Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

गुंतवणूकदारांना एमपीआयडीचा फटका

$
0
0

केबीसी प्रकरणात १५० कोटींची मालमत्ता पडून

--

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet : arvindjadhavMT

नाशिक : राज्यभर गाजलेल्या केबीसी घोटाळ्याच्या गुन्ह्यात वापरण्यात आलेला कायदाच गुंतवणूकदारांच्या मुळावर उठला आहे. महाराष्ट्र ठेवीदार हितरक्षण कायद्यातील (एमपीआयडी) तरतुदींचा योग्य वापर न झाल्यामुळे जवळपास दीडशे कोटींची मालमत्ता पडून आहे. यात जवळपास ५० कोटी रुपयांच्या रोकडचा समावेश असून, मैत्रेयप्रमाणे त्यावेळी कायद्याची अंमलबजावणी झाली असती, तर आज ८० टक्के गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळाले असते.

केबीसीमध्ये पैसे गुंतवले की ठराविक दिवसांनंतर तीनपट अधिक रक्कम देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. कंपनीचा मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाणच्या या स्कीमचा बोलबाला राज्यभरात झाला. काही महिन्यातच कंपनीने शेकडो कोटींची उलाढाल केली. दरम्यान, कंपनीविरोधात मार्च २०१४ आणि जुलै २०१४ असा दोन वेळा गुन्हा नोंदविण्यात आला. यातील पहिल्या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे होता. पोलिसांचा फास आवळल्यानंतर चव्हाण पत्नीसह सिंगापूरला परागंदा झाला. एमपीआयडी अॅक्टमधील तरतुदींनुसार गुंतवणूकदारांना पैसे परत होणे महत्त्वाचे आहे. मैत्रेय कंपनीबाबत पोलिसांनी या तरतुदींचा चांगला वापर केला. सर्व रोकड एस्क्रो खात्यात भरून पोलिसांनी कोर्टाच्या आदेशाने त्याचे वाटप केले. आता कंपनीच्या मालमत्तेचा लिलाव करून पैसे वाटप होणार आहे. केबीसीचे गुंतवणूकदार मात्र याबाबत दुर्दैवी ठरले. पोलिसांनी जप्त केलेला सर्व मुद्देमाल, पैसे, संपत्ती थेट कोर्टाकडे जमा केली. त्यामुळे ती सोडवून गुंतवणूकदारांना परत करणे कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून झाले. याबाबत बोलताना सूत्रांनी सांगितले, की या प्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले असून, कोर्टाच्या निर्णयानुसार पैसे वाटपाबाबत पुढील कार्यवाही होऊ शकते. सन १९९९ मध्ये आलेल्या एमपीआयडी कायद्याला विरोध होत होता. सन २०११ च्या सुमारास हायकोर्टाने त्यावर शिक्कामोर्तब केले. आता या कायद्याचा वापर होत असून, त्याचे खाचखळगे समोर येत आहेत. विविध कोर्ट आपले निर्णय देत असून, त्यातूनच काय करावे आणि काय करू नये, याबाबत पोलिस अवगत होत असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने स्पष्ट केले. कायद्याचा त्यावेळी योग्य वापर झाला नसल्याचा फटका शेकडो गुंतवणूकदारांना बसत आहे. केबीसीचा घोटाळा २०६ कोटींचा असल्याचे बोलले जाते. प्रत्यक्षात त्याची व्याप्ती १६० कोटींच्या पुढे नसून, तेवढी संपत्ती आजही पडून असल्याचा दावा संबंधितांनी केला आहे.

केबीसीची स्थिती

गुन्हा दाखल झाला - २०१४

एकूण आरोपी - ११

एकूण फिर्यादी अथवा साक्षिदार - ५९५२

बँक खात्यातील रोकड - २४.८६ कोटी

जप्त अचल मालमत्ता - १०० कोटी

जप्त रोख रक्कम - ४.६६ कोटी

जप्त सोन्याची किंमत - १९ कोटी

२०१५ मध्ये १९ मालमत्ता जप्त

--

...म्हणून हवे प्रशिक्षण

नवीन कायदा आला की त्याचा वापर तपासी अधिकाऱ्याच्या किंवा वरिष्ठांच्या सूचनांनुसार केला जातो. मात्र, संबंधितांना कायद्याची माहिती असतेच असे नाही. एस्क्रो खात्याबाबत तसेच त्यातील बारीकसारीक माहिती असल्याने तत्कालीन पोलिस आयुक्त डॉ. एस. जगन्नाथन यांनी त्याचा वापर मैत्रेय प्रकरणात खुबीने केला. मैत्रेयच्या दोनच वर्षाआगोदर मात्र ही काळजी घेण्यात आली नाही. नवीन कायद्याची अंमलबजावणी करताना असे प्रकार टाळण्यासाठी पोलिसांसह सरकारी वकिलांना सतत प्रशिक्षण मिळणे अत्यावश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अन् तयार व्हायचे एमडी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एमडी या ड्रग्जची तरुणांमध्ये लोकप्रियता असल्याने पोलिस तस्करांच्या सतत मागावर असतात. त्यामुळे पोलिसांना भणक लागू नये, यासाठी तस्कर अगदी बेमालूमपणे आपले काम करीत होते. सफैउल्लाकडून ऑर्डर आल्यानंतरच अरविंद कुमार एमडी तयार करण्याचे काम करीत होता.

नाशिकमधील रणजीत मोरे, पंकज दुंडे व नितीन माळोदे या तिघांना १६ मे रोजी क्राईम ब्रँचच्या पथकाने एमडी ड्रग्जसह अटक केली होती. या तिघांकडे चौकशी केली असता पोलिसांना मीरारोड भागातील नदीम सौरठीया या मध्यस्थाची माहिती मिळाली. देहविक्री करणाऱ्या महिलांना तसेच तिथे येणाऱ्या ग्राहकांना एमडी पुरविण्याचे काम नदीम करीत होता. नदीम आपला माल सफैउल्ला फारूख शेख (वय २३, रा. मीरारोड, मुंबई) श्रीमंत युवकाकडून घेत असल्याचे समोर येताच पोलिसांनी सफैउल्लाला देखील अटक केली. यातील नदीमकडून येणाऱ्या ऑर्डरनुसारच सफैउल्ला अरविंदकडे ड्रग्जची मागणी करीत होता. सफैउल्ला वगळता इतर आरोपींचा थेट संबंध अरविंदकुमारशी येत नव्हता. मागील तीन वर्षांपासून हा उद्योग सुरू असल्याचा कयास असून, गुन्ह्याचा सर्वच अंगाने तपास केला जाणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.

क्रूड पावडरची निर्मिती

ऑरगॅनिक केमिस्ट्रीचे ज्ञान असलेला अरविंदकुमार क्रूड पावडर तयार करून ठेवयाचा. ही पावडर तयार करण्यासाठी तो वेगवेगळे सात घटक एकत्र करायचा. एकत्र केलेल्या घटकांना ठराविक तापमानावर गरम केले की क्रूड पावडर तयार होते. एखादी ऑर्डर आली की क्रूड पावडरच्या मदतीने एमडी पावडर तयार व्हायची. एक किलो क्रूड पावडरमधून अर्धा किलो एमडी पावडर तयार होत असल्याची माहिती संशयिताने पोलिसांना दिली. नोकरीपेक्षा या व्यवसायात मोठा पैसा मिळत गेला. सफैउल्लाकडील ८० लाखांची कार जप्त करण्यात आली होती. अरविंदकुमारकडेही महागडी कार आढळून आली आहे. आपल्या शैक्षणिक ज्ञानाचा तसेच अनुभवाचा गैरवापर करणाऱ्या अरविंदकुमारसह त्याच्या जोडीदाराकडे पोलिस अधिक चौकशी करीत असून, त्यातून काही मोठ्या भानगडी समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली युनिटचे निरीक्षक आंनद वाघ, सहायक पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी, सचिन खैरणार, दीपक गिरमे, एएसआय चंद्रकांत पळशीकर, पोपट कारवाळ, जाकीर शेख, हवालदार रवींद्र बागुल, अनिल दिघोळे, बाळासाहेब दोंदे, संजय मुळक, वसंत पांडव, पोलिस नाईक आसिफ तांबोळी, दिलीप मोंढे, विशाल देवरे, स्वप्नील जुंद्रे, विशाल काठे, गणेश वडजे, राहुल पालखेडे, प्रवीण चव्हाण, संतोष कोरडे, शांतराम महाले, निलेश भोईर, रावजी मगर, मोहन देशमुख, प्रतिभा पोखरकर, चालक सूर्यवंशी, दिपक जठार यांच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेचा अभियंता बेपत्ता

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक अभियंता रवींद्र पाटील शनिवारी सकाळपासून अचानक बेपत्ता झाले आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांचा नाशिकरोड येथे आयोजित वॉक विथ कमिशनर या कार्यक्रमाला जातो, असे सांगून ते सकाळी सहाला घराबाहेर पडले. इमारतीच्या खाली आल्यानंतर मोबाइल, डायरी व चिठ्ठी गाडीत ठेवल्यानंतर ते बेपत्ता झाले आहेत. मला माझ्या नोकरीचा व कामाचा अतिशय त्रास होत असून, माझा शोध घेऊ नका, असे आवाहन त्यांनी मुले, पत्नी व आईला चिठ्ठीद्वारे केल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महापालिकेतील अतिकामाच्या ताणामुळे पाटील गेल्या तीन-चार दिवसांपासून तणावात होते, अशी माहिती सहकाऱ्यांनी दिली. शुक्रवारी ग्रीन फिल्ड लॉन्सप्रकरणी घडलेल्या माफीनामा नाट्यातील भाग पाटील यांच्या हद्दीतला असल्याने या वादाशीही संबंध असल्याची चर्चा अधिकाऱ्यांमध्ये पसरली आहे. गंगापूर पोलिसांत बेपत्ताची तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.

