Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

भिडे गुरूजींची आज सभा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेतर्फे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या जाहीर सभेचे आज (१० जून) नाशिकमध्ये आयोजन करण्यात आले आहे. 'श्री रायगडावरील ३२ मण सुवर्ण सिंहासन पुनर्संस्थापन आणि खडा पहारा' या विषयावर रविवार कारंजा परिसरातील गाडगीळ गल्लीतील वडांगळीकर महाराज मठ येथे सायंकाळी ५.३० वाजता ही सभा होणार आहे.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या नाशिक विभागाचे मनोज राजवाडे यांनी सभेचे पत्रक प्रसिद्ध केले आहे. यात भिडे गुरुजी यांच्या सभेसाठी महामंडलेश्वर पंडितराध्य शिवाचार्य महाराज वडांगळीकर, महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंदजी सरस्वती महाराज, पंचायती आखाडा श्री निरंजन त्र्यंबकेश्वर यांच्यासह जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील शिवभक्त, शिवसैनिक धारकरी उपस्थित राहणार आहेत. सर्वांना सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

कडक सुरक्षाव्यवस्था

पोलिसांनी या सभेची विशेष दखल घेतली आहे. त्यामुळेच या सभेसाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. भिडे यांना सभेस परवानगी देऊ नये, अशी विनंती विविध संघटनांनी पोलिसांकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांची ज्यादा कुमक राहणार आहे. नंदुरबार येथे नुकत्याच झालेल्या सभेत भिडे यांनी वादग्रस्त व्यक्तव्य केले होते. नाशिकच्या सभेतही ते वादग्रस्त बोलतात का आणि त्याचे काही पडसाद उमटतील का याबाबतही पोलिस अधिक सतर्क आहेत. शहरातील पोलिसांना त्याबाबत अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे भिडे यांच्या रविवारच्या या सभेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कलाप्रेमींनी खुलले प्रांगण

$
0
0

लीड...

तारपावर थिरकणारी पावले... रुबाबदार सिंहाच्या वेशात चकवणारे आदिवासी बांधव... दिग्गजांनी कॅनव्हासवर रेखाटलेले 'कलासंगम'चे अक्षरचित्र, संबळवादन अन् नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानाचे पान असलेल्या कलावंतांची दिवसभर ये-जा... चित्रकला, नाटक, नृत्य या विषयांवर गाजलेले परिसंवाद, नृत्य, तसेच नाशिकमधील गाजलेल्या कलाकारांची फिल्म अशा माहोलमध्ये 'महाराष्ट्र टाइम्स' व कुसुमाग्रज प्रतिष्ठान आयोजित कलासंगम महोत्सवाचा शनिवारी उत्साहात श्रीगणेशा झाला. कुसुमाग्रज स्मारकाचे प्रांगण दिवसभर कलाप्रेमींनी खुलून गेले होते.

---

फोटो ओळी...

१) कॅनव्हासवर 'कलासंगम'चे अक्षरचित्र रेखाटून उद्घाटन करताना शिल्पकार प्रमोद कांबळे.

२) संबळवादनाने 'कलासंगम'ची रंगत वाढवताना नाशिकमधील उभरते कलाकार.

३) 'कलासंगम'मधील कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यात हरखून गेलेले नाशिककर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशनकार्डसाठी भरपावसात आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा येथे भर पावसात किसान सभेने आपल्या विविध मागण्यांसाठी ठिय्या अंदोलन केले. सकाळी ११च्या दरम्यान तळपत्या उन्हात आंदोलन सुरू झाले. दुपारी मुसळधार पाऊस सुरू झाला तरी अंदोलक हटले नाहीत. मुंबई येथे लाँग मार्च काढला तेव्हा सरकारने रेशनकार्ड देण्याचे आणि वनहक्क दावे निकाली काढण्याचे अश्वासन दिले होते. ते अद्याप पूर्ण झालेले नाहीत.

शनिवारी किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस इरफान शेख यांच्या नेतृत्वाखाली ठाणापाडा येथील चौकात अंदोलकांनी ठिय्या अंदोलन सुरू केले. त्र्यंबक पंचायत समिती, तहसील कार्यालय आणि पोलिसांची यामुळे धावपळ उडाली. सर्व अधिकारी ठाणापाडा येथे उपस्थित होते. किसान सभेचे सरचिटणीस इरफान शेख यांनी समस्यांचा पाडा वाचत संबंधित अधिकाऱ्यांना आंदोलकांच्या बोली भाषेतच फटकारले. दुपारी उशिरा प्रांताधिकारी राहुल पाटील ठाणापाडा येथे पोहचले. परंतु रेशनकार्ड मिळाल्याशिवाय येथून उठणार नाही. दोन दिवस लागले तरी चालतील, अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्याने सायंकाळपर्यंत तोडगा निघालेला नव्हता.

तालुक्यात सुमारे दोनह हजार कुटुंबास रेशनकार्ड मिळाले नाहीत. वन हक्काचे प्रकरण प्रलंबित आहेत. त्याचसोबत वृद्ध व्यक्तीच्या पेन्शन योजनेच्या समस्या, घरकुलांचे थकलेले हप्ते, वैयक्तिक शौचलयाची झालेली कामे त्यांची चौकशीची मागणी, वीजबिलात होणारी लूट, देना बँक सह महाराष्ट्र व जिल्हा बँकेतील सेवे बाबत अनियमितता असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे.

गावो गावच्या अंगणवाडीत लहान बालकांना पोषण आहार, गर्भवती महिलांना अमृत आहार मिळत नसल्याच्या तक्रारी यावेळी करण्यात आल्या. मात्र बालविकास प्रकल्प अधिकारी अनुपस्थित होते. दुपारी आंदोलक रस्त्यावर ठिय्या मांडून बसले असताना निवडक कार्यकर्त्यांसह तहसीलदार महेंद्र पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत किसान सभेचे इरफान शेख यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे अधिकाऱ्यांना देता आली नाही. जि. प सदस्य रमेश बरफ, सभापती ज्योती राऊत, पं. स. देवराम मौले यांच्याशी सलग पाच तास समस्यांवर चर्चा करून आंदोलन थांबविण्याचा प्रयत्न झाला. परंतु आंदोलन थांबले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायत प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्रामपंचायतींच्या नवीन प्रभागरचनेचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, यामध्ये जिल्ह्यातील १४४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सोमवारी (दि.१८) जून रोजी गुगल मॅपिंगद्वारे तहसीलदार गावांचे नकाशे अंतिम करणार आहेत. तलाठी व ग्रामसेवक २५ जूनला संबंधित गावांमध्ये जाऊन प्रारूप प्रभागरचना करतील. तलाठ्यांनी तयार केलेल्या प्रारूप रचनेला तहसीलदार मान्यता देतील. संबंधित ग्रामपंचायतींमध्ये ७ जुलै रोजी विशेष ग्रामसभा बोलावून प्रभागांसाठीचे आरक्षण काढले जाणार आहे. प्रभागरचना व आरक्षण प्रसिद्ध करण्यापूर्वी तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्याबाबतचे प्रस्ताव प्राप्त करून त्याची तपासणी करून आवश्यक त्या दुरूस्त्या करतील. दुसऱ्याच दिवशी म्हणजे १२ जुलैला तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समिती दुरूस्त्यांसह प्रारूप प्रभागरचनेला मान्यता देईल. प्रारूप प्रभागरचनेवर १३ ते २० जुलै याकाळात हरकती व सूचना नोंदविता येणार आहेत. प्राप्त हरकतींवर २१ जुलै रोजी प्रांताधिकाऱ्यांकडे सुनावणी घेतली जाईल. त्यानंतर अंतिम अभिप्रायासाठी संबंधित हरकती व सूचना ३१ जूलैला जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केल्या जाणार आहेत. जिल्हाधिकारी हे प्रस्ताव ६ ऑगस्टपर्यंत तपासतील. ९ ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलेली अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल.

