Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

हॉटेल मालककडून पोलिसास धक्काबुक्की

$
0
0
रात्री उशिरापर्यंत हॉटेल चालवणाऱ्या हॉटेल मालकाविरोधात कारवाई करण्याकरिता गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यास हॉटेल मालकाने आरेरावी करीत धक्काबुक्की करण्याची घटना मंगळवारी रात्री घडली.

बेघरांना मिळणार घरकूल योजनेचा लाभ

$
0
0
तालुक्यातील अनुसुचित जमाती व इतर संवर्गातील जनता मोठ्या प्रमाणात बेघर असून टप्प्याटप्प्याने सगळ्यांना घरकूल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी ग्वाही आमदार उमाजी बोरसे यांनी दिली.

आठवडाभरात पदोन्नती ऑर्डर द्या

$
0
0
नोव्हेंबर २०१२मध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. मात्र, त्याच्या ऑर्डर अद्याप कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली नाही. यावर गेल्या महासभेत जोरदार चर्चा झाली होती.

सातपूर, नाशिकरोड बसस्थानकाचे आधुनिकीकरण करावे

$
0
0
राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नाशिक विभागातील प्रवाशांच्या अडचणी त्वरित सोडवून नाशिककरांना सुखद प्रवासाचा दिलासा द्यावा तसेच सातपूर व नाशिकरोड बसस्थानकाचे आगारासह त्वरित आधुनिकीकरण करावे, असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

सप जळगाव महापालिका निवडणूक लढवणार

$
0
0
समाजवादी पार्टी आपल्या स्वबळावर जळगाव महापालिकेची आगामी निवडणूक लढवणार असल्याचे पक्षाचे नेते आ. अबू आझमी यांनी येथे एका पत्रकार परिषदेत जाहीर केले. याचबरोबर विधानसभेच्या जिल्ह्यातील काही जागा देखील लढवणार असल्याचे सांगितले.

हॉस्टेल प्रवेश : स्टॅम्प पेपरची सक्ती

$
0
0
हॉस्टेलमधील असुविधांची वाच्यता कुठेही करणार नाही, तसेच कोणत्याही हॉस्टेलविरोधी आंदोलनांना साथ देणार, अशी हमीपत्रे आदिवासी विकास विभागाकडून दीडशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर भरून घेतली जात आहेत.

करमणूक कराचे घोडे अडले

$
0
0
शहरातील चार केबल चालकांनी जिल्हा प्रशासनाकडे अद्याप करमणूक कर भरलेला नसून जिल्हा प्रशासनाच्या नोटीसीलाही या केबल चालकांनी केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे या करवसुलीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनीही याबाबत हतबलता व्यक्त केली.

सांगा, मुलीला मारू की आत्महत्या करू?

$
0
0
मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून गेल्या वर्षापासून जातपंचायतीकडून मानसिक छळ केला जातोय. समाजात जगणेच मुश्किल झाल्याने सांगा, मुलीला मारू की आत्महत्या करू, असा हतबल प्रश्न उपस्थित केलाय गंगापूररोडवरील डी. के. नगर येथे राहणाऱ्या अण्णा हिंगमिरे यांनी.

नवाल दाम्पत्य अद्याप बेपत्ता

$
0
0
उत्तराखंडमधील जलप्रलयात अडकलेले नाशिकमधील बहुतांश पर्यटक माघारी परतत असले तरी गंगापूर रोडवरील अल्पना व कैलास हे नवाल दाम्पत्य अद्याप संपर्काबाहेर आहेत.

दिवसाला एक कोर्ट मॅरेज!

$
0
0
धुमधडाक्यात आणि पारंपरिकरित्या विवाह करण्याच्या पद्धतीला फाटा देण्यासाठी कोर्ट मॅरेज करण्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळेच दिवासाकाठी किमान एक कोर्ट मॅरेज होताना दिसून येत आहे.

मुलीला मारा किंवा आत्महत्या करा!

$
0
0
हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील खाप पंचायतींना लाजवेल असा प्रकार पुरोगामी महाराष्ट्रात सुरू असून आंतरजातीय विवाह केला म्हणून जात पंचायतीने ‘मुलीला विष पाज किंवा तू आत्महत्या कर,’ असा भयंकर सल्ला दिल्याची तक्रार एका पित्याने पोलिसांकडे केली आहे.

