Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

भगूर येथे आज विविध कार्यक्रम

0
0

देवळाली कॅम्प : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जयंतीनिमित्त आज, सोमवारी (दि. २८) भगूर येथील त्यांच्या जन्मस्थळी पुरातत्त्व विभाग व भगूर नगरपालिका, तसेच संस्था, संघटनांतर्फे विविध कार्यक्रम होणार आहेत. सकाळी ७ वाजता शासकीय महापूजा होईल. नंतर नगरपालिका आदींतर्फे अभिवादन, तसेच गीत मैफल होईल. खासदार हेमंत गोडसे यांना रविवारी येथे दर्शन घेऊन या वाड्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करावे, स्वातंत्र्यवीरांना भारतरत्न देण्यात यावे यासाठी दिल्लीत पाठपुरावा करीत असल्याचे सांगितले. तानाजी करंजकर, वसंतराव पाटील, अनिल पवार, अशोक मोजाड, सचिन हेंबाडे, सुनील कासार, प्रकाश सुराणा आदींसह समिती सदस्य व भगूरवासीय उपस्थित होते. मुंबई 'भाजयुमो'तर्फे भगूर ते मुंबई मशाल रॅलीचा प्रारंभ सावरकर वाडा येथे मशाल प्रज्वलित करून झाला. नगराध्यक्षा अनिता करंजकर, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर, नगरसेवक संजय शिंदे, मनीषा कस्तुरे, प्रतिभा घुमरे आदी उपस्थित होते. सावरकर उत्सव समितीतर्फे सायंकाळी ६ वाजता आहारतज्ज्ञ डॉ. किरण वाटारे यांचे व्याख्यान व ७ वाजता मुंबई येथील मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतील 'करूया जल्लोष' हा कार्यक्रम सादर होईल. यावेळी 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील अभिनेता नागेश मोरवेकर, धनश्री दळवी आदी कलाकार उपस्थित राहतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सांस्कृतिकतेला लाभणार ‘कलासंगम’चे कोंदण

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'महाराष्ट्र टाइम्स'च्या नाशिक आवृत्तीच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र टाइम्स व कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ९ व १० जून रोजी कलासंगम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कुसुमाग्रज स्मारक येथे हा महोत्सव होणार आहे. प्रस्थापित कलाकारांच्या कलांचे सादरीकरण आणि उभरत्या कलाकारांना व्यासपीठ म्हणजे कलासंगम महोत्सव. विविध कलांचे सादरीकरण करून रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा हा महोत्सव जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये होणार आहे.

तालवाद्यापासून सुशीरवाद्यांपर्यंत साऱ्यांचाच समावेश यात राहणार असून, नाशिककर कलाकारांची शिगेला पोहोचलेली उत्कंठा आता पूर्णत्वाकडे गेली आहे. मटा कलासंगम महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून, गेल्या वर्षी नाशिककरांनी महोत्सवाला उदंड प्रतिसाद दिला होता. नाशिकमधील लोककला, डिजिटल आर्ट, परफॉर्मिंग आर्ट, गायन, वादन, शिल्प, नृत्य, नाट्य, चित्र, फोटोग्राफी सादर करणाऱ्या कलाकारांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलेचा प्रचार व प्रसार व्हावा आणि नाशिककरांना नवनवीन सांस्कृतिक प्रयोग पाहण्याची संधी उपलब्ध व्हावी, हा कलासंगम महोत्सवाचा उद्देश आहे. मंत्रभूमी ते यंत्रभूमी असा प्रवास करणाऱ्या अन् सांस्कृतिक ठेवा जपतानाच स्मार्ट बनू पाहणाऱ्या या नगरीने अनेक कलारत्नांना मानसन्मान दिला. या रत्नांनीदेखील नाशिकचा बहुमान वाढविला. 'मटा'च्या वर्धापन दिन सोहळ्यात त्यांना एकत्रित करून एक मोठा आर्ट फेस्ट नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या फेस्टमध्ये संगीत, वादन, नृत्य, चित्र, शिल्प आदी कलांचा संगम नाशिककर रसिकांना पाहायला मिळणार आहे.

महोत्सवात नाशिकच्या सप्तकन्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर उभरत्या कलाकारांचे संबळवादन ठेवण्यात आले आहे. चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य, गायन, वादन व फोटोग्राफी या सात कलांवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय फोटोग्राफी, चित्रकला, वारली या विषयांतील विविध प्रदर्शने होणार आहेत. मान्यवर कलाकारांचे डेमोन्स्ट्रेशनही यावेळी होईल. नाशिकच्या कलावंतांचा समावेश असलेली आर्टिझन्स फिल्म यावेळी दाखविण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी हौशी कलाकारांचे तबलावादन, गायन व नृत्य, तसेच काही डेमो होणार आहेत. त्यांच्यातील कलाविष्कार पाहण्याची संधी नाशिककरांना उपलब्ध होणार आहे. दोन्ही दिवस कुसुमाग्रज स्मारकात शस्त्रास्त्रे व नाणी प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. यात दुर्मिळ नाणी, तसेच शस्त्रास्त्रे नाशिककरांना बघायला मिळणार आहेत. नाशिककरांनी या 'आर्ट फेस्ट'ला नक्की हजेरी लावावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या फेस्टसाठी हॅण्ड फाऊंडेशनचे सहकार्य लाभत आहे.

दोन दिवस धमाल

'महाराष्ट्र टाइम्स'च्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त दि. ९ व १० जून रोजी संपूर्ण दिवस कलासंगम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हे दोन्ही दिवस कलेच्या प्रांतातील मुशाफिरी अनुभवता येणार असून, दोन दिवस धमाल येणार आहे. नाशिकमधील मान्यवर कलाकार यात सहभागी होत असून, मान्यवर शिल्पकार यात डेमो देणार आहेत. मुंबईहून सेलिब्रेटीदेखील सहभागी होणार आहेत.

