Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बिटको महाविद्यालयात पोस्टर प्रदर्शन

$
0
0

बिटको महाविद्यालयात पोस्टर प्रदर्शन (फोटो)

जेलरोड : चांडक-बिटको महाविद्यालयात योग दिनानिमित्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी योगविषयक पोस्टर प्रदर्शन भरविले होते. निसर्गोपचार केंद्राच्या विद्यार्थ्यांनी ओंकार जप, अनुलोम-विलोम, प्राणायामाबरोबरच योगासने सादर केली. निसर्गोपचार केंद्राच्या समन्वयिका डॉ. विद्या देशपांडे, प्राचार्य डॉ. धनेश कलाल यांनी मार्गदर्शन केले. उपप्राचार्य डॉ. दिलीप बेलगावकर, डॉ मंजूषा कुलकर्णी, डॉ. सविता बुवा, डॉ. संजय तुपे आदींसह एनसीसी छात्र त्यात सहभागी झाले होते.

--

दुचाकी चोरीस

नाशिकरोड : शिवाजी पुतळा येथील पोस्ट ऑफिसच्या पार्किंगमधून हीरो होंडा कंपनीची शाईन दुचाकी (एमएच १५, डीपी ४१०९) चोरीस गेल्याची फिर्याद दीपक मोहन जयस्वाल यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात दिली आहे. फिर्यादीनुसार शेख अजिम शेख दादामिया यांच्या मालकीची दुचाकी एक जून रोजी सकाळी पोस्ट ऑफिसच्या पार्किंगमध्ये पार्क करून ते रेल्वेने कल्याणला गेले होते. सायंकाळी परतल्यावर ती चोरीस गेल्याचे आढळले.

--

अपघातात वृद्ध जखमी

नाशिकरोड : जेलरोडवरील सेंट फिलोमिना शाळेसमोर रस्ता ओलांडणारे शांताराम सीताराम बनसोडे (वय ५५, रा. भेंडाळी, ता. सिन्नर) यांना नांदूर नाक्याकडून बिटको चौकाकडे येणाऱ्या ट्रकचा (जीजे ०३, बीव्ही ८१००) धक्का लागला. त्यामुळे खाली पडल्यावर त्यांच्या उजव्या पायाच्या पंजावरून ट्रकचे मागील चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले. देवीदास साठे या रिक्षाचालकाने त्यांना बिटको रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासांठी त्यांना सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले असून, ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

--

शालेय मंत्रिमंडळ स्थापन (फोटो)

इंदिरानगर : एमएसबी स्कूलमध्ये शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली असूनस या विद्यार्थ्यांचा पदग्रहण समारंभ नुकताच झाला. द्वारका येथील एमएसबी स्कलूमध्ये दर वर्षी अशा मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात येत असते. यंदा हेड बॉय म्हणून मुस्तफा ट्रंकवाला याची, तर बतुल मोदी हिची हेड गर्ल म्हणून नेमणूक करण्यात आली. मुस्तफा काचवाला याची स्पोर्टस कॅप्टन म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर सोळा सदस्यांना पदाची शपथ देण्यात आली. विद्यालयाचे मसूल शेख जुजेर हैदरी आणि उपमुख्याध्यापिका मारिया ढोलकावाला यांच्या हस्ते मंत्रिमंडळातील सदस्यांना सन्मानित करण्यात आले.

--

जुगारअड्ड्यावर छापा

नाशिकरोड : शिंदे गावातील तलाठी कार्यालयाजवळील मोकळ्या जागेवर सुरू असलेल्या कल्याण बाजार नावाच्या मटका जुगार अड्ड्यावर नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने छापा टाकून दोन जुगाऱ्यांसह ८५० रुपयांची रोकड जप्त केली. पोलिसांनी किरण शंकर कळसकर (वय २१, रा. कडवा कॉलनी, शिंदे) आणि संजय शंकर शेलार (४६, रा. भांगरे मळा, शिंदे) या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

--

चार संशयित ताब्यात

नाशिकरोड : देवळाली गावातील पाटील गॅरेज येथे गुरुवारी रात्री सव्वातीन वाजेदरम्यान जितेंद्र प्रल्हाद कुमार (वय २२, रा. हरियाना) यास पोलिसांनी ताब्यात घेतले. चेहेडी शिव येथील किशोर गॅरेज येथून रात्री सव्वावाजेच्या दरम्यान पिंटू मारुती चैत्रे (३५, जिंतूर) यास, शिवाजी पुतळा येथील गीता ड्रेसेसजवळून सव्वादोन वाजता विजयकुमार पंडित तूपसमिंद्रे (२७, परभणी) यास, येथूनच रात्री साडेबारा वाजता समाधान रमेश राजपूत (२३, खानापूर) यास पोलिसांनी ताब्यात घेतले. हे चारही जण पोलिसांना बघून पूळन जात असताना त्यांना पकडण्यात आले.

---

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना पूर्ववत ठेवा

$
0
0

-

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

खासगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये व त्यानंतर प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीची योजना पूर्ववत सुरू ठेवण्यात यावी, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

छगन भुजबळ यांनी म्हटले आहे, की मान्यताप्राप्त खासगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती करण्याचा शासनाने सन २००६-०७ पासून निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय सन २०१४-१५ पर्यंत कायम ठेवण्यात आलेला होता. मात्र शैक्षणिक वर्ष सन २०१९-२० पासून संबंधित शिखर संस्थांकडून मूल्यांकन व दर्जा निश्चिती करून मूल्यांकन प्राप्त न केल्यास अशा संस्थांना मूल्यांकन व दर्जा मानांकन प्राप्त होईपर्यंत या योजनेतून वगळण्यात येईल व त्या वर्षापासून केवळ मानांकन प्राप्त करणाऱ्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिताच सदर योजना लागू राहील, असा शासनाने दि. ३१ मार्च २०१६ रोजी निर्णय घेतला आहे. याचा अर्थ जर महाविद्यालयांनी सक्षम शिखर संस्थांकडून मूल्यांकन व दर्जाचे मानांकन प्राप्त न करून घेतल्यास अशा संस्थांना या योजनेतून वगळले तर त्याचा परिणाम विद्यार्थ्यांना भोगावा लागणार आहे. मूल्यांकन व मानांकन प्राप्त न करून घेणे यात विद्यार्थ्यांचा दोष नसतानाही याची शिक्षा मात्र मागसवर्गीय विद्यार्थ्यांना भोगावी लागणार असल्याने हे अन्यायकारक आहे. प्रवेश घेण्यासाठी सर्व महाविद्यालये आणि शिष्यवृत्ती मिळण्यासाठी मात्र शासनाने ठरवले तीच महाविद्यालये ही कल्पनाच मुळी बेकायदेशीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वऱ्हाडींवर काळाची झडप

$
0
0

शिरवाडे वणीजवळ क्रुझर-बस अपघातात सहा ठार; आठ जखमी

म. टा. वृत्तसेवा, निफाड/मनमाड

मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे वणी शिवारात शनिवारी सकाळी ११ वाजता टेम्पो ट्रॅव्हलर व एसटी बसच्या विचित्र अपघातात किकवारी (ता. सटाणा) येथून नाशिकला विवाह सोहळ्यासाठी जाणाऱ्या सहा वऱ्हाडींचा मृत्यू झाला. इतर आठ जण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी वडनेर भैरव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

किकवारी येथील काही वऱ्हार्डी चांदवडमार्गे नाशिकला विवाह सोहळ्यासाठी टेम्पो ट्रॅव्हलरने जात असताना शिरवाडे वणी फाटा येथे या गाडीचे टायर फुटल्याने ती दुभाजक तोडून डाव्या बाजूला नाशिककडून सटाण्याला जाणाऱ्या एसटीवर (एमएच १४ बीटी ४७१६) आदळली. याचवेळी एसटीच्या मागे असणारी इनोव्हा कारही एसटीवर धडकली. तीनही गाड्या वेगात असल्याने क्रूझर मधील सहा प्रवाशांच्या जागेवरच मृत्यू झाला. अपघातस्थळी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, इतर प्रवासी यांनी तातडीने धावपळ केली. या वेळी गाडीचा चालक अशोक पोपट गांगुर्डे यांच्यासह काही प्रवासी मृत तर काही गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने पिंपळगाव बसवंत येथे उपचारासाठी हलविण्यात आले.

