Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अपहार

$
0
0

पतसंस्थेच्या नावाखाली

५ लाखांचा अपहार

देवळाली कॅम्प : पाच लाखांचा अपहार केल्याप्रकरणी १५ महिलांवर देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी फिर्यादी रमेशकुमार ठाकूरदास चक्रवर्ती (रा. आडकेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. तेजा पारुंडेकर, अंजली बापट, आरती जोशी, सुषमा कार्ले, अलका स्वादी, शुभदा जोशी, शरयू बर्वे, सीमा धोपावकर, माधुरी शिखरे, सुषमा कुलकर्णी, अश्विनी वैद्य, स्मिता मराठे, अनुराधा देशमुख, प्राची पेंडसे यांनी विद्या महिला नागरी पतसंस्थेच्या नावाखाली नागरिकांकडून पाच लाख रुपये गोळा केले. मात्र, संस्थेचा थांगपत्ता लागू नये म्हणून पंचवटीत नंदिनी नावाची नवी पतसंस्था काढली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मागासवर्ग आयोगाकडे ५३५ अर्ज

$
0
0

मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यात लवकरच सर्वेक्षणाला होणार सुरुवात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या निकषावर मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे, अशी मागणी करणारी तब्बल ५३५ निवेदने राज्य मागासवर्ग आयोगाला सोमवारी प्राप्त झाली. काहींनी पती मराठा आणि पत्नी कुणबी असल्याचे तर काहींनी आजोबा कुणबी तर नातूच्या दाखल्यावर मराठा असा उल्लेख असल्याचे पुरावे आयोगाकडे सादर केले. नाशिक जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील १० गावांमध्ये लवकरच सर्वेक्षण सुरू करणार असल्याची माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी सर्व स्तरावरून जोर धरू लागली आहे. परंतु, आरक्षण देणे अथवा न देण्याची प्रक्रिया क्लिष्ट असून त्यासाठी समाजमनाचा वेध घेणेही अनिवार्य आहे. याचसाठी हा आयोग प्रत्येक विभागात तसेच तेथील मोठ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन सूनावणी घेतो आहे. विविध संघटना तसेच नागरिकांची निवेदने स्वीकारण्यात येत आहेत. राज्यात आतापर्यंत नऊ ठिकाणी सुनावण्या झाल्या असून नाशिकमधील ही दहावी सुनावणी होती. यावेळी आयोगाचे अध्यक्ष एम. जी. गायकवाड, डॉ. डी. डी. बाळसराफ, डॉ. प्रमोद येवले, सी. व्ही. देशपांडे, सुवर्णा रावळ, डॉ. भूषण कर्डिले, सुधीर ठाकरे, डी. डी. देशमुख आदी उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यातील काही संघटना तसेच व्यक्तींनी सकाळी ११ ते सायंकाळी पाच यावेळेत आयोगाला तब्बल ५३५ निवेदने दिली. सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या निकषावर मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे असा बहुतांश निवेदनांचा सूर आहे. तर आमच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळणार असेल तर त्यास आमची हरकत नसल्याची निवेदनेही आयोगाला प्राप्त झाली आहेत. पत्नी कुणबी तर पती मराठा असल्याचे तसेच आजोबांच्या दाखल्यावर कुणबी तर नातवाच्या दाखल्यावर मराठा असल्याचे पुरावे काही नागरिकांनी आयोगाला सादर केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष एम. जी. गायकवाड यांनी दिली. हे पुरावे अभ्यासण्यात येणार आहेत. एकीकडे अशा सुनावण्या घेतल्या जात असताना राज्यातील सहा विभागांमधील सर्व जिल्ह्यांत सर्वेक्षणदेखील करण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पाच तालुके, त्यामधील प्रत्येकी दोन गावे, तसेच एक महापालिका व नगरपालिकेत सर्वेक्षण करण्यात येत आहे. मराठवाड्यातील सर्वेक्षण पूर्ण झाले असून कोकणातही सर्वेक्षण केले जात आहे. नाशिकमध्येही असे सर्वेक्षण लवकरच केले जाणार असल्याची माहिती यावेळी आयोगाने दिली. त्यासाठी एक हजार व तीन हजार लोकसंख्या असलेली गावांची निवड करण्यात येत असून अशा गावांमध्ये मराठा समाजबांधवांची संख्या लक्षणीय असावी, असा निकष ठेवण्यात आला आहे. सुनावणी तसेच सर्वेक्षणाच्या अहवालांचा अभ्यास करून आयोग त्यांचा अहवाल सरकारला सादर करणार आहे. ५ जून रोजी जळगावमध्ये सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यामध्ये जळगावसह धुळे आणि नंदुरबार येथील नागरिक तसेच संघटनांना निवेदने सादर करता येणार आहेत. त्यानंतर २९ जून रोजी पुण्यात सुनावणी घेण्यात येणार आहे.

आधारतीर्थच्या चिमुकल्यांकडूनही निवेदन

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील अनेक मुले सध्या त्र्यंबकेश्वर रोडवरील आधारतीर्थ येथे वास्तव्यास आहे. या मुलांनी दुपारी आयोगाची भेट घेऊन आरक्षणाबाबतचे निवेदन दिले. याखेरीज अखिल भारतीय युवक मराठा महासंघ, छावा क्रांतीवीर संघटना, सुकाणू समिती मराठा मोर्चासह अनेक संघटनांनी आयोगाला निवेदने सादर केली. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विश्रामगृहाच्या परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तप्त झळांनी नाशिककर त्रस्त!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही चाळीशीपर्यंत पोहोचलेल्या तापमानानी नाशिककरांना हैरान केले आहे. तप्त झळांचा सकाळी नऊ, दहा वाजेपासून सामना करावा लागत आहे. यंदा मान्सून एरवीपेक्षा लवकर दाखल होणार असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आल्याने उन्हाच्या झळांना त्रासलेल्यांकडून पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.

