Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

चौफुली बनली ‘अपघात केंद्र’

$
0
0

गणेशनगर कॅनलजवळ अपघातात दुचाकीस्वार जखमी; नागरिकांचा संताप

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

नाशिक शहरात वाढलेल्या वाहनांच्या संख्येत अपघातही सातत्याने वाढत आहेत. सातपूर एमआयडीसीकडून पाइपलाइन रोडवरून गंगापूररोडला जाणाऱ्या गणेशनगर कॅनल चौफुली अपघातांचे केंद्रच बनली आहे. बुधवारी (दि. १३) पहाटे झालेल्या अपघातात चारचाकी वाहनाने दुचाकी चालकास गंभीर दुखापत केली.

गणेशनगर कॅनल चौफुलीवर झालेल्या श्या अपघातात दुचाकी चालकास दुखापत झाली असून, त्यास खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच सातपूर पोलिसात अपघाताचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. सदर चौफुलीवर नेहमीच अपघात होत असल्याने स्थानिक रहिवाशांनी गतिरोधक टाकण्याची मागणी केली होती. परंतु, याकडे महापालिका व पोलिस प्रशासन दुर्लक्ष देत असल्याने यावर उपाय शोधणार कोण, असा सवाल रहिवाशांनी केला आहे.

गंगापूररोडला पर्याय रस्ता म्हणून धरणाच्या उचव्या कालव्याला लागून महापालिकेने नवीन रस्ता तयार केला. यामुळे काही प्रमाणात का होईना गंगापूररोडवर होणारी वाहनांची गर्दी कॅनलरोडच्या बाजूने वाहतूक करावयास लागली. याच कॅनलरोडवर असलेल्या गणेशनगर चौफुलीवर रोजच अपघात होत असल्याने गतिरोधक टाकण्याची मागणी रहिवाशांनी केली. बुधवारी पहाटे सहावाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात चारचाकी वाहनाने दुचाकी चालकास जोरदार धडक देत गंभीर जखमी केल्याने पुन्हा ही मागणी जोर धरू लागली आहे.

किमान दोन बाजूला गतिरोधक आवश्यक

गणेशनगर कॅनलरोडच्या चौफुलीवर अनेकदा झालेल्या अपघातात चार जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेकदा महापालिका व पोलिस प्रशासनाकडे धोकेदायक झालेल्या चौफुलीवर किमान गतिरोधक टाकावेत, अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली. याकडे मात्र स्थानिक नगरसेवकांसह महापालिका व पोलिस प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. चौफुलीवर एकाबाजूने उतार असल्याने वेगाने वाहन चालवितांना ब्रेक लावणे चालकालाच कठीण होते. यामुळे वाहनावर नियंत्रण मिळवताना अपघात होण्याची संख्या वाढली आहे. चौफुलीच्या किमान दोन बाजूला गतिरोधक टाकले जाणे आवश्यक बनले आहे.

गणेशनगरला लागून असलेल्या कॅनलरोड चौफुली अपघात केंद्रच बनले आहे. यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाकडे किमान रस्त्याच्या दोन बाजूला गतिरोधक टाकण्याची मागणी केली होती. याकडे प्रशासन लक्ष देत नसल्याने अपघातांची संख्या वाढली आहे.

अरुण काळे, माजी नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रंगदेवतेच्या उत्सवाकडे नाशिककरांची पाठ!

$
0
0

नाट्य संमेलनामध्ये …अत्यल्प सहभाग

Fanindra.Mandlik@timesgroup.com

नाशिक : कुसुमाग्रज, वसंत कानेटकर यांच्यासारख्या दिग्गज नाटककरारांची नगरी असलेल्या आणि सद्यस्थितीत येथील नाटकांचा राज्यभरात उदोउदो होत असताना रंगदेवतेच्या उत्सवाकडे नाशिककरांनी पाठ फिरविल्याची बाब समोर येत आहे. ही बाब नाट्यवर्तुळात आश्चर्य व्यक्त करणारी ठरत आहे.

नाशिक शहराला वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज, वसंत कानेटकर यांच्यासारख्या नाटककारांची परंपरा आहे. त्यांनी नाट्य सृष्टीला अनेक नाटके देऊन नाशिकचे नाव अजरामर केले आहे. पूर्वी नाट्य संमेलन म्हटले, की शहरातून नाट्यसंमेलनाला जाण्यासाठी कलावंत मंडळीची रीघ लागत असे. वातावरणही ढवळून निघायचे. हीच बाब राज्य नाट्य स्पर्धेच्या बाबतीत घडायची. मात्र, सध्या यातील काहीच होताना दिसत नसल्याचे रंगकर्मींचे म्हणणे आहे. केवळ स्वत:ला रंगकर्मी म्हणून मिरवून घेण्यातच नाशिकमधील काही लोकांना धन्यता वाटते, असा सूर नाट्य क्षेत्रातून आळवला जात आहे. मुंबईतील मुलूंड येथे नाट्य संमेलनाला सुरुवात झाली असून या ठिकाणी विविध नाटके, एकांकिका यांचे सादरीकरण होणार आहे. मात्र, शहरातील बोटावर मोजण्या इतक्या रंगकर्मींनी तेथे हजेरी लावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत एक ज्येष्ठ रंगकर्मी म्हणाले, की नाशिक शहरातील काही रंगकर्मी स्वत:ची शेखी मिरवून घेण्यातच धन्यता मानतात. या ठिकाणी सादर होणाऱ्या नाटकातून आपल्याला काहीतरी चांगले शिकायला मिळेल, चांगल्या कलाकृती पहायला मिळतील यासाठी तरी आपण संमेलनाला जावे असे त्यांना वाटत नाही. आपण जे करू ते चांगले अशी मानसिकता शहरातील काही कलाकारांची झाल्याने दुसऱ्या कलाकृतींकडेही ते कानाडोळा करीत असतात.

नाशिकमधून संमेलनाला जाणाऱ्यांमध्ये सचिन शिंदे, सुरेश गायधनी, सुनील ढगे,रवींद्र ढवळे, नंदकुमार देशपांडे, प्राजक्त देशमुख, प्रणव प्रभाकर, प्रफुल्ल दीक्षित, आनंद ओक, सिद्धार्थ बोडके, श्रीपाद देशपांडे, शुभांगी सदावर्ते, गिरीश गर्गे, अनिता दाते यांचा समावेश आहे. शहरातील कलाकारांच्या संख्येच्या तुलनेत हा आकडा नगण्य आहे. या नाट्य संमेलनात लोककलांवर आधारित कलाप्रकार पहायला मिळणार आहेत. तसेच काही विदर्भातील नाटकेही सादर होणार आहेत. त्यामुळे वेगळा फॉर्म पाहण्याची संधी मिळणार आहे. पण, त्याकडे नाशिककरांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.

