Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘बिटको’तील समस्या सोडवा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

बिटको रुग्णालयाच्या समस्या सोडविण्यासंदर्भात मनसेच्या नाशिकरोड विभागातर्फे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयंत फुलकर यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, की बिटको रुग्णालयात फिजिशियन डॉक्टर, नाक, कान, घसा, त्वचारोजतज्ज्ञ नाहीत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. सायंकाळी ओपीडी सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. परंतु, त्या संबंधीचे कोणतेही फलक लावलेले नाहीत. त्यामुळे अनेक नागरिकांना याची माहिती नाही. या सर्व विषयांवर सकारात्मक प्रतिसाद देत डॉ. फुलकर यांनी लवकरच सर्व विषयांवर योग्य निर्णय घेतला जाईल व संबंधित विषय महापालिका आयुक्तांकडे मांडण्यात येणार असल्याचे सांगितले. सायंकाळी ओपीडी सुरू झाली आहे. त्याचाफलक लवकरच लावण्यात येईल, असे आश्वासनही डॉ. फुलकर यांनी दिले. यावेळी विभाग अध्यक्ष प्रकाश कोरडे, संतोष सहाणे, असलम मणियार, संतोष क्षीरसागर, प्रवीण पवार, साहेबराव खर्जुल, नितीन पंडित, सचिन चव्हाण, संजय पगारे, विलास कदम, उमेश भोई, अतुल धोंगडे, शशिकांत चौधरी,नितीन धानापुणे, पंकज सोनवणे, संदीप आहेर, रवी जाधव, तुषार वाडिले, प्रशांत बारगळ आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वराहमालकांना अल्टिमेटम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

निपाह आणि स्वाइन फ्लूसारख्या आजाराच्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी, तसेच स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी महापालिकेने शहरात अनधिकृतपणे सुरू असलेल्या वराहपालनावर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात वराह आढळल्यास त्यांना पकडून ठार मारण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील आठवड्यापासून केली जाणार असून, यासंदर्भात महापालिकेने सहा विभागांत पथके तयार केली असून, त्यांच्यामार्फत थेट वराह पकडण्याची कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे वराहमालकांनी शहरातील वराहांचे तातडीने स्थलांतर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिका क्षेत्रात महापालिकेच्या मुंबई प्रांतिक अधिनियम, १९४९ च्या कलम १४ व २२ व त्याचे पोटकलम ३ प्रमाणे महापालिका हद्दीत वराहपालन करता येत नाही. तरीही मोठ्या प्रमाणावर वराहपालन सुरू आहे. शहरात सुमारे ६०० ते ७०० च्या आसपास वराहांची संख्या आहे. वराहांमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी होते. तसेच, स्वाइन फ्लूच्या प्रसाराला ते कारणीभूत ठरतात. त्यामुळे वराहांबाबत महापालिकेकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी येतात. परंतु, वराह पकडण्याची यंत्रणा पालिकेकडे नसल्याने त्याच्यावर कारवाई होत नव्हती. सध्या निपाहच्या व्हायरसमुळे अगोदरच नागरिकांमध्ये भीती आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी शहर स्वच्छतेसाठी शहरात वराह फिरण्यास व पालनास पूर्णपणे बंदी घातली आहे.

तक्रारी करण्याचे आवाहन

पुढील आठवड्यापासून शहरात वराह आढळून आल्यास त्यांना थेट पकडून ठार मारण्याची कारवाई केली जाणार आहे. त्यासंदर्भातील अधिसूचना महापालिकेने काढली असून, वराहमालकांना सध्या शहराच्या हद्दीत असलेल्या वराहांना तातडीने शहराबाहेर स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. बंदीनंतरही शहरात वराह आढळल्यास एनएमसी ई-कनेक्ट अॅपवर तक्रारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वराहपालन करणाऱ्यांनी वराह स्थलांतर केले नाहीत, तर त्यांना इंजेक्ट करून ठार मारू किंवा त्याचे हार्ट ब्रेक करून मारू असा इशारा पालिकेने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पाटील यांची नार्को टेस्ट करा’

$
0
0

'पाटील यांची नार्को टेस्ट करा'

अमळनेर : भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या व्हायरल झालेल्या कथित क्‍लिपबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात अमळनेर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह जिल्हा बॅंकेचे संचालक तथा राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील, भाजपचे लालचंद सैनानी या तिघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांजा तस्कर कंजर व उदय वाघ यांची नार्कोटेस्ट करावी अशी मागणी अनिल पाटील यानी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता पाचवीसाठी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती व आठवीसाठी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. फेब्रुवारी महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत इयत्ता पाचवीचा निकाल २३.०९ टक्के, तर आठवीचा निकाल १२.६४ टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करण्यासाठी ३० जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

परीक्षा परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नाशिक जिल्ह्यातून २४ हजार १२२ विद्यार्थी तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी १८ हजार ५५९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.

ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करायची आहे त्यांनी संबंधित शाळांच्या लॉगिनमध्ये ३० जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. प्रत्येक एका पेपरच्या गुण पडताळणीसाठी ५० रुपये या प्रमाणे रक्कम ऑनलाइन पध्दतीने भरणे आवश्यक आहे. ३० दिवसांपर्यंत गुणपडताळणीचा निर्णय कळविण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम निकाल घोषित केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ती’ च्या आकाशात रंगले नाशिककर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्त्री जीवनात तिला वठवाव्या लागणाऱ्या भूमिका नेमक्या कशा होत्या, रंगभूमीवर तिचा प्रवास कसा राहिला, विविध नाटककारांनी स्त्री चित्रण कसे केले याचा प्रातिनिधिक आणि विचारप्रवृत्त करणारा प्रवास चितारणारे 'ती : आकाश आणि अवकाश' हे नाटक काळ जनस्थान फेस्टिव्हलमध्ये सादर करण्यात आले.