या अपघातात धनुबाई केदा काकुळते, तेजश्री साहेबराव शिंदे, कृष्णाबाई बापू शिंदे, सरस्वतीबाई नथू जगताप (सर्व रा. किकवारी), रत्ना राजेंद्र गांगुर्डे (डांगसौंदाणे), यांच्यासह गाडी चालक अशोक पोपट गांगुर्डे (कळवण) यांच्या अपघातस्थळी मृत्यू झाला. तर यश प्रकाश पगारे, सरला पगारे (मुजवड ता. बागलाण), शंकर चिंधू काकुळते, रिना शशिकांत जगताप (रा. किकवारी), बसमधील कल्याणी कृष्णा शिंदे, मयूर ज्ञानेश्वर नवले यांच्यावर

पिंपळगाव बसवंत येथील धन्वंतरी आणि राधाकृष्ण हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अपघाताबाबत कळताच पिंपळगाव बसवंत ग्रामीण रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. घटनास्थळी वडनेर भैरव पोलिस, टोल प्रशासन अॅम्ब्युलन्स कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी तातडीने मदत केली.

टायर फुटल्याने दुसरा अपघात

सोग्रस फाटा येथे कल्याण येथील भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचे चाक फुटल्याने झालेल्या अपघातात नऊ भाविक ठार झाल्याची याच महिन्यातील घडली. त्यानंतर आज याच मार्गावर खडकजांबजवळ गाडीचे चाक फुटून अपघातात सहा जणांना मृत्यू झाला.

किकवारी, मुंजवाडवर शोककळा

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

किकवारी येथील कैलास जगताप यांच्या मुलीच्या विवाहासाठी नाशिक येथे खासगी क्रुझरला झालेल्या अपघातात किकवारी गावातील चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे किकवारी गावावर शोककळा पसरली आहे.

माजी सरपंच केदा बारकू काकुळते यांच्या पत्नी धनूबाई काकुळते यांच्यासह इतर तिघांना मृत्यूने कवटाळले. यात शिंदे कुटुंबातील आजीसह नातीचा समावेश असल्याने शिंदे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यासह तालुक्यातील मुंजवाड येथील बालिका व महिला, तर डांगसौदाणे येथील एक महिलेचा या मृतांमध्ये समावेश असल्याने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त जात आहे. जगताप यांच्या मुलीच्या विवाहासाठी सकाळी किकवारी येवून वऱ्हाडी चार खासगी वाहनातून सकाळी ९.३० वाजता निघाले होते. तीन क्रुझरमध्ये पुरुषांचा एकत्रित पाठवून उर्वरित एका क्रुझरमध्ये महिलांना बसविण्यात आले होते.

या वाहनात केदा काकुळते यांच्या पत्नी धनुबाई, सुधाकर शिंदे यांच्या मातोश्री कृष्णाबाई, मुलगी तेजश्री, सरस्वती जगताप बसले होते. यासह मुंजवाड येथील शोभाबाई पगारे, सिद्धी मोरे, तर डांगसौंदाणे येथील रत्ना खैरनार बसले होते. या सर्वांवर काळाने झडप घातली. तेजश्री शिंदे ही नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती. सायंकाळी उशिरा पावसात अत्यंत शोकाकूल वातावरणात किकवारी येथे चौघांवर अंत्यविधी करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवस - २४ जून

एमबीए इच्छुकांची कोंडी

$
0
0

\Bजात पडताळणी प्रमाणपत्राअभावी प्रवेश धोक्यात

\B

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

एमबीए अभ्यासक्रमाच्या सुधारीत वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रम प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. जे विद्यार्थी हे प्रमाणपत्र सादर करू शकणार नाहीत, त्यांचे प्रवेश धोक्यात येण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सादरीकरणासाठी आवश्यक तेवढी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी एमबीए इच्छुक विद्यार्थी व पालकांकडून जोर धरू लागली आहे.

मास्टर्स इस बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) या अभ्यासक्रमासाठी स्टेट कॉमन एन्टरन्स सेल व डीटीईने नुकतेच सुधारीत वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना २८ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. या प्रक्रियेत मागासवर्गातील विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. ज्यांच्याकडे ही प्रमाणपत्र नाहीत त्यांनी ती कागदपत्र काढण्यासाठी संबंधित विभागाकडे प्रस्ताव सादर करावा. हा प्रस्ताव सादर केल्याची पावती ऑनलाइन पध्दतीने २८ जूनपर्यंत अपलोड करावी. यानंतर २९ जून रोजी प्रोव्हीजनल मेरिट लिस्ट जाहीर होणार आहे. यानंतर विद्यार्थ्यांना आक्षेप व अर्ज दुरुस्तीच्या प्रक्रियेत सहभागी होता येईल. दरम्यान ३० जून ते १ जुलैपर्यंतच्या कालावधीत विद्यार्थ्यांना जातवैधता व नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. म्हणजे या कागदपत्रांच्या सादरीकरणासाठी विद्यार्थ्यांच्या हाती अवघा आठवडाभराचा अवधी आहे. बारावी विज्ञान शाखा किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना त्वरित ही कागदपत्रे दिली जातात.

चार महिन्यांचा अवधी देण्याची मागणी

इतर शाखांमध्ये पदवी पूर्ण करून पदव्युत्तर स्तरावर एमबीएसारख्या शाखांकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. पण, या कागदपत्रांच्या अनुपलब्धतेमुळे हे विद्यार्थी एमबीए अभ्यासक्रमास इच्छा असूनदेखील प्रवेश घेऊ शकणार नाहीत. ही कागदपत्रे सादर करण्यासाठी या विद्यार्थ्यांना किमान चार महिन्यांचा कालावधी देण्यात यावा, अशी मागणीही विद्यार्थी व पालकांकडून जोर धरू लागली आहे. या अभ्यासक्रमाची गुणवत्ता यादी २ जुलै रोजी जाहीर होणार आहे. त्या अगोदर स्टेट कॉमन एन्टरन्स सेल आणि तंत्रशिक्षण संचालनालयाने याप्रश्नी लक्ष घालून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडचिरोलीला जाण्यास अधिकारी नाखूष

$
0
0

पोलिस महासंचालकांची तीव्र नाराजी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्याच्या पूर्वभागात म्हणजे गडचिरोली आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये जाण्यास अधिकारी नाखूष असतात. हा प्रकार निश्चित क्लेशदायक असून, यापुढे असे होणार नाही. २७ परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षकांना मात्र यात सूट मिळणार नाही. त्यांनी आतापासूनच येथे काम करण्याची तयारी ठेवावी, असे प्रतिपादन राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी केले.

महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या वेबसाईटचे उद्घाटन आणि वृक्षारोपणाबाबत आयोजित कार्यक्रमासाठी माथूर सपत्नीक हजर होते. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी वरील खंत व्यक्त करीत नवीन अधिकाऱ्यांना इशारा देखील दिला. प्रशिक्षण केंद्रातील कालावधी व प्रशिक्षण केंद्रातील नेमणुकीबाबत माथूर यांनी सांगितले, की जीवनात प्रशिाण घेण्याची संधी वारंवार येत नाही. तसेच, प्रशिक्षण केंद्रात मूलभूत शिक्षण देणे हे पोलिस विभागातील अधिकाऱ्यांचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. त्यामुळे सक्षम अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण केंद्रात एकदा तरी नियुक्ती घेऊन योगदान द्यावे. प्रशिक्षण केंद्रातच राज्याचे भविष्य घडविण्याची संधी असते. प्रशिक्षणाच्या दर्जात हळूहळू प्रगती होत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. एमपीएतील ई अकॅडमी व व्हर्च्युअल क्लासरूम पोलिसांकरिता देशपातळीवर सर्व प्रथम सुरू केलेला उपक्रम आहे. या उपक्रमाचे कौतुक करताना माथूर यांनी सर्व पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षकांना ई अकॅडमीवर उपलब्ध ऑनलाइन परीक्षेचा आपल्या अधिकाऱ्यांसाठी वापर करण्याचे आवाहन केले. सतत कायद्याचे परीक्षा घेतल्याने अधिकाऱ्यांचे कायद्याबाबतचे ज्ञान अद्ययावत होऊ शकते, असे मतदेखील त्यांनी मांडले. यावेळी पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलिस अधीक्षक संजय दराडे, माथूर यांच्या पत्नी मंजुला उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वतीतेसाठी एमपीएच्या संचालिका अश्वती दोरजे, सहसंचालक जालिंदर सुपेकर, उपसंचालक ठाकूर यांनी प्रयत्न केला. सर्व वरिष्ठांच्या हस्ते अकॅडमीच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात पावसाचा हलकासा शिडकावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेले दोन दिवस सातत्याने हजेरी लावणाऱ्या पावसाने शनिवारी काहीशी विश्रांती घेतली. ढग दाटून आल्याने जोरदार पाऊस होईल, अशी शक्यता व्यक्त होत होती. परंतु, पावसाची हलकीशी भूरभूर झाली. जिल्ह्यात मात्र शुक्रवारी सकाळी साडेआठ ते शनिवारी सकाळी साडेआठ या २४ तासांमध्ये १८३ मिमी पाऊस झाला.

शहरासह जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला असला तरी अजूनही पावसाचा जोर वाढू शकलेला नाही. कधी भूरभूर, तर कधी हलक्या सरींचा अनुभव शहरवासी घेत आहेत. ग्रामीण भागातील काही तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यात १८३.३ मिमी पावसाची नोंद झाली. एकट्या मालेगाव तालुक्यात ७४ मिमी पाऊस झाला. पेठ तालुक्यातदेखील पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शुक्रवारी दिवसभरात पेठमध्ये ३५ मिमी पावसाची नोंद झाली. देवळा येथे १९.२, इगतपुरीत १९, बागलाणमध्ये ११ मिमी पाऊस झाला. नाशिक तालुक्यात ७.१ मिमी, त्र्यंबकेश्वरमध्ये पाच, येवल्यात चार तर कळवणमध्ये तीन मिमी पावसाची नोंद झाली. दिंडोरी, निफाड, सुरगाण्यात प्रत्येकी एक मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात सरासरी १२.२२ मिमी पाऊस झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाडावर कार आदळून चालक ठार

$
0
0

शहरात वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा मृत्यू

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर परिसरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार झाले. त्यात एका पादचाऱ्याचा समावेश आहे. कॉलेजरोड भागातील कृषीनगर येथील रहिवासी दीपक वसंत देशपांडे (६५ रा. साकव बंगला, मनोहर कॉलनी) हे शुक्रवारी नाशिक-पुणे हायवेने स्विफ्ट कारमधून (एमएच १५ सीटी ४४२०) प्रवास करीत असतांना कार झाडावर आदळल्याने त्यांचा मृत्यू झाला. बोधलेनगर परिसरातील श्रीकृष्ण लॉन्स समोर अपघात झाला. अपघातात कारचा चक्काचूर झाला असून, देशपांडे यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. दुसरा अपघात नाशिक-औरंगाबाद रोडवरील ओढा गावाजवळ झाला. भरधाव काळीपिवळीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. उमेश बाळासाहेब लहांगे (वय ३६) व रामदास जयराम लहांगे (वय २३, रा. दोघे रामाचे पिंपळस, ता. निफाड) हे दोघे भाऊ मंगळवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास नाशिक-औरंगाबाद रोडने आपल्या दुचाकीवर (एमएच १५ एफसी १७७१) प्रवास करीत असतांना ओढा गावाजवळ काळ्या पिवळी जीपने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. यामुळे उमेश लहांगे यांचा मृत्यू झाला. जखमी ज्ञानेश्वर यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास हवालदार लोहकरे करीत आहेत. दरम्यान, माडसांगवी येथील हिरामन महादेव बेंडकुळे हे मंगळवारी दुपारी आरटीओ बस स्टॉपवर रिक्षा घेण्यासाठी गेले असता पाठीमागून आलेल्या भरधाव अ‍ॅटोरिक्षाने त्यांना जबर धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार सोनवणे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माजी विद्यार्थ्यांकडून शाळेचा कायापालट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

आपल्या शाळेविषयीचे ऋण फेडण्याची संधी माजी विद्यार्थ्यांना मिळाली, तर शाळेचे रुपडे कसे बदलू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे गोखले एज्युकेशन सोसायटीची नाशिकरोड येथील जेडीसी बिटको इंग्लिश मीडियम स्कूल ही शाळा होय.

या शाळेतील १९८० पासूनच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत उभारलेल्या देणगीतून या शाळेचा कायपालट केला आहे. सर्व विद्यार्थ्यांना ई लर्निंगची सुविधा या शाळेत उपलब्ध झाली आहे. या शाळेचे यंदाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त १९८० पासूनच्या माजी विद्यार्थ्यांच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून एकत्र येऊन या शाळेचा अक्षरशः कायापालटच केला. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या बॅचचा एक प्रतिनिधी नेमून त्याच्याकडे देणगी जमा केली. प्रत्येक बॅचने एका कामाची जबाबदारी उचलली. गेल्या दोन महिन्यांपासून या शाळेत नूतनीकरणाचे काम सुरू होते. चालू शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी शाळेचे सुंदर रूप बघून आनंद व्यक्त केला.

सर्व काही नवेनवे...

या शाळेच्या इमारतीचे रंगकाम करण्यात आले असून, नवीन १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. स्पोर्ट्स रूम, सभागृह, प्राचार्य, पर्यवेक्षक, स्टाफ रूमचे नूतनीकरण करण्यात आले आहे. जुन्या ब्लॅकबोर्डची जागा एलसीडी प्रोजेक्टरने घेतली असून, संगणक आणि विज्ञान प्रयोगशाळेचे नूतनीकरण झाले. सर्व पोर्च आकर्षक करण्यात आले. विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी वॉटर प्युरिफायरही बसविण्यात आले आहे. व्यासपीठावर छत टाकण्यात आले आहे. ज्या बॅचने ज्या वर्गाचे काम केले त्या बॅचच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे. कॉरिडोरमध्ये आकर्षक पेंटिंग करण्यात आले आहेत. स्वच्छतागृहेही अद्ययावत करण्यात आली आहेत. पालक-शिक्षक संघानेही सहा एलसीडी प्रोजेक्टर शाळेला भेट दिले आहेत.

माजी विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी…

गुरुमितसिंग रेखी, नितीन जगळे, डॉ. अस्मिता जाधव, अरुण तलवाल, मनीष मिश्रा, दीपक पाटील, अजित कुलकर्णी, नितीन पेखळे, डॉ. परिक्षित निकम, रोहित ठक्कर, सैफुद्दिन सुबा, मोहित शर्मा, गुलशन ठाकूर, तन्मयी जोगळेकर, योगेश पठारे, प्रदीप अग्रवाल, प्रीती शहा, बाळासाहेब गायधनी, शशिराज शिसोदे, सचिन भांगरे, इम्रान मणियार, अतिष भावसार, राजू कुलथे, जमनादास पोसवाणी, शानू दलजितसिंग आदी १९८० ते २००७ पर्यंतच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी आपल्या या प्रतिनिधींमार्फत या शाळेच्या नूतनीकरणासाठी देणगी देऊन सामाजिक बांधिलकी जपली. माजी मुख्याध्यापक चंद्रशेखर नानकर यांनीही या कामात आर्थिक मदत केली. शाळेतील शिक्षकवृंद रोहिणी बटवाल, अनिल काळे, सुबोध चव्हाण यांनी उन्हाळ्याच्या सुटीत शाळेच्या नूतनीकरणाचे काम करवून घेतले.