रवींद्र पाटील १९९९ पासून महापालिकेत कार्यरत असून, यापूर्वी पाणीपुरवठा, बांधकाम विभागात त्यांनी उपअभियंता म्हणून काम केले आहे. त्यानंतर ते सहाय्यक अभियंता म्हणून नगररचना विभागात कार्यरत होते. शुक्रवारी त्यांची पुन्हा पाणीपुरवठा विभागात बदली झाली होती. यापूर्वी नगररचना विभागात कार्यरत असताना त्यांच्याकडे टीपी दोन स्कीममधील आनंदवलीचा परिसर सोपविण्यात आला होता. पाटील गेल्या आठवड्यापासून ताणतणावात होते, अशी माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे. महापालिकेच्या एनएमसी ई कनेक्ट अॅपवरील तक्रारीही त्यांच्याकडे प्रलंबित होत्या. त्यामुळे अगोदरच ते अधिकाऱ्यांच्या लिस्टवर आले होते. त्यातच ग्रीन फिल्ड प्रकरणी घडलेल्या नाट्याचा भाग त्यांच्या कार्यक्षेत्रात होता. त्यामुळे आपल्यावरही कारवाई होईल, अशा दडणाखाली पाटील होते, अशी माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली. त्यामुळे पाटील सकाळी सहा वाजता आयुक्तांच्या नाशिकरोड येथील वॉक विथ कमिशनर कार्यक्रमाला जात असल्याचे सांगून घरातून निघाले. त्यांनी इमारतीच्या खाली आल्यानंतर आपला मोबाइल व डायरी गाडीतच ठेवली व निघून गेले. साडेआठ वाजता पेपर पाहण्यासाठी त्यांच्या पत्नी खाली आल्यावर त्यांना गाडीचा दरवाजा उघडा दिसला. त्यात मोबाइल व डायरी होती. परंतु, पाटील अन्य कोणासोबत गेले असतील म्हणून त्या मोबाइल व डायरी घरात घेऊन गेल्या. परंतु, एक वाजेपर्यंत पाटील घरी न परतल्याने त्यांनी चौकशी सुरू केली, तसेच गाडीची पाहणी केली. त्यात त्यांना एक चिठ्ठी आढळून आली. पाटील यांनी आपल्या हस्ताक्षरात लिहून ठेवलेली चिठ्ठी पाहून त्यांच्या पत्नीला धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शोधाशोध सुरू केला. दुपारी दोन वाजता गंगापूर पोलिसांत त्यांच्या मिसिंगची तक्रार नोंदविण्यात आली.

तीन पथके स्थापन

पोलिसांनी बेपत्ताची तक्रार आल्यानंतर त्यांच्या शोधासाठी तीन पथके स्थापन करून त्यांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी कुटुंबीयांसह त्यांच्या सहकाऱ्यांचीही चौकशी करीत त्यांच्या संदर्भातील माहिती जाणून घेण्याचे काम सुरू केले आहे. अनेक सहकाऱ्यांनी पाटील हे तणावात असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांनी पाटील यांच्या मोबाइलवरील संभाषणाचा डाटाही मागविला असून, गेल्या दहा दिवसांत त्यांचे कोणाकोणाशी फोनवर बोलणे झाले याची माहिती शोधण्याचे काम सुरू केले आहे.

चिठ्ठीतील मजकूर

प्रिय जय, भाग्यशा, शीतल व आई, मला माफ करा. माझा शोध कुठेही घेऊ नये. मला माझ्या नोकरीचा व कामाचा अतिशय ताण होत आहे. त्यामुळे मी माझे जीवन संपवत आहे. शीतल, मुलांची व आईची काळजी घे. आता तुझ्यावरच जबाबदारी आहे. मी कोणाचेही वाईट केलेले नाही. तरी माझ्या नशिबी असे आले आहे. तरी देवा मला माफ कर.

-रवींद्र पाटील

नाशिकरोडला दिसले

दरम्यान, पोलिसांनी पाटील यांचा शोध सुरू केला असून, महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांनी गंगापूररोड व नदीकाठचा परिसर शोधून काढला. पोलिसांचा शोध सुरू असतानाच पाटील सकाळी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर एका आर्किटेक्टला भेटल्याचे सांगितले जात आहे. संबंधित आर्किटेक्ट मुंबईला जाण्याच्या तयारीत असताना पाटील यांची भेट झाली, अशी माहिती त्यांनी कुटुंबीयांना दिली आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजही तपासण्याचे काम सुरू केले आहे.

अभियंत्यांची गर्दी

पाटील बेपत्ता झाल्याचे वृत्त समजताच नगररचना विभागातील सर्व अभियंत्यांनी गंगापूर पोलिसांत धाव घेतली. यावेळी महापालिकेतील सर्व अभियंते व उपभियंत्यांनी त्यांच्याबद्दल चौकशी केली. पाटील चुकीचे पाऊल उचलणार नाहीत असे सांगत त्यांच्या शोधासाठी धावाधाव सुरू केली. महापालिकेच्या बोटी घेऊन अभियंत्यांनी गोदावरी नदीचा परिसर पिंजून काढला. सर्व अभियंते उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते.

ग्रीन फिल्डशी संबंध?

पाटील यांच्या बेपत्ता होण्याचा घटनाक्रम ग्रीन फिल्डवरील कारवाईशीही असल्याची चर्चा महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये आहे. ग्रीन फिल्ड प्रकरणात महापालिकेच्या आयुक्तांनाच हायकोर्टात माफीनामा द्यावा लागला होता. हा विभाग पाटील यांच्याकडेच होता. त्यामुळे संभाव्य कारवाईचा धसकाही त्यांनी घेतला असावा, अशी चर्चा त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आहे. पाटील अत्यंत संवेदनशील होते. त्यामुळे आपल्यावर कारवाई होईल अशी भीतीही त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांकडे बोलून दाखविली होती, अशी चर्चा पोलिस स्थानकाच्या आवारात अभियंत्यांमध्ये सुरू होती.

--

या प्रकरणी बेपत्ता व्यक्तीच्या कुटुंबीयाने फिर्याद दिली असून, त्यानुसार मिसिंग दाखल करण्यात आली आहे. याबाबतच तपास सुरू असून, पाटील यांनी लिहिलेली नोट समोर आली आहे. बेपत्ता असलेले पाटील यांचा शोध लागल्यानंतर पुढील बाबी स्पष्ट होतील.

-डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रभाषेविषयीची आस्था वाढायला हवी

$
0
0

एचएएलचे महाप्रबंधक अनिल घारड यांची अपेक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असली तरी तिच्याविषयीची आस्था आणि प्रेम वाढायला हवे, अशी अपेक्षा एचएएलचे महाप्रबंधक अनिल घारड यांनी शनिवारी नाशिकमध्ये व्यक्त केली.

भारत सरकारच्या नगर राजभाषा कार्यान्वय समिती निलांबर कोलकाताच्या वतीने 'एक साँझ कविता कहानी की' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गंगापूर रोडवरील केबीटी महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी घारड बोलत होते. व्यासपीठावर एलआयसीचे वरिष्ठ मंडळ प्रबंधक तुलसीदास गडपायले, एसबीआयचे उपमहाप्रबंधक सुधीर भागवत, करन्सी नोट प्रेसचे महाप्रबंधक एस. पी. वर्मा, नीलांबर कोलकाता संस्थेचे अध्यक्ष डॉ. विमलेश त्रिपाठी, उपाध्यक्ष यतीश कुमार, कथालेखिका वंदना राग, कवी दासू वैद्य, हिंदीतील नामवंत कवी आशुतोष दुबे, रश्मि भारद्वाज आदी मान्यवर उपस्थित होते.

