक्टर अंगावर घालूनही पाटोळे बचावल्याचे लक्षात येताच संतप्त झालेल्या जुंद्रेने ट्रॅक्टर थांबवून ट्रॉलीला लावलेला कोयता घेऊन पाटोळेच्या दिशेने धाव घेतली. दुचाकीखाली अडकलेल्या पाटोळे याने कशीबशी सुटका करून घेत दगडांचा मारा सुरू केला. यामुळे जुंद्रेने वाहनासह घटनास्थळावरून धूम ठोकली. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, जुंद्रेला अटक करण्यात आली आहे. सहाय्यक निरीक्षक लोंढे तपास करीत आहेत.

विनयभंग प्रकरणी तिघांना अटक

शाळेच्या मैदानावर फिरत असलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. हा प्रकार आनंदनगर येथील मनपा शाळा क्रमांक १२५ च्या मैदानावर घडला असून, या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शोएब उमरअली शेख (रा. बागूलनगर, विहितगाव), शिवानी रफी शेख (रा. शेख मंजील, टाऊन हॉल) आणि मुदस्सर अकबर पैठणकर (रा. मराठा कॉलनी, खर्जूल मळा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. पीडित तरुणी गुरुवारी मैत्रिणींसमवेत आनंदनगर येथील मनपा शाळेच्या मैदानावर फिरण्यासाठी गेली होती. संशयितांनी तरुणीला गाठून शिवानी शेख याने विनयभंग केला. यापूर्वी संशयितांनी पाठलाग केल्याचे तरुणीने तक्रारीत नमूद केले आहे. उपनिरीक्षक तेली तपास करीत आहेत.

विनयभंग प्रकरणी तरुणास अटक

शौचास गेलेल्या तरुणीला गाठून विनयभंग करणाऱ्या तरुणास पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील शंकर सोळे (वय ३०, रा. शंकरनगर, तवली फाटा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. मखमलाबाद रोडवरील पिंगळे मळा भागात राहणारी तरुणी बुधवारी सायंकाळी आळंदी कॅनॉल परिसरात शौचास गेली होती. या वेळी संशयिताने तिला गाठून, माझ्याशी लग्न का करीत नाही, असे म्हणत विनयभंग केला. ही घटना तरुणीने घरी कुटुंबीयांना सांगितली. पालकांनी संशयिताविरोधात तक्रार दिली असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. उपनिरीक्षक सावळा तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीच्या सीईओच्या कामाचा धडाका सुरुच.......

0
0

प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी मोहिम

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांकडे प्रलंबित असलेल्या परिच्छेदातील बाबींची पूर्तता करण्यासाठी ३० मे ते १२ जून या कालवधीत धडक मोहीम राबविण्याचे निर्देश झेडपीचे सीईओ डॉ. नरेश गिते यांनी वित्त विभागाला दिले आहेत.

स्थानिक निधी लेखा परीक्षण अहवालात जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख व पंचायत समितीकडील १५ हजार ९५३ परिच्छेद प्रलंबित असून, परिच्छेद निकाली काढण्याचे काम अतिशय असमाधानकारक आहे. याबाबत मुख्य लेखा व वित्त अधिकारी बोधिकिरण सोनकांबळे यांनी तालुकानिहाय नियोजन केले असून, ३० मेपासून या मोहिमेस सुरुवात होणार आहे.

घरकुलची सुनावणी

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत कमी प्रगती असणाऱ्या तालुक्यांची सुनावणी घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी घेतला आहे. ३१ मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात ही सुनावणी होणार आहे. घरकुल योजनेत ज्या तालुक्यातील ग्रामपंचायतींचे काम सर्वात कमी आहे, घरकुले मोठ्या प्रमाणात अपूर्ण आहेत तसेच दुसरा व तिसरा हप्ता अद्याप वितरित केलेला नाही अशा ग्रामपंचायतीची सुनावणी केली जाणार आहे. या सुनावणीत संबंधित ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, उपअभियंता, शाखा अभियंता, स्थापत्य अभियंता, ग्रामीण गृह निर्माण अभियंता, डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घरकुले वेळेत का पूर्ण झाले नाही, कामे प्रलंबित राहण्याची कारणे आदींबाबत यावेळी संबंधितांना विचारणा केली जाणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांनी दिली.

कडकनाथ कोंबड्या वाटप

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी पेठ येथील आढावा बैठकीत कुपोषण निर्मूलनासाठी सर्वांना मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उप विभाग पेठ येथील अभियंता गवळी यांनी करंजाळी येथील अंगणवाडीमधील कुपोषित बालकांच्या पालकांना कडकनाथ जातीची एक नर व एक मादीची जोडी कुपोषित बालकांना अंडी देण्यासाठी वाटप केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक मतदारसंघावरही सेनेचा भगवा फडकवा

0
0

उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादीच्या ताब्यातील नाशिक विधान परिषदेचा गड खेचून आणल्यानंतर आमदार नरेंद्र दराडेंनी शुक्रवारी मातोश्रीवर धाव घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. विधान परिषदेचा गड सर केल्यानंतर आता शिक्षक मतदारसंघाचाही गड जिंका, असे आदेश ठाकरेंनी यावेळी दिले. तसेच, नाशिककरांनी बऱ्याच दिवसांनंतर पेढे खाऊ घातल्याबद्दल त्यांनी नाशिककरांचे आभारही मानले.

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी राष्ट्रवादीच्या शिवाजी सहाणे यांचा दारूण पराभ‌व पराभव केला. भाजपच्या पाठिंब्यानंतरही राष्ट्रवादीच्या ताब्यातील हा मतदारसंघ शिवसेनेकडे प्रथमच आला आहे. विजयानंतर नवोदित आमदार नरेंद्र दराडेंनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित मातोश्रीवर जाऊन शुक्रवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंचा सत्कारही केला.

यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार संजय राऊत, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्तेंसह पदाधिकारी उपस्थित होते.