गेल्या आठवड्यात निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे शहरवासीयांना पावसाची आस लागली होती. मात्र, या आठवड्यात पुन्हा झालेल्या तापमानवाढीने नाशिककरांच्या अंगाची काहिली होत आहे. या परिस्थितीमुळे गरजेशिवाय दिवसा बाहेर पडणेही टाळण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात २३ मे रोजी ३६.३ असलेले तापमान २७ मेपर्यंत ४० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले होते. बाहेर पडणे टाळले तरी घरांमध्येही झळा सोसाव्या लागत असून लहान मुलं व वयोवृद्धांना या तापमानाच्या परिणामांचा सामना अधिक करावा लागत आहे. काही वर्षांमध्ये नाशिकमधील कडाक्याचा उन्हाळा चर्चेचा विषय ठरत असून शहराची थंड शहर म्हणून असलेली ओळखही त्यामुळे पुसू लागली आहे.

सायंकाळी गजबजतेय शहर

दिवसभर असलेल्या उन्हामुळे बाहेर जाणे टाळले जात असून ऊन ओसरण्याची वाट बघितली जात आहे. त्यामुळे दिवसभर मोकळे असलेले रस्ते सायंकाळनंतर गजबजत आहे. शहरातील उद्याने, गोदाघाट, मॉल्स अशा वेगवेगळ्या ठिकाणी विरंगुळा करण्यासाठी पसंती दिली जात आहे. तसेच उन्हाची काहिली मिटवण्यासाठी थंडगार पदार्थांना प्राधान्य दिले जात असून लस्सी, बर्फ गोळा, ऊसाचा रस, आइस्क्रिम पार्लरमध्येही गर्दी दिसत आहे.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नराधमास १५ वर्षांची कैद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दमबाजी करून १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला सोबत घेऊन तिच्यावर तीन वेगवेगळ्या ठिकाणी वर्षभर पाशवी अत्याचार करणाऱ्या नराधमास जिल्हा कोर्टाने दोषी ठरवत १५ वर्षे कैदीची शिक्षा ठोठावली.

विजू वाल्मीक भुसारे उर्फ विजू एकनाथ माळी (२०) असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी मुसळगाव (ता. सिन्नर) येथील पीडितेच्या वडिलांनी सिन्नर पोलिसात फिर्याद दिली होती. आरोपी विजूने २५ डिसेंबर २०१४ रोजी मुसळगाव येथील १५ वर्षाच्या मुलीस दमबाजी केली. 'तू माझ्यासोबत आली नाही तर आत्महत्या करेन', अशी धमकी देत आरोपीने मुलीला सोबत येण्यासाठी दबाव टाकला. यानंतर मुलीला घेऊन आरोपी कन्नड तालुक्यातील लव्हाली शिवारात (जि. औरंगाबाद) ऊस तोड सुरू असलेल्या ठिकाणी घेऊन गेला. येथे त्याने मुलीवर अत्याचार केला. यानंतर एका वीटभट्टीच्या कामाच्या ठिकाणी तर नंतर आरोपीच्या मूळ गावी म्हणजे वैजापूर तालुक्यातील माणकी या गावी घेऊन गेला. सुरुवातीस गोड बोलणाऱ्या आरोपीने मुलीवर अनन्वित अत्याचार केला. मुलीला घराबाहेर पडायची सुद्धा बंदी त्याने केली. अनेकदा आरोपीने हातपाय बांधून मुलीवर अत्याचार केले. १४ ऑगस्ट २०१५ रोजी संधी साधून १५ वर्षाची मुलगी घरातून बाहेर पडली. यावेळी ती गर्भवती होती. तिथे काही जणांच्या मदतीने सिन्नर गाठून घरच्यांपुढे आपली कैफियत मांडली. वडिलांनी लागलीच पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कारासह कलम ३२३ नुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या कोर्टात झाली. सरकारी पक्षातर्फे अॅड. शिरीष कडवे यांनी नऊ साक्षिदार तपासले. घरी आलेली अल्पवयीन मुलगी गर्भवती होती. त्यामुळे तिच्या मर्जीनुसार गर्भापात करण्यात आला. यावेळी सरकारी पक्षाने सदर अर्भकाची डीएनए टेस्ट करून घेतली. यात सदर अर्भकाचा बाप आरोपीच असल्याचे निष्पन्न झाले. तसे पुरावेही कोर्टात मांडण्यात आले. अल्पवयीन मुलीवर अमानवी अत्याचार केल्याने आरोपीला अधिकाधिक जास्त शिक्षा देण्याची विनंती अॅड. कडवे यांनी केली. कडवे यांची विनंती न्यायाधीश शिंदे यांनी मान्य करीत आरोपीला बलात्काराच्या गुन्ह्यात १५ वर्षे कैद तर तीन हजार रुपयांचा दंड ठोठवला.

१० लाखांची मदत

पीडित युवती आदिवासी आणि गरिब कुटुंबातील असून, तिला मनोधैर्य योजनेतंर्गत १० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. न्यायाधीश सूर्यकांत शिंदे या कमिटीचे अध्यक्ष असून, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मनोधैर्य योजनेचे काम चालते. पीडिता अल्पवयीन असून, तिच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद होणे आवश्यक असल्याचे मत शिंदे यांच्यासह प्राधिकरणाचे सचिव एस. एम. बुक्के यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्टरोड कामासाठी वाहतूक मार्गात बदल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी योजनेतंर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका या रस्त्याचे काम सुरू होणार असून, या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. रस्त्याचे काम सोमवारपासून सुरू होणार असल्याचे सांगितले जात होते. प्रत्यक्षात येथील वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेला नव्हता.

मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असून, वाहतुकीतील हा बदल तीन महिन्यासाठी असणार आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका हा पायलट प्रोजेक्ट असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा कायापालट होणार आहे. अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाकापर्यंतचा मार्ग (काम सुरू असलेली बाजू) सर्व प्रकारच्या वाहनांना बंद करण्यात आली आहे. मात्र, दुसऱ्या बाजूने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना एकाच लेनमध्ये मार्ग खुला असणार आहे. सदर मार्गावर एकाच लेनमधून सर्व प्रकारच्या वाहतुकीस जाण्या-येण्यासाठी सुरू करण्यात असून, सदर मार्गावर थांबणे, पार्किंग, बस-रिक्षाथांबा असणार नाही. पादचाऱ्यांना या काळात भूयारी मार्गाचा वापर करता येणार आहे.