कलाकारांची सातत्याने घट

मराठवाड्यातील परळी येथे झालेल्या नाट्य संमेलनात नाशिकच्या 'खंडोबाचं लगीन'चा प्रयोग झाला होता. त्यावर्षी शहरातून प्रयोगाव्यतिरिक्त शंभराच्या वर रंगकर्मी हजर होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून यात सातत्याने घट होत आहे. हौशी रंगकर्मींबरोबर स्वत:ला व्यावसायिक नट म्हणून मिरवणाऱ्यांनीही या संमेलनाकडे पाठ फिरविल्याचे नाट्य क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. यंदा नाशिकच्या नाटकांचाही संमेलनात समावेश नसल्याने येथील नटांची नाराजी आहे.

नाशिकच्या नाट्यवर्तुळात वावरतांना आपण काही तरी नवीन शिकावे या उद्देशाने रंगकर्मींनी संमेलनाला येणे गरजेचे आहे. नाटक हे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून करण्याचे साधन नाही, हे नाशिकच्या रंगकर्मींना समजायला हवे.

- सचिन शिंदे, सदस्य,

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नियामक मंडळ

मटा विशेष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ खाणावळींवर होणार कारवाई

$
0
0

अवैध मद्यविक्री रोखण्याची पोलिस अधीक्षकांकडून ग्वाही

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पावसाळी पर्यटनासाठी त्र्यंबकेश्वरसह इगतपुरी तालुक्यात जाणाऱ्या पर्यटकांना तेथील ढाबे आणि घरगुती खाणावळी चालविणारे दारू उपलब्ध करून देतात. अशी बेकायदा दारू विक्री करून गैरप्रकारांना प्रोत्साहन देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी दिला आहे.

मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात सलामी दिली असून यंदा सरासरीएवढा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानेही वर्तविला आहे. पाऊस पडू लागला, की पर्यटक पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडतात. पावसामुळे बहरणाऱ्या निसर्गाची विविध रुप डोळ्यात साठविण्यासाठी पर्यकांचे जथ्थे ग्रामीण भागात धाव घेतात. त्र्यंबक-घोटी रस्त्यावरील पहिने परिसर असो किंवा इगतपुरी तालुक्यातील भावली धरणासह भंडारदरा मार्गावरील पर्यटन स्थळे असो, तेथे पर्यटकांचा ओढा अधिक असतो. अशा परिसरात पर्यटकांची गर्दी होते. त्यामध्ये टवाळखोरही असतात. त्यांच्याकडून मद्य पिऊन धिंगाणा घातला जातो. छेडछाडीसारखे प्रकारही घडतात. पोलिस स्टेशन दूर असल्याने अशा गैरप्रकारांविरोधात आवाज उठवून ते रोखण्यातही मर्यादा येतात. अशा प्रकारांविरोधात तक्रारी प्राप्त होत असल्याने यंदा पोलिसांनी या परिसरावर विशेष लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाहनांची होणार तपासणी

नाकाबंदी करून वाहनांची तपासणी, ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या केसेस केल्या जाणार आहेत. बेकायदेशीररित्या मद्य विक्री करणाऱ्या खानवळी तसेच ढाब्यांवरही कारवाई केली जाईल, अशी ग्वाही पोलिस अधीक्षक दराडे यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मलनि:सारण केंद्राचे काम बंद पाडले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

नाशिक महापालिकेने अमृत योजनेअंतर्गत गंगापूरोडवरील बेंडकुळेनगर भागात मलजल उपसा केंद्र म्हणजेच मलनिःसारण केंद्राचे काम सुरू केले होते. परंतु, रहिवाशांच्या सेवा सुविधा असलेल्या भूखंडावर मलनिःसारण केंद्राचे काम सुरू करण्यात आल्याने स्थानिक महिलांनी खोदलेल्या खड्ड्यात उतरत काम बंद पाडले होते. यानंतर पुन्हा बुधवारी महापालिकेच्या ठेकेदाराने काम पूर्ववत सुरू केल्याने स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवत पुन्हा काम बंद पाडले.

यावेळी रहिवाशांनी जागा बदलून मलनिःसारण केंद्राचे काम केले जात असल्याचा आरोप केला. मंजूर जागेवर मलनिःसारण केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. दरम्यान, रहिवाशांचा विरोध बघता शिवसेना गटनेते तथा नगरसेवक विलास शिंदे, भाजपा नेते वसंत गिते, नगरसेवक संतोष गायकवाड, नगरसेविका राधा बेंडकुळे, नयना गांगुर्डे यांनी रहिवाशांची भेट घेत चर्चा केली. मलनिःसारण केंद्र रहिवाशी भागाला लागून करण्यात येऊ नये, अशी मागणी रहिवाशांनी नगरसेवक तसेच महापालिका अधिकाऱ्यांकडे केली. विशेष म्हणजे अमृत योजनेत मंजूर असलेला निधी परत जाऊ नये, यासाठी रहिवाशांच्या सेवा सुविधा भूखंडांवर मलनिःसारण केंद्र उभारण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

नाशिक महानगरपालिकेला मलनिःसारण केंद्र (एसटीपी) प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेमधून निधी देण्यात आला आहे. यातून नियोजित कालावधीमध्ये नाशिक मनपास सदर निधी खर्च करण्यास सांगण्यात आले आहे. योजनेअंतर्गत गंगापूर गाव येथे १८ दशलक्ष लिटर क्षमतेचे मलनिःसारण केंद्र बांधण्याचे काम सुरू आहे. सदर मलनिःसारण केंद्रासाठी ले-आऊटप्रमाणे बेंडकुळेनगर, आनंदवली परिसरातील चिखलीनाला, सर्व्हे क्रमांक ६२ व ६३ येथे जागा आरक्षित केलेली आहे. तसा बांधकामाबत स्थायी समितीत ठराव करून निविदादेखील मागवण्यात आल्या होत्या. परंतु, सदर जागा अद्याप सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या मालकीची असून, नाशिक महानगरपालिकेने ही जागा हस्तांतरीत केलेली नाही.

ट्रस्ट सदर जागा जमिनीच्या चालू बाजारभावाप्रमाणे पालिकेला देण्यास तयार आहे. परंतु, मनपाची आर्थिक स्थिती ठीक नसल्याचे कारण पुढे करीत अद्याप सदर जागा ताब्यात

घेण्यात आलेली नाही. दुसरीकडे अमृत योजनेअंतर्गत काम करण्याचा कालावधी संपत आल्याने व एसटीपी प्रकल्पाचा निधी परत जाऊ नये यासाठी पालिकेने बेंडकुळेनगरच्या रहिवाशी परिसरामध्येच साईदेवेश्वर गृहनिर्माण संस्थेच्या जागेमधील नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी असलेल्या ५ टक्के राखीव जागेवरच मलजल उपसा केंद्राचे बांधकाम सुरू

केले आहे. त्यामुळे परिसरातील स्थानिक रहिवाशांनी आरोग्यास धोका असल्याचे सांगत या ठिकाणचे बांधकाम बंद पाडले.

बेंडकुळेनगर भागात सर्वांचेच बंगले आहेत. यात बंगल्यांना लागून महापालिका मलनिःसारण केंद्र उभारत असल्याने त्याचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागणार आहे. मंजूर असलेल्या जागेवरच मलनिःसारण केंद्र उभारले पाहिजे. केवळ निधी परत जाऊ नये, म्हणून रहिवाशांना त्रास देणे योग्य नाही.