शाळेचे आपल्यावर अनंत उपकार असतात. त्यांची परतफेड करण्याचा प्रयत्न आम्ही माजी विद्यार्थ्यांनी केला. सध्या शिक्षण घेत असलेल्या पिढीवरही यानिमित्ताने संस्कार होण्यास मदत होईल.

-गुरुमितसिंग रेखी, माजी विद्यार्थी

शालेय जीवनात संस्कारांचे मिळालेले धडे करिअरमध्ये यशस्वी होण्यास उपयुक्त ठरले. शाळेचे ॠण फेडण्यासाठी आम्ही माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेला पुनर्वैभव देण्याचा प्रयत्न केला

-रोहित ठक्कर, माजी विद्यार्थी

जीवन घडविणारे संस्कार ज्या शाळेत मिळाले त्या शाळेप्रति आपले काही तरी देणे लागते या भावनेतून आम्ही सर्व माजी विद्यार्थ्यांनी मिळून सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

-नितीन जगळे, माजी विद्यार्थी

आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ई लर्निंगसह अन्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने आम्ही सर्व माजी विद्यार्थ्यांनी देणगी जमा करून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

-तन्मयी जोगळेकर, माजी विद्यार्थिनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोन डिटेल्स दिल्यामुळे प्राणघातक हल्ला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

फोन डिटेल दुसऱ्याला दिल्यामुळे व्होडाफोन स्टोअरमध्ये शिरून एकावर प्राणघातक हल्ला करून राकड पळविणाऱ्या संशयितास पोलिसांनी अटक केली. त्याचा साथीदार मात्र फरार असून, या प्रकरणी इंदिरनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुप्रीम सुब्रमण्यम (२६ रा. साईराम अपार्ट. श्रद्धाविहार) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव असून, राज जोशी नावाचा त्याचा साथीदार फरार आहे. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली होती. कलानगर भागातील साई सेक्युलर व्होडाफोन स्टोअरमध्ये शिरून संशयीतांनी आमच्या फोनच्या डिटेल दुसऱ्याला का दिली, या कारणातून राजू अली अख्तर अली सय्यद व शाहरूख शेख याच्याशी वाद घातला. यावेळी संशयीतांनी शिवीगाळ करीत राजू सय्यद यांच्या डोक्यात वीट मारली. शाहरूख याच्या कमरेवर चॉपरने वार केला. यानंतर गल्यातील १२ हजार ७४० रूपयांची रोकड बळजबरीने काढून दोघांनी पोबारा केला. या घटनेत शाहरूख जखमी झाला असून, त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

--

घरासमोरून इनोव्हा चोरी

घरासमोर पार्क केलेली इनोव्हा चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना कृष्णनगर भागात घडली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक किसन सानप (रा.सिध्दी अपार्ट. कृष्णनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सानप यांनी त्यांचे मित्र अमित बाळकृष्ण अमृतकर यांची इनोव्हा कार (एमएच १५ डीएन ५७७७) बुधवारी (दि.१३) रात्री आपल्या घरासमोर पार्क केली असता चोरट्यांनी चोरून नेली.

--

पंचवटीत जुगारी गजाआड

दिंडोरीनाका भागातील देशी दारू दुकान परिसरात जुगार खेळणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली. संशयितांच्या ताब्यातून रोकड आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून, या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोद्दार देशी दारू दुकानाच्या बाजूला असलेल्या शेडमध्ये शुक्रवारी दुपारी करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी राहुल गायकवाड आणि त्याच्या चार साथिदारांना अटक केली. अधिक तपास हवालदार ठाकरे करीत आहेत.

--

खंडणीची मागणी

मिळकतीच्या वादावरून चौघांनी दोन लाख रुपयांची खंडणी मागत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना नाशिकरोड येथे घडली आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये नात्यातीलच चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेलरोडवरील लोखंडे मळा येथे असलेल्या पारिजातनगरमध्ये राजगृह बंगल्यात ५८ वर्षाच्या संजय सुदाम जाधव राहतात. कॉन्ट्रॅक्टर असलेल्या जाधव यांनी नाशिकरोड पोलिस स्टेशन पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार, २ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०१७ पर्यंत नाशिकरोडचा उड्डाणपुलाखाली संशयीत सुदाम सखाराम जाधव (वय ७४), संगीता आनंदा उन्हवणे ऊर्फ संगीता सुदाम जाधव, दिलीप आनंदा उन्हवणे व अन्य एक संशयित (सर्व रा. शिंदे गाव, नाशिक) यांनी संगनमत करून संजय जाधव यांच्याकडे मिळकतीच्या वादातून वेळोवेळी दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. ती दिली नाही, तर जिवे ठार मारण्याची धमकी संशयितांनी त्यांना दिली. यानंतर संशयितांनी त्यांना शिवीगाळ करीत दमदाटी केली.

--

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

कामटवाड्यातील वृंदावननगर भागात राहणाऱ्या १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा एकतर्फी प्रेम करणाऱ्या संशयीतासह त्याच्या साथीदारांनी विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये संशयीताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीत अजय, राजेन सिंग, प्रथमेश व त्यांचे इतर दोन मित्र (सर्वांची नावे व पत्ते पूर्ण माहीत नाही) यांनी शुक्रवारी (दि. २२) रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास कामटवाडा येथील संतोषी माता मंदिराजवळ असलेल्या कोमल बंगलोसमोर पीडितेचा रस्ता अडवला. यानंतर तिचा विनयभंग केला. पीडिता ही संशयीत अजय याला प्रेम करण्यास नकार देत असल्याने त्याने तिचा वारंवार पाठलाग करून प्रेम करण्याची जबरदस्ती केल्याचे मुलीने फिर्यादीत नमूद केले आहे.

--

जमीनमालकाची फसवणूक

पंचवटीतील दिंडोरी रोडलगत असलेल्या जमिनीचे बनावट साठेखत व मुखत्यारपत्र तयार करून अहमदाबाद येथे राहणाऱ्या वृद्धेची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदाबाद येथील सायन सिटी येथे असलेल्या अवध बंगलोमध्ये ६५ वर्षांचे गौतम शांतीलाल मिश्री हे राहतात. त्यांच्या फिर्यादीनुसार संशयित किशोर मोहनलाल सुगंध याने १ जून २००८ रोजी मिश्री यांच्या मालकीच्या पंचवटीतील दिंडोरी रोडलगत असलेल्या सिटी सर्व्हे नं. १३२/७/२ मधील ३९८५.५७ चौरस मीटरपैकी १४८५.७८ या क्षेत्राचे बनावट साठेखत व मुखत्यारपत्र तयार केले. ते तयार केल्यावर मिश्री व त्यांच्या नातेवाईकांच्या बनावट सह्या करून ते इम्पाऊट केले. संशयिताने यामध्ये मिश्री यांच्या वडिलोपार्जित जमिनीत स्वामित्वदोष निर्माण करून ते बनावट कागदपत्र खरे असल्याचे भासविले. या घटनेतील साक्षीदार हेमराज पाटील यांच्याकडून संशयिताने २० लाख रुपये घेऊन पुन्हा २० लाख रुपयांची मागणी करीत गौतम मिश्री व हेमराज पाटील यांची फसवणूक केली. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शेगर करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील ९ बाजार समित्यांमध्ये ‘ई-नाम’

$
0
0

व्यापारी-शेतकऱ्यांमध्ये सुसुंवाद वाढणार; फासवणूकही टळणार

दीपक महाजन, कळवण

शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल देशांतर्गत बाजारपेठेमध्ये कुठेही विक्री करता यावा यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ऑनलाईन नॅशनल अॅग्रीकल्चर मार्केट अर्थात ई-नाम सेवा केंद्र महाराष्ट्र शासनाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील १४५ बाजार समित्यांमध्ये ही सेवा देणार येणार असून त्यात नाशिक जिल्ह्यातील ९ बाजारसमित्यांचा समावेश करण्यात आला आहे. कळवण, देवळा, उमराणे, सटाणा, मनमाड, नांदगाव, सिन्नर, नामपूर, घोटी या बाजारसमित्यांमध्ये आगामी काळात ई नाम सेवा सुरू करण्यात येणार आहे.