हौशी कलाकारांना आवाहन

या महोत्सवामध्ये दुसऱ्या दिवशी हौशी कलाकारांसाठी व्यासपीठ देण्यात येणार आहे. हौशी कलाकारांना आवाहन करण्यात येत आहे, की गायन, वादन, नृत्य, चित्र, शिल्प, फोटोग्राफी, मॉडर्न आर्टमध्ये पीअर्सिंग, नेल आर्ट, तसेच आणखीही संबंधित आर्टमध्ये ज्यांना परफॉर्मन्स सादर करावयाचे असतील त्यांनी रजिस्ट्रेशनसाठी ०२५३- ६६३७९८७ या क्रमांकावर संपर्क करावा. नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

सात ठिकाणांवर हेरिटेज वॉक

'महाराष्ट्र टाइम्स'च्या वर्धापन दिनानिमित्त नाशिककरांसाठी विविध कार्यक्रमांचा खजिना खुला होणार आहे. यात दि. ३ जून रोजी हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. गोपिकाबाईंचा तास, अहिल्या राम मंदिर, अजगरेश्वर महाराज समाधी, कपालेश्वर महादेव मंदिर, गोरेराम मंदिर, कृष्ण मंदिर आणि नारोशंकर मंदिर अशा सात ठिकाणी हा हेरिटेज वॉक होणार आहे.

--

लोगो : ७ वा वर्धापनदिन

लोगो : कलासंगम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांच्या मान्येतेचे प्रस्ताव सादर करा

0
0

'शिक्षकांच्या मान्येतेचे

प्रस्ताव सादर करा'

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक मंडळाने विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांना नवनियुक्त शिक्षकांच्या मान्यतेचे प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली आहे. स्थानिक निवड समितीने शिफारस करुन नियुक्त केलेल्या व तासिका तत्वावर नियुक्त केलेल्या उमेदवारांच्या शिक्षक मान्यतेचे प्रस्ताव विहित मुदतीच सादर करावे, अशी सूचना पुणे, अहमदनगर व नाशिकमधील सर्व महाविद्यालयांना केली आहे.

२०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी स्थानिक निवड समितीच्या अहवालानुसार नेमणूक केलेल्या उमेदवारांच्या शिक्षक मान्यतेचे प्रस्ताव विद्यापीठात सादर करायचे आहेत. महाविद्यालयांनी निवड समितीची सभा आयोजित केल्यानंतर ७२ तासांच्या आत सदर अहवाल सादर करायचा आहे. नियुक्त उमेदवार रुजू झाल्यानंतर ३० दिवसांत ऑनलाइन पध्दतीने शिक्षक मान्यतेचा प्रस्ताव भरून हार्ड कॉपीसहीत सादर करायचा आहे. यासाठी १ जून ते ३० सप्टेंबर २०१८ अशी मुदत आहे. तसेच ज्यांना यापूर्वी शिक्षक मान्यता मिळाली आहे. मात्र त्यांनी कॉलेजचे कामकाज सोडले आहे. अशा उमेदवारांच्या जागी नवीन उमेदवारांचे शिक्षक मान्यतेचे प्रस्ताव भरण्यासाठी शैक्षणिक विभागातील संबंधित अधिकाऱ्याची मान्यता घ्यावी. नोकरी सोडून गेलेल्या शिक्षकांना संबंधित महाविद्यालयांनी रितरस रिलिव्हिंग पत्र देणे आवश्यक असेल. तासिका तत्वावर नियुक्ती झालेल्या उमेदवारांच्या मान्येतेचे प्रस्ताव प्रथम सत्रात १ जुलै ते ३१ ऑगस्ट तर द्वितीय सत्रात १ डिसेंबर ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत शैक्षणिक विभागात सादर करायचे आहे. सदर तारखेनंतर प्रस्ताव सादर केल्यास व अपूर्ण कागदपत्रे असल्यास त्यावर कोणतीही कार्यवाही होणार नाही, अशी सूचना विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाने महाविद्यालयांना दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अपंगांच्या मागण्यांकडे सरकारने लक्ष द्यावे’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अपंग व्यक्तींसाठी देशात अनेक सकारात्मक निर्णय गेल्या काही काळापासून घेतले जात असले तरी अपंगांसमोरील समस्या अद्याप जैसे थेच आहेत. नोकरी, शिक्षण अशा मूलभूत लाभांसाठीही अपंगांना संघर्ष करावा लागत आहे, ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकारने गांर्भीर्याने अपंगांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड संस्थेचे सेक्रेटरी जनरल एस. के. सिंग यांनी केले.

नॅशलन असोसिएशन फॉर इ ब्लाइंड इंडियाच्या बाराव्या कार्यकारी परिषदेचे रविवारी हॉटेल एमरल्ड पार्क येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत एस. के. सिंग बोलत होते. पुढे ते म्हणाले, की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आता अपंग किंवा अंध व्यक्तींचा उल्लेख दिव्यांग असा करावा, असे सूचित केले आहे. हा निर्णय समाजात वावरण्यासाठी निश्चितच आत्मविश्वास निर्माण करणारा आहे. देशपातळीबरोबरच महाराष्ट्र राज्यातही अंधव्यक्तींसाठी अद्याप कोणताही प्रभावी उपक्रम राबविला जात नाही. अपंगांबाबत अच्छे दिनाची प्रतीक्षा कायम असल्याची प्रतिक्रियाही यावेळी देण्यात आली. तसेच यावेळी अपंग व्यक्तींसाठी मोफत बसपास, राज्यभरात घर करापासून सूट, म्हाडा, सिडको, इंदिरा आवास योजनेत चार टक्के सदनिका अपंगांसाठी आरक्षित असाव्या, अशा विविध मागण्या मान्य व्हाव्यात, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भास्कर मेहता, कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पल्लवी कदम, मानद सचिव विमल डेंगला उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी महाराजांच्या विचाराने जगावे

0
0

तळोद्यात संभाजी भिडे यांचे मत

म. टा. वृत्तसेवा, धुळे

देशातील तरुणांना सिंहासारखे जगायचे असेल तर शिवाजी महाराजांसारख्या सिंहाच्या विचाराने जगावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी राजे यांचे व आपले नाते निखाऱ्यासारखे आहे, असे मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केले. ते शनिवारी तळोद्यात एका कार्यक्रमात बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यासाठी लढले. मृत्यू सतत पाठलाग करत असताना त्यांनी २८९ लढाया करीत कधीही माघार घेतली नाही. शत्रूची दाणादाण उडवित त्यांनी रायगडावर स्वराज्याची स्थापना केली, असेही भिडे म्हणाले. शिवाजी महाराजांच्या विचारांना जिवंत ठेवण्यासाठी रायगडावर ३२ मण सुवर्ण सिंहासन स्थापण्याची संकल्पनाही भिडे यांनी व्यक्त केली. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील वामन बापूजी कार्यालयात हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन व संस्थापना न्यासच्यावतीने आयोजित सभेसाठी ते आले होते. देशातील तरुणांना सिंहासारखे जगायचे असेल तर शिवाजीसारख्या सिंहाच्या विचाराने जगावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी राजे यांचे व आपले नाते निखाऱ्यासारखे आहे, असेही भिडे म्हणाले.