अशोकस्तंभाकडून सीबीएसकडे जिल्हाधिकारी कार्यालय, एसबीआय बँकेकडे (ट्रेझरी) जाणाऱ्या वाहनांना सदर मार्ग बंद असणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा ट्रेझरीत जाणाऱ्या वाहनांना अशोकस्तंभाहून आर. के. सांगली बॅँक सिंग्नल, शालिमार, शिवाजीरोड, सीबीएसमार्गे कोर्टात तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात वाहन घेऊन जाता येईल किंवा अशोकस्तंभाहून गंगापूरनाका, कॅनडा कॉर्नर, टिळकवाडी सिग्नलमार्गे सीबीएस मार्गाने कोर्टात, जिल्हाधिकारी कार्यालयात जाता येईल. अशोकस्तंभाकडून त्र्यंबक नाक्याकडे जाणाऱ्या चारचाकी आणि तीनचाकी वाहनांना प्रवेशबंद असणार आहे. मात्र, दुचाकीसाठी मार्ग खुला असेल. ठेकेदाराने सोमवारी डिमार्केनेशनचे काम हाती घेतले होते. त्यामुळे रस्ता बंद करण्यात आला नव्हता. मंगळवारी (दि. २९) मात्र प्रत्यक्ष काम हाती घेतले जाणार असून, वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपाचे अधिकारी, कर्मचारी दहशतीखाली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेचे नगररचना विभागातील सहाय्यक अभियंता रवींद्र पाटील अतिकामाच्या ताणापायी बेपत्ता झाल्याने अधिकारी व कर्मचारी चांगलेच धास्तावले आहेत. सकाळी नऊ ते रात्री उशिरापर्यंत महापालिकेतच काम करावे लागत असल्याने अनेक अधिकारी व कर्मचारीसुद्धा तणावाखाली आले असून, दडपणाच्या विरोधात आवाज उठवण्याची मानसिकता केली आहे. एकीकडे अधिकारी व कर्मचारी तणावाखाली काम करीत असताना, कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संघटनांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भीतीपायी तोडांवर बोट ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आयुक्त मुंढे आल्यापासून अधिकारी व कर्मचाऱ्यांमागे कामाचा दट्टा वाढला आहे. मुंढेंनी आल्यापासून कारवाईचा सपाटा सुरू केला असून, नागरिकांच्या तक्रारीसाठी एनएमसी ई कनेक्ट अॅप सुरू केले आहे. त्यात चोवीस तासांत तक्रार उघडणे बंधनकारक करण्यात आले आहे. तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास कारणे दाखवा नोटिसांसह निलंबनाची कारवाई केली जात आहे. अगोदरच मनुष्यबळ कमी असताना, कामाचा ताण वाढला आहे. अधिकाऱ्यांना तर सकाळी नऊ वाजता कार्यालयात हजर व्हावे लागते. मात्र, घरी जाण्याची वेळ निश्चित नसते. मुंढेंकडून थेट अधिकाऱ्यांना वेळेचे बंधन न पाळता कामासाठी आग्रह धरला जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांपाठोपाठ अधिकारीही आता निलंबनाच्या भीतीने तणावाखाली काम करीत आहेत. नागरिकांच्या तक्रारी या मोघम असल्याने त्यांची वेळेत शहानिशा होत नाही. मात्र, आयुक्तांची कारवाईची भीती त्यांना चोवीस तास सतावत असते. या तणावामुळेच पाटील चार-पाच दिवसांपासून तणावाखाली होते. कामाच्या अतिताणापायीच पाटील यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे आपल्यावरही अशी वेळ येऊ नये, यासाठी कर्मचारी व अधिकारी आता आयुक्तांविरोधात आवाज बुलंद करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधत, यातून बाहेर कसे पडायचे याची चाचपणी सुरू केली आहे.

संघटना झाल्या बाहुल्या

एकीकडे कर्मचारी व अधिकारी अस्वस्थ असताना त्यांच्या संरक्षणासाठी व हक्कासाठी असलेल्या संघटना आयुक्तांचे बाहुले बनल्या आहेत. नाशिक म्युनिसिपल कर्मचारी सेना या संघटनेच्या अध्यक्षांनी अद्याप उघड भूमिका घेतलेली नाही. अधिकारी संघटनेचे प्रमुख असलेले अग्निशमन दल विभागाचे महाजन हेच आयुक्तांच्या दहशतीखाली आहेत. त्यामुळे आयुक्तांविरोधात आवाज कुणी उठवायचा, असा प्रश्न अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे. त्यामुळे नवीन संघटना स्थापन करता येते काय, याची चाचपणी सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयितांच्या कोठडीत वाढ

$
0
0

सातपूर : एमआयडीसीतील एका बारमध्ये मद्य पिण्यावरून झालेल्या वादात हर्षल साळुंखे या तरुणाचा मृत्यूप्रकरणातील तिघा संशयितांना न्यायालयाने सोमवारी पुन्हा दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तसेच कंपनी व्यवस्थापन व सीटू कामगारांमध्ये झालेल्या वादात प्रवीण मेटकर या कामगार मारहाण प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तीन कामगारांना न्यायालयाने सोमवारी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, याच गुन्हातील आरोपी डॉ. डी. एल. कराड यांना अद्याप अटक झालेली नाही. फायनन्स कंपनीत वसुलीचे काम करणाऱ्या स्वप्नील पुंड या तरुणाच्या आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी माधुरी घावटे या महिलेस कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी भरण्याच्या वादात तरुणाचा खून