- शरद बेंडकोळी, स्थानिक रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंतनू कांबळे निधन

$
0
0

(पान-१साठी)

लोकशाहीर शंतनू कांबळे यांचे निधन

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

प्रसिद्ध विद्रोही कवी आणि लोकशाहीर शंतनू नाथा कांबळे (वय ४१) यांचे बुधवारी (दि. १३) दुपारी दीर्घ आजाराने नाशिकरोड येथील बिर्ला हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दीपाली आणि मुलगा कनिष्क, वडील नाथा आणि आई लक्ष्मी असा परिवार आहे. गुरुवारी सकाळी नऊ वाजता शंतनू यांच्या पार्थिवावर नाशिक अमरधाम येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

सामाजिक विषमतेविरुद्ध शाहिरीच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर जनजागृती केली. जागर लढाऊ लोककला आघाडी, लोकसांस्कृतिक मंचसह विविध विद्रोही सांस्कृतिक संघटनांनी शंतनू यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून २००५ मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. परंतु, न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली होती. मॅट्रिकपर्यंत शिक्षण झालेले शंतनू मूळचे शेटफळे, ता. आटपाडी, जिल्हा सांगली येथील होते. वडील मुंबईत नोकरीस असल्याने ते मुंबईतील वडाळा येथे स्थायिक झाले होते. २००८ साली ते नाशिकमध्ये वास्तव्यास आले. नाशिक-पुणे महामार्गावरील आंबेडकर नगर येथे ते वास्तव्यास होते.

(सविस्तर वृत्त...३)

\Bशाहिरी बाणा काळाच्या पडद्याआड

\Bम. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

प्रसिद्ध विद्रोही कवी आणि लोकशाहीर शंतनू नाथा कांबळे (वय ४१) यांचे बुधवारी दुपारी दीर्घ आजाराने नाशिकरोड येथील बिर्ला हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दीपाली आणि मुलगा कनिष्क, वडील नाथा आणि आई लक्ष्मी असा परिवार आहे.

शंतनू मागील काही वर्षांपासून पोटाच्या विकाराने त्रस्त होते. तब्येत बिघडल्याने गेल्या आठवड्यात त्यांना नाशिकच्या बिर्ला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

पाच-सहा दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. बुधवारी सकाळी त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. लोककवी वामनदादा कर्डक, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर गवाणकर, शाहीर विलास घोगटे यांच्या प्रबोधनात्मक गितांचा त्यांच्यावर बालपणीच प्रभाव पडल्याने पुढे चालून ते शाहिरीकडे वळले. राज्यभर त्यांनी विद्रोही चळवळीच्या एकीकरणासाठी प्रयत्न केले. कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या नेत्या सुमन वाघ यांचे ते जावई होत.

तीन महिने होते पोलिस कोठडीत

२००५ मध्ये शंतनू यांना नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून नागपूर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. रायपूर येथे आदिवासींच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले असता त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना १०० दिवस पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. मात्र, तपासाअंती न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. पोलिसांनी तुरुंगात प्रचंड मानसिक आणि शारिरीक छळ केल्याचा आरोप त्यांनी केला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते अंथरुणाला खिळले होते. त्यातच त्यांना क्षयाची लागण झाली. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांनी वडाळ्याहून नाशिकला मुक्काम हलवला होता. मात्र, नाशिकमध्ये आल्यानंतरही आजाराने त्यांची पाठ सोडली नव्हती.

सामाजिक विषमतेवरील भाष्यकार

शंतनू अनेक वर्षांपासून विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि जातीअंताच्या लढाईत ते अग्रेसर होते. त्यांच्या कविता आणि गाण्यातून ते जातीय अत्याचार, शोषण, आर्थिक-सामाजिक विषमता आणि मानवतावादावर भाष्य करत असायचे. 'दलिता रे हल्ला बोल ना... श्रमिका रे हल्ला बोलं ना...' आणि 'समतेच्या वाटेनं, खणकावत पैंजण यावं तू यावं, तू यावं, तू यावं बंधन तोडीत यावं...' अशी काही त्यांची गीते चळवळीत लोकप्रिय होती. अत्यंत गाजलेला 'कोर्ट' हा सिनेमा त्यांच्या आयुष्यावर बेतलेला होता. ते 'विद्रोही' मासिकाच्या संपादक मंडळावरही होते.

--

कोट

--

विद्रोही चळवळ त्यांचा प्राण होता. सामाजिक विषमतेवर त्यांनी शाहिरी रचली व सादर केली. लोकशाहिची तत्त्वे अंगिकारून वंचितांचे प्रबोधनाचे काम त्यांनी केले. त्यांच्या अवेळी जाण्याने विद्रो चळवळीची मोठी हानी झाली आहे.

-प्रा. गंगाधर आहिरे, साहित्यिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन वीज देयकावर अतिरिक्त शुल्क नाही

$
0
0

ऑनलाईन देयक भरणा कोणत्याही शुल्कविना

राज्यभरातील वीजग्राहकांना दिलासा

म.टा.प्रतिनिधी, नागपूर

ऑनलाइन व्यवहार केल्यावर त्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त शुल्क मोजावे लागते. त्यातच बरेदा वीज बिल किवा इतर देयकांसाठी संबंधित कंपन्यांकडून सुविधेबद्दल शुल्क आकारण्यात येते. मात्र, आता महावितरणने ऑनलाइन वीज देयक भरल्यावर त्यावर कुठलेही शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार वीजदेयकाचा भरणा सुलभतेने करता यावा व अशा ग्राहकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी क्रेडीट कार्डचा अपवाद वगळता नेट बँकिंग, डिजिटल वॉलेट, कॅशकार्ड डेबिटकार्ड व युपीआय पध्दतीने विजदेयकाचा भरणा केल्यास महावितरणने अशा ग्राहकांना ही सेवा नि:शुल्क केली आहे.

महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे (www.mahadiscom.in) व महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे ग्राहक विजदेयकाचा ऑनलाईन भरणा करु शकतात. ऑनलाईन विजदेयकाचा भरणा करताना केवळ क्रेडीटकार्डद्वारे भरणा केल्यास ग्राहकांना शुल्क आकारण्यात येईल. उर्वरित इतर सर्व पध्दतीने (नेटबँकींग, युपीआय, डेबिट कार्ड, डिजिटल वॉलेट, कॅशकार्ड) विजदेयकाचा भरणा केल्यास ग्राहकांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

ऑनलाईन पध्दतीने भरणा केल्यास ग्राहकास त्याच्या नोंदणीकृत मोबाईलवर SMS द्वारे त्वरित पोच मिळते. तसेच www.mahadiscom.in या संकेतस्थळावर Payment History तपासल्यास वीजबील भरणा तपशील व पावतीही उपलब्ध होते. ऑनलाईन वीजबील भरणा पध्दत अत्यंत सुरक्षित असून यासंदर्भात काही तक्रार अथवा शंका असल्यास ग्राहक helpdesk_pg@mahadiscom.in या ई-मेल आयडीवर महावितरणशी संपर्क साधूशकतात.