पत्रकार असणाऱ्या दोन स्त्रिया आपल्या अभ्यासाचा भाग म्हणून रंगभूमीवरील स्त्री जीवनाचा आढावा असा विषय घेतात आणि तो विषयच प्रत्यक्ष नाटकाचा विषय होतो हेच सादर झालेल्या 'ती'चे वैशिष्ट्य होते. अपर्णा क्षेमकल्याणी आणि पल्लवी पटवर्धन यांनी पत्रकराची भूमिका करून संगीत शारदा ते अलविदा या प्रातिनिधिक नाट्यकृतींना एका सूत्रात बांधले. मराठी नाट्यकलेचा प्रारंभ ते आधुनिक काळ असा व्यापक पट या नाटकातून नाशिककरांपुढे उभा राहिला. विद्या करंजीकर, नेहा जोशी, प्रांजली बिरारी, प्राजक्ता अत्रे, सुमुखी अथणी, हेमा जोशी, रागिणी कामतीकर, कीर्ती भवाळकर, धनश्री क्षीरसागर, लक्ष्मी पिंपळे, पल्लवी पटवर्धन, श्रीया जोशी, अपर्णा क्षेमकल्याणी, प्रिया तुळजापूरकर, विद्या देशपांडे, रेखा केतकर, आदिती मोराणकर, नुपूर सावजी यांनी वेगवेगळे प्रवेश सादर केले.

दिग्दर्शन व संगीत सुनील देशपांडे यांचे, तर संगीत साथ सुभाष दसककर, नितीन पवार, ईश्वरी दसककर यांची होती. नेपथ्य आनंद ढाकीफळे, प्रकाशयोजना विनोद राठोड व ईश्वर जगताप, वेशभूषा स्नेहल एकबोटे, रंगभूषा माणिक कानडे, ललित निकम यांची होती.

--

आज उत्सव नात्यांचा

आज (दि. २३) सायंकाळी ६ वाजता जनस्थान फेस्टिव्हलच्या पाचव्या आणि सांगतेच्या दिवशी 'उत्सव नात्यांचा' हा नृत्याचा कार्यक्रम परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सादर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्सून सक्रिय; जिल्हावासी सुखावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर आणि जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हळूहळू वाढत असून मान्सून सक्रिय झाला आहे. शुक्रवारी संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात २५ जूनपासून पाऊस अधिक सक्रिय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शनिवारी (दि. २३) जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील अशी शक्यताही हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

संततधार पावसाने हजेरी लावल्याने शहरवासी सुखावले आहेत. आद्रा नक्षत्रामध्ये प्रवेशताच जिल्ह्यात पावसाला दमदार सुरुवात होऊ लागली आहे. शुक्रवारी दुपारी पावसाच्या मध्यम स्वरुपाच्या सरींनी नाशिककरांना भिजविले. दुपारी एकच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. शहराच्या बहुतांश भागात दुपारी तीनपर्यंत मध्यम आणि हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली. खऱ्या अर्थाने मान्सून सक्रिय झाल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. शहरात शुक्रवारी सकाळी साडे आठ ते सायंकाळी साडेपाच यावेळेत ३.४ मि.मी. पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली.

ग्रामीण भागात पावसाचा वाढला जोर

गुरुवारी सकाळी साडेआठ ते शुक्रवारी सकाळी साडेआठ या २४ तासांमध्ये जिल्ह्यात १२१.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ८०८ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. गुरुवारी दिवसभरात चांदवड तालुक्यातील काही मंडळांमध्ये ४० मिमी पावसाची नोंद झाली. चांदवड तालुक्यात २८ मिमी पाऊस झाला. येवल्यात ४४ मिमी तर नांदगावात १९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मालेगावात गुरुवारी १५ मिमी पावसाची नोंद झाली असून शुक्रवारी देखील मालेगावात जोरदार पाऊस झाला. पावसाचा जोर २ जुलैपर्यंत कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरातील प्लास्टिकचे करायचे काय?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र सरकारने प्लास्टिकबंदीचा अध्यादेश जारी केल्यानंतर या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकाही सरसावली असून, ज्या नागरिकांच्या हातात प्लास्टिकच्या पिशव्या दिसतील, त्यांच्यावरही कारवाई करणार असल्याचा इशारा सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरत असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. नाशिक महापालिकेने जनजागृती करून कोणत्या वस्तूवर बंदी घालण्यात येणार आहे व कोणत्या वस्तूंच्या वापराला परवानगी आहे, याबाबत जनतेला माहिती द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

राज्य सरकारने अध्यादेश जारी केल्यानंतर महापालिकेनेही प्लास्टिकबंदीबाबत सूचना जाहीर केली. त्यानंतर शहरात असलेल्या अनेक दुकानांवर धाडी टाकून लाखो रुपयांच्या पिशव्या जप्त केल्या. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी कमी मायक्रॉनच्या पिशव्यांचे साठे होते, तेदेखील जप्त करण्यात आले. मात्र, शहरात अद्याप काही ठिकाणी पिशव्यांचा सर्रास वापर होताना दिसतो आहे. महापालिकेने शहराच्या मुख्य भागात निरीक्षकांची नेमणूक केली असून, रस्त्यावर फिरणाऱ्या ज्या व्यक्तीच्या हातात कमी मायक्रॉनची पिशवी सापडेल अशांवर त्याच ठिकाणी दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. काही लोकांनी महापालिकेचे कर्मचारी आहेत असे सांगून शहरातील चहाटपऱ्यांवरून पैसे उकळणे सुरू केले होते. त्यामुळे जे कर्मचारी कारवाई करणार आहेत, त्यांना महापालिकेचे ओळखपत्र सक्तीचे करावे, अशी मागणी काही संघटनांनी केली आहे.

भाजी विकत घेण्यासाठी अनेक लोक पिशव्या घेऊन येत नाहीत. त्यांना पिशवी दिली नाही तर भाजी विकत घेत नाही. अशा लोकांना समजावण्यात वेळ जातो. पिशव्या बंद केल्याने फरक पडला नाही.