घारड म्हणाले, कुठल्यातरी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कार्यक्रमांमुळे राष्ट्रभाषेतील नियोजित कार्यक्रम अन्यत्र हलवावा लागतो, ही खेदजनक बाब आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्यांची संख्या देखील समाजात राष्ट्रभाषेबद्दल किती आस्था आहे, हे दाखवून देते. ही आस्था वाढावी असे वाटत असेल तर त्यासाठी प्रत्येकाला योगदान द्यावे लागेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यानंतर भरतनाट्यमद्वारे सरस्वती वंदना सादर करण्यात आली. आस्था मांदळे आणि शिवानी जोशी यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या संगीतबद्ध कविता सादर केल्या. या सुश्राव्य रचनांना रसिकांनी दाद दिली. त्यानंतर कोलकाता येथील साहित्यक व सांस्कृतिक संस्था नीलांबरच्या संकल्पनेतून कवितांवर आधारित विविध मोंताज, कोलाज तसेच माईम प्रकार देखील सादर करण्यात आले. यावेळी साहित्य आणि संस्कृतीचा मिलाप असलेल्या कार्यक्रमात साहित्यिकारांच्या रचनेवर दृकश्राव्य माध्यमातून सादरीकरण करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुजा, सोहम सीबीएसईत टॉपर

$
0
0

शहरातील शाळांचा बारावीचा निकाल १०० टक्के

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) चा इयत्ता बारावीचा निकाल शनिवारी लागला. या निकालात नाशिकमधील सर्व सीबीएसई शाळांचा निकाल सुमारे १०० टक्के लागला आहे. ९५.६ टक्के गुण मिळवून सिम्बायोसिस कॉलेजची विद्यार्थिनी अनुजा आहिरे आणि केम्ब्रिज विद्यालयातील सोहम गायकवाड या विद्यार्थ्यांनी संध्याकाळपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार शहरातील शाळांमधून अव्वल क्रमांक पटकाविला.

सीबीएसईचा राष्ट्रीय स्तरावरील निकाल ८३.१ टक्के लागला. सीबीएसईच्या तीन विभागांमध्ये त्रिवेंद्रम विभागातून ९७.३२ टक्क्यांचा विद्यार्थी पहिला आला. चेन्नई विभागातून ९३.८७ टक्क्यांचा विद्यार्थी, तर दिल्ली विभागातून ८९ टक्क्यांचा विद्यार्थी पहिल्या क्रमांकावर आहे.

एअर फोर्स स्टेशनच्या केंद्रीय विद्यालयातून यंदा ७५ विद्यार्थी बारावीसाठी प्रविष्ट झाले होते. पैकी ७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सायन्सच्या वर्गात ६२ पैकी ६१ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. कॉमर्स विद्याशाखेतून १३ पैकी १३ विद्यार्थ्यांनी यश मिळविल्याची माहिती प्राचार्य खेमेंद्र तोडवाल यांनी दिली.

नेहरू नगर केंद्रीय विद्यालयातूनही बारावीसाठी ६० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पैकी ५९ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळविले. या विद्यालयातून ऋतूजा मुजूमदार हिने ९२.६० टक्के मिळवत सायन्स विद्याशाखेत पहिला क्रमांक पटकाविला. दुसऱ्या क्रमांकावर ९० टक्क्यांसह सदाशिव कांबळे, तिसऱ्या क्रमांकावर ८५.४० टक्क्यांसह सुदर्शन झाडे या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. कॉमर्स विद्याशाखेतून स्नेहा भालेराव हिने ८७.४ टक्के मिळवित प्रथम, सोनाली जमनीक हिने ८१.२ टक्के मिळवित व्दितीय क्रमांक पटकाविला.

सिम्बॉयोसिस स्कूलनेही बारावीत १०० टक्के निकालाची नोंद केली. या शाळेतून ३१ विद्यार्थ्यांनी सायन्स विद्याशाखेतून परीक्षा दिली होती. या शाळेतून तीन विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांपेक्षा अधिक, सहा विद्यार्थ्यांनी ९० ते ९५ टक्क्यांदरम्यान, १७ विद्यार्थ्यांनी ८० ते ९० टक्क्यांदरम्यान गुण मिळविले आहेत. या शाळेतून अनुजा टिपरे हिने ९५.६ टक्के गुण मिळवित शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविला. व्दितीय क्रमांक मुकुल अचावाल याने पटकावित ९३.८ टक्के गुण मिळविले आणि सलोनी खन्ना हिने ९३.४ टक्क्यांसह तृतीय क्रमांक पटकाविला.

नाशिक केम्ब्रिज स्कूलचा निकालाही १०० टक्के लागला. या शाळेतून सोहम गायकवाड याने ९५.६ टक्के गुण मिळवित शाळेत पहिला क्रमांक पटकाविला. या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी किमान ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले असल्यची माहिती शाळेने दिली. श्रुती पवार हिने ९५.४ टक्के आणि प्रेक्षा फडके हिने ९४ टक्के मिळवित अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर स्थान पटकाविले.

जूनच्या पहिल्या आठवड्यात मिळणार मार्कशिट

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कॉलेजच्या वतीने विद्यार्थ्यांना गुणपत्रक देण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी सीबीएसईने बारावीच्या विद्यार्थ्यांना डिजिटल मार्कशीटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांना ही सुविधा digilocker.gov.in या लिंकवरून मिळवता येऊ शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल दराचे गौडबंगाल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

पेट्रोल आणि डिझेलच्या दररोज वाढणाऱ्या व गगनला भिडत चाललेल्या दरांवरून वादंग सुरू असतानाच शहरातील ठिकठिकाणच्या पेट्रोलपंपांवरील दरांतही तफावत असल्याचे आढळून येत आहे. शहरातल्या शहरात किमान पंचवीस ते तीस पैशांचा फरक पडत असल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण होत आहे.

पेट्रोल व डिझेलचे भाव दर दिवसेंदिवस वाढत असल्याने सामान्य नागरिकांचे आर्थिक नियेाजन ढासाळल्याचे दिसून येत आहे. त्याच पेट्रोल विक्री करणाऱ्या भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम यांसारख्या कंपन्यांबरोबरच अन्य काही कंपन्यांच्या पेट्रोलपंपांवरील दरात एक लिटरमागे साधारणतः पंचवीस ते तीस पैशांचा फरक दिसून येत आहे. एकाच शहरातील एकाच कंपनीच्या पंपांवरसुद्धा वेगवेगळे दर बघावयास मिळत असून, अशा पद्धतीने नागरिकांची फसवणूक तर होत नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पंपांवर असलेल्या दरांतील तफावतीमुळे नक्‍की कोणता दर खरा याबाबत सांशकता निर्माण होत आहे. अनेक पेट्रोलपंप कर्मचाऱ्यांकडून किती रुपयांचे किंवा किती लिटर पेट्रोल टाकतो हे सुरुवातीला सेट करणे आवश्यक असते. त्याबाबतचे सॉफ्टवेअरच बनविण्यात आले असून, रक्‍कम किंवा लिटर सेट न केल्यास पेट्रोलच देता येत नाही. पेट्रोल व डिझेलच्या होणाऱ्या दरवाढीचा कोणताही फायदा विक्रेत्यांना होत नसून, त्यांचे लिटरमागे कमिशन ठरलेले आहे. मात्र, या दरवाढीमुळे पेट्रोलपंपचालकांचेच भांडवल वाढत असल्याचे एका पेट्रोलपंपचालकाने सांगितले.

एकसारख्या दराची अपेक्षा

हिंदुस्थान पेट्रोलियमच्या क्लब एचपी नावाच्या पंपावर आणि याच कंपनीच्या दुसऱ्या पंपावरील दरात तफावत आढळून येते. भारत पेट्रोलियमने केलेल्या अॅटोमेशननुसार प्रत्येक पंपांवर वेगवेगळे दर बघावयास मिळत आहेत. भारत पेट्रोलियमच्या पंपावर येणारे पेट्रोल किंवा डिझेल किती अंतरावरून येते त्यावर याचा दर निश्चित होत असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्य डेपोपासून पेट्रोलपंपाचे अंतर किती यावर याचा दर निश्चित असून, कंपन्यांच्या काही पंपांवर दिल्या जाणाऱ्या सोयींमुळेसुद्धा दरात तफावत आढळून येत असल्याचेही आढळून आले. पेट्रोलपंपावरील दर तरी किमान एकसारखे करावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्‍त केली जात आहे.

पेट्रोलपंपावर असलेल्या सुविधांबरोबरच त्या ठिकाणी होणारी विक्री, पंपाचे लोकेशन या सर्व गोष्टींचा अभ्यास करून कंपनीकडून पेट्रोलपंपाचे दर ठरविले जात असतात. साधारणतः दहा ते पंधरा पैशांचा हा फरक आढळून येतो. एचपीच्या एचपी क्लब या पंपावर दर वेगळा, तर साध्या एचपी पंपावर दर वेगळा आढळून येऊ शकतो. मात्र, त्यात फार फरक नाही.

-अमोल जाधव, व्यावसायिक

भारत पेट्रोललियमच्या मुख्य डेपोपासून पेट्रोलपंपाचे अंतर किती यावर त्याचा वाहतूक खर्च निश्चित करून दर ठरविला जात असतो. त्याचबरोबर प्रत्येक पंपाची दरनिश्चिती कंपनीकडून होत असून, कंपनीकडूनच ॲटोमेशन पद्धतीने दर बदलेले जात असतात. स्पर्धा असल्यामुळे दरात फरक करावा लागतो. मात्र, त्याचे अधिकार कंपनीकडे असतात.