ग्राहकांनी वीजबील भरणा केंद्रासमोर रांगेत उभे राहून वीजबील भरण्यापेक्षा महावितरणने उपलब्ध करुन दिलेल्या निशुल्क ऑनलाईन वीजबील भरणा सेवांचा फायदा घ्यावा व विजदेयकाचा भरणा ऑनलाईन करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटीस पाठवायची कुठे?

$
0
0

भिडे गुरुजींचा पत्ता शोधण्यासाठी पोलिसांकडे धाव

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'माझ्या शेतातील आंबे खाल्यानंतर मुले होतात', शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या या वादग्रस्त विधानाची चौकशी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने सुरू केली आहे. चौकशीसंदर्भात आरोग्य संचलनालयाकडून पत्र प्राप्त झाल्यानंतर वैद्यकीय विभागाकडून पहिल्या टप्प्यात भिडे गुरुजींना नोटीस पाठविली जाणार आहे. परंतु, भिडे गुरुजींचा नेमका पत्ता नसल्याने नोटीस कुठे पाठवायची अशा संभ्रमात अधिकारी पडले असून, त्यासाठी आता पोलिस आयुक्तांकडे धाव घेतली आहे.

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी रविवारी (दि. १०) नाशिकमधील कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले. त्यावर चौफेर टीका झाल्यानंतर भिडे समर्थकांकडून सारवासारवरही करण्यात आली. 'लेक लाडकी अभियान'तर्फे आरोग्य विभागाच्या पुणे येथील अतिरिक्त संचालकांकडे भिडे यांच्या विधानासंदर्भात तक्रार करण्यात आली. त्यानुसार आरोग्य संचलनालयाने विधानाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिकेच्या वैद्यकीय व आरोग्य विभागाला दिले. महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना विधानाची खातरजमा करण्यासाठी पत्र प्राप्त झाले असून, त्यानुसार महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. गर्भलिंग निदान व प्रसूतीपूर्व चिकित्सा कायद्यानुसार भिडे यांची चौकशी केली जाणार आहे. या चौकशीच्या पहिल्या टप्प्यात भिडे यांना नोटीस पाठविली जाणार आहे, तर सभेला हजर असलेल्या काही लोकांचे जाबजबाब नोंदविण्याबरोबरच भाषणाची व्हिडिओ क्‍लिप तपासली जाणार आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल सोमवारी (दि. १८) होणाऱ्या समितीच्या बैठकीत सादर केला जाणार असल्याची माहिती प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. जयराम कोठारी यांनी दिली आहे.

व्हिडीओ तपासणीचा पेच

भिडे यांच्या वक्तव्यामुळे गर्भलिंग निदान व प्रसूतीपूर्व चिकित्सा कायद्याचे उल्लंघन झाले का, याची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी भिडे यांना नोटीस पाठविली जाणार आहे. महापालिकेच्या नोटिसीवर त्यांच्याकडून उत्तर प्राप्त न झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, भिडे यांच्या वास्तव्याचा पत्ता महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नाही. तसेच, भिडे हे सतत राज्यभर दौऱ्यावर असतात. त्यामुळे त्यांना नोटीस नेमकी कुठे द्यायची, अशा पेचात अधिकारी आहेत. शिवाय, त्यांचा व्हिडीओ खरा की खोटा ही तांत्रिक बाब वैद्यकीय विभाग कशी तपासणार हा सुद्धा पेच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटी बसचा मार्ग बदलणार?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका 'स्मार्ट रोड'चे काम एका बाजूने सुरू झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी या मार्गावरील सिटी बसच्या दररोजच्या १०१८ फेऱ्या कॅनडा मार्गावरुन वळविण्याचा हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अशोकस्तंभ, रविवार कारंजा व पंचवटीकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. त्याचप्रमाणे सिटी बसच्या प्रवासाचे अंतर वाढणार असून, त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

मंगळवारी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व एसटीचे अधिकारी यांची पंचवटीच्या विभागीय कार्यालयात बैठक झाली. त्यात सिटी बसच्या मार्गावर चर्चा झाली. या चर्चेत एसटीने सिटी बसचा मार्ग बदलण्यापेक्षा एकेरी वाहतूक सुरू करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे या विषयावर निर्णय झाला नसला तरी एसटीने पर्यायी मार्गाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून या स्मार्ट रोडचे शासकीय कन्या शाळेच्यासमोरील सीबीएस ते मेहरपर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर स्मार्ट डिव्हायडर टाकून दोन्ही बाजूंची वाहतूक एकाच रस्त्यावरून सुरू करण्यात आली आहे. पण, सिटी बसमुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याचे सांगत स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनने एसटीलाच मार्ग बदलण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे एसटीने तूर्त मार्ग बदलल्यास त्याचे अंतर किती पडेल व त्याची प्रवाशांना किती चाट पडेल व त्यातून किती जणांची गैरसोय होईल त्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

असा असेल सिटी बसचा मार्ग

सीबीएस ते मेहेरपर्यंत सिटी बसचा रस्ता बंद केला तर बसचा मार्ग बदलणार आहे. नाशिकरोडहून येणाऱ्या बस शालिमारवर आल्यानंतर त्या सीबीएसहून कॅनडा कॉर्नरपर्यंत जातील. त्यानंतर त्या गंगापूररोडवरुन चोपडा लॉन्स, रामवाडीवरुन निमाणी बस स्थानकावर सोडण्याचा विचार सुरू आहे. एसटीने मार्ग बदलल्यास प्रवाशांच्या गैरसोयीबरोबरच अंतर व भाडे वाढणार असल्यामुळे प्रवाशांच्या संख्येत घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मार्ग एकेरी करावा व एसटीला कोर्ट व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीच्या बाजूच्या रस्त्यावरून जागा सोडावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. अशोक स्तंभाकडून येणाऱ्या बस व इतर वाहतूक एमजी रोडवरून शालिमारकडे वळवावी असे सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दीड कोटीची इमारत वापराविना

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने खत प्रकल्पावर सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून उभ्या केलेली प्रशिक्षण केंद्राची इमारत गेल्या नऊ वर्षांपासून वापराविना पडून आहे. त्यामुळे राज्याच्या लोकलेखा समितीने गंभीर आक्षेप घेतला आहे. गरज नसताना खतप्रकल्पावर ही इमारत उभी करून लोकांचा पैसा वाया घातल्याची टिप्पणी लेखापालाकडून करण्यात आली आहे. या आक्षेपाबाबत बुधवारी लोकलेखा समितीसमोर सुनावणी झाली. आयुक्त तुकाराम मुंढे आणि पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी हजेरी लावून महापालिकेची बाजू मांडली. या रिकाम्या इमारतीत महापालिकेकडून लवकरच कौशल्य विकास प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे.