$
0
0

काही तासांत संशयितास जेरबंद

म. टा. वृत्तसेवा, सिडको

अंबड एमआयडीसीत एका कंपनीत मशिनमध्ये पाणी भरण्यावरून दोघांमध्ये झालेल्या वादाचे रुपांतर खुनात झाले असून यात ग्यानेंद्रकुमार रामसेवक वर्मा (२०, रा. पांडवनगरी) याचा खून झाला आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा झाल्यानंतर काही तासांच्या आतच पोलिसांनी तपास करून संशयितास ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की अंबड एमआयडीसीतील आशापुरा रबर उद्योग या कंपनीत ही घटना घडली. कंपनीत ग्यानेंद्रकुमार रामसेवक वर्मा आणि घनश्याम देविदास मोरे (३६, रा. रामकृष्णनगर, अंबड) यांच्यात वाद झाले. याप्रसंगी मोरे याने रबर कापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चाकूने ग्यानेंद्रकुमारच्या मानेवर वार केला. ग्यानेंद्रकुमार गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती पोलीसांना मिळताच सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे व अंबडचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी असलेला चाकू पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कंपनीतून पळून गेलेल्या मोरे याचा तपास सुरू केला. यानंतर काही तासात पोलिसांनी मोरेला ताब्यात घेतले. याप्रकरणी रणजीतकुमार वर्मा यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मोरे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विजय पवार करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अध्यात्माची भक्ती जोपासली गेली पाहिजे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मी अनेक वर्षे कॉर्पोरेट कंपनीत काम केले आहे. सध्या स्वत: कंपनीचा मालक आहे. कॉर्पोरेटविश्वात काम करणाऱ्यांकडे अध्यात्मासाठी वेळ नसतो. त्यांच्यावर कामाचा मोठा ताण असतो, असे अनेकांकडून सांगितले जाते. मात्र, कर्म करण्यात व्यस्त असताना दुसरीकडे अध्यात्माचा विसर पडतो. त्यामुळे जीवनात सुख आणि आनंदाची प्राप्ती करायची असेल तर अध्यात्माची भक्ती जोपासली गेलीच पाहिजे, असे प्रतिपादन पुणे येथील डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे यांनी येथे व्यक्त केले.

गोदाघाटावरील यशवंतराव महाराज पटांगणावर आयोजित वसंत व्याख्यानमालेत सोमवारचे पुष्प गुंफताना डॉ. देखणे बोलत होते. स्व. डॉ. वि. म. गोगटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'कॉर्पोरेट कर्मयोग' या विषयावर हे व्याख्यान झाले. या वेळी डॉ. देखणे यांनी विचार व्यक्त केले. ते म्हणाले, की जीवनात अधिक पैसा व श्रीमंती मिळाली म्हणजे सुख व आनंदाची प्राप्ती होऊ शकेल असे नाही. आजच्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये लाखो लोक नोकऱ्या करतात. त्यांना हजारो रुपयांपासून लाखो रुपयांचे पॅकेजही मिळतात. मात्र, एवढा पैसा मिळवूनही त्यांना सुख व आनंद मिळत नाही. त्याउलट कामाचा तणाव, वेळेचा अभाव, संघर्ष, अनारोग्य यांचाच सामना करावा लागतो. त्यामुळे जीवनात खऱ्या अर्थाने सुख व आनंद मिळवायचा असेल तर अध्यात्माची गोडी लावली पाहिजे.

या वेळी विकास गोगटे, विवेक गोगटे, विनिता गोगडे, अनिता गोगटे आदी उपस्थित होते. अरुण शेंदुर्णीकर यांनी स्व. गोगटे यांना आदरांजली अर्पण केली. या वेळी संगीता बाफना, श्रीकांत बेणी आदी उपस्थित होते.

आजचे व्याख्यान

वक्ते : संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख

विषय : उच्च शिक्षणाची गुणवत्ता : एक मोठे प्रश्नचिन्ह

स्थळ : यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदुरबारात १४० बंद कुपनलिकांचे पुनर्भरण

$
0
0

डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या उपक्रमाने वाढली भुजलपातळी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार शहरात रेवंदडा (ता. अलिबाग, जि. रायगड) येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जिल्ह्यात राबविलेल्या जलसंधारणाच्या पॅटर्नने भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. बंद कुपनलिकांना पुनर्जीवित करण्याचे काम यातून झाले. प्रतिष्ठानने राबविलेल्या कार्यक्रमात गेल्यावर्षी या काळात दहा मिनिटेही न चालणारे बोअरवेल निवडण्यात आलेले होते. ते सध्या पाऊण तास चालत आहेत.

सामाजिक उपक्रमांवर भर असलेल्या धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जलपुनर्भरण प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे. यात बंद कुपनलिका व विहीर पुनर्भरण करण्यात येत आहे. प्रतिष्ठानच्या सदस्यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यांच्याकडून हे काम पूर्णपणे मोफत करण्यात येत आहे. त्यांना फक्त साहित्य आणून द्यावे लागते. यामध्ये नंदुरबार शहरात प्रतिष्ठानने १४० ठिकाणी पूर्णपणे बंद तसेच कमी पाणी असलेल्या कुपनलिका निवडून तेथे असे काम झाले आहे.

कुपनलिका पुनर्भरण म्हणजे...
पावसाळ्यात छतावरील वाहून जाणारे पाणी पाईपच्या मदतीने घराजवळच्या कुपनलिकेला जोडून सोडले जाते. यासाठी कोळसा, वाळू, खडी, बारीक वाळूचा उपयोग करुन एक फिल्टरदेखील तयार केले जाते. पावसाळ्यात किमान १५ ते २० वेळा या पद्धतीने कुपनलिकेतून पाणी शेकडो फूट जमिनीखाली सोडले जात असल्याने या भागातील जलपातळी वाढण्यास मदत होते. याचप्रकारे विहीर पुनर्भरणदेखील केले जाते. कमी खर्च आणि सोपा असलेला हा प्रकल्प लाभदायक आणि पथदर्शी आहे. अनेकांना याचा लाभ झाला असून, दरवर्षी मार्चपासूनच केवळ हंडाभर पाणी कुपनलिकेतून येत असे, मात्र जलपुनर्भरणानंतर या मे महिन्यातही ३ तासांपेक्षा अधिक पाणीउपसा होत आहे, असे मत डॉ. सुनील पाटील यांनी व्यक्त केले.

गेल्यावर्षी धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून जलपुनर्भरणाचे काम करून घेतल्यानंतर यंदा मे व जून महिन्यातही किमान ४ ते ५ तास कुपनलिकेतून पाणी मिळत आहे.
-भरत निकुंभे, ग्रामविकास अधिकारी, नंदुरबार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यम्मी टिफिन स्पर्धा अन् स्टार्टर मेकिंग!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जून महिन्यात मुलांच्या शाळा सुरू झाल्या, की दररोज टिफिनमध्ये काय द्यायचे हा प्रश्न त्यांच्या आईसमोर उभा राहतो. पदार्थ हेल्दी असण्याबरोबरच तो टेस्टीही असायला हवा, अशी मुलांची मागणी पूर्ण करता करता त्यांची दमछाक होते. त्यासाठी वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या चोखंदळ महिलांसाठी चटक मटक यम्मी टिफिन बॉक्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

येत्या शनिवारी (दि. २ जून) दुपारी १२.३० वाजता अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, त्र्यंबकरोड येथे ही स्पर्धा होणार आहे. याच ठिकाणी दुपारी ३ वाजता मॉन्सून स्पेशल स्टार्टर मेकिंग वर्कशॉपही आयोजित करण्यात आले आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या नाशिक आवृत्तीच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त 'मटा'तर्फे विविध कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर चटक मटक यम्मी टिफिन बॉक्स कॉम्पिटिशन आणि मॉन्सून स्पेशल स्टार्टर मेकिंग वर्कशॉप आयोजन करण्यात आले आहे.