शेतमालास अधिक दर व शेतकऱ्यांना रोख ऑनलाइन पेमेंट मिळावे म्हणून केंद्र सरकारने राष्ट्रीय कृषी बाजार (ई नाम) ही योजना आणली. या योजनेद्वारे प्रचलित बाजार व्यवस्थेतील शेतकऱ्यांची अनेक मार्गाने होणारी लूट थांबविणे हा हेतू आहे. ई नाम अंतर्गत देशभरातील प्रमुख बाजार समित्या जोडल्या जात आहेत. महाराष्ट्रातील ८५ बाजार समित्यांमध्ये ई लिलाव सुरू झाला असून, इतर १४५ बाजार समित्यादेखील ई नाम पोर्टलशी जोडण्याचा योजनेस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना चिथावणीचेही प्रकार होतात. व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करतात. याला आला घालण्यासाठी व शेतकऱ्याला संपूर्ण राज्यातील शेतमालाचे भाव कळण्यासाठी तसेच शेतमाल विक्री करतांना लागणारा वेळ व श्रम वाचवण्यास मदत होणार आहे. ई लिलावात छोटे व्यापारीही आपली बोली लावू शकतात.

आता राज्यातील १४५ बाजार समित्यांमध्ये व नाशिक जिल्ह्यातील ९ ठिकाणी ई लिलाव यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. ई नाम योजना एप्रिल २०१६ पासून कार्यान्वित असून राज्यातील ५८५ बाजार समित्या ई-नाम ला जोडण्याचे उद्दिष्ट मार्च २०१८ पर्यंत पूर्ण झाले आहे. याआधी राज्यात जागतिक बँक प्रकल्पांतर्गत २५ बाजार समित्या व ई नाम अंतर्गत ६० बाजार समित्यांमध्ये ई लिलाव पद्धतीची अंमलबजावणी सुरू आहे.

राज्य शासनाने पणन मंडळाच्या माध्यमातून बाजार समित्यांमध्ये सुरू केलेली ई नाम सेवा शेतकरी, बाजार समित्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला रास्तभाव, योग्यवेळी खात्यात पेमेंट उपलब्ध होणार आहे. प्रभावी अंमलबजावणीसाठी पणन मंडळामार्फत शेतकऱ्यांचे प्रभोधन करण्यात येणार आहे.---

सुनील पवार, संचालक, पणन मंडळ

राज्याच्या पणन मंडळाने ई-लिलाव पद्धत अवलंबली असून, ती शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल. ग्रामीण भागातील शेतकऱ्याला या आधुनिक तंत्रज्ञानच्या युगात शेतमाल विक्री करतांना वेळ, श्रम तसेच मोठ्या प्रमाणात होणारी आर्थिकहानी रोखता येणार आहे.

कृष्णा पगार, शेतकरी, कळवण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनोरजवळ अपघातात नाशिकचे तिघे ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पालघर

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोरजवळ ट्रॅक्स- जीप व टेम्पोच्या भीषण अपघातात नाशिक येथील टेम्पोचा चालक आणि ट्रॅक्समधील दोन जण ठार झाले, तर चार जण जखमी झाले. मनोरपासून १४ किमीवरील वरई गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. टेम्पोचालक करीम बिन महमद हुसेन व ट्रॅक्समधील विजय समस्कर व मनोज तानाजी देशमुख अशी मृतांची नावे असून, ते नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील आहेत. जखमींना विरार येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ट्रॅक्स मुंबईच्या दिशेने जात असताना चालकाचा ताबा सुटला आणि कमी उंचीचा रस्ता दुभाजक तोडून ट्रॅक्सने समोरून येणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपासाधिकारी बदलासाठी दबाव

$
0
0

दमानियासह संशयितांना वाचविण्याचा प्रयत्न; पोलिस अधीक्षकांवर आमदार खडसेंचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

खोटे डीडी व धनादेश कायकोर्टात सादर केल्याप्रकरणी अंजली दमानिया, गजानन मालपुरे यांच्यासह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दमानिया यांच्या मागणीवरून पोलिस अधीक्षकांवर आर्थिक किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीचा दबाव आल्याने त्यांनी तपासाधिकारी बदलविल्याचा खळबळजनक आरोप माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी शनिवारी (दि. २३) पत्रकार परिषदेत केला.

या प्रकरणी पोलिस अधीक्षकांकडून गुन्ह्यातील संशयित आरोपी दमनिया व त्यांच्या साथीदारांना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याने या विरोधात आपण हायकोर्टात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या वेळी खडसे यांनी सांगितले, माझ्या विरोधात दमानिया यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत जोडलेल्या कागदपत्रांमधील डीडी व धनादेश खोटे असल्याचे यापूर्वीच तत्कालीन पोलिस अधीक्षकांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. याबाबत मी पोलिसात केलेल्या तक्रारीला पोलिस प्रशासनाकडून टाळाटाळ होत होती. विशेषत: पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे जळगाव जिल्ह्यात बदलून आल्यापासून हा प्रकार सुरू होता. त्यामुळे मुक्तार्इनगर कोर्टात तक्रार केली. त्यानंतर कोर्टाने पोलिसांना गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले, असेही खडसे यांनी सांगितले.

मोठे मासे समोर येणार
मुक्तार्इनगरचे तपासाधिकारी पोलिस निरीक्षक कडलग यांनी तपास सुरू करून चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतेले. या प्रकरणी त्यांच्या चौकशीत अंजली दमानिया यांचेच नाव पुढे आल्याचेही खडसे म्हणाले. त्यानंतर ज्या बँकेचे खोटे डीडी होते. तेथील काही जणांनाही पोलिसांनी अटक केली असून, त्यांना ७ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. त्यांच्या नातेवाइकांनी आपल्याला भेटून अनेकांच्या नावाचे खोटे धनादेश केल्याची माहिती दिल्याचेही आमदार खडसे यांनी स्पष्ट केले. या चौकशीत अजून अनेक मोठे मासे पोलिसांच्या हाताला लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

संशयास्पदरित्या बदलले तपासाधिकारी
एकीकडे तपास प्रगतीवर असतानाच ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहे, त्या अंजली दमानिया यांनी पोलिस अधीक्षक कराळे यांना मेल करून तपासाधिकारी यांच्याबाबत तक्रार करून त्यांना बदलण्याची मागणी केली. त्यांच्या सूचनेनुसार पोलिस अधीक्षकांनी लगेच निरीक्षक यांची बदली करून तपास सहाय्यक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे दिला. त्यामुळे पोलिस अधीक्षकांची ही भूमिका संशयास्पद असून, आर्थिक किंवा मोठ्या व्यक्तीच्या दबावातून ही कार्यवाही केल्याचा आरोप खडसे यांनी केला. संशयित आरोपीच्या सूचनेवरून तपासाधिकारी बदलल्याची ही खूप दुर्मिळ व बेकायदेशीर घटना असल्याचे आमदार खडसे म्हणाले.

एसपींचा गुन्हेगारांना पाठींबा
जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अशाप्रकारे गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे. त्यांनी कायदा खुंटीला टाकला असून, अंजली दमानिया पोलिसांना आव्हान देत असतानादेखील त्यांना अटक का होत नाही, असा सवाल आमदार खडसे यांनी उपस्थित केला. तसेच दमानिया यांना अटक होत अधिक्षक त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही खडसे यांनी म्हटले. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही ते म्हणाले. अमळनेर सध्या अवैध धंद्याचे माहेरघर झाल्याचेही ते म्हणाले.