ग्रामपंचायतींची संख्या

तालुका संख्या

नाशिक ०४

पेठ ०१

त्र्यंबकेश्‍वर १८

दिंडोरी ०१

इगतपुरी ८०

निफाड २२

येवला ०३

मालेगाव ०१

नांदगाव ०२

कळवण १०

बागलाण ०१

देवळा ०१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॉइंटर्स...

$
0
0

-'झिप झॅप झूम' आता वाचा दर रविवारी 'संवाद'मध्ये…

-----

-नृत्य परंपरा चिरंतन टिकणारी -२

-वैविध्यपूर्ण कलांची प्रत्यक्षानुभूती -३

-मिळाले जीवनदान -४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ शिक्षकांना निलंबित करा

$
0
0

राष्ट्रवादी महिला काँग्रेसची मागणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थिनींशी असभ्य वर्तणूक करणाऱ्या शिक्षकांना तत्काळ कायमस्वरुपी निलंबित करा, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. विद्यार्थिनींची सुरक्षा आणि शिक्षकांकडून होणारे अत्याचार याबाबत पदाधिकाऱ्यांनी महापालिका शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांची भेट घेतली.

राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिकच्या शहराध्यक्षा अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली साक्षी पठाडे या विद्यार्थिनीच्या हस्ते उपासनी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे, की महापालिका हद्दीत अनेक इंग्रजी, मराठी व उर्दू माध्यमांच्या शाळा आहेत. गेल्या काही महिन्यांत शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनींना टवाळखोर मुलांपासून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्रास दिला जातो. यामुळे अनेक विद्यार्थ्यांनींनी शाळेत जाणे बंद केले आहे. सेंट फ्रान्सिस हायस्कूलमधील सुनील कदम नावाच्या शिक्षकाने तर अतिशय लज्जास्पद कृत्य केल्याचे उघडकीस आले. विद्यार्थ्यांमध्ये आई-वडिलांनंतर शिक्षकाचे स्थान आदराचे असते. परंतु, या शिक्षकाच्या कृत्यामुळे शिक्षकवर्गालाच काळिमा फासला गेला आहे. या शिक्षकावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, हिना शेख, प्रतिभा भुजबळ, विभागीय अध्यक्षा आशा भंदुरे, संगीता गांगुर्डे, पुष्पा राठोड, संगीता सानप, रजनी चौरसिया, मीनाक्षी गायकवाड, सुरेखा पठाडे, रंजना गांगुर्डे, वैशाली तायडे यांनी केली. तसेच, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने शिक्षण विभागांनेही शाळांना कडक निर्देश द्यावेत, असे प्रकार होऊ नये याची खबरदारी घ्यावी, अशी विनंती करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२३ शाखांचे विलीनीकरण

$
0
0

आर्थिक बचतीसाठी बँकेचे प्रयत्न; नोकरभरतीही तपासणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी अध्यक्षांनी आवश्यकता नसलेल्या २३ शाखांचे नजीकच्या शाखांमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वार्षिक तीन कोटींचा खर्च वाचणार असल्याचा माहिती बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी दिली. एकीकडे गरज नसलेल्या शाखा बंद करण्याचा धडाका सुरू झाला असला तरी, या शाखांसाठी अपुरे मनुष्यबळ असल्याचे कारण सांगत यापूर्वी झालेली नोकरभरतीही वादात सापडल्याचे चित्र आहे.

सन २०१६-१७ मध्ये अनावश्यक कर्जवितरण आणि २०१८-१९ या आर्थिक वर्षात कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांनी कर्जफेडीकडे दुर्लक्ष केल्याने जिल्हा बँक सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची घसरती आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी विद्यमान अध्यक्ष केदा आहेर यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. सध्याची स्थिती लक्षात घेता बॅँकेच्या प्रशासनाने प्रत्येक शाखेनिहाय होणारे व्यवहार व त्यातून बॅँकेला मिळणारा लाभ तसेच, प्रशासकीय खर्च याचा ताळमेळ घेण्यास सुरुवात केली होती. त्यातून पहिल्या टप्प्यात बँकेच्या २३ शाखांमध्ये अल्प व्यवहार होत असल्याचे समोर आले आहे. या शाखांमध्ये उलट प्रशासकीय खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, कार्यालयीन खर्चाचे प्रमाण पाहता या शाखा तोट्यात असल्याचे आढळून आले. त्यानुसार प्रशासनाने या बॅँक शाखांचे विलीनीकरण करण्याचा सादर केलेल्या प्रस्तावास संचालक मंडळाने मंजुरी दिली. त्यानुसार येत्या ३० जूनपर्यंत या शाखांचे विलीनीकरण नजीकच्या बँक शाखांमध्ये केले जाईल.

नोकरभरती तपासणार!

जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती चांगली नसतानाही यापूर्वी संचालक मंडळाने शाखांमध्ये मनुष्यबळ कमी असल्याचे सांगत जवळपास ४०० कर्मचाऱ्यांची भरती केली होती. या भरतीतून मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचाही आरोप करण्यात आला होता. या शाखांमध्ये उत्पन्नापेक्षा कर्मचारीच जास्त आढळून येत असल्याने यापूर्वी करण्यात आलेली नोकरभरतीची गरज होती काय? हे तपासण्याची वेळ आली आहे. नोकरभरतीची आवश्यकता तपासल्यास अनेकांचे बुरखेही फाटले जाण्याची शक्यता आहे.

विलीनीकरण होणाऱ्या शाखा

नाशिक नगरपालिका (आग्रारोड नाशिक), मॉडेल कॉलनी (आनंदवल्ली), दरी (मखमलाबाद), देवळालीगाव (नाशिकरोड), पळसे शूगर (शिंदे), गांधीनगर (देवळाली नाका), लहवित कक्ष (भगूर), चास (नांदूरशिंगोटे), मऱ्हळ बु. (वावी), बारागाव प्रिंपी (मार्केट यार्ड सिन्नर), पिंपळस (भाऊसाहेब नगर), वाकद (शिरवादे वाकद), गोंदेगाव (विंचूर), लासलगाव (मार्केट यार्ड लासलगाव), मुखेड गोंडेगाव (पिंपळगाव बसवंत), येवला (मार्केट यार्ड येवला), विराणे (वडनेर खाकुर्डी), पाडळदे (सायणे बु.), मालेगाव कॅम्प (मार्केट यार्ड मालेगाव), टिळकरोड मालेगाव (वसंतवाडी मालेगाव), तळवाडे (रावळगाव), सटाणा शहर (सटाणा), सांजेगाव (वाडीवऱ्हे).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवाशांची बेसुमार लूट

$
0
0

प्रवाशांची बेसुमार लूट

-

एसटीच्या संपामुळे खासगी वाहनांचे भाडे दुप्पट; रेल्वेला पसंती

-

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एसटी कर्मचाऱ्यांच्या अचानक पुकारलेला संप दुसऱ्या दिवशी कायम असल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागला. शनिवारी (दि. ९) तुरळक ठिकाणी बससेवा सुरू असली तरी त्याची शाश्वती नसल्यामुळे बसस्टॅण्डवर गर्दी कमी झाली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपाची संधी साधत दुसरीकडे खासगी वाहन धारकांनी दुप्पट भाडेवाढ करत बेसुमार लूट सुरू केल्याचे चित्र दिसून येत होते. त्यामुळे प्रवाशांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. खासगी वाहनांची ही भाडेवाढ नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी आज या विषयावर बैठक घेणार आहेत.