स्वयंपाकघरात जाऊन नवनवीन पदार्थ बनविण्याची आवड अनेकांना असते. केवळ गरज म्हणून नाही तर स्वत:ची कल्पकता लढवून त्या पदार्थांमध्ये ट्विस्ट आणणे अनेकांना उत्तमरीत्या जमते. अशा व्यक्तींच्या पाल्यांचा टिफिनही तितकाच स्पेशल असतो. या स्पर्धेद्वारे असे पदार्थ सर्वांसमोर सादर करण्याची संधी मिळणार आहे. मॉन्सून स्पेशल स्टार्टर मेकिंग वर्कशॉपमध्ये पालक चीज कटलेट ओट्स टिक्की, लौकी कबाब असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टर कसे करायचे याविषयी विवेक सोवनी मार्गदर्शन करणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असून, त्यासाठी ०२५३ - ६६३७९८७ या क्रमांकावर किंवा महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड या पत्त्यावर संपर्क साधावा.

स्पर्धेसाठीचे नियम...

स्पर्धेला येताना स्पर्धकांनी पदार्थ बनवून आणावा, पदार्थ स्पर्धकांनी स्वतः बनविलेला असावा, स्पर्धेच्या ठिकाणी सजावटीसाठी कुठल्याही प्रकारचे साहित्य उपलब्ध होणार नाही, स्पर्धेसाठी पदार्थ तिखट किंवा गोड कुठल्याही प्रकारचा चालेल, स्पर्धा दुपारी १२.३० वाजता सुरू होईल, स्पर्धेच्या ठिकाणी १५ मिनिटे अगोदर यावे, उशिरा आलेल्या स्पर्धकांना प्रवेश देण्यात येणार नाही, स्पर्धेत भाग घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य असून, त्यासाठी फी नाही, परीक्षकांचा निकाल अंतिम राहील

(मटा कल्चर क्लब लोगो, ७व्या वर्धापनदिनाचा लोगो, फेसबुक, ट्विटर लिंक, क्यू आर कोड वापरावा.)

स्पॉन्सर्स लोगो बातमीत समाविष्ट असल्याने बातमी नाशिक प्लसच्या पहिल्या पानावर घ्यावी.

स्पॉनर्स लोगो स्टेटस = पॉवर्ड बाय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळवणमध्ये बहिरम यांचा मार्ग मोकळा?

$
0
0

कळवण : कळवण नगरपंचायतीसाठी उर्वरित अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. मंगळवारी माघारीच्या अखेरच्या दिवशी निर्धारित वेळेत रोहिणी सुनील महाले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडीचे मयूर बहिरम यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागण्याचीच शक्यता असली तरी भाजपच्या सुरेखा जगताप यांचे आव्हान कायम असल्याने निवडणूक घेण्यात येणार आहे.

कळवण नगरपंचायतवर राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. प्रथम नगराध्यक्षा होण्याचा बहुमान सुनीता पगार यांना मिळाला. आता नगराध्यक्षपद आदिवासी राखीव असल्याने भाजपकडून सुरेखा जगताप, काँग्रेस आघाडीकडून काँग्रेसचे मयूर बहिरम यांच्यात समोरासमोर लढत आहे. राष्ट्रवादीच्या माध्यमातून अडीच वर्षे इतर मागासवर्गीय गटातून सुनीता पगार यांनी नगराध्यक्ष पद उपभोगले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे अनुसूचित जमाती गटातून उमेदवार नसल्याने आघाडीचा धर्म पाळत अडीच वर्षे काँग्रेसकडे नगराध्यक्ष पद राहणार आहे. अडीच वर्षाच्या कार्यकाळात एक-एक वर्षांचे रोटेशन ठरवत बहिरम व रोहिणी महाले या दोघांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळणार आहे.

भाजपकडे १७ पैकी केवळ ३ नगरसेवक असून चौथ्या भाजप पक्षाच्या निवड चिन्हावर निवडून आलेल्या भाग्यश्री पगार या विद्यमान उपनगराध्यक्ष असून त्यांनी सुरवातीपासूनच सत्ताधारी आघाडी सोबत राहून नुकतेच उपनगराध्यक्ष पद पदरात पाडून घेतले आहे. आजच उपनगराध्यक्ष पदाची देखील निवड होणार असून,कार्यकाळ पूर्ण न झाल्याने पगार यांचीच फेरनिवड होऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाणा, नामपूरमध्ये मतदान शांततेत

$
0
0

निकालाकडे लागले लक्ष; सटाणा शहरात सर्वाधिक मतदान

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा व नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मंगळवारी अत्यंत शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. तालुक्यातील गोराणे येथील ग्रामस्थांनी मतदानावर टाकलेला बहिष्काराचा अपवाद वगळता इतरत्र शांततेत मतदान झाले.

सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी दहा तर नामपूर येथील बारा मतदान केंद्रावर मतदान झाले. सर्वाधिक मतदान सटाणा शहरातील गणात झाले असून या ठिकाणी ७६ टक्के मतदान झाले. सटाणा येथील मतदान केंद्रात शेतकरी गणासोबतच व्यापारी व आडते गट तसेच हमाल मापारी गट या तिघां गटांचे मतदान असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती. सटाणा गणनिहाय झालेली मतदानाची टक्केवारी : आराई २४ टक्के, सटाणा २४ टक्के, मुंजवाड २४ टक्के, खमताणे २४ टक्के, कंधाणे २४ टक्के, डांगसौदाणे २४ टक्के, तळवाडे दिगर २४ टक्के, चौगाव २४ टक्के, अजमेर सौंदाणे २४ टक्के, वायगाव २४ टक्के.