कुस्तीचे खाते असायला हवे
आपण, रायगडावर ४ जून २०१७ रोजी ३२ मण सोन्याचे सिंहासन संस्थापित करण्याचा संकल्प केला आहे. यात सिंहासन १२८० किलो, शिवाजी महाराजांची मूर्ती ४६ किलो व राजछत्र ४० किलोचे असणार आहे, अशी माहिती त्यांनी बोलताना दिली. महाराष्ट्र हा मर्दांचा महाराष्ट्र म्हणून बनवायचा असल्याने प्रत्येक गावात कुस्त्या खेळणे व मंत्रालयात कुस्तीचे खाते असावे यादृष्टीने पुढील पाऊल उचलणार असल्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पराग राणे, पुष्पेंद दुबे, अमन जोहरी, राज चौधरी आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तापमान पुन्हा चाळिशीपार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरासह जिल्ह्यात तापमान पुन्हा चाळिशीपार गेले असून, रविवारी कमाल तापमान ४०.३ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. पुढील दोन दिवस नाशिककरांना उन्हाच्या झळांचा सामना करावा लागणार असून, ४२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. उत्तर महाराष्ट्रात जळगाव सर्वांत हॉट ठरले असून, तेथील तापमान ४४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

मे महिन्यात नाशिककरांना उष्णतेच्या झळांचा सामना करावाच लागतो. यंदाही त्याचाच प्रत्यय येतो आहे. आठवडाभर ३७ ते ३९ अंश सेल्सिअसदरम्यान स्थिरावलेले तापमान रविवारी ४० अंश सेल्सिअसच्याही पुढे सरकले. नागरिकांना सकाळी दहापासूनच उन्हाच्या झळा असह्य वाटू लागल्या. दुपारी तर उन्हामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर वर्दळच नसल्याचे पाहायला मिळाले. मेअखेरीस पुन्हा उन्हाची तीव्रता वाढली असून, ती आणखी वाढत जाईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तापमान सोमवारी (दि. २८ मे) ४० अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मात्र, मंगळवारी तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे उन्हाच्या झळांपासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरधाव वेगातील कारची झाडाला धडकली

0
0

कारचालकाचा मृत्यू; चार तरुण जखमी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगातील कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला. यात चार तरुण देखील जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात अशोकस्तंभ ते सीबीएस मार्गावरली हुतात्मा स्मारक परिसरात झाला. वाहनाचा वेग प्रचंड होता. झाडाला धडकलेल्या वाहनाने थेट हुतात्मा स्मारकाच्या संरक्षक भिंतीचा काही भाग जमीनदोस्त केला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आलेली आहे.

गिरीश दीपक भरीतकर (२२, रा. गणेशवाडी) असे अपघातात ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. तर रामेश्वर रमेश जाधव, नलिश सुनील बडगुजर आणि अन्य दोन अशी चौघा जखमी तरुणांची नावे आहेत. गणेशवाडीतील पाच कारमधून (एमएच १५ ईपी १९२६) रविवारी (दि. २७) मध्यरात्री प्रवास करीत असताना ही घटना घडली. अशोकस्तंभाकडून सीबीएसच्या दिशेने जाणाऱ्या कारवरील चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. भरधाव वेगातील कार जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हुतात्मा स्मारकास लागून असलेल्या झाडावर आदळली. त्यात चालक गिरीश भरीतकर हा जागीच ठार झाला. तर, त्याचे अन्य मित्र जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याबाबत विनोद राजेंद्र खैरे (रा. गणेशवाडी, पंचवटी, नाशिक) याच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत. अपघातात हुतात्मा स्मारकाच्या संरक्षत भिंतीचा काही भाग जमीनदोस्त झाला. अपघाताने स्मारकाचे मोठे नुकसान झाल्याचे नमूद करत या संदर्भात पोलिसात वेगळी तक्रार दिली जाणार असल्याची माहिती स्वातंत्र्यसैनिक वसंत हुदलीकर यांनी दिली.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारच्या धडकेत रिक्षाचालक ठार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भरधाव तवेराने दिलेल्या धडकेत रिक्षा पलटी झाली. यात रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. अपघात रविवारी (दि. २७) दुपारी खडकाळी सिग्नल भागात झाला. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात तवेरा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुधाकर मारुती जगताप (४४, रा. लुंबिनीनगर, नाशिकरोड) असे अपघातात ठार झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. जगताप हे रविवारी दुपारी नाशिकरोड रेल्वे स्थानक येथून प्रवाशी घेऊन द्वारका येथे आले. प्रवासी उतरवून ते आपली अ‍ॅटोरिक्षा (एमएच १५ झेड ७९७) घेऊन शालिमारच्या दिशेने प्रवास करीत असताना अपघात झाला. अ‍ॅटोरिक्षा खडकाळी सिग्नल पास करीत असताना जिल्हा परिषदेकडून भरधाव आलेल्या अज्ञात तवेराने रिक्षास जोरदार धडक दिली. यामुळे रिक्षा पलटी झाली. तर तवेरा चालकाने आपले वाहन दूध बाजारच्या दिशेने पुढे नेत पोबारा केला. दरम्यान या अपघातात रिक्षाचालक जगताप गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्यास वर्मी मार लागल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांचा नातू सचिन जगताप याने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास उपनिरीक्षक जोनवाल करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरकुल घोटाळ्यातून निकुळेंची सुटका