जिल्हाधिकारी, आयुक्तांना नोटिस

$
0
0
शहरासह जिल्ह्यातील अनेक रस्त्यांच्या कामात पेव्हर ब्लॉक आणि डांबराने वृक्षांचा गळा घोटण्याच्या प्रकाराची गंभीर दखल नाशिक कोर्टाने घेतली आहे. याप्रकरणी कोर्टाने जिल्हाधिकारी विलास पाटील आणि महापालिका आयुक्त संजय खंदारे यांना नोटिस बजावली आहे.

सुरगाणामध्ये पेरणीची कामे जोरात

$
0
0
गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुरगाणा तालुका परिसरात पावसाने समाधानकारक हजेरी लावली. १ जुलैअखेर तालुक्यात १०,०७२ क्षेत्रावर खरीप हंगामाची पेरणी झाली. काही ठिकाणी भाताची लावणीही सुरू झाली आहे.

'मुक्त'च्या पीएचडी ला ग्रीन सिग्नल

$
0
0
२००९ पासून खोळंबलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या पीएच.डी. एक्सप्रेसला लवकरच ग्रीन सिग्नल मिळण्याची चिन्हे आहेत. नव्याने पीएच.डी. प्रक्रिया पूर्ण करण्याचे अधिकार मुक्त विद्यापीठास देण्याबाबतचे सर्क्युलरही युजीसी दरबारी तयार झाले आहे.

राज्यभरातील पीडितांची नाशिकला धाव

$
0
0
जातीतून बहिष्कृत करण्याची बेकायदा कृती करून भोळ्याभाबड्या समाजबांधवाची आर्थिक लूट करणाऱ्या जातपंचाविरुद्ध कारवाई होत असल्याची माहिती समजताच राज्यभरातील भटके जोशी समाजातील पीडितांनी नाशिककडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे.

बँकेच्या नुकसानीचा आज खुलासा होणार

$
0
0
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सुमारे सव्वा सात कोटी रुपयांचे नुकसान झाल्याप्रकरणी सहकार विभागाने बजावलेल्या नोटिसीला संचालक शुक्रवारी उत्तर देणार आहेत. त्यामुळे बँकेच्या नुकसानीबाबत आज खुलासा होऊ शकणार आहे.

इंदिरानगरहून महिलेचे अपहरण

$
0
0
कांदा विक्री व्यवसायात तोटा झाल्याचा राग येऊन धुळे येथील देवरे कुटुंबियांनी गोविंद पार्क, पाथर्डी रोड येथे राहणाऱ्या राजेंद्र शिरोडे यांना धक्काबुक्की करीत त्यांच्या पत्नी सुवर्णा शिरोडे यांचे अपहरण केल्याची घटना नुकतीच येथे घडली.

सहा जातपंचांना अटक

$
0
0
मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून तिच्या पतीसह इतर सदस्यांना जातीबाहेर काढणाऱ्या आणि प्रेमविवाह करणाऱ्या मुलींना मारून टाकण्यास प्रवृत्त करणाऱ्या भटके-जोशी या समाजातील सहा जात पंचांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना गुरुवारी अटक केली.

रेल्वेभरती लाचखोरीत बन्सल

$
0
0
भाच्याने केलेल्या लाचखोरीमुळे मंत्रिपद गमावण्याची नामुष्की आलेले माजी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांना सीबीआयने रेल्वेभरतीतील लाचखोरीच्या प्रकरणात साक्षीदार केले आहे. बन्सल यांचा भाचा विजय सिंगलाने रेल्वेभरतीसाठी १० कोटींची लाच मागितल्याचा आरोप आहे. बुधवारी सीबीआयने बन्सल यांचा भाचा विजय सिंगला याच्यासह दहा जणांवर आरोपपत्र दाखल केले होते.

पीडितांची नाशिकला धाव

$
0
0
जातीतून बहिष्कृत करण्याची बेकायदा कृती करून भोळ्याभाबड्या समाजबांधवाची आर्थिक लूट करणाऱ्या जातपंचाविरुद्ध कारवाई होत असल्याची माहिती समजताच राज्यभरातील भटके जोशी समाजातील पीडितांनी नाशिककडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images