उद्या मतमोजणी

सटाणा व नामपूर बाजार समितीसाठी गुरुवारी (दि. ३१) मतमोजणी होणार आहे. सटाणा बाजार समितीसाठी येथील प्रशासकीय इमारतीत तर नामपूर येथील मतमोजणी बाजार समितीच्या गोडाउनमध्ये होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण महाजन व सिद्धार्थ भंडारे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लॉट महाग दिल्याने कार घातली अंगावर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्लॉट व्यवहारात फसविल्याच्या संशयातून खरेदीदाराने पैसे परत करण्याची मागणी करीत मूळ मालकाच्या अंगावर कार घातल्याचा धक्कादायक प्रकार अमृतधाम परिसरात घडला. यात मूळ जागामालक जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी संशयितांविरोधात ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैभव ठाकरे (रा. पारिजात अपार्ट. के.के. वाघ कॉलेजमागे) असे संशयिताचे नाव आहे. तर, संदीप प्रभाकर महाले (रा. गंगोत्री विहार, अमृतधाम) हे या घटनेत जखमी झाले आहेत. महाले यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी (दि. २६) दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गंगोत्री विहार परिसरातील गार्डनजवळ फिर्यादी ठाकरे उभे होते. यावेळी कारमधून आलेल्या संशयित महालेने, 'तू मला फार महाग प्लॉट दिला. आत्ताच्या आता मला पाच लाख रुपये दे, नाहीतर तुला व तुझ्या कुटुंबीयांना मारून टाकेल' असे धमकावले. थोडा वेळ वादावादी झाली. या वादावर पडदा टाकून ठाकरे आपल्या घराकडे पायी निघाले. मात्र, संतप्त महालेने आपल्या कारने त्यांना धडक दिली. या घटनेत महाले जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक योगिता पवार करीत आहेत. शहरात जमीन खरेदी विक्रीबाबत फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. मात्र, वादातून थेट ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना पहिल्यांदाच समोर आली असून, घटनेचा सविस्तर तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१८ हजार विद्यार्थ्यांची अकरावीसाठी नोंदणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इयत्ता अकरावीसाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत आतापर्यंत नाशिक शहरातून सुमारे अठरा हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्य महामंडळाचा दहावीचा निकाल अद्याप लागणे बाकी असले तरीही या प्रक्रियेतील पहिला भाग भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आठवड्यापासून वाढीस लागली आहे. अकरावीसाठी शहरातील ५७ कनिष्ठ कॉलेजेसमध्ये सुमारे २७ हजारावर जागा आहेत.

शिक्षण विभागाकडून मंगळवारी सायंकाळी देण्यात आलेल्या माहितीनुसार नाशिकमधून १७ हजार ८९५ विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेंतर्गत नोंदणी केली आहे. राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती आणि औरंगाबाद या शहरांमध्ये ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. नाशिकमधील एकूण विद्यार्थीसंख्येच्या तुलनेत नोंदणीस आतापर्यंत मिळालेला प्रतिसाद समाधानकारक असल्याचे चित्र आहे. राज्यभरात या सहा शहरांमधून आतापर्यंत एकूण १ लाख ६१ हजार ९३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दरम्यान, मंगळवारी सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला. यामुळे या नोंदणीत येत्या काही दिवसांमध्ये आणखी वेगाने भर पडणार असल्याचा शिक्षण विभागाचा अंदाज आहे. बारावीचा निकाल बुधवारी (दि. ३०) जाहीर होणार आहे. या निकालापाठोपाठ दहावीचा निकाल काही दिवसांच्या अंतराने जाहीर करण्यात येतो. यामुळे आता दहावीचा निकाल जाहीर होताच अकरावीची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महसूलमध्ये बदल्यांचे वारे

$
0
0

कारकूनांपासून नायब तहसीलदारांपर्यंतच्या ५० जणांच्या बदल्या

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महसूल विभागात बदल्यांचे वारे वाहत असून कारकून ते नायब तहसीलदार संवर्गातील ५० कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी जारी केले. या कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी १ जून रोजी हजर होण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. एका पदावर तीन-तीन वर्षांचे दोन कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रामुख्याने बदल्या करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया अटळ आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अख्त्यारीत १५ तहसील कार्यालयांसह टंचाई, महसूल, निवडणूक, ग्रामपंचायत, रोजगार हमी अशा विविध शाखा कार्यरत आहेत. या शाखांसह तहसील कार्यालयांच्या अख्त्यारित काम करणाऱ्या, कारकून, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार या संवर्गातील सुमारे ५० कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या नियतकालिक बदल्यांच्या आदेशावर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. हे मंगळवारपासूनच नियोजित सुटीवर जाणार असल्याने त्यांनी सोमवारी रात्री ११.३० पर्यंत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली. हे आदेश मंगळवारी सायंकाळी जारी करण्यात आले. त्यामुळे महसूल वर्तुळात दिवसभर बदल्यांचीच चर्चा होती. कोणाला कोठे बदली देण्यात आली याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न कर्मचारी करीत होते. कोणाला बदली मिळाली, कोण यंदा बदलीच्या ऑर्डरमधून सुटले याचीच चर्चा महसूल वर्तुळात रंगली होती. नियमानुसार दोन वर्षाहून अधिक कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या स्वागत कक्षातील गणेश लिलके आणि टंचाई शाखेतील जीवन राठोड या दोन अव्वल कारकुनांची अनुक्रमे पाथर्डी आणि कोशिंबे (ता. दिंडोरी) येथे मंडळ अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

अशा झाल्या बदल्या

नायब तहसीलदार : ६

अव्व्ल कारकून : २३

कारकून : १२

मंडळाधिकारी : ९

एकूण : ५०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दिवस बँकांचा संप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वेतनवाढीच्या प्रश्नावर देशभरातील बँकचे कर्मचारी दोन दिवसाच्या संपावर जाणार आहेत. त्यामुळे ३० व ३१ मे रोजी बँकेचे व्यवहार ठप्प होणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील ३५० हून अधिक बँकेचे सहा हजार कर्मचारी या संपात सहभाग घेणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँक व जुन्या खासगी बँकेतील ग्राहकांना व्यवहार करण्यात अडचण येणार आहे.