- प्रतिभा पवार, भाजी विक्रेत्या

कारवाई जरूर करावी. मात्र, त्याअगोदर कोणत्या वस्तूंवर बंदी आहे आणि कोणत्या वस्तूंवर बंदी नाही याची माहिती नागरिकांना करून देण्यात यावी. नागरिकांनाही प्लास्टिक नको आहे. प्लास्टिक ज्या ठिकाणाहून येते त्या ठिकाणांवर कारवाई करणे गरजेचे आहे. शहरात प्लास्टिक आलेच नाही तर कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

- तुषार सोनवणे, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक सेनेची कार्यकारिणी जाहीर

$
0
0

मनसेच्या कार्यकारिणीत १५ जणांचा समावेश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेची नाशिक शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांची मनसे मध्यवर्ती कार्यालय राजगड येथे बैठक पार पडली. यावेळी मनसे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, मनसे प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले यांनी वाहतूक सेनेची कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीत १५ जणांचा समावेश करण्यात आला आहे.

मनसे वाहतूक सेनेचे प्रदेश सरचिटणीस नितीन नांदगांवकर, मनसे वाहतूक सेना प्रदेश सरचिटणीस आरीफ शेख, मनसे नाशिक जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम, नाशिक मनसे शहराध्यक्ष अनिल मटाले यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. याप्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मनसे वाहतूक सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष हन्नी कौचर, मनसे वाहतूक सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अल्ताफ गावकर, मनसे वाहतूक सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष आतिक कपाडिया, मनसे वाहतूक सेनेचे प्रदेश चिटणीस जॉन डिसुझा, मनसे कामगार सेनेचे चिटणीस अंकुश पवार, संदीप भवर, सौरभ सोनवणे, गणेश मंडलिक, मनोज कोकरे, भोलेनाथ गुप्ता, सुधाकर टाव्हरे, बबलू ठाकूर, विशाल फडोळ उपस्थित होते.

जिल्हा व शहर कार्यकारिणी

हनुमंत धावणे-प्रदेश उपाध्यक्ष, समीर शेख-सदस्य-प्रदेश कार्यकारिणी, निकेतेश धाकराव-जिल्हा संघटक -नाशिक, जावेद उम्रोद्दिन शेख-जिल्हा संघटक-नाशिक, बंटी रविकांत नेवारे-जिल्हा उपाध्यक्ष-नाशिक,

रोहित आहिरे-उपजिल्हा संघटक-नाशिक, नीलेश बाळासाहेब सहाणे-शहर संघटक-नाशिक, आरिफ आयुब मन्सुरी-उपशहर संघटक-नाशिक, सुनील माधवराव गायकवाड-उपशहर संघटक-नाशिक, महेश सुरेश पवार-शहर चिटणीस-नाशिक, विनोदकुमार शर्मा जड-अवजड उपाध्यक्ष नाशिक शहर, वासुदेव ताजनपुरे- शहर चिटणीस-नाशिक, राजेंद्र भवर - शहर चिटणीस-नाशिक, वैभव दौलत धोंगडे-शहर चिटणीस-नाशिक, राजेंद्र संतोष मोरे-चिटणीस - कळवण तालुका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नेटवर्कसाठी रेशन दुकानांवर अँटेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वस्त धान्य वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता यावी याकरिता रेशन दुकानांमध्ये पॉईंट ऑफ सेल (पॉस) मशिन बसविण्यात आले आहेत. परंतु, स्वस्त धान्य लाभार्थींचे नेटवर्कअभावी थंब घेता येत नसल्याने रेशन दुकानदारांची पंचाईत होऊ लागली आहे. नेटवर्कची ही समस्या सोडविण्यासाठी रेशन दुकानांमध्ये अँटेना बसविण्याचा निर्णय पुरवठा विभागाने घेतला असून, जिल्ह्यात आतापर्यंत ७०० अँटेना बसविण्यात आले आहेत. सर्व दुकानांवर हे अँटेना बसविण्याचा आमचा मानस असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी दिली.

धान्य वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि खऱ्या गरजूंनाच रेशनच्या धान्याचा लाभ मिळावा, याकरिता पुरवठा विभागाने बायोमेट्रिक प्रणालीची मदत घेतली आहे. लाभार्थ्याचा अंगठ्याचा ठसा घेतल्यानंतरच त्याला धान्य वितरित केले जाते. त्यासाठी शिधापत्रिकाधारकाचा आधार क्रमांक पुरवठा विभागाच्या सॉफ्टवेअरला लिंक करण्यात आला आहे. जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना ई-पॉस मशिन वितरीत करण्यात आले असले तरी पेठ, सुरगाण्यासह काही ग्रामीण भागात नेटवर्कअभावी ई-पॉस मशिन सुविधा कुचकामी ठरते आहे. लाभार्थीने स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्यांना या मशिनवर थंब द्यावा लागतो. त्याशिवाय बिल निघत नाही. संबंधित ट्रान्झॅक्शन दिसले नाही तर ग्राहकाला धान्य वितरीत केले नाही, असे गृहित धरले जाते. त्यामुळे रेशन दुकानदारांची कोंडी होऊ लागली आहे. याबाबत अनेक ठिकाणी रेशन दुकानदारांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत. नेटवर्कची समस्या सोडवावी, अशी मागणी रेशन दुकानदारांकडून होत होती. त्यामुळे रेशन दुकानांमध्ये ऑनलाइन व्यवहारांसाठी नेटवर्क मिळावे, याकरिता अँटेना बसविण्याचा निर्णय घेण्यात आला.