रिक्षाचालकांनी घेतला फायदा

संप सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात पहिल्या दिवशी ४६४७ फेऱ्यापैकी १०३६ पूर्ण झाल्या होत्या. तर दुसऱ्या दिवशी फक्त ६५४ फेऱ्या पूर्ण करण्यात आल्या. त्यात १५० फेऱ्या या नाशिक सिटीबसच्या होत्या. या फेऱ्यांमध्ये मोठी घट झाली असून, कर्मचाऱ्यांचा विरोध तीव्र होत असल्याचे चित्र आहे. बसच्या संपामुळे वाहतूक सुरळीत राहवी यासाठी आरटीओने विविध खासगी वाहनांना सेवा देण्याचे आवाहन केले. मात्र, यावेळी त्यांनी भाडेवाढीकडे दुर्लक्ष केले. सिटीबसची सेवा दुसऱ्या दिवशीही विस्कळीत होती. पण, शनिवारी औद्योगिक वसाहतीला असलेल्या सुटीमुळे चाकरमान्यांची संख्याही कमी होती. या बस बंद असल्यामुळे रिक्षाचालकांनी या संधीचा फायदा घेत प्रवाशांची लूट केल्याच्याही तक्रारी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

बसस्टॅण्ड पडले ओस

एसटीची वाहतूक तुरळीत प्रमाणात सुरू असली तरी प्रवाशांनी बस स्टॅण्डकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते. त्यामुळे बस स्टॅण्ड ओस पडल्याचे चित्रही शहरात दिसत होते. शनिवार व रविवार सरकारी कार्यालयांना सुटी असल्यामुळे गर्दीचा ओघही कमी झालेला जाणवत होता.

नाशिकरोडलाही शुकशुकाट

या संपाबाबत पूर्वकल्पना नसल्याने व्यवस्थापन हतबल झाले. अनेक प्रवासी स्टॅण्डवरच अडकून पडले होते. त्यांना जादा पैसे मोजून खासगी ट्रॅव्हल्स, टॅक्सी, रिक्षा यांचा आश्रय घ्यावा लागला. गर्दीने नेहमी गजबजणाऱ्या नाशिकरोड बसस्थानकावर शनिवारीही शुकशुकाट होता. एसटी बरोबरच शहर वाहतुकीच्या बसही धावत नव्हत्या. नाशिकरोड रेल्वे स्थानकावर देशभरातून मोठ्या प्रमाणात प्रवासी येतात. त्यांच्यासाठी शहराच्या विविध भागांसाठी बसस्थानकावर बस उपलब्ध असतात. संपामुळे बस नसल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. त्यामुळे रिक्षा व टॅक्सी चालकांनी दामदुप्पट पैसे घेतले.

प्रवाशी वळाले रेल्वेकडे

नाशिकरोड : वेतनवाढीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या संपाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.९) दिवसभरात नाशिकरोड बसस्थानकावरून शहरी बससेवेच्या ९४ तर ग्रामीण बससेवेच्या २० फेऱ्या झाल्याने काही प्रमाणात संपाची तीव्रता कमी झाली. या संपाची व्याप्ती राज्यभर असल्याने संपाच्या दुसऱ्या दिवशी रेल्वेने प्रवासास प्रवाशांनी पसंती दिल्याने नाशिकरोड रेल्वेस्थानक प्रवाशांच्या गर्दीने खच्चून भरलेले होते.

एसटी कर्मचाऱ्यांनी दि. ८ मेपासून अचानक संप पुकारल्याने शहर व ग्रामीण बससेवा ठप्प झाली आहे. या संपाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी बहुतांश प्रवाशांनी रेल्वेने प्रवासासाठी प्राधान्य दिल्याचे दिसत होते. जिल्ह्यातील नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड, देवळाली, इगतपुरी या रेल्वे स्थानकांवर शनिवारी प्रवाशांची गर्दी वाढली होती. नाशिकरोडकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बहुतांश गाड्यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम म्हणून शनिवारी अचानक गर्दी वाढल्याचे दिसत होते. राज्यराणी, पंचवटी, गोदावरी, सेवाग्राम, जनता एक्स्प्रेस, तपोवन या गाड्यांना मोठी गर्दी होती.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा आधार घेतला. मात्र, सकाळी मुंबईला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे हाल कायम आहेत. नवीन पंचवटी सुरू झाल्यावर ते कमी होतील अशी अपेक्षा होती. मात्र, नवीन गाडीत पूर्वीपेक्षाही कमी जागा आहे.

-सुभाष पाटील, प्रवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिल्पकार होण्यासाठी आधी चित्रकार बना!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मातीमध्ये काम करण्याचा प्रवास चित्रकलेतून होतो. चित्रकला चांगली असेल, तर कलेच्या कोणत्याही प्रांतात यशस्वी होता येते. मात्र, कलेत यशस्वी होण्यासाठी शॉर्टकट शोधू नका. जर तुम्हाला शिल्पकार व्हायचे असेल, तर त्यापूर्वी चित्रकार व्हा, अशा टिप्स प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी उभरत्या कलावंतांना दिल्या.

'महाराष्ट्र टाइम्स' आयोजित 'कलासंगम' महोत्सवात शनिवारी कांबळे यांच्या शिल्पकलेचे डेमोन्स्ट्रेशन व संवादाचे आयोजन करण्यात आले होते. नाशिकमधील शिल्प व चित्राची आवड असणाऱ्या विद्यार्थी, व्यक्तींनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावून शिल्पकलेतील बारकावे, डेमोसह जाणून घेतले. यावेळी कांबळे यांनी त्यांच्या आजवरच्या प्रवासातील अनुभव स्पष्ट केले. शिल्पकलेत करिअर करण्यासाठी खूप मेहनत लागते. कोणत्याही कलेत यश मिळविणे हे एखाद्या तपश्चर्येपेक्षा कमी नाही. शिवाय, कोणत्याही कलेत प्रावीण्य मिळविण्यासाठी मोठ्या क्षमतेची, सातत्याची आवश्यकता आहे. पण, एकदा मात्र तुम्ही स्वत:ला सिद्ध केले, की हीच कला तुम्हाला मोठा आनंद देईल व तुमचे कामच तुमची ओळख बनेल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी लाइव्ह चित्र व शिल्प सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कॅलिग्राफीचे सुरेख सादरीकरण

कॅलिग्राफी आर्टिस्ट महेंद्र जगताप यांनी इंग्रजीतील मूळाक्षरे, नावे विविध टूल्स वापरून कॅलिग्राफीचे तंत्र अगदी सोप्या पद्धतीने सादर केले. स्टँडिंग लाइन, स्लीपिंग लाइन, त्रिकोण, अर्धत्रिकोण हे स्पंज टूल, मेटल टूल, स्पंज रोलर वापरून अक्षरांची सुरेख मांडणी अवघ्या काही सेकंदांत, मिनिटांमध्ये केली. कॅलिग्राफी टूल कसे पकडायचे, कोणत्या पद्धतीच्या अक्षरांसाठी कोणते टूल वापरावे आदी माहितीदेखील त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली. कॅलिग्राफीच्या वळणांबाबत, अक्षरांबाबत उपस्थितांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळेच या डेमोन्स्ट्रेशनला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पादचाऱ्याचा मोबाइल खेचला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रस्त्याने मोबाइलवर बोलत चाललेल्या तरुणाच्या हातातील मोबाइल दुचाकीवरील चोरट्याने ओरबाडून नेल्याची घटना द्वारका परिसरात घडली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशन जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलींद मधुकर भालेराव (रा. वनराज हौ. सोसा. द्वारका) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. गुरुवारी रात्री घराजवळ रस्त्याने ते पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्यांनी त्यांच्या हातातील २३ हजार रुपये किमतीचा मोबाइल खेचून नेला.