महापालिकेच्या वतीने सन २००७ मध्ये ६० कोटी रुपये खर्चून खतप्रकल्प तयार करण्यात आला. या प्रकल्पावेळीच येथे दीड कोटी रुपये खर्चून स्वतंत्र प्रशिक्षण केंद्राची इमारत उभी करण्यात आली होती. परंतु, नियोजन न केल्याने ही इमारत वापराविना पडून आहे. महापालिकेने या इमारतीचा कोणत्याही उपयोजनेसाठी वापर करून घेतलेला नाही. त्यामुळे पालिकेचा खर्च वाया गेला आहे. यासंदर्भात २०१५ मध्ये झालेल्या लेखापरीक्षणात ही बाब उघडकीस आली होती. महापालिकेने उभ्या केलेल्या या वास्तुमुळे जनतेच्या पैशांचे नुकसान झाल्याचा ठपका लेखापरीक्षणात ठेवण्यात आला आहे. त्यानंतर हा आक्षेप लोकलेखा समितीपुढे ठेवण्यात आला. लोकलेखा समितीने यासंदर्भात महापालिकेकडून खुलासाही मागवला होता. बुधवारी लोकलेखा समितीसमोर हा आक्षेपाचा पॅरा ठेवण्यात आला असून, त्यावर महापालिकेच्या वतीने आयुक्त तुकाराम मुंढे आणि शिवाजी चव्हाणके यांनी महापालिकेच्या वतीने आपली बाजू मांडली. या इमारतीचा वापर केला गेला जात नसल्याचे महापालिकेने मान्य केले असून त्याचा वापर करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे समजते.

जबाबदारी निश्चित होणार

लोकलेखा समितीने दीड कोटी रुपये खर्च करून तयार केलेली इमारत गेल्या नऊ वर्षांपासून वापराविना पडून असल्याबद्दल पालिका प्रशासनाला जाब विचारला. या इमारतीची गरज नव्हती तर बांधलीच का, असा सवाल उपस्थित करीत त्यासंदर्भात जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तत्कालीन कार्यकारी अभियंता रमेश पवार यांच्या अडचणी वाढणार आहेत. पवार निवृत्त झाले असले तरी, त्यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्यांच्यावरील आरोपपत्रात अजून वाढ होणार असल्याने त्यांची अडचण वाढणार आहे.

कौशल्य विकास प्रकल्प

लोकलेखा समितीच्या गंभीर आक्षेपानंतर महापालिका प्रशासन जागे झाले असून, या इमारतीचा वापर करण्यासाठी येथे पालिकेचा कौशल्य विकास प्रकल्प सुरू करण्याची तयारी केली आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव पालिकेकडून तयार केला जात आहे. समाजकल्याण विभागाच्या वतीने शहरातील तरूण व मागासवर्गीय तरुणांसाठी व महिलांसाठी पालिकेकडून विविध प्रकारच्या रोजगाराचे प्रशिक्षण देण्याच्या योजना आखल्या जातात. त्यासाठी महापालिका आर्थिक मदत करते. त्यामुळे या रोजगाराचे प्रशिक्षण देण्यासाठी महापालिकेकडून आता इथे कौशल्य विकास प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव असून, त्यावर लवकरच कारवाही केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोत मद्यपींचा धुमाकूळ

$
0
0

स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

म. टा. वृत्तसेवा, सिडको

गुन्हेगारीत शहराच्या तुलनेत कायम अग्रक्रमावर असलेल्या अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांनी पुन्हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हनुमान चौक परिसरात मद्यपींनी धुमाकूळ घालत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत पोलिसांकडून काहीही कारवाई होत नसल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सिडकोतील गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी आता तरी पोलिस रस्त्यावर उतरून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सिडको परिसर हा गुन्हेगारीच्या आकडेवारीवरून कायमच अग्रस्थानी राहिलेला आहे. काही वर्षांपूर्वी दुचाकी जाळपोळीचा प्रकार झाला होता. त्यानंतर उत्तमनगरसह परिसरात टिप्पर गँगने घातलेल्या धुमाकूळामुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले होते. टिप्पर गँगचे सर्वच सक्रीय सदस्य सध्या जेलमध्ये असले तरी आजही सिडकोत अनेक लहान-मोठ्या टोळ्या तयार होत आहेत. त्याच्या उपद्रवांकडे पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात आहे का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

हनुमान चौक भागात दोन दिवसांपूर्वीच मध्यरात्री काही मद्यपींनी गोंधळ घालत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अचानक सुरू झालेला हा प्रकार रोखण्यासाठी काही नागरिकांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, टवाळखोरांनी अजून त्यांच्या काही साथीदारांना बोलावून घेत शिवीगाळ करीत नागरिकांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सिडको परिसरातील खुल्या जागा, उद्याने किंवा रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी सर्रासपणे काही टवाळखोर मद्यपान करून परिसरात धुमाकूळ घालत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. सिडकोत दररोज वाढणाऱ्या या प्रकारांना आळा घालण्यासाठी अंबड पोलिसांनी खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरून ठोस कारवाई केली पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सिडकोत काही जुगार अड्ड्यावरही छापे टाकण्यात आले असले तरी अजूनही अनेक ठिकाणी जुगार अड्डेही सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

तक्रार करायची तरी कोठे?

सिडकोत वाढत्या गुन्हेगारीला अटकाव करण्यासाठी पोलिसांनी अनेक प्रयत्न केले असले तरी त्यात सातत्य राहत नाही. परिणामी गुन्हेगारी वृत्ती पुन्हा डोके वर काढते. अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत आजही चायनीज गाड्या किंवा लहान-मोठ्या हॉटेलमध्ये राजरोसपणे मद्यपान केले जाते. याकडे पोलिस कानाडोळा करीत असल्याने नागरिकांनी तक्रारी करायच्या तरी कोणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज मुख्याध्यापक कार्यशाळा

$
0
0

नाशिक : इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी इंदिरानगरमधील गुरू गोविंदसिंह कॉलेजमधील ऑडेटोरियम हॉलमध्ये गुरुवारी (दि. १४) मुख्याध्यापकांसाठी कार्यशाळा होणार आहे. सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या या कार्यशाळेला प्रवेश प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व कॉलेजेसच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांनी उपस्थिती बंधनकारक आहे. यात संबंधितांना प्रवेश प्रक्रियेविषयी सूचना देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी दिली आहे. दरम्यान, या प्रवेश प्रक्रियेंतर्गत २३ हजार ७८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आणखी ३९० किलो गांजा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात दोनच दिवसांपूर्वी तब्बल ७५० किलो गांजा पकडल्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सिन्नर तालुक्यातूनही बुधवारी ३९० किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे दोन दिवसांमध्ये शहर पोलिसांनी सुमारे ५० लाख रुपयांचा एक टन गांजा पकडला आहे. अजून दोनशे किलो गांजा मिळणे बाकी असून त्याचा शोध गुन्हे शाखा युनिट एकचे पथक घेत आहे.

गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तपोवन परिसरात सापळा रचून ३४ लाख रुपयांचा सुमारे ६८० किलो गांजा पकडला. गांजाची वाहतूक करणाऱ्या यतीन अशोक शिंदे (३५, रा. म्हसरुळ) आणि सुनील नामदेवराव शिंदे (वय ४७, रा. मिरचीचे पालखेड, ता. निफाड) या दोघांना अटक केली. काही गांजा सिन्नर तालुक्यात विकल्याची माहिती त्यांनी तपासात दिली. त्यानुसार पोलिसांनी सिन्नरच्या लिटंनवाडी शिवारात छापा टाकला. तेथे संतोष गोळेसर याच्याकडे चौकशी असता गोठ्यात १९ लाख ५० हजार रुपयांचा ३९० किलो गांजा मिळून आला. पोलिसांनी दोन दिवसांत सुमारे एक टन गांजा जप्त केला आहे. संशयित यतीन आणि सुनील यांनी ओडिशा येथून १२०० किलो गांजा आणला होता. त्यातील पाचशे किलो गांजा त्यांनी विकल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यामुळे आणखी २०० किलो गांजाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकांच्या पाठबळाने पाल्यांची यशस्वी भरारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

पाल्यांच्या करियरबाबत पालकांतही जिद्द असली पाहिजे. पाल्यांच्या करियरमध्ये पालकांना रस असतो अशाच पालकांचे पाल्य करियरचे ध्येय गाठू शकतात. पालकांच्या पाठिंब्याशिवाय मुले यशाचे सर्वोच्च शिखर सर करू शकत नाही, असे मत माजी मंत्री बबनराव घोलप यांनी नाशिकरोड येथ व्यक्त केले.

भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदी नियुक्ती झालेल्या देवळाली गावातील अनंत हेमंत देशमुख याचा मंगळवारी नाशिकरोड येथील उत्सव लॉन्स येथे नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अनंतच्या यशाचे कौतुक करताना ते बोलत होते. पाल्यांचे शिक्षण पूर्ण करणे आजच्या पालकांपुढे मोठी आव्हानात्मक बाब आहे. मोठ्या विपरित परिस्थितीतही अनंतने मेहनत करून मिळविलेले यश शाळेसह नाशिककरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे मत याप्रसंगी सेंट झेवियर हायस्कूलचे प्राचार्य कटाळे यांनी व्यक्त केले. अनंतचे यश हे त्याग व मेहनतीचे प्रतीक आहे. हे यश वाखाणण्याजोगे असल्याचे मत माजी न्यायाधीश रमेश देशमुख यांनी सांगितले.

अनंतनेही यावेळी आपल्या मनोगतातून त्याच्या यशामागचे रहस्य उलगडले. या कार्यक्रमास व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकरोड शहराध्यक्ष मनोहर कोरडे, अनंतचे वडील हेमंत देशमुख, आई वृंदा देशमुख आदींसह शहरातील नागरिकांसह देशमुख कुटुंबीयांचे आप्तेष्ठ उपस्थित होते. ॲड. वर्षा देशमुख यांनी या सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नकाणे तलावात जवानाची आत्महत्या

$
0
0


धुळे : मंगळवारपासून बेपत्ता असलेल्या राज्य राखीव पोलिस बल क्र. ६ मधील जवान विनोद सोनवणे (३७) यांचा मृतदेह नकाणे तलावात बुधवारी आढळून आला. सोनवणे यांना व्यसन असल्याने त्यांना जळगावला समुपदेशनासाठी पाठवले होते. मात्र मंगळवारी सायंकाळी ते धुळ्याकडे निघाल्यानंतर बेपत्ता झाले होते. बुधवारी तलावात मृतदेह दिसताच स्थानिकांनी त्याची माहिती तालुका पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयाला पाठवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तशृंग गडावरील जलस्रोत अस्वच्छ

$
0
0

स्वच्छतेसाठी आठ दिवसाचा अल्टिमेटम; हॉटेल व्यावसायिकांवर कार्यवाही

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण तालुक्यातील सप्तशृंग गड येथील पाणी दूषित असल्याने ग्रामपंचायतीला लाल कार्ड मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण समितीचे सदस्य सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) यांनी २० जून रोजी गडावर तालुका पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण समिती, ग्रामसेवक व सरपंच यांची संयुक्तीक बैठक घेणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर कळवणचे गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर पाटील यांनी गडावरील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची पाहणी केली. या पाहणीत अनेक त्रुटी व अस्वच्छता आढळून आल्याने अधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला.

गडावरील सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर जवळील रस्ता, जाळी व गेट बसविणे, गंगा जमुना कुंड खड्ड्यांमध्ये मुरूम टाकणे, मंबा देवी चौकातील हातपंप, शिवालय तलावाजवळील कुंड, काली कुंड, उपकेंद्राजवळील हातपंप आदी पिण्याच्या पाण्याचे स्रोतांची पाहणी केली. या पाहणीत अनेक त्रुटी व अस्वच्छता आढळून आल्याने ग्रामसेवक, सरपंच व सदस्य यांना आठ दिवसांच्या आत सर्व स्रोतांची स्वच्छता करून संरक्षक भिंत, जाळी बसविणे, स्रोताच्या परिसराजवळ स्वच्छता करून मुरूम टाकणे, नियमित पाण्याचे शुद्धीकरण करणे आदी सूचना करण्यात आल्या आहेत. यावेळी गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर पाटील, वैद्यकीय अधिकारी एन. पी. जे. सिद्धू, आरोग्य सेवक बी. ए. पाटील, स्वच्छ भारत समन्वयक सचिन मुठे, ग्रामसेवक रतिलाल जाधव, सरपंच सुमन सूर्यवंशी, गिरीश गवळी, धनेश गायकवाड आदी उपस्थित होते.

अनधिकृत हॉटेल व्यावसायिकांवर कार्यवाही

गडावरील स्रोतांची पाहणी करीत असताना अनधिकृतपणे सुरू असलेल्या हॉटेल व अनधिकृतपणे विहीर कुंडातून दूषित पाणी घेणाऱ्या हॉटेल मालकांची पाण्याची मोटार व नळी जप्त करून मालकांना गटविकास अधिकारी यांनी खडसावले. तसेच उघड्यावर अन्न विकणारे, ग्राहकांना दूषित पाणी पाजणारे हॉटेल व्यवासायीक, अस्वच्छ असलेल्या हॉटेल व्यावसायीकांना यांनी नोटीस बजावून कार्यवाही करण्यास ग्रामसेवकांना आदेश दिले.

सप्तशृंगी ट्रस्टच्या भोजनालय आहारासाठी व कर्मचारी निवासाला पाणी पुरविणाऱ्या काली कुंडात कचरा, शेवाळ साचलेले आढळले. त्यामुळे पाणी दूषित असल्याचे निदर्शनास आले आहे. काली कुंडाची साफसफाई करून ट्रस्टने पाण्याचे शुद्धिकरण करावे. - डी. एम. बहिरम, गटविकास अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिटिझन रिपोर्टर

$
0
0

सिटिझन रिपोर्टर

०००००००००

येवलेकर मळा

धोकेदायक खड्डा बुजवावा

येवलकर मळ्याजवळील बॉइज टाउन शाळेच्या प्रवेशद्वाराच्या अगदी वळण रस्त्यावर काही दिवसांपूर्वी जलवाहिनीच्या कामासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला. परंतु, तो खड्डा महापालिका कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत बुजवून रस्ता पूर्ववत केलेला नाही. पावसाळा सुरू होण्यापूर्वी तो बुजविण्यात आलेला नाही. या खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. तरी महापालिकेने तो धोकेदायक खड्डा त्वरित बुजवावा.