शिक्षक मतदारसंघात सेनेची एंट्री

विधान परिषदेसोबतच नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही उमेदवार उभा करण्याचे संकेत ठाकरे यांनी दिले आहेत. नाशिक शिक्षक मतदारसंघातही शिवसेनेचाच उमेदवार विजयी झाला पाहिजे, असे सांगत तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून नरेंद्र दराडेंचे बंधू किशोर दराडेंना उमेदवारी मिळेल अशी चर्चा सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन ठिकाणी चेन स्नॅचिंग

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

काही दिवसांपासून शांत बसलेल्या चेन स्नॅचर्सने दोन ठिकाणी हात साफ करीत पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे. दोघांनी मिळून इंदिरानगर आणि भद्रकाली परिसरात चेन स्नॅचिंग केली असून, सराइतांचा मागमूस काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.

मंदाकिनी श्रीराम कोकाटे (वय ७०, रा. श्रीजी हाइट्स, तपोवन रोड, काठे गल्ली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, श्रीजी हाइट्स या बहुमजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कोकाटे राहतात. पाय मोकळे करण्यासाठी गुरुवारी सकाळी त्या इमारतीच्या आवारात आल्या होत्या. साडेदहाच्या सुमारास घरी परतण्यासाठी त्या सोसायटीच्या आवारातील लिफ्टजवळ थांबल्या. या वेळी तिथे दुचाकीवर आलेल्या चोरट्यांपैकी एक जण उतरून कोकाटे यांच्याजवळ आला. काही कळण्याच्या आतच त्यांच्या गळ्यातील पोत खेचून चोरटा रस्त्यावर आला. तिथे दुचाकीवर थांबलेल्या साथीदारासह त्याने पोबारा केला. मुळे तपास करीत आहेत. चेन स्नॅचिंगची आणखी एक घटना इंदिरानगर परिसरातील स्वामी समर्थ केंद्राजवळ घडली. कमलाबाई प्रभाकर वाघ (वय ६५, रा. आत्रीपूजन अपार्ट., परबनगर) यांनी या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. परिसरातील स्वामी समर्थ केंद्र परिसरात गुरुवारी सकाळी फुले घेण्यासाठी वाघ गेल्या होत्या. फुले घेऊन अनुष्का सोसायटीसमोरून त्या घराकडे पायी परतत असताना चोरट्यांनी संधी साधली. मागून आलेल्या दुचाकीस्वारांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील ३५ ग्रॅम वजनाची आणि ८५ हजारांची पोत ओरबाडून धूम ठोकली.

दुकान फोडणारा संशयित अटकेत

गूळ बाजारात बंद दुकान फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी अनिल यादव (वय २८, रा. समतानगर, टाकळी रोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयिताने गूळ बाजारातील विजय अव्हेन्यू सोसायटीतील गाळ्यामध्ये हरीष पवार यांच्या मालकीचे दुकान बुधवारी मध्यरात्री फोडण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना सीसीटीव्ही फूटेजमध्ये कैद झाली. त्यानुसार पोलिसांनी तपास करीत संशयितास अटक केली. हवालदार सोनार तपास करीत आहेत.

घंटा चोरणाऱ्या त्रिकुटाला अटक

म्हसोबा मंदिरातील लोखंडी रॉडला टांगलेल्या नऊ पितळी घंटा चोरणाऱ्या तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली. ही घटना जिल्हा परिषद परिसरात घडली असून, या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश सखाराम सूर्यवंशी, आकाश भीमराव सांगळे (दोघे रा. सिद्धार्थनगर, सामनगाव रोड) आणि नितीन भीमा आहेर (रा. पगारेमळा, उपनगर) अशी संशयितांची नावे आहेत. जिल्हा परिषदेसमोरील लक्ष्मी मोटारसायकल वर्क शॉप येथील म्हसोबा मंदिरात शिरून चोरट्यांनी प्रवेशद्वारावर लोखंडी रॉडला लावलेल्या नऊ पितळी धातूच्या घंटा करवतीच्या साह्याने कापून लंपास केल्या होत्या. या प्रकरणी शरद मंडाले यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी लागलीच तपास करीत संशयितांना अटक केली. संशयितांकडून दुचाकी आणि घंटा असा सुमारे ६६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गोसावी तपास करीत आहेत.

ट्रॅव्हल्स बसमधून बॅटऱ्यांची चोरी

पार्क केलेल्या ट्रॅव्हल्स बसमधून चोरट्यांनी आठ बॅटऱ्या लंपास केल्या. ही घटना महामार्गावरील अमृतधाम परिसरात घडली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीपसिंग बिरबलसिंग बेनिवाल यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस बुधवारी रात्री कंपनीच्या अमृतधाम परिसरातील कुणाल हॉटेलशेजारील जागेत पार्क करण्यात आल्या होत्या. चोरट्यांनी या बसमधून ८० हजार रुपयांच्या बॅटऱ्या लंपास केल्या. उपनिरीक्षक जगदाळे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ते’ बांधकाम पुन्हा बांधून द्या!

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

नाशिकमधील गंगापूर रोडवरील 'ग्रीनफिल्ड लॉन्स' या लँडस्केप व मंगल कार्यालयाच्या वादग्रस्त बांधकामाविषयी 'जैसे थे'चे स्पष्ट आदेश असूनही आणि या आदेशाची माहिती मिळूनही नाशिक महापालिका अधिकाऱ्यांनी केलेली तोडकामाची कारवाई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना चांगलीच भोवली आहे. न्यायालयाने जोरदार दणका दिल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांना न्यायालयाची माफी तर मागावी लागलीच; शिवाय तोडलेले बांधकाम दीड महिन्यात पालिकेच्याच खर्चाने बांधून देण्याची हमीही देणे भाग पडले.