सातशे दुकानांवर बसविला अँटेना

जिल्ह्यात अँटेना बसविण्याचे काम सुरू झाले असून, आतापर्यंत ७०० दुकानांमध्ये अँटेना बसविला आहे. जिल्ह्यात २६०० दुकाने असून, या सर्व दुकानांमध्ये अँटेना बसविण्याचा पुरवठा विभागाचा प्रयत्न आहे. ओअॅसिस कंपनीला हे काम देण्यात आले असून, सर्व दुकानांमध्ये बसविण्याकरिता अँटेना उपलब्ध करावेत, अशा सूचना पुरवठा अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीला दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वराहमालकांना अल्टिमेटम

$
0
0

आठवड्याभरात स्थलांतर न केल्यास ठार मारणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

निपाह आणि स्वाईन फ्लूसारख्या आजाराच्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तसेच, स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी महापालिकेने शहरात अनधिकृतपणे सुरू असलेल्या वराह पालनावर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात वराह आढळल्यास त्यांना पकडून ठार मारण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील आठवड्यापासून केली जाणार असून, यासंदर्भात महापालिकेने सहा विभागांत पथके तयार केली असून, त्यांच्यामार्फत थेट वराह पकडण्याची कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे वराहमालकांनी शहरातील वराहांचे तातडीने स्थलांतर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिका क्षेत्रात महापालिकेच्या मुंबई प्रांतिक अधिनियम १९४९ च्या कलम १४ व २२ व त्याचे पोटकलम ३ प्रमाणे महापालिका हद्दीत वराह पालन करता येत नाही. तरीही महापालिका हद्दीत सध्या मोठ्या प्रमाणावर वराह पालन सुरू आहे. शहरात सुमारे ६०० ते ७०० च्या आसपास वराहांची संख्या आहे. वराहांमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी होते. तसेच, स्वाईन फ्लूच्या प्रसाराला ते कारणीभूत ठरतात. त्यामुळे वराहांबाबत महापालिकेकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी येतात. परंतु, वराह पकडण्याची यंत्रणा पालिकेकडे नसल्याने त्याच्यावर कारवाई होत नव्हती. सध्या निपाहच्या व्हायरसमुळे अगोदरच नागरिकांमध्ये भीती आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी शहर स्वच्छतेसाठी शहरात वराह फिरण्यास व पालनास पूर्णपणे बंदी घातली आहे.

तक्रारी करण्याचे आवाहन

पुढील आठवड्यापासून शहरात वराह आढळून आल्यास त्यांना थेट पकडून ठार मारण्याची कारवाई केली जाणार आहे. त्यासंदर्भातील अधिसूचना महापालिकेने काढली असून, वराहमालकांना सध्या शहराच्या हद्दीत असलेल्या वराहांना तातडीने शहराबाहेर स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. बंदीनंतरही शहरात वराह आढळल्यास एनएमसी ई कनेक्ट अॅपवर तक्रारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वराह पालन करणाऱ्यांनी वराह स्थलांतर केले नाहीत, तर त्यांना इंजेक्ट करून ठार मारू किंवा त्याचे हार्ट ब्रेक करून मारू असा इशारा पालिकेने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोप्रश्नी कायदा पाळा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिडकोतील २५ हजार घरांना कुठलीही पूर्वसूचना वा नोटिसा न देता केवळ फुल्या मारून अतिक्रमण काढून घेण्याच्या तयारीत असलेल्या आयुक्त तुकाराम मुंढे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दुसरा दणका दिला आहे. सिडकोतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना, कायद्याचे पालन करा, अशा शब्दांत पालिकेची उच्च न्यायालयाने कानउघाडणी केली केली आहे. अतिक्रमण काढण्यापूर्वी नागरिकांना आता त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळणार असल्याने सिडकोवासियांना हा मोठा दिलासा मानला जात आहे. महापालिकेला आता नियमांप्रमाणे तीन नोटिसा पाठवून, नागरिकांचे म्हणणे ऐकून घेऊनच कारवाई करावी लागणार आहे. आमदार सीमा हिरेंच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने हा निर्णय दिल्याने महापालिकेला पुन्हा चपराक बसली आहे.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील अतिक्रमणे रडारवर घेत, त्यांच्यावर हातोडा मारला जात आहे. त्यात सिडकोच्या सहाही योजनांमधील सुमारे २५ हजार घरांची वाढीव बांधकामे अनधिकृत ठरवत त्यावर मुंढे यांनी कारवाई सुरू केली होती. एनएमसी ई-कनेक्ट अॅपवर आलेल्या तक्रारींवर ही कारवाई केली जात होती. परंतु, संबंधित अनधिकृत बांधकामधारकांना महापालिकेने कुठलीही पूर्वसूचना वा नोटीस न देता नगररचना व अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत अनधिकृत बांधकामांचे रेखांकन सुरू करण्यात आले होते. त्यामुळे मनपाच्या या कारवाईने सिडकोवासियांमध्ये संतापाचा आगडोंब उसळला होता. स्थानिकांनी या कारवाईला तीव्र विरोध करीत, अधिकाऱ्यांना घेराव घातला होता. परंतु, या कारवाईवर महापालिका ठाम राहिली होती. त्यामुळे नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनी याविरोधात मुख्यमंत्र्यांकडे धाव घेत महापालिकेच्या कारवाईला स्थगिती मिळविली. मात्र, त्यानंतरही सिडकोवासियांवर कारवाईची टांगती तलवार कायम राहिल्याने अखेर आमदार हिरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती.