देशभरातील राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या ९ संघटनेचे दहा लाख कर्मचारी युनायटेड फोरम बँक युनियनच्या झेंड्याखाली एकत्र आल्या असून, त्यांनी हा संप पुकारला आहे. हा संप बँक कर्मचारी, अधिकाऱ्याच्या वेतनवाढीच्या प्रश्नांबाबत सरकारच्या उदासीनतेच्या विरोधात आहे. त्याचप्रमाणे इंडियन बँक असोसिएशनतर्फे बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा फक्त २ टक्के प्रस्ताव दिल्याच्या विरोधात असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले. जलद वाटाघाटीतून पगारवाढीच्या प्रश्नावर करार करावा, पगारवाढीच्या करारात श्रेणी एक ते श्रेणी सात अशा सर्व श्रेणीतील अधिकाऱ्यांचा समावेस करावा यासह अनेक मागण्यांचा समावेश आहे.

बँके कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसाठी २ टक्के वाढीचा प्रस्ताव दिल्यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. त्यामुळे सर्व संघटना एकत्र आल्या आहे. बँक कर्मचारी व अधिकारी सुध्दा या संपामुळे असल्यामुळे बँकेचे व्यवहार पूर्णपणे ठप्प होतील व त्याचा फटकाही ग्राहकांना बसणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भावी डॉक्टरांना संवादाचे धडे

$
0
0

jitendra.tarte@timesgroup.com

Twitter : @jitendratarteMT

नाशिक : रुग्णालयातील एखाद्या संवेदनशीलप्रसंगी अलीकडील काळात डॉक्टर आणि रुग्णालयाच्या स्टाफवर वाढत्या हल्ल्यांचे प्रकार विचारात घेत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने मेडिकलच्या विद्यार्थ्यांना संवादाचे धडे देण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयात यंदाच्या शैक्षणिक वर्षात पुढचे पाऊल टाकत तीन सामाजिक संस्थांवर विद्यापीठाने ही जबाबदारी सोपविली आहे. डॉक्टर आणि समाज यांच्यातील सुसंवाद वाढीला लागावा, यासाठी या संस्थांच्या माध्यमातून भावी डॉक्टरांना समतोल संवाद साधण्यासोबत एकूणच व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे दिले जाणार आहेत. जुलैनंतर या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे.

सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनाही या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये जे. जे. रुग्णालय आणि पुण्यातील एका खासगी रुग्णालयात डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या या प्रयत्नाला महत्त्व आहे. हा उपक्रम सर्व वैद्यकीय शाखांमध्ये राबविण्यात येणार आहे. यामध्ये अॅलोपथी, दंतवैद्यक, होमिओपथी, आयुर्वेद, फिजिओथेरपी, नर्सिंग, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच अँड ऑडिओलॉजी या विद्याशाखांमधील विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा घेता येईल. विद्यापीठाने हा उपक्रम कुणासाठीही सक्तीचा केलेला नाही. मात्र, विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतल्यास त्यांच्यातील व्यावसायिक कौशल्य वाढीस लागण्यासाठी याचा फायदाच होणार असल्याचा दावा विद्यापीठ प्रशासनाने केला आहे. संवादकौशल्य किंवा व्यक्तिमत्त्वाच्या अंगाने भावी डॉक्टरांच्या सादरीकरणात कमतरता राहू नये, यासाठी या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना लाभ होईल, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले.

यापूर्वी घडलेल्या अनेक घटनांमध्ये संवेदनशील बनलेले रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यातील पुरेशा संवादाच्या अभावामुळेच डॉक्टरांवर हल्ले झाले असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. रुग्णाच्या काही संवेदनशील स्थितीची माहिती देण्यासाठी डॉक्टर आणि संबंधित स्टाफकडे पुरेसे संवादकौशल्य आवश्यक असते. त्या दृष्टीने या धर्तीवर प्रयत्न झाल्यास आरोग्य अभ्यासक्रमालपलीकडील व्यावसायिक कौशल्यांचा विकास साधण्यासाठी असे उपक्रम उपयुक्त ठरू शकतात, असेही विद्यार्थ्यांचे मत आहे.

अभ्यासक्रमासाठी नाममात्र नोंदणी शुल्क

या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आरोग्य शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तीन सामाजिक संस्थांचे सहकार्य विद्यापीठाच्या वतीने घेतले जाणार आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी सक्तीचा नसेल. या संस्थांना यासाठी वेगळे शुल्क देण्यात येणार नाही. मात्र, जे विद्यार्थी संवादविषयक कौशल्यांसाठी या संस्थांच्या उपक्रमात सहभागी होऊ इच्छितात, त्यांच्याकडून नाममात्र नोंदणी शुल्क घेतले जाईल. महाविद्यालयांमध्ये दिवसभरासाठी किंवा महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या वेळेत काही दिवसांसाठी संवाद आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे सत्र आयोजित करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निहारिका कुटे टॉपर

$
0
0

दहावी 'सीबीएसई'मध्ये शहरातील शाळांचा १०० टक्के निकाल

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आयसीएसई बोर्डाच्या पाठोपाठ सीबीएसई बोर्डानेही मंगळवारी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत हाती आलेल्या या निकालासंदर्भातील माहितीनुसार शहरातील विविध सीबीएसईच्या शाळांमधून सिम्बायोसिस स्कूलची विद्यार्थिनी निहारिका कुटे हिने ९८ टक्के गुण मिळवत पहिला क्रमांक मिळविला. याशिवाय शहरातील सीबीएसई माध्यमाच्या विविध शाळांचा निकाल १०० टक्के लागल्याची माहिती संबंधित शाळांच्या वतीने देण्यात आली.

सिम्बायोसिस स्कूल

सिम्बायोसिस स्कूलमधून दहावीच्या परीक्षेसाठी बसलेल्या सर्व १३२ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. शाळेतून ९८ टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर निहारिका कुटे, दुसऱ्या क्रमांकावर ९६.८ टक्के गुणांसह प्रथम कापुरे, तिसऱ्या क्रमांकावर ९६.६ टक्क्यांसह सोहम करंदीकर या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. या शाळेतून साई पाटील आणि साहील नवले यांनी इंग्रजीत ९७ गुण मिळविले. हिंदी विषयात ९९ गुण मिळविणारे १२ विद्यार्थी ठरले. दोन विद्यार्थ्यांनी मॅथ्समध्ये १०० गुण मिळविले. एका विद्यार्थ्याने सायन्समध्ये ९९ तर तीन विद्यार्थ्यांनी एसएसटी विषयात ९९ गुण मिळविले.