'ग्रीनफिल्ड लॉन्स'चे अभिजीत पाटील यांनी अॅड. संदीप शिंदे यांच्यामार्फत पालिकेच्या कारवाईविरोधात सुटीकालीन न्यायालयात तातडीने रिट याचिका दाखल केली. 'जे बेकायदा बांधकाम आहे ते आम्ही स्वत:हूनच काढलेले असून, जे नियमित होऊ शकते त्याविषयी चार महिन्यांपूर्वीच अर्ज केलेला आहे. त्यावरील निर्णय प्रलंबित असतानाही पालिकेकडून मनमानी पद्धतीने कारवाई केली जात आहे', असे म्हणणे पाटील यांच्यातर्फे न्या. शाहरुख काथावाला व न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर २१ मे रोजीच्या प्राथमिक सुनावणीत मांडण्यात आले. त्यानंतर खंडपीठाने दोन दिवसांनी सुनावणी ठेवत तोपर्यंत संबंधित सर्व्हे नंबर '४/२बी-१ए ते ४/२बी-१जी'वरील बांधकामाविषयी 'जैसे थे' परिस्थिती ठेवण्याचे आदेश पालिकेला दिले होते. मात्र, 'या आदेशाची स्पष्ट माहिती अॅड. शिंदे यांनी पालिकेचे अधिकारी व आयुक्तांना दुपारी ३ वाजेपर्यंत लेखी स्वरुपात दिली असताना आणि पालिकेच्या वकिलांनीही यासंदर्भातील माहिती प्रशासनाला दिली असताना २१ मे रोजीच संध्याकाळी ५ वाजता पालिकेचे कार्यकारी अभियंता रोहिदास बहिराम, नगररचना अतिरिक्त संचालक आकाश बागुल व विभागीय अधिकारी संगीता गायकवाड यांच्या पथकाने ग्रीनफिल्ड लॉन्सची मोठी संरक्षक भिंत, ओटा व अन्य लहान बांधकामांवर बुलडोझर चालवला. तसेच ग्रीनस्केपचीही नासधूस केली', असे अॅड. शिंदे यांनी २३ मे रोजीच्या सुनावणीत निदर्शनास आणले. त्यामुळे खंडपीठाने त्याची अत्यंत गंभीर दखल घेत आयुक्त व रोहिदास बहिराम यांना शुक्रवारी सकाळी ११ वाजता व्यक्तिश: न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. तरीही आयुक्त मुंढे हजर राहिले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त करून मुंढेंविरोधात 'न्यायालय अवमानाची कारवाई का करू नये', अशी 'कारणे दाखवा' नोटीस काढतानाच 'दुपारी ३ वाजता हजर व्हा, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल', असा गर्भित इशाराही दिला. ही नामुष्की ओढवल्यानंतर मुंढे यांनी तातडीने मुंबईत धाव घेत दुपारी ३ वाजता न्यायालयात हजेरी लावली.

मुंढेंची सारवासारव

'आपल्याला दुपारी ४ वाजता न्यायालयाच्या आदेशाची माहिती मिळाली', अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न मुंढे यांनी केला. तर 'गोदावरी नदीपात्राजवळच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचा आदेश न्यायालयानेच एका जनहित याचिकेत दिलेला होता, त्याअनुषंगाने कारवाई सुरू होती. शिवाय, बेकायदा बांधकाम लॉन्समालकांनीच स्वत:हून तोडले होते', असे सांगण्याचा प्रयत्न पालिकेतर्फे अॅड. वैभव पाटणकर यांनी केला.

न्यायालयाने सुनावले

- 'आम्ही आताच्या क्षणाला बांधकाम बेकायदा होते की नाही या विषयाचा विचारच करत नसून, न्यायालयाच्या आदेशाचे पालन झाले नाही एवढ्याच मुद्याचा विचार करीत आहोत. न्यायिक शिस्तही प्रत्येकाने पाळलीच पाहिजे. आयुक्तांनी आदेशाचे पालन केलेले नाही, हे स्पष्ट आहे. त्यावरून आम्ही त्यांच्याविरुद्ध फौजदारी न्यायालय अवमानाची कारवाई करू शकतो. त्यांनी कोठडीत जावे, अशी तुमची इच्छा आहे का? नसेल तर इतर मुद्यांबाबत युक्तिवाद करूच नका', अशा शब्दांत खंडपीठाने अॅड. पाटणकर यांना सुनावले. त्याचवेळी पालिका कार्यालयात व अधिकाऱ्यांना दुपारी ३ वाजता आदेशाविषयीची लेखी माहिती मिळाल्याचे कागदपत्रांवरूनच स्पष्ट होत असून, त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता अधिकाऱ्यांनी कारवाई कशी काय केली?', असा प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला.

दीड महिन्यात पुन्हा उभारणी

अखेरीस आदेशाची माहिती मिळूनही तोडकामाची कारवाई झाल्याची बाब मुंढे यांना मान्य करावी लागली. त्यामुळे 'झालेल्या कारवाईबाबत माफी मागतो. यापुढे न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाईल', असे मुंढे यांनी स्पष्ट केले. तेव्हा 'केवळ माफी मागून चालणार नाही, तुम्हाला तोडलेले बांधकाम पुन्हा पालिकेच्या खर्चाने बांधून द्यावे लागेल', असे खंडपीठाने सुनावले. त्यामुळे 'आम्ही तोडलेले बांधकाम पुन्हा बांधून देण्याची कार्यवाही त्वरित सुरू करू आणि दीड महिन्यात ते काम पूर्ण करू', अशी हमी मुंढे यांनी दिली. अखेरीस खंडपीठाने मुंढे यांची माफी व हमी नोंदीवर घेऊन त्यांना संभाव्य कारवाईतून मुक्त केले आणि याविषयीची पुढील सुनावणी चार आठवड्यांनी ठेवली. त्याचवेळी बांधकामाविषयीची प्रगती न्यायालयात कळवत रहावी, असेही निर्देश खंडपीठाने पालिकेला दिले.

कोट

''न्यायालयाचा आदेश असतानाही आयुक्त न्यायालयात हजर राहिले नाही. अखेर न्यायालय अवमानाच्या कारवाईचा इशारा दिल्यानंतर ते हजर झाले. आयुक्तांची ही वर्तणूक योग्य नाही. भविष्यातही अशी वर्तणूक राहिली तर न्यायालय त्याकडे गांभीर्याने बघेल.''