शुक्रवारी न्या. शंतनू खेमकर व न्या. नितीन सांबरे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. आमदार हिरे यांच्या वतीने वरिष्ठ वकील संजीव गोरवाडकर यांनी बाजू मांडली. महापालिका कायद्यातील तरतुदींनुसार अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यापूर्वी संबंधितांना नोटिसा देणे, त्यांचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक ठरते. मात्र, सिडकोच्या बाबतीत महापालिकेने थेट कारवाई सुरू केल्याने कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा दावा आमदार हिरे यांच्या वतीने करण्यात आला. महापालिकेच्या वतीनेही न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला. परंतु, उच्च न्यायालयाने महापालिकेचा युक्तिवाद फेटाळत, नागरी प्राधिकरणांना कायद्यानुसार ठरविलेल्या पद्धतींचा अवलंब करणे आणि त्यांचे अनुपालन करणे बंधनकारक असल्याचे नमूद करीत सिडकोतील अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई करण्यापूर्वी महापालिकेने कायद्याचे पालन करावे, असे निर्देश दिले. त्यामुळे कायद्यातील तरतुदींनुसारच कार्यवाही करावी लागणार असून, तीनदा नोटिसा देऊनच आता अतिक्रमण काढावे लागणार आहे. त्यामुळे नागरिाकंना हा मोठा दिलासा मिळाला आहे.

फुली हीच नोटीस

सिडकोवरील कारवाईबाबत महापालिकेने एकतर्फी हेकेखोरपद्धतीने घेतलेली भूमिका पुन्हा अंगलट आली. कोणतेही अतिक्रमण काढताना, अतिक्रमणधारकांना संधी देण्याची कायद्यात तरतूद असतानाही, महापालिकेने एकतर्फी लाल फुल्या मारण्यास सुरुवात केली होती. या कारवाईविरोधात स्थानिकांनी आयुक्त मुंढे यांच्याकडे धाव घेत निदान नोटीस तरी द्या, अशी मागणी केली होती. परंतु, मुंढे यांनी महापालिकेची फुली हीच नोटीस असल्याचे स्पष्ट करीत, सिडकोवासियांना माघारी धाडले होते. परंतु, ही सर्व प्रक्रियाच उच्च न्यायालयाने अनधिकृत ठरवल्याने महापालिकेला ग्रीनफिल्ड पाठोपाठ दुसरा मोठा दणका बसला आहे.

कायदा पायदळी तुडवत सिडकोवासियांवर थेट कारवाई करण्यास निघालेल्या महापालिका प्रशासनाला उच्च न्यायालयाने चपराक दिली आहे. या निर्णयामुळे सिडकोवासियांना काहीसा दिलासा मिळणार असून, आपली बाजू मांडण्याची संधी मिळेल. न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो.

- सीमा हिरे, आमदार, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ

सिडकोवरील कारवाई महानगरपालिकेच्या आणि शासनाच्या कायद्याच्या पद्धतीत बसत नसल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांनी ही जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने कायद्याचा अवलंब करूनच अनधिकृत बांधकामे पाडावीत असा निर्णय दिला आहे. हा निर्णय अत्यंत सकारात्मक असून, न्यायदेवतेवरच आमचा विश्वास आहे.

- ॲड. गुरूदास गोरवाडकर

सिडकोप्रश्नी कायदा पाळा!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सपट’च्या विद्यार्थ्यांनी बनवली रेसिंग कार!

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

कमीत कमी इंधन क्षमतेत जास्तीत जास्त किमीचा प्रवास. कार बनवण्याच्या ६००हून अधिक नियमांची चोख अंमलबजावणी. नट-बोल्टापासून ते कारच्या मोठ्या पार्टपर्यंत सर्व भागांचे नव्याने केलेल डिझाइन. विशेष म्हणजे, एका स्पोर्ट बाइकचे इंजिन वापरून ३९० सीसीची अन् २४५ किलो वजनाची आर. सी. रेसिंग कार अवघ्या साडेपाच लाखांत साकारली आहे नाशिकमधील आर. एच. सपट इंजिनीअरिंगच्या मेकॅनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी.

सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनीअर्सतर्फे (एसएई) सुप्रा एसएई २०१८ ही स्पर्धा ११ ते १६ जूनदरम्यान ग्रेटर नोएडा येथे पार पडली. स्पर्धेच्या अंतिम फेरीत गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आर. एच. सपट इंजिनीअरिंग कॉलेजने पहिल्या १८ संघांत बाजी मारली. स्पर्धेसाठी आर. सी. रेसिंग नावाची कार कॉलेजच्या २२ विद्यार्थ्यांच्या संघाने स्पर्धेत दाखल केली होते. या कारचे वैशिष्ट्य असे की, या कारच्या सायलेन्सरचा आवाज १०६ डेसिबल आहे. अपघात झाल्यास अवघ्या पाच सेकंदात कारचालक कारमधून बाहेर येऊ शकतो. तसेच कोणत्याही खडतर रस्त्यावर अतिशय सहजतेने या कारची ड्रायव्हिंग करणे शक्य आहे. कमीत कमी इंधनात ही कार जास्तीत जास्त अंतर पार करते. स्पोर्ट मोटार बाइकपासून ही कार साकारली असली तरी कारविश्वातली कमीत-कमी खर्चात जास्तीत जास्त सुविधा देणारी आणि पूर्णतः सुरक्षितता असणारी ही कार आहे. ही कार साकारण्यासाठी विद्यार्थी गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या स्तरावरील रिसर्च, संदर्भ पुस्तकांचे वाचन कार बनवण्याच्या नवीन संकल्पना यांचा अभ्यास करत होते. कॉलेज संपल्यानंतर रोज किमान चार ते पाच तास विद्यार्थी कार बनवण्यासाठी मेहनत घेत होते. याच मेहनतीचे फळ आम्हाला एसएइच्या अंतिम फेरीतील यशात मिळाले, असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

शंभराहून अधिक मॉडेल

एसएई स्पर्धेत देशभरातील मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांचे १०० हून अधिक संघांनी नाविन्यपूर्ण सुप्रो कारचे मॉडेल सहभागी केले होते. स्पर्धेतील टेक्निकल, ब्रेक, स्पीड पॅड, अॅक्सलेशन, ऑटोक्रॉस, इग्रेस, वेट, टिल्ट, नॉइस, डिझाइन कॉस्ट, बिझनेस प्रेझेंटेशन या टेस्ट फेरीतून २७ संघांनी अंतिम फेरीत बाजी मारली. अंतिम फेरीत देशभरातून १८ संघ उत्तीर्ण झाले. यामध्ये नाशिक जिल्ह्यातून सहभागी झालेला एकमेव संघ आर.एच.सपट इंजनिअरिंग कॉलेजचा आहे. अशी माहिती कॉलेजच्या मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ.श्रीकांत तारे यांनी दिली. विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव डॉ.मो.स.गोसावी, प्रोजेक्ट डायरेक्टर पी.एम.देशपांडे, प्राचार्य डॉ.पी.सी.कुलकर्णी, विभाग प्रमुख डॉ.तारे, प्रा.स्वप्नील सोनवणे, प्रा. अजिंक्य साळवे यांचे मार्गदर्शन मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बागुलांची विभागीय चौकशी!