-नितीन धात्रक, व्यावसायिक

एकाच शहरात पेट्रोलच्या दरात अशा पद्धतीने तफावत असणे अत्यंत चुकीचे आहे. पंधरा ते पंचवीस पैशांपर्यंतचा लिटरमागील फरक असला, तरी त्याचा बोजा नागरिकांवरच पडत आहे. कंपन्यांनी एकच दरनिश्चिती करून काम केले पाहिजे. त्यामुळे काही जणांचा फायदा तर काहींचे नुकसान होत आहे. ही पद्धत एकदम चुकीची आहे.

-राहुल जाधव, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पादचारी पूल लवकरच सेवेत

$
0
0

रेल्वेचे विभागीय प्रबंधक यादव यांची घोषणा; मनमाड रेल्वेप्रवाशांना दिलासा

शुभ वार्ता

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

गेल्या अनेक महिन्यांपासून प्रवाशांच्या उत्सुकतेचा व प्रतिक्षेचा विषय बनलेला मनमाड रेल्वे स्थानकातील महत्वाकांक्षी पादचारी पूल येत्या तीन महिन्यांत पूर्ण होणार आहे. त्यानंतर लगेचच तो प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे, अशी घोषणा भुसावळ रेल्वेचे विभागीय प्रबंधक रामकुमार यादव यांनी मनमाड रेल्वे स्थानकात केली. त्यामुळे मनमाड रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांचे सध्या पुलाच्या कामामुळे होत असलेले हाल व मोठी गैरसोय थांबणार आहे.

रेल्वे प्रबंधक रामकुमार यादव हे नाशिक दौऱ्यावर आले असता शनिवारी सकाळी त्यांनी मनमाड रेल्वे स्थानकात विकासकामांची पाहणी केली. रेल्वेच्या नव्या पादचारी पुलाचे तसेच रेल्वे स्थानकातील नव्या लिफ्टचे काम, अतिक्रमण काढून त्याठिकाणी संरक्षण भिंत बांधण्याचे प्रगती पथावर असलेले कामांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. नव्या पादचारी पुलाचे काम तील महिन्यांत पूर्ण होणार आहे. त्यानंतर हा पूलही प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मनमाड स्थानकातील नवा पूल तीन महिन्यांत सुरू होणार ही प्रवासी वर्गासाठी आनंदाची बाब ठरणार आहे, या नव्या पुलाच्या कामासाठी रेल्वे स्थानकातील दीडशे वर्ष जुना ब्रिटिशकालीन पूल तोडण्यात आला. तसेच हा पूल तोडल्याने केवळ फलाटावरील मागच्या पुलाने स्थानकाबाहेर पडण्याशिवाय सध्या प्रवाशांना कोणताही पर्याय शिल्लक नाही. लवकरच सुरू होणारा नवा पूल हा विस्तृत व भक्कम आहे. नव्या पुलामुळे मागच्या बाजूला असलेल्या पुलावर सध्या पडत असलेला ताण कमी होण्याची चिन्हे आहेत. प्रबंधकांच्या भेटीमुळे रेल्वे अधिकारी, कर्मचारी आणि प्रवाशांमध्येही उत्साह पसरला असून, कामे तातडीने पूर्ण होतील असा अंदाज आहे.

पुलावरील ताण कमी होणार

फलाटावरील मागच्या बाजुला बसलेला पूलच प्रवाशांना आधार आहे. त्यामुळे सध्या या एकाच पुलावर खूप ताण पडत आहे. रेल्वेप्रवाशांना पुढील डब्यातून उतरल्यानंतर स्थानकाबाहेर पडण्यासाठी खूप मागे जावे लागते. त्यामुळे लहान मुलांसह, ज्येष्ठ नागरिकांचे तसेच ओझे असलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत होते. अनेकदा पुलावरून उतरताना गर्दीत पायात पाय अडकल्याने अनेक प्रवाशांना किरकोळ इजा झाली आहे. तसेच काहींमध्ये वाद तर रोजचेच झाले आहेत. आता नवा पूल लवकरच सेवेसाठी सुरू होणार असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय थांबणार आहे.

लिफ्ट पंधरा दिवसात सेवेत

मनमाड स्थानकात प्रवाशांसाठी लिफ्ट बसविण्याचे काम वेगात सुरू आहे. हे कामदेखील जवळपास पूर्ण झाले आहे. येत्या पंधरा दिवसात लिफ्ट सुरू होईल, असे विभागीय प्रबंधक रामकुमार यादव यांनी शनिवारी सांगितले. एकूणच मनमाड रेल्वे स्थानकातील विकासकामे पूर्णत्वाकडे वाटचाल करीत असून, प्रबंधकाच्या घोषणेने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणावर चाकूहल्ला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

व्यायामासाठी जाणाऱ्या तरुणावर दुचाकीवरून आलेल्या दोन संशयितांनी चाकूहल्ला करीत मानेवर वार केला. ही घटना शुक्रवारी सकाळी गंगापूररोडजवळील संत कबीरनगर येथे घडली असून, यात चंद्रमुनी मधुकर इंगोले (वय २०, रा. पाइपलाइनरोड, संत कबीरनगर) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

शुक्रवारी सकाळी मित्र सागर वाघमारे याच्यासह चंद्रमुनी घरातून नेहमीप्रमाणे व्यायाम करण्यासाठी निघाला होता. घरापासून काही अंतर दूर जाताच दोघे संशयित पाठीमागून पल्सरवरून आले. त्यातील पाठीमागे बसलेल्या संशयिताने दुचाकीवरून खाली उतरत चाकू काढून चंद्रमुनीच्या मानेजवळ वार केला. यात तो जखमी झाला. त्यानंतर दोघे संशयित पल्सरवरून पळून गेले. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिस हवालदार गोवर्धन तपास करीत आहेत.

--

अल्पवयीन युवतीचे अपहरण

दिंडोरीरोडवरील म्हसरूळ शिवारात असलेल्या म्हसोबावाडी परिसरातून दोघा संशयितांनी एका अल्पवयीन युवतीला आमिष दाखवून पळवून नेले आहे. या प्रकरणी अपहृत युवतीच्या आईच्या तक्रारीनुसार म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार १४ वर्षांची युवती शुक्रवारी (दि. २५) आपल्या आईसह घरात झोपलेली होती. याच वेळी संशयित किशोर व सोपान या दोघांनी मुलीला काही तरी आमिष दाखवून पळवून नेले. याबाबत पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

--

ग्राहकाचा मोबाइल चोरी

मेनरोडवरील दिल्ली दरवाजा येथे फळे खरेदी करणाऱ्या ग्राहकाचा मोबाईल अज्ञात चोरट्याने खिशातून लांबविल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. गिरीश मुरलीधर गर्गे (रा. पंचवटी, कपालेश्वर मंदिरामागे) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. गुरुवारी सकाळी मेनरोडवरील दिल्ली दरवाजा भागात गर्गे जांभळे खरेदी करीत असताना संशयिताने त्यांच्या शर्टाच्या खिशात हात घालून १८ हजार ५०० रुपयांचा मोबाइल हातोहात लांबविला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस नाईक जगदाळे करीत आहेत.

--

अंबड लिंकरोडवर आत्महत्या

अंबड लिंकरोडवरील म्हाडा परिसरात ४५ वर्षांच्या दिनकर फकिरा सोनवणे (रा. भोर टाऊनशिप, म्हाडा, अंबड लिंकरोड) यांनी शुक्रवारी (दि. २५) विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. सोनवणे यांनी घरी असताना अज्ञात कारणातून स्वत: विषारी औषध सेवन करून घेत आत्महत्या केली. त्यांना तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत अंबड पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस हवालदार गारले करीत आहेत.

--

अल्पवयीन युवकाची आत्महत्या

पंचवटीतील हिरावाडी परिसरात १५ वर्षांच्या युवकाने विषारी औषध सेवन करीत आत्महत्या केली. अमित पवन अग्रवाल (रा. रुनील रेसिडेन्सी, कमलनगर, हिरावाडी) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी (दि. २५) मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घरी असताना अमितने विषारी औषध सेवन केले होते. ही घटना लक्षात आल्यावर त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार मेतकर करीत आहेत.

--

क्राईम डायरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘जाहिरात चालिसा’चे नाशिककरांना आकर्षण

$
0
0

'जाहिरात चालिसा'चे नाशिककरांना आकर्षण

मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अतिशय वैविध्यपूर्ण बनवलेल्या जाहिराती, आकर्षक स्लोगन, रंगसंगती आणि मॉडेल्स यांचा सुरेख मेळ जाहिरात चालीसा प्रदर्शनात घालण्यात आला आहे. जाहिरात क्षेत्रात गेली ४० वर्षे कार्यरत असलेल्या चित्रकार सुनील धोपावकर यांच्या वैविध्यपूर्ण जाहिरातींचे प्रदर्शन कुसुमाग्रज स्मारकातील छंदोमयी आर्ट गॅलरीत सुरू झाले. या प्रदर्शनाचे उद्घाटन नगरसेवक शाहू खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अभिनेत्री मृणाल दुसानीस यांची प्रमुख उपस्थिती होती.