-मुंबई उच्च न्यायालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इच्छा कमी केल्या की समस्या संपतील

0
0

ब्रह्मकुमार सूरजभाई यांचे प्रतिपादन

वसंत व्याख्यानमाला

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आज अपेक्षांचा भडिमार प्रचंड झाल्याने जीवन जगणे मुश्किल झाले आहे. अपेक्षा कमी केल्यास जीवन जगणे सुसह्य होऊ शकते. आपण आनंदी राहिले तर जगणे खूप सोपे आहे, परंतु इच्छांनी आपल्याला व्यापून टाकलेले आहे. इच्छा कमी केल्या की समस्या संपतील, असे प्रतिपादन ब्रह्मकुमार सूरजभाई यांनी केले.

गोदाघाटावर आयोजित व्याख्यानमालेत शुक्रवारी पंचविसावे पुष्प 'जीवन विषयक शंका समाधान' या विषयावर ब्रह्मकुमार सूरजाभाई यांनी गुंफले. हे व्याख्यान माणेकलाल भटेवरा यांच्या स्मृतीला अर्पण करण्यात आले होते. यशवंतराव देवमामलेदार पटांगणावर ही व्याख्यानमाला सुरू आहे. सूरजभाई पुढे म्हणाले, की सकाळची सुरुवात रम्यपणे हसत हसत केली तर पूर्ण दिवस चांगला जातो. परंतु, आजकाल हसण्यासाठीही लोकांना डॉक्टरकडे जावे लागते. नाशिकची लोकसंख्या २२ लाख आहे, तर त्यासाठी १ हजार डॉक्टर आहेत. प्रत्येक डॉक्टरकडे पेशंटसची गर्दी ही असणारच. त्यामुळे आपण डॉक्टरकडे न जाता कसे निरोगी राहू याचा विचार करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. मनुष्य हा नेहमी नकारात्मक विचार करतो, त्याने सकारात्मक विचार केला तर तो देवत्वाला पोहोचेल परंतु, त्याच्या मनात नेहमी नकारात्मक घंटा वाजत राहिली तर मात्र त्याचा परिणाम शरीरावरही होईल.

आजमितीला संवाद कमी होत आहे. संवादाअभावी तर ५६ लाख केसेस घटस्फोटाच्या आहेत. न्यायालयदेखील निकाल देता देता थकणार आहे, इतक्या या केसेस आहेत. आपल्याला अध्यात्माकडे जायचे आहे. अध्यात्म हे सर्व विकारांवर औषध आहे. आपल्याला सुखी जीवन जगायचे असल्यास अध्यात्माचा अंगीकार केला पाहिजे, असेही सूरजभाई म्हणाले.

---

आजचे व्याख्यान

वक्ते : राजेंद्र फातर्णेकर

विषय : अणुऊर्जेचा विध्वंसक महाभ्रम आणि जैतापूर प्रकल्प

स्थळ : यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रासेगाव येथे युवकाचा खून

0
0

दिंडोरी : रासेगाव येथे गाडीने कट मारला या किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी होत युवकाचा निर्घृण खून झाला. पोलिसांनी तीन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, एका संशयितास अटक केली आहे. तीन जण फरार झाले आहेत. उत्तम गुलाब लहांगे (वय २२) व सुनील संजय लहांगे (वय २२) हे फिरायला जात असताना संजय सुकदेव बेंडकुळे याने चारचाकी गाडीने कट मारला. या कारणावरून त्यांच्यात किरकोळ वाद झाला. संजय बेंडकुळे, संदीप बेंडकुळे, भावराव बेंडकुळे, तानाजी बोके यांनी वाद घालत सुनील लहांगेवर तलवारीने पोटावर वार केला. उपचारादरम्यान त्याचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैशांचा पाऊस; पोलिसांनी उधळली हौस

0
0

मांत्रिकासह पाच जणांना अटक

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषाला बळी पडणाऱ्यांची संख्या कमी नाही. निव्वळ अंधश्रद्धा असूनही लोक या जादूटोण्यावर विश्वास ठेवून स्वत:ची फसवणूक करून घेतात. पैशांची गरज होती म्हणून पालघर येथील महिलेने दोन मांत्रिकांवर विश्वास ठेवला. मात्र, त्यांचा हा पैसे पाडण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावत दोन मांत्रिकांसह पाच जणांना अटक केली. या दोन्ही मांत्रिकांविरोधात जादूटोणा विरोधी कायदा व भारतीय दंड विधान संहिता अन्वये पैशांचा पाऊस पाडणे, फसवणूक करणे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद रोड, नांदूर येथील देव मोटर्स येथे गुरुवारी (दि. २४) मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास तब्बल एक कोटी रुपयांचा पाऊस पाडण्यासाठी पूजा सुरू असल्याची माहिती आडगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी छापा टाकत ही कारवाई केली. पूजा सुरू असतानाच आडगावचे पोलिस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक काकासाहेब पाटील यांच्यासह पोलिस पथकाने देव मोटर्स येथे छापा टाकला. या छाप्यात प्रमोद सूर्यवंशी याच्यासह मांत्रिक संदीप सीताराम वाकडे (रा. भुजबळ फार्म, सप्तशृंगीचौक, सिडको), सुधीर दत्तू भोसले (रा. रोकडोबा वाडी, देवळाली गाव, नाशिकरोड), तुषार राजेंद्र चौधरी (साईबाबानगर, सिडको), चंद्रकांत राघोजी जेजुरकर (रा. पाथरवट लेन, शिवाजी चौक, पंचवटी) यांना अटक करीत गुन्हा दाखल केला.

एक कोटी रुपयांचा पडणार होता पाऊस...