$
0
0

कार्यमुक्तीनंतर शुक्लकाष्ठ कायम; मुढेंचे नगरविकास विभागाला पत्र

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या नगररचना विभागातील दोन अधिकाऱ्यांचा पेच शुक्रवारी सुटला असून, सहायक संचालक आकाश बागूल यांना ग्रीनफिल्ड प्रकरणात चौकशीच्या अधिन राहून कार्यमुक्त करण्यात आले आहे. परंतु, नगररचना विभागातील गोंधळाप्रकरणी आयुक्त तुकाराम मुंढेंनी बागूल यांच्यावर ठपका ठेवला असून, त्यांची विभागीय चौकशी नगररचना विभागाकडे प्रस्तावित केली आहे. त्यामुळे बागूल यांनी नाशिकमधून सुटका झाली असली तरी, त्यांच्यावरील कारवाईचे शुल्ककाष्ठ मात्र कायम राहणार आहे. दरम्यान, मुंढेंच्या अपरोक्ष नगररचना विभागाचा पदभार घेणाऱ्या सुरेश निकुंभेंचीही कानउघाडणी आयुक्तांनी केल्याची चर्चा आहे.

ग्रीनफिल्ड लॉन्सवरील कारवाई प्रकरणात नगररचना विभागाचीच चूक असल्याचे लक्षात आल्यानंतर आयुक्त मुंढेंनी या विभागाची झाडाझडती सुरू केली होती. गेल्या आठवड्यापासून या विभागाची तपासणी सुरू असून, त्यात मोठा सावळा गोंधळ असल्याचे समोर आले आहे. अनेक फाइल्स या प्रलंबित ठेवण्यात आल्या असून, त्यात आर्थिक संशय वाढला आहे. त्यामुळे ही कारवाई सुरू असतानाच बागूल यांची नगरला बदली झाली आहे. परंतु, आयुक्तांनी त्यांची पूर्ण तपासणीच सुरू ठेवली असून, तीन दिवसापासून त्यांना कार्यमुक्त केले नव्हते. दरम्यान, गुरुवारी अहमदनगरहून बदली होऊन आलेले सुरेश निकुंभे यांनी एकतर्फी पदभार घेतला. त्यामुळे दोन अधिकारी एकाच पदावर कार्यरत होते. शुक्रवारी आयुक्त मुंढेंनी बागूल यांना कार्यमुक्त केले आहे. परंतु, बागूल यांना कार्यमुक्त करतांना त्यांना ग्रीनफिल्ड प्रकरणाच्या चौकशीच्या अधिन राहून कार्यमुक्त केले आहे. तसेच, नगररचना विभागातील अनियमितताप्रकरणी बागूल यांची विभागीय चौकशी करावी, अशी शिफारस नगरविकास विभागाला आयुक्तांनी केली आहे. त्यामुळे बागूल यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार कायम आहे.

दोघांची झाडाझडती

आयुक्त मुंबईला असताना त्यांच्या अपरोक्ष नगररचना सहायक संचालकाचा पदभार स्वीकारणाऱ्या निकुंभेसह बागूल यांची मुंढे यांनी शुक्रवारी झाडाझडती घेतली. यावेळी दोघांनाही बोलावून कायदेशीर बाबींची जाणीव करून दिली. यावेळी शासनाच्या आदेशाने पदभार घेतल्याचा दावा करणाऱ्या निकुंभे यांची आयुक्तांनी चांगलीच कानउघाडणी केली. बागूल यांनाही निकुंभे यांना पदभार देण्याबाबत जाब विचारला. त्यामुळे दोघांनाीही दिलगिरी व्यक्त करीत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फास्ट न्यूज १

$
0
0

मोफत आरोग्य तपासणी

नाशिक : अखिल भारतीय श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था व श्री संत नामदेव महाराज सांस्कृतिक महिला विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. २४) कॅनडा कॉर्नर परिसरातील कृष्णा हॉस्पिटलमध्ये सकाळी ९ ते दुपारी ४ यावेळेत हे शिबिर होणार आहे. त्यामध्ये डॉ. अमित केले पोटातील विकारांचे विनामूल्य निदान आणि उपचार करणार आहेत. या शिबिरात औषधेही विनामूल्य देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी राकेश बागूल (९८५०७७९४६३) आणि सोनल नेरे (९४२३०८०४८१) यांच्याशी संपर्क साधावा.

-

दोषींवर कारवाई करा

नाशिक : जामनेर येथे जातीय द्वेषातून दोघांना झालेली मारहाण आणि एका अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्काराचा वाल्मिकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीने निषेध नोंदविला आहे. अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. या दोन्ही प्रकरणांची गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी, अॅक्ट्रॉसिटी कायदा अधिक कठोर कराव्यात, अशी मागण्या या निवेदनात केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचे संस्थाचालकांना साकडे

$
0
0

चंद्रकात पाटील यांनी घेतली बैठक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, राजकीय पक्षांनी आपला उमेदवार निवडून येण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भाजपने अनिकेत पाटील यांना निवडून आणण्यासाठी प्रदेशाध्यक्षांसोबतच आता मंत्र्यांनाही रिंगणात उतरवले आहे. शुक्रवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत संस्थाचालकांची बैठक बोलावून त्यांना उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले. भाजपसोबतच शिवसेना, राष्ट्रवादीनेही आपली ताकद पणाला लावली असून, संस्थांचालकांना साकडे घातले जात आहे. विधानपरिषदेत भाजपची ताकद वाढवा, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.