दिल्ली पब्लिक स्कूल

दिल्ली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनीही या परीक्षेत घवघवीत यश मिळविले. या शाळेमधून वैदेही सिन्हा या विद्यार्थिनीने ९७.४ टक्के मिळवित प्रथम क्रमांक पटकाविले. दुसऱ्या क्रमांकावरील वेद शिंदे याने ९७.२ टक्के गुण मिळविले. तर आदित्य राठी या विद्यार्थ्याने ९६.६ टक्के गुणांसह तिसरा क्रमांक पटकाविला. शाळेतील १५ टक्के विद्यार्थ्यांनी सुमारे ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले. ९० ते ९५ टक्क्यांदरम्यान गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकूण विद्यार्थी संख्येच्या ४० टक्के आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी ८६.१८ टक्के असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले. या शाळेतील ११ विद्यार्थ्यांनी संस्कृतमध्ये १००, इंग्रजीमध्ये ५ विद्यार्थ्यांनी ९८, हिंदीमध्ये ३ विद्यार्थ्यांनी ९९, फ्रेंचमध्ये एका विद्यार्थ्याने ९६, मॅथ्समध्ये ७ विद्यार्थ्यांनी ९९, सायन्समध्ये दोन विद्यार्थ्यांनी ९८ तर एसएसटीमध्ये ४ विद्यार्थ्यांनी ९७ गुण मिळविले आहेत.

किशोर सूर्यवंशी स्कूल

यंदा परीक्षेचे स्वरूप बदलले असूनही शाळेची आठ वर्षांपासूनची १०० टक्के निकालाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम राखली असल्याचे किशोर सूर्यवंशी इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका सुदीप्ता सरकार यांनी सांगितले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षक व शालेय संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे.

विद्या प्रबोधिनी प्रशाला

विद्या प्रबोधिनी प्रशालेचाही दहावी सीबीएसई बोर्डाचा निकाल १०० टक्के लागला आहे. या शाळेत वैष्णवी कासार हिने ९६.८ टक्के मिळवित पहिला क्रमांक पटकाविला. प्रथमेश पाटील याने ९६.६ टक्क्यांसह दुसरा क्रमांक पटकाविला तर नेहा कुऱ्हाडे हिने ९६.४ टक्क्यांसह तिसरा क्रमांक पटकाविला. शाळेतील २५ टक्के विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा अधिक गुण मिळविले. ३० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ८० पेक्षा अधिक तर ४० टक्के विद्यार्थ्यांनी ७१ ते ८० टक्कयांदरम्यान गुण मिळविले.

केंब्रिज स्कूल

केंब्रिज शाळेचाही सीबीएसई दहावीचा निकाल १०० टक्के लागला. शाळेतून अनुष्का कुलकर्णी हिने ९६.२ टक्के गुण मिळवून प्रथम, निधी देशक याने ९५ टक्के गुणांसह द्वितीय, समृद्धी डेरे हिने ९५.४ टक्के गुणांसह तृतीय, केतन सुरवसे याने ९५.१ टक्के गुणांसह चतुर्थ आणि जान्हवी सोनावणे हिने ९५ टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळविले. शाळेत १५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सुमारे ९० टक्क्यांवर गुण मिळविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंढेंपाठोपाठ जिल्हाधिकारीही रजेवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे पंधरा दिवसांसाठी रजेवर गेल्याने त्यांचा कार्यभार जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र, तेही कौटुंबिक कारणास्तव शनिवारपर्यंत रजेवर गेल्याने महापालिकेला सध्या कुणी वाली नसल्याचे चित्र आहे.

आयुक्त रजेवर जाताना आपल्या कामाची जबाबदारी कुणाच्या तरी खांद्यावर सोपवून जात असतात. त्यानुसार आयुक्त मुंढे यांनी आपला कार्यभार जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्याकडे सोपवला. मात्र, तेही शनिवारपर्यंत सुटीवर गेल्याने महापालिकेतील काम ठप्प झाले आहे. रविवारी सुटी आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी सोमवारीच कामावर येतील, असा अंदाज आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जाताना महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त किंवा इतर तत्सम अधिकाऱ्याकडे जबाबदारी द्यायला पाहिजे होती. मात्र, ती दिली नसल्याने अडचणीचे होणार आहे. आयुक्त आणि प्रभारी आयुक्त नसल्याने अनेक कामांचा खोळंबा होणार आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत सोमवारपासून कामाची सुरवात होणार होती. मात्र, त्याला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. या कामाचा रोज आढावा सादर करावा, असे आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सांगितले होते. मात्र, आता आयुक्तच नसल्याने कोणाला आढावा सादर करायाचा हा मोठा प्रश्न आहे.

कर्मचाऱ्यांचा सुस्कारा

आयुक्त मुंढे महापालिकेत आल्यापासून कर्मचारी दहशतीच्या सावटाखाली काम करीत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला होता. त्याबाबत आयुक्तांना भेटून निवेदनही दिले होते. मात्र, तरीही आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारत कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले, तर काहींवर निलंबनाची कारवाई केली होती. मध्यंतरी आयुक्त सुटीवर जाणार, अशी चर्चा होती. त्या वेळी आयुक्त पुन्हा कामावर हजर झाले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये निराशा होती. आता आयुक्त खरोखरच सुटीवर गेल्याने कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

अतिरिक्त आयुक्तांकडे जबाबदारी

आयुक्त मुंढे यांनी प्रभारी आयुक्तपदाची धुरा जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवली होती. मात्र, जिल्हाधिकारीही सुटीवर गेल्याने आता महापालिकेची जबाबदीरी अतिरिक्त आयुक्तांवर येऊन पडली आहे. प्रभारी आयुक्तांच्या गैरहजेरीत तातडीची कामे मार्गी लावण्याचे अधिकार अतिरिक्त आयुक्तांना असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images