नालासोपारा येथील एका महिलेने लोकांकडून १० लाख रुपये घेतले आहेत. ते देण्यासाठी तिला पैशांची गरज होती. तिने नाशिक येथील परिचित प्रमोद बापू सूर्यवंशी (रा. जागृतीनगर, नाशिकरोड) याच्याकडे आठ दिवसांपूर्वी चर्चा केली होती. तेव्हा सूर्यवंशीने आपल्या ओळखीतले मांत्रिक असून, ते मंत्राच्या शक्तीने पैशांचा पाऊस पाडतात. मात्र, त्या पूजेसाठी देवी म्हणून एका बालिकेला बसवावे लागते. तसेच, पूजापाठासाठी मांत्रिकास व त्याच्या सहकाऱ्यांना ६० हजार रुपये द्यावे लागतील. हे सर्व केल्यानंतर मांत्रिक एक करोड रुपयांचा पैशांचा पाऊस पाडतील, असे सूर्यवंशी याने त्या महिलेला सांगितले होते.

मांत्रिकाच्या सांगण्यावरून मांडली पूजा

पैशांची गरज असलेल्या या महिलेने सूयंवशीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. ती एका कुमारीकेसह नाशिकरोडला आली. तिने सूर्यवंशीची भेट घेतली. त्याला तीस हजार रुपये दिले. देव मोटर्स औरंगाबाद येथे सुधीर भोसले, चंद्रकांत जेजुरकर, तुषार चौधरी, मांत्रिक संदीप वाकडे व निखिल यांची त्या महिलेला ओळख करून दिली. त्यांनी पूजेसाठी लागणारे साहित्य आणले. रात्री अकराच्या सुमारास या लोकांनी त्या महिलेला आणि कुमारिकेला देव मोटर्स येथील ऑफिसमध्ये नेले. तेथे संदीप वाकडे व निखील हे दोघा मांत्रिकांच्या सांगण्याप्रमाणे पूजा मांडली. त्यांची पूजा सुरू झाल्याच्या थोड्यावेळातच आडगाव पोलिसांनी छापा टाकत पाचही जणांना अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नंदुरबार-पुणे’ शिवशाहीला सुरुवात

0
0

प्रवाशांच्या मागणीची पूर्तता

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्य परिवहन महामंडळाच्या वातानुकूलित आरामदायी ‘नंदुरबार-पुणे’ स्लीपरकोच शिवशाही शुक्रवार (दि. २५) पासून सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे आता नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना सोयीचे होणार आहे. प्रवाशांनी या बसचा लाभ घ्यावा, असे आवाहन नंदुरबार आगारप्रमुख नीलेश गावीत यांनी केले आहे.

धुळे जिल्ह्यानंतर आता नंदुरबार जिल्ह्यातूनही शिवशाही सुरू करण्यात यावी, ही मागणी जोर धरू लागली होती. त्या मागणीला मान्य करीत राज्य परिवहन महामंडळाकडून ‘नंदुरबार-पुणे’ या धुळे, नाशिकमार्गे जाणाऱ्या शिवशाहीची सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना, नोकरदार वर्गास मोठा फायदा होणार आहे. नंदुरबार बसस्थानकातून सुटणारी ‘नंदुरबार-पुणे’ शिवशाही दररोज रात्री ८ वाजता सुटणार असून, पुण्याहून येणारी ‘पुणे-नंदुरबार’ शिवशाही पुणे बसस्थानकावरून रात्री साडेनऊ वाजता सोडली जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही बस सुरू करण्यात आली असून, तिचे एकीकडून भाडे ९७२ रुपये आकारण्यात येणार आहे, अशी माहितीही गावीत यांनी दिली.


या अगोदर शहादा येथून निघणारी शिवशाही दोंडाईचा, धुळेमार्गे जात होती. त्यामुळे नंदुरबार-पुणे स्लीपर कोच शिवशाही सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. त्यानुसार एसटी महामंडळाकडून शिवशाही बस सुरू केली आहे. शिवशाहीचा जाण्याचा मार्ग नंदुरबार, साक्री, सटाणा, नाशिक, संगमनेर व पुणे असा राहील. तर परत येताना पुणे, संगमनेर, नाशिक, सटाणा, साक्री व नंदुरबार असा मार्ग राहणार आहे. यामुळे निजामपूर-जैताण्यासह माळमाथा परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.

शिवशाहीची वैशिष्ट्ये...
स्लीपरकोच आरामदायी सिट
संपूर्ण वातानुकूलित बस
मोबाईल चार्जर पोर्ट
जीपीएस ट्रॅकिंग सुविधा
अग्निशमन बंब
एअर सस्पेंशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांना पाणी दिलासा

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या १०३ प्रकल्पांत २०१७ च्या तुलनेत यंदाच्या मे महिन्याच्या अखेरीस पाच टक्के अधिक पाणीसाठा शिल्लक असल्याने पाणीटंचाईच्या सावटातून शहरवासीयांची मुक्तता झाली आहे. गेल्या वर्षी मेअखेरीस जिल्ह्यातील प्रकल्पांत अवघा १५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे शहरात पाणीकपात करण्याची वेळ आली होती. यंदा मात्र जिल्ह्यात २० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर विभागातील ३५३ प्रकल्पांत २०.७६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

जिल्ह्यातील मध्यम, लघु आणि मोठ्या प्रकल्पांत एकूण ६५ हजार ८१४ दलघफू इतकी पाणीसाठवण क्षमता आहे. त्यापैकी सध्या १३ हजार ४८९ दलघफू इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी हाच पाणीसाठा १० हजार १२० दलघफू इतका शिल्लक होता. परिणामी, पाणीकपात करण्याची वेळ आली होती. यंदा मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच टक्के अधिक पाणीसाठा शिल्लक असल्याने पाणीकपातीचे सावट दूर झाले आहे. जिल्ह्यातील सात मोठ्या प्रकल्पांपैकी गंगापूर, करंजवण, दारणा, मुकणे आणि कडवा या पाच प्रकल्पांत गेल्या वर्षीपेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे. चणकापुर आणि गिरणा या दोन मोठ्या प्रकल्पांत मात्र गेल्या वर्षीच्या पाणीसाठ्यापेक्षा यंदा कमी पाणीसाठा आहे. आळंदी, पुणेगाव, भावली, वालदेवी आणि नागासाक्या हे पाच प्रकल्प गेल्या वर्षी कोरडे पडले होते. यंदा मात्र या प्रकल्पांत काही प्रमाणात पाणी आहे, तर भोजापूर आणि माणिकपुंज हे दोन्ही प्रकल्प सलग दुसऱ्या वर्षीही कोरडेठाक पडलेले आहेत. मान्सूनचे आगमन वेळेवर झाल्यास पाणीटंचाईचे संकट ओढवणार नाही. मात्र, मान्सूनचे आगमन लांबल्यास पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील उपलब्ध पाणीसाठा (दलघफू)