शिक्षक मतदारसंघासाठी २५ जून रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत १६ उमेदवार रिंगणात असून, भाजपचे अनिकेत पाटील, शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे, अपक्ष प्रतापदादा पाटील, राष्ट्रवादी व टीडीएफ पुरस्कृत संदीप बेडसे, टीडीएफचे भाऊसाहेब कचरे पाटील या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. भाजपने नाशिकची जागा जिंकण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दोन दिवसापूर्वीच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये येऊन बैठक घेत उमेदवाराच्या प्रचारासाठी तसेच विजयासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते. तसेच, कोअर कमिटीची बैठक घेऊन व्यूहरचना आखली होती. पाठोपाठ शुक्रवारी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील यांनीही नाशिकमधील शिक्षण संस्थाचालकांची बैठक घेतली. या बैठकीला महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, उपमहापौर प्रथमेश गिते, उमेदवार अनिकेत पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी चंद्रकात पाटील यांनी संस्थाचालकांना अनिकेत पाटील यांना निवडून आणण्याचे आवाहन केले. अनिकेत पाटील यांना राजकीय वारसा असून, त्यांना संस्थाचालक, शिक्षकांचे प्रश्न माहित आहेत. त्यामुळे त्यांना विजयी करून विधान परिषदेत भाजपची ताकद वाढवा, असे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चाळीसगावचा अमित कान्स फेस्टिवलमध्ये

$
0
0

नाशिक : जागतिक पातळीवरील कान्स लायन इंटरनॅशनल फेस्टिवल ऑफ क्रिएटीव्हीटीमध्ये मराठमोळ्या अमित पाटे याच्या स्नॅप्टीविटी कंपनीने तब्बल दोन सुवर्ण लायन ऑस्कर पुरस्कार मिळवले आहेत. त्यामुळे कान्समध्ये मराठी व्यक्तीचा प्रथमच डंका वाजला आहे. लंडन येथे राहणारा अमित हा चाळीसगावचा असून, तो 'नासा गर्ल' स्वीटी पाटेचा भाऊ आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित स्पोर्ट टेक्नॉलॉजीमध्ये मोबाइल श्रेणीकरिता हे दोन सुवर्ण पुरस्कार त्याच्या कंपनीला मिळाले आहेत. विशेष म्हणजे हा पुरस्कार मिळवताना त्याने गुगल, अॅपल, टोयोटा, ऑडी, वेरिझॉन, पी अँड जी, ऑरेन्ज, नायकी, केफसी, कॅटबरी, ईअेका, द टाइम्स यासारख्या बलाढ्य कंपन्यांना मागे टाकले आहे.

अमित हा स्नॅप्टीविटी कंपनीचा संस्थापक व सीईओ आहे. या कंपनीला मिळालेले ऑस्कर पुरस्कार वेगवेगळ्या श्रेणीत आहेत. पहिला पुरस्कार मोबाइल टेक्नॉलॉजीमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससाठी आहे. दुसरा पुरस्कार हा सोशल या श्रेणीत रिअल टाईम रिस्पॉन्ससाठी आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे क्रीडा व संगीतप्रेमी चाहत्यांना स्मार्ट फोनऐवजी लाइव्ह गेमला गुंतवून ठेवणारे तंत्र आहे. आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्ज), सेन्सर व लाइव्ह डेटाचा वापर करून त्याचे जिवंत क्षण टिपले जातात. उच्च गती रोबोटिक कॅमेरे खेळपट्टीवर चालविण्याऐवजी क्रीडाप्रेमी चाहत्यांवर फोकस करून जिवंत क्रीडाप्रकाराचा त्यांचा अनुभव वाढविला जातो. सेल्फी काढण्याच्या नादात खेळाचा, संगीताचा खरा आनंद अनुभवता येत नाही. पण स्नॅप्टीविटीच्या या तंत्रामुळे आता हे शक्य झाले आहे.

एकाचवेळी क्रीडा व संगीताचा आनंद

क्रीडाप्रेमी, संगीतप्रेमी आपल्या महत्त्वाच्या क्षणांना प्राप्त करून आठवणीत साठवून ठेवू शकतात व त्याचबरोबर थेट क्रीडा व संगीत कार्यक्रमातही एकाच वेळेस सहभागी होऊ शकतात. यामुळे ब्रँड्सला प्रामाणिकपणे सोशल मीडियावर त्यांच्या प्रेक्षकांच्या संभाषणाला योग्य किमत देता येते. विशेष म्हणजे त्यांच्या समुदायाचा एक भाग बनणे शक्य होते. एजबॅस्टन क्रिकेट ग्राउंड, वेम्बली स्टेडियम, इतिहाद स्टेडियम (मॅनकेटी एफसी) आणि ऑरेंज वेलॉड्रोम (फ्रान्स) सारख्या जगातील अग्रगण्य स्टेडियम्स सध्या स्नॅप्टीविटीचे तंत्रज्ञान वापरत आहेत.

या अगोदरही पुरस्कार

अमित पाटे यांनी यापूर्वी नोकियाकडून इनोव्हेशन चायलेंज हा पुरस्कार मिळाला आहे. तसेच, त्यांना यंग अॅचिव्हर अॅवॉर्ड ऑफ द इयरने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या स्नॅप्टीविटी कंपनीने अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले आहेत. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्षेत्रात ब्रिटिश सरकारची तसेच अनेक कॉम्प्युटर क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांची मान्यता प्राप्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनई हत्याकांड: आरोपीचा हृदयविकारानं मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा । नाशिकरोड

अहमदनगर जिल्ह्यातील सोनई हत्याकांड प्रकरणी मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या सहा आरोपींपैकी एकाचा शनिवारी नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हृदयविकारानं मृत्यू झाला आहे. पोपट रघुनाथ उर्फ विश्वनाथ दरंदले (वय ५५) असे मृत आरोपीचं नाव आहे.