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या घरकुल घोटाळ्याअंतर्गत माजी नगरसेवक यशवंत निकुळे यांनी घरकुल मिळवल्याचा आरोप झाल्यानंतर महापालिकेने या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. या चौकशीत निकुळे व त्यांचे नातेवाईक निर्दोष सुटल्याने निकुळेंना दिलासा मिळाला आहे. निकुळे नगरसवेक असताना त्यांनी व त्यांच्या नातेवाइकांनी घरकुल योजनेत घर घेतल्याचा आरोप भाजपच्याच काही मंडळींनी केला होता. त्यामुळे निकुळेंच्या अडचणी वाढल्या होत्या. तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर अतिक्रमण उपायुक्त रोहिदास बहिरम यांनी चौकशी सुरू केली होती. चौकशीत निकुळे यांनी नगरसेवक होण्यापूर्वीच घरकुल घेतल्याचे समोर आले. निकुळेंचीही झोपडी रस्त्याच्या कामात गेल्याने त्याच्या बदल्यात त्यांना व नातेवाइकांना घरकुल देण्यात आले होते. त्यामुळे निकुळेंना आता या प्रकरणात दिलासा मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदिनीचे अतिक्रमण रडारवर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोदावरी नदीपात्रातील पूररेषेतील अतिक्रमणांसोबतच महापालिकेने आता नंदिनी नदीतल्या अतिक्रमणाकडेही मोर्चा वळवला असून, नंदिनीतल्या पूररेषेतील अतिक्रमणाची पाहणी सुरू केली आहे. नगररचना विभागाला नंदिनीच्या पूररेषेतील अतिक्रमणांवर रेखांकन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे नंदिनीच्या काठावर इमारती उभ्या केलेल्या बिल्डरांची अडचण होणार असून, नवा वाद निर्माण होणार आहे. दरम्यान, महापालिकेने गोदावरी व नंदिनीच्या अतिक्रमणावर हातोडा चालविण्याची तयारी सुरू केली असली, तरी नाल्यांवरील अतिक्रमणाकडे मात्र दुर्लक्ष केले आहे.

महापालिकेने गोदावरीच्या पूररेषेतील अतिक्रमणे रडारवर घेत ती पाडण्यास सुरुवात केली आहे. पाठोपाठ आता नंदिनीच्या पूररेषेतील अनधिकृत बांधकामे, तसेच अतिक्रमणांकडेही मोर्चा वळवला आहे. सिडकोतील अतिक्रमण काढण्याला तीव्र विरोध झाल्याने सिडकोतील रेखांकनाचे बळ आता नंदिनीतल्या अतिक्रमणासाठी वापरले जाणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे आणि अतिक्रमण उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी सोमवारी नंदिनीतल्या अतिक्रमणाची पाहणी केली. या ठिकाणी जाऊन त्यांनी नदीपात्रावरच उभी असलेली दुकाने, घरे व इमारतींची माहिती घेतली. नंदिनीच्या पूररेषेतील अतिक्रमणांचे मंगळवारपासून रेखांकन सुरू होणार असल्याने नव्या वादाला तोंड फुटणार आहे.

नाल्यांकडे मात्र दुर्लक्ष

महापालिकेने गोदावरी व नंदिनी पात्रातील अनधिकृत बांधकामे रडारवर घेतली असली तरी शहरातील लहान-मोठ्या नैसर्गिक नाल्यांवरही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. अनेक ठिकाणी बिल्डरांनी नाल्यांवरच इमारती उभ्या केल्या आहेत, तर काही ठिकाणी इमारतींसाठी नालेच वळवण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिकेने है नैसर्गिक नाले मोकळे केल्यास पावसाळ्यात शहरात पावसाचे पाणी साचण्याचे प्रमाण कमी होईल. मात्र, महापालिकेने नाल्यांवरील अतिक्रमणांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याची तक्रार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्‍तांवर गुन्हा दाखल करा

0
0

सिडको : आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील जनता त्रस्त झाली असून, महापालिकेत काम करणारे अधिकारी व कर्मचारीही वैतागले आहेत. आयुक्‍तांच्या या कार्यपद्धतीचाच त्रास झाल्याने अभियंता रवींद्र पाटील बेपत्ता झाले आहेत. या प्रकरणी आता आयुक्‍तांवरच गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. सिडकोतील अनधिकृत बांधकामे पाडण्याबाबत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेप्रसंगी शिवसेनेचे पश्चिम विधानसभा संपर्कप्रमुख नीलेश चव्हाण, महानगरप्रमुख महेश बडवे व नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी ही मागणी केली आहे. पाटील दोन दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत. मात्र या सर्व प्रकरणाला जबाबदार म्हणून आयुक्‍तांवरच गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफी अंतिम पर्याय नाही

0
0

मकरंद अनासपुरे यांचे प्रतिपादन

म. टा. वृतसेवा, मालेगाव

कृषीप्रधान संस्कृती असलेल्या आपल्या देशात शेतकरी जगला पाहिजे. शेतकरी जगला तर समाज टिकेल. नाम फाउंडेशन शेतकऱ्यांना उभे करण्यासाठीची सामाजिक चळवळ आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालास रास्त भाव मिळाला पाहिजे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या पाहिजेत, कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या समस्येचा अंतिम उपाय नाही, असे प्रतिपादन अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी केले.

तालुक्यातील तळवाडे येथील कृषीरत्न फाउंडेशनच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा कुटुंबीयांना मोफत बियाणे वाटपचा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तसेच आदर्श शेतकऱ्यांचाही गौरव करण्यात येत आहे. त्याअंतर्गतच सोमवारी पुरस्कारचे वितरण अनासपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पवार, बाजार समिती संचालक प्रमोद बच्छाव, युवासेना विस्तारक अजिंक्य भुसे, संजय हिरे, पवन मोरे, सुधाकर खैरनार उपस्थित होते.

कृषीरत्न फाउंडेशनच्या वतीने तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुब, अपंग शेतकरी व कुटुंबीय तसेच शहीद जवान, दुर्बल शेतकरी यांना मोफत बियाणे, खते वाटपचा अभिनव उपक्रम घेण्यात आला. एकूण १०१ शेतअरी कुटुंबाना यावेळी बियाणे व खतांचे वाटप अनासपुरे यांच्या हस्ते करण्यात आले अनासपुरे यांनी नामच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाची माहिती दिली.