मानवाला तेजीचा मंत्र देणारी जाहिरात चालिसा ४० श्लोकांमध्ये पोथीच्या स्वरूपात लिहिण्यात आलेली असून, या प्रदर्शनामध्ये ही पॉकेट चालीसा मोफत उपलब्ध करून देण्यात आली. प्रेक्षकांनीही ही चालीसा घेऊन त्याचे पठण करीत जाहिरात प्रदर्शनाचा आनंद घेतला. या प्रदर्शनात निवडक ८०० जाहिराती मांडण्यात आल्या आहेत. यातून गेल्या पंधरा वर्षांत जाहिरातींमध्ये होत गेलेले बदल दाखवण्यात आले. कार्यक्रमात ज्येष्ठ छायाचित्रकार शिरीष हिंगणे, मेकअप आर्टिस्ट माणिक कानडे, गीतकार मिलिंद गांधी व छायाचित्रकार संजय कवडे यांच्या कलासाधनेचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. हे प्रदर्शन दि. २९ मेपर्यंत कुसुमाग्रज स्मारक येथे सुरू राहणार असून, रसिकांनी प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन सुनील धोपावकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युनियनच्या वादात कामगारास बेदम मारहाण

$
0
0

तीन कामगारांना बेड्या; डॉ. कराडांचे नाव यादीत

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

युनियन कोणती हवी या वादातून एकाच कंपनीतील काही कामगारांनी एका कामगाराला मणका मोडेपर्यंत बेदम मारहाण करीत त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, कोर्टाने त्यांना २८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे संशयित आरोपींच्या यादीत डॉ. डी. एल. कराड यांचेही नाव असून, पोलिस काय भूमिका घेतात याकडे औद्योगिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

डॉ. कराड, वैभव भाऊराव जगताप, दीपक भिला पाटील (वय ३३, रा. समर्थ अपार्टमेंट, महादेव मंदिराजवळ, श्रमिकनगर), अनिल भिकाजी समदूर (वय ३१, रा. शुभम पार्क, श्रमिकनगर) रोहित रामचंद्र भालेराव (वय २६, रा. दत्तनगर, श्रमिकनगर) अशी संशयितांची नावे असून, यांच्यासह आणखी सात ते आठ साथिदारदेखील होते. या प्रकरणी प्रवीण वामन मेतकर (वय ३९, रा. शिंदे मळा, कुबेर दर्शन अपार्टमेंट, अशोकनगर) या कामगाराने फिर्याद दिली आहे. मेतकर सीअर्स डाईस अॅण्ड मोल्ड्स प्रा. लि. या सातपूर स्थित कंपनीत कामाला असून, मागील काही महिन्यांपर्यंत येथे इंटरनल युनियन कार्यरत होती. या युनियनचे काम मेतकर पाहतात. काही महिन्यांपूर्वी वैभव जगताप, अनंत पुणेकर, अनिल समदूर तसेच कौशल कुमार सिंग यांनी सीआयटीयुची युनियन सुरू करण्याबाबत मेतकरकडे चौकशी केली. मात्र, व्यवस्थापन चांगले काम करीत असताना बाहेरील युनियनची गरज नाही, असे मेतकरने स्पष्ट केले. यानंतर संशयितांनी मिळून मेतकरला पैसे देण्याचे आमिष दाखवत धमकीही दिली. तरीही मेतकर आपल्या म्हणण्यावर कायम राहिल्याने २३ मे रोजी रात्री कामावरून घरी परतणाऱ्या मेतकरला कार्बन नाका येथे संशयित दीपक पाटीलने थांबवले. तिथे जगताप, पाटील, समदूर, वैभव जगताप आदींसह सात ते आठ जणांनी बेदम मारहाण केली. अंतर्गत युनियन संपविण्यासाठी मेतकरला संपवणे गरजेचे असल्याचे म्हणत त्यांनी मेतकरला जबर मारहाण केली. यात मेतकरच्या मणक्याला दुखापत झाली. यानंतर सर्व प्रकार कंपनीचे मालक अजय केवलरमाणी यांना सांगितला. त्यानुसार केवलरमाणी मेतकरला पोलिस स्टेशनला घेऊन गेले. दोन दिवसांच्या उपचारानंतर मेतकरने पोलिसांना फिर्याद दिली असून, यात डॉ. कराड यांच्या सांगण्यावरून आपल्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने संशयित दीपक पाटील, अनिल समदूर आणि रोहित भालेराव यांना अटक केली. कोर्टाने या सर्वांना २८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, युनियनच्या वादात डॉ. कराडांचे नाव आल्याने पोलिस काय कारवाई करणार याकडे औद्योगिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अरिय परिवाराचे केरुबुवा यांना अभिवादन व पुस्तक प्रकाशन 

$
0
0

'आंबेडकरांवरील भाषणे'

पुस्तकाचे प्रकाशन

देवळाली कॅम्प : नाशिक येथील समता कॉलनीमधील अरिय परिवाराच्या वतीने केरुबुवा गायकवाड यांना अभिवादन तर डॉ. प्रकाश इंगळे यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील भाषणे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.  कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी ना. मु. कांबळे तर प्रमुख अतिथी लोकशाहीर वसंतदादा मानवटकर, कवी भगवंत तायडे, मेजर आर. सी. भगत, डॉ. भास्कर पाटील आणि अरियचे संपादक संजय डोंगरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी राज्यभरातून उपस्थित असलेल्या कवींचे संमेलन पार पडले. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन अमोल शिरसाट यांनी केले तर  आभार डॉ. संजय पोहरे यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक धोंगडेंचे सदस्यत्वच पणाला!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

वॉक विथ कमिशनर उपक्रमात धोंगडे मळ्यातील व्यायामशाळा आणि खोले मळ्यातील गवळीवाडा येथील अभ्यासिकेतील अतिक्रमणाची तक्रार प्राप्त होताच आयुक्त मुंढे यांनी कार्यक्रमानंतर आपला मोर्चा थेट या दोन्ही ठिकाणी वळवला. अभ्यासिकेत राहणाऱ्या कुटुंबाने थेट नगरसेवक रमेश धोंगडे यांनीच ही जागा वास्तव्यास दिल्याची माहिती दिल्याने आयुक्तांनी त्यांचे सदस्यत्वच रद्दबातल करण्याबाबत कारवाईचे आदेश दिल्याने खळबळ उडाली.

व्यायामशाळा परिसरातील चित्र पाहून दोन तासांच्या आत या ठिकाणचे अतिक्रमण काढा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा सज्जड इशारा त्यांनी विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांना दिल्याने उपस्थित अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. त्यानंतर अवघ्या दोन तासांतच या व्यायामशाळेच्या भोवतालचे अतिक्रमण हटविण्यात आले. धोंगडे मळ्यातील व्यायामशाळा बंद असल्याची आणि या व्यायामशाळेच्या जागेत अतिक्रमण झालेले असल्याची तक्रार वॉक विथ कमिशनर उपक्रमादरम्यान दीपक ठाणगे या युवकाने केली होती. या तक्रारीची आयुक्तांनी तात्काळ दखल घेत या व्यायामशाळेला भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणची परिस्थिती बघून त्यांनी कपाळालाच हात लावला. या ठिकाणच्या शेडचे व गोठ्याचे अतिक्रमण दोन तासांत काढण्याचे आदेश त्यांनी विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांना दिले. अतिक्रमण काढल्यानंतर येथील फोटो पाठवा, असेही त्यांनी सांगितले. अतिक्रमण न काढल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिल्याने उपस्थित सर्वच अधिकाऱ्यांवर घामाघूम होण्याची वेळ आली होती. त्यानंतर येथील अतिक्रमण दोन तासांत भुईसपाट करण्यात आले.