प्रकरण दडपल्याने एसपींना प्रमोशन मिळणार
मी एसपी कराळे यांच्या बदलीची मागणी करणार नाही. हे प्रकरण दडपल्याने त्यांना प्रमोशन मिळणार असल्याचा टोलाही खडसेंनी लगावला. एसपी कराळे यांच्या कार्यक्षमतेमुळे जळगावात अवैध धंदे बोकाळल्याचा उपाहास त्यांनी केला. जळगाव जिल्ह्यात मुलांना मारहाण, समता नगरातील मुलीवर अत्याचार करून हत्या इतरही घटना घडत असताना एसपी कराळे तिकडे लक्ष न देता या गुन्ह्यावरच लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले.

मला अक्कल शिकवू नये
जिल्हाध्यक्षांच्या राजीनाम्याच्या वक्तव्याबाबत आमदार खडसे यांनी यावेळी खुलासा केला. ते म्हणाले, भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी चुकीचे काम केले नसेलच पण आरोपांची चौकशी होर्इपर्यंतच त्यांनी राजीनामा द्यावा. भाजप नैतिकमूल्य असलेला पक्ष असून, मीही राजीनामा दिला होता. विशेष म्हणजे, ही बाब पक्ष शिस्तीप्रमाणे प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्याशी बोललो होतो. तसेच या पत्रकार परिषदेसाठीही त्यांनी परवानगी घेतल्याचे आमदार खडसेंनी स्पष्ट केले. मला ४० वर्षे भाजप पक्षात झाले त्यामुळे शिस्त मलाही माहिती आहे. त्यामुळे मला कुणी अक्कल शिकवू नये, असेही ते म्हणाले. माझ्याविरुद्धच्या षडयंत्रात एका मंत्र्याचा हात असल्याचा आरोपाबाबत, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तेहेतीस देशांच्या नोटा अन् नाण्यांचा खजिना!

$
0
0

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

प्रत्येक माणूस आपल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी पैशाच्या मागे धावत असतो. पैसा कमावणे आणि खर्च करणे ही जगण्याची सर्वसाधारण प्रक्रिया. मात्र, देवळाली कॅम्पमधील शिनू जोस या फुटबॉलप्रेमी तरुणाने या प्रक्रियेला छेद देत तब्बल ३३ देशांच्या चलनी नोटा व नाण्यांचा संग्रह केला आहे.

आठ वर्षांपूर्वी कामानिमित्त दुबईमध्ये गेलेल्या शिनूने तोपर्यंत केवळ भारतीय चलनी नोटाच हाताळल्या होत्या. मात्र, या विदेशवारीत दुबईमधील दिराम, कुवैतमधील दिनार, सौदीमधील रियाल, पाकिस्तानी रुपये अशा विविध नोटा व नाणी पाहून भारावलेल्या शिनूने त्यांचा संग्रह करण्याचा निर्धार केला. दुबईहून परतल्यानंतर देवळालीत आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी दर्शनी भागात विविध देशांचे चलन ठेवले असून, तेथे येणारे ग्राहकही हा खजिना पाहताना हरखून जात आहेत.

शिनूच्या संग्रहात सध्या भारतासह अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, कॅनडा, सिंगापूर, जमैका, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, कुवैत, ओमान, दुबई, पाकिस्तान, बहारीन, बांगलादेश, नेपाळ, टांझानिया, व्हेनेझुएला,पेरू, मलेशिया, भूतान, सुदान, श्रीलंका, इंडोनेशिया, इराण, इराक, हाँगकाँग, नायजेरिया, जॉर्जिया, जॉर्डन, सिएरा लिओन, कॅमेरून आदी देशांतील नोटा व नाणी आहेत. या विविध देशांतील रुपया, दिराम, रियाल, दिनार, शिलांग, डॉलर, येन, पौंड, नायरा, रिंगिट, युरी, टका, रुबल, लिओनी, सोल, लारी, जॉर्जे, सेंट, फ्रँक आदी प्रकारचे १ रुपयापासून १० हजारांपर्यंतच्या किमतीचे चलन पाहावयास मिळते.

--

दुर्मिळ अन् अनोख्या क्रमांकांच्या नोटा

भारतीय चलनातील १९१९ सालातील १ पैसा ते अगदी आतापर्यंतच्या २ हजार रुपये किमतीच्या नाणी व नोटा, तसेच स्वतंत्र पाकिस्तानचे पहिले चलनही शिनूच्या संग्रही आहे. जगातील सर्वांत कमी मूल्याचे इंडोनेशियातील, तर सर्वांत जास्त मूल्याचे बहारीनमधील दिनारदेखील (भारतीय चलनानुसार एक दिनार म्हणजे १८० रुपये) त्यात आहे. याशिवाय एकूण ३३ देशांतील ७८ प्रकारच्या नोटा या संग्रहात आहेत. सलग क्रमांक असणाऱ्या नोटा, एकाच अंकाच्या नोटा क्वचितच कोणाला तरी मिळतात. शिनूच्या संग्रहात अशा एक रुपयापासून ते एक हजार रुपयांपर्यंतच्या एकाच आकड्याच्या सहा क्रमांक (११११११, ३३३३३३), जोड आकड्याच्या (९३०९३०) चार, तीन, दोन व एकच अंक असलेल्या नोटादेखील उपलब्ध आहेत. चढत्या क्रमाने असलेल्या अंकांच्या नोटाही या संग्रहात आहेत.

--

विविध देशांच्या नोटा व नाण्यांच्या संग्रहाला नागरिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळत आहे. ३३ देशांच्या नोटांसह आणखी नाणी आणि नोटा ठेवण्यासाठी परदेशातून कॉइन व करन्सी अल्बम मागवून घेत संग्रह केला आहे. यापुढेही हा संग्रह वाढविणार आहे.

-शिनू जोस, संग्राहक

(अँकर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववसाहतीत खड्ड्यांची डोकेदुखी

$
0
0

कच्च्या रस्त्याच्या समस्यांनी रहिवासी हैराण; चिखलाने रहदारीस अडथळा

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक शहर परिसरात नववसाहतींची दिवसेंदिवस वाढत होत असताना त्यांना सुविधा दिल्या जात नाहीत. विशेषतः रस्त्यांच्या सुविधांच्या बाबतीत अत्यंत दुर्लक्ष झालेले आहे. या वसाहतीत रहिवाशांसाठी रस्त्यांच्या खड्ड्यांची डोकेदुखी वाढली आहे.

कच्च्या रस्त्यांच्या समस्यांनी नवसाहतीतील नागरिक हैराण झाले आहेत. पावसाळ्यात कच्च्या रस्त्यांची समस्या गंभीर होत असल्यामुळे मुख्य रस्त्यांपासून घरापर्यंत कसे पोहचायचे ही समस्या पंचवटीतील औरंगाबाद रोडलगत कैलास नगर परिसराजवळच्या वस्तीत मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे.

कैलास नगरजवळच्या भागात दक्षिणेला औरंगाबाद रोड आणि पश्चिमेला अमृतधामकडून येणारा रिंगरोड असे दोन मोठे रस्ते आहेत. या भागात गेल्या आठ-दहा वर्षांपासून नववसाहती तयार होत आहेत. त्यात सध्या वाढ झाली असून, मोठी गृहसंकुले, रो-हाऊस उभरण्यात आली असली तरी त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी अजून पक्के रस्तेच तयार झालेले नाहीत. हिवाळा आणि उन्हाळ्यात रस्त्यांची समस्या फारशी जाणवत नाही. मात्र, पावसाळा सुरू झाला की येथील रहिवाशांना घरातून बाहेर पडणे आणि बाहेरून घरापर्यंत येणे अवघड होत आहे.