प्रकल्प- संकल्पित पाणीसाठा- २०१८

पाणीसाठा-टक्केवारी

गंगापूर- ५६३०- ३९३७- ३४

कश्यपी-१८५२-१३०१-७०

गौतमी गोदावरी-१८६८-१८८-१०

आळंदी-९७०-१४०-१४

पालखेड-६५३-३६७-५६

करंजवण-५३७१-६२०-१२

वाघाड-२३०२-९६-०४

ओझरखेड-२१३०-३२५-१५

पुणेगाव-६२३-६९-११

तीसगाव-४५१-३७-८

दारणा-७१४९-३११४-४४

भावली-१४३४-४३-०३

मुकणे-७२३९-५४५-०८

वालदेवी-११३३-३४३-३०

कडवा-१६८८-२३८-१४

नांदूरमध्यमेश्वर-२५७-१९-०७

भोजापूर-३६१-००-००

चणकापूर-२४२७-५६७-२३

हरणबारी-११६६-७३-०६

केळझर-५७२-१०७-१९

नागासाक्या-३९७-००-०२

गिरणा-१८५००-२९२७-१६

पुनद- १३०६-४२६-३३

माणिकपुंज-३३५-००-००

एकूण-६५८१४-१३४८९-२०





विभागातील पाणीसाठा (दलघमी)

जिल्हा-प्रकल्पसंख्या- प्रकल्पीय उपयुक्त साठा-आजचा उपयुक्त साठा- टक्केवारी

नाशिक-१०३-१४९३.८४-४५१.८७-३०.२५

नगर-३९-१२१७.६३-२२५.३७-१८.५१

धुळे-५८-४८१.२६-८७.१७-१८.११

नंदुरबार-४१-१९४.३२-७२.०७-३७.०९

जळगाव-११२-१४२५.४५-२३३.८८-१६.४१

एकूण-३५३-४३३७.८०-९००.५५-२०.७६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘गुगल’ले लागनी ‘अहिराणी’नी गोडी

0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

खान्देशी लोकांची बोली भाषा असलेल्या 'अहिराणी'चा गुगल की-बोर्डमध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे अहिराणी लोकसाहित्याचा वारसा जतन करणे अधिक सोपे झाले आहे. खान्देशातील लोकांना आपल्या बोलीभाषेत इंटरनेटच्या माध्यमातून व्यक्त होण्याची संधी या की-बोर्डच्या माध्यामातून मिळाली आहे.

खान्देशातील नागरिकांचे शिक्षण, रोजगार, व्यापारानिमित्त शहरांकडे स्थलांतर वाढले आहे. मात्र, आपला प्रांत सोडला, की परप्रांतात पुन्हा आपली बोली भाषा, अहिराणी बोलायची संधी मिळत नाही. त्यामुळे अहिराणी भाषेचा वापर कमी होत आहे. गुगल की-बोर्डच्या नव्या फीचरच्या माध्यमातून अहिराणी भाषेचा जगभरात प्रचार-प्रसार होणार आहे. या की-बोर्डमध्ये अहिराणी भाषेतून लिहिणे आता शक्य झाले आहे. की-बोर्डमध्ये अहिराणी भाषेचा समावेश झाल्याने अहिराणी भाषिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

असा असेल की-बोर्ड

गुगल की-बोर्डवर देवनागरीतून अहिराणीसह मराठी, हिंदी टाइप करणे अशक्य नाही. मात्र, मराठी आणि हिंदी टाइप करताना गुगलचा की-बोर्ड एखाद्या शब्दाचे अनेक पर्याय देतो. त्या तुलनेत अहिराणी बोली भाषेसाठी यापूर्वी शब्दपर्याय दिले जात नव्हते. गुगलने यात बदल करीत अहिराणी शब्दांची भर घातल्याने बोली भाषेतून संवाद साधणे अहिराणी बोलणाऱ्या जगभरातील नागरिकांना सोयीचे झाले आहे.

या भाषांचाही नव्याने समावेश

बहामिनीझ, कनाउजी, फिजन, गगाउज, हल्बी, कराकल्पक, कनुरी, कोमी, मोक्षा, पानगासिआन, सॅन्गो, वेप्स, वोरो, वाडगी, झीउज या जगभरातल्या बोली भाषांचा गुगल की-बोर्डमध्ये नव्याने समावेश करण्यात आला आहे.

अहिराणी लोकसाहित्याचे प्रमाण वाढवण्यासाठी गुगल की-बोर्डचे हे नवे फिचर मोठी कामगिरी करेल. अहिराणी गुगल की-बोर्डच्या माध्यमातून स्मार्टफोनद्वारे अहिराणी भाषेतील संवाद वाढतील.

- रामदास वाघ, अहिराणी कवी

गुगल की-बोर्डने अहिराणी भाषेचा समावेश केलेले फीचर अतिशय सुंदर आहे. अहिराणीचा प्रसारासाठी यापूर्वी आम्ही नाशिकमध्ये सर्वांत मोठे अहिरणी साहित्य संमेलही भरविले होते. आता या की-बोर्डमुळे अहिराणी भाषेच्या माध्यमातून शुभेच्छा संदेशांची देवाणघेवाण करता येईल.

- निंबा पाटील, संस्थापक अध्यक्ष, खान्देश मराठा मंडळ

अनेक बोली भाषा लुप्त पावत असताना गुगलने अहिराणीला आपल्या की-बोर्डमध्ये स्थान देणे ही खूप आनंदाची गोष्ट आहे. अनेक वेळा सोशल मीडियावर चॅट करताना मराठीतून अहिराणी शब्द टाइप करावे लागायचे. यातून अहिराणी भाषेचा गोडवा राहत नसे.