इन कॅमेरा पंचनामा

धोंगडे मळ्यानंतर आयुक्तांचा ताफा थेट खोले मळ्यातील गवळीवाडा येथील अभ्यासिकेत येऊन धडकला. येथे तर चक्क बाबूराव मुटकुळे या व्यक्तीचे कुटुंबच वास्तव्याला असल्याचे आढळून आल्याने आयुक्त मुंढे संतप्त झाले. आपल्याला नगरसेवक रमेश धोंगडे यांनी ही जागा वास्तव्यासाठी दिल्याची माहिती या कुटुंबातील महिलांनी आयुक्तांनाच दिल्याने आयुक्तांनी थेट इन कॅमेरा पंचनामा करण्याचे आदेश दिले. अशा प्रकारे बेकायदेशीरपणे महापालिका मिळकतीवर अतिक्रमण करणाऱ्या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्दबातल करण्याच्या कारवाईचे आदेश दिले. या कुटुंबाला सोमवारी सायंकाळपर्यंत अभ्यासिका खाली करण्याची मुदत दिली. या अभ्यासिकेच्या जागेवर उभी करण्यात आलेली एमएच १५, सीएम ८१८७ या क्रमांकाची काळी-पिवळी व्हॅनही जप्त करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. आयुक्तांच्या या कारवाईमुळे नगरसेवक रमेश धोंगडे यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

स्वच्छता कर्मचाऱ्यांची दमछाक

महापालिका आयुक्त येणार म्हणून शनिवारी झाडून सारे कर्मचारी सकाळी सहा वाजेपासूनच चोखपणे ड्युटी बजावत होते. सिन्नर फाटा, चेहेडी पंपिंग, बिटको चौक, मुक्तिधाम चौक, अनुराधा चौक, महापालिका शाळा क्रमांक १२५ चे मैदान या भागातील सर्व रस्ते रात्रीच झाडून चकाचक करण्यात आले होते. आयुक्तांनी ऐनवेळी खोले मळा व धोंगडे मळ्यात मोर्चा वळविल्याने ऐनवेळी या भागात स्वच्छता करण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांची दमछाक झाली. खोले मळ्यातील अभ्यासिका आवारातील कचरा तर थेट आयुक्तांच्या उपस्थितीतच साफ करण्यात आल्याने उपस्थित नागरिकांतून आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

खोले मळ्यातील अभ्यासिकेत वास्तव्यास असलेले कुटुंब या अभ्यासिकेचे केअर टेकर म्हणून संबंधित ठेकेदारानेच ठेवलेले आहे. त्याच्याशी माझा काही संबंध नाही. उलट त्यांना उदरनिर्वासाठी कधी-कधी आर्थिक मदत करावी लागते. माझे नाव सांगितले ही त्या कुटुंबाची चूक आहे. महापालिकेने आजवर या मिळकतीची काळजी घेण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. असे असतानाही माझ्यावर प्रशासनाचा कारवाईचा विचार असेल, तर त्यास सामोरे जाण्याची आपली तयारी आहे.

-रमेश धोंगडे, नगरसेवक

--

वॉक विथ कमिशनर पान ३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजयाचा गुलालासहदराडे ‘मातोश्री’वर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मताधिक्याने दमदार विजय संपादन करीत गुलालाचे मानकरी ठरलेल्या नरेंद्र दराडे यांनी शुक्रवारी शिवसनेच्या ज्येष्ठ नेतेमंडळींसह मुंबई गाठली. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसेंसह त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विजयाची पताका फडकविल्यानंतर नवनिर्वाचित आमदार नरेंद्र दराडे यांनी शुक्रवारी सकाळी 'मातोश्री' गाठली. ठाकरे यांनी दराडे यांचा सत्कार केला. राज्यमंत्री दादा भुसे, नाशिकचे शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, आमदार राजाभाऊ वाजे, अनिल कदम, योगेश घोलप, यांच्यासह सुधाकर बडगुजर, माजी महापौर विनायक पांडे, दत्ता गायकवाड, अजय बोरस्ते, सचिन मराठे, महेश बिडवे, सुहास कांदे, जिल्हा बँकेचे संचालक किशोर दराडे, येवला पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार उपस्थित होते.

शिवसेनेच्या या लाटेत येत्या विधानसभा निवडणुकीत सेनेचा भगवा फडकणारच, या शब्दात यावेळी ठाकरे यांनी जिल्ह्यातील सेना पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला. यापुढील प्रत्येक निवडणुकीत इतरांचा विचार न करता शिवसेना स्वबळावर निवडणुका लढविणार असल्याचे सांगत, त्यादृष्टीने तयारीला लागण्याच्या सूचनाही ठाकरे यांनी केल्या.

'शिक्षक'साठी उमेदवार

विधानपरिषदेच्या विजयाबद्दल मुक्त कंठाने कौतुक करतानाच, यापुढील प्रत्येक निवडणुकीत सेनेचा स्वबळाचा नारा असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठासून सांगितले. उत्तर महाराष्ट्रातील शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत शिवसेना रिंगणात उतरणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. 'मातोश्री' वरील बंद खोलीत शिवसेनेच्या जिल्ह्यातील काही मोजक्या पदाधिकाऱ्यांसमवेत ठाकरे यांनी चर्चा केली. नरेंद्र दराडे यांचे लहान बंधू तथा जिल्हा बँकेचे संचालक किशोर दराडे हे शिक्षक मतदार संघाची आगामी निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची मोठी चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घर खरेदीकडे वाढतोय कल

$
0
0

लोगो - प्रॉपर्टी फेस्टिव्हल

प्रॉपर्टी फेस्टिव्हलच्या उद्घाटनाप्रसंगी कोतवाल यांचे प्रतिपादन

-

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बांधकाम क्षेत्रावरील अस्थिरतेचे मळभ दूर होत आहे. रेरा, नोटबंदी, जीएसटीचा रिअल इस्टेटवर काय परिणाम होणार याची धास्ती बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहकांनाही होती. अनिश्चितेचे हे वातावरण आता निवळले असून, नाशिकमध्ये घर खरेदीकडे आता कल वाढतो आहे. विकासवाटेवरील या शहरात घरांच्या किमती अजूनही सामान्य नागरिकांच्या आवाक्यात आहेत. त्यामुळे हा घर खरेदीसाठी सर्वोत्तम कालावधी असून, फेस्टिव्हलमधील ऑफर्सचा लाभ नाशिककरांनी घ्यावा, असे आवाहन क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल यांनी केले.

महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या वतीने नाशिककरांसाठी प्रॉपर्टी फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. जुना गंगापूर नाका येथील इंद्रप्रस्थ हॉलमध्ये या दोन दिवसीय फेस्टिव्हलला शनिवारी सुरुवात झाली असून, उद्घाटनाप्रसंगी कोतवाल बोलत होते. यावेळी क्रेडाईचे उपाध्यक्ष उमेश वानखेडे यांच्यासह बांधकाम व्यावसायिक व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोतवाल पुढे म्हणाले, की ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिकांसाठी हा फेस्टिव्हल नामी संधी आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून रिअल इस्टेट क्षेत्रात अस्थिरतेच वातावरण आहे, असे वारंवार बोलले जाते. परंतु, हे वातावरण बऱ्यापैकी निवळले आहे. महारेरा, जीएसटी, नोटबंदी आणि विकास आराखडा याचा रिअल इस्टेट क्षेत्रावर काय आणि कितपत परिणाम होणार याबाबतचे चित्र बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहकांनाही स्पष्ट नव्हते. परंतु, अलीकडच्या काळात ते स्पष्ट झाले असून, या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण स्पर्धा निर्माण झाली आहे. नाशिकमध्ये सद्यस्थितीत घरांचे दर आवाक्यात असल्याने पुणे, मुंबईचे लोकही येथे गुंतवणुकीला पसंती देत आहेत. नाशिकमध्ये वर्षानुवर्षे वास्तव्य असणाऱ्यांकडेही स्वत:चे घर नाही. अशा नागरिकांना घर खरेदीसाठी ही अत्यंत योग्य वेळ असून, फेस्टिव्हलमुळे चांगल्या ऑफर्स आणि पर्यायदेखील नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा लाभ उठवावा, असे आवाहन कोतवाल यांनी केले. हा फेस्टिव्हल बदलाची नांदी ठरेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

ऑफर्सची संधी

या फेस्टिव्हलमध्ये घराचे बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी बांधकाम व्यावसायिकांनी विशेष ऑफर्स देऊ केल्या आहेत. पहिल्याच दिवशी नागरिकांनी इंद्रप्रस्थ हॉल येथे या फेस्टिव्हलमधील ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी गर्दी केली. रविवारीदेखील सकाळी १०.३० ते रात्री ९ या वेळेत फेस्टिव्हल सुरू राहणार आहे. त्यासाठी सर्वांना मोफत प्रवेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैसे भरण्यास हवी सहा महिन्यांची मुदत

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

नाशिक : कंपाउंडिंगच्या जाचक अटींमुळे लॉन्स, मंगल कार्यालये मालकांना त्यांच्या आस्थापनांच्या नियमितीकरणासाठी २० ते ५० लाख रुपयांचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. लॉन्स हा शेतीपूरक व्यवसाय असल्याने कंपाऊंडिंगच्या दरामध्ये सवलत मिळावी, अशी त्यांची मुख्य मागणी असून, त्यासाठी नगरसेवकांनाही साकडे घालण्यात आले आहे. परंतु, त्यासाठीचा ठराव आचारसंहितेच्या कचाट्यात अडकला असून, हा विषय जूनअखेरपर्यंत लांबणीवर पडणार आहे. नियमितीकरणासाठी सहा महिन्यांचा कालावधी मिळावा, अशी अपेक्षा लॉन्स, तसेच मंगल कार्यालय मालकांनी व्यक्त केली आहे.