वाहनचालकांची कसरत

यंदा पावसास अजून चांगली सुरुवात झालेली नसली तरी येथील वस्ती अंतर्गत असलेल्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले असून, सर्वत्र चिखल झालेला आहे. या रस्त्याने दुचाकी चालविण्यासाठी वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागते. येथे पायी चालणे तर मुश्किलच होते. खड्ड्यातील पाणी, गाळ, चिखल तुडवीत पुढे जाताना अनेकदा पाय घसरून पडण्याचे प्रकार घडतात. विशेषतः, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुले यांना त्रास होत आहे. काही रस्त्यांवर खोल खड्डे पडलेले आहेत. त्यातून मार्ग काढताना गुडघ्यापर्यंत पाय अडकत आहेत. रस्त्यांच्या या असुविधांमुळे येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मतदार नोंदणीत बीएलओंचे आस्ते कदम

$
0
0

निम्मेच काम पूर्ण; उद्दिष्ट पूर्तीचे निर्देश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अद्ययावत मतदार यादी तयार करण्यासाठी घरोघरी जाऊन मतदार नोंदणीचे काम बीएलओंनी (बूथ लेव्हल ऑफिसर) हाती घेतले आहे. परंतु, आतापर्यंत त्यांनी निम्म्याच घरांना भेटी दिल्याचे जिल्हा\R प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे मुदत संपूनही निम्मेच काम होऊ शकल्याने उर्वरित उद्दिष्ट तातडीने पूर्ण करा, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने संबंधितांना दिले आहेत.

पुढील\R वर्षी\R लोकसभेसह\R विधानसभा निवडणुकांचा बिगूल वाजणार आहे. त्यामुळे\R निवडणूक\R प्रक्रिया हाताळणाऱ्या निवडणूक यंत्रणेची\R जबाबदारी\R वाढली\R आहे. निवडणूकीपूर्वी निर्दोष आणि अद्ययावत मतदार याद्या तयार करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेवर सोपविली आहे. निवडणूक आयोगाने मतदार\R याद्या\R शुद्धीकरणाचा\R कार्यक्रम\R जाहीर\R केला\R आहे. दोषरहित मतदार\R याद्या\R तयार\R करण्याचे\R निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात\R जवळपास\R दीड\R लाख\R मतदारांची\R दुबार नावे\R असून, मतदार यादीमध्ये अनेकांचे\R रंगीत\R फोटो\R नाहीत. काहींची नावे तसेच निवासाचे पत्ते\R चुकीचे\R नोंदविले आहेत.\R अनेक मतदारांकडे\R मतदार\R ओळखपत्रही\R नाही\R. स्थलांतरीत\R तसेच मृत्यू झालेल्या अनेक मतदारांची\R नावेही\R यादीमध्ये कायम\R आहेत. या सर्व त्रूटी दूर करून अद्ययावत आणि निर्दोष मतदार यादी तयार करण्याचे काम निवडणूक शाखेने हाती घेतले आहे. १५\R मे\R ते\R २०\R जूनपर्यंत\R या कालावधीत\R मतदार\R याद्या\R शुद्धीकरणाचा\R कार्यक्रम\R बीएलओंच्या मदतीने राबविण्यास सुरुवात झाली. परंतु,\R या कामाबाबत बीएलओ कमालीचे उदासीन असल्याचा प्रत्यय जिल्हा प्रशासनाला आला आहे.

अवघे \R ५७ टक्के काम\R पूर्ण\R

जिल्ह्यात\R ११\R लाख\R २१\R हजार\R ६५८\R घरापर्यंत\R पोहचण्याचे\R उद्दिष्ट\R बीएलओंना देण्यात\R आले\R होते. परंतु, बीएलओंना २०\R जून २०१८ पर्यंत\R अवघ्या\R सहा लाख\R ४५\R हजार\R ९३७\R घरांना\R भेटी\R देणे शक्य झाले आहे. याचाच अर्थ एकूण\R टक्केवारीच्या\R अवघे \R ५७ \R टक्के \R काम\R पूर्ण\R करण्यात\R बीएलओंना यश आले आहे. मे\R महिन्यात\R सुट्या\R असल्याने\R घरभेटी\R कमी\R झाल्या असे जिल्हा प्रशासनाला सांगितले जात आहे. \R

दाट लोकवस्तीत सर्वात कमी नोंदणी

जिल्ह्यात\R ४३\R लाख\R १५\R हजार\R ५८०\R मतदार\R असून,\R मोहीम\R सुरू\R होण्यापूर्वी\R चार लाख\R २\R हजार\R १४४\R मतदारांच्या\R घरांना\R भेटी\R देण्यात\R आल्या.\R मोहीम\R सुरू\R झाल्यानंतर\R ११\R लाख\R २१\R हजार\R ६५८\R मतदारांच्या घरी जाऊन पडताळणी\R करण्याचे\R उद्दिष्ट\R होते. त्यापैकी\R ६\R लाख\R ४५\R हजार\R ९३७\R मतदारांच्या घरापर्यंत बीएलओ पोहोचू शकले आहेत. म्हणजे ५७\R.५९\R टक्के\R घरभेटी होऊ शकल्या आहेत. नाशिक\R पश्चिम मतदारसंघात\R अत्यंत दाट लोकवस्ती आहे. या भागात अवघ्या\R ८\R टक्के\R मतदारांच्या\R घरापर्यंत बीएलओ पोहोचले आहेत. उर्वरित मतदारांची नोंदणी केव्हा करणार असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वस्त तूरडाळीची प्रतीक्षाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वस्त धान्य दुकानांमधून ३५ रुपये किलो दराने तूरडाळ उपलब्ध करून देण्याची घोषणा राज्य सरकारने केली असली तरी अद्याप ती ग्राहकांना उपलब्ध होऊ शकलेली नाही. जिल्हा पुरवठा विभाग मागणीचा अंदाज घेत असून, लवकरच त्याबाबतचा प्रस्ताव पाठविला जाईल, असे या विभागाकडून सांगण्यात आले.

दरवर्षी साधारणत: या कालावधीत तूरडाळीचे दर गगनाला भिडतात. खुल्या बाजारामध्ये एक किलो डाळीसाठी १०० रुपयांहून अधिक दर मोजावा लागतो. नागरिकांना अशा दरवाढीला सामोरे जावे लागू नये, याकरिता सरकारनेच पावले उचलण्यास सुरुवात केली. गतवर्षी तूरडाळीचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असताना ८५ रुपये किलो दराने ही डाळ रेशनवर उपलब्ध करून देण्यात आली. गतवर्षीचा अनुभव गाठीशी असल्याने सरकारने यंदाही कमी दराने तूरडाळ देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांची संख्या पाहता महिन्याला सुमारे ५५० ते ६०० क्विंटल तूरडाळीची आवश्यकता भासू शकते. ३५ रुपयांमध्ये पॉलिश न केलेली डाळ रेशनवर देण्यात येणार आहे. अंत्योदय तसेच प्राधान्यक्रम वाल्यांना ही डाळ मिळू शकणार आहे. नेमकी किती डाळ हवी याचा अंदाज अद्याप पुरवठा विभागाला बांधता आलेला नाही. त्यामुळे प्रत्यक्षात स्वस्त डाळ केव्हा मिळणार याची प्रतीक्षा ग्राहकांना लागली आहे.

महिनाभरापूर्वी घोषणा; मात्र मागणी नाही

स्वस्त धान्य दुकानांमधून ३५ रुपये दराने तूरडाळ देण्याची घोषणा एक महिन्यापूर्वी करण्यात आली. घोषणेनंतर जिल्हा पुरवठा विभागाने त्यांच्याकडे उपलब्ध असलेली ५५ रुपये किलोची काही तूरडाळ परत केली, तर काही विक्री केली. परंतु, ३५ रुपये किलो दराच्या डाळीची मागणी अद्याप करण्यात आलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅम्पमध्ये आजपासून धडक कारवाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

येथे आज, रविवारी (दि. २४) भरणाऱ्या आठवडेबाजारापासून प्लास्टिकच्या पिशव्या वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आरोग्य अधीक्षक सतीश भातखळे यांनी दिली.