पालिकेला दिली सदिच्छा भेट

तळवाडे येथील पुरस्कार वितरणाच्या निमित्ताने मकरंद अनासपुरे प्रथमच मालेगावी आले होते. यावेळी त्यांनी येथील महापलिकेत सदिच्छा भेट दिली. यावेळी आयुक्त संगीता धायगुडे यांनी त्यांचे स्वागत केले. धायगुडे यांनी त्यांच्या माहेरी आंधळी येथे पाणी फाउंडेशनच्या कामात नामने मशीन उपलब्ध करून देत मोठे योगदान दिल्याचे आवर्जून सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियमितीकरणाची ‘कासवगती’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील बांधकामे नियमितीकरणासाठी आतापर्यंत ९०० प्रकरणे दाखल झाली आहेत. मात्र, तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या काळात कपाटांशी संबंधितच जवळपास साडेसहा हजार अर्ज आले होते. त्या तुलनेत सध्याच्या प्रस्तावांची संख्या तोडकीच असल्याने आता अखेरच्या तीन दिवसांत नगररचना विभागाकडे आणखी किती प्रस्ताव दाखल होतात याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.

'महाराष्ट्र नगररचना प्रशमित संरचना धोरण २०१७ अंतर्गत दि. ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे दंडात्मक शुल्काद्वारे नियमित करण्याची मुदत ३१ मे रोजी संपत असून, या धोरणाचा लाभ घेण्यासाठी आता अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. परिणामी अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी नगररचना विभागात विकसकांची धावपळ सुरू असून, सोमवारी प्रकरणे दाखल करण्यासाठी विकसकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे नगररचना विभागाला यात्रेचे स्वरूप आले होते.

शहरातील कपाटकोडींमुळे नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांची झालेली कोंडी सरकारने अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचे धोरण जाहीर केल्यामुळे फुटण्याची आशा निर्माण झाली आहे. या धोरणांतर्गत कम्पाउंडिंग चार्जेस भरून ३१ मे २०१८ पर्यंत अनधिकृत बांधकामे नियमित करून घेण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर कपाटकोंडीमुळे अडकलेल्या इमारती यातून मोकळ्या होण्याची शक्यता आहे. परंतु, सरकारचे रस्ता रुंदीकरणासंदर्भात असलेले कलम २१० चे धोरण आणि कम्पाऊंडिंग चार्जेसचे धोरण एकत्रच आल्याने विकसकांची कोंडी झाली होती. त्यामुळे कोणत्या धोरणाचा लाभ घ्यावा, याबाबत संभ्रमावस्था असली, तरी विकसकांनी कम्पाऊंडिंग चार्जेस धोरणाला पसंती दिल्याचे चित्र आहे. आयुक्तांनी कम्पाऊंडिंग चार्जेसअंतर्गत जे प्रस्ताव दाखल करणार नाहीत त्यांच्या बांधकामांवर ३१ मेनंतर हातोडा चालविण्याचा इशारा दिला आहे. या धोरणांतर्गत प्रकरणे दाखल करण्यासाठी अवघे तीनच दिवस शिल्लक राहिल्याने विकसकांकडून या धोरणाचा लाभ घेण्यासाठी नगररचना विभागात धाव घेतली जात आहे. सोमवारी तर नगररचना विभागाला यात्रेचे स्वरूप आले होते. कम्पाऊंडिंग चार्जेस धोरणांतर्गत बांधकामे नियमित करण्यासाठी अनेक विकसकांनी नगररचनात ठाण मांडले असून, आतापर्यंत जवळपास ९०० प्रकरणे दाखल झाली आहेत. प्रकरणे दाखल करण्याठी अजूनही तीन दिवस शिल्लक आहेत. या धोरणांतर्गत अजूनही एवढीच प्रकरणे दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहारतील कपाटकोंडी काहीअंशी सुटण्याची शक्यता आहे.

साडेसहा हजार प्रकरणे

शहरातील कपाटकोंडीमुळे अडकलेल्या प्रकरणांची माहिती घेण्यासाठी तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या कारकीर्दीत सरकारने यासंदर्भातील प्रकरणांची माहिती घेतली होती. त्यावेळी कपाटकोंडीमुळे अडकलेल्या प्रकरणांची संख्या बघूनच योग्य तो निर्णय घेतला जाणार होता. त्यामुळे त्यावेळी विकसकांनी जवळपास साडेसहा हजार अर्ज दाखल केले होते. या सर्वांची माहिती महापालिकेच्या वतीने राज्य सरकारला पाठविण्यात आली होती. त्यांचा एकत्रित निपटारा होईल, अशी अपेक्षा विकसकांना होती. परंतु, नऊ मीटरवरील रस्त्यांवर टीडीआर मिळाल्याने कपाटांची प्रकरणे मिटली आहेत.

मुदतवाढीचीही प्रतीक्षा

अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी मुदतवाढ मिळविण्यासाठी काही विकसकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. भिवंडी महापालिकेने मुदतवाढ देण्यासाठी ठराव करीत तो सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला होता. त्यामुळे सरकारने भिवंडी महापालिकेला जवळपास सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकसह राज्यातही अशा प्रकारची मुदतवाढ मिळावी, अशी विकसकांची मागणी आहे. त्यामुळे सरकारी पातळीवर याबाबत विचार सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुद्रा’तून मिळणार तरुणांना अधिक संधी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुद्रा योजनेची देशभर व्याप्ती वाढविण्यासह प्रभावी अंमलबजावणीसाठी मुद्रा कर्जदाते व उद्योग यांची भागीदारी करण्याचे केंद्र सरकारचे सकारात्मक पाऊल असून, तरुणांना त्याचा मोठा लाभ मिळेल, असा विश्वास भाजपच्या उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीश पेशकार यांनी व्यक्त केला. यामुळे गाव व खेड्यात तरुण वर्गाला उद्योग उभारणीसाठी नवीन दालन सुरू होणार आहे.