गेल्या चार महिन्यांपासून तो नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात होता. नाशिकरोड कारागृह अधिक्षक राजकुमार साळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोपट दरंदलेची प्रकृती गुरुवारी बिघडली होती. त्यामुळं त्याला नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान आज सकाळी त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याचा मृतदेह धुळे येथील मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक: एसटी-कारची धडक; सहा ठार

$
0
0

नाशिक:

नाशिक जिल्ह्यातील चांदवडजवळ एसटी बस आणि क्रूझर गाडीला आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

क्रूझर गाडी बागलाण तालुक्यातील किकवारी येथील असून गाडीतील सर्वजण एका विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निघाले होते. पिंपळगाव आणि चांदवड दरम्यान ही गाडी एका एसटी बसला समोरून धडकली. हा अपघात इतका भीषण होता की क्रूझर गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. एसटीचंही मोठं नुकसान झालं. अपघातामुळं या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
64709389

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कौशल्य विकासाच्या जोरावरच यश’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

स्पर्धा कुठलीही असो, मात्र आपण स्वत:ची कौशल्ये योग्य प्रकारे विकसित केल्यास त्यात नक्कीच यश मिळते. त्यासाठी चिकाटी आणि चौकसपणा अंगी बाणवावा लागतो, असे प्रतिपादन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे उपसंचालक सुनील सैंदाणे यांनी केले.

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात आयोजित रोजगार व उद्योजकता मेळाव्याच्या प्रारंभावेळी ते बोलत होते. मेळाव्यात ८०४ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी ४३१ जणांची प्रथम फेरीसाठी निवड करण्यात आली. प्राचार्य डॉ. बापूसाहेब जगदाळे, उपप्राचार्या डॉ. मुणाल भारद्वाज, करिअर कौन्सिलिंग आणि प्लेसमेंट सेलचे समन्वयक प्रा. अनिल पाटील, समिती सदस्य प्रा. एस. पी. व्याळीज आदी उपस्थित होते.

सहाय्यक संचालक संपत चाटे म्हणाले, की जो रोजगार मिळाला तो घ्या, त्यात आपल्या कौशल्याच्या जोरावर पुढे जा. प्राचार्य डॉ. जगदाळे यांनी महाविद्यालयात राबविल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. मेळाव्यात विविध क्षेत्रांतील नामांकित उद्योगसमूहांतील १८ कंपन्यांनी रोजगारसंधी उपलब्ध करून दिली होती. एस. एम. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. जयमाला सोदे यांनी आभार मानले.

...या कंपन्यांचा सहभाग

मेळाव्यात नाशिकमधील महिंद्रा अँड महिंद्रा, सुमो सॉफ्ट, धुमाळ इंडस्ट्रिज, युरेका फोर्ब्स लिमिटेड, डेटामॅटिक्स, रिलायन्स निप्पॉन, रिलाएबल ऑटोटेक, एम. डी. इंडस्ट्रिज, एम. डी. ऑटो कॉम्पोनंट्स, बॉम्बे इंटेलिजन्स सिक्युरिटी आदी १८ नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन निवडप्रक्रिया पार पडली. अण्णासाहेब पाटील महामंडळ, अण्णा भाऊ साठे महामंडळ, महाबँक व महिला आर्थिक विकास मंडळ अशा विविध मंडळांनीही उद्योजकतावाढीसाठी सहभाग नोंदवला. त्यात २०३ लाभार्थींनी माहिती जाणून घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावा

$
0
0

भुजबळांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील रखडलेले गंगापूर धरणाजवळील मेगा पर्यटन संकुल, गोवर्धन कलाग्राम तसेच मांजरपाड्याचे काम आणि पुणेगाव-दरसवाडी पोहोच कालव्याचे अस्तरिकरण यासह जिल्ह्यातील इतर विकासकामे पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.

या पत्राक भुजबळांनी गंगापूर बोट क्लबची माहिती दिली. त्यात प्रादेशिक पर्यटनमधील निधीमधून येथील जागतिक दर्जाच्या बोट क्लबचे काम मार्च २०१४ मध्ये पूर्ण झालेले आहे. पर्यटकांना बोटिंगसाठी यूएसए मेड युरो ४ नॉर्मच्या ४७ अत्याधुनिक बोटी धरणस्थळी दाखल झालेल्या आहेत. मात्र वेळोवेळी पाठपुरावा करूनही बोट क्लब अजून सुरू झालेला नसल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे ग्रेप पार्क रिसॉर्ट, साहसी क्रीडा संकुल,कन्व्हेन्शन सेंटर, नाशिक कलाग्रामच्या कामाकडेही लक्ष वेधले आहे. त्याचबरोबर मांजरपाडा प्रकल्पासाठी पुरवणी अर्थसंकल्पात २० कोटींची तरतूद करून हे काम लवकर पूर्ण होण्यासाठी कार्यवाही करण्याची विनंती केली. तसेच पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्याच्या अस्तरिकरणासाठी निधी देण्याची मागणी केली. यावेळी येवला तालुक्यातील राजापूरसह ४१ गावांकरिता नवीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तयार करणे, शेतकरी आंदोलनातील येवला तालुक्यातील शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणे याबाबत मागणी केली.

मुख्यमंत्र्यांना आमंत्रण

भुजबळ यांनी हे पत्र दिल्यानंतर दूरध्वणीवरून मुख्यमंत्री यांच्याशी संपर्क करून सप्तशृंगी गडावरील फनिक्युलर ट्रॉलीच्या उद्घाटनाला लवकरात लवकर वेळ देण्याची विनंती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनापूर्वी उद्घाटनाला येण्याचे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images