राज्यभरात शनिवारपासून प्लास्टिक वापरण्यावर बंदी घालण्यात आलेली असून, कोणी प्लास्टिकची पिशवी बाळगल्यास ५ हजारांपासून ते २५ हजारांपर्यंत दंडाची कारवाई केली जात आहे. कॅन्टोन्मेंट अॅक्ट २८९ (५) प्रमाणे देवळाली कॅन्टोन्मेंट हद्दीत याआधी प्लास्टिक कॅरिबॅग वापर करणाऱ्या नागरिक व व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करीत ६ किलो कॅरिबॅग जप्त करून त्यांच्याकडून १५ हजारांहून अधिक दंड आकारण्यात आलेला आहे. दंड ना भरणाऱ्या चार जणांविरोधात या प्रकरणी न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. आता राज्य सरकारनेदेखील बंदी घातल्याने दुकानदार, मॉलधारकांसह ग्राहकांवरही कारवाई करण्यात येणार आहे. तिसऱ्यांदा जो कोणी प्लास्टिक वापर करताना सापडेल त्याला तीन महिन्यांचा तुरुंगवास आणि २५ हजारांचा दंड होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने यापुढे कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. आठवडेबाजारात ज्या विक्रेत्यांकडे अथवा ग्राहकाकडे प्लास्टिकच्या पिशव्या आढळून येतील अशांविरुद्ध आज प्राथमिक स्वरूपाची दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय काही व्यावसायिक दुकानांसह हॉटेल्सवरदेखील सतत कारवाई सुरू राहणार आहे. त्यामुळे देवळालीवासीयांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक नियमाचे २३,३७७ जणांना प्रशिक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने नाशिक फर्स्टतर्फे ट्रॅफिक एज्युकेशन पार्क येथे देण्यात येत असलेले प्रशिक्षण वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. एका वर्षात या उपक्रमांतर्गत ४६३ भागांमध्ये २३ हजार ३७७ जणांना येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ५३ हजार ८०० व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात आले असून, वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यात यश मिळाल्याची माहिती नाशिक फर्स्टचे चेअरमन अभय कुलकर्णी यांनी दिली.

रस्ते अपघातात मृत्युमुखी पडत असलेल्या व्यक्तींची संख्या अतिशय मोठी आहे. वाहतूक नियमांची माहिती नसणे, वेगमर्यादेचे उल्लंघन यामुळे सर्वाधिक अपघात होत होतात. हे चित्र बदलण्यासाठी नाशिक फर्स्टतर्फे चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्कमध्ये मोफत प्रशिक्षण दिले जाते. शालेय विद्यार्थी, महिला, स्कूल बस चालक, कॉलेजचे विद्यार्थी अशा सर्वांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करून जनजागृती केली जात आहे. यामध्ये २०१७-१८ या एका वर्षात ४६३ प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले होते.

एका वर्षात दिलेले प्रशिक्षण

- अॅडल्ट ट्रेनिंग : ६ हजार १९४

- आरटीओशी समन्वय : ७ हजार १६७

- शालेय विद्यार्थी : १० हजार १६

- एकूण : २३ हजार ३७७

आरटीओ आणि पोलिस खाते यांच्या समन्वयाने अनेक प्रशिक्षणवर्गांचे आयोजन केले जात आहे. आतापर्यंत स्कूलबस चालक, कॉलेजचे विद्यार्थी सर्वांकडूनच खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे यापुढेही विविध प्रशिक्षणवर्ग आयोजित करण्याकडे आमचा भर आहे.

- अभय कुलकर्णी, चेअरमन, नाशिक फर्स्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचार थंडावला!

$
0
0

विधान परिषद निवडणूक

उद्या मतदान; शेवटच्या दिवशी गाठीभेटींवर भर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषदेच्या नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाचा प्रचार थंडावला असून, शनिवारी अधिकृत प्रचाराची सांगता झाली. या निवडणूक रिंगणात १६ उमेदवार असले तरी अंतिम टप्प्यात पंचरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी शिक्षकांसह शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची गाठभेट घेऊन तसेच, राजकीय वजन वापरून आपले अस्तित्व दाखविण्याचा कसोशिने प्रयत्न केला. मात्र, प्रत्येक जिल्ह्यातील मतांच्या विभाजनावर दुसऱ्या उमेदवाराच्या विजयाचे समीकरण ठरणार आहे.

नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी सोमवारी (दि.२५) मतदान होणार आहे. विभागातील अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक व नंदुरबार कार्यक्षेत्र असलेल्या या मतदारसंघात १६ उमेदवार आपले नशीब आजमावित आहेत. मात्र शिक्षकांच्या या मतदारसंघात राजकीय शिक्षणसम्राटांनी उड्या घेतल्याने हा मतदारसंघही राजकीय आखाडा झाला. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात विजयासाठी नगर, धुळे, जळगाव जिल्ह्यातील प्रत्येकी एक, नाशिकमधील तीन उमेदवारांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे. भाजपचे अनिकेत पाटील, शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे, राष्ट्रवादी पुरस्कृत संदीप बेडसे, अपक्ष प्रतापदादा सोनवणे आणि टीडीएफचे भाऊसाहेब कचरे पाटील यांच्यात पंचरंगी लढत होत आहे. शिक्षक लोकशाही आघाडीचे पहिले उमेदवार म्हणून प्रचारात उतरलेले संदीप बेडसेंची खरी भिस्त ही धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यातील मतदारांवर आहे. भाजपच्या अनिकेत पाटील यांच्या विजयासाठी शेवटच्या टप्प्यात भाजपने जोर लावला असून, थेट मंत्र्यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. पाचही जिल्ह्यातील मतदारांचे होणारे विभाजन अन् माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील यांच्या पुण्याईवर त्यांचे भवितव्य ठरणार आहे. शिवसेना पुरस्कृत किशोर दराडेंनी प्रभावी प्रचार यंत्रणा राबवून निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. मात्र पैठणी अन् लक्ष्मीदर्शन हे तंत्र शिक्षकांना किती भावते यावर त्यांच्या विजयाचे समीकरण अवलंबून आहे. केवळ दराडेंच्या प्रचार यंत्रणेवर जोरदार आक्षेप घेत नगरच्या भाऊसाहेब कचरे यांनी शिक्षकांच्या प्रश्नांवर फुंकर मारत भावनिक आवाहन करीत शिक्षकांना साद घातली आहे. मात्र शिक्षकांना घातलेली ही साद प्रत्यक्षात मतात रुपातंरीत होते की नाही यावर त्यांचा विजय अवलंबून आहे. त्यामुळे ही निवडणूक आता पंचरंगी झाली आहे.

प्रचाराचा ज्वर लक्ष्मीदर्शनावर

या निवडणुकीच्या प्रचारात प्रांतवाददेखील मोठ्या प्रमाणात उफाळून आला आहे. खांदेशपट्टा व नाशिक, नगर असा पध्दतीने अंतिम टप्प्यात जोरदार प्रचार झाला. उघड प्रचाराचा ज्वर 'लक्ष्मीदर्शना'वर येऊन पोहचला आहे. शेवटच्या टप्प्यात शिक्षकांच्या पार्ट्या आणि लक्ष्मीदर्शनाच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे शिक्षकांचाही प्रतिमा मलीन झाली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत शिगेला पोहचलेल्या या निवडणुकीत मतदारराजा असलेल्या शिक्षकांपर्यंत पोहचण्यात नेमके कोण यशस्वी होते हे प्रत्यक्ष गुरुवारीच (दि.२८) मतपेट्या फुटल्यावर दिसून येईल.

आता छुपा प्रचार

शनिवारी उघड प्रचाराचा जोर संपला असला तरी उमेदवारांनी शिक्षक मतदारांच्या संपर्कासाठी आपली छुपी यंत्रणा कामाला लावली आहे. कॉल सेंटरच्या माध्यमातून शिक्षकांशी संपर्क साधून गाठीभेटी घेतल्या जात आहेत. उमेदवारांनी प्रत्येक जिल्ह्यावर उभारलेल्या यंत्रणांच्या माध्यमातून संपर्क साधला जात असून, मतदान ओढण्यासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. निवडणुकीसाठी २५ रोजी मतदान असले तरी शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांच्या गाठीभेटी कार्यकर्त्यांमार्फत घेतल्या जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images