केंद्र सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयाबाबत बोलतांना पेशकार म्हणाले, की सर्व उद्योग फ्रँचाइझी निवडून त्यांना 'मुद्रा'चा लाभ मिळू शकतो. या भागीदारीमुळे नव्या उद्योजकांना फायदा होणार आहे. केंद्राने लघु उद्योग कर्जासाठी कर्जदाते, उद्योग व मुद्रा बँका यांनी नुकतेच त्रिस्तरीय भागीदारी करण्याचा निर्णय घेतला. वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या पुढाकाराने ही प्रक्रिया मार्गी लागली. प्रधानमंत्री मुद्रा योजनेला गेल्या तीन वर्षांत मिळालेल्या अद्भुत यशाच्या पायावर हा उपक्रमही यशस्वी होणार आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून रोजगार आणि उद्योजकता निर्मिती या विषयी मुंबईत चर्चासत्रात यावर बरीच माहिती देण्यात आली. त्यात मुद्रा योजना भविष्यात उद्योगाला अधिक चालना देणारी ठरणार आहे.

या वर्षी ओयो, ओला, उबेर, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, मेरू, कारझोनरेंट, यात्रा, मेक माय ट्रीपबरोबरच स्विग्गो, झोमॅटो, ग्रॅब, डिलिव्हरी, एक्स्प्रेसबी, लोडशेअर, तसेच अमूल, पतंजली असे खाद्य क्षेत्रातील उद्योग लावा, मोबाइल, जावेद हबीबसारख्या व्यावसायिक शाखांचा विस्तार, इंडियन ऑइल, बीपीसीएलसारख्या तेल कंपन्या, बिग बास्केट आणि मुंबईच्या डबेवाल्यांबरोबर केबल ऑपरेटर्सनाही मुद्रा योजनेंतर्गत आवश्यकतेनुसार कर्ज प्रदान करण्यात भर दिला जाणार आहे.

विविध सेवा क्षेत्रातील या कंपन्यांना, उपक्रमांना आपापल्या सेवांच्या विस्तारासाठी नव्या सदस्यांची आवश्यकता भासत असते. ही गरज भागविण्यासाठी मुद्रा योजना सहाय्यक ठरू शकते. त्याचप्रमाणे सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि खासगी बँकांबरोबरच हिंदुजा, ले लँड फायनान्स, हिरो फिनकॉर्प, श्रीराम फायनान्स, मुथ्थुट फायनान्स, टाटा मोटर्स फायनान्स, बजाज फायनान्स अशा कंपन्याही मुद्रा योजनेच्या व्यासपीठावर एकत्र आल्या आहेत.

अल्पदरात अपघात विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवज्योती विमा योजना अशा योजनांचा लाभही सर्वदूर पोहोचत आहे. केवळ ३४२ रुपये भरून एका व्यक्तीला ४ लाख रुपयांचे विमा कवच प्राप्त होते. या योजनांचा लाभ वाहनचालक, डिलिव्हरी बॉइज अशा निम्न स्तरातील कामगारांनाही मिळावा, यासाठी उद्योग क्षेत्रातही प्रयत्न होत आहे. त्यामुळे या योजनांचा भविष्यात उद्योगवाढीला फायदाच मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियमितीकरणासाठी धावाधाव

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'महाराष्ट्र नगररचना प्रशमित संरचना धोरण २०१७ अंतर्गत दि. ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे दंडात्मक शुल्काद्वारे नियमित करण्याची मुदत ३१ मे रोजी संपत असून, या धोरणाचा लाभ घेण्यासाठी आता अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. परिणामी अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी नगररचना विभागात विकसकांची धावाधाव सुरू असून, सोमवारी प्रकरणे दाखल करण्यासाठी विकसकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे नगररचना विभागाला यात्रेचे स्वरूप आले होते.

शहरातील बांधकामे नियमितीकरणासाठी आतापर्यंत ९०० प्रकरणे दाखल झाली आहेत. मात्र, तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या काळात कपाटांशी संबंधितच जवळपास साडेसहा हजार अर्ज आले होते. त्या तुलनेत सध्याच्या प्रस्तावांची संख्या तोडकीच असल्याने आता अखेरच्या तीन दिवसांत नगररचना विभागाकडे आणखी किती प्रस्ताव दाखल होतात याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.

शहरातील कपाटकोडींमुळे नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांची झालेली कोंडी सरकारने अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचे धोरण जाहीर केल्यामुळे फुटण्याची आशा निर्माण झाली आहे. या धोरणांतर्गत कम्पाउंडिंग चार्जेस भरून ३१ मे २०१८ पर्यंत अनधिकृत बांधकामे नियमित करून घेण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर कपाटकोंडीमुळे अडकलेल्या इमारती यातून मोकळ्या होण्याची शक्यता आहे. परंतु, सरकारचे रस्ता रुंदीकरणासंदर्भात असलेले कलम २१० चे धोरण आणि कम्पाऊंडिंग चार्जेसचे धोरण एकत्रच आल्याने विकसकांची कोंडी झाली होती. त्यामुळे कोणत्या धोरणाचा लाभ घ्यावा, याबाबत संभ्रमावस्था असली, तरी विकसकांनी कम्पाऊंडिंग चार्जेस धोरणाला पसंती दिल्याचे चित्र आहे. आयुक्तांनी कम्पाऊंडिंग चार्जेसअंतर्गत जे प्रस्ताव दाखल करणार नाहीत त्यांच्या बांधकामांवर ३१ मेनंतर हातोडा चालविण्याचा इशारा दिला आहे. या धोरणांतर्गत प्रकरणे दाखल करण्यासाठी अवघे तीनच दिवस शिल्लक राहिल्याने विकसकांकडून या धोरणाचा लाभ घेण्यासाठी नगररचना विभागात धाव घेतली जात आहे. सोमवारी तर नगररचना विभागाला यात्रेचे स्वरूप आले होते. कम्पाऊंडिंग चार्जेस धोरणांतर्गत बांधकामे नियमित करण्यासाठी अनेक विकसकांनी नगररचनात ठाण मांडले असून, आतापर्यंत जवळपास ९०० प्रकरणे दाखल झाली आहेत. प्रकरणे दाखल करण्याठी अजूनही तीन दिवस शिल्लक आहेत. या धोरणांतर्गत अजूनही एवढीच प्रकरणे दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहारतील कपाटकोंडी काहीअंशी सुटण्याची शक्यता आहे.