- विलास भालेराव

बेलतगाव

मोबाइल नेटवर्क गायब

देवलाली कॅम्पलगत असलेल्या बेलतगाव या गावत नामांकित कंपन्यांची मोबाइल नेटवर्कची प्रचंड प्रमाणात समस्या निर्माण होत आहे. या कंपन्यांची फोर जी सेवा फक्त नावपुरतीच आहे, असे म्हणायला हरकत नाही. यामुळे येथील नागरिकांची नेटवर्कअभावी गैरसोय होत आहे.

- आकश घाडगे

शहर परिसर

दिलासा कधी मिळणार?

दिव्यांगांसाठी महापालिका फक्त योजना जाहीर करते. पण त्याचा लाभ कधी मिळणार? अद्याप एकाही योजनेचा लाभ मिळालेला नाही. या प्रश्नी महापालिका प्रशासनाने गांभीर्य दाखवित दिव्यांगांना थेट लाभ मिळू शकेल, त्यांचे जीवन सुसह्य होऊ शकेल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे.

- शेखर निकम

मेनरोड

ठिकठिकाणी बालकामगार

बालकामगारांना कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा आहे. चिमुकल्यांकडून काम करून घेणाऱ्या मालकांवर गुन्हा दाखल होऊन कठोर कारवाई होऊ शकते. मात्र, मेनरोड परिसरात अनेक ठिकाणी असंख्य बालकामगार दिसतात. मग सरकारी विभाग त्याची दखल घेऊन या बालकांची सुटका का करीत नाही?

- कृष्णा सराफ

कृषिनगर

पावसाळी नाल्याची अवस्था

कृषिनगर कॉलनी व कल्पनानगरच्या मधून पावसाचे पाणी जाण्यासाठी असलेल्या नाल्यांचे तोंड पावसाळा आला तरीही मातीने बुजलेले आहे. ते तातडीने मोकळे करणे गरजेचे आहे. तसेच त्या नाल्यावर तेथे असणाऱ्या महिला वसतिगृहाने संरक्षक भिंत बांधलेली आहे. नाल्यांच्या बाजूच्या रहिवाशांनी त्या पावसाच्या पाण्याच्या नाल्यात घरातील सांडपाण्याचे पाइप सोडलेले दिसतात.

- संजय जाधव

उड्डाणपूल

दुचाकींची घुसखोरी

उड्डाणपुलावर दुचाकी प्रवेशास बंदी आहे, असे पोलिसांनी जाहीर केले. पण, त्याचे पालन होत नाही. पोलिसांकडे दुर्लक्ष करून अनेक दुचाकीचालक उड्डाणपुलावर घुसखोरी करतात. त्यामुळे अपघात होऊन दुचाकीचालकच ठार होतात. अशी घुसखोरी करणाऱ्या दुचाकीचालकांवर पोलिसांनी थेट कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

- अनिता भामरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या आरोग्यविभागात २२ पदे मंजूर

$
0
0

आरोग्य सेवा सुधारण्याची अपेक्षा

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिका क्षेत्रातील रुग्णालय व आरोग्य विभागासाठीची २२ पदे भरण्यास अखेर नगरविकास विभागाने मंजुरी दिल्याची माहिती आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली. शहरातील सामान्य रुग्णालय व मनपा रुग्णालयातील रिक्त पदांचा प्रश्नाबाबत न्यायालयात याचिका दाखल आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाने या पदांना मंजुरी दिल्याने आरोग्य सेवा सुधारण्यास मदत होणार आहे.

येथील सामान्य रुग्णालय तसेच मनपा रुग्णालयातील आरोग्य सेवांबाबत सामाजिक कार्यकर्ते राकेश भामरे यांनी याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने याबाबत एक समिती गठीत केली असून, विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या भेटीदरम्यान येथील रिक्त पदांचा प्रश्न गंभीर असल्याची बाब समोर आली होती. दरम्यान पालिकेचा अस्थापन खर्च अधिक असल्याने मनपा रुग्णालय व आरोग्य विभागातील पदे भरली जात नव्हती. मात्र याबाबत नुकताच अत्यावश्यक पदे भरण्यबाबतचा प्रस्ताव शासनाने मागविला होता.

अखेर शासनाच्या नगरविकास विभागाने आरोग्य विभागातील २२ पदे भरण्यास मान्यता दिली आहे. यात आठ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे. यापूर्वी शासनाने आरोग्याधिकारी, भूलतज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, स्त्री रोग तज्ज्ञ अशी सात पदे भरण्यास मंजुरी दिली होती. त्यामुळे आता एकूण २९ पदे मंजूर झाली असून, ती लवकरात लवकर भरण्यात येवून आरोग्य सेवा सुधारावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

या पदांना मंजुरी

वैद्यकशास्त्र २, आरोग्य अधिकारी ८, शस्त्रक्रियागृह सहाय्यक ३, रुग्णवाहिकाचालक ३, क्लीनर २, विकृतीशास्त्र तज्ञ १, क्षयरोग अधिकारी २, प्रयोगशाळा तंत्रज्ञ १.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ शाखांचे विलनीकरण नव्हे, सशक्तीकरण!

$
0
0

जिल्हा बँकेच्या २३ शाखांबाबत केदा आहेर यांचे स्पष्टीकरण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नोटबंदी व कर्जमाफीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ग्रामीण भागातील २३ शाखांचे नजीकच्या शाखांमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. या शांखांचे विलीनीकरण करू नये, अशी मागणी या शाखांमधील सभासदांनी केली. त्यामुळे निर्णय मागे घेत असून या शाखांचे आर्थिक मजबूतीकरण केले जाणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान जिल्हा बँकेतील शाखांमधील वीजबील भरणा केंद्र आठ दिवसांत पुन्हा सुरू होणार असल्याचेही आहेर यांनी स्पष्ट केले.

नोटाबंदी पाठोपाठ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे कर्जभरणा न झाल्याने जिल्हा बँकेची आर्थिक पत खालावली आहे. बँकेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी अध्यक्ष केदा आहेर यांनी प्रयत्न सुरू केले असून, त्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. बँकेची ही स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने प्रत्येक शाखेनिहाय होणारे व्यवहार व त्यातून बॅँकेला मिळणारा लाभ तसेच प्रशासकीय खर्च याचा ताळमेळ घेण्यास सुरुवात केली होती. त्यातून पहिल्या टप्प्यात २३ शाखांमध्ये अल्प व्यवहार होत असल्याचे व उलट प्रशासकीय खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, कार्यालयीन खर्चाचे प्रमाण पाहता त्या शाखा तोट्यात असल्याचे आढळून आले. त्यानुसार प्रशासनाने संचालक मंडळाकडे या बॅँक शाखांचे विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. येत्या ३० जूनपर्यंत या शाखांचे नजीकच्या शाखामध्ये केले जाणार होते. मात्र, शाखांचे विलीनीकरण झाल्यास शेतकरी सभासदांची गैरसोय होईल. यासाठी या शेतकऱ्यांनी विलीनीकरण करू नये अशी मागणी केली होती. त्यामुळे संचालक मंडळाने हा निर्णय मागे घेतला आहे. या शाखांचे विलीनीकरण न करता या सक्षम केल्या जाणार आहेत. त्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याचे अध्यक्ष आहेर यांनी सांगितले.