शहरातील तब्बल १६० लॉन्स, तसेच मंगल कार्यालयांवर महापालिकेने अनधिकृत असा ठपका ठेवला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील ऑक्टोबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी सरकारने दर निश्चित केले. हे दर वाढीव बांधकामासाठी असून, तेच दर नाशिक महापालिका लॉन्समालकांनाही लावत आहे. एकेका लॉन्सचा व्हॉल्यूम एक ते दीड एकरचा असल्याने लॉन्समालकाला किमान २० ते ५० लाखांपर्यंत आर्थिक भुर्दंड बसत आहे. विशेष म्हणजे पक्की बांधकामे कमी असून, त्यांनी डोम उभारले आहेत. त्यामुळे कंपाऊंडिंगच्या दरात सवलत मिळावी, अशी मागणी त्यांच्याकडून होऊ लागली आहे. त्यासाठी महापालिकेत ठराव होणे आवश्यक असून, त्याकरिता लॉन्स आणि मंगल कार्यालये मालकांच्या संघटनेने नगरसेवकांना साकडेही घातले आहे. परंतु, विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता उठली की असा ठराव केला जाणार होता. ही निवडणूक होते ना होते तोच शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता लागू झाल्याने ठरावाचा विषय जूनअखेरपर्यंत बारगळला आहे. त्यामुळे कारवाईची टांगती तलवार या व्यावसायिकांच्या डोक्यावर कायम आहे. लॉन्स नियमित करून द्यावेत यासाठी २००४ पासून पाठपुरावा सुरू असून, औरंगाबादरोडला लॉन्स झोन जाहीर करावे, अशी मागणीही प्रलंबित आहे.

--

...तर वर्षभर संप

महापालिकेला उत्पन्न मिळायला हवे याबाबत आमचे दुमत नाही. आम्हालाही बेकायदेशीरपणे व्यवसाय करायचा नाही. परंतु, बहुतांश लॉन्स शेतीला पूरक व्यवसाय म्हणून सुरू झाले आहेत. शेतीमध्ये काही मिळत नाही, म्हणून हा जोडधंदा शेतकऱ्यांनी सुरू केला. कर्ज घेऊन लॉन्स उभारले. या मालमत्ता पिवळ्या पट्ट्यात असल्याने तेथे टोलेजंग इमारती उभारणेही शक्य आहे. राज्यात कोठे नव्हे, ते नाशिकमध्ये नवरदेवाची मिरवणूक काढणे बंद केले आहे. मुंबई, ठाण्यात डीजे वाजविले जात असताना नाशिकमध्ये पूर्णत: डीजे बंद केले आहेत. चांगल्या सूचनांच्या अंमलबजावणीबाबत आम्ही आग्रही आहोत. लॉन्स किंवा मंगल कार्यालये हा आमचा व्यवसाय असला, तरी तो सेवा उद्योग आहे. जाचक अटी रद्द झाल्या नाहीत, तर वर्षभर लॉन्स व मंगल कार्यालये बंद ठेवण्याचा पवित्रा आम्हाला स्वीकारावा लागेल. नागरिकांची गैरसोय होऊ नये ही आमची भावना असून, महापालिका प्रशासनाने मध्यम मार्ग काढून दिलासा द्यावा, अशी अपेक्षा या व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

(समाप्त)

--

मटा मालिका

शुभमंगल 'सावधान' : भाग ४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोशल मीडियावरही ‘आयमा’चा प्रचार

$
0
0

सोशल मीडियावर 'आयम'चा प्रचार

नाशिक : अंबड इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) या संस्थेच्या दि. २९ मे रोजी होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकीच्या प्रचारात रंगत वाढली आहे. २६ पैकी २५ जागांची बिनविरोध निवड झाली असली, तरी अध्यक्षपदाच्या निवडीमुळे दोन्ही गटांतर्फे जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आल्यामुळे औद्योगिक संघटनेच्या या निवडणुकीत सदस्यांची उत्सुकता वाढली आहे. दोन्ही गटांतर्फे सोशल मीडियाच्या वापराबरोबरच वैयक्तिक गाठीभेटींवर भर देण्यात आला आहे. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी एकता पॅनलतर्फे अध्यक्षपदासाठी वरुण तलवार, तर विरोधी गटातर्फे तुषार चव्हाण यांच्यात लढत आहे.

उद्या प्रशिक्षण

नाशिक : मविप्रच्या कर्मवीर अॅड. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी कॉलेजच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाकडून प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. 'मॉडर्न टेक्निक्स इन सरफेस अॅण्ड सबसरफेस सर्वेइंग' या विषयावर हा प्रशिक्षण कार्यक्रम आधारित आहे. सदरचे प्रशिक्षण दि. २८ ते १ जूनदरम्यान सकाळी ९ ते ३.३० या वेळेत मविप्रच्या केबीटीच्या स्थापत्य विभागातील सेमिनार हॉलमध्ये होईल. या कार्यक्रमात मेरी, मुक्त विद्यापीठ, भूमिअभिलेख या विभागातील तज्ज्ञ प्राध्यापक मार्गदर्शन करणार आहेत.

पार्किंगमध्ये कचरा (फोटो)

पंचवटी : रामकुंड पार्किंगमध्ये कचऱ्या ढिगारा साचलेला आहे. होळकर पुलाच्या दक्षिणेच्या बाजूला असलेल्या पार्किंगच्या जागेत आजूबाजूच्या परिसरातील कचरा गोळा करून येथे टाकण्यात आलेला आहे. या ढिगाऱ्यात पत्रावळ्या, प्लास्टिक पिशव्या, शहाळे, कपडे आदी वस्तू आहेत. साचलेल्या कचऱ्याची परिसरात दुर्गंधी पसरत आहे. हा कचरा त्वरित उचलून घेण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

संशोधनास चालना -२

बेधडक प्रश्नांची सरबत्ती! ..3

कारवाईची टांगती तलवार-4

क्रिकेटची कसोटी -५

जिव्हाळ्याचा जिना -६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विनोदी कथा श्रोत्यांच्या पसंतीच्या’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

कथाकथन हा प्रकार वक्ता आणि श्रोते मिळून आनंद व्यक्त करणारा आहे. विनोदी श्रोत्यांना विनोदी कथा पसंत पडतात, असे प्रतिपादन कथाकार विवेक देशपांडे यांनी केले. ओम गुरुदेव हास्य सरिता, गुलमोहर नगर, म्हसरूळ यांच्या वतीने सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेत त्यांनी विनोदी व गंभीर कथांनी सातवे पुष्प गुंफले.

म्हसरूळ येथे झालेल्या व्याख्यानाप्रसंगी महापौर रंजना भानसी, नगरसेवक अरुण पवार, माजी नगरसेविका शालिनी पवार, केशवराव गायकवाड, हरिश्चंद्र वाळेकर, अरविंद भामरे आदी उपस्थित होते. विवेक देशपांडे यांनी माझा फर्स्ट क्लास प्रवास या कथेतून एक छोटे कुटुंब फर्स्ट क्लासने प्रवास करताना कशा प्रकारे आनंद लुटतात हे सांगितले. फॉरेन या कथेतून प्रत्येकाचे परदेशी जाण्याचे स्वप्न असते आणि अचानक कुटुंबाला परदेशी जाण्याचा योग आला तर घडणारे मजेशीर प्रसंगाचे कथन केले. मवाली ही एका बेरोजगार तरुणाची कथा असून आई आणि मुलांच्या प्रेमातील राग व लोभाचे प्रसंग कसे घडतात ते त्यांनी सांगितले. प्रेमा विषयीच्या कथेत एक प्रेमवीर मुलीच्या प्रेमात पडायचेच असे ठरवून खूप धडपड करतो. त्यातून घडणाऱ्या मजेदार प्रसंगीची खुमासदारपणे मांडणी केल्याने श्रोत्यांनी कथाकथनाचा आनंद घेतला.

राजेंद्र वानखेडे, मनीषा रौंदड, डॉ. भुषण भुरे, अरुणा कुलकर्णी या प्रायोजकांचा सत्कार करण्यात आला. रंजना वाळेकर यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्त मुंढेंविरोधात एल्गाराची तयारी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या नगररचना विभागातील सहाय्यक अभियंता रवींद्र पाटील कामाच्या अतिताणापायी जीवन संपवत असल्याची चिठ्ठी लिहून बेपत्ता झाल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. पाटील यांच्यासारखी घटना पुन्हा घडू नये यासाठी अधिकारी व कर्मचारी संघटना आता एकवटायला लागल्या असून, त्यांनी आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात एल्गार करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या तीन महिन्यांपासून आयुक्त तुकाराम मुंढेंनी शिस्त व गतिमान प्रशासनासाठी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू केल्याने अधिकारी व कर्मचारी धास्तावले असून, तणावाखाली आले आहेत. त्यामुळे एकीकडे कामाचा अतिताण आणि दुसरीकडे कारवाईच्या भीतीने अधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता आहे. त्यामुळे आता अधिकारी आक्रमक भूमिका घेण्याच्या पवित्र्यात आहेत.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी पदभार स्वीकारल्यापासून शिस्तीचा बडगा उगारला आहे. कामात अनियमितता करण्यासह नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यावर निलंबनासह बडतर्फीची कारवाई सुरू केली आहे. गेल्या तीन महिन्यांत जवळपास १७ अधिकारी व कर्मचारी निलंबित झाले असून, डझनभर कर्मचारी बडतर्फ झाले आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी दडणपणाखाली आहेत. महापालिकेत अगोदरच अधिकारी व कर्मचाऱ्यांची वानवा असताना शिल्लक कर्मचारी व अधिकाऱ्यांवरच कामाचा अतिताण आहे. एकेका अधिकारी व कर्मचाऱ्याकडे अधिकाधिक विभागांचा पदभार आहे. त्यातच आयुक्तांनी सुरू केलेल्या एनएमसी ई कनेक्ट या तक्रार निवारण प्रणालीत २४ तासांत तक्रारीची दखल घेणे बंधनकारक केल्याने अधिकारी व कर्मचारी दिवस-रात्र तणावात आहेत. तक्रारींचा वेळेत निपटारा झाला नाही, तर थेट निलंबनाची व कारवाईची नोटीस हातात पडत असल्याने सर्वच अधिकारी व कर्मचारी दहशतखाली काम करीत आहे.