--

चार मोटारसायकल चोरीस

चार मोटारसायकली चोरट्यांनी पळवून नेल्याप्रकरणी गंगापूर, आडगाव आणि मुंबईनाका पोलिसस्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर येथील प्रकाश हिरामण गोतरणे यांची दुचाकी (एमएच १५ एफएस ४२१९) सर्वज्ञ बिल्डिंगच्या पार्किंगमधून, सिडकोतील सौरभ पगार यांची दुचाकी (एमएच १५ बीएस ४०११) बलराम नगर येथील स्वप्नसंकूल अपा.च्या पार्किंगमधून, तर गोल्फ क्लब मैदान परिसरातून खडकाळी भागात राहणारे मुक्तार सलीम सय्यद यांची दुचाकी (एमएच १५ डीव्ही ७१२६) चोरट्यांनी चोरून नेली. राजेंद्र दत्तात्रेय पुराणीक (रा. नववेद अपा. आदित्यनगर,रविशंकर मार्ग) यांचीही दुचाकी (एमएच १५ एफएल ५६७६) सोसायटीच्या पार्किंगमधून चोरट्यांनी पळवून नेली.

--

डिक्कीतील पर्स लंपास

गार्डन परिसरात पार्क केलेल्या मोपेड दुचाकीच्या डिक्कीतून रोकड व दागिने असा सुमारे नऊ हजाराचा ऐवज चोरट्यांनी पळवून नेला. या प्रकरणी शिवानी माहोरिया (रा. नवीन पंडित कॉलनी) या तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलिसात योगेश जाधव व अभिषेक पाटील या

संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवानी (रा. नवीन पंडित कॉलनी) या युवती सायंकाळी फिरण्यासाठी प्रमोद महाजन गार्डन भागात गेली होती. गार्डनच्या प्रवेशद्वारावर तिने आपली दुचाकी पार्क केली असता जवळ उभ्या असलेल्या भामट्यांनी बनावट चावीने डिक्की खोलून पर्स पळवून नेली. पर्स मध्ये सहा हजाराची रोकड व चांदीचे दागिने असा नऊ हजार रूपये किमतीचा ऐवज होता.

--

दुकानास टाळे ठोकले

उधारीच्या वादातून ग्राहकांना बाहेर काढीत एकाने किराणा दुकानास टाळे ठोकल्याची घटना घनकर लेन परिसरात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धार्थ अशोक वैश्य असे दुकानास टाळे ठोकणाऱ्या संशयीताचे नाव आहे. प्रशांत गणेश कोळसकर (रा. आदर्शनगर, रामवाडी) यांनी तक्रार दाखल केली. कोळसकर सिद्धी विनायक धान्य व किराणा भांडार दुकान आहे. वैश्य यांच्याकडून ते उधारीवर माल घेतात. दरम्यान कोळसकर शुक्रवारी सांयकाळी दुकानात असतांना संशयीत तेथे आला व शिवीगाळ केली. तसेच संशयीतांने ग्राहकांसह मालकास दुकानाबाहेर काढून दुकानाला टाळे ठोकले.

--

विवाहितेचा विनयभंग

पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादाप्रसंगी पतीच्या बचावासाठी धावून आलेल्या पत्नीचा संशयितांनी विनयभंग केल्याची घटना जयभवानी रोड भागात घडली. याप्रकरणी उपनगर पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू दौंड व त्याचे तीन साथीदार अशी संशयीतांची नावे आहेत. साई किरण सोसायटीत राहणारे दांम्पत्य २६ मे रोजी रात्री आपल्या घरात असतांना ही घटना घडली. संशयितांनी तक्रारदारास घराबाहेर बोलावून वाद घातला ही बाब विवाहितेच्या लक्षात येताच ती आपल्या पतीच्या बचावासाठी धावून येताच संशयितांनी तिचे कपडे फाडून विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक मुळे करीत आहेत.

--

गंजमाळला जुगारी गजाआड

गंजमाळ परिसरातील हॉटेल रॉयल हेरिटेज भागात उघड्यावर जुगार खेळणाऱ्या सहा जुगारींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. संशयितांकडून रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी छापा टाकला असता शंकर शेट्टी व त्याचे पाच साथीदार पत्यांच्या कॅटवर पैसे लावून जुगार खेळतांना मिळून आले. याप्रकरणी पोलिस शिपाई साहिल सय्यद यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार ढोली करीत आहेत.

--

दुचाकी घसरून एक ठार

पादचारी महिलेस वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरून जखमी झालेल्या चालकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी रात्री जुने आडगाव पोलिस ठाण्यासमोर झाला होता. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संदीप जगन्नाथ मंडलीक (३५ रा.शिवाजीनगर,ओझरमिग,ता.निफाड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. संदीप सोमवारी रात्री आपल्या दुचाकीने नांदूरनाक्याकडे जात असतांना हा अपघात झाला. जुने आडगाव पोलिस ठाणे मार्गाने ते नांदूरनाक्याकडे प्रवास करीत असतांना अचानक वळणावर पादचारी वृद्धा समोर आल्याने तिला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरली होती. या अपघातात संदीप जखमी झाले होते. त्यांना तातडीने नजीकच्या अपोलो हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.

--

नानावलीत एकाची आत्महत्या

जुने नाशिक परिसरातील नानावली भागात राहणाऱ्या ५० वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी भद्रकाली पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उमर दाऊद अत्तार (५० रा.घर नं. ३८९२ नानावली दर्गाजवळ) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खूनप्रकरणी मुख्य संशयित गजाआड

$
0
0

धुळे पोलिसांकडून पारोळ्यात अटक

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील देवपूर परिसरात दत्तमंदिर भागात शुक्रवारी सायंकाळी आपसातील वादामध्ये पिता-पुत्राचा खून करण्यात आला. या घटनेतील हल्लेखोरांना पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतले असून, याप्रकरणी संशयित म्हणून माजी नगराध्यक्षलादेखील चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलविण्यात आले आहे. तर खून झालेल्या पिता-पुत्रावर शनिवारी शवविच्छेदनानंतर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

धुळे शहरातील दत्तमंदिर परिसरात सरस्वती कॉलनीत राहणारे रावसाहेब दगाजी पवार आणि शहरातील गल्ली क्रमांक सहा मध्ये राहणारे माजी नगराध्यक्ष बाजीराव पवार यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होता. घटना घडल्यानंतर जयराज हा महामार्गावरील ट्रकला हात देऊन पारोळ्याकडे फरार झाला होता. मात्र, पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी पारोळा पोलिसांना याची माहिती देत त्यास पकडण्यास यश मिळविले. पारोळा ग्रामीण रुग्नालयात जयराज उपचार घेत असल्याचे समजताच धुळे पोलिस पथकाने पारोळा येथे जाऊन जयराजला ताब्यात घेतले. तर उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