-

वीज भरणा केंद्र पुन्हा कार्यान्वीत

जिल्हा बँक आर्थिक अडचणी आल्याने बँकेच्या शाखांमधील वीज बील भरणा (वसुली) केंद्रात जमा होणारी रक्कम बँकेने वेळेत महावितरणकडे भरणा केली नसल्याने महावितरणने जिल्हा बँक शाखांमधील ही सुविधा बंद केली होती. हे केंद्र बंद केल्याने अतिदुर्गम भागातील शेतकरी सभासदांची गैरसोय होत होती. त्यासाठी अध्यक्ष आहेर यांनी महावितरणकडे पाठपुरावा केला असता महावितरणने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यासाठी आहेर यांनी मंगळवारी (दि.१२) ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. ही भरणा केंद्र सुरू करण्यासाठी बावनकुळे यांनी मान्यता दिली असून आठ दिवसात ही केंद्र पूर्ववत होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजसेवेत लायन्स क्लबचा सिंहाचा वाटा

$
0
0

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लायन्स आंतरराष्ट्रीय संघटनेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भारतीय पोस्टखात्याने लायन्सच्या बोधचिन्हाचा स्टॅम्प नुकताच प्रकाशित केला. या स्टॅम्पचे अनावरण उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात झाले. यावेळी लायन्सचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष नरेश अगरवाल, आंतरराष्ट्रीय संचालक अरुणा ओस्तवाल, जे. पी. सिंग, पोस्ट स्टॅम्पचे प्रकल्प समन्वयक मणिलाल शाह व जागतिक उपप्रमुख नरेंद्र भंडारी हजर होते.

लायन्सचा भारतीय समाजसेवेमध्ये महत्त्वाचा वाटा असून तन-मन-धनाने समाजातील दु:ख दूर करण्याचे कार्य या संघटनेने देशात केले आहे, अजूनही करत आहे. शतक महोत्सवी वर्षात भारतीय व्यक्ती आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे. लायन्सच्या पोस्ट स्टॅम्पचे अनावरण करताना मला अभिमान व हर्षोल्हास होत आहे, असेही नायडू यांनी सांगितले.

१०० व्या वर्षी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष भारतीय असणे आणि भारतीय पोस्ट खात्याने लायन्सचा पोस्ट स्टॅम्प प्रकाशित करणे हा योगायोग नाही. ही लायन्स ला भारताने दिलेली मानवंदना आहे, असे उद्गार माजी आंतरराष्ट्रीय संचालक व प्रकल्प प्रमुख नरेंद्र भंडारी यांनी व्यक्त केले. गेल्या आठ महिन्यांपासून पोस्टाने आमच्याबरोबर परिश्रम घेऊन अंतिम स्वरूप दिले, त्यांचे कौतुक करून मुख्य पोस्ट जनरल एन. एल. शर्मा यांचे व्यक्तिगत आभार मानले. भारतात लायन्सचे कार्य भव्य असले तरी यावर्षी ते अति भव्य करण्याचा मान नरेश अग्रवाल यांनी व्यक्त केला. १००० हून अधिक कायम स्वरूपी समाज केंद्र, सात भव्य नेत्र रुग्णालय, अंधांसाठी विशेष मदत, पूरग्रस्तांना भव्य मदत तसेच त्यांच्यासाठी लायन्सच्या माध्यमातून नवीन घरे बांधून देणे यासारखी कार्य या वर्षी होत आहेत. त्या कार्याला भारतीय पोस्ट खात्याने दिलेली मानवंदना लायन्स कधीही विसरणार नाही, हे आवर्जून सांगितले. लायन मणिलाल शाह यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमास भारतीय आंतरराष्ट्रीय संचालक लायन राजू, सिंग तसेच अनेक दिल्लीतील मान्यवर उपस्थित होते.

'लायन्स'चे आजोळ भारत

'लायन्स क्लब'चे माहेर अमेरिका असले तरी आज भारत त्याचे आजोळ झाले आहे याचा अभिमान वाटतो. 'लायन्स'ची आंतरराष्ट्रीय परिषद २०२२ मध्ये नवी दिल्ली येथे होत असून भारत देशाला मिळालेला हा बहुमान आहे. यासाठी 'भारतीय लायन्स'ने दिलेले योगदान कारणीभूत आहे, अशी पुष्ठी उपराष्ट्रपती नायडू यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाकळीत अपघाताची भीती

$
0
0

गतिरोधक त्वरित टाकण्याची मागणी

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

आगर टाकळीच्या नवीन चौकात गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. त्यामुळे येथे मोठा अपघात होण्याची भीती आहे. नगरसेवकांनी लक्ष घालून तातडीने गतीरोधक टाकावेत, अशी मागणी आहे. गतिरोधक त्वरित न टाकल्यास आणि अपघात झाल्यास महापालिकेला जबाबदार धरले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

कुंभमेळ्यात आगर टाकळीतून बाह्यवळण रस्ता काढण्यात आला आहे. हा रस्ता औरंगाबाद रस्त्याला जाऊन मिळतो. त्यामुळे नाशिक-पुणे मार्गावरील वाहनांना औरंगाबादरोडला त्वरित जाता येते. त्यामुळे वाहनांची वर्दळ वाढली आहे. चौकातून एक रस्ता जेलरोडला जातो. अन्य दोन रस्ते टाकळीकडे जातात.

जेलरोड, नाशिकरोडचे नागरिक नाशिकला जाण्यासाठी टाकळी रस्त्याचा वापर करतात. जेलरोडहून नाशिक-पुणे मार्गाने जाताना प्रदूषण आणि वाहनांच्या गर्दीला तोंड द्यावे लागते. त्यामुळे टाकळी रस्त्यावर विद्यार्थी, कामगार यांची गर्दी वाढली आहे. टाकळीच्या नवीन चौकातून त्यांना जीव मुठीत धरून जावे लागते. या चौकात हायमास्ट नाही. तसेच गतिरोधकही नाही. त्यामुळे वेगात येणारी वाहने धडकून अपघात होऊ शकतो.

झाडाचा बळी

बाह्य वळण रस्त्याच्या मध्यभागी झाड होते. ते दुभाजकाचे काम करायचे. त्यामुळे वाहनांचा वेग कमी होत होता. अडथळा नसतानाही हे झाड तोडण्यात आले. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. चारही नगरसेवकांनी त्वरित कार्यवाही करून नागरिकांना दिलास द्यावा, अशी मागणी स्थानिकांसह वाहनचालकांनी केली आहे.

फोटो : डॉ. बाळकृष्ण शेलार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images