- विशाल धोंडगे, युवक

खान्देशात बोलल्या जाणाऱ्या अहिराणी बोली भाषेचा गुगलने की-बोर्डमध्ये समावेश केल्याने अहिराणी भाषा आता खऱ्या अर्थाने ग्लोबल झाली आहे. की- बोर्डवरच आता अहिराणी शब्द वापराता येणार आहेत.

- दर्शना देवरे, युवती

मराठी आणि अहिराणी या दोन भाषांच्या लहेजात खूप फरक आहे. काहीअंशी अहिराणी राजस्थानी आणि गुजराती भाषेशी साधर्म्य साधते. देवनागरीतून अहिराणी शब्द टाइप करताना अनेकदा अडचणी येतात. गुगलने आता अहिराणी शब्द अपडेट केल्याने ही भाषा संवादाच्या दृष्टीने अधिक सोपी झाली आहे.

- म. सु. पगारे, संचालक, भाषासाहित्य आणि संशोधन मंडळ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य विभागाकडून दंडात्मक कारवाई

0
0

आरोग्य विभागाकडून दंडात्मक कारवाई

पंचवटी : पंचवटीतील आरोग्य विभागातर्फे अस्वच्छतेसंदर्भात दंडात्मक कारवाई करण्यात आली. कचरा वर्गीकरण न करणाऱ्या, प्लास्टिक कॅरिबॅगची विक्री करणाऱ्या, उघड्यावर शौचास बसणाऱ्या, कचरा पेटविणाऱ्या आणि सार्वजनिक जागेत कचरा टाकून अस्वच्छता करणाऱ्यांकडून २८ हजार १८० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, स्वच्छता निरीक्षक संजय दराडे आदींनी ही कारवाई केली.

--

वृक्षांवर कुऱ्हाड (फोटो)

जेलरोड : जेलरोड येथील लोखंडे मळ्यात गुरुवारी सकाळी रहिवाशाने अंगणातील झाडे तोडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. टाकळी रस्त्यावर दोन महिन्यांपूर्वी सव्वाशे झाडे तोडण्यात आल्यानंतर जागामालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोखंडे मळ्याच्या शेवटच्या टोकाला अशोका व आंब्याची हिरवीगार झाडे आहेत. या झाडांमुळे लोखंडे मळ्याला शोभा आली असताना त्यातील काही झाडांवर संबंधिताने कुऱ्हाड चालवली. नागरिकांनी त्याच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

७८ विद्यार्थ्यांना रोजगार (फोटो)

सातपूर : आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सातपूरच्या आयटीआयमध्ये रोजगार मेळावा भरविण्यात आला होता. यावेळी शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी मेळाव्यात सहभाग घेतला. सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतींतील लघु उद्योजकांनी आयटीआय उत्तीर्ण ७८ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी दिली. रोजगार मेळाव्यात आयटीआयचे प्राचार्य व शिक्षकही सहभागी झाले होते. दि. २८ मे रोजी पुण्यातील बड्या कंपन्यांनी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. त्यासाठी आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

--

(थोडक्यात)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळू घाटांचे लिलाव आचारसंहितेच्या कचाट्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषद निवडणुकीचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने जिल्ह्यात पुन्हा आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यातील सात वाळू घाटांच्या लिलावासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली असली तरी या लिलाव प्रक्रियेला आचारसंहितेमुळे ब्रेक लागला आहे. दोन महिन्यांसाठी लिलाव घेऊनही त्यास प्रतिसाद मिळतो की नाही याबाबत साशंकता असून, संबंधित घाटांचे लिलाव सप्टेंबरनंतरच होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील सात वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया गौण खनिज विभागाने गत महिन्यातच सुरू केली आहे. पर्यावरणाशी संबंधित निकष पूर्ण करणाऱ्या घाटांच्या लिलावाला परवानगीसाठी कार्यवाही सुरू होती. दुसऱ्या समितीसमोर हे प्रस्ताव ठेवण्यात आले असून, संबंधित समितीने हिरवा कंदील दाखविताच या घाटांचे लिलाव करण्याची प्रशासनाची तयारी होती. मात्र, विधान परिषद निवडणुकीच्या कचाट्यात अडकलेली ही लिलाव प्रक्रिया आता शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये अडकली आहे. गौण खनिज विभागाकडून दरवर्षी १ ऑक्टोबर ते ३० सप्टेंबर या कालावधीसाठी वाळूचे लिलाव घेतले जातात. मात्र, गतवर्षभर लिलाव प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही. त्यातच पर्यावरण संवर्धनाचे निकष पाळले जात नाहीत म्हणून उच्च न्यायालयाने लिलाव प्रक्रियेवरच बंदी घातली. परिणामी गत डिसेंबरपासून लिलाव बंद होते. मार्चअखेरीस लिलावाची प्रशासनाने तयारी केली. परंतु, आचारसंहितेमुळे अडसर निर्माण झाला. आता पुन्हा शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता ३० जूनपर्यंत लागू असणार आहे. वाळू लिलावाच्या ठेक्याला ग्रामसभेचीही मान्यता लागते. ही मान्यता आचारसंहितेच्या कचाट्यात अडकल्याने लिलाव प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसव्या कर्जमाफीमुळे बँका, सोसायटी अडचणीत

0
0

दिलीप बनकर यांची स्पष्टोक्ती

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

सरकारचे चुकीचे कृषीधोरण आणि फसवी कर्जमाफीमुळे जिल्हा बँकेसह विविध कार्यकारी सोसायटीसुद्धा आर्थिक अडचणीत आल्या आहेत. दरवर्षी दोन हजार कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करणाऱ्या जिल्हा बँकेला सरकारने यापुढे केवळ पाचशे कोटी रुपये पीककर्ज वाटपाची मर्यादा घालून दिल्यामुळे पुढील काळात जिल्हा बँक व सोसायटींमार्फत शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करणे अशक्य होईल, अशी भीती माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक दिलीप बनकर यांनी व्यक्त केली.