गेल्या आठवड्यात रावसाहेब पाटील यांनी बाजीराव पवार यांना तुमच्यातील काही मुलांनी आमच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात जयराज व त्याचे साथीदारांना समजून सांगून तसेच भेटून वाद मिटवूण टाका, असे सांगितले होते. मात्र, बोरसे नगरात राहणारा जयराज पाटील हा दि. ८ मे रोजी साथीदारसोबत रावसाहेब पाटील यांना दिसताच त्यांनी त्याच्यावर वार करण्यास सुरुवात केली. यावेळी जयराजसोबत असलेल्या साथीदारांनी रावसाहेब पाटील यांचा मुलगा वैभववर हल्ला करीत जखमी केले. तसेच प्रशांत पाटील यांच्यावर वार करून पसार झाले. यानंतर प्रशांत पाटील यांनी आपल्या कारमध्ये रावसाहेब व वैभव यांना जखमी अवस्थेत खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैभवची वैद्यकीय तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाला होता तर रावसाहेब पाटील यांचा उपचारादरम्यान रात्री ९ वाजेला मृत्यू झाला. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात प्रशांत पाटील यांच्या फिर्यादीवरून माजी नगराध्यक्ष बाजीराव पवार, गौरव पवार, जयराज पाटील, ऋषिकेश पाटील, वैभव पवार, हर्षल रवींद्र पाटील, भूपेंद्र वाल्मिक पाटील, भूषण बाबूराव कापकर (सर्व रा. धुळे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

mail derail:मुंबई-हावडा मेलचे तीन डबे घसरले

$
0
0

नाशिक:

मुंबईवरून हावडाला जाणाऱ्या मुंबई-हावडा मेलचे तीन डबे रेल्वे रुळावरून घसरले. रात्री १२ वाजता इगतपुरी स्टेशनजवळ ही घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र मेलचे डबे घसरल्याने या मार्गावरून जाणाऱ्या लांबपल्ल्याच्या १२ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

रात्री १२ वाजता झालेल्या या अपघातामुळे पंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्स्प्रेससह १२ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या इतर रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत. तसेच मुंबई-पटना एलटीटी-पाटलीपुत्र एक्स्प्रेस व मुंबई-बनारस महानगरी एक्स्प्रेस या गाड्यांचे मार्ग बदलून त्या पुणे मार्गे सोडण्यात आल्या आहेत.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाला घसरलेले डबे बाजूला काढण्यात यश आले आहे. प्रशासनाने मुंबईकडे जाणारी अप लाईन मोकळी केली असून त्यावरून धीम्या गतीने काही गाड्या सोडल्या जात आहेत. मात्र डाऊन लाईन अजून ही बंद असल्याने दिल्ली व उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्याचा खोळंबा झाला आहे. रेल्वे प्रशासनाने गाडीतील प्रवाशांसाठी मनमाड येथे चहा, नाष्ट्याची व्यवस्था केली आहे. सध्या मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

64526137

या नंबरवर संपर्क करा...

>> कल्याण: ०२५१-२३११४९९
>> दादर: ०२२-२४११४८३६
>> इगतपुरी: ०२५५३-२४४०२०

पुणे-दौंडमार्गे वळवण्यात आलेल्या गाड्या

>> ११०५७ CSMT- अमृतसर एक्सप्रेस
>> १५६४५ LTT- गुवाहाटी एक्सप्रेस
>> १२१६७ LTT- वाराणासी एक्सप्रेस

वसई रोड- सूरत- जळगाव मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्या

>> ११०९३ CSMT-वाराणासी महानगरी एक्सप्रेस
>> १२१४१ LTT-पाटलीपुत्र एक्सप्रेस
>> १५०६६ पनवेल-गोरखपुर एक्सप्रेस
>> १२८११ LTT-हटिया एक्सप्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार पलटली; शिवशाही धडकली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक-पुणे महामार्गावर पळसे गावाजवळील पुलावर तीन वाहनांच्या विचित्र अपघातात दोन जण जखमी झाला तर दोन वाहनांचे नुकसान झाले. किशोर विजयविठ्ठल माथड (रा. थत्तेनगर, कॉलेजरोड, नाशिक) यांच्या फिर्यादीवरून या अपघाताची नोंद नाशिकरोड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

माथड यांच्या मालकीची होंडा डॉल्फिन कार (एमएच १५ बीएन ९१४६) चालक चेतन सुरेश हिरे (रा. ओझरखेड कॉलनी, दिंडोरी) हा हैदराबाद येथील घेऊन नाशिकच्या दिशेने येत होता. पळसे गावाजवळील महामार्गावरील पुलावर शुक्रवारी रात्री पुढे जाणारी इर्टिका कार (एमएच ४१ एएस ०१५२) अचानक पलटली. त्यामुळे चेतन हिरे याने आपली कार तात्काळ थांबविली. याच वेळी पाठीमागून वेगाने आलेली राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस (एमएच ०६ बीडब्ल्यू ०१९६) जोराने येऊन धडकली. परिणामी चेतनच्या ताब्यातील डॉल्फिन कारचे मोठे नुकसान झाले. या अपघातात चेतनसह इर्टिका कारचा चालक शेख आकम शेख बशिद (रा. मालेगाव) हा देखील किरकोळ जखमी झाला. शिवशाही बसचा चालक भाऊसाहेब बाबुराव चव्हाण (रा. म्हसरुळ) याच्या विरोधात माथड यांच्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ड्रायव्हरवर हल्ला

नाशिकरोड : ओळखीच्या व्यक्तीचे खिसे जबरदस्तीने चाचपडत असल्याचे लक्षात आल्यावर जाब विचारणाऱ्या ड्रायव्हरवर हल्ला करून त्यास जखमी केल्याची घटना रेल्वे मालधक्का परिसरात शनिवारी (दि. ९) रात्री उशिरा घडली. पप्पू सोनू घोडके (वय २१, रा. रमाबाई आंबेडकरनगर, मालधक्का रोड, देवळालीगाव) असे हल्ल्यात जखमी झालेल्या ड्रायव्हरचे नाव आहे. पप्पू याच्या परिचयाच्या काडू मुंडे याला रस्त्यात अडवून भुऱ्या चारोळे नावाचा टवाळखोर त्याचे खिसे चाचपडत होता. ही बाब पप्पूच्या लक्षात आली. त्याने काळू मुंडे याच्या मदतीला जात भुऱ्या चारोळे यास जाब विचारला. भुऱ्याने पप्पू याच्याशी वाद घालून त्याच्या डोक्यात लोखंडी पट्टी मारून जखमी केले. हल्ल्यानंतर भुऱ्या फरार झाला. जखमी पप्पू घोडके यास विजय पवार याने महापालिकेच्या बिटको हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. पप्पूच्या जबाबावरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात भुऱ्या याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

दुचाकीची चोरी

नाशिकरोड : शिंदे गावातील राजयोग लॉन्सच्या पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी चोरीस गेल्याची फिर्याद कार्तिक अर्जुन डांगे (रा. शिंगवे बहुला) यांनी नाशिकरोड पोलिसात दिली आहे. त्यांच्या मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी डांगे हे राजयोग लॉन्समध्ये गेले होते. त्यांनी लॉन्सच्या पार्किंगमध्ये दुचाकी (एमच १५ सी वाय ९७७५) उभी केलेली होती. मात्र, पुन्हा गेले असता त्यांना दुचाकी आढळून आली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुण गोळीबारप्रकरणी तीन संशयितांना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

म्हसरुळ येथील एकतानगरात झालेल्या गोळीबारात फरार दोन संशयितांना अटक करण्यात आली. गोळीबार केल्यानंतर संशयितांना फरार होण्यास मदत करणाऱ्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिघा संशयितांकडील दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. गोळीबार का केला याचा मात्र, अजूनही उलगडा झाला नाही.