वारंवारच्या इशाऱ्याने संताप

सकाळी नऊ वाजता घरून निघाल्यावर रात्री किती वाजता घरी परतायचे याची वेळच निश्चित राहिलेली नाही. त्यातच रोज अतिक्रमण, निलंबन, हातोडा, बडतर्फ असे शब्द कानावर पडत आहेत. सुटीचा दिवसही आता महापालिकेलाच द्यावा लागत आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष असून, ते तणावाखाली आले आहेत. या अतितणावाचाच धसका रवींद्र पाटील यांनी घेतल्याने त्यांनी असा प्रकार केल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना धमक्या, निलंबन आणि कारवाईचा इशारा दिला जात असल्याने ते संतप्त झाले असून, आता अशा घटना होऊ नये यासाठी एकवटले आहेत. रोजच्या कारवाईच्या धमक्यांना कंटाळल्याने आता वरिष्ठ पातळीवर तक्रारी करण्याचा विचार अधिकारी संघटनेत सुरू झाला असून, त्यासाठी बैठकांचे सत्र सुरू केले जाणार आहे.

महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी सध्या प्रचंड तणावाखाली काम करीत आहेत. पाटील यांची घटना वेदनादायी असून, त्यांच्यावर टाकलेल्या दडपणामुळे त्यांनी हे पाऊल उचलले आहे. त्यांचे काही बरे-वाईट झाल्यास त्याला सर्वस्वी आयुक्त मुंढेच जबाबदार ठरणार असून, त्यांच्यावर कारवाई केली जावी.

-प्रवीण तिदमे, अध्यक्ष, म्युनिसिपल कर्मचारी सेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानहानीच्या बदल्यात सूडबुद्धी!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अतिक्रमण निर्मूलन मोहिमेंतर्गत ग्रीन फिल्ड लॉन्सवरील बेकायदा कारवाई अंगलट आल्याने हायकोर्टात माफीनामा सादर करण्याची नामुष्की ओढावलेल्या महापालिका प्रशासनाने ग्रीन फिल्डचे संचालक प्रकाश मते यांच्या इतर मालमत्तांना नोटिसा पाठवून सूडबुद्धीचे राजकारण सुरू केले आहे.

विशेष म्हणजे हायकोर्टातील अपमानाचा बदला घेण्यासाठी दोन वर्षांपूर्वीची पावसाळ्यातील पुराची दुर्घटना शोधून काढत त्यांच्यावर नोटिसांचा भडिमार सुरू केला आहे. दोन वर्षांपूर्वी गोदावरीच्या महापुरात मतेंची मालकी असलेल्या केनिंगस्टन क्लबची संरक्षक भिंत कोसळून महापालिकेची गॅबियन वॉल कोसळल्याचा दावा करीत त्यापोटी १ कोटी ४० लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी नोटिशीद्वारे महापालिकेने केली आहे. अस्तित्वात नसलेला नदीपात्रातील मलबा चोवीस तासांत न काढल्यास कारवाईचा इशाराही दिला आहे.

उच्च न्यायालयात झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आता आता प्रशासनाने अफलातून कारणे शोधून काढली आहेत. चांदशी शिवारात प्रकाश मते व विक्रांत मते यांच्या मालकीचा केनिंगस्टन क्लब आहे. दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात गोदावरीला आलेल्या महापुरात या क्लबची संरक्षक भिंत कोसळली होती. त्यामुळे महापालिकेच्या नदीपात्रातील गॅबियन वॉलचेही नुकसान झाले होते. प्रशासनातील बाबूंनी आता २०१६ चे प्रकरण उकरून काढले असून, आरसीसी संरक्षक भिंत महापालिकेच्या गॅबियन वॉलवर पडल्याने आर्थिक नुकसान झाल्याचा दावा केला आहे. याबाबत मते यांना नोटीस बजावण्यात आली असून, गॅबियन वॉलच्या नुकसानभरपाईपोटी १ कोटी ४० लाखांची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय गोदावरी पात्रात पडलेल्या मलब्यामुळे नदीच्या प्रवाहाची रुंदी कमी झाल्याने पूरजन्य आपत्ती निर्माण झाल्याचा दावा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख तथा मुख्य अग्निशमन अधिकारी अनिल महाजन यांनी दिलेल्या नोटिशीमध्ये करण्यात आला आहे. नदीपात्रात पडलेला हा मलबा २४ तासांत न हटविल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. महापालिकेची ही कारवाई सूडबुद्धीने असल्याचा आरोप मते यांच्याकडून करण्यात आला आहे. सोबतच पर्यावरण विभागानेही त्यांच्याविरोधात प्रदूषण प्रकरणी फिर्याद दिली आहे.

पालिकेचेच बांधकाम निकृष्ट

सिंहस्थानिमित्त महापालिकेने गोदाकाठी रस्ता बांधला. वास्तविक ही जागा महापालिकेच्या मालकीची नव्हतीच. बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे २०१३पासूनच या रस्त्याला तडे जाण्यास सुरुवात झाली होती. दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात गोदावरीला आलेल्या महापुरात या रस्त्याचा काही भाग, तसेच नदीपात्रातील गॅबियन वॉल ढासळली. याबाबत आपण २३ ऑक्टोबर २०१७ रोजी महापालिकेला पत्राद्वारे सूचितही केले होते; परंतु, पालिकेने दुर्लक्ष केले. महापालिकेच्या पॅनलवरील वास्तुविशारद धुमणे यांनीदेखील या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित करीत पुराच्या पाण्यात गॅबियन वॉल वाहून गेल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर केनिंगस्टन क्लबची आरसीसी संरक्षक भिंत बांधली गेली. त्यामुळे पालिकेमार्फत केली जात असलेली कारवाई निव्वळ सूडबुद्धीचे राजकारण असल्याचा आरोप मते यांनी केला आहे. आम्हाला टार्गेट केले जात आहे. महापालिकेची चूक आमच्यावर ढकलली जात असून, आम्ही या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार आहे, असे केनिंगस्टन क्लबचे संचालक विक्रांत मते यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरातच ड्रग्जनिर्मिती; संशोधकास अटक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घरातल्या प्रयोगशाळेतच मेफेड्रोन अर्थात एमडी ड्रग्जनिर्मिती होत असल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका संशोधकासह त्याच्या साथीदाराला क्राइम ब्रँचच्या पथकाने अटक केली असून, संशयितांकडून तब्बल एक कोटी ८० लाख ४७ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या दोघांनी घरातच एमडी ड्रग्ज निर्मितीचा उद्योग सुरू केला होता. पोलिसांनी आतापर्यंत या गुन्ह्यात सात जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून तीन कोटी २० लाख रुपयांचे २५ किलो ड्रग्ज हस्तगत केले आहे.

अरविंद कुमार (वय ३४, मुंबई) आणि हरिश्चंद्र उर्वादत्त पंत (२४, रा. बोईंसर, ठाणे) अशी या संशियितांची नावे आहेत. अरविंद कुमार एम.एस्सी. (ऑरगॅनिक केमिस्ट्री) झाला असून, तो मूळचा उत्तर प्रदेशातील मुज्जफरनगर येथील आहे. शिक्षणानंतर नोकरीसाठी तो मुंबईत आला. येथे त्याने १० वर्षे वेगवेगळ्या औषधनिर्मिती कंपन्यांमध्ये काम केले. शेवटची नोकरी सोडली त्या कंपनीत तो सहाय्यक संशोधक शास्त्रज्ञ म्हणून काम करीत होता. नोकरीत मनासारखे पैसे मिळत नसल्याने अरविंद कुमारने बी.एस्सी.चे शिक्षण अर्धवट सोडलेल्या पंतला सोबतीला घेऊन एमडी ड्रग्जनिर्मितीचा धंदा सुरू केला. मागील तीन वर्षांपासून ते ड्रग्जची बेमालूमपणे निर्मिती करीत असल्याची माहिती प्राथमिक चौकशीत समोर आल्याचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images