पिंपळगाव बसवंत विविध कार्यकारी सोसायटीच्या नूतन चेअरमन, व्हा. चेअरमन यांच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी बनकर बोलत होते. ज्येष्ठ नेते तानाजीराव बनकर, उपसरपंच संजय मोरे, बाळासाहेब बनकर, संपतराव विधाते, चंद्रकांत खोडे, सुशीला बनकर, संदीप बनकर उपस्थित होते.

बनकर म्हणाले, दोन वर्षपूर्वी आपण व भास्कर बनकर गटाने सोसायटी निवडणूक एकत्रित लढविली. सर्व जागा जिकूंन सत्ता चालविण्याचे सूत्र व धोरण निश्चित केले. मात्र नंतरच्या काळात जि. प. निवडणूक व ग्रामपंचायत निवडणुकीत दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात लढले. असे असले तरी राजकारणात शब्द पाळला नाही, असा संदेश जाऊ नये म्हणून आपण कार्यकर्ते, हितचिंतकांची नाराजी पत्करून सोसायटीच्या सत्तेचे धोरण व सूत्र पाळले. ठरल्याप्रमाणे चेअरमन निवड विनाडावपेच पार पडली. संस्थेचे हित व आर्थिक अडचण लक्षात घेऊन संचालक मंडळाने कर्जवसुलीवर भर द्यावा.

तानाजीराव बनकर म्हणाले, दिलीप बनकरांनी ठरविले असते तर सोसायटीवर स्वतःच्या गटाची सत्ता स्थापन करून मर्जीतला संचालक चेअरमनपदी विराजमान केला असता. मात्र राजकीय मतभेद विसरून दिलीप बनकरांनी दिलेला शब्द पाळला. त्यांचा आदर्श इतर नेत्यांनी घ्यावा. नूतन चेअरमन चंद्रकांत खोडे यांनी मनोगतातून आदर्श व पारदर्शक कामकाजाची परंपरा यापुढेही सोसायटीत सुरू राहील, अशी ग्वाही दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटक म्हणून गेले अन् जलमित्र बनले

0
0

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांमुळे उमरावणे टंचाईमुक्तीच्या वाटेवर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पर्यटनाची आवड सर्वांनाच असली तरी पर्यटन स्थळांबद्दलची आत्मियता प्रत्येकजण जपतोच असे नाही. किंबहूना तेथे अस्वच्छता करणे पर्यटन स्थळांचे विद्रूपीकरण करण्याचा उद्योग करणारेच अधिक असतात. नाशिकमधील काही तरुणांनी मात्र केवळ पर्यटन स्थळावरील निसर्गाविष्काराचा आनंद घेतला नाही, तर परिसरात जलसंधारणाचे काम हाती घेऊन सामाजिक बांधिलकीचा परिचयही दिला आहे. त्यामुळे शहापूर तालुक्यातील उमरावणे गावाची वाटचाल टंचाईमुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे.

नाशिक, अहमदनगर आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमारेषेवर शहापूर तालुक्यात उमरावणे हे गाव आहे. या गावालगतच्या परिसराला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. विहीगाव येथील अशोका धबधबा पहाण्यासाठी राज्यभरातील पर्यटक या भागात येत असतात. निसर्गाचा हा नितांत सुंदर अविष्कार नेत्रांमध्ये साठविण्यासाठी पावसाळ्यात येथे पर्यटकांची झुंबड उडते. नाशिकमधील गुरूगोविंद सिंग इंजिनीअरिंग कॉलेजचे काही विद्यार्थी गत पावसाळ्यात येथे धबधबा पाहण्यासाठी गेले होते. अन्य ठिकाणांहून आलेल्या पर्यटकांशी गप्पा मारताना त्यांना उमराणे गावातील पाणीटंचाईची माहिती मिळाली. ही बाब लक्षात ठेऊन या विद्यार्थ्यांनी पुन्हा उन्हाळ्यात या गावाला भेट दिली. गावातील दोन सार्वजनिक विहिरी आणि हापसा आटल्यामुळे चिल्यापिल्यांसह महिलांना पाण्यासाठी चार-पाच किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याचे विदारक चित्र त्यांना पहावयास मिळाले. जलसमृध्दी अभियान या नावाखाली त्यांनी या गावामध्ये श्रमदानातून जलसंधारणाची कामे करण्याचा निर्णय घेतला. १० मेपासून त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. प्रत्येक शनिवार, रविवारी २५ ते ३० विद्यार्थ्यांचा ग्रुप भल्यासकाळी येथे श्रमदानासाठी दाखल होतो. सायंकाळी उशिरापर्यंत येथे श्रमदान केले जाते. आतापर्यंत येथे या तरुणाईने तीन दगडी नालाबांद तयार केले असून, विहिरीतील गाळही काढण्यात आला आहे. पाच शोषखड्डे तयार करण्यात आले असून, आता ५० सीसीटीचे कामही हाती घेण्यात येणार आहे. गुरू गोविंदसिंग इंजिनीअरिंग कॉलेजच्या सिव्हील आणि मॅकेनिकल विभागाच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी या श्रमदानात स्वत:ला झोकून दिले असून, त्याचे फळ ग्रामस्थांना या पावसाळ्यानंतर मिळू शकणार आहे.

गावाची पाण्याची गरज

वर्षाकाठी ५४ लाख लिटर एवढी या गावाची पाण्याची गरज आहे. त्यांची सध्या १० लाख लिटर पाण्याची व्यवस्था होते. परंतु, जलसमृध्दी अभियानांतर्गत केल्या जात असलेल्या कामांमुळे येथे ६५ लाख लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण होणार आहे. याचाच अर्थ गरजेपेक्षाही २० लाख लिटर अधिक पाणीसाठा त्यांना उपलब्ध करून देण्याचा या विद्यार्थ्यांचा प्रयत्न आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत हे श्रमदान सुरूच ठेवण्यात येणार आहे. या गावाला टंचाईमुक्त करण्याचा निर्धार या जलमित्रांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images