एकतानगर येथे बुधवारी (दि. ६) रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास नितीन दिलीप परदेशी हा युवक साती आसरा मंदिराजवळ असलेल्या बाकड्यावर बसलेला होता. तेथे दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी त्याच्या डोक्यात जवळून गोळी मारली. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला, शेजारच्या रहिवाशांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दोन दिवसांच्या उपचारात डॉक्टरांनी अथक प्रयत्नानंतर नितीन परदेशी याचा शुक्रवारी (दि. ८) रात्री ११ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.

म्हसरुळ पोलिस स्टेशनमध्ये अगोदर मारण्याचा प्रयत्न असा अज्ञात संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात वाढ करून हत्या केल्याचा गुन्हा दाखल झाला. गोळीबारात संशयितांना फरार होण्यास मदत करणाऱ्या विजयकुमार पुंडलिक गांगोडे (वय २१, रा. फ्लॅट नं. ३२, वेदश्री अपार्टमेंट, चाणक्यपुरी सोसायटी) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. म्हसरुळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांनी मुख्य संशयितांना अटक करण्यासाठी तीन पथकांची निर्मिती केली. रविवारी (दि. १०) पहाटेच्या सुमारास संशयित मयूर राजाराम जाधव (२२, रा. श्रीएकता अपार्टमेंट, बोरगड) आणि हितेश उर्फ चिक्या रवींद्र केदार (२३, रा. वेदांत अपार्टमेंट चाणक्यपुरी, मखमलाबाद लिंकरोड) यांना अटक केली. त्यांच्याकडून गोळीबारानंतर फरार होण्यासाठी वापरलेली दुचाकी (एमएच १५ ईक्यू ९६१४) ही दुचाकी जप्त केली.

हाणामारी करणाऱ्या संशयितांची धिंड

जेलरोड : नाशिक-पुणे मार्गावरील आंबेडकरवाडीत तीन दिवसांपूर्वी दोन गटात हाणामारी झाली होती. त्यात एकाला गंभीर जखमी करणाऱ्या संशयितांची उपनगर पोलिसांनी समतानगर, आंबेडकर पुतळा, पंचशीलनगर, शिवाजीनगर आदी भागातून धिंड काढली. यामुळे परिसरातील तणाव दूर होऊन नागरिकांना दिलासा मिळाला. कुणाल साळवे, कुणाल भालेराव अशी या संशयितांची नावे असून यापूर्वी संशयितांवर विविध गुन्हे दाखल झाले आहेत. उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी अकरा वाजता संशयितांची धिंड काढण्यात आली. पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण, गणेश जाधव, महेंद्र चव्हाण आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विदेशी सिगारेटसाठा पंचवटीमध्ये जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विक्रीस बंदी असलेल्या विदेशी सिगारेटची राजरोस विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी मयुरेश ट्रेंडर्स या दुकानावर छापा टाकून सुमारे २२ हजार रुपयांचा सिगारेटचा साठा जप्त केला. या प्रकरणी पंचवटी पोलिसांत कोपटा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने कारवाई केली. गोरेराम लेन भागातील मयुरेश महाले (रा. शनी मंदिराजवळ) यांच्या दुकानात मोठ्या प्रमाणात विदेशी सिगारेटचा साठा असल्याची माहिती युनिट १ चे सहाय्यक निरीक्षक दीपक गिरमे यांना मिळाली. त्यानुसार, शुक्रवारी छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. वैधानिक इशारा आणि चिन्ह नसलेल्या विदेशी सिगारेटला राज्यात विक्रीस बंदी असताना संशयित मोठा साठा करून तो शहरातील विक्रेत्यांना पुरवित असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला असता संशयिताच्या दुकानात २२ हजार रुपयांचा विदेशी सिगारेटचा साठा आढळून आला. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात कोपटा अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्यात आली. युनिटचे निरीक्षक आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी, एस. एम. वाघ, दीपक गिरमे, उपनिरीक्षक पालकर, जमादार चंद्रकांत पळशीकर, जाकीर शेख, हवालदार रवींद्र बागूल, अनिल दिघोळे, बाळासाहेब दोंदे, संजय मुळक, वसंत पांडव, प्रवीण कोकाटे, येवाजी महाले, विजय गवांदे, पोलिस नाईक आसिफ तांबोळी, दिलीप मोंढे, मोहन देशमुख, शिपाई विशाल देवरे, स्वप्नील जुंद्रे, गणेश वडजे, राहुल पालखेडे, रावजी मगर, शांताराम महाले, प्रवीण चव्हाण, प्रतीभा पोखरकर, दीपक जठार आदींच्या पथकाने कारवाई केली.

पतीची आत्महत्या

जेलरोड : पत्नी व तिच्या नातेवाईक त्रास देत असल्याच्या कारणाने पतीने आत्महत्या केल्याचा प्रकार विहितगाव येथे घडला. उपनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिरोज लतीफ पठाण (२५, रा. विहितगाव, मारुती मंदिरासमोर, नाशिकरोड) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. पत्नी शहनाज पठाण व तिचे नातेवाईक जावेद, फरीद व अशफाक या चौघांनी फिरोजचा सातत्याने छळ केल्याची तक्रार आहे. इम्तियाज नूरमोहम्मद यांनी दिलेल्या फिर्याद दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रविवारचा परिसंवाद--छायाप्रकाश कालचा की आजचा

$
0
0

डिजिटलमुळे छायाचित्रातील कला हरवतेय!

छायाप्रकाश कालचा की आजचा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फोटोग्राफी ही एक कला आहे, साधना आहे. प्रकाशाचा अभ्यास करण्याचे आणि त्या प्रकाशाच्या उजेडात मानवी चेहऱ्यावरील भावना टीपण्याचे फोटोग्राफी हे एक शास्त्र आहे. काळानुसार या कलेत बदल होत असले तरी 'मॅन बिहाईंड द कॅमेरा'चे महत्त्व आजही आहे. मात्र तसेच आताच्या डिजिटल मोबाइलमुळे छायाचित्र ही कला हरवत आहे. तरीही ज्याला प्रकाश कळला, दिसला अन् त्या प्रकाशात चेहरा वाचता आला तोच खरा छायाचित्रकार. छायाचित्रणातील अशा अनेक रंगछटा कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा हॉलमध्ये 'छायाप्रकाश कालची की आजचा'या परिसंवादात उमटल्या.

परिसंवादात ज्येष्ठ छायाचित्रकार धनंजय गोवर्धने, प्रसाद पवार, समीर बोंदार्डे यांनी आपापल्या काळातील फोटोग्राफीतले अनेक रंग, छटा रसिकांसमोर उलगडल्या. छायाचित्रकार संजय अमृतकर यांनी मान्यवरांशी मनमोकळ्या गप्पा मारताना छायाचित्र या कलेतील कृष्णधवल ते डिजिटल अशी छानशी सैर घडवून आणली. फोटोग्राफी मग ती कालची अवघड होती, की आजची सहज-सोपी आहे. त्यावेळचा नैसर्गिक प्रकाश की आजचा शटरचा स्पीड आणि अॅप्रेचरची सांगड, की आजची डिजिटलची इफेक्टची किमया, अशा अनेक पैलूंचे निरनिराळे पदर या परिसंवादात उलगडत गेले.