साडेसहा हजार प्रकरणे

शहरातील कपाटकोंडीमुळे अडकलेल्या प्रकरणांची माहिती घेण्यासाठी तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या कारकीर्दीत सरकारने यासंदर्भातील प्रकरणांची माहिती घेतली होती. त्यावेळी कपाटकोंडीमुळे अडकलेल्या प्रकरणांची संख्या बघूनच योग्य तो निर्णय घेतला जाणार होता. त्यामुळे त्यावेळी विकसकांनी जवळपास साडेसहा हजार अर्ज दाखल केले होते. या सर्वांची माहिती महापालिकेच्या वतीने राज्य सरकारला पाठविण्यात आली होती. त्यांचा एकत्रित निपटारा होईल, अशी अपेक्षा विकसकांना होती. परंतु, नऊ मीटरवरील रस्त्यांवर टीडीआर मिळाल्याने कपाटांची प्रकरणे मिटली आहेत.

मुदतवाढीचीही प्रतीक्षा

अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी मुदतवाढ मिळविण्यासाठी काही विकसकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. भिवंडी महापालिकेने मुदतवाढ देण्यासाठी ठराव करीत तो सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला होता. त्यामुळे सरकारने भिवंडी महापालिकेला जवळपास सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकसह राज्यातही अशा प्रकारची मुदतवाढ मिळावी, अशी विकसकांची मागणी आहे. त्यामुळे सरकारी पातळीवर याबाबत विचार सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


६ व ७.५ मीटर रस्त्यांवरील कपाटकोंडी फुटणार...

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील सहा व साडेसात मीटर रस्त्यांवरील कपाटकोंडी फोडण्यासाठी महापालिकेचा कलम २१० अंतर्गत रस्ते रुंदीकरणाचा प्रस्ताव आता स्थायी समितीवर दाखल झाला आहे. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर सहा व साडेसात मीटर रस्त्यांवरील कपाटकोंडी फोडण्यासाठी संबंधित इमारतधारकांना रस्ता रुंदीकरण करून कपाटे नियमित करता येणार आहेत. परंतु, सध्या आचारसंहिता सुरू असल्याने अजून महिनाभर तरी या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत.

शहरातील ६ व ७.५ मीटर रस्त्यांवर टीडीआर लोड करता येत नसल्याने या रस्त्यांवरील कपाटकोंडी अजूनही फुटलेली नाही. त्यामुळे महापालिकेने दाट लोकवस्तीचे क्षेत्र वगळता उर्वरित क्षेत्रातील ६ आणि ७.५ मीटरचे रस्ते ९ मीटर रुंदीचे करण्यासाठी नियम २१० अन्वये कारवाई सुरू केली आहे. त्यासाठी दि. १६ एप्रिल २०१८ रोजी अधिसूचना प्रसिद्ध करत त्यासाठी ३० दिवसांत हरकती व सूचना मागविल्या होत्या. सदरची मुदत बुधवारी संपली असून, त्यावर कोणीही हरकती घेतलेल्या नाहीत. या प्रस्तावांतर्गत इमारतधारकांना सामासिक अंतराचा लाभ घेऊन आपली अनधिकृत बांधकामे नियमित करता येणार आहेत. त्यासाठी ६ मीटरचा रस्ता असेल, तर दोन्ही बाजूंना १.५ मीटर असे सामासिक अंतर सोडून रस्ता रुंदीकरण करता येणार आहे. रस्ता ७.५ मीटरचा असेल, तर ०.७५ मीटर रस्ता दोन्ही बाजूंनी सोडावा लागणार आहे. या प्रस्तावावर कोणत्याही हरकती व सूचना आल्या नसल्याने प्रशासनाने अंतिम मंजुरीसाठी तो स्थायी समितीवर पाठविला आहे. स्थायी समितीची मान्यता मिळ्यानंतर या धोरणांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

किमान महिनाभराचे वेटिंग?

रस्ते रुंदीकरण करून कपाटकोंडी फोडण्यांसाठी अंमलात येणाऱ्या कलम २१० च्या प्रस्तावाला अजून महिनाभराचे वेटिंग करावे लागणार आहे. सध्या नाशिक शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता सुरू आहे. ही आचारसंहिता २ जुलैपर्यंत राहणार आहे. परिणामी स्थायी समितीला या प्रस्तावास २ जुलैपर्यंत मंजुरी देता येणार नाही. त्यामुळे हा प्रस्ताव अजून महिनाभर तरी तसाच पडून राहण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयमा’च्या अध्यक्षपदासाठी आज मतदान

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) या संस्थेच्या द्विवार्षिक निवडणुकीत मंगळवारी अध्यक्षपदासाठी दोन उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. आयमा रिक्रिएशन सेंटर येथे मंगळवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होईल. निवडणुकीसाठी एकूण २६ जागा आहेत. पैकी २५ जागांवर बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदासाठी रिक्त असलेल्या जागेकरिता वरुण तलवार आणि विरोधी गटाच्या वतीने तुषार चव्हाण यांच्यात ही लढत होईल.

निवडणुकीसाठी १६०० सदस्य मतदान करणार आहेत. या औद्योगिक संघटनेमध्ये सर्व जागा बिनविरोध करण्याचे प्रयत्न यापूर्वी झाले. मात्र, त्यात यश न मिळाल्याने ही निवडणूक होणार आहे. त्यासाठी आता पूर्णपणे मतदानप्रक्रिया राबवावी लागणार आहे. मतदानानंतर ३० मे रोजी सकाळी सातनंतर मतमोजणी होईल. दोन्हीही प्रतिस्पर्धी गटांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने निवडणुकीत रंगत आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालमृत्यूंची सखोल चौकशी करा

0
0

सीईओ डॉ. गीते यांचे निर्देश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कोणत्या कारणामुळे बाळाचा मृत्यू झाला, याबाबत घरी जाऊन अन्वेषण करावे, तसेच बालमृत्यू रोखण्यासाठी नियोजन करण्याची गरज असून बालमृत्यूचे कारण शोधून त्यावर प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे स्पष्ट निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. नरेश गिते यांनी दिले.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात जिल्हास्तरीय बालमृत्यू अन्वेषण समिती तसेच अतिसार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत अंतर्गत जिल्हास्तरीय गाभा समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात विविध कारणांमुळे झालेल्या बालमृत्यूबाबत बैठकीत आढावा घेण्यात आला. नांदगाव येथील बालकाच्या मृत्यूचे अन्वेषण करताना डॉ. गिते यांनी अतिशय सखोलतेने याबाबत शोध घेण्याचा प्रयत्न केला. सदर बालकाला वाचविता आले असते का, याबाबत सर्व समिती सदस्यांसमोर चर्चा केली. तसेच उपस्थित आरोग्यसेविका व वैद्यकीय अधिकारी यांच्या कामाची तपासणी केली. यामध्ये जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या मातृत्व अप मध्ये माता व बालकाची नोंदणी व रजिस्टरची पडताळणी केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार करताना वैद्यकीय निदान करण्याबरोबरच सामाजिक कारणांचीही चिकिस्ता करून मार्गदर्शन करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. होले, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, बालरोग तज्ज्ञ डॉ. पंकज गाजरे आदि उपस्थित होते.