धनंजय गोवर्धने यांनी साधारणपणे चार-पाच दशकांपूर्वीचे छायाचित्रण कसे होते यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, कॅमेरा जुना असो की आताचा डिजिटल, डीएसएलआर याला महत्त्व नाही. त्यामागचा माणूस महत्त्वाचा. कॅमेरा एक तंत्र आहे. मात्र ते तंत्र कोणत्या प्रकाशात चालवायचे, त्याच्या व्ह्यू फाईंडरमधून प्रकाशमान झालेला मानवी चेहरा कसा टिपायचा हे ज्याला कळले तो उत्तम फोटोग्राफर. दिसणं आणि पाहणं यात फरक आहे. फोटोग्राफर हा कॅमेरातून दिसणाऱ्या असंख्य बाबींकडे दुर्लक्ष करून केवळ एकाच गोष्टीकडे पाहत असतो. आणि योग्य प्रकाश, पाहिजो तो भाव दिसताच 'क्लिक' करतो, हीच खरी कला आहे.

प्रसाद पवार यांनी पूर्वीची आणि आताची अशा दोन्ही काळातील फोटोग्राफीवर प्रकाश टाकला. अजिंठा लेण्यांमध्यील मूर्तींच्या चेहऱ्यांवरील भाव टिपताना आलेले अनुभव कथन करताना प्रेक्षक भारावून गेले होते. ते म्हणाले, चित्रकार अनेक दिवस एका चित्रावर काम करीत असतो. त्याला जे सांगायचे असते ते त्या चित्रातून तो सांगत असतो. मात्र यात खूप वेळ जातो. याऊलट फोटोग्राफी ही एक अशी कला आहे जी कमीत कमी वेळात खूप काही सांगून जाते. पण तरीही छायाचित्र आणि पेंटिंग या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मात्र आज खूप कमी वेळात फोटो हातात येत असल्यामुळे त्यातील उत्सुकता कमी झाली आहे. 'वेटिंग पिरेड' कमी झाला आहे. तरीही चांगल्या फोटोसाठी खूप वाट पहावीच लागते, जास्त काम करावेच लागते.

समीर बोंदार्डे यांनी डिजिटल फोटोग्राफीचे फायदे आणि तोटे सांगितले. डिजिटल फोटोग्राफीमुळे मूळ छायाचित्र हरवत चालले आहे, अशीही भीतीही त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, डिजिटल फोटोग्राफीमुळे काम वाढले असले तरी फायदाही झाला आहे. साधारण पंधरा वर्षांपूर्वी फोटोग्राफी कशी होती याबाबत त्यांनी अनेक गमतीशीर किस्से सांगितले. या परिसंवादात स्टुडिओतील दोन छत्र्या, चेहऱ्यांवरील अनेक खुणा कशा नाहीशा होतात, मुला-मुलीला लग्नासाठी काढावे लागणारे फोटो अशा अनेक मुद्द्यांवर तिनही व्यक्त्यांनी अनेक विनोदी किस्से सांगितले. तसेच कॉपीराईटसाठी फोटोग्राफर्सनी एकत्र यायला हवे, अशी एक भूमिकाही त्यांनी 'मटा'च्या व्याासपीठावर मांडली. अपर्णा क्षेमकल्याणी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोर्डाच्या परीक्षेत मायलेकींचे घवघवीत यश

$
0
0

दहावी-बारावीत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

दहावी-बारावी परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. या निकालात मालेगाव तालुक्यातील झोडगे येथील मायलेकींनी सोबत दहावी-बारावीची परीक्षा देऊन उत्तम गुण संपादन केले आहेत. एकाच वर्षी दहावी व बारावीच्या परीक्षेत या मायलेकींनी मिळवलेले शैक्षणिक यश कौतुकाचा विषय ठरत आहे.

मालेगावच्या पंचायत समिती सदस्य असलेल्या सुवर्णा विजय देसाई यांनी बारावीत ७३.८४ टक्के गुण मिळवले आहेत. तर त्यांची लेक गौरी विजय देसाई हिने ८९.४० टक्के गुण मिळवले. दहावी-बारावीच्या परीक्षा म्हणजे मुलांच्या बरोबरीने पालकांचीदेखील परीक्षा असल्याचे म्हटले जाते. सुवर्णा देसाई यांनी मात्र खरोखरीच बारावीची परीक्षा देत आपले स्वप्न साकार केले आहे. त्यांची कन्या गौरी ही मालेगाव येथील काकाणी विद्यालयात यंदा दहावीच्या वर्गात शिकतानाच सुवर्णाताईंनी आपले अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा धाडसी निर्णय घेतला. झोडगे येथील जनता महाविद्यालयात सतरा नंबर फॉर्म भरून त्यांनी बारावीला प्रवेश घेतला. शाळा सोडून बरीच वर्ष झाली असल्याने त्यांच्यासाठी बारावीचे वर्ष मोठे आव्हान होते. परंतु, मायलेकींनी सोबतच अभ्यास केला. आता गौरीने विज्ञान शाखेत करिअर करण्याचे ठरविले असून, सुवर्णाताईंनीदेखील पदवी संपादन करण्याची जिद्द मनात बाळगली आहे.

मी दहावीला असली तरी आईने देखील बारावीला प्रवेश घेतल्याने मला प्रेरणा मिळाली. घर आणि राजकीय जबाबदारी सांभाळून तिला बारावी करणे कठीण होते. मात्र, आई आणि मी सोबत अभ्यासाला सुरुवात केली. मला दहावीत चांगले गुण मिळाले यापेक्षा आईने बारावीत चांगले गुण मिळवले याचा अधिक आनंद आहे.

- गौरी विजय देसाई , कन्या

वृत्तपत्रे विकणाऱ्या गौरवचे यश

पिंपळगाव बसवंत : शहरात रोज सकाळी लवकर उठून बाजार समितीमध्ये शेतकरी वर्गांना सकाळी पाच वाजता ओरडून पेपर विकणाऱ्या गौरव पवार याने दहावीत तब्बल ९१ टक्के गुण प्राप्त केले आहे. त्याने कुठलाही क्लास न लावता व स्वतःच्या कठोर मेहनतीच्या बळावर स्वखर्चाने इयत्ता दहावीत ९१ टक्के मार्क मिळविले. त्याबद्दल पिंपळगाव पोलिस स्थानकातील पोलिस निरीक्षक आनंद निकम, सहाय्यक पोलिस निरीक्षक बिपीन शेवाळे यांनी गौरवचा सत्कार करीत अभिनंदन केले आहे. गौरव पवार याने सैन्यात जाण्याचे स्वप्न सत्कारावेळी बोलून दाखविले.