पंधरवाड्यात जनजागृती

अतिसार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सुरू झालेल्या विशेष अतिसार नियंत्रण पंधरवड्याबाबत आढावा घेण्यात आला. यात सर्वेक्षण, प्रशिक्षण व झिंक गोळ्यांचा चांगला वापर करून येणाऱ्या पावसाळ्यात अतिसारामुळे बालमृत्यू कमी व्हावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे तसेच पाणी नमुने तपासनी, टीसीएल तपासणी करण्याच्या सूचना डॉ. गिते यांनी दिल्या. या पंधरवड्यात अतिसाराविषयी जनजागृती करण्यात येणार असून हात धुवा प्रात्यक्षिक, जनजागृती फेरी काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे यांनी दिली. या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे, प्रतिभा संगमनेरे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे, कार्यकारी अभियंता बापू साळुंके, संजय नारखेडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाबजबाब घेण्यास सुरुवात

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या बेपत्ता इंजिनीअर रवींद्र पाटील प्रकरणी पोलिसांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवण्याचे काम हाती घेतले आहे. पाटील यांच्यावर कामाचा ताण होता, अशी कबुली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीच दिली असून, पाटील यांच्या शोधासाठी पोलिसांचे सर्वच पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत.

महापालिकेच्या कार्यालयीन त्रासाला कंटाळून जीवन संपवत असल्याचा उल्लेख असलेली सुसाइड नोट ठेवून शनिवारी पहाटे बेपत्ता झालेले पाटील यांचा तीन दिवसांपासून कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. पोलिसांना सोमवारी दुपारी पाटील शिर्डी येथे असल्याची कुणकुण लागली होती. मात्र, पोलिसांसह त्यांच्या नातेवाइकांनी प्रत्यक्ष शिर्डी येथे भेट दिली असता ती अफवाच निघाली. या गुन्ह्यातील गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी तीन वेगवेगळी पथके तैनात केली आहेत. मात्र, पाटील आपला मोबाइल सोडून गेलेले असल्याने तपासाला गती मिळू शकलेली नाही. याबाबत बोलताना सूत्रांनी सांगितले, की या प्रकरणात महापालिका वर्तुळात घडलेल्या घडामोडी महत्त्वाच्या आहेत. हायकोर्टाचा मनाई हुकूम असताना महापालिकेने एका लॉन्सचे बांधकाम पाडले. या प्रकरणात पाटील यांचा थेट संबंध असल्याने त्यांच्यावर वरिष्ठांकडून दबाव येत होता. त्यातच हायकोर्टाने महापालिकेने केलेल्या चुकीबाबत दोषी ठरवत सदर डलेले बांधकाम पूर्ण करून देण्याचे आदेश दिले. यात पाटील यांच्यावर कारवाई करण्याबाबत चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे पाटील शनिवारी सकाळी घरातून बाहेर पडले, ते पुन्हा परतलेच नाहीत. महापालिकेच्या किती अधिकाऱ्यांचे जबाब घेतले आणि त्यात त्यांनी कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव घेतले, याबाबत बोलण्यास पोलिसांनी नकार दिला. अद्याप काम संपलेले नसून, पाटील सापडणे महत्त्वाचे असल्याचे संबंधितांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभियंत्याचे गूढ वाढले!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या नगररचना विभागातील सहाय्यक अभियंता रवींद्र पाटील तीन दिवसांपासून बेपत्ता असून, अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे त्यांच्या बेपत्ता होण्याचे गूढ अधिकच वाढले आहे. दुसरीकडे पाटील यांचा अद्याप थांगपत्ता लागत नसल्याने कुटुंबावरील तणाव वाढला आहे. पोलिस, महापालिका अभियंत्यांसह नातेवाइकांनीही आता पाटील यांचा शोध सुरू केला आहे. यामुळे अफवांनाही ऊत आला असून, शिर्डी येथे पाटील सापडल्याची अफवा सोमवारी पसरली होती.

महापालिकेच्या नगररचना विभागातील सहाय्यक अभियंता कामाच्या अतिताणामुळे शनिवारी सकाळपासून बेपत्ता झाले आहेत. अतिकामाच्या ताणामुळे आपण जीवन संपवत असल्याचे चिठ्ठी नमूद केल्याने महापालिकेतील कामकाजाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाटील संवेदनशील अधिकारी असल्याने त्यांच्या बेपत्ता होण्याचा धसका कुटुंबीयांसह आप्तेष्ट व महापालिकेतील त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला आहे. पोलिसांनी पाटील यांच्या शोधासाठी तीन पथके तैनात केली आहेत. शनिवारपासून सलग तीन दिवस त्यांचा शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे कुटुंबाचा तणाव अधिकच वाढला आहे. कुटुंबाच्या भेटीसाठी येणाऱ्यांचीही गर्दी मात्र वाढली आहे. पोलिसांप्रमाणेच पाटील यांचा शोध महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी, तसेच नातेवाईकही घेत आहेत. मात्र, अद्याप त्यांचा सुगावा लागला नसल्याने कुटुंबासह नातेवाइकांची चिंता वाढली आहे.

शिर्डीची अफवा

पाटील सोमवारी शिर्डी येथे एका मंदिरात सापडल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यामुळे पाटील सापडल्याने त्यांचे आप्तेष्ट व कुटुंबाला थोडा दिलासा मिळाला होता. मात्र, पाटील सापडल्याची माहिती नंतर अफवाच असल्याचे समोर आले आहे. असा काही प्रकार झाला नसल्याचे शिर्डी पोलिसांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images