रखवालदाराच्या मुलीला ९७ टक्के

नाशिक : उंटवाडी येथील मधुरा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीतील रखवालदाराच्या मुलीने दहावीच्या परीक्षेत ९७ टक्के गुण मिळवून यशाला गवसणी घातली आहे. मनिषा कैलास पगारे असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती सिडकोतील सरस्वती गुलाबराव पाटील विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिचे वडील कैलास उंटवाडीतील मधुरा पार्क या इमारतीमध्ये रखवालदारी करतात. तर तिची आई सुनीता मिळेल तेथे धुणीभांडीची कामे करते. सोसायटीतील दहा बाय दहाच्या खोलीत हे कुटुंब राहते. संस्थेचे सचिव माजी नगरसेवक दत्ता पाटील, मुख्याध्यापक मनोज वाकचौरे यांच्यासह सोसायटीतील रहिवाशी प्रवीणचंद्र भट, सुभाष कुलकर्णी, विलास सोमवंशी आदींनी तिचे कौतुक केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोंडे न्हाण्यासाठी भाविकांची गर्दी

$
0
0

अधिकमास, वद्य एकादशीनिमित्त त्र्यंबकला पसंती

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे अधिकमास, वद्य एकादशीच्या निमित्ताने धोंडे न्हाण्यासाठी भाविकांची आलोट गर्दी उसळली आहे. कुशावर्तावर रविवारी (दि. १०)स्नानासाठी पहाटेपासून दाटी झाली होती. आंघोळीच्या दरम्यान महिला पुरूष भाविक दीपदान करताना आढळत होते.

तीन वर्षांतून एकदा येणाऱ्या अधिकमासात कुशावर्तला स्नान करण्यासाठी देशभरातील भाविकांनी गर्दी केली आहे. सोबतच संत निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिरात दर्शनासाठी वारकरींच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. विद्यावाचस्पती द्वाराचार्य रामकृष्ण महाराज लहवीतकर यांनी अशा प्रकारची वारी आपल्या आठवणीत प्रथमच भरली असल्याचे सांगितले. शनिवार, रविवार आणि अधिकमास असा योग जुळून आल्याने भाविकांनी त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला आणि कुशावर्तात स्नानासाठी गर्दी केली होती.

संत निवृत्तिनाथ मंदिरात रविवारी अनेक भाविकांनी दर्शनासाठी तसेच देणगी देण्यासाठी नंबर लावले होते. अवघ्या एका महिन्याच्या आत दहा लाखांपेक्षा अधिक रक्कम प्राप्त झाली असून, मंदिराचे काम प्रगतीपथावर होत असल्याचे संस्थान ट्रस्ट अध्यक्ष ह. भ. प. संजय महाराज धोंडगे यांनी सांगितले. या कामाच्या बाबत ठेकेदार यांनी हमी पत्र दिले असून, उशीर झाल्यास दंड करण्यात येणार आहे. येत्या २८ जून रोजी पालखी प्रस्थान होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांसाठी वकिलांचा ‘चक्काजाम’

$
0
0

सटाण्यात राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक विस्कळीत

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शेतकरी वर्गाच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत, तोपर्यंत शेतकरी वर्गाचा लढा सुरूच राहील. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी सटाणा वकील असोशिएशनने येथील राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (दि. १०) तीन तासांहून अधिक वेळ चक्काजाम आंदोलन केले. बागलाणचे प्रांताधिकारी यांनी चक्काजाम आंदोलनस्थळी येवून आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले.

येथील बसस्थानकासमोरील राष्ट्रीय महामार्गावर सटाणा वकील संघ असोशिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. पंडितराव भदाणे यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन झाले. या वेळी आंदोलनात शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकरी व वकील मोठ्या संख्येने सहभागी होते. सकाळी १० वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर वकील संघ व शेतकरी वर्गाने चक्काजाम आंदोलनास प्रारंभ केला. यामुळे महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. त्यातच एस. टी. बसेस सुरू झाल्याने प्रवासासाठी बाहेर पडलेल्या चाकरमाने व प्रवाशांना या आंदोलनाचा मोठा पटका बसला.

शेतकऱ्यांसह त्यांचे कुटुंबीय आता आत्महत्येकडे वळू लागले असून, ही शरमेची बाब आहे. सरकारने सरसकट कर्जमाफी करावी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, शेतमालाला रास्तभाव द्यावा यासारख्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले, असे अॅड. भदाणे म्हणाले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार, शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष भास्कर सोनवणे, वकील संघाचे अ‍ॅड. नाना भामरे, अ‍ॅड. वसंतराव सोनवणे, अ‍ॅड. रेखा शिंदे यांची भाषणे झाली. या वेळी बागलाणचे प्रांताधिकारी प्रवीण महाजन, पोलिस उपविभागीय अधिकारी शशिकांत शिंदे, पोलिस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. आंदोलनात अ‍ॅड. हिरामण सोनवणे, अ‍ॅड. अभिमन्यू पाटील, अ‍ॅड. विष्णू सोनवणे, अ‍ॅड. रवींद्र पाटील, डोंगर पगार, देविदास निकम, सुभाष सावकार आदींसह तालुक्यातील शेतकरी सहभागी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदास्नानासाठी तुडूंब गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुण्यफल देणारा अधिक महिना, कमला एकादशी आणि रविवारची सुटी असा तिहेरी योग जुळून आल्याने पंचवटीतील रामकुंडासह गोदाघाटावर स्नानासाठी नाशिककरांची झुंबड उडाली. त्यामुळे सिंहस्थ पर्वणी काळासारखाच माहोल येथे जमून आल्याने तीन वर्षांपूर्वी झालेल्या सिंहस्थाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.

कमला एकादशीला उपवास केल्याने पापांपासून मुक्ती मिळते, अशी धारणा आहे. अधिक मासामध्ये येणाऱ्या या एकादशीला परमा तसेच हरिवल्लभा एकादशी असेही म्हटले जाते. तीन दिवसांनी म्हणजेच बुधवारी दर्श अमावस्या असून, अधिक महिन्याची समाप्ती होते आहे. तत्पूर्वी रविवारी सुटीच्या दिवशी एकादशी आल्याने सकाळपासूनच रामकुंड आणि गोदाघाट परिसरात नागरिकांची गर्दी झाली. कोणी गोदेमध्ये स्नानास तर कोणी हात-पाय धुण्यास पसंती दिली. बच्चेमंडळींसह अबालवृद्धांनी गोदेच्या पाण्यात डुंबण्याचा आनंद यानिमित्ताने लुटला. देवांना वाण देण्यासाठीदेखील गोदाघाटालगतच्या मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली. त्यामुळे कपालेश्वर मंदिर, सांडव्यावरची देवी, काळाराम मंदिर परिसरात भाविकांची लांबच लांब रांग लागल्याचे चित्र पहावयास मिळाले. नागरिकांच्या गर्दीमुळे अनुचित घटना अथवा गैरप्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी या परिसरात बंदोबस्त वाढवला होता. तसेच या मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी वाहनांनाही काही वेळासाठी प्रवेश बंद ठेवण्यात आला. रामकुंड आणि परिसरात दिवसभर भाविकांच्या गर्दीचा ओघ सुरूच होता. पुढील दोन-तीन दिवस गोदाघाटावर भाविकांचा ओघ असणार आहे.

देवदर्शनालाही पसंती

अधिक मासाच्या निमित्ताने गोदास्नानासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह अन्य जिल्ह्यांमधूनही भाविक मोठ्या संख्येने नाशिकमध्ये आले. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यामुळे गर्दी अधिकच वाढली. गोदास्नानाबरोबरच पर्यटनाचा आनंद लुटण्यासही पसंती देण्यात आली. कपालेश्वर मंदिर, काळाराम मंदिर, सीतागुंफा, गोरेराम मंदिर, सुंदर नारायण मंदिर, तपोवन या परिसरात भाविकांची गर्दी पहावयास मिळत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images